Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

शिवाजी पेठेत ड्रेनेजलाइनची दुर्गंधी

$
0
0
शिवाजी पेठेतील खरी कॉर्नरनजीक गांधी मैदानसमोर गेल्या महिन्याभरापासून ड्रेनेज लाइन फुटल्याने भागात दुर्गंधी पसरली आहे.

‘एक हृदय हो भारत जननी’

$
0
0
कच्छपासून कोहिमापर्यंत आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेला भारत हा एक देश आहे, असा सर्वसाधारण समज आहे. देश म्हणजे सलग भूभाग असलेला जमिनीचा तुकडा असतो काय?

‘सर्वोदय’बाबत आंदोलनाचा इशारा

$
0
0
‘सर्वोदय सहकारी साखर कारखान्याच्या हस्तांतरणाबाबत जाणीवपूर्वक वाद निर्माण केला जात आहे.

सोलापुरात अतिक्रमण पाडण्याचा धडाका कायम

$
0
0
सोलापूर महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी दुसऱ्या दिवशीही अतिक्रमण मोहीम तीव्र करीत होटगी रोडवरील ५० हून अधिक बांधकामे उद्ध्वस्त केली. यामध्ये बंगल्यांचाही समावेश आहे.

मिरजेत २ गटांत जोरदार मारामारी

$
0
0
शहरातील म्हैसाळ रोड झोपडपट्टीत लहान मुलांच्या भांडणातून दोन गटात सशस्त्र मारामारी झाली. या प्रकरणी दहाजणांविरूद्ध गुन्हा दाखल करून नऊजणांना पोलिसांनी अटक केली.

साता-यात मनसे आक्रमक

$
0
0
‘सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात पुरेसा पाऊस न झाल्याने चारा छावण्या सुरू ठेवाव्यात,’ या मागणीची प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी अतिरिक्त जिल्हाधिकारी बी. एस. पऱ्हाड यांच्या गाडीची तोडफोड केली.

विजेच्या धक्क्याने २ शेतक-यांचा मृत्यू

$
0
0
विजेचा धक्का लागून शेतात काम करणाऱ्या दोघा शेतकऱ्यांचा कागल येथे माळकर मळ्यात जागीच मृत्यू झाला. शेतातील खांबावरील गार्डींग तार तुटून मुख्य वाहिनीवर पडल्याने हा अपघात झाला.

मारहाणप्रकरणी पाचजणांना कोठडी

$
0
0
युवक काँग्रेसच्या सभासद नोंदणीसाठी गेलेल्या चंदगड विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष अजित कल्लाप्पा बंदी यांना हद्दीच्या कारणावरून काठीसह लाथा-बुक्यांनी मारहाण झाल्याप्रकरणी पाचजणांना गडहिंग्लज पोलिसांनी अटक केली आहे.

खूनप्रकरणातील गाडी ताब्यात

$
0
0
इचलकरंजीतील कुख्यात गुंड भरत त्यागी याचा रविवारी जयसिंगपूर येथे रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार करून खून करण्यात आला.

उमेदवारी, नको रे बाबा..!

$
0
0
कोल्हापूर लोकसभेची जागा आघाडीमधील कोणत्या पक्षाला मिळणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे. तरीही कॉंग्रेसला जागा मिळाली तर त्याची उमेदवारी आपल्या गळ्यात पडू नये म्हणून सध्या नेत्यांची धावपळ सुरू आहे.

शहीद माने कुटुंबीयांना २ लाखांची मदत

$
0
0
देशाचा खरा हिरा पिंपळगाव बुद्रुक (ता.कागल) येथील शहीद जवान कुंडलिक माने हे आहेत.म्हणूनच जागतिक डायमंड दिनाचे औचित्य साधून मुंबईचे हि-याचे प्रसिध्द व्यापारी हार्दिक हुंडिया यानी एक लाख रुपयांची रोख मदत आणि हिऱ्याचे काचेचे स्मृतिचिन्ह शहीद माने यांच्या कुटुंबीयाना दिले.

जिल्हा परिषदेचा ‘जय स्वच्छता’ चा नारा

$
0
0
ग्रामीण भागाच्या स्वच्छतेसाठी जिल्हा परिषदेने पुन्हा नव्याने ‘जागर स्वच्छतेचा सन्मान राजर्षी शाहू भूमीचा’ असा नारा देत ‘जय स्वच्छता सप्ताह’ साजरा करण्याचे नियोजन केले आहे.

निवडणुकीसाठी पर्यायी यंत्रणेचा विचार

$
0
0
जिल्ह्यातील निवडणुकीस पात्र असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीची जबाबदारी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांवर देण्यात येणार आहे. पण अद्याप मतदार यादी ठरवण्याच्या तारखेचा पत्ता नाही.

टोप खणीतील उत्खननाबद्दल दंड

$
0
0
महापालिकेच्या मालकीच्या टोप खणीत बेकायदेशीर गौण खनिजाचे उत्खनन करणाऱ्या लोकांकडून हातकणंगले तहसिलदारांनी दोन लाख ६५ हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे.

‘केएमटी’ कर्मचा-यांची लेबर ऑफिसरला मारहाण

$
0
0
गेटपास तपासणीचे आदेश दिल्याबद्दल कोल्हापूर महापालिका कर्मचारी संघ (इंटक) च्या सदस्य असलेल्या कर्मचा-यांनी सोमवारी सायंकाळी केएमटीचे लेबर ऑफिसर अशोक बाबूराव मगर यांना मारहाण केली.

शिव्यांच्या लाखोलीने रंगला ‘बोरीचा बार’

$
0
0
शिव्यांची बरसात होणारा खंडाळा तालुक्यातील बोरीचा बार पहिल्या श्रावणी सोमवारी उत्साहात साजरा झाला. बोरी व सुखेड गावच्या महिला एकमेकांना देणाऱ्या शिव्या ऐकण्यासाठी परिसरातील अंदाजे एक हजार ग्रामस्थ उपस्थित होते.

मुहूर्ताच्या सौद्यात गुळाला ५ हजार १ रुपये दर

$
0
0
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या हंगामातील नवीन गुळाचा सोमवारी सौदा काढण्यात आला. मुहूर्तावर काढण्यात आलेल्या सौद्यामध्ये ५००१ रुपयाचा दर मिळाला.

सेंट्रिंग कामगाराचा बालिकेवर बलात्कार

$
0
0
सेंट्रिंग कामगाराकडून सव्वादोन वर्षाच्या बालिकेवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. राजेसिंग बबलीसिंग (वय ३० सध्या रा. जवाहरनगर, मूळ रा. झारखंड) या संशयिताला जमावाने बेदम मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिले.

ऊसतोडणी टोळ्यांकडून २८ कोटींचा चुना

$
0
0
ऊसतोडणी टोळ्यांनी गेल्या आठ वर्षांत अॅडाव्हान्सपोटी २७ कोटी ९६ लाख रुपये घेऊन पोबारा केल्याचे गाऱ्हाणे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या जनता दरबारात ऊस वाहतूक व्यावसायिकांनी मांडले.

सेनेच्या गटबाजीत प्रशासन वेठीला

$
0
0
जिल्ह्यातील शिवसेनेत असलेला अंतर्गत गटबाजीचा जुना वाद आमदार गट व जिल्हाप्रमुखांच्या गटातून सोमवारी पुन्हा उफाळला.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images