Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘मोफत प्रवेशा’चे ऑडिट करा

$
0
0

‌काही संस्थांकडून देणगीच्या नावाखाली लुटीचा शिवसेनेचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के मोफत प्रवेश देणे गरजेचे असताना काही संस्था नियमाची पायमल्ली होत आहे. त्यामुळे यानुसार मोफत प्रवेश देण्यावर शिक्षण विभागाने विशेष लक्ष देऊन अशा विद्यार्थ्यांची यादी जाहीर करावी, यांसह अन्य मागण्यांसाठी शिवसेनेच्यावतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आमदार राजेश क्षीरसागर यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. प्रवेश व शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न व वादाच्या मुद्यांबाबत सोमवारी (१५ जून) संस्थाचालक, अधिकारी व ​शिष्टमंडळाची संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

शिवाजी चौकापासून मोर्चाला प्रारंभ झाला. उपसंचालक एम. के. गोंधळी कार्यालयात नसल्याचे समजले. मोर्चाबाबतची पूर्वकल्पना दिलेली असतानाही गोंधळी उपस्थित नसल्याबद्दल त्यांचा निषेध करण्यात आला. त्यानंतर संपत गायकवाड व पोतदार या अधिकाऱ्यांशी शिष्टमंडळाने चर्चा केली.

प्रवेश प्रक्रिया सुरू असताना काही संस्थांकडून लूट सुरू असल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. या संस्था लाखोंची देणगी गोळा करत आहेत. त्यांच्यावर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, प्रमुख मागणी करण्यात आली.

महापालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच सर्व शाळांत केंद्रीय प्रवेश परीक्षा पारदर्शीपणे राबविण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश मिळाला पाहिजे, अर्जाची किंमत नाममात्र असावी, पुस्तिकेची किंमत विद्यार्थ्यांवर लादू नये, विनाअनुदानित तुकडीतील विद्यार्थ्यांवर फी लादणाऱ्या संस्थाचालकांची चौकशी करुन कारवाई करावी, अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेशावेळी देणगीतून होणारी लूट थांबवावी, विनाअनुदानित तुकड्या बंद कराव्यात, शुल्काची पावती द्यावी, प्रवेशाला ८५ टक्के कोटा ड्रॉसाठी असावा तर १५ टक्के कोटा मॅनेजमेंटसाठी असावा, आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यात दहावी, बारावी निकाल एप्रिल किंवा मेमध्ये जाहीर करतात. त्यानंतर लगेच पुरवणी परीक्षा घेऊन जुलैपर्यंत निकाल जाहीर करतात. त्यांना त्या वर्षी पुढील वर्गासाठी प्रवेश घेण्यात येतो. ही पद्धत महाराष्ट्रात राबवावी, अशा महत्त्वाच्या मागण्या यावेळी निवेदनात करण्यात आल्या.

आंदोलनात दक्षिण शहर प्रमुख शिवाजी जाधव, उत्तर शहर प्रमुख दुर्गेश लिंग्रस, भारतीय विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख चेतन शिंदे, किशोर घाटगे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी होते.

'शाळेचे आरक्षण उठवू नये'

रमणमळा येथील शाळेचे आरक्षण असलेल्या जागेभोवती एका बांधकाम व्यावसायिकाने बेकायेदशीर कुंपण घातले आहे, तसेच हे आरक्षण उठवण्यात येऊ नये, अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली आहे. मागणीचे निवेदन त्यांनी नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, नगरविकास विभागचे सचिव आणि कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त पी. ‌शिवशंकर यांना दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठा महासंघातर्फे महेशच्या जिद्दीला सलाम

$
0
0

हाता-पायांनी अपंग असूनही करतोय ज्ञानदानाचे पवित्र कार्य

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वयाच्या १४ व्या वर्षी विद्युतवाहिनीला अडकलेला पतंग काढताना शॉक बसून झालेल्या अपघातात दोन्ही हात व पायाने अपंगत्व आलेला महेश मंगेशकर जिद्दीने आयुष्यात उभा राहिला. इंग्रजी विषयात बी.ए. होऊन त्याने खासगी क्लास घेण्यास सुरुवात केली. दोन्ही हात-पाय नसतानाही इंग्रजीवर प्रभुत्व मिळवून महेश एक यशस्वी नागरिक म्हणून जीवन जगत आहे. त्याच्या या जिद्दीला सलाम करण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त त्याचा सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्या हस्ते महेशला ११ हजार रुपयांची ठेवपावती आणि शिवरायांची प्रतिमा देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम बुधवारी शाहू स्मारक भवन येथे झाला.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी सैनी म्हणाले, 'अपघाताने आलेल्या अपंगत्वाने खचून न जाता महेशसारखा तरुण ज्ञानदानाचे कार्य करत आहे ही स्तुत्य गोष्ट आहे. माणसाला जगण्यासाठी हात आणि पाय दोन्ही अवयव गरजेचे असतात. मात्र,

महेशचे हे अपंगत्व त्याच्या जिद्दीपुढेही खुजे ठरले. त्याच्या सकारात्मक दृष्टिकोनाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

डॉ. मनोजकुमार शर्मा म्हणाले, 'समाजातील अशा युवकांच्या पाठीवर थाप मारण्याचे काम करणाऱ्या संस्था कमी आहेत. मराठा महासंघाने शिवाजी महाराजांच्या मनातील युवकांना दिले जाणारे बळ या विचाराला उजाळा दिला आहे. महेश म्हणजे समाजाला मिळालेला एक प्रकाशमय विचार आहे.'

मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी प्रास्ताविक केले. शशिकांत पाटील यांनी स्वागत केले. यावेळी व्ही. बी. पाटील, चंद्रकांत जाधव, संभाजीराव पोवार, सूरजित पवार, प्रकाश मेड​शिंगे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन शंकर शेळके, चंद्रकांत चव्हाण, प्रकाश पाटील, डॉ. शिवाजीराव हिलगे, आदींसह महासंघाच्या कार्यकर्त्यांनी केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सांडपाणी रोखण्यास सक्षम यंत्रणा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जयंती नाल्यातून दररोज ६० दशलक्ष लिटर सांडपाणी उपसा करण्यात येतो. पाऊस पडल्यानंतर नाल्यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त पाणी येते. पाऊस आणि नाला ओव्हर फ्लोच्या कालावधीतही पंप बंद ठेवला जात नाही. जयंती नाल्यातील तरंगणारा कचरा काढून टाकण्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे,' अशी माहिती आयुक्त पी. शिव शंकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात म्हटले आहे की, 'शहराच्या ज्या भागामध्ये भूमिगत गटार योजना नाही तेथे भूमिगत गटार योजना उपलब्ध करण्याचा प्रस्ताव आहे. जयंती नाला पंपिंग स्टेशन प्रकल्पातून सांडपाणी उपसा केला जातो. जयंती नाल्याचे पाणलोट क्षेत्र कळंबा तलावापर्यंत दहा किलोमीटर परिसरात पसरलेले आहे. या परिसरातील पावसाचे पाणी जयंती नाल्यातून वाहते. परिणामी पावसाळ्यात नाला ओव्हर फ्लो होतो. ओव्हर फ्लो कालावधीत निर्जंतुकीकरणासाठी क्लोरिन गॅस टॉवर चालू करून प्रदूषण कमी केले जाते. कोल्हापूर शहरातील भूमिगत गटर योजनेतील बंदिस्त पाइपमधून गोळा होणारे मैलामिश्रित सांडपाणी शास्त्रोक्त पद्धतीने जयंती नाला येथील मैला इनटेक विहिरीत २४ तास गोळा होतो. शिवाय जयंती नाल्याच्या सांडपाण्यामुळे नदीचे प्रदूषण होऊ नये म्हणून बंधारा घालून सांडपाणी याच विहिरीत घेतले जाते. अशा पद्धतीने या विहिरीतून रोज ६० दशलक्ष लिटर सांडपाणी पंपिंग करून कसबा बावडा येथे ७६ दशलक्ष लिटर क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे वळविण्यात आले आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंद्रकांत पाठक यांचा राष्ट्रपतींकडून गौरव

$
0
0

म .टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

ग्रामीण भागात भारनियमाने हैराण असणाऱ्या बळीराजाला आधार देण्यासाठी विजेशिवाय शेती उपकरणे तयार करण्याचा एक चांगला आणि उत्कृष्ट प्रयोग एका अवलियाने केला. दिवंगत चंद्रकांत पाठक यांच्या अथक परिश्रमामुळे पारंपारिक शेती व्यवसायाला नवसंजीवनी मिळाली आहे. त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना नुकतेच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. राष्ट्रपती भवन येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांचे चिरंजीव केदार पाठक यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

संपूर्ण जगाचा अन्नदाता म्हणवून घेणारा शेतकरी अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे. निसर्गाची अनियमितता, वाढती महागाई व विजेची टंचाई या तिन्हींचा सामना करता करता शेतकऱ्याचे कंबरडेच मोडले आहे. यातून बळीराजाची सुटका करण्यासाठी चंद्रकांत पाठक यांनी सौरशक्ती, बायोगॅस, मनुष्य आणि बैलशक्तीचा वापर करून या शेतीपूरक व घरगुती उपकरणांची निर्मिती केली. केदार पाठक यांनी 'मॉडर्न टेक्निकल सेंटर' या संस्थेच्या माध्यमातून त्यांचा वारसा जपला आहे.

यातून विजेशिवाय सायकलच्या मदतीने पाणी उपसा, पाणी अथवा औषध फवारणी, कडबा कटिंग मशीन, ज्यूसर, पिठाची गिरणी, मिक्सर, भाजी कटर, कॉम्प्रेसर, शेंगा फोडणी आदी मशीनवर नियमित कामांसह वीजनिर्मिती करून पंखे, ट्यूबलाईट सुरु करता येतात. या उपकरणांना राज्य सरकारच्या कृषी विभागातर्फे २५ टक्के सबसिडी देण्यात येते, अशी माहिती पाठक यांनी दिली. पाठक यांनी कोल्हापुरात १९७० साली हिंदुस्थान स्टील फॅब्रीकेशनच्या माध्यमातून कारकिर्दीची सुरवात केली.

या व्यतिरिक्त त्यांनी बनविलेला गार्डनमधील झुला त्यांच्या कल्पकतेचा अप्रतिम नमुना आहे. बागेतील रम्य वातावरणात यावर बसून झोका घेतल्यास आनंद तर मिळेलच मात्र बागेतील रोपांना पाणी घातल्याचे सत्कृत्यही आपल्या हातून घडेल. त्यासाठी वेगळ्या श्रमाची गरज नाही. तांत्रिकदृष्ट्या या झुल्याच्या दोन्ही बाजूला कॉम्प्रेसर बसविले असून त्याला स्प्रिंकलर व ठिबक सिंचन योजना जोडली आहे. झुला पुढे-मागे केल्यास कॉम्प्रेसरद्वारे हवेचा दाब निर्माण होऊन पाणी योजना कार्यान्वित होते. या संस्थेला शेकडो पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्यामध्ये माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जी.अब्दुल कलाम यांचे हस्ते पायाभूत विकासासाठीच्या अपारंपारिक उर्जासाधनांच्या नवनिर्मितीबद्दल राष्ट्रीय पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा उर्जा तसेच शेतीमित्र पुरस्कार, दिल्लीस्थित नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनमार्फत ऍप्रिसिएशन पुरस्कार तसेच पारखे औद्योगिक मान पुरस्कार (मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अंड इंडस्ट्रीज पुणे) या प्रमुख संस्थांचा समावेश आहे.

'अस्डेन'ने सन्मानित

ब्रिटनतर्फे हरितक्रांतीचा प्रसार व प्रचार करणाऱ्या जगातील निवडक लोकांना 'अस्डेन' पुरस्काराने सन्मानित केले जाते. यामध्ये पर्यावरण समतोलासाठीच्या कार्याची दखल घेतली जाते. या पुरस्कारासाठी २००७ साली सन्मानित झालेले पाठक हे एकमेव भारतीय आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेरे प्लॉटधारकांचे उपोषण मागे

$
0
0

पंधरा दिवसांत प्रश्न सोडविण्याचे तहसीलदारांचे आश्वासन

म. टा. वृत्तसेवा चंदगड

हेरे (ता. चंदगड) येथील गावठाण वाढीव मंजूर झालेले २३४ प्लॉट संबंधित लाभार्थांच्या नावावर करुन ताबा मिळावा, या मागणीसाठी हेरे येथील महारटेक येथे शंकर चव्हाण व रघुवीर शेलार यांचे गेले तीन दिवस उपोषण सुरु केले होते. तहसीलदार आप्पासाहेब समिंदर यांनी पंधरा दिवसात प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांना लिंबू सरबत देवून उपोषण मागे घेतले.
हेरे येथील प्लॉटधारकांनी पैसे भरुन सरकारकडून पावत्या घेतल्या आहेत. त्याच दिवशी प्लॉटचा ताबा प्लॉटधारकांना मिळाला असल्याचा कायदा आहे. तरी देखील २५ वर्षे प्लॉटधारकांना अन्याय सहन करावा लागला. सरकारने प्लॉटचे वितरण करावे, अशी उपोषणकर्त्यांची मागणी होती. यासाठी गेले तीन दिवस उपोषणकर्ते शंकर चव्हाण व रघुवीर शेलार उपोषणाला बसले होते. गुरूवारी तिसऱ्या दिवशी उपोषणकर्त्यांची प्रकृती खराब होत होती.

त्यामुळे सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली. यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील, जि. प. सदस्य राजेंद्र परीट यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी तहसिलदार समिंदर यांच्याशी चर्चा केली. या प्रकरणी समिंदर यांनी प्रातांधिकाऱ्यांशी चर्चा करुन पंधरा दिवसात प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले. त्यामुळे त्यांनी गेले तीन दिवस चाललेले उपोषण मागे घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मलकापूर आगार रामभरोसे

$
0
0

समन्वयाचा अभाव, वाहकांची कमतरता आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

म. टा. वृत्तसेवा, शाहूवाडी

समन्वयाचा अभाव, वाहकांची कमतरता, कर्मचाऱ्यांमध्ये वेळेचे नसलेले भान आणि अधिकाऱ्यांचे नसलेले लक्ष यामुळे मलकापूर आगारातील एसटीचे वेळापत्रक कोलमडले आहे. आगारातून गाड्या कधी सुटतील याचा नेम नसल्यामुळे गाड्या सुटण्याचे गणित बिघडले आहे. प्रवाशांना वेळोवेळी या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तक्रार कोणाकडे करायची आणि तक्रार केली तर त्या तक्रारीचे निराकरण होईल की नाही याची शाश्वती देण्याइतपत इथली परिस्थिती चांगली नाही. कारण येथील कारभार रामभरोसेच चालू आहे. त्याचा फायदा खासगी वडापवाले उचलत आहेत.

आगारातील वर्कशॉप हा इथला चिंतेचा विषय बनला आहे. वर्कशॉपमधून गाड्यांची दुरुस्ती योग्य रीतीने व वेळेवर होत नसल्याने कोल्हापूर मार्गावर सातत्याने गाड्या ब्रेकडाऊन होत असल्याचा अनुभव प्रवाशी घेत आहेत. आगारात ५४ गाड्या असल्या तरी दररोज दहा ते बारा गाड्या जागोजागी बंद पडलेल्या आढळतात. पाणी बॉईल होणे व धूर मारणे अशा अवस्थेतल्या गाड्यांची संख्या येथे आहे. दूरमार्गावर धावणाऱ्या गाड्या अस्वच्छ आणि खिडक्यांच्या काचा खडखड वाजणाऱ्या आहेत. तर पावसाळ्यात काही गाड्यांना गळतीही लागलेली असते. जिल्हापातळीवरून पुरेसे साहित्य पुरविले जात असले तरी येथून गाड्यांची दुरुस्ती वेळेवर का होत नाही हा संशोधनाचा विषय ठरेल अशी येथे परिस्थिती आहे.

ग्रामीण भागातील कडवे, भेंडवडे, शेडगेवाडी, पावडाइवाडी या भागात गाड्या सुरु केल्या असल्या तरी कोल्हापूर मार्गावर काही वेळेला दोन दोन तास गाड्या सुटत नाहीत. याशिवाय कोकरूड, बांबवडे व शिराळा या मार्गावर अवेळी गाड्या सुटत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. अल्पावधीतच प्रवाशांत लोकप्रिय झालेल्या 'यशवंती' या मिनी बसेसचे गेल्या चार - सहा महिन्यापासून प्रवाशांना दर्शनच झालेले नाही.

काही वाहक प्रवाशांशी हिडीसफिडीस करत अपमानास्पद वागणूक देत असल्याच्या तक्रारी वारंवार घडत असल्याने अशा वाहकांच्या कामाच्या पद्धतीकडे अधिकारीवर्गाने जातीने लक्ष पुरविण्याची गरज आहे.

आगाराच्या उत्पन्नावर परिणाम

आगारात सुमारे तीस चालक कमी आहेत. त्यामुळे नियोजनात अडथळे येत आहेत. अधिकारी - कर्मचाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव रहात असल्यामुळे प्रवाशांना गाड्यांची वाट पहावी लागत असते. गाड्या वेळेवर सुटत नसल्यामुळे मलकापूर, बांबवडे, आंबा व कोल्हापूर येथून खासगी वडाप गाड्यांची चलती होऊ लागली आहे. पर्यायाने आगाराच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिटेलर्सच्या मुळावर डिस्काउंट

$
0
0

शालेय साहित्याची विक्रीवर बहिष्काराचा इशारा

सचिन यादव, कोल्हापूर

नामांकित कंपनीच्या डिस्काउंटच्या आमिषामुळे जिल्ह्यातील रिटेलर्स व्यवसाय गोत्यात जाण्याची भीती व्यक्त होत आहे. पुस्तक, वह्या आणि शालेय साहित्य विक्री करणारे होलसेलर्स, रिटेलर्स, सेमी रिटेलर्सच्या कोल्हापूर स्टेशनरी असोसिएशनने कंपन्यावर बहिष्कार टाकणार आहे. सुपर मार्केट विरोधात रिटेलर्स असे थेट युद्ध सुरु झाले असून या वादाचा फटका जिल्ह्यातील एक हजार रिटेलर्संना बसणार आहे.

सुपर मार्केटचा फटका यापूर्वी जिल्हा किरकोळ धान्य दुकानदारांना बसला आहे. आता शालेय पुस्तके आणि साहित्य विक्रीच्या क्षेत्रात असलेल्या कंपनी आणि रिटेलर्समध्ये डिस्काउंटचा वाद सुरु झाला आहे. यापूर्वीच काही कंपन्यानी शाळांचा ताबा घेतला आहे. त्यामुळे रिटेलर्सचे वीस टक्के ग्राहक कमी झाले आहे. कंपन्या सुपर मार्केटला सुमारे २५ टक्के कमिशन देत असल्याने रिटलर्सच्या दुकानात शालेय साहित्य पडून आहे. कंपन्यांनी रिटेलर्सनाही शालेय साहित्याची विक्री केली आहे. त्यामुळे डिस्काउंटच्या वादात रिटेलर्सचा ग्राहक वर्ग अधिक डिस्काउंट देणाऱ्या सुपर मार्केटकडे वळला आहे. त्यामुळे कोल्हापूर स्टेशनरी असोसिएशन काही कंपन्यांवर बहिष्कार टाकणार आहे.

शिक्षण विभागाकडून पहिली ते आठवीपर्यंतची मोफत क्रमिक पाठ्यपुस्तके मिळत असल्याने क्रमिक पुस्तकांच्या विक्रीही रिटेलर्सकडून थांबली. सध्या बहुतांशी इंग्रजी, सेमी इंग्रजी आणि काही विनाअनुदानित मराठी माध्यमांच्या शाळांत शालेय साहित्य पॅकेजची विक्री केली जाते. नामांकित कंपन्या आणि

शाळांची टक्केवारी असल्याने त्याचाही फटका रिटेलर्सना बसत आहे. याविरोधात रिटेलर्स एकत्रित लढा देणार आहेत.


सुपर मार्केटने डिस्काउंटचा फलक लावून रिटेलर्सचा मोठा ग्राहक पळविला आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याने कंपन्यांच्या या धोरणाला विरोध दर्शविला आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास रिटेलर्सचे भवितव्य धोक्यात येणार आहे.
- भौमिक मेहता, संचालक, कोल्हापूर स्टेशनरी असोसिएशन


स्वस्त आणि दर्जेदार साहित्य मिळेल त्या ठिकाणी ग्राहकांची पसंती आहे. साहित्य विक्रीच्या व्यवसायात स्पर्धा सुरु आहे. सुपर मार्केट आणि होलसेलर्सनी शालेय साहित्य समान किमतीत विक्री करावे. त्यामुळे ग्राहकांना चांगला फायदा होईल.

- अभिजित सूर्यवशी,ग्राहक


दोनशे टन साहित्य

तीन नामांकित कंपन्यासह सुमारे दहा स्थानिक उत्पादक कंपन्या आहेत. ब्रॅण्डेड साहित्य खरेदी करणारा तीस टक्के ग्राहक आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी माध्यमांची शालेय पुस्तके, शालेय साहित्य, लॉगबुक, नोटबुकसह आदी वस्तूंची मोठ्या प्रमाणात आयात केली जाते. सुमारे दोनशे टनाहून अधिक शालेय साहित्य कोल्हापुरात आणले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विजय परकाळे, मुंडेंचे जबाब घेतले नाहीत’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यभर गाजलेल्या जिल्ह्यातील पोलिस लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर उपअधीक्षक व पोलिस निरीक्षक अशा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बदली करून त्यांना बडतर्फ केले असले तरी त्यांच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह आहे. या प्रकरणाच्या तपास अधिकारी मैथली झा यांनी गुरुवारी कोर्टासमोर उलट तपासणीमध्ये विजय परकाळे व ज्ञानेश्वर मुंडे यांच्या नावानंतर तपास आपल्याकडे सोपविण्यात आला का, याबाबत त्यांनी काही सांगू शकत नाही. त्या दोघांचे जबाब घेतले नसल्याचे उत्तर दिल्याचे अॅड. संपतराव पवार यांनी सांगितले.

२०११ मध्ये पोलिस दलात लैंगिक अत्याचाराचा प्रकार उघडकीस आला. त्यामध्ये कॉन्स्टेबल युवराज मारुती कांबळे याने बलात्कार केल्याबद्दल महिला कॉन्स्टेबलने शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार कांबळे याला अटक केली होती. लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलिसालाच अटक केल्याने हे प्रकरण राज्यपातळीवर गाजले होते. त्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक दुर्योधन पोवार यांच्याकडे होता. प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यानंतर उपअधीक्षक परकाळे तसेच पोलिस निरीक्षक ​ज्ञानेश्वर मुंडे यांची नावे समोर येऊ लागल्यानंतर पोलिस अधीक्षक असलेल्या मैथली झा यांच्याकडे तपास सोपविला होता.

मुंडे व परकाळे यांची बदली करून त्यांना बडतर्फ केल्याचे झा यांनी सांगितले असले तरी त्यांचे जबाब घेतले नसल्याचे स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विकासासाठी स्वतंत्र सेक्टर

$
0
0

गावांवर सुविधांच्या वर्षावात हद्दवाढीचा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर
प्रस्तावित हद्दवाढीतील समाविष्ट गावे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर महापालिका हद्दवाढीत समाविष्ट गावांचा सुनियोजित विकासाचा कृती कार्यक्रमच महापालिकेने आखला आहे. हद्दवाढीच्या भागाचा स्वतंत्र सेक्टर तयार करणे, गावांत मालमत्ता करात वाढ नाही, माणसी १३५ लिटर पाणी, आरोग्यापासून दळणवळणापर्यंतच्या अनेकविध सुविधांचा गालिचा असणार आहे. हद्दवाढीच्या प्रस्तावावर महापौर तृप्ती माळवी यांनी सही करून हा ठराव प्रशासनाकडे गुरुवारी सादर केला.

मालमत्ता करात वाढ नाही,
माणसी १३५ लिटर पाणी हद्दवाढीमध्ये समाविष्ट होणाऱ्या गावांतील मालमत्तेवर एकरकमी करवाढ होणार नाही. दोन वर्षे ग्रामपंचायत दराप्रमाणे कर आकारणी होईल. पुढील सात वर्षांत या गावांतील मालमत्ता कराची आकारणी शहर हद्दीतील मालमत्ता कराच्या बरोबरीने आणण्याची तरतूद आहे. शहरी भागात माणसी प्रतिदिन १३५ लिटर पाणीपुरवठा होतो, ग्रामीण

भागामध्ये माणसी ४० लिटर पाणीपुरवठा होतो. हद्दवाढीनंतर समाविष्ट होणाऱ्या गावांना शहरी भागाप्रमाणे १३५ लिटर पाणी प्रतिदिन मिळणार आहे. सांडपाणी प्रक्रिया केंद्र व पुनर्वापर केंद्र बांधून प्रदूषण होणार नाही याची दक्षता घेईल असे प्रशासनाने म्हटले आहे.

गावांत पायाभूत सुविधा उभारणार

महापालिका व सरकारच्या निधीतून गावांत नियोजन व वाहतुकीच्या दृष्टीने आवश्यक लांबी व रुंदीचे रस्ते, गटर्स केली जाणार आहेत. मनोरंजनासाठी सार्वजनिक बागा, खेळणी पार्क तयार केल्या जातील. खेळाची मैदान, वाचनालये, दवाखाने, व्यापारी संकुल, शैक्षणिक सुविधा करता येतील. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून झोपडपट्टीचा विकास साधता येणार आहे. गावांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात अग्निशमन केंद्र प्रस्तावित करून तातडीने अग्निशमन सुविधा उपलब्ध होणार आहेत.

आरोग्यापासून दळणवळणाच्या सुविधा

केंद सरकारच्या एनयूएचएम योजनेंतर्गत नवीन दवाखाने, आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. शहरातील दवाखान्यांमधून मिळणाऱ्या सुविधा हद्दवाढीत समाविष्ट गावांना मिळणार आहेत. गावातील सांडपाणी, कचरा उठाव होऊन त्यावर प्रक्रिया केली जाईल. पक्की गटारे व भुयारी गटारीची सुविधा उपलब्ध होणार आहेत. केएमटीमार्फत दळणवळणाची सुविधा गावांपर्यंत पोहोचणार आहे. अतिरिक्त बससंख्या उपलब्ध केल्या जातील. विविध सवलत योजना, पासेसचा लाभ मिळेल. शहराच्या धर्तीवर स्मशानभूमीमध्ये मोफत सुविधा दिल्या जातील.

शहरावर फ्लॅशबॅक...

१८७१ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे क्षेत्रफळ ९ चौरस किलोमीटर

१९४१ मध्ये १७ चौरस किलोमीटर इतके क्षेत्रफळ झाले.

१९४१ ते १९४६ कालावधीत क्षेत्रफळ वाढून ६६.८२ चौरस किलोमीटरपर्यंत वाढ झाली.


शिये, वडणगे, आंबेवाडी, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, नागदेववाडी, नवे बालिंगे, वाडीपीर, मोरेवाडी, पाचगाव, कळंबा, शिरोली, उचगाव, शिंगणापूर, गोकुळ शिरगाव, नागाव, वळीवडे-गांधीनगर, मुडशिंगी, गोकुळ शिरगाव व शिरोली एमआयडीसीचा समावेश आहे. हद्दवाढीमध्ये समाविष्ट होणाऱ्या गावांची एकूण लोकसंख्या २ लाख १६ हजार ८७३ आहे. महापालिकेच्या हद्दीतील नागरिकांचे वार्षिक दरडोई उत्पन्न ३८६५.७५ रुपये आहे. नव्याने समाविष्ट होणाऱ्या गावांतील एमआयडीसीसह वार्षिक दरडोई उत्पन्न ५०७.२४ रुपये इतके आहे. हद्दवाढीनंतर वार्षिक दरडोई उत्पन्न ३००२ रुपये होणार आहे. तर हद्दवाढीनंतर महापालिकेचे एकूण क्षेत्रफळ १८९.९३ चौरस किलोमीटर होईल.


हद्दवाढीत समाविष्ट होणाऱ्या ग्रामपंचायतींमधील सर्व लोकप्रतिनिधी, औद्योगिक वसाहतींमधील उद्योजकांनी हद्दवाढ प्रस्तावाचे स्वागत करून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे. शहराच्या विकासाचा दूरगामी विचार करून महापालिका हद्दीपासून एक ​किलोमीटरच्या आतील, भौगोलिक संलग्नता व ६० टक्क्यांपर्यंत नागरीकरण झालेल्या १८ महसुली गावांचा तसेच शिरोली व गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतींचा हद्दवाढीत समावेश केला आहे.

- पी. शिव शंकर, आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टॅक्सेशन पेपरचे ८० पैकी गुणांकन

$
0
0

चुकीच्या प्रश्नांमुळे झाला होता गोंधळ

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एमकॉम भाग १ च्या अॅडव्हान्स अकाउंटन्सी विषयातील टॅक्सेशनच्या प्रश्नपत्रिकेत अभ्यासक्रमाच्या बाहेरील विचारलेल्या प्रश्नांचा मोठा फटका विद्यार्थ्यांना बसला होता. यासंदर्भात ८० पैकी गुण देण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठाने घेतला आहे, त्याचा लाभ २७०० विद्यार्थ्यांना होणार आहे. अखिल भारतीय ‌‌विद्यार्थी परिषदेने (अभाविप) हा विषय लावून धरला होता.

मे महिन्यात ही परीक्षा झाली होती. यामध्ये अॅडव्हान्स अकाउंटन्सी विषयातील टॅक्सेशन (पेपर क्रमांक ४) या विषयात अभ्यासक्रमाच्या घोष‌ित आराखड्यामध्ये आणि प्रत्यक्ष स्वरुपामध्ये मोठा बदल झाला होता. यासंदर्भात अभाविपने शिवाजी विद्यापीठाकडे तक्रार करत विद्यार्थ्यांची बाजू मांडली होती.

यासंदर्भात ५ जूनला परीक्षा नियंत्रक महेश ककडे, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. आर. जी. फडतरे, अकाउटन्सी आणि ऑडिटिंग अभ्यास मंडळ अध्यक्ष डॉ. पी. व्ही. मोहिते आणि अधिसभा सदस्य अमित कुलकर्णी, अभाविपेचे पदाधिकारी शंकरराव कुलकर्णी, अमित वैद्य आणि रतन कांबळे यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत १६ मार्कांचे प्रश्न २० मार्कांचे करून, सोडवलेल्या प्रश्नातील अधिकतम मार्कांच्या चार प्रश्नांची बेरीज करून ८० पैकी गुण देण्याचा निर्णय झाला. तशा स्वरुपाच्या सूचनाही विद्यापीठाने दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेंबलाईवाडी तहानलेलीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कष्टकरी, मध्यमवर्गीयांची वस्ती असलेला प्रभाग म्हणजे टेंबलाईवाडी प्रभाग होय. याप्रभागात अनेक सुविधा केल्याचा दावा नगरसेवक करत असले तरी रस्त्यांशिवाय इतर सुविधा फारशा दिसत नाहीत. प्रभागात पाण्याची महत्त्वाची समस्या आहे. त्याबरोबरच कचरा उठाव हा देखील या प्रभागातील कळीचा मुद्दा आहे.

टेंबलाईदेवीच्या नावावरून या भागाला आणि प्रभागालाही टेंबलाईवाडी असे नाव पडले आहे. हा प्रभाग उंचगाव नाका, टेंबलाईवाडी शाळा परिसर, समर्थ कॉलनी, कृष्णविहार कॉलनी, लक्ष्मी कॉलनी, टेंबलाईवाडी गावठाण, श्रीराम कॉलनी, साईनाथ कॉलनी, अष्टविनायक कॉलनी, ख्रिश्चन वसाहत, जोशी गल्ली, सम्राट कॉलनी या भागात विस्तारलेला आहे. त्याबरोबरच याच भागात काही कंपन्यादेखील आहेत.

या प्रभागातील सुमारे ८० टक्के रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामध्ये उंचगाव नाका, टेंबालाईवाडी शाळा गावठाण, लक्ष्मी कॉलनी, समर्थ कॉलनी, ख्रिश्चन वसाहत या ठिकाणचे रस्ते झाले आहेत. मात्र, श्रीराम कॉलनी, अष्टविनायक कॉलनी याठिकाणची कामे राहिली आहेत. पिण्याच्या पाइपलाइनसाठी ५० लाखांचा निधी नगरसेवकांनी खर्च केला असला तरी काही भागात अजूनही पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. कावळा नाका येथील टाकीतून टेंबलाईवाडीसाठी करण्यात येणारा पाणीपुरवठा कमी प्रमाणात होतो. त्यामुळे पुढे कमी पाणी येते. काही दिवसांपूर्वी टेंबलाईवाडी येथे नवीन मोटार बसविण्यात आल्यानंतर चांगले पाणी येत होते. मात्र, ती चारच दिवसात बंद पडली आणि लोकांना पुन्हा पाणी टंचाईची समस्या भेडसावू लागली आहे.

टेंबलाईवाडी शाळेची उंची वाढविण्यात आली आहे. त्याबरोबरच शाळेला ग्रीलही करण्यात आले आहे. त्याबरोबरच प्रभागात एकमेव असलेल्या इंदिरा गांधी बालोद्यानामध्ये काही सुविधा देण्यात आल्या आहेत. याठिकाणी बँच खरेदी आणि खेळणी बसविण्यात आली आहेत.

टेंबलाईवाडी प्रभागात एका हॉलची गरज आहे. पण, त्याला महानगरपालिकेकडून परवानगी मिळालेली नाही. त्याबरोबरच गार्डनच्या बाजूला कंपाऊंड, हॉल‌िबॉल ग्राउंड, बास्केटबॉल ग्राऊंडदेखील करण्याचे नियोजन होते. मात्र, महानगरापालिकेच्या परवानगीमुळे सर्वच कामे रखडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहराच्या मध्यवस्तीतील भाग म्हणून शाहू मैदान प्रभाग ओळखला जातो. मंदिर परिसर, नाट्यगृह, मार्केट, तालीम परिसर, खाऊ गल्ली यामुळे या भाग नेहमी गजबजलेला असतो. प्रभागातील रस्ते, गटर्स, ड्रेनेजची बहुतांशी कामे झाली असली तरी या पायाभूत सुविधांची पूर्ततेच्या पलीकडे जाऊन पर्यटकांसाठी, भाविकासाठी सोयी सुविधा करणे गरजेचे आहे. मात्र या भागात पर्यटक, भाविकासाठी व्यवस्थित पार्किंगची सुविधा नाही. स्वच्छतागृहे नाहीत. वाहनतळावर पैसे आकारून वाहनासाठी जागा उपलब्ध करून दिली जाते, मात्र माती, धुळीतून वाट काढत वाहनधारकांना वाहने लावण्यासाठी जागा शोधावी लागते.

ना पिण्याची सोय, ना स्वच्छतागृहाची उपलब्धता

करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. भाविकांसाठी ​बिंदू चौक परिसरात पे अँड पार्कची सुविधा आहे. महापालिकेने याकरिता खासगी ठेकेदार नेमले आहेत. पण या ठिकाणी सुविधांची वानवा आहे. पे अँड पार्ककडे जाण्यासाठी दिशादर्शक फलक नाहीत. पर्यटकांना दहा ठिकाणी चौकशी करत या ठिकाणी पोहचावे लागते. येथे दरपत्रक लावण्यात आले नाही. वाहने थांबवण्यासाठी व्यवस्थित जागा नाही. माती, धुळीचा सामना करावा लागतो. या भागात आता खडीकरण केले आहे. निम्म्या जागेवर खडी टाकली आहे. या भागात पिण्याच्या पाण्याची सोय नाही. भाविकासाठी स्वच्छतागृहे नाहीत. स्वच्छतागृहाअभावी महिला भाविकांची गैरसोय होत आहे. लहान मुले उघडयावरच अनेकदा शौचास बसतात. वास्तविक महापालिकेने याठिकाणी सुलभ शौचालयाच्या धर्तीवर स्वच्छतागृह उभारण्याची आवश्यकता होती. करवीर नगर वाचन मंदिराच्या समोरील रस्त्यावरही दोन्ही बाजूनी वाहने पार्क केलेली असतात. या मार्गावर वाहतुकीची कोंडी नित्याची आहे.

सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था

बालगोपाल तालीम मंडळ, तांदळे गल्लीतील सार्वजनिक शौचालयची दुरवस्था झाली आहे. बालगोपाल तालीमच्या पिछाडीस असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या ठिकाणी सुलभ शौचालय उभे केले तर नागरिकांची सोय होणार आहे. तसेच परिसरात स्वच्छता राहील. खासबाग मैदान येथील खाऊ गल्लीत खोक्यांचे अतिक्रमण वाढत आहे.भागातील पिण्याच्या पाइपलाइन खराब झाले आहेत. ईगल प्राईड येथील महापालिका रुग्णालयाकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी येथील सेवेचा नागरिकांना लाभ होत नाही.

नगरसेवक आदिल फरास यांनी बालगोपाल तालीम, खासबाग मैदान, देवणे गल्ली, खाऊ गल्ली, टेंबे रोड, मिरजकर तिकटीसह विविध भागात रस्ते, गटर्सची कामे केल्याचे नागरिक सांगतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कागल नगराध्यक्षपदी संगीता गाडेकर बिनविरोध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

कागल नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी संगीता प्रकाश गाडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार शांताराम सांगडे यांनी काम पाहीले.

मावळत्या नगराध्यक्षा श्रीमती आशाकाकी माने यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदासाठी संगीता गाडेकर यांनी दोन अर्ज भरले. पैकी माघारीच्या दिवशी (ता.१०) एक माघार घेतल्याने गाडेकर यांचा एकमेव अर्ज राहीला. त्यांच्या निवडीने कागलच्या इतिहासात प्रथमच प्रकाश गाडेकर आणि त्यांच्या पत्नी संगीता या दाम्पत्यांना नगराध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे. निवडीनंतर प्रचंड आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करण्यात आली. सजवलेल्या ट्रॉलीतून वाद्याच्या गजरात भव्य मिरवणूकही काढण्यात आली. आशाकाकी माने यांनी गाडेकर यांचा सत्कार केला.

सत्काराला उत्तर देताना संगीता गाडेकर म्हणाल्या, 'सर्वांगसुंदर कागल हा आमदार हसन मुश्रीफ यांचा ध्यास घेवून आम्ही गेली पंचवीस वर्ष कागल शहराच्या कायापालटासाठी झटत आहोत. दिलेल्या संधीतून पारदर्शी कारभार करुन सर्वसमावेशक विकासासाठी कटिबध्द राहू.' यावेळी भैय्या माने, मनोहर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ चित्रकार ऐझॅक होळकर यांचे निधन

$
0
0

मिरज : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार व सामाजिक कार्यकर्ते ऐझॅक हंबीरराव होळकर (वय८०) यांचे बुधवारी रात्री वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर मिरज येथील ख्रिश्चन दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

अमूर्त शैलीतील जागतिक स्तरावरील एक महत्त्वाचे चित्रकार अशी चित्रकला क्षेत्रात त्यांची ओळख होती. त्यांचे चित्रकलेचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूरच्या दळवीज् आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये झाले. १९५३ मध्ये मिशन स्कॉलरशीप मिळवून जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांना चित्रकला अध्ययनाची संधी मिळाली. बालचित्रकला क्षेत्रातील त्यांच्या संशोधनाबद्दल तत्कालीन पंतप्रधान कार्यालयाने त्यांचा विशेष सन्मान केला होता. आर्ट स्टुडंट व ख्रिश्चन मिशनरी या दोन्ही भूमिका त्यांनी अमेरिकेतही अत्यंत तळमळीने बजावल्या. त्यांच्या चित्रांची अनेक प्रदर्शने अमेरिकेत विविध शहरांतून झाली होती. अमेरिकेतून परतल्यानंतर त्यांनी झोपडपट्टीतील मुलांसाठी इसा बाल संगोपन सेवा संस्था सुरू केली. त्याचबरोबर इमॅन्युअल इंग्लिश स्कूल, सांगली, बिशप इंग्लिश स्कूल, इचलकरंजी, कॅमरन स्कूल अॅन्ड चर्च, मिरज या संस्थांमध्येही त्यांनी पदाधिकारी म्हणून कार्य केले. आजवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्केटर्सचा १३१ तासांचा विक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सलग १३१ तास ३१ मिनिटे आणि ३१ सेकंद रिले स्केटिंग करत १४६ स्केटर्सनी आशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस‍्मध्ये आपल्या कामगिरीची नोंद केली. त्यामुळे कोल्हापूरचे नाव पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचले आहे.

कोल्हापूर जिल्हा अमॅच्युअर रोलर स्केटिंग असोसिएशनच्यावतीने विवेकानंद शिक्षण संस्थेच्या शिक्षणमहर्षी बापूजी साळंखे स्केटिंग प्रशिक्षण केंद्रात हा विक्रम करण्यात आला. ६ जूनला सकाळी ६ वाजता या उपक्रमाची सुरूवात झाली होती. तब्बल ५ दिवस हा उपक्रम सुरू होता.

अगदी अडीच वर्षांच्या मुलांपासून ते पंचवीशीपर्यंतच्या युवकांपर्यंत सर्व स्केटर्सनी दिवसरात्र सुरू असणाऱ्या रिले पद्धतीच्या उपक्रमात सहभाग घेऊन हा विक्रम केला. साखळी पद्धतीने स्केटींग करून हा विक्रम पार पाडण्यात आला.

गुरूवारी ६ जूनला सकाळी स्केटिंगपटू रिंगवर उतरले होते. त्यांनी १३१ तास ३१ मिनिटे व ३१ सेकंद असा विक्रम केला. पालक, शिक्षक आणि क्रीडापटूंनी त्यांचे स्वागत केले. सोहळ्यानंतर आमदार राजेश क्षीरसागर व आशिया तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे प्रतिनिधी गौरव हंडूजा व काडसिद्धेश्वर महाराज यांच्याहस्ते खेळाडूंना पदक व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. यावेळी अड. धनंजय पठाडे, डॉ. संदीप पाटील, प्राचार्या शुभांगी गावडे, संघटनेचे अध्यक्ष अनिल कदम, आदी उपस्थित होते. स्केटिंग प्रशिक्षक महेश कदम, भास्कर कदम यांनी सर्वांचा आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फासेपारधी कुटुंबीयांचा पालिकेवर मोर्चा

$
0
0

पुनर्वसनाच्या आश्वासनानंतर इचलकरंजीतील आंदोलन मागे

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

झोपडपट्टी हटवून त्याठिकाणी बाजारकट्टा बांधण्यासाठी सुरु असलेल्या हालचालींच्या निषेधार्थ तेथे वास्तव्यास असलेल्या फासेपारधी कुटुंबियांनी गुरुवारी पालिकेवर मोर्चा काढला. पालिकेच्या प्रवेशद्वारातच ठाण मांडून चूल पेटवून आंदोलन करण्यात आले. सुमारे दोन तास हे आंदोलन सुरु होते. अखेरीस नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी फासेपारधी कुटुंबियांचे पुनर्वसन केल्याशिवाय झोपड्या हलविल्या जाणार नाहीत, असे ठोस आश्वासन दिल्यानंतरच आंदोलक माघारी परतले. दरम्यान, आंदोलन मागे घेण्याबाबत समजावण्यासाठी गेलेल्या पोलिसांबरोबर आंदोलकांची शाब्दिक चकमक उडाली. येथील स्वामी मळा परिसरातील गट क्रमांक ११६ व ११७ मधील ३४ गुंठे जमीन नगरपालिकेच्या मालकीची आहे. मात्र याठिकाणी १९८७-८८ पासून फासेपारधी समाजाची २० कुटुंबे झोपड्या बांधून वास्तव्यास होती. काही वर्षांपूर्वी पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने यापैकी ९ झोपड्या हटविल्या. मात्र अद्यापही ११ झोपड्या याठिकाणी आहेत. झोपड्या हटवित असताना फासेपारध्यांनी केलेल्या आंदोलनानंतर तत्कालीन मुख्याधिकारी नितीन देसाई यांनी कुटुंबाचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ठराव करण्यात आला. मात्र २००१ पूर्वीच्या झोपड्या नियमित करुन त्यांचे साईट नं. १०२ मध्ये पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव पुढे आला. पण या संदर्भात पालिकेकडून अद्यापही कोणतीच कार्यवाही झालेली नाही. या जागेवर बाजारकट्ट्याचे आरक्षण असून त्यासाठी आमदार फंडातून २३ लाखाचा निधीही मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानुसार याठिकाणी सुसज्ज असा बाजारकट्टा बांधण्याच्या हालचाली पालिकेकडून सुरु आहेत. बाजारकट्टा बांधण्यासाठी येथील झोपडपट्ट्या हटविणे गरजेचे आहे. मात्र त्याला फासेपारधी कुटुंबियांतून तीव्र विरोध होत आहे. जोपर्यंत पर्यायी व्यवस्था होत नाही तोपर्यंत नगरपरिषदेसमोर चूल पेटवू आंदोलन असा इशारा देत गुरुवारी फासेपारधी कुटुंबियांनी पालिकेवर मोर्चा काढला. आदिवासी फासेपारधी समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मोहन काळे यांच्या नेतृत्त्वाखाली महिला, मुले, वृध्द सर्वांनीच पालिकेच्या प्रवेशद्वारातच ठिय्या मारुन तेथेच चुली पेटवल्या. घोषणाबाजी सुरु केल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सकस, स्वच्छ आण‌ि निर्भेळ अन्न पुरवा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'सणासुदीच्या काळात दूध, मिठाई, खवा, खाद्यतेल, वनस्पती, बेसन यांचे नमुने घेऊन ग्राहकांना स्वच्छ, सकस व निर्भेळ अन्न पुरविण्याबाबत अन्न प्रशासनाने दक्षता घ्यावी. तसेच कोल्हापूर शहरातील फिरत्या विक्रेत्यांकडील अन्नाबाबत स्वच्छतेचे निकष पाळले जात नसतील तर त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करावी,' असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिले. अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ ची प्रभावी अंमलबजावणी, नियंत्रण व समस्यांचे निराकरण तसेच दूध भेसळीस आळा यासंदर्भात समितीची बैठक झाली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

जिल्हाधिकारी सैनी म्हणाले, 'नवीन परवाने तसेच नोंदणी दाखले देणे व त्यांच्या नूतनीकरणाचे कामकाज 'सेतू'मार्फत करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. प्रशासनाने २५ मे रोजी मॅगीचे चार नमुने तपासणीसाठी घेतले होते, त्यापैकी दोन नमुन्यांमध्ये शिशाचे प्रमाण जास्त आढळल्याने विक्रेता ते उत्पादक यांच्या टोकापर्यंत तपास करून दोषी व्यक्तींविरुद्ध न्यायालयात खटले दाखल केल्याची माहिती प्रशासनातर्फे दिली, तसेच, गोकुळ शिरगाव येथील वितरकाकडे ३२ लाखांचा मॅगीचा साठा जप्त करून जे १६ नमुने तपासणीस घेतले आहेत, त्यांचे विश्लेषण अहवाल प्राप्त होताच अहवालातील निष्कर्षानुसार कायदेशीर कारवाई करू.'

बैठकीमध्ये अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ ची अंमलबजावणी सुरु झाल्यापासून प्रशासनाने केलेल्या कामाची माहिती सादर करण्यात आली. गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू यांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध आय.पी.सी. कलम ३२८ अंतर्गत गुन्हे दाखल करण्याबाबत चर्चा झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके, पोलिस निरीक्षक प्रदीप जाधव, महापालिकेचे अन्न सुरक्षा अधिकारी एस. ए. केदार, अन्न व औषध प्रशासनच्या परिमंडळ १ चे सहाय्यक आयुक्त (अन्न) एस. एम. देशमुख, आदींसह अन्य अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपत्कालीन पीक योजना

$
0
0

संशोधनावर आधार‌ित कृषी विद्यापीठाच्या विविध उपाययोजना

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

देशात यंदा मान्सूनच्या स्थितीबद्दल संभ्रम असल्याने महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्यावतीने आपत्कालिन पर्यायी पीक योजना जाहीर करण्यात आली आहे. जर जुलै महिन्यात पावसाला सुरुवात झाली तर उडीद, मूग, मटकी हे पीक घेवू नये, अशी सूचना विद्यापीठाने केली आहे. तसेच जमिनीची पाणी धारण क्षमता वाढवण्यासाठी एकरी दोन टन शेणखत वापर करण्याची सूचनाही केली आहे. जर पेरणीस उशीर झाला तर ऊस पिकासाठी हेक्टरी २० टक्के बियाणे कमी वापरण्याचा महत्त्वाची सल्लाही दिला आहे.

विद्यापीठाने यासंदर्भात आराखडा प्रसिद्ध केला आहे. आराखड्यात म्हटले आहे की, 'महाराष्ट्रात ७ जूनला पावसाची सुरुवात होते. पण अजूनही पाऊस सुरू न झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत उशिरा पेरणीसाठी शेतकऱ्यांनी कोणती पिके घ्यावीत, याचे व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. संशोधनावर आधारीत विविध उपाययोजना विद्यापीठाने सुचवल्या आहेत.

ऊस व्यवस्थापन

विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, अतिरिक्त ऊस असेल तर त्याचा चारा म्हणून उपयोग करावा आणि पाचट उर्वरीत ऊस पिकामध्ये पसरून द्यावे, अशी सूचना केली आहे. तसेच पाणी देताना ते एक आड एक सरीत द्यावे, आणि ८ टक्के केवोलीनची फवारणी करावी. पालाश अन्नद्रव्ये दिली नसल्यास ती प्रती हेक्टरी ११५ किलो पाणी देण्याचा अगोदर द्यावीत. जर पाण्याची उपलब्धता नसेल तर ऊस पिकास फवारणीद्वारे १०० ग्रॅम १९:१९:१९ आणि सुक्ष्म अन्नद्रव्ये खत (ग्रेड २) ५० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसांच्या अंतराने आलटून पालटून द्यावीत. जर पेरणीस उशीर झाला तर पिकाच्या दोन ओळीतील आणि रोपातील अंतर जास्त ठेवावे आणि हेक्टरी बियाणाचे प्रमाण २० टक्के कमी करावे अशी सूचना केली आहे. कोळपणी आणि खुरपणी वेळेवर केल्यास तणनियंत्रण राहून जमिनीतील ओलावा टिकून राहील. सरीत अच्छादनाचा वापर करणे, तसेच खुरपणी करून तुषार ‌सिंचनाद्वारे पाण्याची व्यवस्था करावी.

भात पीक व्यवस्थापन

ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे आणि भाताची रोपे २५ ते ३० दिवसांची आहेत, त्यांनी रोपवाटिकेस शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी बेताचे पाणी द्यावे. पावसाला सुरुवात झाल्यानंतर पुनर्लागवड करतांना रोपांची संख्या वाढवून ३-४ रोपे प्रती चूड लागवड करावी.

रोपांचे अंतर हळव्या वाणांसाठी १५ सेंटीमीटर x १५ सेंटीमीटर, तसेच निमगरव्या आणि गरव्या वाणांसाठी २० सेंटीमीटर x १५ सेंटीमीटर इतके ठेवावी अशी सूचना करण्यात आली आहे. ज्यांची रोपे १५ दिवसांची आहेत, त्यांनी प्रती गुंठा १ किलो युरीया द्यावी, तसेच रोपवाटिकेस सकाळी आणि सायंकाळी पाणी द्यावे. पाऊस झाल्यानंतर पुर्नलागवड करताना रोपांची संख्या २ ते ३ प्रती चूड ठेवावी. भाताची रोपे तयार करण्यासाठी थोडी उंचवट्याची जागा निवडावी आणि चारही बाजूने खोलगट चरी काढावी. त्यामुळे जास्त पाऊस झाला तरी पा

ण्याची निचरा होण्यास मदत होते. पुनर्लागवड योग्ये वेळेत होण्यासाठी १४ दिवसांपासून पुढील वयाची रोपे वापरावीत.





खरीप जमिनीसाठीची हंगाम दुरुस्ती

पावसाचे आगमन आणि पिके

जुलै पहिला पंधरवडा ः बाजरी, राळा, राजगीरा, भूईमूग, एरंडी, तूर, हलगा, सूर्यफूल.

आंतरपीक : बाजरी ः तूर (२:१), सूर्यफूल : तूर (२:१), गवार : तूर (२:१), एरंडी : गवार (१:२)

जुलै दुसरा पंधरवडा ः सूर्यफूल, तूर, हुलगा, राळा, एरंडी, बाजरी

आंतरपीक : सूर्यफूल : तूर (२:१), गवार:तूर (२:१), बाजरी:तूर (२:१)

ऑगस्ट पहिला पंधरवडाः सूर्यफूल, तूर, हुलगा, एरंडी

आंतरपीक : सूर्यफूल : तूर (२:१), एरंडी : दोडका मिश्रपिके

ऑगस्ट दुसरा पंधरवडाः सूर्यफूल : एरंडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेरपरीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

यंदा दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची फेर परिक्षा जुलैमध्ये घेऊन ऑगष्टमध्ये निकालही जाहीर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. परंतु, या संदर्भातले अद्याप कोणतेही सरकारी आदेश अथवा स्पष्ट माहिती जिल्हा पातळीपर्यंत व तेथून शाळांपर्यंत आलेली नाही. त्यामुळे शाळांमध्ये या बाबत चुकीची माहिती दिली जात आहे. या बाबत शिक्षण विभागच अद्याप अनभिन्न असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात या वर्षी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३८१० इतकी आहे. या सर्वांना ही संधी उपलब्ध होणार आहे.

या बाबत जिल्हा परिषद माध्यमिक विभागाकडे चौकशी केली असता त्याबाबत अद्याप काहीही माहिती आली नसल्याचे सांगण्यात आले. या बाबतची सविस्तर माहीती सोमवारी अथवा मंगळवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतरच या प्रक्रियेला गती मिळणार आहे. मात्र, शाळास्तरांवर या बाबत काही माहिती नसल्याने शाळांमध्ये चुकीची माहिती देण्यात येत आहे. ही प्रक्रिया पुढील वर्षी पासून राबवण्यात येणार असल्याचेही काही जण सांगत आहेत. मात्र, प्रत्यक्षात ही प्रक्रिया पुढील वर्षीपासून नव्हे तर गुणपत्रिकेवर पुढील वर्षीपासून नापास हा शेरा नसेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्ह्यात गतवर्षी ४२ हजार १३२ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षा दिली होती. त्यापैकी ३९ हजार ३८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, २७४५ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील २४४५ विद्यार्थ्यांनी पुनर्परिक्षार्थी म्हणून गतवर्षी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी ९८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. १०६५ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे या वर्षी जिल्ह्यात दहावीमध्ये अनुत्तीर्ण झालेले ३८१० इतके विद्यार्थी आहेत. या सर्वांनी ही संधी मिळणार आहे. त्यामुळे आता दहावी नापास असा शेरा असणारी मुले असणार नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणवेशांची प्रतीक्षा कायम

$
0
0

कुपवाड : प्राथमिक शाळा सोमवारपासून सुरू होत आहेत. सांगली जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारी २० लाख ७६ हजार २३० पाठ्यपुस्तके व स्वाध्याय पुस्तके दाखल झाली आहेत. मात्र, गणवेशाचा पत्ता नाही. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तके नवी मात्र, गणवेश जुनेच असे चित्र दिसण्याची शक्यता आहे.

सरकारकडून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येतात. गतवर्षी बऱ्याच ठिकाणी पुस्तके वेळेत पोहचली नव्हती. यंदा, मात्र ही पुस्तके वेळेत पोहचली असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व मुलांना मोफत पाठ्यपुस्तके मिळणार हे नक्की आहे. त्याच बरोबर सर्व मुलांचे स्वागत हे गुलाब पुष्प देऊन करण्यात येणार आहे. त्यामुळे मुलांचा शाळेचा पहिला दिवस मजेत जाणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तकांबरोबरच नवीन गणवेशही देण्याचे नियोजन होते. जिल्हा परिषद पातळीवर त्यासाठी प्राथमिक तयारीही करण्यात आली होती. मात्र, सरकारने यासाठी लागणारा निधीच दिला नसल्याने मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे नवीन गणवेश अद्याप अंधातरी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images