Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कागदोपत्री संस्थांची होणार सफाई

$
0
0
सरकारच्या अनुदानाचा लाभ उठवण्यासाठी तर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी ठराव गोळा करण्याच्यानिमित्ताने जिल्ह्यात स्थापन झालेल्या बिनकामाच्या व जिल्ह्यातील संस्थांचे आकडे फुगवणाऱ्या सहकारी संस्थांची नव्या निवडणुकीच्यानिमित्ताने सफाई होणार आहे.

‘पोलो डिझेल ट्रेंडलाइन’ स्पेशल प्राईजमध्ये

$
0
0
फोक्सवॅगन कंपनीने ग्राहकांसाठी पोलो डिझेल ट्रेंडलाईन ५ लाख ६९ हजार या स्पेशल प्राईजमध्ये उपलब्ध केली आहे. पोलो डिझेल ट्रेंडलाईन या कंपनीच्या लोकप्रिय मॉडेलसाठी ही सुविधा २७ ऑगस्टपर्यंत उपलब्ध राहणार आहे.

भुदरगड, पन्हाळा प्रांत कार्यालये उद्यापासून

$
0
0
दोन तालुक्यांसाठी एक उपविभागीय कार्यालय (प्रांत) याप्रमाणे जिल्ह्यात १५ ऑगस्टपासून भुदरगड व पन्हाळा या दोन नवीन प्रांत कार्यालयांना प्रारंभ होणार आहे.

‘लोकसभा लढायला काँग्रेसमध्ये पुष्कळजण’

$
0
0
‘कोल्हापूर लोकसभेची जागा काँग्रेसलाच मिळावी असा आमचा आग्रह आहे, ती मिळाल्यास आमच्याकडे लढण्यास उसन्या उमेदवाराची गरज भासणार नाही, लढायला भरपूर व्यक्ती आहेत,’ अशी माहिती गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

मांडरेंची चित्रसंपदा हा सांस्कृतिक ठेवा

$
0
0
‘मराठी रूपेरी पडदा आणि निसर्गचित्रांचा कॅनव्हास या दोन्ही माध्यमांमध्ये कोल्हापूरचं नाव अजरामर करणाऱ्या कै. चंद्रकांत मांडरे यांच्यासारखा कलाकार पुन्हा होणार नाही’ अशा शब्दांत ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी मांडरे यांना आदरांजली वाहत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

वसंत पेंटरांची कलापुरात आठवणही नाही

$
0
0
सिनेमाच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या कलादिग्दर्शन, अभिनय, दिग्दर्शन, पटकथा, तंत्र अशा प्रत्येक क्षेत्रात निष्णात असलेल्या कै. वसंतराव पेंटर यांच्या १३ ऑगस्ट या जन्म शताब्दी दिनाची कलापुरात साधी आठवणही नाही.

परप्रांतीयांचे रेकॉर्डच नाही

$
0
0
शहरात कुस्तीसाठी येणारे पैलवान व बांधकाम, अन्य व्यवसाय, कामानिमित्त येणाऱ्या परप्रांतिय कामागारांचे कोणत्याही प्रकारचे अधिकृत रेकार्ड पोलिसांकडे नाही.

‘वातावरण बिघडविणाऱ्यांवर गुन्हे’

$
0
0
‘बालिकवेर अत्याचार करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. तरीही काही पक्ष, संघटनांकडून परप्रांतियांवर हल्ले होत असून कायदा व सुव्यवस्था बिघडवली जात आहे.

क्रिमिनल इंज्युरी कॉम्पेन्सेशन बोर्डच बेदखल

$
0
0
बलात्कारासारख्या वेदनादायी अत्याचाराला बळी पडणाऱ्या मुलीला वैद्यकीय उपचारांबरोबरच मानसिक उभारी मिळून ती नव्याने आयुष्यात उभी रहावी यासाठी संसदेने मंजुरी दिलेली आणि सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिलेले क्रिमिनल इंज्युरी कॉम्पेन्सेशन बोर्ड कोल्हापुरात आस्तित्वातच नाही.

परप्रांतीयांना शोधून बेदम मारहाण

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी स्टंटबाजी करत गोकुळ शिरगाव एमआयडीसीतील कारखान्यांमध्ये परप्रांतिय कामगारांचा शोध घेऊन त्यांना काठी, लोखंडी फावडे, सळीने बेदम मारहाण केली.

'मनसे'चा धुडगूस

$
0
0
अडीच वर्षीय बालिकेवर परप्रांतीय तरुणाने बलात्कार केल्याच्या घटनेचे सलग दुसऱ्या दिवशी कोल्हापुरात तीव्र पडसाद उमटले. विविध संघटना व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन आंदोलन सुरू केले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढून परप्रांतीय नागरिकांना अक्षरश: वेचून वेचून बदडले.

कुशल कामगारांसाठी प्रशिक्षण केंद्र

$
0
0
बांधकाम क्षेत्रात भासणाऱ्या कुशल कामगारांची उणीव दूर करण्यासाठी सरकारच्या कामगार कल्याण मंडळाच्यावतीने कोल्हापुरात प्रशिक्षण केंद्र उभारले जाईल, अशी घोषणा कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

३६ खिडक्यांचा बागुल‘बुवा’

$
0
0
आरटीओ कार्यालयात ३६ खिडक्यांचा कारभार सांभाळणारे बागुल‘बुवा’ आहेत. प्रत्येक खिडकीवर हॉट स्पॉटवर मर्जीतल्या क्लार्कच्या नेमणुकीची ड्युटी ते पाहतात.

भारतमाता की जय !

$
0
0
स्वातंत्र्यदिनाला नक्की काय लिहावं ते सुचत नव्हतं. या दिनावर जवळपास सगळे मुद्दे कोणी ना कोणी मांडलेले असतातच किंवा त्यावर चर्चा झडलेली असते.

हुपरीत तणावाचे वातावरण

$
0
0
कोल्हापुरातील बलात्काराची घटना ताजी असताना बुधवारी हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे एका युवकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली.

आता ‘फेस रेकग्निशन’

$
0
0
महापालिकेत गेली चार वर्षे सुरू असलेली बायोमेट्रिक प्रेझेंटी सिस्टम लवकरच बंद होणार आहे. यापुढे अत्याधुनिक फेस रेकग्निशन प्रेझेंटी सिस्टम सुरू करण्यात येणार आहे.

मआसंस लोकसभेच्या ११ जागा लढवणार

$
0
0
मराठा आरक्षण संघर्ष समिती लोकसभेच्या राज्यातील ११ जागा लढवणार असल्याचे सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. यापुढे राजकीय पदाधिका-यांची मदत न घेता स्वतःच आरक्षणाचा लढा लढण्याचा निर्णयही समितीने घेतल्याचे पाटील यांनी यावेळी जाहीर केले.

विकासात सहभाग वाढवूया!

$
0
0
शिक्षण, उद्योग, पायाभूत सुविधा आणि शेती अशा सर्व क्षेत्रांत कोल्हापूरने वेगाने प्रगती साधली आहे. काळाच्या गतीवर स्वार होऊन विकासाची गती पकडणाऱ्या कोल्हापूरच्या सर्व क्षेत्रांतील घडामोडींचा वेध महाराष्ट्र टाइम्सने ‘कोल्हापूर रायझिंग’च्या माध्यमातून घेतला आहे.

महापालिका सभेत पाकिस्तानचा निषेध

$
0
0
महापालिकेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत पाकिस्तानविरोधात घोषणा देत त्याच्या भ्याड हल्ल्याचा व दहशतवादी कृत्याचा निषेध करण्यात आला.

गर्भलिंग निदान : डॉक्टरची सनद निलंबित

$
0
0
बिद्री (ता. कागल) येथील श्रद्धा हॉस्पिटलचे डॉ. युवराज पाटील यांची व्यावसायिक सनद महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीने निलंबित केल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images