Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

श्रोत्यांसाठी संगीतकक्ष

0
0


अनुराधा कदम, कोल्हापूर

एखाद्या संस्थेने शास्त्रीय संगीताची मैफल आयोजित केली तरच रागदारी सूर ऐकण्याची पर्वणी श्रोत्यांना मिळते. शास्त्रीय संगीत ऐकण्याची कितीही आवड असली तरी प्रत्येक रागातील गीतांचा संग्रह करून ठेवणे शक्य होत नाही. अशा रसिकांसाठी गायन समाज देवल क्लबमध्ये लवकरच शास्त्रीय संगीत कक्ष तयार होणार आहे. संगीतरसिक आणि गायन समाज देवलक्लबचे उपाध्यक्ष दिलीप गुणे यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला असून रसिकांनी हवे तेव्हा यावे आणि आवडीचे शास्त्रीय संगीत ऐकावे अशी या कक्षाची रचना करण्यात येणार आहे.

सध्याची कर्णकर्कश्‍श गाणी आणि आयटम साँगच्या गर्दीत अस्सल शास्त्रीय सुरांचे मधूर महत्व तितकेच अबाधित आहे. तसेच विविध रागांवर आधा​रीत गाणी नेहमीच श्रवणीय असतात. कोल्हापुरात शास्त्रीय संगीताची मैफल आयोजित करणाऱ्या अनेक संस्था, संयोजक रसिकांना चांगले ऐकण्याची मेजवानी देत आहेत. मात्र मैफल असेल तरच शास्त्रीय संगीताचा आनंद मिळणार या समीकरणाच्या पलीकडे जाण्यासाठी देवलक्लबमध्ये स्वतंत्र संगीतकक्ष तयार करण्याचा मनोदय पुढे आला.

गायन समाज देवल क्लबमध्ये होणाऱ्या या संगीतकक्षाचे स्वरूपही शास्त्रीय संगीताच्या श्रोत्यांसाठी शांत आणि प्रसन्नदायी असेल अशी माहिती गुणे यांनी दिली. विविध रागांवर आधारीत गीते, सिनेसंगीत, बंदिश, चीज यांच्या सीडी या कक्षात उपलब्ध असतील. रसिकांनी आपल्या सोयीच्या वेळेनुसार एक तास या कक्षात येऊन आपल्या आवडीचे गाणे हेडसेटच्या आधारे ऐकायचे अशी सुविधा देण्यात येणार आहे. यामुळे रसिकांना त्यांना हवे असलेल्या शास्त्रीय संगीताचा श्रवणीय आनंद शांत वातावरणात अनुभवता येणार आहे, असे ते म्हणाले.

श्रोत्यांना पर्वणी

जातीवंत गायकांचे सूर कानात साठवण्यासाठी श्रोताही तितकाच अस्सल असावा लागतो. तरच मैफल रंगते हे संगीतविश्वातील सूत्र आहे. याच विचाराने संगीतकक्षाची संकल्पना पुढे आली. श्रोत्यांना संगीतानुभव घेण्यासाठी एखाद्या जाहीर मैफलीची प्रतीक्षा करायला लागू नये आणि त्यांना हवे असेल तेव्हा रागदारी संगीत ऐकावे ही श्रोत्यांना पर्वणीच असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वानराचा अपघाती मृत्यू

0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

सेनापती कापशीजवळील आंबेओहळ ओढ्याजवळ भरधाव जाणाऱ्या मोटारीने रस्ता ओलांडणाऱ्या वानराला जोराची धडक दिली. या धडकेत वानर गंभीर जखमी झाले. तेथून जाणाऱ्या शाळकरी मुलांनी त्याला वाचवण्याचा अटोकाट प्रयत्न केला. डॉक्टर, वनकर्मचारीही घटनास्थळी आले, परंतु त्यांना त्यामध्ये यश आले नाही. अखेर वानराचा मृत्यू झाला. गुरूवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली.

गुरूवारी दुपारच्या सुमारास आंबेओहळ येथे एक वानर रस्ता ओलांडत होते. यावेळी येथून भरधाव जाणाऱ्या अज्ञात मोटारीने त्याला जोरदार धडक दिली. त्यात ते दूरवर फरफटत गेले. त्याचे किंचाळणे ऐकून येथून संगणक शिक्षणासाठी कापशीकडे जाणारी तमनाकवाडा व वडगावच्या ओंकार डावरे, प्रकाश पाटील, अभय पाटील आदी शाळकरी मुले थबकली. त्यांनी या वानराला वाचविण्याची धडपड सुरु केली. त्यांनी त्याला उचलून झाडाच्या सावलीत नेले. पळत जाऊन जवळच्या ओढ्यातून पाणी आणून त्याला पाजले. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांच्या मदतीने मोबाइलवरुन कापशी येथील पशुवैद्यकीय डॉक्टर मिलिंद काळेबेरे व डॉ. एकनाथ चौगले यांना बोलावून घेतले.

वनविभागाचे परिमंडल वन अधिकारी एन. एस. डवर व त्यांचे कर्मचारी तानाजी इंदलकर, शंकर शेटके, दत्तात्रय टिकले घटनास्थळी आले. सर्वांनी त्याला वाचवण्याचे अटोकाट प्रयत्न केले. परंतु यश मिळाले नाही. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बाळेघोल येथील वनहद्दीत त्याचे दफन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात ७ जखमी

0
0

जयसिंगपूर : ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मारूती कारने प्रथम ट्रकला त्यानंतर झाडाला धडक दिली. या अपघातात सातजण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये महिला व लहान मुलांचा समावेश आहे. जयसिंगपूर-इचलकरंजी रस्त्यावर कोंडिग्रेजवळ दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

शमशुद्दीन गुलाबलाल आगा (वय ५५), बेबी शमशुद्दीन आगा (वय ५०), मुख्तार शमशुद्दीन आगा (वय ३०, सर्व रा.मिरज), महमंदगौस मुस्तफा चिक्कोडीकर (वय ३५), शकिला महमदगौस चिक्कोडीकर (वय ३०), मोईनमहंमद गौस चिक्कोडीकर (वय १०) अशी जखमींची नावे आहेत. जखमींपैकी एका बालकाचे नाव समजू शकले नाही. जखमींवर इचलकरंजी येथील आयजीएम रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

काँक्रीट घेऊन ट्रक कोंडिग्रेहून इचलकरंजीतील जवाहरनगरकडे जात होता. ट्रकला ओव्हरटेक करून मारूती कार पुढे येत असतानाच समोरून स्विफ्ट कार आली. यावेळी चालकाने मारूती कार डाव्या बाजूला घेतल्याने कार व ट्रकची धडक झाली. यानंतर चालकाचा ताबा सुटला व मारूती कार रस्त्याच्या डाव्या बाजूस असणाऱ्या झाडावर आदळली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

११८ शाळांमध्ये ICT लॅब

0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पारंपारिक शिक्षणात बदल करून नव्या टेक्नॉलॉजीचा वापर करत गेल्या तीन वर्षांपासून इन्फर्मेशन कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी (आयसीटी) या विषयासाठी विशेष कम्प्युटर लॅब सुरू करण्यात आली आहे. राज्यात पाच हजार तर कोल्हापुरात ११८ शाळांमध्ये हा प्रोजेक्ट राबविला जात आहे. त्यासाठी ११८ शिक्षकांची टीम कार्यरत करत आहे.

केंद्र व राज्य सरकारच्यावतीने ५ वी ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रोजेक्ट राबविला जात आहे. तंत्रज्ञानाबरोबरच वाढत असलेले संवाद कौशल्याचे महत्व लक्षात घेऊन याबाबचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात आहे. गेल्या तीन वर्षांपासून कोल्हापूरात हा प्रोजेक्ट सुरू असून हा विषय विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजावा, तसेच यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून कंपनीच्या माध्यमातून प्रत्येक शाळेमध्ये कम्प्युटर लॅब उभारली आली आहे. ११८ शाळांमध्ये या लॅब उभारल्या जाणार असून प्रत्येक लॅबमध्ये १० ते १२ कम्प्युटर्स उपलब्ध करून दिले आहेत. प्रत्येक शाळेसाठी ११ लाख रुपये देण्यात येत असून त्यामध्ये हार्डवेअर, देखभाल खर्च व शिक्षकांचा पगार सर्व पाच वर्षासाठी टप्प्याटप्प्याने दिला जातो.

पाच वर्षांनी हा प्रोजेक्ट संपल्यावर ही लॅब शाळेच्या ताब्यात देण्यात येणार असून तिथून पुढे त्याची देखभाल किंवा हा प्रोजेक्ट सुरू ठेवावा की बंद करायचा हा निर्णय शाळा घेणार आहे. या प्रोजेक्टसाठी शाळा निवडताना तेथील सुविधा आणि शाळेची परवानगी असल्यास त्या शाळांची नावे सरकारकडे पाठविली जातात. त्यानंतर त्यातील ठराविक शाळांची निवड करून कंपनीच्या माध्यमातून हे प्रोजेक्ट पाच वर्षांसाठी राबविले जातात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी शाळांना मान्यता

0
0


जान्हवी सराटे, कोल्हापूर

सरकारवर आर्थिक बोजा न पडता शिक्षणसंस्था उभ्या रहाव्या आणि त्यातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून २०१४-१५ या शैक्षणिक वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात ७६ तर विभागात २१४ स्वयं अर्थसहाय्यित शाळांना मंजूरी देण्यात आली आहे. दर्जेदार शिक्षण देण्यासह शिक्षणाचे सार्वत्रिकरण व्हावे यासाठी सरकारने कायम विनाअनुदानित तत्त्वावर मंजूर झालेल्या शाळांपैकी कोल्हापुरात ४८ तर विभागात १४५ प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा नव्याने सुरू झाल्या आहेत. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात अशा १४५ स्वयं अर्थसहाय्यित शाळा विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या आहेत.

राज्य सरकारने शाळांना अनुदान देणे थांबविण्याचे धोरण अवलंबवला आहे. त्यामुळे अनेक शाळांतील कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. शाळेला अत्यावश्यक असलेल्या सोयी-सुविधांचा अनेक शाळांमध्ये अभावही असतो. त्यातून अनेक शाळांचा शैक्षणिक दर्जा खालावल्याचे दिसून येते. या समस्या सोडविण्याऐवजी त्या अधिक वाढविण्याचे काम सरकारकडून होत असल्याचा आरोप संस्थाचालकांचा आहे. स्वयं अर्थसहाय्यित शाळा योजना म्हणजे स्वतःच कमवा आणि खर्च करा, सरकारकडे मदत मागू नका असाच हेतू असल्याचा आरोप या क्षेत्रात कार्यरत सामाजिक संघटनांनी केला आहे.

स्वयं अर्थसहाय्यित शाळांना मंजूर करताना सरकारने काही निकष लागू झाले आहेत. ग्रामीण भागासाठी दोन लाख तर शहरी भागात शाळा सुरू करण्यासाठी ५ लाख रुपयांची मुदतठेव ठेवावी लागते. महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांप्रमाणेही या खासगी शाळांनाही शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) निषकानुसार शाळेसाठी स्वतंत्र इमारत, प्रत्येक शिक्षकामागे एक वर्गखोली, मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय, स्वयंपाकगृह, शाळेभोवती कंपाउंड, खेळाचे मैदान, अडथळाविरहित प्रवेशमार्ग (रॅम्प), मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र कार्यालय आणि ग्रंथालय असे दहा निकष पूर्ण असतील तरच शाळांना मंजूरी देण्यात येते. २०१४-१५ मध्ये नवीन शाळांना मान्यता, कार्यरत असलेल्या शाळांच्या दर्जामध्ये वाढ करण्यात आली आहे. यात कोल्हापुरातील २५ स्वयंअर्थसहाय्यित शाळांना दर्जावाढ देण्यात आली आहे. मंजूर झालेल्या शाळांपैकी ७ शाळा सुरू झाल्या आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोल्हापूर विभागात ५९ शाळांना मंजूरी देण्यात आली असून त्यापैकी ३० शाळा सुरू झाल्या आहेत.

मंजूर शाळा (स्वयं अर्थसहाय्यित)

कोल्हापूर जिल्हा - ७६

कोल्हापूर विभाग - २१४

नव्याने सुरू शाळा

कोल्हापूर जिल्हा - ४८

कोल्हापूर विभाग - १४५

दर्जावाढ मिळालेल्या शाळा - २५

सुरू झालेल्या शाळा - ७

विभागातील शाळा - ५९

सुरू झालेल्या शाळा - ३०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतजमिनीचे हेल्थकार्ड

0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'आगामी काळात प्रत्येक तालुक्यात माती प्रयोगशाळा सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व शेतजमिनीचे हेल्थकार्ड तीन वर्षात तयार करण्यात येणार आहे. यंदा २४ हजार शेतजमिनीचे हेल्थकार्ड तयार केले जाईल', अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. शिरोळ तालुक्यातील ३० गावात सहा हजार हेक्टर क्षारपड जमीन असल्याचे यावे‍ळी त्यांनी सांगितले.

शासकीय विश्रामगृहावर गुरुवारी जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पालकमंत्री पाटील यांनी घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत पाटील म्हणाले, 'गेल्यावर्षी बनावट बियाणे, खताचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला होता. यावेळी अशी परिस्थिती उद्भभवू नये म्हणून १४ भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. भरारी पथके जिल्ह्यातील प्रत्येक खत व बियाणे विक्री दुकाने, केंद्राची तपासणी करणार आहेत. जलयुक्त शिवार योजनेसाठी ६९ गावांची निवड केली असून २२ कोटी २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. योजनेमुळे जलस्तर सुधारण्यास मदत होणार आहे. ठिबक सिंचन योजना राबवणाऱ्या शेतकऱ्यांच्या गटांना ५० टक्के सबसिडी दिली जाईल.'

पालकमंत्री पाटील म्हणाले, 'माती परिक्षणावर यंदा भर दिला जाईल. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात माती प्रयोगशाळा सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. शेतीचे हेल्थकार्ड तयार करण्यावर भर देणार आहे. चंदगड तालुक्यातील हत्तींचा त्रास कमी करण्याबाबत गांभीर्याने प्रयत्न केले जात आहे. हत्ती व अन्य वन्य प्राण्यांनी नुकसान केलेल्या जिल्ह्यातील २४ शेतकऱ्यांना मदत करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्याच्या कामात काहीसा संथपणा आला आहे. वीज कनेक्शन देण्यास वेग यावा यासाठी नवीन कंत्राटदारांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले असून हे अधिकारी चीफ इंजिनिअरला देण्यात आले आहेत. शिरोळ तालुक्यातील ३० गावांतील क्षारपड जमिन पिकाऊ होण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्यात येणार आहे.' पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी अमित सैनी, आमदार उल्हास पाटील, उप वन अधिकारी रंगनाथ नाईकडे उपस्थित होते.

इथेनॉल उत्पादनावर भर देणार

'साखरेचे उत्पादन वाढले असून साखरेचा बफर स्टॉक करणे किंवा सरकारने साखर विकत घेणे या दोन प्रस्तावावर गांभीर्याने चर्चा सुरू आहे. साखर उत्पादन कमी करण्याबरोबर इथेनॉलचे उत्पादन वाढवण्यावर भर देण्याबाबत विचार सुरू आहे. इथेनॉलला दर मिळाल्याने शेतकऱ्यांच्या हाती पैसा पडेल. साखर उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. साखरेला एफआरपीप्रमाणे दर मिळाले पाहिजे व साखर कारखाने टिकले पाहिजेत हे सरकारचे धोरण आहे', असे पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोकुळचा अध्यक्ष?

0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदाची निवडणूक सात मे रोजी होत आहे. अध्यक्षपदासाठी विश्वास नारायण पाटील, सुरेश पाटील, अरुण नरके अशी नावे आघाडीवर आहेत. नेते आमदार महादेवराव महाडिक आणि पी. एन. पाटील यांनी अध्यक्षपदाचे नाव जवळजवळ निश्चित केले आहे. यानंतरही आणखी कुणा इच्छुकाने जोर धरल्यास नेत्यांची पुन्हा एकदा बैठक होण्याची शक्यता आहे.

निवडणूक अधिकारी अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकरा वाजता अध्यक्ष निवडीची बैठक होणार आहे. संचालक मंडळाच्या निवडणुकीत यंदा प्रथमच विरोधी पॅनेलमधील दोन उमेदवार विजयी झाले आहेत. तरीही महाडिक व पी. एन. पाटील यांच्या गटाकडे बहुमत आहे. त्यामुळे दोन्ही नेते मंडळी बसून कोणाचे नाव निश्चित करतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अध्यक्षपदाच्या चर्चेत असलेले संचालक जुने व अनुभवी आहेत. त्यातील विश्वास पाटील व अरुण नरके यांनी अध्यक्षपद भूषवले आहे. सुरेश पाटील यांना मात्र ही संधी मिळालेली नाही. त्यामुळे अध्यक्षपदाचा अनुभव असलेल्या संचालकांची निवड होते की ज्येष्ठ असून आतापर्यंत अध्यक्षपद न मिळालेल्या संचालकांची ​निवड होणार याबाबत उत्सुकता ताणली आहे. विद्यमान संचालकांपैकी पाच संचालकांनी यापूर्वी अध्यक्षपद भूषविले आहे. त्यामुळे नव्यांना संधी मिळणार का? याची उत्सुकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीटंचाईच्या झळा

0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उन्हाच्या वाढत्या झळा आणि सुटीतील पर्यटकांची गर्दी यामुळे अंबाबाई मंदिरात गेल्या महिनाभरापासून पाण्याची टंचाई आहे. महापालिकेतर्फे सकाळी केवळ दीड तासच मंदिरात पाणीपुरवठा केला जातो. यावेळेत मंदिरातील पाच हजार लिटर क्षमतेच्या चार टाक्या भरत नसल्यामुळे दिवसभर भाविक, पर्यटकांना पाणी मिळत नाही. मंदिरातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत देवस्थान व्यवस्थापनाकडून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला सातत्याने विनंती करूनही अद्याप दखल घेतलेली नाही.

अंबाबाई मंदिरात येणाऱ्या पर्यटक भाविकांना पाण्याची गरज लागते. त्यासाठी मंदिराच्या आवारात शनि मंदिरासमोर, गारेच्या गणपतीमंदिराशेजारी आणि दत्तमंदिराशेजारी पाण्याच्या नळाची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी पाच हजार लिटर क्षमतेच्या तीन टाक्या बसवण्यात आल्या असून एक टाकी देवस्थान कार्यालयाजवळ आहे. मंदिरात दिवसभरात येणाऱ्या भाविक व पर्यटकांची संख्या लक्षात घेता आणि देवस्थान कार्यालय, अभिषेक करणाऱ्या भाविकांचे अन्नछत्र याठिकाणी दररोज किमान पाच टाक्या पाणी लागते. मात्र महापालिकेतर्फे केवळ दीडतास पाणीपुरवठा करण्यात येतो, यावेळेत सर्व टाक्या भरल्या जात नाहीत. तसेच हा पुरवठाही कमी दाबाने किंवा अपुऱ्या दाबाने होत असतो.

सध्या उन्हाळी सुटीचा काळ आहे. मे महिन्यापासून ते जूनच्या ​पहिल्या पंधरवड्यापर्यंत भाविकांची व पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. मंदिरातील पाणी हे पिण्यासाठीही वापरले जात असल्यामुळे भाविकांची गैरसोय होत आहे.

अंबाबाई मंदिरातील पाण्याची सुविधा ही प्रामुख्याने पर्यटक, भाविक आणि देवस्थान यांच्यासाठी आहे. मात्र घाटी​ दरवाजा परिसरातील फुलविक्रेत्यांकडून पाण्याचा मोठ्याप्रमाणात वापर केला जातो. फुलांवर मारण्यासाठी लागणारे पाणी हे विक्रेते मंदिरातून घेऊन जातात. तसेच मंदिराच्या बाहेरील परिसरातील दुकानदारही मंदिरातून पाण्याच्या बादल्या भरून नेतात. यामुळे भाविकांच्या सोयीसाठी असलेल्या पाण्याची फूलविक्रेते आणि दुकानदार यांच्याकडूनच लूट होत आहे याबाबत देवस्थान व्यवस्थापनाने लक्ष देण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अस्सल कोल्हापुरी

0
0


दोन वर्षापूर्वी ऋषी देसाई हे मऱ्हाठमोळं नाव जगभरात गाजलं ते मास्टर शेफ या स्पर्धेमुळे. या बहु​चर्चित स्पर्धेत ऋषीने बाजी मारली तेव्हा तो म्हणाला, 'ही मला हे जमलं कारण खवय्यांची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरचा मी मुलगा आहे.' ऋषीच्या या प्रतिक्रियेचा विचार केला तर आपल्याला हे अमान्य करताच येणार नाही की अस्सल खवय्येगिरी करावी ती कोल्हापूरकरांनीच. पण खाण्यात जितके कोल्हापूरकर पट्टीचे खवय्ये तितकेच पाहुणचार करणे, जिभेचे चोचले पुरवण्यातही कोल्हापूरकरांचा हात कुणीही धरू शकणार नाही. त्यामुळेच खास कोल्हापुरी पदार्थांची चव आजही महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करत जगभरातील खाद्यप्रेमींच्या जीभेवर मनसोक्त रेंगाळत आहे.

उकडीचे मोदक

अख्ख्या मुठीतही न मावणारा डेरेदार मोदक म्हणजे श्रावणापासून भाद्रपदापर्यंत कोल्हापुरातील घराघरात तयार होतोच. पण या मोदकाने गेल्या अनेकवर्षापासून दिल्लीत भरणाऱ्या महाराष्ट्र महोत्सवात येणाऱ्या खवय्यांना तृप्त केले आहे. येथील स्वयंसिद्धा या महिला संस्थेतर्फे दरवर्षी या महाराष्ट्र महोत्सवात सहभागी होणाऱ्या महिला केवळ मोदक ही डिश घेऊन जगभरातील खवय्यांसमोर जातात. त्यांचा अनुभव सांगतो, की एरव्ही महोत्सवात मसालेदार मांसाहारी पदार्थांवर ताव मारणाऱ्यांकडून हमखास उकडीच्या मोदकाच्या स्टॉलसमोर गर्दी केली जाते. तुपात भाजलेल्या ओले खोबरे आणि गुळाच्या सारणाचे उकडी मोदक कोल्हापूरचे नाव जगभरात पोहोचवणारी चव बनली आहे. ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, सिंगापूर येथील भारतीय हॉटेल्समध्येही खास कोल्हापुरी पद्धतीने बनवलेला मोदक आपले स्थान टिकवून आहे.

पुरणपोळी आणि थालीपीठ

पुरणपोळी ज्या मुलीला बनवायला येते ती पाककौशल्यात पारंगत हे सूत्रच बनले आहे. त्यातही पिठाची पोळी हा कर्नाटकी प्रकार असला तरी तेलाची पोळी करावी ती कोल्हापूरच्या गृहिणीनेच. त्यामुळे मऊ लुसलूशीत पुरणपोळी खाणे यासारखी​ दुसरी मेजवानी खवय्यांसाठी नसेल. तीच गोष्ट थालीपीठाची. खमंग भाजणीचे थालीपीठ ताज्या लोण्यासोबत रिचवताना होणारा आनंद लुटावा तो अस्सल खवय्यानेच. कोल्हापूरच्या पुरणपोळी आणि थालीपीठाने भरपेटीची ढेकर दिली नाही तरच नवल. दरवर्षी महाराष्ट्र महोत्सवातही कोल्हापूरच्या अनेक महिला पुरणपोळी बनवण्यासाठी राजधानीत जातात आणि पुरणपोळी खाणाऱ्याच्या चेहऱ्यावरच्या आनंदाची शिदोरी घेऊन परततात.

मसाल्याचे तिखट आणि गरम मसाले

कोल्हापूरच्या पदार्थांना जी झणझणीत चव येते त्याचे गमक आहे ते अर्थातच इथल्या मसाल्याच्या तिखटात आणि गरममसाला पावडरमध्ये. वर्षभराचे तिखट करणे हा इथल्या गृहिणींचा प्रोजेक्टच असतो. मिरचीपावडरमध्ये कांदा, लसूण, आले, कोथिंबीर, धडे, सुकेखोबरे आणि गरममसाला घालून केलेल्या या मसाल्याच्या तिखटाला जगात मागणी आहे. मांसाहारी पदार्थच नव्हे तर शाकाहारी डिशेसही या तिखटामुळे चविष्ट होतात. कोल्हापुरातील देशपरदेशात जाणाऱ्या मसाल्याच्या तिखटाचे मार्केट आणि आर्थिक उलाढाल खूपच मोठी आहे.

झण​झणीत मिसळ

भरपेट नाश्ता या प्रकारात मोडणारा हा पदार्थ खरा कोल्हापूरचा. आज देशात कुठेही मिसळ मिळत असेल पण कोल्हापूरची मिसळ जगात पोहोचवली ती कोल्हापुराती संदीप फडतरे यांनी. उद्यमनगरातील शेडवजा हॉटेलमध्ये मिळणाऱ्या या मिसळची महती एका जागतिक स्तरावरच्या साप्ताहिकाने घेतली आणि कोल्हापूरच्या मिसळची चव जगात पोहोचली. मटकी, बटाटा, वाटाणा यासोबत मसाल्याचे वाटण यामधून तयार होणाऱ्या मिसळीचा लालभडक कट वरपावा तो कोल्हापुरातच. कोल्हापुरी मिसळीची कृती आता जगभरातील महाराष्ट्रीयन हॉटेल्समध्ये वापरली जात आहे.

तांबडा, पांढरा रस्सा आणि मटण लोणचे

मटणाचे अनेक प्रकार हॉटेल्सच्या मेन्यूकार्डमध्ये पहायला मिळाले तरी कोल्हापूरचं सुकं, तांबडा, पांढरा रस्सा आणि मटण लोणचं याची सर कशालाच येणार नाही. कोल्हापूरच्या पर्यटनाला येणारा खवय्या पर्यटनस्थळांचे दर्शन घेईलच, पण इथला तांबडापांढऱ्या रस्सा भुरकल्याशिवाय त्याची खाद्यभ्रमंती पूर्ण होणार नाही. कोल्हापूरच्या मटणाला असलेली झण​झणित चव नाकातून पाणी काढणारी. देशासह परदेशातही कोल्हापुरी मटण असा खास उल्लेख मेन्यूकार्डमध्ये असतो हेच या चवीचे यश आहे. किमान आठवडाभर मटण खाण्याचा आनंद देण्याची किमया मटण लोणच्यात आहे. खास प्रकारच्या मसाल्यात मटणाचे तळलेले चॉप्स मुरवून केलेले मटणाचे लोणचे खास कोल्हापुरी ​रेसिपीने केले आहे. आजही हा पदार्थ जगभरात वाखाणला जात आहे.

बाकरवडी

दिवाळी आली की कोल्हापुरातील प्रत्येक घरातून एक खमंग वास येतो. मटणाला वापरला जाणारा ओला मसाला जेव्हा वेगळ्या रूपात बाकरवडीत घातला जातो तेव्हा नव्या पदार्थाचा जन्म होतो. खरं तर कोल्हापुरात या बाकरवडीला पुडाची वडी हे रांगडं आहे, याच नावाने ती कोल्हापूरबाहेर खवय्यांच्या राज्यात नांदते आहे. पुणेरी बाकरवडीपेक्षा वेगळी चव असलेल्या या वडीची घडी पारीला एकमेकावर ठेवून घातली जात असल्यामुळे ही पुडाची वडी झाली. खरपूस भाजलेली ही वडी खाल्यानंतर एक झण​​झणित ठसका जिभेवर रेंगाळतो तो कोल्हापूरच्या मसाल्याचा असतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संपाने उडाली दैना

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विवाहाचे मुहूर्त, सलग सुटी व उन्हाळ्यासाठी लहानग्यांसह गुरुवारी सकाळी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची एसटी सेवा पूर्णपणे बंद असल्याने दैना उडाली. केंद्र सरकारच्या प्रस्तावित रोड सेफ्टी विधेयकाला विरोध करण्यासाठी पुकारलेल्या वाहतूक बंदनुसार येथील मध्यवर्ती बसस्थानकातून सकाळी सहापासून एकही एसटी बस सुटली नसल्याने हजारो प्रवाशी अडकून पडले. प्रशासनाकडून काहीच पर्याय काढले जात नसल्याने प्रवाशांनी कर्मचाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. शिवाय एका एसटीवर दगडफेकही केली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते.

महामंडळाकडील एकाच संघटनेने बंदला पाठींबा दिला असल्याने काही अंशी का होईना वाहतूक सुरू राहील असे वाटत होते. पण प्रत्यक्षात गुरुवारी सकाळी सहापासून मध्यवर्ती स्टँड तसेच इतर स्थानकातून एकही एसटी बस सोडली नाही. तसेच इतर गावाहून येऊन पुढील गावाकडे जाणाऱ्या एसटीही थांबल्या. त्यांच्याकडून वाहतूक नियंत्रण कक्षाकडे विचारणा केल्यानंतर आपापल्या जबाबदारीवर बस नेण्यास सांगितल्याने चालक वाहक स्टँडमध्येच थांबले. तिकिट काढून बसलेले प्रवाशी त्यामुळे वैतागून गेले होते. सकाळी सह्याद्री, महालक्ष्मी एक्सप्रेस या रेल्वे गाड्या तसेच खासगी आराम बस आल्यानंतर त्यामधून आलेले व जिल्ह्यात जाणारे प्रवाशी मोठ्या संख्येने स्टँडवर आले.

पण एकही बस बाहेर पडली नसल्याने हजारोंच्या संख्येने प्रवाशी थांबले होते. त्यामध्ये महिला, लहान मुलांसह वयोवृद्ध नागरिकांची संख्या मोठी होती. जवळपास दोन तास स्टँडवर बसल्याने वैतागलेल्या प्रवाशांनी वाहतूक नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांशी वाद घातला. गणवेशावर असलेल्या कर्मचाऱ्यांना काम सुरू करण्यास का सांगितले जात नाही, असे प्रवाशी सांगत होते. तर प्रशासन नियोजन केले जात असल्याचे सांगत होते. जवळपास दहा वाजेपर्यंत हा प्रकार सुरू असल्याने एका बाहेरून आलेल्या एसटीवर संतप्त प्रवाशांनी दगडफेक केली. स्टँडवरील हा प्रकार विभाग नियंत्रकांपर्यंत पोचल्यानंतर बंदला पाठिंबा न दिलेल्या इतर संघटनांच्या कर्मचाऱ्यांना बस बाहेर काढण्याच्या सूचना केल्या. काही संघटना यापूर्वीही तयार होत्या. मात्र, प्रशासनाकडून काहीच प्रतिसाद मिळाला नसल्याची चर्चा होती. त्यानंतर काही प्रमाणात एसटी बस सुरू झाल्या. अखेर मुंबईत निर्णय झाल्यानंतर अकरापासून सर्व बसेस सोडण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरणप्रेमी डॉ. पाटील

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मूळचे कोल्हापूरचे असलेले पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते डॉ. प्रमोद पाटील आणि कर्नाटकमधील नेचर कन्झर्व्हेशन फाउंडेशनचे संशोधक आनंद कुमार यांना बुधवारी लंडन येथे व्हाइटली पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. व्हाइटली फंड फॉर नेचरच्या वतीने दिलेले जाणारा हा पुरस्कार ग्रीन ऑस्कर म्हणून ओळखला जातो. पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या जगभरातील सात जणांना हा पुरस्कार देण्यात आला.

पुरस्काराची एकूण रक्कम २.४५ लाख पाउंड असून, ही रक्कम या विजेत्यांमध्ये प्रोजेक्ट फंडिंग म्हणून विभागली आहे. बुधवारी लंडन येथील रॉयल जिऑग्राफी सोसायटीत झालेल्या समारंभात प्रिन्सेस रॉयल यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. या वेळी व्हाइटली फंड फॉर नेचरचे संस्थापक एडवर्ड व्हाइटली उपस्थित होते. ते म्हणाले, 'पुरस्कार विजेते त्यांच्या देशांत विविध समस्यांना तोंड देत मानवी जीवन उन्नत करण्याबरोबरच वन्यजीवांसाठीही चांगले प्रयत्न करत आहेत. या पर्यावरणप्रेमींचे यश आणि त्यांच्या प्रयत्नांच्या सन्मानासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.'

डॉ. पाटील यांची ओळख

पाटील यांचे शिक्षण एमडीपर्यंत झाले आहे. माळढोक संवर्धनासाठीच्या स्टेट कॉन्झर्व्हेशन प्लॅन, केंद्र सरकारच्या नॅशनल बस्टर्ड रिकव्हरी प्रोग्रॅम या कार्यक्रमात बॉम्बे नेचर हिस्ट्री सोसायटीच्या सहकार्याने ते काम करत आहेत. त्यांच्या 'बर्ड लाइफ इंटरनॅशनल' या पक्ष्यांसंदर्भात काम करणाऱ्या 'ग्लोबली थ्रेटन्ड बर्ड फोरम'साठी त्यांनी माळढोकची सद्यःस्थिती आणि अचूक आकडेवारी दिली. त्यामुळे माळढोकची नोंद सर्वाधिक संकटग्रस्त गटात होऊ शकली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिजाततेच्या प्र‌तीक्षेत मराठी

0
0


गुरुबाळ माळी, कोल्हापूर

मराठीला अ​भिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी सर्व प्रशासकीय निकषांची पूर्तता केली आहे. तसा अहवाल केंद्राकडे पाठवला आहे. तरीही गेले दीड वर्षे याबाबतच्या घोषणेसाठी केंद्र सरकारला मुहूर्त मिळत नाही. राज्यातील नेत्यांनीही तशी इच्छाशक्ती दाखवलेली नाही.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी गेले वीस वर्षे महाराष्ट्राचे प्रयत्न सुरू आहेत. उशिरा का होईना गेल्या दोन वर्षांत ही मागणी पूर्ण होण्याच्या दृष्टीने गतीने पावले पडत आहेत. कन्नड, तमिळ, तेलगू व ओरिया भाषेला असा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषेबाबतच्या मागणीला अधिक गती आली. यासाठी साहित्यिक रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. हरि नरके या समितीचे समन्वयक आहेत. या समितीचा अभ्यासपूर्ण अहवाल राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला. केंद्राने साहित्य अकादमीकडे पाठविलेला हा अहवाल मान्य झाला. तो पुढील मान्यतेसाठी केंद्र सरकारने पाठवण्यात आला. प्रशासकीय पातळीवर तो मान्यही करण्यात आला. आता केवळ घोषणेची औपचारिकता शिल्लक राहिलेली असताना त्यासाठी राजकीय दबावच नसल्याने घोषणा सातत्याने लांबणीवर टाकली जात आहे.

दोन महिन्यांपूर्वी २७ फेब्रुवारीला भाषा दिनीच याबाबत घोषणेची शक्यता होती. मात्र, केंद्रीय अर्थसंकल्पाचे कारण पुढे करत ते लांबणीवर टाकण्यात आले. असा दर्जा दिल्यानंतर भाषेच्या विकासासाठी पाचशे कोटी रुपये द्यावे लागतात. बजेटमध्ये या रकमेची तरतूद नसल्याचे सांगत ३१ मार्चपर्यंत पुन्हा ती घोषणा पुढे ढकलण्यात आली. आजच्या महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधत ही घोषणा होण्याची शक्यता असल्याचे समजते. राज्य व केंद्रात एकाच पक्षाचे सरकार असल्याने या निर्णयावर केंद्र लवकरच मोहोर उमटवेल, अशी आहे. शुक्रवारी नेमके चित्र स्पष्ट होईलच.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेम्पोचालकाला मारहाण करून लुटले

0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

दूध वाहतुकीच्या टेम्पोपोवरील चालकास बेदम मारहाण करून चोरट्यांनी रोख रक्कम, मोबाइल व सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्या. शुक्रवारी रात्री येथील सुमंगल हॉटेलजवळ ही घटना घडली. तपासाची चक्रे गतीमान करून पोलिसांनी चौघा संशयितांपैकी तिघाजणांना गजाआड केले. त्यांना सातदिवस पोलिस कोठडीचे आदेश न्यायालयाने दिले. धनराज उर्फ चिकन्या गुरूनाथ धुतरगी (वय१९, रा.चकोते फार्म हाऊसजवळ नांदणी), प्रविण सुरेश पाटील (वय २२, रा.अज्निंयतारा हौसिंग सोसायटी, जयसिंगपूर), अक्षय तिप्पाण्णा गाडीवडर (वय १८, रा.शाहूनगर जयसिंगपूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

कुमार महादेव पाटील (वय ४०, रा.गोकुळ शिरगाव) हे टेम्पोमधून गोकुळ शिरगांव येथून गोकुळ दूधाच्या पिशव्या घेवून जयसिंगपूरकडे येत होते. झोप आल्याने त्यांनी सुमंगल हॉटेलजवळ रस्त्याच्या बाजूला टेम्पो उभा केली. यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या चौघाजणांनी त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच पाटील यांच्याकडील तीन हजार रूपये, मोबाइल तसेच दोन सोन्याच्या अंगठ्या घेवून चोरटे पसार झाले.

यानंतर कुमार पाटील यांनी जयसिंगपूर पोलिसात फिर्याद दिली. तक्रार दाखल होताच सहायक पोलिस निरीक्षक संतोष डोके, उपनिरीक्षक शाम कदम, सहायक फौजदार प्रकाश देसाई यांनी तपासाची चक्रे गतीमान केली. तिघांना अटक करण्यात आली असून चौथा संशयित फरारी आहे. या चोरट्यांकडून पोलिसांनी चोरीच्या अंगठ्या, रोकड, मोबाइल तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मान्यताप्राप्त संघटनेकडून कर्मचाऱ्यांची पिळवणूक

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'गेल्या अनेक वर्षांपासून मान्यताप्राप्त संघटने​ने एसटी कर्मचाऱ्यांना पिळून काढले आहे. त्याचा बदला घेण्याची वेळ आली असून प्रस्थापितांविरोधात जायचे असेल तर मनसेसोबत या,' असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य परिवहन कामगार सेनेचे अध्यक्ष अविनाश अभ्यंकर यांनी केले. शाहू स्मारक भवनमध्ये एसटी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक मेळावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

एसटीमध्ये मान्यताप्राप्त संघटना म्हणून मिरवत असताना कर्मचाऱ्यांसाठी काही केलेले नाही, असा आरोप करत अभ्यंकर म्हणाले, 'कर्मचाऱ्यांच्या पैशावर मजा करण्यासाठी नव्हे तर त्यांच्या भल्यासाठी संघटना आहे. मात्र, येथील मान्यताप्राप्त संघटनेने कर्मचाऱ्यांना कायम कर्जाच्या खाईत लोटले आहे. कर्मचाऱ्यांचे भले करा, आम्ही निवडणूक लढवत नाही. पण ते काही करत नसाल तर मात्र तुम्ही निघून जा. मनसे सत्तेमध्ये आली तर भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी लावू.'

अभ्यंकर पुढे म्हणाले, 'मान्यताप्राप्त संघटनेच्या नेत्यांना संपाची हाक दिली असे धड मंत्र्यांना सांगताही आले नाही. त्यांच्यावर टिका करायलाही लाज वाटते. एसटीला घातक विधेयकाला आमचा विरोधच असेल. त्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून विरोध करण्याची तयारी आहे. एसटी बँकेत सत्ता आल्यानंतर कर्जाचा व्याजदर कमी करण्याबरोबरच बँकेत एसटी कर्मचाऱ्यांचीच मुले घेतली जातील.' याप्रसंगी उपाध्यक्ष प्रमोद पाटील, मोहन चावरे, प्रल्हाद सपकाळ, जयराज लांडगे, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोड्याच्या तयारीतील चौघे ताब्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गुजरीतील सराफ दुकानावर दरोड्याच्या तयारीत असणा‍ऱ्या चौघांना शुक्रवारी रात्री जुना राजवाडा पोलिसांनी हॉकी स्टेडीयमजवळ अटक केली. या टोळीतील अन्य दोघेजण गाडीसह फरार झाले. अटक केलेल्या चौघांकडून धारधार शस्त्रांसह रोख रक्कम असा एकूण ७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.अटक केलेल्यांमध्ये अरुण अंकुश गुंजाळ (वय २४), रोहिदास देवराव गुंजाळ (२२ दोघेही रा. माढा जि. सोलापूर), तानाजी भारत डिकोळे (३०, रा. गोटी ता. करमाळा जि. सोलापूर), अर्जुन रामा डिकोळे (४२, रा. लवुळ ता. माढा) यांचा समावेश आहे. शनिवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. सोलापूरमधील सराईत गुंडाची टोळी कोल्हापुरातील गुजरीत सराफ दुकानावर दरोडा टाकण्यासाठी कोल्हापुरात आल्याची माहिती जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिनकर मोहिते यांना खबऱ्याकडून मिळाली होती. तपासणी केल्यावर शुक्रवारी सायंकाळी ध्यानचंद हॉकी स्टेडियमनजीकएक स्कॉर्पीओ मोटार (एमएच ४५ एन ६१५) संशयास्पद फिरताना आढळली होती.

कातडे विकणाऱ्यास अटक

कोल्हापूर : बिबट्याचे कातडे विकण्याचा प्रयत्नात असलेल्या एकास शनिवारी जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. आशिष दयानंद पोकर्णीकर (रा. पोकर्णी ता. वाळवा जि. सांगली) असे त्याचे नाव आहे. याबाबत सचिन रामचंद्र भणगे (वय ४० रा. शहाजी वसाहत) यांनी फिर्याद दिली. दरम्यान, हे कातडे बनावट असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सचिन भणगे यांचा गाड्या भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे. गुरुवारी रात्री ते हॉकी स्टेडियम नजीक थांबले असता आशिष पोकर्णीकर हा याठिकाणी आला. त्याने भणगे यांना माझ्याकडे बिबट्याचे कातडे असून त्याची विक्री करायची असल्याचे सांगितले. त्याची किंमत ४ लाख रुपये असल्याचे सांगितले. भणगे यांनी याबाबत जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील मिलींद टेळी यांना दिली. टेळी यांनी हॉकी स्टेडियमजवळून पोकर्णीकर याला ताब्यात घेतले. ते कातडे बिबट्याचे नसल्याचे निष्पन्न झाले. ही कारवाई टेळी, राहुल महाजन, राजू डांगे, नितीन चोथे, राजु चव्हाण यांनी केली.

सुनेला विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : मूल होत नसल्याच्या कारणावरून आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी सासू सासऱ्यांनी सुनेला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संबंधित विवाहितेचे वडील बळवंत पाटील यांनी केला आहे. याप्रकरणी सासू-सासऱ्यांवर राधानगरी पोलिस ठाण्यात सुनेला विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजश्री प्रकाश काशीद (वय २४, रा. राशिवडे) असे विवाहितेचे नाव आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालिका अभियंत्यासह सहाजणांवर गुन्हा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रंकाळा तलाव परिसरात ड्रेनेजलाइन सफाईचे काम करत असताना कामगाराच्या गुदमरून झालेल्या मृत्यूला जबाबदार असल्याचा ठपका ठेवत शनिवारी जुना राजवाडा पोलिसांनी महापालिकेच्या ड्रेनेज अभियंत्यासह सहाजणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. महापालिकेचे ड्रेनेज अभियंता सुरेश कुलकर्णी, कनिष्ठ अभियंता अजय साळुंखे, सुपरवायझर राजू कांबळे, शेख राठोड, मलिक पटेल यांच्याविरुद्ध कलम ३०४ (अ), अ ४ नुसार गुन्हा नोंदवत अविचारीपणाने, दुर्लक्ष करत काम करणे, कामगारांच्या सुरक्षिततेसाठी योग्य त्या उपाययोजना न करणे असा ठपका ठेवण्यात आला आहे.

रंकाळा तलाव परिसरात २० डिसेंबर २०१४ रोजी हा प्रकार घडला होता. ड्रेनेज सफाई करताना चेंबरमध्ये उतरलेल्या चौघा कामगारांपैकी साबू शेखर बजंत्री (वय २४) याचा मृत्यू झाला होता. या वेळी रमेश राठोड, सुनील राठोड आणि मंजू बजंत्री हे तिघे कामगार गंभीर जखमी झाले होते. तांबट कमान ते राजे संभाजी तरुण मंडळ येथील ड्रेनेज लाइनची सफाई करताना ४० फूट खोल ड्रेनेजलाइनमधील तीन चेंबरमध्ये साबू आणि तीन कर्मचारी उतरले होते. सुमारे अर्ध्या तासानंतरही कामगार बाहेर न आल्याने परिसरातील खेळाडूंनी तरुणांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूल्यांकन समितीकडून रस्त्यांची पाहणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरसीयांच्यादृष्टीने रस्ते प्रकल्पातील त्रासदायक झालेल्या युटिलिटी शिफ्टिंगच्या मूल्यांकनाचा स्वतंत्र अहवाल प्रकल्पाच्या मूल्यांकनाच्या अहवालाबरोबर जोडला जाणार आहे. तसेच, महापालिकेने आयआरबीला दिलेल्या सवलतींचाही विचार मूल्यांकनामध्ये केला जाणार आहे. मूल्यांकन समितीचे अध्यक्ष व रस्ते महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार यांनी श​निवारी प्रकल्पाची चार तास पाहणी केली. त्यानंतर त्यांनी समिती सदस्यांशी चर्चा करून १५ मेपर्यंत मूल्यांकनाचा अहवाल देण्यास सांगितले.

सरकारने नेमलेल्या समितीने बुधवारी रस्ते प्रकल्पाचे मूल्यांकन करून घेण्यासाठी पाच सदस्यीय समितीची स्थापना केली. महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक रामचंदानी, मुख्य अभियंता, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, असोसिएशन ऑफ ​ आर्किटेक्ट अँड इंजीनिअर्सचे राजेंद्र सावंत यांचा समितीत समावेश आहे. ३१ मेपूर्वी टोलबाबत निर्णय घेणार असल्याचे सरकारच्यावतीने सांगण्यात आल्याने अध्यक्ष संतोष कुमार यांनी शनिवारी प्रकल्पाची पाहणी केली. समिती सदस्य राजेंद्र सावंत व सरनोबत तसेच महामंडळाचे अधिकारी व असोसिएशन ऑफ आ​र्किटेक्ट अँड इंजीनिअर्सचे पदाधिकारी सहभागी होते.

सायबरजवळ प्रकल्पातील व महापालिकेने एकाच ठिकाणी केलेल्या गटार, शाहू मिलजवळील गटारीचे अर्धवट टाकलेले काम, लक्ष्मीपुरीतील मुख्य रस्त्यावरील काम, फुलेवाडी रस्त्यावरील रंकाळ्याजवळचे अपूर्ण काम व त्याजवळील खचलेला रस्ता, राधानगरी व कळंबा रोडवरील काँक्रीटच्या कामातील त्रुटी संतोष कुमार यांनी पाहिल्या. त्यावेळी त्यांनीही कामाबाबत सदस्यांजवळ नाराजी व्यक्त केली. यादरम्यान युटिलिटी शिफ्टिंगबाबतचा मुद्दा कामातून वगळण्यात आला. त्याचा फटका शहरवासीयांना बसणार आहे. त्यामुळे या कामाची किंमत पकडून मूल्यांकन कमी झाले पाहिजे, असे सदस्यांनी सांगितले. त्यानुसार संतोष कुमार यांनी या कामाचा स्वतंत्र अहवाल द्या. तो मूल्यांकनाच्या अहवालासोबत जोडला जाईल, असे स्पष्ट केले.

समिती अमान्य ?

दरम्यान, आयआरबीने ही समिती मान्य नसल्याचे पत्र रस्ते विकास महामंडळाला पाठवले असल्याचे समजते. तर सर्व्हेसाठी नेमलेल्या कंपनीकडून सादर करण्यात आलेल्या अहवालाप्रमाणे रविवारपासून ही समिती प्रत्येक रस्त्याचे क्रॉस चेक करणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजरा परिसरात बिबट्याची दहशत

0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

गेले आठवडाभर एक भुकेला बिबट्या आजरा शहरानजिकच्या पाच-सहा किलोमीटर अंतरावर वावरतो आहे. चार-पाच दिवसांपूर्वी या बिबट्याने गव्यांच्या पिलांची शिकार करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला असल्याचे आजरा वनविभागातून सांगण्यात आले. त्यानंतरही हा बिबट्या आजरानजिकच्या हात्तीवडे व हाजगोळी खुर्द व हाजगोळी बुद्रुक परिसरातच वावरत आहे. शुक्रवारी पहाटे तीन वाजता हाजगोळी खुर्द येथील इश्वर कसलकर यांच्या घरानजीक बिबट्याचे दर्शन झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यास वनविभाग असमर्थ ठरले आहे. दोन महिन्यांपूर्वी हा बिबट्या मलिग्रे जंगलातून या परिसरातच आला होता. त्यावेळी काही कुत्र्यांची शिकार करीत त्याने हात्तीवडेच्या उत्तरेकडील हाजगोळी खुर्द व बुद्रुकनजिकच्या परिसरात ठाण मांडले. त्यानंतर या बिबट्याचे कोणालाही दर्शन झाले नाही. मात्र चार दिवसांपूर्वी शेतातील कामे करणाऱ्यांना याचे दर्शन झाले. त्यावेळी तेथील शेतीवाडीत वावरणाऱ्या गव्यांच्या कळपावर या बिबट्याने हल्ला केला. गव्यांच्या कळपातील काही पिल्लांवर त्याची नजर होती. मात्र गव्यांच्या सतर्कतेमुळे त्याचा हा हल्ला फसला.

बिबट्याच्या या वावराबाबत आजरा वनविभागानेही दुजोरा दिला आहे. येथील जंगलासह शेतीवाडीत त्याचा सध्या वावर असल्याचे बिबट्याच्या पाऊलखुणांवरून स्पष्ट झाल्याचे त्यांचे मत आहे. याशिवाय हा बिबट्या सध्या भुकेलेला असून गावातील भटके कुत्रे हे त्याचे भक्ष असल्याने मनवी वस्तीलगत त्याचा वावर असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मनसे लढणार स्वबळावर’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'एसटी बँकेच्या निवडणुकीत कुणाशीही युती न करता मनसे स्वबळावर निवडणूक लढेल,' असे महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे अध्यक्ष अविनाश अभ्यंकर यांनी स्पष्ट केले. संघटनेच्या मेळाव्यानंतर अभ्यंकर म्हणाले, 'रोड सेफ्टी बिलाला आमचा विरोध आहे. विनावाहक बस, खासगीकरण, खासगी वाहनांना टप्पा वाहतुकीला परवानगी याविरोधात संघटना आहे. नुकसान पोहचवून स्पर्धा करण्याला विरोध आहे. संघटनेमध्ये जागांपेक्षाही अधिक उमेदवार बँकेच्या निवडणुकीसाठी इच्छूक आहेत. अनेक संघटना येऊन भेटतात. पण मनसेचे सर्व पॅनेल तयार असल्याने कुणाशी युती करण्याचा प्रश्नच नाही. निकालाची पर्वा न करता स्वबळावर निवडणूक लढवली जाईल.' ते म्हणाले, 'कर्जाचा व्याज दर कमी करणे, कर्ज सोप्या पद्धतीने वितरण करणे, जामीनदाराबाबतची भूमिका, एसटीने इतर ठिकाणी गुंतवलेल्या पैशांचा विनीयोग हे आमचे प्रमुख मुद्दे आहेत. '

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४० ठाण्यात होतेय कृषी भवन

0
0

मारुती पाटील, कोल्हापूर

जिल्हा कृषी कार्यालयासह उपविभागीय कृषी कार्यालय, करवीर तालुका कृषी कार्यालय लवकरच एकत्र येणार आहेत. जिल्हा नियोजन समितीने यासाठी आर्थिक तरतूद केली असून आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. कसबा बावडा येथील चाळीस ठाणा इमारतीमध्ये तयार होणाऱ्या या कृषी भवनात जवाहरनगरातील माती परिक्षण कार्यालय आणि मार्केट यार्डातील खत विश्लेषण प्रयोगशाळाही आणण्याचा प्रस्ताव आहे. सर्व कार्यालये एकत्र आल्यास दरवर्षी भाडेपट्टीवर होणाऱ्या खर्चाला पूर्णपणे आळा बसणार आहे. यामुळे सरकारचे लाखो रुपये बचत होणार आहे.

१९९८ मध्ये एकखिडकी योजना अंमलात आल्यानंतर जिल्हा कृषी कार्यालय ट्रेड सेंटर येथील इमारतीमध्ये आले. यापूर्वी येथे विभागीय कृषी कार्यालय अस्तित्वात होते. जिल्हा कृषी कार्यालयाला यासाठी दरमहा २६ हजार रुपये भाडेपट्टी विकासकाला द्यावी लागत होती. दरवर्षी नवीन भाडेपट्टी करारामुळे लाखो रुपये केवळ भाडेपट्टीवर खर्च होत होते. भाडेपट्टीवर खर्च रक्कमेमध्ये बचत व्हावी व स्व मालकीच्या इमारतीमध्ये कार्यालय असावे यासाठी २०१० मध्ये कृषी संचालक व कृषी मंत्री यांना साडेतीन कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला होता. प्रस्तावाला मे २०१४ मध्ये मंजुरी मिळाल्यानंतर जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी केली होती. त्याचवेळी नवीन अस्तित्वात आलेल्या आत्मा कार्यालय हे जिल्हा कृषी कार्यालयातच सुरू करण्यात आले. आधीच कमी जागेत असलेल्या कार्यालयामध्ये अधिकच अडचण निर्माण झाली. सध्या फायलींच्या ढिगाऱ्यामध्ये कर्मचारी अडकले असल्याची स्थिती आहे.

जिल्हा नियोजन समितीमध्ये आत्मा कार्यालयासाठी निधीची तरतूद झाल्यानंतर अंतर्गत कामे करुन चाळीसठाणा येथील इमारतीमध्ये कार्यालय स्थलांतरीत करण्यात आले. मात्र, कृषी कार्यालय आहे, त्याच जागेत सुरू होते. सरकारची प्रस्तावाला मंजुरी मिळूनही निधीची तरतूद झालेली नव्हती. मात्र, नुकत्याच झालेल्या नियोजन मंडळाच्या बैठकीत ५० लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. एकाच छताखाली सर्व कार्यलये आल्यास त्याचा फायदाच होणार आहे. शासकीय यंत्रणांना गतीने काम करणे शक्य होईल.

कृषी विद्यापीठाच्या जागेत असलेल्या इमारतीमध्ये सुधारीत आराखडा तयार करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याला प्रस्ताव पाठवला आहे. अंदाजपत्रक आणि नकाशा तयार केल्यानंतर लवकरच कामाला सुरुवात होईल. कृषी भवन साकारल्यानंतर जिल्हा कृषी कार्यालय, उपविभागीय कृषी कार्यालय, करवीर तालुका कृषी कार्यालय, आत्मा ही सर्व कार्यालये एकत्रीत येणार आहेत. त्यातून शेतकऱ्यांचाही फायदाच होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात येत आहे.

कृषी क्षेत्राचे कार्य एकत्रीत आणण्यासाठी कृषीभवन साकारण्यात येणार आहे. यात जिल्हा कृषी कार्यालयासह उपविभागीय कृषी कार्यालय, करवीर तालुका कार्यालय एकत्र येणार आहे. याचबरोबर माती परिक्षण, खत विश्लेषण प्रयोगशाळाही येथे आणण्याचे नियोजन आहे.

- नंदकुमार कदम, तंत्र अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images