Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

स्कूल बसचे धोरण पंक्चर!

$
0
0

सचिन यादव, कोल्हापूर

शहरातील अनेक शाळांकडून स्कूल बस सुरक्षा धोरणाची पायमल्ली होत आहे. राज्य सरकारचे स्कूल बसचे धोरण पंक्चर झाले आहे. विद्यार्थी सुरक्षा, निर्धारित बसचे शुल्काचे तीन तेरा काही शाळांनी वाजविले आहे. अनेक स्कूल बसमध्ये स्पीड गव्हर्नर, आपत्कालीन दरवाजा, अटेंडन्सची सुविधा नाही. काही आयुर्मान संपलेल्या बसेसही विद्यार्थी घेऊन धावतात. दरवर्षी सरकारचा नवा निर्णय, शाळा व्यवस्थापन आणि बसमालकांच्या नव्या धोरणांमुळे बसभाडेवाढीला पालकांना सामोरे जावे लागत आहे. सरकारचे स्कूल बस धोरण कागदावरच राहिले आहे.

दर्जेदार मराठी आणि काही इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी विद्यार्थ्यांच्यासाठी बसची व्यवस्था केली आहे. अपघाताच्या अनेक घटना घडल्यानंतर राज्य सरकारने स्कूल बस सुरक्षा धोरण ठरविले. त्यानुसार अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्यातील सर्व शाळांना दिले. मात्र, बहुतांशी शाळांचे व्यवस्थापनाने स्कूल बसचे धोरण कागदावर ठेवले आहे. शाळा व्यवस्थापन आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडूनही दोषी बसचालकांवर कारवाई केली जात नाही. वाहनांना वेग नियंत्रक आणि स्कूल बसच्या मागील बाजूस दरवाजा बसविलेला नाही. जिल्ह्यातील ४० शाळांकडे १८० बसेस आहेत. राज्य सरकारने किमान तीन किलोमीटर अंतर असलेल्या शाळांतून विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी स्कूल बस सक्तीची केली. स्कूल बस धोरणाचे पालन करणाऱ्या शाळांना सरकारने कर सवलत देऊ केली आहे. मात्र फायदे लाटणारे बसमालक अव्वाच्या सव्वा भाडे घेतात. काही शाळांनी बसला फाटा देऊन रिक्षा आणि व्हॅनमधून विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे. यातही काही विद्यार्थ्यांची वाहतूक घरगुती सिलिंडवरुन गॅसवरुन धोकादायक पद्धतीने सुरु आहे. एका व्हॅनमधून पंचवीस ते तीस विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते.

असे ठरते शुल्क

किलोमीटरनुसार बसचे शुल्क निश्चित केले जात आहे. त्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती आणि बसमालक यांच्यात करारपत्र असते. यात संभाव्य डिझेल दरवाढ झाल्यास दरात वाढ करण्याची मुभा आहे. सरासरी तीन किलोमीटर पर्यंतच्या अंतरासाठी एका विद्यार्थ्यांला पाचशे रुपये शुल्क आकारले जाते. दर आकारणीचा वाद टाळण्यासाठी सर्वंच विद्यार्थ्यांकडून समान शुल्क आकारणी होते.

दरवर्षी शुल्कवाढ

वाढते डिझेलचे दर, वाढती विद्यार्थी संख्येमुळे काही बसमालकांनी महिन्याच्या शुल्कात वाढ करण्याचा विचार सुरु आहे. दरवर्षी शुल्कवाढीचा फटका पालकांना बसत आहे. पहिली इयत्तेतील पाल्यांची वर्षांचे शुल्क सात हजार रुपये इतके होते. तर पाल्य तिसरी इयत्तेत जाईपर्यंत संबधित शुल्क दहा हजारांच्या घरात गेले आहे. इंग्रजी माध्यमांच्या सीबीएसई, आयसीएसई, सेमी इंग्रजीच्या काही शाळांत स्कूल बसचे भाडे वाढण्याची शक्यता आहे.

नियमांचे उल्लंघन

स्कूल बसचालकांकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केले जाते. काही स्कूल बसमध्ये क्षमतेपेक्षा जादा विद्यार्थी भरले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसायला जागाही नसते. विद्यार्थिनींसाठी महिला सेविका नाहीत. बहुतांशी बसला आपत्कालीन दरवाजा नाही. अपघात घडल्यास विद्यार्थी सुटकेचा प्रश्न गंभीर होणार आहे.

आरटीओ कार्यालयाकडून पासिंगवेळी बसची तपासणी केली जाते. फ्लाइंग स्कॉडकडूनही काही बसेसची तपासणी केली जाते. स्कूल बसच्या धोरणाच्या तरतूदीनुसार बसमालकांना आणि शाळांच्या व्यवस्थापनाला अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

- लक्ष्मण दराडे, आरटीओ

विद्यार्थी सुरक्षेची जबाबदारी शाळा आणि आरटीओंच्यावर आहे. अनेक शाळांत घटना घडल्यानंतर शहाणपण सुचते. त्या वेळी राजकीय दबावाखाली कारवाई थांबविली जाते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्वच घटकांनी शहाणे होणे गरजेचे आहे. त्यासाठी पालकांची मतेही विचारात घ्यावीत.

- सुहास गुरव, पालक

स्कूल बसचे धोरण

स्कूल बसमध्ये अग्निशमन यंत्रणा

महिला सहाय्यक सेविका

एकाच रंगाची स्कूलबस

आठ वर्षांपेक्षा जुनी बस नको

चालकाला तीन वर्षांचा अनुभव

विद्यार्थ्यांचा रक्तगट, दूरध्वनी क्रमांक

शाळेच्या मुख्याध्यापकांचा

दूरध्वनी क्रमांक

आपत्कालीन दरवाजा, गाडीचे योग्यता प्रमाणपत्र

क्षमतेइतकीच विद्यार्थी संख्या, वेगमर्यादेचे निकष

शाळेबरोबरचा करार, रोजचावाहतुकीचा मार्ग

ड्रायव्हरला शाळेचा ड्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुटखा विक्रीवर धडक कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अन्न व औषध प्रशासनाने मध्यवर्ती बसस्थानक, ​रेल्वेस्थानक व कसबा बावडा येथे पानपट्टी टपऱ्यांवर कारवाई करून सात हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. सहायक आयुक्त संपत देशमुख यांनी कारवाई केली.

पोलिसांनी मध्यवर्ती बसस्थानकातील ऊस्मान पान शॉपचे मालक जावेद मोमीन (वय ४५, रा. जवाहरनगर), स्टेशन रोडवरील त्रिमूर्ती पानशॉपचे मालक तानाजी पाटील (४६ रा. जाधववाडी), कसबा बावडा मेनरोडवरील रेहमान मोमीन (५१, संकपाळ नगर, कसबा बावडा), माधव पानशॉपचे मालक ईस्माईल इनामदार (रा. कसबा बावडा), शिवा पानशॉपचे मालक शैलेश उलपे (२७, रा. उलपेमळा), यश पान शॉपचे मालक अभिजित खोपकर (२३, रा. कागलवाडी) यांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ वाळू आवट्या उद‍्ध्वस्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्याजवळ सुरू असलेल्या अनाधिकृत वाळू ठेकेदारांच्या पाच आवट्या तसेच खिद्रापूर येथील तीन अनाधिकृत वाळू आवट्या महसूल विभागामया पथकाने मंगळवारी उध्वस्त केल्या. ज्या ठिकाणी अनाधिकृत वाळू आवट्या सुरू असतील त्या शेतमालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, राजापूर व खिद्रापूर येथे आठ वाळू आवट्यांवर कारवाई झाली असली तरी अद्याप शिरोळ तालुक्यातील आलास, बुबनाळ, औरवाड, गौरवाड, कवठेगुलंद, शेडशाळ, चिंचवाड, कोथळी येथे सरकारचा महसूल बुडवून वाळू तस्करी सुरू आहे. महसूल विभागाकडून येथील आवट्यांवर कधी कारवाई होणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

अनाधिकृत वाळू उपशामुळे राजापूर बंधाऱ्याला धोका निर्माण झाला होता. यामुळे मगंळवारी महसूल विभागाने कारवाईचे पाऊल उचलले. राजापूर येथे रविंद्र कौतुक सुतार, विजयकुमार बंडू खोत, बाळगोंडा मलगोंडा पाटील, निसार सुलतान दानवाडे, हायचाँद निजाम दानवाडे तसेच खिद्रापूर येथील इस्माईल सुलेमान मुजावर, महावीर आदाप्पा रायनाडे, गुणपाल दादू सुनके यांच्या शेतामध्ये अनाधिकृत वाळू उपसा सुरू होता. येथील आवट्या जेसीबीने उध्वस्त करूनत्याचा पंचनामा करण्यात आला.

दरम्यान, चिंचवाड येथे अनाधिकृत वाळू उपशामुळे जॅकवेलला धोका निर्माण झाला आहे. तालुक्यातील आलास, बुबनाळ, औरवाड, गौरवाड, कवठेगुलंद, शेडशाळ, चिंचवाड, कोथळी या गावात गेल्या दोन महिन्यापासून अनाधिकृतरित्या वाळूची लूट सुरू आहे. या लुटीमुळे सरकारचा कोट्यवधी रूपयाचा महसूल बुडाला आहे. याला जबाबदार कोण? या वाळू आवट्यांवर कारवाई कधी होणार असा प्रश्न ग्रामस्थांतून उपस्थित होत आहे. तहसिलदार सचिन गिरी या आवट्याबाबत काय भूमिका घेतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

कारवाईची माहिती आधीच

मंगळवारी राजापूर व खिद्रापूर परिसरातील अनाधिकृत वाळू आवट्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती वाळू तस्कारांना मिळाली होती. यामुळे त्यांनी वाळू उपशाच्या यांत्रिकी बोटी तसेच लोखंडी पाईप त्वरीत अन्यत्र हलविल्या. या तस्कारांना महसूल विभागाच्या कारवाईची माहिती मिळालीच कशी, असा प्रश्न निर्माण होत असून याचा शोध घेवून तहसिलदारांनी वाळू तस्करांच्या खबऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

यापूर्वीही सोळा अनाधिकृत वाळू आवट्या उध्वस्त केल्या आहेत. सव्वा लाखापासून २० लाखांपर्यंत दंडात्मक कारवाई केली आहे. वाळू आवट्या सुरू असणाऱ्या ठिकाणी शेतकऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

- सचिन गिरी, तहसीलदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कापशी आरोग्य केंद्राला कुलूप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

डॉक्टरच नसल्याने संपूर्ण आरोग्य केंद्रच कोलमडल्याने सेनापती कापशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मंगळवारी शिवसेनेच्यावतीने कुलपे लावण्यात आली. यावेळी १७ पैकी चारच कर्मचारी उपस्थित होते. तालुका आरोग्य अधिकारी ए. आर. गवळी यांच्यावर जबाबदारी असतानाही ते उपस्थित नव्हते. आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, जिल्हा महिला संघटक सुषमा चव्हाण, अशोक पाटील, संभाजी भोकरे यांनी केले.

एक मे पासून येथे डॉक्टर नाहीत. याचे कोणतेही गांभीर्य रुग्णालय प्रशानाने घेतले नाही. येथील वैद्यकीय अधिकारी सातपुते ३० एप्रिलपासून रजेवर आहेत. तात्पुरती सोय म्हणून सात मे पासून १८ मे पर्यंतचा कार्यभार हमिदवाडा येथील डॉ. खरबुडे यांच्याकडे दिला होता. त्यानंतर आजपासून मे अखेरपर्यंतची जबाबदारी तालुका अधिकारी डॉ. ए. आर. गवळी यांच्याकडे होती. परंतु दिवसभारात ते इकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे मंगळवारीही आरोग्यकेंद्र डॉक्टरविना होते. निवेदन स्विकारण्यासही कोणी वरिष्ठ आले नाहीत. त्यामुळे उपस्थित कर्मचाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले.

केंद्राला कुलपे लावून डॉक्टर मिळत नाहीत तोपर्यंत कुलूप न काढण्याच्या अटीवर दवाखान्याच्या चाव्या पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आल्या. तात्पुरते असले तरी डॉ. खरबुडे यांच्याकडे तीन ठिकाणचा कार्यभार असल्याने ते या केंद्रात थोडाच वेळ द्यायचे. परिणामी दुपारनंतर येथील रुग्णांना सेवा मिळत नसे. त्यांची तात्पुरती मुदतही सोमवारी संपली. मंगळवारपासून तालुका आरोग्य अधिकारी ए. आर. गवळी यांच्याकडे कार्यभार होता. परंतु ते दिवसभरात इकडे फिरकलेच नाहीत. याशिवाय दोन आरोग्यसेवक लसीकरणासाठी बाहेर, दोन रजेवर व अन्य रिक्त पदे यामुळे येथे सतरा पैकी एक फार्मासिस्ट, एक सेविका, एक शिपाई व ड्रायव्हर इतकेच कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोल पंप बंद ठेवू नका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पेट्रोल, डिझेलचे कोणतेही पंप ड्राय (बंद) न ठेवण्याचे आदेश मंगळवारी जिल्हा पुरवठा कार्यालयाने इंधन कंपन्या, पेट्रोल पंपधारक असोसिएशनच्या बैठकीत दिले. त्याचबरोबर पंपांवर ग्राहकांना पूर्ण सुविधा देण्याबरोबर टंचाई होणार नाही व पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर इंधनाचा राखीव कोटा ठेवण्याचे आदेशही देण्यात आले. दरम्यान, मंगळवारी शहरातील बहुतांश पंपांवर पेट्रोल व डिझेल विक्री सुरू झाल्याचे दिसत होते.

गेल्या सोमवारपासून (११ मे) शहरात तसेच जिल्ह्यातील इतर ठिकाणीही पेट्रोल, डिझेल तुटवडा जाणवत होता. अनेक पंप बंद झाले होते. अगदी सोमवारपर्यंत ही परिस्थिती होती. त्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी भारत पेट्रोलियम कार्पोरेशन (बीपीसी), इंडियन ऑईल कार्पोरेशन (आयओसी), हिंदुस्थान ऑईल कार्पोरेशनच्या (एचपीसी) स्थानिक अधिकाऱ्यांसह पेट्रोल पंपधारक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्यामध्ये आगवणे यांनी या प्रकाराची माहिती घेतली. त्यावेळी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बीपीसीच्या बेळगावमधील रिफायनरीला आग लागल्यामुळे त्यातून कर्नाटकातील परिसराला केल्या जाणाऱ्या इंधन पुरवठ्याचा ताण मिरजच्या केंद्रावर आला. शिवडीवरुनही इंधन मागवण्यात आले होते. तरीही कोल्हापूर, इचलकरंजीसारख्या शहरात पुरवठा नीट होऊ शकला नाही. बीपीसीएलच्या पंपांनाच दिवसाला १०० ते २०० किलोलिटरची आवश्यकता होती. पण ६० ते ७० किलोलिटरपर्यंतच आवक होत होती (एक किलोलिटर म्हणजे एक हजार लिटर). त्याचवेळी आयओसीची रेल्वे वॅगन घसरल्याने १२०० किलोलिटरची वॅगन अडकून पडली होती.

या परिस्थितीनंतर सोमवारपासून (१८ मे) परिस्थितीत सुधारणा होत आहे. पण शहरातील आगामी भाजपचे अधिवेशन, त्यासाठी येणाऱ्या अनेक अतिमहत्वाच्या व्यक्ती, मोठ्या प्रमाणावरील कार्यकर्ते अशा परिस्थितीत टंचाई जाणवू नये म्हणून शहराबरोबरच परिसरातील कोणतेही पंप बंद होता कामा नयेत, असे आदेश आगवणे यांनी दिले. त्यासाठी कंपन्यांना थेट पत्र देण्यात येत आहे. यानंतर पावसाळ्यालाही सुरुवात होत आहे. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत जिल्ह्यात आवश्यक तितका इंधनाचा राखीव साठा करण्याचेही आदेश दिले. दरम्यान, दरवाढीच्या वेळी पंप बंद ठेवण्याच्या प्रकाराची चौकशी करण्यात येणार असून अशा बाबी सातत्याने करणाऱ्यांवर आवश्यक ती कारवाई केली जाणार असल्याचे आगवणे यांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात अनेक पंपांमध्ये पेट्रोल व डिझेल कमी प्रमाणात असल्याने ठराविक रकमेचेच इंधन दिले जात होते. मात्र, शुक्रवारनंतर अनेक ठिकाणचे पंप इंधन पुरवठा न झाल्याने बंद ठेवण्यात आले होते. या प्रकारामुळे नागरिकांना ठिकठिकाणच्या पंपावर जाऊन पेट्रोल भरण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. ही टंचाई संपणार कधी याची शाश्वती नसल्याने जादा इंधन भरले जात असल्यानेही टंचाईत भर पडत होती.

जिल्ह्यातील पंपांची संख्या

बीपीसी १०६

आयओसी ९७

एचपीसी ५५

एकूण २५८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौपदरीकरणाचे काम रखडले

$
0
0

अजय जाधव, जयसिंगपूर

उदगाव, तमदलगे, हातकणंगले, शिरोली येथे छोट्या पुलांची कामे रखडली आहेत. जयसिंगपूर येथे रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणास सुरूवात नाही. तमदलगे, अतिग्रे येथे भूसंपादन करूनही कामाचा श्रीगणेशा नाही. हातकणंगले येथे उड्डाणपुलाचे काम ठप्प आहे, ही स्थिती आहे कोल्हापूर सांगली रस्ता चौपदरीकरणाची. रस्त्याचे काम काही ठिकाणी सुरू असले तरी पाऊस सुरू होण्यापुर्वी चौपदरीकरण पूर्ण होण्याची शक्यता मावळली आहे.

कोल्हापूर सांगली रस्त्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आढावा बैठका घेतल्या. पावसाळ्यापूर्वी चौपदरीकरण पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी सुप्रीम इन्फ्रास्ट्र्क्चर कंपनीला दिल्या. मात्र अद्याप तमदलगे, उदगांव, शिरोली येथील छोट्या पुलांची कामे पूर्ण झालेली नाहीत. हातकणंगले येथील उड्डाणपुलाचा दोनवेळा बांधकाम प्रारंभ झाला.पिलर उभारणीचे कामही सुरू झाले. मात्र गेल्या वर्षभरापासून हे काम ठप्प आहे. हातकणंगले बसस्थानकासमोर उड्डाणपुलाच्या पिलरचे केवळ सांगाडेच उभे आहेत.

उदगांव येथे टोलनाक्याजवळ छोट्या पुलाचे काम संथगतीने सुरू आहे. तर जयसिंगपूर रेल्वेस्थानक ते टोलनाका दरम्याच्या रस्त्याच्या खडीकरणाचा अद्याप पत्ता नाही. दानोळी फाटा ते जैनापूरपर्यंतमया केवळ एकपदरी रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. दुसऱ्या बाजूचे डांबरीकरण पूर्ण कधी होणार असा ग्रामस्थांचा सवाल आहे. जैनापूर निमशिरगांव दरम्यान डांबरीकरणाचे काम कासवगतीने सुरू आहे. तर निमशिरगांव तमदलगे रस्त्याचे काम रखडले आहे.

हातकणंगले शिरोळ तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या बसवान खिंडीत रस्त्याच्या कामासाठी खोदाई करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून रस्त्याकडेचे खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहेत. मजले येथील श्रेणिक इंडस्ट्रीजपासून अतिग्रे येथील घोडावत शिक्षण संकुलापर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले असले तरी हातकणंगले येथे पूर्व बाजूस छोट्या पुलाच्या दुतर्फा भरावाचे काम अपूर्ण आहे. त्याचबरोबर पश्चिम बाजूच्या ओढ्यावरील पुलाची कामेही ठप्प आहेत. हेर्ले येथे भूसंपादन करून चौपदरीकरणाचे काम नुकतेच सुरू करण्यात आले असलेतरी अतिग्रे, तमदलगे येथे भूसंपादन करून अद्याप चौपदरीकरणाचा श्रीगणेशा झाला नाही. शिरोली फाट्याजवळ छोट्याचे पुलाचे काम सुरू आहे.

कोल्हापूर सांगली चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्यास सरकारने सुप्रीम कंपनीस दोन वर्षाची मुदत दिली होती. तर पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी सूचना पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी दिली होती. सरकारने दिलेली मुदत संपून सात महिने झाले तरी अद्याप काम पूर्ण झालेले नाही. यंदा मान्सून दोन दिवस आधीच दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पाऊस सुरू झाल्यास रस्त्याचे काम पुन्हा रखडण्याची चिन्हे आहेत.

ही कामे संथगतीने सुरू

निमशिरगाव-जैनापूर रस्ता डांबरीकरण, उदगाव येथे छोट्या पुलाचे बांधकाम, चोकाकजवळ रस्ता दुभाजकाचे काम संथगतीने सुरू आहे. तर शिरोली फाट्याजवळ छोट्या पुलाचे काम, हेर्ले शिरोली फाटा दरम्यान डांबरीकरणालाही गती मिळण्याची गरज आहे.

ही कामे रखडली

तमदलगे येथील छोटा पूल तसेच रस्त्याचे काम, तमदलगे ते उदगाव टोलनाका या जयसिंगपूर शहरातून जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण, जयसिंगपूर रेल्वेस्थानक ते उदगाव टोलनाका रस्ता, हातकणंगले येथील उड्डाणपूल व छोटे पूल, अतिग्रे येथील रस्ता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंदला अत्यल्प प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दुचाकी व चारचाकी वाहनधारकांकडून आरटीओ अयोग्य पद्धतीने कर आकारत असल्याचा आरोप करुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी पुकारलेल्या बंद अत्यल्प प्रतिसाद मिळाला. याबाबत जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून देण्यात आले.

मनसेच्यावतीने वाहनधारकांच्या लुटीबाबत सातत्याने आंदोलन करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी कोल्हापूर बंदचे आवाहन केले होते. काही कार्यकर्त्यांनी सकाळी स्टँड व आरटीओ कार्यालयाच्या परिसरात बंदचे आवाहन करत रॅली काढली. त्यामुळे या परिसरात काही काळ व्यवसाय बंद ठेवण्यात आले. पण त्यानंतर व्यवसाय पूर्ववत सुरु झाले. दरम्यान जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून देण्यात आले. या बंदचा परिणाम आरटीओ, जिल्हा परिषद तसेच स्टँडच्या परिसरात काही काळ जाणवला. इतरत्र मात्र शहरवासियांना या बंदची काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषध दुकानांमध्ये चोरी करणाऱ्यास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

औषधांच्या दुकानात चोरी करणारा सूरज तानाजी काळे (वय २५, रा. दौंड, जि. पुणे) या चोरट्याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांनी शहरातील नऊ औषधाच्या दुकानात चोरी केल्याची कबुली दिली. गेल्या काही दिवसांत औषधे दुकाने फोडून चोरी करण्याच्या प्रकारात वाढ झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक महेश सावंत यांच्या दुकानात चोरीनंतर घटनेचे फुटेज पोलिसांना दिले होते. शाहूपुरी पोलिसांनी सीसीटीव्हीचे फुटेज पाहून चोरट्याला पकडले. पोलिस कॉन्स्टेबल सुनील कवळेकर, रवींद्र पाटील, अमर अडूरकर, ओंकार परब, धनंजय परब, विशाल बंदरे, अरविंद पाटील, समीर मुल्ला, विनोद भोसले या टीमने रेल्वे स्टेशनच्या परिसरात मंगळवारी सूरजला पकडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘वैद्यकीय’ कारवाईचा वाद सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वैद्यकीय कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट न लावणाऱ्या ३८७ डॉक्टरांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेच्या आयुक्तांना दिल्यानंतर आता तू-तू, मै-मै सुरू आहे. महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळांमध्ये हा वाद सुरू झाला आहे. जयंती नाल्यामधील मिळून आलेला दोनशे किलो जैववैद्यकीय कचरा नाश करत असताना प्रदूषण नियंत्रण मंडळालाही पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यासारखी कारवाई करणे शक्य होते, असे पत्रक महापालिकेचे आरोग्य अधिकारी दिलीप पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे. मात्र, हे पत्रक त्यांच्या स्वाक्षरीविना आहे.

गेल्या आठवड्यात जयंती नाल्यामध्ये वैद्यकीय कचरा आढळल्याने खळबळ उडाली होती. प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाने कचऱ्याचा पंचनामा करून विल्हेवाट लावली होती. कचऱ्याची विल्हेवाट लावली गेल्याने कारवाई करण्यात अडचणी आल्या. कचरा कोणाचे आहे हे सिद्ध झाले असते. त्यानुसार डॉक्टरांवर कारवाई करता आली असती. आता कचरा कोणाचा हे सिद्ध होत नसल्याने शहरातील सर्वच डॉक्टरांना नोटीस काढण्यास भाग पडले आहे, असे पत्रक आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवस्थानला ऑनलाइन १२ लाख देणगी

$
0
0

अनुराधा कदम, कोल्हापूर

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापनाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन देणगीच्या आवाहनाला भाविकांकडून गेल्या तीन वर्षात १२ लाख ९९ हजार ६८९ रूपयांची देणगी रोख स्वरूपात मिळाली आहे. जगभरातील भाविकांना अंबाबाईच्या रोजच्या पूजेसह लाईव्ह दर्शन मिळावे या हेतूने सुरू करण्यात आलेल्या देवस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावरील देणगीला भाविकांनी उत्स्फूर्तपणे क्लिक केल्यामुळे देवस्थानच्या तिजोरीत ही रक्कम जमा झाली आहे.

सन २०१० साली नवरात्रौत्सवकाळात देवस्थान समितीतर्फे www.mahalaxmikolhapur.com हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले. दिवसेंदिवस भक्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन भाविकांकडून ऑनलाइन देणगी स्वीकारण्यासाठी एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून ई पेमेंट गेटवे सुरू करण्यात आले. या सुविधेला भाविकांकडून प्रतिसाद मिळाला. त्यानंतर फेडरल बँकेच्या माध्यमातून परदेशातील डे​बिट व क्रेडीट कार्डमार्फत देणगी स्वीकारण्याची सुविधा या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. गेल्यावर्षीपासून या संकेतस्थळाद्वारे अंबाबाईचे ऑनलाईन लाईव्ह दर्शन सुविधा सुरू करण्यात आली आहे. आजपर्यंत या संकेतस्थळाला पावणेचार लाख हिटस् मिळाल्या आहेत.

या संकेतस्थळावर देणगीसाठी केलेल्या आवाहनाला भाविकांनी प्रतिसाद देत देवस्थानच्या बँक खात्यावर देणगीमूल्य जमा केले आहे. गेल्या तीन वर्षातील या रोख देणगीमूल्याची रक्कम बारा लाखांच्या घरात गेली आहे.जगभरातील भाविकांना अंबाबाईच्या दर्शनाला येण्याची इच्छा असूनही येता येत नाही. त्यांच्यासाठी ऑनलाइन देणगी हा पर्याय उपयुक्त ठरत आहे.

वर्षाला ३० लाख खंडवसुली

देवस्थानच्या आर्थिक व्यवहारातील मुख्य भाग असलेल्या खंडवसुलीत गेल्यावर्षी देवस्थान समितीला यश आले आहे. गेल्या वर्षभरात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे वर्षाकाठी ३० लाख रूपयांची खंडवसुली केली आहे. खंडवसुलीचे योग्य नियोजन करून ही प्रक्रिया पूर्ण केली जात असल्याची माहिती देवस्थान व्यवस्थापनाच्यावतीने देण्यात आली.

अंबाबाईचे लाइव्ह दर्शन व नित्यपूजा पाहण्याची सुविधा संकेतस्थळाद्वारे देताना भाविकांना ऑनलाइन देणगीसाठी आवाहन केले आहे. भाविकांकडून या आवाहनाला प्रतिसाद चांगला असून इ पेमेंट गेटवेच्या माध्यमातून येणारी रोख देणगी भविष्यातही वाढेल असा विश्वास आहे.

-एस. एस. साळवी, सहसचिव, देवस्थान समिती

मी मूळची कोल्हापूरची असून सध्या इंदोर येथे वास्तव्यास आहे. संकेतस्थळाद्वारे अंबाबाईची रोजची पूजा पाहता येते. देवीला अभिषेकासाठी देणगी देण्याची इच्छा असूनही लांबपल्ल्याच्या अंतरामुळे कोल्हापूरला येणे शक्य होत नाही. त्यामुळे ऑनलाइन देणगीद्वारे मी या सेवेचा लाभ घेतला आहे.

-देविका पंडितराव, इंदौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोवंश हत्या बंदीविरोधात आरपीआयची निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारच्या गोवंश हत्या बंदी कायद्याने गरीब शेतकरी, खाटीक, बेपारी समाजाबरोबर ढोर, चर्मकार समाजाचे उद्योग बंद पडतील. त्यामुळे हा कायदा रद्द करावा यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी दुपारी निदर्शने करण्यात आली. पक्षाच्यावतीने राज्यभरात सर्वत्र निदर्शने करण्यात आली.

राज्यामध्ये गोहत्या बंदी कायदा अस्तित्वात आहे. त्याला आरपीआयने जाहीर पाठींबा दिला आहे. हिंदू धर्मातील गाईचे महत्व ओळखून हा पाठींबा दिला. पण गोहत्याबंदी कायद्याआडून सरकारने वंश हा शब्द जोडल्याने महाराष्ट्र गोंधळला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे हा कायदा मागे घ्यावा यासाठी पक्षाने दिलेल्या आदेशाप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे, राज्य सचिव मंगलराव माळगे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, सदस्य शामप्रसाद कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर करुन भावना व्यक्त केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पार्किंगसाठी नव्या जागा, नवी ठिकाणे

$
0
0

आप्पासाहेब माळी, कोल्हापूर

शहरातील वाहतूक कोंडी, पार्किंगचा प्रश्न समस्या सोडविण्यासाठी महापालिकेतर्फे पार्किंग धोरण तयार केली जात आहे. पे अँड पा​र्कची ठिकाणे वाढविणे, सार्वजनिक रस्त्यावरील पार्किंगसाठी वा​र्षिक फी आकारणी, महापालिकेचे खुले भूखंड, ले आऊटमधून मिळणारे ओपन स्पेस पार्किंगसाठी विकसित करणे, शहरातील विशिष्ट ठिकाणे नो पार्किंग झोन करणे याबाबत अभ्यास सुरू आहे. योजनेत खासगी व्यावसायिकांसह नागरिकांना सामावून घेतले जाणार आहे.

शहरात सध्या १४ ठिकाणी पे अँड पार्क सुविधा आहे. नवी निविदा प्रक्रिया राबवून ही ठिकाणी पे अँड पार्किंगसाठी दिली जाणार आहेत. महापालिकेने पे अँड पार्किंगच्या ठिकाणात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आणखी १३ ठिकाणे, दोन सार्वजनिक जागा व एका खासगी जागेवर ही सुविधा उपलब्ध करण्याचे नियोजन प्रशासन करत आहे. शहरातील अनेक मंगल कार्यालये, हॉस्पिटल्स, हॉटेल्स, शाळा, कॉलेज यांच्याकडे स्वतंत्र पार्किंग व्यवस्था नाही. या ठिकाणी रस्त्यावरच वाहने लावली जातात. महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नात भर पडावी याकरिता अशा व्यावसायिकांना पार्किंगसाठी वार्षिक शुल्क आकारणी केली जाणार आहे. मालमत्ता करात वार्षिक शुल्काचा समावेश करून त्यांच्याकडून पार्किंगची रक्कम वसूल केली जाणार आहे.

याशिवाय, महापालिकेच्या मालकीच्या अनेक जागा आहेत. खुल्या जागा आरक्षित करून तेथे पे अँड पार्क सुविधा दिली जाणार आहे. शहरात ठिकठिकाणी नव्या २६ जागा यासाठी निश्चित केल्या आहेत. रेल्वेस्थानक, मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील संबंधित व्यवस्थापनाकडून पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून मिळावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांवर केएमटी प्रवाशांच्या चढ-उतारासाठी विशेष जलद पद्धत (बीआरटीएस) विकसित करण्याचे नियोजन आहे.

नो पार्किग झोन

सरकारी कार्यालये, अंबाबाई मंदिर परिसर, शहरातील प्रमुख बाजारपेठा, सराफ बाजाराचा गुजरी परिसर नेहमी गजबजलेला असतो. येथे रस्ता रुंदीकरणाच्या मर्यादा आहेत. या भागातील वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे परिसर 'नो पार्किंग झोन' केले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांना कोल्हापूर बंदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सर्वच वाहनांना टोलमुक्ती, राज्य सरकारने रस्त्यासाठी झालेल्या सर्व खर्चाची रक्कम द्यावी, त्याचा बोजा महापालिकेवर टाकू नये. भविष्यातील रस्त्यासाठीचा अठरा कोटी रुपयांचा मेटेनन्सचा खर्चातही राज्य सरकारने वाटा उचलावा. संपूर्ण टोलमुक्ती केल्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुराला येण्यापूर्वी मुंबईतून जाहीर करावा. अन्यथा, कोल्हापूर बंदने मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले जाईल, अशा संतप्त प्रतिक्रिया शहर जिल्हा टोल विरोधी कृती समितीच्या बैठकीत अनेक पक्ष, संघटनांचे नेते यांनी मंगळवारी व्यक्त केल्या.

निमंत्रक निवासराव साळोखे यांनी कृती समितीच्या आंदोलनाची पार्श्वभूमी सांगितली. राजारामपुरी विकास मंचचे अनिल घाटगे म्हणाले, 'यापूर्वी टोलच्या विरोधात असलेले अनेक जण मूग गिळून गप्प आहेत. खासदार धनंजय महाडिक, आमदार महादेवराव महाडिक यांनीही टोलबाबत ढाल म्यान कशी केली? याचा खुलासा करावा.'

बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण म्हणाले, 'समितीकडून सुरू असलेल्या टोलमुक्ती लढ्यासाठी बार असोसिएशनकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही.'

भाजपचे महानगराध्यक्ष महेश जाधव म्हणाले, 'सर्वच वाहनांना टोलमुक्तीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याशी शिष्टमंडळाची भेटीचे नियोजन केले जाईल. भाजप टोलविरोधी कृती समितीच्या पाठीशी ठामपणे उभा राहील.' नगरसेवक आर. डी. पाटील म्हणाले, 'मूल्यांकन समितीने सुरु केलेल्या सर्व्हेतून रस्त्यासाठी खर्ची झालेली रक्कम स्पष्ट होईल. आरआरबीच्या पाठिमागे कोण आहे, हे लवकरच उघड होईल.'

राष्ट्रवादी काँग्रेसचे आर. के. पोवार म्हणाले, 'पहिल्यापासून राष्ट्रवादीने टोलसाठी विरोध केला आहे. आयआरबीला एक रुपयाही दिला जाणार नाही.' यावेळी कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केल्या. आगामी काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. शिवसेनेचे पद्माकर कापसे, शेकापचे बजरंग शेलार, दीपा पाटील, अॅड. प्रशांत चिटणीस, जनशक्तीचे विश्वास तिवारी, बहुजन समाज पक्षाचे उदय लाड, सुभाष कोळी, भगवान काटे आदींनी मनोगत व्यक्त केले.

शाब्दिक वादावादी

भाजपचे महानगराध्यक्ष महेश जाधव, नगरसेवक आर. डी. पाटील, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ चव्हाण यांनी काही मुद्दे मांडले. या मुद्यांना उपस्थितीतील काहींनी विरोध दर्शविला. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला. त्यावेळी निमंत्रक निवासराव साळोखे म्हणाले, 'प्रत्येकाला स्पष्टपणे आपले मुद्दे मांडण्याची मुभा आहे. भाषणावेळी कोणीही विरोध करु नये.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदानालाही ‘आधार’च हवा

$
0
0

सतीश घाटगे, कोल्हापूर

बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदाराच्या ओळखपत्राशी आधारकार्ड जोडण्याचा (लिकिंग) कार्यक्रम सुरू केला आहे. ज्या मतदाराचे ओळखपत्र आधारकार्डशी जोडले जाईल त्यालाच मतदान करता येणार आहे. आगामी महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून त्याची अंमलबजावणी करण्याचे संकेत निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

मतदार यादी निर्दोष व प्रमाणित करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ज्या मतदाराची एकापेक्षा अनेक ठिकाणी नोंदणी आहे, त्यांनी स्वच्छेने दुबार नावे वगळण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले आहे. बोगस मतदार रोखण्यासाठी मतदान ओळखपत्राशी (EPIC) त्या मतदाराचे आधार कार्ड संलग्न करण्याची मोहिम सुरू केली आहे. इंटरनेट व मोबाइलवर आधार कार्डचे लिकिंग करता येते. महापालिकेची निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर महापालिका क्षेत्रात ७७ प्रभाग असून उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये ५१ प्रभाग तर कोल्हापूर दक्षिण मतदार संघात २४ प्रभाग आहेत. दोन प्रभाग दोन्ही विधानसभा मतदारसंघात आहेत. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात २८९ आणि कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात ११५ मतदान केंद्रावर बीएलओच्या माध्यमातून आधार लिकिंगचे काम सुरू आहे.

सरकारी कार्यालये व पोलिस खात्यातही आधार लिकिंगची मोहीम सुरू आहे. आधार लिकिंगला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद असून शहरामध्ये थंडा प्रतिसाद आहे. चंदगड व गडहिंग्लज तालुक्यात ११ टक्के मतदारांनी आधार लिकिंग केले असताना कोल्हापूर ​दक्षिण व उत्तरमध्ये फक्त अडीच टक्के आधार लिकिंग झाले आहे. महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीएलओंना घरोघरी जाऊन आधार कार्डची नोंदणी करण्याची सक्ती केली आहे. मतदाराचे आधार क्रमांक किंवा आधार कार्डची झेरॉक्स घेऊन बीएलओ आधारकार्डाचे लिकिंग करवीर तहसील कार्यालयात करत आहेत. ऑक्टोबर महिन्यात ज्याचे आधारकार्ड लिकिंग झाले असेल, त्याला मतदान करण्यास परवानगी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जो उमेदवार निवडणुकीस उभा राहणार आहे त्या उमदेवाराचे आधारकार्ड लिकिंग झाल्यास तो निवडणुकीस पात्र ठरण्याची शक्यता आहे. तसेच अनुमोदक व सूचकाचे मतदान ओळखपत्रही आधार लिकिंग करण्याचा नियम येऊ शकतो, असे निवडणूक शाखेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. आधार लिंक असलेल्यांना मतदान करता येईल असा नियम येण्याची शक्यता घेऊन काही सत्ताधारी राजकीय पक्षांनी मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड संलग्न करण्यासाठी विशेष कॅम्प सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे.

असे करा लिकिंग

इंटरनेटवर www/eci.nic.in-National Voters Service Portal यावर मतदारांनी आपल्या नावाने अथवा मतदार केंद्रानुसार शोध घ्यावा. स्क्रीनवर कोल्हापूर जिल्ह्याचे नाव येईल. त्यानंतर मतदारसंघ सिलेक्ट करा. पहिले नाव, वडील किंवा पतीचे नाव ही माहिती भरावी. त्यानंतर सर्च करा. स्क्रीनवर मतदारांची नावे दिसतील, त्यानुसार तुमचे नाव क्लिक करून आधार क्रमांक द्यावा. मोबाइल क्रमांक, ई मेलची नोंद केली तरी चालते.

भविष्यातील सर्व निवडणुकांसाठी आधार कार्डशी मतदान ओळखपत्रांचे लिकिंग महत्वाचे आहे. दुबार नावे टाळण्यासाठी आधार लिकिंग केले जात आहे. निवडणूक आयोगातर्फे मतदारयादी निर्दोष व प्रमाणित करण्याच्या मोहिमेतील आधार लिकिंग केले जात आहे.

- संगीता चौगुले, उपजिल्हाधिकारी, निवडणूक विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोलमुक्तीचा लढा सुरूच राहील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सरकारने कोल्हापूरच्या जनतेला दिलेला शब्द पाळावा, एमएच-०९चा टोलमुक्तीचा पर्याय मान्य केला जाणार नाही, अस्मिता पणाला लावून संपूर्ण टोलमुक्तीचा लढा यापुढेही निकराने सुरू ठेवू तसेच कोल्हापूर बंदबाबत बुधवारी (ता. २०) सायंकाळी पाच वाजता निर्णय जाहीर केला जाईल, असा निर्णय शहर व जिल्हा सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील होते. बुधवारी डॉ. एन. डी. पाटील यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे.

कोल्हापूर बंद, काळे झेंडे दाखवून मुख्यमंत्र्यांचे स्वागत आणि शिष्टमंडळ भेट याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र, ठोस निर्णय बुधवारी घेण्याचे ठरले. भाजप, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी टोलविरोधी कृती समितीच्या पाठीशी राहण्याचा निर्णय जाहीर केला. अनेक पर्यायी मार्गांची वृत्तपत्रांतून चर्चा सुरू आहे. मात्र, टोलविरोधी कृती समिती सुचविलेले पर्याय मान्य करणार नाही. संपूर्णपणे टोलमुक्त होईपर्यंत लढा सुरूच राहील, असा निर्णय झाला.

ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, 'आघाडी सरकारने यापूर्वी टोलमधून एमएच-०९ ला वगळण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यावेळीही हा प्रस्ताव कृती समितीने धुडकावला. मंगळवारीही कृती समिती या निर्णयाविरोधात ठाम आहे. टोलमुक्तीबाबत कुणीही उठावे आणि कधीही बोलावे, असे चित्र आहे. मात्र, टोलविरोधी कृती समितीचा निर्णय ठाम आहे. समिती जनतेला दिलेल्या शब्दाला जागणार आहे. सर्वच वाहनांसाठी टोलमुक्तीचा लढा सुरूच राहणार आहे. युती सरकारने संपूर्णपणे टोलमुक्तीचे जनतेला आश्वासन दिले आहे. त्याची पूर्तता तातडीने करा; अन्यथा जनता राज्यकर्त्यांना खड्यासारखी बाजूला करेल.'

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उचगाव (ता. करवीर) येथे टोलमुक्तीबाबत केलेले भाषण उपस्थितांना ऐकविण्यात आले. बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, शेकाप, जनता दल, व्यापारी संघटना, उद्योजक, जिल्हा बार असोसिएशन, तालीम मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

सर्वच वाहनांसाठी टोलमुक्तीचा लढा सुरूच राहणार आहे. युती सरकारने संपूर्णपणे टोलमुक्तीचे जनतेला आश्वासन दिले आहे. त्याची पूर्तता तातडीने करा; अन्यथा जनता राज्यकर्त्यांना खड्यासारखी बाजूला करेल.

- प्रा. एन. डी. पाटील, ज्येष्ठ नेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दिरंगाईचे दोनशे बळी

$
0
0

मारुती पाटील, कोल्हापूर

सांगली-कोल्हापूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडल्यामुळे या मार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या सात महिन्यांत या महामार्गावर झालेल्या १७९ अपघातांत १९६ जणांचे बळी गेले आहेत. या कामाची ३१ मे ची अंतिम मुदत पुन्हा हुकणार आहे. आतापर्यंत फक्त ४० टक्के काम पूर्ण झाले आहे.

या आतापर्यंत कामाला दोनवेळा मुदतवाढ मिळाली आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नोव्हेंबर २०१४मध्ये झालेल्या बैठकीत सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला ३१ मेपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आला होता. मात्र, सात महिन्यांत अवघे पाच टक्केच काम पूर्ण झाले आहे.

कोल्हापूर ते सांगली रस्त्याच्या पन्नास किलोमीटरच्या मार्गाचे चौपदरीकरण १२ ऑक्टोबर २०१२ मध्ये सुरू झाले. बीओटी तत्त्वावर हे चौपदरीकरणाचे काम सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला देण्यात आले. २६ किलोमीटरचा चौपदरी, २५ किलोमीटरचा दोन लेन असलेल्या या रस्त्यावर जयसिंगपूर आणि हातगणंगले येथे उड्डाणपूल उभारण्यात येणार होते. त्यासाठी दीड वर्षांचा कालावधी निश्चित केला होता. मात्र भूसंपादन, जयसिंगपूर येथील उड्डाणपुलाच्या वादात रस्त्याचे काम रखडत गेले. वादग्रस्त मुद्दांना बाजूला ठेवत जेथे शक्य आहे, अशा ठिकाणी कामाला सुरुवात झाली होती.

तरीही कोल्हापूर-सांगली रस्त्यावर वाहनांची प्रचंड संख्या असल्याने आधीच अरुंद असलेल्या मार्गांवर काम सुरू असल्याने अपघातामध्ये अधिकच भर पडली. काम सुरू असताना दिशादर्शक फलकांचा अभाव, खोदून ठेवलेल्या मोठ्या साइडपट्ट्या आणि अरुंद रस्त्यामुळे अपघात वाढले. ठेकेदाराकडून दिरंगाईने तर कळसच गाठल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. अडीच वर्षांच्या कालवधीत चाळीस टक्के काम झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लांबी वाढविण्याचा प्रस्ताव

चौपदरीकरणाच्या मूळ योजनेत जयसिंगपूर आणि हातगणंगले येथे दोन उड्डाणपूल होणार होते. मात्र, जयसिंगपूरचा उड्डाणपूल रद्द करण्यात आला आहे. हातकणंगले येथील उड्डाणपुलाची लांबी वाढवण्यात आली आहे. तसा प्रस्तावही मंत्रालय पातळीवर पाठवलेला आहे. मात्र अद्याप याही प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही.

सार्वजनीक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत कंपनीला ३१ मेपर्यंत चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्याची डेडलाइन दिली होती. मात्र बैठकीनंतर केवळ पाच टक्के काम पूर्ण झाले आहे. या कामासाठी मुदतवाढ नसल्याने कंपनीला दंडाची नोटीस लागू केली आहे.

- पी. एस. कदम, प्रकल्प अभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तक्रारींचे अपडेट एसएमएसद्वारे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरवासियांच्या प्रश्नांची जलदगतीने सोडवणूक व्हावी, त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीबाबतचे अपडेटस कळावेत याकरिता महापालिका प्रशासन आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणार आहे. पहिल्या टप्प्यात नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेत टोल फ्री क्रमांक उपलब्ध केले जाणार आहेत. त्या क्रमांकावर नागरिकांनी तक्रारी नोंदविल्या की त्याच्या पुढच्या ​प्रक्रियेची माहिती एसएमएसद्वारे नागरिकांना कळवली जाणार आहे. पुढच्या टप्प्यात समस्यांच्या सोडवणुकीसाठी ऑनलाइन पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. आनॅलाइनसाठी सध्या तांत्रिक बाबी तपासून पाहिल्या जात आहेत.

शहरवासिय महापालिकेकडे विविध रूपात कराचा भरणा करतात. पाणी, घरफाळा, बांधकाम मंजुरीपासून परवान्यापर्यंत शुल्क आकारले जाते. त्या मोबदल्यात विविध सोयी सुविधा मिळाव्यात, पायाभूत सुविधांच्या प्रश्नांची सोडवणूक जलद गतीने व्हावी ही अपेक्षा असते. नागरिकांच्या सुविधेसाठी प्रशासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात टोल फ्री क्रमांकची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. महापालिकेत सध्या त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. सकाळी आठ ते दुपारी दोन आणि दुपारी दोन ते रात्री आठ या वेळेत टोल फ्री क्रमांक सुरू असणार आहे. या कालावधीत नागरिकांनी महापालिकेशी निगडीत तक्रारी नोंदवायच्या आहेत. नागरिकांनी तक्रार नोंदविल्यानंतर त्याची नोंद केली जाणार आहे. कक्षामधून संबंधित विभागाला त्या तक्रारीची माहिती दिली जाणार आहे. विभागाकडून त्या तक्रारीची सोडवणूक केली की, संबंधित व्यक्तीला एसएमएसद्वारे कळविले जाणार आहे.

'टोल फ्री'ची सुविधा या आठवड्यात सुरू करण्याचे नियोजन आहे. अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत. अशी माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. 'टोल फ्री'ची सुविधा सुरू झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ऑनलाइन संकल्पना राबवली जाणार आहे. ऑनलाइनद्वारे नागरिकांना तक्रारी नोंदविता येतील. ऑनलाइन सिस्टिमसाठी सध्या तांत्रिक बाबी तपासून पाहिल्या जात आहेत. याकरिता निविदा प्रक्रिया राबवून अंतिमत प्रक्रिया राबवली जाणार आहे.

महापालिकेच्या कामाचा तपशील वेबूसाइटवर

चार विभागीय कार्यालयातंर्गत महापालिकेचा कामकाज चालविले जाते. रस्ते, आरोग्य,पाणी पुरवठ्यापासून घरफाळा, व्यवसाय परवानापर्यंतच्या कामाचा तपशील आत महापालिकेवर पाहता येणार आहे. २०१२ पासून विभाग निहाय माहिती महापालिकेच्या वेबसाइटवर उपलब्ध केली आहे. मंजूर झालेले काम, कामाची प्रगती, महापालिकेचे विविध प्रकल्प, सुरू असलेले प्रकल्प अशा विविध बाबींचा यामध्ये समावेश असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंचन योजना तीन वर्षांत पूर्ण करू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

राज्यातील सिंचन योजनांसाठी स्वतंत्रपणे तीस ते चाळीस हजार कोटी रुपये उभा करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. येत्या तीन वर्षांत सर्व सिंचन योजना पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे. त्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. जिल्ह्यातील पाणी योजना खासगीकरणातून करणार, असे आपण बोललो नव्हतो, तर खाजगीकरणातून या योजना पूर्ण करणे हा शेवटचा पर्याय असू शकतो, असे आपण म्हणलो होतो, असा खुलासाही खासदार संजय पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केला.

पाटील म्हणाले, 'सांगली जिल्ह्यातील पाणी योजना पूर्ण व्हाव्यात यासाठी आपण गेली अनेक दिवस प्रयत्न करीत आहे. मुख्यमंत्र्यापासून केंद्रातील मंत्री व संबधित विभाग यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. अगदी राज्यपालकांकडेही या बाबत मागणी केली आहे. जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ व टेंभू या सर्वच योजनांना लागणारा जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी आपण प्रयत्न सुरू ठेवले आहेत. या वर्षी निदान शंभर कोटी रुपये तरी वाढवून द्यावी. जिल्ह्यातील तसेच राज्यातील सिंचन योजनांना मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे. प्रत्येक वर्षी थोडा-थोडा निधी देऊन या योजना पूर्ण करणे अडचणीचे व खर्चिक होणार आहे. त्या ऐवजी अन्य काही मार्गातून निधी उभा करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहेत. मुख्यमंत्री स्वतः या पाणी योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सकारात्मक आहेत. त्यासाठी ठोस पावले उचलली जात आहे. लगेच हे काम दिसत नसले तरी त्याचे परिणाम लवकरच दिसतील.' सध्या कवठे महंकाळ, जत, आटपाडी तालुक्यांत पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे खासदार पाटील यांच्यासह सत्ताधारी नेत्यांवर पाणी योजना पूर्ण करण्याचा दबाव वाढत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कराडनजीक वाहतूक विस्कळित

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूर नाका परीसरात बुधवारी दुपारी मालट्रक रस्त्यात बंद पडल्याने सुमारे दोन तास वाहतूक विस्कळि त झाली. क्रेनच्या मदतीने मालट्रक बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

येथील पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून कराड शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यावरील कोल्हापूर नाका येथे बुधवारी दुपारी येथील बागवान ट्रान्सपोर्ट कंपनीचा माल वाहतूक करणारा मालट्रक अचानक बंद पडला. भर रस्त्यात मालट्रक बंद पडल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प होवून वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. मात्र, या बाबतची माहिती येथील शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेला मिळताच, वाहतूक पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या मदतीने मालट्रक बाजूला केला. मालट्रक बाजूला केल्यानंतर सुमारे दोन तासांनंतर रस्ता खुला होवून वाहतूक पूर्ववत करण्यात पोलिसांना यश आले.

दरम्यान, तब्बल दोन तास वाहतूक ठप्प झाल्याने एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. लहान मुले व महिलांना ताटकळत बसावे लागले तर दुचाकीस्वारांच्या दुचाकी जागेवरच अडकून पडल्या. येथील कोल्हापूर नाका परीसरात वारंवार वाहतुकीची कोंडी होत असल्याने यावर ठोस उपाययोजना करून अथवा एकेरी वाहतूक करून वाहतुकीची कोंडी थांबवावी, अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंटेनर-कार अपघातात दोन युवक ठार

$
0
0

सातारा : शिरवळ-लोणंद रोडवर कंटनेर व स्वीफ्ट कारच्या समोरासमोरील धडकेत युवक ठार तर एक जखमी झाला आहे. याची फिर्याद रफिक शिराज खान, नायकवडी (वय ३५, रा. लोणी, ता. खंडाळा) यांनी दिली आहे. प्रशांत प्रमोद जंगम (वय २२, ता. बारामती) व बालाजी रामेश्वर माटापल्ली (वय २६, रा. लातूर) अशी अपघातात मृत्यूमूखी पडलेल्या युवकांची नावे आहेत. जंगम, माटापल्ली व अमोल अर्जुन खरमटे (वय २९, रा. तासगाव, जि. सांगली) हे तीन जण आपल्या स्वीप्ट कारमधून लोणंदहून वाई बाजूकडे येत होते. शिरवळकडून लोणंद बाजूकडे जाणारा कंटेनर आणि स्वीप्ट कारमध्ये लोणी गावच्या हद्दीत समोरासमोर धडक झाली. कारमधील प्रशांत जंगम व बालाजी माटापल्ली जागीच ठार झाले तर अमोल खरमटे गंभीर जखमी झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images