Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

'जत तालुक्यातील बेचाळीस गावांना कर्नाटकात जाण्यासाठी नाहरकत दाखला द्यावा,' अशी मागणी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार यांनी थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या मागणीमुळे जत तालुक्यातील पाणी प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बुधवारी जत तालुक्यातील उमदी ते सांगली अशी पदयात्रा काढण्यात येणार आहे. यामध्ये खासदार संजय पाटील, आमदार विलासराव जगताप सहभागी होणार असल्याने या अनोख्या आंदोलनाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

जत तालुक्याच्या पूर्व भागातील बेचाळीस गावे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेपासून वंचित आहेत. सरकारच्या अन्य योजनाही या गावांपासून चार हात दूरच असल्याचे चित्र आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी विधानसभेच्या वेळी पाणीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. उद्धव ठाकरे यांनीही जतचा दौरा करून संबधित गावांतील लोकांची भेट घेतली होती. शिवाय त्यावेळच्या दुष्काळात चारा छावण्या सुरू करून दिलासा दिला होता. सेना-भाजप सत्तेवर आल्यानंतर पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल, असे वाटल्याने पाणी संघर्ष समिती भाजप उमेदवाराच्या प्रचारात सक्रीय झाली होती. परंतु, अद्यापही या गावांना न्याय मिळत नाही. त्यामुळे आता आम्हाला कर्नाटकात जाण्यासाठी परवानगी द्यावी, असे पत्र समितीच्या वतीने उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे. शिवाय बुधवारी उमदी ते सांगली या पदयात्रेत जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन पोतदार यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुख्याधिकारी पवार धारेवर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

प्रभागातील विकासकामेच होत नसल्याने नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने सोमवारी मुख्याधिकारी सुनील पवार यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करीत अक्षरशः धारेवर धरले, तर बांधकाम समिती सभापती भाऊसाहेब आवळे व नगरसेवक मोहन कुंभार यांच्यात हमरी-तुमरी होऊन एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याबरोबरच शिवीगाळ, धमकाण्याचा प्रकार घडला. या गोंधळात नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी तेथून काढता पाय घेतला. मुख्याधिकाऱ्यांच्या दालनातच झालेल्या या शाब्दिक चकमकीनंतर पालिकेतील वातावरण तणावपूर्ण बनले होते.

प्रभाग क्र. १३ मधील विकासकामांबाबत नगरसेवक विठ्ठल चोपडे, मोहन कुंभार व दीपक ढेरे यांनी तक्रारी केल्यामुळे या भागातील कामे खोळंबल्याचे वक्तव्य मुख्याधिकारी पवार यांनी करताच गोंधळाला सुरुवात झाली. बांधकाम समिती सभापती भाऊसाहेब आवळे यांनी शिष्टमंडळाला समजावण्याचा प्रयत्न केला; पण कोणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. मुख्याधिकारी पवार यांना शिष्टमंडळाने धारेवर धरत त्यांच्याशी हुज्जत घातल्यास सुरुवात केली. नगरपालिकेने या प्रभागात गेल्या दोन वर्षांत कोणत्या सुविधा उपलब्ध केल्या, असा सवाल उपस्थित करत अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.

या प्रभागातील नागरी सुविधांबाबत पालिकेने निविदा प्रसिद्ध केल्या असल्याचे सांगत मुख्याधिकारी पवार यांनी यापैकी काही कामांना मंजुरी मिळाल्याचे सांगितले. मात्र, काही आजी-माजी नगरसेवकांच्या तक्रारीमुळे या प्रभागात मक्तेदार काम करण्यास तयार होत नसल्याचे सांगताच संतापात भर पडली. काम न करणाऱ्या मक्तेदारास पालिका ठेका का देते, असा उलट सवाल उपस्थित नागरिकांनी केला. यावेळी बांधकाम सभापती आवळे यांनी शिष्टमंडळाला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त नागरिकांनी आवळे यांच्याशीच हुज्जत घातली.

नगरसेवक संतोष शेळके हे प्रभागातील प्रलंबित कामे मागील महिन्यात पूर्ण करण्याचे आश्वासन आपणास यापूर्वी दिल्याचे वारंवार मुख्याधिकाऱ्यांना सांगत होते, तर नगरसेवक मोहन कुंभार यांनी बांधकाम विभागाकडूनच कामे होत नसल्याचा आरोप करताच आवळे संतप्त बनले. त्याचवेळी आवळे यांना कुंभार यांच्या समर्थकांनी शिवीगाळ केल्याचे आवळे यांनी त्या कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी आवळे-कुंभार यांनी एकमेकांना एकेरी शब्दप्रयोग केल्याने कार्यकर्तेही संतप्त झाले. अखेर पोलिसांनी कार्यकर्त्यांना दालनाबाहेर काढले. यावेळी शहर विकास आघाडीचे मदन झोरे, महादेव गौड, आदी नगरसेवक उपस्थित होते. दरम्यान, गोंधळानंतर मुख्याधिकारी सुनील पवार यांनी कामगार अधिकारी विजय राजापुरे यांना याबाबतचा अहवाल संबंधित पोलिस ठाण्याला पाठविण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळा प्रवेशही ऑनलाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये भरमसाठ घेतले जाणारे डोनेशन, शालेय साहित्यांची सक्ती, आरटीइनुसार २५ टक्के आरक्षणाबाबत घेण्यात येणारा गैरफायदा रोखण्यासाठी अकरावी केंद्रीय प्रवेशाप्रमाणेच शालेय प्रवेश प्रक्रियाही ऑनलाइन करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सहाय्यक शिक्षण उपसंचालक संपतराव गायकवाड यांनी सांगितले.

मेन राजाराम हायस्कूलमध्ये सोमवारी शिक्षण उपसंचालक व शहर शिवसेनेच्यावतीने शाळा प्रवेशाबाबत संस्थाचालकांच्या मनमानी कारभाराबाबत आलेल्या तक्रारीबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी शिक्षण उपसंचालक एम.के.गोंधळी, माध्यमिक शिक्षणधिकारी ज्योत्स्ना शिंदे, प्राथमिक शिक्षणाधिकारी स्मिता गौड, विज्ञान विभाग सल्लागार ए. एस. रणदिवे, शिक्षण उपनिरीक्षक ए.आर.पोतदार, प्रशासन अधिकारी प्रतिभा सुर्वे उपस्थित होते.

गायकवाड म्हणाले, 'गेल्या पाच वर्षांपासून अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन केल्यानंतर त्यात पारदर्शकता आली. याच धरतीवर बालवाडीपासून माध्यमिक शाळेच्या प्रवेशामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी जुलैमध्ये बैठक घेण्यात येणार आहे. ही प्रणाली ऑनलाइन राबविण्यासाठी काय करता येईल याचा विचार बैठकीत केला जाणार आहे. जेणेकरून सध्या संस्थाचालकांविरोधात असलेल्या तक्रारी दूर होतील. तसेच यावेळी २५ टक्के आरटीइनुसार गरजू विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाणार असून जर ती जागा भरली नसेल तर ती रिकामीच राहील.'

गोंधळी म्हणाले, 'जे संस्थाचालक बैठकीला उपस्थित नव्हते त्यांना नोटीस पाठविण्यात येणार असून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. फीबद्दल लवकरच आदेश येणार असून त्यानंतर ती ठरविली जाणार आहे. शाळांनी सक्तीने फी जमा केली तर तो गुन्हा ठरविण्यात येईल. तसेच शाळांनी विद्यार्थी व पालकांना शालेय साहित्याबद्दल सक्ती करू नये. यासाठी शिक्षणाधिकारी व प्रशासन लवकरच शाळांना भेटी देऊन पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे.

पालकांसाठीही तक्रारपेटी

शाळेतील विद्यार्थ्याला काही अडचणी असल्यास त्याबद्दलची तक्रार त्याने शाळेतील तक्रारपेटीत करण्याबाबतचा 'उमंग' नावाचा उपक्रम शाळेत राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पालकांच्या शिक्षणसंस्थांबद्दल काही तक्रार असल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र तक्रारपेटी ठेवण्यात यावी, अशी सूचना यावेळी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वायरमनसाठी खबरदारीचा डोस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वीज यंत्रणेमध्ये झालेला बिघाड दुरुस्त करण्यासाठी किंवा विद्युत पोलवरील काम करताना योग्य खबरदारी न घेतल्यामुळे वायरमनचा मृत्यू होतो. गेल्या आठ दिवसांत कोल्हापूर जिल्ह्यात अशा घटनांमध्ये दोन वायरमन आणि चार नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. असे प्रकार यापुढे होऊ नयेत यासाठी 'महावितरण'च्यावतीने पोलवर चढण्यापूर्वी काय खबरदारी घ्यावी याच्या माहितीचे कार्ड वायरमनच्या घरात आणि खिशात देण्याचा निर्णय घेतला आहे. खबरदारीसाठीच्या या योजनेची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

पावसाळ्याच्या काळात वीज खांब, ट्रान्सफार्मर दुरुस्ती करताना वायरमनसमोर अनेक अडचणी असतात. काम पटकन उरकण्याच्या गडबडीत वायरमनकडून योग्य खबरदारी घेतली जात नाही. आवश्यक ती साधने न वापरल्यामुळे वायरमनला जीव गमवावा लागतो. आपल्यावर पूर्ण कुटूंब अवलंबून आहे ही बाब पोलवर चढताना वायरमन विसरतात. मात्र त्यांनी या गोष्टीचे भान ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी घरातून निघतानाच त्याने कोणती काळजी घ्यावी याबाबतचा बोर्ड त्याच्या घरात लावण्यात येणार आहे. वायरमन बाहेर पडताना त्याच्या कुटुंबियांनीही त्यांना समज द्यावी आणि त्यानेही आपला जीव धोक्यात घालून काम करू नये असा याचा उद्देश आहे.

केवळ घरात बोर्ड लावून थांबण्यापेक्षा वायरमन जेव्हा पोलवर चढेल त्यावेळीही त्याला जाणीव व्हावी यासाठी पावले उचलली जाणार आहेत. साहित्य घेण्यासाठी खिशात हात घातल्यावरही त्याला एक कार्ड मिळेल. त्या कार्डवरही पोलवर चढण्यापूर्वी काय काळजी घ्यावी याबाबतची माहिती त्याला मिळेल. त्यात विद्युत पुरवठा बंद आहे का ?, ग्लोव्हज् वापरले आहेत का ? सिडीचा वापर केला आहे का ? अशा सूचनांचे त्याला स्मरण होईल आणि तो सावध होईल अशी अपेक्षा आहे. वायरमनच्या कुटुंबाचेही मनोधैर्य वाढविणे आणि त्यांनी वायरमनला सूचना देणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांच्या कुटुंबियांना एकत्र आणून त्यांनाही याबाबत माहिती देण्यात येणार आहे. त्याबरोबरच विद्युत संघटनांचेही याबाबतीत प्रबोधन करण्यात येणार आहे.

गेल्या वर्षभरात कोल्हापूर सर्कलमध्ये ६ कर्मचाऱ्यांचा विद्युत दुरुस्तीदरम्यान अपघातात मृत्यू झाला आहे. हे प्रमाण राज्यातील अन्य विभागांत सर्वाधिक आहे. असे प्रकार कमी करण्यासाठी या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याची अंमलबजावणी लवकरच करू.

- शंकर शिंदे, मुख्य अभियंता, महावितरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसुली घटली, पगार लांबला

$
0
0

आप्पासाहेब माळी, कोल्हापूर

अपेक्षित करवसुली होत नसल्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडला आहे. केएमटी कर्मचाऱ्यांचाही मे महिन्याचा पगार झालेला नाही. व्यापाऱ्यांचा एलबीटी भरण्यास विरोध, घरफाळा, पाणी पुरवठा, नगररचना आणि बांधकाम विभागाकडून अपेक्षित वसुली होत नसल्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात घट झाली आहे. एरवी दरमहा पहिल्या आठवड्यात पगार मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता पंधरा तारखेपर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे.

घरफाळा विभागात थकीत रकमेत नियमबाह्य सवलत दिल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर दोन महिन्यापासून बहुतांशी कर्मचारी पावत्या तपासणीच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे अजूनही बिले तयार करण्याचेच काम सुरू आहे. ती वितरित झाल्यानंतर वसुली सुरू होईल. महापालिकेची निवडणूक ऑक्टोबरमध्ये आहे. विविध विभागांतील कर्मचाऱ्यांकडे निवडणुकीची कामे सोपवल्याने वसुलीवर परिणाम झाला आहे. पगार रखडल्याने नोकरदारांचे कौटुंबिक बजेट कोलमडले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसतिगृहातून मुलगी, महिला बेपत्ता

$
0
0

कराडः सरकारी आशाकिरण महिला वसतिगृहातील अल्पवयीन मुलीस अनोळखी व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद कराड शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. त्यावरून गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, याच वसतिगृहातील एक महिलाही बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंदविण्यात आली.

सातारा येथील बालकल्याण समितीमधून न्यायालयीन आदेशाने एक १७ वर्षीय मुलगी येथील सरकारी आशाकिरण वसतिगृहात गेल्या १६ मे रोजी दाखल झाली होती. १४ जून रोजी ती काही कामानिमित्त सकाळी आठ वाजता वसतिगृहाबाहेर गेली, त्यानंतर ती परत आली नाही. वसतिगृहातील कर्मचाऱ्यांनी तिचा शोध सुरू केला. हा शोध सुरू असतानाच तिला एका अनोळखी इसमाने फूस लावून नेल्याचे समोर आले आहे. मुलीस पळवून नेल्याची खात्री पटताच अरुणा गणपतराव पाटील (रा. कराड) यांनी सोमवारी रात्री उशीरा येथील शहर पोलिसात फिर्याद दिली.

दरम्यान, याच वसतिगृहातील कल्पना प्रकाश माणेरे (रा. बलवडी, ता. खानापूर) ही महिला देखील रविवारी सकाळी आठनंतर कोणास, काहीही न सांगता निघून गेली आहे. ती अद्याप बेपत्ता झाल्याची फिर्याद पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाववार बैठकांचा सपाटा सुरू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

सातरा आणि सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यांत कार्यक्षेत्र आणि सुमारे ५० हजार सभासद संख्या असलेल्या येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक चार दिवसांवर आली आहे. निवडणुकीतील तीनही पॅनेलकडून गाव वार कार्यकर्ता टिपण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे गावोगावच्या गल्लीबोळातील कार्यकर्त्यांना अच्छे दिन आले आहेत.

रविवारी मतदान होत आहे. मतदानाचा दिवस अवघ्या चार दिवसांवर येवून ठेपल्याने व प्रचाराला केवळ तीनच दिवस उरल्याने गावागावांत होणाऱ्या सभा तीनही पॅनेलचे वक्ते आश्वासनांची भीम गर्जनाकरीत आहेत. सातारा, सांगली जिल्ह्यांतील सुमारे १३० गावांत कृष्णा कारखान्याचे सुमारे ४८ हजार सभासद आहेत. कारखाना सभासद असलेल्या कराड, वाळवा, कडेगाव व पलूस तालुक्यांतील अनेक छोट्या-मोठ्या गावांत सर्व प्रकारचा प्रचार सुरू झाला आहे. गावागावांत कमराबंद बैठका घेऊन प्रत्येकाला आपल्याच बाजूला कसे ओढता येईल याची चढाओढ सुरू झाली आहे. त्यामुळे गल्ली-बोळातील कार्यकर्त्याला तीनही पॅनेल चुचकारू लागले आहेत. त्यामुळे आपल्याकडे आला की 'मतपरिवर्तन' अन् दुसऱ्या गटाकडे गेला, की 'गद्दार' अशी स्तुतीसुमने उधळली जावू लागली आहेत. तरीही आयाराम-गयारामांची संख्या काही कमी होताना दिसत नाही.

दरम्यान, पावसाळ्याची चाहूल दिसू लागल्याने शेतकरीही खरिपाच्या पेरण्यात मग्न होण्याच्या मार्गावर असतानाच कार्यक्षेत्राच्या रंगमंचावरील कृष्णाचा प्रचारही ऐन रंगात आला आहे. दिवसभर खरिपाच्या कामांनी दमलेल्या शेतकऱ्यांना सायंकाळी गावात होणाऱ्या सभा ऐकाव्या लागत आहेत.

एन. डी. पाटील, डॉ. पाटणकर उतरले रिंगणात

कारखान्याच्या निवडणूक आखाड्यात उतरलेल्या संस्थापक, सहकार व रयत या तीनही पॅनेलच्या प्रमुखांनी आतापर्यंत कार्यक्षेत्रात प्रचाराच्या अनेक फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. अखेरच्या टप्प्यात जेष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील व डॉ. भारत पाटणकर यांच्यासारख्या चळवळीतील नेत्यांच्या प्रचार सभांचा धुरळा उडत आहे. त्यांच्या सभांमध्ये होणाऱ्या भाषणाने प्रचारात मोठी रंगत निर्माण झाली आहे. कृष्णा कारखाना कार्यक्षेत्रातील मतदारांची संख्या जास्त असणाऱ्या गावांमध्ये आतापर्यंत तीनही पॅनेलच्या सभा झाल्या आहेत.

मतमोजणी एकाच वेळी

राजकीय रणधुमाळी जोरात सुरू असतानाच प्रशासकीय पातळीवर मतदानाची व मतमोजणी प्रक्रियेची तयारी सुरू आहे. कारखान्याचे मतदार जास्त आणि गटवार मतदान असल्याने मतमोजणीस वेळ लागतो. त्याचा विचार करून या वेळी सर्व मतपत्रिका एकत्र करून एकाच वेळी सर्व गटांतील मतांची मोजणी करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकार संजीव देशमुख यांनी आज 'मटा'शी बोलताना दिली. कारखान्यासाठी २१ जूनला मतदान, २३ जूनला सकाळी वखार महामंडळाच्याच गोदामात मतमोजणीस प्रारंभ होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीच्या खूनप्रकरणी पतीस जन्मठेप

$
0
0

कुपवाड : अठरा वर्षीय पत्नीचा गळा आवळून खून करणारा पती शंकर भगवान माने-कांबळे (वय २७, सावळज, ता. तासगाव) याला मंगळवारी कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सावळज येथे २३ जानेवारी २०१२ रोजी ही खूनाची घटना घडली होती. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. जी. ढमाळ यांनी या खटल्याचा निकाल दिला. सरकारी वकील म्हणून उल्हास चिप्रे यांनी सरकारची बाजू मांडली.

कराड तालुक्यातील केसे पाडळी येथील रावसाहेब गाडे यांची मुलगी सोनाला उर्फ गौरी हिच्याशी जून २०११मध्ये शंकरचा विवाह झाला होता. गळा आवळून पत्नीचा खून केल्यानंतर सकाळी दारू पिऊन आरोपी शंकर माने हा घराबाहेर रडत बसल्यानंतर एका पत्रकारांने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर शंकरला अटक करून तत्कालीन पोलिस उापाधीक्षक जयश्री गायकवाड यांनी या प्रकरणाचा तपास केला होता. मंगळवारी कोर्टाने परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २०१२ मध्ये घडलेल्या या घटनेनंतर सावळजमध्ये खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी तत्काळ पूर्ण केला होता. त्यामुळे सरकारी व‌कीलांना बाजू मांडता आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्थैर्यासाठी ‘दंडवत’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भटक्या समाजातील नागरिकांना स्थिरस्थावर करण्यासाठी विविध ठिकाणी मागण्या करण्यात आलेल्या जागा देण्याबरोबरच जातीच्या दाखल्यासह अन्य चौदा मागण्यांसाठी भटका समाज मुक्ती आंदोलनाच्यावतीने कार्यकर्त्यांनी रस्त्यांवर दंडवत घालत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दसरा चौकातून निघालेल्या या अभिनव मोर्चाकडे शहरवासियांचे लक्ष वेधले गेले.

विविध संघटनांनी एकत्र येऊन भटक्या जमातीतील नागरिकांसाठी सातत्याने निवेदने दिली होती. भटका समाज मुक्ती आंदोलनाने यापूर्वीही अनेक ठिकाणी गायरानावर झोपड्या मारुन राहिलेल्या या समाजातील नागरिकांच्या नावावर जागा करुन देण्याबरोबरच सरकारी योजनांमध्ये त्याबाबत सवलती देण्याची मागणी केली होती. याबाबत यापूर्वीचे जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी काहीच हालचाल केली नसल्याचा आरोप संघटनेचा आहे. त्यानुसार पुन्हा प्रशासनाला जाग आणण्यासाठी दसरा चौकातून अभिनव मोर्चाचे आयोजन केले होते. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. विविध मागण्यांच्या घोषणा देत तापलेल्या रस्त्यावरुन उघड्या अंगांनी दंडवत घालत दसरा चौकापर्यंत मोर्चा काढला. यावेळी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.

गोपाळ समाजासाठी पारगाव येथील गायरानाची मागणी केली आहे. टोप, क. वडगाव, मौजे तासगाव येथील जागांचीही वेळावेळी मागणी नोंदवली आहे. याशिवाय क वर्ग नगरपालिकांमध्ये राजीव आवास योजनेसाठी दारिद्र्य रेषेची अट शिथील करावी, मौजे तासगाव येथील रस्त्याचा प्रश्न मिटवण्याबाबत तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे या समाजातील लोक सतत भटकत असल्याने त्यांच्या जातीच्या दाखल्याचा प्रश्न कायम आहे. त्याबाबत सातत्याने मागणी केली आहे. पण प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेत आंदोलनाचे अध्यक्ष भिमराव साठे यांनी या सर्व मागण्यांबाबत १५ दिवसात ठोस निर्णय घेण्यात यावा. अन्यथा राज्यव्यापी तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला. यावेळी आदिनाथ साठे, शिवाजीराव आवळे, बनेश साठे, भारत धोंगडे आदींनी नेतृत्व केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रक रूतल्याने वाहतूक ठप्प

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

येथील चंदूर ओढ्यावरील पुलावर मंगळवारी पाणी जाण्यासाठी असलेला नळ फुटून त्यामध्ये वाळूचा ट्रक अडकल्याने या मार्गावरील वाहतूक सुमारे पाच तासाहून अधिक काळ खोळंबली होती. या पुलाचे काम अतिशय संथ गतीने सुरु असून तात्पुरता बनविलेला पर्यायी रस्ताही निकृष्ट दर्जाचा असल्याचे समजते.

इचलकरंजी ते चंदूर या गावांना जोडणारा कलानगरनजीक ओढ्यावर असलेला पूल अत्यंत छोटा असल्याने प्रत्येक वर्षी पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली जातो. त्यामुळे पाणी ओसरण्याची प्रतिक्षा करीत दोन्ही बाजूकडे वाहनांच्या रांगा लागत. त्यामुळे याठिकाणी नवीन उंच पूल बांधण्यात यावा अशी मागणी प्रदीर्घ भागातील नागरिकांतून वारंवार केली जात होती. गतवर्षी याठिकाणी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या प्रयत्नातून पूल मंजूर झाला. त्याच्या कामाचा नारळही फोडला गेला. पण काम मात्र सुरु झाले नव्हते. आता ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. तर पावसाळ्यात काम सुरु केल्याने मोठा पाऊस झाल्यास ओढ्याच्या पाण्यात हा पूल वाहून जाण्याची भिती नागरिकांतून व्यक्त होत आहे.

पुलाचे काम सुरु झाल्याने या मार्गावरील वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता करण्यात आला आहे. हा पर्यायी रस्ता अत्यंत निकृष्ट असल्याची तक्रार वाहनधारकांतून केली जात आहे. त्याचा प्रत्यय मंगळवारच्या घटनेने आला. वाळूने भरलेला ट्रक या रस्त्यावरुन जात असताना या अरुंद पुलावर अडकला. पाणी वाहून जाण्यासाठी बसविलेला नळ फुटल्याने ट्रकची मागील बाजूची दोन्ही चाके त्यामध्ये अडकली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूकीचा चांगलाच खोळंबा झाला. सुमारे पाच तास हा ट्रक अडकून पडला होता. या मार्गावर चंदूरसह शाहूनगर, साईनगर, आभारफाटा, दावतनगर, सहारानगर, सनदी मळा आणि रुई भागातील नागरिकांची ये-जा सुरु असते. या परिसरात कारखाने व उद्योग असल्याने मार्गावर वाहनांची वर्दळही सतत असते. पण अशा घटनांमुळे सर्वांनाच नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपुऱ्या सेवेमुळे हेळसांड

$
0
0

संपत पाटील, चंदगड

तालुका दुर्गम व डोंगराळ असल्याने येथील रुग्णांना वाहतुकीपासून रुग्णसेवेपर्यंतच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. तालुक्याचा विस्तार मोठा व त्याप्रमाणात आरोग्य केंद्रांची संख्या नसल्याने अपुऱ्या सेवेमुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे व ३३ आरोग्य उपकेंद्रे असली तरी ती तोकडी आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही अनेक कारणांनी प्राथमिक सुविधांचाही अभाव आहे. सद्यस्थितीला रुग्णांना चंदगडपासून चाळीस किमीवर असलेल्या गडहिंग्लज व पन्नास किमीवर असलेल्या बेळगावचा आधार घ्यावा लागत आहे.

तालुक्याची लोकसंख्या तीन लाखाच्या आसपास आहे. इसापूर, झांबरे, तुडये, कानूर व हेरे या परिसरामध्ये नागरिकांना सरकारी दवाखान्यापासून अंतर जास्त असल्याने व वाहतुकीची सोय अपुरी असल्याने खासगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागतो. चंदगडला ग्रामीण रुग्णालय तर कानूर, अडकूर, हेरे, माणगाव, कोवाड व तुडये येथे प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. यासह ३३ ठिकाणी उपकेंद्रही आहेत.

तालुक्यातील कष्टकरी लोक उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रावरच अवलंबून असतात. त्या ठिकाणी अपुरे साहित्य व डॉक्टरांच्या संख्येमुळे नागरिकांना चंदगड येथील ग्रामीण रुग्णालय किंवा खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागतो. तालुक्यात सव्वाशेच्यावर खासगी प्रॅक्टीस करणारे डॉक्टर असले तरी कोणात्याही दवाखान्यात अत्याधुनिक सेवा नाहीत. कोणीही शस्त्रक्रिया करत नसल्यामुळे व अत्याधुनिक सामुग्री नसल्याने रुग्णांना गडहिंग्लज किंवा बेळगावचा आधार घ्यावा लागत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काही ठिकाणी इंजेक्शन व अन्य कारणासाठी शुल्क आकारले जात असल्याने रुग्णांनी पाठ फिरविली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेमणूक केलेले डॉक्टर डयुटी व्यतिरिक्त त्या ठिकाणी रहात नसल्याने रुग्णांना तातडीच्या वेळी नाईलाजाने खासगी सेवा घ्यावी लागते. एरवी सरकारी दवाखान्यात जाणारा रुग्ण तातडीच्या वेळी खासगी डॉक्टरकडे आल्यास त्यांच्याकडून भरमसाठ फी आकारली जाते.

चंदगड तालुका हा अनेक गोष्टीमध्ये दुर्लक्षित असताना आरोग्य सेवाही त्याला अपवाद नाही. अपुरे कर्मचारी व नियोजनातील त्रुटीमुळे तालुक्यातील आरोग्य केंद्रामधील सेवा कोलमडली आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे ते लोक गडहिंग्लज, बेळगाव किंवा कोल्हापूर येथे उपचार घेतात. गरीब रुग्णांना आजार अंगावर काढण्याची वेळ येते. तालुक्यात १०८ नंबरच्या तीन रुग्णवाहिका अलीकडे वर्षभरापूर्वी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे येथील लोकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कै. कुपेकर यांनी पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे पन्नास बेडचे हॉस्पीटल व ट्रामा सेंटर उभारण्याची घोषणा केली होती. मात्र त्याबाबत अद्याप कोणत्याही हालचाल नाही.

अनेक ठिकाणी पदे रिक्त

अडकूर, तुडये व कोवाड या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. कानूर विभागात पुरुष सहाय्यकाची पदे रिक्त आहेत कोवाड, अडकूर, हेरे, माणगाव येथेही सहय्यक महिलांच्या जागा रिक्त आहेत. चंदगड ग्रामीण रुग्णांलयात बालरोग व भूलतज्ज्ञ या या विशिष्ट रोगांचे स्पेशालिस्ट नसल्याने रुग्णांना उपचारासाठी शहारांचा आधार घ्यावा लागतो.

'यापूर्वी तालुक्यात दोन आरोग्य केंद्रे होती, ती आता सहा झाली आहे. सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांच्या ड्युटी रोज बदलणाऱ्या असल्याने तेच डॉक्टर उपलब्ध नसल्याने लोक खासगी दवाखान्यांकडे वळतात. ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक सामुग्री नसल्याने गंभीर रुग्णांना गडहिंग्लज किंवा बेळगावला पोहोचविण्यासाठी तीन रुग्णवाहिका आहेत.

- डॉ. आर. के. खोत, तालुका आरोग्य अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतमजुरांचा प्रांतवर मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

ग्रामीण भागातील भूमिहीन शेतमजुरांना राहण्यासाठी जागा नाही, घर नाही. मिळणाऱ्या उत्पन्नातून खोली भाडे देता येत नाही. त्यामुळे हजारो शेतमजूर कुटुंबे सरकारी गायरानामध्ये गेल्या ३०-४० वर्षांपासून झोपड्या बांधून राहत आहेत. त्यामुळे सरकारने त्यांची अतिक्रमणे नियमित करावीत, या प्रमुख मागणीसह रेशन कार्डावर मिळणारे धान्य, संजय गांधी योजनेतील अनुदान, अशा विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र शेतमजूर युनियन - लालबावटा यांच्यावतीने प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांना देण्यात आले.

निवेदनामध्ये म्हटले आहे, अब्दुललाट, अकिवाट, टाकळीवाडी, हुपरी, मुडशिंगी, कोरोची येथील अतिक्रमणांचा ताबडतोब सर्व्हे करून नियमित करा, जांभळीतील भूखंडाचे वाटप करा, संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांना १५०० रुपये अनुदान द्या, तसेच रेशन व्यवस्थेतून ग्रामीण भागातील मंजूर असलेला ७५ टक्के कोटा नियमित करा, बांधकाम कामगारांच्या धर्तीवर शेतमजुरांचे बोर्ड स्थापन करावे, बेघरांना भूखंड द्यावा, अन्नसुरक्षा योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, रेशन कार्डवर पाच किलो साखर मिळावी, शेतमजूर व कुटुंबींयांना दवाखाना मोफत मिळावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

तसेच काही गावांमध्ये देण्यात आलेले जॉब कार्ड प्रशासनाच्यावतीने काढून घेण्यात आली आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली. दरम्यान, सर्व मागण्यांबाबत प्रांत कार्यालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या विषयांबाबत तोडगा काढण्याचे, तसेच मागण्या वरिष्ठांना कळविण्याचे आश्वासन प्रांताधिकारी जिरंगे यांनी दिले. थोरात चौकातून निघालेला मोर्चा कॉ. के. एल. मलाबादे चौक ते मुख्य मार्गांवरून फिरून प्रांत कार्यालयावर आला. त्याठिकाणी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चामध्ये महिला व पुरूष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब कसबे, राज्य समिती सचिव वत्सला भोसले, जिल्हा सचिव नारायण गायकवाड, अनिल सनदी, सदा मलाबादे, संजय टेके, मंगल आवळे, सविता पतंगे, आदींसह शेतमजूर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खडतर वाटचालीचे यश

$
0
0

सचिन यादव, कोल्हापूर

'शिक्षणासाठी उस्मानाबादजवळील शिंगोणी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सुमारे तीन ते चार किलोमीटरची पायपीट केली. वडील बाबूराव शिंदे पोलिस खात्यात होते. पोलिसाच्या मुलाने पोलिस खात्यातच काम करावे, अशी इच्छा होती. मात्र महिन्याला मिळणाऱ्या तुटंपुज्या पगारातही शिक्षणाची आवड जोपासली. शेतकरी, प्राध्यापक ते कुलगुरुपदापर्यंत पोहोचण्याची संधी मिळाल्याचे शिवाजी विद्यापीठाचे नूतन कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांनी सांगितले. राज्यपाल कार्यालयाकडून कुलगुरूपदावर निवड झाल्याचा फॅक्स मिळाल्यानंतर त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'ची खास संवाद साधून जीवनप्रवास उलगडला.

नूतन कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले,'उस्मानाबादमध्ये जिरायत शेती असल्याने उत्पन्नाचे मुख्य साधन म्हणजे वडिलांचा त्या काळातील सुमारे दोन हजार रुपये पगार होता. या पगारात कुटुंबाचा उदरनिर्वाह शक्य नव्हता. लहानपणापासून शिक्षणाची जिद्द आणि तळमळ असल्याने शिक्षणाची कास सोडली नाही. शिक्षणासाठी अनेकदा पायपीट केली. कॉलेजचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत दुचाकी गाडी मिळाली नाही. पीएचडी करत असताना दुचाकी मिळाली. त्यानंतर औरंगाबाद जवळील देवगिरी येथे प्राध्यापक म्हणून रूजू झालो. तीन ते चार वर्षे तेथे प्राध्यापक म्हणून कार्यरत राहिलो. त्यानंतर औरंगाबाद येथेच पीएचडी पूर्ण केली आणि तेथूनच खऱ्या अर्थांने संशोधनाची एक नवीन संधीच मिळाली. मेडिशनल केमिस्ट्रीत पहिल्यापासून आवड होती. त्यातून औषधनिर्माण शास्त्रात संशोधनाची चांगली संधी मिळाली.'

ते पुढे म्हणाले,' शिवाजी विद्यापीठाच्या पाच वर्षाच्या कुलगुरूपदाच्या कारकीर्दीत अधिकाधिक संशोधनावर अधिक भर दिला जाणार आहे. शिवाजी विद्यापीठाची केवळ डिग्री मिळाली, एवढेच समाधान विद्यार्थ्यांना असणार नाही. या विद्यार्थ्यांना औद्योगिक कौशल्यासह अनेक नामांकित कंपन्यांना लागणारे कौशल्य विकासासाठी प्राधान्य दिले जाईल. विद्यापीठात घेतल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमधून दर्जेदार विद्यार्थी कंपनीत दाखल होण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यासाठी लवकरच सर्व अधिविभाग प्रमुखांची बैठक घेतली जाणार आहे. शिक्षणाची गुणवत्ता आणि दर्जा वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जातील. विद्यापीठाच्या प्रगतीसाठी सर्वच घटकांचे सहकार्य आवश्यक असते. विद्यापीठाच्या सर्वोतोपरी प्रगतीसाठी प्रत्येक घटकासोबत चर्चा आणि विचारांच्या आदान प्रदानाला महत्व दिले जाणार आहे. राज्य सरकारकडून विद्यापीठाचा निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातील.'

अल्पपरिचय

डॉ. देवानंद शिंदे

मूळ गावः उस्मानाबाद

जन्मः ६ फेब्रुवारी, १९६३

शिक्षणः रसायशास्त्रातील केमिकल टेक्नॉलॉजी विषयात एम. एस्सी, पीएचडी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद),

प्राध्यापकः १९८९ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात केमिकल टेक्नॉलॉजी विभागात प्राध्यापक

विभागप्रमुखः १९९८ ते २०११ पर्यंत विभागप्रमुख म्हणून कार्यरत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रोफेसर आणि सेंट्रल फॅसिलिटी फॉर अॅडव्हान्स रिसर्च सेंटरचे संचालक

सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी पार्कचे अध्यक्ष

शिवाजी विद्यापीठाचे आजवरचे कुलगुरू

डॉ. आप्पासाहेब पवार ः २० सप्टेंबर, १९६२ ते २० जानेवारी १९७५

बॅरिस्टर पी. जी. पाटील ः २१ सप्टेंबर, १९७५ ते १६ एप्रिल १९७८

प्रि. बी. एस. भणगेः १७ एप्रिल १९७८ ते २८ मार्च १९८०

डॉ. रा. कृ. कणबरकर ः २२ सप्टेंबर १९८० ते २१ सप्टेंबर १९८३

प्रि. के. भोगीशियन ः २२ सप्टेंबर १९८३ ते २१ सप्टेंबर १९८६

प्रो. के. बी. पवार ः २२ सप्टेंबर १९८६ ते २१ सप्टेंबर १९९२

डॉ. आप्पासाहेब वरुटे ः २२ सप्टेंबर १९९२ ते १५ जून १९९५

प्रा. द. ना. धनागरे ः १ नोव्हेंबर १९९५ ते ३१ ऑक्टोबर २०००

डॉ. एम. जी. ताकवले ः १ नोव्हेंबर २००० ते ११ मार्च २००४

डॉ. एम. एम. साळुंखे ः ११ जून २००४ ते २ मार्च २००९

डॉ. एन. जे. पवार ः २६ फेब्रुवारी २०१० ते २५ फेब्रुवारी २०१५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परदेशात नोकरीच्या आमिषाने फसवणूक

$
0
0

कोल्हापूरः परदेशात नोकरी लावण्याच्या आमिषाने दोघांची एक लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात अब्दुलवहाब समध शेख (रा. स्वानंद अपार्टमेंट, न्यू शाहूपुरी) याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सर्जेराव दादू वाडकर (वय ४२, रा. पोहाळवाडी, ता. पन्हाळा) आणि राजीव पुरषोत्तम नायक (५६, रा. आजरा) यांनी फिर्याद दिली आहे.

अब्दुलवहाब शेख याने ११ ऑक्टोबर २०१४ मध्ये वृत्तपत्रांमध्ये परदेशात नोकरी लावतो अशी जाहिरात दिली होती. नोकरीसंदर्भात वाडकर आणि नायक यांनी शेख याची भेट घेतली. त्याने नोकरी लावण्यासाठी पैशाची मागणी केली. शेख याने वाडकर यांच्याकडून वेळोवेळी ९० हजार रुपये तर नायक यांच्याकडून ७५ हजार रुपये घेतले. मे महिन्यात नोकरीबाबत विचारणा केल्यावर त्याने टाळाटाळ केल्यानंतर वाडकर, नायक यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात दरवर्षी ४०० कोटींची लूट

$
0
0

दीपक शिंदे, कोल्हापूर

बांधकाम विभागात काम मिळविणे सोपे, पण बिल मंजूर करून घेणे अवघड असल्याचे ठेकेदारच खासगीत सांगतात. त्यामुळे बिल काढून घेण्याची ज्याची क्षमता आहे, तोच काम घेतो. काम करूनही अनेक महिने बिलासाठी थांबावे लागत असल्याने तेही अनेकदा हतबल होतात. पैसे दिले नाहीत तर कामात त्रुटी काढल्या जातात. त्यामुळे पैसे दिलेले बरे, नाहीतर

झालेल्या कामावर केलेल्या गुंतवणुकीमुळे ठेकेदार व्याज भरून अडचणीत येतो. अनेक कामे एडी (अडजेस्ट) केली जातात. त्यातून दरवर्षी अशा बांधकामांतून जिल्ह्यातील काही अधिकारी सुमारे ४०० कोटी रुपयांची माया जमवतात असे सांगण्यात येते.

बांधकाम विभागात एखाद्या कामासाठी टेंडर भरल्यानंतर आणि ते मंजूर झाल्यानंतर वर्कऑर्डर मिळणे हे महत्वाचे असते. मात्र, जोपर्यंत टक्केवारी पोहोचत नाही तोपर्यंत वर्कऑर्डर निघत नाही. त्यामुळे कामाला उशीर होतो. वर्कऑर्डरला ठेच लागल्यावर ठेकेदार शहाणा होतो किंवा नाद सोडून देतो. अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांचाही यात वाटा असतो. काम अवेळी सुरू झाल्यामुळे त्याचा दर्जा राहत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पैसे दिल्याशिवाय पुढचे कोणतेच काम होणार नाही याचा ठेकेदाराला अंदाज येतो. त्यामुळे जेवढे काम होईल, तेवढे बिल काढून घेण्याकडे त्याचा कल राहतो. त्यासाठी जास्तीत जास्त वेळ कागदपत्रांची पूर्तता करण्यात जातो आणि कामाकडे दुर्लक्ष होते. साधारणतः एका कामाला ५०० तास लागणार असतील तर त्यातील ३५० तास कागदपत्रांच्या पूर्ततेच जातात असे ठेकेदारही सांगतात. त्यामुळे फक्त १५० तासांचेच काम होते. मग हे काम किती दर्जेदार होणार याची कल्पनाच न केलेली बरी.

रस्ते किंवा इमारतींच्या बांधकामाशिवाय दुरुस्ती आणि डागडुजीचीही कामे असतात. ही कामे फार मोठी नसल्याने स्थानिक पातळीवर ओपन टेंडर काढून भरली जातात. या कामांसाठी येणारा खर्च एडी केला जातो. कार्यालयीन पडदे बदलणे, सिलिंगची कामे, खुर्च्या, टेबल अशी स्टेशनरी बदलणे यात एडजेस्टमेंट होते. त्यामुळे यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होतो.

कंत्राटदाराही कामात चुकारपणा असतोच. एखाद्या भागासाठी जेवढे लोखंड किंवा सळी वापरावयाची आहे, त्यापेक्षा कमी प्रमाणात वापरली जाते. प्रत्येकाला पैसे देऊनच काम करायचे असेल तर कंत्राटदारही फार त्रास घेत नाही. प्रामाणिक काम करणाऱ्या आणि पैसे न देणाऱ्या ठेकेदाराचे बिल यात पहिले दिले गेले तरी दुसरे बिल अडविले जाते. कामातील वेगवेगळ्या त्रुटी काढल्या जातात अशी स्थिती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गळा चिरल्याने कामगाराचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गांधीनगर येथे काम सुरू असलेल्या एका बंगल्यात ग्रायंडरवर पडून गळा चिरल्याने गुट्टन शंकर निशाद (वय २८, रा. निगडेवाडी, मूळ रा. केवरिया, ता. मलकापूर, जि. गोंडा, उत्तरप्रदेश) या बांधकाम कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी तीन वाजता ही घटना उघडकीस आली.

गांधीनगरात शंकर जेठानन छाब्रिया यांच्या नवीन बंगल्याचे काम सुरू आहे. गुट्टन आणि त्याचा मित्र अशोककुमार यादव प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे (पीओपी) काम करत होते. यादव याला पत्नीने बोलावल्याने तो बंगल्याच्या बाहेर गेला. यावेळी गुट्टन एकटाच काम करत होता. दरम्यान, काम करत असताना गुट्टन ग्रायंडरवर कोसळल्याने त्याचा गळा चिरला गेला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना बंगल्यात काम करणाऱ्या सुताराने पाहिले. त्याने ही घटना गांधीनगर पोलिस ठाण्यात कळवली. दरम्यान, गुट्टन याचा खून झाल्याची अफवा सर्वत्र पसरली. मात्र, गुट्टन याचा ग्रायंडरवर पडून मृत्यू झाला असल्याचे गांधीनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी सांगितले.

दरम्यान, या घटनेवेळी कोणीच तेथे उपस्थित नसल्याने हा अपघात झाला की घातपात अशी शंका उपस्थित करण्यात आली. त्यानंतर तशी चर्चा गांधीनगर परिसरात सुरू होती. गुट्टन याचा खून झाला असावा अशी शंका व्यक्त करण्यात येत होती. मात्र, पोलिसांनी असा प्रकार घडला नसल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाकाबंदीत सापडले घरफोडीतील चोरटे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लक्ष्मीपुरी पोलिसांनी गंगावेशतील धोत्री गल्ली परिसरात झालेल्या घरफोडीचा तपास चार दिवसांत पूर्ण केला. यातील संशयित उत्तम राजाराम बारड (वय २३, रा. धामोड, ता राधानगरी) आणि लखन कृष्णात माने (वय २०, रा. वंदूर, ता. कागल) या दोघांना सोमवारी अटक केली. त्यांच्याकडून घरफोडीतील साडेअठरा तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले. चोरीच्या गुन्ह्यातील तीन मोटारसायकलही जप्त केल्या.

१२ जून रोजी धोत्री गल्लीत निलेश ​निवासराव मिसाळ यांच्या घरी चोरी झाली होती. याच्या तपासासाठी लक्ष्मीपुरी पोलिसांनी सोमवारी रात्री नाकाबंदी केली. यावेळी शिवाजी पूल, तोरस्कर चौकात मोपेडवरून भरधाव जाणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले. उत्तम बारड आणि लखन माने हे रेकॉर्डवरील संशयित असल्याने त्यांच्याकडे कसून चौकशी केली. बारड याने धोत्री गल्लीत चोरीची कबुली दिली. दोघांनी डुप्लिकेट चावीने दोन मोपेडसह मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. उपनिरीक्षक युवराज आठरे, सोमनाथ पांचाळ, अजित गोडबोले, अजित शेख आदींनी तपास केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. देवानंद शिंदे नवे कुलगुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केमिकल टेक्नॉलॉजी विभागाचे प्राध्यापक व सेंट्रल फॅसिलिटी ऑफ अॅडव्हान्स्ड रिसर्च अॅन्ड ट्रेनिंगचे संचालक डॉ. देवानंद बाबुराव शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुलपती कार्यालयाने मंगळवारी दुपारी ही घोषणा केली. डॉ. शिंदे शिवाजी विद्यापीठाचे बारावे कुलगुरू आहेत.

डॉ. शिंदे येत्या आठवडाभरात पदभार स्वीकारणार असल्याने नव्या शैक्षणिक वर्षातच पूर्ण वेळ कुलगुरू मिळणार आहेत. त्यांच्या नावावर आंतरराष्ट्रीय स्तरावरील दोन संशोधनांची नोंद आहे. औषधनिर्माण शास्त्रात त्यांचे विशेष योगदान आहे. पाच वर्षांच्या कालावधीसाठी ही नियुक्ती आहे. कुलगुरू डॉ. एन. जे पवार यांचा कार्यकाळ २६ फेब्रुवारी, २०१५ रोजी संपला. त्यानंतर कुलगुरूपदाचा प्रभारी कार्यभार डॉ. अशोक भोईटे यांच्याकडे होता.

शर्यतीत बाजी

कुलगुरुपदाच्या शर्यतीत शिवाजी विद्यापीठातील पर्यावरण जैवतंत्रज्ञान विभागाचे समन्वयक डॉ. एस. बी. गोविंदवार, पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख डॉ. नितीन करमळकर, सोलापूर विद्यापीठाच्या पदार्थविज्ञानाचे प्रमुख डॉ. एल. पी. देशमुख, नांदेड येथील यशवंत कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव कल्याणकर यांचा समावेश होता.

शिवाजी विद्यापीठाला नॅकचा अ दर्जा मिळाला आहे. तो कायम राहण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येतील. गुणवत्ता आणि संशोधनावर विशेष लक्ष दिले जाईल.

- डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृष्णा नदीत १९ मगरी, ३४ पिले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

कृष्णा नदीत हरिपूरपासून आमणापूर (ता. पलूस) पर्यंत २३ किलोमीटर पट्ट्यात १९ मोठ्या मगरींसह ३४ पिलांचे वास्तव्य असल्याचे वनखात्याच्या पाहणीत आढळून आले आहे. वन विभागाने या संदर्भात नुकतेच सर्वेक्षण केले. हा अहवाल या विभागाने राज्य सरकारला सादर केला आहे.

विभागीय वनाधिकारी समाधान चव्हाण म्हणाले, 'मगरींचा अधिवास सुरक्षित ठेऊन कृष्णा नदीकाठावरील भीतीची छाया कमी करण्याचा आमचा प्रयत्न राहील. जानेवारी ते मे हा मगरींचा प्रजनन काळ असतो. एक मगर ४० अंडी घालते. मे महिन्यात पिले जन्माला येतात. या काळात पिलांची व अंड्यांची सुरक्षा करण्यास ती आक्रमक असते. माणूस व जनावरांचा वावर ती खपवून घेत नाही. म्हणूनच या काळापुरत्या विशेष काही उपाययोजना करता येतो का? यादृष्टीने आमचा अभ्यास सुरू आहे.

आजवर या मगरींनी अनेकांचे बळी घेतले आहेत. काहीना जखमी केले आहे. मगरींचे सतत हल्ले सुरू असतात. त्यांचे दर्शनही सातत्याने होत असते. या सर्व पार्श्वभूमीवर हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यासाठी वनविभागाचे ३० कर्मचारी व निसर्गप्रेमी १० संस्थांचे सदस्य यांची पथके तयार करण्यात आली होती.

मागील महिन्यात कृष्णा नदीपात्रात मगरीने एका मुलाला ठार केले होते. तर मच्छीमारावर गंभीर हल्ला केला होता. त्यामुळे मगरीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मगरींचा बंदोबस्त करण्याची मागणी झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदेशानंतरही ठेका रद्द होईना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महावितरणच्या इन्फ्रा टू योजनेंतर्गत कोल्हापूर शहरात होणारी सुमारे ३०० कोटींची कामे जागेची उपलब्धता न होणे आणि ठेकेदारांच्या अकार्यक्षतेमुळे अपूर्ण राहिली. त्यामुळे याबाबत उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधिताचा ठेकाच रद्द करण्याचे आदेश दिले. मात्र, अद्यापही त्यांचा ठेका रद्द करण्यात आलेला नाही. त्यामुळे ही योजना पुढे नेण्यास अनेक अडचणी निर्माण होणार आहेत. परिणामी शहरवासिय महावितरणच्या सुविधांपासून वंचित राहणार आहेत.

शहराच्या विविध भागात नवे ट्रान्सफॉर्मर उभारणे आणि अंतर्गत विद्युतवाहिन्या टाकणे यासाठी सुमारे ३०० कोटी ररुपये खर्चाची कामे इन्फ्रा टू अंतर्गत करण्यात येणार होती. मात्र, त्यासाठी शहरातील जागा मिळविण्यात ठेकेदारांना अपयश आले. त्यामुळे योजनेंतील कामेच होऊ शकली नाहीत. यामुळे उर्जामंत्र्यांनी ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याचा आदेश दिला. मात्र, विभाजन झाल्यानंतरही महावितरणच्या कामात गती आलेली नाही. ठेकेदारांना केवळ नोटीस देण्यापर्यंतच या आदेशाची अंमलबजावणी झालेली आहे. पुढील कारवाई न झाल्यामुळे हे काम पुन्हा रेंगाळले आहे.

ठेका रद्द केल्यास पुन्हा नव्याने टेंडर प्रक्रिया राबवावी लागेल. काम मोठे असल्याने पुन्हा ऑनलाइन टेंडर काढावे लागेल. त्यासाठी वेळ जाणार असल्यामुळे हे काम आणखी रेंगाळेल. त्यासाठी छोटी टेंडर्स काढून हे काम करावी लागणार आहेत. अन्यथा इतर शहरांमध्ये कामे पूर्ण होत असताना कोल्हापूर मागे पडणार यात संशय नाही.

इन्फ्रा टूचे काम फार मोठे आहे. त्यासाठी चांगले ठेकेदार हवे आहेत. अन्यथा कामे छोटी करून ती करून घ्यावी लागतील. याबाबत वरिष्ठ कार्यालयाला प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यांची परवानगी मिळाल्यास कामे लवकर करून घेऊ.

- शंकर शिंदे, मुख्य अभियंता, महावितरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images