Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

विजेच्या धक्क्याने मुलाचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

विजेचा धक्का बसून खोतवाडी (ता. हातकणंगले) येथील शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रसाद संभाजी खोत (वय १४, रा. हनुमाननगर रिक्षा स्टॉपजवळ) असे मुलाचे नाव आहे. ही घटना बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची नोंद शहापूर पोलिस ठाण्यात झाली आहे.

खोतवाडी परिसरात तारदाळ-खोतवाडी पाणी पुरवठा योजनेतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. खोतवाडी गावात बुधवारी तब्बल आठ दिवसानंतर पाणी सोडण्यात आले होते. पाणी भरण्यासाठी खोत यांच्या घरात विद्युत मोटार जोडण्यात आली होती. मोटर सुरु असताना लावलेली पाइप निघाली. त्यामुळे प्रसाद ती पाइप बसविण्यासाठी गेला. मोटर सुरु असतानाच तो पाइप बसवत असतानाच त्याला विजेचा तीव्र धक्का बसला. प्रसाद याला पालिकेच्या आयजीएम रुग्णालयात आणले. याठिकाणी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रसाद हा तात्यासाहेब मुसळे विद्यालयात इयत्ता नववीमध्ये शिकत होता. त्याच्या पश्चात आई, वडील व बहीण असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘पंचगंगे’ कडे दुर्लक्षच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा तालीम प्रभागातील पंचगंगा नदीमध्ये परीट घाटामुळे होणाऱ्या प्रदूषणाकडे दुर्लक्ष झाले आहे. तसेच शहरी व ग्रामिण भागाचा आधार असलेल्या पंचगंगा हॉस्पिटलचे विस्तारीकरण व आधुनिकीकरणाकडे दुर्लक्ष झाले. गटर, रस्ते, पिण्याचे पाणी या सुविधाची कमालीची सुधारणा झाली असली तरी २० टक्क्याहून अधिक भागात रस्ते, गटरची कामे झालेली नाहीत.

पंचगंगा नदीजवळ सर्वात जुनी वस्ती असलेला हा भाग आहे. शंकराचार्य मठ, मस्कुती तलाव, ललितकुमार भिशी, धनवडे गल्ली, सोमेश्वर गल्ली, अवधूत गल्ली, गवंडी मस्जिद, शिंदे पॅसेज, केसापूर पेठ, कागदी गल्ली, शाहू हायस्कूल, भोई गल्ली, जामदार क्लब, गायकवाड या भागांचा प्रभागात समावेश होतो. हा भाग सखल भागात असल्याने पाणी मुबलक आहे. जैन मठ, अवधूत गल्ली परिसरात थोडा कमी दाबाने पाणीपुरवठा होत असला तरी पाणी मात्र मुबलक आहे. गवंडी मोहल्ला, शिंदे पॅसेजमध्ये डांबरीकरण झालेले नाही. या परिसरात कोंडाळ्यातील कचऱ्याचा उठावही नि​यमित होत नाही. भोई गल्ली, जामदार क्लब, गायकवाड वाडा या छोट्या रस्त्यांवर डांबरीकरण झालेले नाही.

पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी महानगरपालिकेकडून प्रयत्न केले जात असले तरी स्थानिकांकडून सहकार्य मिळत नाही. पंचगंगा तालमीकडून आलेल्या मोठ्या गटारीचे पाणी परीट घाटामार्गे सांडपाणी थेट नदीत मिसळते. परीट घाटाजवळ म्हशी नियमित धुतल्या जातात. सोमवारी नदीला प​रड्या सोडल्या जातात. यामुळे नदीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. परीट घाटावर कपडे धुतले जातात. नदी प्रदूषण होऊ नये, म्हणून महानगरपालिकेकडून कोणतेही प्रयत्न केले जात नाही. एक महिन्यापूर्वी आरोग्य अधिकाऱ्यांनी परीट घाटावर कपडे धुण्यास व म्हशी धुण्यास बंदी घातली होती. पण स्थानिक नगरसेवक प्रकाश गवंडी यांनी विरोध केला होता. कपडे व म्हशी धुण्याची सोय करावी मग बंदी आणावी अशी मागणी केली होती. पंचगंगा ब्राह्मण घाट ते शंकराचार्य मठ हा परिसर हागणदारी मुक्त करण्यासाठी तात्पुरते शौचालय करण्याची गरज आहे. तसेच महिलांना स्नान करण्यासाठी कायमस्वरूपी बाथरूमची गरज आहे. या परिसरातील ग. गो. जाधव शाळेची रंगरंगोटी करण्यात आली आहे पण शाळेच्या बाहेरील दोन खोल्या अडगळीत पडल्या आहेत. मस्कुती तलाव परिसरातील शाळेसाठी भुख्ंड आरक्षित करण्यात आला आहे.

पंचगंगा हॉस्पिटलकडे दुर्लक्ष

पंचगंगा हॉस्पिटलमध्ये परिसरातील व ग्रामिण भागातील गरीब कुटुंबातील महिला प्रसुतीसाठी येतात. या हॉस्पिटलमध्ये दिवसेदिवस गर्दी वाढत आहे पण त्याप्रमाणात सुविधा नसल्याने कमी पायाभूत सुविधा असतानाही प्रसती केल्या जातात. हॉस्पिटलचे विस्तारीकरण व आधुनिकीकरण करण्याकडे मात्र दुर्लक्ष आहे. हॉस्पिटलमध्ये लिफ्टची सोय करण्याची मागणी केली जात आहे. दोन वर्षापूर्वी डागडुजी करण्यात आली पण हॉस्पिटलचा विस्तार करण्याची दृष्टी प्रशासन व नेतृत्वाला दाखवता आलेली नाही.

प्रभागातील ८० टक्के रस्ते व गटरांचे काम पूर्ण केले आहे. त्यासाठी प्रयत्न करत आहे. पंचगंगा प्रदूषणमुक्त झाली पाहिजे, या मताचा मी आहे पण कपडे धुण्यासाठी व म्हशी धुण्याची सोय महानगरपालिकेने करून दिली पाहिजे.

- प्रकाश गवंडी, नगरसेवक

प्रभागात रस्ते, गटर, स्ट्रीट लाइट, स्वच्छता ही कामे अतिशय चांगली झाली आहेत. पण उठावदार काम झालेले नाही. पहिली तीन वर्षे रस्ते अतिशय खराब होते. केलेले रस्ते कोणत्या दर्जाचे आहेत, हे पावसाळ्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

- रोहित बुचडे, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीच्या हंगामासाठी ‘मारहाणी’ची छाप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नगरसेवकपद मिरवण्यापलिकडे काही केले नाही. विकास कामांबाबत कधी प्रशासनाशी पंगा घेतल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे नागरिकांची समस्या दूर होण्याचा प्रश्नच नाही. पाच वर्षाचा कालावधी जसा कमी होऊ लागला तसे प्रभागात नवनवे विरोधक निर्माण होऊ लागले. या परिस्थितीत नवी विकास कामे होऊ शकत नसल्याचे माहिती असल्यानेच प्रभागात छाप उमटवण्यासाठी कर्मचाऱ्यांवर हात उचलण्यापासून अधिकाऱ्यांशी शिवीगाळीचे प्रसंग सध्या वारंवार उद्भवू लागले आहेत.

महापालिकेच्या एका अधिकाऱ्याला नुकत्याच झालेल्या मारहाणीबरोबरच स्थायी, सर्वसाधारण सभांमधून नगरसेवकांनी प्रशासनाला सळो की पळो करुन सोडण्याचे धोरण अवलंबले आहे. यापाठीमागे काही महिन्यांवर येऊन ठेपलेली निवडणूक हेच महत्वाचे कारण आहे. महापालिकेच्या या पंचवार्षिकमध्ये नवीन कोणत्याही प्रकल्पाशिवाय शहराची वाटचाल सुरु राहिली. पाणी, रस्ते, गटारी या व्यवस्था प्रशासन असेपर्यंत सुरु राहतात. पण यातून फार मोठे काम केल्याचा समज नगरसेवकांकडून होत असतो. या पाच वर्षात तर अनेक नगरसेवक महापालिकेकडे केवळ सर्वसाधारण सभेपुरते फिरकले. त्यामुळे त्यांना भागात नवीन प्रकल्प आणायचा हे दूर, त्यांना नेहमीच्या कामासाठी निधीही मिळवताना आटापीटा करावा लागल्याचे चित्र पहायला मिळते. त्यामुळे भागात विकास कामांच्यादृष्टीने ओरड हे स्वा​भाविकच होते. कुठे गटार तुंबल्याची नागरिकांची तक्रार आली की आरोग्य विभागाचे कर्मचारी पाठवायचे, कचऱ्याचा कोंडाळा ओसंडला की कचऱ्याची गाडी पाठवायची इतकीच कामे केली. मात्र निवडणुकीचा कालावधी जवळ येऊ लागला तसे प्रभागात अनेक इच्छूक तयार होऊ लागले आहेत.

विरोधक भागात संपर्क वाढवून पाच वर्षात नगरसेवकांनी काय केले याबाबत नागरिकांचे कान फुंकण्यास सुरुवात केली आहे. त्यावेळी विद्यमान नगरसेवकांची पाच वर्षाची धुंदी उतरण्यास सुरुवात झाली आहे. त्यातूनच भागातील नागरिक विरोधकांकडे वळू नये यासाठी त्यांची कामे करण्यासाठी आटापीटा करताना दिसत आहेत. त्यातूनच मी सांगेल त्याप्रमाणे भागात काम झाले पाहिजे, असा अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे त्यांचा आग्रह वाढत आहे. ७७ नगरसेवकांमधील काही अपवाद सोडल्यास हा आग्रह बहुतांशजणांचा होत असल्याने प्रशासनालाही त्यांच्या इच्छेप्रमाणे काम करणे शक्य होत नाही. त्यातून थोडा कालावधी लागल्यास नगरसेवक थेट हातघाईवर उतरु लागले आहेत. त्यातही मानधनावर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना संघटनाही जवळ करत नाही. त्यामुळे मानधनवाल्यांची चांगलीच कोंडी होताना दिसत आहे. प्रशासनाकडूनही अशा कर्मचारी, अधिकाऱ्यांबाबत होणाऱ्या प्रकाराबाबत कडक धोरण अवलंबले जात नसल्याने नगरसेवक यापुढील काळात शिरजोर होण्याचीच भीती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीपी अधांतरी

$
0
0

ठेकेदार कंपनीला करार संपविण्याचे पत्र

उदयसिंग पाटील, कोल्हापूर

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी नेमलेल्या विश्वा इन्फ्रास्टक्चर प्रा. लि. कंपनीला महापालिकेने बऱ्याच मुदतवाढीनंतर आता करार संपुष्टात आणण्याबाबतचे निर्वाणीचे पहिले पत्र दिले आहे. शहरातून होणारे पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी 'विश्वा' ला चार वर्षापूर्वी कंत्राट दिले होते. यानंतर अजूनही लाईन बाजार जॅकवेलच्या कामाला सुरुवात झालेली नाही. तसेच प्रक्रिया झालेले पाणी वाहून नेण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या पाइपलाइनचे काम सुरु आहे.

शहरातील जयंती नाल्यातून वाहून येणाऱ्या सांडपाण्याबरोबरच इतर दहा नाल्यांच्या सांडपाण्यातून पंचगंगा नदीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत होते. प्रदूषण रोखण्यासाठी या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्याने केंद्र सरकारकडून या प्रकल्पाचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्याप्रमाणे ७६ एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, लाइन बाजार नाल्याजवळ जॅकवेल बांधून तेथील व बापट कॅम्प येथील नाल्याचे सांडपाणी प्रकल्पाकडे वळवण्याचे काम विश्वा इन्फ्रास्ट्रक्चरला देण्यात आले होते. २०११ साली झालेल्या प्रक्रियेनंतर प्रकल्पाचे काम सुरु झाले. पण २०१३ पासून हे काम रखडण्यास सुरुवात झाली. यामुळे महापालिकेने पाचवेळा या कामासाठी मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर हायकोर्टात झालेल्या याचिकेमुळे प्रशासनाने कंत्राटदार कंपनीला काम संपवण्यास अक्षरशः पाठ घेतली होती. त्यामुळे ​एप्रिलमध्ये हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास सज्ज झाला.

मात्र लाइन बाजारमधील नाल्यावरील जॅकवेलचे काम व बापट कॅम्पमधील नाल्यावरील कामाला सुरुवातच केलेली नाही. सध्या हायकोर्ट प्रत्येक सुनावणीमध्ये महापालिकेला कामाच्या परिस्थितीची वस्तुस्थिती विचारत आहे. तसेच सामाजिक संस्थाही लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे महापा​लिकेला आता काम पुर्ण करुन घेण्याशिवाय पर्याय नाही. आतापर्यंत बऱ्याचदा मुदतवाढ दिल्या. पण पाणीपुरवठा विभागाने नुकतेच करार संपुष्टात आणण्याबाबतचे पहिले पत्र दिले आहे. त्यानुसार महिनाभरात जर कंत्राटदाराने या कामाबाबत वेग दाखवला नाही तर करार संपुष्टात आणला जाऊ शकतो. कंपनीकडून आतापर्यंत जवळपास ८० लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. अजूनही पुढील कामाबाबतचा दंड आकारणी केली​ जाणार आहे. संबंधित कंपनीला या प्रकल्पाबाबत काही आर्थिक अडचणी आल्या. त्यामुळे या प्रकल्पातून कंपनी काढता पाय घेऊ शकते अशी चर्चा सुरु आहे. मात्र अगदी शेवटच्या टप्प्यातील काम शिल्लक असल्याने कंपनी नेमका काय निर्णय घेते यावर या प्रकल्पाची यशस्वीता अवलंबून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदा उच्चांकी निकाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत यंदाही मुलींनी बाजी मारली असून, कोल्हापूर विभागाचा निकाल ९२.१३ टक्के लागला. हा कोल्हापूर मंडळाच्या इतिहासातील उच्चांकी निकाल आहे. राज्याच्या गुणवत्ता यादीत कोल्हापूर विभागीय मंडळाने तिसरा क्रमांक मिळविला. विज्ञान शाखेचाही सर्वाधिक ९६.९२ टक्के निकाल लागल्याची माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली. ऑनलाइन निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला.

कोल्हापूर विभागीय मंडळातंर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील २५७ कॉलेजमधून ४३,३०३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. कोल्हापूरचा निकाल ९१.६४ टक्के आहे. सांगली जिल्ह्यातील २२८ कॉलेजमधून २९,९७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. जिल्ह्याचा निकाल ९२.२८ टक्के आहे. सातारा जिल्ह्यातील २१७ कॉलेजमधून ३३, ३४९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून ९२. ६४ टक्के निकाल लागला. कोल्हापूर विभागातील ७०२ कॉलेजमधून १,१५,९०३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. पैकी १,१५, ७३७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात १,६६,०३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

बारावीसाठी ६४, ५३० मुले आणि ५१,२०७ मुलींनी परीक्षा दिली. यात मुलींची उत्तीर्णतेची संख्या ५७,३३४ असून त्याचे प्रमाण ८८.८५ टक्के आहे. सन २०१४ चा गतवर्षीचा निकाल ९१.५४ होता. त्या तुलनेत या वर्षीच्या निकालात ०.५९ टक्के वाढ झाल्याचे सचिव गोसावी यांनी सांगितले. या वेळी शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जबाबदारी विमानपत्तनचीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणासाठी संपादित करायच्या वन विभागाच्या जागेचा प्रस्ताव भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाने (एएआय) देण्याचा आदेश जिल्ह्याचे पालक सचिव राजगोपाल देवरा यांनी बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत दिला. प्रस्ताव उपवनसंरक्षकाकडे देण्यासाठी आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून ठप्पच असलेल्या या प्रक्रियेला आता वेग येणार आहे.

विमानतळ विस्तारीकरणासाठी राज्य सरकारने जागा संपादित करून दिली आहे; पण धावपट्टी वाढवण्यासाठी शेजारील वन विभागाची दहा हेक्टर जागा आवश्यक आहे. त्या जागेअभावी धावपट्टीचे विस्तारीकरण रखडले.

त्यातील पाच हेक्टर जागा देण्यास वन विभाग तयार आहे. या जागेचा प्रस्ताव प्राधिकरणाने की राज्य सरकारने द्यायचा या वादात दोन वर्षांपासून भूसंपादन रखडले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही कोंडी फोडण्यासाठी मुंबईत प्राधिकरण व राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार बुधवारी दुपारी देवरा यांच्याकडे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी व प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची

बैठक झाली.

काही कंपन्यांच्या विमानसेवेसाठी प्रयत्न सुरू असून त्याची चर्चाही बैठकीत झाली. त्याबाबतची माहितीही देवरा यांनी घेतली.

दिल्ली अभी दूर है

यामध्ये देवरा यांनी ती जागा निवर्नीकरण करणे आवश्यक आहे. तसेच ती जागा आवश्यक असल्याबाबतचा प्रस्ताव प्राधिकरणाने कोल्हापूरच्या उपवनसंरक्षकांकडे आठवड्यात द्यावा असे आदेश दिले. त्यानंतर त्या प्रस्तावाला मुंबई, दिल्ली येथील मंजुरीचे टप्पे पूर्ण करावे लागणार आहेत. मात्र अजूनपर्यंत जागेची मागणीच नसल्याने पुढील प्रक्रिया सुरू होण्याचा प्रश्नच नव्हता. आता या प्रस्तावामुळे ही प्रक्रिया सुरू होऊन पुढील मंजुरीच्या पाठपुराव्यासाठी लोकप्रतिनिधींना प्रयत्न करणे शक्य होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा हेल्पलाइनने दिले पवनला बळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र टाइम्सच्यावतीने दहावीमध्ये प्रतिकूल स्थितीत शिक्षण घेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन उपक्रम राबवला जातो. २०१३ ला या उपक्रमातून मदत मिळालेल्या पवन किसन सोनवले या राजेंद्रनगर झोपडपट्टीतील विद्यार्थ्याने १२ च्या कॉमर्स शाखेच ६७ टक्के इतके गुण मिळवले आहेत. सोनवले गोखले कॉलेजचा विद्यार्थी आहे.

पवनला दहावीमध्ये ६० टक्के गुण मिळवले होते. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असूनही नोकरी करत नाइट कॉलेजला जावून त्याने चांगले यश मिळवल्याने त्याची निवड हेल्पलाइनसाठी झाली होती. पवनचे वडील मजुरी करतात तर आई गृहिणी आहे. किसनचा लहान भाऊ विनायक मजुरीचे काम करतो. तर बहिण विशाल आणि राणी यांचे लग्न झाले आहे.

पवन म्हणाला, 'महाराष्ट्र टाइम्सच्या हेल्पलाइनमुळेच १२ वी करता आली. गोखले कॉलेजच्या शिक्षकांचेही फार मोठे सहकार्य लाभले. हेल्पलाइनची मदत झाल्याने मी पूर्णवेळ अभ्यास करू शकलो. दररोज संध्याकाळी अभ्यास करत होतो, तर परीक्षेच्या काळात सकाळ आणि संध्याकाळी अभ्यास केला.'

पवन म्हणाला, 'घरात कुणाचेही शिक्षण झालेले नाही. शिक्षणातून पुढे काहीतरी करून दाखवायचे असे ठरवले आहे. बीकॉमला प्रवेश घेणार आहे. तसेच सीए होण्यासाठी काय करता येईल, याची माहितीही घेत आहे. 'मटा' आणि 'मटा'च्या वाचकांनी मदत देऊन फार मोठा विश्वास दाखवला. त्याला पात्र राहण्याचा प्रयत्न करणार आहे.'

दीपक घोलपेला ८५ टक्के मार्क्स

दीपक घोलपे याचीही निवड हेल्पलाइनसाठी निवड झाली होती. दीपकला विवेकानंद कॉलेजचा विद्यार्थी असून त्याला ८५ टक्के इतके गुण मिळाले आहेत. कसबा बावडा येथे राहण्यास असलेल्या दीपकची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. दहावीला त्याला ९२ टक्के इतके गुण होते. हेल्पलाइनमुळेच करिअर करता येणार असल्याचे त्याने सांगितले. दीपकने मेकॅनिकल इंजिनीअर होण्याचे ठरवले आहे.

अमृता मोरेला ७७ टक्के मार्क्स

एस. एम. लोहिया ज्युनिअर कॉलेजमधील अमृता मोरे हिला सायन्समधून ७७ टक्के इतके गुण मिळाले आहेत. तिचीही आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने तिची निवड 'मटा हेल्पलाइन'साठी झाली होती. अमृताला दहावीत ९३ टक्के इतके गुण मिळाले होते. बीएस्सी करून स्पर्धा परीक्षा देणार असल्याचे अमृताने सांगितले. तसेच हेल्पलाइनचे फार मोठे सहकार्य मिळाल्याचे तिने सांगितले.

शहरातील काही कॉलेजची उत्तीर्णतेची टक्केवारी

मौलाना आझाद उर्दू कॉलेज : १००

राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज : ८७.४६

शहाजी छत्रपती महाविद्यालय : ७०.५८

देशभक्त रत्नाप्पाण्णा कॉलेज ऑफ कॉमर्स : ९७.७०

गोखले कॉलेज : ८४.९७

चाटे स्कूल (शाहूपुरी) : १००

न्यू कॉलेज : ९३.११

तात्यासाहेब तेंडुलकर ज्युनिअर कॉलेज : ९३.८५

एस. एम. लोहिया ज्युनिअर कॉलेज : ९६.२५

मेन राजाराम हायस्कूल, ज्युनिअर कॉलेज : ९६.२५

नाईट कॉलेज ऑफ आर्टस अँड कॉमर्स : ७७.११

केएमसी कॉलेज : ६६.६७

कमला कॉलेज : ९२.७९

राजर्षी छत्रपती शाहू महाराज ज्युनिअर कॉलेज : ९५.७९

खासदार गायकवाड कॉलेज : ९२.२१

राजर्षी छत्रपती शाहू महाराज ज्युनिअर कॉलेज : ९५.७९

डी. डी. शिंदे सरकार कॉलेज : ९८.७५

विद्यापीठ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज : ८८.१५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लताच्या यशाचा आनंद घरभर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आदिवासी कुटुंबातील असलेली विवेकानंद कॉलेजची विद्यार्थिनी लता दाते हिने कला शाखेतून ८६.४६ टक्के गुण मिळवत लख्ख यश मिळवले आहे. वडील शिपाई, आई शेतमजूर अशी प्रतिकूल स्थिती असलेल्या लताने जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले आहे. दाते कुटुंब बुधवारी दुपारपासून 'लेकीनं नाव काढलं,' अशा भावना व्यक्त करीत लताची गोड बाती सर्वांना सांगत होते.

मूळचे पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील नानवडे गावचे असलेले दाते कुटुंब सध्या कसबा बावडा येथे श्रीराम हाउसिंग सोसायटीनजीक भाड्याच्या घरात राहतात. लताचे वडील खेवजी यांचे शिक्षण ७ वीपर्यंत झाले आहे. शिये येथील नवजीवन ‌शिक्षण प्रसारक मंडळात ते १९९७ पासून काम करतात. लताची आई अलका अशिक्षित असून शेतमजूर म्हणून काम करतात. लताचा मोठा भाऊ मछिंद्र बीएच्या दुसऱ्या वर्षात विवेकानंद कॉलेजमध्येच शिकतो. खेवजी यांच्या पायावर तीनवेळा शस्त्रक्रियाही झाली आहे.

लता लहानपणापासून अभ्यासात तल्लख असल्याचे खेमजी सांगतात. ते म्हणाले, 'आमचेच शिक्षण झाले नसल्याने लताला फार काही मदत करता येत नाही. दहावीत तिला ७० टक्के गुण असूनही सायन्सचा खर्च पेलणार नाही म्हणून कला शाखेत प्रवेश घेतला. तिला खासगी ‌शिकवणी कधीच लावता आली नाही.' आई भांगलणीसाठी जात असल्याने लताला घरकामातही मदत करावी लागते. सुट्या असल्याने लता गावी गेली आहे. तिला ८६.४६ टक्के गुण मिळाल्याचे तिच्या वडीलांनी तिला फोनवरून कळवले.

इंग्रजीत कमी गुण तरीही अव्वल

विवेकानंद कॉलेजमध्ये कला शाखेत लताचा तिसरा क्रमांक आला आहे. लताला इंग्रजीत ५१ गुण मिळाले आहेत. तर मराठी (९०), ‌इतिहास (९२), भूगोल (९२), राज्यशास्त्र (९०), सामाजिक शास्त्रे (९७) आणि पर्यावरण शिक्षण याविषयात ५० पैकी ५० गुण मिळाले आहेत. लताला इंग्रजीविषयात थोडे अधिक गूण मिळाले असते तर तिला याहीपेक्षा अधिक गूण मिळाले असते असे खेवजी म्हणाले.

कॉलेजच्या शिक्षकांची मोठी मदत झाल्याचे सांगितले. आता यापुढे स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत, जिल्हाधिकारी व्हायचे आहे. - लता दाते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शाहू समाधीस्थळाचे काम लवकरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाच्या विकासाच्या कामाला सुरूवात करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महापालिकेने पहिल्या टप्प्यात समाधीस्थळ विकसित करण्यासाठी ७० लाखांची तरतूद केली आहे. येत्या दोन दिवसांत कामांची निविदा काढली जाणार आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांची समाधी नर्सरी बाग परिसरात व्हावी असा उल्लेख त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये केला होता. या परिसरात छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी ताराराणी मंदिर आहे. राजर्षी शाहू महाराज यांचे समाधीस्थळ विकसित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. साधारणपणे चार कोटी रुपयेहून अधिक रक्कम खर्च करून समाधीस्थळाची बांधणी केली जाणार आहे. दरम्यान, समाधीस्थळासाठी पहिल्या टप्प्यात ७० लाख रुपयांची तरतूद केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

राजर्षी शाहू समाधीस्थळाच्या कामाला लवकरच सुरूवात करण्यासंदर्भात प्रयत्नशील आहे. आयुक्त पी. शिव शंकर यांच्यासोबत चर्चा झाली आहे. निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामाला येत्या काही दिवसात सुरूवात होईल. समाधीस्थळाच्या उभारणीसोबतच परिसराचा विकासही केला जाणार आहे.

- आदिल फरास, स्थायी सभापती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४०० पोलिसांच्या बदल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरच्या होम डीवायएसपीपदी अनिल पाटील यांची नियुक्ती झाली. किसन गवळी यांची नांदेड जिल्ह्यातील बिलोली पोलिस उपअधीक्षकपदी बदली झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ४०० पोलिस कर्मचाऱ्यांची विनंतीनुसार बदली केल्या आहेत.

पाटील याआधी करमाळा पोलिस उपअधीक्षक म्हणून कार्यरत होते. सीआयडीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक सतीश माने यांची सिल्लोडच्या पोलिस उप अधीक्षकपदी बदली झाली आहे. कोल्हापूर एसआरपीचे समादेशक रामचंद्र केडे यांची औरंगाबाद एसआयपी समादेशकपदी बदली झाली आहे.

कोल्हापूर परिक्षेत्रातील सहा पोलिस निरीक्षकांच्या व एका सहाय्यक पोलिस निरीक्षकांची बदली झाली आहे. गडहिंग्लजचे पोलिस निरीक्षक रामदास इंगवले यांची पुणे ग्रामीण, विश्रामबागचे कृष्णदेव पाटील यांची साताऱ्याला तर सांगली वाहतूक शाखेचे निरीक्षक संजय गोरले यांची पुणे ग्रामीणकडे, सोलापूर ग्रामीणचे संजय गिड्डे यांची साताऱ्याला, पुणे ग्रामीण येथील नितिन गोकावे यांची कोल्हापूर तर पुणे ग्रामीणचे तुळशीराम जाधव यांची सांगलीला बदली झाली आहे. कोल्हापूर कंट्रोल येथील सहाय्यक निरीक्षक अर्चना बोदडे यांची पुणे ग्रामीणकडे बदली झाली आहे.

दरम्यान, पाच वर्षे एकाच पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या ४०० पोलिसांच्या विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या. अलंकार हॉलमध्ये जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यातील बदल्यासंबंधीचा चार्ट स्क्रीनवर दिसत होता. चार्टवर रिक्त असलेल्या जागा लक्षात घेऊन विनंती बदली करण्यात आल्या. ९० टक्क्याहून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांना घराजवळची पोलिस ठाणी मिळाली आहेत. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यातील तब्बल ४२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूल्यांकननिश्चिती १५ पर्यंत

$
0
0

समितीची तीस तारखेला कोल्हापुरात बैठक घेण्याची मागणी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रस्ते विकास प्रकल्पांतर्गत साकारलेल्या रस्त्याची कामे अपुरी आणि निकृष्ट आहेत. प्रकल्पाची किंमत निश्चित करताना प्रकल्प कालावधी दरम्यानच्या कामाची जिल्हा दर सूचीनुसार (डीएसआर) मूल्यांकन नको. ज्या कामांचा दर्जा योग्य नाही त्याचा दर कमी करावा. डीएसआरपेक्षा कमी दरानेच संबंधित रस्त्यांची किंमत निश्चित व्हायला हवी, अशी सूचना राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. फेरमूल्यांकन समितीचे सदस्य राजेंद्र सावंत यांनी राज्य सरकारला तसे कळविले आहे.

रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय फेरमूल्यांकन समिती नेमली आहे. मूल्यांकननिश्चिती १५ जूनपर्यंत होण्याची अपेक्षा आहे. सध्या रस्त्याच्या सर्व्हेचे काम सुरू आहे. याचा आढावा, आयआरबीने रस्ते विकास प्रकल्पात ठेवलेल्या त्रुटी, या संदर्भात चर्चा करण्यासाठी समितीसह एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांची ३० मे रोजी कोल्हापुरात बैठक घ्यावी, अशी मागणी केल्याचे समिती सदस्य राजेंद्र सावंत यांनी सांगितले. आयआरबीने बीओटी तत्वावर ४९ किलोमीटरचे रस्ते बांधले आहेत. रस्त्यांची कामे करताना २००९-१० आणि २०१०-११ या वर्षातील दर सूचीनुसार दर निश्चित केला आहे. मात्र झालेल्या कामाचा दर्जा योग्य नाही, अनेक कामे अपुरी आहेत. यामुळे प्रकल्पाचे मूल्यांकन निश्चित करताना दर कमी झाला पाहिजे. या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.

नोबेल इंटरेस्ट इंजिनीअर्स कंपनीने आतापर्यंत सात रस्त्यांचा सर्व्हे केला आहे. त्यापैकी सहा रस्त्यांचे क्रॉस चेकिंग (तपासणी) आर्किटेक्ट अँड इंजिनीअर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. अजून आठवडाभर सर्व्हेचे काम चालण्याची शक्यता आहे. त्यानंतर आर्किटेक्ट अँड इंजिनीअर्सतर्फे पुन्हा तपासणी होणार आहे. 'नोबेल'च्या सर्व्हे आणि मूल्यांकनानंतर एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर अहवाल सादर होणार आहे. समितीकडून प्रकल्पाच्या मूल्यांकनाची किंमत १५ जूनपर्यंत निश्चित होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोरक्या शुभांगीची भरारी

$
0
0

'मटा हेल्पलाइन'च्या शिलेदारांचे धवल यश

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आईवडिलांचे छत्र लहानपणीच हरविले. शिक्षणासाठी शेतमजुराचे काम करीत असलेल्या काकीकडे शालेय शिक्षण घेतले. फुलेवाडी परिसरात भाड्याने रहात असलेल्या शुभांगी साळोखेने दहावीत ९१ टक्के तर बारावीतही ८८ टक्के गुण मिळविले आहेत. घरकाम आणि काकीला मदत करीत तिने कॉमर्समध्ये देदीप्यमान यश मिळविले आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'ने दहावीतील या गुणवंत विद्यार्थिनीला 'मटा हेल्पलाइन'च्या माध्यमातून मदत केली होती.

कर्नाटकातील जमगी येथून साळोखे कुटुंबीय कोल्हापुरात स्थायिक झाले. शुभांगीचे वडीलही मजुरी करूनच उदरनिर्वाह करीत होते. फुलेवाडी रोडवरील लक्ष्मी नारायण कॉलनीत शुभांगी आपले काका दिनकर साळोखे यांच्याकडे राहते. तिला एक भाऊ आणि बहीण आहे. काका दिनकर आणि काकी संगीता दोघेही शेतमजुरी करतात. दिवसाला ७० ते १०० रुपये मजुरी मिळते. अशा हलाखीच्या परिस्थिती जिद्दीने अभ्यासाची कास धरली. दहावीत ९१ टक्के पर्यंत बाजी मारल्यानंतर

बारावीतही जिद्दीने अभ्यास करून ८८ टक्के गुण मिळविले आहेत. तिने अकाउंटन्सी विषयात १०० पैकी ९९ गुण मिळविले आहेत. तिची अभ्यासाची जिद्द पाहून परिसरातील फुलेवाडी सोशल फाउंडेशनने बारावीची पुस्तके दिली. कॉलनीतील सेवानिवृत्त कर्मचारी बी. के. जाधव यांनीही अकाउंटन्सी विषयासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या बळावरच आजपर्यंतची वाटचाल सुरू आहे. गरीब आहेत पण पैसे नसल्याने शिक्षण पूर्ण होत नसलेल्या अनेक विद्यार्थ्यांचा शोध महाराष्ट्र टाइम्सने घेतला आहे. ही मदत आयुष्याला उभारी देणारी आहे.

- शुभांगी साळोखे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टरांचे सामूहिक राजीनामे

$
0
0

सुनील दिवाण, पंढरपूर

समाज कंटकांकडून होत असलेल्या त्रासाला वैतागून पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांसह १५ पैकी १२ डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या सामूहिक राजीनाम्यांच्या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

वारंवार डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांना होत असलेल्या त्रासाला वैतागून पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक पंकज गायकवाड आणि इतर १२ डॉक्टरांनी राजीनामे दिले. पंढरपूरचे उपजिल्हा रुग्णालय या तरुण डॉक्टरानी गेल्या काही वर्षांत नावारूपाला आणले होते. त्यामुळे या रुग्णालयाला चांगल्या कामगिरीबद्दल शासनाच्या आनंदीबाई जोशी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

काही वर्षांपूर्वी या रुग्णालयात रुग्ण खूप कमी संख्येने येत होते. अगदी यात्रेच्या काळातही रुग्णालय ओस पडलेले असे. मात्र, डॉ. पंकज गायकवाड, डॉ. मंदार सोनावणे यांच्यासह डॉ. गवळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या शासकीय रुग्णालयाचे रुपडेच पालटून टाकले. दररोज ५०० हून अधिक रुग्ण या रुग्णालयात तपासणीसाठी येत असतात. महिला, बालविभागातही दररोज मोठमोठ्या शस्त्रक्रिया अत्यंत माफक खर्चात केल्या जात. अपघात विभागात २४ तास सेवा देण्यात येत होती. एकूणच सोलापूर जिल्ह्यातील सगळ्यात चांगले शासकीय रुग्णालय म्हणून याकडे पहिले जात. येथील लोकप्रतिनिधी भारत भालके यांनी पुढाकार घेऊन अनेक अद्ययावत उपकरणे येथे बसवले. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांतून येथे रुग्ण खास उपचारासाठी येत असत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून काही संघटना, काही पत्रकार आणि काही समाजकंटकांनी येथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना विविध कारणांनी त्रास देण्यास सुरुवात केल्याचे या डॉक्टरांचे म्हणणे आहे. खोट्या बातम्या छापणे, उगाच वारंवार माहिती मागविणे या माध्यमातून त्रास देण्यात येत असल्याचे आधीक्षक पंकज गायकवाड यांनी सांगितले. याबाबत आता सहनशक्ती संपत आल्याने एका महिन्यापूर्वी शासनाला राजीनाम्याबाबत नोटीस पाठविली होती. मात्र शासनाने याबाबत काहीही दखल न घेतल्याने अखेर आज ८ पैकी ५ कायम सेवेत असणाऱ्या आणि ७ हंगामी सेवेत असलेल्या डॉक्टरांनी राजीनामा दिला आहे.

या राजीनाम्याच्या प्रकारामुळे शासकीय सेवेत काही चांगले करू पाहणाऱ्या डॉक्टर मंडळींच्या खचलेल्या मानासिकतेस जबाबदार कोण, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. आषाढी यात्रा अगदी तोंडावर आली आहे. मात्र, या राजीनामा सत्रामुळे रुग्णालयातील सेवेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राजीनामे देण्याबाबत महिनाभरापूर्वी कळवूनही कोणताही निर्णय न घेणारे वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लकी ड्रॉद्वारे फसवणूक

$
0
0

सांगलीः लकी ड्रॉच्या नावाखाली अनेकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या साई समर्थ मार्केटिंग कंपनीविरुद्ध वाळवा येथील १२ जणांनी तासगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या कंपनीने तासगाव, वाळवा परिसरातील अनेकांची फसवणूक केल्याच्या तक्रारी आहेत.

या कंपनीचा संचालक अंकुश कुरणे व कर्मचारी संतोष माळी (रा. खंडोबाची वाडी, ता. पलूस) यांच्याविरुद्ध ही तक्रार दाखल झाली आहे. या दोघांनी आणखी चौघांसह तासगाव येथील सैनिकी शाळेसमोर काही महिन्यापूर्वी या कंपनीचे कामकाज सुरू केले. कंपनीतर्फे ३५०, २५० व २०० रुपये हप्ता ठेव म्हणून घेऊन दर आठवड्याला लकी ड्रॉची सोडत काढली जाईल, असे आमिष दाखविण्यात आले. बक्षीस म्हणून गृहोपयोगी वस्तू बरोबरच दुचाकी, लॅपटॉप आदी वस्तू दिल्या जात. २७०० सभासद झाल्यावर लकी ड्रॉ काढला जाण्याचे आश्वासन दिले जात असे. प्रत्यक्षात मात्र मात्र काहींच घडत नव्हते. पैसे गुंतविणाऱ्यांना उद्धट, उडवाउडवीची उत्तरे दिली जात. अखेर कंटाळून गुंतवणूकदारांनी पोलिसांत तक्रार दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२ अधिकाऱ्यांच्या चौकशीचा आदेश

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

माण तालुक्यातील म्हसवडमध्ये सुरू केलेल्या चारा छावण्यात गैरप्रकार आढळल्याने कामात कुचराई केल्याचा ठपका ठेवून तेथील तत्कालीन सर्कल, तलाठ्याची चौकशी सुरू झाली आहे. या प्रकरणी ४४ शेतकऱ्याांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.

दोन वर्षांपूर्वी माण तालुक्यातील म्हसवड येथे दोन चारा छावण्या सुरू करण्यात आल्या. शासन तसेच सामाजिक संस्थांच्या माध्यमातून या छावण्या चालवण्यात आल्या. हजारो जनावरे या छावण्यांमध्ये होती. छावणी अधिकारी म्हणून मंडल अधिकारी तर चारा डेपो व्यवस्थापक म्हणून तलाठ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली. या अधिकाऱ्यांनी चारा छावण्या तसेच डेपोतून पुरवल्या जाणाऱ्या चाऱ्याच्या नोंदी ठेवल्या नाहीत. या प्रक्रियेवर त्यांचे नियंत्रण नव्हते. एकाच शेतकऱ्याने चारा छावणी तसेच डेपोचा लाभ घेतल्याचे चव्हाण यांनी अहवालात म्हटले आहे. काही जणांनी तर पुरवण्यात आलेला चारा विकल्याचेही निदर्शनास आले. या गैरप्रकारांबद्दल दोषी धरून म्हसवडचे तत्कालीन मंडल अधिकारी एस. जी. जाधव तसेच तलाठी गुलाब उगल मागले यांची चौकशी सुरू झाली आहे. या दोघांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका चौकशी अहवालात ठेवण्यात आला आहे.

या घोटाळ्याचा अहवाल साताऱ्याचे तत्कालीन प्रांत विक्रांत चव्हाण यांनी वर्षभरापूर्वीच सादर केला असतानाही संबंधितांवर कारवाई करण्यास दिरंगाई का केली, अशी विचारणा जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार महेश पाटील यांना केली आहे. ‌या कारवाईमुळे सातारा जिल्ह्यात चारा छावण्यातील गैरव्यवहारांची चौकशी होणार असून, भविष्यात असे प्रकार टाळणे शक्य होईल, अशी आशा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कमी मार्कांच्या भीतीने आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

बारावीच्या परीक्षेत कमी मार्क मिळतील या भीतीपोटी विटा येथील रचना सतीश दंडवते (वय १८) या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. निकाल जाहीर झाल्यावर तिला ५६.६७ टक्के गुण मिळाल्याचे दिसून आले. विटा येथील मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या व. रा. दिवटे ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी होती. विटा पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक सतीश दंडवते यांची ती मुलगी आहे. सकाळी दंडवते कुटुंबीय कराडला एका नातेवाईकांकडे जाणार होते. म्हणून घरच्यांची आवराआवर सुरू होती. त्याचवेळी रचना आतल्या खोलीत कपडे बदलण्यासाठी गेली; परंतु बराच वेळ बाहेर आली नाही. अखेर संशय आल्याने दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी रचनाने स्वत:ला ओढणीच्या सहाय्याने पंख्याला गळफास लावून घेतल्याचे आढळून आले. मृत्यूपूर्वी तिने लिहिलेल्या चिठीत नमूद केले आहे की, अभ्यास न झाल्याने मला कमी गुण मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी मी हे जग कायमचे सोडून जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिले पाऊल बैठकीचे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

सांगली महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पासंबधी हरित लावादाने दिलेल्या आदेशानुसार गुरुवारी तज्ज्ञ समितीची पहिली बैठक महापालिकेत झाली. त्यात घनकचरा प्रकल्पाची माहिती, तंत्रज्ञान, अंमलबजावणी, सध्याची परिस्थिती, कार्यपद्धती याविषयी सविस्तर चर्चा झाली. ही समिती अहवाल ३ जुलैपर्यंत हरित लवादास सादर करणार आहे. घनकचरा प्रकल्प राबवण्यात महापालिका प्रशासनाने दिरंगाई केल्याप्रकरणी सांगली शहर सुधार समितीच्या तक्रारीनुसार हरित लवादाने महापालिकेला कार्यवाहीची हमी म्हणून साठ कोटी रुपये भरण्यास सांगितले आहे. अन्यथा, महापालिका बरखास्त करण्याची तंबी दिली आहे. लवादानेच घनकचरा प्रकल्पासाठी तीन तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्याचे आदेश दिले. समितीमध्ये मुंबईचे प्रा. अनिल दीक्षित, गोखले इन्स्टिट्यूटच्या प्रीती मस्तकार, वालचंद कॉलेजचे पी. जी. सोनवणे यांचा समावेश आहे. समितीने गुरुवारी महापालिकेत आयुक्त अजिज कारचे यांची भेट घेतली.

या बैठकीत कोल्हापूर, पुणे येथील घनकचरा प्रकल्पांचीही माहिती तज्ज्ञांनी घेतली. समितीने समडोळी येथील महापालिकेच्या कचरा डेपो आणि मिरजेतील बेडग रोडवरील कचरा डेपोस भेट दिली. तेथील कचरा डंपिंगची माहिती घेतली.

बैठकीची माहिती देताना आयुक्त कारचे म्हणाले, 'बैठकीत प्रकल्प अहवाल, अंतिम रूपरेषा, कालावधी, कार्यपद्धती ठरवणे यावर चर्चा झाली. एसीसी सिमेंट कंपनीच्या सहकार्याने प्रस्तावित घनकचरा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय घनकचरा प्रकल्प राबवता येईल. केंद्र सरकारही घनकचरा व्यवस्थापन या विषयावर विशेष मोहीम राबवत आहे.'

हरित लवादाच्या आदेशानुसार घनकचरा प्रकल्पाच्या समितीमध्ये जेष्ठ शास्त्रज्ञ व होमी भाभा रिसर्च इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. शरद काळे, ज्येष्ठ कार्यकर्त्या ज्योती म्हापसेकर यांची नेमणूक करावी, असे पत्र सांगली सहर सुधार समितीचे अॅड. अमित शिंदे यांनी आयुक्तांना दिले आहे.

आयआयटी करणार प्रकल्प आराखडा

पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट या प्रकल्पाचा खर्च निश्चित करणार आहे. प्रकल्पासाठीचे तंत्रज्ञान, त्याचा आराखडा अमंलबजावणी ही आयआयटी मुंबई करणार आहे आणि तर स्थानिक व्यवस्थापनाची जबाबदारी वालचंद कॉलेजवर असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैद्यकीय अधीक्षकांसह १२ डॉक्टरांचा राजीनामा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

काही संघटनांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांसह १५ पैकी १२ डॉक्टरांनी राजीनामा दिला आहे. हे डॉक्टर कार्यमुक्त झाल्याने आता रुग्णालय चालणार कसे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. बंद पडण्याच्या स्थितीपर्यंत पोहोचलेल्या या रुग्णालयाला संजीवनी देण्याचे काम अधीक्षक पंकज गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते.

काही वर्षांपूर्वी फार थोडे रुग्ण या रुग्णालयात जात. अगदी यात्रा काळातही ते ओस पडलेले असे. मात्र, डॉ. पंकज गायकवाड, डॉ. मंदार सोनावणे यांच्यासह डॉ. गवळी आणि त्यांच्या टीमने हे रुग्णालय गेल्या काही वर्षांत इतके नावारूपाला आणले की, रुग्णालयाला चांगल्या कामगिरीबद्दल सरकारच्या आनंदीबाई जोशी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. रोज ५०० पेक्षा जास्त रुग्ण येथे सध्या रोज तपासणी साठी येतात. महिला, लहान मुलांच्या विभागातही रोज मोठमोठ्या शस्त्रक्रिया अत्यंत माफक खर्चात केल्या जातात. अपघात विभागात २४ तास सेवा चालू असे. सोलापूर जिल्ह्यातील सगळ्यात चांगले सरकारी रुग्णालय म्हणून या रुग्णालयाचा लौकिक होता. काही महिन्यापासून काही संघटना, काही पत्रकार आणि काही समाजकंटक यांनी येथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना त्रास देत होते, अशी या डॉक्टरांची तक्रार आहे.

'खोट्या बातम्या छापणे, उगाच वारंवार माहिती मागविणे यासह विविध कारणाने सातत्याने त्रास दिला जात होता,' असे अधीक्षक पंकज गायकवाड यांनी सांगितले. या डॉक्टरांनी महिन्यापूर्वी राजीनाम्याची नोटीस पाठविली होती, मात्र सरकारने दखल न घेतल्याने आठपैकी पाच कायम सेवेतील आणि सर्व सात हंगामी सेवेतील डॉक्टर कार्यमुक्त झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गारगोटीत सराफी दुकानात चोरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

येथील नंदकुमार भीमराव काकडे यांच्या सराफी दुकानातून २० हजार रुपयांचा ऐवज चोरी झाल्याची फिर्याद काकडे यांनी भुदरगड पोलिसांत दिली. काकडे यांचे सराफी दुकान देशपांडे गल्लीत असून बुधवारी रात्री या दुकानातून १० हजार किंमतीचे सोन्याचे नाकातील डिस्को मुगुट व १० हजार रूपये किंमतीची अर्धा किलो चांदीची मोड चोरांनी लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरकुल घोटाळ्याप्रश्नी झेडपीकडून चौकशी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, हुपरी

पट्टणकोडोली (ता.हातकणंगले) येथे दारिद्रयरेषेखालील लाभार्थ्यींची बनावट कागदपत्रे तयार करून राजीव गांधी व इंदिरा गांधी घरकुल योजनाचा लाभ घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांची जिल्हा परिषदेकडून चौकशी सुरू झाली आहे. यामध्ये अनेक बोगस प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता असून सहभागी असलेल्या अधिकारी व 'टोळक्यांचे' धाबे दणाणले आहे. या घरकुल घोटाळ्यामध्ये या टोळक्यांनी लाखो रूपयांचा गंडा घातल्याचे समजते. याबाबत ग्रामपंचायतीच्या दहा सदस्यांनी जिल्हा परिषदेकडे तक्रार केलेली होती.

दारिद्रयरेषेखालील गोरगरिबांना राजीव गांधी व इंदिरा गांधी घरकुल योजनाचा सरकारकडून लाभ होतो. हातकणंगले तालुक्यामध्ये सर्वात अधिक ६८ पात्र लाभार्थी पट्टणकोडोली गावात झाले आहेत. दारिद्रयरेषेखालील यादीमध्ये नाव नसणाऱ्या पण नावात साधर्म्य असणाऱ्या अनेकांना सरकारच्या राजीव गांधी व इंदिरा गांधी घरकुल योजनेचा लाभ मिळवून देणारे एक टोळके कार्यरत असून माहिती अधिकाराचा दुरूपयोग करून हे टोळके सरकारी अधिकाऱ्यांना आपल्या जाळयात ओढून अनेक बोगस कामे करून घेत असते.

अनेक अधिकारीही 'अर्थ'पूर्ण तडजोडी करून वरकमाईस प्राधान्य देत आहेत. या सर्वांचा लाभ उठवून सरकारच्या राजीव गांधी व इंदिरा गांधी घरकुल योजनेच्या निकषामध्ये पात्र न ठरणाऱ्या कुटुंबांना बोगस कागदपत्राद्वारे पात्र ठरवून घरकुल उभारण्यास सरकारी अनुदान मिळवून दिले आहे. त्यामुळे गरजू व पात्र लाभार्थ्यांवर अन्याय होत आहे. या प्रकारामुळे गावात मोठया प्रमाणावर असंतोष निर्माण झाला आहे. याबाबत दहा ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा परिषदेकडे तक्रार करून चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीस सुरूवात झाली. या चौकशीतून अनेक कारनामे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

याबाबत पट्टणकोडोलीचे सरपंच महेश नाझरे म्हणाले, 'या घरकुल घोटळयाची जिल्हा परिषदेकडे तक्रार होताच जिल्हा परिषदेने चौकशी समिती नियुक्त केली आहे. या चौकशीत जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.'

कारणे दाखवा नोटीस

जिल्हा परिषदेच्या चौकशी समितीचे प्रमुख श्रावण तलाम म्हणाले, ' या घरकुल घोटाळाप्रकरणी चौकशीचा आदेश प्राप्त झाल्यानंतर यामधील ३४ घरकुल लाभार्थ्यांकडे चौकशी केली आहे. त्यातून जे काही निष्पन्न झाले आहे, तो अहवाल जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे दिला आहे. लवकरच संबंधित अधिकाऱ्यांवर कारणे दाखवा नोटीस लागू करण्यात येणार आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images