Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

अंबाबाई आरतीवरून वादाची ठिणगी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या नित्यआरतीला काही ठराविक महिला भाविक गर्दी करतात. यामुळे इतर महिला भाविकांची अडवणूक होते. या पार्श्वभूमीवर महिला भाविकांच्या गर्दीला हटवण्यावरून देवस्थान समितीच्या सदस्या संगीता खाडे आणि काही महिला भाविक यांच्यात वाद झाला. आरतीला थांबू न देणे चुकीचे असल्याची महिला भाविकांची तक्रार आहे तर पर्यटक महिला भाविकांनाही आरतीला थांबण्याची संधी मिळाली पाहिजे, अशी भूमिका देवस्थान समितीने मांडली आहे.

दररोज आरतीला उपस्थित राहण्याचाही अनेक महिला भाविकांचा शिरस्ता आहे. स्थानिक महिला पितळी उंबऱ्याच्या आत बसून राहत असल्यामुळे पर्यटक महिला भाविकांना पेटी चौकात जाता येत नाही. शिवाय आरतीचा लाभही घेता येत नाही.

याबाबत संगीता खाडे म्हणाल्या, 'पर्यटक महिला भाविकांना आरतीचा लाभ मिळावा यासाठी स्थानिक महिला भाविकांनी पुढाकार घेतला पाहिजे. आरतीच्यावेळी काही स्थानिक महिला मक्तेदारी करण्याचा प्रयत्न करतात. पर्यटक भाविकांनाही शंखतीर्थ आरती पाहण्याची इच्छा असते.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रंकाळ्यासमोरील वन-वे त्रासदायक

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

फुलेवाडी मार्गावरील डी मार्ट समोरील रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा बंद करण्यात आला आहे. डी मार्ट समोरील हा रस्ता उखडला आहे. ​रसत्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. अर्धवट कामांमुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेला रस्ता सुरू करण्यासाठी गेल्या महिन्यात शेतकरी कामगार पक्ष व टोल विरोधी कृती समितीतर्फे आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनानंतर २९ मे रोजी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता.

आयआरबी कंपनीने हा रस्ता केला आहे. मात्र रस्त्याचे काम अर्धवट राहिल्यामुळे गेली दोन वर्षे शालिनी पॅलेसकडून रंकाळा टॉवरकडे येणारा डी मार्ट समोरील एकेरी मार्ग वाहतुकीसाठ बंद होता. या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या मार्गावरून वाहतूक सुरू करावी यासाठी शेकाप आणि टोल विरोधी कृती स​मितीने आंदोलन केले होते. आंदोलन होऊन महिना होण्याच्या अगोदरच हा रस्ता पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या संदर्भात महापालिकेचे उप शहर अभियंता एस. के. माने यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अॅप’ च्या माध्यमातून राजर्षींना मानाचा मुजरा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजर्षी शाहू महाराजांचे विचार जगभरात पोहचवण्यासाठी येथील दोन युवकांनी 'राजर्षी शाहू' हे अँड्राईड अॅप्लीकेशन तयार केले आहे. शाहू महाराजांच्या का​रकिर्दीची माहिती व त्यांनी घेतलेल्या क्रांतीकारक निर्णय या 'अॅप' च्या माध्यमातून मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तीन भाषांमधून उपलब्ध होणार आहेत. शाहू जयंतीपासून हे अॅप उपलब्ध होणार आहे.

राकेश मधाळे व रफी मोकाशी या तरुणांच्या फँटासॉफ्ट स्टुडिओमध्ये या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. आधुनिक डिजीटल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अॅप तयार करुन शाहू महाराजांना मानाचा मुजरा केला असल्याच्या या दोन तरुणांच्या भावना आहेत. शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित हे पहिलेच अॅप असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तीन भाषेमध्ये ते उपलब्ध असून कोल्हापूरच्या पर्यटनाचीही माहिती देण्यात आली आहे. यासाठी युवराज संभाजीराजे, इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत, डॉ. पद्मा पाटील, अजेय दळवी, विजय टिपुगडे यांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नोबेल’ला जूनअखेरची मुदत

0
0

म. टा. प्र​तिनिधी, कोल्हापूर

रस्ते विकास प्रकल्पांतर्गत कोल्हापुरात साकारलेल्या रस्त्यांच्या मूल्यांकनाचा किंमतीसह अहवाल (ड्राफ्ट रिपोर्ट) जून महिन्याच्या अखेरपर्यंत देण्याचा आदेश नोबेल कंपनीला दिला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी व नोबेल कंपनीच्या प्रतिनिधींची मुंबईत येथे आढावा बैठक झाली. या बैठकीत आतापर्यंतच्या मूल्यांकनाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी नोबेल कंपनीने दहा रस्त्यांच्या मोजमापाचा अहवाल एमएसआरडीकडे सादर केला.

आयआरबी कंपनीने कोल्हापुरात ४९ किलो मीटर लांबीचे रस्ते केले आहेत. शहरात १३ रस्त्यांची बांधणी करण्यात आली आहे. तथापि रस्त्यांचा निकृष्ट दर्जा आणि अपुऱ्या कामांना टोल विरोधी कृती स​मितीने आक्षेप घेतला आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार सध्या रस्त्यांच्या फेर मूल्यांकनाचे काम सुरू आहे.रस्ते मूल्यांकनासाठी राज्य सरकारने पाच ​सदस्यीय समिती नेमली आहे. तर प्रकल्पाचे प्रत्यक्ष मूल्यांकन करण्याचे काम नोबेल कंपनीला दिले आहे. कंपनीला प्रकल्पाचे मूल्यांकन करण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ दिली होती. १५ जूनला ही मुदत संपली आहे. कंपनीने शहरातील तेरा रस्त्यांची लांबी, रूंदीच्या मोजमाप, तयार रस्ते, अपुरे रस्ते, न झालेले रस्ते या कामाचा अहवाल तयार केला आहे. सध्या शहरातील तेरा रस्त्यांचे मटेरिअलचे नमुने तपासणीसाठी घेतले जात आहेत. प्रत्येक रस्त्यावर एक मीटर खड्डा खोदून नमुने घेतले जात आहेत.

एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक सुरेश रामचंदानी, मुख्य अभियंता बी. एन. ओहळ, उप अभियंता एन. आर. भांबुरे, अधीक्षक अभियंता पी. एस. आवटी यांच्या उपस्थितीत मुंबई येथे मूल्यांकनाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी नोबेल कंपनीच्या प्रतिनिधींनी मूल्यांकनची माहिती दिली. रामचंदानी यांनी कंपनीच्या प्रतिनिधींना जून महिन्याच्या अखेरपर्यंत प्रकल्पाचा मूल्यांकन अहवाल (किंमती) देण्याचा आदेश दिला असल्याचे वृत्त आहे.

मूल्यांकन समितीचे अध्यक्षपद रिक्त

फेर मूल्यांकन समितीचे अध्यक्ष संतोषकुमार यांची जीवन प्राधिकरणकडे बदली झाली आहे. यामुळे फेर मूल्यांकन समितीचे अध्यक्षपद सध्या रिक्त आहे. राज्य सरकारकडून अद्याप या समितीच्या अध्यक्षपदी कुणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. मूल्यांकनाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. यामुळे अध्यक्षपद रिक्त झाले तर मूल्यांकनाच्या कामास विलंब होणार आहे. दुसरीकडे टोल विरोधी कृती समितीने संतोषकुमार यांची बदली रद्द करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, मुंबई येथे बुधवारी झालेल्या बैठकीला रस्ते मूल्यांकन समितीचे सदस्य राजेंद्र सावंत, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत हे दोघेही अनुपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फर्टिमिन क्षार मिश्रणाची गोकुळच्या वतीने निर्मिती

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) जनावरांच्या वंधत्व तक्रारी कमी करणे, गाभण जनावरांची टक्केवारी वाढविण्यासह जनावरांच्या दुधात वाढ होण्यासाठी महालक्ष्मी फर्टिमीन या नवीन क्षार मिश्रणाची निर्मिती केली आहे' अशी माहिती गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली. गोकुळच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महालक्ष्मी फर्टिमीन या उत्पादनाचे वितरण ताराबाई पार्कातील कार्यालयात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

पाटील म्हणाले,' महालक्ष्मी फर्टिमीन हे क्षार गोकुळ दूध संघाने स्वतः विकसित केलेले आहे. संघाच्या महालक्ष्मी पशूखाद्य कारखान्यात याची निर्मिती करण्यात आलेली आहे. यामध्ये चिलेटेड मिनरल्स व आवश्यक व्हिटामिन्स आहेत. त्याच्या वापरामुळे जनावराच्या वंधत्व तक्रारी कमी होऊन गाभण राहण्याची टक्केवारी वाढण्यास मदत होणार आहे. वांझ जनावरांसाठी संघाने दिलेला हा उत्तम पर्याय आहे.'

कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर म्हणाले, ' जनावरांच्या दूधाच्या फायद्याबरोबरच वासरांची वाढ झपाट्याने होते. याचबरोबर कासेचे आजार, दूधाचा ताप, वार लवकर पडणे इत्यादी आजार कमी होण्यासाठी फर्टिमीनचा उपयोग होतो.' यावेळी डॉ. उदयकुमार मोगले, डॉ. प्रकाश दळवी, डॉ. अविनाश जोशी, डॉ. व्ही. डी. पाटील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एम. डी. राठोड यांना माहिती आयोगाचा दणका

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर महापालिकेच्या नगररचना विभागाचे तत्कालीन सहायक संचालक एम. डी. राठोड यांना माहितीच्या अधिकार अधिनियमाचे उल्लंघन केल्याबद्दल पाच हजार रुपयांची शास्ती का लावण्यात येऊ नये ? अशी विचारणा राज्य माहिती आयोगाच्या पुणे खंडपीठाने केली आहे. विवेकानंद कॉलेजजवळील आयकॉन टॉवर या अपार्टमेंटच्या सोसायटीचे अध्यक्ष आर. ए. पाटील यांनी यासंदर्भात तक्रार केली होती. पाटील यांना राज्य माहिती आयोगाच्यावतीने आदेशाची प्रत पाठविण्यात आली आहे.

यासंदर्भात पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, विवेकानंद कॉलजेशेजारील आयकॉन टॉवरच्या तळमजल्यावरील हॉटेल तेजस रेस्टॉरंटच्या अनधिकृत बांधकामाची खातरजमा करण्यासाठी अपार्टमेंटचे अध्यक्ष पाटील यांनी तत्कालीन नगररचनाकार तथा जन माहिती अधिकारी एम. डी. राठोड यांच्याकडे ११ मार्च २०१३ रोजी लेखी अर्ज करून कागदपत्रे व माहिती मागितली होती. मात्र राठोड यांनी ही माहिती मुदतीत न दिल्याने प्रथम अपिलीय अधिकारी तथा उपायुक्त संजय हेरवाडे यांच्याकडे अपिल दाखल केले होते. या अपिलावर २० जुलै २०१३ रोजी सुनावणी होऊन त्यांनी आदेश दिली. दरम्यान, मुदत संपल्यावर शंभर दिवस उशीरा राठोड यांनी माहिती दिली. उपायुक्तांनी राठोड यांना अशी प्रकरणे वारंवार घडत असल्याची कल्पना दिली होती. तसे ताशेरेही ओढले होते. या आदेशाविरोधात पाटील यांनी पुणे खंडपीठाकडे द्वितीय अपील केले. १३ मार्च २०१५ रोजी झालेल्या सुनावणीनंतर १६ मार्च रोजी दिलेल्या आयोगाच्या आदेशात पाच हजार रुपये शास्ती का लावू नये ? अशी विचारणा केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिल रायडर्सची पदभ्रमंती तिशीत

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पावनखिंडीमध्ये ३५५ वर्षापूर्वी घडलेल्या रणसंग्रामाच्या स्मरणासाठी हिल रायडर्स अँड हायकर्स ग्रुपच्यावतीने सतत २९ वर्षे आयोजन केल्या जात असलेल्या पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेचे यंदाचे ३० वे वर्ष आहे. यावर्षीही ​नेहमीप्रमाणे ४ व ५ जुलै तसेच २५ व २६ जुलै या कालावधीत दोन मोहिमांचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी हि माहिती दिली.

१२ जुलै १६६० रोजी गजापूरच्या घोडखिंडीत लढाई झाली. वादळी वारा, जोरदार पाऊस, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट अशा वातावरणात शिवाजी महाराज व त्यांचे मावळे पन्हाळ्यातून विशाळगडाकडे रवाना झाले. त्या वाटेवरुन ही मोहिम आखली जात असल्याचे सांगत पाटील म्हणाले, 'त्याच वातावरणाचा अनुभव घेऊन शिवाजी महाराजांनी व त्यांच्या मावळ्यांनी कसा लढा दिला याची जाणीव होण्यासाठी या मोहिमांचे आयोजन केले जाते. शनिवारी (४ जुलै) सकाळी सात वाजता पन्हाळ्यावरील शिवा काशिद पुतळ्यापासून मोहिमेला सुरुवात होणार आहे. तिथून आंबर्डे पैकी आंबेवाडी येथे मुक्काम केला जातो. रविवारी सकाळी पांढरे पाणी मागाॡ्ने पावनखिंड येथे दुपारी मोहिम पोहचते. भाततळी येथे महाप्रसाद व प्रशस्तीपत्रक वाटप करण्यात येते. यासाठी २५० रुपये प्रवेश शुल्क आहे. त्यामध्ये नाष्टा, जेवण व मुक्कामाची सोय केली जाते. मोहिम ही केवळ पदभ्रमंती नसून इतिहासातील थरारकतेचा अनुभव घ्यावा म्हणून आयोजीत केली जाते.'

या मोहिमेसाठी शहरात विविध ठिकाणी नावनोंदणी करण्याचे केंद्र आहेत. तसेच प्रमोद पाटील यांच्याकडे पद्मावती मंदिरामागे, मंगळवार पेठेतही नोंदणी करता येते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, भारत पाटील, विनोद कांबोज उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरी मसाल्याला ‘GI’ची फोडणी

0
0

गुरुबाळ माळी, कोल्हापूर

कोल्हापुरी मसाल्याला आता भौगोलिक ओळख (जीआय) देण्यास तत्त्वतः मान्यता मिळाली आहे. त्यामुळे कोल्हापुरी मसाल्याच्या नावावर कोणताही मसाला खपविण्याच्या प्रकाराला आळा बसणार आहे. कोल्हापुरी गूळ आणि आजरा घनसाळपाठोपाठ आता या मसाल्याला खास अशी कोल्हापुरी भौगोलिक ओळख मिळणार आहे.

कोल्हापूरचा तांबडा-पांढरा रस्सा जगभर प्रसिद्ध आहे. त्यातील विशिष्ट मसाल्यामुळे त्याची चव जिभेवर तरळत राहते. कोल्हापुरात येणारे पर्यटक तांबडा-पांढऱ्याची झणझणीत रश्शाची चव चाखल्याशिवाय जात नाहीत. कोल्हापुरी मसाल्याच्या या वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळे याच नावाने अनेक ठिकाणी कोणताही मसाला खपवला जाऊ लागला. जीआय मिळाल्यानंतर ही फसवणूक पूर्णपणे थांबणार आहे.

कोल्हापुरी मसाल्याला जीआय मिळावा यासाठी गेले दी​ड वर्षे प्रयत्न सुरू आहेत. करवीर आदर्श महिला औद्योगिक सहकारी संस्थेने यासाठी पुढाकार घेतला आहे. 'आत्मा' व महाराष्ट्र स्पर्धात्मक कृषी विकासच्या मदतीने मेमध्ये दिल्लीत जीआयसाठी प्रस्ताव सादर केला. प्रा. गणेश हिंगमिरे यांनी त्यासाठी मार्गदर्शन केले. या कार्यालयाने उपस्थित केलेल्या काही शंकांचे निरसन केल्यानंतर हा प्रस्ताव स्वीकारण्यात आला. हा मसाला वापरणाऱ्या शंभर व्यक्तींचा अभिप्राय घेण्यात येणार आहे. त्यानंतर काही कागदपत्रांच्या पूर्तता झाल्यानंतर जीआय मान्यतेवर शिक्कामोर्तब होणार आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या ट्रिप्स या करारानुसार भारतीय भौगोलिक उपदर्शन तयार झाले आहे.

जीआयचे फायदे

कोल्हापुरी मसाल्याला जीआय मिळाल्याने व्यापक बाजारपेठ उपलब्ध होईल. यामुळे मसाला तयार करण्याचा व्यवसाय वाढेल. पर्यायाने अधिकाधिक महिलांना रोजगार मिळेल. विशेष म्हणजे कोल्हापुरी मसाल्याची नक्कल करण्याच्या प्रकाराला पायबंद बसेल. चांगल्या दर्जाचा मसाला लोकांना मिळेल. कोल्हापुरी नावाखाली इतर मसाले खपवण्यावर मर्यादा येतील.

आतापर्यंत महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी, नाशिकच्या द्राक्षांना सोलापूर चादर, सोलापूर टेरी टॉवेल, पुणेरी पगडी, नाशिकची वाइन, पैठणी साडी यांना जीआय मिळाले आहे.

दहा वर्षांपूर्वी करवीर आदर्श संस्थेची आम्ही स्थापना केली. बचत गटाच्या माध्यमातून घरगुती पद्धतीने कोल्हापुरी मसाला तयार करतो. दरवर्षी किमान दीड हजार किलो मसाला खपतो. या मसाल्याला मागणी चांगली आहे. जीआय मिळाल्याने आता व्यवसाय वाढीस मदत होणार आहे.

- संगीता पाटील, अध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उद्योगांना ’कॅड-कॅम’ सेंटरची साथ

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उद्योगातील नवनिर्मितीची प्रक्रिया कायम कोल्हापूरमध्ये घडत आहे. या नवनिर्मितीला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी आता कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशनने क्लस्टरच्या माध्यमातून उभारलेल्या 'कॅड-कॅम' सेंटरची साथ मिळणार आहे. पारंपरिक सुट्या भागांसोबतच नवीन पार्ट्सचे डिझाइन तयार करणे आणि नवीन कल्पनांना संधी मिळणार आहे. सेंटरची पहिली बॅच नुकतीच बाहेर पडली आहे.

कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर असलेल्या फौंड्री उद्योगाला प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहे. या फाउंड्री उद्योगात नव्याने आलेल्या सीएनसी-व्हीएमसी तंत्रज्ञानाबरोबरच 'कॅड-कॅम'चीही गरज असते. मात्र, त्यासाठी विद्यार्थ्यांना पुणे, मुंबईकडे जावे लागत होते. ही समस्या दूर करण्यासाठी कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशनने 'कॅड-कॅम' सेंटर सुरू केले आहे. त्यामुळे फाउंड्री उद्योगाची गरज उद्योजकांनीच पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. 'ना नफा ना तोटा' या तत्वावर हे केंद्र चालविण्यात येत आहे. त्यामुळे अत्यंत कमी प्रशिक्षण फीमध्ये उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

कोल्हापूरमधील उद्योगांसाठी राबविण्यात येणाऱ्या कलस्टर योजनेतून कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशनच्या आवारात 'कॅड-कॅम' सेंटर उभारण्यात आले आहे. सध्या येथे सहा कम्प्युटर असून २४ लोकांना प्रशिक्षित करण्याची क्षमता आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. तर कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशनच्यावतीने हे केंद्र चालविण्यात येणार आहे. या प्रशिक्षण केंद्रात सध्या इंडस्ट्रिअल कॅड थ्रीडी मॉडेलिंग, कॅम प्रोग्रॅमिंग फॉर व्हीएमसी, एचएमसी, कॅम प्रोग्रामिंग फॉर सीएनसी टर्निंग, कॅम प्रोग्रामिंग फॉर वायरकट असे अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहेत. दहावी किंवा बारावी झाल्यानंतर याठिकाणी तीन ते सहा महिन्यांचे कोर्स करून उद्योगांमध्ये नोकरी मिळविता येते.

क्लस्टर योजनेतून साकरण्यात आलेल्या या 'कॅड-कॅम' सेंटरसाठी ३३ लाख रुपयांचा निधी वापरण्यात आला आहे. त्यामधून सेंटरची इमारत आणि पायाभूत सुविधा देण्यात आल्या आहेत. सध्या या ठिकाणी प्राथमिक पातळीवर काही सुविधा देण्यात आल्या असून त्यामध्ये आणखी वाढ करण्यात येणार आहे. त्याबरोबरच फाउंड्री, फोर्जिंग, पॅटर्न मेकिंग, कास्टिंग सॉप्टवेअर अशा वेगवेगळ्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

'उद्योगांना प्रशिक्षित मुनष्यबळाची गरज आहे. हे मनुष्यबळ तयार करण्यासाठी सेंटरची स्थापना झाली असून अत्यंत चांगल्या पद्धतीने, तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते. प्रात्यक्षिके आणि मार्गदर्शन अशा दोन्ही गोष्टींची व्यवस्था आहे. त्याबरोबरच थेट इंडस्ट्रीमध्ये इंटर्नशीप आणि काम करण्याचीही संधी मिळू शकते.'

- विजय कामते, विभागप्रमुख, कॅड-कॅम सेंटरप्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात ‘एमआयएम’ची उडी

0
0

दीपक शिंदे, कोल्हापूर

मराठवाड्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातही एमआयएम (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन) अस्तित्व निर्माण करण्याच्या तयारीत आहे. त्याची सुरुवात म्हणून कोल्हापूर महापालिकेची आगामी निवडणूक लढविण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

महापालिकेची गेली निवडणूक पक्षीय पातळीवर लढवली गेली होती. आघाड्यांच्या राजकारणात शहराचा विकास होणार नाही म्हणून पक्षीय पातळीवर निवडणूक लढविण्याचा प्रयत्न झाला. त्याला यशही आले. पण, थेट पाइपलाइन व्यतिरिक्त फार काही हाती लागल्याचे दिसत नाही. त्याचवेळी आता येथील राजकीय पक्षांसमोर एमआयएमचे आव्हान उभे ठाकणार आहे. एमआयएमनेही तयारी सुरू केली असून पहिल्या टप्प्यात विद्यमान नगरसेवक आणि इच्छुकांशी संपर्क वाढविला आहे.

औरंगाबाद आणि नांदेड महापालिकेत एमआयएम पक्षाने चांगले यश मिळविले आहे. औरंगाबादेत २५ जागांवर तर नांदेडमध्ये ११ जागांवर पक्षाचे नगरसेवक निवडून आले आहेत. कोल्हापूर महापालिकेतही काही नगरसेवक पक्षाच्या चिन्हावर उभे करून या ठिकाणी त्यांना पाय रोवायचे आहेत. सध्या महापालिकेत तीन नगरसेवक मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व करत आहेत; पण, ते राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित आहेत. त्यांच्यासह अन्य पक्षाच्या उमेदवारांशी एमआयएमने संपर्क साधला अाहे. संपूर्ण निवडणूक खर्चाचे आमिष दाखवून काही उमेदवार गळाला लागतात का, याची चाचपणी सुरू आहे.

शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजपने राज्य कार्यकारिणीची बैठक घेऊन वातावरण तयार केले तर शिवसेनेने सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त भगवा सप्ताह आयोजित केला आहे. राष्ट्रवादीही सदस्य नोंदणी सुरू आहे. काँग्रेसने पत्ते उघड केले नसले तरी तेही ताकदीने निवडणूक रिंगणात उतरतील.

पक्षाची ताकद वाढविण्याचा एमआयएमचा प्रयत्न आहे. कोल्हापूर महापालिकाही केवळ लढविण्याचाच नव्हे तर जिंकण्याचाही आमचा निर्धार आहे. त्या दृष्टीने तयारी करण्यात येत असून येत्या काही दिवसात सर्वेक्षण केले जाईल. त्यानंतर किती जागा लढवायच्या याचा निर्णय घेतला जाईल.

- इम्तियाज जलील, आमदार, एमआयएम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचगंगा प्रथमच पात्राबाहेर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर येऊ लागला अाहे. पंचगंगा नदीचे पाणी बुधवारी पहिल्यांदाच पात्राबाहेर पडले. जिल्ह्यातील २४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

चंदगड तालुक्यातील घटप्रभा धरणही भरले आहे. अतिवृष्टीमुळे गगनबावड्यातून गगनगिरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरू केली आहे. तसेच गारगोटी, गगनबावडा तालुक्यातील दोन मार्गावरील वाहतूकही बंद झाली असून गगनबावड्यातील एका मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी पुराच्या पाण्याने वेढल्या जाणाऱ्या टेकवाडी गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. मंगळवारी दुपारनंतर जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोर पकडला.

सांगली, साताऱ्यातही जोर

सांगली जिल्ह्यातील मांगले आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काखे दरम्यानचा पूल बुधवारी सकाळी पाण्याखाली गेला. सातारा जिल्ह्यातही दमदार पाऊस सुरू असून, ठोसेघर येथील धबधबा सुरू झाला आहे. महाबळेश्वर, कोयनानगर भागात पावसाचा जोर जास्त आहे.

आज दिवसात

गगनबावडा तालुक्यात २४ तासात १८४

मिलीमीटर पाऊस

पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड या तालुक्यांतही अतिवृष्टी

कासारी, कडवी,​ हिरण्यकेशी, वारणा या नद्यांना पूर

बुधवारी सायंकाळपर्यंत पंचगंगेची पातळी २८ फूट २ इंचावर

पंचगंगेचे पाणी प्रथमच पात्राबाहेर

वेदगंगा व धामणी नदीवरील दोन बंधारे पाण्याखाली

चंदगड तालुक्यात फाटकवाडी येथे घटप्रभा नदीवर बांधलेला मध्यम प्रकल्प भरला. १

गारगोटीहून हेळेवाडीकडे जाणारा रस्ता सावर्धेपर्यंतच सुरू

कोल्हापुरातून गारीवडे, भिंडवडेमार्गे गगनबावड्याकडे जाणारा रस्ता बंद

मलकापुरातून भाततळीमार्गे विशाळगडाकडे जाणारा मार्ग बंद पण आंबामार्गे वाहतूक सुरू

गगनबावड्यातून गगनगिरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहू कार्य

0
0

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहूमहाराज यांचे सर्व क्षेत्रातील कार्य अलौकिक आहे. सामाजिक सुधारणेबरोबरच राजर्षींनी साहित्य, कला, कुस्ती, शेती सुधारणा, जलप्रकल्प उभारणी अशा विविध क्षेत्रांत अजोड कामगिरी केली आहे. आजही त्यांच्या कार्याची ओळख शहरातील भव्य अशा वास्तूंमधून प्रकर्षाने समोर येते. खासबाग कुस्त्यांचे मैदान असो, साठमारी असो, जनतेसाठी सुरू केलेले छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल असो वा त्यांच्या उदार आश्रयाखाली सुरू असलेल्या सांस्कृतिक संस्थांच्या इमारती असोत; त्या नेहमीच प्रेरणादायी ठरत आहे. त्याचबरोबर शाहू विचाराने आजही अनेक क्षेत्रांतील कार्यकर्ते कार्यरत आहेत. त्यांच्याविषयी.

शाहूंचे सर्वस्पर्शी स्मारक : बाबूराव धारवाडे

माजी आमदार बाबूराव धारवाडे यांच्या प्रयत्नातून कोल्हापूरच्या मध्यवर्ती भागात राजर्षी शाहूंचे भव्य स्मारक उभारले आहे. शाहू स्मारक भवन म्हणून ते ओळखले जाते. गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून धारवाडे यांनी शाहूंचे विचार विविध माध्यमातून भारतभर पोहचावेत यासाठी संसद, विधानभवनात पुतळे उभारणी ते शाहू विचारावर देखावा स्पर्धा घेण्यापर्यंतच्या प्रत्येक उपक्रमात धडाडीने भाग घेतला. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच महाराजांचे महाराष्ट्र गॅझेटमधील विकृत लेखन वगळण्यात आले.

राजर्षी शाहू महाराजांच्या जीवन व कार्याचे चिरंतन स्मारक साकारण्यासाठी राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टची स्थापना झाली. या ट्रस्टचे विश्वस्त म्हणून धारवाडे यांनी भरीव काम केले. बागल विद्यापीठ व राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टच्या माध्यमातून शाहू महाराजांच्या विचारांचा जागर सातत्याने सुरू आहे.

गॅझेटियर दुरुस्तीसाठी दीर्घकाळ लढा

राज्य सरकारतर्फे कोल्हापूरचे नवे गॅझेटियर १९८९-९० मध्ये प्रकाशित झाले. यामध्ये राजर्षी शाहूंविषयी अवमानकारक मजकूर होता. या प्रकाराने संतप्त झालेल्या धारवाडे यांनी हा प्रश्न नागपूर हिवाळी अधिवेशनात मांडला. हा मजकूर वगळून नवीन मजकूर त्यात समाविष्ट करेपर्यंत धारवाडे यांनी पाठपुरावा केला.

विधानभवनासमोर पुतळा

राजर्षी शाहू महाराज यांचा पुतळा विधान भवन व संसदेच्या प्रांगणात उभारण्यात धारवाडे यांचा पुढाकार होता. गंगाराम कांबळे स्मृतिस्तंभ, राजर्षी शाहू स्मारक भवनात राजर्षी शाहूंचा पुतळा, शाहू विचार परिषद व राजर्षी शाहू महाराज यांच्या विचार कार्यावर असंख्य भाषणे करत धारवाडे यांनी शाहू विचाराचा झेंडा लावला.



शिवचरित्राकडून शाहू चरित्राकडे : इंद्रजित सावंत

नव्या पिढीतील आश्वासक ​संशोधक म्हणून इंद्रजीत सावंत यांची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याची महती लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. शिवचरित्र हा त्यांच्या अभ्यासाचा विषय. शिवचरित्र, गडकिल्यांचा अभ्यास, शिवजयंती वादाची कारणे शोधत असताना राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याकडे ते आकर्षित झाले. राजर्षी शाहू महाराज यांनी खऱ्या अर्थाने शिवचरित्र लोकांसमोर आणले. शाहू महाराज यांनी समाजप्रबोधनासाठी, राष्ट्रनिर्मातीसाठी शिवचरित्राचा वापर करून घेतला. शाहू महाराजांनी संशोधकांना चालना दिली. शाहूंच्या सर्वांगीण कार्याचा अभ्यास करायला सुरूवात केली. सावंत यांनी राजर्षी शाहू जन्मस्थळ विकास, राजर्षी शाहू समाधीस्थळ विकास या कामांसाठी लोकचळवळ उभारण्यात पुढाकार घेतला. त्याचवेळी शाहू चरित्रावर संशोधन सुरू ठेवले. पुरालेखागार कार्यालयातील कागदपत्रे, ठराव बुकचा अभ्यास केला. 'शिवभक्त : राजर्षी शाहू महाराज' पुस्तक प्रकाशित केले. शाहू महाराजांची दुर्मिळ छायाचित्रे असलेले पुस्तक प्रकाशित केले. ते 'चित्रमय शाहू' लवकरच इंग्रजी आणि हिंदीत प्रकाशित होणार आहे.



शिल्पकार : अशोक सुतार

लोकराजा राजर्षी शाहूंच्या पुतळ्याला वंदन करुन दिवसभराच्या कामाची सुरुवात करणारे अनेक शाहूप्रेमी आहेत. शहरात वर्षाला फायबर आणि ग्लास रेनफोर्स केमिकलची पंचवीस हजार छोटे पुतळे आणि भित्तीशिल्पातून राजर्षी शाहूंचा विचार घरोघरी पोहोचत आहेत. शहरातील विविध शैक्षणिक संस्था, संकुलात राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा आहे. शिल्पकार अशोक सुतार यांची शिल्पे राज्यभर पोहोचली आहेत. राजर्षी शाहू स्मारक भवनातील छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनकार्यावरील भव्य म्युरल अशोक सुतार यांनीच साकारले आहे. तत्कालीन शिल्पकार राजू डोंगरसाने आणि संजय तडसरकर यांनी निर्माण केलेला पुतळा कागलच्या शाहू सहकारी साखर कारखान्याच्या आवारात आहे. किशोर पुरेकर, संजीव संकपाळ, अतुल डाके शिल्पकारांचे पुतळे प्रेरणास्थाने बनली आहेत. फायबरसह सिमेंट, केमिकल, काळा दगड आणि त्याचे कास्टिंग करुन आकर्षक पुतळे तयार केले जातात. राधानगरी धरण येथेही राजर्षी शाहू महाराजांचे स्मारक उभारण्यात येणार आहे.

याबाबत शिल्पकार अशोक सुतार सांगतात, 'लोकराजा राजर्षी शाहू महाराजांचे विचार पोहोचिण्याचे काम अनेक शिल्प आणि भित्तीशिल्पांच्या माध्यमातून केलेे. या माध्यमातून शाहूंचे कार्य घरोघरी पोहोचवता आले.'



डॉ. मंजुश्री पवार : वेगळ्या पैलूंवर प्रकाश

राजर्षी शाहू महाराजांचे वास्तववादी, परखड विचार साहित्यातून मांडले आहेत. शाहू अभ्यासक डॉ. मंजुश्री पवार यांनी २०१० मध्ये 'शाहू आणि स्वातंत्र्य' या विषयावर पुस्तक प्रकाशित केले. काही इतिहासकारांनी राजर्षी शाहू महाराजांचा स्वातंत्र्य चळवळीला विरोधा होता अशी भूमिका मांडली होती. या भूमिकेला विरोध करुन सहा क्रांतिकारकांनी राजर्षी शाहू महाराजांनी लिहिलेली पत्रे आणि पुराव्यानिशी पवार यांनी हे संशोधन समाजासमोर आणले. राजर्षी शाहू महाराजांनी स्वातंत्र्य चळवळीला मदत केली होती, हे ठामपणे मांडले. 'राजर्षी शाहू आणि डॉ. आंबेडकर,' 'छत्रपती शाहू अॅण्ड द ब्रिटीश पॅरॉमाउन्सी,' अशी त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत. यातून राजर्षी शाहूंचे ब्रिटीशांशी असलेले संबंध आणि त्याचा समाजसुधारणेसाठी केलेला उपयोग त्यांनी विविध दाखले आणि पुरावे देऊन मांडला. राजर्षी शाहू महाराजांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेली अप्रकाशित पत्रेही प्रकाशित केली आहेत.



शाहू विचारांचा जागर : वसंतराव मुळीक

राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळ व समाधीस्थळाबाबत अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी पाठपुरावा केला. इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, रमेश जाधव, वसंतराव मोरे, इंद्रजित सावंत यांच्या मदतीने शाहू जन्मस्थळाच्या सुशोभिकरणासाठी मुळीक यांनी जनआंदोलन उभारण्यास पुढाकार घेतला. पालकमंत्री, मुख्यमंत्र्याना निवेदन, आंदोलनाचा इशारा देऊन ​सरकारकडून निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा केला. आज जन्मस्थळाचे काम पूर्णत्वास आले आहे. नर्सरी बागेत समाधीस्थळ उभारावे अशी इच्छा शाहू महाराजांनी १९१६ मध्ये व्यक्त केली होती. त्यासाठीही मुळीक यांनी इंद्रजित सावंत यांच्या मदतीने पुढाकार घेतला आहे. शाहूभक्त गंगाराम कांबळे स्मारकाच्या सुशोभिकरणासाठी पाठपुरावा केल्यानंतर आमदार राजेश क्षीरसागर यांनी पाच लाखाच्या निधीची घोषणाही केली. शाहूकालीन वास्तू टिकून रहाव्यात, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. दरवर्षी शाहू जयंतीला शाहू महाराजांचे लोकोपयोगी आदेश व अंमलबजावणीसंबंधीच्या अस्सल पत्रांचे प्रदर्शन भरवण्यात मुळीकांचा पुढाकार असतो.

कृतिशील उपक्रम : प्राचार्य टी. एस. पाटील

राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा प्रसार करताना स्वतः हा विचार जगणारे म्हणून प्राचार्य टी.एस. पाटील यांची ओळख आहे. शाहूंच्या सत्यशोधकी विचारांचा प्रसार करण्यासाठी पाटील यांनी अंधश्रध्दा निर्मूलन समिती आणि विज्ञान प्रबोधिनीचे उदय गायकवाड यांच्या मदतीने एक हजार व्याख्याने देऊन लोकजागृतीचे काम केले. या उपक्रमामुळे सत्यशोधक विचारांची ओळख नव्याने लोकांना पटली. 'आंधळा शब्द, खुळ्या समजुती' हे पुस्तक पाटील यांनी लिहिले. ते कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी छापून पाच हजार प्रतींची प्रत्येकी दोन रूपये एवढ्या अल्प किमतीत विक्री करुन ते व्यापक पातळीवर पोहोचविण्यात आले. पाटील यांनी मुलांची लग्ने सत्यशोधक पध्दतीने केली आहेत. शाहू संशोधन केंद्रांत डॉ. जयसिंगराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली क्युरेटर म्हणून काम करताना शाहूकालीन वास्तू, कागदपत्रे व छायाचित्रे अनेक ठिकाणी फिरून जमा केली. तसेच ज्येष्ठ संशोधक डॉ. विलास संगवे यांना शाहूकालीन कागदपत्रांचे खंड प्रसिध्द करण्याच्या कामात मदत केली. शाहूंचे विचार अंगी बाणवण्यासाठी प्रा. एन. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःच्या जातीच्या त्याग करून जातविरहित समाज निर्माण करण्यासाठी लढा सुरू केला आहे. दलित-मागास जातीतील लोकांच्या जमिनी सवर्णांकडे असलेल्या जमिनी पुन्हा त्यांना मिळवून देण्यासाठी दलितमित्र बापूसाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या लढ्यात भाग घेतला होता. आजही शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्थांत शाहूंच्या विषयांवर व्याख्याने देण्याचे कार्य प्राचार्य पाटील तळमळीने करत आहेत.



प्रबोधनाच्या कार्यात सक्रिय सहभाग : प्रा. विलास रणसुभे

'कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी राजर्षी शाहूंच्या विचारांचा वारसा जपत हे विचार सर्वदूर पोहोचवण्यासाठी 'राजर्षी शाहू : वसा आणि वारसा' ही छोटी पुस्तिका लिहिली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणेच शाहूंचा खरा इतिहास यानिमित्ताने समोर आला. शाहू पुरस्कार प्रदान सोहळ्यात त्यांनी या पुस्तकावर आधारित शंभर व्याख्याने देण्याचा संकल्प केला होता. यापैकी त्यांनी ८८ व्याख्याने विविध कॉलेज, शिबिरे आणि समारंभात दिली आहेत. कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्येनंतर व्याख्यानाचा संकल्प अपुरा न ठेवता, त्यांचा संकल्प पूर्ण करण्याचा मनोदय ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्यासह श्रमिक प्रतिष्ठानच्या चार ते पाच कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. कार्यकर्ते नोकरी, व्यावसाय सांभाळून त्यांचे शाहूंचे विचार पोहोचवत आहेत. त्यांपैकीच एक प्रा. विलास रणसुभे आहेत. प्रबोधनाच्या कामात ते नेहमीच सक्रिय असतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाऱ्याने पळव‌िली वीज

0
0

संपत पाटील

राधानगरी पाच दिवस अंधारात

संततधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. चंदगड तालुक्यातील ताम्रपर्णी नदीने गुरुवारी धोक्याची पातळी ओलांडली.

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठे वृक्ष, फांद्या-मोडून पडल्याने राधानगरी गेल्या पाच दिवसांपासून अंधारात आहे. वीजच नसल्याने पिण्याच्या पाणी टंचाईसह बँक, महसूल व सर्वच खासगी, सरकारी कार्यालयातील कामकाज बंद झाले आहे.

पावसाळ्यापूर्वी वीजवाहिन्या दुरुस्ती करण्यात आलेले अपयश, खाजगी कंपनीचे निकृष्ट काम, अनुभवहीन नवीन कर्मचाऱ्यांचा भरणा यामुळे ही परिस्थिती उद्‍भवल्याचे वास्तव समोर आले असून त्यातच वीजवितरणचे स्थानिक अधिकारी, कर्मचारी स्वीच ऑफ झाल्याने ग्रामस्थाच्या संतापात अधिकच वाढला आहे.अतिवृष्टी आणि धरणाबरोबरच वीज निर्मिती करणारे शहर म्हणून राधानगरीची ओळख आहे. गेल्या पाच दिवसात येथे विक्रमी असा ९६९ मी.मी.पाऊस पडला असून या अतिवृष्टीने अनेक ठिकाणचे मोठे वृक्ष,फांद्या आणि असंख्य वीजवाहिन्या तुटून पडलेल्या आहेत. त्यामुळे पाच दिवसापासून येथील वीज पूर्णत: बंद पडला असून त्याचा परिणाम जनजीवनावर झाला आहे.

शहरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून पावसाचे पाणी पिण्याचे वेळ ग्रामस्थावर आली आहे. विजेअभावी बँक, तहशील कार्यालय,पोलिस ठाणे पंचायत समिती कार्यालय, झेरॉक्स सेंटर, बँकांची ए. टी. एम. मशीन, कम्प्युटर लँब आदी ठिकांणचे वीजेसंबधित सर्व व्यवहार ठप्प झाले असून त्याचा सर्वाधिक फटका तालुक्यातून विविध दाखल्यासाठी महसूल कार्यालयात आलेल्या विद्यार्थी वर्गाला बसला आहे. खासगी कंपनीने केलेले दुरुस्तीचे कामही निकृष्ट केल्याचा सूर नागरिकांमधून व्यक्त होत आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गडहिंग्लजच्या नगराध्यक्षांचा राजीनामा

0
0

लक्ष्मी घुगरे

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

गेल्या महिनाभरापासून प्रलंबित असलेला गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा लक्ष्म‌ी घुगरे यांच्या राजीनाम्याचा प्रश्न गुरूवारी निकाली निघाला. त्यांनी राजीनामा दिल्याने इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे.
गेल्या साडेतीन वर्षाच्या नगरपालिका कार्यकाळात पहिल्या प्रयत्नात नगराध्यक्ष होण्याची संधी मिळाली यासाठी स्वतःला भाग्यवान समजते. मात्र आमदार हसन मुश्रीफ यांचा आदेश आणि सहकाऱ्यांना संधी मिळावी यासाठी आपण राजीनामा देत आहोत अशी माहिती नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे यांनी दिली. तत्पूर्वी त्यांनी कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी अमित सैनी यांचेकडे राजीनामा सुपूर्द केला.

घुगरे म्हणाल्या, गडहिंग्लज नगरपालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता आल्यापासून गेल्या साडेतीन वर्षाच्या कार्यकाळात चांगले काम करण्याचा प्रयत्न केला. आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या वर्षी बांधकाम सभापती तर दुसऱ्यावर्षी महिला व बालकल्याण सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर राजकारणातील पहिल्याच प्रयत्नात नगराध्यक्षा होण्याचा सन्मान मला मिळाला यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते, असेही त्या म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी काँग्रेस लबाडांची टोळी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

निवडणुकांमध्ये कोणी सोबत येते कोणी विरोधात जाते. पण, सोबत यायचे असे सांगत ऐनवेळी धोका देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे. अशाप्रकारे दगाबाज करणारी राष्ट्रवादी काँग्रेस ही लबाडांची टोळी आहे, अशी टीका बाजारसमिती निवडणुकीच्या काँग्रेसप्रणित पी. एन. पाटील पॅनेलच्या मेळाव्यात आळविण्यात आला.

बाजारसमिती निवडणुकीच्या प्रचाराची सुरूवात फुलेवाडी येथे आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आली. त्यानंतर आयोजित प्रचार मेळाव्यात नेते आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर तोंडसुख घेतले. काँग्रेसप्रणित आघाडीचे नेते पी. एन. पाटील म्हणाले,' काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या सर्व संस्था चांगल्या चालल्या आहेत. यापूर्वीही संस्था चांगल्या होत्या, सध्या आहेत आणि भविष्यातही त्या चांगल्या ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील. गोकुळ चांगल्या प्रकारे चालविले आहे त्याबरोबरच जिल्हा बँक व्यवस्थित सुरू ठेवली होती. शेतकऱ्यांना कर्जांचे वाटप करण्यात आले होते. त्यानंतरच्या काळात काय अवस्था झाली हे आपल्या समोर आहेच. भाजप सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधातच आहे त्यामुळे मोठ्या जमीनी काढून घेणे आणि आता पुन्हा नव्याने कूळकायदा पद्धत बंद करण्याचा प्रयत्न करून पुन्हा शेतकरी कसत असलेल्या जमीनी मोठ्या लोकांच्या ताब्यात देण्याचा प्रकार आहे.'

आमदार महादेवराव महाडिक म्हणाले,' पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलसोबत सर्वांनी उभे राहण्याची गरज आहे. बाजार समितीत संचालकांनी चुकीचा कारभार केल्यामुळेच बाजार समितीवर प्रशासक नियुक्ती झाली. यावेळी बाबासाहेब भुयेकर, उदयसिंह पाटील कौलवकर, जयसिंगराव हिर्डेकर आदींची भाषणे झाली. गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी प्रास्ताविक केले. तर पी.डी. धुंदरे यांनी आभार मानले.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राजर्षींचा जीवनपट एका क्लिकवर

0
0

मोबाइल अॅपद्वारे राकेश व रफी यांचा मानाचा मुजरा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने राजर्षी शाहू महाराजांच्या क्रांतिकारक विचारांचा प्रसार करण्यासाठी कोल्हापूरच्या फँटासॉफ्ट स्टुडिओचे प्रमुख राकेश मधाळे आणि रफी मोकाशी यांनी एका क्लिकवर शाहू महाराजांचा जीवनपट पाहण्याची पर्वणी दिली आहे. शाहू महाराजांच्या १४१ व्या जयंतीच्या पूर्वदिनी या अॅप्सचे सादरीकरण खासदार धनंजय महाडिक यांच्याहस्ते शाहू स्मारक भवन येथे करण्यात आले. शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून हे शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित जगातील पहिले अॅप्लिकेशन विश्वातील समस्त समाजाला उपलब्ध करून देत असल्याचे राकेश व रफी यांनी यावेळी सांगितले.

यावेळी खासदार महाडिक म्हणाले, आजची तरूणाई मोबाइल अॅप्सचा वापर सर्वाधिक करते. शाहू महाराजांविषयी माहिती घेण्यासाठी आज या अॅप्सच्या रूपाने त्यांचेच माध्यम वापरले गेल्यामुळे नव्या पिढीपर्यंत शाहू महाराजांचे कार्य पोहोचेल.

हे अॅप्लिकेशन मराठी, हिन्दी आणि इंग्रजी भाषांत उपलब्ध आहे. शाहूंचे जीवन चरित्र मोजक्या शब्दांत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये कोल्हापूर पर्यटनाचा तपशील देण्यात आला असून पर्यटन नकाशा, पर्यटनस्थळांची छायाचित्रे, नामांकित हॉटेल्सची माहिती आहे. या अॅप्लिकेशनच्या ग्राफिक्सवर विशेष परिश्रम घेतले आहेत. संपूर्ण माहिती ऑफलाइन पद्धतीची असून फक्त हॉटेल बुकिंगसाठी इंटरनेटची आवश्यकता असेल. प्रोग्रामिंगची जबाबदारी फँटासॉफ्ट स्टुडिओच्या सदस्या पूनम दळवी यांच्याकडे आहे. युवराज संभाजीराजे छत्रपती, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, डॉ. पद्मा पाटील आदींच्या मार्गदर्शनाखाली अॅप्स विकसित करण्यात आल्याची माहिती रफी मोकाशी यांनी दिली.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अणू प्रकल्पाबाबतची भीती निराधार’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अणुप्रकल्पामुळे समाजाला फायदे होतात हा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायचा असेल तर या परिवर्तनप्रक्रियेत लोकांना सहभागी करून घेतले पाहिजे. अशा प्रकारच्या प्रकल्पांमुळे संभाव्य किरणोत्सर्गाच्या धोक्यासह नुकसान भरपाई व इतर लाभ मिळण्यात होणारी सरकारी दिरंगाई हे अणुप्रकल्पाला विरोधाचे मूळ कारण आहे. मात्र शास्त्रोक्त माहिती समजून घेतल्यास अणुप्रकल्पाबाबतची भीती निराधार असल्याचे लक्षात येईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ डॉ. शिवराज भोजे यांनी केले.

राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टच्यावतीने राजर्षी शाहू जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शाहू व्याख्यानमालेतील पाचवे पुष्प गुंफताना 'जैतापूरचा अणुप्रकल्प' याविषयावर ते बोलत होते. गुरूवारी सायंकाळी शाहू स्मारक भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले होते. भविष्यात ऊर्जेची गरज सर्वाधिक असल्याचे सांगून डॉ. भोजे म्हणाले, ही गरज भागवण्यासाठी अणूऊर्जेचा पर्याय सक्षम आहे. कोळशातून वीजनिर्मिती करत असतात वीज व धूर हवेत सोडला जातो. तो हवेतच साठून राहतो, मात्र अणुऊर्जानिर्मितीमध्ये पर्यावरणाला हानिकारक धूर हवेत न सोडता तो जमिनीत साठवला जातो.

अणुसयंत्राभोवतीचे संरक्षककवच भक्कम असते. विमानाची धडक असो, त्सुनामीच्या लाटा असो किंवा भूकंप अशा आपत्तीतही अणुसयंत्र टिकून राहते. त्यामुळे अणुप्रकल्पाबाबतची भीती लोकांना मनातून काढून टाकली पाहिजे. तथापि, धरणग्रस्तांना ५० वर्षानंतरही नुकसानभरपाई, रोजगार, पुनर्वसन हे लाभ न मिळाल्याचा अनुभव गाठीशी असल्यामुळे लोकांकडून या प्रकल्पाला विरोध होत आहे. त्यासाठी सरकारने कायद्यांमध्ये शिथिलता आणून लोकांना या प्रकल्पाच्या फायद्यांचा अनुभव द्यावा. विरोधाची तीव्रता कमी होण्यासाठी मोफत विजेसह नोकरी, भरपाई तातडीने देण्यासाठी प्रयत्न केल्यास चित्र बदलेल. वसंत भोसले यांनी अध्यक्षीय समारोप केला. प्रास्ताविक विवेक जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी केले. यावेळी ज्येष्ठ ​इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. अशोक चौसाळकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हद्दवाढीचा प्रश्न

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत सरकारी यंत्रणा गतिमान झाली आहे. नगरविकास विभागाने महापालिकेकडून सादर झालेल्या हद्दवाढीच्या प्रस्तावावर जिल्हाधिकाऱ्यांचा अभिप्राय मागवला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी दोन दिवसांत अभिप्राय पाठवणार आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी महापालिकेकडून आवश्यक माहिती घेतली. महापालिकेने शहरालगतच्या १८ गावांसह दोन औद्योगिक वसाहतींचा शहरात समावेश करावा, असा हद्दवाढीचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यासाठी आवश्यक सर्वेक्षण करण्यात आले आहे. कोल्हापूर दौऱ्यावर नुकतेच येऊन गेलेल्या नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी हद्दवाढीचे संकेत दिले होते. त्यादृष्टीने गुरुवारी नगरविकास विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार झाला आहे.

महापालिकेने पाठवलेल्या प्रस्तावानुसार हद्दवाढीबाबतची परिस्थिती जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून अभिप्राय मागवण्यात येतो. यापूर्वीच्या आघाडी सरकारने रद्द केलेल्या प्रस्तावासाठीही तत्कालीन जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्याकडून अभिप्राय मागवला होता. त्यांनीही सकारात्मक अभिप्राय दिला होता. महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक धनंजय खोत, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, कनिष्ठ अभियंता अरुणकुमार गवळी यांच्याशी आज सैनी यांनी चर्चा केली.

शहराची रचना, हद्दवाढीत प्रस्तावित केलेली गावे, त्यांच्याबाबतची माहिती घेतली. त्यानंतर त्या प्रस्तावावर दोन दिवसांत जिल्हाधिकारी अभिप्राय देणार आहेत. अभिप्राय आल्यानंतर अधिसूचना जारी केली जाऊ शकते. त्यामुळे महिनाअखेरपर्यंत ती प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुडीतांना ५०० कोटींचे पॅकेज

0
0

गुरुबाळ माळी, कोल्हापूर

बुडीत पतसंस्थांमधील ठेवीदारांच्या ५० हजार ते एक लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी परत देण्यासाठी ५०० कोटी रुपयांचे पॅकेज देण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी सहकार विभाग माहिती गोळा करीत आहे.

ठेवीदारांना दिलासा देण्यासाठी आघाडी सरकारने तीन वर्षांपूर्वी २०० कोटी रुपयांचे पॅकेज दिले होते. त्यातून अनेक ठेवीदारांना दहा हजार रुपयांपर्यंतच्या ठेवी परत मिळाल्या. पतसंस्थांनी पॅकेजची रक्कम नंतर परत करायची आहे, मात्र संस्थांची आर्थिक परिस्थिती पाहता ती परत मिळण्याची शक्यता दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर आता महायुती सरकार पतसंस्थांना पाचशे कोटी रुपयांचे पॅकेज देणार आहे. याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. राज्यातील सर्व पतसंस्थांत अशा किती ठेवी आहेत याची माहिती संकलन करण्याचे आदेश सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. त्यानुसार तातडीने माहिती संकलन सुरू करण्यात आले आहे. पंधरा दिवसात हे संकलन पूर्ण झाल्यानंतर पुढील निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.

पतसंस्थांत सामान्य ठेवीदारांचे पैसे बुडाले आहेत. अशा ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी सरकारने पॅकेज देण्याचे ठरवले आहे. पाचशे कोटी रुपयांपर्यंत पॅकेज जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी तातडीने माहिती संकलन करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय या संस्थांचे ऑडिट करण्यात येणार आहे. - चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेवर भगवाच

0
0

शिवसेनेच्या भगवा सप्ताहाच्या रॅली सांगतेवेळी निर्धार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या भगव्या सप्ताहाची सांगता गुरुवारी भव्य रॅलीने झाली. शहरात भव्य मोटारसायकल रॅलीच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन केले. आगामी महानगरपालिका निवडणुकीत महानगरपालिकेवर भगवा फडकवण्याचा निर्धार आमदार राजेश क्षीरसागर यांनी यावेळी बोलून दाखवला.

शिवसेनेच्यावतीने गेले आठवडाभर विविध उपक्रम सुरू आहेत. मिरवणूक, आरोग्य आणि रक्तदान शिबिर, पक्षसदस्य नोंदणी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाची चित्रफीत अशा कार्यक्रमांचा त्यात समावेश होता. गुरूवारी सकाळी अकरा वाजता दसरा चौकातून रॅलीला सुरुवात झाली. रॅलीत शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते भगव्या ध्वजासह सहभागी झाले होते. 'कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला,' 'शिवसेना झिंदाबाद,' 'बघतोस काय रागानं, पंजा मारला वाघानं,' अशा घोषणांनी रॅलीचा मार्ग दुमदुमून गेला.

दसरा चौक, सीपीआर चौक, शनिवार पोस्ट, आमदार क्षीरसागर यांचे निवासस्थान, सोन्या मारूती चौक, तोरस्कर चौक, पंचगंगा रोड, शुक्रवार पेठ पोलिस चौकी, उत्तरेश्वर पेठ, जावळाचा गणपती, रंकाळा रोड, साकोली कॉर्नर, उभा मारूती चौक, जुना वाशी नाका, नंगीवली तालीम, मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, निवृत्ती चौक, ताराबाई रोड, महाव्दार रोड, पापाची तिकटी, शिवाजी चौक, भवानी मंडप, बिंदू चौक, शाहू मिल, राजारामपुरी मुख्य मार्ग, टाकाळा, उड्डाण पूल, कावळा नाका, सदर बाजार, जाधवाडी, कदमवाडी, लाईन बाजार, कसबा बावडा, रमणमळा चौक, पितळी गणपती, ​आदित्य कॉर्नर, सासने ग्राऊंड, न्यू शाहूपुरी, दाभोळकर कॉर्नर, स्टेशन रोड, व्हीनस टॉकीजमार्गे दसरा चौकात रॅली विसर्जित झाली. रॅलीत आमदार राजेश क्षीरसागर, शिवाजी जाधव, दुर्गेश लिंग्रस, विजय कुलकर्णी, माजी उपमहापौर उदय पोवार, माजी नगरसेवक नंदकुमार गजगेश्वर, दीपक गौड यांच्या शिवसेना पदाधिकारी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images