Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कांदा, मिरचीने गाठला दराचा उच्चांक

0
0
दैनंदिन वापरात लागणाऱ्या मिरची आणि कांद्याच्या उच्चांकी दराने गृहिणींच्या डोळ्यांत पाणी आणले. होलसेल दरात सरासरी किलोमागे दहा ते बारा रुपयांनी दर वाढल्याने रिटेलमध्ये कांद्याचा दर शनिवारी ५५ रुपये किलो झाला.

अनधिकृत बांधकामांवर सोलापुरात हातोडा

0
0
सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी आता शहरातील अनधिकृत बांधकामांकडे आपला मोर्चा वळवला आहे.

मदन पाटील युवा मंचने टोल वसुली रोखली

0
0
सांगली -इस्लामपूर रस्त्यावरील सांगलीवाडीनजीकच्या नाक्यावरील टोल वसुली तत्काळ बंद करण्यात यावी, असे सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे आदेशपत्र फडकावत शनिवारी सायंकाळी मदन पाटील युवा मंचने दोन तास टोल वसुली रोखली.

तासगाव -पलूस कारखाना संजय पाटील यांच्या घशात घातला

0
0
‘गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या सोयीसाठी तासगाव-पलूस साखर कारखाना आमदार संजय पाटील यांच्या घशात घातला आहे,’ असा घाणाघाती आरोप ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी शनिवारी तासगाव येथे बोलताना केला.

जवान मधुकर महाडिक यांच्यावर अंत्यसंस्कार

0
0
कारगीलमध्ये द्रास परिसरात गस्त घालताना गुरुवारी आठ ऑगस्ट रोजी शहीद झालेले शिपूरचे जवान मधुकर श्रीकांत महाडिक यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रा. रा. ग. जाधव यांना जीवनगौरव

0
0
यंदाचे पद्मश्री विखे-पाटील साहित्य पुरस्कार जाहीर झाले असून ज्येष्ठ समीक्षक प्रा. रा. ग. जाधव यांना विखे-पाटील साहित्य जीवनगौरव, तर ज्येष्ठ नाट्य अभिनेते प्रा. मधुकर तोरडमल यांना नाट्यसम्राट पुरस्कार जाहीर झाला.

इचलकरंजीतील टोळीयुद्धातून खून

0
0
इचलकरंजी येथील कुख्यात गुंड भरत हरिबा त्यागी उर्फ कांबळे (वय ३२) याचा जयसिंगपुरात सहा हल्लेखोरांनी गोळ्या झाडून खून केला.

बांबू वाहतुकीला सूट

0
0
बांबू वाहतूक व तोडणीसाठी वनखात्याच्या जाचक अटीतून शेतकऱ्यांची सुटका झाली आहे.

४ कोटींचे रक्तचंदन निपाणीजवळ जप्त

0
0
तमिळनाडू - राजनपेठ तुमकूरमार्गे आयशर ट्रकमधून दीड टन मोसंबी फळाच्या ५० पोत्यांखाली खाली झाकून मुंबईकडे घेऊन जाणारे जवळपास १५ टन रक्तचंदन वनविभागाने शनिवारी जप्त केले.

मुंबईतील ‘नाराजी’नाम्यावर आज तोडगा?

0
0
मुंबईच्या सभासदांची नाराजी दूर करण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे पदाधिकारी पुढे सरसावले आहेत.

विशेष फेरीसाठी १८० अर्ज

0
0
आयटीआयमध्ये ३३ अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विशेष फेरीत आजअखेर १८० प्रवेश अर्ज दाखल झाले. मंगळवारपर्यंत (दि. १३) ही विशेष फेरी सुरु राहणार आहे.

देशमुख गट वा-यावर

0
0
राज्यात प्रत्येक जिल्ह्यात केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी आपला गट निर्माण केला. मात्र त्यांच्या अकाली निधनाला वर्ष पूर्ण होत आले तरी हा गट वा-यावरच आहे.

खड्डे दुरुस्तीला प्रतीक्षा उन्हाची!

0
0
पावसाने थोडी विश्रांती घेतल्यावर ऊन कायम राहण्याची वाट महापालिका पहात आहे. ऊन कायम राहिल्यास खड्डे मुजवण्यासाठी डांबराचे पॅचवर्क करण्याची घोषणा महापालिकेने केली आहे.

जिल्हाधिका-यांनी केले पोलिसांचे काम

0
0
सेवंथ डे स्कूलसमोर मोटारसायकल धोकादायक चालवत असलेल्या आसवराज विश्वनाथ मोरे (वय, २८ विक्रमनगर) याला जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.

पश्चिम घाट बचावसाठी मंगळवारी मानवी साखळी

0
0
पश्चिम घाटात विकासाच्या नावावर होणाऱ्या जैवविविधतेच्या ऱ्हासाविरोधात जनजागृतीसाठी मंगळवारी (दि. १३) शिवाजी विद्यापीठात मानवी साखळीचे आयोजन केले आहे.

इचलकरंजीतील गुंडाचा जयसिंगपुरात खून

0
0
इचलकरंजीतील कुख्यात गुंड भरत हरिबा त्यागी उर्फ कांबळे (वय ३२) याचा जयसिंगपुरात पाठलाग करीत हल्लेखोरांनी रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडून खून करण्यात आला.

ग्रामीण भागातही बांधकाम नियमावली

0
0
शहरी-ग्रामीण भागात समान बांधकाम नियमावली राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, त्यानुसार ग्रामीण भागातही ‘ट्रान्स्फरेबल डेव्हल्पमेंट राइट्स’ची (टीडीआर) पद्धत अवलंबली जाणार आहे.

गैरसोयीची अर्धप्रदक्षिणा!

0
0
महाद्वारातून मंदिरात जाणाऱ्या भाविकांना दर्शनानंतर घाटी दरवाजा किंवा पूर्व दरवाजातूनच बाहेर जाण्याची परवानगी असल्यामुळे महाद्वारात काढलेले चप्पल घालण्यासाठी भाविकांना गैरसोयीची का असेना पण मंदिराला अर्धप्रदक्षिणा घालावी लागणार आहे.

निवडणुकांचे आव्हान पेलणार कसे?

0
0
सहकार कायदा सुधारणांमधील अवघड वाटणारे पोटनियम दुरुस्ती व विशेष सर्वसाधारण सभा घेण्याचे महत्वाचे टप्पे संस्थांनी पार केले आहेत. यानंतर मुदत संपलेल्या संस्थांच्या निवडणूक घेण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर आहे.

२ वर्षांत १.५ हजार पोलिसांवर हल्ले

0
0
कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवून समाजाचे रक्षण करणाऱ्या पोलिसांवर दुहेरी संकट ओढवले असल्याचे चित्र आहे. पोलिसांवर हल्ले आणि त्यांच्याविरोधात नागरिकांनी केलेल्या तक्रारींच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images