Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

नेत्यांवर तोफ डागत एकनाथ खडसेंची दांडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भाजपच्या दोन दिवसांच्या कार्यकारिणी बैठक आणि अधिवेशनाचा समारोप झाला; पण या दरम्यान भाजपच्या अनेक नेत्यांमधील अंतर्गत धुसफूस लपून राहिली नाही. सुरूवातीपासून मनात मुख्यमंत्रिपदाची आस बाळगून असलेले एकनाथ खडसे यांनी नेत्यांवर तोफ डागत दुसऱ्या दिवशी अधिवेशनालाच दांडी मारली. त्यामुळे त्यांची अनुपस्थिती आणि नाराजी चर्चेचा विषय होती.

भाजप राज्य कार्यकारिणीची बैठक आणि अधिवेशन जोशात पार पडले. एकमेकांना चिमटे घेत आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती आरोप करत भाजपच्या नेत्यांनी स्वकीयांनाही सुनावले. प्रत्येक नेत्याने आपल्या खात्याचा लेखाजोखा मांडताना गेल्या सहा महिन्यांत कसा चांगला कारभार केला याचा सातबाराच मांडला; पण एवढे करूनही नाराजी असल्याबाबत खंत व्यक्त केली.

महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी 'शेतकरी मोबाइलचे बिल भरतात मग लाइटचे बिल का भरत नाहीत?' असा सवाल केल्यानंतर उठलेल्या वादंगाचा समाचार घेतला. शेतकऱ्यांसाठी योजना राबविल्या, कर्जे माफ केली तरीही आत्महत्या थांबल्या नाहीत. आता यावर कुणीतरी उपाय सुचवावा, असे वक्तव्य केले. खडसे तसे रोखठोक बोलणारे आहेत. मुख्यमंत्र्यांकडे इशारा करत कितीही चांगले काम केले तरी, केवळ काही लोकांनाच माध्यमांचे प्रेम मिळते. आमच्या नशिबी जास्त प्रेम असल्यामुळे त्याला अधिक प्रसिद्धी मिळते, असा टोला लगावला.

'मुंबई महापालिका एकत्रच लढणार'

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसेना आणि भाजप एकत्र येऊनच लढणार आहे. शिवाय राज्यातील अन्य महापालिकांमध्ये स्थानिक जिल्हा कमिट्यांना अधिकार देण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिली. विधानसभा निवडणुकीत युती तुटल्याने ताकद समजली, असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी शनिवारीच केले होते. त्यावर ते म्हणाले, 'युती तुटावी असे कुणालाच वाटत नव्हते, अगदी शेवटच्या टप्प्यात युतीबाबत निर्णय झाला आणि सर्व जागा लढवाव्या लागल्या. खूप कमी कालावधीत तयारी करून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावा लागला.'

काँग्रेस सत्तेची दलाल, भाजप सेवक

काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सरकार हे सत्तेचे सेवक नव्हते तर ते सत्तेचे दलाल होते, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आपले सरकार सत्तेचे सेवक असल्याचा दावाही त्यांनी केला. केंद्र व राज्य सरकारवर उपाहात्मक टीका होत असताना भाजप कार्यकर्त्यांनी बचावत्मक भूमिकेत न राहता सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती घराघरात जाऊन लोकांना पटवून द्या. त्यांचे जीवनमान उंचावण्यास प्रयत्न करा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. फडणवीस म्हणाले, 'पंधरा वर्षे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीने भ्रष्टाचार करून जनतेला ओरबाडण्याचे काम केले. त्यामुळे राज्यातील जनतेने भाजपला मोठा पक्ष म्हणून संधी दिली. भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शी व गतीमान कारभार हेच सरकारचे ध्येय आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘बसप’च्या नेत्याकडून विनयभंग

0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

तरुणीला बेदम मारहाण करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक झालेला बहुजन समाज पक्षाचा जिल्हाध्यक्ष शंकर मार्तंड माने याने जामिनावर सुटल्यावर संबधित तरुणीसह तीन जणांवर ब्लेडने हल्ला केला. या घटनेने कवठेमहांकाळ परिसरात खळबळ उडाली आहे. तिघाही जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोर शंकर माने हा पसार झाला आहे.

कवठेमहांकाळमध्येच राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीला शंकर माने याने रस्त्यात आडवून आपल्यावर प्रेम करण्यासाठी दबाव आणला. तीने नकार देताच तिला मारहाण करून तिच्याशी झोंबाझोंबी केली. हा प्रकार समजताच तरुणीने पालकांना सोबत घेऊन माने विरुद्ध फिर्याद दिली. पोलिसांनी माने याला अटक करून शनिवारी कोर्टासमोर हजर केले. त्यावेळी कोर्टाने त्याला जामिनावर सोडले. जामिनावर सुटताच त्याने पुन्हा त्या तरुणीचे घर गाठून तिच्यावर ब्लेडने वार केले. तरुणीचा मामा धावत आल्यानंतर त्याच्यावरही ब्लेडने गंभीर स्वरुपाचा हल्ला केला. तरुणीच्या आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेने त्या परिसरात खळबळ माजली. हल्ला केल्यानंतर माने पसार झाला आहे. जखमीपैकी मामाची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मिरजेच्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

प्रेमप्रकरणातून सांगलीत जोरदार धुमश्चक्री

प्रेमप्रकरणातून फोन केल्याच्या कारणावरून रविवारी सांगलीत दोन गटांत जोरदार धुमश्चक्री झाली. मारामारीत तलवार, टॉमी, लोखंडी गजाचा वापर केल्याने दोन्ही गटातील सात जण जखमी झाले. जखमींना सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्परांविरुद्ध संजयनगर पोलिसांत तक्रारी केल्या आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

माधवनगरमधील गोसावी गल्लीत राहणाऱ्या एका तरुणीचा विवाह टाकवडे (इचलकरंजी) येथे झाला आहे. लग्नानंतर दोन महिन्यांपूर्वी सांगलीतील लक्ष्मीनगरमध्ये राहणाऱ्या विजय विनायक जाधव (गोसावी) याने त्या विवाहितेला फोन केला होता. तेव्हा संबधित प्रकरण गोसावी समाजाने एकत्र येवून आपसात मिटवले होते. पुन्हा दोन दिवसांपूर्वी त्याने फोन केल्याने माधवनगरमधील एक गट विजय जाधवला जाब विचारण्यासाठी रविवारी सकाळी माधवनगर रोडवरील लक्ष्मीनगरमध्ये आला.

त्यावेळी वाद वाढत गेला आणि दोन गटात जोरदार मारामारी झाली. विजय जाधव याने दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी माधवनगरचे राजकुमार अशोक घाडगे, विशाल अशोक घाडगे, सुरेश श्रीपती घाडगे, राहुल उत्तम आडके आंदीच्या विरोधात विनयभंग आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला. तर राजकुमार घाडगे याच्या तक्रारीवरुन विजय जाधव, विजय पंडीत गोसावी, आशा शिवाजी चव्हाण आदींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेस्ट‌िनेशन आंबा-विशाळगड

0
0

म. टा. वृत्तसेवा, शाहूवाडी

उन्हाळ्याच्या झळा तीव्र झाल्याने पर्यटक निसर्गरम्य ठिकाणांनाच अधिक पसंती देऊ लागले आहेत. निसर्गसमृद्ध आंबा गिरीस्थान, किल्ले विशाळगड आणि साडेतीनशे वर्षापूर्वी घडलेल्या रणसंग्रामातील पावनखिंड ही ठिकाणे वर्षातील बाराही महिने पर्यटकांनी गजबजलेली असतात. ऐतिहासिक बाज असलेल्या पावनखिंडीविषयी तर पर्यटकांना खास आकर्षण वाटू लागले आहे. निसर्गाचा हा आविष्कार आणि जैवविविधतेचा नजराणा अनुभवावयाचा असेल तर आंबा - विशाळगड येथीली टूर घडायलाच हवी.

तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडणारा हा भाग म्हणजे आंबा, विशाळगडचे जंगल, जैवविविधता आणि उंचच उंच डोंगररांगा यामुळे हा भाग पश्चिम घाटाची ख्याती टिकवून आहे. बाराही महिने हिरवागार निसर्ग आणि थंड हवा यासाठी प्रसिद्ध असलेला आंबा आणि आंबा घाट पर्यटकांची नेहमीच तहानभूक हरवतो.

हौशी पर्यटकांना आंबा - विशाळगड किंवा पावनखिंड - विशाळगड या मार्गावर ट्रेकिंगचाही अनुभव घेता येतो. नैसर्गिक वरदान लाभलेल्या या परिसरात राज्यप्राणी शेकरू, राज्यफुल जारुल, राज्यपक्षी हरेल व राज्य फुलपाखरू ब्ल्यू मोर्मोन यासह दुर्मिळ असलेला माउस डीअर ( गेळा), रानगवे, हॉर्नबील, गरुड यासह औषधी वनस्पतींचा खजिना दृष्टीस पडतो. आंब्यातली देवराई, निसर्ग माहिती केंद्र, सासनकडा, मानोली धरण याचाही अनुभव घेता येतो. थकूनभागून आलेल्या पर्यटकांसाठी आंबा इथली रिसोर्ट्स नेहमीच स्वागतासाठी सज्ज आहेत. कोल्हापुरी तांबडा - पांढरा रस्सा, रानमेव्यांची सरबराई यामुळे पर्यटकांची चांगली पोटपूजा होते. मलकापूर, आंबा, विशाळगडाचा पायथा या ठिकाणी तर ऐन उन्हाळ्यात जांभळे, करवंदे, तोरणे, रातांबी, अळू, काजू, फणस हा रानमेवा मनाला तरतरी निर्माण करतो. हौशी पर्यटकांसाठी आंबा घाट, वाघझरा, कोंकण पोईन्ट, पावनखिंड व किल्ले विशाळगड या मार्गावरील जंगल सफारी करण्यासाठी आंबा येथे जीपवर टप केलेल्या खास गाड्याही सदैव सजलेल्या असतात.

पर्यटकांना संधी

पावनखिंड ते विशाळगड या तेरा किलोमीटरच्या मार्गावर निसर्गाची हिरवाई, दाट झाडी, वेडावाकडा घाट आहे. विशाळगडावर मलिक रेहान बाबांचा दर्गाह, टकमक दरी, गडकोटांचे प्रदर्शन, पावनखिंडित प्राणार्पण केलेल्या नरवीर बाजीप्रभू देशपांडे व फुलाजी प्रभू या दोघा बंधूंच्या समाधी, हजारो फूट खोल खोल दऱ्या या साऱ्या गोष्टी पर्यटकांना पहावयास मिळतात.

निसर्गसंपन्न परिसर

मलकापूरपासून पांढरेपाणी, पावनखिंड, भाततळी, गजापूर, गेळवडे धरण, विशाळगड हा तीस किलोमीटरचा तर मलकापूरपासून आंबा ते विशाळगड हा वीस किलोमीटरचा परिसर पूर्णपणे निसर्गसंपन्नतेने नटलेला आहे. उन्हाच्या झळा असल्या तरी इथली दाट झाडी सदैव गारवाच देते. या मार्गावर भटकंती केल्यावर विविध जातीचे पक्षी व वन्य प्राण्यांचे हमखास दर्शन होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजीपाला कडाडला

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खरीप हंगामामध्ये पेरणी करण्यासाठी भाजीपाला उत्पादनाखालील क्षेत्राची पूर्ण काढणी केल्यामुळे भाजीपाल्याची आवक गेल्या चार दिवसांपासून निम्म्याने घटली आहे. त्यामुळे दरात चांगलीच वाढ झाली आहे. यात सर्वात जास्त वाढ कोथिंबिरीत झाली आहे. गेल्या आठवड्यात दहा ते पंधरा रुपयाला मिळणाऱ्या पेंढीचा दर ३० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली असताना हापूस आंब्याची आवक वाढल्याने दरात चांगलीच घसरण झाली आहे.

मृग नक्षत्राची चाहूल लागल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. भात, भुईमुग, सोयाबिन पिकांची पेरणी करण्यासाठी शेत मोकळे करून मशागतयोग्य करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादनाखालील क्षेत्रामध्ये प्रचंड घट झाल्याने कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसह किरकोळ बाजारातही भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. आवक घटल्यामुळे फळभाज्यांसह भाजीपाल्याच्या दरात चांगलीच वाढ झाली. त्यामुळे नेहमी कवडीमोल दराने विकला जाणारा फ्लॉवर व कोबीच्या दरातही वाढ झाली आहे. तर दोडका, श्रावण घेवडा भाजीची आवकच ठप्प झाली आहे. दहा ते पंधरा रुपये किलो असणाऱ्या काकडीचा दर ५० रुपयांवर पोहोचला आहे.

पावसाळ्यात साठवणूक करण्यासाठी गृहिणी मे महिन्यामध्ये चटणी करुन ठेवतात. त्यामुळे मिरची आणि चटणी करण्यासाठी लागणाऱ्या पदार्थांच्या मागणीमध्ये वाढ होत आहे. उन्हाचा तीव्रता वाढल्याने कोथिंबिरीच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने कोथिंबिरीचे उत्पादनच कमी झाले आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापेक्षा आता दरात दुप्पटीने वाढ झाली आहे. हापूस, पायरी, तोतापुरी, रायवळ यासह मद्रास हापूस व कर्नाटक येथील लालबाग आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. यामुळे हापूस आंब्याच्या दरामध्ये निम्माने घट झाली आहे. गेल्या आठवड्यात ३०० ते ६०० रुपये डझन असणारा हापूस आंब्याचा दर १५० ते ३०० रुपयांपर्यंत कमी झाला आहे. हापूस आंब्याचे कमी झाल्यामुळे ग्राहकांची खरेदीसाठी मोठी गर्दी झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘काँग्रेस सत्तेची दलाल’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सरकार हे सत्तेचे सेवक नव्हते तर ते सत्तेचे दलाल होते, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आपले सरकार सत्तेचे सेवक असल्याचा दावाही त्यांनी केला. केंद्र व राज्य सरकारवर उपाहात्मक टीका होत असताना भाजप कार्यकर्त्यांनी बचावत्मक भूमिकेत न राहता सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती घराघरात जाऊ लोकांना पटवून द्या. त्यांचे जीवनमान उंचावण्यास प्रयत्न करा, असे आवाहनही केले. भाजप राज्य कार्यकारिणी व अधिवेशनाच्या समारोप कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितिन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे प्रमुख अतिथी होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, '१५ वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीने भ्रष्टाचार करून जनतेला ओरबाडण्याचे काम केले. त्यामुळे राज्यातील जनतेने भाजपला मोठा पक्ष म्हणून संधी दिली. आपणही त्यांच्यासारखे वागायला लागलो तर जनता आपल्या मागे राहणार नाही. भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शी व गतीमान कारभार हे सरकारचे ध्येय आहे. पक्ष कार्यकर्त्यांनी सरकारची भूमिका घरोघरी जाऊन पटवून द्यावी. एक महिन्यात सक्रिय कार्यकर्त्यांना महामंडळ व समितीवर नियुक्ती करून घेतले जाईल.' आघाडीने सरकारने शेतीचे पाणी पळवले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असा आरोप केला. शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवताना भ्रष्टाचाऱ्यांना बेड्या ठोकल्या जातील असा इशाराही त्यांनी दिला.

राज्यातील ५० टक्के लोकसंख्या २५ वर्षाखालील आहे. या साडेपाच कोटी युवकांच्या हाताला काम देण्यासाठी 'मेक इन महाराष्ट्र' कार्यक्रम हाती घेतला आहे. सर्वाधिक परकीय गुंतवणूक राज्यात व्हावी यासाठी इन्स्पेक्टर राज संपवले आहे, असेही फडणवीस म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भ्रष्टाचाराचा इतिहास बदलू

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोट्यवधींचा भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आरोग्य व शिक्षण व्यवस्थेच्या दुरवस्थेचा इतिहास बदलून भाजपला स्वच्छ, सुरक्षित व बलशाली भारत घडवायचा आहे. त्यासाठी सरकारच्या लोककल्याणाच्या योजना घरोघरी पोहचवून देशातील जगातील एक नंबरची शक्ती बनवण्यासाठी ताकदीने कामाला लागा,' असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले. गर‌िबांचा विकास हाच भाजपचा विचार हे सरकारच्या कामाचे सूत्र आहे. त्यासाठी महाराष्ट्रात एक लाख कोटीचे रस्ते बांधले जातील, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली.

केंद्र व राज्यात सत्ता मिळवल्यानंतर येथे गेले तीन दिवस सुरू असलेल्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक व राज्य परिषदेचा समारोप रविवारी झाला. त्या वेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खासदार रावसाहेब दानवे यांच्याकडे प्रदेश अध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात आली.

देशाच्या सद्यपरिस्थितीला काँग्रेसची एकछत्री राजवट कारणीभूत असल्याचे सांगत गडकरी म्हणाले, 'सामान्य जनता रस्ते, पाणी, रोजगार नसल्याने त्रस्त आहे. काँग्रेसच्या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या कारभाराला कंटाळूनच जनतेने आपल्याकडे सत्ता सोपवली आहे. भाजप सत्ता बदलण्यासाठी नव्हे तर, समाज बदलण्यासाठी कटिबद्ध आहे. सा​माजिक व

आर्थिक परिस्थिती बदलण्याचे मोठे आव्हान समोर आहे. त्यासाठी राष्ट्रवाद, सुशासन व अंत्योदय या त्रिसूत्रीचा वापर केला जात आहे. त्याच्या केंद्रस्थानी गरीबांचा विकास आहे. सामान्यांचा विकास झाला तर भाजपच्या विरोधात मते मागता येणार नाहीत, म्हणून विकासच होऊ नये, अशी संकुचित मनोवृत्ती वारंवार अडथळे निर्माण करत आहेत.'

राज्याचा कृषी विकासाचा दर सलग तीन वर्षे शून्याच्याही खाली आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांचे सरकार होते मग ही दयनीय अवस्था का? सिंचन व्यवस्था नसल्याने शेतकरी आत्महत्या करत असल्याचे सांगत गडकरी म्हणाले, 'जलशिवार योजना, भूसंपादन कायदा शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठीच आहेत; पण भूसंपादन कायद्याबाबत गैरसमज पसरवले जात आहेत. देशातील तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी कौशल्ये विकास केंद्रांची उभारणी करण्याची गरज आहे. शेतमजूर, शेतकरी, गरीब जनता यांच्या विकासासाठी सरकारने विविध योजना राबवल्या. त्या योजना घरोघरी पोहचवण्याची गरज आहे. भाजप हा पक्ष आमदार, खासदार बनण्यासाठी नव्हे तर, समाजासाठी काम करण्यासाठी आहे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान व शेतकरी, गरीब जनता असा समन्वय साधत देशाच्या विकासासाठी भाजप कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे.'

नितीन गडकरी म्हणतात...

राज्यात एक लाख कोटीचे रस्ते बांधणार

परिवहन विभागाच्या योजनांमधून जीडीपीमध्ये २ टक्के भर घालणार

इथेनॉल निर्मितीच्या पाठीमागे लागा

ऊसपिकांत ते​लबिया लावल्यास खाद्यतेलाचा तुटवडा कमी होईल

एसटी बस डिझेलऐवजी इलेक्ट्रिकल करा

कोळशातून खतनिर्मितीतून युरियाची किंमत निम्म्यावर

छाबरामधील (इराण) खतकारखान्यामुळेही युरियाची किंमत घटणार

'गुंतवणुकीत गुजरातच नंबर १'

कोल्हापूरः औद्योगिकीकरणात राज्य आघाडीवर असले तरी सध्या गुजरातमध्ये सर्वांत जास्त परकीय गुंतवणूक होत असल्याची कुबली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मात्र, पुढील वर्षभरात परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीचा समारोप रविवारी झाला. त्यापूर्वी ते पेटाळा येथे पत्रकारांशी बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, 'औद्योगिकदृष्ट्या पुणे आणि जवळपासचा परिसर वेगाने विकसित होत आहे. पश्चिम महाराष्ट्रात साखर उद्योग, त्याबरोबरच फूड प्रोसेसिंग युनिट आणि वस्त्रोद्योगासंदर्भातील धोरण विकसित करण्याचे नियोजन आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबई महापालिकेत युतीच

0
0

निवडणुकांबाबत मुख्यमंत्र्यांचे कोल्हापुरात स्पष्टीकरण

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यातील युती सरकार महापालिका निवडणुकांपर्यंतच टिकेल, मालिका निवडणुका दोन्ही पक्ष वेगळेच लढतील, असे तर्क लढवले जात असतानाच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसेना आणि भाजप एकत्र येऊनच लढणार आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी कोल्हापुरात स्पष्ट केले. तसेच राज्यातील अन्य महापालिकांमध्ये स्थानिक जिल्हा समित्यांना अधिकार देण्यात आले असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

शिवसेना आणि भाजपची युती गेल्या अनेक वर्षांपासून चालत आली आहे. विधानसभा निवडणुकीत काही कारणाने युती होऊ शकली नाही. मात्र, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप एकत्रच लढणार आहे, असे ते म्हणाले. युती तुटल्याने ताकद कळली, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडल्याने चर्चा होत असतानाच युती तुटावी असे कुणालाच वाटत नव्हते. एवढ्या कमी कालावधीतही जास्त जागा येऊ शकल्या ही भाजपची ताकद होती, ती सर्वांना समजली, एवढाच या बोलण्याचा उद्देश होता, अशी सारवासारव त्यांनी रविवारी केली.

गुजरातमध्येच गुंतवणूक

औद्योगिकीकरणात राज्य आघाडीवर असले तरी सध्या गुजरातमध्ये सर्वांत जास्त परकीय गुंतवणूक होत असल्याची कुबली फडणवीस यांनी दिली. मात्र, पुढील वर्षभरात परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 'औद्योगिकदृष्ट्या पुणे आणि जवळपासचा परिसर वेगाने विकसित होत आहे. इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या माध्यमातून अनेक शहरांचा विकास होणार आहे. त्याचेही काम सुरू असून सध्या औरंगाबादसारख्या शहरांत थेट गुंतवणूक केली जात आहे. भविष्यात अशाच प्रकारची गुंतवणूक अन्य शहरांतही होणार आहे,' असे ते म्हणाले.

कारवाईचे आदेश

बँकांनी शेतकऱ्यांना मदतीचे पैसेच दिले नसल्याचा प्रकार काही ठिकाणी घडला आहे. सरकारने दिलेले पैसे जिल्हा बँकांनी वापरल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देऊन त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत, असे ते म्हणाले.

दानवे प्रदेशाध्यक्ष

केंद्र व राज्यात सत्ता मिळवल्यानंतर येथे गेले तीन दिवस सुरू असलेली भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक रविवारी संपली. तत्पूर्वी फडणवीस यांनी रावसाहेब दानवे यांच्याकडे प्रदेश अध्यक्षपदाची सूत्रे सोपवली.

एकनाथ खडसेंची दांडी

बैठकीदरम्यान भाजपच्या नेत्यांमधील धुसफूस लपून राहिली नाही. सुरुवातीपासून मनात मुख्यमंत्रिपदाची आस बाळगून असलेले एकनाथ खडसे यांनी नेत्यांवर तोफ डागत दुसऱ्या दिवशी अधिवेशनालाच दांडी मारली. एकमेकांना चिमटे घेत आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती आरोप करत भाजपच्या नेत्यांनी स्वकीयांनाही सुनावले. खडसे यांनी 'शेतकरी मोबाइलचे बिल भरतात मग लाइटचे बिल का भरत नाहीत?' असा सवाल केल्यानंतर उठलेल्या वादंगाचा समाचार घेतला. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या, कर्जे माफ केली तरीही आत्महत्या थांबलेल्या नाहीत. त्यामुळे आता यावर काय उपाय करावा हे सुचत नसल्याची हतबलताही त्यांनी व्यक्त केली. आता यावर कुणीतरी उपाय सुचवावा राज्याची तिजोरी खाली करू, असे वक्तव्य केले. खडसे तसे रोखठोक बोलत मुख्यमंत्र्यांकडे इशारा करत कितीही चांगले काम केले तरी, केवळ काही लोकांनाच माध्यमांचे प्रेम मिळते. आमच्या नशिबी जास्त प्रेम असल्यामुळे त्याला अधिक प्रसिद्धी मिळते, असा टोल लगावला.

बदलासाठी कटिबद्ध

'सामान्य जनता रस्ते, पाणी, रोजगार नसल्याने त्रस्त आहे. काँग्रेसच्या कारभाराला कंटाळूनच जनतेने आपल्याकडे सत्ता सोपवली आहे. भाजप समाज बदलण्यासाठी कटिबद्ध आहे,' असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आंदोलकांना मंत्रिपदात जास्त रस’

0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

'आंदोलने केल्याने ऊसाला दर मिळतो, हा आपला गैरसमज आहे. देशाचे तत्कालीन कृष‌िमंत्री शरद पवार यांनी साखर उद्योगासमोरील अडचणींवर वेळो-वेळी उपाययोजना केल्याने आपणास चांगला दर मिळाला आहे. सध्या आंदोलकांना ऊसदरापेक्षा मंत्रिपदात जास्त रस आहे,' असा टोला माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी राजू शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना लगावला. ते कामेरी येथील प्रचारसभेत बोलत होते.

राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील सत्ताधारी राजारामबापू सहकार पॅनेलच्या प्रचारसभेत ते बोलत होते. चेअरमन पी. आर. पाटील, व्हा. चेअरमन विजय पाटील, उमेदवार जालिंदर कांबळे या वेळी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, 'पूर्वी साखरेचा दर २२-२३ रुपयांवर येताच शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या वतीने तातडीने निर्यातीचे धोरण घ्यायला लावले. त्यामुळे साखरेचा दर ३३-३४ रुपयांवर गेला. त्यामुळे आपणास चांगला दर मिळाला. सध्या विक्रमी साखरेचे उत्पादन होताना केंद्र सरकारने पुर्वीच निर्यातीचे धोरण घ्यायला हवे होते. भाजपाच्या केंद्र व राज्य सरकारने उसदराचा प्रश्नच समजला नाही? का सरकार मुद्दामच असे वागत आहे, हे कळत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांचे ऐकण्यासाठी किती वेळ दिला? हा प्रश्नच आहे. शेजारच्या कृष्णा कारखान्यात तीनही पॅनेलचे प्रमुख एकमेकांचा उद्धार करीत असताना आपले चेअरमन पी. आर. पाटील व सहकारी केलेल्या विकासकामांचा आढावा मांडत आहेत, यातच आपल्या कारखान्याच्या यशाचे गमक आहे.'

सभासद विरोधात का जातात

आपल्या सभासदांनी दिवंगत राजारामबापूंपासून प्रत्येक निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने आपल्यावर विश्वास दाखवित आपल्याकडे एकहाती सत्ता दिली आहे. तरीही १२ हजार ५०० सभासदांच्या मधून ६०० ते ७०० मते विरोधी जातात. आपण या विरोधातील लोकांनाही भेटावे ते विरोधी मतदान का करतात, हे बघावे, असे आवाहन माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी शिगाव येथील प्रचार सभेत बोलताना केले.

आंदोलक आता सत्तेचे राजकारण करीत आहेत. आता ऊसदराची चर्चा होत नाही, तर मंत्रिपद सदाभाऊंना मिळणार का शिवाजीराव नाईकांना याची चर्चा सुरू आहे. ते कोणालाही मिळो, आमची तक्रार नाही. मात्र, यांव करू, त्यांव करू म्हणणारे अपयशी ठरले आहेत.

- जयंत पाटील, माजी मंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बापाने केला मुलांचा खून

0
0

कुपवाड : घरातून निघून जाण्यास बजावल्याने जन्मदात्या पित्याने झोपेत असलेल्या मुलाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना सोहोली (ता. कडेगाव) येथे घडली. या प्रकरणी खुनी बाप महादेव ठोंबरे याला कडेगाव पोलिसांनी अटक केली आहे. महादेव ठोंबरे (वय ६८) आणि त्याचा मुलगा रावसाहेब (वय ३८) या दोघांनाही दारुचे व्यसन होते. त्यामुळे दोघांत सतत वाद होत होता. याच वादातून रविवारी रावसाहेबने बापाला 'घरातून बाहेर पड,' असे सुनावले. याचा राग आल्याने दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घरात झोपलेल्या रावसाहेबाच्या डोक्यात दगड घालून खून केला.

एक ठार; एक जखमी

कराड : हरपळवाडीहून उंब्रजकडे येणाऱ्या दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार जागीच ठार तर पाठीमागे बसलेला युवक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी कोर्टी (ता.कराड) गावच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर घडली. या अपघातात दुचाकीवरील तानाजी खंडेराव कळंबेकर (२५, रा. हरपळवाडी, ता. कराड) यांचा मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेला दत्तात्रय यादव जखमी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लष्कराचा जवान अपघातात ठार

0
0

कराड : एकाच मोटरसायकलवरून गावी (पणुंब्रे. ता. शिराळा) येथे निघालेल्या दोन सख्ख्या भावांच्या दुचाकीला वाठार (ता. कराड) येथे अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने मोटरसायकलवरील लष्करी जवान ठार झाले तर पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. अनिल रघुनाथ पाटील (३५) असे मृत लष्करी जवानाचे नाव आहे तर वैभव रघुनाथ पाटील (३८) या गंभीर जखमी असलेल्या पोलिसावर येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

वैभव रघुनाथ पाटील मुंबई पोलिस दलात देवनार पोलिस ठाण्यात पोलिस कॉन्स्टेबल म्हणून नोकरी करत आहेत. काही दिवसांपूर्वी रजा घेऊन वैभव पाटील हे गावी पणुंब्रे येथे आले होते. त्यांचा धाकटा भाऊ अनिल रघुनाथ पाटील (३५) मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये गुजरात (अहमदाबाद) येथे भारतीय सैन्यदलात नोकरी करत आहे. अनिल पाटील यांनाही काही दिवसांसाठी सुट्टी मंजूर झाल्याने ते गावी जाण्यासाठी कराडहून पणुंब्रेकडे निघाले होते. पणुंब्रेकडे जात असताना अज्ञात वाहनाने मोटरसायकलला जोराची धडक दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवजात मुलीचे अपहरण

0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी येथून पळवून आणलेल्या नवजात स्त्री अर्भकासह वंदना जयपाल कांबळे-गांजे (वय २८) या महिलेला सोमवारी सांगलीत अटक करण्यात आली. शनिवारी रात्री वंदनाने अर्भकाला घेऊन सांगलीकडे पळ काढला होता. तिला इंदिरानगरमधील राहते घरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पकडले. सलग दुसऱ्या वेळीही मुलगीच जन्माला आल्याने जन्मदात्या बापानेच हे अपहरणनाट्य घडवून आणल्याची चर्चा आहे.

सांगलीत इंदिरानगरमध्ये राहणारी वंदना कांबळे ही येडेनिपाणी येथे जावून संबधित कुटुंबाकडे काही दिवस राहिली होती. नातेवाईकच असल्याने तिच्या वास्तव्याबाबत कोणाला शंका नव्हती. २३ मे रोजी मध्यरात्री तिने संबधित अर्भकाच्या मातेच्या डोक्याला तेल लावले आणि कसली तरी पावडर तिच्यावर टाकली. त्यामुळे ती गाड झोपल्यानंतर वंदनाने स्त्री अर्भकाला घेऊन तेथून पलायन केले. संबधित माते जवळ बाळ नसल्याने ती कासाविस झाली. त्यानंतर तिच्या पतीने कुरळप पोलिसात धाव घेऊन वंदना कांबळे हिनेच बाळाला पळवून नेल्याची फिर्याद दिली. या बाबतची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोबाइल लोकेशनच्या आधारे वंदनाचे घर शोधून तेथे छापा घातला त्यावेळी संबधित अर्भक आणि वंदना एकाच ठिकाणी सापडले. वंदना ही मुळची शिरोळ तालुक्यातील दानोळी येथील राहणारी आहे.

कुरळप पोलिसांसी संपर्क साधला असताना अर्भक अपहरणाचे नेमके कारण स्पष्ट अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे सांगितले. वंदनाने भीक मागण्यासाठी मुले हवी असल्यानेच अर्भकाचे अपहरण केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पण, या कारणामुळे अनेक सवाल उपस्थित होतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळमुक्त राज्यासाठी प्रयत्नशील

0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

'जलयुक्त शिवार अभियानाद्वारे विकेंद्रित पिण्याच्या पाण्याचे साठे निर्माण करून महाराष्ट्र कायमस्वरुपी दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न आहे,' असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सोलापूर जिल्ह्यातील इंगळगी जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाच्या पाहणी प्रसंगी केले. या वेळी पालकमंत्री विजय देशमुख, आमदार सुभाष देशमुख, प्रधान सचिव प्रविणसिंह परदेशी, जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रफिक नाईकवाडी आदी उपस्थिती होते.

या वेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले, 'प्रत्येक गावात पावसाचा प्रत्येक थेंब अडवून पाण्याचे साठे करून या अभियानाद्वारे जलस्वयंपूर्ण गाव करण्यासाठी हा कार्यक्रम आखण्यात आला आहे. हे अभियान अविरत चालू राहणार आहे. पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर हा कार्यक्रम परत राबविला जाणार आहे. ही योजना सरकारची न राहता जनतेची योजना झाली आहे. याला केवळ सरकारचे पाठबळ आहे.' दरम्यान, या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी इंगळगी, होटगी येथील विविध जलयुक्त शिवार अभियानांची पाहणी करून माहिती घेतली.

दरम्यान, महापालिकेबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, 'सोलापूर शहराला पाणी पुरवठा प्रामुख्याने उजनी धरणातून नदीद्वारे केला जातो. त्यामुळ बरेच पाणी वाया जाते. यासाठी एनटीपीसी योजनेचा विस्तार वाढवून सर्व पाणी समांतर जलवाहिनी टाकून बंद पाईपलाईनद्वारे सोलापूरला आणले पाहिजे. या साठीचा निधी राज्य सरकार व महापालिकेच्या माध्यमातून उभा करता येईल. तसेच पाणी वितरण व्यवस्था जुनी झाल्यामुळ पाणी वाटपात अडचण ठरते. यासाठी वितरण व्यवस्था नव्याने तयार करा. त्याच प्रमाणे घनकचरा व्यवस्थापनासाठीचाही प्रस्ताव तयार करावा. केंद्र सरकारच्या योजनेतून याला कशी मदत देता येईल याचा विचार करून पाठपुरावा करण्यात येईल.'

सोलापूर महापालिकेला सर्वोतोपरी मदत

सोलापूर महानगरपालिकेला पिण्याचे पाणी, घनकचरा व्यवस्थापन आदी कामासाठी राज्य सरकारच्या वतीने आवश्यक मदत दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सोलापूर महानगरपालिकेच्या प्रश्नांबाबत आयोजित आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणलोट कामात भ्रष्टाचार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सरकारच्या कृषी विभागामार्फत राबवलेल्या पाणलोट क्षेत्र विकास कामात व इतर योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला असून याला जबबादार असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना शिष्टमंडळाच्यावतीने कृषी अधीक्षक मोहन आटोळे यांच्याकडे केली. या पार्श्वभूमीवर राधानगरीचे तालुका कृषी अधिकारी रवींद्र रानगे, करवीरचे दिलीप पाटील व भुदरगडचे सुपरवाझर बी. डी. चव्हाण यांच्या मालमत्तेचे चौकशी करण्याचे आदेश आटोळे यांनी दिले. कामाच्या निविदा, झालेला खर्च याची सविस्तर यादी कृषीमंत्री खडसे व शिनसेना शिष्टमंडळाला आटोळे यांनी दिले.

कृषी कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यात शेततळी, नाला बडिंग, फळबाग योजना, सिमेंट बंधारे आदी कामे झाली आहेत. कार्यालयामार्फत केलेल्या कामामध्ये राधानगरी, करवीर व भुदरगड तालुक्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. जिल्ह्यात झालेल्या कामासाठी निविदा प्रसिद्ध झालेली नाही. पूर्ण झालेल्या कामाचा तपशील सादर केलेला नाही. राधानगरी तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांनी राशिवडे येथे तीस हजार रुपयांची खुरपी वितरीत केली आहेत. मात्र प्रत्यक्षात राशिवडे गावात एकाही लाभार्थ्याला खुरपे मिळालेली नाहीत. तसेच सेंद्रीय शेतीसाठी दिलेल्या अनुदानाचा ा गैरव्यवहार झाला आहे. भुदरगडचे सुपरवाझर बी. डी. चव्हाण यांनी तर अपार्टमेंट बांधली आहे.

कारवाईला विलंब लावल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला. दरम्यान तालुका कृषी अधिकाऱ्यांची नियोजित बैठक होती. यामुळे बहुतेक सर्व कृषी अधिकारी बैठकीस उपस्थित होते. मात्र ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या बैठकीला प्रतिनिधी पाठवून दिले होते. शिष्टमंडळात जिल्हा प्रमुख विजय देवणे यांच्यासह प्रवीण सावंत, संभाजी भोकरे, सुषमा चव्हाण, अशोक पाटील, तानाजी चौगुले, प्रकाश पाटील, सुरेश पाटील, विद्या गिरी, सुषमा पाटील यांच्यासह सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवसेनेची हेल्पलाइन

कृषी कार्यालयामार्फत होणाऱ्या कामे इ-ट्रेडिंगच्या माध्यमातून होणार आहेत. यासाठी कार्यालयाने कृषी खात्यास प्रस्ताव सादर केला आहे. कृषी कार्यालयासंबंधी काही तक्रारी असल्यास तक्रारी दाखल करण्यासाठी सेनेच्यावतीने हेल्पलाइन सुरू करण्यात येणार आहे. याद्वारे कृषी खात्यातील कामांवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासकांचा हवेत बार

0
0

मारुती पाटील, कोल्हापूर

अशासकीय प्रशासक मंडळ बरखास्तीनंतर कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यभार प्रशासक रंजन लाखे यांनी स्वीकारला होता. कार्यभार स्वीकारल्यानंतर धान्य बाजार स्थलांतर, गांडूळ खत प्रकल्प, रस्ते गटर दुरुस्तीसह सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या घोषणा केल्या होत्या. प्रत्यक्षात यापैकी एकाही घोषणेची पूर्तता झालेली नाही. समितीची निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर मंगळवारपासून सीसीटीव्ही कॅमेरे कार्यन्वित होणार आहेत.

समितीमध्ये भ्रष्टाचार झालेल्याच चौकशीमध्ये स्पष्ट झाल्यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी प्रशासकांची नियुक्ती केली होती. प्रथम डॉ. महेश कदम यांच्याकडे समितीचा कार्यभार दिल्यानंतर त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. समितीच्या उत्पन्वाढीसह गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी त्यांनी कठोर उपायोजना केली होती. यामुळे त्यांच्या कार्यकाळामध्ये हाती घेतलेली अतिक्रमण मोहीम व समितीमधील डुकरांच्या वावरावर घातलेली बंदी चांगलीच प्रकाशझोतात आली होती. टेंबलावाडी येथील धान्य बाजारासाठी पायाभूत सुविधा देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले होते. कार्यालयीन नुतनीकरणही करण्यात आले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची 'सोय' करण्यासाठी राज्य सरकारने प्रशासक असलेल्या राज्यातील बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळाची नियुक्ती केली होती. कोल्हापूर समितीच्या मंडळाच्या नियुक्तीबाबत कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर पुन्हा प्रशासकांची नियुक्ती केली होती. यावेळी डॉ. कदम यांच्याऐवजी उपनिबंधक (सहकारी संस्था) रंजन लाखे यांची नियुक्ती केली गेली. लाखे यांनी समितीचा पदभार पोलिस बंदोबस्तात स्वीकारल्यानंतर अनेक घोषणा केल्या होत्या, मात्र त्यांनी जाहीर केलेल्या एकाही घोषणेची पूर्तता झालेली नाही. पणन मंडळाकडे पाठवलेल्या प्रस्तावानुसार समितीमधील चार रस्त्यांचे मजबुतीकरण झाले आहे, मात्र डांबरीकरण अद्याप झालेले नाही. धान्य बाजाराची अवस्था जैस थे च राहिली आहे. समितीमध्ये चालणाऱ्या इतर व्यापारांबाबत नोटिस पाठवली होती, मात्र नोटिस पाठवण्यपलिकडे नंतर काहीही झाले नाही. प्रशासक लाखे यांनी शेतकरी निवासाचे नुतनीकरण करुन समितीच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले. मात्र इतर घोषणांची अमंलबजावणी करता आली नाही.

बहुतांश कामे बाजूलाच

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ४० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळण्यासाठी १७ मार्च रोजी पणन मंडळाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला होता. पणन मंडळाने यातील काही कामांना मंजुरी दिली होती. यामधील फक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. इतर कामांबाबत फारशी हालचाल झालेली नाही.

उत्पन्नात सहा कोटींची वाढ

ऑक्टोबर २०१३ पासून समितीवर प्रशासकांची नियुक्ती केली होती. सुरुवातील डॉ. कदम व लाखे यांच्याकडे पदभार सोपवला होता. डॉ. कदम यांनी सर्व खर्चाला फाटा देत अवास्तव खर्चाला आळा घातला होता. त्यांचे कार्य लाखे यांनी पुढे सुरू केल्याने समितीच्या उत्पन्नामध्ये तब्बल सहा कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुदरगडात खरीप लागवडीत वाढ अपेक्षित

0
0

शांताराम पाटील, गारगोटी

वळीव पावसानंतर भुदरगड तालुक्यात पेरणीपूर्व मशागतींना जोर चढला आहे. ऊस हे या तालुक्यात प्रामुख्याने मुख्य पिक असले तरी यंदा सुमारे वीस हजार हेक्टर क्षेत्रात खरीपाची लागवड अपेक्षित आहे. तालुक्यात ऊस, भात, भुईमुग, नाचणा, सोयाबीन, काजू ही पिके घेतली जातात. यंदा ऊसदरातील अनिश्चितीमुळे खरीप पिके किमान तीन ते चार हजार हेक्टरने वाढण्याची शक्यता आहे. सरासरी उत्पन्नवाढीसाठी कृषी विभाग आणि शेतकरी एकमेकांच्या सहाय्याने सरसावले आहेत. यामुळे यंदा खरीप पिक आणि उत्पादनवाढ याबाबत तालुक्यात आशादायी चित्र आहे.

वळीव पावसाने मागील आठवड्यात सात ते आठ दिवस हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी आता औताच्या पाळ्या देऊन शेती पेरणीयोग्य करण्यात गुंतला आहे. तालुक्यात मे महिन्याच्या दुसऱ्या - तिसऱ्या आठवड्यात धुळवाफ पेरणीला सुरवात होते. मात्र वळीव लांबल्याने या पेरण्या किमान एक आठवडे पुढे ढकलण्याची शक्यता आहे. सध्या वळीव पावसाने विश्रांती दिल्याने शेतकरी वाफे तयार करणे, शेताला बांध घालणे, शिवारातील पाला पाचोळा गोळा करणे, औतणी करून शेती पेरणी योग्य करणे आदी कामात गुंतला असल्याचे चित्र आहे. तालुक्याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात धूळवाफ पेरणी होते. तर दक्षिण भागात रोप लागण केली जाते. यंदा मोठ्या प्रमाणात ऊस क्षेत्र कमी झाल्याचे या भागात दिसत आहे. याला उसाच्या अनियमित दर व प्रत्येक वर्षी दरासाठी करावे लागणारे आंदोलन आणि खते व ऊस दर यांचा न बसणारा मेळ यामुळे तालुक्यात यंदा किमान चार ते पाच हजार हेक्टर क्षेत्र खरीप पिकांच्यासाठी वाढण्याची शक्यता आहे.

पेरणीचा हंगाम लक्षात घेऊन शेती सेवा केंद्र दुकानदारांनी संकरित बियाणे आपल्या दुकानात ठेवली आहेत. नंतर तुटवडा जाणवायला नको व हंगामात दर वाढायला नको म्हणून शेतकरीही आपल्या जमिनीचा कस पाहून बियाणे खरेदी करत आहे. यात भात पिकाला प्रामुख्याने प्राधान्य दिले जात आहे. हलक्या व मध्यम प्रतीच्या जमिनीसाठी हौसा तेली, तांबडी कर्जत, श्वेता, पूनम, आर. आय. सिल्की या बियाणांना मोठी मागणी आहे. हे वाण ९० ते १०० दिवसात काढणीसाठी तयार होते. भारी कसाच्या जमिनीसाठी आर चोवीस, सुचित्रा, आरजी, तृप्ती, खुशबू, सारथी, जया, सोनम, पांढरी कर्जत, मेनका आदी बियाणांना मागणी आहे. ११० ते १२० दिवसात कापणीला येते. तर नदीकाठावरील पूरग्रस्त जमिनीत कोमल, आकाश, गोरखनाथ, लोकनाथ, मुलायम आदी संकरित बियाणांना मागणी आहे. हे बियाणे १२० ते १३० दिवसात कापणीला येतात.

तालुका कृषी विभागाची मोहीम

ऊसपिकाकडून भात पिकाकडे वळलेले शेतकरी संकरित बियाणांच्या माध्यमातून आधुनिक शेती करून जादा उत्पन्न घेण्यावर भर देत असल्याचे दिसत आहे. यासाठी तालुका कृषी विभागानेही खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण व जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. यानुसार गावागावात शंभर टक्के बीज प्रक्रिया मोहीम, ३८ गावात चार सूत्री भात मोहीम, २५ गावात नाचणी महोत्सव व जागृती अभियान, १९ गावात काजुवृध्दी अभियान, ९ गावात सोयाबीन नियंत्रण कक्ष, तालुकास्तरीय गुणनियंत्रण कक्ष आदी गोष्टीवर भर दिला आहे.

खरीप लागवडीचे क्षेत्र

तालुक्यात यंदा खरीप पिकाची लागवड होणारे क्षेत्र असे (हेक्टरमध्ये) - भात १२ हजार २००, नाचणी - ३ हजार १००, भुईमुग २ हजार ९००, काजू १ हजार ७००, सोयाबीन ३ हजार ५००.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाळेघोल पंचायतीला महावितरणचा झटका

0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

वीज वितरण कंपनीने बाळेघोल (ता. कागल) येथील ग्रामपंचायतीने सार्वजनिक बोअरवेलला मंजुरी न घेता तीन वर्षे वीज वापरल्याबद्दल कारवाई केली आणि तीस हजार रुपयांचा दंड आकारला. नागरिकांनी केलेल्या मनमानीचा फटका ग्रामपंचायतीला बसल्याचे हे उदाहरण आहे.

बाळेघोलच्या अंबाबाई मंदिराच्या समोर असलेल्या बोअरवेलवर विद्युत पंप बसविताना वीज कंपनीकडून कनेक्शन मंजुरी घेतली नाही. अनधिकृतरित्या कनेक्शन घेऊन गेली तीन ते चार वर्षे वीज फुकट वापरली जात आहे. त्याला विजेचे बिल येत नाही, तरीही सरपंच, ग्रामसेवक, सदस्य किंवा अन्य कोणीही त्याची चौकशी देखील केली नाही. केवळ पाणी वापरण्याचे काम केले. बिलाबाबत मात्र कोणीही पुढे आले नाही. ग्रामपंचायतीचीही त्याला मूक संमतीच मिळाली.

हे कनेक्शन मोफत व मंजुरीशिवाय वापरले जाते हे अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्वरीत ते बंद करुन त्याची फ्युजपेटी सील करण्यात आली. ग्रामपंचायतीवर दंडात्मक कारावाईसाठी पंचनामा करण्यात आला. त्यांना तीस हजार रुपयांचा दंड भरण्याची सूचना करण्यात आली. ग्रामपंचायतीने पाणी कर वाढविल्याने त्यांचे उत्पन्नही चांगले आहे, तरीही वीज कनेक्शन फुकट वापरण्याचा अट्टाहास का? याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

नागरिकांची मनमानी

याबाबत बोलताना सरपंच शामराव पाटील म्हणाले,'आम्ही यापूर्वी हे वीज कनेक्शन बंद केले होते. परंतु गावातील सप्ताह कार्यक्रमाच्या निमित्ताने नागरिकांनी स्वत:च्या मनमानीने वीज कनेक्शन पुन्हा जोडून पाणी वापरले. त्यामुळे हा ग्रामपंचायतीला हा भुर्दंड बसला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१७ वाळू आवट्या शिरोळमध्ये उद‍्ध्वस्त

0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

शिरोळ तालु्क्यात महसूल विभागाने अनाधिकृत आवट्यांवरील कारवाईची मोहीम सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच ठेवली. सोमवारी पथकाने १७ अनाधिकृत आवट्या उद्ध्वस्त केल्या. औरवाड येथील कारवाईवेळी यांत्रिकी बोट काढण्यास विरोध झाला. मात्र पथकातील कर्मचाऱ्यांनी बोट उद्ध्वस्त करण्याची भूमिका घेतली. परिणामी वाळू उपसा करणाऱ्या व्यक्तीने अनाधिकृत गटातील यांत्रिक बोट व पाइप काढून घेतली.

महसूल विभागाची तिसऱ्या दिवशीही मोहीम सुरू राहिल्याने सरकारचा महसूल बुडवून वाळू तस्करी करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहे. शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीपात्रात अधिकृत वाळू ठेकेदार यांच्याबरोबरच अनाधिकृत वाळू तस्करांनी गट सोडून इतरत्र बेकायदेशीर वाळू उपसा सुरू ठेवला होता. यामुळे वाळू तस्करांवर कारवाईची मागणी नागरिकांतून होत होती.

मंगळवारी तहसिलदार सचिन गिरी यांच्या पथकाने राजापूर व खिद्रापूर येथे आठ वाळू आवट्यांवर कारवाई केली होती. तर शनिवारी शेडशाळ, कवठेगुलंद, खिद्रापूर, राजापूरवाडी, राजापूर येथे विनापरवाना अठरा वाळू आवट्या जेसीबीमया सहाय्याने उद्ध्वस्त केल्या होत्या. रविवारी कवठेगुलंद व गौरवाड परिसरातील आठ वाळू आवट्यावर कारवाई केली.

सोमवारी सायंकाळी नृसिंहवाडी-औरवाड पुलाजवळ सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू आवटी उद्ध्वस्त करताना यांत्रिक बोट काढण्यावरून महसूल पथक व वाळू उपसा करणाऱ्यांमध्ये शब्दिक चकमक झाली. तणाव निर्माण झाल्याने पथक प्रमुख कोठावळे यांनी यांत्रिक बोट काढण्याची सूचना केली. मात्र वाळू माफियाने बोट काढण्यास नकार दिला. यामुळे कोठावळे यांनी जेसीबीमया सहाय्याने बोट नदीपात्रातून बाहेर काढण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले. परिणामी वाळू उपसा करणाऱ्यांनी यांत्रिकी बोट काढण्याची प्रक्रिया सुरू केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेवाव्रताचा ‘खेळखंडोबा’

0
0

दीपक मांगले, गडहिंग्लज

सर्वत्र अस्वच्छता, अपुरा औषध पुरवठा, यंत्रसामुग्रीचा अभाव आणि गैरहजर डॉक्टर्स अशा अनेक अडचणींचा सामना येथील उपजिल्हा रुग्णालयाला करावा लागत आहे. सर्वसामान्य व गरजू जनतेला अत्यल्प खर्चात आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून रुग्णालयाची स्थापना झाली. मात्र शंभर खाटांचे हे रुग्णालय केवळ किरकोळ उपचार करण्यातच धन्यता मानत आहेत. त्यामुळे 'असून अडचण नसून खोळंबा' अशी स्थिती उपजिल्हा रुग्णालयाची झाली आहे.

ग्रामीण भागात नागरिकांना दर्जेदार व कमी खर्चात चांगली आरोग्य सुविधा मिळावी या उद्देशाने सरकारने २००५ साली सुमारे पाच कोटी रुपये खर्चून हे रुग्णालय उभे केले. गडहिंग्लज, आजरा, चंदगड, भुदरगडसह कर्नाटक सीमाभागातील रूग्णांना वैद्यकीय सुविधा मिळावी हा एकमेव उद्देश यामागे होता. दिवंगत.बाबासाहेब कुपेकर यांच्या पुढाकाराने अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज रुग्णालयाची स्थापना झाल्यानंतर ग्रामीण भागातून समाधान व्यक्त करण्यात आले.

मात्र 'नव्याचे नऊ दिवस' या म्हणीला सार्थ ठरवत अवघ्या दीडवर्षात रुग्णालयाचा 'दर्जा' ढासळत चालली आहे. औषधांचा अपुरा साठा, यंत्रसामुग्री व तज्ज्ञांचा अभाव, बंद अवस्थेतील सोनोग्राफी मशीन, डॉक्टरांची अपुरी संख्या, त्यातच तासाभरासाठी येणारे 'पर्यटक' डॉक्टर्स अधिक आहेत. या आणि अशा अनेक समस्यांनी उपजिल्हा रुग्णालयाला घेरले आहे. रुग्णालयाकडे एकूण पंधरा डॉक्टर पदे असून सध्या अर्थोपेडीक, भूलततज्ज्ञ, सर्जन, फिजिशियन असे डॉक्टर्स उपलब्ध आहेत. तर कान-नाक-घसा-नेत्र तज्ज्ञ डॉक्टर्स नाहीत. मात्र अतिसंवेदनशील प्रसूतीविभाग मात्र रिकामा आहे. सध्या इंटर्नशिपवर प्रसूतीविभागाला डॉक्टर उपलब्ध झाले आहेत. मात्र प्रसूतीविभाग एकाहाती चालविणे शक्य नसल्यामुळे जमतील तेवढ्या रुग्णांची तपासणी केली जाते. तर बाकीच्या रुग्णांना रेफर केले जाते. त्यामुळे बहुतांश रुग्णांना परतीची वाट धरून खासगी रुग्णालयाचा दरवाजा ठोठावावा लागतो. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या घटली असून याकडे व्यवस्थापक आणि अधक्षकांचे दुर्लक्ष होत आहे.

केवळ डॉक्टरांची वानवा हा एकच भाग नसून येथील कर्मचाऱ्यांचा उद्धटपणासुद्धा रुग्णालयाच्या या अवस्थेला कारणीभूत आहे. वेदनेने तडफडणाऱ्या रुग्णाला दिलासा देण्याएवजी त्यांना मनस्ताप देण्याचे काम हे कर्मचारी करताना आढळतात. येथील कर्मचाऱ्यांच्या उर्मटपणाचे अनेक किस्से ऐकिवात आहेत. रुग्णालयाची आतील आणि बाहेरील दोन्हीकडची स्वच्छता पाहता हे रुग्णालयच आहे का? असा प्रश्न पडेल. रुग्णालयातील बेड्स-बेड्सशीट, चादर, शौचालय, स्नानगृहे येथे स्वच्छताच नाही. बहुतांश शौचालये बंदच आहेत. तसेच रुग्णालयाच्या अवतीभवती अस्वच्छतेचे साम्राज्य आहे. येथील अस्वच्छता पाहता धडधाकट माणूससुद्धा आजारी पडेल की काय अशी शंका निर्माण होते.

याठिकाणी स्पेशालिस्ट डॉक्टरांची नेमणूक होणे आवश्यक असून त्यासाठी अधीक्षकांनी वेळोवेळी पाठपुरावा करून बंद अवस्थेतील यंत्रसामुग्रीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र 'रुग्ण सेवा हीच श्रेष्ठ सेवा' मानली जात असली तरी उपजिल्हा रुग्णालयात अनेक सुविधांच्या अभावी या सेवाव्रताचा 'खेळखंडोबा' सुरू असल्याचे चित्र आहे.

परिणाम शून्य

रुग्णालयाच्या भोंग कारभाराबाबत गडहिंग्लज शहरातील अनके संस्था, नेतेमंडळीनी व पक्षांनी मोर्चे आणि आंदोलने केलेली आहेत. अधीक्षकांकडून त्यांचा राजीनामा लिहून घेण्यापर्यंत नामुष्की उपजिल्हा रुग्णालयावर आली. मात्र या सगळ्याचा त्यांच्यावर काहीही परिणाम होताना दिसत नाही.

रुग्णवाहिका बंद

गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका बंद असून त्याकडेही दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसत आहेत. 'डिझेल नसल्यामुळे रुग्णवाहिका बंद आहे' अशा आशयाचा फलकच याठिकाणी लावण्यात आला आहे. त्यामुळे ही रुग्णवाहिका केवळ दिखाव्यासाठीच ठेवली गेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'राज्यात सत्ताबदल झाला असला तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्रच सुरूच आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांच्या सानुग्रह अनुदानासह संपूर्ण कर्जमाफी द्यावी,' अशी मागणी जनता दलाच्यावतीने (सेक्युलर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

याबाबतच्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यामध्ये निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटामुळे शेती उत्पादनाचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक गेल्याने आणि कर्जाची रक्कम वाढत जात असल्याने नैराश्यातून शेतकरी आत्महत्या करीत आहे. यामुळे त्याचे कुटुंब उघड्यावर पडत आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकार एक लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देत आहे. यापैकी तीस हजार रोख स्वरुपात तर उर्वरीत रक्कम पोस्ट खात्यामध्ये किंवा राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये डिपॉझिट स्वरुपात ठेवले जातात. कुटुंबाचा उदरनिर्वाह, औषध, मुलांमुलींचे विवाह खर्चामुळे मेटाकुटीला आलेल्या कुटुंबाला मिळालेले अनुदान कुचकामी ठरत आहे.

शेतकरी आणि पर्यायाने कुटुंबाला मदत करण्यासाठी पाच लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान द्यावे, दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी व दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना फी-माफी द्यावी आदी मागण्या केल्या आहेत. राज्यातील दुष्काळी परिस्थिती, गेल्या वर्षभरात आलेली नैसर्गिक संकटे यांमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर जनता दलाचे महासचिव शिवाजीराव परुळेकर, वंदना पाटील, मधुकर पाटील, बजरंग शेलार, वसंतराव पाटील आदींच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

७४ हजार विद्यार्थ्यांना ‘आधार’

0
0

जान्हवी सराटे, कोल्हापूर

प्रत्यक्षात किती मुले शाळेत जातात? आणि शाळांची सद्यस्थिती काय? याची माहिती आता‌ विद्यार्थ्यांच्या आधार कार्डामुळे मिळणार आहे. जिल्ह्यातील एकूण २ लाख ७४ हजार ५८२ विद्यार्थ्यांपैकी २ लाख ११ हजार ४९ विद्यार्थ्यांची आधारकार्डे तयार आहेत. अद्याप ७३ हजार ९६३ विद्यार्थ्यांची आधारकार्डे देण्याची कार्यवाही सुरू आहे. २६ जूनपर्यंत जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांचे आधारकार्ड तयार होणार आहे.

राज्य सरकारने २१ एप्रिलला ६ ते १४ वयोगटातील प्राथमिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी आधारकार्ड काढावा असा अध्यादेस काढला. त्यानंतर गेल्या महिन्यापासून विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे आधारकार्ड तयार झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ५ मे रोजी झालेल्या बैठकीमध्ये आधारकार्ड काढण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिक प्राधान्य देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. या बैठकीमध्ये मशिन कमी पडत असल्याचे सांगण्यात आल्यानंतर २० मशिन्स वाढवून देण्यात आली. सध्या जिल्ह्यात ८० मशिनवर आधारकार्ड काढण्याचे काम सुरू आहे.

आतापर्यंत सर्वाधिक आधारकार्ड हातकणंगले आणि करवीर तालुक्यात काढण्यात आले आहेत. सर्वात कमी आधारकार्डे भुदरगड तालुक्यातील विद्यार्थ्यांची काढली गेली आहेत. प्रत्येक शाळेत आधारकार्ड काढण्याची सुविधा देता येणे शक्य नसल्यामुळे त्या-त्या परिसरातील तीन ते चार शाळा एकत्र येऊन आधारकार्ड काढण्याची कार्यवाही केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या आधाकार्डामुळे सरकारला किती विद्यार्थी शाळाबाह्य आहेत, शाळांची नेमकी पटसंख्या किती याबाबतची अचूक माहिती मिळणार आहे.

सर्व्हेनंतर शाळाबाह्य मुलांचे आधारकार्ड

सरकारने शाळाबाह्य मुलांचेही आधारकार्ड काढले जावे, तसेच किती विद्यार्थी शाळाबाह्य आहेत याबाबतचा सर्व्हे करण्यासंदर्भात जीआर काढण्यात आला आहे. त्यानुसार शिक्षकांनी सर्व्हे करून ही माहिती जमा करायची आहे. अशा शाळाबाह्य मुलांचे आधारकार्ड ४ जुलै रोजी काढण्यात येणार आहे. त्यानंतर अशा मुलांना शाळेत दाखल करण्यात येणार आहे.

प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. शाळांना सुटी असल्याने सध्या थोडी संथगतीने सुरू आहे. मात्र २६ जूनपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यासाठी ८ ते ९ हजार ‌शिक्षक कार्यरत आहेत. एकूण ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे.

- स्मिता गौड, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images