Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘इको व्हिलेज’मध्ये सांगलीत घोटाळा

$
0
0

सांगलीः पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना 'इको व्हिलेज' अंतर्गत वाळवा तालुक्यातील ६४ ग्रामसेवकांची चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणी या ग्रामसेवकांवर ४ लाख ७८ हजार रुपयांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येकी १० ते १५ हजार रुपये याप्रमाणे वसुलीचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी ही कारवाई केली आहे.

विशेष म्हणजे वाळवा पंचायत समितीस सन २०१२-१३ च्या दरम्यान या योजनेअंतर्गत बक्षिसाची रक्कम मिळाली होती. यातील काही रक्कम तालुक्यातील ग्रामपंचायतींना 'इको व्हिलेज'च्या प्रचार, प्रसिद्धीवर खर्च करणे आवश्यक होते. हे काम नियमाला धरून केले नाही. निविदेची प्रक्रिया राबविली नाही. त्या संदर्भात जिल्हा परिषदेच्या सहायक लेखा अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात आली. चौकशी अहवाल सादर झाला होता. निविदा न मागविता, अथवा कोटेशन न घेताच बोर्ड खरेदी केले गेली होती. या प्रकरणी ४.७८ कोटींची अनियमितता आढळून आल्याचा ठपका या ग्रामसेवकांवर ठेवण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लॉकर्ससाठीही आता मोबाइल अलर्ट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

डीकेटीईच्या इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन विभागातील विनित पाटणी, सागर प्रसाद शर्मा व आदित्य दातार या अंतिम वर्षीय विद्यार्थ्यांनी आरएफआयडी आणि जीएसएम कार्यप्रणालीचा वापर करून बँक लॉकर सिक्युरिटी सिस्टीम बनवली आहे. सध्याची लॉकर प्रणाली सक्षम व मजबूत असली तरी त्यात त्रुटी आहेत. प्रत्येकवेळी लॉकर उघडण्यासाठी बँकेचा कर्मचारी लागतोच. तसेच किल्ली हरवली किंवा डुप्लीकेट केली तर दगा फटका होवू शकतो. या त्रुटी लक्षात घेवून विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प पूर्ण केला आहे.

या प्रकल्पामध्ये प्रत्येक लॉकरधारकाकडे किल्लीऐवजी आयडेंटीटी नंबर असेल. जर योग्य लॉकर खातेधारक असेल तर लगेच त्याला त्याच्या रजिस्टर्ड मोबाइलवर एक पासवर्ड येईल आणि हा पासवर्ड लॉकर प्रणालीला दिला तर लगेच लॉकर उघडेल. पासवर्ड चुकीचा असेल तर लॉकर बंदच राहील. त्यामुळे समाजातील गुन्हे कमी होतीलच शिवाय बँक लॉकर्स आणखी सक्षम होऊन लॉकर खातेधारकांचा वेळ वाचेल. हा प्रकल्प इटीसी विभागप्रमुख प्रा. डॉ. एस. ए. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाला आहे. प्राचार्य प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले व उपप्राचार्या प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

व्यक्तिगत लॉकर्सही सुरक्षित

याच प्रणालीचा उपयोग व्यक्तिगत लॉकर्सच्या सुरक्षेसाठीही होऊ शकतो. आजकाल सराफ पेढीवरील लॉकर्स असतील किंवा मोठ्या व्यापारांच्या पेढीवरील लॉकर्स असतील त्यांनाही अशा प्रणालीची अत्यंत गरज आहे. व्यक्तिगत लॉकर्समध्ये असे काही बदल होऊ लागले तर ताबडतोब तसा संदेश मालकाच्या मोबाइलवर जाईल. पुढील धोका टळू शकेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हत्तीचा बंदोबस्त करण्याची मागणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा चंदगड

जांबरे (ता. चंदगड) येथील पंचकोशीत दोन महिने ठाण मांडून बसलेल्य हत्तींनी दहशत माजवल्याने रात्रीची पिकांची राखण बंद झाली आहे. त्यामुळे हत्तीकडून रात्रीच्या वेळी पिकांच्यावर ताव मारला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने त्यांचा पंधरा दिवसांत बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा तहसिलदार आप्पासाहेब समिंदर यांना देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन ग्रामस्थांच्यावतीने देण्यात आले.

परिसरात ऊस, केळी व इतर बागायती पिकांची लागवड केली जाते. पूर्णतः डोंगरात वसलेल्या या भागात डुक्कर, गवे, अस्वल व इतर जंगली प्राण्यांकडून नेहमी त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच हत्तींचे आगमन झाल्याने पंचाईत झाली आहे, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर गोविंद गावडा, गोपाळ गावडे, रामचंद्र गावडे, विठ्ठल कांबळे, पांडूरंग सावंत आदींच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळाबाह्य मुलांसाठी जागर

$
0
0

दिग्विजय कुंभार, शाहूवाडी

पारंपरिक व्यवसाय, भटकंती, कौटुंबिक समस्या, दारिद्र्य आणि स्थलांतर अशा कारणांमुळे अनेक मुले शिक्षणापासून वंचित राहतात. या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रबोधनाची गरज आहे. या ज्वलंत प्रश्नाचे गांभीर्य ओळखून सांगली डायटमधील अधिव्याख्याता प्रा. तुकाराम कुंभार यांनी शाळाबाह्य मुलांमध्ये जागृती करण्यासाठी लघुपट तयार केला आहे.

सहा ते चौदा वयोगटातील कोणीही मूल प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून गणवेश, मोफत पाठ्यपुस्तके, माध्यान्ह भोजन, विविध शासकीय शिष्यवृत्त्या, दत्तक पालक योजना यांसारख्या योजना अंमलात आणूनही शंभर टक्के मुले शिक्षणाच्या प्रवाहात आलेली नाहीत. समाजातील नंदीवाले, डोंबारी, गोसावी, कैकाडी, गारुडी, गोपाळ, गोंधळी, वीटभट्टी व्यावसायिक, बाहेरच्या जिल्ह्यातील ऊसतोड कामगार या सर्वांची गावोगावी भटकंती होत असते. पर्यायाने या समाजातील मुलांची प्राथमिक शिक्षणाची हेळसांड होते. शिक्षणात खंड पडतो. या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी समाजमन जाणारे उपक्रमशील प्रा. तुकाराम कुंभार यांनी अशा मुलांसाठी लघुपट तयार केला आहे. शिक्षण विभागाने उपक्रमाचे भरभरून कौतुक केले आहे.

समाजप्रबोधनाचे ब्रीद असलेल्या या लघुपटात स्वतः प्रा. कुंभार यांनी डोंबाऱ्याची शिवाय प्राचार्य पी. व्ही. जाधव यांचीही भूमिका आहे. डोंबाऱ्याच्या बायकोची भूमिका इस्लामपुरातील प्राथमिक शिक्षिका स्नेहलता पाटील यांनी तर पोतराजाची भूमिका मिरजेतील मोहन शिंदे यांनी केली आहे. कडकलक्ष्मीच्या भूमिकेत हरहुन्नरी कलाकार शिक्षिका माया सोनटक्के आहेत. पोतराज समाजातील काही युवक व युवतींनीही यात सहभाग दर्शविला आहे. दिग्दर्शनाची बाजू सांभाळणारे सर्जेराव गायकवाड लघुपटात शिक्षणाधिकारी आहेत. या लघुपटातून वंचित मुले व पालकांसाठी शिक्षणाचे महत्व आणि सरकारच्या विविध योजना याबाबतचे प्रबोधन केले आहे.

सहकलाकार म्हणून रेश्मा कुंभार, वैभव बंडगर, अमित कुंभार, सुर्यकांत शिंदे, मधुकर हंकारे, वैभव कुंभार, नामदेव शेळके, नंदकिशोर मासाळ, वैभव आंबी यांनी भूमिका केल्या आहेत.

या लघुपटाच्या माध्यमातून वंचित समाजाचे प्रबोधन होणार आहे. यातून वंचित समाजातील मुले शैक्षणिक प्रवाहात येण्यास निश्चित मदत होईल. हा लघुपट एक दिशादर्शक पाऊल ठरेल.

- पी. व्ही. जाधव, प्राचार्य, डायट

शिक्षणापासून वंचित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी या लघुपटासारखी आधुनिक कौशल्य यंत्रणा निश्चितच प्रबोधन करेल. शासनाचा हेतू सफल करण्यासाठी ही धडपड आहे.

- प्रा. तुकाराम कुंभार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदी सरकारकडून फसवणूक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

सत्तेची वर्षपूर्ती साजरी करणाऱ्या भाजप-मोदी सरकारने जनतेची घोर फसवणूक केली आहे. 'अच्छे दिन' आणू म्हणत दिलेल्या आश्वासनांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. जनतेने जो विश्वास टाकून सत्ता सोपवली त्या विश्वासाला तडा गेला आहे, असा आरोप करीत रविवारी इचलकरंजी विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने 'अच्छे दिन' ची पहिली पुण्यतिथी साजरी करत मोदी सरकारचे श्राध्द घालून शंखध्वनी करण्यात आला. यावेळी भाजप सरकारच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली.

भाजप सरकार केंद्रात सत्ता येऊन वर्ष पूर्ण झाले. वर्षपूर्ती साजरी करणाऱ्या या केंद्रातील भाजप सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला आहे. भुरळ पाडणारी वचने देऊन सत्ता काबीज केल्याच्या आरोप यावेळी करण्यात आला. मोदी सरकारच्या विरोधात देशभर संताप आहे, विशेषतः भूसंपादन विधेयकामुळे हा संताप खदखदू लागला आहे. जनता या सरकारला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

त्याआधी इचलकरंजी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष पैलवान अमृत भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली सर्व युवा कार्यकर्ते येथील कॉम्रेड मलाबादे चौकात जमले. त्याठिकाणी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे, उपनगराध्यक्ष रणजित जाधव, भारत बोंगार्डे, रवि जावळे, राजू बोंद्रे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष बाळासाहेब माने, तात्या कुंभोजे, प्रमोद पोवार, समीर शिरगांवे, नरेश हरवंदे, सुहास कांबळे, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवकाळीचा दणका

$
0
0

म. टा. गडहिंग्लज

अवकाळी पावसाने रविवारी गडहिंग्लज परिसराचा चांगलाच दणका दिला. वीज पडून एका युवतीचा मृत्यु झाला. भागव्वा मुरारी यड्रावी (वय १८, रा.जोडकुरळे, ता.चिक्कोडी) असे तिचे नाव आहे. तसेच वडरगे (ता.गडहिंग्लज) येथील दोन म्हैशींचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.

याबाबत पोलीसातून मिळालेली माहिती अशी की, गडहिंग्लज औद्योगिक वसाहत परिसरात ग्रेमक कंपनीच्या गेटशेजारी गेल्या काही दिवसांपासून धनगरांनी बकरी बसविली होती. रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस सुरु झाला. त्याचवेळी भागव्वा तंबूत बसली होती. भागव्वा राहत असलेल्या तंबूवर वीज पडली. विजेच्या धक्क्याने तिचा मृत्यू झाला. भागाव्वा हिचे नुकतेच लग्न ठरले होते. आज रात्रीच या तळावरून ते चिक्कोडीच्या दिशेने निघणार होते. दुर्दैवाने त्याआधीच कुटुंबावर घाला घातला.

दुस ऱ्या एका घटनेत वडरगे येथील अल्पभूधारक शेतकरी आनंदा केदारी देवार्डे यांच्या म्हैशींवर वीज पडली. त्यात दोन म्हैशींचा मृत्यु झाला. देवार्डे हे पाऊस आल्याने घरासमोरच्या झाडाखाली बांधलेल्या म्हैशी गोठ्यात बांधत होते. झाडाखाली तीन म्हैशी होत्या. त्यापैकी एक म्हैस गीठ्यात बांधून ते बाहेर आले. त्याचवेळी त्यांच्या डोळ्यादेखत दोन्ही म्हशीवर वीज पडली. त्यात म्हैशीचा मृत्यू झाला. मंडल अधिकारी अशोक कोळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

वाहतूक कोंडी, धावपळ

अचानक आलेल्या पावसामुळे आठवडी बाजारात नागरिक तसेच व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. वडरगेसह संकेश्वर मार्गावर वृक्ष कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीने वाहतूक सुरळीत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फळभाज्यांसह कडधान्याचे दर स्थिर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या आठवड्यात फळभाज्यांसह कडधान्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. कोथिंबिरीच्या जुडीचा दर ६० रुपयांपर्यंत पोहचला होता. मात्र, भाजीपाल्याच्या दरात पुन्हा घसरण होऊन सर्वच फळभाज्यांचे दर सरासरी ४० रुपयांवर स्थिर राहिला आहे. कडधान्याचे दर स्थिर राहिले असले मागणीमध्ये फारशी वाढ झालेली नाही. गेल्या दोन-तीन दिवसांपासून हापूस आंब्याची आवक वाढल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. रस्तोरस्ती लागलेल्या स्टॉल्समुळे बाजारपेठांत आंब्याचा सुंगध दरवळत आहे.

गेल्या आठवड्यात फळभाज्या व पालेभाज्यांची आवक प्रचंड घटल्याने दरामध्ये चांगलीच वाढ झाली होती. किरकोळ बाजारात झालेल्या दर वाढीमुळे सर्वसमान्य नागरिकांमध्ये अस्वस्थता होती. मात्र या आठवड्यात पुन्हा दरात घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात कोथिंबिरीच्या जुडीचा दर ६० रुपयांपर्यंत पोहचला होता. चटणीसाठी कोथिंबिरीचा वापर जास्त होत असल्याने आणि नेमकी याचकाळात दरवाढ झाल्याने त्याचा परिणाम जाणवू लागला होता. मात्र या आठवड्यात कोथिंबिरीच्या दरात २० रुपयांची घट झाली आहे. दोडका वगळता वांगी, भेंडी, गवार, कारली या फळभाज्यांचे दर सरासरी ४० रुपयांवर स्थिर राहिले आहेत. दोडक्याचा दर ७० रुपयांवर पोहोचला आहे.

कडधान्याचे दर स्थिर

गेल्या आठवड्यात कडधान्याच्या दरात सरासरी २० रुपयांची वाढ झाली होती. पावसाळ्याच्या हंगामाच्या सुरुवातीला कडधान्याच्या मागणीमध्ये वाढ होत असते. मात्र, यावर्षी कडधान्याच्या मागणीत वाढ झालेली नाही. मसूरडाळ, तुरडाळ, मूगडाळ व हरभरा डाळीच्या दरात वाढ झाली होती. मात्र आता दर स्थिर आहेत.

हापूसचा सुगंध

रत्नागिरी, बेंगळुरू, गुजरात व शाहूवाडी येथून कोल्हापूर बाजारपेठेत हापूस आंब्याची आवक वाढली आहे. याबरोबरच पायरी, रायवळ या देशी आंब्यांची आवक वाढल्याने त्याचा बाजारपेठेतील दरावर चांगलाच परिणाम झाला आहे. २५० ते ६०० रुपये डझन असणारा दर सध्या १५० ते २०० रुपयांपर्यंत कमी झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे प्रयोगशाळेत मटेरियलची तपासणी

$
0
0

कोल्हापूर : रस्ते विकास प्रकल्पांतर्गत रस्ते तयार करण्यात आलेल्या डांबर, सिमेंट आणि क्राँकीटचे पुणे येथील सरकारी मालकीच्या प्रयोगशाळेत चार जून रोजी तपासणी केली जाणार आहे. रस्ते विकास महामंडळाने तपासणीवेळी आयआरबी कंपनीच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे असे पत्र दिले आहे. मूल्यांकन समितीचे सदस्य, महापालिका प्रतिनिधीही उपस्थित राहतील. नोबेल इंटरेस्ट इंजिनीअर्स कंपनीकडून रस्त्यांच्या मोजमापाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. मंगळवारपर्यंत कंपनीकडून सर्व्हेचा अहवाल फेरतपासणीसाठी आर्किटेक्ट अँड इंजिनीअर्स असो​सिएशनकडे प्राप्त होईल अशी माहिती मूल्यांकन समिती सदस्य राजेंद्र सावंत यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणी मिळवण्यासाठी टँकरभोवती झुंबड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कसबा बावडा जल शुद्धीकरण केंद्राकरिता पाणी उपसा करणारा शिंगणापूर येथील पंप नादुरूस्त झाल्याने शहरातील बहूतांश भागात रविवारी टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला. सकाळी कसबा बावडा फिल्टर हाऊसमधून तीन टँकरने तेरा फेऱ्यांतून पाणी देण्यात आले. कळंबा फिल्टर हाउसमधून दोन टँकरद्वारे सुभाषनगर, शिवाजी पेठ परिसरात पाणीपुरवठा झाला. पाणी मिळवण्यासाठी टँकरभोवती झुंबड उडाली होती.

महापालिकेतर्फे पंप दुरूस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. कसबा बावडा, मार्केटयार्ड, जाधववाडी, बापट कँम्प, रमणमळा, महावीर कॉलेज परिसर, कदमवाडी, गणेश कॉलनी, राजारामपुरी, राजेंद्रनगर, लिशा हॉटेल परिसरात टँकरने पाणी देण्यात आले. शिंगणापूर जलउपसा केंद्रातील पंप दुरूस्ती आणखी काही दिवस सुरू राहणार आहे. त्यामुळे ई वॉर्डाला अपुरा पाणीपुरवठा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टस्करकडून ग्रामस्थांचा पाठलाग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

तीन महिन्यांनंतर आजरा तालुक्यात परतलेला तो टस्कर आता नुसता पिकांसह झाडाझुडपांचीच नुकसान करीत नाही तर विशेषतः शेतीवाडीतील पुरूष व महिलांच्या मागे लागला आहे. गेल्या तीन दिवसांत आंबाडेच्या दोन महिला व आज पारेवाडीच्या ग्रामस्थांच्या मागे हा टस्कर धावला आहे. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नसली तरी हे संकेत घातक असल्याने तालुक्याच्या पश्चिम भागातील ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस गेलेला टस्कर पुन्हा आजरा तालुक्याच्या हद्दीत परतला आहे. येतानाच पहिल्या दिवशी त्याने सुळेरान, धनगरमोळा व पारपोली परिसरातील ऊसासह झाडांच्या नुकसानीचे सत्र आरंभले. मात्र तिसऱ्या दिवशी त्याने आजऱ्याला बाजारासाठी निधालेल्या दोन महिलांचा पाठलाग केला.

बनूबाई बम्मू गावडे व त्यांची नणंद गंगूबाई सखाराम शेळके या आवंढी धनगरवाडा क्रमांक एकमधील दोन महिला चाळोबा जंगलमार्गे आजऱ्याकडे येणारी एस.टी. पकडण्यासाठी नेहमीप्रमाणे निघाल्या असताना टस्कराने चित्कार करीत पाठलाग केला. भेदरलेल्या त्या दोन्ही महिलांनी बाजाराच्या पिशव्या व इतर साहित्य टाकून पळ काढल्याने संकट टळले. त्यानंतर आजही येथील पारपोलीचे ग्रामस्थ त्याच्या परिसरातील चाळोबा देवस्थानाचे पारंपारिक विधी करण्यासाठी गेले होते.

मात्र, त्यादरम्यानच टस्कराने वीस-बावीस जणांचा पाठलाग केल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे या विधीमध्ये सहभागी होणारे अणार आजरा शहरातील ग्रामस्थही थांबले. टस्कराचा हा प्रताप राहणार असेल तर येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे शेतीवाडीत फिरकणेही मुश्किल होणार असल्याने सर्वजण हवालदिल आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘केडीसीसीला नंबर वन बनवा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जिल्ह्यात एक नंबरची बँक म्हणून केडीसीसी झाली पाहिजे. त्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याने मरगळ झटकून कामाला लागा', असा सल्ला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. केडीसीसीच्या मुख्य शाखेत रविवारी झालेल्या कर्मचारी मेळाव्यात ते बोलत होते.

अध्यक्ष मुश्रीफ म्हणाले, केडीसीसीला गतवैभव मिळवून देण्यासाठी बँकेतील प्रत्येक कर्मचाऱ्याने झटून काम करण्याची गरज आहे. प्रत्येक ग्राहकांसोबत सौजन्याने वागा. कोणतेही कर्ज देताना जाणीवपूर्वक प्रत्येक कागद आणि कागद तपासा. राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणेच केडीसीसीची कार्यप्रणालीची असावी. थकबाकी वसुलीसाठी गांभीर्याने प्रयत्न केले पाहिजेत. येत्या काही दिवसांत वकिलांची बैठक बोलवून थकबाकीचा प्रश्न कायमचा निकालात काढा. प्रत्येक कर्मचाऱ्याने बँकेची वेळ पाळण्याची गरज आहे. सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच या कालावधीतच बँकेच्या कामालाच प्राधान्य द्या. व्यवसाय वाढीसाठी ग्राहकांभिमुख सेवेसाठी कायम तत्परता हवी. सर्व शाखांत बदल्यासाठीचे शेकडो अर्ज येतील. मात्र, त्याच शाखेत बदलीसाठी कोणत्याही कर्मचाऱ्याने भेटू नये. जिल्ह्यातील प्रत्येक शाखेच्या व्यवसाय वृद्धीसाठी कर्मचाऱ्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करायला हवी. केडीसीसीच्या ठेवीतही झपाट्याने वाढ झाली पाहिजे.'

संचालक के. पी. पाटील म्हणाले, प्रत्येक कर्मचाऱ्यांनी मानसकिता बदलल्यास प्रगतीचा वेग आपोआप वाढेल. वादाचे प्रसंग टाळून प्रत्येकाने ग्राहकाभिमुख होण्याची काळाची गरज आहे.' संचालक निवेदिता माने, भय्या माने यांनीही मार्गदर्शन केले. संचालक बाबासाहेब पाटील, उदयानी साळुंखे, विलास गाताडे, सर्जेराव पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाची होणार बारमाही नोंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

फक्त पावसाळा सुरू झाल्यानंतर नोंद केल्या जाणाऱ्या पावसाची आता बारमाही नोंद केली जाणार आहे. त्याची जबाबदारी प्रत्येक मंडल अधिकाऱ्यावर सोपवण्यात आली असून कोणत्याही परिस्थितीत सकाळी साडेआठ वाजता ही नोंद झाली पाहिजे, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्व ठिकाणच्या मंडल अधिकाऱ्यांच्या स्तरावरील पाऊस ९ जूनपासून संकेतस्थळावर पहायला मिळणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय माहिती केंद्राच्यावतीने (एनआयसी) नुकतेच प्रशिक्षण झाले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांसह सर्व तहसीलदार उपस्थित होते. एनआयसीचे तंत्र संचालक विजय देशपांडे व पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयातील सतीश सांडभोर यांनी या नव्या नियोजनाची माहिती दिली. सध्या पावसाळा सुरू झाल्यानंतर प्रत्येक त​हसील कार्यालयातून सकाळी आठ वाजेपर्यंतची आकडेवाडी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवली जाते. त्यानंतर ती माहिती सरकारकडे जाते. याऐवजी आता ही माहिती सरकारच्या थेट संकेतस्थळाकडे पाठविण्यासाठी पुण्यातील एनआयसी कार्यालयाकडे द्यायची आहे. तिथून सरकारच्या संकेतस्थळावर प्रत्येक मंडळाच्या कार्यक्षेत्रानुसार ही माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे. ही माहिती एसएमएसच्या माध्यमातून दिली जाणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे केवळ पावसाळ्याच्या कालावधीसाठी ही यंत्रणा नसून बाराही महिन्यातील पावसाची प्रत्येक दिवसाची नोंद ठेवण्याचे आदेश आहेत. त्यामुळे ही यंत्रणा कायमस्वरूपी कार्यरत राहणार आहे.

आजवर तहसील कार्यालयातून त्या-त्या तालुक्यातील पावसाची सरासरी काढून आकडेवारी जिल्हा कार्यालयाला पाठविली जात होती. त्यामुळे अनेक तालुक्यातील भागात पाऊस होत नाही. मात्र तालुक्याच्या सरासरीमुळे त्या भागाची वस्तुस्थिती समजून येत नाही. तर अनेक भागातील अतिवृष्टी त्या तालुक्याला लागू होते. यातून अतिवृष्टीने ज्यांचे नुकसान होत नाही, त्यांना लाभ मिळतो. तर जिथे पाऊस नसतानाही दुष्काळाचे फायदे मिळत नाहीत. यामुळे आता प्रत्येक मंडळ अधिकाऱ्याच्या क्षेत्रातील पावसामुळे प्रत्येक भागातील पावसाचे प्रमाण समोर येणार आहे. त्यानुसार सरकारच्यावतीने पुढील कार्यवाही केली जाऊ शकते. राज्य सरकारच्या www.maharain.gov.in या संकेतस्थळावर ही माहिती पहायला मिळणार आहे. तसेच तलाठी, मंडल अधिकारी व तहसिलदारांवर ही सर्व जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२७ लाखांचे मद्य जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सरनोबतवाडी (ता. करवीर) येथील रस्त्यावर उत्पादन शुल्क विभागाने टेम्पोतून आणण्यात येणारे २७ लाख २६ हजार ४०० रुपये किंमतीचे गोवा बनावटीचे विदेशी मद्य पकडले. पोलिसांनी पाँचू हरभजन हरिजन (वय २४, रा. डेरामपूर, ता. उतरामपूर, जिल्हा गोंडा, उत्तरप्रदेश), केशरीलाल सर्ज गौतम (३०, रा. हाजीकडी, ता. उतरामपूर, जिल्हा गोंडा, उत्तरप्रदेश) या दोघांना अटक केली. या प्रकरणातील मुख्य संशयित जितेंद्र रिजवाणी (रा. उल्हासनगर, ठाणे) हा फरारी आहे. कोल्हापूर व मुंबईच्या भरारी पथकाने रविवारी सकाळी सहा वाजता ही कारवाई केली.

गोव्यातून महसूल चुकवून गोवा बनावटीचे मद्य आणले जात असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. सरनोबतवाडीजवळ सापळा रचून टेम्पो अडवला. त्यात लोखंडी बार ठेवण्यात आले होते. त्याच्या पाठीमागे २७ लाख २६ हजार ४०० रुपयाचे मद्य लपविले होते. पोलिसांनी ५५० बॉक्स जप्त केले. ७५९ मिलीच्या ९००० बाटल्या तर १८० मिलीच्या ७२०० अशा १६ हजार २०० बाटल्या पोलिसांनी मद्य आणि ट्रक असा एकूण ३७ लाख २५ हजार ३८० रुपये किंमतीचा माल जप्त केला. संशयितांना नऊ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त शामसुंदर शिंदे, संचालक प्रसाद सुवे, उपायुक्त संगीता दरेकर यांच्या मार्गदर्शनाखली निरीक्षक सुभाष जाधव, मुकुंद बिलोलीकर, बाळसाहेब जाधव यांच्या टीमने कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केएमटीचा कारभार ट्रॅकबाहेरच

$
0
0

आप्पासाहेब माळी, कोल्हापूर

केएमटीचे आर्थिक उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याचा फटका कर्मचाऱ्यांच्या वेतनासह अन्य सुविधांवर होत आहे. विमा पॉलिसी, पीएफ रक्कम आणि अल्पबचत खात्यावर जमा होणारी रक्कमच भरलेली नाही. दोन महिन्यांचा पगार अद्याप दिलेला नाही. रोज उत्पन्न असूनही केएमटीचा कारभार ट्रॅकवर येत नसल्यामुळे कामकाजाच्या ऑडिटची गरज असल्याचे कर्मचाऱ्यांचेच म्हणणे आहे.

कर्मचाऱ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षेचा विचार करून विम्यासाठीची रक्कम कपात केली जायची. सात लाख रुपयांहून अधिक रक्कम विमा पॉलिसीकरिता भरली जात होती. मात्र, गेल्या सात महिन्यांपासून ही रक्कमच भरली नाही. दुर्दैवाने कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका पोहचला, तर जबाबदार कोण? असा प्रश्न कर्मचारी उपस्थित करीत आहेत.

मे २०१४ पासून पीएफची रक्कमही भरलेली नाही. सुमारे २६ लाख रुपये बाकी आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा २५० पेक्षा अधिक रक्कम पोस्ट खात्यात गुंतवली जायची. ती पाच महिन्यांपासून बचत खात्यात जमा नाही. प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना अल्पबचत खाते योजना बंद केल्याचे पत्र दिले आहे. कर्मचाऱ्यांनी या संदर्भात प्रशासनाकडे विचारणा केली. पण रक्कम भरण्याच्या अनुषंगाने कार्यवाही झाली नाही.

वर्कशॉपमधील १८० टायरी रिमोल्ड करण्याची आवश्यकता होती. वेळेत रिमोल्ड केले असते, तर त्या पुन्हा वापरता आल्या असत्या. पण सातारा येथील एक आणि शिरोली एमआयडीसी येथील टायर रिमोल्ड कंपनीची थकीत रक्कम दिलेली नाही. यामुळे या कंपन्यांनी रिमोल्डचे काम करण्यास नकार दिला. यामुळे १८० टायरी रिमोल्डअभावी वापराविना बाद झाल्या, असे वर्कशॉपमधील कर्मचारी सांगतात.

आ​र्थिक नियोजनाची माहिती मागवली

केएमटी कर्मचाऱ्यांच्या विमा पॉलिसी, पीएफ, अल्पबचत योजनेंतर्गत पगारातून रक्कम कपात करूनही संबंधित विभागाकडे भरली नाही अशा तकारी आहेत. यासंदर्भात प्रशासनाकडून माहिती मागवली आहे. कर्मचाऱ्यांच्या रकमा देण्यासंदर्भात काय आर्थिक नियोजन केले आहे, यासंबधी विचारणा केली आहे. दोन दिवसांत माहिती मिळेल. त्यानंतर प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईचा निर्णय घेऊ. सर्वसाधारण सभेवेळी याप्रश्नी प्रशासनावर फौजदारीचा इशारा दिला आहे, असे नगरसेवक राजू लाटकर यांनी सांगितले.

९५० केएमटीकडील कर्मचारी

७.५ लाख रोजचे उत्पन्न

१ लाख १० हजार रोजची प्रवासी वाहतूक

१ कोटी ४० लाख दर महिन्याची पगाराची रक्कम

६ हजार लिटर रोज लागणारे इंधन

वर्षाला ४ कोटी विविध सवलतींवरील भार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

वाळवा तालुक्यासारख्या सधन तालुक्यातील जांभूळवाडीच्या उपसरपंच आणि महिलांनी आज पिण्याच्या पाण्यासाठी पंचायत समितीवर मोर्चा काढला. दोन दिवसांत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत झाला नाही तर ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा, त्यांनी दिला आहे. सोमवारी गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव यांना निवदेन देऊन त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. गट विकास अधिकाऱ्यांनी दोनच दिवसांत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत करू, असे आश्वासन दिले आहे.

सकाळी वाळवा तालुक्यातील जांभूळवाडी येथील उपसरपंच संगीता बांदल यांच्या नेतृत्वाखाली गांवातील महिला आणि पुरुषानी पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढला. गावात पिण्याच्या पाण्याचा गेल्या दहा दिवसांपासून पुरवठा बंद आहे, तो तातडीने सुरू करावा व ग्रामसेविकेची बदली करावी, म्हणून गेल्या दीड वर्षांपूर्वी दिलेल्या निवेदनावर अद्याप काहीच कार्यवाही झाली नसल्याबद्दल ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या वेळी सभापती रवींद्र बर्डे यांनी मध्यस्थी करून बदलीबाबत लवकरात लवकर निर्णय घेवू आणि पिण्याच्या पाण्याची गैरसोय तातडीने दूर करू, असे आश्वासन दिले. ग्रामस्थांनी दोन दिवसांत आमचे प्रश्न मिटले नाहीत तर आम्ही ग्रामपंचायतीला टाळे ठोकणार, असा पवित्रा घेत निवेदन दिले. आजच्या मार्चाचे उपसरपंच संगीता बांदल, शंकर बांदल, राजेंद्र नायकल, श्रीरंग बांदल, राजश्री बांदल, बाळाबाई बांदल, राहुल स्वामी, शुभांगी जंगम यांनी नेतृत्व केले.

या बाबत गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव म्हणाले, 'पाण्याबाबत ज्यावेळी तक्रार झाली त्यावेळी ग्रामसेविका इलेक्षन ड्याुटीवर होत्या. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत करण्यास विलंब झाला. नेर्ले येथील मुख्य पाईपलाईन फुटल्याने कामाला वेळ लागला मात्र आज पाईपलाईन दुरुस्त करुन पाणी पुरवठा सुरळीत केला आहे. ग्रामसेविका मुमताज षेख यांची बदली करावी, असे ग्रामस्थांचे निवेदन आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सांगलीत जोरदार वादळी पाऊस

$
0
0

कुपवाड : रविवारी मध्यरात्रीनंतर वादळी पावसाने सांगली, मिरज आणि जत तालुक्याच्या परिसराला जोरदार झोडपले. वादळी वाऱ्याने झाडे, वीजेचे खांब हेलकावू लागल्यानंतर वीजपुरवठा खंडीत होऊन सर्वत्र काळाकुट्ट अंधार पसरला होता. विजांच्या लखलखाटात पावसाचा जोर स्पष्टपणे दिसत होता. केवळ दोन तासांत एकूण तब्बल नव्वद मिलीमीटर पाऊस कोसळला आहे.

रविवारी दिवसभराच्या प्रचंड उष्म्याने हैराण करूव सोडले होते. त्यामुळे जोरदार पाऊस कोसळणार याची पूर्व कल्पना सर्वांनाच आली होती. नेमके तसेच झाले. मध्यरात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्याचे चित्रविचित्र आवाज घुमू लागले आणि त्यापाठोपाठ मुसळधार पाऊस कोसळू लागला. वादळी वारे आणि पाऊस म्हटले वीज हमखास गुल होते. त्यामुळे बाहेर विजांची, वादळी वाऱ्याची धास्ती आणि घरात शिजवून काढणारा उकाडा, यामुळे नागरिक हैराण झाले होते. बघता बघता अनेक ठिकाणहून पाण्याची लोट वाहू लागले. शहरातील रस्ते पाण्याखाली गेले. सर्वाधिक पाऊस सांगली आणि मिरज परिसरात २९.७ मिलीमीटर इतका कोसळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळीत कुटुंबाला ‘अंनिस’चा आधार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

जातपंचायतीने वाळीत टाकलेल्या सरताळे (ता. जावळी) येथील एका कुटुंबास अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पोलिसांच्या प्रयत्नामुळे पुन्हा सामान्य जीवन मिळाले आहे. या बाबतची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली.

सरताळे येथील भिसे कुटुंबीयांना गेली सहा महिने जातपंचायतीच्या निर्णयानुसार वाळीत टाकण्यात आले होते. त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता. स्वत:च्या मालकीच्या घरात राहात असलेल्या रूपाली भोसले यांच्या कुटुंबाशी संबंध ठेवणाऱ्या कुटुंबालाही वाळीत टाकले जाईल, अशी धमकी जातपंचायतीने दिली होती. तुम्हाला मुलगा नाही, तुमचे तोंड पाहिल्यास आमचा दिवस वाईट जातो. तुम्ही येथे राहू नका, अन्यथा तुम्हाला घरादारासहीत जाळून मारू, अशी धमकीही त्यांना दिली जात होती. या बाबत अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे भिसे कुटुंबाने तक्रार करून न्याय मिळण्याची अपेक्षा केली होती. या प्रकाराची दखल घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य सरताळे येथे गेले. पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने त्यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात अन्यायग्रस्त कुटुंब आणि जातपंचायतीच्या सर्व जणांची बैठक घेतली. सर्वांचे प्रबोधन करून सामंजस्याने या कुटुंबावरील बहिष्कार मागे घेण्यास

प्रवृत्त केले. त्या वेळी साखर वाटून संबंधित महिलेस गैरसमज विसरून आनंदाने राहण्याचे आश्वासन सर्वांनी दिले. गावकऱ्यांनीही समाधान व्यक्त केले.या वेळी अंनिसचे भगवान रणदिवे, शंकर कणसे, उदय चव्हाण, प्रशांत पोतदार आणि पोलिस निरीक्षक विवेक पाटील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कोयने’तून अखंड‌ित वीजनिर्मिती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

कोयना धरणातील पुरेशा पाणीसाठ्यामुळे ऐन कडक उन्हाळ्यातही धरणातून अखंडित वीजनिर्मिती सुरू राहिल्याने राज्यावरील उन्हाळ्यातील भारनियमनाचे संकट टळले आहे. दरम्यान, रविवारी ३१ मे रोजी गत तांत्रिक वर्ष संपुष्ठात आले. सोमवारी एक जूनपासून पुन्हा नव्या तांत्रिक वर्षास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे वीजनिर्मितीसाठी धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचा वापर करून अखंडित वीजनिर्मिती सुरूच राहणार असल्याचे कोयना धरण व्यवस्थापन सूत्रांकडून सोमवारी सांगण्यात आल्याने सध्या तरी भारनियमनाचे संकट टळले आहे.

कोयना धरणातील पाणी वाटपाबाबत अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश कृष्णा पाणी वाटप लवादाच्या धोरणानुसार कोयनेच्या पाणी वाटप तांत्रिक वर्षांचा विचार करता रविवारी ३१ मे रोजी चालू तांत्रिक वर्ष संपुष्ठात आले. या संपलेल्या वर्षात कोयना धरणातील पाण्यावर कोयना जलविद्युत प्रकल्पातून तब्बल ३ हजार ३४५ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये पोफळी वीज केंद्रातून १ हजार २२७ दशलक्ष युनिट, चौथ्या टप्प्यातून १ हजार ३९७, पायथा वीजगृहातून १०३ आणि अलोरे वीजनिर्मिती केंद्रातून ६१८ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती करण्यात आली आहे. या वीज निर्मितीसाठी ६८ टीएमसी पाण्याचा वापर करण्यात आला असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.

कृष्णा पाणी वाटप लवादानुसार धरणातील १०५.२५ पाणीसाठ्यापैकी ६७.५० टीएमसी पाण्याचा वीजनिर्मितीसाठी तर ३० टीएमसी पाण्याचा सिंचनासाठी वापर करावा लागतो. मात्र, गत तांत्रिक वर्ष संपण्याला दोन दिवस बाकी असतानाच निर्धारीत पाणीकोटा संपुष्ठात आला होता. मात्र, यंदा गत वर्षाचा पाणीकोटा वापरूनही आजअखेर धरणात ३४ टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा किमान दोन महिने पुरेल, असा धरण व्यवस्थापनाचा अंदाज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फ्लेक्समुळे विद्रुपीकरण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वारा व पाऊसामुळे येथील शहरातील उंच इमारतींवरील अनेक फ्लेक्स बोर्ड फाटले आहेत. तब्बल महिना उलटत आला तरी फाटलेल्या फ्लेक्स बोर्डची लक्तरे शहरातील दर्शनी भागावर 'झळकत' असल्याने शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. संबधित फ्लेक्स बोर्ड तातडीने हटवून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी येथील नागरीकांच्यातून होत आहे.

मुंबई हायकोर्टाच्या निर्देशांचे पालन करत कराड नगरपालिकेनेही शहरात लागणाऱ्या फ्लेक्स बोर्डबाबत कडक पावले उचलली आहेत. शहरात लागणार्या बेकायदा फ्लेक्सवर दंडात्मक कारवाईचे पाऊल पालिकेने उचलले आहे. मात्र, खासगी जागेत लावण्यात येणाऱ्या फ्लेक्स बोर्डबाबत पालिका अजूनही कारवाई करत नसल्याने येथील शहरातील प्रमुख चौक व रस्त्यांच्या दर्शनी भागातील उंच इमारतींवर मोठमोठे फलक लावण्यात येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आनेवाडी टोलनाक्यावर मॉल नाही

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

'राष्ट्रीय महामार्ग सहापदरीकरणाचे कामकाज जलद गतीने पूर्ण करावे, असे आदेश देत आनेवाडी व विरमाडे येथील जमीन मॉलसाठी नव्हे तर फक्त टोलनाक्यासाठी आणि अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेसाठीच आवश्यक असेल तेवढी संपादीत करण्यात येईल,' अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुद् गल यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाबाबत उड्डाण पुलांवरील चालू असलेल्या व बंद असलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस राजेश कुंडल (प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग पुणे), भूसंपादन समन्वयचे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, 'ज्या उड्डाण पुलाचे काम चालू आहे ते जून २०१५ पूर्वी पूर्ण करून वाहतुकीसाठी सुरू करावेत. तसेच ज्या उड्डाण पुलाची कामे अद्याप सुरू झालेली नाहीत, अशी कामे तात्काळ सुरू करावीत. महामार्गाच्या सहापदरीच्या ठिकाणी दिशादर्शक किंवा वाहतुकीचे सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.'

आनेवाडी व विरमाडे येथील टोल नाक्यासाठी जमीन संपादनाबाबत, मॉलसाठी मोठ्या प्रमाणात जमीन संपादन करण्यात येणार आहे, अशी अफवा पसरल्याने त्याठिकाणी जमीन संपादन करण्यास स्थानिक शेतकऱ्यांचा मोठा विरोध आहे. ती जमीन फक्त टोलनाक्यासाठी आणि नियंत्रण कार्यालय, अपघातग्रस्त मदत करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेसाठीच संपादन करण्यात येणार आहे.

आनेवाडीमधील ६२ गुंठे विरमाडेमधील एक हेक्टर १२ गुंठे इतकी जमीन संपाद‌ित करावी. विरमाडेमधील स्थानिक शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून गैरसमज दूर करावा.

- आश्विन मुद् गल, जिल्हाधिकारी सातारा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images