Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

आरोग्य विम्याचा मोलाचा आधार

$
0
0

सतीश घाटगे, कोल्हापूर

राज्य सरकारच्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा ​गेल्या १९ महिन्यांत २० हजार ७९२ रुग्णांना लाभ झाला आहे. या योजनेअंतर्गत ५८ कोटी ७६ लाख रुपयांचा बिले जिल्ह्यातील ३१ हॉस्पिटलना अदा केली गेली आहेत.

दारिद्र्यरेषेखालील (पिवळी शिधापत्रिका) दारिद्र्यरेषेवरील (केशरी शिधापत्रिका), अंत्योदय, अन्नपूर्णा शिधापत्रिका असणाऱ्या कुटुंबातील व्यक्तींना योजनेचा लाभ मिळतो. कोल्हापूर जिल्ह्यात १ नोव्हेंबर २०१३ मध्ये ही योजना सुरू झाली. जिल्ह्यातील ३१ हॉस्पिटल्समध्ये ही सुविधा मिळते. सीपीआर हॉस्पिटलसह शहरातील नामवंत २३ तर ग्रामिण भागातील आठ हॉस्पिटल्सचा योजनेत समावेश आहे.

ज्या रूग्णाला योजनेतून उपचार हवे असतील त्यांनी शिधापत्रिका, मतदान ओळखपत्र, आधारकार्ड घेऊन सरकारने नियुक्त केलेल्या हॉस्पिटलशी संपर्क साधायचा असतो. हॉस्पिटलमधील आरोग्यमित्र या रुग्णांना मदत करतात. ऑनलाइन प्रक्रियेव्दारे रुग्णांची नोंद केली जाते. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये यासाठी स्वतंत्र कक्ष किंवा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. रुग्णाच्या आजारासंबधीची कागदपत्रे व रिपोर्ट ऑनलाइन पाठवले जातात. खर्चाला मान्यता आल्यावर उपचार सुरू होतात. प्रारंभी ही योजना किचकट वाटली असली तरी योजनेव्दारे जोडलेल्या हॉस्पिटलला कॅशलेस बिल मिळत असल्याने त्यांच्या खात्यात भारी रक्कम पडत आहे. प्रत्येक आजारासाठी विशिष्ट रक्कम विम्याव्दारे मिळते. राजकीय पक्ष व नेत्यांनी राजीव गांधी आरोग्यदायी योजनेचा लाभ नागरिकांना देण्यासाठी मदत म्हणून स्वतंत्र व्यक्तींची नोंद केली आहे.

योजनेतील ३१ हॉस्पिटलंना रुग्णांना सेवा दिल्याबद्दल ५८ कोटी ७६ लाख रुपये मिळाले आहेत. २१ नोव्हेंबर २०१३ ते २० नोव्हेंबर २०१४ या कालावधीत १२ हजार २३४ रुग्णांवर उपचार केले आहेत. बिलापोटी ३४ कोटी ९० लाख रुपये हॉस्पिटल्सना मिळाले आहेत. २१ नोव्हेंबर २०१४ ते ३१ मे २०१५ अखेर ८५५८ रुग्णांना योजनेचा लाभ झाला आहे. २३ कोटी ८६ लाख ८३ हजार रुपयांचे बिल हॉस्पिटलला मिळाले आहे.

९७१ आजारांवर मदत

या योजनेअंतर्गत ९७१ आजारांवरील उपचारांसाठी विम्याव्दारे मदत मिळते. कर्करोग, किडणी, कान, नाक घसा, पोटाचे आजार, हाडांचे आजार, लहान मुलांचे आजार यासह छोट्या व मोठ्या आजारांवर उपचार, शस्त्रक्रिया व औषधांसाठी मदत मिळते.

कोल्हापूर जिल्ह्यात शहर व ग्रामिण अशा दोन विभागात योजना राबवण्यासाठी सीपीआर हॉस्पिटलमध्ये समन्वयक आहेत. योजनेचा लाभ घेण्यात कोल्हापूर जिल्ह्याचा चौथा क्रमांक आहे. मुंबई, औरंगाबाद, अहमदनगर हे जिल्हेही योजनेचा लाभ घेण्यात आघाडीवर आहेत.

- डॉ. अशोक देठे, जिल्हा समन्वयक, राजीव गांधी आरोग्यदायी योजना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेल्वे स्टेशनवर सरकता ज‌िना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शाहूपुरी भागाकडून रेल्वे स्टेशनवरील दोन व तीन क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या पादचारी पुलामध्ये सरकता जिना बसवण्यात येणार आहे. त्यादृष्टीने रेल्वे प्रशासनाने तेथील जागेची मोजणी केली असून पावसाळा संपल्यानंतर तातडीने कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दोन महिन्यांत खासगी तिकिट बुकिंग कार्यालयही सुरू करण्यात येणार आहे.

शाहूपुरी परिसरातून रेल्वे स्टेशनवर येणाऱ्यांसाठी मोठा फेरा मारावा लागत असल्याने त्याबाजूने पादचारी पूल उभारण्यात यावा याबाबत सातत्याने मागणी करण्यात येत होती. त्यानुसार मध्य रेल्वेने पादचारी पूल, बुकिंग ऑफिस यासाठी टेंडर प्रसिद्ध करण्यात आले होते. दरम्यानच्या कालावधीत स्टेशनवर पुलावरून जाणाऱ्या प्रवाशांच्या सोईसाठी सरकते जिने बसवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. त्यातच कोल्हापूर रेल्वे स्टेशन हे ए ग्रेड स्टेशनच्या यादीत असल्याने येथे सरकता जिना बसवण्याच्यादृष्टीने प्रक्रिया राबवण्यात आली. त्यानुसार प्रशासनाने शाहूपुरीकडील भागातील रिकाम्या जागेची मोजणी केली आहे. पावसाळ्यानंतर काम सुरू करण्यात येणार आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या मतानुसार डिसेंबरमध्ये या कामाला प्रारंभ होणार आहे. काम सुरू झाल्यानंतर १२ महिन्यात संपवण्याची अट आहे. या कामाबरोबर पार्किंग, छोटे गार्डन व प्रतिक्षालयही उभारण्यात येणार आहे. पावसाळ्यानंतर या कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी संजय कुमार यांनी पुष्टी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांना मिळणार करिअरचा मंत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विद्यार्थी आणि पालकांना करिअरचा मंत्र देणारे 'टाइम्स एज्युफेस्ट २०१५' शैक्षणिक प्रदर्शन ६ ते ८ जून या कालावधीत होत आहे. विद्यार्थ्यांना शेकडो कोर्सेस, करिअरच्या अनेक संधी एकाच छताखाली उपलब्ध होत आहेत. शनिवारी (ता. ६) सकाळी दहा वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होत आहे. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाच्या प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील आहेत. विजेता अकॅडमीचे संचालक जयंत पाटील प्रमुख पाहुणे आहेत. कमला कॉलेज परिसरातील डॉ. व्ही. टी. पाटील सभागृहात शनिवारपासून सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत प्रदर्शन सुरू राहणार आहे.

शैक्षणिक विश्वातील विविध अभ्यासक्रम, संधी आणि करिअर दालनाचा खजिना शुक्रवारी उलगडणार आहे. उच्च शिक्षणातील संधी व करिअरमधील नवनवीन वाटा एकाच छताखाली उपलब्ध होण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'टाइम्स ऑफ इंडिया'च्यावतीने होणाऱ्या प्रदर्शनाचे सहप्रायोजक विजेता अकॅडमी आहे.

एज्युफेस्टमध्ये पुणे, बेळगांव, सांगली, जयसिंगपूर, कराड, इस्लामपूर, मिरज आदी ठिकाणाच्या तीस नामांकित शैक्षणिक संस्था सहभागी होत आहेत. स्पर्धा परीक्षेत राज्यात पहिला क्रमांक मिळविलेले विद्यार्थी, दहावी, बारावीनंतरचे करिअर, अभियांत्रिकी क्षेत्रातील संधी आणि करिअर, जेइइ मेन्स आणि अॅडव्हान्स, उच्च शिक्षणातील संधी, बँकिंग क्षेत्रातील प्रवेश परीक्षा, आदी विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.

प्रदर्शनातील कार्यक्रम

शनिवार, ६ जून

सकाळी १० वाजता : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

सकाळी १०.३० ः व्याख्यान ः डॉ. गिरीश कुलकर्णी, संचालक, तंत्रज्ञान विभाग, विषय ः तंत्रशिक्षणातील करिअर

दुपारी ४ वाजता : व्याख्यान ः पीएसआय परीक्षेत राज्यात प्रथम आलेले शशांक कदम

दुपारी ४.३० वाजता ः व्याख्यान ः चिन्मय पंडित, आयपीएस अधिकारी

सायं. ५ वाजता : वक्ते : प्राचार्य विराट गिरी, संजय घोडावत इन्स्टिट्यूट, विषय : दहावी, बारावीनंतर पुढे काय?

रविवार, ७ जून

सकाळी ११ वाजता : प्राचार्या संगीता चौगुले, विषय : अभियांत्रिकीमधील संधी

दुपारी १२ वाजता : प्राचार्य एस. व्ही. आणेकर, विषय : अभियांत्रिकीतील करिअर

सायं. ५ वाजता : जयंत पाटील, संचालक विजेता अकॅडमी : विषय : जेइइ मेन्स, अॅडव्हान्स

सोमवार, ८ जून :

सकाळी ११ वाजता : शिवाजी विद्यापीठाचे

प्लेसमेट ऑफिसर

डॉ. पी. एन. भोसले, विषय : उच्च शिक्षणातील करिअर आणि विविध संधी. वक्ते ः रवींद्र खैरे,

विषयः करिअरसाठी कौशल्य विकास

दुपारी ४ वाजता : शंतनू पेंडसे, क्षेत्रीय व्यवस्थापक एसबीआय, विषय : बँकिंग क्षेत्रातील संधी.

सायं. ५ वाजता : प्राचार्य ए. के. गुप्ता, डॉ. जे. जे. मगदूम इंजिनीअरिंग कॉलेज, विषय : इंजिनीअरिंग प्रवेश

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोर्चाआधीच इशाऱ्यांचा खेळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ऊसाच्या एफआरपीसाठी साखर कारखान्यांना दोन हजार कोटी रुपये देण्यास विलंब होत असल्याच्या कारणावरून सहकार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर उद्या (शनिवारी) मोर्चा काढण्यापूर्वीच शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपात इशाऱ्यांचा खेळ रंगला. 'अटक झाली तरी बेहत्तर, पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढणारच' असे राष्ट्रवादीचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तर राष्ट्रवादीचा हा स्टंट मोर्चा भाजपचे कार्यकर्ते जीवाचे रान करून अडवतील असे प्रत्युत्तर भाजपचे महानगर अध्यक्ष महेश जाधव यांनी दिले. दरम्यान, पोलिस प्रशासनाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक बंदोबस्त ठेवला आहे. जमावबंदी आदेशाचा भंक केल्यास कारवाई करू असा सज्जड इशारा पोलिसांनी दिला आहे.

साखरेच्या घसरलेल्या दरामुळे ऊस बिले देण्यास कारखान्यांकडे पैसे नाहीत. केंद्र आणि राज्य सरकारकडून कारखान्यांना मदत न मिळाल्याने काखानदार हवालदिल आहेत. बिले खात्यावर जमा झालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. पिक कर्जेही धोक्यात आली आहेत. एफआरपीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन हजार कोटी रुपये देण्याची घोषणा केली. ही मदत प्रलंबित असल्याने १५ मे रोजी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री पाटील यांची भेट घेतली होती. ३१ मेपर्यंत मदतीचे आश्वासन पालकमंत्री पाटील यांनी दिले होते. यावेळी राष्ट्रवादीने मोर्चाचा इशारा दिला होता.

गेले आठवडाभर मोर्चा काढण्यावरून पालकमंत्री पाटील, आमदार मुश्रीफ आणि भाजपचे महानगर अध्यक्ष महेश जाधव यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. त्यातून तणाव वाढला आहे. राष्ट्रवादीने एक जून रोजी पोलिसांकडे मोर्चाची मागणी केली. त्याला पोलिसांनी परवानगी

नाकारली. मोर्चास परवानगी नाकारल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी भेट घेतली. शर्मा यांनी मोर्चाऐवजी मध्यममार्ग काढण्याचे आवाहन शिष्टमंडळाला केले. शेतकऱ्यांच्या बिलासाठी लोकशाही पद्धतीने आंदोलन केले जाईल. शेतकरी, कारखान्यांची बिकट अवस्था पालकमंत्र्यांना समजावून सांगू असे मुश्रीफ यांनी जिल्हा पोलिसप्रमुखांना सांगितले.

मेळावा बारा वाजता, मोर्चा दोन वाजता

संभाजीनगर परिसरातील रामानंदनगरात शनिवारी दुपारी बारा वाजता शेतकऱ्यांचा मेळावा होईल. यावेळी आमदार मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार संध्यादेवी कुपेकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार के. पी. पाटील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. वीस हजार शेतकरी मेळाव्यातील येतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसने व्यक्त केला आहे.

बंदी आदेश असल्याने पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली आहे. राष्ट्रवादी आणि भाजपाच्या नेत्यांशी मोर्चाबाबत चर्चा सुरू आहे. तरीही संभाजीनगर परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. कायद्याचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

- मनोजकुमार शर्मा, पोलिस अधीक्षक

मी मंत्री असताना कागलच्या निवासस्थानावर टोल, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर्स, गिरणी कामगारांनी मोर्चे काढले. बांधकाम कामगारांनी तर माझ्या उपस्थितीत घराला टाळे ठोकले होते. घरावर मोर्चा हा प्रतिकात्मक असतो. मात्र पालकमंत्र्यांनी त्याचा वेगळा अर्थ घेतला. आम्ही लोकशाही मार्गाने व शांततेत मोर्चा काढणार आहे. याप्रश्नी अटक झाली तरी शेतकऱ्यांसाठीचा लढा थांबणार नाही. .

- हसन मुश्रीफ, आमदार

भाजपचे कार्यकर्ते पालकमंत्र्याच्या घरावर मोर्चा येऊ देणार नाहीत. मंत्री पाटील यांच्या घराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर कार्यकर्ते मोर्चा अडवतील. राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही कार्यकर्ता संभाजीनगर परिसरात येऊ शकणार नाहीत याची दक्षता कार्यकर्ते घेतील. त्यासाठी हजारो कार्यकर्ते रस्त्यावर ठाण मांडतील.

- महेश जाधव, भाजप महानगर अध्यक्ष

असा असेल बंदोबस्त

२ पोलिस उपाधीक्षक

११ पोलिस निरीक्षक

१८ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक

१९० पोलिस

७० महिला

३० ट्रॅफिक पोलिस

गरज भासल्यास जलद कृती दलाची तुकडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्त्री शिकली, पण शहाणी झाली नाही’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'शिक्षण आणि शहाणपण यामध्ये आजही एक दरी आहे, आणि ती निघून जायची असेल तर शिक्षणाला मंथनाची जोड दिली पाहिजे. स्त्रीशिक्षणाचा प्रवास पाहिला तर स्त्री शिकली, पण ती शहाणी झाली नाही अशी अवस्था आहे,' या शब्दात लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. तारा भवाळकर यांनी खंत व्यक्त केली.

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या परिवर्तनवादी विचारांना केंद्रस्थानी ठेवून ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनतर्फे सावित्रीबाई फुले स्मृति विशेषांकाचे प्रकाशन डॉ. भवाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. शाहू स्मारक बहुउद्देशीय सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मेघा पानसरे होत्या.

सावित्रीबाई स्त्री शिक्षण चळवळ : प्रगतीपथ आणि सद्यस्थिती या विषयावर बोलताना डॉ. भवाळकर म्हणाल्या, 'शिक्षण म्हणजे विचाराचा उच्चार करण्याचे धैर्य येणे आणि तो विचार आचरणात आणण्याची कृती होणे. पण पदव्यांची मालिका नावापुढे लागली याचा अर्थ शिक्षित झालो असा समज होतो. सावित्रीबाई स्त्री शिक्षणाच्या चळवळीत येण्यापूर्वी महिला व्यक्त होण्यासाठी ओवी, लोकगीते यांचा वापर करत होत्या. त्यांची अभिव्यक्ती श्रमाशी निगडीत होती. मात्र गेल्या दीडशे वर्षातील स्त्री शिक्षणाची चळवळ आणि सद्यस्थिती पाहिली तर अजूनही स्त्रीला शहाणपण आलेले नाही. शिक्षणातून तिला जी समज आली आहे तिला ती चिंतनाच्या दृष्टिने तपासून पाहत नाही. परिणामी आजच्या माध्यमांमधूनही स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सिमीत आहे.'

यावेळी स्मृती विशेषांकाचे संपादक सुशील लाड, सुनेत्रा ढेरे, प्रशांत आंबी, शिवाजी माळी आदी उपस्थित होते. या विशेषांकामध्ये भवाळकर यांच्यासह मंगला सामंत, संजय पवार, विद्या बाळ, गोविंद पानसरे, रवींद्र पंढरीनाथ, संध्या नरे-पवार, अरुणा बुरडे, नीरजा, नीलम माणगावे, जयदेव डोळे, विजय चोरमारे, प्रगती बाणखेले, सुशील लाड यांचे लेख, कविता, लघुकथा, मुलाखती यांचा अंतर्भाव आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यात ‘मॅगी नूडल्स’ विक्री

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

दिल्ली येथे मॅगी नुडल्सच्या घेतलेल्या नमुन्यांमध्ये आरोग्यास अपायकारक घटक आढळून आल्यामुळे मॅगीच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. दिल्ली पाठोपाठ बिहार, केरळ आणि आता गुजरात, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मिर या राज्यांनी मॅगीच्या विक्रीला बंदी घातली आहे. मात्र, महाराष्ट्र सरकारने अजूनही कोणत्याही प्रकारची बंदी न घातल्यामुळे सातारा जिल्ह्यात 'मॅगी'ची राजरोसपणे विक्री सुरू आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील अन्न व औषध प्रशासनाने सुमारे ३२ लाख रुपयांचा मॅगी नुडल्सचा २० टनांचा साठा ताब्यात घेतला आहे. त्यातील नमुने आरोग्य प्रयोगशाळेकडे योग्य त्या तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे कोल्हापूरमध्ये मॅगीच्या विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र, राज्यात कोल्हापूर वगळता अशा प्रकारची कोठेही का कारवाई करण्यात येत नाही? असा संतप्त सवाल ग्राहकांतून विचारला जात आहे.

'गुटख्या' प्रमाणे 'मॅगी'ची होणार पुनरावृत्ती?

गुटखा शरीराला अपायकारक आहे, याची माहिती असूनही त्यातून सरकारला मोठ्या प्रमाणात कर (महसूल) मिळत असल्यामुळे त्याच्या उत्पादन व विक्रीला बंदी घालण्याचे सरकार धाडस दाखवत नव्हते. मात्र, गुटख्यापासून झालेल्या कर्करोगाचे प्रमाण बळावल्याच्या धक्कादायक घटना समोर येवू लागल्यानंतर राज्याच्या अन्न व औषध विभागाने दिलेल्या अहवालावर गंभीरपणे विचार करून सरकारने गुटखा बंदीचा निर्णय घेतला. गतवर्षीच्या जुलै महिन्यात म्हणजे तब्बल अकरा महिन्यांपूर्वी राज्य सरकारने गुटखा विक्री आणि उत्पादनाला राज्यात बंदी घातली. त्यानंतर खऱ्या अर्थाने राज्यात गुटखा बंदी झाली का? जेथे विक्री सुरू आहे, त्यावर का कारवाई केली जात नाही? हा संशोधनाचा विषय ठरला आहे. सरकारने बंदी घातल्यानंतरही गुटखा खाणाऱ्यांनी संख्या फारशी कमी झालेली नाही. तर गुटख्याचे दर आकाशाला भिडले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगली जिल्ह्यात तुफान पाऊस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

सांगली जिल्ह्यातील कडेगाव-पलूस परिसराला शुक्रवारी दुपारपासून मुसळधार पावसाने पुन्हा झोडपायला सुरुवात केली. सलग तीन तासांहून अधिक काळ पाऊस एकसारखा कोसळतच राहिला. दरम्यान, गुरुवारी रात्री जिल्ह्याच्या सर्वच भागाला वादळी पावसाने झोडपून काढले आहे. काही ठिकाणी घरांच्या भिंती कोसळल्या तर अनेक भागांत रात्रभर विजांच्या गडगडाटाने जनमानसाची झोप उडवून दिली. अवघ्या दोन तासांत मिरज तालुक्यात ४०.४ मिलीमीटर पाऊस कोसळला.

गुरुवारी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास सुरु झालेला वादळी पाऊस रात्री उशीरापर्यंत एकसारखा कोसळत राहिला. सुरुवातील धुळीचे वादळ, त्यानंतर विजांचा कडकडाट आणि त्या पाठोपाठ बदडून काढायला लागला. गारांप्रमाणे थेंबाचा मारा झेलत घर गाठताना शहरवासीयांची तारांबळ उडाली. काही क्षणात शहरातील रस्ते पाण्याखाली गेले. वीज गुल झाल्याने अनेकांना रस्त्यावर अंधाराचा आणि घरात उकाड्याशी सामना करावा लागला. हा पाऊस जिल्ह्याच्या सर्वच भागात कोसळला. सांगलीतील राणी सरस्वती कन्या शाळेच्या कुंपनाची भिंत कोसळली. ग्रामीण भागातही घरांची पडझड झाली आहे. दरम्यान, सरासरी २५.२ मिलीमीटरच्या सरासरीने जिल्ह्यात अवघ्या तीन ते चार तासांत एकून २५२ मिलीमीटर पाऊस कोसळला आहे. शुक्रवारी पुन्हा कडेगाव, जत, उमदी, पलूस या भागात जोरदार पाऊसाने हजेरी लावली आहे. सांगलीतही रात्री उशीरा पावसाला सुरुवात झाली.

कराड परिरातही पाणी-पाणी

कराडः कराड आणि परिसराला गुरुवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान वादळी पावसाने झोडपून काढले. रात्री पाऊस सुरू झाल्याने महामार्गावरील वाहतूक सावकाश सुरू होती. अनेक ठिकाणी पावसामुळे डंबकी साचली होती. ग्रामीण भागांत पडलेला पाऊस खरीप हंगामाच्या तयारीला पोषक ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंतिम यादीत पाच जण

$
0
0

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी निवड समितीने शुक्रवारी अंतिम पाच उमेदवारांची निवड केली. यादीत शिवाजी विद्यापीठातील दोघांचा समावेश आहे. गेले दोन दिवस या पदाच्या मुलाखती मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहावर झाल्या. शनिवारी सायंकाळी पाच वाजता पाच उमेदवारांच्या मुलाखती राज्यपाल सी. विद्यासागर राव घेणार आहेत. विद्यापीठातील रसायशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. एम. बी. देशमुख, जैवतंत्रज्ञान विभागाचे विभागप्रमुख डॉ. एस.पी. गोविंदवार, औरंगाबादमधील देवानंद शिंदे, भूगर्भशास्त्र विभागातील प्रा. नितिन करमळकर, सोलापूरचे डॉ. लालासाहेब देशमुख यांचा या समावेश असल्याचे समजते. शनिवारीच कुलगुरुपदासाठी नाव निश्चित होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हद्दवाढीत एमआयडीसी हवीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोकुळ शिरगाव एमआयडीसीचा समावेश नसल्याने शुक्रवारी प्रशासनाने मांडलेला हद्दवाढीचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत फेटाळण्यात आला. प्रशासनाने कारखानदार, उद्योजकांची सुपारी घेऊन एमआयडीसीला हद्दवाढीतून वगळल्याचा आरोप सदस्यांनी प्रशासनावर केला.

शहराच्या हद्दवाढीसंदर्भात शुक्रवारी महापालिकेची विशेष सभा उपमहापौर मोहन गोंजारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. तांत्रिक मुद्दा पुढे करत प्रस्ताव मागे घेता नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितल्याने नगरसेवक संतापले. प्रस्तावात त्रुटी असून, तो मागे घेतल्याखेरीज एकाही अधिकाऱ्याला सभागृहातून बाहेर न सोडण्याचा इशारा दिला. सभागृहाचे दरवाजे आतून बंद करण्यात आले. नगरसेवकांच्या आक्रमकतेपुढे प्रशासन नमले. प्रस्ताव मागे घेत, एमआयडीसीचा समावेश करून चार दिवसांत फेरप्रस्ताव सादर करण्याचे आश्वासन उपायुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिले.

हद्दवाढीच्या प्रस्तावात गोकुळ शिरगाव गावाचा समावेश होता, मात्र एमआयडीसीचा समावेश नव्हता, हे लक्षात आल्यानंतर नगरसेवक संतापले. काँग्रेस, राष्ट्रवादी, जनसुराज्य, ‌शिवसेना, भाजपच्या सर्वच नगरसेवकांनी प्रस्तावातील त्रुटीवरून प्रशासनाला धारेवर धरले.

स्थायी सभापती आदिल फरास, गटनेते राजू लाटकर, शारंगधर देशमुख, निशिकांत मेथे, भूपाल शेटे, आर. डी. पाटील, इंद्रजित सलगर, मधुकर रामाणे, सचिन खेडकर आदी सदस्यांनी गोकुळ शिरगाव एमआयडीसीला वगळण्याचे कारण काय? असा सवाल केला. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई सभागृहाला सामोरे गेले.

प्रस्तावात काय होते?

नगररचना सहायक संचालक धनंजय खोत यांनी १९ गावांचा हद्दवाढीचा प्रस्ताव सभागृहापुढे मांडला.

शहरापासून एक किलोमीटर व काही ठिकाणी दोन किलोमीटर अंतरावरील गावांचा हद्दवाढीत समावेश प्रस्तावात.

हद्दवाढीत गोकुळ शिरगाव गावचा समावेश होता; पण एमआयडीसीचा समावेश नव्हता.

विकासासाठी हद्दवाढ आवश्यक आहे. मात्र एमआयडीसीचा समावेश नसेल तर उत्पन्नात भर पडणार नाही. प्रशासन एमआयडीसीचा समावेश न करता कोल्हापूरचे नुकसान करत आहे. एमआयडीसीसह हद्दवाढ ही आमची भूमिका आहे. निव्वळ लोकसंख्येचा निकष पूर्ण करण्यासाठी मोठ्या गावांचा समावेश न करता आर्थिक उत्पन्नवाढ, शहराचे सक्षमीकरण या सर्व बाबींचा विचार करून हद्दवाढीत एमआयडीसी आवश्यक आहेत.

- शारंगधर देशमुख, गटनेता, काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूल्यांकन घटणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रस्ते विकास प्रकल्पांतर्गत आयडियल रोड बिल्डर्स कंपनीने केलेले रस्ते निकृष्ट असल्याचे फेरमूल्यांकन समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत मान्य करण्यात आले. रस्त्याच्या दर्जानुसार मूल्यांकन होणार असल्याने प्रकल्पाचे एकूण मूल्यांकन कमी होण्याचे संकेत या बैठकीतून मिळाले. तसे झाल्यास आयआरबी कंपनीला द्यावयाच्या रकमेत घट होऊ शकते.

फेरमूल्यांकन समितीची बैठक समितीचे अध्यक्ष संतोषकुमार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पुण्यात झाली. कंपनीने रस्त्यांसाठी वापरलेले काँक्रिट दर्जेदार नसल्याने अशा रस्त्यांचा मूल्यांकनात समावेश करू नये, अशी भूमिका आर्किटेक्ट अँड इंजिनीअरिंग असोसिएशनचे पदाधिकारी राजेंद्र सावंत यांनी फेरमूल्यांकन समितीच्या बैठकीत मांडली. त्यावर, अध्यक्ष संतोषकुमार यांनी समितीला प्रकल्पाचे मूल्यांकन करण्याचे अधिकार आहेत, वगळण्याचे अधिकार नाहीत. तपासणीअंती जे रिपोर्ट आले आहेत त्यानुसार मूल्यांकनाचे काम होईल. मूल्यांकनाचा अहवाल सरकारला सादर करायचा आहे. याबाबत सरकार निर्णय घेईल, असे स्पष्ट केले. कंपनीकडून करारानुसार काम झालेले नाही आणि रस्तेही निकृष्ट असल्याचे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी निदर्शनास आणून दिले.

काँक्रिट वापरून तयार केलेल्या रस्त्यांचा मूल्यांकनात समावेश करू नये. मुळातच वापरलेले काँक्रिट रस्ता तयार करण्याच्या लायकीचे नव्हते. यामुळे काही वर्षांनी हे रस्ते उकरून नव्याने करावे लागणार आहेत. जवळपास ३६ किलोमीटरचे रस्ते काँक्रिट आणि डांबरी आहेत.

- राजेंद्र सावंत, पदाधिकारी, आर्किटेक्ट अँड इंजिनीअर्स असोसिएशन, कोल्हापूर

दर्जा निकृष्ट कसा?

रस्त्यासाठी एम ४० ग्रेडचे काँक्रिट वापरणे आवश्यक

प्रत्यक्षात एम १२ ते २० ग्रेडचे काँक्रिट वापरले

प्रयोगशाळेतील तपासणीत काँक्रिट दर्जेदार नसल्याचे स्पष्ट

दृष्टिक्षेपात प्रकल्प

एकूण लांबी ४९ किलोमीटर

त्यातील दोन किलोमीटरचा रस्ता केलेला नाही

३६ किलोमीटरच्या रस्त्यासाठी काँक्रिटचा वापर

मूल्यांकनाचे टप्पे

मूळ किंमत २२० कोटी रुपये (२००८ मधील)

आयआरबीने केलेला दावा - ६०० कोटी रुपये

सरकारने नेमलेल्या समितीचे मूल्यांकन - ३२५ कोटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कराडला वळिवाने झोडपले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

कराड शहर व परिसराला शुक्रवारी रात्री उशिरा सुमारे तासभर झालेल्या जोरदार मान्सूनपूर्व वळिवाच्या पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱ्यासह दाखल झालेल्या पावसामुळे वीज पुरवठा खंडीत झाला होता. शहरातील सखल भागातील गटारे तुंबल्यामुळे रस्त्यावर पाण्याची तळी साचली होती. सलग तासभर पडलेल्या पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. पडलेला पाऊस आगामी खरीप हंगामासाठी उपयुक्त ठरणारा असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास विजेचा लखलखाट आणि ढगांचा गडगडाट करीत वादळी वाऱ्यासह दाखल झालेल्या वळीव पावसाने कराड शहरासह परिसराला जवळपास तासभर झोडपून काढले. सकाळपासून प्रचंड उष्मा निर्माण झाल्याने उकाड्याने जनता हैराण झाली होती. अशातच सायंकाळनंतर अचानक वातावरणात बदल होवून दाखल झालेल्या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला. शहर व परिसरात तासभर पडलेल्या पावसामुळे शहरातील सखल भागातील गटारे तुंबल्यामुळे रस्त्यावरून गुडघाभर पाणी वाहत होते. शहरातील पोपटभाई पेट्रोलपंपाजवळ नाला तुंबल्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुतळा काढल्यास गाठ शिवभक्तांशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रायगडावरील मेघडंबरीवरील पुतळा हटवण्यासाठी सरकारकडे पत्रव्यवहार केला आहे. महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यास गाठ शिवभक्तांशी आहे, असा इशारा युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी दिला. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे रायगड येथे आयोजित ३४२व्या शिवराज्याभिषेक महोत्सवात ते बोलत होते. या वेळी हजारो शिवभक्तांनी रायगडवर गर्दी केली होती.

शनिवारी झालेल्या सोहळ्यात बोलताना युवराज संभाजीराजे म्हणाले, 'रायगडच्या जतन-संवर्धन आणि संरक्षणाची जबाबदारी केंद्र सरकारचे पुरात्व विभाग घेत नाही. २०१४-१५ च्या आर्थिक वर्षात रायगडासाठी केवळ एक कोटी ३३ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. यापैकी ८८ लाखांचे उत्पन्न गडावर येणाऱ्या शिवभक्तांच्या तिकीटातून झाले आहे. बेबी का मकबरा वस्तुची ४४ वेळा दुरुस्ती केली आहे. शिवभक्तांचा अभिमान असलेल्या रायगडासाठी मात्र, तुटपुंजा निधी दिला जात आहे. रायगडसाठी भरघोस निधी मिळण्यासाठी जागतिक वारसास्थळांमध्ये रायगडचा समावेश करावा.'

रायगडच्या विकासासाठी पुरातत्व विभागाबरोबरच स्थानिक प्रशासनाने प्रयत्न करण्याची आवश्यकता इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी व्यक्त केली. पहाटे सहा वाजता इचलकरंजीच्या गिरीभ्रमण संघटनेच्या वतीने नगारखान्यासमोर भगवा ध्वज लावण्यात आला. या नंतर राजसदरेवर शिवशाहिरांनी पोवाडे सादर केले. राजर्षी शाहू महाराजज यांनी सुरू केलेल्या वैदीक स्कूलमधील राजपुरोहितांच्या मंत्रोच्चारात राज्याभिषेक विधी पार पडला. शिवछत्रपतींच्या उत्सव मूर्तीवर हिमालयातील बियास कुंड व सह्याद्रीच्या गडकोटांवरुन आणलेल्या जलाने अभिषेक करण्यात आला. युवराज संभाजीराजे व शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते मेघडंबरीतील शिवछत्रपतींच्या वीरासनातील मूर्तीची पूजा झाली. ३४२ सुवर्ण मुद्रांचा अभिषेक घालण्यात आला.

या वेळी आमदार पंडित पाटील, माजी आमदार माणिकराव जगताप, जिल्हाधिकारी सुमंत भांगे, जिल्हा पोलिस प्रमुख सुयज हक, प्रातांधिकारी सुषमा सातपुते, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुनील पाटील, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील, कोल्हापूरचे नगरसेवक दिगंबर फराकटे, समितीचे अध्यक्ष सागर यादव, कार्याध्यक्ष फत्तेसिंग सावंत यांच्यासह कोल्हापुरातील शिवभक्त उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासक मागणी खोडसाळपणाची

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

'बिद्री साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया न्यायालयीन प्रविष्ठ करत आमदार प्रकाश आबिटकर व सहकाऱ्यांनी कारखान्यावर आर्थिक भुर्दंड लादण्याचे काम केले आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया लांबणीवर गेली असून या कारखान्यावर प्रशासक नेमा म्हणणे खोडसाळपणाचे आहे,' अशी टीका बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. आमदार प्रकाश आबिटकर यांनी कारखाना संचालक मंडळाची मुदत संपल्याने काखान्यावर प्रशासक नेमा, अशी मागणी केली होती.

अध्यक्ष पाटील म्हणाले, 'बिद्री साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत ३१ मे २०१५ पर्यंत होती. पुढील संचालक मंडळ नियुक्तीसाठी निवडणूक नियमानुसार १२० दिवस अगोदर कारखान्याने मतदार याद्या सहकार खात्याकडे जमा केल्या आहेत. निवडणूक वेळेत व्हावी यासाठी आमचे प्रयत्न होते. मात्र विरोधी मंडळींनी सभासदत्वाचा वाद निर्माण करून निवडणूक प्रक्रिया लांबणीवर टाकण्याचे काम केले आहे. निवडणूक प्रक्रिया लांबली म्हणून कारखान्यावर प्रशासक येऊ शकत नाही.'

ते पुढे म्हणाले, 'वकिली फी बद्दल खोटी माहिती देऊन विरोधक जनतेची दिशाभूल करत आहेत. तेच विरोधक सभासद रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव घेऊन लाखो रुपये का खर्च करत आहेत. याचे उतर विरोधकांनी द्यावे. सहवीज प्रकल्पाच्या वाढीव खर्चाला हेच लोक जबाबदार आहेत. याच लोकांच्या विरोधामुळे या प्रकल्पाला विरोध झाला.' यावेळी उपाध्यक्ष प्रवीण पाटील यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.

त्यांच्या कागदपत्रांचे काय?

कारखान्यात नवीन सभासद मंजुरीसाठी कागदपत्रे बोगस असल्याचा आरोप आमदार प्रकाश आबिटकर यांनी केला आहे. त्यावर 'त्यांनी आपल्या घरातील व्यक्ती सभासद होताना अर्जासोबत दिलेले उतारे खरे आहेत का? याचे आत्मपरीक्षण करावे. मगच सामान्य सभासदांच्या सभासदत्वाविषयी बोलावे व तक्रारी कराव्यात,' असे आवाहन पाटील यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

$
0
0

कोल्हापूरः नवीन वाशी नाका येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या इमारतीमध्ये विजेचा धक्का बसल्याने एकाचा मृत्यू झाला. पंकज प्रकाश पोवार (वय २२ रा. बांबवडे ता. पलूस) असे त्याचे नाव आहे. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

कॉन्ट्रॅक्टर प्रकाश पोवार यांचा मुलगा पंकज हा बांधकामावर देखरेख करण्यासाठी बांबवडे येथून कोल्हापूरला आला होता. शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पंकजचा पाय विद्युतवाहिनीवर पडला. यामुळे पंकजला जोरदार विद्युत धक्का बसला. तो खाली कोसळला. पंकजला तात्काळ सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मुलाचा डोळ्यासमोर झालेला मृत्यू पाहून वडिलांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४ वर्षांनंतर आमचा राज्याभिषेक करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे ऊसबिल देता यावे यासाठी भाजप सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कारखान्यांना दोन हजार कोटी रुपये बिनव्याजी कर्ज मिळावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेल्या मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाला. निर्माण चौकातील मैल खड्डा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. जोरदार घोषणाबाजी, पत्रके, पोस्टर्स आणि विविध कलाकारांच्या माध्यमातून भाजप सरकारचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसने शक्तीप्रदर्शन केले. भाजप सरकारवर जोरदार टीका करत, 'चार वर्षानंतर भाजप सरकारचा पाडाव करून राष्ट्रवादीचा राज्याभिषेक करा' असे आवाहनही आमदार हसन मुश्रीफ यांनी सभास्थळी केले.

आमदार मुश्रीफ म्हणाले, 'कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनीच एफआरपीप्रमाणे रक्कम देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात साखरेचे दर २२०० रुपयांपर्यंत कमी झाल्याने कारखानदार अडचणीत आले आहेत. सुमारे एक हजार कोटींची थकबाकी आहे. सरकारने बिनव्याजी कर्ज दिले नाही तर अडचणीत आणखी भर पडेल. पूर्वी मोदी नावाचे भूत लोकांच्या मानगुटीवर बसल्यामुळे लोक सैरभैर झाले होते. आता ते सरकारच्या निर्णयानंतर भानावर आले आहेत. त्यामुळे पुढील चार वर्षात राष्ट्रवादीच्या सरकारचा राज्याभिषेक होईल यात शंका नाही. यापुढेही रेशन, संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेच्या प्रश्नांसाठी भव्य मोर्चा काढू.'

खासदार धनंजय महाडिक म्हणाले, 'केंद्र आणि राज्य सरकारने दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. सरकारच्या आधाराची गरज असताना दुर्लक्ष केले जात आहे. सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण नाही. त्यामुळे साखरेचा बफर स्टॉक केला जात नाही. त्यासाठी पुढील काळात राज्यभर मोर्चे काढावे लागतील.'

माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, 'सरकारने आता मदत केली नाही तर भविष्यात शेतीला कोणत्याही प्रकारचा अर्थपुरवठा होणार नाही. पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांमुळे हे भारताचे आहेत की परदेशी पंतप्रधान आहेत अशी शंका निर्माण झाली आहे. या मोर्चादरम्यान काहींनी जातीयवादी प्रचार करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणीही केली आहे. सरकारने दोन हजार कोटी रुपये दिले नाहीत तर राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींनी अधिवेशन चालू करू देऊ नये.'

धैर्यशील पाटील, सामाजिक कार्यकर्ते व्यंकप्पा भोसले, भैय्या घोरपडे यांच्यासह जिल्ह्यातून आलेल्या कार्यकर्त्यांची उत्सफूर्त भाषणे झाली. मोर्चात माजी खासदार निवेदिता माने, प्रदेश कार्यकारिणी सदस्य आर. के. पोवार, जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, स्थायी सभापती आदिल फरास, महेश जाधव आदी सहभागी झाले होते. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर शहराध्यक्ष राजेश लाटकर यांनी आभार मानले.

भाजपची तयारी

दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा आल्यास तो अडविण्याची तयारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली होती. मोर्चा अडविण्यासाठी भाजपचे दोनशे कार्यकर्ते चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी सज्ज होते. मात्र, पोलिसांनी मोर्चा घराच्या दिशेने जाऊच दिला नाही. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते समोरासमोरच आले नाहीत.

फलक, पोस्टर्स, कार्यकर्त्यांचीही झुंबड

राष्ट्रवादी काँग्रेसला गेली १५ वर्षे सत्तेत असल्यामुळे मोर्चा काढण्याची सवय नव्हती. मात्र, मुश्रीफ यांनी काटेकोरपणे मोर्चाचे नियोजन केले. फलक आणि पोस्टर्ससह कार्यकर्ते बोलविण्यात आले. ज्यांच्या हातात फलक नव्हते, त्यांच्यासाठी दोन गाड्या भरून फलकही तयार होते. फलकावर केंद्र आणि राज्य सरकारसह मंत्र्यांच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात आले होते. मोर्चाला आक्रमक आणि उत्साही स्वरुप देण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार तयारी केली. प्रत्येक नेत्याचे स्वागत हालकीच्या तालावर केले. ढोलच्या निनादात मोर्चा काढला. मोर्चात लक्ष वेधून घेण्यासाठी महात्मा गांधींची वेषभूषा केलेल्याच्या हाती काठीऐवजी ऊस देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पानसरे यांच्या मारेकऱ्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंदराव पानसरे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीने दोन संशयितांची आठ रेखाचित्रे आणि सीसीटीव्हीतील फोटो आणि चित्रफित प्रसारीत केली आहेत. एसआयटीने तीन महिन्यांच्या तपासानंतर आता यावर लक्ष केंद्रित केले असून, लवकरच गुन्हा उघडकीस येईल,' असा विश्वास एसआयटीचे प्रमुख संजयकुमार यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला. सीसीटीव्हीच्या दृश्यांसाठी फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट पुणे, फिल्म अर्काइव्हज, विविध चित्रपट निर्मात्यांची मदत घेण्यात आली. त्याबरोबरच मिळालेली दृश्ये ही महाराष्ट्र आणि गुजरातमधील काही तज्ज्ञ संस्थांकडूनही तपासून घेण्यात आल्या आहेत, असे संजयकुमार यांनी सांगितले.

संजयकुमार म्हणाले, 'गेल्या तीन महिन्यांत पोलिसांना मोठ्या प्रमाणावर तपशील मिळाला आहे. पानसरे दाम्पत्यावर दोन हत्यारांतून गोळीबार झाला. ही दोन्ही हत्यारे स्थानिक बनावटीची आहेत. पानसरे यांच्यावर पाठीमागून गोळीबार झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले. संशयित सकाळी ७.५७ पासून साधारणतः सकाळी ९.२२ वाजेपर्यंत सुमारे दोन तास परिसरात फिरत होते. यादरम्यान त्यांना अनेकांनी पाहिले असावे. मात्र, काहीजण तपासात मदत करीत नसल्याने ओळख पटविण्यात अडचणी येत आहेत. हल्लेखोर नंतर सुभाषनगरमार्गे पसार झाले असल्याचा निष्कर्ष सीसीटीव्हीतील दृश्यांवरून काढण्यात आला आहे.'

पोलिस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा म्हणाले, 'कागलमध्ये सापडलेल्या मोटरसायकलींचीही तपासणी करण्यात आली. ही मोटरसायकल चोरीची होती. ती गेल्या पाच महिन्यांत सात हजार किलोमीटर अंतर फिरली. या गाडीचे शॉकऑब्झर आणि सीट ही विशिष्ट बनावटीची असल्याचेही आढळून आले आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फरार दरोडेखोर साताऱ्यात जेरबंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

तासगाव (जि. सांगली) पोलिस ठाण्याचा तुरुंग फोडून फरार झालेल्या तीन दरोडेखोरांपैकी दोन जणांना सातारा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या विशेष पथकाने शिरवळ (ता. खंडाळा) येथील बसस्थानकाजवळ रंगेहाथ पकडले.

तासगाव पोलिस ठाण्याचा तुरुंग फोडून तीन दरोडेखोर फरार झाले होते. यामधील कुमार दादू पवार (वय २३ रा. पुसेगाव, ता. खटाव) या आरोपीला एलसीबीच्या पथकाने गुरुवारी पहाटे चार वाजता पोवई नाका येथे पकडले होते. तर त्याचे अन्य दोन साथीदार फरार होते. मिळालेल्या माहितीच्या अधारे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या सूचनेप्रमाणे एलसीबीचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलिस निरीक्षक कुमार घाडगे यांच्या विशेष पथकाने शनिवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील शिरवळ येथे सापळा रचून राजेंद्र प्रेमनाथ जाधव (वय २३), राहुल लक्ष्मण माने (वय १९, दोघे रा. पुसेगाव) यांना रंगेहाथ पकडले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. दरम्यान, तासगाव पोलिस ठाण्याचा तुरुंग फोडून फरार झालेल्या तीन आरोपींना अटक केल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाळीस टन मॅगी गोदामात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

देशभरात मॅगी नूडल्सवरून उठलेल्या गदारोळामुळे कोल्हापुरातील दररोज विकली जाणारी सुमारे चाळीस टन मॅगी गोडावूनमध्ये गेली आहे. घरात असलेल्या मॅगी पाकिटांचा वापर करायचा की नाही याबाबत मात्र संभ्रमाची स्थिती आहे. किरकोळ दुकानदारांच्या गल्ल्यात रोज किमान हजार रुपये देणाऱ्या मॅगीची मागणी पूर्ण थांबल्याचे चित्र कोल्हापुरात गेल्या आठवड्यात दिसत आहे. मॅगीचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले असून, त्याचा अहवाल काय येतो याची वाट पाहण्यापेक्षा आरोग्याला घातक असल्याचा आरोप झालेले मॅगी नूडल्स नकोच असा निष्कर्ष घरोघरी काढण्यात आला आहे.

इन्स्टंड फूडमध्ये सर्वाधिक मागणी असलेल्या मॅगी नूडल्सभोवती सध्या वादाचे मोहळ उठले आहे. लहान मुलांच्या आरोग्याबाबत दक्ष असलेल्या पालकांनी या वादाचा धसका घेत मॅगीला स्वयंपाकघरातून हद्दपार केले आहे. एकीकडे घरातून मॅगीवर बंदी आणण्यावर एकमत होत असतानाच शहरातील मॉल्स आणि सुपरशॉपी, किराणा दुकानांमधील मॅगीच्या विक्रीवरही परिणाम झाला आहे. दररोज सरासरी मिनी मॅगी पाकिटांसह फॅमिली पॅकपर्यंत किमान १०० पाकिटांची विक्री होत होती, तर मॉलमधून मॅगी विक्री होण्याचे प्रमाण दिवसाला किमान एक हजार पाकिटे इतके आहे. अन्न व औषध प्रशासनाने कोल्हापुरातील वितरकांकडून घेतलेल्या माहितीच्या आधारे, मॅगीची पाकिटे दर महिन्याला विक्री होण्याचे प्रमाण ४० टन आहे.



दुकानदारांकडूनही 'मॅगी'वर चाप

ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी मॅगीची पाकिटे दुकांनाच्या दर्शनी भागात ठेवण्यात येत होती. मात्र, गेल्या आठवड्यात मॅगी दर्शनीभागातून आत गेली आहे. दुकानदारांकडून स्वेच्छेने मॅगीवर चाप लावण्यात येत असल्याची माहिती किरकोळ विक्रेते मधुकर कोठावळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक गाव सरपंचाविना

$
0
0

अजय जाधव, जयसिंगपूर

शिरोळ तालुक्यातील मजरेवाडीत तब्बल पाच वर्षापासून सरपंचपद रिक्त आहे. सरपंचच नसल्याने गावचा कारभार उपसरपंच चालवित आहेत. येथील सरपंचपद मागासवर्गीयासाठी आरक्षित आहे, मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी सदरचे आरक्षण प्रभागात न टाकल्याने या समाजाला आरक्षणापासून वंचित रहावे लागले आहे.

मजरेवाडी हे नृसिंहवाडी तीर्थक्षेत्रापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावरचे अडीच हजार लोकवस्तीचे गाव. येथील ग्रामपंचायतीमध्ये नऊ सदस्य आहेत. सन २०११ साली सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत झाली आणि मजरेवाडीचे सरपंचपद मागासवर्गीयांसाठी आरक्षित झाले. आरक्षण पडल्याने या समाजातील इच्छुकांच्या आकांक्षांना धुमारे फुटले. मजरेवाडीत अन्य समाजाच्या तुलनेत जैन समाजबांधवांची संख्या अधिक आहे. राजकारणापासून अलिप्त असणाऱ्या मागासवर्गीयांचा गावच्या कारभारात सहभाग असावा म्हणून सरपंचपद आरक्षित झाले. मात्र गावातील नऊ प्रभागांच्या आरक्षणानंतर नवीनच समस्या निर्माण झाली.

मजरेवाडीचे राजकारण स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादीचे राजेंद्र पाटील यांचा गट तसेच काँग्रेसमध्ये विभागले आहे. सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी हालचाली गतीमान झाल्या. सत्ताधारी व विरोधी गटाकडून सरपंचपदाच्या उमेदवाराची चाचपणी सुरू झाली. मजरेवाडीत प्रभाग क्रमांक दोनमध्ये मागासवर्गीयांची संख्या अधिक आहे. सरपंचपद मागासवर्गीयांसाठी आरक्षित असल्याने या समाजातून सदस्य निवडूण येणे गरजेचे होते. प्रभागांचे आरक्षण निश्चित करताना निवडणूक अधिकाऱ्यांनी याची दक्षता घ्यायला हवी होती. मात्र आरक्षणात मागासवर्गीयांसाठी जागा आरक्षित ठेवण्यात आली नाही. परिणामी समाजातील इच्छकांची मोठी कोंडी झाली.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना व काँग्रेसने हातमिळवणी करून मोर्चेबांधणी केली. मात्र या आघाडीला मागासवर्गीय उमेदवारच मिळाला नाही. सरपंचपदाची गरज ओळखून गावातील यड्रावकर गटाचे नेते लक्ष्मण चौगुले यांनी खुल्या प्रभागातून मागासवर्गीय उमेदवाराला संधी दिली. मात्र या उमेदवाराचा पराभव झाला. निवडून आलेल्या नऊ सदस्यांमध्ये मागासवर्गीय समाजाचा सदस्य नसल्याने सरपंचपदी निवड कोणाची करायची असा प्रश्न सत्ताधाऱ्यांसमोर निर्माण झाला.

गेल्या पाच वर्षापासून येथील सरपंचपद रिक्त आहे. उपसरपंच गावचा कारभार चालवित आहेत. परिणामी उपसरपंच पदाला महत्व आले आहे. सत्ताधारी आघाडीने उपसरपंचपदावर संधी देण्यासाठी अंतर्गत समझोता केला आहे. सरपंचपद आरक्षित असूनही निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे मागासवर्गीयांना या पदापासून वंचित रहावे लागले आहे.

नवे आरक्षण लागू

२६ मे रोजी शिरोळ येथील महसूल भवनमध्ये सरपंचपदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. आता मजरेवाडीचे सरपंचपद महिलांसाठी आरक्षित झाले आहे. सरपंचपदाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी हालचाली गतीमान झाल्या असून मोर्चेबांधणी सुरू आहे.

'उपेक्षित घटकांना संधी मिळावी यासाठी मागासवर्गीयांना आरक्षण देण्यात आले. मात्र प्रभाग आरक्षणातील त्रुटीमुळे आरक्षणाचा मुख्य उद्देश बाजूला पडला आहे. मागासवर्गीयांसाठी आरक्षण न टाकल्याने अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र लोकसंख्येनुसार आरक्षण टाकण्यात येत असून यामध्ये बदल करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.

-प्रकाश खुरपे, सदस्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता दहा जूनचा वायदा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ऊसाच्या 'एफआरपी'चा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारने साखर कारखान्यांना जाहीर केलेले दोन हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज तातडीने द्यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी हजारो कार्यकर्त्यांच्या सहभागाने शक्तीप्रदर्शन केले. पोलिसांनी दक्षता घेत संभाजीनगर- निर्माण चौक परिसरातील मैलखड्ड्यानजीक मोर्चा अडविल्याने सहकार तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घराकडे जाण्याचा हट्ट सोडून देत राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या भूमिकेपासून यू टर्न घ्यावा लागला. त्यानंतर हॉकी स्टेडियमच्या हॉलमध्ये झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ आणि सहकामंत्री पाटील यांच्या चर्चेत मंत्रिमंडळाच्या १० जून रोजी होणाऱ्या बैठकीत ही रक्कम कशी द्यायची, याबाबत निर्णय घेऊ असे आश्वासन मंत्र्यांकडून मिळाल्याने मोर्चा विसर्जित करण्यात आला.

शनिवारी दुपारी बारा वाजता मैल खड्डा परिसरात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत सभा घेतली. सभेनंतर निघालेल्या मोर्चाला पोलिसांनी तेथून ५० मीटर अंतरावरच अडवून यू टर्न घेण्यास भाग पाडले. सहकारमंत्री पाटील यांच्या घराकडे हा मोर्चा जाण्याऐवजी पोलिसांनी हॉकी स्टेडियममध्ये आमदार मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अन्य नेत्यांशी मंत्री पाटील यांची भेट घडवून आणली. याबाबत १० जून रोजी तोडगा काढण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले.

मंत्री पाटील म्हणाले, 'दोन हजार कोटी रुपये कसे द्यायचे याबाबत अनेक पर्याय आहेत. थेट बँकांना पैसे द्यायचे, शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करायचे, त्याचप्रमाणे बफर स्टॉक केला तर साखरेच्या किमतीत काय फरक पडेल का? याचाही विचार सुरू आहे. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सरकार निर्णय जाहीर करेल. सरकारच्या कर्जानंतर कारखान्यांनी एफआरपी दिली नाही, तर कायदेशीर कारवाई करू.'

आमदार मुश्रीफ म्हणाले, 'सहकारमंत्र्यांच्या आश्वासनाबाबत १० जूनची वाट पाहू. मात्र, स्थिती अशीच राहिली तर ३० जूननंतर पुन्हा तीव्र आंदोलन करू.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images