Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

रस्ते मूल्यांकन लांबणार

$
0
0

आप्पासाहेब माळी, कोल्हापूर

रस्ते विकास प्रकल्पाच्या मूल्यांकनाच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या चुका, नोबेल कंपनीकडे असलेली अपुरी साधनसामग्री आ​णि मनुष्यबळाची कमतरता यामुळे रस्त्यांच्या मोजमापासह सर्वेक्षणाचे काम लांबणार आहे. राज्य सरकारने ३१ मेपूर्वी टोलबाबत निर्णय घेण्याची घोषणा केली असली तरी सर्व्हे आणि मूल्यांकनाचे काम अजून तीन आठवडे चालण्याची शक्यता आहे. मात्र, उपलब्ध कालावधी, सर्व्हे करावयाचे रस्ते आणि परत त्याची असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट इंजिनीअर्सतर्फे सुरू असलेली फेरतपासणी यामुळे सरकारने टोलबाबत केलेली वेळेचे गणित चुकणार असे सूत्रांकडून समजते. मुदतीत काम होणार नसल्याने प्रकल्पाचे सर्व्हे करणाऱ्या नोबेल कंपनीला मुदतवाढ देण्याच्या हालचाली सुरू आहेत.

यासंदर्भात मूल्यांकनासाठी नियुक्त स​मितीचे सदस्य, आर्किटेक्ट असोसिएशनचे पदाधिकारी राजेंद्र सावंत म्हणाले, 'पुणे येथील नोबेल इंटरेस्ट कंपनीने रस्ते प्रकल्पाचे सर्व्हे आणि मूल्यांकनाचे काम २१ एप्रिलला सुरू केले. कंपनीला एका महिन्याच्या आता अहवाल देण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र कंपनीने पहिले वीस दिवसात केलेल्या सर्व्हेच्या कामात असंख्य चुका आणि मोजमापात विसंगती आढळली. यामुळे तो वीस दिवसाचा कालावधी वाया गेला. ८ मे रोजी पुणे येथे रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी, मूल्यांकन समिती सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत 'नोबेल'ने केलेल्या मोजमापाविषयी आक्षेप घेतल्याने पुर्न सर्व्हेचा​ निर्णय झाला. 'नोबेल'ने पुर्न सर्व्हे सुरू केला आहे. 'नोबेल'ने यापूर्वी एकाच रस्त्याचा सर्व्हे करून अहवाल दिला आहे. रविवारी सायंकाळपर्यंत दुसऱ्या रस्त्याचा अहवाल मिळाला नाही. तेरा दिवसांत इतर रस्त्यांचे मोजमाप आणि फेरतपासणी पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे.'

आर्किटेक्ट असोसिएशनची टीम

नोबेल कंपनीकडून पुर्न सर्व्हे अंतर्गत प्रत्येक रस्त्याचे मोजमाप, लांबी रुंदी घेतली जात आहे. शुक्रवारपर्यंत चार मशिनच्या आधारे काम सुरू होते. सर्व्हेत रस्त्यांचे प्रत्येकी दहा मीटर अंतरावर मोजमाप, गटर्स, फूटपाथची रूंदी, रस्त्याचा प्रकार या बाबींचा समावेश आहे. नोबेलकडून अहवाल आल्यानंतर असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस असोसिएशकडून त्या सर्व्हेची फेर तपासणी केली जाते. असोसिएशनने याकरिता २५ आर्किटेक्ट व न्यू पॉलिटेक्निक कॉलेजच्या १५ विद्यार्थ्यांच्या मिळून वेगवेगळ्या टीम केल्या आहेत. असोसिएशने एका रस्त्याच्या मोजमापाला क्लीन चीट दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोयनेत ११३ शेकरू, ५ वाघ

$
0
0

प्रथमच शास्त्रीय पद्धतीने प्राणीगणना पूर्ण

म. टा. वृत्तसेवा, कराड

कोयनेसह चांदोली, राधानगरी अभयारण्यात एप्रिलमध्ये शेकरू गणना अत्याधुनिक साधनांच्या मदतीने करण्यात आली. यात कोयना अभयारण्यातील गणनेवेळी ११३ शेकरूंची प्रत्यक्ष नोंद करण्यात आली आहे. तर व्याघ्र प्रकल्पात पाच वाघांचे अस्तित्व असल्याचा अहवाल डेहराडून येथील संस्थेकडून वन्यजीव विभागाला प्राप्त झाला आहे.

महाराष्ट्रातील चौथ्या व पश्चिम महाराष्ट्रात साकारणाऱ्या पहिल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सुरू झालेली प्राणीगणना नुकतीच पूर्ण झाली आहे. गणनेच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी असून, आतापर्यंत भीमाशंकरच्या जंगलात शेकरू पाहावयास मिळत होता. कोयना अभयारण्यात त्याचे अस्तित्व असल्याचे सांगण्यात येत होते. तथापि त्याची प्रत्यक्ष गणना कधीही झालेली नव्हती. यासाठी राज्य सरकारने जूनअखेर राज्यातील अभयारण्ये, व्याघ्र प्रकल्प आणि राष्ट्रीय उद्यानांत शेकरू गणना घेण्याचे आदेश जारी केले होते.

अशी झाली शेकरू गणना

कोयना अभयारण्यात ही गणना नुकतीच पार पडली. मात्र, प्रथमच त्याची शास्त्रीय पद्ध्तीने गणना करण्यात आली. यासाठी प्रत्यक्ष पाहण्याला महत्व देण्यात आले होते. त्यानुसार कोयना वनविभागाने केलेल्या गणनेत संपूर्ण अभयारण्यात ११३ शेकरू प्रत्यक्ष पाहिल्याची नोंद करण्यात आली आहे. शेकरू उंच झाडांवर घरटे बांधते. साधारण एकाच झाडावर एकपेक्षा अधिक घरटी बांधण्याकडे शेकरूचा कल असतो. त्यामुळे या गणनेत घरटे नोंदीला महत्व देण्यात आले होते. या गणनेत उंच झाडांवर अशी २७१ घरटी आढळून आली. वापरात नसलेली ६१, घरटे बांधायचे काम सुरू असणारी ९१ तर सोडलेली घरटी १५९ आढळली. तसेच गर्भ घरटी म्हणजेच ज्या घरट्यांमध्ये सद्या प्रजनन सुरू आहे, अशी ४९ घरटी अभयारण्यात आढळली आहेत.

भक्ष्याला अंदाज येऊ नये म्हणून शेकरू एकाच झाडावर एकापेक्षा जास्त घरटी बांधून त्यात प्रजनन करते. शेकरू दिसला अथवा त्याचे घरटे दिसले की जीपीएस प्रणाली वापरून त्याची शास्त्रोक्त नोंद करण्यात आली आहे. शेकरू (रातुफा इंडिका) हा मुळातच लाजाळू प्राणी असून, त्याचे वास्तव्य उंच झाडांवर असते. ते फार कमी काळ जमिनीवर येतो. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर, दाट झाडीत त्याचे वास्तव्य असते. तांबुस, लालसर रंगाचा व साधारणत: मांजराच्या आकाराचा हा सस्तनप्राणी भारतात सापडणारी सर्वात मोठी खार समजली जाते. त्याचे शेपूट झुपकेदार व पोटाचा भाग पांढरा असतो. भारतात याच्या सहा जाती असून, यातील 'रातुफा इंडिका' ही जात पश्चिम घाटात आढळते. कोयनेत शेकरूंची चांगली नोंद झाल्याने या अभयारण्यातील जैवविविधता अजूनही चांगली असल्याचे मानले जात आहे. या गणनेमुळे जंगल घनतेचा डाटाही उपलब्ध होणार आहे.

पाच पट्टेरी वाघांची डरकाळी

डेहराडून येथील राष्ट्रीय वन्यजीव संस्थेकडून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पाच पट्टेरी वाघांचे अस्तित्व असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. आता विशेष साधनसामग्री कर्मचारी आणि विशेष सरंक्षणाची गरज असल्याचे मत येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे सहायक वनसंरक्षक सुभाष पुराणिक यांनी व्यक्त केले. वन्यजीव विभागाच्या वतीने नुकतीच ५ ते १२ मे या कालावधीत सह्याद्री प्रकल्पामध्ये प्राणीगणना पूर्ण झाली आहे. यासाठी कॅमेरा ड्रॅपिंग, डिस्टन्स सॅफलिंग, रेंज फाईंडर्स, ट्रान्सेट लाईन्स अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. वन्यजीव विभागाच्या वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेने वन्यजीव विभागाकडे तशा प्रकारचा अहवालही सादर केला असल्याची माहितीही पुराणिक यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करिअरला मिळाली योग्य दिशा

$
0
0



'महाराष्ट्र टाइम्स'-'अॅस्टर आधार'च्या सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांना मिळाला कानमंत्र

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'विद्यार्थ्यांची आवड, कल, क्षमता आणि व्यवसाय मार्गदर्शन निवड संस्थेचा निर्णय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक करिअरसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. दहावी आणि बारावीला मिळालेल्या गुणांपेक्षा बुद्ध्यांक चाचणी महत्त्वाची आहे. सामाजिक, भावनिक, आरोग्य आणि कौटुंबिक प्रश्नांची सोडवणूक या चाचणीतून शंभर टक्के होते. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात या चाचणीचा कल दिशादर्शक ठरतोच, त्यामुळे प्रत्येकाने ही चाचणी करावी,' असा मोलाचा सल्ला 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे सोमवारी झालेल्या सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांना मिळाला. करिअरचा योग्य मार्ग घेऊनच विद्यार्थी कॅम्पसमधून बाहेर पडले. सेमिनारसाठी विद्यार्थ्यांची हाउसफुल्ल गर्दी झाली होती. 'अकरावी, बारावीला सामोरे जाताना' या विषयावर सोमवारी शिवाजी पेठेतील श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाउसच्या न्यू कॉलेजमध्ये सेमिनार झाला. कोल्हापुरातील नामवंत हॉस्पिटल अॅस्टर आधार या सेमिनारचे प्रयोजक प्रायोजक होते.

सेमिनारसाठी विद्यार्थी, पालकांची मोठी गर्दी झाली. न्यू कॉलेजचे प्राचार्य नागेश नलवडे यांनी स्वागत केले. वरुणराज भिडे स्मृती पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राचार्य नलवडे यांच्या हस्ते 'महाराष्ट्र टाइम्स'च्या कोल्हापूर आवृत्तीचे सहायक संपादक गुरुबाळ माळी यांचा सत्कार झाला.

गरिबीच शिक्षणाची संधी

संपतराव गायकवाड म्हणाले, 'गरिबी ही शिक्षणासाठीची संधीच आहे. दुर्दम्य इच्छाशक्ती, जिद्द, कष्ट करण्याची तयारी असल्यास कोणत्याही क्षेत्रात यश मिळू शकते. अकरावीत नापास झालेला मंगेश मस्कर उपजिल्हाधिकारी बनला. कवी प्रवीण दवणे अत्यंत गरिबीतून शिक्षण घेतले. त्यांनी साहित्यिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला. आयएएस अधिकारी मदन नागरगोजेने आवडत्या क्षेत्रात करिअर केले. नेत्ररोगतज्ज्ञ तात्याराव लहाने यांनीही प्रतिकूल परिस्थितीतून यश मिळविता येत असल्याचा आदर्श ठेवला. नव्या पिढीने अशा कर्तबगार व्यक्तींच्या कार्याचा आदर्श घ्यावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपकेंद्रांना जागा मिळणार

$
0
0



'इन्फ्रा टू' योजनेसाठी प्रशासनासह नेत्यांचा पुढाकार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरवासियांना तात्काळ वीज कनेक्शन देणारी आणि पायाभूत सुविधांमध्ये महत्वाच्या ठरणाऱ्या इन्फ्रा टू योजनेसाठी महावितरण, प्रशासन आणि राजकीय नेत्यांनी पुढाकार घेतला आहे. नवीन उपकेंद्रे उभारण्यासाठी महावितरणला जागेची गरज असून त्याबाबत जागा देण्यासाठी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेने सकारात्मकता दर्शविली आहे. त्यामुळे भविष्यात तात्काळ वीज कनेक्शन मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कोल्हापूर परिमंडलासाठी ५१३ कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा या योजनेंतर्गत होणार होत्या. मात्र, नवीन उपकेंद्रे उभारण्यासाठी कळंबा, मंगळवार पेठ, न्यू शाहुपूरी आणि एमआयडीसी शिरोली याठिकाणी जागा न मिळाल्याने ही योजना बारगळली होती. ४८ पैकी केवळ १८ केंद्रांचेच काम सुरू असून इतर उपकेंद्रांना जागा मिळत नसल्याने या सुविधांपासून शहरातील सुमारे १ लाख ५६ हजार ८६२ हून अधिक ग्राहक वंचित राहणार होते. या सर्वांसाठी आशादायक बाब म्हणजे काही जागा देण्यासाठी जिल्हाधिकारी तर काही जागांसाठी महापालिकेशी महावितरणची चर्चा सुरू आहे. कोल्हापूर शहराचा इन्फ्रा टू मध्ये समावेश झाल्याने शहरवासियांना तात्काळ आणि योग्य दाबाने विजपुरवठा मिळणार आहे. नवीन उपकेंद्राची उभारणी, उच्चदाब आणि लघूदाब अंतर्गत वाहिनी टाकणे, नवीन रोहित्र उभारणे अशी कामे इन्फ्रा टू अंतर्गत केली जाणार आहेत. त्यामुळे विनाअडथळा वीज मिळण्याची ग्राहकांना आशा आहे. या अंतर्गत शहरात सुमारे ८० कोटी रुपयांची विजेसंदर्भातील कामे होणार आहेत.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ५१३ कोटींपैकी ५१० कोटींच्या कामाच्या निविदाही काढण्यात आल्या आहेत. या निविदा निघाल्यानंतर २०१५-१६ पर्यंत ही सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले होते. पण, अद्याप ४८ पैकी २० उपक्रेंद्रांचेही काम पूर्ण झालेले नाही. ती पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सध्या शहरी भागात वीज कनेक्शनची मागणी केल्यानंतर ७ दिवसात वीज कनेक्शन देण्याची व्यवस्था आहे. भविष्यात मागताक्षणी काही तासातच कनेक्शन उपलब्ध करून दिले जाऊ जाईल अशी तत्परता या इन्फ्रा टू मुळे येणार आहे. त्याबरोबरच अंतर्गत वाहिनी टाकल्यामुळे अपघाताचे प्रमाणही घटणार आहे. यासर्व प्रकारांसह महत्वाची गोष्ट म्हणजे चोरून वीज वापरण्याच्या प्रकारांना आळा बसणार होता. त्याबरोबरच शॉर्ट सर्किटचे प्रमाणही कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अखंडीत वीजही मिळेल अशी अपेक्षा आहे.

'इन्फ्रा टू योजनेसाठी शहरातील जागा मिळविण्याबाबत विविध पातळ्यांवर चर्चा सुरू आहे. त्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्याशीही चर्चा झाली आहे. त्यांनी सकारात्मकता दर्शविल्यामुळे जागा उपलब्ध होताच ही कामे पूर्ण केली जातील.' - शंकर शिंदे, मुख्य अभियंता, कोल्हापूर परिमंडल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेहेर कंपनी देणार विमानसेवा

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर ते मुंबई मार्गावर लवकरच विमानसेवा सुरू होणार आहे. मेहेर कंपनीने १९ आसनी विमानसेवा देण्याची तयारी दर्शवल्याने लवकरच टेक ऑफ होण्याची शक्यता आहे.

कंपनीची नियोजित विमानसेवा कोल्हापूर, सोलापूर, लातूर, नांदेड येथून मुंबईसाठी सुरु करण्याचे नियोजन आहे. कोल्हापूरची विमानसेवा गेली दोन वर्षे बंद आहे. एमआयडीसीकडून भारतीय विमानपतन प्राधिकरणाकडे हस्तांतरण झाले. राज्य सरकारने तीन वर्षात परिपूर्ण सुविधांनी विमानतळ करण्याचे जबाबदारी सोपविली. छोट्या विमानतळाच्या विकासात कोल्हापूरच्या विमानतळाचाही समावेश करण्यात आला. त्यानुसार कोल्हापूर विमानतळावर सुविधांची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे. यात वनखात्याची जागा, धावपट्टीचे विस्तारीकरण, नाइट लॅण्डिंग यासह अन्य सुविधांची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे.

सध्याच्या विमानतळावर सरकारी विमानतळाचे लॅण्डिंग सुरु आहे. काही खासगी मालकीची विमानेही धावपट्टीवर उतरतात. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज देशमुख यांनी सहा सीटर विमानसेवा देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र ही विमानसेवाही रखडली. संगीता एव्हीऐशन, जेट एअरवेज या कंपन्यानी विमानसेवा देण्याची तयारी दर्शविली होती. आता मेहेर कंपनीने विमानसेवा देणार आहे.

गेली दोन वर्षे रखडलेली विमानसेवा सुरू होत असल्याने विशेषत उद्योजकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कंपनीने विमानसेवा सुरू करण्यासाठी त्या-त्या शहरातील विविध भागधारकांची चर्चा सुरू केली आहे. येत्या तीन महिन्यात ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. कंपनीने यापूर्वी गुजरातमध्ये अहमदाबाद ते पोरबंदर ही राज्यांतर्गत विमानसेवा सुरु केली आहे. राजस्थानमध्येही ही सेवा सुरू करण्याची योजना आहे. एक तासाच्या उड्डाणासाठी सात ते साडेसात हजार रुपये प्रति प्रवासी भाडे आकारले जाणार असल्याचे मेहेर कंपनीचे सिद्धार्थ वर्मा यांनी सांगितले. यापूर्वी कोल्हापूर ते मुंबई विमानसेवेसाठी काही कंपन्याची पाच हजार, सहा हजार रुपये दर आकारण्याचे जाहीर केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेत्यांनी मला आकसातून त्रास दिला

$
0
0



महापौर तृप्ती माळवी यांचा पलटवार; 'ठराव बेकायदेशीर'चा दावा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'राजकीय द्वेषाने प्रेरित होऊन आ​णि महापालिकेच्या सत्ता स्पर्धेमध्ये मला बळीचा बकरा बनविण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला आहे. सभागृहाने माझे नगरसेवक पद रद्द करण्याबाबत शिफारस केलेले दोन्ही ठराव बेकायदेशीर आहेत' असे प्रत्यूत्तर महापौर तृप्ती माळवी यांनी नगरविकास विभागाच्या सहसचिवांना कळविले आहे. गरज भासल्यास वकिलांमार्फत तसेच वैयक्तिक हजर राहून म्हणणे मांडण्याची संधी द्यावी असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

याबाबत महापौरांच्या प्रसिद्धीपत्रकात 'त्या' ठरावाच्या आधारे राज्य सरकारला कोणतीही कारवाई करता येणार नाही. नगरविकास विभागाने महापौरपद काढून का घेण्यात येऊ नये अशी बजावलेली नोटीस पूर्णपणे चुकीची व बेकायदेशीर आहे असे म्हटले आहे. दरम्यान, महापौर माळवी या लाच घेण्याच्या प्रकरणात सापडल्यामुळे महापालिक कलम १३ (१) (अ) व (ब) नुसार त्यांचे नगरसेवक रद्द करण्यात यावे अशी शिफारस करणारे दोन ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभागृहाने २० मार्च रोजी केले होते. माळवी यांनीही पक्षाचा व्हिप लक्षात घेऊन नगरसेवकपद वाचविण्यासाठी ठरावाच्या बाजूने मतदान केले होते. महापौरांच्या सहीनंतर प्रशासनाने २१ एप्रिल रोजी हे ठराव नगरविकास विभागाकडे पाठविले होते. नगरविकास विभागाने दहा दिवसांपूर्वी माळवी यांना, कारणे दाखवा नोटीस बजावत नगरसेवक पद रद्द का करू नये? या संदर्भात खुलासा करण्याचे आदेश दिले होते. माळवी यांनी याबाबत सोमवारी खुलासा केला.

कामामुळे द्वेषभावना

'दोन्ही काँग्रेसच्या महापालिकेतील नेत्यांनी वैयक्तिक आकसातून, राजकारणातून त्रास दिला,' असे महापौरांचे म्हणणे आहे. पत्रकात म्हटले आहे की, जनतेच्या हिताच्या कामाचा धडाका लावल्यामुळे नेत्यांच्या मनात द्वेष भावना निर्माण झाली. महापौर पदाचा राजीनामा द्यावा म्हणून दबाव टाकला गेला. दबावास बळी न पडल्यामुळे माझ्या विरूद्ध कट कारस्थान. उपचारासाठी दवाखान्यात दाखल झाल्यानंतर काही व्यक्तींनी दवाखान्यात येऊन धमकावून राजीनामा घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांधीनगर व्यापाऱ्यांचा बंद मागे

$
0
0



पालकमंत्र्यांच्या आवाहनाला सिंधी समाजाचा प्रतिसाद; पुतळा 'जैसे थे'

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गांधीनगरातील सिरू चौकात वादग्रस्त जागेवर बसविण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळाप्रश्नी सोमवारी पाच जणांची समिती नियुक्त करण्यात आली. याप्रश्नी तोडगा निघेपर्यंत गांधीनगरातील व्यापाऱ्यांना व्यवहार सुरू करण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. तोडगा निघेपर्यंत पुतळा त्याच जागेवर राहिल असेही पालकमंत्री पाटील यांनी सर्किट हाऊसवर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. त्यानंतर व्यापाऱ्यांनी बंद आंदोलन मागे घेतले.

दरम्यान, गांधीनगरातील व्यापाऱ्यांनी सोमवारी दुपारी सासने मैदान परिसाररातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. गांधीनगर येथील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. दगांधीनगरातील ज्या जागेवर बसविण्यात आला आहे. दरम्यान, वादग्रस्ता जागेमुळे गेल्या ८ दिवसांपासून गांधीनगर बंद राहिले. त्यावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्र्यांनी बोलविलेल्या बैठकीवेळी फक्त बंद मागे घेण्याचा निर्णय झाले.

घाऊक बाजारपेठ असलेले गांधीनगर व्यापारी पेठ गेल्या आठ दिवसांपासून बंद राहिली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी बाजारात वर्दळीच्या, आणि वादग्रस्त ठिकाणी जबरदस्तीने पुतळा बसविल्याचा आक्षेप सिंधी समाजाचा होता. जागा सरकारी असल्याचा दावा आरपीआयचा होता. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, अमल महाडिक यांच्या उपस्थितीत सर्किट हाऊसवर बैठक घेण्यात आली. या बैठकीत पाच जणांची समिती नियुक्त करण्यात आली. समितीमध्ये आरपीआयचे नेते शहाजी कांबळे, उत्तम कांबळे, शंकर दुलाणी आणि भजनलाल डेंबडा यांच्यासह प्रांताधिकारी प्रशांत पाटील यांचा समावेश आहे. समितीने लवकर निर्णय घ्यावा आणि सर्वांशी समन्वय साधून तोडगा काढावा असे आदेश पालकमंत्र्यांनी त्यांना दिले.

पालकमंत्री पाटील म्हणाले, गांधीनगरातील या पुतळ्याला सिंधी पंचायत आणि व्यापाऱ्यांचा विरोध नाही. पुतळा बसविण्यात आलेल्या जागेबाबत वाद आहे. हा वाद न्यायलयात गेला असल्यामुळे त्या प्रकरणात एवढ्यात तोडगा निघणे शक्य नाही. वादग्रस्त जागेवर पुतळा कोणी बसवला याबाबतही चौकशी करण्यात येईल. सध्या गांधीनगरातील व्यवसाय बंद असल्यामुळे लोकांची कोंडी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर व्यापार सुरू करण्यास व्यापाऱ्यांनी सहमती दर्शविली आहे.'

सिंधी समाजाचे नेते भजनलाल डेंबडा म्हणाले, 'पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सन्मानजनक तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे व्यवसाय सुरू करण्यात येत आहेत.'

आरपीआयचे नेते शहाजी कांबळे म्हणाले, 'शांतता आणि सुव्यवस्था रहावी यासाठी आमचाही प्रयत्न आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेतली जाईल.' पत्रकार परिषदेस सिंधी समाजाचे नेते, आरपीआयसह विविध पक्षांचे कार्यकर्ते, भाजपचे शहराध्यक्ष महेश जाधव उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेना, स्वाभिमानीची मोर्चेबांधणी

$
0
0



बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसमध्ये अद्याप शांतता

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रमाला सोमवारपासून (ता. २५) सुरूवात होण्याची शक्यता आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्याचा शिवसेनेने चंग बांधला असला, तरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप व जनसुराज्य पक्षाच्या पातळीवर शांतता आहे. दोन्ही काँग्रेस स्वतंत्र लढण्यासाठी इच्छुक असले, तरी शिवसेना-भाजपाला रोखण्यासाठी एकत्र येण्याची शक्यता आहे. दोन्ही काँग्रेससह सेनेच्या काही नेत्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी संपर्क साधला असल्याने स्वाभिमानी कोणता पर्याय निवडणार याकडेही जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. एक दोन दिवसांत निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असल्याने पडद्यामागील हालचालींना चांगलाच वेग आला आहे.

२००७ च्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाबरोबर युती करुन काँग्रेसचा पराभव केला होता. सहकारी संस्थामध्ये युतीचा शिरकाव होऊ नये यासाठी दोन्ही काँग्रेस कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये एकत्र आली होती.

याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष भगवान काटे म्हणाले,'दोन्ही काँग्रेस व शिवसेनेचे काही नेत्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी संपर्क साधला आहे. सन्माने जेथे अधिक जागा मिळतील त्यांच्यासोबत बाजार समितीची निवडणूक लढवू. अन्यथा स्वतंत्र लढण्याचीही तयारी केली आहे.'

जनसुराज्यचे प्रवक्ते विजयसिंह जाधव म्हणाले, 'गतवेळी राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करुन निवडणूक लढवली होती. जनसुराज्यचे सहा उमेदवार निवडून आले होते. मात्र सध्या निवडणुकीबाबत कोणताही विचार झालेला नाही. केडीसीसी अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड झाल्यानंतरच राष्ट्रवादीसोबत जायचे किंवा नाही याचा विचार करुन अद्याप समिती निवडणुकीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही.'

विद्यमान संचालकांवर झालेल्या भ्रष्टाचाराची न्यायालीयन चौकशी झाल्यानंतर समितीवर प्रशासकांची नियुक्ती केली होती. राजकीय कार्यकर्त्यांना पदे देण्यासाठी दोन महिने अशासकिय प्रशासकीय संचालक मंडळाची निवडही केली होती. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात समितीचा कार्यभार पुन्हा प्रशासकांच्या ताब्यात देण्यात आला होता. भ्रष्टाचारा मुद्दा करत शिवसेनेने निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे.

काँग्रेस पक्ष समितीच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. समविचारी पक्षासोबत जायचे किंवा स्वतंत्र लढायचे याबाबतचा निर्णय सर्व नेत्यांशी चर्चा करुन घेतला जाईल. मात्र निवडणुकीबाबत इतर कोणत्याही पक्षांसोबत चर्चा झालेली नाही. - पी. एन. पाटील, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये जनसुराज्य, शेकापसोबत युती करुन लढवली होती. निवडणुकीची अद्याप अधिसूचना निघालेली नसल्याने याबाबत निर्णय झालेला नाही. मात्र निवडणुकीची अधिसूचना निघाल्यानंतर समविचारी पक्षांना सोबत घेवून पुन्हा समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणार. - के. पी. पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी

जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांशी याबाबत विचारविनिमय झाला आहे. पुन्हा बुधवारी बैठक घेवून इतर पक्षांसोबत युती करायची किंवा नाही याचा निर्णय होईल. सहकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्ती मिळ्यास त्यांना पॅनेलमध्ये घेण्यासाठी प्रयत्न करु. - संजय पवार, जिल्हाध्यक्ष, शिवसेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘झूम’चा प्रश्न रेंगाळलेलाच

$
0
0




म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कसबा बावडा आणि ताराबाई पार्क या परिसराला जोडणाऱ्या लाइनबाजार प्रभागातील सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणारा झूम प्रकल्प अन्यत्र हलवण्याचा प्रश्न अद्याप रेंगाळलेलाच आहे. अष्टेकर नगर परिसरात असलेल्या 'झूम झोन'मुळे या भागात मोकाट कुत्री आणि दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे. तर मत्स्यविभागाच्या जागेवर असलेल्या मैदान किंवा वाचनालयाच्या आरक्षणाबाबत विद्यमान नगरसेवक चंद्रकांत घाटगे यांच्याकडून फारसा पाठपुरावा झालेला नाही. मात्र, प्रभागातील हॉकी मैदानाचा विकास करण्यात नगरसेवकांना यश आले असून टेबलशेड आणि पॅव्हेलियनरूम अद्ययावत करण्यात आली आहे. परंतु सेफ्टीटँक, कचरा उठाव, अंतर्गत रस्ते, गटरस्वच्छता याबाबत प्रभागातील नगरसेवकांकडून उदासीनता आहे.

भगवा चौक, मराठा कॉलनी, साईनाथ कॉलनी, अष्टेकर नगर, लाईनबाजार चौक, पडवळे ते भट्टी विभाग, त्र्यंबोली नगर आणि रेणुका मंदिर समोरील भाग प्रभाग क्रमांक सहा म्हणून रचना करण्यात आलेल्या लाईनबाजार प्रभागामध्ये समाविष्ट होतो. या प्रभागातील महत्त्वाची समस्या आहे ती म्हणजे झूम प्रकल्पामुळे होणाऱ्या दुर्गंधीच्या त्रासाची. गेल्या साडेचार वर्षात झूम प्रकल्पांतर्गत शहरातील कचरा टाकण्यासाठी अष्टेकर नगर येथील जागा निश्चित केलेल्या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. त्यासाठी औषधफवारणीदेखील सातत्याने केली जात नाही. कचऱ्याच्या ढिगामुळे सतत मोकाट कुत्र्यांचा वावर असल्याने लहानमुलांच्याही सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रभागात मत्स्यविभागची रिकामी जागा आहे. पूर्वी जी तळी होती ती सध्या आटली आहेत. या तळ्यांच्या जागी वाचनालय किंवा मैदान करण्यासाठी आर​क्षण आहे. सध्या या भागात मशिदीजवळ असलेले मैदान हे कसबा बावडा आणि लाईन बाजार या प्रभागाच्या सीमेवर असल्यामुळे ​विकास कुणी करायचा या वादात अडकले आहे. नवरात्रउत्सवात मैदानावर कार्यक्रम केले जातात, मात्र मैदानासाठी तळ्याची जागा आरक्षित असूनही त्याबाबत कार्यवाही झालेली नाही.

प्रभागात काही ठिकाणी कचरा उठाव होत असला तरी अंतर्गत कॉलनी आणि सोसायटी येथील कचरा उठाव सातत्याने होत नसल्याचे चित्र प्रभागात दिसते. लाईन बाजार प्रभागातील ड्रेनेज लाइनचा प्रश्नही गंभीर आहे. अनेक रहिवासी नागरिकांनी स्वत:च्या खर्चाने सेफ्टीटँक बसवून घेतले आहेत. मात्र ड्रेनेज असुविधेची समस्या कायम आहे. प्रभागातील श्री कॉलनी आणि भट्टी विभाग या भागात कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याने मतदार त्रस्त आहेत. मुख्य रस्त्यांचे काम दर्जाहिन झाल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यात अडचणी येतात.

संरक्षक भिंत, बालोद्यानचा प्रश्न मार्गी

सध्या या प्रभागातील झूमप्रश्न निकाली निघाला नसला तरी मध्यंतरी झूमप्रकल्पाच्या जागेभोवती असलेली भिंत कोसळली होती. ती बांधण्यात आली आहे. जवळपास दोन एकर जागेत असलेल्या मत्स्यतळ्याची जमीन ताब्यात घेण्यात यश आले आहे. या भागात महापालिकेची क्रमांक सात ही शाळा आहे,​ तिथे महापालिकेतर्फे सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. तर हनुमान मंदिर परिसरात बालोद्यान फुलवण्यात आले आहे. या भागातील हॉकी मैदानाला नवीन शेड उभारण्यात आल्यामुळे खेळाडूंना फायदेशीर ठरले आहे.

प्रभागातील झूम प्रकल्पामुळे ना​गरिकांची नाराजी स्वाभाविक आहे. मात्र हा प्रकल्प टोप खण येथे हलवण्यात यावा यासाठी गेल्या चार वर्षापासून सातत्याने पाठपुरावा केला आहे. कचऱ्याच्या दुर्गंधीची तीव्रता कमी झाली आहे. झूम परिसरात भिंत बांधण्यासाठी ७२ लाख निधी खर्च केला आहे. एक कोटी रूपयांच्या निधीतून फाटक क्रमांक चार ते भगवा चौक या लिंकरोडचे काम मार्गी लावले. - चंद्रकांत घाटगे, नगरसेवक

घाटगे प्रथमच या भागातून नगरसेवक म्हणून निवडून आल्यामुळे भागातील समस्या जाणून घेण्यात ते कमी पडले. प्रामुख्याने या प्रभागातील झूम प्रश्न मार्गी लागला पाहिजे. तसेच कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटला पाहिजे. पावसाळ्यात या भागातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट असते. मुख्य रस्ते चांगले नाहीत. . - विजय यादव, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंकाळ्याचा प्रश्न कायम

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भागातील बहुतांश रस्ते चकाचक झाले, गल्लीत काँक्रीटीकरण झाले, गटारी झाल्या. पण प्रभागातील एकमेव सभागृहाच्या इमारतीला अवकळा आली आहे. तर रंकाळ्यावर येणाऱ्या पर्यटकांना सोईच्या ठरु शकतील अशा स्वच्छतागृह व शौचालयांची अवस्था दयनीय आहे. संपूर्ण कोल्हापूरची अस्मिता असलेला प्रभागातील रंकाळ्याची दुरवस्था कायम असल्याने त्याबाबत नेहमीच ओरड होत आहे.

मरगाई गल्ली, संध्यामठ गल्ली, चंद्रेश्वर गल्ली, राजघाट रोड, उभा मारुती चौकाच्या पश्चिमेकडील भाग, ताराबाई रोडवरील दयावान ग्रुपपर्यंत, आयरेकर गल्ली असा शिवाजी पेठेचा मुख्य भाग असलेला चंद्रेश्वर प्र्रभाग आहे. उभा मारुती चौक, रंकाळा टॉवर ते जुना वाशी नाका हे दोन मुख्य रस्ते सोडल्यास प्रभागात गल्ली, बोळांचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य आहे. येथे बोंद्रे, खराडे, सावेकर ही राजकीय वारसा असलेली घराणी असली तरी सामाजिक कार्यकर्त्यांची ताकदही मोठी असल्याचे वेळोवेळी निवडणुकांमधून दाखवून दिली आहे. तरीही परिक्षित पन्हाळकर यांनी लढत देऊन नगरसेवकपद मिळवले.

त्यांच्या नेतृत्वाखाली मुख्य रस्ते, अंतर्गत रस्त्यांची बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. काँक्रीटीकरण व पेव्हिंग ब्लॉक नसलेले बोळ व गल्ली क्वचितच पहायला मिळते. संध्यामठ गल्लीमध्ये असणारी व्यायामशाळा व सभागृहाच्या इमारतीला अवकळा आली आहे. रस्त्यासमोरील बाजूला शटर आहेत. पण पाठीमागील दारे गायब आहेत. खिडक्यांचे स्लॅब ढासळत आहेत. त्यांची दारे गायब झाल्याने लाकडी पट्ट्या मारुन खिडक्यांचा प्रकाशच बंद केला आहे. आतमध्ये बराच कचरा दिसून आल्याने त्या इमारतीचा वापर होत नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यापाठीमागेच सार्वजनिक शौचालये आहेत. त्यांची देखभाल व्यवस्थित होते. सार्वजनिक शौचालयांची अवस्था फारच वाईट आहे. अनेकांचे स्लॅब पडले आहेत, दरवाजे तुटले आहेत. त्याची दुर्गंधी पसरते. या प्रभागातील रंकाळा काठावरील लोकांना मध्यंतरी रंकाळ्याच्या पाण्याच्या दुर्गंधीने त्रस्थ करुन सोडले. रंकाळ्याची या प्रभागातील भिंत रस्त्याच्या कामामुळे ठिक​ठिकाणी कमकुवत होत आली आहे. त्याचा धोका या प्रभागातील वस्तीलाही आहे. त्यादृष्टीने नगरसेवकांनी आक्रमक प्रयत्न केल्याचे दिसलेले नाही.

सहा वर्षे बंद असलेल्या रंकाळ्याच्या रस्त्याची सुरुवात या प्रभागातून होते. रस्त्याचे काम रखडले आहेच. खितपड पडलेल्या या रस्त्याचे डांबरीकरण झाले नाही तर किमान चिखल होणार नाही याचीही दक्षता घेतलेली नाही. त्यामुळे पाच वर्षे या रस्त्याशेजारील गल्लीतील लोकांना फुलेवाडी अथवा सानेगुरुजी वसाहतीकडे जाण्यासाठी फेरा मारुनच जावे लागते. आयरेकर गल्लीपर्यंत असलेल्या रंकाळ्याजवळच्या रस्त्यावरील पॅचवर्कही करता आलेले नाही. प्रसिद्ध संध्यामठ इमारतीची दुरुस्ती केलेली नाही.

प्रभागातील नागरिकांनी विश्वास टाकून निवडून दिल्यानंतर अनेक कामे केली. त्यामध्ये प्रकर्षाने उभा मारुती चौक ते जुना वाशी नाक्यापर्यंतचा रस्ता करुन घेतला. त्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर केल्या. इतर रस्त्यांचीही कामे केली असून त्यामध्ये अनेक गल्लींचा समावेश आहे. शिवाय बोळातील, गल्लीतील रस्ते केले. ड्रेनेज लाइनची कामे झाली आहेत. जिथे पेव्हिंग ब्लॉकमुळे अडचणी येत होत्या. तिथे नागरिकांच्या मागणीनुसार काँक्रीटीकरण केले आहे. - परीक्षित पन्हाळकर, नगरसेवक

रस्ते, गटारी, ड्रेनज लाइन ही कामे प्रभागांमध्ये सातत्याने सुरु असतात. पण रंकाळा हा शहराची अस्मिता आहे. या प्रभागातील नागरिकांनी पूर्वीपासून रंकाळ्याच्या स्वच्छ पाण्याबरोबर स्वच्छ हवा अनुभवली आहे. त्यामुळे रंकाळ्याला येत असलेली अवकळा दूर होण्याची नागरिकांची अपेक्षा होती. रंकाळ्यात मिसणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. त्यासाठी झटून काम करण्याची आवश्यकता होती. ते या पाच वर्षात दिसले नाही. - बाळासाहेब सासने, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोयना अभयारण्यात ५ वाघ

$
0
0



वन खात्याने केलेल्या प्राण‌िगणनेत सह्याद्री प्रकल्पात पाच वाघांचेही अस्तित्व निश्चित

म. टा. वृत्तसेवा, कराड

कोयना अभयारण्याच्या परिसरात प्रथमच महाराष्ट्राचा राज्य प्राणी असलेल्या शेकरूची अधिकृत नोंद करण्यात आली आहे. या ठिकाणी ११३ शेकरू आहेत. तसेच, या भागातच असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाच पट्टेरी वाघ असल्याचेही निश्चित झाले आहे.

कोयनेसह चांदोली, राधानगरी अभयारण्यांत शेकरू गणना अत्याधुनिक साधनांच्या मदतीने करण्यात आली. शेकरू भीमाशंकर अभयारण्यात प्रामुख्याने आढळतो. कोयना अभयारण्यातही शेकरू होते, मात्र त्यांची प्रत्यक्ष गणना झाली नव्हती. राज्य सरकारने जूनअखेर राज्यातील अभयारण्ये, व्याघ्र प्रकल्प आणि राष्ट्रीय उद्यानांत शेकरू गणना घेण्याचे आदेश दिले होते.

भारतात शेकरूच्या सहा जाती असून, यातील 'रातुफा इंडिका' ही जात पश्चिम घाटात आढळते. कोयनेत शेकरूंची चांगली नोंद झाल्याने या अभयारण्यातील जैवविविधता अजूनही चांगली असल्याचे मानले जात आहे. या गणनेमुळे जंगल घनतेची माहितीही उपलब्ध होणार आहे.

'डेहराडून येथील राष्ट्रीय वन्यजीव संस्थेकडून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पाच पट्टेरी वाघांचे अस्तित्व असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. आता विशेष साधनसामग्री कर्मचारी आणि विशेष सरंक्षणाची गरज आहे,' असे मत येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे सहायक वनसंरक्षक सुभाष पुराणिक यांनी व्यक्त केले.

अशी झाली शेकरू गणना

> यंदा प्रथमच शास्त्रीय पद्धतीने शेकरू गणना > यासाठी प्रत्यक्ष पाहणीला महत्त्व > ११३ शेकरू प्रत्यक्ष दिसले. > उंच झाडांवर २७१ घरटी. त्यात वापरात नसलेली ६१, अर्धवट बांधलेली ९१ तर सोडलेली १५९ घरटी. > तसेच गर्भ घरटी म्हणजेच सध्या प्रजनन सुरू असलेली ४९ घरटी > कॅमेरा ट्रॅपिंग, डिस्टन्स सॅफलिंग, रेंज फाइंडर, ट्रान्सेट लाइन्स अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा गणनेत वापर

सह्याद्रीत वाघ असल्याच्या नोंदी अनेक वर्षांपासून प्राणिगणनेत केल्या जात आहेत. मात्र, वाघ प्रत्यक्ष पाहिल्याची नोंद एकाही गणनेत झालेली नाही. मध्यंतरी वन विभागाने वाघाची छबी टिपण्यासाठी कॅमेरेही लावले होते. मात्र, वाघ या कॅमेऱ्यांतूनही टिपता आलेले नाहीत. तरीही त्यांच्या पाऊलखुणा, विष्ठा आदी साधनांवरून या परिसरात वाघ आहेत, याला वन्य जीव संस्थेनेही दुजोरा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३८७ डॉक्टरांवर फौजदारीचा आदेश

$
0
0



वैद्यकीय कचऱ्याबद्दल कारवाई

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट अशास्त्रीय केल्याबद्दल शहर व परिसरातील ३८७ डॉक्टरांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाने महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिले आहेत.

गेल्या आठवड्यात जयंती नाला परिसरात जैव वैद्यकीय कचरा टाकण्यात आला होत्या. पर्यावरणप्रेमी चळवळीतील कार्यकर्त्यांनी या संदर्भात तक्रार दाखल केल्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी एस. एस. डोके यांनी पंचनामा केला होता. त्यानंतर हे डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महानगरपालिकेला दिले होते.

सध्या कोल्हापूर परिसरात ११०० हून अधिक डॉक्टर आहेत. महापालिकेने त्यांची विभागणी हॉस्पिटल, डेंटल क्लिनिक आणि सिटी क्लिनिक अशी केली आहे. वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिका, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन आणि 'नेचर इन नीड' या संस्थेत करार झाला आहे. संस्थेकडे नोंद झालेल्या ७५२ हॉस्पिटलमधील जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट करण्याचे काम 'नेचर इन नीड' गेले दोन वर्षे करते. सीपीआर हॉस्पिटल, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, आयसोलेशन हॉस्पिटल, पंचगंगा हॉस्पिटलसह सर्व ठिकाणच्या वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट कसबा बावड्यातील झूम कचरा प्रकल्प परिसरातील केंद्रात केली जाते.

तरीही अनेक हॉस्पिटल, डॉक्टर वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट अशास्त्रीय पद्धतीने लावतात. अनेकदा कोंडाळा, नाले आणि शहरांबाहेर रस्त्यांवर कचरा उघड्यावर फेकला जातो.

वैद्यकीय कचऱ्याची अशास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी पावले उचलली आहेत. शहर व शहर परिसरातील अशा डॉक्टरांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत महापालिकेला आदेश दिले आहेत. - मनीष होळकर, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जमीन अधिग्रहण परस्पर करू नका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

महायुतीचे सरकार कराड विमानतळ विस्तारवाढीबाबतचे धोरण, भूसंपादन प्रक्रिया कशी राबविणार या बाबतचा तपशील तातडीने जाहीर करावा, अशी मागणी कराड विमानतळ विस्तारवाढ बाधित शेतकरी समितीने प्रांताधिकारी किशोर पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सरकारने कराड विमानतळ विस्तारवाढ प्रक्रिया सुरू केली आहे. विस्तारवाढीसाठी मोजणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, विमानतळ विस्तारात बाधीत होणाऱ्या शेतकऱ्यांना यापूर्वीच्या आघाडी सरकारने प्रतिगुंठा ३ लाख ५० हजार रुपये दर देण्याविषयी अनुकूलता दाखविली होती. मात्र गत विधानसभा निवडणुकीत सत्तांतर झाल्याने राज्यातील महायुतीच्या नवीन सरकारचे या बाबतचे धोरण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, कराड विमानतळ विस्ताराच्या संदर्भात आजपर्यंत विस्तारवाढ बाधीत शेतकरी समितीने राज्य सरकारबरोबर अनेकवेळा पत्रव्यवहार केलेला आहे. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर जमिनीच्या दरासंदर्भात चर्चा केलेली होती. त्यानुसार सरकार व पुर्नवसन प्राधिकरण यांच्या समवेत झालेल्या चर्चेत प्रतिगुंठा ३ लाख ५० हजार रुपये इतका दर जमिनीचा मोबादला म्हणून बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना देण्याबाबत सरकार अनुकूल होते. मात्र, शेतकरी समितीने प्रचलित बाजारभावाने प्रतिगुंठा १० लाख रुपये मोबदला देण्याची मागणी केली होती. त्यामुळे हा प्रश्न प्रलंबीत राहिला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृष्णेच्या प्रदूषणप्रकरणी काँग्रेसचा रास्ता रोको

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

कृष्णा नदीत मळीमिश्रित दुर्गंधीयुक्त पाणी मिसळून नदीतील पाण्याचे प्रदूषण झाले आहे. याचा फटका नदीकाठच्या गावांना बसत आहे. नदीचे प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी बोरगाव (ता. वाळवा) येथे काँग्रेसच्या वतीने रस्ता रोको व निदर्शने करण्यात आली. नदीच्या पात्रात हजारो मासे मरून पडले आहेत. या मृत माशांचा खच गावोगावी नदी किनाऱ्यावर पहायला मिळतो आहे. याची प्रदूषण नियंत्रण मंडळाने कसलीही दखल घेतली नसल्याने नदीकाठच्या ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्रदूषण महामंडाळच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने बोरगाव येथे रस्ता रोको व निदर्शने करण्यात आली.

दरम्यान, गेल्या आठवड्यापासून प्रदूषणाचा हा प्रकार सुरू असल्याने नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांचे आरोग्य बिघडले आहे. विविध साथींचे प्रमाणही वाढले आहे. या प्रदूषणाची जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. विशेष म्हणजे गेल्या महिनाभरात मृत माशांची ही तिसरी घटना असल्याचे नवेखेड येथील ग्रामस्थानी सांगितले. नवेखेड येथे बोरगाव बंधाऱ्यापाशी हजारो मासे मरून पडले आहेत. मोठ्या प्रमाणात मासे मेल्याने नदीकाठच्या अनेक गावात कृष्णा नदीचे पाणी काळेशार झाले आहे.

साखर कारखान्यामुळे बिघडते कृष्णेचे आरोग्य

कृष्णा नदीकाठच्या विविध कारखान्यांनी प्रामुख्याने साखर कारखान्यांनी आपले दूषित पाणी शुद्ध करून कृष्णा नदीपात्रात सोडणे आवश्यक आहे. पण हे घडत नाही. त्यामुळे कृष्णेचे पात्र म्हणजे अक्षरश: गटारगंगा झाली आहे. आज बहे, बोरगाव, पार्णेवाडी, साटपेवाडी, गौंडवाडी, ताकारी या अनेक गावातील कृष्णा नदीकाठचे पाणी पिण्याला योग्य राहिलेले नाही. त्यात रसायनमिश्रित मळी मिसळली गेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेतील बोगस कर्मचारी कमी

$
0
0

सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महापालिका प्रशासनाने आणखी बोगस ९४ सफाई कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचे आदेश दिले आहेत. इतर ठिकाणी काम करणाऱ्या २३ सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ जागी पाठविण्यात आले आहे. तर आजवर एकूण १५१ बोगस कर्मचाऱ्यांना कामावरून हटविण्यात आले आहे.

विशेष म्हणजे कामावरून काढून टाकण्यात आलेल्या या सर्व सफाई कामगारांना आतापर्यंत दिलेल्या वेतनाची वसुली संबंधित अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे, तसे प्रशासनाने जाहीर केले आहे. उपायुक्त प्रशांत रसाळ यांनी संबंधित बोगस कर्मचाऱ्यांबाबतचा अहवाल आयुक्त अजिज कारचे यांना सादर केला होता. तसेच महापालिकेने स्वच्छतेसाठी ४०० कर्मचारी मानधनावर घेण्याचा ठराव केला होता. जेंव्हा या जागांसाठी ७०० कर्मचार्यांच्या मुलाखती घेतल्या गेल्या त्यावेळी ३ हजार मानधन ठरले होते. मानधन कमी असल्याने ४० टक्के कर्मचारी कामावर आलेच नाहीत. त्यामुळे हे मानधन वाढवून ६ हजार रुपये करण्यात आले. तोवर काही अधिकाऱ्यांनी सदस्यांनी परस्पर कसलीही प्रक्रिया न राबवता कर्मचारी कामावर घेऊन त्यांना मानधनही देण्यात येत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चूक कार्यालयाची, फटका शिक्षकांना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रलंबित कामांचा आणि फायलींचा लवकर निपटारा करावा, बालकांना मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायद्याची (आरटीई) प्रभावी अंमलबजावणी यासंदर्भात सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्राथ​मिक शिक्षण मंडळाला महापालिका प्रशासनाने चांगलाच झटका दिला. कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी प्रलंबित कामे वेळेत केले नाहीत म्हणून प्रशासनाने एप्रिल महिन्याच्या पगाराला 'ब्रेक' लावला आहे.

महापालिकेच्या शाळेतील शिक्षकांची संख्या ३२५ तर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची संख्या १५० हून अधिक आहे. निवृत्तांची संख्या ७०० हून अधिक आहे. महापालिका आणि राज्य सरकारच्या निधीतून पगाराची तरतूद केली जाते. दरम्यान एप्रिल महिन्याचा पगार अद्याप झाला नाही. प्रशासनाने प्राथमिक शिक्षण मंडळाला आरटीई संदर्भात प्रभावीपणे काम करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यासंदर्भातल अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र काही कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. प्रशासनाने आरटीई संदर्भात प्रभावीपणे काम करण्याच्या सूचना केल्या. मात्र, शिक्षण मंडळाच्या कार्यालायच्या पातळीवर हलगर्जीपणा होत असल्याचे निदर्शनास येताच प्रशासनाने झटका देत एप्रिल महिन्याच्या पगाराला काही दिवसाकरिता ब्रेक लावला. सोमवारपर्यंत (ता. १८) पगार करण्यात आला नव्हता. प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारताच शिक्षण मंडळाच्या कार्यालयाने कामाचा निपटारा केला. तसेच प्रशासनाच्या सूचनेनुसार कार्यवाही केली. प्रशासनाकडून आता पगार वितरीत करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. येत्या दोन दिवसांत पगार होण्याची शक्यता आहे.

शिष्टमंडळ उपायुक्तांकडे

महापालिका शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एप्रिलच्या वेतनाची प्रतीक्षा करावी लागत आहे. कार्यालयीन चूक असताना त्याचा फटका शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कशासाठी ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्राथमिक शिक्षक समिती, प्राथमिक शिक्षक संघ, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी उपायुक्त अश्विनी वाघमळे यांची भेट घेऊन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन करावे, अशी मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खोदाईमुळे अपघातांना निमंत्रण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा चंदगड

बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर ठिकठिकाणी रस्त्यामध्ये पाइपलाइनसाठी खड्डे पाडून पाइपलाइन रस्त्यातून आर-पार नेल्यामुळे रस्त्यावर खड्यांचे प्रमाण वाढले आहे. हे खड्डे अनेक दिवस न भरल्याने या मार्गावरील अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. बांधकाम विभागाने याची त्वरीत दखल घेवून संबंधितांना सूचना द्याव्यात व खड्डे भरुन रस्ता वाहतुकीला पूर्ववत करावा, अशी मागणी होत आहे.

बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर वाहनांची नेहमी रिघ लागलेली असते. चंदगड-बेळगाव मार्गावर अनेक गावे येत असल्याने या मार्गावर एसटी महामंडळाच्या गाड्यांची वर्दळ असते. बेळगावहून -वेंगुल्र्याकडे आंबोली, सावंतवाडीकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी असते. सतत वर्दळ असलेल्या या मार्गावर पाइपलाइनसाठी अनेकांनी रस्ता खोदाई करुन पाइपलाइन घातली आहे. यासाठी रस्ता मधोमध खोदाई केला आहे. त्यामुळे रस्त्यात खड्डे पडले आहेत. पाइपलाइन घातल्यानंतर रस्त्याचे पूर्वीप्रमाणे डांबरीकरण न करता केवळ त्यामध्ये मुरुम टाकून रस्ता पूर्ववत केला जातो. सतत वाहनांची वर्दळ असल्याने वाहनांच्या गतीमुळे माती उडून जाऊन रस्त्यामध्ये खड्डे पडतात. या मार्गावर वाहने वेगात जात असल्याने रस्त्यात खड्डा दिसल्यावर अचानक ब्रेक लागल्याने अनेकांचे अपघात झाले आहेत. काही ठिकाणी रस्ता खोदाईनंतर रस्त्याचे डांबरीकरण केले आहे. मात्र तेथे स्पीडब्रेकरप्रमाणे उंचवटा केल्यामुळे अनेकांना यावरुन जाताना कंबरेला जोराचा दणका बसत आहे. या मार्गावर वाहने सुसाट असल्यामुळे वाहनांचे अनेक अपघात झाले आहेत.

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

या रस्त्यावर खोदाई करत असताना बांधकाम खात्याकडून परवानगी घेतली जाते. बांधकाम खाते रस्त्याची नुकसानभरपाई म्हणून ठराविक रक्कम भरुन घेवून त्यानंतरच परवानगी देते. त्यानंतर मात्र त्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत असून सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेवून रस्ता वाहतुकीला सुरळीत करावा अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भवानी तलाव होणार गाळमुक्त

$
0
0

दिग्विजय कुंभार, शाहूवाडी

साधारणपणे सोळाव्या शतकात खोदाई केलेला भेडंसगाव येथील ऐतिहासिक भवानी तलाव कालौघात गाळाने भरून गेला होता. तलावाच्या रूपातला हा ऐतिहासिक ठेवा यापुढेही कायमस्वरूपी जपून ठेवावा या एकाच उद्देशाने सारे ग्रामस्थ, ग्रामपंचायतीचे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकवटले आहेत. पावसाळ्यापूर्वी संपूर्ण गाळ काढून या तलावाला नवसंजीवनी मिळवून देण्यासाठी सर्वच स्तरावर सारी यंत्रणा गाळ काढण्यासाठी जोमाने कामाला लागली आहे.

वीस एकर जागेमध्ये असलेला हा तलाव गावाच्या मध्यभागी आहे. जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न लक्षात घेवून तत्कालिन पोलिस पाटील चिमाजी पाटील यांची प्रेरणा घेवून ग्रामस्थांनी श्रमदानातून हा तलाव खोदला होता. पूर्वी या तलावातील पाण्याचा वापर पिण्यासाठी करत होते. तलावात पूर्वेकडील बाजू वगळता अन्य तिन्ही बाजूकडून येणारे पावसाचे पाणी, तलावातल्या पाण्यात जनावरे व कपडे धुणे आणि सभोवारचे सांडपाणी यामुळे तलावातले संपूर्ण पाणी दुषित व पिण्यास अयोग्य बनले होते. शिवाय मोठ्या प्रमाणात गाळही साचला होता. हा गाळ काढण्यासाठी साधारणपणे सतरा वर्षांपूर्वी 'गोकुळ'चे तत्कालीन संचालक दिवंगत आनंदराव पाटील, माजी जि. प. सदस्य हंबीरराव पाटील, अप्पासाहेब साळुंखे, बाळासाहेब पाटील यांच्या पुढाकाराने विविध मशीन्सच्या साहाय्याने गाळ काढण्याचा मोठा प्रयत्न झाला होता, परंतु तो प्रयत्न अपुरा पडला.

मागील वर्षी विद्यमान जि. प. सदस्या लक्ष्मी पाटील यांच्या प्रयत्नातून दहा लाख रुपये खर्चून साताळी मंदिराच्या पठारावरून नैसर्गिक स्त्रोताद्वारे या तलावात पाणी आणून सोडले आहे. परंतु तलावातील गाळ काढण्यासाठी पुरते यश मिळाले नाही. त्याचा विचार करून सारे ग्रामस्थ, विविध पातळ्यावरील सरकारी योजनांचा निधी, लोकप्रतिनिधींचा स्थानिक विकास निधी या साऱ्यांच्या सहभागातून गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. यासाठी पोकलॅन मशीन्स आणि ट्रॅक्टर्सचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे.

'अंगाई' सिनेमातील तलाव

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे यांचे मूळ गाव भेडंसगाव. साधारणपणे नव्वदच्या दशकात 'अंगाई' सिनेमा प्रदर्शित केला होता. प्रा. नलगे यांनी हा सिनेमाच मुळी या तलावाभोवती गुंफला होता. त्यामुळे 'अंगाई' मधील हा तलाव सर्वांच्या कायम चर्चेत राहिला आहे. या तलावाचे गावक‍ऱ्यांशीही एक भावनिक नाते जुळले आहे.

घटनेचा साक्षीदार

हा तलाव बांधून पूर्ण झाला त्यावेळी 'खोदाईचे साल सन १६७०' असा मजकूर वीस फूट उंचीच्या असलेल्या सागवानी स्मृतीस्तंभावर कोरण्यात आला आहे. विशेष म्हणजे या तलावाच्या घटनेचा साक्षीदार म्हणून असलेला हा स्मृतीस्तंभ वर्षानुवर्षे पाण्यात उभा असूनही आजपावेतो चांगल्या स्थितीमध्ये आहे.

या ऐतिहासिक तलावातील पूर्ण गाळ काढून तलावाला गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. पाण्याचा निचरा होत असल्याने कामाचा उरक गतीने होत आहे. पावसाळ्यापूर्वी काम पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला आहे. तलावातील गाळ काढण्याच्या कामी सर्वांचेच सहकार्य लाभत आहे.

- हंबीरराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिनी बस उलटून २२ विद्यार्थी जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

फोंडा-कोल्हापूर राज्यमार्गावर राधानगरीनजीक दाऊतवाडीच्या वळणावर मंगळवारी (ता.१९) पहाटे खासगी टेम्पो ट्रॅव्हलर गाडी उलटून झालेल्या अपघातात २२ जण जखमी झाले. जखमींमध्ये सर्वजण पुण्याच्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थी असून दोन दिवसांपूर्वी सहलीसाठी सर्वजण गोव्यास गेले होते. परत येताना त्यांच्या गाडीस अपघात झाला असून जखमींवर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, पुण्याच्या विलिंग्डन,फग्युसनसह अन्य महाविद्यालयातील ४० विद्यार्थी खासगी टेम्पो ट्रॅव्हलरमधून १६ मे रोजी पुण्याहून गोव्यास सहलीसाठी गेले होते. दोन दिवसांची सहल केल्यानंतर ते सोमवारी रात्री परतीच्या प्रवासात गोव्याहून पुण्यास, राधानगरी-कोल्हापूर मार्गावरून निघाले होते. मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता राधानगरीनजीक एजिवडे-दाऊतवाडी दरम्यानच्या वळणावर चालकाचे गाडीच्या वेगावरील नियंत्रण सुटल्याने मागील चाके रस्त्याकडेला चरीत जावून गाडी उलटली झाली.

त्यामध्ये २२ विद्यार्थी जखमी झाले. त्यांच्यापैकी अनेकांच्या हात, पाय, डोके, चेहरा, हनवटीला मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या असून, जखमींमध्ये दोन मुलींचाही समावेश आहे. या अपघाताची वर्दी सहप्रवासी असलेल्या पार्थ मटकरी याने राधानगरी पोलिसांना दिली. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना गाडीतून बाहेर काढून उपचारासाठी कोल्हापुरास पाठविले. आदित्य निगोट, इंद्रनील गाडगीळ, चैतन्य मारणे, यश सरदेसाई, युगंधर चावरेकर, अधर्व, देशपांडे, प्रतिक कानडे, यश डब्बे, सुमित यडगावकर, प्रवीणसिंग खोडके, रफरम पडसलकर, प्रश्नांत दांडेकर, अवेद फडके, प्रिया सप्रे, श्रिता शैलेगार व चालक आदींचा जखमींमध्ये समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्या ८३ कर्मचाऱ्यांच्या नोकरीचा घोळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महावितरणकडून जुन्या, रोजंदारीवरील ८३ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणे आणि पुन्हा त्यांना मंत्र्यांच्या आदेशानंतर कामावर घेऊन त्यांच्या जागी घेतलेल्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविणे असा खेळखंडोबा झाला आहे. अधिकारी, कंत्राटदार आणि मंत्र्यांनी हा कर्मचाऱ्यांचा खेळ सुरू केला असून त्यात सर्वसामान्य कामगार उघड्यावर आले आहे. एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याच्या या प्रकारात नव्या कंत्राटी कामगारांवर मिळालेली नोकरी गमावण्याची वेळ आली आहे.

महावितरणमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या ८३ कर्मचाऱ्यांना डिसेंबर २०१४ मध्ये कामावरून काढून टाकण्यात आले. नोकरीत कायम करावे या मागणीसाठी न्यायालयात गेलेल्या या कर्मचाऱ्यांना कामावर काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली. हे कर्मचारी ठेकेदारामार्फत महावितरणमध्ये काम करत होते. पण, त्यांना तडकाफडकी काढून टाकले गेले. यात किमान १२ वर्षे नोकरी केलेल्या कर्मचाऱ्यांना संसार कसा सुरू ठेवायचा असा प्रश्न पडला होता. अधिकारी आणि ठेकेदाराकडे विनंती अर्ज करूनही त्याची दखल घेतली गेली नाही. सुरूवातीला हे कर्मचारी कोणत्याही वीज कामगार संघटनांचे सदस्य नव्हते. त्यामुळे कोणत्याही कर्मचारी संघटनांनीही त्यांना जवळ केले नाही. त्यांची बाजू मांडली नाही.

कोल्हापूर, सांगली परिमंडलाप्रमाणे बारामती आणि नाशिक परिमंडलात देखील असाच प्रकार झाला होता. या प्रकारामुळे त्या ठिकाणचे अनेक कर्मचारी बेरोजगार झाले होते. त्यांना इतर ठिकाणीही नोकरी करता येत नव्हती. अखेर महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेच्या मदतीने कोल्हापूर परिमंडलातील ८३ कर्मचाऱ्यांनी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे धाव घेतली. त्यांच्या एका फोनमुळे या कामगारांना पुन्हा नोकरीवर घेण्यात आले. ज्या कर्मचाऱ्यांनी गेले वर्षभर कामावर घ्या म्हणून आर्जव, विनंत्या केल्या, त्याला केराची टोपली दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्याच दिवशी, ठेकेदारामार्फत त्यांना कामावर हजर करून घेतले.

मात्र, हे करत असताना गेल्या वर्षभरात या कर्मचाऱ्यांच्या जागेवर घेण्यात आलेल्या नव्या कर्मचाऱ्यांचा बळी गेला आहे. त्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. हे कर्मचारी सध्या कोणत्याही संघटनेचे सदस्य नसल्याने त्यांच्या पाठिशी कोणीच नाही.

या प्रकरणात महावितरणचे अधिकारी नामानिराळे राहिले आहेत. महावितरणमध्ये झालेली भरती कंत्राटी पद्धतीने ठेकेदारामार्फत झालेली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांना काढून टाकणे किंवा कामावर घेणे हे अधिकाऱ्यांच्या हातात नसून ठेकेदाराच्या हातात असल्याचे सांगितले जाते. पण, या ठेकेदाराला सूचना देण्याचे काम अधिकारीच करतात. अधिकारी, ठेकेदार आणि मंत्र्यांनी ज्या-त्या वेळी योग्य निर्णय घेतले, तर शेवटच्या टप्प्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही.

गेल्या वर्षभरात महावितरणची मोठी भरती झाली. या भरतीच्या काळात या कर्मचाऱ्यांना सामावून घेता आले असते. पण तसे न झाल्याने हे कर्मचारी न्यायालयात गेले होते. त्याचा फटका म्हणून त्यांना कायमचे घरी बसविण्यात आले. मात्र, मंत्र्यांच्या एका फोनवर त्यांना पुन्हा कामावर घेण्यात आले. सांगलीमधील ५ कर्मचाऱ्यांना मात्र अजूनही कामावर घेण्यात आलेले नाही. अधिकारी जागेवर नसल्यामुळे, त्यांना हजर करून घेता येत नाही असे कारण दिले जात असले तरी जर ठेकेदारामार्फत महावितरणने कर्मचारी घेतले आहेत, तर मग अधिकाऱ्यांची गरज काय असा प्रश्नही उपस्थित होतो. एकमेकांना असलेली छुपी मदत या प्रकरणामुळे उघड झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images