Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘ठिबक सिंचनाला पर्याय नाही’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

'सर्वच पिकांच्या उत्पादन वाढीसाठी ठिबक सिंचन काळाची गरज आहे हे माहीती असूनही आपल्या देशात साडेतीन टक्के ऊसाचे क्षेत्र असताना उपलब्ध पाण्याच्या पन्नास टक्के पाणी केवळ उसासाठी वापरले जाते. जर सर्वच पिकांसाठी ठिबक सिंचनचा वापर झाल्यास शेतकरी उसासह सर्वच पिकांत क्रांती करेल,' असे प्रतिपादन राज्याचे कृषि संचालक (फलोत्पादन)डॉ. सुदामराव आडसूळ यांनी केले. ते कसबा सांगाव (ता.कागल) येथे दूधगंगा सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या जिल्ह्यातील पहिल्या स्वयंचलित ठिबक सिंचन योजनेच्या उदघाटनप्रसंगी बोलत होते.अध्यक्षस्थानी कृषि विभागाचे संचालक नारायण सिसोदे होते.

डॉ. आडसूळ म्हणाले, 'उसासाठी पाणी देण्याची 'डुबुक' पध्दती फायदे तोटे आता माहीती असूनही सर्रास वापरली जाते. ज्याचा परिणाम उत्पादन कमी होण्यावर होतो. तुलनेने असे असूनही कोल्हापूरची उत्पादकता अजूनही बऱ्यापैकी आहे. परंतु भविष्यात ठिबक सिंचनशिवाय पर्यायच उरणार नाही. रासायनिक खतांचा पिकांना योग्य डोस मिळायचा असेल आणि जमिनीची सुपीकता टिकवून ठेवायची असेल तर ठिबक सिंचनाचा प्रसार वेगाने होणे गरजेचे आहे. तरच अतिपाण्यामुळे खराब होणा‍ऱ्या जमिनी आपण वाचवू शकू.'

संस्थेचे चेअरमन बाबासो लबाजे म्हणाले, '१९९१ साली नोंदणी झालेल्या या संस्थेत १२५ सभासद आणि ४०० एकर क्षेत्र आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे संस्था ९७ साली उशीरा कार्यान्वित झाली. स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्यामुळे संस्था निर्माण झाली. आता १२० एकरावर ठिबकची सुरवात केली आहे.'

'नेटाफिम'चे अरुण देशमुख म्हणाले,'निचरा होणाऱ्या ठिकाणी सेंद्रीय खतांचा वापर करुन ठिबक वापरल्यास हमखास उत्पादन वाढते. यासाठी सरकार, शेतकरी, कारखानदार आणि कंपनी एकत्र येवून काम करण्याची गरज आहे.' यावेळी शैलेश लंबे,फेडरल बँकेचे व्यवस्थापक थॉमस पी मॅथ्यू, राजकुमार माळी, अश्विनी पोळ यांनी मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी उपविभागीय कृषि अधिकारी विजेंद्र धुमाळ,तालुका कृषी अधिकारी संजय वाघमोरे, विकास सोनवणे, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पारा चढल्याने अंगाची लाही लाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वळीव पावसाच्या हजेरीमुळे गेल्या आठवडाभरात न जाणवणारा उन्हाचा तडाखा शनिवारपासून मात्र चांगलाच जाणवू लागला आहे. तापमान सलग दोन दिवस ३८ अंशावर गेल्याने लाही लाही होत आहे. येत्या काही दिवसात हा तडाखा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

यंदा मार्चमध्येही उन्हाळ्याचा तडाखा जाणवला नाही. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात तापमान ३७ अंशावर गेले होते. यंदा प्रथमच वाढलेल्या तापमानामुळे उष्मा जाणवू लागला होता. दरम्यान वळीव पाऊस सुरु झाल्याने वातावरणात थोडा गारवा आला होता. शुक्रवारपासून मात्र वातावरणातील उष्मा वाढत असल्याचे जाणवू लागले होते. शनिवारी ३८.२ अंशावर तापमानाचा पारा पोहचला. रविवारीही तीच परिस्थिती कायम राहिली. या वातावरणामुळे भरदुपारी शहरातील वर्दळही कमी झाल्याचे जाणवत आहे.

यापूर्वी कोल्हापूरचे तापमान ३९ अंशावर गेले आहे. अशा दिवसाच्या काही वेळेत तर तापमानाने ४० अंशाचा टप्पा ओलांडला होता. त्यामुळे एप्रिलमध्ये तापमान हा टप्पा ओलांडण्याची शक्यता असते. दोन दिवसांपासून वाराही कमी झाल्याने उन्हाचा चटका प्रचंड जाणवत आहे. उन्हाच्या तडाख्याने अंग अक्षरशः भाजून काढले जात आहे. दुपारच्या वेळी रस्त्यावरील झळांनीही जीव कासावीस होत आहे. सायंकाळपर्यंत उन्हाचा हा तडाखा जाणवत असून वारा नसल्याने तगमग वाढत आहे.

वाढत्या तापमानात काय करावे

गरज नसल्यास भरदुपारी उन्हात जाणे टाळावे

उन्हात जायचेच असल्यास टोपी किंवा अंग पूर्ण झाकेल असे कपडे वापरावेत

भरपूर पाणी प्यावे

फळे खावीत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राधानगरीचे विश्रांतीगृह बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

पर्यटकांच्या अनेक समस्या असताना भोगावती पाटबंधारे उपविभागाने केवळ कर्मचारी नसल्याच्या जुजबी कारणाने राधानगरी धरणावर सुमारे ७० वर्षांपासून सुरु असलेले एकमेव विश्रांतीगृह बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच इथली अन्य तीन विश्रांतीगृहे याआधीच विविध कारणाने बंद असल्याने पर्यटकांची मोठी कुचंबणा होत असून कर्मचारी उपलब्ध करण्यापेक्षा प्रशासनाने घेतलेल्या नकारात्मक भूमिकेविषयी जनतेतून संताप व्यक्त होत आहे.

राधानगरी, काळम्मावाड़ी धरण, दाजीपूर अभयारण्य आणि पाऊसकाळातील धबधबे पाहण्यासाठी येथे वर्षभर पर्यटकांची मोठी गर्दी असते. त्यांच्या निवास आणि भोजन व्यवस्थेसाठी खासगी व्यवस्थेसह सार्वजनिक बांधकाम व विजवितरणचे प्रत्येकी एक तर जलसंपदा विभागाची दोन अशी चार सरकारी विश्रांतीगृहे येथे आहेत. यापैकी पहिल्या दोन विश्रांतीगृहात स्वयंपाकी नसल्याने ती वर्षभरापासून बंद आहेत. तर जलसंपदा विभागाचे हत्तीमहाल येथील विश्रांतीगृहाच्या इमारतीची दुरवस्था झाल्याने ते बंदच आहे. तर राधानगरी धरणावर सन १९५४ पासून सुरु असलेले ऐतिहासिक विश्रांतीगृहही कर्मचाऱ्याअभावी बंद करण्याचा निर्णय भोगावती जलसंपदा विभागाने नुकताच घेतला आहे. तसा अहवाल वरिष्ठ प्रशासनाकड़े पाठविला असून याबाबत कर्मचारी वर्गासह स्थानिक जनतेत नाराजी आहे.

धरणस्थळावर जलसंपदा विभागाची भोगावती पाटबंधारे उपशाखा आणि उपविभागीय कार्यालये असून त्यासाठी तीस कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी सध्या येथे केवळ चौदाच कर्मचारी उपलब्ध असून त्याना दोन ऐवजी तीन शिप्टमध्ये काम करावे लागत आहे. तर त्यातील दोघांची धरणावर स्वयंपाकी कर्मचाऱ्यास मदतनीस म्हणून नियुक्ती करावी लागते. त्यामुळे अन्य ठिकाणी कर्मचारी अपुरे पडत असल्याने स्थानिक प्रशासनाने कामाचा व्याप कमी व्हावा म्हणून चक्क हे विश्रांतीगृह बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पर्यटकांची मोठी गैरसोय होणार असून हा नकारात्मक निर्णय घेण्यापेक्षा कर्मचारी उपब्धतेसाठी स्थानिक प्रशासनाने प्रयत्न करायला हवेत असा स्थानिक ग्रामस्थांचा सूर आहे. तर येथील पर्यटन व्यवसाय पूर्णतः बंद पडण्यापूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधींनी याप्रश्नी लक्ष घालावे, अशी स्थानिकांतून मागणी होत आहे.

सुविधांची वानवा

पर्यटनवाढीसाठी सर्वच स्तरावर प्रयत्न केले जात असल्याचे नेहमीच सांगितले जाते. जिल्ह्यात अनेक निसर्गरम्य आण ऐतिहासिक ठिकणे आहेत. पर्यटकही या ठिकाणांकडे मोठ्या संख्येने वळत आहेत. परंतु पर्यटकांसाठी अनेक सुविधांची वानवा भासत असते. पर्यटक वाढायचे असतील तर सुविधाही वाढल्या पाहिजेत. मात्र सुविधा वाढवायचे दूरच उलट आहे त्या सुविधा कमी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसते. कर्मचारी नसल्याच्या किरकोळ कारणावरून राधानगरी धरणावरील सुमारे ७० वर्षांपासून सुरु असलेले एकमेव विश्रांतीगृह बंद करण्याचा निर्णय याचाच परिपाक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तर महापौरांविरोधात सरकारला अहवाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने बजेट मंजूर करूनही अद्याप महापौर तृप्ती माळवी यांनी स्वाक्षरी केलेली नाही. माळवी यांनी पुढील सर्वसाधारण सभेपूर्वी बजेटवर सही करावी असा संकेत आहे. सोमवारपर्यंत बजेटवर सही न झाल्यास प्रशासन यासंदर्भात राज्य सरकारला अहवाल सादर करण्याची शक्यता आहे. राज्य सरकार, महापौरांना याबाबत सूचना करू शकते असे सूत्रांनी सांगितले. विकासकामांची अंमलबजावणी करताना तां​​त्रिक मुद्दे उपस्थित होऊ नये यासाठी प्रशासनाच्यावतीने राज्य सरकारला अहवाल पाठवून मार्गदर्शन मागितले जाणार आहे.

स्थायी सभापती आदिल फरास यांनी ३० मार्च रोजी सर्वसाधारण सभेपुढे बजेट सादर केले. प्रशासनाने स्थायी समितीसमोर ३८९ कोटी ४५ लाख ५४ हजार ७१५ रुपयांचे बजेट सादर केले होते. सभापती फरास यांनी त्यात २४ कोटीची अ​तिरिक्त वाढ करत ४१३ कोटी ४५ लाखाचे बजेट मांडले. मात्र महा​पालिकेत सध्या महापौरांविरूध्द दोन्ही काँग्रेस असा संघर्ष सुरू आहे. दोन्ही स्तरावर एकमेकांना शह-काटशह दिला जात आहे. कुरघोडीच्या राजकारणातून बजेटवर महापौरांची सही झालेली नाही. महापालिकेची आगामी निवडणूक ऑक्टोबर २०१५ मध्ये होणार आहे. त्यातही १५ मे नंतर रस्ते, पॅचवर्कची कामे करता येणार नाहीत. महापौरांनी बजेटवर सही झाल्यानंतर निविदा प्रक्रिया ते प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. बजेटवर तत्काळ सही होऊन प्रशासनाकडून विकासकामांची अंमलबजावणी व्हावी अशी नगरसेवकांची अपेक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिल्या टप्प्याचा प्रस्ताव आठवडाभरात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामधील पहिल्या टप्प्यातील अंबाबाई मंदिर आवाराच्या विकासाचा ७२ कोटींचा प्रस्ताव एका आठवड्यात सरकारला सादर केला जाणार असल्याचे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी रविवारी सांगितले. यामध्ये मंदिराच्या आवारातील विविध विकासकामांचा समावेश आहे. या विकासकामांसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचाही सहभाग घेण्यात येणार आहे.

महापालिकेच्यावतीने २५५ कोटी रुपयांचा कोल्हापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्यात आला होता. यापूर्वीही प्रचंड मोठ्या रकमेचे प्रस्ताव तयार केले होते. पण सरकारच्या पातळीवर फारशी दखल घेतली नव्हती. आराखडा सादरीकरणावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एकाचवेळी एवढा मोठा निधी सरकारला देणे अशक्य असल्याने त्याचे भाग करण्याची सूचना केली होती. त्यानुसार तीन टप्पे केले होते. पहिल्या टप्प्याचा प्रस्ताव तातडीने दिल्यास अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधीची तरतूद करण्यात येणार होती. तोपर्यंत हा प्रस्ताव न आल्याने तीर्थक्षेत्र विकास म्हणून टोकन स्वरुपातील तरतूद करण्यात आली. फोर्ट्रेस कंपनीकडून हा प्रस्ताव सादर झाल्यानंतर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या चोक्कलिंगम यांनी या आराखड्यासाठी ​रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.

त्यांच्यासमोर टप्प्यानुसार आराखडा सादर करण्यात आला. या वेळी देवस्थान समिती, आर्किटेक्ट, पुजाऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांना माहिती देताना चोक्कलिंगम म्हणाले, 'पहिल्या टप्प्याचा प्रस्ताव आठवड्याच्या आत सरकारकडे पाठवला जाणार आहे. यामध्ये मंदिराच्या संवर्धनाबरोबर भाविकांसाठी विविध सुविधांसह सुरक्षा यंत्रणेचाही समावेश असेल. देवस्थान समितीकडे मंदिराचे उत्पन्न असल्याने या आराखड्याच्या रकमेपैकी १३ कोटी रुपयांचा वाटा समितीकडून घेण्यात येणार आहे.'

याप्रसंगी जिल्हाधिकारी राजाराम माने, विशेष पोलिस महानिरीक्षक संजय वर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अविनाश सुभेदार, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण उपस्थित होते.

पहिल्या टप्प्यातील प्रस्तावित कामे

मंदिराच्या मुख्य इमारतीची दुरुस्ती, दीपमाळ, मंदिर आवारात देणगी कक्ष, भाविकांसाठी लॉकर्स, विद्यापीठ हायस्कूलसमोर होणाऱ्या दर्शन मंडपाजवळ पूजासाहित्य विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचे स्थलांतर, वास्तू संरक्षण यंत्रणा, पार्किंग सुविधेच्या ठिकाणी हेरिटेज वॉकसाठी ट्रॅक, माहिती केंद्र, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, पाणी व औषध सुविधा.

दुसरा टप्पा (११६ कोटी)

शहरातील नवदुर्गा मंदिरासह पंचगंगा घाट व रंकाळा परिसराचा कायापालट. मंदिराला जोडणाऱ्या रस्त्यांचा विकास

तिसरा टप्पा (६७ कोटी)

धार्मिक पर्यटनासाठी येणाऱ्या भाविकांना ऐतिहासिक व निसर्गपर्यटनाचा आनंद घेता यावा या दृष्टीने पर्यटनवृद्धीवर तसेच भूसंपादनविषयक बाबींचा समावेश

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेथी, कोथिंबिरीचे भाव कडाडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीतील घाऊक बाजारासह किरकोळ बाजारात भाजीपाल्यांची आवक घटल्याने त्याचा दरावर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या आठवड्यातील दरांमध्ये दुप्पटीने वाढ झाल्याने मेथी, पोकळा व कोथिंबीरच्या जुडीचा दर २० ते ३० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली असताना, फळभाज्यांचे व फळांचे दर स्थिर राहिले आहेत. आंब्याची आवक हळूहळू वाढत असली तरी दोन महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसाचा फटका आंबा उत्पादनावर झाला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

उन्हाचा तडाखा वाढल्यानंतर पालेभाज्यांसह कोथिंबीरच्या उत्पादनात घट होते. मार्चपासून उन्हाची तीव्रता वाढली असली, तरी आवक नियमित सुरू होती. यामुळे सरासरी सर्वच पालेभाज्यांची जुडी दहा रुपयांना मिळत होती. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे जयसिंगपूर, मिरज, बेळगाव परिसरातून येणारी पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे एका मेथीच्या पेंढीचा दर १५ तर जुडीचा दर २५ रुपये झाला आहे. पालक, चाकवतचा जुडीचा दर अनुक्रमे २० व २५ रुपये झाला आहे. चाकवतची आवक पूर्णपणे बंद झाली आहे. चटणी करण्यासाठी कोथिंबीर, कांद्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. कांद्याचा दर २० रुपयांवर स्थिर राहिला असला, तरी कोथिंबीरच्या जुडीचा दर २० ते २२ रुपयांवर पोहोचला आहे.

फळभाज्यांचे स्थिर

अवकाळी पावसाचा पालेभाजी उत्पादनावर परिणाम झाला असला, तरी फळभाज्यांवर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. यामुळे बाजार समितीसह किरकोळ बाजारात फळभाज्यांची आवक चांगली आहे. त्यामुळे दरामध्ये वाढ झालेली नाही. केवळ वांगीच्या दरात सरासरी पाच रुपयांची किलोमागे वाढ झाली आहे. भेंडी, दोडका, गवार व कारलीच्या दर स्थिर राहिले आहेत.

आंब्याची आवक वाढली

मार्चच्या पहिल्या आठवड्यात केवळ हापूस आंब्याची आवक सुरू झाली होती. आवक कमी असल्याने सरासरी डझनाचा दर एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत होता. गेल्या आठवड्यापासून हापूस आंब्यासह पायरी आंब्याची आवक वाढली आहे. आंबा उत्पादक क्षेत्राला अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे आंबा उत्पादनावर परिणाम झाला असल्याचे आंबा विक्रेत्यांनी सांगितले. यामुळे अजूनही आंब्याचे दर चढेच आहेत. हापूस आंब्याची अडीच डझनाची पेटी ७०० ते एक हजार रुपयांना विक्री होत आहे. पायरी आंब्याची पेटी ३०० ते ७०० रुपयांना मिळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवतीचा कात्यायनीत खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कात्यायनी (ता. करवीर) येथील कळंबा-कात्ययनी रस्त्यावर रविवारी दुपारी एका २० वर्षीय युवतीचा मृतदेह आढळला. या मृतदेहाचा चेहरा छिन्नविछिन्न अवस्थेत होता. अज्ञात व्यक्तीने डोक्यात आणि चेहऱ्यावर दगड टाकून युवतीचा खून केला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. या मृतदेहाची रात्री उशीरापर्यंत ओळख पटलेली नव्हती.

कळंबा रस्त्यावर अज्ञात युवतीचा डोक्यात दगड घालून खून झाला आहे अशी माहिती रविवारी दुपारी दोनच्या सुमारास राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी कळंबा येथे बंदोबस्तास असलेल्या पोलिसांना कळाली. त्यांनी करवीरचे निरीक्षक दयानंद ढोमे यांनी खुनाची माहिती दिली. करवीरचे पोलिस उपाधीक्षक अमरसिंह जाधव, निरीक्षक ढोमे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांना मृतदेहाच्या अंगावर सुमारे ५० किलो वजनाचा दगड गालून खून केल्याचे आढळले. डोक्यात दगड घातल्याने या युवतीच्या चेहरा आणि डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटू शकली नाही. मृत युवती २० वर्षाची असून तिच्या अंगात तपकिरी रंगाचा टॉप व हिरव्या रंगाची लेगीन्स होती. हातात बांगड्या, पायात पैंजण आहेत. पोलिसांनी डॉग स्कॉडला पाचारण केले. मात्र ते परिसरातच घुटमळले. करवीर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, अशा प्रकारे विकृत पद्धतीने खून करण्याची अलीकडच्या काळातील ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास तातडीने सुरू केला आहे.

बेपत्तांचा शोध

दरम्यान, मृत युवतीची ओळख न पटल्याने गेल्या काही दिवसांत बेपत्ता झालेल्या युवतींबाबतच्या तक्रारींची खातरजमा करण्यात येत आहे. ऊसतोडणी कामगार टोळ्यांकडे चौकशी करण्यात येत आहे. पोलिस निरीक्षक दयानंद ढोमे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंदिर परिसरात भूसंपादन नको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या पुढील टप्प्यांसाठी लागणाऱ्या जागेसाठी अंबाबाई मंदिर परिसरातील भूसंपादन करू नये. त्याऐवजी सरकारने भवानी मंडपातील शेतकरी संघाची इमारत, शालिनी पॅलेस, महापालिकेच्या शाळा घेऊन त्यांचा वापर दर्शन मंडप, भक्तनिवासासाठी वापर करावा, असे मत मंदिर परिसरातील स्थानिकांनी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मांडले.

मंदिर विकासातील अडचणींवर विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी अधिकारी, देवस्थान समितीचे पदाधिकारी, पर्यावरणप्रेमी यांच्याशी चर्चा केली. 'मंदिराची पुरातन रचना, वास्तू व वारसा यांचे जतन व्हावे. आराखडा करताना या वारशाला धक्का लागू देऊ नये. पर्यटकांच्या गरजा पाहून नियोजन करावे', अशा सूचना त्यांनी केल्या. ते म्हणाले, 'मंदिराचा विकास करताना आर्थिक तरतुदीसाठी विविध पर्यायांवर विचार करावा. सरकारी निधीबरोबरोबरच मंदिर व्यवस्थापन समितीची मदत, कार्पोरेट कंपन्यांकडून सामाजिक उत्तरदायित्व (कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सबिलिटी) माध्यमातून निधी मिळवणे तसेच देणगी स्वरूपात मिळणारा निधी असे पर्याय अवलंबले गेले पाहिजेत.

तसेच सिद्धीविनायक ट्रस्ट, तिरूपती बालाजी ट्रस्टकडून निधी मिळवण्याबाबतही प्रयत्न करावेत. त्यासाठी उच्चस्तरीय समिती तिरूपतीला पाठवण्याबाबतही विचार करू.' मंदिर विकास करताना भूसंपादनासाठी सुचवलेल्या विविध पर्यायांची उपलब्धता लक्षात घेऊन विचार केला जावा, अशा सूचना चोक्कलिंगम यांनी केली. यावेळी आयुक्त पी. शिव शंकर, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके, करवीरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत पाटील, अतिरीक्त आयुक्त नितीन देसाई, देवस्थान व्यवस्थापन समितीच्या सदस्या संगीता खाडे, सचिव शुभांगी साठे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह विविध प्रतिनिधी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राजाराम’चा आज फैसला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेले पंधरा दिवस सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपांची राळ उडालेल्या कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी रविवारी चुरशीने ९० टक्के मतदान झाले. १९ जागांसाठी १२ हजार ६२४ पैकी ११ हजार ३८५ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत माजी मंत्री सतेज पाटील आणि आमदार महादेवराव महाडिक एकमेकांसमोर उभे ठाकल्याने निवडणुकीची रंगत वाढली होती. आरोप-प्रत्यारोपाने 'राजाराम'चे कार्यक्षेत्र ढवळून निघाले होते.

करवीर तालुक्यातील वडणगे येथे सर्वाधिक ९८ टक्के तर शाहूपुरी येथील मतदान केंद्रावर सर्वांत कमी ५६ टक्के मतदान झाले. टोप आणि शाहूपुरी येथे किरकोळ वादावादी वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले. सर्वच मतदान केंद्रांवर सरासरी ८९ ते ९८ टक्क्यांपर्यंत मतदान झाले. एकूण १२ हजार ६२४ पैकी ११ हजार ३८५ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला.

मतदानावेळी सर भिडले

दरम्यान, कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक पतसंस्थेच्या (कोजिमाशि) निवडणुकीसाठीही प्रचंड चुरस होती. मतदान केंद्राच्या कमानीसमोर दोन्ही आघाडीच्या समर्थकांत शाब्दिक बाचाबाची, अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडले. बहुतांश वेळी समर्थकांना रोखण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. ९०.५३ टक्के मतदान झाले. ७४८६ मतदानापैकी ६७७७ सभासदांनी मतदानाचा हक्क बजाविला. अत्यंत चुरशीने झालेल्या मतदानामुळे न्यू हायस्कूल मतदान केंद्रावर सभासदांचा जल्लोष सुरू राहिला.

'कोजिमाशि'त स्वाभिमानी सहकार आघाडी, राजर्षी शाहू परिवर्तन महाआघाडी आणि नाराज उमेदवारांची फुले-शाहू-आंबेडकर निर्णायक आघाडीचे ७ उमेदवार आहेत. तर तीन अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.

निकालाची उत्सुकता

राजाराम कारखान्याची मतमोजणी कसबा बावड्यातील बहुउद्देशीय सभागृहात तर 'कोजिमाशि'साठी मार्केट यार्डातील बाजार समितीच्या ‌मल्टिपर्पज हॉलमध्ये होणार आहे. सकाळी आठपासून मतमोजणीची सुरुवात होईल. दुपारी दोन वाजेपर्यंत दोन्ही संस्थांतील निकालांचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज‍ऱ्यात पाणीगळती चिंताजनक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा , आजरा

तालुक्यात यावर्षी कोणत्याही गावात अथवा वाडी-वस्तीत तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई नसल्याची स्थिती आहे. गेल्या चार-पाच वर्षात तालुक्यात राबविण्यात आलेल्या पाणीयोजनांचा हा परिणाम आहे. तसेच दरवर्षीच्या तुलनेत मुबलक पाणीसाठा राहण्यामागे खरीप हंगामाच्या पूर्वार्धात झालेला अवकाळी पाऊसही आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीसाठी होणाऱ्या पाण्याचा व्यय थांबला. दरम्यान, उत्तूर विभागातील वडकशिवाले, वझरे व भादवणपैकी डोंगरेवाडी वसाहतीला मे महिन्यादरम्यान पाणीटंचाई ग्रासू शकते, असा प्रशासनाचा अंदाज आहे.

साधारणत: मार्चच्या ऊन्हाच्या झळा सुरू झाल्या की, तालुक्याच्या उत्तूर व पूर्व विभागातील गावांना पाणीटंचाई भेडसावते. मात्र जिल्हा परिषदेच्या विविध पाणी योजनांमुळे येथील प्रत्येक गावांमध्ये पिण्यासाठीच्या पाण्याची कमतरता भासत नाही. चार-पाच वर्षात हे बदललेले चित्र समोर येत आहे.

याशिवाय चित्री व हिरण्यकेशी नदीवरील कोल्हापूरी पध्दतीचे सोहाळे, हाजगोळी, ऐनापूर, देवर्डे, साळगाव, सुळेरान, दाभिल, शेळप येथील बंधारेही वरदान ठरले आहेत. अशातच यावर्षी झालेल्या अवकाळी पावसांमुळे येथील पाण्याचा उपसा बऱ्यापैकी घटल्याने या कोल्हापूरी बंधाऱ्यांसह एरंडोळ, कानापूर, धनगरमोळा, घाटकरवाडी, गवसे व वेळवट्टीच्या प्रकल्पांमध्ये अद्यापही मुबलक पाणीसाठा आहे.

जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार तालुक्याच्या चित्री प्रकल्पात ५२ टक्के म्हणजेच १०२२ दशलक्षघतफूट पाणीसाठा आहे. यामुळे या नदीच्या खोऱ्यासह गडहिंग्लजसह संकेश्वर दरम्यानच्या पट्ट्यातील गावांना पाणीपुरवठा मुबलक होऊ शकतो. मात्र यासाठी नियोजनाची गरज आहे. तालुक्यातील इतर प्रकल्पांमधील पाणीसाठ्यांचा विचार करता दरवर्षीपेक्षा १५ टक्के जादा पाणीसाठा उपलब्ध आहे.

विरोधाभास चिंताजनक

एकीकडे अशी स्थिती असली तरी अनेक गावच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेतील गळती चिंतनीय आहे. यामुळे कित्येक हजार लिटर पाणी अकारण वाया जाते आहे. अनेक गावांतील पाणीयोजनांना गळतीचा शाप लागला आहे.नळपाणी पुरवठा योजना व गावागावात उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्यांची गळती रोखणे आव्हानात्मक असले तरी शक्य आहे. मात्र संबंधित गावच्या पाणीपुरवठा वितरण व्यवस्था त्याबाबत गंभार नसल्याची स्थिती आहे.

९ गावे आणि ७ वसाहतींसाठी प्रस्ताव

आगामी गरज ओळखून येथील पंचायत समिती प्रशासनाने तालुक्यातील शिरसंगी, आर्दाळ, पेंडारवाडी, सोहाळे, चव्हाणवाडी, होन्याळी, कोरीवडे, पेरणोली, सुळे अशा ९ गावांसह किटवडे कुंभार वसाहत व धनगरवाडा, वेळवट्टी येथील कुंभार व आवाडे वसाहत, वाटंगीची नाईक वसाहत, मेंढोली येथील सावरवाडी वसाहत, सुळेरान व धनगरमोळा येथील वाडे अशा ७ वाड्यांवर विंधन विहीरी, झरे दुरूस्ती व नळपाणीपुरवठा योजना दुरूस्तीचे प्रस्ताव दिले होते. त्याचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

सांगली पालिकेत तुंबळ हाणामारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या महासभेत सोमवारी मोठा गदारोळ उडाला. एकाकी पडलेल्या महापौरांनी आसन सोडले. नगर सचिवांना माजी उपमहापौरांनी धक्काबुक्की करून समांतर सभेला रोखण्याचा प्रयत्न केला. धक्काबुक्कीचा जबर धक्का बसल्याने नगर सचिवांना स्ट्रेचरवरुन हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. सत्ताधाऱ्यांसह सर्वांनीच महापौरांनी सभेतून पळ सांगली-मिरज-कुपवाड काढल्याचा आरोप केला, तर महापौरांनी एक विषय वगळता विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर झाल्याचा दावा सभेनंतर पत्रकारांशी बोलताना केला.

इतिवृत्त वाचण्यावरून वादाला सुरुवात

महापौर विवेक कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरुवात होताच मागील सभेचे इतिवृत्त मंजूर म्हणत महापौर पुढे निघाले. त्याचवेळी विरोधकांबरोबरच सत्ताधाऱ्यांनीही इतिवृत्त वाचण्याचा जोरदार आग्रह धरला आणि गोंधळाला सुरुवात झाली. महापौरांनी कारवाईचा इशारा देऊन बघितले. ही हुकुमशाही आहे काय? असा सवाल करीत विरोधकांनी मतदानाची मागणी केली. कोणीच मागे हटायला तयार नसल्याने इतिवृत्त वाचण्याशिवाय पर्याय उरला नाही.

इतिवृत्तातील आयत्यावेळच्या विषयांवरुन गोंधळ वाढतच गेला. तेराव्या वित्त आयोगातील ६ कोटी ३४ लाखांच्या कामांचा विषय वाचला जाताच त्यावर हा विषय न्यायालयीन बाब असल्याने त्यावर चर्चा करताच येणार नाही, असे महापौरांनी सांगितले. त्यावेळी सत्ताधाऱ्यांनीच 'ही न्यायालयीन बाब असताना त्याचे वाचनच का केले? असा सवाल केला आणि गोंधळात आणखी भर पडली.

राष्ट्रवादी काँग्रेसही आक्रमक

कोणत्याच विषयावर महापौर चर्चा करायला तयार नसल्याने राष्ट्रवादीचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांनी 'आमच्या २५ सदस्यांवर कारवाई करा, मग तुम्हाला काय निर्णय घ्यायचे ते घ्या. सभा चालविण्याची ही पद्धत नव्हे,' असेही सुनावले. सत्ताधारी गटाच्या अनारकली कुरणे यांनी आयत्यावेळच्या विषयांच्या मंजुरीला आमचा विरोध असल्याचे सांगताच सत्ताधारी सर्वच सदस्यांनी त्यात सूर मिसळला. माजी उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर, संतोष पाटील यांनीही आसनासमोर जावून महापौरांना जाब विचारला. सभागृहच विरोधात गेल्याने महापौरांनी आसन आणि सभागृहही सोडले. महापौर, उपमहापौरांनी सभागृह सोडताच त्यांनी सभेतून पळ काढल्याचा निषेध सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्रित येवून केला.

गैरसमजातून हाणामारी?

समांतर सभा घेण्याची घोषणा करीत माजी उपमहापौर पाटील-मजलेकर यांनी नगर सचिव चंद्रकांत आडके यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मार्ग काढण्यासाठी आडके व्यासपीठावरुन खाली येताच त्यांचा धक्का पाटील-मजलेकरांना बसला. त्यामुळे संतप्त झालेल्या पाटील-मजलेकरांनी थेट आडके यांची कॉलर धरून त्यांना मागे रेटले. सर्वच सदस्य आडके यांना आडविण्यासाठी पुढे सरसावल्याने प्रचंड गदारोळ झाला. बेकायदा कारभार मोडून काढून नागरिकांच्या आणि महापालिकेच्या हितासाठी पक्षभेद बाजूला ठेवून एकजुटीचे दर्शन देण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे विष्णू माने यांनी केले. तर नगर सचिवांच्या बाबतीत अनावधनाने प्रकार घडल्याने आपण त्यांची लेखी माफी मागायला तयार असल्याचे पाटील-मजलेकर यांनी सांगितले. ७८ पैकी ५७ सदस्य सभागृहातच बसून होते. परंतु व्यासपीठावर आवश्यक असलेले नगर सचिवच नसल्याने समांतर सभा होऊ शकली नाही. नगरसचिवांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी तेथे जावून प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर काही वेळाने पाटील-मजलेकर हेही अन्य एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live

Latest Images