Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘अहवालाशिवाय टोलचा निर्णय नाही’

0
0



कोल्हापूर : 'पुर्नमूल्यांकन अहवालाशिवाय कोल्हापूरच्या टोलबाबत निर्णय घेणार नाही' असे सांगत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी घुमजाव केले. 'सरकारने राज्यातील ५३ टोलनाके बंद केले. त्याच्यापेक्षा जास्त रक्कम कोल्हापूरला द्यावी लागेल. एका जिल्ह्याला एवढी रक्कम देणे शक्य नाही' असे पालकमंत्री म्हणाले.

पालकमंत्री पाटील यांनी गुरुवारी, टोलविरोधी कृती समितीसोबतच्या बैठकीत कोल्हापूर पासिंगच्या वाहनांना टोलमुक्ती देण्याचा विचार असल्याचे सांगितले होते. त्याला टोलविरोधी कृती समितीने संपूर्ण टोलमुक्तीची भूमिका मांडली. त्यानंतर मंत्री पाटील यांनी आज अशा निर्णयापर्यंत सरकार आले नसल्याचे सांगितले.

मंत्री पाटील म्हणाले, 'टोलवसुलीतून दिवसाला पाच लाख रुपये याप्रमाणे वार्षिक १८ कोटी रुपये कंपनीकडे जमा होणार आहेत. आगामी तीस वर्षांत एकूण ५४० कोटी रुपये कंपनीला द्यावे लागतील. संपूर्ण टोलमाफी करण्याचा निर्णय घेतल्यास ही बाब न्यायप्रविष्ट होण्याची शक्यता आहे. हा प्रश्न न्यायालयात गेल्यास निकालासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यादरम्यान टोलवसुली सुरूच राहिल्यास अडचण निर्माण होईल. त्यासाठी अहवाल आल्यानंतर प्रकल्पाची रक्कम निश्चित करू.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


... पण विरोध संपणार नाही

0
0



घरकुल प्रदानप्रसंगी पालकमंत्री पाटील यांनी लगावला आंदोलकांना टोला

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापुरात चांगल्या कामासाठी एकमत होत नाही. शहरात एखादा प्रकल्प कार्यान्वित झाला की, आंदोलनाला नवा विषय मिळाला या आविर्भावात काही मंडळी साधन परजून तयार असतात. सातत्याने आंदोलने, विरोध केल्यामुळे शहर विकासावर कोणता परिणाम होतो याचा सारासार विचार करत नाहीत. आयुक्तांनी, शहरात विकास प्रकल्पाची अंमलबजावणी करताना नेटके नियोजन करावे. विरोध होणार नाही याची काळजी घ्या. कारण आंदोलनातून मार्ग काढत प्रकल्प मार्गस्थ करण्यापर्यंत तुमचे केस पांढरे होतील, पण विरोध काही संपणार नाही. मात्र, शहर सुंदर बनविण्यासाठी आयुक्तांनी ही जोखीम पत्करावी. कलियुगातील शेवटच्या पर्वात जसे विरोध, यादवी माजली होती ते पर्व सध्या कोल्हापुरात सुरू आहे,' असा खोचक टोला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आंदोलकांना लगावला.

तपोवन परिसरातील विस्थापित झोपडपट्टीधारकांना घरकुल प्रदान व इमारत उद्घाटन सोहळा शुक्रवारी झाला. पालकमंत्री पाटील व आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात काही विस्थापितांना घरकुलाच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या. साळोखेनगर येथील शिवगंगा कॉलनी येथे साकारलेल्या या घरकुलास 'संत गाडगेबाबा महाराज यांचे नाव द्यावे, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत यासंदर्भात ठराव करून रितसर नामकरण सोहळा करावा,' अशी सूचना पाटील यांनी केली.

पालकमंत्री पाटील म्हणाले, 'कळंबा रस्त्याचे रुंदीकरण करताना विस्थापित झालेल्या झोपडपट्टीवासीयांचे पाच-सहा वर्षांच्या संघर्षानंतर घरकुलाचे स्वप्न साकारले आहे. या घरकुलाला काहीजणांनी विरोध केला. पक्की घरे मिळाल्याने झोपडपट्टीधारकांची जबाबदारी वाढली आहे. त्यांनी स्वच्छता, टापटीपपणे वागत विरोध करणाऱ्यांना पश्चात्ताप होईल अशा वर्तणुकीचे दर्शन घडवावे. महापालिकेने शहरातील सर्वच झोपडपट्टीवासीयांना पक्की घरे देण्याची योजना आखावी.'

आयुक्त पी. शिव शंकर म्हणाले, 'कोल्हापुरातील ६२ झोपडपट्ट्यांपैकी ४४ झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सर्व झोपडपट्ट्यांचा येत्या काळात विकास करण्याचे नियोजन आहे. सरकारच्या 'सर्वांसाठी घर' या योजनेतंर्गत झोपडपट्ट्यांचा विकास करण्यात येणार आहे. शिवगंगा कॉलनी येथील झोपडपट्टीधारकांना पाणी कनेक्शनसह सर्व सुविधा पुरवल्या जातील.'

यावेळी भाजपचे महानगर अध्यक्ष महेश जाधव यांचे भाषण झाले. नगरसेवक रामुगडे यांनी प्रास्ताविक केले. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी आभार मानले. यावेळी विरोधी पक्षनेते मुरलीधर जाधव, राजू हुंबे, सहायक आयुक्त उमेश रणदिवे, अभियंता एस. के. माने आदी उपस्थित होते.

काँग्रेस, राष्ट्रवादीने फिरवली पाठ

महापालिकेच्या निधीतून झोपडपट्टीवासीयांसाठी घरे बांधली आहेत. या कार्यक्रमासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, नेते, महापौर या सर्वांना आमंत्रित दिले होते. मात्र, ​दक्षिणेतील राजकारण आणि सतेज पाटील, महाडिक वाद यामुळे पदाधिकारी व नगरसेवकांनी कार्यक्रमापासून दूर राहणे पसंत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंभर मीटर ‘नो व्हेइकल झोन’

0
0



अंबाबाई मंदिर परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महापालिकेत बैठक

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढते भाविक आणि पर्यटक, वाहनांची मोठी संख्या यामुळे या भागात वाहतुकीची कोंडी होत आहे. ही कोंडी टाळण्यासाठी मंदिराच्या चारही बाजूची १०० मीटर जागा 'नो व्हेइकल झोन' करण्याचा प्रस्तावावर महापालिकेत चर्चा झाली. तसेच पार्किंगसाठी वेगवेगळी ठिकाणे निश्चित करण्यासंदर्भात चर्चा झाली.

उन्हाळी आणि दीपावली सुटी व नवरात्रात अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी प्रचंड गर्दी होते. मंदिर परिसर, भवानी मंडप, भाऊसिंगजी रोडवर वाहतुकीची कोंडी होते. मंदिराच्या चारही बाजूंनी १०० मीटर परिसर 'नो व्हेइकल झोन' केला की, या परिसरावरील ताण कमी होणार आहे. वाहतुकीची रहदारी थांबली की भाविकांनाही सहजपणे मंदिर परिसरात ये-जा करता येणार आहे. मात्र, हा परिसर वाहनमुक्त करताना या भागातील जे रहिवासी आहेत त्यांच्या वाहनांसंदर्भात काय मार्ग काढता येईल या अनुषंगाने चर्चा झाली. तसेच महापालिका, शहर वाहतूक शाखेतर्फे स्वतंत्रपणे पाहणी करण्याचे ठरले.

सुटीत राजाराम हायस्कूलचे मैदान मिळावे

आयुक्त पी. शिव शंकर, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक आर. आर. पाटील, आरटीओ विभागाचे अधिकारी वर्मा, विनायक रेवणकर यांची शुक्रवारी सायंकाळी महापालिकेत बैठक झाली. पार्किंगच्या नियोजनासंदर्भात वेगवेगळ्या पर्यायांचा विचार झाला. शाळेला सुटी असताना राजाराम हायस्कूलचे मैदान पार्किंगसाठी उपलब्ध करून द्यावे. शाळेच्या वार्षिक संपल्यानंतर जून महिन्यात शाळा सुरू होईपर्यंत मैदान उपलब्ध झाल्यास या भागातील वाहतुकीची, पार्किंगची समस्या बहुतांश सुटणार आहे. यासंदर्भात पोलिस प्रशासनामार्फत राजाराम हायस्कूलशी पत्रव्यवहार केला आहे, असे शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक पाटील यांनी बैठकीच्या निदर्शनास आणले.

साइडपट्ट्या केल्यास दुचाकींची सोय

पार्वती टॉकीजसमोरील चौक, राजाराम रोड, सीपीआर ते छत्रपती शिवाजी चौक, शिवाजी रोडवर साइड पट्ट्यांची सोय करावी. या ठिकाणी दुचाकी वाहने लावता येतात; पण महापालिकेकडून साइडपट्ट्या केल्या जात नाहीत. परिणामी दुचाकी वाहने लावण्यास अडथळे येतात याकडे लक्ष वेधण्यात आले.

पार्किंगसाठी नवे पर्याय

पूर्वी राजाराम हायस्कूलचे मैदान पार्किंगसाठी देण्यात आले होते. आता मात्र हायस्कूलकडून प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. शाहू स्टेडियम व शिवाजी स्टेडियमच्या बाहेरील जागा पार्किंगसाठी तयार करावी. तेथे पे अँड पार्क योजना राबवली तर संबंधित संस्थांना आर्थिक उत्पन्नही मिळेल, तसेच गांधी मैदान येथील काही जागा पार्किंगसाठी निश्चित करावी. जेणेकरून मंदिरासाठी येणाऱ्या भाविकांना वाहने लावता येतील. या प्रस्तावावरही आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांत चर्चा झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मा पानसरे यांचा जबाब पूर्ण

0
0



कोल्हापूर : ज्येष्ठ नेते, कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्येतील प्रत्यक्ष साक्षीदार आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांचा जबाब पूर्ण झाला आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी तीन टप्प्यात त्यांचा जबाब घेतला.

पानसरे यांच्यावरील हत्येला तीन महिने पूर्ण होत असताना उमा यांचा जबाब पूर्ण झाला आहे. पानसरे यांच्यावरील झालेल्या खूनी हल्ल्यात उमा याही गंभीर जखमी झाल्या होत्या. बंदुकीची गोळी त्यांच्या डोक्याला चाटून गेल्याने त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया केली गेली. त्यांची तब्येत ठीक नसल्याने जबाब घेण्यात आला नव्हता. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात त्यांचा जबाब घेण्याचे काम सुरू झाले. तीन टप्प्यात जबाब पूर्ण झाला.

हत्येचा तपास अधिकारी म्हणून अंकित गोयल यांची नियुक्ती होती. दरम्यान त्यांना बढती मिळाली असल्याने ते वर्धा येथे पोलिस अधीक्षकपदी रूजू होणार आहेत. पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा छडा लागला नाही, याचे दुःख वाटते अशी भावना गोयल यांनी व्यक्त केली आहे. गोयल यांच्याजागी एस. चैत्यन्न यांनी नियुक्ती झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तपास शून्य; अधिकारी बदलले

0
0



पानसरे हत्या प्रकरणाचा तपास तीन महिन्यांनंतरही जैसे थे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते, कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्यावरील हल्ल्यास शुक्रवारी (ता. १६ मे) तीन महिने पूर्ण झाले. मात्र हल्लेखोरांचा शोध घेण्यात पोलिसांना अपयशच आले आहे. हल्ल्याचा तपास गांभीर्याने सुरू असताना गृहखात्याने अवघ्या एका महिन्यात कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रितेशकुमार यांची पुणे येथे सीआयडीकडे आणि हल्ल्याचे तपास अधिकारी अंकित गोयल यांची वर्धा पोलिस अधीक्षकपदी बढतीने बदली केली आहे. दोन अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे तपासावर मर्यादा येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारीला हल्ला झाल्यानंतर पोलिस महानिरीक्षक रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला. तपासासाठी २७ पथके नेमण्यात आली. मुंबई आणि पुण्याच्या एटीएस पथकांकडूनही तपास सुरू आहे. परिक्षेत्रातील दिग्गज अधिकारीही तपास करीत आहेत. रितेशकुमार यांनी, हल्लेखोर कर्नाटकात पळाले असल्याचे लक्षात घेऊन कर्नाटक, गोवा व महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकाऱ्याना एकत्र आणत तपास सुरू केला. राज्यांच्या सीमेवरील जिल्ह्यांत समन्वय रहावा यासाठी नऊ पोलिस अधिक्षकांत समन्वय ठेवण्यास त्यांनी पुढाकार घेतला. एकीकडे रितेशकुमार यांनी तपासासाठी ही पावले उचलली असताना त्यांची पुणे गृह अन्वेषण विभागाच्या महानिरीक्षकपदी तडकाफडकी बदली झाली. वास्तविक दोन वर्षे कालावधी पूर्ण झाल्याशिवाय बदली केली जात नसताना नियम डावलून अवघ्या ११ महिन्यांत रितेशकुमार यांची बदली झाली. त्यास विरोध होऊन सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे.

जबाब अर्धवट असतानाच बदली

पानसरे कुटुंबीयांनी दोन महिन्यानंतर उच्च न्यायालयात याचिका दाखल करून एसआयटीची मागणी केली. तपास अहवाल न्यायालयात सादर करावा अशी सूचना केली. याचिकेनंतर अवघ्या दोन दिवसांत राज्य सरकारने एसआयटी नियुक्त करून गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त अधीक्षक संजयकुमार यांची नियुक्ती केली. त्यांनी उमा पानसरे यांची भेटही घेतली. गेल्या आठवड्यात अतिरिक्त अधीक्षक अंकित गोयल यांनी उमा पानसरे यांचा जबाब घेण्यास सुरूवात केली. जबाबाचे काम सुरू असतानाच गोयल यांना बढती देऊन त्यांची बदली केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकारमंत्र्यांना कोंडू

0
0


एफआरपीप्रश्नी आमदार हसन मुश्रीफ यांचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'विधानसभेच्या अधिवेशनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखर कारखान्यांना दोन हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा केली होती. मात्र, वित्त विभागाकडून अद्याप फाइल मिळाली नसल्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील सांगत आहेत. त्यांचा हा पवित्रा विश्वामित्री आहे,' अशी टीका माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी केली. 'एफआरपीबाबत ३१ मेपर्यंत योग्य तोडगा न निघाल्यास वीस हजार शेतकऱ्यांच्या मदतीने सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या निवासस्थानी कोंडून घालू' असा इशारा मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिला. एफआरपीबाबत सहकारमंत्र्यांसमवेत शासकीय विश्रामगृहावर बैठक झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

मुश्रीफ म्हणाले, 'साखरेच्या दरानुसार ३१०० रुपये एफआरपी ठरविण्यात आली होती. मात्र, त्यानंतर बाजारातील साखरेचे दर कोसळले. त्यामुळे साखर कारखान्यांना केंद्र सरकारने निश्चित केलेल्या एफआरपीनुसार दर देण्यास अडचणी आल्या आहेत. त्यामुळे अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी कारखान्यांना बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा केल्याला दोन महिने होऊनही एक रुपयाही कारखान्यांना मिळालेला नाही.'

मुश्रीफ म्हणाले, 'हंगाम संपल्यानंतर सरकारने कच्चा साखरेला निर्यात अनुदान जाहीर केले आहे. हा निर्णय म्हणजे वराती मागून घोडे आहे. तो व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी घेतला गेला. आघाडी सरकारने दोन वर्षांपासून पर्चेस टॅक्स दिला असताना, सहकारमंत्रीच पर्चेस टॅक्स दिल्याचे सांगताहेत. ही फसवणूक आहे. उत्पादकांच्या तोंडाला त्यांनी पाने पुसली आहेत.'

वेळी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार के. पी. पाटील, नामदेवराव भोईटे, केडीसीसीचे संचालक ए. वाय. पाटील, बाबासाहेब पाटील, संतोष पाटील, शहराध्यक्ष आर. के. पाटील उपस्थित होते.

त्यांना माफ करू

खासदार राजू शेट्टी आणि मुश्रीफ यांनी गेले दोन दिवस ऊस दरप्रश्नी पत्रकबाजी केली आहे. याबाबत मुश्रीफ म्हणाले, 'त्यांच्या कार्यकर्त्याची महामंडळावर वर्णी लागली आहे. त्यामुळे त्यांचे लाल दिव्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. ते सरकारविरोधी काही बोलणार नाहीत. त्यांना आता माफ करू.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोकुळचे दूध महागले

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कुलिंग चार्जच्या नावाखाली दूध संघाकडून वितरकांनी वाढीव कमिशनची मागणी करत दूध विक्री बंद केली होती. यामुळे महानंदा, गोकुळ, वारणा संघांच्या दूध वितरणावर परिणाम झाला होता. वितरकांना कमिशन वाढवून देण्यासाठी महानंदाने दूध विक्री दरामध्ये वाढ केल्यानंतर गोकुळनेही मुंबई येथील दुधाच्या विक्री दरात एक रुपयांची वाढ केली आहे. यामुळे मुंबई येथील ग्राहकांना गायीचे दूध ३९ तर म्हशीचे दूध ५१ रुपये लिटरने खरेदी करावे लागणार आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीबरोबरच दुधाच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांना चांगलाच झटका बसला आहे.

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघामार्फत (गोकुळ) मुंबई येथे दररोज सहा लाख तर पुणे येथे दीड लाख लिटर दुधाचे वितरण होत आहे. मुंबईतील विक्रेत्यांना संघामार्फत प्रतिलिटरमागे चार रुपये कमिशन दिले जाते. भरघोस मिळणाऱ्या कमिशनमुळे मुख्य वितरक, उपवितरक अशी साखळीच निर्माण झाली आहे. या वितरकांनी कुलिंज चार्जला जास्त खर्च येत असल्याने प्रतिलिटरमागे दोन रुपये कमिशन वाढवून देण्याची मागणी केली होती.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दुधाचे आणि दूध पावडरीचे दर ढासळल्याने खासगी कंपन्यांचे दूध खुल्या बाजारापेठे आले आहे. खासगी कंपन्यांकडून मागेल तेवढे कमिशन मिळत आहे. याचाच फायदा घेत सहकारी दूध संघांनीही तेवढेच कमिशन द्यावे अशी मागणी करत त्यांनी २२ एप्रिलपासून दूध वितरण बंद केले होते. यामुळे गोकुळ व वारणा संघाचे ८० हजार लिटर दूध शिल्लक राहत होते. निवडणुकीच्या धामधुमीत वितरकांनी संप केल्याने संघासमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. निवडणुकीचा धुरळा खाली बसल्यानंतर मुंबईकरांना आता दुधवाढीचा झटका बसला आहे.

........................

कुलिंग चार्जेसच्या नावाखाली वितरक एमआरपीपेक्षा जास्त दराने दूध विक्री करत असल्याच्या तक्रारी अन्न व औषध प्रशासनाकडे दाखल झाल्या होत्या. त्यावर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर वितरकांनीव वाढीव कमिशनची मागणी करत ग्राहकांना वेठीस धरले होते. कमिशन वाढवून देतो असे सांगत दूध संघानी मार्ग काढला होता. मात्र हे कमिशन ग्राहकांच्या खिश्यातूनच जाणार असल्याने त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे.

........................

गायीचे दूध आधी ३८ रु. लिटर, आता ३९ रु. लिटर तर म्हशीचे दूध आधी ५० रु. लिटर, आता ५१ रु. लिटर

मुंबईत दररोज सहा लाख लिटर दूध वितरण आणि पुण्यात दररोज दीड लाख लिटर दूध वितरण

........................

मंबई दूध विक्री दरामध्ये सरासरी एक रुपयांची वाढ केली आहे. इतर जिल्ह्यातील दूध संघापेक्षा गोकुळ उत्पादकांना सात ते आठ रुपये लिटरमागे जास्त दर देत आहे. यामुळे मुंबईतील विक्री दरामध्ये वाढ झाल्याने स्थानिक उत्पादकांना दर वाढ करता येणार नाही. विक्री दरातूनच विक्रेत्यांना वाढीव कमिशन देणार - डी. व्ही. घाणेकर, कार्यकारी संचालक गोकुळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रॅक्टर विहिरीत कोसळून २ ठार

0
0

म. टा. वृत्तसेवा, मिरज

मिरज तालुक्यातील चाबुकस्वारवाडी येथे ट्रॉलीत खत भरलेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह विहिरीत कोसळल्याने दोन ठार झाले. तर ट्रॅक्टर चालकासह आणखी एक जण जखमी झाला आहे. अपघातानंतर कवठेमहांकाळ पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या मदतीने ट्रॅक्टर विहिरीतून बाहेर काढण्यात आला आहे.

शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कोंबडी खत भरून निघालेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह सलगरे-चाबुकस्वारवाडी रस्त्यावरील विहिरीत कोसळला. रस्त्याकडेला असलेली ही विहिर सुमारे ७० फूट खोल आहे. चालता ट्रॅक्टर अचानक विहिरीत कोसळल्याने ट्रॉलीवरील विनायक कल्लाप्पा गुंडेवाडी (वय १७) व तानाजी महादेव आकले (वय ४५, दोघेही रा. चाबुकस्वारवाडी) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर विलास खोत (वय ४०) व ट्रॅक्टर चालक शशिकांत गुराप्पा गुंडेवाडी (वय ४०) हे दोघे जखमी झाले.

ट्रॅक्टर चालक शशिकांत गुंडेवाडी याने मद्यपान केल्याची समजून ग्रामस्थांनी चोप दिला. ट्रॉलीतील कोंबडी खतासह ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने पाणी गढून झाले होते. यामुळे मतदकार्यात अडथळा निर्माण झाला होता. कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यातील चार पोलिस कर्मचारी व दोन गृहरक्षक दलाच्या जवानांनी विहिरीत उतरून मृत व ट्रॅक्टर बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या अपघाताची कवठेमहांकाळ ग्रामीण पोलिसांत नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सिंचनासाठी केंद्राकडून भरीव निधी आणणार’

0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

'जिल्ह्यातील टेंभू, म्हैशाळ, ताकारी योजना पूर्ण करण्यासाठी येत्या वर्षभरात केंद्र सरकारकडून जास्तीत-जास्त निधी आधी मिळवू. केंद्र सरकारकडून निधी न मिळाल्यास उर्वरीत योजना पूर्ण खासगीकरण हाच अंतिम पर्याय समोर राहील,' अशी माहिती खासदार संजय पाटील यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त सरकारच्या वर्षभरातील वाटचालीचा आढावा खासदार पाटील यांनी शनिवारी घेतला. भाजपाचे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, 'केंद्रातील भाजप सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. वर्षभराचा पारदर्शी कारभार हे सरकारचे यश आहे, वर्षभरात अनेक नागरी हिताच्या योजना राबवल्या, ताकारी, म्हैशाळ, टेंभूसाठी जास्तीत-जास्त निधी केंद्र सरकारकडून धरण्यात यावा यासाठी आपण वर्षभरात पाठपुरावा केला आहे. या योजना पूर्ण करण्यासाठी निधी धरण्याची ग्वाही मिळाली आहे. येत्या वर्षभरात हा निधी धरला जाणार आहे. या योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करू. जतचा अपुरा मेन कॅनॉल पूर्ण करू, मिरज-कवठेमहांकाळमधील पोट कालवे पुर्ण करण्यासाठी सुमारे ६५ कोटींच्या आसपास रक्कम लागणार आहे, यासाठीही पाठपुरावा सुरू आहे. या जिल्ह्यातील पाणी योजना ड्रीपवर आणण्याचा प्रयत्न आहे. यातून वाचणारे पाणी राहिलेल्या गावाला कसे पुरवता येईल.'

घोरपडेंनी माझ्याकडे राग व्यक्त केला नाही

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आणखी दोन जागा मिळायला हव्या होत्या. बाजार समिती निवडणुकीबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. जेव्हा एकत्र बसू तेव्हा चर्चा होईल, अजित घोरपडे नाराज असल्याबद्दल विचारले असता खासदार पाटील म्हणाले, 'जयंतराव आणि अजितरावांची चर्चा काय झाली हे मला माहित नाही, त्यांचा माझ्याजवळ राग व्यक्त झालेला नाही.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेमार्गांच्या सर्वेक्षणासह कोट्यवधींच्या कामांना मंजुरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर - राजापूर रेल्वेमार्ग, कोल्हापूर - पुणे रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण यासह सुमारे १३० कोटी रुपयांची कामे गेल्या वर्षभरात केल्याचे समाधान असले तरी केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे फारसे लक्ष दिले नसल्याची खंत खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. केंद्रातील सरकारला आणि खासदार म्हणून वर्षपूर्तीनिमित्त केंद्र सरकारचे काम आणि खासदारपदाच्या कारकीर्दीबाबत त्यांना विचारले असता ते 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलत होते.

खासदार शेट्टी म्हणाले, ' खासदार म्हणून दिल्लीत काम करण्याची ही दुसरी टर्म आहे. त्यामुळे संसदेच्या कामाचा चांगला अनुभव पाठिशी आहे. केंद्रातील वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांशी सततचा संपर्क तसेच अनेक समस्यांबाबत पाठपुरावा करण्यात आला आहे. या पाठपुराव्यामुळेच कोल्हापूर - राजापूर रेल्वे मार्गाची मागणी मान्य करण्यात आली. कोल्हापूर - पुणे रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण त्याबरोबरच १३० कोटींची विविध विकासकामे युएलडीच्या माध्यमातून जिल्ह्यात केली आहेत.

केंद्र सरकारचा गेल्या वर्षभराचा कारभार पाहिला तर त्यांच्याकडून फार आश्वासक असे काही दिसत नाही. पुढील काळात काही काम दिसले तर काम झाले असे म्हणता येईल. या केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक अपेक्षा होत्या. पण, पहिल्या वर्षभरात अपेक्षाभंगच झालेला दिसतो. शेतीबाबतच्या केंद्राच्या कामाबाबत फारसे समाधानी नसल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.

'सांसद आदर्श गाव' म्हणून निवडलेल्या गावाला केंद्र किंवा राज्य सरकारचा एकही रुपयाचा निधी नाही. त्यामुळे खासदार निधीच्या माध्यमातून या गावांमध्ये विकासकामे करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. रुकडी ते गांधीनगर हा पूल देखील मंजूर करण्यात आला असून त्याचेही काम लवकरच सुरू होणार असल्याचे शेट्टी म्हणाले.

ते पुढे म्हणाले, 'उसाच्या प्रश्नाबाबत केंद्र आणि राज्य सरकारसोबत गेले वर्षभर चर्चा आणि मागण्या सुरू आहेत. त्यातील एक महत्वाची बाब म्हणजे पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉलचा वापर करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. ऊसासाठी दिलेले पॅकेज अपुरे आहे. शेतकऱ्यांना अजूनही मदतीची अपेक्षा आहे. त्यासाठी राज्य सरकारनेही मदत करण्याची गरज आहे. खासदार झाल्यानंतर आणि त्यापूर्वीही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरलो आहे .यापुढेही शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढत राहू.

गेल्या वर्षभरात खासदार म्हणून सत्ताधारी पक्षासोबत काम करत आहे. या कालावधीत सरकारने काही निर्णय चांगले घेतले आहेत. त्याबाबत सरकारचे अभिनंदन पण अजूनही खूप चांगले काम सरकारला करता आले असते. नव्या सरकारकडून लोकांना खूप अपेक्षा आहेत. त्या सर्व अपेक्षा पूर्ण करणे अवघड असले तरी अशक्य नाही. पाया मजबूत झाला तर अनेक कामे करता येतील. शेतकऱ्यांबाबत सरकारचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादन खर्च आणि मालाला मिळणारी किंमत याचा विचार करून आयात - निर्यात धोरण ठरविण्याची गरज आहे. त्यासाठी पुढील काळात प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याबरोबरच मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहे. हातकणंगले मतदारसंघ मोठा आणि दऱ्याखोऱ्यांचा आहे. तरीदेखील सर्वांच्या किमान प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. भविष्यात काही योजना राबवून शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न खासदार म्हणून केला जाईल, असेही खासदार शेट्टी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरचा समावेश स्मार्ट सिटीमध्ये करणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरसाठी सर्कीट बेंच, रेल्वेस्थानकासाठी प्लॅटफॉर्मची उंची वाढविणे, पुणे - मिरज रेल्वे मार्ग दुहेरीकरण यासह विविध रस्त्यांच्या कामासाठी ४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर भविष्यात कोल्हापूरचा स्मार्ट सिटीच्या यादीत समावेश करणे, विमानतळाचा विकास आणि विमानसेवा सुरू करणे, कोकण रेल्वेला मंजुरी, पंचगंगा आणि तिर्थक्षेत्र विकास आराखडा यासाठी पुढाकार घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. खासदारपदाच्या वर्षपूर्तीनिमित्त गेल्या वर्षभरातील झालेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

वर्षभरातील कामाचा आढावा घेताना खासदार महाडिक म्हणाले, 'लोकसभेत पहिल्यांदा निवडून जाऊनदेखील अत्यंत कार्यक्षमपणे काम करण्याची संधी मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार म्हणून पक्षाची भूमिकाही मांडता आली. सुमारे ३५९ तारांकित आणि अतारांकित प्रश्न उपस्थित केले. अनेक मंत्र्यांना भेटून विविधकामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. शेतीचे प्रश्न, ऊस, रेल्वे, सहकारी कारखानदारी, पासपोर्ट कॅम्प, नदीजोड प्रकल्प, राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाणी मीटर देणे, आजरा - चंदगडमधील हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी पाठपुरावा, एव्हीएच प्रकल्प बंद करण्याबाबत, महिलांच्या आरोग्याविषयीचे प्रश्न, आदर्श ग्राम प्रकल्प, सीपीआरसाठी नवीन सी. टी. स्कॅन मशीन अशा प्रश्नांमध्ये लक्ष घातले. भविष्यात देखील जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करू.'

महाडिक पुढे म्हणाले, 'शहरातील रस्त्यांची दुरूस्ती करणे महानगरपालिकेच्या आवाक्यातील बाब आहे असे वाटत नाही. त्यामुळे एम. एच. ०९ वगळून इतर गाड्यांना टोल आकारला जावा अशी सूचना समितीला करणार असून त्याचा समितीने विचार करावा.

समन्वयाने निवडणुका व्यवस्थित

'राजाराम साखर कारखाना, गोकुळ, जिल्हा मध्यवर्ती बँक यासह जिल्ह्यात झालेल्या अनेक निवडणुका या आपणच सर्वांना एकत्र आणून समन्वयाने घडवून आणल्या. प्रत्येक संस्थेच्या निवडणुकीमध्ये महत्वाचा सहभाग होता. सर्वजण एकत्र येत होते, जे बाजूला जात होते त्यांनाही सोबत आणण्याचे काम केले आहे. त्यामुळे कोणत्याही अडचणीशिवाय या निवडणुका पार पडल्या आहेत. समन्वयाचीच भूमिका असल्याने महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग निर्णय घेऊ,' असेही महाडिक यांनी स्पष्ट केले.

दिल्लीत केवळ निवेदने देऊन किंवा संसदेत प्रश्न मांडून गप्प बसलेलो नाही तर अनेक प्रकरणांचा पाठपुरावा केला असल्याचे महाडिक यांनी सांगितले. सिमेंटच्या वाढलेल्या दराबाबत आवाज उठविल्यानंतर ते कमी करण्यात आले. ज्या प्रश्नांवर आवाज उठविला त्यातील अनेक कामी मार्गी लागली आहेत. कामाचे प्राधान्य देखील ठरविण्यात आले असून भविष्यात त्याला मूर्त स्वरुप देण्यात येणार आहे. संसदेमध्ये अभ्यासपूर्ण मांडणी केल्याबद्दल महाराष्ट्रातील पहिल्या पाच कार्यक्षम खासदारांमध्ये समावेश झाला आहे. गेल्या वर्षभरातमध्ये कामामध्ये सातत्य, अभ्यास आणि लोकल्याणाची भावना यांना महत्व दिले आहे. कोल्हापूरच्या जनतेने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रयत्नशील असून कोल्हापूर जिल्हा विकासाचे रोल मॉडेल बनविण्याचा प्रयत्न आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजऱ्यात भातक्षेत्र वाढणार

0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

आजरा तालुक्यात यावर्षी भातपिकाचे क्षेत्र वाढणार आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हे प्रमाण २०० हेक्टरने वाढणार आहे. यामुळे यावर्षी सुमारे ९ हजार ८०० हेक्टरवर भातपिकाची लागवड होईल. याप्रमाणेच ऊसाच्या क्षेत्रातही तीनशे हेक्टरने वाढ झाल्याचे विभागातून सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर तालुक्याच्या पंचायत समितीच्या कृषी विभागाबरोबरच तालुका कृषी विभागाने नियोजन केले आहे. एकूण २९ हजार जमिनीवर विविध पिकांची लागवड होईल.

नेहमीप्रमाणे मे महिन्याच्या उत्तरार्धादरम्यान कृषी विभाग खरीप हंगामाचे नियोजन करतो. या दरम्यानच शेतकरी वर्गही आंतरमशागतीसह विविध प्रकारच्या शेतीकामाच्या लगबगीत असतो. तालुक्याचे प्रमुख पिक असलेल्या भाताचे क्षेत्र यावर्षी वाढणार असल्याने त्यादृष्टीने शेतातील हंगामपूर्व कामे आटोपली जात आहेत. तालुक्याच्या पश्चिम भागात भातपिकाची रोपलावण घेतली जाते. त्यादृष्टीने तरवे टाकण्याच्या कामांनी वेग घेतला आहे. तालुक्याच्या पूर्व भागात प्राधान्याने धूळवाफेच्या पेरण्या होतात. त्यामुळे येथेही जमिनीच्या आंतरमशागतीच्या नांगरणी व कुळवणीसह इतर कामांची लगबग सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर तालुका संघानेही कंबर कसली आहे. शेतकऱ्यांना हंगामाच्या तोंडावर बि-बियाणे व खतांचा पुरवठा सुरळीतपणे व्हावा यादृष्टीने तयारी सुरू आहे. कृषी विभागाच्या सूचनेनुसार स्थानिक व संकरीत बियाणे पुरविण्यावर संघाचा भर आहे. सुवासिक घनसाळ, काळा जिरगा, चंपाकळी आदींसह रत्नागिरी-२४, सोनम, दप्तरी, इंद्रायणी, कर्जत व वरंगळ भाताची निवड शेतकरी वर्ग करीत असतो.

आजऱ्यातील पिकनिहाय क्षेत्र

कृषी विभागाच्या नियोजनानुसार यावर्षी पिकनिहाय हेक्टर क्षेत्र पुढीलप्रमाणे राहील. भात- (९८०४), खरीप ज्वारी-(२००), नागली - (४०००), मका-(४००), इतर तृणधान्य-(५००), तूर- (१००), उडीद- (३००), इतर कडधान्य - (६००), भूईमूग - (५१००), कारळा-(२००), सोयाबीन - (१५००), ऊस-(४७००).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४१७ वन्यप्राण्यांची गणती

0
0

म. टा वृत्तसेवा, राधानगरी

देशात अनेक वन्यप्राण्यांची संख्या कमी होत असताना गेल्या आठवड्यात राधानगरी अभयारण्यात झालेल्या प्राणीगणतीत गवा, सांबर, भेकर,अस्वल,शेकरू आदींसह सुमारे ४१७ वन्यप्राण्यांचे दर्शन झाले आहे. तर जंगलातील बंदिस्त कॅमेऱ्यात १३ बिबट्यांचे चित्रण झाले असून, वन्यप्राण्यांच्या या समृद्ध दर्शनाने वनविभाग आणि निसर्गप्रेमी सुखावले आहेत. सुमारे ३६४ चौरस कि.मी अंतरावर पसरलेले दाजीपूरचे हे अभयारण्य खास गवा या प्राण्यासाठी राखीव आहे. मात्र येथे याशिवाय अन्य प्राण्यांचा आधिवासही मोठ्या प्रमाणात आहे. दरवर्षी एप्रिल- मे महिन्यात त्यांची गणती केली जाते. त्यानुसार येथे ३ ते १२ मे दरम्यान वन विभागाने राधानगरी, दाजीपूर विभागातील २१ बीटांत ही विशेष मोहीम राबविली. दोन मीटर रुंद व अडीच कि. मी. लांबीच्या ट्रा​न्जिट लाईनवरील फिरती, १८ पाणवठे, १४ मचाणांवरून केलेल्या नोंदी आणि निरीक्षणातून ही माहिती समोर आली आहे. वन विभागाचे २० कर्मचारी, १९ निसर्गप्रेमींच्या पथकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ यावेळेत प्रत्यक्ष फिरती करून, ही माहिती संकलित केली आहे.

१३ बिबट्यांचा वावर

गवे १६८, वानर ६१, ससा १९, सांबर १०, साळींदर ०५, भेकर १६ मोर १७, रानकुत्रे १० डुक्कर २६, अस्वल १४ रानकोंबडी ४५, असे एकूण ४१७ वन्यप्राणी या गणती पथकाला प्रत्यक्ष दिसून आले आहेत. तर अभयारण्यात लावलेल्या ३५ कॅमेऱ्यापैकी दाजीपूर परिक्षेत्रातील १० ट्रॅप कॅमेऱ्यात १३ बिबट्यांचा वावर असल्याचे चित्रित झाले आहे.

या अभयारण्यात गव्यासह अन्य वन्यप्राण्यांचा आधिवास अधिक प्रमाणात असल्याचे या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. पाण्याच्या शोधासाठी अनेक वन्यप्राणी पाणवठ्यावरया काळात येत असल्याने या नोंदी वस्तुनिष्ठ आहेत.

- एस. एस पाटील, वनक्षेत्रपाल, राधानगरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबईतील ग्राहकांसाठी ‘गोकुळ’ची दरवाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कुलिंग चार्जच्या नावाखाली दूध संघाकडून वितरकांनी वाढीव कमिशनची मागणी करत दूध विक्री बंद केली होती. यामुळे महानंदा, गोकुळ, वारणा संघांच्या दूध वितरणावर परिणाम झाला होता. वितरकांना कमिशन वाढवून देण्यासाठी महानंदाने दूध विक्री दरामध्ये वाढ केल्यानंतर गोकुळनेही मुंबई येथील दुधाच्या विक्री दरात एक रुपयांची वाढ केली आहे.

यामुळे मुंबई येथील ग्राहकांना गायीचे दूध ३९ तर म्हशीचे दूध ५१ रुपये लिटरने खरेदी करावे लागणार आहे. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघामार्फत (गोकुळ) मुंबई येथे दररोज सहा लाख तर पुणे येथे दीड लाख लिटर दुधाचे वितरण होत आहे. मुंबईतील विक्रेत्यांना संघामार्फत प्रतिलिटरमागे चार रुपये कमिशन दिले जाते.

याबाबत 'गोकुळ'चे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर म्हणाले, 'मंबई दूध विक्री दरामध्ये सरासरी एक रुपयांची वाढ केली आहे. इतर जिल्ह्यातील दूध संघापेक्षा गोकुळ उत्पादकांना सात ते आठ रुपये लिटरमागे जास्त दर देत आहे. यामुळे मुंबईतील विक्री दरामध्ये वाढ झाल्याने स्थानिक उत्पादकांना दर वाढ करता येणार नाही. विक्री दरातूनच विक्रेत्यांना वाढीव कमिशन देणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसाहतींवरील जोखड दूर

0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

गेली अनेक वर्षे ग्रामपंचायतीचा स्वतंत्र दर्जा मिळावा यासाठी तिष्ठत राहिलेल्या राज्यभरातील हजारो प्रकल्पग्रस्तांच्या वसाहतींबाबत तातडीने अंमलबजावणी करीत ग्रामपंचायतींचा दर्जा देण्याचे निर्देश महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत दिले.

याबाबत आघाडी सरकारच्या काळात गेल्यावर्षी २४ फेब्रुवारीस हा निर्णय तत्कालीन ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी घेतला होता. मात्र अंमलबजावणी न झाल्याने प्रकल्पग्रस्त वसाहती स्वतंत्र ग्रामपंचायतींच्या प्रतीक्षेत होत्या. यामुळे गेली अनेक वर्षे राजकीय गुलामगिरीचे जोखड घेतलेल्या अशा वसाहतींना स्वतंत्र ग्रामपंचायती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. साधारणत: पंधरा ऑगस्टपर्यंत ही कार्यवाही होईल, असा अंदाज श्रमिक मुक्ती दलाचे संपत देसाई यांनी व्यक्त केला.

लोकसंख्येच्या निकषांमुळे या वसाहती स्वतंत्र ग्रामपंचायतीविना निकटच्या गावांशी संलग्न होत्या. किमान एक हजार लोकसंख्येची अट ग्रामपंचायतीची दर्जा मिळण्यास गरजेची होती. मात्र प्रकल्पग्रस्तांच्या वसाहती साडेतीनशे ते सातशे लोकसंख्येच्याच असल्याने त्यांना अशा प्रकारच्या ग्रामपंचायतीविना इतरांशी जोडून घेणे अपरिहार्य ठरले होते. यामध्ये बऱ्याचदा प्रस्थापित ग्रामपंचातींच्या कारभाऱ्यांकडून नेहमीच योग्य न्याय मिळत नसे. सरकारीकामांपासून अनेक योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी निर्माण होत. याशिवाय वसाहतींमधील मूलभूत विकासकामेही रेंगाळत होती. ही गरज ओळखून श्रमिक मुक्ती दलाने अशा वसाहतींसाठी विशेष बाब म्हणून स्वतंत्र ग्रामपंचायती मिळण्यासाठी लढा सुरू केला. त्यास गेल्यावर्षी यश आले, पण कार्यवाही होऊ शकली नव्हती.

या पार्श्वभूमीवर १२ मे रोजी महसूलमंत्री खडसे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीच 'श्रमुद'चे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी या प्रलंबीत गोष्टीकडे मंत्री खडसे यांचे लक्ष वेधले. यावेळी संबंधीत वसाहतींना तातडीने ग्रामपंचायती मंजूर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यानुसार दुसऱ्या दिवशी (ता. १३) कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमित सैनी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीवेळी जिल्ह्यातील अशा वसाहतींना स्वतंत्र ग्रामपंचायती देण्याबाबतचे प्रस्ताव तातडीने मंजूर केले जातील, असे स्पष्ट करण्यात आले.

जिल्ह्यातील ४७ वसाहतींना मिळणार दर्जा

या निर्णयामुळे आजरा तालुक्यातील बहुचर्चित चित्री प्रकल्पग्रस्तांच्या आवंडी, रायवाडा व चित्रानगर या तीन वसाहतींसह जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या ४७ वसाहतींना स्वतंत्र ग्रामपंचायती मिळणार आहेत. यानुसार जिल्ह्यातील महसूल यंत्रणांनी संबंधित वसाहती गॅझेटेड करणे व संबंधितांच्या स्वतंत्र ग्रामपंचायतीचे प्रस्ताव तातडीने मंत्रालयाकडे पाठविण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. ही प्रक्रिया दोन महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वादळाशी लढले धाडसी जवान

0
0

उदयसिंग पाटील, कोल्हापूर

सहा दिवसात तीनदा वळीव पावसाने ठिकठिकाणी कहर केला. जवळपास शंभरहून अधिक ठिकाणी झाडांबरोबर मोठ्या, छोट्या फांद्या कोसळल्या. कुणाच्या घरावर, कुणाच्या वाहनांवर तर वीज तारांवर. या साऱ्या फ्रंटवर सहा दिवस रात्रंदिवस महापालिकेचा अग्निशमन विभाग केवळ ६९ फायरमनच्या जिवावर लढत राहिला. घटना मोठ्या व जवान कमी असे विसंगत समीकरण असतानाही ही लढाई जिंकून दाखवली. या लढाईने जवानांची इच्छाशक्ती दाखवून दिली, पण आता जवानांची ही अपुरी संख्या वाढवण्याची इच्छाशक्ती प्रशासनाने दाखवली नाही तर भविष्यात एखाद्या आपत्तीत शहरातील यंत्रणा कोसळण्याची भीती आहे.

मे महिन्याचा पहिला आठवडा वळीव पावसाचाच ठरला. सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह झोडपून काढलेल्या वळवाने अनेक झाडे उन्मळून पडली. त्यामध्ये मोठ्या व जुन्या झाडांचा समावेश होता. या झाडांखाली शहरातील एक घर आले तर अनेक रस्त्यांवरील वाहतूक ठप्प करुन टाकली होती. मंगळवारी (५ मे) झालेल्या वळीवानंतर सायंकाळी सहानंतर अग्निशमन दलाकडे नागरिकांचे फोन येण्यास सुरुवात झाली. पहाटेपर्यंत हे फोन सुरु होते. रात्री एकवाजेपर्यंतच जवळपास ३० फोन आले होते. त्यामध्ये शहराच्या विविध भागातील नागरिकांचा समावेश होता. वळीवामुळे झाड पडले, फांदी तुटून पडली, वीजेच्या तारांवर फांद्या पडून तारा तुटलेल्या, खांब वाकलेले, पडलेल्या झाडामुळे घराला धोका होणार आहे, असेच संदेश साऱ्या फोनमधून होते.

शहरात सहा ठिकाणी फायर स्टेशन आहेत. त्यातील एक ​फायर फायटरची गाडी ​रिझर्व्ह ठेवून पाच गाड्या फायरमनसह ठिकठिकाणी पाठवल्या. त्यावर पेट्रोल व वीजेवर चालणारे वेगवेगळे कटर होते. पथकाने एका ठिकाणचे काम संपवल्यानंतर सूचना कंट्रोल केबिनला जशी सूचना मिळेल त्या ठिकाणी त्या पथकाला पुढे पाठवले गेले. अशा प्रकारे दोन शिफ्टमधील फायरमननी पहाटेपर्यंत झटून काम केले. रस्ते ब्लॉक करणारी, वीज तारांवर पडलेली झाडे व फांद्या, घरांवर पडलेल्या झाडांची कामे प्राधान्याने हाती घेऊन ते पूर्ण करण्यात आले. लोकांना रस्त्यावर पडलेले झाड बाजूला केलेले पहायला मिळाले. मुख्य अग्निशमन अधिकारी चिले म्हणाले, 'त्यासाठी महापालिकेकडील आधुनिक साधनसामुग्रीमुळे झटपट काम करणे शक्य झाले. जिथे धोका अथवा नुकसान होण्याची शक्यता होती. अशा ठिकाणची कामे कर्मचाऱ्यांनी जादा वेळ काम करुन पूर्ण केली. वळीव पावसाच्या तडाख्यामुळे झालेला विस्कळीतपणा दूर करण्यासाठी जवान सहा दिवस राबत होते.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हसन मुश्रीफांची नार्को टेस्ट करा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील भ्रष्टाचाराबाबत आमदार हसन मुश्रीफ यांची नार्को टेस्ट घेण्याची मागणी मी केली होती. मुश्रीफ यांनी त्याला तत्काळ संमती दिली होती. त्यामुळे माझे आरोप चुकीचे तर नाहीत ना? अशी शंका निर्माण होत आहे. मुश्रीफ संत तुकाराम यांच्याप्रमाणे भोळेभाबडे असल्याने त्यांच्यावर आरोप केल्याचे शल्य बोचत राहिल', असा उपरोधीक टोल लगावत खासदार राजू शेट्टी यांनी लगावला.

मुश्रीफ यांची नार्को टेस्ट घेऊन एकदा सत्य बाहेर येऊ दे अशी मागणी त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. गेल्या चार दिवसांपासून खासदार शेट्टी व मुश्रीफ यांच्यात प्रसिद्धी पत्रकांतून आरोपाच्या फैरी झडत आहेत. शुक्रवारी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतर मुश्रीफ यांनी शेट्टींवर पुन्हा टीका केली. याबाबत प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, जिल्हा बँकेतील १४७ कोटींच्या अपहाराबाबत मुश्रीफ यांची नार्को टेस्टची मागणी मी केली. त्यावर मुश्रीफ यांनी ते अतिशय सज्जन व्यक्ती आहे. भ्रष्टाचाराचा असा कोणताही धंदा केलेला नाही, सर्वप्रथम माझी नार्को टेस्ट करा असे सांगितले. त्यामुळे मुश्रीफ यांची नार्को टेस्ट व्हायलाच हवी असे निवेदन मी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.'

ते संत तुकाराम आहेत...

पत्रकात शेट्टी म्हणतात, 'मुश्रीफ यांना काही लोक संत तुकाराम संबोधतात. त्यामुळे मी मंबाजी आहे का? असे मला वाटू लागले आहे. यामुळे अशा भोळ्याभोबड्या व्यक्तीची बदनामी रोखण्यासाठी नार्को टेस्ट करावी. ते संत आणि भोळेबाबडे असल्याने अशा व्यक्तीवर आरोप केल्याचे शल्य मला मनात सदैव बोचत राहिल. मुख्यमंत्री पुढील आठवड्यात कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी नार्को टेस्टसंबंधी त्वरीत आदेश काढून सहकार्य करण्याची मागणीही मी मुख्यमंत्र्यांना केली आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महागाईचा आणखी भडका

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पेट्रोलच्या दरात लिटरमागे ३ रुपये १३ पैशांची आणि डिझेलच्या दरात २ रुपये ७१ पैशांची वाढ करण्यात आली असल्याने सार्वजनिक वाहतुकीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. विशेषत: डिझेलच्या दरातील वाढीमुळे सार्वजनिक वाहतूक आणि मालवाहतुकीचे दर वाढण्याची शक्यता आहे. मालवाहतुकीच्या दरात किमान दहा टक्के दरवाढ होईल असा अंदाज आहे.

ऑगस्ट २०१४ ते फेब्रुवारी २०१५ या कालावधीत पेट्रोलच्या किंमती १० वेळा कमी झाल्या. तर ऑक्टोबर ते फेब्रुवारीदरम्यान डिझेलच्या किंमतीतही सहा वेळा घट झाली होती. परंतु, गेल्या काही महिन्यांत, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महाग होऊ लागल्याने १६ फेब्रुवारीपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती दर पंधरवड्याने वाढतच चालल्या आहेत. ३० एप्रिलला पेट्रोल प्रतिलिटर ३.९६ पैशांनी आणि डिझेल २.३७ पैशांनी महागले होते. त्यानंतर आता पुन्हा इंधनाची दरवाढ झाली आहे. त्यामुळे दरवाढ अटळ आहे.

यासंदर्भात कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव म्हणाले, 'गेल्या पंधरा दिवसांत डिझेलच्या दरात लिटरमागे जवळपास पाच रुपयांपेक्षा जास्त दरवाढ झालेली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घटल्याने दरवाढ झाल्याचे समर्थन योग्य नाही. आताची दरवाढ लक्षात घेतली दर किमान मालवाहतुकीच्या दरात किमान दहा टक्के वाढ होईल. याचा परिणाम म्हणून कडधान्ये, डाळी, भाजीपाला अशा जीवनावश्यक वस्तूही महाग होतील. एकूणच सर्वसामान्य जनतेचा विचार केला तर मोदी सरकारबद्दल पूर्ण भ्रमनिरास झाला आहे.'

जिल्हा खासगी बस वाहतूक संघटनेचे प्रमुख सतीशचंद्र कांबळे म्हणाले, 'वाहतुकीचे दर वाढविण्याला पर्याय असणार नाही. डिझेलच्या दरवाढीचा फार मोठा फटका वाहतूकदारांना बसत आहे. सर्वसाधारणपणे एका बसला दिवसाला २०० लिटर डिझेल लागते. वाढलेले दर विचारात घेतले, तर एका बसमागील दिवसाचा निव्वळ इंधनाचा खर्च एक हजार रुपयांनी महागला आहे. खरेतर डिझेलचे दरावर सरकारचेच नियंत्रण हवे. इंधनाचे दर केव्हाही वाढत असल्याने नवीन व्यावसायिक या व्यवसायात येत नाही.'

कॉमन मॅन रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अॅड. बाबा इंदूलकर म्हणाले, 'सध्या झालेली दरवाढ किरकोळ नाही. त्यामुळे रिक्षाचालकांना वाहतुकीचे दर वाढवून मिळाले पाहिजेत. हकीम समितीने रिक्षाची भाडेवाढ कशी करायची याचे सूत्र ठरवून दिले आहे. त्यानुसार रिक्षाचालकांना दरवाढ मिळाली पाहिजे. अर्थात ही दरवाढ होताना सर्वसामान्यांनाही झळ बसू नये, अशी आमची मागणी आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांधीनगरात तणाव कायम

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गांधीनगर येथील सिरू चौकात राष्ट्रपुरुषांच्या वादग्रस्त पुतळ्यासंदर्भात शनिवारीही कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे गांधीनगरातील व्यापारी पेठ सलग पाचव्या दिवशी बंद राहिली. दरम्यान, पुतळ्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. यामध्ये विविध ठिकाणच्या तीन जागा सुचविण्यात आल्या आहेत. मात्र यातील कोणत्याही जागेसंदर्भात एकमत होऊ शकलेले नाही.

सहा दिवसांपूर्वी गांधीनगरातील सिरू चौकातील मोकळ्या जागेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रपुरुषांचा पुतळा बसविला. जबरदस्तीने, परवानगी न घेता पुतळा बसविण्यात आल्याने गेल्या पाच दिवसांपासून व्यापारी वर्गाने व्यवसाय बंद ठेवून आंदोलन सुरू केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून या वादात पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार महादेवराव महाडिक आदींनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.

या संदर्भात शनिवारीही ‌‌सिंधी सेंट्रल पंचायतचे प्रमुख बी. एच. डेंबडा यांच्या नेतृत्वाखाली रात्री उशिरापर्यंत व्यापाऱ्यांची बैठक सुरू होती; पण त्यात तोडगा निघू शकला नाही. दरम्यान, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या काही कार्यकर्त्यांनी पुतळ्याला जुना हार काढून नवीन हार अर्पण केला. त्यामुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. आमदार अमल महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी व्यापारी आणि आरपीआयच्या नेत्यांशी चर्चा केली. सीआयडीच्या अधिकाऱ्याने पाहणी केली. तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याने व्यापाऱ्यांनी, त्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावरील नियोजित मोर्चा रद्द केला.

दिवसभरात पोलिस अधिकारी, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे आणि व्यापाऱ्यांच्या नेत्यांशी एकत्र बैठक झाली. चांगली पर्यायी जागा दिल्यास तेथे पुतळा हलवू अशी आरपीआयची भूमिका आहे. काही जागांची पाहणी झाली असून, त्याबाबत चर्चा सुरू आहे.

- महेश जाधव जिल्हाध्यक्ष, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंदलगावनजीक तरुणाचा निर्घृण खून

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कंदलगाव-गिरगाव रस्त्यावर शनिवारी निर्जनस्थळी युवकाचा दोन्ही हात तोडलेल्या आणि शीर वेगळे केलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. त्याच्या पॅँटच्या खिशात पुण्यातील फरारी गुंड लहू ढेकणे याच्या मतदान ओळखपत्राची झेरॉक्स प्रत आणि त्याच्या नावाची चिठ्ठी सापडली. मात्र, मृतदेहाची ओळख पटू नये, अशा पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आल्याने हा ढेकणेचाच मृतदेह असावा का, याबद्दल पोलिसांनी शंका व्यक्त केली आहे. त्यामुळे अज्ञात व्यक्तीच्या खुनाची नोंद करवीर पोलिसांत करण्यात आली आहे.

कंदलगाव-गिरगाव शिवारात निर्घृण पद्धतीने खून एक मृतदेह पडला असल्याची माहिती करवीर पोलिसांना मिळाली. पोलिस उपाधिक्षक एस. चैतन्य यांच्यासह करवीर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी आले. तेथे दोन्ही हात तोडलेले आणि शिर धडापासून वेगळा केलेला मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या जवळपास कागदपत्रांची पाहणी केली असता त्याच्या पँटच्या खिशात लहू ढेकणे याच्या मतदान ओळखपत्राची झेरॉक्स आणि त्याची बहिणीचा, भावाचा भोर (जि. पुणे) येथील पत्ता आणि फोन नंबर आढळला. त्यावरून त्याच्या भावाशी संपर्क साधण्यात आले. त्याला मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी बोलविण्यात आले आहे असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, मृतदेहाच्या खिशात लहू ढेकणेच्या नावाची चिट्ठी सापडली असली तरी, हा मृतदेह त्याचा असावा याबाबत पोलिसांना खात्री नाही. ढेकणे याच्या नावावर सातारा जिल्ह्यातील संकेत भांडे आणि पुणे जिल्ह्यातील नीरा येथील अमित सोनवणे यांच्या खुनाचा आरोप आहे. संकेत भांडे खून प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली असून, तो कळंबा कारागृहात शिक्षा भोगत होता. दोन महिन्यांपूर्वी तो पॅरोलवर सुटला. त्यानंतर तो फरारी आहे. ढेकणेने आपला खून झाल्याचे भासविण्यासाठी असा प्रकार केला असावा असा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक दयानंद ढोमे तपास करीत आहेत.

भावाने मृतदेह ओळखला ?

दरम्यान, रात्री उशीरा पुणे येथून आलेल्या अंकुश रामचंद्र ढेकणे याने हा मृतदेह आपला भाऊ लहू याचाच असल्याचे पोलिसांना सांगितले. मृतदेह पाहिल्यानंतर त्याने पोलिसांना याबद्दल माहिती दिली. मात्र, पोलिसांनी यावर विश्वास ठेवलेला नाही. पोलिसांकडे याबद्दल विचारणा केली असता त्यांनी हा लहू ढेकणे याचाच मृतदेह आहे याला दुजोरा दिलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images