Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

तुरुंग फोडून तीन दरोडेखोर पळाले

0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

तासगाव पोलिस ठाण्यासमोरील तुरुंग फोडून तीन सराईत दरोडेखोरांनी सोमवारी पहाटे पलायन केल्याने पोलिस दलाला हादरा बसला आहे. विजांचा कडकडाट, जोरदार वादळी पाऊस सुरू असतानाच दरोडेखोरांनी ब्रिटिशकालीन इमारतीच्या लाकडी छताच्या फळ्या फोडून, पत्रा वाकवून, कौले काढून धूम ठोकली आहे. वादळी पावसाने वीजपुरवठा खंडीत झाल्याची संधी साधून दरोडेखोरांनी पलायन केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. दरम्यान, त्यावेळी बंदोबस्तावर असलेल्या दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आटपाडी परिसरात गस्त घालताना दरोड्याच्या तयारीत असलेल्या तीन जणांना पंधरा दिवसांपूर्वी अटक केली होती. त्यामध्ये कुमार बधू पवार (वय २३), राहुल लक्ष्मण माने (वय १९), राजेंद्र प्रेमनाथ जाधव (वय २३, सर्वजण रा. पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा) आदींचा समावेश होता. १६ मे रोजी तासगाव तालुक्यातील किंदरवाडी येथील शिवाजी सूर्यवंशी यांच्याकडे पिण्यासाठी पाणी मागण्याचा बहाणा करून त्यांना चाकूचा धाक दाखवून चोरी करण्याचा प्रकार घडला होता. आटपाडीत पकडलेले दरोडेखोरांनीच आपल्याला धमकावल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितल्याने तासगाव पोलिसांनी त्या तिघांना ताब्यात घेतले होते. कोर्टाने एक जूनपर्यंत पोलिस कोठडी दिल्याने ते तासगावच्या तुरुंगात होते.

रविवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास वादळी पावसाचा तडाखा बसून वीज गायब झाली. त्याचवेळी वीजांचा कडकडाट सुरू होता. हीच संधी साधून दरोडेखोरांनी मजबूत आणि उंच अशा तुरुंगाच्या छताच्या फळ्या फोडून काढल्या. त्यानंतर वरील कौलाच्या खाली असलेला पत्रा वाकवून कौले काढून अंधारात केव्हा धूम ठोकली, हे बंदोबस्तावरील पोलिसांना समजलेच नाही.

सोमवारी पहाटे दरोडेखोरांनी तुरुंग फोडून पलायन केल्याचे समजाताच पोलिस अधीक्षक सुनिल फुलारी, अप्पर पोलिस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील, प्रभारी पोलिस उपाधीक्षक अभिजित पाटील यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी तासगावकडे धाव घेतली. दरम्यान या प्रकरणी दरोडेखोरांनी पलायन केले, त्यावेळी बंदोबस्तावर तैनात असलेले हवालदार कदम आणि पोलिस शिपाई सुकुमार जाधव यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक पाटील यांनी दिली.

संधीचा फायदा घेतला

तासगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रमेश बनकर हे रविवारी सेवानिवृत्त झाल्याने त्यांना निरोप देण्याचा कार्यक्रमही रात्री उशीरापर्यंत सुरू होता. याही संधीचा फायदा दरोडेखोरांनी घेतला असावा, अशी चर्चा आहे. यापूर्वीही एक कैदी तुरुंगाच्या शौचालयाच्या बाजूने पसार झाला होता. परंतु, थेट तुरुंग फोडून पोलिसांच्या हातावर तुरी देवून एकाचवेळी तीन दरोडेखोरांनी पलायन केल्याची ही तासगावातील पहिलीच घटना आहे. या ठिकाणी पूर्वी न्यायालयीन कोठडीतील कैदी ठेवले जात होते. पण, अलिकडे याचा वापर तासगाव पोलिस कोठडीसाठी करत आहेत. इतका मजबूत आणि उंच छताचा तुरुंग फोडला गेल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘शाळा’प्रकरणी झेडपी प्रशासन सुस्त

0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

मिरज तालुक्यातील इनामधामणी येथील ग्रामपंचायतीच्या जागेत असलेली मराठी मुलींची शाळा आणि अंगणवाडी भरत असलेली इमारत पाडल्याप्रकरणी दुसऱ्या दिवशीही गुन्हा दाखल झाला नव्हता. पोलिसांनी मात्र, स्वतःहून संबधित घटनेची नोंद घेऊन संबधित जेसीबी जप्त करून चालकाचा जबाब नोंदविला आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ यांनी संबधित घटनेची प्राथमिक माहिती घेऊन ग्रामसेवकांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचे पत्रकारांना सांगितले.

इनामधामणी येथे सातवीपर्यंत मुलींची शाळा आणि त्या लगत असलेल्या सरकारी खोल्यांमध्ये अंगणवाडी भरते. अंगणवाडीची खोलीच रविवारी जेसीबीने जमीनदोस्त करताच गावकरी आक्रमक झाले. त्यावेळी एक गाव पुढारी पुढे येवून आम्ही त्या ठिकाणी नवीन इमारत बांधणार असल्याचे सांगू लागला. गावकऱ्यांनी त्याला दाद न देता जेसीबीसह चालक प्रशांत भूपाल धुमाळे (मिरज) याला सांगली ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले. रविवारी रात्रीपर्यंत या घटनेबाबत तक्रार देण्यासाठी कोणीही सरकारी व्यक्ती पोलिस ठाण्याकडे फिरकली नाही. मग, पोलिसांनी घटनास्थळावरील परिस्थितीची पाहणी करून रात्री सव्वानऊ वाजता घटनाक्रमाची नोंद पोलिस डायरीला केली. संबधित जागेवरील बांधकाम पाडून ती स्वच्छ करण्याबाबत कंत्राटदार संजय खराडे यांनी सांगितल्याचा दावा चालक धुमाळे करत आहे. तशीच नोंद घेऊन कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या घटनेबाबत उपमुख्यकार्यकारी अधिकारी आडसूळ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 'इनामधामणीच्या ग्रामसेवकांना संबधित घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे. सर्कल अधिकाऱ्यांना घटनास्थळाचा अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. माहिती एकत्रित करून गुन्हा दाखल करतील.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संचालकांचे कायद्यावर बोट

0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गेल्या काही वर्षातील कारभावरून सुरू झालेल्या चौकशींचा धसका नव्या संचालक मंडळाने घेतल्याचे चित्र सोमवारी नूतन संचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीत प्रकर्षाने जाणवले. यापुढे काहीही झाले तरी बँकेच्या हिताचा विचार करून व कायदेशीर सल्ला घेऊनच सर्व निर्णय घेण्याचा निर्धार संचालक मंडळाने केला. त्यामुळे संचालक मंडळ बैठकीत तर सोमवारी 'हातावर घडी कायद्यावर बोट,' असेच चित्र समोर आले.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक काल बँकेच्या राजारामबापू पाटील सभागृहात झाली. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील होते. बैठकीस उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, मोहनराव कदम, विलासराव शिंदे, खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर, विशाल पाटील यांच्यासह सर्व संचालक, कार्यकारी संचालक चोथे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. बैठकीत महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर जिल्हा बँकेचा प्रतिनिधी पाठविण्यावर चर्चा झाली. माजी आमदार मानसिंग नाईक यांची राज्य सहकारी बँकेसाठी जिल्हा बँक प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. बँक असोसिएशनवर प्रा. सिकंदर जमादार यांची निवड करण्यात आली. या शिवाय बँकेच्या दैनंदिन कामकाजाच्या सोईसाठी विविध चौदा समित्या गठीत करण्याबाबत चर्चा करण्यात आली. उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या ऑडीट समितीसह इतर समित्यांचा यामध्ये समावेश आहे. या सर्व समित्यांमध्ये सर्वांचा सहभाग करून घेऊन समित्यांची घोषणा करण्याचे अधिकार सर्वानुमते अध्यक्ष पाटील यांना देण्यात आले.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्याच्या विषयावर चर्चा झाली. मात्र, यासाठी गडबड न करता कायदेशीर सल्ला घेऊनच निर्णय घेण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा बँकेची सेवा अधिक गतीमान व अत्याधुनिक करण्यात येणार आहे. स्पर्धक बँकांच्या एक पाऊल पुढे सेवा देण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन अध्यक्ष दिलीप पाटील यांनी संचालक मंडळास दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंचनासाठी कर्जरोखे

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

'राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ८० हजार कोटींची गरज आहे. अर्थसंकल्पातून फक्त ७ हजार कोटी रुपये मिळतात. त्यामुळे हा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी भाजप सरकारने कर्ज रोखे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. एक रकमी ३० ते ४० हजार कोटी रुपये उभे करून सिंचनाचा प्रश्न कायमचा सोडविण्याचा निर्णय घेतला आहे,' अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
मोहोळ तालुक्याला वरदान ठरणाऱ्या आष्टी उपसा सिंचन योजनेचे उद्घाटन सोमवारी महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. योजनेमुळे दुष्काळी २७ हजार एकर क्षेत्राला पाणी देत येणार आहे.

'सिंचन घोटाळ्याची चौकशी अतिशय वेगाने सुरू आहे. एसीबीला मागेल ती कागदपत्रे, मनुष्यबळ आणि अधिकारी सरकार उपलब्ध करून देत असल्याने तपासाची गती वाढली आहे. सध्या कोकणातील १२ आणि विदर्भातील २ प्रकल्पांची चौकशी सुरू आहे. यात दोषी आढळलेला अधिकारी आणि पदाधिकारी कितीही मोठा असला तरी त्याला सोडणार नाही. कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. भाजप सरकारने नुकत्याच झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत एक क्रांतिकारक निर्णय घेतला असून, आता यापुढे बदल्या आणि टेंडरची कामे मंत्रालयातून काढून खाली देण्यात आली आहेत. यामुळे भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे. गेल्या १० ते १५ वर्षांत हे सर्व अधिकार मंत्रालयात आणल्याने अनेक टेबले फिरताना मोठा भ्रष्टाचार होते,' असेही महाजन म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुढच्या गळिताची ‘फिल्डिंग’

0
0

शांताराम पाटील, गारगोटी

गेल्या गळीत हंगामात वाहनमालकांना परजिल्ह्यातील अनेक टोळ्यांनी लाखोला गंडा घातल्याने वाहनमालक पुढील हंगामासाठी स्थानिक टोळ्या करण्याला प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. या टोळ्यांची बांधणी करण्यासाठी पावसाळ्याच्या तोंडावर अॅडव्हान्स म्हणून हजारो रुपये स्थानिक कामगारांना दिले जात आहेत. शेतकरीही आपल्या उसाची तोड लवकर करावी या बोलीवर वाहन मालकाकडून अॅडव्हान्स घेत आहेत. या वाहनमालक आणि शेतकऱ्यांच्या 'फिल्डिंग'मुळे वाहनमालकाच्या पैशाला सुरक्षा मिळणार आहे. शेतकऱ्याचा ऊसही वेळेत गाळप होणार आहे.

जिल्ह्यात १७ साखर कारखाने आहेत. प्रत्येक साखर कारखान्याला सरासरी १५० ते ३०० वाहने वाहतुकीसाठी असतात. या वाहनांवर ऊसतोड करण्यासाठी बीड, उस्मानाबाद, नगर, विदर्भ आदी भागातून मोठ्या प्रमाणात कामगार येतात. त्यांना साखर कारखान्यांचा हंगाम संपताच मे, जूनमध्ये पुढील हंगामासाठी किमान चार ते पाच लाख रुपये अॅडव्हान्स म्हणून द्यावे लागतात, टोळी निश्चित करावी लागते. एकटा मुकादम पैसे घेऊन टोळी पोहचवण्याची जबाबदारी घेतो. अपवाद वगळता इतका मोठा व्यवहार हा केवळ विश्वासावर केला जातो. मागील हंगामात पैसे घेतलेले अनेक कामगार तोडणीसाठी आलेच नाहीत. यामुळे अनेकांना लाखोंचा फटका बसला. अनेक मालकांना मारहाण झाली तर अनेकांवर या कामगार लोकांनी खोट्या केसेस दाखल केल्या. त्यामुळे मागील वर्षीचा अनुभव घेऊन अनेक वाहनमालक स्थानिक टोळ्या करताना दिसत आहेत. यासाठी प्रत्येक कामगाराला अॅडव्हान्सपोटी हजारो रुपये देत आहेत.

हे पैसे घेणारे कामगारही तुमचे वाहन कोणत्याही कारखान्याला लावा मात्र सुरुवातीची तोड ही गावातून झाली पाहिजे. आपला ऊस पहिला तोडला पाहिजे या अटीवर अडव्हांस घेताना दिसत आहेत. शेतकऱ्याला उस लागण करणे सोपे झाले आहे. मात्र कारखान्यांना ऊस पाठविताना कसरत करावी लागत आहे.

गेल्या वर्षी दहा टनासाठी आठ हजार रुपये खर्च करावे लागले. यासाठी चीटबॉयपासून तोडणी मुकादमापर्यंत अनेकांच्या पाया पडावे लागले. अनेकदा टोळी शेतात आली आणि परत गेली हा अनुभवत पाहता स्वतःचा उस पाठविण्यासाठी कामगार म्हणून जाण्याचे ठरवले. आपल्या उसाला पहिल्यांदा तोड या अटीवर अॅडव्हान्स घेतली.

- यशवंत पाटील, कामगार

गेल्या वर्षी लाखोंचा फटका वाहनमालकांना सहन करावा लागला. यंदा ज्या वाहनांच्या परजिल्ह्यातील पारंपरिक टोळ्या आहेत त्यांनीच या टोळ्यांना पैसे देण्याचे धाडस केले आहे. अनेकांनी स्थानिक टोळ्यांनाच प्राधान्य दिले आहे. यंदाच्या हंगामात स्थानिक टोळ्यांची संख्या वाढलेली दिसेल.

- संतोष पाटील, वाहन मालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूसंपादनविरोधात तीव्र लढा हवा

0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

'भूमिसंपादन कायदा देशाच्या विकासासाठी नाही. तो बड्या भांडवलदारांच्या सट्टेबाजीला प्रोत्साहन देणारा आहे. त्याविरोधात लढण्यास हयगय झाली तर भारतीय शेतकऱ्यांचे आणि शेतीशी निगडीत सर्व व्यवस्था साफ नष्ट होण्याचा धोका आहे. आपल्या मागच्या पिढीने स्वराज्य मिळविण्यासाठी प्राणाची आहुती दिली. आता आपण ते स्वराज्य सांभाळण्यासाठी प्राणाची बाजी लावली पाहिजे. या भूमिकेतून या कायद्याविरोधात रान उठविले पाहिजे,' असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत आणि समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. डॉ. एन.डी. पाटील यांनी केले. समाजवादी प्रबोधिनीच्यावतीने 'भूमी अधिग्रहण अध्यादेश,' या विषयावरील चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. चर्चासत्रात प्राचार्य आनंद मेणसे आणि प्रा. डॉ. जे.एम. पाटील यांचे बीजभाषण झाले. प्राचार्य आनंद मेणसे यांनी या कायद्याचा गेल्या १२१वर्षाचा इतिहास मांडला. त्यात वेळोवेळी केलेले बदल आणि त्याचे झालेले दुष्परिणाम सविस्तरपणे स्पष्ट केले. जंगल, पाणी, खनिजसंपत्ती लुटण्यासाठी भांडवलदारांना मदत करणे, निवडणुकीसाठी पैसा उपलब्ध करून दिलेल्या बड्या मंडळींच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करणे आणि काळा पैसा पांढरा करणाऱ्यांना तशी संधी उपलब्ध करून देणे ही सरकारची या अध्यादेशामागची भूमिका आहे, असे त्यांनी ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. जे.एफ. पाटील यांनी सरकार राज्यसभेचे अधिवेशन जाणीवपूर्वक गुंडाळून लोकसभेत याबाबतचा अध्यादेश का काढते याची कारणमीमांसा करत अध्यादेशांची तुलनात्मक मांडणी केली. प्रसाद कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. चर्चेत शशांक बावचकर, जयकुमार कोले, राहुल खंजिरे आदिंनी सहभाग घेतला. प्रा. टी. एस. पाटील यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाऊक निवृत्तींमुळे ताण

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सरकारी, निमसरकारी कार्यालयातील कार्यरत कर्मचाऱ्यांवर ३१ मे रोजी अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने ताण वाढणार आहे. सरकारी कर्मचारी भरती बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांनाच गाडा हाकावा लागणार आहे.

दरवर्षी ३१ मार्च, ३१ मे आणि ३१ डिसेंबर या दिवशी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असते. स्वातंत्र्यानंकप आणि महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर सरकारी व निमसरकारी कार्यालयात भरती प्रक्रिया झाली होती. पूर्वी भरतीतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना एक जानेवारी, एक जून व एक एप्रिल या तारखांना सेवेत सामावून घेतले जात असे. त्यामुळे निवृत्ती होणारे बहुतांशी ३१ मार्च, ३१ मे व ३१ डिसेंबर या तारखांना निवृत्त होतात. रविवारी सरकारी व निमसरकारी कार्यालयात अनेक कर्मचारी निवृत्त झाले. त्यामुळे ३० मे रोजी कर्मचाऱ्यांना निरोप देण्यात आला.

राज्य सरकारने प्रशासकीय खर्च कमी करण्यासाठी नोकरभरती प्रक्रिया बंद केली आहे. फक्त अनुकंपा तत्त्वावरील भरती सुरू आहे. ज्या संस्थांमध्ये प्रशासकीय खर्च ३५ टक्क्यांच्यापुढे आहे, त्याठिकाणी नोकरभरती बंद झाली आहे. नोकरभरती बंद झाल्यामुळे सध्याच्या कर्मचाऱ्यांवर ताण पडत आहे. संगणकीकरणामुळे काम सोपे झाले आहे, असा दावा केला जात असला तरी वाढती लोकसंख्या, नवे कायदे व नियम, सुविधांमुळे कामाचे प्रमाण वाढल्याचा दावा कर्मचारी संघटनांकडून केला जातो.

महसुल खात्यातून १६ निवृत्त

दरम्यान, जिल्ह्यात महसल विभागातून १६ जण निवृत्त झाले. त्यामध्ये तीन नायब तहसिलदार, सहा अव्वल कारकून, तीन मंडल अधिकारी व चार शिपायांचा निरोप समारंभ झाला. रविवारी सुटी असल्याने निवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यालयात निरोप समारंभाचा कार्यक्रम झाला.

पोलिस खात्यातील ३५ जण निवृत्त

दरम्यान, जयसिंगपूरचे पोलिस उपाधीक्षक प्रकाश घाटगे, शाहूपुरीचे निरीक्षक के. ए. महाडिक यांच्यासह जिल्हा पोलिस दलातील ३५ जण निवृत्त झाले. २४ सहायक फौजदार, सात हवालदार आणि दोन पोलिस नाईक निवृत्त झाले. पोलिस प्रशासनाने त्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला.

महावितरणचे ११९ जण निवृत्त

महावितरण कार्यालयात एकाच दिवशी ११९ कर्मचारी निवृत्त झाले. यात वरिष्ठ अधिकारी ते कर्मचाऱ्यांपर्यंतच्या लोकांचा समावेश आहे. वर्ग १चे एक अधिकारी, वर्ग २मधील ६७ अधिकारी आणि वर्ग तीनमधील ५० अधिकारी यांचा यात समावेश आहे. गेली २५ ते ३० वर्षे या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी महावितरणमध्ये विविध ठिकाणी सेवा बजावली आहे. मुख्य कंपनी ते कंपनीचे विभाजन असा प्रवास या कर्मचाऱ्यांनी पाहिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रॅक ओलांडण्यास बंदीच हवी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रेल्वे स्टेशनच्या एक नंबर फाटकाजवळ अत्यंत आवश्यक असलेल्या पादचारी पुलाच्या उभारणीकडे रेल्वे प्रशासनाबरोबरच स्थानिक लोकप्रतिनिधींकडून पुर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. स्टँडवरुन शाहूपुरी, राजारामपुरीकडे जाण्यासाठी हा कमी अंतराचा मार्ग असल्याने दररोज हजारोंच्या संख्येने नागरिक तिथून ये-जा करत असतात. त्यांच्यावर रेल्वे प्रशासन पूर्ण बंदीही घालत नसल्याने वारंवार जीवघेणे अपघात होत आहेत.

स्टेशनजवळील एक नंबर फाटकातून बऱ्याच वर्षांपासून सातत्याने नागरिक जातात. तिथे फाटक बंद झाल्यानंतरही ही सवय कायम आहे. यासाठी तिथून एक पादचारी पूल उभा केल्यास नागरिकांचा धोका संपणार होता. त्यासाठी प्रथम पूल की भूयारी मार्ग यावर काथ्याकुट झाला. त्यानंतर महापालिकेने त्यामध्ये सहभाग घेण्यावरुन, रेल्वेच्या परवानगीवरुन किमान पाच वर्षे हा प्रकल्प लोंबकळत पडला आहे. आमदार फंडातून काही निधी द्यायचा यावरही चर्चा झाली. मात्र या प्रकल्पासाठी कुणी नेतृत्व करत नसल्याने या प्रश्नाचा त्या-त्या प्रसंगावेळी ताकतुंबा होत आहे. यामध्ये प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून फारसे स्वारस्य दाखवले जात नसल्याचे चित्र आहे. मात्र अपघातांची संख्या वाढतच चाली आहे.

भूयारी मार्गासाठी अडचणी असल्या तरी पुलासाठी काहीच अडचणी नाहीत. हा मार्ग नागरिकांच्या सोईसाठी असल्याने महापालिकेकडून हा प्रकल्प उभा करता येऊ शकतो. त्यासाठी रेल्वे प्रशासनाची मात्र परवानगी आवश्यक आहे. या प्रकल्पात लोकप्रतिनिधींनी अथवा महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी, नगरसेवकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. आतापर्यंत केवळ चर्चाच केली जात

असली तरी रेल्वे प्रशासनही येथील ये जा करण्यावर पूर्णपणे बंदी घालण्याची आवश्यकता आहे. अनेक विक्रेते तर रेल्वेच्या हद्दीमध्ये येऊन व्यवसाय करत असल्याचे ​चित्र आहे. याबाबत रेल्वे प्रशासन काहीच कारवाई करताना दिसत नाही. यासंदर्भात, रेल्वेच्या विभागीय सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी म्हणाले, याप्रश्नी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन प्रकल्प मार्गी लावावा. तोपर्यंत हा मार्ग बंद करावा. नागरिकांना थोडाफार त्रास होईल. मात्र जीव गमावण्यापेक्षा त्रास बरा असेच म्हणण्याची वेळ आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सुधारित वेतनश्रेणी द्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

निलंबित केलेल्या ग्रामसेवकांना पुन्हा सेवेत घ्या, चोवीस वर्षे सेवा झालेल्या ग्रामसेवकांना सुधारीत वेतनश्रेणी लागू करा, ग्रेड वेतनश्रेणीचा अवलंब करा, आदी मागण्यांसाठी राज्य ग्रामसेवक युनियनच्या जिल्हा शाखेच्यावतीने जिल्ह्यात काम बंद आंदोलन सुरू केले आहे. तालुक्यातील प्रत्येक पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. सातारा, पणे येथे ग्रेड वेतनश्रेणी लागू झाली असताना सीईओ अविनाश सुभेदार वेतनश्रेणी अडवून ठेवल्याचा आरोपही पदाधिकाऱ्यांकडून केला आहे.

कामातील अनियमिततेमुळे अनेक ग्रामसेवकांना निलंबित केले आहे. सरकारच्या नियमानुसार ज्या ग्रामसेवकांना निलंबित करुन तीन महिन्याचा कालावधी झाला आहे, अशा कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याची तरतूद आहे. मात्र निलंबित कर्मचाऱ्यांना एक वर्षापासून सेवेत घेतलेले नाही. ज्या ग्रामसेवकांची सेवा बारा किंवा चोवीस वर्षे पूर्ण झाली आहे, अशा ग्रामसेवकांना सुधारित वेतनश्रेणी लागू केलेली

नाही. ही वेतनश्रेणी त्वरित लागू करावी, अन्यथा यापुढे ग्रामसेवक काम सुरु करणार नाहीत.

सरकारच्या सुधारित अध्यादेशानुसार २८०० ते ३५०० ग्रेड वेतनश्रेणी लागू करण्याचा निर्णय झाला आहे. अध्यादेशाची अमंलबाजवणी सातारा व पुणे येथे सुरू झाली असताना कोल्हापूरातील ग्रामसेवकांना मात्र अद्याप ग्रेड वेतनश्रेणी लागू झालेली नाही. सरकार निर्णय होवूनसुद्धा सीईओ सुभेदार यांनी वेतनश्रेणी रोखून धरल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

याबाबत ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन मार्च २०१५ मध्ये दिले होते. मात्र दोन महिन्यांतरही याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. ज्यो पर्यंत ग्रामसेवकांचे प्रश्न निकालात निघत नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन राहिल असा इशारा दिला आहे. आंदोलनात जिल्हाध्यक्ष एस. जी. मोहिते, कार्याध्यक्ष एन. के. कुंभार, एम. एस. बेनके, सुखदेव कांबळे, बाबासाहेब कापसे, एस. एस. भोगम, कायदा सल्लागार काकासो पाटील सहभागी झाले आहेत.

संघटनेत दुफळी

जिल्ह्यात सुमारे ९०० ग्रामसेवकांची संख्या आहे. मात्र यामध्येही महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ व राज्य ग्रामसेवक युनियन अशा दोन संघटना आहेत. आजच्या आंदोलनामध्ये ग्रामसेवक युनियनने केले आहे. यामध्ये संघाचे ग्रामसेवक सहभागी झाली नसल्याने मागण्या मान्य करण्यात अडचणी येत असल्याची चर्चा आंदोलनस्थळी सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेम्पो उलटून वृद्धा ठार

0
0

जयसिंगपूरः आळते (ता. हातकणंगले) येथे रामलिंग डोंगराच्या पायथ्याशी पिकअप टेम्पो उलटल्याने वृद्धा ठार झाली. गौराबाई बापू शेळके (वय ६०) असे त्यांचे नाव आहे. अपघातात दहाजण गंभीर जखमी झाले असून, यामध्ये सहा महिला व एका लहान मुलीचा समावेश आहे. धुळोबा देवालयाजवळ परडी सोडण्यासाठी जात असताना सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता हा अपघात घडला. सर्वजण करवीर तालुक्यातील वळिवडे येथील आहेत. त्यांच्यावरर हातकणंगले येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राजाबाई गणपती शेळके (वय ६५), बापू बाळू शेळके (७०), संतोष चंद्रकांत शेळके, शोभा रंगराव शेळके, आक्काताई आनंदा शेळके, मंगल रामचंद्र मेटकर, आबासाहेब भाऊसाहेब शिंदे (सर्व रा. वळिवडे), शेवंता नवलाप्पा पडवळे (६०, रा. सौंदलगा, ता. चिकोडी), मंगल अशोक गावडे (४०, रा.कोरेगाव, ता.वाळवा), प्रणाली प्रधान धनगर (११, रा. लाटवडे) अशी जखमींची नावे आहेत. शेळके कुटुंबीय नातेवाइकांना घेऊन आळते येथील धुळोबा देवालयाजवळ परडी सोडण्यासाठी टेम्पो (एम.एच.०९ सीयू ३२९६) मधून जात होते. वळणावर तेथे चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो उलटला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहायक फौजदारावर लाचप्रकरणी गुन्हा

0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

अटकेची कारवाई टाळण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी शाहूवाडी पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार श्रीकांत विलास कोरे यांच्यावर जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

श्रीकांत कोरे हे शाहूवाडी पोलिस ठाण्यात सेवेत आहेत. चोरीच्या गुन्ह्यात मुलास अटक करावी लागेल असे त्यांनी जयसिंगपूर येथील सराफास सांगितले. मुलाचे भविष्य खराब होईल यामुळे त्याला अटक करू नये, अशी सराफाने विनवणी केली. अटकेची कारवाई टाळण्यासाठी पाच हजार रूपये द्यावे लागतील असे कोरे यांनी सांगितले.

यानंतर मोबाइलवरून बोलताना कोरे यांनी दोन हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले. यामुळे जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई उपअधीक्षक श्रीमती पद्मा कदम, हवालदार अमर भोसले, जितेंद्र शिंदे, आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पगार, पीएफ जमा होणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केएमटी कर्मचाऱ्यांचा थकीत पगार करण्याची लेखी हमी सोमवारी प्रशासनातर्फे देण्यात आली. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची थकीत भविष्य निर्वाह ​निधीची रक्कम, विमा पॉलिसीची रक्कम या महिन्यातच जमा करण्यात येईल अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली. नगरसेवक राजू लाटकर यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात अधिकाऱ्यांना धारेवर धरले. कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या वेतनासंदर्भात चालढकल होत असेल तर अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला. कर्मचाऱ्यांच्या या व्यथांना 'महाराष्ट्र टाइम्स'ने वाचा फोडली.

केएमटीचे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सातत्याने गाजत आहे. दोन ते तीन महिन्यांतून एकदा वेतन दिले जात असल्याने कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. थकीत वेतनासह कर्मचाऱ्यांच्या नावाने भरण्यात येणारी पीएफ, विमा पॉलिसीची रक्कम, अल्पबचत योजनेंतर्गत रक्कमच भरण्यात आली नव्हती. कर्मचाऱ्यांची जमा होणारी पीएफ, पगार आणि पॉलिसीची रक्कम कुठे जाते याकडे महाराष्ट्र टाइम्सने लक्ष वेधले होते. कर्मचाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने सोमवारी महापालिकेत येऊन नगरसेवक लाटकर यांची भेट घेतली. शिष्टमंडळात रविंद्र इंगवले, राजेंद्र निगवेकर, योहान चौगुले, राजेंद्र मंडलिक यांचा समावेश होता. त्यांनी पगाराअभावी कर्मचाऱ्यांचे हाल होत असल्याचे सांगितले​.

आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक

नगरसेवक लाटकर यांनी आयुक्त पी. शिव शंकर यांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात प्रशासनाची काय भूमिका आहे अशी विचारणा केली. आयुक्तांनी तत्काळ उपायुक्त विजयकुमार खोराटे, अश्विनी वाघमळे, केएमटीचे अतिरिक्त व्यवस्थापक संजय भोसले यांची बैठक घेतली. या बैठकीतही लाटकर यांनी पीएफ, विमा पॉलिसीची रक्कम कुठे जाते अशी विचारणा करत कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला नाही तर अधिकाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा दिला. आयुक्तांनी अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न तत्काळ सोडवावा अशी सूचना केली. व्यवस्थापक भोसले यांनी या संदर्भात लेखी पत्र दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उलटा अशोकाचा घेतला अंधश्रद्धेने बळी

0
0

मोहसीन मुल्ला, कोल्हापूर

अंधश्रद्धा आणि वास्तूशास्त्र यांचा फटका झाडांनाही बसत आहे. वास्तूशास्त्राच्या वाढत्या प्रस्थामुळे स्थानिक भाषेत म्हटल्या जाणाऱ्या उलटा अशोकाच्या झाडाचा बळी गेला आहे. हे झाड लावण्याचे अनेकांनी बंद केले आहे. गेल्या काही वर्षात या रोपांची विक्री कमालीची घटली आहे. याशिवाय बोन्साय केलेली झाडे लावणेही अनेकांनी बंद केले आहे.

अशोकाचे झाड उंच आणि अगदी सरळ वाढते. त्यामुळे ते दिसायलाही आकर्षक असते. वीजेच्या तारांना या झाडाचा कसलाही त्रास होत नसल्याने पूर्वी मोठ्या संख्येने ही झाडे लावली जायची. अनेक बंगल्यात आजही ओळीने या झाडांची रांग पहायला मिळते. मात्र गेल्या दहा वर्षात हे उलटा अशोक घरी किंवा ऑफीस परिसरात लावणे अशूभ असते अशी अंधश्रद्धा पसरली आहे. लावलेले हे झाड काही कारणाने तोडले तर त्यातून काही अशूभ घटना घडते अशीही भ्रामक कल्पना आहे. त्यामुळे भविष्यात उलटा अशोकाचे झाड तोडण्याची वेळ येऊ नये यापेक्षा हे झाड न लावलेलेच बरे अशी समजूत नागरिकांत आहे.

यासंदर्भात निसर्ग नर्सरीचे संतोष लोबो म्हणाले, 'मुळात निर्सगातील कोणताही वृक्ष अशूभ नसतो. वृक्षांबद्दलही अनेक अंधश्रद्धा पसरत आहेत. झाड लावल्यास काही तरी उलटे होणार असा गैरसमज नागरिकांत पसरला आहे. त्यातून उलटा अशोक घेणाऱ्यांची संख्या घटली आहे. क्वचितच कोणी वृक्षप्रेमी हे रोप विकत घेतो. यासंदर्भात नागरिकांचे प्रबोधन करण्याचाही आम्ही प्रयत्न करतो, त्याचा उपयोग होत नाही.'

यासंदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा सचिव उमेश सूर्यवंशी म्हणाले, 'आपल्याकडे प्राणी आणि वनस्पतीजन्य अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत. झाडांचा संबंध हा सावली, फुले, फळे, पर्यावरणाशी आहे. त्याच्या संबंध सुख आणि समृद्धीशी असत नाही. आपल्या हव्यासासाठी वृक्षांना जबाबदार धरणे चुकीचे आहे. काही ज्योतिषी एखादे काम करताना खिशात उलट्या अशोकाची पाने ठेण्याचाही सल्ला देत असतात. हेही चुकीचे आहे.'

अशोक औषधीच

अशोक या वृक्षाचे शास्त्रीय नाव 'पॉलिअलिथिया लाँगीफोलिया' आहे. अनेक संशोधन पत्रिकांत अशोकाचा औषधी वनस्पती असा उल्लेख आहे.

बोन्सायबद्दलही भीती

मध्यंतरी बोन्साय झाडांची मोठी क्रेझ कोल्हापुरात पहायला मिळत होती. मात्र बोन्सायचे झाड घरी लावले तर त्या झाडाप्रमाणेच आपला विकासही खुंटतो असा समज पसरल्याने बोन्सायची मागणीही कमी घाल्याचे लोबो यांनी सांगितले. ते म्हणाले, 'बोन्साय ही कला जपानमधील आहे. तेथे कोणाचा विकास खुंटलेला दिसत नाही. वास्तूशास्त्र फारच जुने आहे. बोन्साय कला भारतात काही दशकांपूर्वी आली. हे लक्षात घेतले तर वास्तूशास्त्राचा आणि बोन्सायचा संबंधच लावता येत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घराच्या बांधकामावरून वाठारमध्ये युवकाचा खून

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रागाच्या भरात घराच्या चौकटीवर डोके आपटून एकाचा खून केल्याची घटना वाठार तर्फे वडगाव (ता. हातकणंगले) येथे सोमवारी दुपारी चार वाजता घडली. शरीफ इकबाल पटाईत (वय २९ रा. वाठार तर्फ वडगाव) असे खून झालेल्याचे नाव आहे. हुनमान मंदिराजवळील खून प्रकरणी संशयित बालम गुलाम पठाण याला वडगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शरीफ पटाईत हा सिमेंट विक्रीच्या दुकानात नोकरीस होता. त्याने स्वतःचे घर बांधावयास काढले होते. त्याने गवंडीकाम करणाऱ्या बालम पठाण याच्यासह त्याचा भाऊ जमाल आणि वडील गुलाम पठाण यांना हे काम दिले. पठाण यांनी ​घराचे बांधकाम अर्धवट सोडले. त्यामुळे शरीफ पटाईतने पठाण यांच्या घरी फोन करून जाब विचारला. यावेळी झालेल्या मारामारीत बालमने शरीफचे डोके घराच्या चौकटीवर जोरात आपटले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधी डोनेशन द्या, मगच प्रवेश

0
0

सचिन यादव, कोल्हापूर

जून महिन्यात पालक आणि विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी धावपळ सुरु झाली आहे. केजी ते पीजी पर्यंतच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना रांगेत उभे राहून प्रवेश घ्यावा लागतो. केवळ शैक्षणिक शुल्क भरले म्हणजे प्रवेश निश्चित झाला असे नाही. या शैक्षणिक शुल्काच्या पावतीसोबतच विद्यार्थ्यांना डोनेशन, सर्व प्रकारचे दाखले आणि काही ठिकाणी मुले मिळविण्यासाठी भरघोस ऑफरचे चित्र आहे.

पाल्याचा प्ले स्कूल ते पदवीपर्यंतच्या शिक्षण प्रवेशासाठी डोनेशनचा आकडा हजारांच्या घरात आहे. शिक्षण संस्थाकडून शैक्षणिक शुल्काची रितसर पावती दिली जात असली तरी या पालकांच्या कडून हजारो रुपयांचे डोनेशन राजरोस घेतले जाते. राज्य सरकारचा शुल्क नियंत्रण वाढीचा आणि डोनेशनचा कायदा अजूनही कागदावरच राहिला आहे.

मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांत श्रीगणेशा करण्यासाठी पालकांना डोनेशन द्यावे लागते. मराठी, इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमांच्या शाळा डोनेशन घेण्यात आघाडीवर आहेत. पाल्याचा प्रवेशाच्या वेळी शैक्षणिक आणि अन्य शुल्काची एकत्रित पावती पालकांनी दिली जाते. मात्र त्यासोबत पंधरा हजार रुपयांचे डोनेशनची मागणी केली जाते. या डोनेशनची कोणतीही पावती दिली जात नाही. डोनेशन दिल्यासच प्रवेशाची निश्चिती करीत असल्याचा अलिखित नियम बहुतांशी शिक्षण संस्थात कायम आहे. प्राथमिक शिक्षण घेतानाचा पालकांची आर्थिक लूटीची सुरूवात केली जाते. शाळेत प्रवेश घेतल्यानंतर इमारत निधी आणि कंम्प्युटर निधीच्या नावाखालीही काही संस्था दहा ते वीस हजार रुपयांची मागणी करतात. पहिली ते दहावी पर्यंतच्या मध्येच कोणत्याही इयत्तेत प्रवेश घ्यायचा असेल तर डोनेशनशिवाय प्रवेश दिला जात नाही. प्रवेशासाठी काहींनी दिलेल्या शिफारस पत्रांना केराची टोपली दाखविली जातात. अकरावीत गुणवत्तेवर प्रवेश दिला जात असला तरी काही विनाअनुदानित शिक्षण संस्थाकडून डोनेशनचा सपाटा सुरुच आहे.

बारावीनंतर करिअरची अनेक विस्तारित क्षेत्रे आहेत. इंजिनीअरिंग, मेडिकल, व्यावसायिक अभ्यासक्रम, फार्मसी, ऑटोमोबाइल इंजिनीअरिंगसह दीडशेहून अधिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशाची धांदल उडाली आहे. सरकारी अनुदानित कॉलेजमध्ये शैक्षणिक शुल्क घेतले जाते. मात्र राज्य सरकारकडून या शुल्काची परिपूर्ती वेळेत केली जात नसल्याने बहुतांशी विद्यार्थी हवालदिल आहेत.

विनाअनुदानित ज्युनिअर, सीनिअर कॉलेजमध्ये मात्र पालकांची आर्थिक लूट केली जाते. शैक्षणिक शुल्कासह मनमानी शुल्क आकारले जाते. या डोनेशनवर देखरेख ठेवण्यासाठी कोणतीही सक्षम समिती अद्याप शिक्षण खात्याकडे नाही. इंजिनीअरिंगमधील विविध शाखांच्या प्रवेशासाठी पन्नास हजारांचा डोनेशनचा आकडा आहे. तर एम. डी, एमबीबीएस, बीडीएस, बीएएमस, बीएचएमएस, डी फार्म, एम. फार्म, हॉस्पिटल मॅनेजमेंट, एमबीए यासह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांचा शैक्षणिक शुल्काचा आकडा लाखांच्या घरात आहे. तर डोनेशनचा आकडाही तितकाच आहे. एम. डी. आणि एमबीबीएससाठी पंचवीस ते चाळीस लाखांपर्यंत डोनेशन घेतले जाते. डोनेशन घेताना रंगेहाथ पकडल्याची एकही घटना अद्याप कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात सापडलेली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा हीच अपेक्षा असते.

व्यावसायिक अभ्यासक्रमातून लखपती

एनसीटीईकडून मेडिकल, इंजिनीअरिंगसह व्यावसायिक अभ्यासक्रमांना परवागनी दिली जाते. काही कॉलेजमध्ये तज्ज्ञ प्राध्यापक मिळत नाही. कॉलेजमध्ये अॅडमिशन घेण्यासाठी आणि दर्जेदार स्टाफ कॉलेजमध्ये असल्याचे बहुतांशी शिक्षण संस्थाचालकांच्याकडून दाखविले जाते. संबधित प्राध्यापक, विभागप्रमुख काम दुसऱ्या ठिकाणी करतात. मात्र या प्राध्यापकांचा पॅकेज देऊन व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या कॉलेजमध्ये कार्यरत असल्याचे भासविले जाते. त्या आधारचे पालकांच्याकडून लाखो रुपयांचे डोनेशनही आकारले जाते.

शुल्क नियंत्रण कायदा कुठे आहे

राज्य सरकारने शुल्क नियंत्रण कायद्याची कडक अमंलबजावणी करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले आहेत. मात्र बहुतांशी प्रवेश गुढीपाडव्यालाच पूर्ण झाले आहे. प्रवेशाच्या पावतीवरचा आकडा स्पष्ट असला तरी डोनेशनचा आकडा वेगळा आहे. अॅडमिशन रद्द होईल या भीतीने काही पालकही तक्रारीसाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे बहुतांशी संस्थाचालकांनी डोनेशनचा सपाटा लावला आहे. शिक्षण सहसंचालक, शिक्षण उपसंचालकांच्या कडूनही केवळ परिपत्रक काढण्याच्या पलिकडे कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही. त्यामुळे आरटीइचा कायदा कागदावरच आहे.

डोनेशन घेत असल्याच्या काही संस्थाच्या तक्रारी अभाविपकडे येत आहेत. त्याची शहानिशा केली जात आहे. काही वेळेला शिक्षण सहसंचालक आणि उपसंचालकांकडे विद्यार्थ्यांनीही तक्रारी दिल्या आहेत. मात्र त्याची दखल घेतलेली नाही. काही सामाजिक कार्यकर्ते प्रवेश मिळवून देतो, असे सांगूनही काहींची फसवणूक करीत आहेत. या कार्यकर्त्यांची यादी तयार करण्याचे काम परिषदेकडून सुरू झाले आहे.

- पंकज पाटील, महानगरमंत्री अभाविप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


...तरच लाल बावट्याचे नाव लावू

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बांधकाम कामगारांच्या विविध प्रश्नांवर लाल बावटा बांधकाम संघटनेच्यावतीने सोमवारी सहायक कामगार आयुक्त कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. जवळपास २५ हजारांवर कामगार मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी कामगार नेते, माजी आमदार नरसय्या आडाम यांनी ३० जुनपर्यंत बांधकाम कामगारांचे प्रश्न मार्गी न लावल्यास पालकमंत्री चंद्रकात पाटील यांना 'तुमची गाडी अडवू, तरचे लाल बावट्याचे नाव लावू' असे आव्हान त्यांनी दिले.

लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने 'तुफान' मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात बांधकाम कामगार प्रचंड संख्येने मोर्चात सहभागी झाले. विविध वाद्यांच्या गजरात अनेक ठिकाणाहून कामगार मोर्चात सहभागी झाले. मोर्चा दुपारी दसरा चौकातून चिमासाहेब महाराज चौक, भाउसिंगजी रोड, बिंदू चौक, लक्ष्मीपुरी, व्हीनस कॉर्नरमार्गे शाहूपुरीत आला. या मोर्चाचे नेतृत्व आडाम यांच्यासह संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे, शिवगोंड खोत, शिवाजी मगदूम, सीआयटीयूचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, प्रा. सुभाष जाधव, उदय नारकर यांनी केले. मोर्चात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

यावेळी आडाम म्हणाले, 'सरकार कोणाचेही असो, त्याला रास्त मागण्यांच्या पूर्ततेसाठी नमविण्यासाठी लाल बावटा संघटना मजबूत आहे. कामगारांनी किती‌ दिवस किड्या मुंग्यांसारखे जगायचे? असा प्रश्न आहे. राज्य सरकारने ३० जूनपर्यंत बांधकाम कामगारांच्या मागण्या मार्गी लावाव्यात. बांधकाम कामगार कल्याण महामंडळाकडे दहा हजार कोटी रुपये जमा आहेत. कामगार त्यांच्या हक्काचा पैसा मागत आहेत. या पैशातून कामगारांसाठीच्या आवश्यक सुविधा दिल्या जाव्यात.'

पंधरा दिवसांत निर्णय

शिष्टमंडळाने सहायक आयुक्त सुहास कदम यांची भेट घेतली. यावेळी 'नव्याने नोंदणी झालेल्या कामगारांना सानुग्रह अनुदान मिळावे, त्याशिवाय कार्यालयातून बाहेर जाणार नाही', अशी भूमिका अडाम यांनी घेतली. कदम यांनी तातडीने महामंडळाचे अध्यक्ष एच. व्ही. जावळे यांच्याशी संपर्क साधला. यावेळी जावळे यांनी १५ दिवसांत हा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. 'ऑगस्ट २०१४ पर्यंत नोंदणी झालेल्यांपैकी १२०० जणांचे सानुग्रह अनुदानाचे, तर पाच मृतांच्या वारसांना अंत्यविधी मदतीचे चेक तर एका अपघाती मृत्यू झालेल्याच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये नुकसान भरपाईचे चेक देण्यात येतील' असे महामंडळाचे अध्यक्ष जावळए यांनी सांगितले.

काय आहेत मागण्या?

२०१२ ते ऑगस्ट २०१४ पर्यंत नोंदणी, नुतनीकरण झालेल्या कामगारांना ३ हजार रुपयांचा लाभ मिळावा

नैसर्गिक मृत्यू झाल्यास ५ लाख रुपये तर अपघाती मृत्यू झाल्यास १० लाख नुकसानभरपाई मिळावी

६० वर्षांवरील कामगारांना ५ हजार पेन्शन, दिवाळीला १० हजार रुपये बोनस मिळावा

घर बांधणीसाठी पाच लाख रुपये अनुदान आणि १० लाख रुपये बिनव्याजी कर्ज

दाखल झालेल्या पात्र अर्जावरून सेवा पुस्तके द्या

जिल्हास्तरीय मंडळ स्थापन करा

मुलांच्य लग्नासाठी ५० हजार रुपये अनुदान

मेडिक्लेम मंजुरी आठ तासांत मिळावी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात तालुक्यांत स्थिती सुधारली

0
0

मारुती पाटील, कोल्हापूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजक्ट असलेल्या 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' योजनेमध्ये कोल्हापूर जिल्हा अग्रेसर असला तरी पाच तालुक्यांमध्ये शून्य ते सहा वयोगटातील मुलांचे प्रमाण अजुनही चिंताजनक आहे. 'लेक वाचवा' अभियानांतर्गत अनेक ठिकाणी अवैध सोनोग्राफी सेंटर्स व अवैध गर्भलिंग चाचणीवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. मात्र जिल्ह्याच्या सीमेवर होणाऱ्या गर्भलिंग चाचण्यांचा याला अडसर ठरत आहे. जिल्ह्यातील पन्हाळा, करवीर, राधानगरी, शिरोळ आणि हातकणंगले या तुलनेने सधन असलेल्या तालुक्यांमध्ये मुलींचे प्रमाण वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे. त्याला काही प्रमाणात यशही आले आहे.

२०११ च्या जनगणनेमध्ये जिल्ह्यातील स्त्री-पुरुष प्रमाणातील असमोतल स्पष्ट झाला होता. मुलगाच हवा या मानसिकतेमधून सोनोग्राफी केंद्रांतून गर्भलिंग चाचणी करून घेऊन मोठ्या प्रमाणात गर्भपात केले जात होते. डोंगरी समजल्या जाणाऱ्या तालुक्यात हे प्रमाण कमी असताना, सधन समजल्या जाणाऱ्या करवीर, पन्हाळा व शिरोळ तालुक्यात हे प्रमाण अगदीच चिंताजनक होते. जिल्ह्यात सरासरी प्रमाण ९१७ असताना त्यापेक्षा कमी प्रमाण असलेल्या गटात पाच तालुक्यांचा समावेश आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने या तालुक्यांवर विशेष लक्ष केंद्रीत केल्याने मुलींच्या प्रमाणामध्ये वाढ गेली आहे. आरोग्य सेविका, आशा कर्मचाऱ्यांच्या नियमित बैठका घेण्यात आल्या. ज्या कुटुंबात पहिली मुलगी जन्माला आली आहे, अशा कुटुंबावर लक्ष ठेवून गर्भपात होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली. मुलीच्या जन्मानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात नवजात बालकांचा व मातांचा सत्कार करण्यात आला. काही ग्रामपंचायतींनी ठेव स्वरुपात मदत केली. आरोग्य विभागाने जाणीव जागृतीसोबत प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले. जिल्ह्यात चार तालुक्यांत मुलींचे प्रमाण कमी आहे. मात्र जिल्ह्यातील ३६ ग्रावांमध्ये मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले आहे. ही बाब अभिमानास्पद आहे.

एक मुलीनंतर पुन्हा गर्भधारणा झालेल्या महिलांवर आशा कर्मचारी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे विशेष लक्ष असते. त्यांच्या कुटुंबाशी थेट संबंध येत असल्याने सोनोग्राफी, गर्भपात अशा प्रकारांवर लक्ष दिल्याने अनेक भागात मुलामुलींचे प्रमाण वाढण्यास मदत झाली आहे.

- डॉ. आर. एस. आडकेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपजिल्हा रुग्णालयात उद्रेक

0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोयींविरोधात धुमसणाऱ्या रागाचा सोमवारी उद्रेक झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाप्रमुख नागेश चौगुले व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रतीकात्मक निषेध म्हणून अधीक्षकांची खुर्ची जाळली. तसेच रुग्णालयाचे 'कै. बाबासाहेब कुपेकर उपजिल्हा रुग्णालय' असे नामकरण केले. याउपर अधीक्षक डॉ. सुनील कुरुंदवाडे यांना १०२ या सरकारी रुग्णवाहिकेतून घरी पाठवत हकालपट्टी केली.

गडहिंग्लज उपविभागातील रुग्णांना सोयी-सुविधा तत्काळ उपलब्ध व्हाव्यात यासाठी स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रयत्नातून उपजिल्हा रुग्णालयाची उभारणी झाली. सुरुवातीच्या काळात अतिशय उत्कृष्ट पद्धतीने रुग्णालयाचे कामकाज सुरू होते. मात्र, गेल्या दोन वर्षांत रुग्णालयाला उतरती कळा लागली. औषधांचा तुटवडा, यंत्रसामग्री व तज्ज्ञांचा अभाव, पर्यटकासारखे तासभर येणारे डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांची अरेरावी, नित्यनियमाने होणारी आंदोलने, त्या दरम्यान घेण्यात आलेला अधीक्षकांचा 'राजीनामा' या आणि अशा अनेक कारणांनी उपजिल्हा रुग्णाय नेहमी चर्चेत राहिले.

उपजिल्हा रुग्णालयातील कामकाजाचा निषेध नोंदविण्यासाठी मनसेतर्फे आज उपजिल्हा रुग्णालयावर आंदोलन करण्यात आले. यावेळी डॉ. कुरुंदवाडे यांच्याकडे उपजिल्हा रुग्णालयाच्या कामकाजाबाबत तसेच कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत विचारणा करण्यात आली. मात्र, ते समाधानकारक उत्तर देऊ न शकल्यामुळे संतापलेल्या आंदोलनकर्त्यांनी अधीक्षक डॉ. कुरुंदवाडे यांची खुर्ची पेटवून दिली. तसेच त्यांना घरी जाण्यास सांगितले व पुन्हा कधीही रुग्णालयात येऊ नये असे सुनावले.

स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांच्या स्मरणार्थ मनसेतर्फे आज उपजिल्हा रुग्णालयाला 'कै.बाबासाहेब कुपेकर उपजिल्हा रुग्णालय' असे नामकरण करण्यात आले. राष्ट्रवादीला जे जमले नाही ते मनसेने करून दाखविले. यावेळी प्रभात साबळे, अजित पाटील, उद्धव नाईक, महेश देसुरे, अनिल कावणेकर यांच्यासह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादीला विसर

गडहिंग्लज उपविभागात गरीब व गरजू रुग्णांना सवलतीच्या दरात आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी कै.कुपेकर यांनी पुढाकार घेतला. म्हणूनच उपजिल्हा रुग्णालय बाबासाहेबांच्या कार्याचे 'ऊर्जित स्मारक' ठरले. मात्र, बाबासाहेबांना प्रेरणास्थान मानणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींसह पदाधिकाऱ्यांना याचा विसर पडला. गैरसोयींविरोधात गेल्या दोन वर्षांत डझनभर आंदोलने झाली. मात्र, विद्यमान आमदार हसन मुश्रीफ व संध्यादेवी कुपेकर यांनी रुग्णालयाकडे ढुंकूनही पाहिले नाही. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षच आजच्या उद्रेकाला कारणीभूत ठरले.

तरीही प्रशासन, लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष

'महाराष्ट्र टाइम्स'ने उपजिल्हा रुग्णालयाच्या गैरसोयींसंदर्भात दोन दिवसांपूर्वी 'सेवाव्रताचा खेळखंडोबा' या मथळ्याखाली बातमी प्रसिद्धी केली. मात्र, तरीही प्रशासन अथवा लोकप्रतिनिधींनी यासंदर्भात वस्तुस्थितीची माहिती घेण्याचा प्रयत्नही केला नाही. त्यामुळे जनतेला नाईलाजास्तव आंदोलन करावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाई मंदिरात आज सावल्यांचा खेळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंबाबाई मंदिरात दरवर्षी होणाऱ्या किरणोत्सवाप्रमाणेच शिखरांच्या सावल्यांचा खेळही भाविकांना भावतो. दरवर्षी २ जूनला शिखरांच्या सावल्यांचा खेळ अनुभवता येतो. सकाळी चांगले ऊन असेल तर तिन्ही शिखरे आणि दीपमाळांची सावली असेल तर आज (मंगळवार) हा खेळ पाहता येणार आहे. मंदिरात दरवर्षी नोव्हेंबर आणि जानेवारी महिन्यात किरणोत्सव होतो. त्याप्रमाणेच जून महिन्यातही मंदिरांची शिखरे आणि आवारातील दीपमाळांची सावली महाद्वार कमानीतून बाहेर जाते. पावसाळी वातावरणामुळे हा अनुभव अनेकदा लोकांना घेता येत नाही; पण सकाळी चांगला सूर्यप्रकाश असल्यास हा ऊन-सावल्यांचा खेळ अनुभवता येतो.

श्री अंबाबाई मंदिराचे बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे या वास्तूचे वेगळेपण प्रत्येकवेळी अनुभवता येते. दरवर्षी २ जूनला सूर्योदयावेळी सूर्याची पहिली किरणे मंदिरांवर आणि आवारातील दीपमाळांवर पडतात. त्याचवेळी मंदिर आणि दीपमाळांची सावली महाद्वाराच्या कमानीवर आणि नंतर हळूहळू मंदिराच्या मध्यभागी येते. मंदिरात किरणोत्सावेळी अंबाबाईची मूर्ती, महाद्वार कमान व सूर्य सायंकाळी एकाचवेळी सरळ रेषेत येतात त्याचवेळी किरणोत्सव होतो. सूर्यकिरणे मूर्तीवर असतानाच सूर्य दिसत असूनही सूर्यकिरणे लोप पावतात. हीच रेषा सरळ पूर्वेकडे वाढविली तर महाद्वार कमान, मंदिराचा कळस आणि सूर्य २ जूनला एकाच रेषेत येतात. त्यामुळे २ जूनपूर्वी १० दिवस आणि २ जूननंतर १० दिवस कळसाची सावली उत्तरायण आणि दक्षिणायण असा छायाप्रकाशाचा प्रवास करताना दिसते.

पंचगंगा नदीपात्रातील मंदिरांतही किरणोत्सव

अंबाबाई मंदिराचा कळस आणि कमानीदरम्यानचे अंतर सुमारे दोनशे फुटांचे आहे. त्यामुळे कळसाची सावली रेखीव आणि जाणवेल अशी पडत नाही ती थोडी पुसट होते, तर दीपमाळांमधील अंतर ९ फुटांचे असल्यामुळे ही सावली अधिक गडद दिसते. असाच प्रकार पंचगंगा नदीपात्रातील मंदिरांबाबतीतही घडतो. ज्यावर्षी उन्हाळ्याचा कालावधी वाढतो त्याच वर्षी सावली महाद्वारात गेलेली दिसते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरंक्षक कठड्यांची गरज

0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

पेरले (ता. कराड) येथील कृष्णा नदीवरील लक्कडवाला पूल वाहतुकीस असुरक्षित झाला आहे. पुलाला संरक्षक कठडेच नसल्याने या पुलावरून वाहन केव्हा खडकावर आपटेल याचा नेम नाही. सद्यस्थितीत अत्यंत धोकादायक प्रवास या पुलावरून सुरू आहे. मात्र, वर्षांनुवर्षे या पुलाला सरंक्षक कठडे होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कराड तालुक्यातील पेरले येथील कृष्णा नदीवर काही दशकांपूर्वी पूल उभारण्यात आला होता. या पुलाला लक्कडवाला पूल या नावाने ओळखले जाते. पेरले येथून पूल ओलांडला की सातारा तालुक्यातील गावांची हद्द सुरू होते. कोपर्डे, वेणेगाव, तुकाईवाडीसह सातारा व कोरेगाव तालुक्यातील अनेक गावांना पेरले गावाला जोडणारा हा पूल अनेक ग्रामस्थांना जवळीक साधण्यासाठी सोयीचा ठरला आहे. मात्र, या पुलाला सरंक्षक कठडे नसल्याने धोकादायक स्थिती आहे. या पुलावरून पादचाऱ्यांसह दुचाकी, चारचाकी वाहनांची वाहतूक सुरू असते. गेल्या काही दिवसांपासून या पुलावरून वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. या पुलावरून प्रवास करताना एखादे वाहन पलिकडे जाईपर्यत दुसरे कोणतेही वाहन अथवा पादचारी पुल ओंलाडू शकत नाही, इतका हा पूल अरूंद आहे. त्यातच पुलाला सरंक्षक कठडे नसल्याने अत्यंत धोकादायकरित्या वाहन चालवावे लागते. लक्कडवाला पुलावरून सध्या अनेक वडाप वाहने, कार व दुचाकी नियमीत प्रवास करतात. पुल ओलांडल्यानंतर सुरू होणाऱ्या

रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने या वाहतुकीत वाढ झाली आहे. पुलाच्या खाली नदीपात्रात संपुर्ण खडक आहे. त्यामुळे पुलावरून एखादे वाहन घसरल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे या पुलाला सरंक्षक कठडे होणे अंत्यत गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images