Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

प्रादेशिक आराखड्यात ‘पर्यावरण’चा खोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्याचा प्रादेशिक आराखडा तयार करण्याचे काम अनेक अडचणींना तोंड देत सुरू आहे. आराखडा अंतिम टप्प्यात आला असला तरी पर्यावरण विभागाच्या अभ्यास गटाने आपला नियोजित अहवाल वेळेत दिलेला नाही. त्यामुळे आराखड्याचे काम थांबले आहे. अन्य सर्व गटांनी आपले काम पूर्ण केले आहे. कोणत्याही परिस्थितीत ऑगस्टमध्ये आराखडा प्रसिद्ध करायचा असल्याने आता नगररचना विभागाने इतर ठिकाणाहून पर्यावरण विभागाचा आराखडा तयार करण्याचे नियोजन केले आहे.

जिल्ह्याचा प्रादेशिक आराखडा तयार करताना नेमलेले विविध अभ्यास गट आणि लोकांना मोठ्या प्रमाणावर सहभागी करुन घेतल्यामुळे आराखड्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. जिल्ह्याच्या विकासात भर टाकणारा आणि नियोजनबद्ध विकासाचा हा आराखडा डिसेंबर २०१३ मध्ये पूर्ण होणार होता. मात्र, वाढलेला व्याप आणि अपेक्षा, सर्वांना सामावून घेण्याची जबाबदारी यामुळे आराखडा सादर करण्याचा कालावधी वाढत गेला.

जिल्ह्यातील सामाजिक संस्था, पर्यावरण, उद्योग, आर्किटेक्ट, शेती या सर्वांचा विचार करून, त्यांची मते घेऊन हा आराखडा तयार करण्यात येत आहे. त्यासाठी आठ अभ्यासगट नेमले आहेत. या अभ्यासगटातील विशेषज्ञांनी आपल्या क्षेत्रासंदर्भातील गरजा आणि पुढील २५ वर्षातील वाढ लक्षात घेऊन नियोजन करून ते नगररचना विभागाकडे सादर केले. केवळ पर्यावरण विभागाच्या अभ्यासगटाने अहवाल सादर केला नाही. त्यामुळे काम रखडले असल्याचे सांगितले जात आहे.

प्रादेशिक आराखड्याचे काम २००६ पासून सुरू झाले. मात्र, त्यावेळी हे फक्त नगररचना विभागाचे काम असल्याचे गृहीत धरून काम सुरू होते. आर. ए. खान याठिकाणी आल्यानंतर त्यांनी लोकांना या आराखड्यात सामावून घेऊन तो सर्वसमावेशक करावा, असे नियोजन केले. रस्त्यांचे रुंदीकरण, अंतर्गत जागांचे आरक्षण, नवीन जागांची निर्मिती, उद्योगांसाठी जागा शेतीसाठी आरक्षण असे नियोजन या आराखड्यात होते, पण प्रत्यक्षात उद्योगांसाठी जागाच उपलब्ध नाही. शेतीसाठी जेवढी जागा पाहिजे त्यापेक्षा अधिक जागेचा वापर रहिवासी आणि इतर कारणासाठी करण्यात आला आहे.

आराखड्यासाठी नेमलेल्या अभ्यासगटांनी दिलेल्या योगदानामुळे तसेच सर्वांच्या सहकार्यामुळे गेल्या वर्षभरात प्रचंड काम झाले आहे. त्यामुळे या आराखड्याला वेळ लागणार याची जाणीव आहे. त्यामुळे डिसेंबर २०१३ ची तारीख ओलांडून आता ऑगस्ट २०१५ ही नवीन डेडलाइन देण्यात आली आहे. त्यानंतर पुढील चार महिन्यात हरकती, सूचना मागविण्यासाठी वेळ देण्यात येणार आहे. ३१ ऑगस्टपूर्वी हा आराखडा कोणत्याही परिस्थितीत प्रसिद्ध करावा लागणार आहे. त्यामुळे अजून काही दिवसांत पर्यावरण समितीने आपला अहवाल न दिल्यास पर्यायी मार्ग म्हणून इतर संस्थांकडून पर्यावरण विभागाचा अहवाल घेण्याच्या हालचाली नगर रचना विभागाने सुरू केल्या आहेत. त्यांची अवस्था 'इकडे आड आणि तिकडे विहीर,' अशीच झाली आहे. या प्रकारामुळे आराखडा तयार करण्यात अडचणी वाढत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

प्रादेशिक आराखड्यासाठी सर्व अभ्यास गटांनी आपले योगदान दिले आहे. फक्त पर्यावरण विभागाचा अपवाद आहे. त्यांनी आपला अहवाल दिलेला नाही. त्यामुळे इतर ठिकाणाहून हा आराखडा करून घेण्याबाबत नियोजन नगर रचना विभागाने करत आहे. याबाबत संबंधितांशी संपर्क साधून त्यांच्याकडून टाळाटाळ केली जात आहे.

- आर. ए. खान, उपसंचालक, नगररचना विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ढेकणेने केलेला खून उचगावच्या नायकुडेचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कुख्यात गुंड लहू ढेकणे याने केलेला खून उचगाव येथील दत्तात्रय पांडुरंग नायकुडे (वय ४५) याचा असल्याचे स्पष्ट झाले. ढेकणेने त्याचे शीर आणि दोन्ही हात छाटून कोगनोळी नदीत टाकल्याची माहिती पोलिसांना दिली. नायकुडे याच्या नातेवाइकांनाही मृतदेहाची ओळख पटली आहे. पोलिसांनी केलेल्या व्हिडिओ चित्रफितीवरून ही ओळख पटविण्यात आली.

गुंड ढेकणे पॅरोल संपल्यानंतर कळंबा कारागृहात हजर होण्यासाठी आला होता. पण हजर न होताच तो कोल्हापुरात फिरत होता. काही दिवसांनंतर पैसे संपल्याने त्याने भावाला फोन केला. भावाने पैसे आणून दिले. त्यानंतर तो उचगाव येथे भाड्याने राहत होता. खून करण्याच्या दोन ते तीन दिवस आधी त्याच्या डोक्यात दुसऱ्या कुणाचा तरी खून करून जेलच्या कटकटीपासून मुक्ती मिळवायचा विचार त्याने केल्याचे पोलिसांना सांगितले.

उंचगावच्या नाक्यावर तो दोन दिवस थांबत होता. दत्तात्रय नायकुडेला दारूचे व्यसन असल्याचे त्याने ओळखले आणि त्याचाच खून करण्याचा निर्णय घेतला. आपण सेंट्रींगचे काम करत असून खड्डे खणायचे आहेत असे सांगून त्याने नायकुडीला दारू पाजल्यानंतर संध्याकाळी कोयत्याने डोक्यात वार करुन खून केला.

मोटारसायकलही चोरीची

खुनाच्या घटनेनंतर ढेकणे कधी रेल्वे स्टेशन तर कधी उंचगाव परिसरात राहत होता. त्यांच्याकडे चोरीची मोटारसायकल होती. ती मोटारसायकल गणेश आप्पाजी पंधारे यांची होती. तिचा नंबर बदलून तो फिरत होता. त्यापूर्वी इचलकरंजी येथील शहापूर येथे चोरीचा प्रयत्न केला होता. करवीर पोलिस ढेकणेकडून अजून काही माहिती मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पंकजा मुंडेंनी राजीनामा द्यावा’

$
0
0

साताराः अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सरकार त्याकडे गांभीर्याने बघत नाही. मानधन वाढवून देण्याचा अध्यादेश निघाला असतानाही त्याप्रमाणे मानधन देण्यात आलेले नाही. या खात्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांना तीनदा भेटण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी भेट दिली नाही. त्यांना खात्याची काहीच माहिती नाही, असा आरोप करून प्राथमिक शिक्षिका सेविका संघाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

भाजपच्या कोल्हापूर येथील अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा इशारा दिल्यानंतर त्या भेटल्या. परंतु त्यातही त्यांनी थातुरमातूर उत्तरे दिली. एक तर त्यांनी अभ्यास कपून खाते सांभाळावे अन्यथा या खात्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. प्रलंबित मागण्यांसाठी दक्षिण महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आता पालकमंत्र्यांच्या कार्यालयाला टाळे टोकणार असून, तालुका आणि जिल्हा स्तरावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र पूर्व प्राथमिक शिक्षिक सेविका संघाने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजेंच्या संस्थांचा मी ‘हनुमान’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

'मला स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या कोणत्याही संस्थेत रस नाही. परंतु लांडग्यांपासून या संस्थांचे 'हनुमानाप्रमाणे' काम करुन रक्षण करु,' असा विश्वास आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला. निमित्त होते कागल येथे नळांना मीटर जोडणीच्या प्रारंभाचे. शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्राचीन विठ्ठल मंदिर आवाराचे सुशोभीकरण, अपंगांना साहित्य व अनुदान वाटप मान्यवरांच्या हस्ते झाले.

आमदार मुश्रीफ म्हणाले,'विक्रमसिंह घाटगे यांच्यासारखे संयमी, पितृतुल्य नेतृत्व गेल्याची पोकळी कधीच भरुन निघणार नाही. वनवासात लक्ष्मणाने जशी सीतेसाठी 'रेषा' आखली होती तशीच लक्ष्मणरेषा समरजितसिंह घाटगे यांच्या सभोवती आहे. त्याच्याबाहेर त्यांनी जावू नये. अन्यथा मायावी रूप घेतलेले लांडगे टपूनच बसले आहेत. पण मी व माझे तमाम कार्यकर्ते 'हनुमान' बनून या सर्व संस्थांचे रक्षण करायला समर्थ आहेत. स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांचा प्रामाणिकपणा आणि आदर्श जपणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.'

याप्रसंगी समरजितसिंह घाटगे म्हणाले, 'ज्यावेळी नगरपालिकेत राजे-मुश्रीफ युती झाली त्याचवेळी आश्वासनांची पूर्तता होत असेल तरच जाहीरनामा प्रसिध्द करा असे बजावले होते. त्यानुसार सर्वच कामे होत असल्याचे समाधान आहे. आमच्या पिढीला पाण्याची अडचण माहीती नाही. म्हणूनच गरजेपेक्षा जास्त वापर होतो. परंतु मीटरमुळे वचक बसेल. येत्या नोव्हेंबरपर्यंत अक्षरधामप्रमाणे राम मंदिरासह विक्रमसिंह राजेंचेही स्वप्न पूर्ण होईल.'

भैय्या माने म्हणाले, 'पाण्याबाबत आपण सुदैवी असलो तरी भविष्याचा विचार करता आपण मानसिकता बदलण्याची गरज आहे. नळांना मीटरच्या निर्णयाने बाग, गाड्या, रस्ते धुणाऱ्यांना वचक बसेल.' मनोहर पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी नगराध्यक्षा आशाकाकी माने, उपनगराध्यक्षा उषाताई सोनुले, मुख्याधिकारी प्रभाकर पत्की, कागल को.ऑप.बँक प्रेसिडेंट राजेंद्र जाधव, प्रकाश गाडेकर, आदी उपस्थित होते. प्रास्ताविक रमेश माळी यांनी केले.

रिडींग सायकलने...

आमदार मुश्रीफ म्हणाले, 'वीज आणि पाण्यावरचा खर्च वाचण्यासाठी नळांना मीटर गरजेचेच आहेत. याबाबत देखील नागरिक समाधानाचे उदगार काढतील. मोफत मीटर देणारी एकमेव नगरपालिका असली तरी घराबाहेर असणाऱ्या मीटरची जपणूक करण्याची जबाबदारी ज्याची त्याची आहे. भविष्यात सायकल फिरवून तंत्रज्ञानाने मीटरची रिडींग घेतली जातील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन नगरसेवकांनी लावला ‘दिवा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रभागात एलइडी दिव्यांची सुविधा उपलब्ध करण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या कारणावरून सहाय्यक अभियंता विवेक पवार यांना नगरसेवक दिगंबर फराकटे, प्रकाश नाईकनवरे यांनी शिवीगाळ करण्याचा प्रकार महापालिकेत घडला. विद्युत दिव्यांच्या कामासाठी सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही पवार यांनी मोबाइल घेण्याचे टाळले. या रागातून नगरसेवकांनी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पवार यांना तंबी केली. वादावादीवेळी नगरसेवक फराकटे यांनी पवार यांना मारहाणीची घटना घडल्याची चर्चा होती. स्थायी सभापती आदिल फरास यांनी मध्यस्थी केली. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या कार्यालयात हा प्रकार घडला. आरडाओरड आणि धावपळीमुळे काही वेळ तणावाची स्थिती होती.

नाईकनवरे व फराकटे यांच्या प्रभागात एलइडी दिवे बसविण्यात येणार आहेत. २३ हजार रुपये प्रमाणे या कामाची निविदा प्रक्रिया मंजूर केली आहे. निविदा मंजूर झाल्यानंतर या दोघा नगरसेवकांनी दुसऱ्या कंपनीचे दिवे आठ हजार रुपयांत मिळतात. यामुळे दुसऱ्या कंपनीचे दिवे बसवावेत असे पवार यांना सांगितले, परंतु निविदा प्रक्रिया मंजूर झाल्यामुळे दुसऱ्या कंपनीचे दिवे बसविता येणार नाहीत, असे पवार यांनी स्पष्ट केले. सोमवारी सायंकाळी पुन्हा एकदा एलइडी दिवे संदर्भात अभियंत्याकडे विचारणा झाली. यावेळी आरडाओरड करत नगरसेवक व पवार सरनोबत यांच्या कार्यालयात गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंकाळ्याचा प्रश्न कोर्टात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रंकाळा तलाव हे धरण असून ते पाटबंधारे विभागाने महानगरपालिकेकडे हस्तांतरित केले आहे. पण, हस्तांतरण करताना धरणासाठी आवश्यक असलेले सर्व नियम पाळण्याचा करार करण्यात आला आहे. या कराराचे उल्लंघन झाल्यामुळे या धरणाचा ताबा पुन्हा पाटबंधारे विभागाकडे देण्यात यावा, असे प्रतिज्ञापत्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोर्टात सादर केले आहे.

रंकाळा तलाव हे कोल्हापूरचे भूषण मानले जात असले तरीदेखील या तलावात होणारे मोठ्या प्रमाणावरील प्रदूषण सर्वांसाठी चिंताजनक आहे. रंकाळा तलावात प्रदूषण होऊ नये, यासाठी महानगरपालिकेने जी खबरदारी घेणे गरजेचे होते. ती खबरदारी घेण्यात आलेली नाही. रंकाळा हे धरण म्हणून बांधण्यात आले होते आणि १९९९ साली ते महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. या हस्तांतरणावेळी पाटबंधारे विभागाने काही अटी घातल्या होत्या. या अटींसह रंकाळ्याचे हस्तांतरण करण्यात आले आणि अटींचा भंग झाल्यास ते पुन्हा परत करण्याचाही करारात उल्लेख करण्यात आला आहे.

पाटबंधारे विभागाच्या करारानुसार धरणामध्ये सांडपाणी किंवा इतर कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होता कामा नये. यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. त्याबरोबरच पर्यायी कोणत्याही प्रकारचे बांधकाम संबंधित क्षेत्रात केले जाऊ नये. या धरणाला धोका पोहचेल अशी कोणतीही कृती महानगरपालिकेकडून होऊ नये, अशा अटी घालण्यात आल्या होत्या. मात्र, महानगरापालिकेकडून या कराराचा भंग करण्यात आला आहे. तलावात सांडपाणी येऊ नये यासाठी सुमारे ७५ किलोमीटर ड्रेनेज लाइन टाकणे अपेक्षित होते. पण, प्रत्यक्षात २५ किलोमीटर ड्रेनेज लाइन टाकूनच काम थांबविण्यात आले आहे. यामुळे रंकाळा प्रदूषणात वाढ होत असून सांडपाणी जम‌िनीत मुरून आणि कधी थेट रंकाळ्यात मिसळून रंकाळ्याचे प्रदूषण होत आहे.

रंकाळा प्रदूषणाबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार महानगरपालिका आणि पाटबंधारे विभाग यांच्यातील करार भंग झाल्याने आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या नोटीसांचा विचारच न केल्याने रंकाळा धरण पुन्हा पाटबंधारे विभागाकडे हस्तांतर करण्याची सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली आहे.

रंकाळ्यासाठी अपुरे प्रयत्न

रंकाळा तलावाचे प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. त्यासाठी महापालिकेने पहिल्या टप्प्यात रंकाळा तलावात मिसळणारे सांडपाणी रोखण्यात यश मिळवले आहे. आता राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेंतर्गत तलाव संवर्धन व​ विकास आराखडा टप्पा दोन तयार केला जात आहे. टप्पा २ प्रकल्पामध्ये तलाव कायमस्वरूपी प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रभावी उपाययोजना आखल्या जाणार आहेत. सध्या विकास आराखडा बनवला जात आहे. रंकाळा वाचवण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू असले तरी ते अपुरे आहेत.

गेल्या दोन वर्षात रंकाळ्याच्या प्रदूषणामध्ये प्रचंड वाढ

जलपर्णी आणि सांडपाण्यामुळे रंकाळ्यात सातत्याने प्रदूषण

रंकाळ्यात वर्षभर हजारो मासे आणि जलचर मृत्यूमुखी

सांडपाणी रोखण्याच्या व्यवस्थाचा अभाव, अपुरी कामे

रंकाळ्यात म्हैशी आणि धुणी धुणे बंदीचा परिणाम नाही

बोटिंग सुरू केल्यानंतरही प्रदूषणाची स्थिती जैसे थे

काही दिवसांपूर्वीच रंकाळा तलावात अनेक बदकांचा मृत्यू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हद्दवाढ एक किलोमीटरची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी प्रस्तावांचे चऱ्हाट सुरूच असून, आता महापालिकेच्या हद्दीपासून एक किलोमीटरच्या आतील १७ गावांचा समावेश असलेला प्रस्ताव तयार केला जात आहे. महापालिकेच्या पुढील सर्वसाधारण सभेत तो प्रस्ताव मांडून मंजुरीनंतर सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.

भौगोलिक संलग्नता, महापालिकेतर्फे गावांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, दळणवळण आणि ग्रामीण भागातील लोकांचा शहरांशी व्यवहार आदी घटकांचा विचार करून नगररचना विभागाने महापालिका आयुक्तांना प्राथमिक अहवाल दिला आहे. प्रस्तावासाठी एक किलोमीटरच्या आतील १७ व दोन किलोमीटरच्या आतील ३३ गावांची माहिती संकलित केली आहे.

नगररचना विभागाने आयुक्तांकडे माहिती सादर केलेल्यांमध्ये शिये, वडणगे, आंबेवाडी, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, नागदेववाडी, नवे बालिंगे, शिंगणापूर, चिखली, पाचगाव, वाडीपीर, मोरेवाडी, कळंबा, शिरोली, उचगाव, गोकुळ शिरगाव, जत्राटवाडी या गावांचा समावेश आहे.

महापालिकेच्या हद्दीपासून दोन किलोमीटरच्या अंतरात ३३ गावे आहेत. त्यांचा स्वतंत्र सर्व्हे करण्यात आला आहे. गोकुळ ​शिरगाव आणि शिरोली या औद्योगिक वसाहती महापालिका हद्दीपासून एक किलोमीटरच्या आत असून, त्यांचाही सर्व्हे करण्यात आला आहे. गावची लोकसंख्या, जमिनीचे क्षेत्र, शेतीवर अवलंबून असलेली लोकसंख्या, शेती क्षेत्र, नोकरी, व्यवसायातील वर्गवारी या संबंधी माहिती संकलित करण्यात आली आहे.

लोकसंख्येचा निकष पूर्ण?

दहा लाख लोकसंख्या असलेल्या शहरांसाठी केंद्र आणि राज्याच्या अनेक योजनांचा आहेत. सध्या हद्दवाढीअभावी कोल्हापूर या योजनांपासून वंचित आहे. २०११ च्या लोकसंख्येनुसार कोल्हापूरची लोकसंख्या ५,४८,२८३ आहे. हद्दवाढीसाठी समाविष्ट करण्यासाठी सर्व्हे केलेल्या १७ गावांची लोकसंख्या १,७६,८५२ आहे. हद्दवाढ झाल्यास लोकसंख्येच्या निकषाच्या जवळ कोल्हापूर जाऊ शकते.

हद्दवाढीसाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. या गावांशी संबधित लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्यांची शनिवारी बैठक आहे. त्यांना हद्दवाढीचे महत्त्व पटवून दिले जाईल. प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे.

- पी. शिवशंकर, आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेरतपासणीचा टक्का हजारांत

$
0
0

सचिन यादव, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठातील उत्तरपत्रिकांच्या फेरतपासणीचा टक्का वाढला आहे. परीक्षा विभागाकडे या वर्षातील सत्रात वीस हजारांवर परीक्षार्थींनी फेरतपासणीसाठी अर्ज केले आहेत. यामुळे विद्यापीठाच्या तिजोरीत वाढ होत असली तरी विद्यार्थ्यांना आर्थिक मानसिक त्रास होत आहे.

विविध अभ्यासक्रमांचा निकाल ५६ दिवसांत जाहीर करण्याचे धोरण अवलंबल्याने परीक्षा विभागाचे काम गतिमान झाले. मात्र, विभागाला काही घटकांकडून सहकार्य मिळत नसल्याचा परिणाम निकालावर होत आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत सरासरी चार ते पाच हजार अर्ज फेरतपासणीसाठी येत आहेत. कला, वाणिज्य, विज्ञान आणि इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिकांचे प्रमाण जास्त आहे. विषयतज्ज्ञ प्राध्यापकांना जिल्ह्यातील कॅप सेंटरवर उत्तरपत्रिका तपासणीची सोय आहे; परंतु काही प्राध्यापक कॅप सेंटरकडे फिरकत नाही. फेरतपासणीसाठी वेळेवर उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्सही मिळत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांचा आहे. या प्रक्रियेसाठी ६५० रुपये शुल्क आकारले जाते. फेरतपासणी आठवड्याभरात करावी, असा विद्यापीठाचा नियम आहे, मात्र उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स आठवड्यानंतर दिल्या जात असल्याचा आरोप विद्यार्थी करीत आहेत. परीक्षा विभाग, कंम्प्युटर आणि एमकेसीएलमधील काही दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाला सवड नाही. त्यामुळेच फेरतपासणीचा टक्का वाढत आहे.

'२०१५मध्ये वीस हजार, २०१४ मध्ये १५ हजार आणि २०१३ मध्ये १० हजारांचा आकडा फेरतपासणीचा आहे. या वाढत्या आकडेवारीमुळे विद्यापीठाच्या कामकाजाबाबत अविश्वास निर्माण होत आहे. नदोषी घटकांच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे,' असे मत अभाविपचे महानगरमंत्री पंकज पाटील यांनी व्यक्त केले.

एमकेसीएलवर कारवाईची प्रतीक्षा

शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत सिनेट सदस्यांनी कारवाईची मागणी केली. एमकेसीएलने घातलेल्या गोंधळाचा फटका विद्यापीठाचा केंद्रबिंदू असलेल्या विद्यार्थ्यांना बसत असल्याचा आरोप केला. त्याबाबत यापुढील काम पाहून एमकेसीएलचा करार वाढविण्याचा निर्णयाचे आश्वासन देण्यात आले. अद्याप त्याबाबत हालचाल झालेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सनशेड कर्टन

$
0
0




कोल्हापूर टाइम्स टीम

कारमध्ये येणाऱ्या सूर्यप्रकाशापासून तसेच उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काचांना फिल्मींग करण्याचा चांगला पर्याय होता. पण आता फिल्मींग करण्यासच बंदी आहे. त्यामुळे प्रवासात जाताना पारदर्शक काचांमधून येणाऱ्या सूर्यप्रकाशापासून बचाव करण्यासाठी अनेकजण काचांवर टॉवेल, पेपर असे नानाविध प्रकार करत असतात. यामुळे कारचा लूक जात असल्याने कारचा लूक राखण्याबरोबरच प्रवास सुखकर होण्यासाठी सनशेड कर्टन नवनव्या रुपात आले आहेत. त्यामध्ये काचांप्रमाणे स्वयंचलित चालणारे तसेच स्वतः लावता येणाऱ्या कर्टनचा समावेश आहे.

पूर्णपणे काळी फिल्म काचेवर लावल्यास कारमध्ये येणाऱ्या सूर्यप्रकाशाची तीव्रता प्रचंड कमी होते. तसेच प्रवासादरम्यानची रखरखही कमी होते, पण नवीन कायद्यानुसार फिल्म लावण्यास बंदी केल्याने काचांवर फिल्म लावण्यास पूर्णता बंदी घातलेली आहे. यामुळे कारमध्ये कितीही एसी पॉवरफूल असला तरी सूर्यप्रकाशामुळे कारमधील व्यक्तीस अस्वस्थ वाटतेच. यासाठी मध्यंतरी काळ्या कापडाचे चौकोनी सनशेड कर्टन आल्या होत्या. पण काचेवर त्या व्यवस्थित फिक्स होत नसल्याने त्याचा उपयोग नसल्याचे लक्षात आले. यानंतर सध्या बाजारात सनशेड कर्टन नव्या रुपामध्ये आल्या आहेत.

पॉलीस्टरपासून बनवलेले कर्टन प्लेन तसेच स्लाइड टाइपमध्ये आहेत. तसेच ते स्वयंचलित व स्वतः लावण्याच्या रुपामध्येही आहेत. छोट्याशा काठीप्रमाणे दरवाजाच्या आतील बाजूने बसवण्यात आलेले स्वयं​चलित कर्टन ज्यावेळी आपण काच बंद करतो, त्यावेळी कर्टन काचेबरोबर आपोआप खेचले जातात. तसेच काच खाली केल्यानंतर ते त्या काठीमध्ये बंद होतात. यामुळे कारमध्ये येणारा सूर्यप्रकाश ६० टक्क्यापर्यंत अडवला जातो. परिणामी कारमधील एसीचा आनंद अधिक चांगल्या पद्धतीने लुटता येतो. कारमधील इंटेरिअरही चांगले राखण्यास मदत होते. चारही काचांचे कर्टन उपलब्ध आहेत. पाठीमागील काचेसाठीचेही कर्टन मिळू शकतात. यामुळे कायदा पाळला जातो व दुसरीकडे ऊन्हापासूनचही बचाव असे दुहेरी फायदे होतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक दिवस अंबाबाईसाठी

$
0
0



कोल्हापूर टाइम्स टीम

शिवाजी विद्यापीठाच्यावतीने शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेल्या रंकाळा तलावाची स्वच्छता करण्यात आली. इराणी खण व रंकाळ्याच्या दक्षिण बाजूकडील पदपथ उद्यानाची साफसफाई केल्यानंतर ऐतिहासिक रेल्वे स्टेशनची स्वच्छता करण्यात आली. दोन्ही ठिकाणची मोहीम यशस्वी झाल्यानंतर बुधवारी अंबाबाई मंदिर आणि परिसराची स्वच्छता करण्यात आली.

सकाळी नाऊ वाजता एनएसएसचे विद्यार्थी विद्यापीठाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह उपस्थित झाले. त्यापाठोपाठ महापालिकेचे कर्मचारी दाखल झाल्यानंतर प्रथम घाटी दरवाज्याची स्वच्छता करण्यात आली. मंदिर परिसरात विरंगुळ्यासाठी असलेल्या महालक्ष्मी बागेतील सर्व कचरा एकत्र करण्यात आला. पाण्याचा बाटल्या, प्लास्टिक पिशव्यांनी गार्डनचा कोंडाळा झाला होता. चार डस्टबीनचे डबे भरुन गार्डनमधील कचरा बाहेर काढण्यात आला. यानंतर छत्रपती ट्रस्टच्या राम मंदिर, रामाचा पार परिसरातील स्वच्छता करण्यात आली. याठिकाणी असलेल्या वृक्षांच्या पानामुळे केरकचरा वाढला होता. प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांच्यासह अधिकारी मोहिमेत सहभागी झाले होते. बृहस्पती मंदिर आणि दक्षिण दरवाजाकडील संपूर्ण भागाची स्वच्छता करण्यात आली. मंदिराभोवतीच्या ओवऱ्यावरील छताची स्वच्छता करण्यात आली. छतावरील छोटी झुडपे, झाडांची पाने, एकत्र करुन बाहेर काढण्यात आली. मंदिर परिसराची दररोज स्वच्छता केली जात असतानाही आजच्या स्वच्छता मोहिमेत दोन डंपर कचरा काढण्यात आला.

स्वच्छता मोहिमेमध्ये कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, बीसीयूडी संचालक डॉ. आर. बी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीसह विद्यापीठाच्या विविध विभागाचे उपकुलसचिव, अधिकारी कर्मचाऱ्यांसह महापालिका कर्मचारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना श्रमदानाची आवड निर्माण व्हावी, ऐतिहासिक स्थळांसह पर्यटनस्थळांची स्वच्छता व्हावी आणि पर्यटकांना स्वच्छ सुंदर शहर दिसावे, यासाठी शिवाजी विद्यापीठाच्यावतीने गेल्या काही दिवसांपासून स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. रंकाळा, रेल्वे स्थानक परिसरानंतर बुधवारी विद्यार्थ्यांनी अंबाबाई मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. सकाळी नऊ वाजता सुरू झालेल्या मोहिमेची सांगता दुपारी बारा वाजता झाली.

एनएसएसच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) विद्यार्थ्यांनी अनेक उत्कृष्ट कामे केली आहेत. एनएसएस विद्यार्थ्यांनी तीनही ठिकाणी झालेल्या स्वच्छता मोहिमेमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. यामध्ये विशेषतः जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांचा सहभाग उल्लेखनीय होता.

सुटीतही विद्यार्थ्यांचे श्रमदान

शिवाजी विद्यापीठ व संलग्न कॉलेजच्या परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. यामुळे बहुतांशी विद्यार्थी गावाकडे गेले आहेत. परीक्षा संपल्यानंतर विद्यापीठाने शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांची स्वच्छता मोहीम सुरु केली आहे. सुटीचा हंगाम असूनही विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहिमेला चांगला प्रतिसाद दिला आहे.

अनेक ठिकाणी नागरिक केवळ कचरा निर्माण करण्याचे काम करतात. मात्र आजच्या मोहिमेत युवकांचा सहभाग असल्याने प्रौढही या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते. एक दिवस स्वच्छता न करता नागरिकांनी मंदिर परिसरात असणाऱ्या डस्टबीनचा वापर करावा जेणेकरुन मंदिर पसिरात स्वच्छ राहील. श्री अंबाबाई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना हा परिसर स्वच्छ असल्यामुळे वेगळे समाधान मिळेल. - शमशुद्दीन डांगे, भिलवडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

८३ विद्यार्थी शंभर नंबरी

$
0
0

सचिन यादव, कोल्हापूर

राज्य शिक्षण मंडळाचा कोल्हापूर विभागाचा आजपर्यंतच्या निकालाच्या यादीत कोल्हापूर विभागीय मंडळाने गुणवत्तेत मानाचा तुरा खोवला आहे. निकाल ९२.१३ टक्के लागला. या देदिप्यमान कामगिरीसह बारावीच्या विविध विषयांत कोल्हापूर विभागातील ८३ विद्यार्थी शंभर नंबरी ठरले आहेत. गेल्या वर्षी कोल्हापूर विभागात शंभरपैकी शंभर गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ५० होता. या वर्षीच्या निकालात आणि शंभर नंबरी विद्यार्थ्यांत कोल्हापूर विभागाला गुणवत्तेची शाबासकीची थाप मिळाली आहे.

विषयात अधिकाधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना मंडळाची तीसहून अधिक पारितोषिक आहे. या पुरस्काराचे कोल्हापूरचे ८३ विद्यार्थी मानकरी ठरणार आहेत. मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमात बारावीचे १४० विषय आहेत. पैकी प्रमुख विषयांत कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. संस्कृत विषयात ३ विद्यार्थी, गणितात ३९, अकाउंटन्सीत २०, फिजिक्सला ६, केमिस्ट्रीला १, भूगर्भशास्त्रला १३, टेक्साईल या विषयात १ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळविले आहेत. राज्य मंडळाने बारावीत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी बंद केली. मात्र प्रत्येक विषयांत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी मंडळाने पारितोषिके आहे. मंडळाच्या स्वनिधीतीतून आणि दानशूर व्यक्तिंनी दिलेला निधी, विविध व्यक्तिंच्या नावे स्मरणार्थ दिले जाणारे पुरस्कार आहेत. या पुरस्काराचे कोल्हापूर विभागातील ८३ विद्यार्थी मानकरी ठरले आहेत. येत्या ४ जून रोजी या विद्यार्थ्यांची नावे मंडळ जाहीर करणार आहे. पैकीच्या पैकी गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांवर कौतुकाची थाप पडणार आहे.

शंभराच्या काठावरचे ३० हून अधिक विद्यार्थी

शंभर पैकी शंभर गुण मिळविलेले विद्यार्थ्यांच्यासह ९५ ते ९९ पर्यंत गुण ८३ पैकी ३० हून अधिक विद्यार्थ्यानी मिळविले आहेत. विभागात गणित या विषयात सर्वांधिक ३९ विद्यार्थ्यांनी शंभर गुण त्या खालोखाल २० विद्यार्थ्यांनी अकाउंटन्सीमध्ये शंभर गुण मिळविले आहेत. इंग्रजी विषयात ४ विद्यार्थ्यांनी ९५ गुण मिळविले आहेत.

गैरप्रकार विरोधी अभियान मोठ्या प्रमाणात राबविले. अभ्यास केला तर यश मिळतेच. त्यासाठी कॉपी करु नका, असे आवाहन आणि प्रबोधन केले होता. त्याचा चांगला परिणाम कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना झाला. त्याचेच फलित शंभर नंबरीत आहे.

- शरद गोसावी, सचिव, कोल्हापूर मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विभागात सातारा अव्वल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ऑनलाइन निकाल जाहीर केला. यात कोल्हापूर विभागात कोल्हापूरने तिसरा क्रमांक पटकाविला आहे. बारावीत कोल्हापूर जिल्ह्याचा ९१.६४ टक्के निकाल. सातारा जिल्ह्याने ९२.६४ टक्के आणि सांगली जिल्ह्याचा निकाल ९२. २८ टक्के लागला. विभागात सांगली जिल्हा अव्वल ठरला आहे. दरम्यान निकाल जाहीर झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी कॉलेज कॅम्पस तर काहींनी नेट कॅफेवर जल्लोष केला.

बारावीचा ऑनलाइन निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. मूळ गुणपत्रिका ४ जून रोजी सकाळी ११ वाजता संबंधित कॉलेजमध्ये देण्यात येणार आहे. शाळांना शालेय अभिलेखही याच दिवशी देण्यात येतील. गुणपत्रिकांचे वाटप दुपारी तीन वाजल्यापासून करण्यात येणार आहे. या परीक्षेत ४४ गैरमार्ग प्रकरणे सापडली. पैकी एक तोतया प्रकरण असून ४३ विद्यार्थ्यांना सहा परिक्षेची संपादणूक रद्द केली आहे.

प्राध्यापक गायब

ऑनलाइन निकालाच्या दिवशी प्राचार्यांनी संबधित विषय शिक्षक, कम्प्युटर शिक्षकांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. मात्र काही ज्युनिअर कॉलेजमध्ये हा आदेश अनेकांनी मोडला. शहरातील ज्युनिअर कॉलेजमध्ये स्टाफमध्ये अनेक प्राध्यापक गायब होते. त्यामुळे काही विद्यार्थी निकाल आणि शंका निरसनासाठी कॉलेजकडे आले. काही कॉलेजमध्ये प्राचार्य तर काही कॉलेजमध्ये प्राध्यापक उपस्थित नव्हते. त्यामुळे काही विद्यार्थ्यांमधून मनस्ताप व्यक्त केला.

समुदेशन

कोल्हापूर विभागीय मंडळाने विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी हेल्पलाइन सुविधा सुरु केली आहे. २७ मे पासून या सेवेची दुपारी १ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांच्यासाठी २४ तास ही सुविधा उपलब्ध राहणार आहे. एक आठवडाभर ही सुविधा सुरु राहणार आहे. मंडळाच्या कार्यालयात हेल्पलाइन सुरु केली आहे. सकाळी आठ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत या हेल्पलाइन सुविधा सुरु राहणार आहे. विद्यार्थ्यांनी दूरध्वनी क्रमांक २६९६१०१, २६९६१०२, १०३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

उत्सुकता आणि जल्लोष

बारावीचा ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी शहरातील नेटकॅफेवर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली. ऑनलाइन निकाल पाहिल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी जल्लोष व्यक्त केला. दुपारी बारा वाजल्यापासूनच विद्यार्थ्यांची नेटकॅफेवर गर्दी सुरु झाली. काही नेटकॅफेचालकांनी विद्यार्थ्याची गर्दी पाहून इंटरनेटचे दरही वाढविले. काही ठिकाणी मंडळाचा सर्व्हर डाउन झाल्याचा अनुभवही विद्यार्थ्यांना आला.

निकालानंतर...

उत्तरत्रिकांची फोटोकॉपी २७ मे ते १५ जून पर्यंत मिळणार

अर्ज मंडळाच्या संकेतस्थळावर आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये उपलब्ध

फोटोकॉपीसाठी ४०० रुपयांचे शुल्क

फोटोकॉपी हस्तपोहोच किंवा रजिस्टर पोस्टाने मिळणार

फोटोकॉपी नंतर कोणतीही माहिती दिली जाणार नाही

गैरमार्गातील विद्यार्थ्यांला फोटोकॉपी मिळणार नाही

फोटोकॉपी प्रसिद्ध करता येणार नाही

गुणांची पडताळणी ४ जून पासून १५ जूनपर्यंत

समुपदेशक आणि मोबाइल क्रमांक

कोल्हापूर

शशिकांत कापसे : ९१७५८८०००८

शशांक कोंडेकर : ९४२११०९७२१

रवींद्र पायमल : ९८२२३०७१४१

सातारा

अकुंश डांगे : ९८२२२२००४१

पी. एस. पवार : ९४२३८०४२४९

सांगली

एन. डी. बिरनाळे : ९३७१४७४९९०, ८८८८४७५५५२

नेहा वाटवे : ९८५००५७६३०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तरकार्याला ग्रंथ भेट देण्याचा विधायक उपक्रम

$
0
0

म. टा. प्र​तिनिधी, कोल्हापूर

हल्ली उत्तरकार्यालाला भांडी वाटपाची नवी पद्धत सुरू झाली आहे. पै पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळींना भांडी साहित्य दिले जाते. मात्र अनेकवेळा हा आर्थिक खर्च सामान्य कुटुंबियांना परवडणारा नसतो. उत्तरकार्यादिवशी होणारा या अनाठायी खर्चाला पायबंद बसला पाहिजे, चुकीच्या प्रथा पडू नयेत याकरिता उत्तरकार्यादिवशी भांडी वाटपाला फाटा देत ग्रंथ भेट देण्याचा विधायक उपक्रम राजेंद्रनगर परिसरातील रेव्हन्यू को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीतील शेवरे कुटुंबींयांनी राबवला. हॉटेल व्यावसायिक विक्रम शेवरे व संग्राम शेवरे या भांवडांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला.

रविवारी (ता.२४) हा अनुकरणीय उपक्रम राबविला गेला. यादिवशी 'ज्ञानेश्वरी'च्या २०० प्रतींचे ​वाटप केले. पारंपरिक पद्धतीला फाटा देत वेगळा कार्यक्रम राबविल्याबद्दल नातेवाईकांसह समाजातील विविध घटकांनी त्याचे कौतुक केले. जिल्हा परिषदेचे माजी मुख्य लेखापरीक्षक, महापालिकेचे माजी जकात अधिकारी व उपायुक्त वसंतराव रामचंद्र शेवरे यांचे १३ मे रोजी निधन झाले. रविवारी (ता.२४) उत्तरकार्याचा दिवस होता. हॉटेल व्यावसायिक विक्रम व संग्राम या दोघा भांवडांनी कुटुंबींयांशी चर्चा केली आणि उत्तरकार्य वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला.

वडील वसंतराव शेवरे हे सरकारी अधिकारी म्हणून जिल्हा परिषद व महापालिकेत नोकरी केली असली तरी सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. 'रेव्हन्यू...'सोसायटीचे चेअरमन म्हणून त्यांनी काम केले होते. चेअरमन म्हणून काम करत असताना भागात रस्ते, वृक्षारोपणाचे कार्यक्रम केले. लोकांच्या सहभागातून ही कामे केली. याची जाणीव ठेवत शेवरे कुटुंबींयांनी त्यांच्या उत्तरकार्यादिवशी विविध घटकांना ग्रंथ वाटप करण्याचे ठरविले. त्यानुसार रविवारी अरूणोदय सोसायटीच्या हॉलमध्ये उत्तरकार्याच्या विधीचा कार्यक्रम झाला.

खर्चिक प्रथा थांबाव्यात

याविषयी सांगताना विक्रम शेवरे म्हणाले, 'उत्तरकार्याला काहीजण अनाठायी खर्च करतात. या गोष्टीला फाटा देऊन आम्ही ग्रंथ वाटपाचा निर्णय घेतला. वाचनाचे महत्व कळावे आ​णि भांडी वाटपासारख्या खर्चिक प्रथा थांबाव्यात हा या मागील प्रमुख उद्देश होता. या कार्यक्रमाला भगिनी गीता अशोक तर्डेकर व नीना प्रेमानंद भणगे यांचाही सहभाग राहिला. '

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फक्त मंजूर... मंजूर...

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

शहरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचे, आरोग्य, सामाजिक गरजांविषयीचे ठराव विषयपत्रिकेवर असताना कोणत्याही ठरावावर चर्चा न होता तसेच कोणतीही सूचना न मांडता केवळ मंजूर... मंजूर... मंजूर.., असा सूर सातारा पालिकेच्या बुधवारच्या सभेत घुमला अवघ्या १५ मिनिटांत ३९ विषयांना मंजुरी देत सभा संपवण्यात आली. चर्चा न करताच विषय मंजूर करायचे असतील तर केवळ औपचारिक म्हणून सभा घेतली जाते का? असे प्रश्नचिन्ह काही नगरसेवकांचया चेहऱ्यावर होते. परंतु, कोणीच न बोलण्याने सभा संपली. या वेळी सातारा शहरात असलेले जिल्हा कारागृह निर्जनस्थळी स्थलांतरित करण्यात यावे, असा ठराव करण्यात आला.

सातारा पालिकेत मनोमिलनाची सत्ता आहे. परंतु पालिकेवर ठराविक नगरसेवकांचेच वर्चस्व आहे. त्यांचे प्रत्यंतर सर्वसाधारण सभेत येत असते. विषयपत्रिकेवरील ठरावाबद्दल 'त्या' नगरसेवकांना चर्चा करावी वाटली, सूचना मांडावीशी वाटली तरच ती मांडली जाते अन्यथा केवळ ठराव वाचण्यापूर्वीच मंजूर...मंजूर...मंजूर.., असे म्हणून विषय रेठले जातात. बुधवारच्या सर्वसाधारण सभेत नागरिकांच्या जिव्हाळ्याचे, आरोग्य, सामाजिक गरजांविषयीचे ठराव होते. परंतु, त्यापैकी एक-दोन विषय सोडले तर कोणत्याच विषयावर ना चर्चा झाली ना कोणी सूचना मांडली. यावरुन शहरात सर्व आलबेल आहे का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. विद्युत साहित्य खरेदी, जंतुनाशके, सार्वजनिक स्वच्छतागृहाची दुरुस्ती पथदिवे, कच्चे गटार व खोदकाम करणे, जळाऊ लाकूड पुरविणे, मुंबई ते सातारा डांबर वाहतूक, असे अनेक विषय होते. या कामांच्या ठेकेदाराबाबत नागरिकांच्या तक्रारी असतानाही त्याबाबत चर्चा न होता त्याच त्याच ठेकेदारांना पुन्हा ठेके का दिले जातात? ठेकेदार अरेरावी करत असताना त्यांना पालिका प्रशासनाकडून कोणतीही समज का दिली जात नाही? ठेकेदारांचा मनमानी कारभार असताना त्या-त्या भागातील नगरसेवक आवाज का उठवत नाहीत? या बाबत कोणत्याही नगरसेवकाने 'ब्र' शब्दही काढला नाही. महिला नगरसेवक तर क्वचितच कोणत्यातरी विषयावर बोलताना अथवा सूचना करताना दिसतात. त्यामुळे सर्वसाधारण सभा औपचारिक म्हणून घेतली जाते का? असे प्रश्न अनेक नगरसेवकांच्या चेहऱ्यावर होते. परंतु, 'त्या' ठराविक नगरसेवकांच्या पुढे बोलणार कोण? अखेर १५ मिनिटांत ३९ विषयांना मंजुरी देण्यात आली.

सातारा कारागृह शहराबाहेर?

राज्य सरकारने जिल्हा कारागृहाच्या ठिकाणापासून ५०० चौरसमीटर अंतरापर्यंत बांधकाम करण्यास परवानगी नाकारली आहे. घर बांधण्यासाठी फार कठीण निकष लावल्याने विकासाला खीळ बसणार आहे. त्यामुळे शहरातील जिल्हा कारागृह निर्जनस्थळी हलविण्यात यावे, असा प्रस्ताव तयार करावा, असा ठराव करण्यात आला. साविआचे पक्षप्रतोद अॅड. डी. जी. बनकर यांनी हा प्रस्ताव जिल्हाधिकारी आणि राज्य सरकारकडे पाठविण्यात यावा, अशी मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निकालापूर्वी होणार प्रवेश प्रक्रिया

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये (आयटीआय) येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेशासाठीची केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच सुरु केली जाणार आहे. विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचनालयाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती हमिदवाडा (ता. कागल) येथील आयटीआयचे प्राचार्य अमोल वास्कर यांनी दिली.

यापूर्वी दहावीचा निकाल लागल्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरु केली जात होती. निकालापूर्वी विद्यार्थ्यांना प्रक्रियेतील पहिल्या टप्यातील वैयक्तिक माहिती तसेच इतर आवश्यक माहिती भरता येणार आहे. निकालानंतर मिळालेल्या गुणांची माहिती भरता येईल.

मागील शैक्षणिक वर्षापासून शासकिय 'आयटीआय' ची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविली जात आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून ऑनलाईन प्रक्रियेत खासगी आयटीआयचाही समावेश करण्यात आला आहे. राज्यात ४१७ सरकारी आयटीआयसह सुमारे ७५० आयटीआय आहेत. या सर्व संस्थांना ऑनलाईन प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना त्रास कमी झाला आहे. आयटीआयमध्ये काही व्यवसाय अभ्यासक्रमांना आठवी, दहावी व बारावीनंतर प्रवेश घेता येतो. सर्वांधिक व्यवसाय अभ्यासक्रमासाठी दहावी ही शैक्षणिक पात्राता आहे. त्यामुळे मागील वर्षापर्यंत दहावीचा निकाला लागल्यानंतर प्रवेश प्रक्रियेला सुरवात केली जात होती. यावर्षी काहीच यामध्ये बदल करण्यात आल्याची माहिती संचालनालयातील अधिकाऱ्यांनी दिली.

येत्या एक जूनपासून विद्यार्थ्यांना प्रवेशाची माहिती पुस्तीका उपलब्ध होवू शकते. राज्यातील सर्व सरकारी, खासगी आयटीआय (अर्ज स्वीकृती केंद्र) मध्ये ही माहिती उपलब्ध असेल. संचालनालयाच्या संकेतस्थळावरही ही माहिती पाहता येईल. पहिल्या टप्यात विद्यार्थ्यांना संबंधित संकेतस्थळावर केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईल नोंदणी करावी लागेल. यामध्ये दहावीच्या गुणांव्यतिरिक्त सर्व माहिती भरता येईल. मागील वर्षी निकालानंतर सर्व माहिती भरावी लागत असल्याने विलंब होत होता. त्यामुळे काही तांत्रिक अडचणीही निर्माण झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर दोन टप्पे करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रवेशाच्या पाच फेऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्जातील सर्व माहिती भरल्यानंतर अर्जनिश्चिती व कागदपत्रांची पडताळणी अर्ज स्वीकृती केंद्रावर करणे आवश्यक आहे. अर्ज निश्चितीनंतर प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल.

पाचवी फेरी समुपदेशनाची

पहिल्या पसंतीक्रमानुसार जागा मिळाल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करावा लागेल. पुढील फेऱ्यांसाठी त्यांचा विचार होणार नाही. दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा पसंतीक्रम भरावे लागतील पहिल्या तीन पसंती क्रमानुसार तिसऱ्या फेरीत पहिल्या पाच पसंतीक्रमानुसार तर चौथ्या फेरीत कोणत्याही एका पसंती क्रमानुसार जागा मिळाल्यास प्रवेश निश्चित करावा लागेल. पाचवी फेरी समुपदेश फेरी असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालिकेसाठी एल्गार

$
0
0

प्रविण कांबळे, हुपरी

चांदीनगरी हुपरी (ता.हातकणंगले) येथे नगरपालिका होण्यासाठी गेल्या ४० वर्षांपासूनच्या मागणीला आता मोठ्या प्रमाणात जोर चढू लागला आहे. शुक्रवारी (ता.२९) यासाठी लाक्षणिक उपोषण होणार असून यामध्ये गावातील तरूण मंडळे, संघटना, सर्व राजकिय पक्षांबरोबरच सर्वसामान्य नागरिक सहभागी होणार आहेत. उपोषणासाठी हुपरीकरांतून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन हुपरी नगरपालिका कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

चांदीनगरी हुपरी ही संपूर्ण देशामध्ये चांदीचे दागिने बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील दागिने देशाच्या कानाकोपऱ्यात जात असतात. वाढती लोकसंख्या आणि सुविधांच्या मागणीसाठी येथे नगरपालिकेची मागणी होत आहे. मात्र या मागणीकडे राज्य सरकाराने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. २०११ च्या जनगणनेनुसार हुपरीची लोकसंख्या ६० हजारच्या वर जाऊन पोहचली आहे.

जवाहर साखर कारखाना, पंचतारांकीत औद्योगिक वसाहत, सिल्व्हर झोन आदींमुळे लोकसंख्या वाढत चालली आहे. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचे स्त्रोत मर्यादित असून केवळ दोन कोटीपर्यंत वार्षिक महसूल गोळा होता. त्यातून कामगारांचा पगार, लाईट बिल, पाणी योजनेचे बिल यातून निधी शिल्लक राहिला तर नागरी सुविधा व विकाकामांसाठी वापरता येतो. अशा परिस्थितीत गावाचा डोलारा सांभाळणे ग्रामपंचायतीला जिकीरीचे बनले आहे. त्यामुळे याठिकाणी नगरपालिका व्हावी अशी मागणी हुपरीकरांतून होत आहे.

नगरपालिकेच्या मागणीसाठी हुपरीतील सर्व तरूणांनी एकत्र येऊन कृती समिती स्थापना केली आहे. २००७ पासून नगरपालिकेसाठी न्यायालयीन लढा देणारे अशोक खाडे, तसेच कृती समितीच्या अमजद नदाफ, सहनिमंत्रक बाळासो कांबळे यांनी जनजागृती करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या कृती समितीने आमदार सुजीत मिणचेकर, जि.प.समाज कल्याण सभापती किरण कांबळे यांच्यासह मुंबई येथे नग विकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्याबरोबर चर्चा करून पाठपुरावा केला. पण त्याबाबत अद्याप कार्यवाही झालेली नाही.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकार नुसतीच चर्चा करीत नगरपालिकेच्या मागणीकडे डोळेझाक करत असल्यामुळे हुपरीकरांचा वाढता दबाव लक्षात घेऊन कृती समितीने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. शुक्रवारच्या लाक्षणिक उपोषणाने आंदोलनाची सुरूवात होणार आहे. यापुढे रास्ता रोको, बेमुदत उपोषण, सरकारी कार्यालये बंद, हुपरी बंद यासारखी आंदोलने करण्यात येणार आहेत.

नगरपालिकेसाठी सर्वच थरातून पाठिंबा

चांदीच्या कलाकुसरीसाठी हुपरी देशात प्रसिद्ध आहे. येथील कलाकारांच्या कलेमुळे आणि येथील व्यवसायाच्या वृद्धीमुळे या नगरीला चांदीनगरी म्हणूनही ओळखले जाते. सहकारी संस्था आणि औद्योगिकीकरणाचा वाढता वेग यामुळे येथील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या लोकसंख्येला सोयीसुविधा पुरवणे ग्रामपंचायतीला शक्य होत नाही. सध्या हुपरीची लोकसंख्या ६० हजारच्या पुढे गेली आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला सुविधा पुरवायच्या असतील तर आणि उत्पन्न वाढवायचे असेल नगरपालिकेशिवाय पर्याय नाही. हुपरीकरांच्या या प्रदीर्घ लढ्याला समाजाच्या सर्वच थरात पाठिंबा मिळत आहे.

सध्याची लोकसंख्या पाहता ग्रामपंचायतीकडून नागरी सुविद्या देणे कठीण आहे. त्यामुळे हुपरीला नगरपालिका झाल्याशिवाय गावचा विकास होणार नाही. नगरपालिका मंजुरी हाच त्यावरील मार्ग आहे.

- दिपाली शिंदे, सरपंच

नगरपालिकेसाठी कृती समिती मोठया प्रमाणावर प्रयत्न करीत असून त्यांना साथ देण्यासाठी सर्वसामान्य जनतेने रेटा दिला तरच नगरपालिका होईल. येथून पुढे होणाऱ्या सर्व आंदोलनात आम्ही सर्वजण अग्रभागी राहू. - किरण कांबळे, सभापती, जि.प.

गेल्या दोन महिन्यांपासून सरकारदरबारी बैठका आणि चर्चा सुरू आहेत. मात्र राज्य सरकार काहीही निर्णय घेत नाही. त्यामुळे रस्त्यावरच्या लढाईशिवाय पर्याय नसून जनतेने या आरपारच्या लढाईत सहभागी व्हावे. - अमजद नदाफ, निमंत्रक, कृती समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतमजुरांना पेन्शन सुरू करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दरमहा तीन हजार रुपये निवृत्तीवेतन ६० वर्षापासून मिळावे याबरोबरच आरोग्य सेवा मोफत मिळाव्यात यासह अन्य मागण्यांसाठी शेतमजुरांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. टाउन हॉलपासून मोर्चा काढण्यात आला.

शेतमजूरांचे प्रश्न यापूर्वीही अनेकवेळा मोर्चाद्वारे मांडले आहेत. किमान वेतन मिळावे यासाठी सहाय्यक कामगार आयुक्तांकडे प्रयत्न केले. पण अजूनही किमान वेतन व इतर सुविधा मिळाल्या नाहीत. सरकारच्या धोरणाने शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यातून शेतमजूरांवरही परिणाम होत आहे. यामध्ये महिलांची संख्या जास्त आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा शेतमजूर युनियनच्यावतीने प्रशासनाने या प्रश्नांकडे गांभीर्याने पहावे यासाठी मोर्चाचे आयोजन केले होते. शेतमजूर महिला यांना प्रामुख्याने अंगमेहनतीचे काम असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. यामुळे अध्यक्ष सुशिला यादव, दिलीप पवार, मिलिंद यादव यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शेतमजूर महिलांचा मोर्चा काढण्यात आला.

शेतमजूर, कुटुंबियांना आरोग्य सेवा मोफत मिळाव्यात, मुलांना शैक्षणिक सुविधा मोफत मिळाव्यात, किमान वेतन कायद्याप्रमाणे शेतमजूरांना वेतन मिळावे व काटेकोर अंमलबजावणी करावी, ​महिलांना बाळंतपणावेळी दहा हजार रुपये आर्थिक सहाय्य मिळावे, स्वस्त दरात धान्य पुरवठा करण्यात यावा, विम्याचे संरक्षण देण्यात यावे आदी मागण्या करत प्रशासनाला शिष्टमंडळाच्यावतीने निवेदन देण्यात आले. कमल नाईक, मालती कुरणे, कमल पाटील, शोभा नवले, सुनिता वाघवेकर, वैशाली तांदळे आदी सहभागी​ झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मगरीचा पुन्हा हल्ला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

पलूस तालुक्यातील भिलवडीनजीक मगरीने बुधवारी मच्छीमारावर हल्ला केला. गुडघाभर पाण्यात उभे राहून मासे पकडण्यासाठी जाळे फेकण्याच्या तयारीत असताना पाठीमागून आलेल्या मगरीने अशोक सोनाप्पा नलावडे (वय ५४) यांची मांडी आपल्या जबड्यात पकडली. मोठ्या प्रयत्नाने नलावडे यांनी मगरीच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेत नदीचाकाठ गाठला.

भिलवडी येथील भोई गल्लीत राहणारे अशोक नलावडे नेहमीप्रमाणे भिलवडी-अंकलखोपच्या दरम्यान असलेल्या कृष्णेवरील पुलानजीक मासे पकडण्यासाठी गेले होते. ते फेक जाळ्याद्वारे मासे पकडत असल्याने त्यांना गुडघ्या इतक्या पाण्यात नदीत उतरावे लागते. बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ते जाळे फेकण्याच्या तयारीत असतानाच पाठीमागून पाण्याखालून आलेल्या मगरीने नलावडे यांची मांडी पकडली. अचानक हल्ला झाल्यानंतरही नलावडे यांनी हिम्मत दाखवून मगरीच्या जबड्यातून मांडी सोडवून घेतली. मगरीने पकडलेल्या ठिकाणचा मांडीचा लचका तुटल्याने मोठी जखम झाली आहे. त्यानंतर तातडीने त्यांना सांगलीच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

कृष्णाकाठावर मगरींच्या पिल्लांचा वावर

भिलवडीनजीकच्या कृष्णेच्या पात्रातील काही परिसर मगरीच्या वावराने कायमचाच व्यापला आहे. त्याच परिसरात आता अंड्यातून बाहेर पडलेली मगरीचे पिल्लं वळवळत पाण्याकडे झेपावत असल्याचे चित्र दररोज बघायला मिळत आहे. वनविभागाचे कर्मचारी तेथे नेमणुकीस आहेत. पण, ते हे दृश्य बघत बसण्यापलिकडे काहीच करू शकत नाही. बुधवारी दुपारी मगरीने मच्छिमारावर हल्ला केला, त्यावेळी तर वन विभागाचे कर्मचारी जागेवर नव्हतेच. पाण्यातील मगर पकडणे कठीण असले तरी नुकत्याच जन्मलेल्या पिलांना अन्य ठिकाणी स्थलांतरीत करून मगरींच्या संख्येवर नियंत्रण आणता येणे शक्य आहे. पण, या बाबत निर्णय कोणी घ्यायचा? हाच खरा सवाल आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक पालकाच्या दारात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

उन्हाळी सुट्टी सुरू असतानाही प्राथमिक व माध्यमिक शाळांचे शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पालकांच्या भेटी घेवून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी विनवणी करत आहेत. राज्य सरकारने १ ते १० पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शाळा वर्ग वाचवण्यासाठी शिक्षकांची धडपड सुरू आहे. विद्यार्थी मामाच्या गावाला अन् शिक्षक पालकांच्या गावाला, असे चित्र गावोगावी दिसू लागले आहे.

राज्यात यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकार सत्तेवर असताना शिक्षण सम्राटांच्या हिताचे अनेक निर्णय त्यांनी घेतले होते. त्यामुळे राज्यभर सर्वत्र प्राथमिकपासून पदवीपर्यंत, इंजिनिअरिंग, वैद्यकीय आदी प्रकारच्या शाळांचे अक्षरश: पेव फुटले होते. आज त्या शाळांमध्ये प्रवेश घ्यायला विद्यार्थी धजावत नाहीत. त्यामुळे त्या शाळा नैसर्गिकरीत्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. भाजपा-सेना युती सरकारने १ ते १० पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. परिणामी, पटसंख्येअभावी शाळांच्या तुकड्यांवर गंडांतर येण्याची शक्यता असल्याने उन्हाळी आणि हक्काची सुट्टी असतानाही शिक्षक दारोदारी जावून विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्यासाठी पालकांकडे विणवणी करू लागले आहेत.

वार्षिक परीक्षेचा निकाल लागल्यानंतर शिक्षकांनी उन्हाळी सुट्टीचे अचूक नियोजन केले होते. मात्र, काही शाळांमधील शिक्षकांनी विद्यार्थीसंख्या वाढविण्यासाठी सुट्टी राखून ठेवली आहे. त्यासाठी पहिली ते चौथी, सहावी ते दहावीपर्यंत पट टिकविण्यासाठी घरोघरी पालकांच्या गाठीभेटी सुरू करून शाळांमधील विविध शैक्षणिक सुविधांची माहिती पालकांना देवू लागले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजरा घनसाळचे प्रेझेंटेशन

$
0
0

नवी दिल्लीत आजरेकरांनी जीआयबाबत दिली परिपूर्ण माहिती

रमेश चव्हाण, आजरा

आजऱ्याच्या सुवासिक घनसाळ तांदळाचे भौगोलिक निर्देशांक (जीआय) मिळविण्यासाठी आवश्यक प्रेझेंटेशन करण्यासाठी गेलेल्या आजरेकर शेतकरी मंडळ सदस्य आणि कृषी विभागातील तज्ज्ञांची बुधवारी दिल्ली-मोहिम यशस्वीरित्या पार पाडली. राज्यभरातून गेलेल्या १८ जीआय इच्छुक टीमपैकी सर्वप्रथम सादरीकरण आजरेकरांचे झाले. या सादरीकरणाचे अवलोकन व क्रॉस-क्वेशचनिंगसाठी नेमण्यात आलेल्या वरिष्ठांचे समाधान झाल्याने आता घनसाळ जीआयबाबत केवळ औपचारिकताच राहिली असल्याची प्रतिक्रिया आजरा तालुका शेतकरी मंडळाचे अध्यक्ष संभाजी सावंत व आत्माचे उपसंचालक अनिल गळीतकर यांनी 'मटा' कडे दिली.

गेले काही दिवस याबाबतची सूचना मिळाल्यापासून घनसाळ उत्पादक शेतकरी व आजरा तालुका शेतकरी मंडळासह तालुका व जिल्हा कृषी विभागाकडून मोठी तयारी सुरू होती. वर्ष-दीड वर्षापासून याबाबत गोळा केलेली माहिती व प्रयोगशाळेतील संशोधनांसह अहवालांचे संकलन तसेच अनेक मराठीतील माहितीचे इंग्रजी रूपांतर करण्यात येत होती. याशिवाय जिल्हा कृषी विभागाच्या आत्माचे संचालक बसवराज मास्तोळी यांनी याबाबत मॉक प्रेझेंटेशन आदींमार्फत तयारी करवून घेतली होती. या टीममध्ये सावंत यांच्यासह पाच शेतकरी, आत्माचे गळीतकर व अॅग्रो मार्केटींग एक्स्पर्ट धनराज पाटील यांचा समावेश होता. या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. २७) सकाळच्या सत्रात पहिलेच प्रेझेंटेशन घनसाळचे झाले व त्याबाबत पॅनेलचेही समाधान झाल्याने घनसाळ पेटंट आजरेकरांना मिळण्याबाबत केवळ दोन-तीन महिन्यांची औपचारिकताच उरली असल्याचे सांगण्यात आले.

बुधवारी सकाळी आयएएस दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पॅनेलसमोर प्राथमिक माहितीचे सादरीकरण केल्यानंतर काही मूलभूत प्रश्नांच्या अनुषंगिक माहीतीकडे पॅनेलने लक्ष वेधले. घनसाळ हा जरी आजरा परिसरातच पिकविला जात असला तरी इतरत्र त्याचे उत्पादनच होत नाही का, अशी अपेक्षित विचारणा झाली. त्यावर घनसाळचे उत्पादन जरी इतरत्र होत असले तरी त्यातील जीआय (भौगोलिक निर्देशांक) हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. याला कारण आहे तो आजरा तालुक्यातील दाभिल परिसराचा पट्टा. तेथील पोषक हवामानामुळेच घनसाळला सुवास व चव मिळते. ती इतर तालुक्यातच नव्हे तर आजरा तालुक्यातील इतर परिसरातही अशक्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

याबाबत येत्या दोन-तीन महिन्यात पुन्हा एकदा या जीआयबाबत हरकती मागविल्या जाणार आहेत. पण आधीच्या टप्प्यातच कोणी हरकती दिल्या नसल्याने याबाबतचे हक्क मिळविण्यासाठी औपचारिकताच राहिल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images