Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

जागा आहे, मैदान नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रशस्त जागा आणि रस्ते असलेल्या फुलेवाडी प्रभागात दर्जेदार क्रीडा मैदानाची आवश्यकता आहे. रिंगरोडवरुन फुलेवाडी दत्त मंदिराकडे प्रवेश करीत असलेला रस्ता वर्षानुवर्षे तसाच आहे. युवकांसाठी व्यायामशाळेचे साहित्य नाही. अयोध्या कॉलनी ते फुलेवाडी जकात नाका रोडवर जाण्यासाठी मात्र जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे.

सन १९४६ मध्ये फुलेवाडी सहकारी सोसायटीच्या माध्यमातून या ठिकाणी प्रशस्त प्लॉट पाडण्यात आले. प्रभागात उच्च आणि मध्यमवर्गीय वस्ती आहे. फुलेवाडी क्रीडा मंडळ अनेक स्पर्धेत भाग घेते. फुटबॉलची आवड असलेले सुमारे दोनशे खेळाडू परिसरात आहेत. मात्र या प्रभागात विस्तारित जागा असूनही खेळाडूंसाठी दर्जेदार मैदान उपलब्ध नाही. फुलेवाडी रिंग रोड ते फुलेवाडी सहावा स्टॉप पर्यंत प्रत्येक गल्लीत रस्ते मोठे आहेत. मात्र शेळके कॉलनी परिसरातील गटर्स आणि रस्ते झालेले नाहीत. फुलेवाडी पाचवा बस स्टॉप येथे महिलांच्यासाठी नियोजन सभागृहाची मागणी होती. मात्र तीही अद्याप पूर्ण झालेली नाही. दत्त मंदिर परिसरात चांगले सभागृह बांधले आहे. मात्र अद्याप या सभागृहात स्वच्छतागृहत, पाण्याची सुविधा नसल्याने याचा उपयोग केला जात नाही. सुमारे पाच हजार चौरस फूटाचे सभागृह आहे. फुलेवाडी मधील गल्ली क्रमांक एक ते सहा पर्यंत प्रत्येक ठिकाणी कचरा उठाव करण्यासाठी कचरा कोंडाळे आहेत. मात्र त्यातील कचरा वेळेवर उठाव केला जात नाही. परिसरातील बहुतांशी ठिकाणी औषध फवारणी केली जात नाही.

परिसरातील दत्त मंदिर आणि दर्जेदार बाग आहे. यंग सीनिअर्सची या ठिकाणी मोठी गर्दी होते. नगरसेवक सर्जेराव पाटील यांनी सुमारे दोनशे ट्रक माती टाकून उत्तम बाग तयार केली आहे. या बागेची निगाही राखली जाते. फुलेवाडी दूध डेअरीसमोर भाजी मंडईसाठी नियोजन केले आहे. मात्र या ठिकाणी भाजी विक्रेते बसत नाही. फुलेवाडी जकात नाका येथून क्रांतीसिंह नाना पाटील नगर रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही विक्रेते बसतात. फुलेवाडी जकात नाका ते अयोध्या कॉलनीपर्यंतचा रस्ताही अद्याप झालेला नाही. फुलेवाडी पहिला बसस्टॉपपासून ते सहाव्या बसस्टॉप पर्यंत काही ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत.

'प्रभागात सुमारे दहा कोटींची कामे केली आहे. रस्ता, पाण्याची कोणतीही कमतरता नाही. चांगल्या शाळा, मंदिरे, बागांची निगा राखली आहे. प्रत्येक रहिवाशांचे काम सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. प्रभागाच्या विकासासाठी काही ठिकाणी स्वनिधीही खर्च केला आहे. काही ठिकाणी मात्र केवळ विरोधासाठी विरोध म्हणून विकासकामे करु दिली नाहीत. भाजी मंडईसाठी फुलेवाडी दूध डेअरीच्या ठिकाणी व्यवस्था केली आहे. यंग सीनिअर्स, युवक, महिलांसाठी विशेष उपक्रमही राबविले असून प्रत्येक कॉलनीत जाऊन समस्या तातडीने सोडविल्या आहेत.

- सर्जेराव पाटील, नगरसेवक

'प्रभागात बहुतांशी विकासकामे पूर्ण झाली आहेत. काही विकासकामांसाठी अधिक निधी मिळाला नसल्याने कामे होऊ शकली नाहीत. उत्कृष्ट बाग, शाळा आणि रस्ता चांगला आहे. मात्र खेळांडूच्यासाठी मैदान उपलब्ध नाही. कोणत्याही प्रभागात नगरसेवक सर्वच कामे परिपूर्ण करणे शक्य नाही. फुलेवाडी ते क्रांतीसिंह नाना पाटील रिंगरोडवरील अयोध्या कॉलनीपर्यंतचा अपुरा रस्ताही तातडीने पूर्ण करण्याची गरज आहे.

- प्रकाश घाटगे, रहिवाशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ग्रामीण भागात पहिलेच शूटिंग रेंज

$
0
0

मारुती पाटील, कोल्हापूर

शिंगणापूर येथील जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू विद्यानिकेतन निवासी क्रीडा प्रशालेत लोकसहभाग आणि जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून शूटिंग रेंज उभारण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी टप्प्याटप्प्याने येथे क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेतर्फे ग्रामीण भागात उभारण्यात येणारे हे पहिलेच शूटिंग रेंज असेल. पहिला टप्पा म्हणून मैदानाच्या सपाटीकरणाचे काम लोकसहभागातून करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेची राज्यातील ही पहिली निवासी क्रीडा प्रशाला आहे. यामध्ये निवडलेले १२५ खेळाडू शिक्षण घेत आहेत. प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी वर्षाला ८० हजार रुपयांचा खर्च येत आहे. यासाठी जिल्हा परिषदेने पंधरा कोटी रुपयांची ठेव ठेवली आहे. यातून मिळणाऱ्या व्याजातून प्रशालेतील विद्यार्थ्यांचा खर्च भागवला जात आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना क्रीडाक्षेत्रात नैपुण्य मिळविण्यासाठी चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हा परिषद प्रशासन प्रयत्नशील आहे. त्याचाच भाग म्हणून येथे क्रीडा संकुल उभारण्यात येत आहे. पहिल्याच वर्षी शाळेच्या खेळाडूंनी जिल्हा पातळीपासून राज्यस्तरीय स्पर्धेत अॅथलेटिक्स, कुस्ती, जिम्नॅस्टिक क्रीडाप्रकारात २५ पदके मिळवली आहेत. खेळाडूंच्या या कामगिरीची दखल घेत त्यांना नेमबाजीचे प्रशिक्षणही मिळावे, यासाठी शूटिंग रेंज उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

झेडपी सदस्यांचीही मदत

शूटिंग रेंजसाठी १३ ते १५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च लोकसहभाग आणि जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून करण्यात येणार आहे. शुटिंग रेंजप्रमाणे इतर खेळांसाठी मैदान तयार करण्याचे कामही सुरू आहे. त्यासाठी लोकसहभागाबरोबरच जिल्हा परिषद सदस्यांनी दीड ते दोन लाख रुपये मानधानातून दिले आहेत. या मैदानावर ४०० मीटरचा अॅथलेटिक्स ट्रॅक, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, फुटबॉल, मल्लखांब, बॅडमिंटन, कुस्ती आखाडा, लांब व उंच उडीसाठी मैदान तयार करण्यात येणार आहे. यापैकी कुस्तीचे मॅट, कबड्डी व खो-खो मैदान तयार झाले आहे.

अर्थमूव्हर्सची बांधिलकी

जिल्हा अर्थमूव्हर्स असोसिएशनने नेहमीच सामाजिक कार्यात सहभाग घेतला आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना अद्ययावत मैदान मिळण्यासाठी निवासी प्रशालेच्या मैदान सपाटीकरणाचे काम हाती घेतले होते. यासाठी संपूर्ण मशिनरी पुरवली आहे. मैदानाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामूहिक हितासाठी सामूहिक शेती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जिल्ह्यात शेतकऱ्यांचे सामूहिक हित नजरेसमोर ठेवून उत्पादन आणि विक्री व्यवस्था निर्माण करण्यासाठी १० शेतकरी उत्पादक कंपन्यांची नोंदणी झाली आहे,' असे प्रतिपादन आत्माचे प्रकल्प संचालक बसवराज मास्तोळी यांनी केले. कृषि विभागाच्या महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्पांतर्गत कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने शेतकरी उत्पादक कंपनी कार्यशाळा मंगळवारी घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

शेतकऱ्यांचे गट स्थापन करणे व शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचा प्रकल्प जागतिक बँकेच्या सहकार्याने राबवला जात आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यामध्ये झाला आहे. शेतकरी उत्पादन कंपनी स्थापन करण्यासाठी २० शेतकऱ्यांचा एक गट या प्रमाणे जिल्ह्यातील निवडलेल्या २२ क्लस्टरमध्ये अशा प्रकारच्या कंपन्या स्थापन करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. यासाठी अफार्म आणि डीएसटीसी या सेवापुरवठादार संस्था कार्यरत आहेत. त्यांच्यामार्फत जिल्ह्यात ५५० गट स्थापन करण्यात आले आहेत. या गटांचे प्रशिक्षण, नोंदणी, नोंदणीकृत गटांची क्षमता बांधणी, उत्पादन वाढीचे प्रशिक्षण, विक्रीव्यवस्था निर्माण करण्यासाठी पोस्ट हार्वेस्ट प्रशिक्षण दिले जात आहे. भात, सोयाबीन, भाजीपाला आणि केळी यांच्या कंपन्या करण्याचे नियोजन केले आहे.' मंगेश मंगरूळकर यांनी शेतकरी उत्पादक कंपनीसंदर्भात सादरीकरण केले. धनराज पाटील यांनी स्वागत केले. भाग्यश्री पवार तसेच तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. एस. डी. खाडे, विश्वनाथ पाटील, ए. डी. गळीतकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेल्मेटचे बंधपत्र रेकॉर्डवरच

$
0
0

सचिन यादव, कोल्हापूर

लायसन्सच्यावेळी हेल्मेट वापराचे प्रतिज्ञापत्राचे अस्तित्व केवळ कागदावरच राहिले आहे. वाहनधारकांनी हेल्मेट वापराची हमी दिली असली तरी प्रत्यक्षात हेल्मेटचा वापर केला जात नाही. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी लायसन्स देताना बंधपत्र लिहून घेण्याची सक्ती केली आहे. मात्र त्यांच्या अंमलबजावणीच्या कारवाईला आरटीओला आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेला मुहूर्त मिळालेला नाही.

वाहन चालविण्याचा परवाना देताना संबधितांकडून हेल्मेटचा वापर केला जाईल, असे प्रतिज्ञापत्र (बंधपत्र) लिहून घेतले जात आहे. सध्या मोठ्या शहरांमध्ये हेल्मेटची सक्ती केली जाते. मात्र हायवे आणि छोट्या शहरांमध्ये कारवाई होत नाही. हेल्मेट वापरासाठी वेगळ्याप्रकारे सक्ती केल्याशिवाय सुरक्षितता बाळगली जाणार नसल्याचे सूतोवाच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी कोल्हापुरात दोन दिवसांपूर्वी केले. मात्र हेल्मेट सक्तीच्या कारवाईसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. कोल्हापूर आरटीओ मध्ये एप्रिल २०१५ पासून हेल्मेट वापराचे बंधपत्र लिहून घेतले जात आहे. मात्र हेल्मेटचा वापर किती वाहनधारकांच्याकडून केला जात आहे, याचा कोणताही अहवाल आरटीओ कार्यालयाकडे आणि शहर वाहतूक शाखेकडे उपलब्ध नाही.

कर्नाटक राज्यात हेल्मेटची सक्ती आहे. हायवेवर कर्नाटक पोलिसांकडून कारवाई केली जाते. मात्र त्या तुलनेत महाराष्ट्र पोलिसांकडून कारवाई केली जात नाही. हेल्मेटची अंमलबजावणी करण्यासाठी आरटीओ आणि शहर वाहतूक शाखेने मौन बाळगले आहे. शहरात सुमारे अडीच लाख दुचाकी वाहनांची संख्या आहे. त्या तुलनेत आरटीओच्या तपासणी पथकाने सहा महिन्यात ८६ वाहनधारकांवर कारवाई केली आहे.

असे आहे बंधपत्र

मोटार वाहन कायदा १९८८ कलम १२९ नुसार वाहन चालवित असताना स्वतःच्या सुरक्षितेतसाठी हेल्मेट वापरणे बंधनकारक राहील. वाहन चालक आणि त्यांच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्तिनेही हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. त्या विषयाची जाणीव करुन देण्यासाठी मोटारवाहन कायद्याच्या तरतूदीनुसार बंधपत्र लिहून दिले जात आहे. वाहन चालविण्याच्या सुरक्षेतितेसाठी या तरतुदीचे पालन करण्याची हमी देत आहे.

'हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर तपासणी पथकाने कारवाई केली आहे. सहा महिन्यात ८६ वाहनधारकांच्यावर कारवाई करुन ११ हजार रुपये दंड वसूल केला आहे. वाहनधारकांची हेल्मेटसाठी जागरुकता हवी. येत्या काही दिवसांत ही मोहिम प्रभावी केली जाईल.

- लक्ष्मण दराडे, आरटीओ

'विविध कंपन्यांनी वाहन विक्री करतानाच मोफत हेल्मेट द्यावीत. हेल्मेट वापरुनही काही ठिकाणी मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. हेल्मेटची जनजागृती आणि शहरात वापराबाबत जनमताचा विचारही आवश्यक आहे. यापूर्वीही हेल्मेट विरोधासाठी आंदोलने झाली आहेत.

- अभिजित सूर्यंवंशी, वाहनचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झाड पडून दोघेजण जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पावसाने मंगळवारी दुपारपासून पुन्हा झोडपायला सुरू केली आहे. जोरदार वाऱ्यामुळे बिंदू चौकाजवळ दोन मोटारसायकलवर झाड पडून दोघेजण जखमी झाले. त्यांच्यावर सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. मंगळवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास ही घटना घडली. संजय जाधव (रा. देवकर पाणंद) व विलास तुकाराम पांडव (रा. नेसरी) अशी जखमींची नावे आहेत. दरम्यान, आंबोली धबधब्याजवळ पार्क केलेल्या मोटारीवर दगड पडल्याने मोटारीचे नुकसान झाले. त्यामुळे वाहतूक काही काळ विस्कळित झाली.

जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धरणांचा पाणीसाठा निम्म्यापर्यंत पोहचला आहे. गेल्या आठवड्यातील दोनच दिवसांच्या पावसाने पूरस्थिती निर्माण झाली होती. पंचगंगेची पातळी एका दिवसात दहा फुटांनी वाढली होती. पावसाचा जोर पाहता यंदाच्या पावसाळ्यातील नद्यांचा पहिला पूर लवकरच पहायला मिळणार अशी शक्यता होती. पण सोमवारी पावसाने चांगलीच उघडिप दिली. नेहमी अतिवृष्टी होणाऱ्या गगनबावडा तालुक्यात २४ तासांत अवघा ३७ मिलीमीटर पाऊस झाला. त्यामुळे सोमवारी रात्रीपासून नद्यांच्या पाणी पातळीत घट व्हायला सुरुवात झाली. पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावर २५ फुटावर पोहचलेली पातळी सकाळी आठ वाजता २३ फुटावर आली. तर सायंकाळी २१ फुटापर्यंत आली होती. दुपारनंतर मात्र शहरासह जिल्ह्याच्या सर्वच भागात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. मुसळधार सरींमुळे शहरातील जनजीवन विस्कळित झाले.

गेल्या दोन दिवसांपासून आजरा व आंबोली परिसरात पावसाचा जोर आहे. मुख्य धबधब्याजवळ उंच कड्यावरून मोठा दगड पार्क केलेल्या कारच्या (एमएच १२ एफएफ १९७७) मागच्या बाजूवर येऊन पडला. सुदैवाने कारमध्ये कुणीही नसल्याने जीवितहानी टळली. कड्यावरून याचवेळी आलेला आणखी एक मोठा दगड झाडाला तटल्याने अडकून राहिला. अपघातानंतर जेसीबी आणून दगड हलविण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, रात्री उशिरापर्यंत कार्यवाही सुरू होती. दरडी कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन पर्यटकांना मुख्य धबधब्याकडे जाण्यास प्रतिबंध केल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवे बांधकाम पाडणार

$
0
0

सुनील दिवाण, पंढरपूर

येथील विठ्ठल मंदिराची मूळ वास्तू धोकादायक बनल्यामुळे मंदिराची दुरुस्ती करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. मूळ मंदिरावर नव्याने झालेले बांधकाम, स्लॅब पाडण्यात येणार आहे. विठुरायाचे हेमाडपंती मंदिर अकराव्या शतकातील असल्याचे पुरावे आहेत. मात्र, मूळ मंदिर याच्याही पूर्वीचे असल्याचे इतिहासकार सांगतात. या मूळ मंदिराभोवती इतर वास्तू उभारून मंदिराची व्याप्ती वाढली. मात्र, या इतर बांधकामांमुळे मूळ मंदिरावर बोजा पडून वास्तूच खचू लागली आहे. पायाकडून मंदिर खचू लागल्याच्या खुणाही दिसू लागल्या होत्या. ही वस्तुस्थिती 'मटा'ने मांडली होती.

मध्यंतरी मंदिराचा एक दगड निसटून एक भाविक जखमी झाला होता. त्यानंतर मात्र मंदिर समिती खडबडून जागी झाली. समितीने धोकादायक बनू लागलेल्या मूळ वास्तूला लोखंडी खांब लावून आधार दिला होता. समितीने पुरातत्त्व विभागाकडे दुरुस्ती बाबत पत्रव्यवहार केला. आता पुरातत्त्व विभागाने मूळ मंदिरावर आलेल्या इमारती पाडण्याची परवानगी मंदिर समितीला दिली आहे. समितीचे नूतन अध्यक्ष जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी मूळ मंदिराला धोका ठरू लागलेल्या इमारती आणि स्लॅब पडण्याचा निर्णय घेतला आहे. आषाढी यात्रेनंतर या कामाला सुरुवात होणार आहे. मंदिरातील धोकादायक वायरिंगमुळे संभाव्य आगीचा धोका लक्षात घेऊन मंदिरातील वायरिंग आणि पुरातन लाकडी सभामंडपाच्या दुरुस्तीची कामेही समितीने हातात घेतले आहेत.

हे पडणार

विठ्ठल मंदिराच्या शेजारील महालक्ष्मी मंदिर, हत्ती दरवाजा, बाजीराव पडसाळी या नंतर बांधलेल्या इमारतींवरील सिमेंट कॉँक्रिटच्या स्लॅबचा बोजा मूळ मंदिरावर पडत आहे. त्यामुळे मंदिर खचत आहे. आता हा स्लाब पाडण्यात येणार असून, कमी वजनाचे छत बसविण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांदोलीत १९० मि. मी पाऊस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शिराळा

शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरात १९० मि. मी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील चांदोली धरण परिसरासह इतर भागांत रात्री मुसळधार सरी पडल्यामुळे सांगली जिल्ह्यातील मांगले आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काखे दरम्यानचा पूल बुधवारी सकाळी पाण्याखाली गेला. कोकरूड जवळचा कोकरूड रेठरे बंधाराही मंगळवारी रात्री पाण्याखाली गेला. आतापर्यंत ७२० मि. मी पाऊस चांदोली धरण परिसरात झाला आहे. धरणात २०.९३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. चांदोली धरण ६०.८५ टक्के भरले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४५० विद्यार्थी वाऱ्यावर?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शिराळा

शिराळा तालुक्यातील मांगले गावातील एका खासगी शाळेला अभय देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सुमारे ४५० पटसंख्या असणाऱ्या शाळेच्या सर्व वर्ग खोल्या भाड्याने देण्याचा घाट शिराळ्याचे गटशिक्षण अधिकारी सुनील मद्रूपकर यांनी घातला आहे. एकीकडे सरकार जिल्हा परिषदेच्या शाळा गरिबांसाठी चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. आणि दुसरीकडे तालुक्याचा जबाबदार अधिकारी जिल्हा परिषदेच्या शाळा वाचविण्याऐवजी खासगी शाळेला पाठींबा देत आहे. या मागे काय गौडबंगाल आहे. याची चौकशी व्हावी, अशी मागणी शिराळा पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रल्हाद पाटील, गावचे सरपंच दत्तात्रय पाटील, उपसरपंच संदीप तडाखे, यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

गावातील फत्तेसिंगराव नाईक कला क्रीडा मंडळ संचालित आदर्श बालक मंदिर शाळेने शाळेसाठी वर्ग खोल्या मिळाव्यात, अशी मागणी गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे केली होती. त्या पत्राच्या आधारे मांगले येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोल्या संबधित खासगी शाळेला देण्यात याव्यात असा पत्रव्यवहार त्यांनी केला आहे. शाळेला पत्रव्यवहार केल्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीला माहिती दिली त्यावेळी प्रशासनासमोर पेच निर्माण झाला. ४५० विद्यार्थी असणाऱ्या शाळेला जागा कमी पडत असताना गट शिक्षण अधिकाऱ्यांनी काढलेला 'जावईशोध' संशोधनाचा विषय होवून बसला आहे. विशेष म्हणजे गटशिक्षण अधिकाऱ्यांनी पत्रव्यवहार करताना ३ ऑगस्ट २०१५ची तारीख टाकून ११ जून २०१५ला संबधित शाळेच्या मुख्याध्यापकाना वर्ग खोल्याचा खुलासा मागवून दुसरा पराक्रम केला आहे. गटशिक्षण अधिकाऱ्यांचा खासगी शाळेला वर्ग खोल्या देण्याचा स्वार्थ काय? याची चौकशी होवून त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

झेडपी शाळेच्या खोल्या कोणाला द्यायच्या आणि कोणाला नाही, याचा निर्णय झेडपी सीईओंच्या अखत्यारीत येतो. संबंधित संस्थेने वर्ग खोल्या भाड्याने मिळण्याबाबत प्रस्ताव पाठवला होता. त्याबाबत चौकशी अहवाल विस्तार अधिकाऱ्यांमार्फत दिला. मी जागा द्या, किंवा नाही, असा पत्रव्यवहार केलेला नाही.

- सुनील मद्रूपकर, गटशिक्षण अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नालेसफाईअभावी धोका वाढला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहराच्या विविध भागात नालेसफाई केली नसल्याचे दोन दिवसाच्या पावसामुळे समोर झाले आहे. नाल्यातील कचरा, मातीचे ढीग, प्लास्टिक पिशव्या हटवले नसल्यामुळे अनेक भागात पाणी तुंबत आहे. नालेसफाईअभावी पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे संबंधित परिसरात धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. नगरसेवक मधुकर रामाणे यांनी या प्रश्नाकडे आयुक्तांचे लक्ष वेधले आहे. विविध भागात सफाई करण्याची आवश्यकता असून यासंदर्भात त्यांनी आयुक्तांना निवेदन दिले.

रामाणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकांत म्हटले आहे, 'नालेसफाई केली नसल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणूनही कसल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. परिणामी नाल्याशेजारच्या घरात पाणी शिरण्याचा धोका आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात मंगळवार, बुधवारी अपुरा पाणी पुरवठा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चंबुखडी टाकीवरून होणाऱ्या पाणी पुरवठा होणाऱ्या मुख्य गुरूत्वनलिकेवर व्हॉल्व बसविणे, बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रातील वाहिनीवरील गळती काढणे व दुरूस्तीची कामे मंगळवारी (ता.३० जून) करण्यात येणार आहेत. यामुळे ए, बी, सी, आ​णि डी वॉर्डमध्ये मंगळवारी व बुधवारी (ता.१ जुलै) रोजी कमी दाबाने व अपुरा पाणी पुरवठा होणार आहे. नागरिकांनी या कालावधीत काटकसरीने पाणी वापरावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे. संबंधित भागात महापालिकेतर्फे टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जाणार आहे.

सी, डी वॉर्ड तसेच ए आ​णि बी वॉर्डमधील काही भागात अपुरा पाणीपुरवठा होणार आहे. या वॉर्डातील भाग, उपनगरे, आपटेनगर, साने गुरूजी वसाहत, रिंगरोड, रायगड कॉलनी, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, देवकर पाणंद परिसराचा समावेश आहे. रंकाळा परिसर, गंगावेश, पापाची तिकटी, बाराईमाम, मिरजकर तिकटी, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, उत्तरेश्वर पेठ, बिंदू चौक, कोकणे मठ, गुजरी, लक्ष्मीपुरी, फुलेवाडी परिसर, लक्षतीर्थ वसाहतीत सुद्धा कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. ई वॉर्डमधील शाहूपुरी, उद्यमनगर परिसराला अपुरया पाणी पुरवठ्याचा फटका बसणार आहे. नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन जल अ​भियंता मनीष पवार यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकित शिष्यवृत्ती तातडीने द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

समाजकल्याण विभागाच्यावतीने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना २३ कोटी रुपये मिळालेले नाहीत. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातील ही रक्कम मिळणे अपेक्षित असताना गेल्या तीन महिन्यापासून शिष्यवृत्तीचे पैसे मिळालेले नाहीत. ही रक्कम त्वरीत मिळावी, अशी मागणी युवक काँग्रेसच्यावतीने अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांच्याकडे केली.

तसेच जातीचे दाखल मिळण्यास दिरंगाई होत असल्याचेही निदर्शनास आणून दिले. शिष्यवृत्ती रक्कम मिळण्यासाठी त्वरीत पाठपुरवा करु व जातीचे दाखल त्वरीत देण्यासाठी सर्व प्रातांधिकाऱ्यांना सूचना देऊ, असे आश्वासन देशमुख यांनी दिले.

यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, गेल्या चार वर्षांपासून एक लाख ८३२९४ मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी २२ हजार ५१० प्रकरणे प्रलंबित आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे २३ कोटी ७५ लाख रुपये समाजकल्याण खात्याच्या गलथान कारभारामुळे अडकून पडले आहेत. तसेच अस्वच्छ व्यवसायातील मुलांची ४६८० संख्या आहे. यापैकी २४३२ विद्यार्थ्यांची ५५ लाख रुपयांची बिले काढण्यात आली आहेत. मात्र अद्याप १७०२ मागील वर्षाची ३१ लाख रुपयांची शिष्यवृत्ती रखडली आहे. थकीत रकमेमुळे अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षच धोक्यात आले आहे. शिष्यवृत्तीचा असा घोळ सुरू असताना मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे साडेतीन कोटी रुपये परत गेले आहेत. यामुळे अनुसूचित विद्यार्थ्यांची फरफट होणार आहे. शिष्टमंडाळात दीपक थोरात, रुपाली पाटील, प्रभाकर पाटील, पार्थ मुढे, योगेश कांबळे, कृष्णात धोत्रे, निखिल इंगळे यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डीकेटीई’ला २३ वे मानांकन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

‍डीकेटीई सोसायटीच्या टेक्स्टाईल अॅण्ड इंजिनीअरींग इन्स्टिट्यूट, इचलकरंजी या महाविद्यालयाने राष्ट्रीय पातळीवरील आणखीन एक सन्मान प्राप्त केला आहे. 'हायर एज्युकेशन रिव्ह्यूव' या मॅगेझिनने केलेल्या सर्वेक्षणात डीकेटीईस 'बेस्ट प्रायव्हेट इंजिनिअरींग कॉलेजेसमध्ये' २३ वा क्रमांक प्राप्त झाला आहे तसेच 'टॉप २० अकॅडॅमिकली बेस्ट इंजिनिअरींग' कॉलेजसमध्ये ११ वा क्रमांक प्राप्त झाला आहे.

सन २०१४-१५ मध्ये 'हायर एज्युकेशन रिव्ह्यूव' या मॅगेझिनने प्रायव्हेट इंजिनीअरींग कॉलेजीसचे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणाअंतर्गत इन्फ्रास्ट्रक्चर, प्राध्यापक, रिसर्च, कन्सल्टन्सी, प्रोजेक्ट, प्रवेश, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, इंडस्ट्रीयल ट्रेनिंग, व्ह‌िजीटींग फॅकल्टी, नॅशनल इंटरनॅशनल सेमिनार व कॉन्फरन्स, गव्हर्टमेंट रिसर्च प्रोजेक्ट,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विद्यापीठ व इंडस्ट्रीशी झालेला सामंजस्य करार, प्रवेश, अभ्यासक्रम व ज्ञानदान, प्लेसमेंट अशा विविध मुदद्यावर संस्थेची कामगिरी अभ्यासली गेली. अशा पद्धतीचे सर्वेक्षण प्रायव्हेट इंजिनीअरींग कॉलेजिसचे करण्यात आले व यामध्ये डीकेटीईचे २३ व्या क्रमांकावर नामांकन झाले आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चर किंवा इतर सुविधा हे बाजूला ठेवून विशेषत: विद्यार्थ्यांना घेणारे ज्ञानदान, प्लेसमेंट व अॅकॅडमिक एक्स्लन्स याचा सर्वांगाने विचार करुन त्यांनी टॉप २० अॅकॅडॅमिकली बेस्ट इंजिनिअरींग कॉलेजिसची निवड केली आहे व त्यामध्ये डीकेटीईस ११ व्या क्रमांकाचे स्थान प्राप्त झाले आहे.

डीकेटीईचे अनेक औद्योगिक आणि शैक्षणिक संस्थाशी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार झालेले आहेत. याअंतर्गत जवळजवळ २० कोटी रुपयांच्या मशीनरीज संस्थेला देणगी स्वरुपात मिळालेली आहेत. इन्स्टिट्यूटचा इंडस्ट्रीजशी संवाद साधण्यामध्ये नेहमीच पुढाकार असतो. विविध औद्योगिक भेटीबरोबरच डीकेटीईत अनेक विषयावर कार्यशाळा, चर्चासत्रे, सेमिनार आयोजित करुन इंडस्ट्रीजमधील व्यक्तींची प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे चर्चा केली जाते. याबरोबरच विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूटकडून पुरविण्यात येणाऱ्या उत्तम शैक्षणिक सुविधेचा अभ्यास करुन या पुरस्कारासाठी डीकेटीईचे नामांकन झाले.

संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे इन्स्टिट्यूटचे प्राचार्य प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, उपप्राचार्या प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे व सर्व स्टाफ या सर्वांनी घेतलेले सातत्यपूर्ण परिश्रम यातून हे यश प्राप्त झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माणगाववाडीतील दारूभट्ट्या उद‍्ध्वस्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

माणगाववाडी (ता. हातकणंगले) येथे राज्य उत्पादन शुल्क आणि पोलिस विभागाने केलेल्या संयुक्त कारवाईत गावठी दारुच्या हातभट्ट्या उद‍्ध्वस्त करण्यात आल्या. या कारवाईत अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे २५ अधिकारी आणि ९० कर्मचाऱ्यांचा सहभाग असलेल्या या धडक कारवाईत एकही आरोपी हाती लागला नाही.

याबाबत मिळालेली माहिती अशी, हातकणंगले तालुक्यातील माणगांववाडी येथे सुरु असलेल्या गावठी दारुच्या हातभट्ट्यांवर बुधवारी पहाटेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक राजेश कावळे यांच्या उपस्थितीत कारवाईला सुरुवात करण्यात आली. यामध्ये ५० बॅरेल रसायन, ५० लिटर तयार दारु आणि २० रिकामे बॅरेल, होज पाईप, जर्मन डबे आणि दारु तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. हातकणंगले पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपाधिक्षक संजय पाटील, निरीक्षक संजय जाधव, दुय्यम निरीक्षक रावसाहेब कोरे, विजय टिकोळे, राजेंद्र खोत, प्रभारी निरीक्षक शिवाजी कोरे, जगन्नाथ पाटील यांच्यासह पोलिस निरीक्षक रमेश सरवदे सहभागी झाले होते.

दरम्यान, माणगांववाडी येथे गावठी दारुच्या हातभट्ट्या राजरोसपणे सुरु असतात. मुंबई येथे विषारी दारुमुळे शंभरहून अधिक जणांचा बळी गेल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाला वरातीमागून घोडे या उक्तीप्रमाणे जाग आली आहे. मुंबईतील दुर्घटनेनंतर ही कारवाई करण्यात आली असली तरी हातकणंगले पोलिस नेमके काय करतात. सातत्याने निर्मिती होत असलेल्या या हातभट्ट्यांवर हातकणंगले पोलिसांकडून का कारवाई होत नाही असा सवाल नागरिकांतून व्यक्त होत आहे. इतकी मोठी कारवाई आज करुनही या हातभट्ट्या कोणाच्या मालकीच्या आहेत किंवा कितीजणांना या प्रकरणी अटक केली या पत्रकारांनी केलेल्या प्रश्नावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना उत्तर मात्र देता आले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामतीर्थ घालतेय साद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

पावसाळी पर्यटनाचा आकर्षणबिंदू असलेला आजऱ्यानजीकचा हिरण्यकेशी नदीवरील रामतीर्थ धबधबा आता कोसळू लागला आहे. गेले काही दिवस आजरा परिसरात पाऊस नसला तरी हिरण्यकेशीचे उगमस्थान असलेल्या आंबोली परिसरात जास्त पाऊस होता. त्यामुळे उन्हाळ्यात कोरडा ठणठणीत पडलेला हा धबधबा ज‌िवंत होऊन वाहू लागला होता. अशातच कालपासून तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये १९३ मिलीमिटर नोंदीसह पावसाने जोरदार आगमन केल्याने आता हा धबधबा कोसळू लागला आहे. त्यामुळे पावसाळी पर्यटनाच्या निमित्ताने आंबोली व कोकण परिसरात ये-जा करणाऱ्या पर्यटकांसाठी आजचा पहिला रविवार कमालीचा पर्वणीचा ठरला.

आजऱ्यासह आंबोली व कोकण परिसरातील पावसाळी पर्यटनक्षेत्र म्हणून रामतीर्थ धबधबा ओळखला जातो. आजऱ्याच्या पश्चिमेकडील परिसरात ऐसपैस वाहणाऱ्या हिरण्यकेशी नदीमध्ये येथील रामतीर्थ या धार्मिक स्थळी काळ्याकभिन्न पाषाणांची महाकाय पण सपाट रांग आहे. या ठिकाणीच हा धबधबा ७०-८० मीटरचे विस्तीर्ण नदीपात्र कवेत घेऊन खाली झेपावतो. वास्तविकत: डिसेंबरपर्यंत हा धबधबा आपल्या सौंदर्याचा अविष्कार निसर्गप्रेमींसाठी उधळत राहात असला तरी ऐन मुसळधार पर्जन्यवृष्टीमध्ये नव्यानेच नदीला आलेल्या तजेलदार तांबुस-लाल पाणी घेऊन त्याचे कोसळणे, त्याचे खर्जाच्या स्वरातील संगीत एकणे आणि त्या कोसळण्याने निर्माण होणारे फेसाळ करीही आक्राळ-विक्राळ स्वरूप न्याहाळणे हा पावसाळी पर्यटकांच्या नित्याचा तरीही पर्वणीचा नेम बनला आहे. रविवारच्या सुटीच्या निमित्ताने येथून पुढे कोकणाकडे जाणारे पर्यटक या धबधब्याचे सौंदर्य आपल्या डोळ्यात साठवून थव्याथव्यानेच पुढे जात होते.

काळजी घ्या...

रामतीर्थ धबधबा हा नदीपात्रा असल्याने पात्रातील पाणी मोठ्या वेगाने खाली कोसळते. त्यामुळे येथे पाण्याचा भोवरा निर्माण होतो. याआधी काही पर्यटकांनी अतित्साही होत पोहण्यासाठी झेप घेतली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने अनेकांचा मृत्यू ओढवला होता. या धबधब्यात पोहणे अत्यंत धोकादाय आहे. या धबधब्याचे सौंदर्य पाहण्यासाठी रॅम्प तयार करण्यात आला आहे. त्यामुळे अतिधाडस न करता नैसर्गिक सौंदर्य न्याहाळणेच योग्य आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समितीचे ३ संचालक अपात्रच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लवादाच्या शिफारसीनुसार जिल्हा उपनिबंधकांनी बरखास्त केलेल्या कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान १३ संचालकांना निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी अपात्र ठरवले होते. निवडणूक अधिकाऱ्यांच्या निकालाविरोधात यापैकी तीन संचालकांनी जिल्हाधाकारी यांच्याकडे अपील दाखल केले होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निकाल जिल्हाधिकारी यांनी कायम राखत संचालक नंदकुमार वळंजू, कृष्णात चव्हाण व नयन प्रसादे यांचे अपील फेटाळले. यामुळे अपात्र संचालकांना पुढील सहा वर्षे कोणत्याही सहकारी संस्थेची निवडणूक लढवता येणार नाही.

महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ च्या कलम ४५ नुसार बरखास्त केलेल्या संचालक मंडळातील व्यक्तीला पुढील सहा वर्षे निवडणूक लढवता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. याच नियमाचा आधार घेवून शिवसेनेच्या अनिल रघुनाथ पाटील यांनी हरकत घेत त्यांचे अर्ज अवैध ठरवण्याची मागणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती. या कायद्याचा अधार घेत निवडणूक अधिकाऱ्यांचे अर्ज अपात्र ठरवले होते. याविरोधात १३ ही संचालकांनी अपील दाखल केले होते. मात्र वळंजू, चव्हाण व प्रसादे यांच्याशिवाय इतर संचालकांची कागदपत्रे अपूर्ण असल्याने त्यांचे अपील जिल्हाधिकाऱ्यांनी दाखल करुन घेतले नव्हेत. दाखल झालेल्या अप‌िलावर जिल्हाधिकारी यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यात तीनही संचालकांचे अपील फेटाळून लावण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चार दिवसांपासून चंदगड अंधारात

$
0
0

चंदगडः गेले चार दिवस सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळी वारे व चोहोबाजूने येणा-या पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणीच पाणी झाले आहे. तहसील कार्यालयातील मिळालेल्या आकडेवारीनुसार आज सकाळी आठ वाजेपर्यंत तालुक्यामध्ये सरासरी ११३ मिलीमिटर पाऊस झाला आहे. आतापर्यंतच्या पावसामुळे अनेक घरांची पडझड होवून सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत वाहिनीवर झाडांच्या फांद्या पडल्याने सुमारे चार दिवस तालुका अंधारात आहे. शनिवारपासून चंदगड शहरही अंधारात होते. सोमवारपासून शहरातील विद्युत पुरवठा काहीसा सुरू झाला. मात्र तालुक्यातील हेरे, झांबरे, कानूर, तुर्केवाडी, कोवाड परिसर चार दिवसांपासून अंधारात आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधीक्षकांची हकालपट्टी करा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाच्या व्यवस्थेविरोधात वारंवार आंदोलने होतात मात्र सुधारणा होत नाहीत. डॉक्टर्स केवळ हजेरीसाठी उपस्थित राहत असून दिवसाढवळ्या रुग्णांची लूट सुरु आहे. अधीक्षकांचे या सर्व परिस्थितीकडे दुर्लक्ष आहे असा आरोप करीत त्यांची येथून हकालपट्टी करण्यात यावी, असा ठराव बाळेश नाईक यांनी मांडला. पंचायत समितीच्या मासिक सभेत ते बोलत होते. सभापती अनुसया सुतार अध्यक्षस्थानी होत्या.

आरोग्य विभागाचा आढावा घेत असताना सदस्य नाईक यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या ढिसाळ कारभाराचा पाढा वाचला. आजअखेर झालेल्या पंचायत समितीच्या कुठल्याच सभेला अनुपस्थित राहिलेले आरोग्य अधिकारी आज प्रतिनिधीच्या रूपाने सभेला उपस्थित होते. या पार्श्वभूमीवर 'उपजिल्हा रूग्णालय भारताबाहेर आहे असे समजत असलेल्या रुग्णालयाचे प्रतिनिधी सभेला उपस्थित राहिले याबद्दल त्यांचे अभिनंदन' असा उपरोधिक टोला लगावत सदस्य नाईक यांनी डॉ. स्वाती कमल यांना धारेवर धरले. आज अखेर उपजिल्हा बाबत अनेक आंदोलने झाली. अधीक्षक रजेवर असतानासुद्धा सर्व कर्मचाऱ्यांचे पगार व बिले वेळेत निघतात. मात्र कामाच्या बाबतीत मात्र नियोजन नसल्याची टीका करीत आरोग्य अधीक्षक डॉ.सुनील कुरुंदवाडे यांच्या हकालपट्टीचा ठराव मांडण्यात आला. सदस्य हेमंत कोलेकर यांनी त्याला अनुमोदन दिले.

शिक्षणविभागाच्या आढावा घेताना गटशिक्षणाधिकारी डॉ. जी. बी. कमळकर यांनी शाळा बाह्य घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर 'शाळाबाह्य शोध मोहीम' राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली. यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून ४ जुलै २०१५ रोजी सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली काम सुरु होईल. या शैक्षिणिक वर्षाच्या सुरवातीलाच १०२० पट नोंद झाली असून तालुक्यातील प्रत्येक शाळेत पुस्तके पोहोच झाली आहेत. तसेच विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

सामूहिक रजा

दुपारी एकच्या सुमारास सभागृहात मासिक सभा सुरु झाली. त्याचवेळी चंचल पाटील यांच्या दालनात कर्मचाऱ्यांची बैठक होवून अचानक सर्वच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सामुहिक रजेचा निर्णय घेतला. यावेळी सभागृहात सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद जगदाळे, कार्यालय अधीक्षक विठ्ठल भवारी व सभा कामकाज लिपिक यांच्यासह सदस्य व अन्य विभागप्रमुख उपस्थित होते. रजेच्या निर्णयामुळे पदाधिकारी चिडले. त्यांनी अजेंड्यावरील विषय संपविले आणि कर्मचाऱ्यांचा समाचार घ्यायला सुरवात केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...आता उरले काही दिवस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वर्षभर ​वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेण्याची संधी देणाऱ्या मटा कल्चर क्लबची सदस्य नोंदणी सुरू आहे. महाराष्ट्र टाइम्सतर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून रसिक वाचकांच्या कुटुंबीयांना या मंचाद्वारे सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक कार्यक्रमांसह विविध प्रात्यक्षिकांमधून माहितीपूर्ण मनोरंजनाची संधी मिळणार आहे. २९९ रूपयामध्ये वर्षभराचे सदस्यत्व असलेल्या या कल्चर क्लबचे सदस्य होण्यासाठी मटाच्या नागाळापार्क येथील कार्यालयात वाचकांची गर्दी होत आहे.

दर्जेदार नाटकं, नृत्य, काव्यमैफल, पुस्तक अभिवाचन, सिनेमांचे प्रीमियर, हेरिटेज वॉक, निसर्गभ्रमंती, सेलिब्रिटींसोबत भेटीगाठी, सांगीतिक मैफल, शै​क्षणिक व्याख्याने अशा भरगच्च कार्यक्रमांच्या माध्यमातून मनोरंजनाचे माहितीपूर्ण दालन कोल्हापुरात खुले होत आहे. मटा कल्चर क्लबच्या मंचावर कोल्हापुरातील रसिक वाचकांना दर्जेदार कार्यक्रमांचा आस्वाद देण्यासाठी हे दालन खुले झाले आहे. कुटुंबातील प्रत्येकाच्या आवडीनिवडी, स्वारस्याचे विषय घेऊन त्यावर आधारित मनोरंजनाची पर्वणी मटा कल्चर क्लबच्या माध्यमातून रसिकांना मिळणार आहे.

सुंदर हस्ताक्षर वर्कशॉपचे आयोजन मटा कल्चर क्लबतर्फे करण्यात आले आहे. २७ व २८ जून रोजी ही कार्यशाळा होणार आहे. हा कार्यक्रम केवळ शालेय व महाविद्यालयीन मुलांसाठीच नव्हे तर नोकरदार, व्यावसायिक, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी मोलाचा ठरणार आहे. अक्षरांच्या या वळणदार प्रवासात खूप काही शिकण्याची संधी मटाने दिली आहे. निर्मितीचा आनंद देणारी एरो मॉडेलिंग ही कार्यशाळा होणार आहे.

सध्याचे आघाडीचे कलाकार गायक आनंद भाटे आणि बासरीवादक अमर ओक यांच्या कलाकारीचा एकत्रित संगम मटाच्या निमित्ताने घडून येणार आहे. आनंद भाटे यांच्या गायकीला अमर ओक यांच्या बासरीची साथ ​हा अनुभव मटा कल्चर क्लबच्या सदस्यांना मिळणार आहे. यानिमित्ताने स्वर आणि बासरी यांचा मिलाफ आणि एक श्रवणीय जुगलबंदी घडून येणार आहे.

रोज अनेक कारणाने आपण कोल्हापुरात फिरतो. पण आपल्याच शहराची वेगळी ओळख करून देणारा हेरिटेज वॉक हा उपक्रम होणार आहे. कोल्हापूरला असलेली ऐतिहासिक श्रीमंती पाहताना आपण कोल्हापूरकर असल्याचा वेगळा अभिमान या निमित्ताने अनुभवता येणार आहे.

सध्या आरोग्यदायी जीवनाला खूप महत्त्व आहे. आपण जे खातो त्यातून आपल्या आरोग्याला धोका पोहोचू नये, यासाठी प्रत्येकजण जागरूक आहे. मटाने हाच विचार करून खास कल्चर क्लबच्या सदस्यांसाठी डाएट ब्रेकफास्ट प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. ब्रेकफास्ट दिवसाची सुरूवात असते. ती जर आरोग्यदायी झाली तर आरोग्याच्या तक्रारी कमी होऊ शकतात. असे डाएट ब्रेकफास्ट घरच्याघरी कसे करता येतील हे या वर्कशॉपमध्ये शिकायला मिळणार आहे.

एका कार्डावर कुटुंबाचे मनोरंजन

मटा कल्चर क्लब हा संपूर्ण कुटंबासाठी मनोरंजनाची पर्वणी घेऊन आला आहे. कुटुंबातील शालेय व महाविद्यालयीन मुले, ज्येष्ठ नागरिक, गृहिणी, पुरूष यांच्या आवडीनिवडीचा विचार करून विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे कुटुंबातील एका सदस्याने मटा कल्चर क्लबचे सदस्यत्व घेतले तरी त्या कार्डवर कुटुंबातील दोन सदस्य येऊ शकतात. जेव्हा मुलांसाठी कार्यक्रम असेल तेव्हा ते कार्ड मुले वापरू शकतात, तर ज्येष्ठांसाठी आयोजित कार्यक्रमांना त्याच कार्डच्या माध्यमातून प्रवेश दिला जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकरी १०० टन उसासाठी प्रयत्न करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'दरडोई उत्पन्न वाढून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा मिळावा, यासाठी 'आत्मा'ने कृषि विज्ञान व तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार करावा. येत्या काळात एकरी शंभर टन ऊस उत्पादन, जैविक पध्दतीने हुमणी नियंत्रण, दर्जेदार गूळ उत्पादन, मधुमक्षिकापालन आणि मत्स्यव्यवसाय विकास कार्यक्रम जिल्ह्यात व्यापक प्रमाणात राबवावा. त्यासाठी अभ्यासपूर्ण आणि काटेकोर नियोजन करावे,' असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केले.

कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेची (आत्मा) बैठक जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. डॉ. सैनी म्हणाले, 'उसाच्या नवीन जाती, सुधारित लागवड तंत्रज्ञान (पट्टा पद्धत), बीज प्रक्रिया, सेंद्रिय व रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर, आधुनिक सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर व एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीने उसाचे उत्पादन घेतल्यास एकरी १०० टन इतके उत्पादन घेऊ शकतो. हे विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या प्रात्यक्षिकांतून दिसून आले आहे. त्यामुळे कृषि तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत गेले तरच त्याचा लाभ होईल. जिल्ह्यात सुमारे ४ लाख एकर ऊस क्षेत्र आहे. यावर्षी त्यापैकी किमान १ लाख एकरावर शाश्वत ऊस उत्पादकता तंत्रज्ञान अभियान राबविण्यात यावे. यामध्ये शेतीशी निगडित मूल्यांकन झालेल्या गटांमधील १२०० अ व ब गटांचा सहभाग असावा. शेतकऱ्यांच्या व्यापक सहभागासाठीचे सूक्ष्म नियोजन आत्माने करावे व एकरी १०० टन ऊस उत्पादन अभियान यशस्वी करावे. दर्जेदार गूळ उत्पादनासाठीही आत्मा मार्फत प्रयत्न होणे आवश्यक आहे.' हुमणी नियंत्रणासाठी जिल्ह्यातच जैविक तंत्रज्ञान कसे उपलब्ध करुन देता येईल, यावर चर्चा करताना जे हैद्राबादमध्ये शक्य होते ते कोल्हापूरमध्ये का होवू शकत नाही, असा प्रश्न त्यांनी केला.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, आत्माचे प्रकल्प संचालक बसवराज मास्तोळी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी मोहन आटोळे, आत्माचे प्रकल्प उपसंचालक ए. डी. गळीतकर आणि भाग्यश्री पवार, महिला शेतकरी सुजाता गाट, दिनकरराव किल्लेदार उपस्थित होते.

मत्स्य व्यवसायात संधी

जिल्ह्याची आवश्यकता व निर्मिती क्षमता याबाबत आढावा घेण्याची सूचना यावेळी करण्यात आली. मत्स्य व्यवसायामध्ये जिल्ह्याला संधी आहे. जिल्ह्यात शेततळ्यांची संख्या वाढत आहे. गोड्यापाण्यातील मत्स्यपालनाला मोठा वाव आहे. त्यामुळे ज्या तालुक्यांमध्ये सर्वात जास्त शेततळी आहेत, अशा तालुक्यात मत्स्यनिर्मितीसाठी प्रयत्न करण्यात यावेत. आजरा घनसाळमधील भेसळ कशी थांबविता येईल, याबाबतही बैठकीत चर्चा झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘केएमटी’ साठी एक कोटींची तरतूद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर

थकीत वेतनासाठी आंदोलनाच्या पावित्र्यात असलेल्या केएमटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला. महापालिकेतर्फे कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्याची निर्णय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या बैठकीत झाला. गुरूवारी आणि शुक्रवारी प्रत्येकी पन्नास लाख रुपये केएमटीच्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दिले जाणार आहेत. यामुळे गुरूवारी मध्यरात्रीपासून होणारे कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

केएमटीकडे वाहक, चालक, वर्कशॉप व रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांची संख्या १००० च्या आसपास आहे. या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दरमहा एक कोटी २० लाख रुपये इतकी रक्कम लागते. एकूण पगारापैकी चाळीस लाख रुपये विमा, अल्पबचत खाते, भविष्यनिर्वाह निधी अशा विविध योजनेतंर्गत कपात केली जाते. दरम्यान, केएमटी कर्मचाऱ्यांचा एप्रिल आ​णि मे महिन्याचा पगार थकीत आहे. थकीत वेतनाचा निर्णय झाला नाही तर कोल्हापूर महापालिका इंटक युनियनने गुरूवारी मध्यरात्रीपासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता.

कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी बुधवारी आयुक्त पी. शिव शंकर, परिवहन समिती सभापती अजित पोवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते राजू लाटकर, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले, मुख्य लेखापाल संजय सरनाईक यांची बैठक झाली. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतन प्रश्नी तत्काळ तोडगा काढण्याचे ठरले. 'एप्रिल महिन्याचे ५८ लाख रुपये वेतन थकीत आहे. त्याकरिता गुरूवारी ५० लाख रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले. शुक्रवारी ५० लाख रुपये मिळणार असून मे महिन्याचा पगार दिला जाणार आहे.' अशी माहिती अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images