Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी सहकारी पॅनेलने १५ जागा जिंकून स्पष्ट बहुमताची सत्ता मिळवली. परंतु, या पॅनेलची आवस्था गड आला पण सिंह गेला अशी झाली. सहा जागा जिंकताना पतंगराव कदमांच्या रयत आघाडीने माजी मंत्री मदन पाटील, आमदार विलासराव जगताप यांचे चिरंजीव मनोज जगताप यांचा पराभव केला. मदन पाटील यांचा चुलत भाऊ विशाल पाटील यानेच पराभव केला. याच दोन जागांच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मतमोजणीला गुरुवारी सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात झाली. पहिला निकाल जाहीर झाला आणि विशाल पाटील समर्थकांनी जल्लोष केला. विशाल पाटील यांना ३५ आणि मदन पाटील यांना ३१ मते मिळाली. दुसरा निकाल जत अ गटाचा झाला आणि काँग्रेसचे विक्रम सावंत यांनी भाजप आमदाराचे चिरंजीव मनोज जगताप यांचा पराभव केल्याचे जाहीर होताच जल्लोषात भर पडत गेली. दोन खात्रीच्या जागांवर पराभव झाल्याने जयंत पाटील आघाडीला काळजीने घेरले. सर्वपक्षीय आघाडी करण्याचे बारगळल्यानंतर समोर आलेल्या परिस्थितीमुळे या दोन निकालांकडेच संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले होते. शिवाय वाळवा तालुक्यातीलच काँग्रेसचे सी. बी. पाटील यांनी क-४ गटातून जयंत पाटील आघाडीच्या विष्णू माने यांचा पराभव केला. त्या नंतरचा तिसरा निकाल गणपती सगरे (कवठेमहांकाळ) यांच्या रूपाने निकाल जयंत पाटील यांच्या गटाकडे गेला.

जतचे आमदार विलासराव जगताप यांनी कदम गटांवर टोकाचा आरोप केला. डॉ. पतंगराव कदम यांच्यामुळेच बँकेचे संचालक मंडळ बरखास्त झाले आहे. त्यामुळे त्यांना आघाडीत घेऊ नये. असे जगतापांनी जाहीर केल्याने सर्वपक्षीय आघाडीत बिघाडी होणार हे स्पष्ट झाले होते. कदम गटानेही जगतापांना आघाडीत स्थान नको, असा आग्रह धरला होता. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी काँग्रेस समर्थकांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले होते. परंतु, उमेदवारी माघारीला केवळ १५ मिनिटांचा अवधी उरला असताना जयंत पाटील यांनी काँग्रेसला न विचारता परस्पर आपल्या आघाडीची घोषणा केली. त्यांनी काँग्रेसचे तुल्यबळ नेते माजी मंत्री मदन पाटील यांना आपल्याकडे ओढून मोठी खळबळ उडवून दिली.

जयंत पाटील आघाडीने पंधरा जागा जिंकून बँकेची सत्ता काबीज केली. परंतु या विजयाबाबत आघाडीत उत्साह मात्र दिसत नव्हता. कारण ज्यांच्यासाठी आघाडीत बिघाड करुन रणनिती आखली. तेच मोहरे या निवडणुकीत पराभूत झाले.

राष्ट्रवादीचीच सरशी; काँग्रेसला दोन जागा

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनेच पुन्हा बाजी मारत २१ पैकी १९ जागा जिंकल्या. या विजयाने राष्ट्रवादीने बँकेवरील आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. दोन जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. सात जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. त्या ठिकाणी राष्ट्रवादीनेच बाजी मारली होती. खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, प्रभाकर घार्गे, राजेंद्र राजपुरे, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्यासह दिग्गजांची बँकेवर बिनविरोध वर्णी लागली होती. परंतु, उर्वरित १४ जागांसाठी निवडणूक लागली होती. त्यामध्ये विरोधक प्रबळ नसल्याने पुन्हा राष्ट्रवादीच जिंकणार अशी जिल्हावासीयांची खात्री होती. विलासराव उंडाळकर यांनी ८७ मते मिळवून व आमदार जयकुमार गोरे यांनी ३८ मते मिळवत विजय संपादन करत काँग्रेसचेही आव्हान जिवंत ठेवले आहे. उर्वरित सर्व जागा राष्ट्रवादीने जिंकून सहकारातील आपला दबदबा कायम राखला आहे. अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघांतून शेतकरी विकास पॅनेलच्या प्रकाश बडेकर यांनी विजय संपादन केला. नागरी बँका व पतपेढ्या मतदासंघात एकूण ४४३ मतांपैकी ४४० जणांनी मतदान केले. त्यापैकी चार मते बाद ठरली. उर्वरित वैध ४३६ मतांपैकी शेतकरी विकास पॅनेलच्या राजेश वाठारकर यांना २७९ तर विरोधातील अपक्ष प्रभाकर साबळे यांना १५७ मते मिळाली. यामध्ये वाठारकर यांनी अपेक्षेप्रमाणे विजय मिळवला. कृषी व प्रक्रिया मतदासंघात एकूण ३० मतांपैकी सर्वच्या सर्व मते शेतकरी विकासच्या दादाराजे खर्डेकर यांनी घेऊन विरोधी राष्ट्रवादीच्याच बंडखोर आमदार बाळासाहेब पाटील यांचा दारुण पराभव केला. महिला राखीव मतदारसंघात एकूण २२७० मतांपैकी २१५२ मतदान झाले. त्यापैकी शेतकरी विकासच्या दोन उमेदवार सुरेखा पाटील व कांचन साळुंखे यांच्यात मुख्य लढत झाली. या ठिकाणी सुरेखा पाटील यांनी १७३५ मते घेत विजय मिळवला. खंडाळा मतदारसंघात दत्तानाना ढमाळ यांच्या विजयाने पक्ष संघटनेची ताकद मोठी असते हे अधोरेखित झाले आहे. फलटण मतदारसंघात रामराजे नाईक-निंबाळकर विजयी झाले. प्रथामिक कृषी पतपुरवठा मतदारसंघात शशिकांत शिंदेंनी विजय मिळवला. कुरश पतपुरवठा संघात नितीन पाटील यांनी विजय मिळवला. इतर मागास मतदारसंघातून प्रदीप विधाते यांनी विजय मिळवला. भटक्या विमुक्त जाती-जमातींमधून अर्जुनराव खाडे यांनी विजय मिळवला.

सकाळी सव्वा अकरा वाजता हे निकाल जाहीर झाले. निकाल जाहीर झाल्यावर गुलालाची उधळण करत व फटाक्यां आतिषबाजी करत कार्यंकर्त्यानी जल्लोष केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापालिका शाळांचे ‘पाऊल पडते पुढे’

$
0
0

सचिन यादव, कोल्हापूर

महापालिका शाळांचे आकर्षण वाढण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी येत्या जूनपासून महापालिका शाळांतील महापालिकेच्या ५७ शाळांतील साडेनऊ हजार विद्यार्थ्यांना काळे बूट आणि पांढरे सॉक्स दिले जाणार आहेत. ड्रेसकोडसह टाय आणि बूट यामुळे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा लुक बदलणार आहे.

महापालिका शाळांसमोर खासगी शाळांचे आव्हान उभे आहे. या आव्हानाला तोंड देण्यासाठी महापालिका शाळांत विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. त्या अंतर्गत शिक्षण मंडळ साडेनऊ हजार विद्यार्थ्यांना बूट देणार आहे. फूटवेअर असोसिएशन, सेवाभावी संस्था, उद्योगपती, टिंबर मार्केट असोसिएशन, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षणप्रेमींकडून या उपक्रमासाठी मदत घेण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना बूट आणि सॉक्स देण्यासाठी सुमारे दहा लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात येणार आहे. जमा झालेल्या रकमेतून दिल्लीतून होलसेल दरात शूज खरेदी केली जाणार आहे. एक बूट सुमारे १२५ रुपये किमतीला खरेदी करता येणार आहे.

सुमारे सव्वा महिन्याच्या कालावधीत या उपक्रमासाठी लागणारी आर्थिक मदत गोळा करण्यात येणार आहे. शिक्षण मंडळाच्या शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना बूट देण्याचा निर्धार आहे. यापूर्वी सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दरवर्षी गणवेश देण्यात येतो. यात ड्रेससोबत टायही देण्यात येणार आहे. ड्रेसकोडमुळे सेमी इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांचा लूक बदलणार आहे. यासह दर्जेदार गुणवत्ता वाढीत सातत्य ठेवले जाणार आहे.

पालिकेच्या शाळांच्या प्रगतीसाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सुमारे दीड हजार संस्थांना मदतीचे आवाहन करणारी पत्रे पाठविली जातील. निश्चितच येत्या जून महिन्यात महापालिका शाळांतील मुलांचा लुक बदलेल. - संजय मोहिते, सभापती, शिक्षण समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विश्वास पाटील ‘गोकुळ’चे अध्यक्ष

$
0
0

मटा प्रतिनिधी । कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदी विश्वास नारायण पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. ताराबाई पार्क येथील संघाच्या कार्यालयात झालेल्या संचालकांच्या बैठकीत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर गोकुळ शिरगाव येथील मुख्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अशोक पाटील आणि सहायक निवडणूक अधिकारी अरुण चौगुले यांनी पाटील यांच्या नावाची घोषणा केली.

अध्यक्षपदासाठी अरुण नरके, सुरेश पाटील आणि विश्वास पाटील यांच्या नावाची चर्चा होती. अखेरच्या टप्प्यात विश्वास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. नरके आणि सुरेश पाटील यांनी त्यांना पाठिंबा दिला.

'गोकुळच्या अध्यक्षपदाचा अनुभव असून संघाचा कारभार अधिक चांगल्या प्रकारे करू,' असा विश्वास पाटील यांनी निवडीनंतर बोलून दाखवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस आघाडीचे वर्चस्व

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (केडीसीसी) निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनसुराज्य पक्षप्रणीत छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीने निर्विवाद वर्चस्व राखले. भाजपने एक जागा जिंकत चंचुप्रवेश केला. नगरसेवक जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष मानसिंग गायकवाड यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले.

आघाडीतील पक्षांमध्ये सेवा संस्था गटांत मैत्रीपूर्ण लढती झाल्या. इतर गटांतील नऊपैकी आठ जागा आघाडीने जिंकल्या. बँका आणि पतसंस्था गटात परिवर्तन ‌आघाडीचे अनिल पाटील (भाजप) यांनी शेतकरी विकास आघाडीचे नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांचा चार मतांनी पराभव केला. रमणमळा येथील बहुउद्देशीय सभागृहात मतमोजणी झाली. सेवा संस्था गटात शाहूवाडीत मानसिंगराव गायकवाड यांचा 'जनसुराज्य'चे सर्जेराव पाटील-पेरीडकर यांनी दोन मतांनी पराभव केला. शिरोळमधून राष्ट्रवादीचे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी स्वपक्षीय माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर यांचा दणदणीत पराभव केला.

उर्वरित सेवा संस्था गटातून माजी मंत्री हसन मुश्रीफ (कागल), अशोक चराटी (आजरा), माजी आमदार के. पी. पाटील (भुदरगड), माजी आमदार नरसिंग गुरुनाथ पाटील (चंदगड), संतोष पाटील (गडहिंग्लज) अपेक्षेनुसार विजयी झाले. याच गटातून आमदार महादेवराव महाडिक (हातकणंगले), माजी आमदार पी. एन. पाटील (करवीर), माजी मंत्री विनय कोरे (पन्हाळा), ए. वाय. पाटील (राधानगरी) यांच्या बिनविरोध निवडी झाल्या आहेत. गगनबावड्याचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे.

कृषी पणन आणि शेतीमाल प्रकिया गटातून शेतकरी विकास आघाडीतील शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक आणि राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर (पन्हाळा) विजयी झाले. इतर शेती संस्था गटातून राष्ट्रवादीचे प्रताप उर्फ भैय्या माने (कागल) विजयी झाले.

महिला गटातून राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने, काँग्रेसच्या उदयानी साळुंखे विजयी झाल्या. भटक्या आणि विमुक्त गटातून काँग्रेसचे अप्पी पाटील (गडहिंग्लज) विजयी झाले. अनुसूचित जाती-जमातीतून माजी अध्यक्ष राजू जयवंतराव आवळे विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांचा पराभव केला. इतर मागासवर्गीय गटातून काँग्रेसचे विलासराव गाताडे विजयी झाले.

पक्षनिहाय संचालक

राष्ट्रवादी काँग्रेस : हसन मुश्रीफ, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, संतोष पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, प्रताप उर्फ भैय्या माने, निवेदिता माने, अशोक चराटी, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर

काँग्रेस : महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील, राजू आवळे, विलासराव गाताडे, अप्पी पाटील, उदयानी साळुंखे.

जनसुराज्य शक्ती : विनय कोरे, सर्जेराव पाटील-पेरीडकर

शिवसेना : प्रा. संजय मंडलिक

भाजप : अनिल पाटील

इतर : नरसिंग गुरुनाथ पाटील.

अडचणीतील बँकेला बाहेर काढण्यासाठी काँग्रेस, जनसुराज्यसह सर्वच पक्षांनी एकत्र यावे यासाठी आम्ही पुढाकार घेतला. त्याला यश मिळाले. सभासदांनीही आमच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देत चांगला कौल दिला आहे. त्यांचा विश्वास सार्थ ठरवत बँकेला पुनर्वैभव प्राप्त करून देऊ. - हसन मुश्रीफ, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेचे १० कोटी आयुक्तांकडे जमा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

सांगली-मिरज-कुपवाड महापालिका प्रशासनाने हरित लवादाच्या आदेशानंतर घनकचरा प्रकल्पासाठी आणखी दहा कोटी रुपये विभागीय महसूल आयुक्तांकडे जमा केले. या पूर्वी १० कोटी जमा केले आहेत.

लवादाने सुनावणीच्यावेळी या प्रकल्पासाठी महसूल आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची अभ्यास समिती नियुक्त केली जावी. तसेच या समितीत आर्थिक नियोजनासाठी गोखले इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स, पुणे. तांत्रिक नियोजनासाठी आयआयटी मुंबई आणि सांगलीचे वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय या संस्थांच्या तज्ज्ञ व्यक्तींचा अंतर्भाव केला जावा. या समितीने एक महिन्यात हरित लवादावा अहवाल सादर करावा असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सांगली जिल्हा सुधार समितीतर्फे अॅड. अमित शिंदे, आर्किटेक्ट रवींद्र चव्हाण, प्रा. आर. बी. शिंदे यांनी या घनकचरा प्रकरणी हरित लवादात याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणी झाली. महापालिकेने गेल्या १५ वर्षांत घनकचरा व्यवस्थापन प्रकरणी काहीही केले नाही म्हणून पुण्याच्या हरित लवादाने ६० कोटी विभागीय आयुक्तांकडे जमा करण्याचा आदेश पालिकेला दिला होता. महापालिकेने त्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात अपील केलेले फेटाळले गेले होते.

कोल्हापूरच्या धर्तीवर प्रकल्प

हरित न्यायालयाने कोल्हापूरच्या धर्तीवर त्वरित घनकचरा प्रकल्प राबवा आणि टप्प्याटप्प्याने ६० कोटी जमा करा असेही आदेशात म्हटले आहे. महापालिकेने त्यानुसार ६० कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प सादर केला आहे. आता सांगली महापालिका कोल्हापूर महापालिका धर्तीवर हा प्रकल्प राबविणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संभाजी भिडे यांची सांगलीत पोलिसगिरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

सांगलीतील चाटे शिक्षण समूहाच्या राजर्षी शाहू महाराज ज्युनिअर कॉलेजमध्ये अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग करणाऱ्या मयूर कल्लाप्पा कुंभार (वय २७, दानोळी) याला कोर्टाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, शिवप्रतिष्ठानने संभाजीराव भिडे-गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली संबधित कॉलेजसमोर निदर्शने करीत पोलिसगिरी केली. तेथील सर्व शिक्षकांना कान धरून समाजाची माफी मागण्यास भाग पाडले. त्याचबरोबर तेथील क्लास आणि कॉलेज बंद ठेवण्याचे लेखी लिहून घेतले.

सांगलीतील चांदणी चौकानजीक चाटे कोचिंग क्लास आणि ज्युनिअर कॉलेज एकाच इमारतीत आहे. गुरुवारी दुपारी संबधित अल्पवयीन मुलीला मयूर कुंभारने पालक आल्याचे सांगून तिला लॅबमध्ये जाण्यास सांगितले. पाठीमागून जावून त्याने तिचा विनयभंग केला. त्यावेळी तिने बाथरुममध्ये स्वतःला कोंडून घेऊन मोबाईलवरुन पालकांशी संपर्क साधला. पालकांनी तेथे धाव घेऊन तिची सुटका केली. हा घृणास्पद प्रकार समोर येतात संतप्त नागरिकांनी त्या शिक्षकाला चोप देवून पोलिसांच्या ताब्यात दिले. विश्रामबाग पोलिसांनी त्याच्यावर नवीन महिला व बाल अत्याचार प्रतिबंध कायदा आणि दलित अत्याचार विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

खासगी क्लासमध्ये घृणास्पद प्रकार झाल्याचे समोर येताच शिवप्रतिष्ठानचे भिडे गुरुजी यांनी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन अशा प्रकारांना आळा घालण्याची मागणी केली. त्यानंतर प्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांच्यासह कार्यकर्त्यांचा जथ्था घेऊन जावून संबधित कॉलेजसमोर निदर्शने केली. त्यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनीही या आंदोलनात सहभाग घेतला होता. तेथील सर्व शिक्षकांना बाहेर बोलवून एका ओळीत उभा करून कान धरून पुन्हा असे प्रकार या ठिकाणी होऊ देणार नाही, अशी शपथ घ्यायला लावली. माफीनामा लिहून घेतला. या वेळी पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्र, राज्य सरकार गंभीर नाही

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी अवकाळी पावसाने आणि गारपीट झाल्याने संकटात आहेत. देशातील अनेक भागातील शेतकऱ्यांचे हातातोंडाला आलेली पीके गेली आहेत. महाराष्ट्रात राज्य सरकार अजूनही या बाबत गंभीर नाही. संसदेच्या अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सोमवारपासून असून या संकटावर मात करण्यासाठी मी पुढाकार घेतला आहे. संसदेच्या सभागृहात हा विषय उपस्थित करून यातून काही तरी मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करू. परंतु, केंद्र सरकारही या बाबत गंभीर नसल्याने यातून मार्ग निघेल की नाही हे सांगणे आता अवघड आहे. शेतकरी संकटात असताना स्वस्थ बसण्याची परिस्थिती नाही, असा आरोप करीत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांच्या धोरणाबाबत टीका केली.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नूतन संचालकांचे अभिनंदन आणि जिल्ह्यातील अवकाळी आणि गारपीटग्रस्तांना बँकेच्या वतीने मदतनिधी देण्यात आला. त्याचे वाटप माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

पवार पुढे म्हणाले, 'राज्यातील जिल्हा बँकेच्या निवडणुकाचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. त्यात सभासदांच्या विश्वासास पात्र ठरून काम करणाऱ्यांना पुन्हा संधी मिळाली. सध्या अनेक प्रश्न निर्माण झाले असून, शेती व्यवसाय संकटात आहे. साखरेच्या किंमतीही ढासळल्या असून, साखरेचा साठाही जास्त झाला आहे. त्याचप्रमाणे पुढील वर्षी होणाऱ्या ऊसाची लागणही मोठ्या प्रमाणात झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुद्धा साखरेचे दर कोसळले आहेत. त्यामुळे कारखान्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भाव देता येत नाही. अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे अनेक शेतकऱ्यांचे हाताचे पीक गेले आहे. अशावेळी राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम केले पाहिजे. परंतु, राज्य सरकाराने अद्याप कोणताही ठोस भूमिका घेऊन अंमलबजावणी केलेली नाही. शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना पतपुरवठा करणाऱ्यांची परिस्थितीसुद्धा गंभीर होण्याची शक्यता आहे. या संस्थांना पुढील वर्ष आव्हानात्मक असणार आहे. परंतु, संकटावर मात करून यातून मार्ग काढला पाहिजे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रदूषणप्रश्नी फौजदारी करा

$
0
0

कोल्हापूरः पंचगंगा नदी व रंकाळा तलावाच्या प्रदूषणाची जबाबदारी निश्चित करुन महापालिकेच्या आयुक्तांसह जबाबदार सर्वांवर पर्यावरण संरक्षण कायदा तसेच फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्याची मागणी प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह विभागीय आयुक्तांकडे केली आहे. मंडळाच्या सदस्य सचिवांकडे केलेल्या मागणीमध्ये संस्थेने कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने कायदा राबवण्यास सदस्य स​चिवांनी दिलेला नकार असंवेदनशील व अमानवी आहे. त्यामुळे नदी व इतर ठिकाणी प्रदूषण करणाऱ्यांना मोकळीक देण्यास कारणीभूतही ठरला आहे. मंडळ विविध शुल्कांच्या माध्यमातून निधी जमा करते. पण प्रदूषण रोखण्यासाठी वापर करत नाही. त्यातूनच प्रदूषण वाढल्याचे म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुंडांच्या मुसक्या आवळणार!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून निवडणूक लढवण्यासाठी गुंडांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणूक भयमुक्त वातावरणात व्हावी यासाठी कोल्हापूर पोलिस दलाने गुंडांच्या मुसक्या आवळण्यासाठी कारवाई सुरू केली आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याने हद्दीतील गुंडाचा क्राईम चार्ट करून हद्दपार व मोकाच्या कलमान्वये कारवाईसाठी आदेश देण्यात आले आहेत.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. काही गुंड व्हाइट कॉलर होण्यासाठी प्रयत्न करू लागले आहेत. या गुंडांनी वाढदिवस, अन्य कार्यक्रमांद्वारे शक्तीप्रदर्शन सुरू केले आहे. राजकीय नेतेही गुंडांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमांसाठी उपस्थित राहू लागले आहेत. कोल्हापूर दक्षिणच्या राजकारणामुळे गुंड आपल्या गोटात असावेत यासाठी धडपड नेते धडपड करीत आहेत. सर्वसामान्य नागरिक गुंडाच्या विरोधात तक्रार देण्यास धजावत नसल्याने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी अशा गुंडाचा क्राईम चार्ट तयार करण्याचे आदेश शहरातील चारही पोलिस ठाण्यांना दिले आहेत. क्राईम चार्ट एकत्र करून विधी विभागाचा सल्ला घेऊन अशा गुंडाच्यावर हद्दपारी व मोका कायद्याद्वारे कारवाई करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहेत. गेल्या दोन वर्षात कोल्हापूर परिक्षेत्रातील ३० टोळ्यांना मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. महसूल खात्याने पोलिस खात्याला साथ दिल्यास गुंडाच्या मुसक्या आवळणे सोपे जाणार आहे.

दरम्यान, पाच वर्षांपूर्वीच्या महापालिका निवडणुकीपूर्वी अवधूत माळवीचा खून झाला होता. तशी परिस्थिती पुन्हा उद्भभवू नये यासाठी पोलिसांनी दक्षता बाळगण्यास सुरूवात केली आहे. १९९०च्या निवडणुकीत शिवाजी पेठेत एका गुंडाने निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले होते. तत्कालीन पोलिस अधीक्षक शिवप्रताप यादव यांनी हे प्रयत्न उधळून लावल्याने निवडणूक भयमुक्त वातावरणात झाली होती. आगामी निवडणुकीत काही गुंडांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी यंत्रणा सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरण प्रकल्प मार्गी

$
0
0

मारुती पाटील, कोल्हापूर



राज्याला विशेषतः मराठवाडा आणि विदर्भाला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असताना पाण्याचा प्रचंड साठा असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याला भविष्यात टंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी रखडेल्या प्रकल्पांसाठी ४३ कोटींच्या निधींची तरतूद करण्यात आली आहे. मिळालेल्या निधीमुळे जांबरे, कार्जीणे प्रकल्प पूर्णात्वाकडे जाणार आहेत. यामुळे या वर्षापासूनच या धरणाच्या घळभरणीला सुरुवात होणार आहे. याचा सर्वाधिक फायदा चंदगड तालुक्यातील शेतीला होणार आहे. टंचाईवर मात करण्यासाठी कोल्हापूरसह औरंगाबाद विभागातील ५२ प्रकल्पांच्या सुधारित आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे.

दुसरीकडे लाभक्षेत्रात पुनर्वसन करावे अशी अपेक्षा असल्याने पुनर्वसनाचे भिजत घोंगडे आहे. यामुळे जिल्ह्यातील तीन मध्यम व तीन लघू प्रकल्प केवळ निधीअभावी रखडले आहेत. प्रशासकीय पातळीवर घळभरणीसाठी तयार असलेल्या प्रकल्पांच्या सुधारित आराखड्याला मंजुरी मिळत असल्याने जिल्ह्यातील केवळ जांबरे व कार्जीणे प्रकल्पांचा सुधारित आराखडा मंजूर झाला आहे. वर्षअखेरपर्यंत प्रकल्पांचे काम पूर्ण झाल्यानंतर चंदगड तालुक्यातील जिरायत शेती ओलीताखाली येणार आहे. पिण्याचा पाण्याचा प्रश्नही काहीअंशी मिटणार आहे.

राज्यातील दुष्काळ स्थितीवर मात करण्यासाठी 'जलयुक्त शिवार अभियाना'नंतर रखडलेल्या प्रकल्पांना निधी देऊन सरकारने ठोस पाऊल उचलले आहे. यामध्ये ज्या प्रकल्पांना निधी मिळाल्यानंतर घळभरणी त्वरित होऊ शकते अशाच प्रकल्पांचा आराखडा प्रशासकीय पातळीवर मंजूर करण्यात आला आहे. कृष्णा खोरे लवादानुसार जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाने आपल्या वाट्याचे १०९ टीएमसीपैकी ९६ टीएमसी पाणी अडवण्यात जलसंपदा विभागाला यश आले आहे. निधी मिळाल्यामुळे आणखी ०.९६५ टीएमसी पाणी अडवण्यात यश येणार आहे. प्रकल्पग्रस्तांची लाभक्षेत्रात पुनर्वसन करावे, अशी अपेक्षा असल्याने एक हजार १४८ हेक्टर क्षेत्र प्रकल्पग्रस्तांना देय आहे. पुनर्वसनाचा प्रश्न निकालात निघाल्यास धामणीसारखा प्रकल्प त्वरित मार्गी लागण्याची शक्यता आहे.

दुहेरी कात्रीत धामणी प्रकल्प

काळम्मावाडीनंतर सर्वांत मोठा प्रकल्प अशी धामणी प्रकल्पाची ओळख आहे. धरणाच्या पायथ्याशी असलेल्या राई गावच्या पुनर्वसनाचा प्रश्न जटील बनला आहे. त्यामुळे सुधारित आराखडा तयार करण्यासही जलसंपदा विभागाला अडचण येत आहे. पुनर्वसन केल्याशिवाय घळभरणी होऊ शकत नसल्याने धामणी प्रकल्प दुहेरी कात्रीत सापडला आहे.

जे प्रकल्प पूर्णत्वाकडे आहेत त्यांना तत्काळ निधी दिला जाणार आहे. राज्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी औरंगाबाद विभागातील ५२ प्रकल्पांच्या सुधारित आराखड्याला मंजुरी दिली आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील पूर्णत्वाकडे निघालेल्या प्रकल्पांच्या सुधारित आराखड्याला मंजुरी दिली आहे.

- गिरीष महाजन, जलसंपदा मंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंबाघाटातील दरीत कोसळून तरुण ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आंबा

आंबाघाटातील सातशे फूट खोल दरीत कोसळून विक्रम भीमराव धुमाळ (वय २८, रा. शेणे (कासेगाव) या तरुणाचा मृत्यू झाला. साखरपा पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे. आंब्यातील आपत्कालीन यंत्रणेने भर उन्हात कडा चढून सहा तासाच्या अथक प्रयत्नाने मृतदेह रस्त्यावर आणला. विक्रम लघुशंकेसाठी घाटात उतरला होता. त्याचा मृतदेह पाहून आई छाया धुमाळ व बहीण-भावांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवून टाकणारा होता.

याबाबत अधिक माहिती अशी, धुमाळ कुटुंब सकाळी नउला शेणेहून ट्रॅक्सने (क्रमांक एमएच ०९ एक्यू २३४६) रत्नागिरीकडे निघाले होते. अकराच्या सुमारास विक्रम लघुशंकेसाठी गायमुखजवळील वळणावर उतरला. आडोश्याला जाताना पाय घसरून तो थेट सातशे फूट दरीत कोसऴला. डोक्याला गंभीर मार बसल्याने तो जागीच ठार झाला.

साखरपा पोलिसांनी आंब्यातील आपत्कालीन यंत्रणेशी संपर्क साधला. काही तरुण विक्रमला शोधण्यासाठी दरीत उतरले. तासाच्या शोधमोहीम नंतर विक्रम मृत अवस्थेत दिसला. त्यांनी मृतदेह बाहेर काढला. या मोहिमेत मोनेरा फाउंडेशनचे सचिव प्रमोद माळी आपत्कालीन यंत्रणेचे राजेंद्र लाड, कृष्णा दळवी, मंगेश बागम, दत्ता जाधव, सरदार वरेकर आदींनी सहभाग नोंदवला. अधिक तपास फौजदार दिलीप पवार, पोलिस निरीक्षक डी. टी. बेन करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमा सुरक्षा कवच आजपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेला शनिवारपासून (ता. ९) सुरुवात होत आहेत. या विमा योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात १ लाख १३ हजार ६५० खाती उघडण्यात येणार आहेत. बँकांशिवाय स्वस्त धान्य वितरण केंद्रे, गॅस वितरक, बँकिंग मित्र यांच्यामार्फत योजनेचे फॉर्म भरून घेतले जाणार आहेत. योजना राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि ग्रामीण बँकांच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहेत. केडीसीसीच्या १९१ शाखा, २२ राष्ट्रीयीकृत बँकांच्या २२० शाखा आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या सहा शाखांतून या योजना ग्राहकांना उलपब्ध करून दिल्या जाणार आहेत. बँक ऑफ इंडियाचे लिड बँकेचे जिल्हा व्यवस्थापक एम. जी. कुलकर्णी यांनी पत्रकातून ही माहिती दिली आहे.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत १८ ते ७० वयोगटातील नागरिक पात्र आहेत. त्यासाठी वर्षाला १२ रुपये हप्ता असून अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास २ लाख रुपये नुकसान भरपाई, अपंगत्वासाठी १ लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाणार आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत, ज्यांचे बँकेत खाते आहे अशा १८ ते ५० वयोगटातील सर्व लोकांकरीता ३३० रुपये वार्षिक हप्ता असेल. यात कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास २ लाख वारसास मिळतील. ५० व्या वर्षी सहभागी झाल्यास ५५ वा वर्षापर्यंत फायदा घेता येणार आहे. योजनेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी बैठक झाली. शनिवारी जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक, अंगणवाडी शिक्षक, अंगणवाडी सहायक तसेच 'नरेगा'मधील लाभार्थी, संजय गांधी योजना लाभार्थी, इंदिरा आवास योजना लाभार्थ्यांचे फॉर्म भरून घेतले जाणार आहेत. शनिवारी साईक्स एक्स्टेंशन येथील महालक्ष्मी सांस्कृतिक भवनात सकाळी ९ वाजता या योजनांची सुरुवात होणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी उपस्थित असतील.

अटल पेन्शन योजना

याशिवाय केंद्र सरकारकडून अटल पेन्शन योजना सुरू होत असून त्याचे प्रत्यक्षात खाते उघडण्याचे काम सुरू होण्यास काही अवधी लागणार आहे. ही योजना असंघटीत क्षेत्रासाठी असून १८ ते ४० वर्षांपर्यंतचे नागरिक यात सहभागी होऊ शकतील. राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडून या योजनेत सहभागी होता येणार आहे. ह्या योजनेत २० वर्षे ‌किंवा त्याहून जास्त वर्षे ठराविक वयोमर्यादेनुसार रकम भरल्यास ६० वर्षांनंतर मासिक एक हजार ते पाच हजार रुपये पेन्शन मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शॉक लागून कामगाराचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विजेचा शॉक लागल्याने शाहआलम अतिऊर रेहमान (वय २३) या कामगाराचा शुक्रवारी दुपारी मृत्यू झाला. शाहआलम मूळचा उत्तर प्रदेशमधील असून सध्या तो पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) राहत होता. शिरोली एमआयडीसीतील फॅब्रिकेशनच्या कारखान्यात काम करताना त्याला शॉक बसला. उपचारासाठी सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. सीपीआर पोलिस चौकीत मृत्यूची नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचप्रकरणी तलाठ्यासह कोतवालाला सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एक हजाराची लाच घेणारा मौजे पाचगाव येथील तलाठी बाळू भोपाळ कोळी (रा. अब्दुललाट, ता. शिरोळ) याला दीड वर्षाची आणि कोतवाल बाबूराव बाजीराव भोसले (रा. मोरेवाडी, ता. करवीर) याला सहा महिन्याची शिक्षा द्वितीय जिल्हा व सत्र न्यायाधीश के. डी. बोचे यांनी ठोठावली.

पाचगाव येथे २००८ मध्ये तलाठी बाळू कोळी आणि कोतवाल बाबूराव भोसले कार्यरत होते. बाबासाहेब रामचंद्र वाघवेकर (रा. दादू चौगुले नगर, कळंबा, ता. करवीर) यांनी खरेदी केलेल्या दस्ताची नोंद सातबारा पत्रकारावर करण्यासाठी त्यांनी तलाठी कोळी यांच्याकडे १ फेब्रुवारी २००८ रोजी अर्ज केला होता. पण कोळी हे उतारा देण्यासाठी टाळाटाळ करत होते. दोन महिन्यानंतर कोळी यांनी या नोंदीसाठी एक हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर वागवेकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला. ७ एप्रिल २००८ मध्ये कोळी यांच्यावतीने वाघवेकर यांच्याकडून एक हजार रुपये स्वीकारताना कोतवाल भोसले याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर दोषारोपपत्र दाखल केले होते.

या खटल्याची सुनावणी न्यायाधीश बोचे यांच्यासमोर झाली. जिल्हा सरकारी वकील दिलीप मंगसुळे यांनी तीन साक्षीदार तपासून केलेला युक्तीवाद ग्राह्य मानत न्यायालयाने तलाठी कोळी यांना दीड वर्षाची सक्तमजुरी, सात हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. कोतवाल बाबूराव भोसले याला सहा महिने सक्तमजुरी, चार हजार रुपयांचा दंड ठोठावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूमिहीन शेतमजुरांना आधार

$
0
0

मोहसीन मुल्ला, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (केडीसीसी) नवनिर्वाचित संचालक मंडळ सत्तेवर आल्यानंतर जिल्ह्यातील दूध व्यवसाय विकसित करण्यासाठी विशेष लक्ष दिले जाणार आहे. यामध्ये भूमिहीन शेतमजुरांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी गाई आणि म्हशी घेण्यासाठी विशेष कर्ज योजना राबविण्यात येणार आहे. तसेच पीक कर्जाची ६०-४० ही योजना पुन्हा सुरू केली जाणार आहे. जिल्हा बँकेचे संचालक पी. एन. पाटील यांनी 'मटा'शी बोलताना ही माहिती दिली. नवीन संचालक मंडळाने कामकाज सुरू केल्यानंतर या योजना सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पाटील म्हणाले, 'भूमिहीन शेतमजुरांसाठी बँकेत सध्या कोणतीही योजना नाही, त्यामुळे त्यांना दारिद्र्यात दिवस काढावे लागतात. त्यांच्या विकासासाठी त्यांना एक गाय किंवा एक म्हैस घेण्यासाठी कर्ज देण्यात येणार आहे. संबंधित शेतमजूर या जनावराचे किमान एकवेळचे दूध डेअरीला घालून त्याद्वारे कर्ज फेडेल व त्यांचे जीवनमान उंचावण्यात मदत होईल. दुसऱ्या योजनेते शेतकऱ्यांना आठ गायी किंवा आठ म्हशी घेण्यासाठी तसेच चांगला गोठा बांधण्यासाठी कर्ज देण्यात येईल. त्याची रक्कम जवळपास चार लाखांच्या आसपास असू शकेल. यापूर्वी १९९० ला अध्यक्ष असताना ही योजना राबवली होती.'

पाटील पुढे म्हणाले, 'बँकेच्यावतीने पीककर्ज देताना पूर्वी ६० टक्के रक्कम कर्ज स्वरूपात, तर ४० टक्के खतांच्या स्वरूपात दिली जात असे. सेवा संस्थातून ही खते दिली जात असत. प्रशासक काळात ही पद्धत बंद होऊन सर्वच कर्जरकमेच्या स्वरूपात दिली जाऊ लागली. ६० टक्के रोख आणि ४० टक्के खत स्वरुपात देण्याची पद्धत हीच शेतकऱ्यांसाठी योग्य होती. सर्व रक्कम हातात पडल्यानंतर ती खर्च होण्याचीच शक्यता जास्त असते. खत स्वरूपात कर्ज मिळाल्यानंतर खते वेळेवर पिकांना दिली जात होती. सेवासंस्थातून दिली जाणारी खते तालुका संघांनी थेट फॅक्टरीतून घेतलेली असल्याने चांगल्या दर्जाची असतात. त्यामुळे हीच पद्धत पुन्हा सुरू केली जाणार आहेत. शेतकरी केंद्रस्थानी ठेवून जास्तीत जास्त योजना राबवल्या जाणार आहेत.'

भूमिहीन शेतमजुरांसाठी सध्या कोणतीही योजना नाही. त्यामुळे केडीसीसीच्या माध्यमातून भूमिहीन शेतमजुरांना एक गाय किंवा एक म्हैस घेण्यासाठी कर्ज दिले जाणार आहे. यातून भूमिहीन शेतमजुरांना लाभ होईल. म्हशीचे एकवेळेच दूध जर डेअरीला घातले तरी हे कर्ज ते सहज फेडू शकतील, तर एकवेळचे दूध घरी वापरू शकतील. भूमिहीन शेतमजुरांची उन्नती व्हावी यासाठी ही योजना असेल.

- पी. एन. पाटील, संचालक, जिल्हा बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महाडिक-मुश्रीफांची पुन्हा गट्टी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोकुळ, राजाराम कारखाना आणि जिल्हा बँकेवर दोन्ही काँग्रेसने झेंडा फडकविल्यानंतर आता महापालिकेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. गोकुळ, जिल्हा बँकेच्या यशाचा फॉर्म्यूला महापालिकेत वापरण्याच्या दृष्टीने पावले पडत आहेत. ऑक्टोबरमध्ये होणारी निवडणूक आमदार महादेवराव महाडिक, आमदार हसन मुश्रीफ यांच्या आघाडीतर्फे लढवण्याची तयारी वेगावली आहे. कारभाऱ्यांना तसा संदेश मिळाल्याने आता उमेदवार शोधण्याची मोहीम सुरू झाली आहे. त्यामुळे माजी मंत्री सतेज पाटील यांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे.

साडेचार वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने चांगली भरारी मारली. मात्र कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. आमदार महाडिक यांना महापालिकेच्या राजकारणातून बाजूला ठेवण्याचा मुश्रीफ आणि सतेज पाटील यांचा डाव यशस्वी झाला. आता महापालिकेवर साडेचार वर्षे या दोघांचीच सत्ता आहे. ऑक्टोबरमध्ये होत असलेल्या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष हळूहळू सक्रीय होत आहेत. शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. भा​जपानेही चाचपणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीही सक्रीय होत आहेत. गोकुळ, राजाराम आणि जिल्हा बँकेवर सत्ता आल्याने दोन्ही पक्षाच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.

लोकसभा निवडणुकीत माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांना मदत केली. मात्र विधानसभा निवडणुकीत महडिक कुटुंबियांनी त्यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली. त्यामुळे पाटील यांचा पराभव झाला. त्याचा वचपा काढण्यासाठी गोकुळ, राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत पाटील यांनी महाडिक यांच्या विरोधात जोरदार टक्कर दिली. मात्र चार वर्षे सतेज पाटील यांच्यासोबत असणारे मुश्रीफ अचानक महाडिकांसोबत गेले. त्यामुळे पाटील एकाकी पडले. महाडिक-मुश्रीफ आघाडीने गोकुळमध्ये सत्ता मिळवली. जिल्हा बँकेच्या चाव्याही त्यांच्या ताब्यात गेल्या. त्यामुळे महापालिकेत काय होणार याबाबत उत्सुकता आहे.

गेल्या काही दिवसात ज्या हालचाली सुरू आहेत, त्यावरून मुश्रीफ-महाडिक यांची महापालिकेतही गट्टी होण्याची शक्यता आहे. कारभारी मंडळींना तसा संदेश देण्यात आला आहे. त्यामुळे आतापासून उमेदवार हेरण्याचे काम कारभारी मंडळींनी सुरू केले आहे. आगामी निवडणूक पुन्हा पक्षाच्या चिन्हावर होण्याचीच दाट शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेतृत्व सतेज पाटील यांच्याकडेच राहणार आहे. महापालिकेत पी. एन. पाटील यांचा फारसा रस नसल्याने ते नेहमीप्रमाणे लांबच राहण्याची चिन्हे आहेत. महाडिक हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या तीन पक्षांमध्ये विभागले आहेत. त्यामुळे तिन्ही पक्षांमध्ये आपल्या गटाचे उमेदवार कसे निवडून येतील याचीच काळजी ते घेतील यात शंका नाही. अशावेळी पक्षाच्या चिन्हाकडे दुर्लक्ष करण्यातही ते फारसा विचार करणार नाहीत. महापालिकेत सतेज पाटील यांचे वर्चस्व कमी करण्यासाठी जे करता येईल ते करण्यात महाडिक आघाडीवर असतील. त्याचा पहिला टप्पा म्हणून मुश्रीफ यांना सोबत घेण्याचे संकेत आहेत. तशा हालचाली सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, महापालिकेची आगामी निवडणूक नजरेसमोर ठेऊन अन्य पक्षांनीही आपल्या हालचाली गतिमान केल्या आहेत. आयत्या वेळी काय खेळी करता येईल यावर भर देत आतापासून उमेदवारांचा शोध सर्वच पक्षांनी सुरू केला आहे. त्यातून विरोधकांवर कुरघोडी करण्याचे राजकारण सुरू झाले आहे. भागातील कार्यक्रमांत त्याचे प्रत्यंतर दिसत आहे.

निवडणुकीला अद्याप अवकाश आहे. मात्र आमचे टार्गेट ठरले आहे. हे टार्गेट काय आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. आम्हाला विरोध करणाऱ्यांना बाजूला करण्यासाठी जे-जे काही करता येईल ते सारे करू. त्यासाठी गोकुळ, केडीसीसीचा फॉर्म्यूला वापरण्याचा प्रस्तावही असू शकेल.

- महादेवराव महाडिक, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचगंगा स्मशानभूमीवर पडतोय ताण

$
0
0

सतीश घाटगे, कोल्हापूर

वाढती उपनगरे आणि कदमवाडी, बापट कॅम्प या परिसरातील स्मशानभूमींकडे पाठ फिरवून पंचगंगा स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार करण्याचा नातेवाईकांचा आग्रह यामुळे मोफत अंत्यसंस्काराची सोय असलेल्या पंचगंगा स्मशानभूमीवरील ताण वाढला आहे. कदमवाडी आणि बापट कॅम्पचा वापर परिसरातील नागरिकांनी घेतला तर पंचगंगा स्मशानभूमीवरील ताण कमी होऊ शकतो.

पंचगंगा स्मशानभूमीवर दहनासाठी ४० प्लॉट आहेत. येथे रोज सरासरी दहा मृतदेहांवर अंत्यसंस्कार होतात. मात्र मंगळवार, शुक्रवार, अमावस्या, पोर्णिमा, संकष्टी चतुर्थी, एकादशी या दिवशीच रक्षा विसर्जन होत असल्याने महिन्यातून दहा ते पंधरा दिवस दहनाला अडचणी येतात. कसबा बावडा, कदमवाडी, बापट कॅम्प येथेही स्मशानभूमी आहे. कसबा बावडा, रमणमळा परिसरातील मृतदेहांचे दहन कसबा बावड्यात होते. मार्केट यार्ड, रुईकर कॉलनी, टेंबलाई, विक्रमनगर, शिवाजी पार्क, ताराबाई पार्क परिसरातील नागरिकांना कदमवाडी आणि बापट कॅम्प स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याची सोय आहे. मात्र, तेथे जाण्याची नागरिकांची मानसिकता झालेली नाही.

बापट कॅम्प आणि कदमवाडीत आठ प्लॉट आहेत. कदमवाडीपासून नदी लांब आहे. पण बापट कॅम्प नदीजवळ आहे. दोन्ही ठिकाणी रक्षा कुंड आहेत. दोन्ही स्मशानभूमींजवळील नागरिकांनी याचा वापर केला तर पंचगंगा स्मशानभूमीवर ताण कमी होऊ शकेल. नागरिकांच्या प्रवासाचा वेळही वाचू शकेल. दरम्यान, रक्षा विसर्जनाची मुख्य अडचण होत आहे. या विधीला वेळही लागतो. त्याचा फटका नातेवाईकांना बसतो. शहराच्या दक्षिण व पश्चिमेकडील उपनगरे, महापालिका हद्दीबाहेरील पाचगाव, मोरेवाडी, फुलेवाडी रिंगरोड, नागदेववाडी भाग, आंबेवाडी, वडणगे चिखलीतील अंत्यसंस्कार पंचगंगा स्मशानभूमीतच होत असल्याने ताण पडत आहे. तेथे १६ कर्मचारी आहेत. तीन शिफ्टमध्ये काम चालते. प्रत्येक शिफ्टला पाच कर्मचारी असतात. रात्रीची शिफ्ट रात्री आठ ते सकाळी आठ अशी आहे. या वेळेत साफसफाई, सरण रचण्याचे काम चालते. सकाळी व दुपारच्या शिफ्टमध्ये रक्षा विसर्जनानंतर प्लॉट स्वच्छ करणे, नवैद्य गोळा करून त्याची विल्हेवाट लावली जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोज ३० हजार रुपयांचा दंड

$
0
0

आप्पासाहेब माळी, कोल्हापूर

दुधाळी नाल्यावरील १७ दशलक्ष घनमीटर (एमएलडी) सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे लक्ष्मी इंजिनीअर्स या ठेकेदार कंपनीला रोज ३० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाने ऑक्टोबर २०१५पर्यंत दुधाळी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) प्रकल्प कार्यान्वित करणार असल्याचे कोर्टाला सांगितले आहे. मात्र, प्रकल्पाची सद्यस्थिती पाहता जून २०१६ पर्यंत मुदतवाढ मिळावी, असे म्हणणे महापालिकेने मांडले आहे.

नाल्याद्वारे पंचगंगेत थेट सांडपाणी ​​मिसळत आहे. दुधाळीतील सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी एसटीपी प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय झाला. केंद्र सरकारच्या 'यूआयडीएसएसएमटी' प्रकल्पांतर्गत २६ कोटी रुपयांचा निधी मिळाला. २०१३ मध्ये लक्ष्मी इंजिनीअर्सला 'वर्क ऑर्डर' देण्यात आली. ऑगस्ट २०१४ मध्ये प्रकल्पाचे काम सुरू झाले. कंपनी सध्या जॅकवेल उभारणीचे करीत आहे. मात्र दोन वर्षांपासून प्रकल्पाचे काम संथ गतीने सुरू आहे. कंपनीला जलद काम करण्यच्या सूचना महापालिका प्रशासनाने दिल्या होत्या. मात्र करारानुसार काम होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत जल अभियंता मनीष पवार यांनी सांगितले, 'कंपनीची महापालिकेकेकडे एक कोटी रुपयांहून अधिक अनामत रक्कम आहे. या रकमेतून दंड वसूल केला जाणार आहे. सुरुवातीला कंपनीला दरदिवशी १० हजार रुपये दंड केला जात होता. नंतर ही रक्कम रक्कम वीस हजार रुपये करण्यात आली. जानेवारी २०१५ पासून ३० हजार रुपये दंड आकारला जात आहे. कंपनीला सूचना केल्यामुळे प्रकल्पाच्या कामाला वेग आला आहे. एसटीपीचे काम तातडीने पूर्ण होण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.'

पाच हजारांवर घरांतील मैला रंकाळ्यात

देवकर पाणंद, साळोखे पार्क, तुळजाभवानी कॉलनी, टिंबर मार्केट, सरनाईक कॉलनी परिसरातील सुमारे पाच हजारांंवर घरांतील मैलायुक्त सांडपाणी ड्रेनेजलाइनअभावी पावसामुळे थेट रंकाळा तलावात मिसळते. या भागात काही ठिकाणी भुयारी गटार योजनेच्या पाइप टाकण्यात आल्या आहेत. मात्र आवाहन करूनही अनेकांनी ड्रेनेज लाइनच्या जोडण्या घेतल्या नाहीत. अपार्टमेंट आ​णि बंगलेधारकांनी सेफ्टी टँकअंतर्गत शोषखड्डा तयार करायचा आहे. मात्र अनेकांनी शोषखड्डा न काढता सेफ्टी टँकची तोटी थेट गटारीला जोडली आहे. गटारीतून सांडपाण्यासोबत मैला वाहून जातो. श्याम सोसायटी, सरनाईक वसाहत, देशमुख हॉल, परताळाकडील नाल्याला ही गटारे मिळतात. सांडपाणी वाहून नेण्यासाठी पाइपलाइन टाकली आहे. मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नाले भरून वाहिले. मैलायुक्त सांडपाणी, रसायनयुक्त घटक तलावात मिसळल्याचे महापालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हे सांडपाणी रोखण्यासाठी महापालिकेने प्राधान्याने दुधाळी एसटीपी प्रकल्प पूर्ण करून या भागातील ड्रेनेज लाइन जोडल्या पाहिजेत, तरच पावसाळा आणि अवकाळी पावसात तुंडूब वाहणाऱ्या नाल्यांतून मैलायुक्त सांडपाणी तलावात मिसळणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरपद : माळवी यांना नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लाचखोरी प्रकरणात पोलिस कारवाईस सामोरे जावे लागलेल्या महापौर तृप्ती माळवी यांना नगरसेवक व महापौरपदावरून काढून का टाकू नये, अशी विचारणा करणारी नोटिस राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने बजावली आहे. माळवी यांना म्हणणे मांडण्यासाठी दहा दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

महापौर माळवी या लाचखोरी प्रकरणात सापडल्यामुळे महापौरपदाची बदनामी झाली आहे. लाचखोरी प्रकरणी त्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्यावर कारवाई झाल्यामुळे महापालिका अधिनियमानुसार त्यांचे नगरसेवक पद रद्द करावे व महापौरपद काढून घ्यावे अशी शिफारस करणारा ठराव महापालिका सर्वसाधारण सभेने २० मार्च रोजी मंजूर केला होता. पक्षाने व्हिप बजावल्यामुळे महापौर माळवी यांना आपल्याच विरोधातील ठरावाच्या बाजूने मतदान करावे लागले होते. सभागृहाने मंजूर केलेल्या ठरावावर महापौर माळवी यांनी तब्बल एक महिन्याने म्हणजे २० एप्रिलला सही केली होती. महापौरांच्या सहीनंतर मंजूर ठराव प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठविला होता. त्यावर नगरविकास विभागाचे सहसचिव प्र. ता. गौड यांनी शुक्रवारी सायंकाळी नोटिस बजावली आहे. महापौरांच्या दालनातच स्वीय सहाय्यकामार्फत १५ हजार रुपयांची लाच घेताना महापौरांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. त्यानंतर महापौरांनी राजीनामा द्यावा यासाठी दबाव वाढला आहे.

कुठल्याही कोर्टाने मला दोषी ठरवलेले नाही. माझ्यावर गुन्हा सिद्ध झालेला नाही. मुळात माझ्याविरोधात नगरसेवकांनी केलेला ठराव बेकायदा आहे. नगरसेवकपद रद्द करण्याबाबत सदस्यांचा ठराव रद्द करावा, अशी मागणी यापूर्वीच मी नगरविकास विभागाकडे केली आहे. तरीही आलेल्या पत्राबाबत म्हणणे सादर केले जाईल.

- तृप्ती माळवी, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उदय ठोंबरे यांचे हृदयविकाराने निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर : गेली तेरा वर्षे प्रभारी स्टेशन ऑफिसर म्हणून काम करणाऱ्या उदय ठोंबरे (वय ४३) यांना शुक्रवारी एक दिवस प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी बनण्याची संधी मिळाली. दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी लग्नाचा वाढदिवस. एकापाठोपाठ एक असे आनंदाचे क्षण अनुभवत असताना त्यांचे सकाळी हृदयविकाराने निधन झाले. या घटनेने ठोंबरे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

ठोंबरे अग्निशमन दलातील एक उमदे अधिकारी म्हणून परिचित होते. सध्या ते टिंबर मार्केट व प्रतिभानगर अशा दोन फायर स्टेशनचे इनचार्ज होते. कामाबाबतची त्यांची निष्ठा पाहून त्यांच्याकडे शुक्रवारी एक दिवस प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारीपदाचा कार्यभार सोपवला होता. फुलेवाडी येथून सकाळी नऊ वाजता ते कार्यालयात जाण्यास निघाले असता त्यांच्या छातीत अचानक कळ आली. त्यामुळे कुटुंबीय व मित्रांनी त्यांना तातडीने खासगी दवाखान्यात दाखल केले, पण उपचाराचा काहीच उपयोग झाला नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images