Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

नाल्यात जैववैद्यकीय कचरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वापरलेल्या इंजेक्शन सिरिंज, औषधाच्या बाटल्या असा मोठ्या प्रमाणातील जैववैद्यकीय कचरा जयंती नाल्यामध्ये टाकला असल्याचे आढळून आले. जयंती नाल्यातील प्रदूषण वाढविण्याच्या प्रकाराने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांबरोबर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीही तत्काळ भेट दिली.

जयंती नाल्याच्या प्रवाहातच मोठ्या प्रमाणावरील सिरिंज, औषधाच्या बाटल्या तसेच काही बँडेज असा जैववैद्यकीय कचरा टाकल्याचे काही जागरुक नागरिकांना आढळून आले. त्यानंतर मंडळाच्या व महापालिकेच्या अधिकाऱ्यांना त्याची कल्पना दिल्यावर आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील व मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी मनीष होळकर घटनास्थळी आले. जयंती नाल्याचे सांडपाणी अडवल्यामुळे पात्र कोरडे आहे. पण एखादा मोठा पाऊस झाल्यास नाला ओसंडून वाहिल्यास त्यातून हा कचरा पाण्यातून थेट नदीत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा कचरा काढून घेण्याचा आदेश होळकर यांनी महापालिकेला दिला.

त्यानंतर डॉ. पाटील यांनी नेचर इन नीड या संस्थेला तत्काळ बोलवून हा कचरा उठवण्याचे आदेश दिले. त्यानुसार तातडीने त्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीही सिरिंज व बाटल्या गोळा केल्या. नाल्यात पाणी असण्याच्या शक्यतेने हा कचरा नाल्यावरील पुलावर थांबून सिरिंज, बाटल्या असलेले बॉक्स खाली फेकले आहेत. पण नाल्यात पाणी नसल्याने ते वाहून गेले नाही हे सुदैवच ठरले. शहरात अनेक ठिकाणी जैववैद्यकीय कचरा अशाच पद्धतीने अंधारामध्ये फेकून दिला जात असल्याचे वारंवार घडत आहे. नाल्यातील हा प्रकार म्हणजे इतर नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचाच हा प्रकार असल्याने प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी सांगितले. याबाबत शहरातील हॉस्पिटलना जैववैद्यकीय कचरा संबंधित कंत्राटदार कंपनीकडेच देण्याबाबतच्या सूचना प्रशासनाने देण्याचीही मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘देवस्थानचा पैसा पुनर्वसित गावांना द्या’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

कोयना प्रकल्पासाठी ७ हजार ५०० खातेदारांना विस्थापित व्हावे लागले आहे. त्यातील दीड हजार खातेदारांना अजूनही पर्यायी जमिनी मिळाल्या नाहीत. गतवर्षी वंचित राहिलेल्या खातेदारांना पर्यायी जमीन देण्याचे सुतोवाच झाले असले तरी अद्याप कारवाई झाली नाही. गेल्या तीन वर्षांपासून कोयना पुनर्वसनला एक दमडीचाही निधी न मिळाल्यामुळे पाटण तालुक्यातील ५५ प्रकल्पग्रस्त वस्त्यांमधील अनेक विकासकामे खोळंबली आहेत. देवस्थानचे पैसे सरकारी तिजोरीत पडून आहेत. त्याचा तातडीने निर्णय होवून संबंधित पुनर्वसित गावांना ते देण्यात यावेत, अशा आग्रही मागण्या कोयना प्रकल्पग्रस्तांनी केल्या आहेत.

कोयना प्रकल्पाच्या ५३व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून पाटण तालुका कोयना पुनर्वसन समिती व पाटण तालुका मानवी हक्क संरक्षण समितीच्या वतीने रविवारी कोयनानगर येथे कोयना पुनर्वसनाचे प्रलंबीत प्रश्न, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील निर्बंधाबाबत धरणग्रस्त, व्याघ्र प्रकल्पग्रत बाधितांच्या हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विविध मागण्या करण्यात आल्या. १६ मे रोजी कोयना प्रकल्पाला ५३ वर्षें पूर्ण झाली आहेत. पण, प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला नाही. कोयना प्रकल्प वसाहतीमध्ये बांधीव गाळे, मोकळ्या जागांचा अनेक दिवस रखडलेला प्रश्न त्वरित मार्गी लावावा. इको-सेन्सिटीव्ह झोन व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा कोअर व बफर झोन पूर्णपणे रद्द करण्यात यावा आदी प्रमुख मागण्याही परिषदेत करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगली पालिका बरखास्त करा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

सत्ताधारी काँग्रेस सदस्यांमधील अतंर्गत संघर्ष, प्रशासनाची मनमानी यामुळे नगरसेवक भागात फिरू शकत नाहीत. त्यामुळे सरकारने खरोखरीच भ्रष्टाचाराने बरबटलेली सांगली-मिरज-कुपवाड महापालिका बरखास्त करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत केली. सत्तधाऱ्यांचा कारभार आणि वाटचालच महापालिका बरखास्तीच्या दिशेनेच निघाल्याचेही ते म्हणाले.

महापालिकेसमोर अनेक प्रश्न गंभीर बनले आहेत. हरित लवादाने घनकचरा प्रकल्पावरुन महापालिकेला धारेवर धरले आहे. कचरा उठाव होत नाही. भागांत दिवा लावायला पैसा नाही, अशा परिस्थितीत सत्ताधारी मिरज पॅटर्न पद्धतीने महासभा गुंडाळून गैरकाभार करीत आहेत. या वेळी मे महिन्याची महासभा ही सत्ताधारी बहुमत असतानाही घेऊ शकली नाही. सत्ताधारी गटातील अतंर्गत संघषामुळे महापौर तीन महिन्यांपासून बजेट ही देऊ शकत नाहीत. त्यांच्याच गटाचे नगरसेवक कामे होत नाहीत म्हणून राजीनामा देण्याची धमकी देत आहेत. सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनाच महापालिका बरखास्त करायची असल्याने महासभा घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. सत्ताधारी गटाच्या सदस्यांची, पदाधिकाऱ्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला असल्याने याचा फायदा प्रशासनातील अधिकारी घेत आहेत.

जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकास महाआघाडीची सत्ता सोडताना आम्ही ठेकेदारांचे २२ कोटी देणी देऊन महापालिकेच्या तिजोरीत २६ कोटी ७५ लाख ठेव होती. आता काँग्रेसच्या सत्तेने वर्षातच अठ्ठावीस कोटी ठेकेदारांची देणी करून ठेवली, सरकारी निधीही दुसरीकडे वर्ग करावा लागला, असेही सूर्यवंशी म्हणाले.

'एलबीटीची अभय योजना सूडबुद्धीने'

सांगली : एलबीटीबाबत विद्यमान भाजप-शिवसेनेचे सरकार जाणूनबुजून सूडबुद्धीने वागत असल्याची टीका सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे महापौर विवेक कांबळे यांनी केली आहे. राज्यातील बहुतांशी महापालिका या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे आहेत. म्हणूनच राज्य सरकारने एलबीटीसंदर्भात खेळखंडोबा सुरू केला आहे. महापालिका मोडीत काढण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. म्हणूनच व्यापाऱ्यांना थकित एलबीटी भरण्यासाठी 'अभय' योजना आणि ३१ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. या धोरणामुळे सर्वच महापालिका व शहरांचे वाटोळे होणार आहे. सरकारच्या योजनेविरुद्ध न्यायालयाकडे दाद मागण्याचा आमचा विचार आहे, असेही महापौर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिंद धरणातून गाळ काढण्याची मागणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

पाटण तालुक्याच्या दुर्गम व डोंगरी विभागातील ढेबेवाडी खोऱ्याला वरदान ठरलेल्या वांग नदीवरील महिंद धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होवू लागला आहे. नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यावर मर्यादा असल्याने नदीच्या दुतर्फा शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना या पाणीटंचाईची झळ पोहोचू लागली आहे. १८ वर्षांपासून या धरणातील गाळ न काढल्यामुळे धरणात पाणी कमी अन् गाळ जास्त, अशी आवस्था झाली आहे. त्यामुळे तालुक्याच्या लोकप्रतिनिधींसह सरकारी यंत्रणेने जलयुक्त शिवार अभियानातून या धरणातील गाळ काढण्याचे काम करावे, अशी मागणी होत आहे.

सपमारे १८ वर्षांपूर्वी या धरणात पाणी अडवण्यास सुरूवात झाली. ८५ दशलक्ष घनफूट पाणीसाठवण क्षमता असलेल्या या धरणाचे लाभक्षेत्र पाटण तालुक्यातील बनपुरी गावापर्यंत आहे. या धरणामुळे ढेबेवाडी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी संपुष्टात आला आहे. या धरणाच्या लाभक्षेत्रात कृष्णा खोरे विकास महामंडळाने कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले आहेत.

पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने धरण भरल्यानंतर हिवाळ्यातर धरणातील पाणी नदीपात्रात सोडून ते बंधाऱ्यांत अडवून शेती आणि पिण्यासाठी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, धरणातच पाणी कमी असल्याने या बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे.

धरणाची उंची वाढवण्याची गरज

महिंद धरणात गेल्या १८ वर्षांपासून साचलेला गाळ काढून आणि धरणाची उंची थोडी वाढवून धरणातील पाणीसाठा एक टीएमसीपर्यंत वाढवल्यास विभागातील जनतेच्या पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन कारखान्यांवर कारवाई

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदीचे पाणी रेठरे (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना आणि भुईंज (ता. वाई) येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्यांच्या डिस्टिलरीमुळे प्रदूषित होऊन मासे मृत्यूमुखी पडले होते. या बाबत ग्रामस्थांनी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधित ठिकाणाची पाहणी करून अहवाल प्रादेशिक कार्यालयाकडे पाठवला होता. त्यानंतर या दोन्ही कारखान्यांच्या डिस्टलरी बंद करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावले आहेत.

कारखान्यांचा वीज व पाणीपुरवठा ७२ तासांच्या आत बंद करावा, असे आदेशही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पुणे विभागीय अधिकारी ए. एम. देशमाने यांनी दिले आहेत.

रेठरे (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यातील आसवनी प्रकल्पाचे व कारखान्याचे दूषित पाणी खुबी नाल्याद्वारे कृष्णा नदीत मिसळत आहे. त्यामुळे बहे बंधाऱ्याच्याखाली कृष्णा नदीतील मासे मृत्यूमुखी पडले होते. या बाबतची तक्रार स्थानिक ग्रामस्थांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली होती. त्याची त्वर‌ित दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधित ठिकाणाची पाहणी करून त्याचा अहवाल प्रादेशिक कार्यालयाकडे पाठवला होता. त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारखान्याला नोटीस बजावली असून, कृष्णा नदी प्रदूषित केल्याप्रकरणी उत्पादन (डिस्टीलरी) थांबवण्याचे आदेश काढले आहेत. एवढेच नाही तर ७२ तासांच्या आत कारखान्याचा वीज व पाणीपुरवठा बंद करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

भुईंज (ता. वाई) येथील किसनवीर सहकारी साखर कारखान्याबाबत लिंब गोवे (ता. सातारा) येथील ग्रामस्थांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे दूषित पाण्यामुळे मासे मृत्यू झाल्याची तक्रार अकरा मे रोजी दिली होती. या तक्रारीची दखल घेत प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नदीपात्राची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांना कारखान्यातील दूषित पाणी चिंधवली ओढ्याद्वारे कृष्णा नदीमध्ये मिसळून नदीपात्रातील मासे मृत्यूमुखी पडत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे पर्यावरणाला धोका पोहोचत असल्याचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाने तयार केला. या दोन्ही अहवालांवर प्रादेशिक कार्यालयाने किसनवीर सहकारी साखर कारखाना व कृष्णा सहकारी साखर कारखान्यांना जलप्रदूषण प्रतिबंधक नियंत्रण कायद्यानुसार हवा प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायद्यानुसार कारखान्यातील उत्पादन बंद करण्याचे आदेश पुण्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी ए. एम. देशमाने यांनी बजावले आहेत.

कृष्णेत मृत माशांचा खच

सांगली : वाळवा तालुक्यातील रामलिंग बेट परिसरात कृष्णा नदीपात्रात मृत माशांचा खच पडला आहे. पर्यटकांसाठी खास आकर्षण असलेले तेथील बोटिंग बंद पडले आहे. मागील १५ दिवसांपासून नदीपात्रात मळी व रसायनमिश्रित पाणी मिसळत आहे. त्याचा ऊग्र वास परिसरात पसरला आहे. वासाने चक्कर येणे, उलट्या होणे, अंगाला फोड उठणे आदी प्रकार सुरू झाले आहेत. दरम्यान, कराडनजीक टेंभू योजनेसाठी पाणी अडवून ठेवण्यात आले असून, त्यातून थोडे येणारे पाणी ताकारी येथे अडवून तेथून उचलले जात आहे. तथापि रेठरे बुद्रुक ते बोरगावपर्यंत नदीतील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यातच पाणी दूषित होऊन हजारो मासे मृत्यूमुखी पडले आहेत. जलपर्णीचाही विळखा वाढला आहे. या सर्व प्रकारामुळे जलप्रदूषण कमालीचे वाढले आहे. त्यामुळे वरून नवीन ताजे पाणी सोडण्याची मागणी त्या भागातील ग्रामस्थ करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंत्रमाग महामंडळ फायद्यात आणू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

'राज्यातील छोटे यंत्रमागधारक आणि कापूस उत्पादक यांच्यासाठी यंत्रमाग महामंडळाच्या माध्यमातून दिलासा देणारे निर्णय घेतानाच तोट्यातील महामंडळ नफ्यात आणण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू,' अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे नूतन अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. राज्यातील महायुतीच्या सरकारमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळालेल्या महामंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रविकांत तुपकर यांनी इचलकरंजीतील महामंडळाच्या कार्यलयास भेट दिली. यावेळी खासदार राजू शेट्टी उपस्थित होते. तुपकर म्हणाले, 'सातत्याने तोट्यात असलेल्या महामंडळाला नफ्यात आणून ऊर्जितावस्था देण्याचा प्रयत्न करणार असून महामंडळाला उभारी देण्यासाठी जूनच्या पहिल्याच आठवड्यात इचलकरंजी येथे वस्त्रोद्योगाशी निगडीत सर्वच घटकांची एक व्यापक बैठक घेतली जाईल. यंत्रमागधारकापासून ग्राहकांपर्यंत सर्वांनाच न्याय मिळवून देण्याचा पयत्न करू.'

खासदार शेट्टी म्हणाले, 'कापूसपट्ट्यातील अभ्यासू आणि उत्साही कार्यकर्त्याला संधी मिळाली असून त्याचा वस्त्रोद्योगाला निश्चितच लाभ होईल. व्यापारातील मक्तेदारी थांबवून छोट्या छोट्या यंत्रमागधारकांना उभारी देण्यासाठी हे महामंडळ असून तुपकर यांनी संपूर्ण अभ्यास करुन मुळापर्यंत पोहचून महामंडळ नफ्यात आणावे.' राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी म्हणाले, 'महामंडळाकडून छोट्या यंत्रमागधारकांशी निर्मिती कार्यक्रम पूर्ववत सुरु करावा. हातमागासाठी ज्याप्रमाणे सूतगिरण्यांना दोन टक्के सूत निर्मिती करणे बंधनकारक आहे. त्याचपध्दतीने यंत्रमागासाठीही महामंडळाने लेव्ही दरात सूत खरेदी करुन ते यंत्रमागधारकांना पुरवावे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘घोडेश्वर’ जुगाऱ्यांच्या विळख्यात

$
0
0

प्रकाश कारंडे, कागल

पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील भक्तांच्या नवसाला पावणारा अशी ओळख असलेल्या आणि डोंगरमाथ्यावर निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या घोडेश्वर (ता.कागल) मंदिर आणि परिसर दारुडे, प्रेमीयुगुल आणि जुगार लोकांच्या विळख्यात अडकला आहे. दारु जेवणाच्या पार्ट्यांसाठी निसर्गरम्य ठिकाण, प्रेमीयुगलासाठी निवांत ठिकाण आणि जुगार खेळणाऱ्यांसाठी सुरक्षित ठिकाण यामुळे हा परिसर सामान्यांसाठीच असुरक्षित बनला आहे. या साऱ्या प्रकारांमुळे मंदिराचे आणि परिसराचे पावित्र्य धोक्यात आले आहे. परिसरात दारुच्या बाटल्या, तीनपानी जुगाराची पाने, कोंबड्यांच्या पिसांचा खच पडत असल्याने अस्वच्छता वाढली असून परिसराच्या सौंदर्याला बाधा निर्माण झाली आहे.

कुरुकली,सुरुपली आणि बेनिक्रे या तीन गावांच्या सीमेवर आणि डोगंरमाथ्यावर नवसाला पावणाऱ्या या घोडेश्वरांचे मंदिर आहे. अनेक अडचणींवर मात करीत गावकऱ्यांनी भक्तांच्या मदतीतून येथे चोवीस तास पिण्यासाठी पाणी उपलब्ध करुन दिले आहे. विविध सरकारी योजानांतून भक्तांच्या निवासासाठी सुसज्ज अशी पाच खोल्याची तर स्वयंपाक करायला भव्य अशा आर.सी.सी. इमारतीची सोय केली आहे. देवालयाचा एकूण २५ एकराचा परिसर आहे. या परिसरात विविध प्रकारची झाडे लावून निसर्गसौंदर्य वाढवण्याचा प्रयत्न नेहमीच सुरू असतो. मंदिराच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या डोंगरामुळे परिसराचे सौंदर्य अधिकच खुलून येते. त्यामुळे घोडेश्वर मंदीर म्हणजे निवांतपणाचे हवेशीर ठिकाण अशी ओळख बनली आहे. सरकारकडून मंदिराला पर्यटनक्षेत्र म्हणून विकसित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सुरुपली आीण कुरुकली या दोन्ही गावावरुन देवाकडे जाण्यासाठी डांबरी रस्ते बनवले आहेत. मंगळवार,रविवार आणि शुक्रवार असे आठवड्यातील तीन दिवस हजारो भाविक येथे देवदर्शनाला येतात.

मात्र गावापासून एक कि.मी.अंतर, निवांतपणा, निसर्गसौंदर्य आणि पाण्यासह रहाण्याची सोय यामुळे दारुडे,प्रेमीयुगुल आणि जुगार खेळणाऱ्यांच्या विळख्यात सध्या घोडेकर मंदिर आणि परिसर अडकला आहे. रात्री आणि दिवसाही येते पार्ट्या रंगत आहेत. दारुड्यांचा रात्री उशिरापर्यंत धिंगाण सुरु असतो. माळावर सर्वत्र दारुच्या बाटल्यांचा खच साठलेला असतो. याची स्वच्छता करताना येथील पुजाऱ्यांच्या नाकी दम येत येतो. अनेकवेळा दारुड्यांच्यात होणारी भांडणे या पुजाऱ्यांना सोडवावी लागतात.

दारुड्यांचा महिला वर्गाला त्रास होतो. तर मंदिराच्या दोन्ही बाजूला असलेल्या डोंगरात एकांताचे ठिकाण म्हणून प्रेमीयुगुलांची वर्दळ वाढू लागली आहे. तर मुख्य मंदिराच्या मागील बाजूला असलेल्या छोट्या मंदिरात बारमाही तीनपानी जुगाराचा अड्डा चालतो. खेळून खराब झालेली पत्त्याची पाने या देवळाभोवती विखुरलेली आहेत.

दाद मागायची कोणाकडे?

देवस्थान समितीने हे सारे प्रकार थांबवण्यासाठी मंदिरासमोर सूचना फलक लावला आहे, पण त्याचा काहीही उपयोग होत नाही. शिवाय मंदिराचे पुजारीही वेळोवेळी संबंधितांना सूचना, विनंत्या करत असतात पण याचा कोणताच परिणाम या मंडळींवर होत नाही. त्यामुळे आता दाद मागायची तरी कोणाकडे असा प्रश्न पुजाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरोळ तालुक्यात वाळूची लूट सुरूच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

शिरोळ तालुक्यात कृष्णा नदीच्या पात्रातून विनापरवाना बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. सरकारचा कोट्यवधी रूपयांचा महसूल बुडवून सुरू असणाऱ्या या वाळू उपशाकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे. वाळू तस्करांना चाप लावण्यासाठी जिल्हाधिकारी अमित सैनी व प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होवू लागली आहे.

शिरोळ तालुक्यात वाळू तस्करांनी सरकारी नियम धाब्यावर बसवून विनापरवाना वाळू उपसा सुरू केला आहे. खुलेआम वाळू उपसा सुरू असताना महसूल विभागाचे अधिकारी गप्प का? वाळू तस्करांवर तहसिलदार सचिन गिरी कारवाई का करीत नाहीत? असा प्रश्नही नागरिकांतून उपस्थित होत आहे. वाळू माफियांवर कारवाईच होत नसल्याने महसूल विभागाच्या भूमिकेचा 'अर्थ' चर्चेचा ठरत आहे. या तालुक्यातील वाळू तस्करांना चाप लावण्यासाठी जिल्हाधिकारी व प्रांताधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

तालुक्यातील उदगांव, चिंचवाड, घालवाड, कुटवाड, औरवाड, गौरवाड, कवठेगुलंद, शेडशाळ, बुबनाळ, बस्तवाड, अकिवाट, राजापूर, खिद्रापूर या गावांच्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत वाळू उपसा केला जात आहे. काही ठिकाणी रात्रीच्यावेळी वाळू उपसा होतो. चिंचवाड येथे तर एका वाळू माफियाने ग्राम पाणी पुरवठ्याच्या जॅकवेल नजीकच वाळू उपशास सुरूवात केली आहे. सरकारला एक रूपयाही न भरता या ठिकाणी वाळू काढली जात आहे. याकडे तलाठी, मंडल अधिकारी, तहसीलदार यांचे दुर्लक्ष होत असून वाळू तस्करांवर कारवाई केली जात नसल्याने हा विषय चर्चेचा ठरत आहे. उदगांव येथेही असाच प्रकार सुरू आहे.

नियम धाब्यावर

सरकारी नियम धाब्यावर बसवून राजापूर येथे तीन ठिकाणी वाळू तस्करी होत आहे. खिद्रापूर येथेही तीन ठिकाणी नदीच्या पात्रातून वाळू काढली जात आहे. शिरोळ पंचायत समितीच्या एका माजी सभापतीच्या पुढाकाराने या ठिकाणी वाळू उपसा होत आहे. या ठिकाणच्या वाळू आवट्या उध्दवस्त कराव्यात अन्यथा आंदोलन छेडण्याचा पवित्रा नागरीकांनी घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बॅग स्कॅनरचा प्रस्ताव रखडलेलाच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेच्या दृष्टिने महत्वाचा असलेला बॅगस्कॅ​नर निविदेचा प्रस्ताव गेल्या ११ महिन्यांपासून राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाकडे निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने भाडेतत्वावर मागविलेल्या दोन बॅगस्कॅनरच्या नि​विदेला केवळ एकाच कंपनीने प्रतिसाद दिला. त्यामुळे यासंदर्भातील निर्णय घेण्याचा प्रस्ताव देवस्थानतर्फे विधी व न्याय खात्याकडे पाठवून येत्या ऑगस्टमध्ये एक वर्ष पूर्ण होत आहे. अद्याप बॅगस्कॅनरबाबत संबंधित खात्याने कोणताही निर्णय न घेतल्याने नव्याने निविदा काढायची की आलेल्या निविदेला मंजुरी द्यायची या संभ्रमात देवस्थान व्यवस्थापन अडकले आहे.

अंबाबाई मंदिरात येणाऱ्या पर्यटक भाविकांच्या बॅग ठेवण्यासाठी लॉकर सुविधा देण्यात आली होती. मात्र मोठ्या आकाराच्या बॅग आणि लॉकरचा आकार यामध्ये विसंगती असल्यामुळे या लॉकरचा पर्यटक भाविकांना लाभ घेता येत नव्हता. त्यामुळे प्रवासी बॅगांसह पर्यटक भाविकांकडून मंदिर प्रवेश केला जात होता. मंदिराच्या सुरक्षिततेच्यादृष्टिने बॅगसह मंदिराच्या आवारात प्रवेश देणे धोकादायक ठरू शकते असा मुद्दा राज्याच्यागृहखात्याने उपस्थित केला. तसेच मध्यंतरी मंदिरावरील हल्ल्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन मंदिरांमध्ये बॅगस्कॅनर यंत्रणा कार्यान्वित करण्याची सूचनाही सुरक्षाखात्यामार्फत देवस्थान ​समितीला देण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीने २६ जून २०१४ रोजी तीन वर्षासाठी भाडेतत्वावर बॅगस्कॅनरसाठी ऑनलाइन निविदा मागवली. यासाठी निविदा फी एक हजार रूपये तर अनामत रक्कम एक लाख रूपये नमूद करण्यात आले आहे. पुणे येथील भारत इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कंपनीने यासाठी निविदा भरली नाही. किमान तीन निविदा येणे बंधनकारक असल्यामुळे बॅगस्कॅनर पुरवण्याचे काम कुणाला द्यायचे याबाबत देवस्थान समिती स्थानिक पातळीवर निर्णय घेऊ शकत नव्हती. परिणामी देवस्थान समितीमार्फत बॅगस्कॅनर निविदांबाबतच्या निर्णयाचा प्रस्ताव राज्याच्या विधी व न्याय खात्याकडे पाठवण्यात आला आहे.

मंदिर सुरक्षेसाठी बॅगस्कॅनर यंत्रणा कार्यान्वित होणे आवश्यक आहे. याबाबत देवस्थानतर्फे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. नव्याने निविदा प्रसिद्ध करायची असेल तर त्यासाठी विधी व न्याय विभागाची परवानगी आवश्यक आहे. त्यामुळे तातडीने विधी व न्याय विभागाकडून याबाबत कार्यवाही होणे अपेक्षित आहे.

- एस. एस. साळवी, सहसचिव, देवस्थान समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जमीन विक्रीप्रकरणी लिपिकाला अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पन्हाळा

पन्हाळा तालुक्यातील जमिनी फसवून विकल्याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिक सतीश गणपतराव सुर्यवंशी याला रविवारी पन्हाळ्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक राजू तिबिले यांनी कोल्हापूर येथे अटक केली.

याबाबत पन्हाळा पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, आंबवडे येथील गट क्रमांक ३५० आणि गटक्रमांक ३८२ अशा दोन जमीनींमधील ठराविक भाग आरोपी सतीश सुर्यवंशी यांनी वटमुखत्यार पत्राआधारे एक कोटी तीन लाख ५० हजार रुपयांना कोल्हापूर येथील किशोर माणिकचंद ओसवाल यांना विकला. या व्यवहारातून सुर्यवंशी याने ओसवाल यांच्याकडून आजपर्यंत १८ लाख ५० हजार रुपये रोख घेतले. त्यांना ही जमीन खरेदी करून न देता नोटरी दस्त करून देऊन ते पैसे स्वत: वापरले. तसेच या जमिनी ओसवाल यांना न विकता त्या परस्पर दुसऱ्यांना १५ लाख रुपयांना विकली. याबाबतची फिर्याद पाच जुलै रोजी ओसवाल यांनी पोलिसांत दिली होती. या गुन्ह्यात अटक चुकवण्याकरीता आरोपीने जिल्हा सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता, तो अर्ज कोर्टाने सात मे रोजी फेटाळला.

सुर्यवंशी जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक असून नोकरीच्या माध्यमातून त्याने केलेल्या भ्रष्टाचारासंबंधी स्पेशल कोर्ट इचलकरंजी यांच्या न्यायालयात २००८ साली केस दाखल करण्यात आली होती. त्याचा निकाल ३१ मार्च रोजी लागला असून आरोपीस दोन वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड व दंड न दिल्यास सहा महिने पुन्हा सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली असून आरोपीने त्याविरुध्द मुंबई उच्च न्यायालयात अपिल केले आहे. त्याचा निकाल प्रलंबित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुटखा, पानमसाल्यावर धडक कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अन्न व औषध प्रशासनाच्या कोल्हापूर कार्यालयाने आठवडाभरात कोल्हापूर शहर, हातकणंगले, किणी टोल नाका परिसर तसेच, शिवाजी उद्यमनगर परिसरात अनेक ठिकाणी छापे टाकून गुटखा, पान मसाला व सुगंधी तंबाखू या सरकारने प्रतिबंधित केलेल्या पदार्थांचा साठा जप्त केला.

११ ते १३ मे या कालावधीत दहा ठिकाणी छापे टाकून २४ हजार, ७९० रुपयांचा तर १५ मे रोजी शिवाजी उद्यमनगर परिसरात दोन ठिकाणी छापे टाकून १६ हजार, १७७ रुपयांचा गुटखा, पान मसाला व सुगंधी तंबाखू या सरकारने प्रतिबंधित केलेल्या पदार्थांचा साठा जप्त केला. सहायक आयुक्त संपत देशमुख व सुकुमार चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शहरातील ताराबाई रोड, सरस्वती टॉकीज परिसरात छापे टाकले. लक्ष्मी पान शॉपचा मालक जमीर दिलावर मुजावर याच्याकडून ३६२५ रुपयांचा, नेहा पोहे सेंटरचा मालक हेमंत बळवंत कडते यांच्याकडून २०२ रुपयांचा, रवीराज पान शॉपचा मालक अजित कुमार यादव याच्याकडून ५२८ रुपयांचा व सरस्वती पान शॉपचा मालक अशोक शामराव भोसले यांच्याकउून १६४ रुपयांचा प्रतिबंधीत पदार्थांचा साठा जप्त केला. त्यांच्याविरुद्ध जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यांच्याविरूद्ध राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिबंधीत पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध यापुढे अशाच प्रकारे धडक कारवाई सुरु राहणार असल्याचे कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता मुश्रीफही टोलविरोधी आंदोलनात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सत्ता बदलली की समीकरणे बदलतात असे म्हटले जाते. टोल आंदोलनावरून सध्या त्याची प्रचिती शहरवासीय घेत आहेत. गेली पाच वर्षे टोल आंदोलनात सक्रिय असलेल्या भाजप सेनेचे नेते आता टोल प्रश्नी व्यवहार्य तोडगा काढण्याच्या प्रयत्नात आहेत. दुसरीकडे काँग्रेस आघाडीच्या मंत्रीमंडळात असताना सातत्याने सरकारची बाजू मांडणारे, माजी मंत्री आणि आमदार हसन मुश्रीफ आता टोल विरोधी आंदोलनात सहभागी होणार आहेत.

कोल्हापूर पासिंगच्या वाहनांना टोलमधून सवलती देण्याच्या पर्यायाचा सरकार विचार करत आहे. मात्र टोल विरोधी कृती समितीने संपूर्ण टोलमुक्तीसाठी लढा सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महिन्यात कोल्हापूर दौऱ्यावर येणार असून, त्यांना टोल मुक्तीचे स्मरण करून देण्यात येईल असे टोल विरोधी कृती समितीने म्हटले आहे. टोल रद्दच्या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी कृती समितीने मंगळवारी (ता.१९) कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिर येथे सायंकाळी चार वाजता बैठक होणार आहे.

बैठकीस सर्वच राजकीय पक्षांना आमंत्रित करून ताकत दाखविण्याची तयारी कृती समिती करत आहे. कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे, बाबा पार्टे, अशोक पोवार, गणी आजरेकर, रमेश मोरे आदींनी मुश्रीफ यांची भेट घेतली. मुश्रीफ यांनी 'तुम्ही हाक द्या, मी येतो' असे सांगितल्याचे साळोखे यांनी सांगितले. आंदोलनात दोन्ही काँग्रेस, सेना, भाजपसह तालीम संस्था, सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन कृती समितीचे निमंत्रक निवास साळाखे यांनी केले आहे.

खासदार महाडिकांचे घुमजाव ?

एमएच ०९ वाहनांता टोलमधून सवलत हा या प्रश्नी व्यवहार्य तोडगा असल्याचे वक्तव्य खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी केले होते. या संदर्भात कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महाडिक यांची भेट घेतली. त्यांना त्या विधानासंदर्भात विचारणा केली असता, महाडिक यांनी 'मी तसे बोललेलो नाही' असे सांगत घुमजाव केले. टोलविरोधी आंदोलनात मी कृती समितीसोबत आहे असे म्हटल्याचे त्यांनी निवास साळोखे यांना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हळदीत पत्नीपाठोपाठ पतीचीही आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हळदी (ता. करवीर) येथे पती पत्नीने गळफास लावून आत्महत्या केली. या दुर्दर्वी घटनेतील पती-पत्नीचे नाव संगीता महादेव जाधव (वय १९) व महादेव शिवाजी जाधव (वय २८, रा. धराडी, ता. परभणी, सध्या रा. हळदी) असे आहे. करवीर पोलिस ठाण्यात आत्महत्येची नोंद आहे.

परभणी येथील संगीता व महादेव जाधव यांचा २७ फेब्रुवारी २०१५ मध्ये विवाह झाला. महादेव यांचे हळदी येथे कापड विक्रीचे दुकान होते. ते भाड्याने हळदीत राहत होते. शुक्रवारी (ता. १५ रोजी) रात्री अकरा वाजता संगीताने राहत्या घरी साडीने गळफास लावून आत्महत्या केली. पती महादेव याला पत्नी संगीताने आत्महत्या केल्याचे लक्षात आल्यावर तो घाबरून घरातून निघून गेला. संगीताचे वडील सोपान भागोजी शेरकर (रा. गांधीनगर) यांनी मुलीचा मृतेदह ताब्यात घेतला.

त्यांनी शनिवारी (ता. १६) महादेव, त्याचे वडील व आईच्या विरोधात हुंड्यासाठी मुलीचा छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर संगीताचा मृतदेह सासरीच नेण्यात आला. दरम्यान, रविवारी सकाळी सहाच्या सुमारास महादेवने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांधीनगरात अद्याप ‘जैसे थे’ स्थिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गांधीनगरमध्ये राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याबाबत निर्माण झालेला वाद रविवार अखेर कायम राहिला. व्यापाऱ्यांनी प्रथम बंद मागे घेतल्यास योग्य पद्धतीने चर्चा केली जाईल, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने प्रशासनाला कळवले आहे. पण, सिंधी समाजाने त्याबाबत काही निर्णय घेतला नाही. उद्यापासून तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

सोमवारी (११ मे) पहाटे काहींनी गांधीनगरामध्ये सिरू चौकातील वागद्रस्त जागेवर जबरदस्तीने राष्ट्रपुरुषांचा पुतळा बसवला होता. त्यानंतर सिंधी समाजाकडून तो पुतळा हटविण्यासाठी बंद पुकारण्यात आला. सोमवारी या प्रकाराला आठवडा पूर्ण होत असून दररोज पन्नास कोटी रुपयांची उलाढाल असलेली बाजारपेठ कडकडीत बंद रहात असल्याने कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे. व्यापाऱ्यांशिवाय ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांचेही प्रचंड हाल सुरु आहेत. या वादावर निर्णय घेण्यासाठी लोकप्रतिनिधींनी दोन्ही समाजाच्या नेत्यांशी चर्चा केली. मात्र रविवारपर्यंत त्यावर तोडगा निघाला नाही. दरम्यान, आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे यांनी प्रांताधिकारी प्रशांत पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यांनी प्रथम व्यापाऱ्यांनी बंद मागे घेऊन सोहार्दाचे वातावरण राखावे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण कररू नये असे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

अनेक दिवसांपासून मागणी केल्या जात असलेल्या जागेत पुतळा बसवण्यास होत असलेला विरोध खेदाची बाब आहे. यातून जातीय द्वेष निर्माण होत आहे. हा विरोध खपवून घेणर नसून त्याच जागेवर आंबेडकरांचा पुतळा सुशोभीत करावा अशी मागणी राहिल. बंद मागे न घेतल्यास आंबेडकरी जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशाराही त्यामध्ये दिला आहे. प्रांताधिकारी पाटील यांनी सिंधी समाजाशीही चर्चा केली. त्यानंतर बंद मागे घेतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. सिंधी समाजाने मात्र याबाबत निर्णय घेतलेला नव्हता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकसहभागातून रस्ते विकास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रस्त्यांच्या बांधणीवर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च पडतो. रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करावी लागते. परिणामी महापालिकेच्या आर्थिक तिजोरीवर ताण पडतो. यावर प्रशासनाने नामी शक्कल लढविताना लोकसहभाग आणि खासगी विकसकामार्फत रस्ते तयार करून घेण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. ५०० मीटर लांबीचा रस्ता तयार करा, आणि नाव द्या असा प्रस्ताव असून याकरिता दोघांनी तयारी दाखवली आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय मंजूर झाला की, खासगी विकसक आ​णि लोकसहभागातून रस्ते निर्मितीचा मार्ग खुला होणार आहे.

दुकानगाळ्यांची भाडेवाढ

महापालिकेच्या मालकीच्या विविध मार्केटमधील दुकानगाळे भाड्याने दिली आहेत. शहरातील अशा दुकानगाळ्यांची संख्या २१०० हून अ​धिक आहे. काही दुकानदारांचा भाडे करार संपला आहे. पूर्वीच्या करारानुसार भाडे आकारणी केली जात आहे. महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नात भर पडावी याकरिता महापालिकेच्या सर्व मार्केटमधील गाळेधारकांना नव्याने मुदतवाढ देताना सध्या असलेल्या भाड्याच्या तीन पट भाडे आकारणीचा प्रस्ताव आहे. खुल्या जागे भाडेधारकांनाही याच दराने भाडे आकारणी करून वीस वर्षाचा करार करण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन आहे.

नव्याने पार्किंग पॉलिसी

कोल्हापुरात भाविक आणि पर्यटकांची संख्या वाढत आहे. सुट्टीच्या दिवशी शहरातील वाहतुकीवर प्रचंड तणाव पडतो. वाहतुकीची कोंडी होते. वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी महापालिका नव्याने पार्किंग पॉलिसी आखत आहे. शहरातील तेरा ठिकाणी पे अँड पार्कसाठी निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्याचबरोबर नव्याने जागा निश्चित करण्याचा विचार आहे.

अंबाबाई मंदिर, शाहू समाधी स्थळ आराखड्यात फेरबदल

अंबाबाई मंदिर परिसराचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. भविष्यकाळाचा विचार करून मंदिर परिसरातील महाद्वार रोड, जोतिबा रोड, सरलष्कर भवन, विद्यापीठ हायस्कूल व महालक्ष्मी बँक परिसरातील जागा लागणार आहे. त्या अनुषंगाने मुंबई येथील कंपनी सर्व्हे करत आहे. मंदिर परिसर विकास आराखड्याकरिता या परिसरातील जागा राखीव ठेवण्याचा प्रस्ताव नगर रचना विभागाने तयार केला आहे. राजर्षी शाहू समाधी स्थळ विकसित करण्यात येणार आहे. महापालिकेने याकरिता यापूर्वी सुमारे ७० लाख रुपयांची तरतूद केली आहे. स्मारकासाठी जागा ग्रीन झोनमधून वगळून सार्वजनिक, निम सार्वजनिक विभागात समाविष्ठ करण्याबाबतचा प्रस्ताव आहे. समाधी स्थळ विकासासह परिसरातील जागेचे सुशोभिकरण, बगिचा करण्याचे प्रस्तावित आहे. या संदर्भात फेरबदल करण्यात आलेला प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या सभेसमोर आहे.

नगरोत्थान योजनेतून नाले सफाई

पंचगंगा नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. कसबा बावडा येथे ७६ एमएलडी क्षमतेचा एसटीपी प्रकल्प साकारल्यानंतर शहरातील बारा नाले अडविण्याचा व त्यातील सांडपाणी कसबा बावडा येथील एसटीपी प्रकल्पाकडे वळविण्याचे प्रस्तावित आहे. याकरिता सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेतंर्गत मंजुरी मिळावी असा प्रस्ताव आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘भ्रष्टाचाऱ्यांच्या नाड्या आमच्या हातात’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे थकबाकीदार असलेल्या आणि बँकेवर निवडून आलेल्या संचालकांनी आता सर्व काही सुरळीत झाले अशा भावनेत वावरू नये. न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांना काही कालावधीसाठी दिलासा मिळाला आहे. अद्याप त्यांचा धोका टळलेला नाही. त्यांच्या नाड्या आमच्या हातात आहेत,' असा टोला सहकार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नूतन संचालकांना लगावला आहे. येथील शासकीय विश्रामधामावर ते पत्रकारांशी बोलत होते.

सहकारमंत्री पाटील म्हणाले, 'जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये निवडून आलेले संचालक एकमेकांवर तोंडसुख घेत आहेत. बँक अडचणीत आणल्याप्रकरणी त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्याला न्यायालयाने स्थगिती दिली असली तरी सहकारमंत्री म्हणून माझ्याकडे या प्रकरणाची चौकशी सुरूच आहे. न्यायालयाच्या पुढील कारवाईनंतर त्यांची अपात्रता सिद्ध होऊ शकते. त्यामुळे आता सर्व प्रकरण मिटले, आपल्याला काही काळजी नाही असा आत्मविश्वास त्यांनी बाळगू नये. राज्य बँकेच्या संचालकांचीही चौकशी सुरू असून त्यांच्यावरही जबाबदारी निश्चित होणार आहे. ८८ अ अंतर्गत त्यांच्यावरही कारवाई करून त्यांनाही निवडणुकीसाठी अपात्र ठरविले जाऊ शकते. त्यामुळे चुकीचे काम केलेल्या कोणाचीही सुटका होणार नाही, हे निश्चित आहे.'

मंत्री पाटील म्हणाले, 'सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत भाजपला उपाध्यक्षपद मिळत आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये काही संचालक थेट निवडून आले आहेत. गोकुळमध्ये बाबा देसाई यांची तज्ज्ञ संचालक म्हणून निवड निश्चित झाली आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रातही भाजपने शिरकाव केला आहे. जिल्हा बँकेमध्ये सेना-भाजप आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र लढले असते तर वेगळे चित्र पहायला मिळाले असते. आता ही चूक सुधारू. मार्केट कमिटीत सेना-भाजप एकत्र लढेल.

मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार

'राज्य आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार करण्यात येणार आहे' असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन दौऱ्यावरून आल्यानंतर लगेचच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार अपेक्षित आहे. त्यात राज्याला एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. मित्रपक्षांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे त्यांनाही मंत्रिमंडळात सहभागी करून घेतले जाणार आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस असल्याचे भासवून बलात्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पोलिस असल्याचे भासवून विवाहितेवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला पीडित महिलेच्या नातेवाईकांनी बेदम चोप देऊन करवीर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी संशयित नंदकुमार दिनकर पाटील (वय ३७ रा. कोथळी, ता. करवीर) याला अटक केली. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता बलात्काराचा प्रकार घडला.

याबाबत पोलिस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी सांगितले की, पीडित महिला मोपेडवरून तर तिचा पती मोटारसायकलवरून शुक्रवारी सायंकाळी करवीर तालुक्यातील वाशी, कोथळीमार्गे म्हालसवडेत नातेवाईकांकडे निघाले होते. रात्री साडेआठ वाजता त्यांनी लघुशंकेसाठी कोथळीच्या पाणंदीजवळ वाहने थांबवली. संबंधित महिला तेथे ऊसाच्या शेतात लघुशंकेसाठी गेली असता नंदकुमार पाटील आणि त्याचे चार मित्र दोन मोटारसायकलवरून पाणंदीजवळ आले. नंदुकमारने पीडीत महिलेच्या पतीला बेदम मारहाण करून रस्त्याकडेला फेकून दिले. नंतर ऊसाच्या फडात जाऊन नंदकुमारने संबंधित महिलेला पकडले. यावेळी या महिलेने नंदकुमारच्या मित्राला ओळखले. या महिलेने, 'मी तुम्हाला ओळखते. तुम्ही वडाप ड्रायव्हर आहात. मला सोडा' अशी विनंती केली. या मित्रांनी यावेळी नंदकुमारला अडवले. मात्र, त्याने महिलेवर बलात्कार केला. पीडित महिलेने पतीला या प्रकाराची महिती दिली. मोपेड तेथेच सोडून पीडित महिला, पतीसोबत मोटारसायकलने घरी गेले.

दरम्यान, नंदकुमारने दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी घटनास्थळावरून मोपेडचा नंबर घेतला. आरटीओशी संपर्क साधून संबधित वाहन कोणाचे आहे याची माहिती घेतली. पीडित महिलेच्या आईची मोपेड असल्याने नंदकुमार त्यांच्या घरी गेला. या गाडीचा अॅक्सिडेंट झाला असून केस मिटवण्यासाठी एक हजार रुपयांची मागणी केली. पीडित महिलेच्या आईने नंदकुमारला एक हजार रुपये दिले. नंतर त्यांनी मुलीला फोन करून अॅक्सिडेंटबाबत विचारल्यानंतर बलात्काराची घटना उघड झाली. पैसे मागितलेली व्यक्ती आणि बलात्कार करणारा एकच असल्याचे लक्षात आल्यावर पीडित महिलेच्या नातेवाईकांनी संशयितांचा शोध सुरू केला. रंकाळावेश परिसरात नंदकुमारच्या वडाप चालक मित्राला नातेवाईकांनी ताब्यात घेतले. तेथून हळदी गावातून नंदकुमारला ताब्यात घेतले. तेथून नंदकुमारला करवीर पोलिस ठाण्यापर्यंत बेदम मारहाण करत जमावाने पोलिसांच्या ताब्यात दिले. पीडित महिलेच्या फिर्यादीनंतर पोलिस निरीक्षक ढोमे यांनी नंदकुमारला अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हापूस आंब्याचा गोडवा वाढला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रत्नागिरी हापूससह पायरी, तोतापुरी, लालबाग आणि मद्रास हापूस आंब्याची आवक वाढल्याने दरात डझनामागे शंभर ते दीडशे रुपयांची घट झाली आहे. पेटीचा दर पाचशे ते सातशे रुपयांनी कमी झाला आहे. सर्वसामान्यांच्या आवाक्यात हापूसचे दर आल्याने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. रत्नागिरी हापूसचा डझनाचा भाव २०० ते ४०० रुपये झाल्यामुळे आंबा चाखण्याची संधी मिळत आहे. या आंब्याचे दर कमी झाल्याने पायरी, लालबाग व मद्रास हापूस आंब्याचे दर यापेक्षाही कमी झाले आहेत.

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मार्चपासून रत्नागिरी हापूस आंब्याची आवक सुरू झाली. मार्चपासून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ५०० ते ७०० पेट्यांची आवक होत होती. यात दुप्पटीने वाढ होऊन सध्या समितीमध्ये दररोज १५०० ते १८०० पेट्यांची तर सरासरी तीन हजार बॉक्सची आवक होऊ लागली आहे. काही विक्रेते स्वतंत्र आंब्याची खरेदी करत असल्याने शहरातील सर्वच बाजारपेठांमध्ये आंब्याची रेलचेल झाली आहे. हापूससोबत कर्नाटक व मद्रास येथून पायरी, रायवळ, लालबाग आंब्याची आवक झाल्याने दर कमी झाले आहेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सहा डझन पेटीचा दर १२०० ते १६०० रुपये होता. सध्या हाच दर १००० ते १४०० रुपयांपर्यंत आला आहे. अडीच डझन बॉक्सचा दर ८०० ते १००० रुपये होता. यात तीनशे रुपयांची घट झाली आहे.

अननसची आवक वाढली

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अननसची किरकोळ आवक होते. केरळवरून होणारी आवक निपाणी बाजार समितीमध्ये होत असते. काही विक्रेते अननसची खरेदी निपाणीतून करतात. या विक्रेत्यांनी शहरातील मुख्य बाजारपेठेसह महत्त्वाच्या चौकामध्ये अननस विक्रीचे स्टॉल लावले आहेत. दहा रुपयांपासून ६० रुपयांपर्यंत एक नगाची किमंत असल्याने खरेदीसाठी ग्राहक पसंती देत आहेत.

रानमेव्याचा दर वाढला

मे महिन्याच्या सुरुवातीपासून रानमेव्याची आवक होते. ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांनी वर्दळीच्या ठिकाणी रानमेव्याचे स्टॉल लावले आहेत. चौकाचौकात असलेला रानमेवा खरेदीकडे बच्चे कंपनीने गर्दी केली आहे. मात्र, रानमेव्याच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. जांभळाचा दर १६० रुपये तर करवंदाचा किलोचा दर ८० रुपयांपर्यंत झाला आहे.

पालेभाज्यांची दरवाढ

आवक आणि मागणीत तफावत नसल्याने सर्वच फळभाज्यांचे दर स्थिर राहिले आहेत. वांगी, दोडका, गवार, भेंडी, कारली, टोमॅटो आदी भाज्यांचे सरासरी दर ४० रुपयांवर गेल्या महिन्यापासून स्थिर राहिले आहेत. कांद्याच्या दरामध्ये तीन ते चार रुपयांची वाढ झाली आहे. चटणीसाठी लसूणच्या मागणीमध्ये वाढ झाली असली, तरी दर मात्र किलोमागे दहा रुपयांनी कमी झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंदलगावच्या खुनाचे गूढ कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कंदलगाव-गिरगाव रस्त्यावर शनिवारी आढळलेला मृतदेह पुण्यातील फरारी गुंड लहू ढकेणे याचाच आहे, अशी खात्री त्याच्या नातेवाईकांनी केली असली तरी पोलिसांनी मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसल्याचे सांगितले. दरम्यान, मृतदेहाच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीतील हस्ताक्षर मात्र लहू ढेकणे याचे असल्याचे हस्ताक्षर तज्ज्ञांच्या तपासणीत स्पष्ट झाले.

शनिवारी सकाळी कंदलगावनजीक निर्जन माळावर दोन्ही हात तोडलेल्या आणि शीर धडावेगळे केलेला मृतदेह आढळला. मृतदेहाच्या पँटच्या खिशात पुण्यातील गुंड लहू ढेकणे याच्या मतदान ओळखपत्राची झेरॉक्स प्रत व त्याच्या नावाची चिठ्ठी सापडली. दरम्यान, शनिवारी रात्री पुण्यातील लहू ढेकणे याचा भाऊ अंकुश कोल्हापुरात आला. त्याने भावाचा मृतदेह असल्याचे सांगितले. मात्र पोलिसांनी त्यावर विश्वास ठेवलेला नाही. खून करताना हल्लेखोरांनी दोन्ही हात कापून, शीर तोडून पुरावा मागे ठेवलेला नाही. मग, खिशातील मतदान ओळखपत्राची झेरॉक्स प्रत असलेला पुरावा नष्ट का केला नाही? असा प्रश्न पोलिसांचा आहे. ढेकणे याच्यावर सातारा जिल्ह्यातील संकेत भांडे आणि पुणे जिल्ह्यातील नीरा येथील अमित सोनवणे यांच्या खुनाचा आरोप आहे.

संकेत भांडे खून प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. ढेकणे कळंबा कारागृहात शिक्षा भोगत होता. ऑक्टोबर २०१४ मध्ये तो पॅरोलवर सुटला. नंतर फरारी होता. कारागृहात त्याचा अन्य गुंडाशी संपर्क झाला होता का? याचा पोलिस तपास करत आहेत.

पॅरोलनंतर तो कोल्हापूर परिसरात वावरत होता का? याचाही तपास सुरू आहे. मृतदेह ढेकणे याचा असेल, तर त्याचा खून कोणत्या कारणावरून झाला? याबाबत पोलिस तपास करत आहेत. तपासासाठी पथके जिल्ह्याबाहेरही गेली आहेत. दरम्यान, आणखी तीन दिवस मृतदेह ठेवण्यात येणार आहे. पोलिसांनी मृतदेहाच्या पायाचे ठसे घेतले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ना बगीचा, ना क्रीडांगण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मध्यमवर्गीय व नोकरदार वर्गांची लोकवस्ती, उपनगरात दरवर्षी पडणारी भर आणि शहरालगचा भाग म्हणून बाबा जरगनगर प्रभागाचा वाढ होत आहे. या प्रभागात मात्र मुलांसाठी क्रीडांगणाची सुविधा नाही. परिसरात बगिचा नाही. यंग सिनीअर्ससाठी विरंगुळा केंद्र नाही. प्रभागात खुल्या जागा आहेत,पण बागा आणि क्रीडांगणासाठी नियोजन झाले नाही. नगरोत्थान योजना, नगरसेवकांचा ऐच्छिक निधी या माध्यमातून अंतर्गत रस्ते, गटारीची कामे झाली आहेत. काही भागात नियमित पाणी पुरवठा होतो तर काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा ठरलेला आहे.

मंडलिक पार्क, बळवंतनगर, इंदिरा घरकुल योजना, रामानंदनगर, दत्तात्रय कॉलनी, पोस्टल कॉलनी, स्वामी समर्थ नगर, दत्तमंदिर, गुरुकृपा कॉलनी या भागाचा प्रभागात समावेश आहे. रामानंद नगरमधील हरि मंदिर परिसरात ड्रेनेज सुविधा नाही. काही ठिकाणी ड्रेनेज लाइनला कनेक्शन जोडले नाहीत. गटारीची कामे अपूर्ण आहेत. जाधव पार्क, गुरुप्रसाद कॉलनीतही सारख्या समस्या आहेत. भागात गटारी केल्या नाहीत. ड्रेनेज लाइनचा पत्ता नाही. गुरुप्रसाद कॉलनीत एका बाजूला गटारी केल्या आहेत. प्रभागात अंतर्गत रस्ते करण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे. रामानंदनगरसह काही भागात एक दिवसा आड पाणी येते. जगरनगर भागात ठिकठिकाणी खुल्या जागा आहेत. तेथे परिसरासाठी बाग, क्रीडांगण करणे गरजेचे आहे. काही भागात कचरा उठाव केला जात नाही. घंटागाडी भागात रोज फिरकत नाही अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत.

रखडलेली कामे पूर्णत्वास

ज्योतिर्लिंग कॉलनी ते जरगनगर कमान या रस्त्यावरील पुलाचे काम अनेक महिने रखडले होते. नागरिकांनी या रस्त्यासाठी आंदोलने केली. महापालिकेच्या माध्यमातून पुलाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. दोन्ही उपनगरांना जोडणारा हा पूल तयार झाल्यामुळे नागरिकांची सोय झाली. वाढत्या लोकसंख्येचा विचार आणि उपनगरातील पाणी पुरवठ्याचा विचार करून जरगनगर भागात पाण्याची टाकी बांधण्याची मागणी होती. महापालिकेने तब्बल चार लाख रुपये खर्चून १५ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधली आहे. नगरोत्थान योजनेतून निर्माण चौक ते जरगनगर शेवटचा बस स्टॉपपर्यंतचा रस्ता तयार केला आहे.

प्रभागातील अंतर्गत रस्ते, पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध केल्या आहेत. प्रभाग टँकरमुक्त करण्यात यश ​मिळवले आहे. प्रभागातील रस्ते, गटर्सची ९५ टक्के कामे पूर्ण केली आहेत. रामानंदनगर परिसरात पावसाळ्यात नागरिकांच्या घरी पाणी जायचे. रामानंदनगर ओढ्याशेजारील संरक्षक भिंत बांधली आहे. मानधनातून काही ठिकाणी गटारी तयार केल्या आहेत.

- सुनील पाटील, नगरसेवक

येथे भाजी मार्केट होणे गरजेचे आहे. प्रभागात रस्ते झाले आहेत पण अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाचे आहेत. असंख्य ठिकाणी ड्रेनेज कनेक्शनच्या अडचणी आहेत.े महापालिकेचे कर्मचारी अभावानेच आढळतात. गेल्या पाच वर्षात पाण्याची सोय झाली

- राजनंदिनी पतकी, जरगनगर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images