Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मगरीने घेतला मुलाचा बळी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

चोपडेवाडी (ता. पलूस) येथे कृष्णा नदीत तेरा वर्षांच्या मुलाला मगरीने ओढून नेले. सयाजी शहाजी यादव, असे त्या मुलाचे नाव आहे. तो आई-वडिलांच्याबरोबर नदीवर गेला होता. सोमवारी सकाळी आठ वाजता ही घटना घडली. सायंकाळपर्यंत त्याचा शोध सुरू होता. दोन महिन्यांतील ही दुसरी घटना आहे, त्यामुळे नदीकाठावरील गावांत खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यातील कृष्णेच्या पात्रात मगरींचा वावर वाढल्याची केवळ चर्चाच होत होती. मात्र, या मगरी नागरिकांच्यावर जीवावर उठल्या असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. चोपडेवाडीतील मुलगा अजय यादव हा सोमवारी सकाळी आई-वडिलांबरोबर नदीवर गेला होता. आई-वडील धुणे धुण्यात मग्न होते. त्या वेळी अजय नदीत डुबक्या घेत होता. वडील धुतलेले धुणे वाळत टाकण्यासाठी पाण्यातून बाहेर आले. त्याचवेळी अन्य दोन महिला तेथे येत होत्या. त्यांच्या देखतच मगरीने अजयवर झडप घालून त्याला पाण्यात ओढून नेले. त्या महिलांचा आरडाओरडा ऐकूण गावकरी धावले. तेथील बोटीतूनही लोकांनी अजयचा शोध घ्यायला सुरुवात केली. पण, तो सापडला नाही. तेथून काही अंतरावरील लोकांना मगर त्याला मुलाला तोंडात धरुन जात असताना दिसली. त्यामुळे शोधपथकाने तिकडे धाव घेतली. सांगलीतील हेल्पलाईन टीम, वनाधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत. शोध पथकाला मगर अधून-मधून दिसते. पण, तिने ओढून नेलेला मुलगा मात्र सायंकाळपर्यंत सापडला नव्हता. दिवसेंदिवस हिंस्त्र होत चाललेल्या मगरींचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दोन महिन्यांतील ही दुसरी घटना आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासकामे अंतिम टप्प्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

'महालक्ष्मी यात्रा अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपली असून यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी सर्व कामे वेळेत पूर्ण करा,' असा सल्ला तहसीलदार हनुमंतराव पाटील यांनी आढावा बैठकीत दिला. प्रभारी नायब तहसीलदार योगिता ढोले, नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे, उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, पोलिस निरीक्षक रामदास इंगवले, मुख्याधिकारी तानाजी नरळे व यात्रा कमिटीचे अध्यक्ष रमेश रिंगणे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

सभेच्या सुरवातीला तहसीलदार पाटील यांनी महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरातील पार्किंगचे स्लॉट पूर्ण झाल्याची माहिती दिली. तसेच रिंग रोडचे काम अंतिम टप्प्यात आले असून यात्राकाळात वाहतूक समस्या उदभवणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी पार्किंगच्या ठिकाणी लाईटची सुविधा देण्यात यावी तसेच २४ तास सुरक्षारक्षकाची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी प्रवीण अजगेकर यांनी केली.

वाहतूक नियंत्रणाबाबत माहिती देत असताना पोलिस निरीक्षक इंगवले यांनी चार मेपर्यंत सुरळीत वाहतूक सुरू राहील असे सांगितले. तर ५, ६ व ७ मे या कालावधीत नियोजित नियमानुसार वाहतूक सुरू राहणार असल्याची माहिती दिली. तसेच शहरातील सर्व व्यापारी वर्गाला ३० एप्रिल पूर्वी माल वाहतूक करता येईल, तेव्हा यापूर्वीच सर्व माल साठवून घ्यावा, असे आवाहन केले. त्यानंतर मात्र कुठल्या परिस्थिती मोठी व अवजड वाहने रस्त्यात उभा केली जाणार नाहीत असे सांगितले.

यावेळी पालिका अभियंता रमेश पाटील यांनी शहरात ३०० शौचालये पूर्ण झाली असल्याची माहिती दिली. तसेच शहरातील रस्ते दुरुस्ती व इतर विकासकामे अंतिम टप्प्यात आले असल्याचे सांगितले. मोठ्या संख्येने येणा‍ऱ्या भाविकांना कोणतीही अडचण भासणार नाही. उपजिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुनील कुरुंदवाड यांनी दुकानदारांची अन्न-भेसळ विभागामार्फत तपासणी करावी अशी सूचना केली. गॅस पुरवठ्यासंदर्भात माहिती देताना वितरक सुरेश कोळकी म्हणाले, 'यात्रेसाठी कंपनीने खास व्यवस्था केली आहे. या काळासाठी ५००० सिलेंडरचा जादा स्टॉक ठेवण्यात येणार आहे. ज्या नागरिकांना उपलब्ध क्षमतेपेक्षा जादा सिलेंडर लागेल त्यांना अनामत रक्कम भरून सिलेंडर घेता येईल. यात्रा कालावधीनंतर कंपनी ते परत घेईल व अनामत रक्कम परत देईल.

३१ ठिकाणी सीसीटीव्ही

पोलिस निरीक्षक रामदास इंगवले म्हणाले, 'शहरात सुमारे ३१ ठिकाणी सीसी टीव्ही यंत्रणा बसविण्याचे काम सुरु आहे. यात्रा कालावधीत शहरातील चार ठिकाणी पर्यायी पोलिस चौकी उभारण्यात येणार आहे. मंदिर परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मेटल डिटेक्टर, सहा हॅण्ड हेल्ड डिटेक्टर व बिनतारी संदेश यंत्रणा उभारण्यात आली आहे. तसेच बॉम्बनाशक, बॉम्ब शोधक व घातपात विरोधी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी वाहतुकीसंदर्भातील सर्व नियोजन अंतिम टप्प्यात आले असून आता अपवाद वगळता कुठल्याही प्रकारच्या सूचना व हरकती स्वीकारल्या जाणार नाहीत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रस्ताव पाठवा, पाठपुरावा करू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'राज्याचा मंत्री असलो तरी मला माझ्या गावचा, जिल्ह्याचा अभिमान आहे. विविध उपक्रम, योजना अत्यंत प्रभावीपणे राबवून कोल्हापूर जिल्हा परिषदेने राज्यात अनेक पुरस्कार मिळविले आहेत. जिल्हा परिषदेने केंद्रीय राजीव गांधी पंचायत राज सबलीकरण आणि उत्तरदायित्त्व प्रोत्साहन योजनेत देशात प्रथम क्रमांक मिळविला, याचा आपल्याला खूप अभिमान आहे,' असे प्र्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू सभागृहात विविध योजना, उपक्रम यांची माहिती व आढावा घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, उपाध्यक्ष शशिकांत खोत, शिक्षण, क्रीडा व अर्थ समितीचे सभापती अभिजित तायशेटे, महिला बाल कल्याण सभापती ज्योती पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री पाटील म्हणाले, 'जिल्हा परिषदेला विविध स्तरावरील पुरस्कार प्राप्त होत आहेत, यातून या ठिकाणी खूप चांगले काम सुरु असल्याचे दिसते. सरकारच्या योजना चांगल्या राबवून तळागाळातील, खेड्यापाड्यातील वंचित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणा. जिल्हा परिषदेचे अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी सातत्याने मुंबई, दिल्लीला यावे. आवश्यक ते प्रस्ताव तातडीने पाठवावेत. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य सर्वतोपरी करू.'

जिल्हा परिषदेकडील निर्मलग्राम योजना, कायापालट योजना, चिरायु योजना, किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन देण्याचा उपक्रम, राजर्षी शाहू छत्रपती निवासी क्रीडा प्रशाला, ई लर्निंग, ऍ़क्टीव्हिटी बेस्ड लर्निंग, इ पंचायत प्रकल्प, राष्ट्रीय बायोगॅस प्रकल्प, एक कुटुंब एक नोकरी योजना आदींची सविस्तर माहिती पालकमंत्री पाटील यांनी घेतली.

निधी पुरवू

पालकमंत्री पाटील म्हणाले, 'एक कुटुंब एक नोकरी योजना प्रभावीपणे राबवा. कारण रोजगारनिर्मितीला पर्याय नाही. अनेक गावे-वाड्या वस्त्यांच्या ठिकाणी रोजगार उपलब्ध नाहीत. तेथील लोक सरकारकडे आशेने पाहतात. अशा लोकांमध्ये कौशल्यवृध्दी करुन त्यांना नोकरी देण्यासाठीही प्रयत्न करा. या योजनेसाठी आवश्यक निधीची कमतरता पडू देणार नाही.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दुकानगाळे’ भोवले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीच्या दुकानगाळ्यांची लिलाव प्रक्रिया न राबविता मुदतवाढ दिल्याप्रकरणी ११ पैकी १० सदस्यांच्या अपात्रतेचे आदेश पुणे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी दिले. 'आंदोलन अंकुश' या सामाजिक संस्थेने याबाबत तक्रार केली होती.

सरपंच राजश्री विनायक कांबळे, तत्कालिन उपसरपंच अनंतराव बाळकृष्ण धनवडे, सदस्य मुरलीधर दत्तात्रय गवळी, अशोक जनार्दन पुजारी, अभिजीतराव नारायणराव जगदाळे, मनीषा जयवंत पतंगे, अरूंधती सदाशिव पुजारी, परशराम दत्तू गवंडी, राजेंद्र भाऊसो आणुजे, कांचन राजाराम कंदले अशी अपात्र ठरविण्यात आलेल्या सदस्यांची नावे आहेत. यापैकी राजेंद्र आणुजे यांचे निधन झाले आहे.

याबाबत माहिती देताना 'आंदोलन अंकुश'चे धनाजी चुडमुंगे व राकेश जगदाळे म्हणाले, 'नृसिंहवाडीत ग्रामपंचायतीच्या मालकीच्या मोक्याच्या ठिकाणी जागा आहेत. यापैकी काही जागा तात्पुरत्या वापरासाठी तूट कराराने दिल्या आहेत. मात्र या ठिकाणी दोन-तीन मजली इमारती उभारण्यात आलेल्या आहेत. काही जागा केवळ वार्षिक दोन ते तीन हजार इतकी कवडीमोल दराने भाड्याने घेऊन या ठिकाणी गाळे बांधण्यात आले आहेत. तसेच हे दुकानगाळे तब्बल दीड ते दोन लाख रुपये डिपॉझीट घेऊन भाड्याने देण्यात आले आहेत. अशा मोक्याच्या तीसहून अधिक जागा आहेत. याचबरोबर ग्रामपंचायतीच्या मालकीचे अनेक गाळे आजी माजी सदस्यांनी अल्प किंमतीत आप्तस्वकियांना नावाने घेऊन भाड्याने दिले आहेत. ग्रामपंचायतीचे स्टेडियम गाळे व विठ्ठल मंदिर गाळ्यांचा फेरलिलाव न करता ग्रामपंचायतीने मुदतवाढ दिली आहे.'

यानंतर २६ जानेवारी २०१४ रोजी उपोषणही केले होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबत शिरोळच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला होता. सरपंच व ग्रा.पं.सदस्यांनी कर्तव्यात कसुरी व हेळसांड केल्याने गटविकास अधिकाऱ्यांनी कारवाईची शिफारस केली होती. हा चौकशी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पुणे विभागीय आयुक्तांकडे सादर केला होता. याबाबत पुणे विभागीय आयुक्तांसमोर २७ जानेवारी, १० फेब्रुवारी व ३ मार्च २०१५ रोजी सुनावणी झाली. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा अहवाल मान्य करून दहा सदस्यांच अपात्रतेचे आदेश आयुक्त एस. चोकलिंगम यांनी दिले.

'आंदोलन अंकुश'चा पाठपुरावा

'आंदोलन अंकुश' या सामाजिक संस्थेने ९ जानेवारी २०१४ रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. दुकानगाळ्यांचे वाटप पारदर्शी व लिलाव पध्दतीने झाले नाही. सन २०१२-१३ ते २०१४-१५ या कालावधीत गाळ्याचे मनमानी पध्दतीने बेकायदेशीर वाटप केले आहे. यामुळे ग्रामपंचायतीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. परिणामी सरपंच व सदस्यांवर कारवाई करावी अशी मागणी आंदोलन अंकुशने केली होती.

शिरोळ येथील ग्रामपंचायतीने ठराव करून गायरानमधील जागा जयभवानी मंडळाला दिली होती. याबाबतही 'आंदोलन अंकुश'ने तक्रार केली होती. जानेवारी २०१२ मध्ये शिरोळ ग्रामपंचायत बरखास्तीचे आदेश देण्यात आले. 'अंकुश' च्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील गायरान जमिनींचे वाटप थांबले.

-धनाजी चुडमुंगे, अध्यक्ष, अंकुश

ग्रामपंचायत सदस्यांनी कोणताही भ्रष्टाचार केला नाही. तसेच स्वत: गाळे घेवून लाभ उठविला नाही. ३० टक्के भाडेवाढ करून गाळेधारकांना मुदतवाढ दिली. यामध्ये ग्रामपंचायतीचे नुकसान केलेले नाही. 'अंकुश' तक्रारीवर आयुक्तांनी अपात्रतेचे आदेश दिले आहेत. याविरूध्द अपिलात जाणार आहोत.

-अभिजीत जगदाळे, उपसरपंच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारविरोधात भाकपचे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या खुनाला दोन महिने झाले तरी खुनाचा काहीही सुगावा लागलेला नाही. दाभोळकरांच्या खुनाचा तपासही लागलेला नाही. सरकारच्या या निष्क्रियतेविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी जातीयवादी शक्तींना पाठिशी घालणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्याविरोधात घोषणा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, गोविंदराव पानसरे अमर रहे, धर्मांध सनातन्यांचा धिक्कार असो अशी घोषणांनी आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. धरणे आंदोलनामध्ये 'अंनिस', 'एआयएसएफ'चे कॉ. अनिल चव्हाण, सतिशचंद्र कांबळे, सुभाष वाणी, नामदेव गावडे, आशा कुकडे, गिरीश फोंडे, उमेश सूर्यवंशी, शिवाजी माळी, शिवाजी शिंदे, प्रशांत आंबी, मेधा पानसरे, रसिया पडळकर, वर्षा कदम आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दरमहा नवे उपक्रम राबवू’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'दर महिन्याच्या वीस तारखेला रेल्वेस्थानकात नावीन्यपूर्ण कार्यक्रम केला जाईल. प्रवाशांच्या तक्रारी सोडविल्या जातील' अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. सोमवारपासून छत्रपती राजर्षी शाहू महाराज टर्मिनसमध्ये शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाची सुरुवात केक कापून करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. रेल्वे स्टेशनवर सकाळी साडेअकरा वाजता छोटेखानी कार्यक्रमाने शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाची सुरुवात झाली.

खासदार धनंजय महाडिक म्हणाले, 'कोल्हापूर रेल्वेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्याबाबत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या समवेत चर्चा झाली असून काही मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन मिळाले आहे. रेल्वेस्टेशनमध्ये दर महिन्याच्या वीस तारखेला नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार आहे. रांगोळी, सुभोभिकरण, रेल्वेचा इतिहास, नव्या सूचनांचा विचार केला जाणार आहे. प्रवाशांच्या तक्रारी ऐकून सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील.'

यावेळी रेल्वे अभ्यासक मोहन शेटे म्हणाले, 'दर महिन्याच्या वीस तारखेला कार्यक्रम घेण्याची मागणी रेल्वे संघटनांनी यापूर्वी केली होती. ही मागणी मान्य झाल्याने संघटनेला यश आले आहे.' यावेळी कृष्णराव सोळंकी उपस्थित होते.

रेल्वे सेवेची सुरुवात

मिरजेपर्यंत आलेली रेल्वे कोल्हापूरपर्यंत आणण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी मिरजेपासून कोल्हापूरपर्यंत संस्थानाच्या खर्चाने प्रयत्न केले. त्यासाठी कोल्हापूर रेल्वे स्टेशनची पायाभरणी ३ मे १८८८ रोजी झाली. त्यानंतर तीन वर्षात स्टेशन पूर्ण होऊन २० एप्रिल १८९१ पासून रेल्वे सेवेला प्रारंभ झाला. खासदार महाडिक यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन रौप्यमहोत्सवाची सुरुवात करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टेशनरी परस्पर विकून दहा लाखांची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विक्रीकर कार्यालयातील टंकलेखक अमित विठ्ठल बळप याने दहा लाख रुपये किंमतीच्या स्टेशनरीची परस्पर विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. विक्रीकर भवनाचे आस्थापना अधीक्षक अजितकुमार महेशी यांनी फिर्याद दिली आहे.

विक्रीकर भवनाला कोल्हापूर भांडाराकडून स्टेश​नरी पुरवली जाते. पाच सप्टेंबर २०१३ आणि तीन ऑक्टोबर २०१३ रोजी कोल्हापूर भांडारकडून स्टेशनरी पुरविण्यात आली होती. विक्रीकर भवनाकडे चार टप्प्यात ही स्टेशनरी येणार होती. मात्र दोनच टप्प्यातील स्टेशनरी मिळाल्याने विक्रीकर भवनाच्यावतीने कोल्हापूर भांडारला विचारणा करण्यात आली. यावेळी स्टेशनरी पोहोच केल्याचा खुलासा कोल्हापूर भांडारच्यावतीने करण्यात आला. त्यानंतर विक्रीकर भवनातील अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता अमित बळप याने अधिकाऱ्यांच्या सह्या करून आणि बनावट शिक्के वापरून स्टेशनरीची परस्पर विल्हेवाट लावली.

पाच सप्टेंबर २०१३ रोजी पाच लाख ९४ हजार १०० रुपये तर ३ ऑक्टोबर २०१३ रोजी तीन लाख ४८ हजार ७०० रुपयांची स्टेशनरी विकून त्याने फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीई निकषांत २६८९ शाळा नापास

$
0
0

जान्हवी सराटे, कोल्हापूर

आरटीईचे (शिक्षण हक्क कायदा) निकष पूर्ण करण्यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषद आणि कोल्हापूर महापालिकेच्या एकूण १५२४ शाळा नापास ठरल्या आहेत. एकीकडे सरकार शाळा हायटेक करण्याची घोषणा करत असतानाच जिल्हा परिषदेच्या २००५ आणि महापालिकेच्या ५९ शाळा अशा एकूण २०६४ शाळांपैकी केवळ ५४० शाळाच सर्व दहा निकष पूर्ण करण्यात यशस्वी ठरल्या. जिल्ह्यातील खासगी शाळांसह एकूण ३६१७ शाळांपैकी केवळ ९२८ शाळा आरटीईच्या निकषांना पात्र ठरल्या आहेत. एकूण २६८९ शाळा निकष पूर्ण करण्यास अपात्र ठरल्या आहेत.

शाळेसाठी स्वतंत्र इमारत, प्रत्येक शिक्षकामागे एक वर्गखोली, मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय, स्वयंपाकगृह, शाळेभोवती कंपाऊंड, खेळाचे मैदान, अडथळाविरहित प्रवेशमार्ग (रॅम्प), मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र कार्यालय आणि ग्रंथालय असे शिक्षण हक्क कायद्यांन्वये किमान दहा निकष शाळांना आहेत. मात्र जिल्हा परिषदेच्या कोल्हापुरातील २०६४ शाळांपैकी १५२४ शाळा या निकषांच्या कसोटीवर नापास झाल्याचे शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणाअंती स्पष्ट झाले आहे. साडेतीन हजार शाळांपैकी सर्वाधिक म्हणजे एक हजारहून अधिक शाळांमध्ये मुख्याध्यापक खोली नसल्याचे दिसून आले. प्रत्येक शाळेत अपंगांसाठी रॅम्प असणे आवश्यक असताना अद्याप ४४१ शाळांनी रॅम्पची सुविधा केलेली नसल्याने अशा विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क बजाविताना अडचणी निर्माण होत आहेत.

'काही शाळांमध्ये सर्व दहा निकष पूर्ण करण्यास काही अडचणी आहेत. शाळांच्या इमारती ह्या पूर्वीच्या आहेत. त्याकाळात असे निकष नव्हते. मात्र, आता नव्याने बांधल्या जाणाऱ्या इमारतींमध्ये हे निकष पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे', असे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी स्मिता गौड यांनी सांगितले.

दरम्यान, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या मुलांना शिक्षणाची समान संधी मिळण्यासाठी अस्तित्वात असलेल्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आरक्षित जागांवर प्रवेश देण्यासाठी शहरातील खासगी शैक्षणिक संस्थांच्या ७५ टक्के शाळांना अपयश आले आहै. शहरातील शाळांमध्ये उपलब्ध २७८ जागांपैकी केवळ ७० प्रवेश निश्चित झाल्यामुळे अजूनही २०८ जागा रिक्त राहिल्या आहेत. शिक्षण हक्क कायदा राबविण्याची मानसिकता शाळांमध्ये नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी प्रभावी झालेली नाही. शिक्षणासाठी मोफत हक्क कायद्यानुसार आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना २५ टक्के प्रवेश देण्याबाबत शहर व जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये उदासिनता दिसून येत आहे.

शहरातील नामवंत शाळांमध्ये पहिल्या वर्गाच्या प्रवेशासाठी मोठी गर्दी होते. त्यामुळे आरटीईचे निकष पाळले जावेत आणि अधिकाधिक मुलांना प्रवेशाची संधी मिळावी यादृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे. तरच या योजनेचा लाभ अधिकाधिक मुलांना मिळेल.

मैदानांच्या उपलब्धतेसाठी प्रयत्न

'महापालिकेच्या एकूण ५९ शाळांपैकी पाच शाळांना स्वतःची इमारत नाही. अशा शाळा भाड्याच्या खोलीमध्ये भरविल्या जातात. मैदानांबाबत सरकारने हा निकष शिथिल केला असून भाड्याच्या खोलीमध्ये शाळा भरत असेल तर परिसरात रिकाम्या जागेची संम्मती घेऊन मुलांना खेळासाठी मैदान उपलब्ध करता येते,' असे महापालिकेचे प्रशासन अधिकारी डी. एम. किल्लेदार यांनी सांगितले.

निकषनिहाय अपात्र शाळा

एकूण शाळा - ३६१७

मुलांचे स्वच्छतागृह - २१

मुलींचे स्वच्छतागृह - १६

रॅम्प - ४४१

पिण्याचे पाणी - ०

संरक्षक भिंत - ३०५

स्वयंपाकगृह - २४९

ग्रंथालय - ३८

खेळाचे मैदान - ३४१

विद्युतीकरण - २६९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजाराम कारखान्यासह प्रोसेसर्सची वीज तोडणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदीच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरल्याप्रकरणी राजाराम कारखान्यासह इचलकरंजी येथील आठ प्रोसेसिंग युनिटची वीज २४ तासात खंडीत करण्यात येत असल्याची नोटीस महावितरण कंपनीने पाठवली आहे. मंगळवारी या नोटिसा संबंधितांना मिळणार आहे. त्यानंतर २४ तासात वीज पुरवठा बंद केला जाणार आहे. त्याचबरोबर पाटबंधारे विभागाकडूनही या संस्थांना पाणीपुरवठा बंद करण्यात येत असल्याची नोटीस पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

दरम्यान, ज्या कारखानदारांना आणि प्रोसेस युनिटला २४ तासात प्रकल्प बंद करता येणार नाही, त्यासाठी त्यांनी काय प्रक्रिया (सेल्फ क्लोजर) केली आहे यासंदर्भात खुलासा करण्याच्या सूचनाही केल्या आहेत.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासंदर्भात करायच्या उपाययोजनेसंदर्भात बैठक झाली होती. विभागीय आयुक्तांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला नदी प्रदूषणास कारणीभूत घटकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या कारवाईअंतर्गत २४ तासात वीज तोडण्यात येणार असल्याची नोटीस सोमवारी बजावल्याची माहिती महावितरणचे अधिक्षक अभियंता दिपक कुमठेकर यांनी दिली.

राजाराम कारखाना, सावंत प्रोसेसिंग, रघुनंदन प्रोसेसिंग, राधामोहन, राधा कन्हैया, लक्ष्मी को ऑपरेटिव्ह, हरिहर को ऑपरेटिव्ह, यशवंत को ऑपरेटिव्ह आणि अरविंद कॉटस्पीन या प्रोसेसिंग युनिटची वीज खंडीत केली जाणार आहे. सोमवारी सायंकाळी नोटीसा दिल्या आहेत. मंगळवारी त्या संबंधितांना मिळणार आहेत. त्यानंतर लगेच कारवाई होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन बिल्डरांच्या विरोधात गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अपार्टमेंटमधील दूषित पाणी पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनमध्ये मिसळत असल्याने जिवितास धोका उत्पन्न होत असल्याच्या आरोप ठेवत अॅड. गौतम सुरेश पोवार (वय ४३, रा. लिशा हॉटेल चौकाजवळ) यांनी दोन बांधकाम व्यावसायिकांसह अपार्टमेंटमधील सात रहिवाशांविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या प्रकरणात नऊ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, बांधकाम व्यावसायिक अनंत मुरगुडे आणि अमर उपाध्ये यांनी अॅड. पोवार यांच्या घराशेजारी निसर्ग अपार्टमेंट बांधली आहे. पोवार यांच्या घरी येण्याऱ्या पिण्याच्या पाइपलाइनमध्ये या अपार्टमेंटचे सांडपाणी मिसळत आहे. दूषित पाण्याबद्दल तक्रार करून मुरगुडे आणि उपाध्ये यांनी दुर्लक्ष केल्याने अॅड. पोवार यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात सोमवारी फिर्याद दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगली पालिकेला SCचा दणका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

हरीत न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधातील सांगली महापालिकेची याचिका सुप्रीम कोर्टाने सोमवारी फेटाळली. पुन्हा हरीत न्यायालयाकडे बाजू मांडण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने महापालिकेला दिले. दरम्यान, दहा कोटी रुपये विभागीय आयुक्तांकडे भरल्याशिवाय हरीत न्यायालयही महापालिकेची बाजू ऐकूण घेणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

घनकचरा व्यवस्थापनाकडे अक्षम्य दुर्लक्ष करून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण केल्याचा ठपका ठेवत हरीत न्यायालयाने महापालिकेला बरखास्तीचा इशारा देवून साठ कोटी रुपये भरण्याचा आदेश दिला होता. या आदेशाच्या विरोधात महापालिकेने सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यानंतर कोर्टानेही प्रकल्पाच्या तीस टक्के रक्कम भरण्याचे हमीपत्र घेऊन आला तरच याचिकेवर सुनावणी होईल, असे सांगून हरीत न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. सोमवारी आयुक्त, उपायुक्तांसह अन्य अधिकारी कागदपत्रांची जुळणी करून सुप्रीम कोर्टात पोहचले. त्यावेळी कोणतीही सुनावणी न घेताच न्यायालयाने महापालिकेची याचिका फेटाळत पुन्हा हरीत न्यायालयाचा रस्ता दाखविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तृप्ती माळवी सभागृहापुढे नरमल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महानगरपालिकेत शह-काटशहाच्या राजकारणामुळे अर्थसंकल्पावर सही करण्यास चालढकल करणाऱ्या महापौर तृप्ती माळवी यांना सोमवारी नगरसेवकांच्या संतापाला सामोरे जावे लागले. सर्वसाधारण सभेने यापूर्वीच अर्थसंकल्पाला मंजुरी दिली असताना त्यावर सही करण्यास टाळाटाळ कशासाठी, विकासकामांचे बजेट अडवून शहर विकासाआड येण्याचा नैतिक अधिकार काय, अशा प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. महापौरांच्या निषेधाच्या घोषणाही या वेळी देण्यात आल्या. नगरसेवकांनी बजेटवरील सहीवरून सुमारे अर्धा तासहून अधिक काळ महापौर आणि प्रशासनाला धारेवर धरले. त्यामुळे महापौर माळवी यांनी दुपारी एकच्या सुमारास अर्थसंकल्पासह त्यांच्या विरोधात सभागृहाने मंजूर केलेला नगरसेवकपद रद्द करण्याच्या ठरावावरही सही केली. आता प्रशासनाकडून नगरसेवक पद रद्दचा ठराव राज्य सरकारकडे कारवाईसंदर्भात सादर केला जाणार आहे.

महापालिकेच्या ४१३ कोटीच्या अर्थसंकल्पास ३० मार्च रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेने सर्वानुमते मंजुरी दिली. महापौरांच्या सहीअभावी विकासकामांच्या अंमलबजावणीसाठी निधी उपलब्ध होणार नसल्याने नगरसेवकात अस्वस्थता होती. नगरसेवक राजू लाटकर यांनी सोमवारी सभेला सुरुवात होताच मागील सभेचा इतिवृत्तांत मंजूर करणार म्हणजे काय करणार, बजेटवर अजून सही झाली नसल्याचा मुद्दा मांडला. उपमहापौर मोहन गोंजारे, शारंगधर देशमुख, भूपाल शेटे, निशिकांत मेथे, यशोदा मोहिते, रशीद बारगीर, आर.डी. पाटील, मुरलीधर जाधव, चंद्रकांत घाटगे आदींनीही थेट हल्लोबाल केला. देशमुख यांनी महापौरांची शहर विकासाची भूमिका दिसत नाही असा आरोप केला. नगरसेवकांचा रेटा पाहून महापौरांनी सभागृहातच ठरावावर सह्या केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पगाराला कात्री लावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापौर तृप्ती माळवी यांनी अर्थसंकल्पावर स्वाक्षरी न केल्यामुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांच्या रोषाला आयुक्त पी. शिव शंकर यांना सामोरे जावे लागले. अर्थसंकल्पातील तरतुदी आ​णि ऐच्छिक निधीवर चर्चा सुरू असताना आयुक्तांनी, 'निधीची उपलब्धता झाल्यानंतर कामे करू' असे सभागृहाला सांगताच नगरसेवकांनी आयुक्तांकडे मोर्चा वळविला. 'निधीची उपलब्धता म्हणजे काय ?' अशी विचारणा करत 'निधी उपलब्ध करणे ही तुमची जबाबदारी आहे. बजेटबद्दल गांभीर्य नसणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पगाराला कात्री लावा, मोटारी काढून घ्या. प्रशासनाविरोधात हक्कभंग दाखल करू. विकासकामांसाठी निधीची तरतूद होत नसेल तर महापालिकेचा एक पैसाही प्रशासनावर खर्ची पडता कामा नये' असा रेटा नगरसेवकांनी लावला.

नगरसेवक राजू लाटकर, भूपाल शेटे यांनी, 'महापौर बजेटवर सही करणार नसतील तर प्रशासनाने शहरातील विकासकामांच्या पूर्ततेसाठी काय नियोजन केले ते सांगावे. बजेटवर सही झाली नाही म्हणून जनतेस वेठीस धरणार का?' असा थेट हल्ला चढवला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सभागृहात उभे रहात महापौरांना बजेटवर सही करण्यास उशिरा लावल्याबद्दल प्रश्न विचारले. शिवसेना, भाजप आणि जनसुराज्य अपक्ष आघाडीच्या नगरसेवकांनीही माळवींना टीकेचे लक्ष्य केल्याने त्या सभागृहात एकाकी पडल्या. बजेटवर सही होणार नसेल तर तसा अहवाल सरकारला आजच पाठवा अशी मागणी नगरसेवकांनी केली.

यावेळी मुख्य लेखापरीक्षक संजय सरनाईक यांनी बजेटमधील तरतुदीनुसार कामे होतील असे सांगितले. अंदाजपत्रकातील तरतुदींनुसार निधी खर्च होईल. निवडणुकीआधी ७५ टक्के निधीची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने नियोजन करू असे सांगितले.

विक्रमसिंह घाटगेंचे स्मारक साकारू

सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांचे जीवन उजळविणारे विक्रमसिंह घाटगे यांचे महापालिकेतर्फे यथोच्छित स्मारक उभारले जाईल. नागाळा पार्क परिसरातील चौकाला त्यांचे नाव देण्याची प्रक्रिया महिन्याभरात पूर्ण करू असे सभागृहात सांगण्यात आले. माजी आमदार सा. रे. पाटील, माजी कुलगुरू रा. कृ. कणबरकर आणि तालीम संघाचे वसंतराव मोहिते यांना आदरांजली वाहण्यात आली. नगरसेवक लाटकर, यशोदा मोहिते, आर. डी. पाटील यांची यावेळी भाषणे झाली. महिला व बालकल्याण समिती सभापती लीला धुमाळ यांना यावेळी अश्रू अनावर झाले. त्यानंतर सभा तहकूब करण्यात आली. ही तहकूब सभा शुक्रवारी दुपारी बारा वाजता होईल.

महापौर म्हणतात, सहीबद्दल खोटा प्रचार

महापौर माळवी यांनी यासंदर्भात प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, 'अर्थसंकल्पावर सही करणार नाही हा माझ्याबद्दल प्रचार खोटा केला गेला. नगरसेवकांना मिळणाऱ्या ऐच्छिक निधीसंदर्भात आयुक्तांनी चर्चा केली होती. मुळात अर्थसंकल्पात नगरसेवकांना दिलेल्या निधीमध्ये कमी-जास्तपणा आहे. नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील कामे त्वरित करता यावीत यासाठी कमी मुदतीची टेंडर्स काढून गतीने कामे करावीत, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यास आयुक्तांना कळविले होते.' दरम्यान माळवी यांनी नगरविकास विभागाच्या प्रधानसचिवांना निवेदन पाठवून सभागृहाने नगरसेवकपद रद्द करण्याबाबत मंजूर केलेला सदस्य ठराव रद्द करावा अशी मागणी केली आहे. मला कोणत्याही कोर्टाने दोषी ठरविले नाही असे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राजाराम’ महाडिकांकडेच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार महादेवराव महाडिक यांनी सलग पाचव्यांदा निर्विवाद विजय मिळवत कारखान्यावर एकतर्फी वर्चस्व राखले. महाडिक यांच्या राजर्षी शाहू पॅनेलने माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या परिवर्तन पॅनेलचा धुव्वा उडवत सर्वच्या सर्व १९ जागांवर विजय मिळवला. 'राजाराम'च्या निकालाचे पडसाद गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवर उमटण्याची शक्यता असल्याने दोन्ही गटांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. अखेर कारखान्यावर महाडिक यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले.

राजाराम कारखान्यावरील आमदार महाडिक यांच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी माजी गृहराज्यमंत्री पाटील यांनी परिवर्तन पॅनेल उभे केले होते. आमदार महाडिक यांनीही विद्यमान १२ संचालकांना डच्चू देत पॅनेलची घोषणा केली होती. यामुळे सुरुवातीला नाराजांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न विरोधी गटाकडून झाला होता. त्याला राधानगरी परिसरात यश आले असल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. मात्र, महाडिक यांच्या बालेकिल्ल्यातील हातकणंगले तालुक्यात विरोधी गटाला फारसा शिरकाव करता आला नाही. महाडिक यांनी याच भागात मोठे मताधिक्क्य मिळवत विजयाला गवसणी घातली.

एक वर्षाचा जास्त कार्यकाल मिळाल्यानंतर जाहीर झालेल्या निवडणुकीत दोन्ही गटांकडून व्यक्तिगत पातळीवर टीका होत होती. यामुळे निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाली होती. सकाळी पहिल्या निकालाने महाडिक यांच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. मतदानात हातकणंगले तालुक्यातील लाटवडे, भेंडवडे, नरंदे, पेठवडगाव, टोप या हक्काच्या गावांत सत्तारुढ गटाने मोठे मताधिक्क्य मिळवले. तर, पट्टणकडोली व हुपरी गावात तसेच राधानगरी तालुक्याने विरोधी पॅनेलला चांगलाच हात दिला, परंतु शिये, वडणगे, निगवे, वाशी, कांडगाव, कळंबा या गावात सत्तारुढ गटाने चांगले मताधिक्क्य मिळवत विजयाकडे आगेकूच सुरू ठेवली. विरोधी पॅनेलचे दोन उमेदवार शंभर ते दीडशे मतांच्या फरकाने पराभूत झाले. विधानसभेपाठोपाठ राजाराम कारखान्यात माजी मंत्री सतेज पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

सत्यशोधक बँकेत सत्ताधारीच

अॅड. शामराव शिंदे सत्यशोधक सहकारी बँकेच्या इतिहासात प्रथमच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी पॅनेलने १४ जागा जिंकून निर्विवाद विजय मिळवला. विरोधी पॅनेलचे उमेदवार दोनशे ते सातशे मतांच्या फरकाने पराभूत झाले. विद्यमान अध्यक्ष सुरेश काळे व उपाध्यक्ष गजानन लिंगम विजयी झाले. कै. शामराव शिंदे यांच्या पत्नी सुमित्रा शिंदे यांनी सत्ताधारी पॅनेलचे नेतृत्व केले. सर्वसाधारण गटात विलासराव बचाटे यांना सर्वाधिक १५८८ मते मिळाली.

'कोजिमाशि'त स्वाभिमानीची हॅट्‍ट्रिक

कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी पतंसस्थेत अखेर स्वाभिमानी सहकार आघाडीने पुन्हा एकदा वर्चस्व मिळविले. २१ जागांपैकी १७ जागांवर स्वाभिमानीच्या उमेदवारांनी बाजी मारली. तर, विरोधी राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीने चार जागा घेतल्या. या निकालाने 'कोजिमाशि'त स्वाभिमानीने विजयाची हॅट्‍ट्रिक साधली. अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत पन्नास ते शंभर मतांचा फरक राहिला. शाहू-फुले-आंबेडकर निर्णायक आघाडी आणि अपक्षांचा धुव्वा उडाला. सत्तारुढ गटातील सहा संचालकांनी राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीत प्रवेश केला होता. संस्थाचालक, शैक्षणिक संघटना, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी एकत्र येऊन महाआघाडीतून लढा दिला. काटालढतीत परिवर्तन आघाडीने चार जागांवर मजल मारली. सर्वसाधारण गटात स्वाभिमानीने १६ पैकी १३ जागा जिंकल्या. तर, महाआघाडीने या गटात तीन जागा जिंकल्या. महिला राखीव गटात महाआघाडीला एक जागा मिळाली.

सभासदांनी सत्याच्या बाजूने न्याय दिला आहे. राजाराम कारखान्याच्या निकालाने जिल्ह्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळणार आहे. या निकालवरून आमचा 'गोकुळ'मध्येही विजय निश्चित झाला आहे.

- महादेवराव महाडिक, आमदार, सत्तारुढ पॅनेल प्रमुख

उत्पादकांनी आमच्या बाजूने निकाल दिला. मात्र, येलूर येथील सभासद व केवळ साखर मिळते म्हणून मतदान केलेल्या अनुउत्पादक सभासदांमुळे पराभव झाला आहे. या पराभवातून उभारी घेऊन पुन्हा जोमाने लढत देऊ.

- सतेज पाटील, माजी मंत्री, परिवर्तन पॅनेल प्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंकाळ्यात ११ बदकांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रंकाळा तलावातील प्रदूषित पाण्याचा फटका आता माशांपाठोपाठ पक्ष्यांनाही बसला आहे. जुना वाशी नाका परिसरात बांधलेल्या नवीन लोखंडी पुलाजवळ स्थलांतरित पक्षी मृतावस्थेत आढळले. स्पॉट बिल्ड आणि कॅरेबियन कूट जातीच्या ११ बदकांना प्रदूषित पाण्यामुळे जीव गमवावा लागला. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. तरीही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात कुठलीच माहिती नव्हती. महापालिकेच्या आरोग्य विभागातील अ​धिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे फोन स्वीच ऑफ होते.

हौशी छायाचित्रकार संग्राम मगदूम, नीलेश शिरगावे, कुंदन माळी, अभिजीत यादव, कुश वसा यांना रविवारी सकाळी हा प्रकार आढळून आला. बदकांच्या मृत्युमुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. मगदूम गोकुळ दूध संघात पशुसंवर्धन विभागात नोकरी करतात. त्यांनी दूध संघाच्या पशु चिकित्सकांना संपर्क साधून पक्षी मृतावस्थेत आढळल्याची माहिती दिली. वास येत असल्याने पक्षी मरून दोन ते तीन दिवस झाले असतील, यामुळे त्याचा वैद्यकीय अहवाल (पोस्ट मार्टम) करता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मगदूम व त्यांच्या सहकाऱ्यांनी महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण होऊ शकला नाही.

मगदूम म्हणाले, 'स्पॉट बिल्ड आणि कॅरेबियन कूट हे पक्षी स्थलांतरित आहेत. हिवाळ्याला सुरुवात झाली की रंकाळा परिसरात मोठ्या संख्येने हे पक्षी येतात. पाणस्थळ, दलदलीचा प्रदेश यामुळे पक्ष्यांना आवश्यक खाद्य येथे मुबलक प्रमाणात आढळत असल्याने पक्ष्यांचे आगमन होते. मात्र, गेल्या काही वर्षांत रंकाळ्याच्या वाढत्या प्रदूषणामुळे स्थलांतरित पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे. प्रदूषणामुळे रंकाळ्यावरील पक्षी आणि जलचरांना धोका निर्माण झाला आहे.'

सद्यस्थितीत पक्ष्यांच्या मृत्युला रंकाळा तलावाचे प्रदूषण हेच कारण दिसते. त्या पक्ष्यांचा वैद्यकीय अहवाल तयार केला पाहिजे. त्यातून नेमके कारण समजू शकेल. वनविभागाने यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे. पक्ष्यांच्या मृत्युमागे प्रदूषण हे एकमेव कारण असू शकणार नाही.

- फारूक म्हेतर, पक्षी अभ्यासक

आजपासून धरणातील पाणी अडवणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

आजपर्यंत सरकारने केवळ आश्वासने दिली. विविध प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत सरकार उदासीन असल्याचे दिसत आहे. राज्यात ३ लाख कुटुंब प्रकल्पग्रस्त आहेत. त्यांच्यासाठी कोणत्याही नवीन मागण्या आम्ही केलेल्या नाहीत, केवळ मंजूर केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्यातील ११ जिल्ह्यांत ६ एप्रिलपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. तरीही सरकाराने दखल घेतली नाही. त्यामुळे आजपासून (बुधवार) राज्यात विविध ठिकाणच्या धरणातील पाणी अडवण्यात येणार आहे. जर पोलिसांनी अटकाव केला तर ज्या ठिकाणी अडवले जाईल तिथेच आंदोलन केले जाईल. तसेच येथून पुढे तारीख जाहीर न करता आंदोलन करू, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.

पाटणकर म्हणाले, '६ एप्रिलपासून राज्यातील ११ जिल्ह्यात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनीही आमच्या शिष्टमंडळास तोडगा काढण्यासाठी बोलावले होते. परंतु, आम्ही ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय आम्ही आंदोलन स्थगित करणार नाही, त्यांना सांगितले होते. आजअखेर मुख्यमंत्र्यांनी बैठकीला बोलावले नाही किंवा चर्चाही केली नाही यावरुन आमचा निर्णय योग्य होता, हे स्पष्ट झाले. या प्रकारामुळेच आमचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे आता आंदोलन तीव्र करणे अपरिहार्य झाले आहे. मुख्यमंत्री विदेश दौऱ्यावरुन येऊन बरेच दिवस झाले. या काळात ते राज्याच्या विविध भागात गेले, कार्यक्रमांना हजेरी लावली परंतु, ज्यांनी राज्याच्या विकासासाठी त्याग केला त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्याला त्यांना वेळ नाही. राज्यात जवळपास ३ लाख कुटुंब म्हणजे १५ लाखांहून अधिक लोक प्रकल्पग्रस्त आहेत. एवढ्या मोठ्या लोकसंख्येचे प्रश्न सोडवण्याची इच्छाशक्ती राज्यकर्त्यांमध्ये नाही. कोणत्या नवीन मागण्यांसाठी आंदोलन नाही तर निघालेल्या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही, ती व्हावी ही प्रमुख मागणी आहे. या मागणीकडेही सरकार गांभीर्याने बघत नाही. कोयना धरण होऊन इतके वर्ष झाले. परंतु, त्यांचेही अजून पूर्ण पुर्नवसन झाले नाही. विधानसभा निवडणुकीत भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष विकासाच्या मुद्यावर निवडून आले आहेत. परंतु ज्यांनी विकासासाठी त्याग केला त्यांच्याकडे त्यांचे लक्ष नाही. अंमलबजावणीसाठी एवढा उशीर लागण्याचे कारणच काय त्यामुळे आता बुधवारपासून राज्यात विविध ठिकाणी धरणातील पाणी अडवले जाणार आहे. जिल्हाधिकारी आणि पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडवू नये, अन्यथा जिथे अडवला तिथेच आंदोलन केले जाईल आणि येथून पुढे तारीख जाहीर न करता आंदोलन करू.'

असे होईल आंदोलन

सातारा जिल्ह्यातील तारळी, उरमोडी, कोयना धरणातील पाणी अडवण्यात येणार आहे. सांगली आणि कोल्हापूर मधील वारणा धरण तसेच चांदोली अभयारण्याच्या गेटवर पर्यटकांना अडवण्यात येईल. कोल्हापूरच्या पश्चिम भागातील आजरा, चंदगड येथे सुरू असलेल्या धरणाचे काम बंद पाडण्यात येणार आहे. सोलापूरमधील उजनी धरणातून तसेच मराठवाड्यातील जायकवडी धरणातून पाणी सोडून देण्यात येणार नाही. सध्याच्या अर्थसंकल्पात उरमोडी, तारळी, वांगसाठी कोणताही निधी देण्यात आलेला नाही. त्यामुळे दुष्काळातील लोक दुष्काळातच राहणार आहेत आणि पुन्हा सरकार त्यांना दुसऱ्या रुपाने मदत करणार, सरकारचे हे कसले अर्थशास्त्र आहे कळायला मार्ग नाही, असा सवालही डॉ. पाटणकरांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अभियांत्रिकी’ला मिळणार स्वायत्तता

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

कराड येथे सन १९६० साली उभारलेल्या सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्वायत्तता दर्जाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. मे महिन्यात यूजीसीची समिती सर्व पहाणी व तपासणी करून या स्वायत्तता दर्जावर शिक्कामोर्तब करणार आहेत.

या महाविद्यालयांनी नुकताच सुवर्णमहोत्सव साजरा केलेला आहे. महाविद्यालयीन प्रशासनाने स्वायत्तता दर्जा मिळविण्याचे दृष्टीने अथक परिश्रम करून तयारी केली आहे. यूजीसीची मान्यता दृष्टिपथात असल्याने सन २०१५-१६या शैक्षणिक वर्षापासून स्वायत्त संस्था म्हणून महाविद्यालयाचे कामकाज सुरू होईल. पारंपारिक अभ्यासक्रमांना फाटा देवून जागतिक बाजारपेठेशी स्पर्धा करणाऱ्या अभ्यास क्रमाकांची निर्मिती, परिक्षा आदींचे नियोजन महाविद्यालयाकडे येईल. तत्कालीन प्राचार्य डॉ. ए. एस. पंत यांनी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या उपाध्यक्षपदी वर्णी लागल्यानंतर सरकारने येथील प्राचार्य पदाची धुरा डॉ. पी. एम. खोडके यांच्याकडे सोपवली गेली. डॉ. खोडके यांनी पदाची धुरा सांभाळताना संस्थेला स्वायत्त दर्जा मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. मे महिन्यात यूजीसीच्या समितीकडून तपासणी होवून स्वायत्त दर्जावर शिक्कामोर्तब होईल.

अभियांत्रिकी महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी बैठकांचे आयोजन केले जात असून, मे महिन्यात यूजीसीच्या समितीकडून महाविद्यालयांची तपासणी होऊन स्वायत्त दर्जावर शिक्कामोर्तब होईल.

- डॉ. पी. एम. खोडके, प्राचार्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live

Latest Images