Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

गडहिंग्लजमध्ये शिवसेनेचा मोर्चा

$
0
0

वैद्यकीय अधीक्षकांच्या चौकशीची मागणी

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

येथील उपजिल्हा रुग्णालयाचे भ्रष्ट वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील कुरुंदवाडे यांची खातेनिहाय चौकशी व्हावी व त्यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्त्वाखाली बुधवारी उपजिल्हा रुग्णालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रशासकीय अधिकारी एन. डी. मोरे यांच्यासोबत शिष्टमंडळाने चर्चा केली.

यावेळी देवणे म्हणाले, 'गडहिंग्लज हे आजरा, चंदगड, भुदरगड व कर्नाटक सीमाभागातील लोकांसाठी वैद्यकीय सुविधेचे चांगले ठिकाण आहे. शहरातील १०० बेडचे सुसज्ज रुग्णालय हे या परिसरातील गरीब रुग्णांना सेवा देणारे रुग्णालय आहे. मात्र येथील भोंगळ कारभारामुळे या रूग्णालयाची विश्वासाहर्ता कमी होत आहे. रुग्णालयातील रिक्त पदे भरलेली नाहीत, सेवा असून कर्मचारी उपलब्ध नाहीत. बऱ्याचदा अपघाती रुग्णांना सेवा न देता कोल्हापूरला पाठवले जाते. स्त्रीरोग तज्ज्ञ नसल्यामुळे गरोदर स्त्रियांना डॉक्टर्सअभावी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. सध्या अनेक प्रश्नांमुळे हे रुग्णालय वादात आहे. या सर्व गोष्टींसाठी अधीक्षक डॉ कुरुंदवाडे हेच सर्वस्वी जबाबदार आहेत. त्यांची खातेनिहाय चौकशी व्हावी व तत्काळ निलंबित करण्यात यावी.'

डॉ. सुनील कुरुंदवाडे यांची त्वरित बदली करून त्यांच्या कारभाराची खातेनिहाय चौकशी व्हावी, अपघात विभाग साहित्य व रिक्त कर्मचारी भरून सुस्थितीत करावा, स्त्रीरोग तज्ञ, सर्जन, फिजिशियन यांची रिक्त पदे त्वरित भरवित, रुग्णालयात एकूण १५ डॉक्टरांची पदे आहेत पैकी ७ पदे रिक्त आहेत. ती त्वरित भरावीत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील, तालुकाप्रमुख दिलीप माने, सहसंपर्कप्रमुख अरविंद नांगनुरी, शहर प्रमुख सागर कुऱ्हाडे, वसंत नाईक, संजय पाटील, बबन पाटील आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुर्लक्षामुळे इमारतीला अवकळा

$
0
0

​मुरगूड पोलिस स्टेशनच्या संस्थानकालीन इमारतीची दुरवस्था

म. टा. वृत्तसेवा, कागल

कधी काळी मुरगूड शहराचे वैभव म्हणून पाहिल्या जाणाऱ्या संस्थानकालीन मुरगूड पोलिस स्टेशनच्या जुन्या इमारतीची अवस्था भंगारासारखी झाली आहे. गेल्या चार वर्षांपासून पोलिस स्टेशन नवीन इमारतीत स्थलांतरीत झाल्यापासून ही जुनी इमारत मरणयातना सोसत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षाने या इमारतीला भंगारावस्था आली असून इमारतीसमोरील बाग म्हणजे जणू जनावारांचा गोठाच बनला आहे. आणखी काही काळ या इमारतीकडे दुर्लक्ष झाल्यास या ठिकाणी ही इमारत होती असे म्हणण्याची वेळ येणार आहे.

मुरगूड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या संस्थानकालीन राजवाडा पध्दतीच्या भव्य इमारतीमध्ये ४० वर्षांहून अधिक काळ मुरगूड पोलिस स्टेशनचा कारभार चालला. गेल्या चार वर्षांपासून मुरगूड पोलिस स्टेशन नवीन बांधलेल्या इमारतीत स्थलांतरीत झाले आहे. तेव्हापासून पोलिस स्टेशनच्या या जुन्या इमारतीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. देखण्या दिसणाऱ्या जुन्या इमारतीची शोभा वाढवण्यासाठी इमारतीसमोरच तत्कालिन सहाय्यक पोलिस निरीक्षक मल्लिकार्जुन सुरवसे यांनी सुंदर बगीचा तयार करुन घेतला आणि या बागेतच देखणे दत्त मंदिरही उभारले. पण येथून पोलिस स्टेशन स्थलांतरीत झाले आणि हे सारे वैभव लयाला गेले.

'जुनं ते सोनं' या उक्तीप्रमाणे या इमारतीकडे लक्ष देण्याऐवजी 'गरज सरो आणि वैद्य मरो' याप्रमाणे आता या इमारतीकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही. या जुन्या इमारतीतून पोलिस स्टेशन स्थलातंरीत झाल्यावर येथे गाव चावडी, कृषी विभाग, दुय्यम निबंधक आदींसह न्यायालय भरवण्यासाठी चर्चा अनेक झाल्या पण त्या निष्फळच ठरल्या आहेत. जर एखादे कोणतेही सरकारी कार्यालय येथे सुरु झाले असते तर या इमारतीचे गतवैभव टिकून राहिले असते आणि संबंधित कार्यालयाची गरजही पूर्ण झाली असती. पण याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही.

गेली चार वर्षे कोणीही एकदाही या इमारतीची काय अवस्था आहे याविषयी चर्चा केली नाही की प्रत्यक्ष जाऊन पाहणी केलेली नाही. चार वर्षांपासून या इमारतीची मोठी पडझड सुरु झाली असून या इमारतीच्या समोरची बाग म्हणजे भटक्या जनावरांचा गोठा बनत आहे. पूर्वीचे वैभव आणि आताची दुरवस्था पाहून नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. तसेच आजूबाजूला पडलेले खड्डे, साचलेला कचरा आणि झालेली पडझड अशा दुरवस्थेने ही इमारत सौंदर्यहीन झाली आहे.

मार्चअखेर आल्याने आम्ही या इमारतीकडे लक्ष दिले नव्हते. मी नुकतीच इमारतीची पाहणी केली आहे. सरकारकडून यासाठी फारसा निधी मिळत नाही. परंतु पोलिस खात्याकडेच यासाठी इस्टिमेट करून निधी मागणार आहे. तो मंजूर होताच इमारतीला गतवैभव प्राप्त करुन देऊ.

- बी. ए. भाई, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुना बुधवार पेठ रस्ता एकेरी करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जुना बुधवार पेठेतील मुख्य रस्ता वाहतुकीसाठी एकेरी करावा, या मागणीसाठी येथील जनता सेवक साम‌ाजिक संघाच्यावतीने बुधवारी जुना बुधवार पेठ तालमीसमोरील चौकात लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी महापालिका आणि पोलिस प्रशासनाने मागणीकडे लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भागातील नागरिकांनी दिला आहे.

जुना बुधवार पेठेतील मुख्य रस्ता अरुंद आहे, तसेच दाटीवाटीची घरे आहेत. स्मशानभूमी आणि पंचगंगा घाट जुना बुधवार पेठेत असल्याने दहन आणि रक्षाविसर्जनासाठीची गर्दी या मार्गावर असते. तसेच गणेशोत्सव, ताबूत विसर्जन, दुर्गामूर्तीचे विर्सजन, दसरा पालखी, जोतिबा यात्रा याचा संपूर्ण ताण याच रस्त्यावर पडतो. तसेच रत्नागिरीसह कोकणाकडे जाणारा हा मुख्य मार्ग आहे. कोकणाकडे जाणारी सर्व वाहतूक याच मार्गावरून सुरू असते.

जनता सेवक सामाजिक संघाचे अध्यक्ष धीरज रुकडे म्हणाले, 'ग्रामीण भागातून येणारी प्रचंड वाहतूक या रस्त्यावरून सुरू असते. अपघातात काही जणांचे प्राण गेले आहेत, शिवाय काहींना गंभीर दुखापती झाल्या आहेत. हवेचे आणि ध्वनीचे प्रदूषणही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. रात्रीसुद्धा प्रचंड वाहतूक असते. त्यातही अनेकजण भरधाव वेगाने वाहने चालवून समस्येत भरच घालत आहेत. अशी स्थिती असताना येथे पोलिस कर्मचारीही कधी नेमला जात नाही. हा मार्ग एकेरी करावा असा अर्ज आम्ही महापालिकेकडे आणि वाहतूक पोलिसांकडे दिला आहे. कोकणाकडे जाणारी वाहतूक शहराबाहेरून वळवण्यासाठी वडणगेपासून ते शहराबाहेर योग्य त्या ठिकाणी पुणे-बेंगळुरू महामार्गाला मिळेल असा बायपास रोड निर्माण करावा, जेणे करून संपूर्ण शहरातील वाहतुकीवरील ताण कमी होईल.' उपोषणात राहुल घोरपडे, बापू घोरपडे, आनंद वरेकर, किसन पाटील, आदी सहभागी झाले.

दरम्यान, याच मागणीचे निवेदन जुना बुधवार पेठ तालमी संस्थेच्यावतीने महापालिकेला देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौपदरीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा

$
0
0

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिरोली-सांगली रस्त्याचे चौपदरीकरण पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. रस्ता चौपदरीकरणासह क्रीडा संकुलाच्या कामाची मंत्री पाटील यांनी मंगळवारी आढावा बैठक घेतली. विभागीय क्रीडा संकुलात काम पूर्ण झालेल्या ठिकाणी स्पर्धा, शिबिरे आयोजित करावीत, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

बैठकीत शिरोली ते सांगली रस्त्याच्या टप्पेनिहाय भूसंपादन, भूसंपादनातील अडचणी, कब्जापट्टीबाबत चर्चा झाली. चौपदरीकरण पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे, असे पाटील यांनी आदेश दिले. विभागीय क्रीडा संकुलाचा आढावा घेताना २५ मीटर शूटिंग रेंज, जलतरण व डायव्हिंगचे काम, नाला व पाइपलाइनची कामे, दुसऱ्या टप्प्यातील विकसित करावयाच्या सुविधा, क्रीडा संकुलामध्ये कँटीन सुविधा सुरू करण्याबाबत आढावा घेतला. अपूर्ण कामे महिनाभरात पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच, क्रीडा संकुलात नवीन सुविधांचा प्रस्ताव नावीन्यपूर्ण योजनेमधून द्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. क्रीडा उपसंचालक एन. बी. मोटे, जिल्हा क्रीडा अधिकारी नवनाथ फरताडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता ए. एस. उपळे, कार्यकारी अभियंता एन. एम. वेदपाठक उपस्थित होते.

चौपदरीकरणाच्या बैठकीस इचलकरंजीच्या उपविभागीय अधिकारी अश्विनी जिरंगे, तहसीलदार वर्षा शिंगण-पाटील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यात कैद्यांचा कोंडवाडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

क्षमतेच्या जवळपास दुप्पट कैद्यांच्या संख्येमुळे सातारा जिल्हा कारागृह हाउसफुल्ल झाले आहे. कोंडवाड्यासारखी अवस्था होऊ नये म्हणून कारागृह व्यवस्थापनाने नवीन कैद्यांना कोल्हापूरच्या कळंबा कारागृहाची वाट दाखविण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे गुन्ह्यांच्या वाढत्या संख्येप्रमाणे कारागृहाची क्षमता वाढविण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

गेल्या काही वर्षांतील घटनांमुळे जिल्हा कारागृह चांगलेच चर्चेत राहिले. बाहेरून पिस्तूल टाकले जाणे, कैद्यांच्या समूहाकडून दुसऱ्या कैद्याला मारहाण आणि या सर्वांवर कडी म्हणजे तुरुंग रक्षकालाच कैद्यांकडून मारहाण होणे, असेही प्रकार घडले आहेत. त्या-त्या अशा प्रसंगावर व प्रश्नांवर कारागृह व्यवस्थापनाने मात केली. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कारागृहात येणाऱ्या कैद्यांच्या क्षमतेचा प्रश्नाशी कारागृह व्यवस्थापनाला सतत झगडावे लागत आहे. त्यावर आजवर तरी समाधानकारक तोडगा निघालेला नाही. दरवर्षी गुन्ह्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. गुन्ह्यांची संख्या वाढली की सहाजिकच कैद्यांची संख्या वाढते. तशी जिल्ह्यातही वाढ झाली आहे. मात्र, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्थापन झालेल्या या कारागृहामध्ये वाढत्या क्षमतेला पुरेशी पडतील, अशी नव्याने किमान कैद्यांच्या राहण्याच्या बाबतीत ठोस कामे झाली नाहीत. परिणामी कारागृहातील कैद्यांची संख्याही वाढणार, याचे भान सरकारला येताना दिसत नाही. जिल्हा कारागृहाची १५९ पुरुष व नऊ स्त्री कैद्यांना ठेवण्याची क्षमता आहे. तेवढ्याच कैद्यांची राहण्याची व्यवस्था येथे आहे. तसेच कर्मचारी संख्याबळही या क्षमतेनुसारच मंजूर आहे. मात्र, सध्या जिल्हा कारागृहामध्ये दररोज अडीचशेपेक्षा जास्त कैदी असतातच अशी स्थिती आहे. अनेकदा हा आकडा तीनशेपर्यंतही जातो. वाढत्या संख्येमुळे तीन कैद्यांच्या ठिकाणी पाच कैद्यांना ठेवावे लागते. त्यामुळे कारागृहाचा कोंडवाडा झाल्यासारखी परिस्थिती आहे.

कारागृहातील आजचा कैद्यांचा आकडा २९२आहे. त्यामध्ये २८१ पुरुष तर, ११ महिलांचा समावेश आहे. त्यात उन्हाळ्याच्या दिवसात तापमान चांगलेच वाढलेले आहे. अपुऱ्या जागेत जास्त कैदी ठेवल्याने उष्णता आणखी वाढते. त्यावर मार्ग म्हणून कारागृह व्यवस्थापनाने पंख्यांची सोय केली आहे. परंतु, कैदी कारागृहात येण्याचा ओघ सुरूच आहे. त्यामुळे स्वच्छता व आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

पोलिसांवर ताण

या कैद्यांना कोल्हापूरला सुरक्षित सोडण्याची पोलिसांवरील जबाबदारी वाढली आहे. नातेवाइकांनाही जामीन आदेश घेऊन कोल्हापूरची वारी करावी लागणार आहे. एक-दोन दिवसांत जामीन होण्याची शक्यता असलेल्यांची त्यामुळे चांगलीच तारांबळ उडत आहे. जामीन न होणाऱ्या कैद्यांना तारखेसाठी कोर्टात हजर करण्यासाठीही पोलिसांची कसरत होत आहे. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित होणार आहे. कैदी पळून जाऊ नये याचा ताणही पोलिसांवर येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वादग्रस्त अधिकाऱ्याची गडचिरोलीला बदली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

काही महिन्यांपूर्वीच कराड उपविभागीय कृषी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारलेले व जेथे जातील तेथे तक्रारींच्या भोवऱ्यात अडकलेले वादग्रस्त अधिकारी उत्तमराव के. देसाई यांची अखेर वडसा (जि. गडचिरोली) येथे त्याच जागेवर तडकाफडकी बदली झाली.

उत्तमराव देसाई हे कराडला उपविभागीय कृषी अधिकारीपदावर रूजू होण्यापूर्वी सिंधुदूर्ग जिल्ह्यात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहत होते. त्यापूर्वी ते पाटण (जि. सातारा) येथे तालुका कृषी अधिकारीपदावर कार्यरत असताना त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यावेळी तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विरोधात कृषी सहसंचालकांच्याकडे रितसर तक्रारी केल्या होत्या तर एन. व्ही. साळुंखे या निवृत्त कर्मचाऱ्याने देसाई यांनी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारासंबंधी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केल्या आहेत. त्यापैकी एका याचिकेवर निर्णय झाला असून, देसाई यांच्यावर कोर्टाने ठपका ठेवला आहे. तसेच अनेक लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनीही वारंवार संबंधितांकडे त्यांच्या बदलीची लेखी मागणी केली होती. त्यात त्यांनी त्यांच्या गैरव्यवहारावर प्रकाशझोत टाकून देसाई यांच्या कराड येथील बदलीला विरोध दर्शवला होता. तरीही अनेकांच्या या मागणीला कोलदांडा दाखवून व तक्रारींना मूठमाती देवून तत्कालिन कॉँग्रेस आघाडी सरकारने देसाई यांची विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असतानाच, २५ जून २०१४रोजी कराडला बदली केली होती. मात्र, बदलीची अंमलबजावणी १७ सप्टेंबर २०१४पासून करावी, असे नमूद केले होते. युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर देसाई यांच्याबाबत स्थानिक पदाधिकारी, नेतेमंडळी आणि कर्मचाऱ्यांनी सातत्याने तक्रारींचा सपाटा लावला होता. त्याची राज्य सरकारने गांभिर्याने दखल घेवून देसाई बदली करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बैलगाडी शर्यतींसाठी मोर्चा

$
0
0

कुपवाड : बैलगाडी शर्यती पुन्हा पूर्ववत सुरू कराव्यात, या मागणीसाठी बुधवारी सांगलीत आयोजित केलेल्या मोर्चाला जोरदार प्रतिसाद मिळाला. साडेतीनशे शर्यतीच्या बैलगाड्या आणि शेकडो समर्थक अचानक रस्त्यावर आल्याने आल्यानंतर पोलिस यंत्रणा कोंडीत सापडली. अखेर मोर्चाला परवानगी नाकारून त्याच ठिकाणी येवून तहसीलदार किशोर घाडगे यांनी निवेदन स्वीकारले.

अखिल भारतीय शर्यती बचाव कृती समितीचे अध्यक्ष प्रसाद धर्माधिकारी (शिरोळ, जि. कोल्हापूर) यांच्या आवाहनाला प्रतिसाद देवून मोर्चासाठी बुधवारी सातारा, पुणे, सोलापूर, सांगली परिसरातील बैलगाडीवान शर्यतीच्या बैलांसह सांगलीतील विश्रामबागमध्ये दाखल झाले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार होता. परंतु, मोर्चाला मिळालेला उस्फूर्त प्रतिसाद, साडेतीनशे बैलगाड्या आणि त्यांना जुंपलेले बैल हे शर्यतीचे असल्याने हा मोर्चा शहरात गेला तर काय होईल? याचा अंदाज पोलिसांना अगोदरच आला असावा. त्यामुळे पोलिसांनी परवानगी नाकारून मोर्चा जागीच रोखला. मिरजेचे तहसीलदार किशोर घाडगे यांना परिस्थितीची कल्पना देवून त्यांना जागेवरच निवेदन देण्यात आले. या वेळी दिलीप बुरसे (मिरज), धनाजी पाटील, बाळासाहेब पाटील, सुधीर खाडे, सचिन संकपाळ, हिम्मतखान सनदी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जमिनीला बाजारभावाने दर द्या’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

वाघापूर पुलाच्या मुरगूड व वाघापूर या दोन्ही बाजूकडील रस्त्यासाठी द्याव्या लागणाऱ्या जमिनीचा मोबदला सरकारने चालू बाजारभावाप्रमाणे देवून रस्त्याची कामे तातडीने पूर्ण करुन पूल वाहतुकीसाठी खुला करावा अन्यथा शिवसेना आंदोलन करेल, असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

कागल व भुदरगड तालुक्यातील लोकांची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी लक्षात घेवून आणि कोट्यावधी रुपये खर्चून वेदगंगा नदीवर कागल व भुदरगड तालुक्याला जोडणार्या वाघापूर पूलाचे काम पूर्ण झाले आहे. पण पुलाच्या मुरगूड व वाघापूर या दोन्ही बाजूंनी भराव टाकून रस्ता करण्याची गरज आहे. दोन्ही बाजूंनी पुलाला जोडून काढण्यात येणाऱ्या रस्त्यासाठी जमीन संपादनाचे काम हाती घेतले आहे. पण आपल्या शेत जमिनीचा मोबदला मिळाल्याशिवाय रस्त्यासाठी जमिनी देणार नसल्याची भूमिका घेतल्याने रस्त्याचे काम बंद पडले आहे.

परिणामी पूल पूर्ण झाला तरी तो वाहतुकीसाठी वापरता येत नाही. शेतकरी आणि प्रशासन यांची सयुक्त बैठक झाल्याशिवाय यावर तोडगा काढणे अशक्य आहे. विकास करताना शेतकऱ्यांना त्यांमया जमिनीचा मोबदला हा मिळालाच पाहिजे.यावर शिवसेना ठाम असून शेतकऱ्यांना बाजारभावाप्रमाणे मोबदला तातडीने देवून रस्त्याचे काम पूर्ण करावे आणि हा पूल वाहतुकीसाठी खुला करावा. ही मागणी येत्या महिन्याभरात पूर्ण झाली नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे,उपजिल्हाप्रमुख संभाजी देवणे यांनी सार्वजनिक बाधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जी.टी.पवार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तलाठ्याला लाच घेताना अटक

$
0
0

कोल्हापूर : आसुर्ले (ता. पन्हाळा) येथील तलाठी हनुमंत शंकर बदडे याला दोन हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी दुपारी सापळा रचून पकडले. तक्रारदाराने आसुर्ले येथे स्वतः व पत्नीच्या नावाने जमीन खरेदी केली होती. या जमिनीवर नाव लावण्यासाठी तक्रारदाराने तीन फेब्रुवारी रोजी तलाठी बदडे याच्याकडे अर्ज केला होता. याकामी तलाठी बदडे यांनी दोन हजाराची लाच मागितली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे बुधवारी तक्रार दिली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीला मिळाले दुप्पट उत्पन्न

$
0
0

उदयसिंग पाटील, कोल्हापूर

प्रवाशांना आकृष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवून एस. टी. महामंडळ उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. पण या प्रयत्नांबरोबर प्रासंगिक कराराने यावर्षी कोल्हापूर विभागाला चांगलाच हात दिला आहे. करारांमधून गतवर्षीच्या तुलनेत यंदा महामंडळाला जवळपास दुप्पट म्हणजे ४ कोटी ८३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षभरात झालेल्या लोकसभा, विधानसभा व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी दिलेल्या बसेसमधून ९८ लाख रुपयावर उत्पन्न मिळाले आहे.

राज्यभर महामंडळ तोट्यात आहे. त्यामुळे हा गाडा चालवण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोल्हापूर विभागात सुटीचा कालावधी, विविध यात्रा यांचे नियोजन करुन उत्पन्न वाढवण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न केले जातात. कर्नाटकातील सौंदत्ती यात्रेतील उत्पन्न आपल्याकडे वळवण्यासाठी कर्नाटक व महाराष्ट्र महामंडळात स्पर्धा चाललेली असते. त्याचबरोबर जोतिबा यात्रेसाठी नियोजन केले जाते. तसेच पंढरपूर यात्रेसाठी विविध गावांमधून थेट पंढरपूरसाठी बस सोडल्या होत्या. कोल्हापूर विभागाने यंदा या सर्व प्रयत्नांतून प्रासंगिक करार करण्याच्या संख्येत दुप्पट वाढ केली आहे. २०१३-२०१४ च्या आर्थिक वर्षात १५५३ बस करारबद्ध झाल्या होत्या. २०१४-२०१५ च्या आर्थिक वर्षात तब्बल ३२७७ बस करारबद्ध झाल्या. त्यातून ४ कोटी ८३ लाख १८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. सौंदत्ती यात्रेसाठी मोठ्या प्रमाणावर बस करारावर दिल्या गेल्या आहेत.

त्याचबरोबर लोकसभा, विधानसभा व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकाही महामंडळाला फायदेशीर ठरल्या आहेत. तीनही निवडणुकांसाठी दिलेल्या बसेसमधून ९८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. महत्वाचे म्हणजे ही रक्कम महामंडळाला मिळालीही आहे. या बस दररोजचे काम करुन दिल्या गेल्याने हे उत्पन्न जादाचे मिळाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफाळा विभागाचा होणार ‘हिशेब’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

थकीत घरफाळ्याच्या रकमेत नियमबाह्यरीत्या सवलत दिल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर घरफाळा विभागाच्या संपूर्ण कामकाजाचा हिशेब मांडला जाणार आहे. महापौरांनी घरफाळा विभागाच्या गेल्या पाच वर्षातील योजना, सवलत कुणाला दिली, कोणाच्या आदेशाने दिली या संदर्भातील इत्थंभूत माहिती मागवली आहे. आयुक्त पी. शिवशंकर यांना यासंदर्भात लेखी पत्र दिले आहे. शहरातील मिळकतींची संख्या वाढली असताना, विभागाच्या कर्मचाऱ्याकडून मिळकतींच्या नोंदी केल्या जात नाहीत. पावती पुस्तकाचा आधार घेत नियमबाह्य्रईत्या सवलत देत काहींनी पैसे हडप केल्याच्या तक्रारी आहेत.

घरफाळा विभागाकडून वर्षाकाठी ३६ कोटी रुपयांच्या आसपास कर जमा होतो. मात्र विभागाकडील कामकाजाबद्दल नागरिकांच्या तक्रारी आहेत. मिळकतीच्या नोंदीपासून ते वसुलीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर विभागातील काही कर्मचारी 'हम करे सो कायदा' या पध्दतीने कामकाज करत आहेत. शहर आणि उपनगरांत गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली आहेत. व्यापारी संकुलांच संख्या वाढली आहे. मात्र महापालिकेच्या दफ्तरी वाढीव मिळकतींची नोंद नाही. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांनी मिळकतधारकांशी, व्यापारी संकुलाच्या मालकांशी संगनमत करून महापालिकेचे आर्थिक नुकसान करत आहेत.

बागल चौकातील आमले मार्केटची थकीत घरफाळ्याची रक्कम २२ लाख रुपये असताना दोघा कर्मचाऱ्यांनी १४ लाख रुपये जमा केले आहेत. मुळात रहिवासी मिळकतींसाठी सवलत योजना असताना व्यापारी संकुलाचा त्यामध्ये समावेश केला आहे. उर्वरित आठ लाख रुपयांचा उल्लेख कुठेच नाही. आयुक्त पातळीवरून सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

जनता दरबारात नाग​रिकांनी घरफाळा विभागाच्या कामकाजाविषयी तक्रारी केल्या आहेत. यामुळे घरफाळा विभागाने २०१० ते २०१४-२०१५ पर्यंत कुणा कुणाला सवलत दिली, कुणाच्य आदेशाने आणि अधिकाराखाली घरफाळा कमी केला आहे याविषयी वर्षनिहाय माहिती मागवली आहे. आयुक्तांकडे यासंदर्भात लेखी पत्र पाठवले आहे. त्यातून विभागातील कामकाजावर प्रकाशझोत पडणार आहे.

- तृप्ती माळवी, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंभर फुटीसाठी भूसंपादन प्रक्रिया

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहर सुधारित विकास योजनेंतर्गत खानविलकर पेट्रोल पंपाच्या पिछाडीपासून ते कसबा बावड्यापर्यंत नदीकाठच्या बाजूने १०० फुटी रस्ता तयार करण्यात येणार आहे. महापालिकेने या रस्त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली असून, संबंधित शेतकऱ्यांना नोटिसा लागू केल्या आहेत. नुकसान भरपाईअंतर्गत जागा संपादनाच्या मोबदल्यात टीडीआर देण्याचे प्रस्ताव दिला आहे. आयुक्त पी. शिवशंकर यांच्या उपस्थितीत बुधवारी शेतकऱ्यांना द्यावयाच्या नुकसान भरपाईसंदर्भात बैठक झाली. प्राथमिक टप्प्यात शेतकऱ्यांनी महापालिकेच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे.

कोल्हापूर शहरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी आणि रत्नागिरी, पन्हाळामार्गे येणारी अवजड व मोठ्या वाहनांसाठी शहराच्या बाहेरून रस्ता तयार करण्याचे विकास नियंत्रण नियमावलीत समाविष्ट आहे. हा रस्ता साकारला तर शहरातील वाहतुकीची कोंडी कमी होण्याची शक्यता आहे. रस्ता बनविण्याच्या अनुषंगाने महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. १०० फुटी रस्ता तयार करण्यासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेंतर्गत या संभाव्य मार्गावरील शेतकऱ्यांना नोटिसा पाठविल्या आहेत.

खानविलकर पेट्रोल पंपाच्या पिछाडीपासून ते कसबा बावडा येथील गोळीबार मैदान, पेट्रोल पंपापर्यंत असा प्रस्तावित सव्वाचार किलोमीटरचा रस्ता आहे. या रस्त्यासाठी १२५ शेतकऱ्यांची ६० एकर शेती क्षेत्र बाधित होणार आहे. त्यासाठी आयुक्तांनी संबंधित शेतकऱ्यांशी नुकसान भरपाईसंदर्भात चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांनी भूसंपादन कायद्याप्रमाणे नुकसानभरपाई देणार की टीडीआरच्या मोबदल्यात जागा हस्तांतरण करायचे या अनुषंगाने चर्चा झाली. टीडीआरचे हक्क, नुकसानभरपाई याविषयी शेतकऱ्यांनी मते मांडली. चर्चेत नगरसेवक डॉ. संदीप नेजदार, जयवंत पाटील, अजित सासने, अमर पाटील, प्रवीण पाटील आदींनी सहभाग घेतला.

नेमके टीडीआर कुणाला द्यायचे हे कळणार नाही. संबंधित शेतकऱ्यांकडून वैयक्तिकरीत्या टीडीआर मागणीचा प्रस्ताव आल्यानंतर जागा ताब्यात घेऊन टीडीआर देणार आहे. आठवठाभरात सर्व्हे करून पुन्हा एकदा शेतकऱ्यांची बैठक घेतली जाणार आहे.

- धनंजय खोत, सहायक संचालक, नगर रचना विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यातील १३ कला संग्रहालयांवर नजर

$
0
0

गुरुबाळ माळी, कोल्हापूर

सिंदखेड राजा येथील जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या राजवाड्यातून सोळाव्या शतकातील दुर्मिळ तोफ पळवल्याच्या घटनेने खडबडून जागे झालेल्या राज्य सरकारने आता हजारो वर्षांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक दुर्मिळ व ऐतिहासिक वस्तूंची जपणूक करण्यासाठी ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यातील तेरा सरकारी वस्तूसंग्रहालयांवर सीसीटीव्हीची नजर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात टाउन हॉल म्युझियम आणि चंद्रकांत मांडरे कला संग्रहालयांचाही समावेश आहे.

राज्यातील सर्वच कला संग्रहालयात अतिशय दुर्मिळ वस्तू आहेत. काही संग्रहालयांत तर हजार वर्षांपूर्वीच्या वस्तू आहेत. हा प्राचीन आणि ऐतिहासिक ठेवा जपून ठेवण्यासाठी राज्य सरकार विविध मार्गाने प्रयत्न करीत आहे. पण डिसेंबर महिन्यात सिंदखेड येथील राजवाड्यातून जिजामाता यांचे वडील लखोजी जाधव यांची तोफ पळवली. त्यातून ही संग्रहालये सुरक्षित नसल्याचा पुरावा मिळाला. पंचधातूचा वापर करून तयार केलेली ही ८५ किलोची तोफ पळवून नेणाऱ्या युवकांचा पोलिसांनी शोध लावला, पण या घटनेने सरकारही खडबडून जागे झाले. तातडीने काही उपाययोजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ही संग्रहालये सीसीटीव्हीच्या नजरेखाली आणण्यात येणार आहेत. त्याच्या खर्चाची तरतूद करण्यात आली असून, निविदा प्रक्रियाही राबविण्यात येणार आहे. सध्या तेरापैकी केवळ तीन वस्तूसंग्रहालयांत सीसीटीव्हीची व्यवस्था असली तरी ती तोकडी आहे. त्यामुळे तेथेही आधुनिक व अधिकाधिक प्रमाणात कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.

वस्तूसंग्रहालयात अतिशय दुर्मिळ वस्तू आहेत. त्या सुरक्षित राहाव्यात यासाठी सर्व संग्रहालयांत सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सरकारने निधीची तरतूद केली आहे. लवकरात लवकर सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे आमचे प्रयत्न राहतील.

- संजय पाटील, संचालक, राज्य पुरातत्व विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोकुळचा ‘भाव’ वधारला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'आंबा पाडणे', 'घोडे बाजार' किंवा 'ढपला पाडणे' हे शब्द कोल्हापूरला नवे नाहीत. या शब्दांनी कोल्हापूरची बदनामी फार लांबवर पोहचविली आहे. समोर संधी दिसली की त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा असे ठरवूनच हात साफ करून घेतले जातात. सहकार क्षेत्रातील निवडणुका आल्या की या शब्दप्रयोगांना मूर्त रूप येते. मतदानावेळी हात धूऊन घेतल्याने पुढील पाच वर्षात नैतिक अधिकार गमावून बसलेल्या सभासदांचा आवाज बंद होतो. त्यामुळेच अनेक संस्था बुडाल्या. सध्य सुरू असलेल्या गोकुळच्या निवडणुकीसाठी ठरावधारक प्रलोभनांसाठी स्वतःला बाजारात उभे करत आहेत. गोकुळच्या या 'आठवडी बाजारात' सध्ये काहींनी ८० हजार तर कोणी १ लाख रुपये दर ठरवला आहे. जो जास्त बोली लावेल त्याच्याकडे उडी मारायची. असे कुंपणावरचे ठरावधारक अपल्या गळाला लागावेत यासाठी नेतेही आपली ताकद पणाला लावत आहेत.

गोकुळच्या निवडणुकीसाठी ठराव घेतलेले संस्थांचे काही संचालक आता बंगळुरूमध्ये कुंटुंबियांसह मौजमस्ती करत आहेत. उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी कोणी मस्तपैकी तलावात डुंबत आहे तर कोणी शॉपिंग मॉलमध्ये खरेदी करत आहे. मात्र, दोन्ही सत्तारूढ पॅनेलविरोधात विरोधकांचे तगडे आव्हान उभे राहिल्याने काही ठरावधारक जिकडे जास्त बोली लागेल तिकडे पळण्याच्या तयारीत आहेत. काही ठरावधारक सहलीवर गेले असले तरी संबधित ठरावधारकांचे कुटुंबिय, मित्र आणि संबधित संस्थेच्या संचालकांकरवी यांच्या नाकदु ऱ्या काढण्याची तयारी सुरु आहे. यासाठी एका पॅनेलने ८० हजार तर दुसऱ्या पॅनेलने १ लाख रुपयांचे अमिष दाखविले आहे. गावोगावी असलेल्या दूधसंस्थांमध्ये चेअरमन आणि एखाददुसरा संचालकच संस्था चालवित असल्याने सध्या या दोघा तिघांची चंगळ सुरु आहे. काहींनी पैशाऐवजी गोकुळमध्ये नोकरीचे प्रस्ताव दिले आहेत. जे ठरावधारक कट्टर आहेत त्यांना शब्द देऊन गावातच ठेवले आहे तर बेभरवशी ठरावधारकांना दूरच्या सहलीवर पाठवले आहे.

मागील निवडणुकीत हाच दर ६० हजारांवर गेला होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात होती. आता दोन्ही पॅनेल तगडी झाल्याने कुंपणावरच्या ठरावधारकांना चांगले दिवस आले आहेत. आता हेच ठरावधारक आपली बोली लावून दर वाढवून घेत आहेत. सध्या हा दर ८० हजारांवरून १ लाखांवर गेला आहे. जर पैसे नसतील तर नोकरीची हमीही घेतली जात आहे. मा‌त्र, मागील निवडणुकीत ज्यांनी नोकरीचा शब्द घेतला त्यापैकी अनेकजण रोजंदारीवर राबत आहेत हा भाग वेगळा.

सक्रिय कर्मचाऱ्यांना धास्ती

सध्या ठराव गोळा करण्यापासून ते अगदी ठरावधारकांची सोय करण्यापर्यंत गोकुळचे काही कर्मचारी सक्रिय होते. आता हा भाग वेगळा की गोकुळचे अधिकारी आणि विद्यमान संचालक ते नाकारात आले आहेत. त्यामुळे आत्ता आपण आघाडी घेतली आहेच तर सत्ता आणूनच गप्प बसू, नाहीतर नोकरीवर गदा येईल अशी भीती अनेकांच्या मनात आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विरोधात काम केलेल्या काहींना मुंबईला पाठवले तर काहींना कायमचा नारळ दिला होता. त्यामुळे सध्या कर्मचारीही सावध आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशयित अद्याप मोकाटच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांची हत्या होऊन दोन महिने झाले. हल्लेखोरांच्या तपासासाठी पोलिसांनी विविध पातळ्यांवर प्रयत्न करूनही अद्याप हत्येच्या तपासाचे धागेदोरे लागलेले नाहीत. पोलिसांनी दोन महिन्यांत तब्बल दीड लाख लोकांकडे चौकशी केली आहे. वैयक्तिक कारणांबरोबर जातीयवादी संघटनांचा पानसरे यांच्या हत्येत हात आहे का, याबाबतही पोलिस कसून तपास करत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

पानसरेंची हत्या होऊन दोन महिने झाले तरी हल्लेखोरांचा शोध लागला नसल्याने राज्य सरकार व पोलिस प्रशासनाबद्दल टीका होऊ लागली आहे. गेले दोन महिने पोलिसांची २७ पथके महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यांत तपास करत आहेत. पानसरेंवर ज्या ठिकाणी हल्ला झाला, त्या परिसरातील एक किलोमीटर अंतरावरील फोन व मोबाइल कॉल्सची तपासणी केली आहे. तपासणीत जवाहरनगर, राजारामपुरी, यादवनगर, परिसरातील गुंडांच्या कॉलची संख्या जास्त असल्याचे दिसून आले. अशा गुंडांची चौकशी करण्यात आली आहे. तसेच कॉल करणाऱ्या प्रत्येक संशयिताकडे वैयक्तिक चौकशी केली आहे. छोट्या कॉलकडे जास्त लक्ष देण्यात आले आहे. याशिवाय एसएमएस, वॉट्स अॅप्स, फेसबुक, ई-मेलची तपासणी सुरू आहे. प्रत्येक अधिकाऱ्याकडे स्वतंत्र तपास दिला आहे. कोल्हापूर परिक्षेत्रातील रेकॉर्डवरील गुंड, टोळी युद्धातील गुंड, सुपारी घेणारे गुंड, रेकॉर्डवरील गोळीबाराच्या गुन्ह्यातील आरोपींची कसून चौकशी केली आहे.

हत्येची व्याप्ती पाहता कर्नाटक, गोवा राज्यांतील पोलिसांबरोबर बैठका घेऊन शोधमोहीम सुरू आहे. हल्लेखोर निपाणीमार्गे कर्नाटकाकडे पळून गेल्याचा संशय आहे. या पार्श्वभूमीवर सीमाभागातील कर्नाटकातील बेळगाव, विजापूर, हुबळी, धारवाड परिसरात शोधमोहीम सुरू आहे. परराज्यांतील स्थानिक पोलिसांचीही मदत घेतली जात आहे. पानसरे जातीयवादी संघटना व पक्षांवर टीका करत असत, त्यामुळे त्यांना विरोध करणाऱ्या मंडळींकडेही चौकशी केली जात आहे. पानसरेंनी जिथे-जिथे भाषणे व व्याख्याने दिली, त्या ठिकाणी पोलिस चौकशी करत आहेत. कोकण, नागपूर, अहमदनगर, औरंगाबाद, पुणे येथे त्यांनी दिलेल्या व्याख्यानावेळी विरोध करणाऱ्या व्यक्तींकडेही चौकशी केली जात आहे.

प्रत्यक्षदर्शींकडून माहिती देण्यास टाळाटाळ

पानसरेंवर जेव्हा हल्ला झाला, त्यावेळी पाच ते सहाजणांनी हल्लेखोरांना पाहिले आहे. हल्लेखोर कोणत्या दिशेकडे वळाले, ते कसे होते याची माहिती असूनही ती देण्यास टाळाटाळ करत आहेत. एक साक्षीदार परिसरातील मोलकरीण आहे. घटनेवेळी ती पानसरेंच्या घरासमोर उभी होती. तिच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असली तरी पुरेशी माहिती मिळत नाही. साक्षीदार भीतीच्या छायेखाली असल्याने माहिती देण्यास उत्सुक नाहीत.

उमा पानसरेंकडून अपेक्षा

हल्ल्यातील मुख्य साक्षीदार उमा पानसरे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांच्याकडून आरोपींची माहिती घेण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. हल्ल्यापूर्वीची माहिती उमा पानसरे देत आहेत, पण हल्ला झाला त्यावेळी घटना कशा घडल्या, हल्लेखोर कसे होते, हे त्यांना आठवत नसल्याने तपासात अडचणी येत आहेत. त्यामुळे गेले दोन महिने पोलिसांनी रीतसर त्यांचा जबाबही घेतलेला नाही. उमा पानसरे यांचा जबाब महत्त्वाचा असल्याने आरोपी पकडल्यावर त्यांचा जबाब व आरोपींचे वर्णन यामध्ये तफावत राहू नये यासाठी पोलिस काळजी घेत आहेत, पण काही दिवसांनी जबाबात कायदेशीर बदल करता येतो याकडेही पोलिस निर्देश देत आहेत. डॉक्टर व कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊन पानसरे कुटुंबीयांना विश्वासात घेऊन पोलिस रीतसर जबाब घेणार आहेत.

उमा पानसरेंची भूमिका आणि भाषा दुर्दैवी आहे. भाजपने बैठक कुठे घ्यावी, कशी घ्यावी हा पक्षाचा विचार आहे. पानसरे कुटुंबाबद्दल पूर्ण सहानुभूती बाळगूनही मला असे वाटते की, सगळ्या विषयाला चुकीचे वळण लावणे ही जी काही डाव्या राजकारणाची खास बुद्धीभेद करण्याची शैली आहे, ती निदान अशा विषयांसाठी तरी वापरू नये. पानसरेंच्या खुनाचा तपास करण्याचे सगळे प्रयत्न सुरू आहेत. कोणाकडेही ठोस माहिती असेल, तर त्यांनी ती पोलिसांकडे देऊन सहकार्य करावे. याबाबत निव्वळ राजकारण सुरू आहे, हे दुर्दैव आहे.

- माधव भंडारी, पक्ष प्रवक्ता भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ATM च्या धर्तीवर पेड मिनरल वॉटर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नागरिकांच्या सोयीसाठी एक रुपयात एक लिटर पाणी देण्याच्या महापालिकेच्या महत्त्वकांक्षी योजनेला लवकरच मूर्तरुप येण्याची शक्यता आहे. प्रशासनाने एका खासगी कंपनीशी यासंदर्भात चर्चा सुरू केली आहे. आठवडाभरात यावर शिक्कामोर्तब होणार आहे. एटीएमच्या धर्तीवर ही पेड ​मिनरल वॉटर योजना सुरू होणार आहे. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसर, सीबीएस, शिवाजी चौक, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, पापाची तिकटी, रंकाळा चौपाटीसह ६० ठिकाणे त्यासाठी निश्चित केली आहेत.

कोल्हापुरात पर्यटक आणि भाविकांची संख्या वाढत आहे. पर्यटकांना एक रुपयात एक लिटर शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे तसेच नागरिकांनाही माफक दरात पाणी मिळावे असा उद्देश ठेवून स्थायी समिती सभापती आदिल फरास यांनी पेड मिनरल वॉटर डिस्पेन्सरची योजना आखली आहे. यासाठी सामाजिक संस्था, कंपनींना महापालिकेकडून जागा, पाणी कनेक्शन दिले जाणार आहे. अॅक्वा क्राफ्ट कंपनीने योजनेसाठी उत्सुकता दाखवली आहे. महापालिकेकडे प्रस्तावही सादर केला आहे.

साडेचार लाखाचे मशिन

शहरातील झोपडपट्टी परिसरातही ही योजना रा‌बविण्यात येणार आहे. यामध्ये जवाहरनगर चौक, सुभाषनगर चौकाचा समावेश आहे. विक्रमनगर येथे दोन मशिन्स बसवली जाणार आहेत. एका मशिन्सची किंमत साडेचार लाख रुपये इतकी आहे. महापालिकेकडून कंपनीला पाणी उपलब्ध करून दिल्यानंतर त्यावर प्रक्रिया करून ते नागरिकांना देण्यात येणार आहे.

नागरिकांना एक रुपयात एक लिटर शुद्ध् पाणी देतानाच या माध्यमातून अपंग व्यक्ती आणि विधवांना रोजगार मिळणार आहे. त्यांची प्रत्येक केंद्रावर नेमणूक केली जाणार आहे. एक लिटर पाण्यामागे २५ पैसे मोबदला अंपग किंवा विधवांना मिळणार आहे. या संदर्भात कंपनीशी चर्चा झाली आहे. येत्या आठवड्याभरात या योजनेला अंतिम स्वरूप दिले जाईल.

- आदिल फरास, सभापती, स्थायी समिती सभापती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीड लाख जणांची चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांची हत्या होऊन दोन महिने झाले. हल्लेखोरांच्या तपासासाठी पोलिसांनी विविध पातळ्यांवर प्रयत्न करूनही अद्याप हत्येच्या तपासाचे धागेदोरे लागलेले नाहीत. पोलिसांनी दोन महिन्यांत दीड लाख लोकांकडे चौकशी केली आहे. सर्व शक्यतांची पडताळणी पोलिसांकडून सुरू आहे.

पानसरेंची हत्या होऊन दोन महिने झाले तरी हल्लेखोरांचा शोध लागला नसल्याने राज्य सरकार व पोलिस प्रशासनाबद्दल टीका होऊ लागली आहे. गेले दोन महिने पोलिसांची २७ पथके महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यांत तपास करीत आहेत. पानसरेंवर ज्या ठिकाणी हल्ला झाला, त्या परिसरातील एक किलोमीटर अंतरावरील फोन व मोबाइल कॉल्सची तपासणी केली आहे. तपासणीत जवाहरनगर, राजारामपुरी, यादवनगर, परिसरातील गुंडांच्या कॉलची संख्या जास्त असल्याचे दिसून आले. अशा गुंडांची चौकशी करण्यात आली आहे. तसेच, कॉल करणाऱ्या प्रत्येक संशयिताकडे वैयक्तिक चौकशी केली आहे. छोट्या कॉलकडे जास्त लक्ष देण्यात आले आहे. याशिवाय एसएमएस, व्हॉट्स अॅप, फेसबुक, ई-मेलची तपासणी सुरू आहे. प्रत्येक अधिकाऱ्याकडे स्वतंत्र तपास दिला आहे. कोल्हापूर परिक्षेत्रातील रेकॉर्डवरील गुंड, टोळी युद्धातील गुंड, सुपारी घेणारे गुंड, रेकॉर्डवरील गोळीबाराच्या गुन्ह्यातील आरोपींची कसून चौकशी केली आहे.

हत्येची व्याप्ती पाहता कर्नाटक, गोवा राज्यांतील पोलिसांबरोबर बैठका घेऊन शोधमोहीम सुरू आहे. हल्लेखोर निपाणीमार्गे कर्नाटकाकडे पळून गेल्याचे संशय आहे. या पार्श्वभूमीवर सीमाभागातील कर्नाटकातील बेळगाव, विजापूर, हुबळी, धारवाड परिसरात शोधमोहीम सुरू आहे. परराज्यांतील स्थानिक पोलिसांचीही मदत घेतली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुमन पाटील यांचा विक्रमी विजय

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुमन पाटील विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्या. सुमन पाटील यांना एकूण १ लाख ३१ हजार २३६ मते मिळाली. त्यांनी १ लाख १२ हजार ९६३ मताधिक्य मिळवित निकटचे प्रतिस्पर्धी स्वप्नील पाटील यांचा दणदणीत पराभव केला. स्वप्नील पाटील यांना अवघ्या १८ हजार २७३ मतांवर समाधान मानावे लागले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक झाली. आबांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेचा मोठा फायदा सुमन पाटील यांना झाला. सर्वच पक्षांनी सुमन पाटील यांना पाठिंबा दिल्यामुळे विजयाची केवळ औपचारिकता बाकी होती. मतदानाची टक्केवारी वाढल्यामुळे मोठे मताधिक्य घेत पाटील यांनी विजय मिळविला. दरम्यान, आबांच्या पारंपरिक विरोधी गटाची मतेही अपक्ष उमेदवारांना मिळाली नाहीत. त्यामुळे ही पोटनिवडणूक पूर्णपणे एकतर्फी झाल्याचे स्पष्ट झाले.

राष्ट्रवादीने मानले तासगावकरांचे आभार

तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आबांच्या पत्नी आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार सुमन रावसाहेब पाटील यांना विक्रमी मताधिक्याने निवडून दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसने तासगाव कवठेमहांकाळच्या जनतेचे आभार मानले आहेत. हा विजय आर. आर. आबा पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेचा आहे. गेली २५ वर्षे आबांनी या भागात केलेली विकासकामे व जनतेच्या प्रश्नांची केलेली सोडवणूक यामुळे तेथील जनता आबांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी उभी राहिली आहे. या भागाच्या सर्वांगिण विकासाचे आबांचे अपुरे राहिलेले स्वप्न सुमन पाटील निश्चित पूर्ण करतील, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदारांची आबांना श्रद्धांजली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

सहानुभूतीच्या लाटेवर स्वार झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेच्या उमेदवार सुमन रावसाहेब पाटील यांनी तब्बल एक लाख १२ हजार ९६३ इतके विक्रमी मताधिक्य घेऊन तासगाव-कवठेमहांकाळची पोटनिवडणूक जिंकली. तासगाव-कवठेमहांकाळच्या मतदारांनी आर. आर. आबांना आपल्या भरघोष मतांची श्रद्धांजली वाहिली. अशीच भावनिक प्रतिक्रिया निकालानंतर उमटत होती. बंडखोरीचे आव्हान देणारे स्वप्नील पाटील यांच्यासह सर्वच अपक्ष उमेदवारांना आपली अनामत रक्कमही वाचविता आली नाही. या मतदारसंघातील पारंपारिक आर. आर. पाटील विरोधी गटाचे मतदान आपल्या पारड्यात पडेल, ही बंडखोराची आशाही फोल ठरली.

राष्ट्रवादीच्या उमेदवार सुमन आर. पाटील यांना एकूण १ लाख ३१ हजार २३६ मते मिळाली. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी स्वप्नील पाटील यांना अवघ्या १८ हजार २७३ मतांवरच समाधान मानावे लागले. खुद्द त्यांच्या सावर्डे गावातही स्वप्नील पाटील आघाडी घेऊ शकले नाहीत. अन्य अपक्षांपैकी प्रशांत ज्ञानेश्वर गंगावणे (मुंबई) यांची १०६२ मते वगळता कोणालाच मतांचा चार अंकी आकडाही गाठता आला नाही.

तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाच्या २८५मतदान केंद्रांवरील तसेच पोष्टाच्या मतदानासह १ लाख ५५ हजार १८४ मते मोजण्यात आली, यापैकी केवळ २ मते बाद झाली. दुपारी १२ वाजण्याच्या आत संपूर्ण निकाल जाहीर करण्यात निवडणूक यंत्रणा यशस्वी झाली.

सकाळी बरोबर आठ वाजता तासगाव तहसील कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात मतमोजणीला सुरूवात झाली. १७ व्या फेरीत पाटील यांच्या मताधिक्याने लाखावर झेप घेतली व अंतिमता सुमन पाटील या १ लाख १२ हजार ९६३ मतांनी विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम यांनी जाहीर केले व मतमोजणी केंद्रात असणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. या जल्लोषी वातावरणातच सुमन पाटील या मतमोजणी केंद्रात आल्या. त्यांना हेमंत निकम यांनी विजयाचे प्रमाण पत्र दिले. या वेळी सुमन पाटील यांच्यासह तिथे असणाऱ्या आबांच्या कुटुंबीयांनी अश्रू अनावर झाले. या वेळी 'अमर रहे, अमर रहे, आर. आर. आबा अमर रहे...'च्या घोषणांनी मतमोजणी केंद्र दणाणून सोडले.

सुमन पाटील यांच्या दृष्टीने ही निवडणूक अक्षरश: एकतर्फी झाली. तासगाव शहरात त्यांना १३१४२ तर स्वप्नील पाटील यांना १००६ मते मिळाली. म्हणजे तासगाव शहरातच त्यांना १२१३६ मतांची आघाडी मिळाली. थोड्या फार फरकाने हीच अवस्था संपूर्ण मतदार संघात होती. खासदार संजय पाटील यांच्या चिंचणी गावात सुमन पाटलांना १८०५ मते, तर स्वप्नील पाटील यांना ५७८ मते, आबांच्या अंजनीत २०६५ मते सुमन पाटलांना तर स्वप्नीलला ३० मते मिळाली.





पाठिंबा देणारे सर्व पक्ष, कार्यकर्ते आणि मतदारांचे आभार. आबांच्या पश्चात जनतेने दाखवलेला विश्वास कामांच्या माध्यमातून सार्थ करून दाखवू. - सुमन पाटील, विजयी उमेदवार



निकालातील ठळ‍क बाबी

एकूण वैध मतदान १ लाख ५५ हजार १८४.

सुमन पाटील यांना मिळालेली मते १ लाख ३१ हजार २३६.

सुमन पाटील यांचे मताधिक्य १ लाख १२ हजार ९६३.

निकटचे प्रतिस्पर्धी स्वप्नील पाटील यांना १८ हजार २७३ मते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा’

$
0
0

कोल्हापूर ः डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येच्या तपासाच्यावेळी असणारे विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस होते. सध्या ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. विरोधी पक्षनेते असताना त्यांनी दाभोळकर हत्येप्रश्नी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला होता. आता पानसरे यांची हत्या होऊन दोन महिने उलटले असले तरी तपास लागला नसल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या कन्या स्मिता पानसरे-सातपुते यांनी केली.

त्या म्हणाल्या, 'पानसरे हत्येचा तपास पोलिस सर्वांगाने करत असल्याचे सांगत आहेत. वैयक्तिक, जमीन जुमला, टोल, कामगार संघटना व अन्य कारणांचा तपास पोलिसांकडून जवळ जवळ संपला आहे. पोलिसांकडून हिंदुत्वावाद्यांच्या दृष्टीने तपास झालेला नाही. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता ते कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रितेश कुमार यांची १४ महिन्यात बदली झाली आहे. तपासाबाबत पानसरे कुटुंबीय समाधानी नाहीत.'



रितेश कुमार यांच्या बदलीचा निषेध

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रितेश कुमार यांच्या बदलीबद्दल भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात निषेध करण्यात आला. ज्येष्ठ नेते कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या हत्येच्या तपासाची सूत्रे रितेशकुमार यांच्याकडे होती. त्यांच्या बदलीमुळे तपासात पुन्हा रखडला जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली. यासंदर्भात पक्षाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना भेटून बदलीबाबत निवेदन देण्यात येणार आहे. बैठकीला कॉ. बी. एल. बरगे, चंद्रकांत यादव, नामदेव कांबळे, सतीशचंद्र कांबळे, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images