Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘कोल्हापूर कर्जात बुडेल’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरला टोलमुक्त करण्यासाठी राज्य सरकार महापालिकेला ३५० कोटी रुपयांचे कर्ज देणार आहे. महापालिकेकडून ही रक्कम आयआरबी कंपनीला देऊन टोल भागविण्याचा विचार सरकार करत आहे. महापालिकेकडून या रक्कमेची परतफेड केली जाणार आहे. वास्तविक कोल्हापूर महापालिकेचा वार्षिक ताळेबंद पाहता टोल घालविण्यासाठी कर्जाचा बोजा टाकल्या शहर कर्जात बुडणार आहे. त्या कर्जाचा भुर्दंड या-ना त्या कारणाने शहरवासियांवर पडणार आहे. मुळात प्रकल्पाची किंमत १६५ कोटी रुपये असताना कंपनीने ६०० कोटी रुपयांची मागणी करणे अवास्तव असल्याची टीका आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली आहे.

क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, 'रस्ते विकास प्रकल्प सुरुवातीला १६५ कोटीचा असताना काही महिन्यांत त्यामध्ये वाढ करून २२० कोटीं रुपयांचा करण्यात आला. अद्याप प्रकल्पातील निम्म्यापेक्षा जास्त कामे शिल्लक आहेत. पूर्ण केलेल्या कामांचा दर्जाही निकृष्ट आहे. मात्र, आयआरबी कंपनी मनमानी कारभारी करत जबरदस्तीने टोलवसुली करत आहे. राज्यात सत्तांतर झाल्याने जनतेच्या तीव्र भावना लक्षात घेऊन युती सरकारने टोल कायमचा हद्दपार करण्याचे ठरविले आहे. त्यादृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आयआरबी कंपनी प्रकल्पासाटी ६०० कोटी रुपयांची अवास्तव मागणी करत आहे. सरकारने रस्ते प्रकल्पाच्या फेरमूल्यांकनासाठी समितीची स्थापना केली आहे. महापालिकेला कर्ज देऊन प्रकल्पाची किंमत किंमत भागविण्यात येणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. मात्र महापालिका कोणत्याही परिस्थितीत आयआरबीला पैसे देण्यास असमर्थ असल्याने सरकारने या निर्णयाचा विचार करावा. टोलचा भुर्दंड शहरवासियांवर पडणार नाही पध्दतीने प्रश्न मार्गी लावावा.

प्रथम रस्ते प्रकल्पाचे पारदर्शी मूल्यांकन करावे. आजपर्यंत वसूल केलेली टोलची रक्कम, महापालिकेने कंपनीस दिलेल्या भूखंडाची रक्कम ठरवावी. यातून उर्वरित रक्कम सरकारने पेट्रोल, डिझेलवर सेस बसवून भागवावी. आधीच कर्जबाजारी असलेल्या महापालिकेवर कर्जाचा बोजा टाकू नये.

-राजेश क्षीरसागर, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शोरूमची काच फोडून तो पोलिसांकडे धावला

$
0
0

म. टा. पतिनिधी, कोल्हापूर

वाहतूक शाखेचे कर्मचारी क्रेनमधून मोटारसायकल उचलून नेत असताना त्यांना थांबवण्यासाठी तो गडबडीने शोरूमबाहेर धावला. मात्र धावताना तो चक्क शोरूमची काच फोडून बाहेर पडल्याची घटना बागल चौक परिसरात घडली. या प्रकारात प्रथमेष बजरंग फडतरे (वय १६, देवणे गल्ली, मंगळवार पेठ) हा मुलगा जखमी झाला. सोमवारी दुपारी अडीच वाजता घटना झाली.

प्रथमेष फडतरे आणि त्याचा मित्र बागल चौकातील एका शोरूममध्ये मोटारसायकल पाहण्यासाठी गेले होते. फडतरे यांच्या मित्राने शोरूमच्या बाहेर मोटारसायकल पार्क केली होती. फडतरे यांचा मित्र कोटेशन घेत होता. यावेळी फडतरे शो-रुमच्या वेटिंग रुममध्ये बसला होता. यावेळी चुकीच्या ठिकाणी पार्किंग केलेल्या मोटारसायकल नेण्यासाठी वाहतूक शाखेची क्रेन तेथे आली. पोलिस आपली मोटारसायकल उचलून नेत आहेत हे फडतरेच्या लक्षात आल्यावर त्यांना थांबविण्यासाठी तो शोरूममधून बाहेर पळत सुटला. यावेळी शोरूमच्या दरवाजाला असलेली काच त्याच्या लक्षात आली नाही. शोरुमची काच फोडूनच तो बाहेर रस्त्यावर कोसळला. त्याच्यावर सीपीआरमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले. नंतर खासगी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून सरकारच्या प्रतिमेचे दहन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे प्रलंबित मानधन त्वरीत द्या या मागणीसह अन्य मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाने सोमवारी बिंदू चौकात सरकारच्या प्रतिमेचे दहन केले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सरकारवरील संताप व्यक्त केला.

लक्ष्मीपुरीतून बिंदू चौकापर्यंत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी सरकारची प्र‌तिमा घेऊन घोषणाबाजी करत मोर्चा काढला. बिंदू चौकात महिलांनी सरकारच्या प्रतिमेचे दहन करत निषेध व्यक्त केला. त्वरीत मानधन मिळालेच पाहिजे, सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. याशिवाय अन्य मागण्याही यावेळी करण्यात आल्या.

त्यामध्ये एक वर्षांपासून अनियमित मानधन मिळते, राज्य सरकारकडून मिळणारे सेविकांना दोन हजार व मदतनीसांना मिळणारे एक हजार रुपये मानधन ऑगस्ट २०१४ पासून मिळालेले नाही. ते त्वरीत मिळावे, २०१४ ची भाऊबीज मिळावी, लाभार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या आहाराची बिले एक वर्षापासून प्रलंबित आहेत.

या प्रश्नांबाबत पंधरा दिवसांपूर्वी आझाद मैदानावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्याचे अश्वासन देण्यात आले होते. दरम्यान जिल्हा परिषदेवरला टाळे ठोको आंदोलन करून महिलांचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ३१ मार्चपर्यंत थकीत बिले मंजूर होतील असे अश्वासन दिले होते. मात्र सरकारने या प्रश्नांकडे लक्ष न दिल्याने कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाने सरकारचा निषेध केला. आंदोलनाचे नेतृत्व कॉ. सुवर्णा तळेकर, अतुल दिघे यांनी केले. आगामी काळात आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोप खण लँडफिल साइटच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेने शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया केल्यानंतर इनर्ट मटेरियल टाकण्यासाठी टोपमधील खण लँडफिल साइट म्हणून वापरण्यास कोणतीही अडचण नसल्याचा निर्वाळा राष्ट्रीय हरित लवादने दिला आहे. टोप खणीला भूमिभरण केंद्र म्हणून वापरण्यास सशर्त परवानगी दिली आहे. त्याळे महापालिकेला दिलासा मिळाला असून भूमिभरण क्षेत्रासाठी अनुषांगिक कामे करण्यासाठी कोणतीही आडकाठी नसल्याचेही राष्ट्रीय हरित लवादाच्या पुणे येथील न्या. व्ही. आर. किंगावकर आणि तज्ज्ञ सदस्य अजय देशपांडे यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे. महापालिकेचे वकील धैर्यशील सुतार यांनी ही माहिती दिली.

खंडपीठाने, सध्या कसबा बावडा येथील साचलेल्या घनकचऱ्याची विल्हेवाट कसा लावणार याचा अहवाल २० मेपर्यंत महापालिकेने सादर करावा असा आदेश दिला आहे. टोप ग्रामपंचायतीने दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. अहवालानंतर आवश्यकता वाटल्यास याचिकेवर सुनावणी घेतली जाईल असेही स्पष्ट केले. महापालिकेने प्रदूषण मंडळाकडे अर्ज करून, सध्याचा कसबा बावडा येथील डम्पिंग ग्राउंडवरील घनकचरा तात्पुरता ६ महिन्यांसाठी इतरत्र हलवण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाची मान्यता मिळवणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. कसबा बावड्यातील जागा रिकामी करून रोकेम कंपनीला कचऱ्यावर प्रक्रियेसाठी देण्याचे आदेश दिले. यासंदर्भातील सुनावणी ९ ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली. आजच्या सुनावणीस उपायुक्त अश्विनी वाघमळे हजर होत्या.

दरम्यान, कोल्हापूर शहरात सध्या दररोज १७० टन घनकचरा निर्माण होतो. त्यावर कोणतीही प्रक्रिया होत नसल्याने तो तसाच कसबा बावडा येथे टाकला जात आहे. त्यामुळे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. कसबा बावड्यात कचऱ्यावर प्रक्रिया केल्यानंर इनर्ट मटेरियल टोप खणीत टाकण्यात येणार आहे. याकरिता टोपची खण अत्यंत गरजेची होती. याकरिता टोप खण येथे लँडफिल साइट विकसित केली जाईल. त्याचा डीपीआर तयार केला जाईल. टोपची खण पुढील २५ वर्षांसाठी पुरणार आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरातील कचऱ्याची समस्या सुटण्यास मोठा दिलासा मिळाला आहे अशी प्रतिक्रिया उपायुक्त अश्विनी वाघमळे यांनी दिली. दरम्यान १५ मेपासून टाकाळा येथे कसबा बावडा येथील इनर्ट मटेरीअल हलविले जाणार आहे. मात्र, चार महिन्यांत ते भरल्यावर पुन्हा महापालिकेकडे भूमिभरण क्षेत्र नाही. टोप खणीची जागा मिळाल्यामुळे कचरा टाकण्याचा प्रश्न सुटणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मचाऱ्यांना बुधवारपासून पगार

$
0
0

म. टा.प्रतिनिधी, कोल्हापूर

कामाचा मोबदला मिळाला पाहिजे, पगार आमच्या हक्काचा अशा घोषणा देत केएमटीच्या कर्मचाऱ्यांनी महापालिकेचा परिसर दणाणून सोडला. सकाळी ११ ते दुपारी एक अशा तब्बल दोन तास महापौरांच्या कार्यालयासमोर ठिय्या मारत कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या प्रश्नाची सोडवणूक झाल्याशिवाय हलणार नाही असा इशारा दिला. महापौर तृप्ती माळवी यांच्या केबिनमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. त्यात तोडगा काढण्यात आला. त्यानुसार फेब्रुवारी महिन्याचा पगार बुधवारपासून (ता. १५) देण्यात येणार आहे.

याशिवाय एक दिवसाआड सात लाख रुपये पगारासाठी देण्याची ग्वाही प्रशासनाने दिली. २७ एप्रिलपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांचा पगार देण्याचे ठरले. मार्च महिन्याचा पगार दहा मेपर्यंत देण्याचे ठरले असून यासाठी महापालिका केएमटीला ५० लाख रुपयांचे अनुदान देणार आहे. या बैठकीत कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. महापौरांनाही कर्मचाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. तीन महिन्यांच्या थकीत पगारासाठी कर्मचारी गेले पाच दिवस महापालिकेत हेलपाटे मारत आहेत. महापौर माळवी यांनी या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी सोमवारी बैठक बोलावली. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त विजयकुमार खोराटे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले, कर्मचारी प्रतिनिधी म्हणून रवींद्र इंगवले, मारुती पाटील, निलेश डोईफोडे, राजेंद्र निगवेकर, आनंदा आडके यांची बैठक झाली.

बैठकीत केएमटी कर्मचऱ्यांच्या पगारावरून कर्मचारी पोटतिडकीने म्हणणे मांडले. नगरसेवक संभाजी जाधव, भूपाल शेटे, माधुरी नकाते यांनी कर्मचाऱ्यांच्या पगाराप्रश्नी प्रशासनाचे लक्ष वेधले. दरम्यान, पदाधिकारी, अधिकारी आणि प्रतिनिधींची महापौरांच्या केबिनमध्ये चर्चा सुरू असताना कर्मचारी मोठ्या संख्येने महापौर कार्यालयासमोर जमले. त्यांनी, ' पगार आमच्या हक्काचे, कामाचा मोबदला मिळाला पाहिजे' अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. पगाराचा निर्णय होईपर्यंत येथून हलणार नाही असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला. कर्मचारी प्रतिनिधींनी बैठकीतील वृत्तांत कर्मचाऱ्यांना सांगितला. त्यानंर सगळे कर्मचारी शाहू क्लॉथ मार्केटसमोरील केएमटी ऑफीससमोर जमले. त्यांनी प्रशासनाच्या गलथान कारभाराच्या विरोधात पुन्हा घोषणेबाजी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ईव्हीएम मशिनऐवजी मतपत्रिका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) पंचवार्षिक निवडणुकीचे मतदान सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये घेण्यात येणार आहे. दरम्यान, प्रचार सुरू झाल्यापासून मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आचारसंहितेचे उल्लघंन झाल्यास कडक कारवाई करू असे उमेदवारांना सांगण्यात आले आहे, अशी माहिती निवडणूक अधिकारी अशोक पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. निवडणूक जाहीर झाली असताना गोकुळच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषद घेतल्याप्रकरणी व्यवस्थापकीय संचालक डी. व्ही. घाणेकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचेही पाटील यांनी सांगितले.

पाटील म्हणाले, 'निवडणूक प्रक्रिया आणि सुलभ होण्यासाठी एव्हीएम मशीन्स वापरण्याची परवानगी सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे मागितली होती. प्राधिकरणाने एव्हीएम मशीन्स वापरण्यास परवानगीही दिली. मात्र सध्या मशीन्स उपलब्ध नसल्याने पूर्वीप्रमाणेच बॅलेट पत्रिकेवर मतदान घेतले जाणार आहे. मशीन्सद्वारे मतदान घेतले असते, तर त्याच दिवशी मतमोजणी करण्याचा विचार होता. मात्र मतपत्रिकेवर मतदान घेतले जात असल्याने नियोजित वेळेनुसारच मतमोजणी प्रक्रिया राबवली जाणार आहे.'

पाटील म्हणाले, 'शहरातील वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पार्किंगची चांगली सुविधा असलेल्या सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये मतदान होईल. प्रत्येकी दहा खोल्यांमध्ये सरासरी ३०० ठरावधारक मतदानाचा हक्क बजावतील. मतपत्रिका छपाईचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी सोमवारी सर्व उमेदवारांची बैठक घेतली आहे. अचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. निवडणूक प्रचारात संघाचे कर्मचारी, वाहने, कार्यालये व इतर सभा समारंभ आणि मतदानावर परिणाम करतील अशा घोषणा करण्यास प्रतिबंध घातला आहे. प्रचार दरम्यान सर्व उमेदवारांना दररोजचा खर्च तपशीलवार निवडणूक कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. निवडणुकीसाठी दूध संघाचा वापर होत असल्यास संबंधीतांना नावासह तक्रार दाखल करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. मतदानासाठी येतांना ठरावधारक मतदारांनी सरकारने घालून दिलेल्या १९ ओळखीच्या पुराव्यासह मतदानामध्ये भाग घ्यावा, ओळखीचा पुरावा नसल्यास मतदान प्रक्रियेत सहभागी करुन घेणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान सतेज पाटील यांनी आरोप केल्यानंतर गोकुळचे व्यवस्थापकीय संचालक डी. व्ही. घाणेकर यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटीस बजावल्याने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी कुलगुरू, प्राचार्य रा. कृ. कणबरकर यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य रा. कृ. कणबरकर (वय ९५) यांचे सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. भोगावती येथे खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच रात्री नऊच्या सुमारास प्राणज्योत मालवली. कोल्हापुरात आज, मंगळवारी सकाळी दहा वाजता त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात मुलगा डॉ. अरुण, अंजली साबळे, नमिता खोत, मेघा वागळे या तीन मुली आहेत.

कणबरकर काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच नाळे कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी गर्दी केली. प्राचार्य कणबरकर अनेक वर्षे राजर्षी शाहू स्मारक भवन ट्रस्टचे विश्वस्त होते. त्यांनी भाई माधवराव बागल विद्यापीठाच्या माध्यमातून राजर्षी शाहूंच्या कार्यावर इंग्रजीत ग्रंथलेखन केले होते. राजर्षी शाहूंचा पुरोगामी विचार आणि त्यांच्या कार्याच्या प्रसाराबद्दल सन २०११ मध्ये राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टने त्यांना शाहू पुरस्काराने गौरविले होते. भाई माधवराव बागल विद्यापीठाचे संस्थापक सदस्य आणि उपाध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. त्यांची विविध विषयांवरील पुस्तके प्रकाशित झाली होती. त्यातील 'महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न : महाराष्ट्राची न्याय्य बाजू,' 'भाई माधवराव बागल (संक्षिप्त चरित्र)', 'अ ग्रामर ऑफ इंग्लिश' ही काही महत्त्वाची पुस्तके होत. २००३ मध्ये कोल्हापूर महापालिकेचा कोल्हापूर भूषण पुरस्कार, कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार, संत गाडगे महाराज पुरस्कार आणि शैक्षणिक कार्यासाठी दक्षिण भारत जैन सभेच्या कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्काराबरोबरच राज्य सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कारही त्यांना मिळाला होता.

शिवाजी विद्यापीठाचा १९७४ चा नवीन कायदा करण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता. विद्यापीठाच्या कार्यकारिणीचे ते दहा वर्षे सभासद होते. रयत शिक्षण संस्था, विवेकानंद, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस आदी संस्थांवर ते पदाधिकारी म्हणून कार्यरत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंबेडकरांची तीन नवी पत्रे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजर्षी शाहू महाराज यांना लिहिलेली तीन महत्वाची पत्रे सोमवारी प्रकाशित केली. या पत्रातून डॉ. आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्यातील स्नेह तसेच त्याकाळातील काही घटनांवर नव्याने प्रकाश पडत आहे. शाहू महाराजांचे दिवाण सर रघुनाथराव सबनीस यांच्या खासगी दफ्तरात ही पत्रे सापडली आहेत. तिन्ही पत्रे १९२० आणि १९२१ या वर्षांतील आहेत. प्रबोधिनीच्या विश्वस्त, इतिहास संशोधक डॉ. मंजुश्री पवार, ज्येष्ठ संशोधक प्रा. डॉ. टी. एस. पाटील आणि सबनीस यांच्या वंशज अॅड. सुमेधा सबनीस यांनी पत्रकार परिषदेत या पत्रांविषयी माहिती दिली.

यापैकी एक पत्र डॉ. आंबेडकर यांनी मुंबई येथील 'मूकनायक' कार्यालयातून मराठीत लिहिले आहे. त्यावर तारीख नाही. यात आंबेडकर यांनी नागपूर येथे ३० मे १९२० ला झालेल्या अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषदेला शाहू महाराज उपस्थित राहणार असल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. शाहू महाराजांच्या कन्या आक्कासाहेब महाराज आजारी असल्याने शाहू महाराज या परिषदेला उपस्थित राहणार की नाही याबद्दल शंका होती. डॉ. आंबेडकर यांची शाहू महाराजांना परिषदेला उपस्थित राहण्यासाठी विनंती करणारे पत्र उपलब्ध आहे, त्यानंतरचे हे पत्र आहे. या पत्रात डॉ. आंबेडकर यांनी शाहू महाराजांना त्यांचे भाषण छापण्याच्या पूर्वी पाहण्यास मिळावे, अशी विनंती केली आहे. तसेच नागपूर येथील मंडळीकडून आलेल्या अर्जाची चौकशी करणे कठीण आहे असे म्हटले आहे, पण हा प्रकार नेमका लक्षात येत नसल्याचे पवार यांनी सांगितले.

६ ऑक्टोबर १९२१ च्या पत्रात डॉ. आंबेडकरांनी शाहू महाराजांचा उल्लेख निष्काम, दिनदयाळू, सत्पुरूष असा केला आहे. शाहू महाराजांकडे दोनशे पौडची मागणी केली आहे. 'माझी अगदी गाळण झाली आहे आणि आपल्याकडून पैशाची वाट पहात आहे, तरी निराशा न करणे,' असे या पत्रात त्यांनी म्हटले आहे. तसेच कोल्हापूर संस्थानचे स्टेट रेकॉर्ड चोरीला गेल्याची माहिती आंबेडकरांना लंडनमध्ये मिळाल्याचे यात स्पष्ट होते. तिसरे पत्र इंग्रजीत असून, ते २० ऑक्टोबर १९२१ चे आहे. त्यात आंबेडकरांनी १०७ पौंडची मदत गेल्याच आठवड्यात मिळाल्याचा उल्लेख केला आहे.

पवार म्हणाल्या, 'आंबेडकरांचे शाहू महाराजांकडे आर्थिक मदतीची मागणी ४ सप्टेंबर १९२१ चे पत्र उपलब्ध आहे. त्याकाळात कोल्हापूर ते पत्र लंडनला पोहोचण्यासाठी किंवा पैसा पाठवण्यासाठी २० दिवस लागायचे. २० ऑक्टोबरला आंबेडकर 'मागील आठवड्यात' पैसे मिळाल्याचे सांगतात. यावरून शाहू महाराजांनी तातडीने मदत दिल्याचे दिसते. शाहू महाराजांना १०७ पौड रक्कम पौंडमध्ये बदलून मिळाली असण्याची शक्यता आहे.'

या पत्रात व्हॅलेंटाइन चिरोल यांनी स्टेट रेकॉर्डसंदर्भात सहानुभूती व्यक्त केल्याचे म्हटले आहे. 'शाहू महाराजांचा काही गुप्त पत्रव्यवहार ब्राह्मणी वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाला होता. त्याचा शाहू महाराजांना मोठा धक्का बसला होता. या संदर्भातील हे उल्लेख आहेत. त्याकाळात गाजलेल्या टिळक-चिरोल खटल्यात या रेकॉर्डचा उपयोग झाला होता.' प्रा. पाटील यांनी सबनीस यांच्या खासगी दफ्तरावर अभ्यास सुरु असून वर्षभरात त्यावर स्वतंत्र ग्रंथ प्रसिद्ध करण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आंबेडकरी डिक्शनरी’चा प्रोजेक्ट पूर्ण

$
0
0

सचिन यादव, कोल्हापूर

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोल्हापूरला दिलेल्या भेटी, तत्कालीन कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, माणगाव परिषदेसह कोल्हापूरशी संबंधित दुर्मिळ गोष्टीचा संग्रह अंतिम टप्प्यात आहे. डॉ. आंबेडकरांच्या साहित्यातील साडेआठ हजार इंग्रजी शब्दांच्या 'आंबेडकरी डिक्शनरी'चा प्रोजेक्ट पूर्ण झाला आहे. येत्या काही दिवसांत आंबेडकर संशोधन सेंटरच्या संकेतस्थळाची निर्मिती होणार असून, बाबासाहेबांची दुर्मिळ कागदपत्रे आणि कार्य सातासमुद्रापार पोहोचणार आहे. या निमित्ताने शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राने संशोधनाचा पुढचा टप्पा गाठला आहे.

या केंद्रात डॉ. आंबेडकरांच्या दुर्मिळ पाचशे फोटोचा खजिना संग्रहित केला आहे. बाबासाहेबांनी सुरू केलेले पाक्षिक मूकनायक, जनता आणि प्रबुद्ध भारतमधील अग्रलेखांचा मूळ दस्तावेज संशोधक विद्यार्थ्यांना पर्वणी ठरत आहेत. सेंटरकडे चाळीस मूळ दस्तावेज आहेत. डॉ. आंबेडकरांच्या सानिध्यात आलेले लोक आणि त्यांच्याशी झालेला पत्रव्यवहाराचे संकलन आहे. या वर्षी सेंटरने आंबेडकरांचे कोल्हापूरशी संबंध, त्यांच्यासोबत काम केलेले कार्यकर्ते, त्यांच्याविषयीच्या आठवणी, माणगाव परिषद आणि दुर्मिळ फोटोंच्या संग्रहाचे काम हाती घेतले. डॉ. आंबेडकरांनी साहित्यात अनेक इंग्रजी शब्द वापरले. संशोधनपर लेखन, संसदीय वादविवाद, मुंबई केंद्रीय मंडळात मांडलेले प्रश्न वीस खंडात संग्रहित आहे. सेंटरने त्यांच्या लिखित आणि भाषणांत वापरलेले साडेआठ हजार इंग्रजी शब्दांचा संग्रह केला आहे. मूळ इंग्रजीतील असलेल्या काही शब्दांचा भावानुवाद केला आहे. त्यामुळे साहित्यकृती समजायला मदत होणार आहे.

सेंटरने डॉ. आंबेडकरांच्या दुर्मिळ पाचशे फोटोंची सीडी तयार केली आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि कोल्हापुरातील समन्वयक दत्तोबा पवार आणि डॉ. आंबेडकर यांच्यात झालेल्या पत्रव्यवहारातील ६० पत्रेही आहेत. तत्त्वज्ञानाचे अभ्यासक डॉ. ज. रा. दाभोळे आणि प्राचार्य दिनकर खाबडे यांच्याकडून 'आंबेडकरी चळवळीला बहुजन समाजाचे योगदान,' या विषयावर इंग्रजीतील ग्रंथाची निर्मिती केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील संशोधनासाठीचे विविध पैलू संशोधकांना खुले आहेत. सेंटरच्या माध्यमातून त्यांचे कार्य आणि दुर्मिळ कागदपत्रे नवसंशोधकांसमोर आणली आहेत. काही मंडळी आंबेडकरांचा चुकीचा इतिहास माथी मारण्याचे काम करीत आहेत. या पार्श्वभूमीवर सेंटरचे काम महत्त्वाचे ठरत आहे.

- डॉ. कृष्णा किरवले, संचालक, आंबेडकर संशोधन व विकास केंद्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किरणांना प्रदूषणाचा अडथळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हवेतील प्रदूषणामुळे सूर्यकिरणांचे वक्रीभवन होत आहे. यामुळे भौतिक अडथळे दूर केले, तरी वर्षातून दोन्हीवेळेला झालेल्या किरणोत्सवातील किरणे अंबाबाई मूर्तीच्या मुखापर्यंत पोहोचू शकलेली नाहीत. भौतिक अडथळ्यांसोबतच हवेतील प्रदूषण किरणोत्सवातील प्रमुख अडथळा ठरत असताना काही जण जाणीपूर्वक अंधश्रद्धा पसरवत आहेत. हवेतील प्रदूषण कमी केल्यास किरणोत्सव विना अढथळा पार पडेल, अशी माहिती खगोलशास्त्रज्ञ आर. व्ही. भोसले यांनी पत्रकार बैठकीत दिली.

भोसले म्हणाले, अंबाबाई मंदिरामध्ये २३ ते २५ नोव्हेंबर व ३१ जानेवारी, १ व २ फेब्रुवारी किरणोत्सव होतो. मात्र गेल्या चार पाच वर्षापासून सूर्यकिरणे मूर्तीच्या मुख्यापर्यंत न पोहोचता केवळ कंबरेपर्यंतच पोहोचत आहेत. यामुळे समाजात गैरसमज पसरवले जात आहेत. यापाठीमागील शास्त्रीय दृष्ट‌िकोणाचा अभ्यास करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरु डॉ. एम. जी. ताकवले व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने समिती स्थापन केली होती. समितीच्यावतीने मूर्तीपासून पश्चिम क्षितीजाच्या दिशेने सूर्यप्रकाशाच्या मार्गातील अढथळांचा अभ्यास केला. काही अढथळे दूर केल्यानंतर मूर्तीपासून सूर्यबिंब दिसू लागेल. भौतिक अढथळे आणखी दूर केल्यास सूर्यबिंब अधिक स्पष्ट दिसेल.

नोव्हेंबर २०१४ व जानेवारी, फेब्रुवारी २०१५ मध्ये किरणोत्सवकाळात सूर्यकिरणे फक्त मूर्तीच्या कंबरेपर्यंत पोहोचली होती. याचा भौतिकशास्त्रातील वैज्ञानिक संकल्पना आणि सिद्धांतावर अभ्यास करण्यात आला. प्रकाश किरण सरळ रेषेत प्रवास करतात, मात्र अशी किरणे एखाद्या माध्यमातून प्रवास करतात तेंव्हा त्यांची गती, तरंगलांबी यास अनुसरुन त्याचे अपवर्तन होते. त्यामध्ये विचलन कोन तयार होतो आणि किरणे वक्रीकृत होतात. यानुसारच किरणोत्सवादिवशी मंदिरात सूर्यास्तादरम्यान क्षितीजावरुन येणारी सूर्यकिरणे क्षितीजापासून प्रदूषित हवा, धूर, धूळ, वाफ या माध्यमातून प्रवेश करतात. हे माध्यम प्रिझमसदृश्य काम करत असल्याने किरणे विचलित होऊन वक्रीकृत होण्याचा संभव आहे. ही क्रिया केवळ तीन ते चार मिनिटात पूर्ण होत असल्याने किरणोत्सवावर त्याचा परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.

भविष्यात किरणोत्सव पाहण्यासाठी फायबर ऑप्टिकलचा उपयोग करुन पूर्ण किरणोत्सव शक्य असल्याचे मत डॉ. एस. बी. पवार यांनी व्यक्त केले. पत्रकार बैठकीस मित्रा संस्थेचे उदय गायकवाड, प्रकाश देसाई, अनिल चौगुले उपस्थित होते.

शहराभोवतीचे प्रदूषणही कारणीभूत

शहरातील वायू प्रदूषणात झालेली वाढ, रंकाळा तलाव व पश्चिमेकडील नदी, शेती यादरम्यान होणारी वाफ, धुके, धूर, गुऱ्हाळघरे, फड जाळणे अशा कृती किरणोत्सव काळात जास्त होत असल्याने व त्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने किरणोत्सव होत नसल्याचे उदय गायकवाड यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमएच-०९’ टोलमुक्त

$
0
0

गुरुबाळ माळी, कोल्हापूर

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या कोल्हापूर महापालिकेला टोलमुक्तीसाठी आणखी कर्जाच्या खाईत न लोटता कोल्हापूर पासिंगच्या वाहनांच्या (एमएच०९) टोलचा बोजा राज्य सरकार उचलणार आहे. यामुळे आता टोलचा झोल संपण्याची चिन्हे आहेत. वाहनांचा सर्व्हे करून सरासरीवर रक्कम द्यायची की प्रत्येक वाहनाचा टोल महिन्याला द्यायचा याबाबत पंधरा दिवसांत निर्णय होणार आहे.

राज्यातील अनेक टोलचा प्रश्न राज्य सरकारने निकालात काढला. पण पाच वर्षे लढा देत असलेल्या कोल्हापूरकरांच्या तोंडाला पाने पुसली. यामुळे संतप्त भावना व्यक्त होत असताना सरकारने महापालिकेला टोलची रक्कम कर्जाऊ देण्याची भूमिका घेतली. मात्र मुळातच कर्जाच्या बोजाखाली असलेल्या महापालिकेला आणखी कर्ज परवडणारे नसल्याने विरोध सुरु आहे. महापालिकेवर सध्या तीनशे कोटीपेक्षा जास्त कर्ज आहे. या कर्जाच्या व्याजापोटी वर्षाला ३५ कोटी व्याज भरावे लागणार आहे. थेट पाइपलाइनचा खर्च वाढल्याने कर्जाचा हा आकडा आणखी वाढणार आहे. यामुळे टोलमुक्त कोल्हापूरसाठी कर्ज नको निधी द्या, अशी भूमिका कोल्हापूरकरांनी घेतली आहे. यामुळे आता सरकार निधी द्यायच्या तयारीत आहे.

कोल्हापूर टोलमुक्त करण्यासाठी टोलची संपूर्ण रक्कम आता राज्य सरकार देणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. मंत्र्यांच्या पातळीवर याला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. काही दिवसांतच तशी अधिकृत घोषणा करण्यात येईल. संपूर्ण टोलमुक्त न करता फक्त कोल्हापूर पासिंग वाहनांना टोलमुक्ती मिळणार आहे. आयआरबीने केलेल्या रस्त्यांच्या कामाचे फेरमूल्यांकन होणार आहे. त्याचा अहवाल येताच याबाबत तातडीने निर्णय घेण्यात येईल.

सर्वेक्षणातील नोंदीनुसार रक्कम

टोलची रक्कम कशी द्यायची याबाबत सध्या ​सरकार विचार करत आहे. प्रत्येक नाक्यावर सीसीटीव्ही असून त्या रेकॉर्डनुसार कोल्हापूर पासिंग वाहनांच्या नोंदी ठेवून त्याचा टोल सरकार भरेल असा पहिला प्रस्ताव आहे. दुसऱ्या पर्यायानुसार पंधरा दिवस वाहनांचा सर्व्हे करण्यात येईल. त्यानुसार सरासरी काढून ती रक्कम सरकार देईल. इतर वाहनांना मात्र टोल भरावा लागणार आहे. याची वसुली आयआरबीने करायची की महापालिकेने याबाबतही तातडीने निर्णय घेण्यात येणार आहे. ३१ मे पासून कोल्हापूरकरांची टोलमुक्ती होणार आहे.

टोलचा बोजा जनतेवर पडू नये अशीच राज्य सरकारची भूमिका आहे. महापालिकेला कर्ज देण्याच्या भूमिकेला विरोध असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे राज्य सरकार अधिकाधिक रक्कम महापालिकेला देईल. ही रक्कम कशा पद्धतीने देता येईल याबाबत सरकार विचार करत आहे.

- चंद्रकांत पाटील, पालकमंत्री

महापालिकेवरील सध्याचे कर्ज

थेट पाइपलाइन ११० कोटी

शिंगणापूर पाणी योजना १०० कोटी

एसटीपीसाठी प्रस्तावित कर्ज १० कोटी

नगरोत्थान योजना ९१ कोटी

महापालिकेचे उत्पन्न ३८९.४५ कोटी

महापालिकेचा खर्च ३८९ कोटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योगांचा नव्याने सर्व्हे

$
0
0

मोहसीन मुल्ला, कोल्हापूर

राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक वसाहतींव्यतिरिक्त अन्य ठिकाणी उभारल्या गेलेल्या औद्योगिक वसाहतींना सेवा-सुविधा पुरविण्याचे धोरण राज्य सरकारने निश्चित केले आहे. त्यानुसार राज्यातील अधिकृत औद्योगिक वसाहतींबाहेर उभ्या राहिलेल्या उद्योगांचा सर्व्हे करण्यात येत आहे. राज्यभर त्या-त्या ठिकाणच्या जिल्हा उद्योग केंद्रांच्यावतीने असा सर्व्हे सुरू आहे. या उद्योगांच्या पायाभूत सुविधांसाठी उद्योगांनी ५० टक्के तर सरकारने ५० टक्के रक्कम खर्च करण्याचे नियोजन आहे. त्यासंदर्भातील प्रस्तावही संबंधित औद्योगिक वसाहतींकडून मागविण्यात आले आहेत.

राज्यात एमआयडीसीच्या अखत्यारीत १६ विभागीय कार्यालये आहेत. सुमारे ८४ हजार हेक्टर जागेवर २८१ औद्योगिक वसाहती आहेत. मात्र या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी औद्योगिक वसाहती उभ्या राहिल्या आहेत. अनेक ठिकाणी पन्नास ते शंभर उद्योग एकाच परिसरात उभे राहिले आहेत. तेथे एक प्रकारे या स्वतंत्र औद्योगिक वसाहती उभ्या राहिल्या आहेत. या उद्योगांकडूनही मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो. मात्र अशा पद्धतीने उभ्या असलेल्या औद्योगिक वसाहतींना पायाभूत सुविधा मिळवताना फार मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते.

कोल्हापूरचे उदाहरण घ्यायचे झाले तर शहरात शिवाजी उद्यमनगर, वाय. पी. पोवारनगर, विक्रमनगर येथे मोठ्या संख्येने उद्योग उभे आहेत. मात्र, तेथे पायाभूत सुविधा नाहीत. या उद्योगांचे महाराष्ट्राच्या विकासातील योगदान लक्षात घेत राज्य सरकारने अशा पद्धतीने उभ्या राहिलेल्या औद्योगिक वसाहतींना सुविधा पुरवण्याचे धोरण स्वीकारले आहे.

सर्वसाधारणपणे एका औद्योगिक वसाहतीत पाच कोटी रुपयांपर्यंतच्या पायाभूत सुविधा दिल्या जातील. एमआयडीसीच्या माध्यमातून ही कामे केली जातील. यातील अडीच कोटी रुपयांचा खर्च एमआयडीसी करेल. उर्वरीत अडीच कोटी रुपये संबंधित औद्योगिक वसाहतीच्या संघटनेने खर्च करायचे आहेत. कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशनचे सचिव प्रदीप व्हरांबळे यांनी कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशनला हा प्रस्ताव मिळाल्याचे सांगितले.

यासंदर्भात जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक शैलेश राजपूत म्हणाले, 'राज्य सरकारचे अशा प्रकारचे धोरण आहे. या धोरणाला पूरक माहितीसाठी राज्यभर उद्योगांची माहिती जमविण्याची प्रक्रिया उद्योग आयुक्तालयाकाडून सुरू करण्यात आली आहे. कोल्हापुरातही अशा पद्धतीने माहिती घेतली जात आहे.'

औद्योगिक वसाहतींना पायाभूत सुविधा पुरवण्याची योजना निश्चितच चांगली आहे. सुरुवातीला यात २५ टक्के वाटा उद्योजकांचा आणि उर्वरीत राज्य सरकारचा असे नियोजन होते. मात्र आता उद्योजकांचा वाटा ५० टक्के करण्यात आला आहे. योजनेत सरकारने ७५ टक्के खर्च करावा अशी आमची मागणी आहे. मात्र ही योजना निश्चितच स्वागतार्ह आहे.

-संजय अंगडी, अध्यक्ष, कोल्हापूर इंजिनी‌अरिंग असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कोल्हापूर कर्जात बुडेल’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरला टोलमुक्त करण्यासाठी राज्य सरकार महापालिकेला ३५० कोटी रुपयांचे कर्ज देणार आहे. महापालिकेकडून ही रक्कम आयआरबी कंपनीला देऊन टोल भागविण्याचा विचार सरकार करत आहे. महापालिकेकडून या रक्कमेची परतफेड केली जाणार आहे. वास्तविक कोल्हापूर महापालिकेचा वार्षिक ताळेबंद पाहता टोल घालविण्यासाठी कर्जाचा बोजा टाकल्या शहर कर्जात बुडणार आहे. त्या कर्जाचा भुर्दंड या-ना त्या कारणाने शहरवासियांवर पडणार आहे. मुळात प्रकल्पाची किंमत १६५ कोटी रुपये असताना कंपनीने ६०० कोटी रुपयांची मागणी करणे अवास्तव असल्याची टीका आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली आहे.

क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, 'रस्ते विकास प्रकल्प सुरुवातीला १६५ कोटीचा असताना काही महिन्यांत त्यामध्ये वाढ करून २२० कोटीं रुपयांचा करण्यात आला. अद्याप प्रकल्पातील निम्म्यापेक्षा जास्त कामे शिल्लक आहेत. पूर्ण केलेल्या कामांचा दर्जाही निकृष्ट आहे. मात्र, आयआरबी कंपनी मनमानी कारभारी करत जबरदस्तीने टोलवसुली करत आहे. राज्यात सत्तांतर झाल्याने जनतेच्या तीव्र भावना लक्षात घेऊन युती सरकारने टोल कायमचा हद्दपार करण्याचे ठरविले आहे. त्यादृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आयआरबी कंपनी प्रकल्पासाटी ६०० कोटी रुपयांची अवास्तव मागणी करत आहे. सरकारने रस्ते प्रकल्पाच्या फेरमूल्यांकनासाठी समितीची स्थापना केली आहे. महापालिकेला कर्ज देऊन प्रकल्पाची किंमत किंमत भागविण्यात येणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. मात्र महापालिका कोणत्याही परिस्थितीत आयआरबीला पैसे देण्यास असमर्थ असल्याने सरकारने या निर्णयाचा विचार करावा. टोलचा भुर्दंड शहरवासियांवर पडणार नाही पध्दतीने प्रश्न मार्गी लावावा.

प्रथम रस्ते प्रकल्पाचे पारदर्शी मूल्यांकन करावे. आजपर्यंत वसूल केलेली टोलची रक्कम, महापालिकेने कंपनीस दिलेल्या भूखंडाची रक्कम ठरवावी. यातून उर्वरित रक्कम सरकारने पेट्रोल, डिझेलवर सेस बसवून भागवावी. आधीच कर्जबाजारी असलेल्या महापालिकेवर कर्जाचा बोजा टाकू नये.

-राजेश क्षीरसागर, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शोरूमची काच फोडून तो पोलिसांकडे धावला

$
0
0

म. टा. पतिनिधी, कोल्हापूर

वाहतूक शाखेचे कर्मचारी क्रेनमधून मोटारसायकल उचलून नेत असताना त्यांना थांबवण्यासाठी तो गडबडीने शोरूमबाहेर धावला. मात्र धावताना तो चक्क शोरूमची काच फोडून बाहेर पडल्याची घटना बागल चौक परिसरात घडली. या प्रकारात प्रथमेष बजरंग फडतरे (वय १६, देवणे गल्ली, मंगळवार पेठ) हा मुलगा जखमी झाला. सोमवारी दुपारी अडीच वाजता घटना झाली.

प्रथमेष फडतरे आणि त्याचा मित्र बागल चौकातील एका शोरूममध्ये मोटारसायकल पाहण्यासाठी गेले होते. फडतरे यांच्या मित्राने शोरूमच्या बाहेर मोटारसायकल पार्क केली होती. फडतरे यांचा मित्र कोटेशन घेत होता. यावेळी फडतरे शो-रुमच्या वेटिंग रुममध्ये बसला होता. यावेळी चुकीच्या ठिकाणी पार्किंग केलेल्या मोटारसायकल नेण्यासाठी वाहतूक शाखेची क्रेन तेथे आली. पोलिस आपली मोटारसायकल उचलून नेत आहेत हे फडतरेच्या लक्षात आल्यावर त्यांना थांबविण्यासाठी तो शोरूममधून बाहेर पळत सुटला. यावेळी शोरूमच्या दरवाजाला असलेली काच त्याच्या लक्षात आली नाही. शोरुमची काच फोडूनच तो बाहेर रस्त्यावर कोसळला. त्याच्यावर सीपीआरमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले. नंतर खासगी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून सरकारच्या प्रतिमेचे दहन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे प्रलंबित मानधन त्वरीत द्या या मागणीसह अन्य मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाने सोमवारी बिंदू चौकात सरकारच्या प्रतिमेचे दहन केले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सरकारवरील संताप व्यक्त केला.

लक्ष्मीपुरीतून बिंदू चौकापर्यंत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी सरकारची प्र‌तिमा घेऊन घोषणाबाजी करत मोर्चा काढला. बिंदू चौकात महिलांनी सरकारच्या प्रतिमेचे दहन करत निषेध व्यक्त केला. त्वरीत मानधन मिळालेच पाहिजे, सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. याशिवाय अन्य मागण्याही यावेळी करण्यात आल्या.

त्यामध्ये एक वर्षांपासून अनियमित मानधन मिळते, राज्य सरकारकडून मिळणारे सेविकांना दोन हजार व मदतनीसांना मिळणारे एक हजार रुपये मानधन ऑगस्ट २०१४ पासून मिळालेले नाही. ते त्वरीत मिळावे, २०१४ ची भाऊबीज मिळावी, लाभार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या आहाराची बिले एक वर्षापासून प्रलंबित आहेत.

या प्रश्नांबाबत पंधरा दिवसांपूर्वी आझाद मैदानावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्याचे अश्वासन देण्यात आले होते. दरम्यान जिल्हा परिषदेवरला टाळे ठोको आंदोलन करून महिलांचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ३१ मार्चपर्यंत थकीत बिले मंजूर होतील असे अश्वासन दिले होते. मात्र सरकारने या प्रश्नांकडे लक्ष न दिल्याने कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाने सरकारचा निषेध केला. आंदोलनाचे नेतृत्व कॉ. सुवर्णा तळेकर, अतुल दिघे यांनी केले. आगामी काळात आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोप खण लँडफिल साइटच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेने शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया केल्यानंतर इनर्ट मटेरियल टाकण्यासाठी टोपमधील खण लँडफिल साइट म्हणून वापरण्यास कोणतीही अडचण नसल्याचा निर्वाळा राष्ट्रीय हरित लवादने दिला आहे. टोप खणीला भूमिभरण केंद्र म्हणून वापरण्यास सशर्त परवानगी दिली आहे. त्याळे महापालिकेला दिलासा मिळाला असून भूमिभरण क्षेत्रासाठी अनुषांगिक कामे करण्यासाठी कोणतीही आडकाठी नसल्याचेही राष्ट्रीय हरित लवादाच्या पुणे येथील न्या. व्ही. आर. किंगावकर आणि तज्ज्ञ सदस्य अजय देशपांडे यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे. महापालिकेचे वकील धैर्यशील सुतार यांनी ही माहिती दिली.

खंडपीठाने, सध्या कसबा बावडा येथील साचलेल्या घनकचऱ्याची विल्हेवाट कसा लावणार याचा अहवाल २० मेपर्यंत महापालिकेने सादर करावा असा आदेश दिला आहे. टोप ग्रामपंचायतीने दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. अहवालानंतर आवश्यकता वाटल्यास याचिकेवर सुनावणी घेतली जाईल असेही स्पष्ट केले. महापालिकेने प्रदूषण मंडळाकडे अर्ज करून, सध्याचा कसबा बावडा येथील डम्पिंग ग्राउंडवरील घनकचरा तात्पुरता ६ महिन्यांसाठी इतरत्र हलवण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाची मान्यता मिळवणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. कसबा बावड्यातील जागा रिकामी करून रोकेम कंपनीला कचऱ्यावर प्रक्रियेसाठी देण्याचे आदेश दिले. यासंदर्भातील सुनावणी ९ ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली. आजच्या सुनावणीस उपायुक्त अश्विनी वाघमळे हजर होत्या.

दरम्यान, कोल्हापूर शहरात सध्या दररोज १७० टन घनकचरा निर्माण होतो. त्यावर कोणतीही प्रक्रिया होत नसल्याने तो तसाच कसबा बावडा येथे टाकला जात आहे. त्यामुळे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. कसबा बावड्यात कचऱ्यावर प्रक्रिया केल्यानंर इनर्ट मटेरियल टोप खणीत टाकण्यात येणार आहे. याकरिता टोपची खण अत्यंत गरजेची होती. याकरिता टोप खण येथे लँडफिल साइट विकसित केली जाईल. त्याचा डीपीआर तयार केला जाईल. टोपची खण पुढील २५ वर्षांसाठी पुरणार आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरातील कचऱ्याची समस्या सुटण्यास मोठा दिलासा मिळाला आहे अशी प्रतिक्रिया उपायुक्त अश्विनी वाघमळे यांनी दिली. दरम्यान १५ मेपासून टाकाळा येथे कसबा बावडा येथील इनर्ट मटेरीअल हलविले जाणार आहे. मात्र, चार महिन्यांत ते भरल्यावर पुन्हा महापालिकेकडे भूमिभरण क्षेत्र नाही. टोप खणीची जागा मिळाल्यामुळे कचरा टाकण्याचा प्रश्न सुटणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मचाऱ्यांना बुधवारपासून पगार

$
0
0

म. टा.प्रतिनिधी, कोल्हापूर

कामाचा मोबदला मिळाला पाहिजे, पगार आमच्या हक्काचा अशा घोषणा देत केएमटीच्या कर्मचाऱ्यांनी महापालिकेचा परिसर दणाणून सोडला. सकाळी ११ ते दुपारी एक अशा तब्बल दोन तास महापौरांच्या कार्यालयासमोर ठिय्या मारत कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या प्रश्नाची सोडवणूक झाल्याशिवाय हलणार नाही असा इशारा दिला. महापौर तृप्ती माळवी यांच्या केबिनमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. त्यात तोडगा काढण्यात आला. त्यानुसार फेब्रुवारी महिन्याचा पगार बुधवारपासून (ता. १५) देण्यात येणार आहे.

याशिवाय एक दिवसाआड सात लाख रुपये पगारासाठी देण्याची ग्वाही प्रशासनाने दिली. २७ एप्रिलपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांचा पगार देण्याचे ठरले. मार्च महिन्याचा पगार दहा मेपर्यंत देण्याचे ठरले असून यासाठी महापालिका केएमटीला ५० लाख रुपयांचे अनुदान देणार आहे. या बैठकीत कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. महापौरांनाही कर्मचाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. तीन महिन्यांच्या थकीत पगारासाठी कर्मचारी गेले पाच दिवस महापालिकेत हेलपाटे मारत आहेत. महापौर माळवी यांनी या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी सोमवारी बैठक बोलावली. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त विजयकुमार खोराटे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले, कर्मचारी प्रतिनिधी म्हणून रवींद्र इंगवले, मारुती पाटील, निलेश डोईफोडे, राजेंद्र निगवेकर, आनंदा आडके यांची बैठक झाली.

बैठकीत केएमटी कर्मचऱ्यांच्या पगारावरून कर्मचारी पोटतिडकीने म्हणणे मांडले. नगरसेवक संभाजी जाधव, भूपाल शेटे, माधुरी नकाते यांनी कर्मचाऱ्यांच्या पगाराप्रश्नी प्रशासनाचे लक्ष वेधले. दरम्यान, पदाधिकारी, अधिकारी आणि प्रतिनिधींची महापौरांच्या केबिनमध्ये चर्चा सुरू असताना कर्मचारी मोठ्या संख्येने महापौर कार्यालयासमोर जमले. त्यांनी, ' पगार आमच्या हक्काचे, कामाचा मोबदला मिळाला पाहिजे' अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. पगाराचा निर्णय होईपर्यंत येथून हलणार नाही असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला. कर्मचारी प्रतिनिधींनी बैठकीतील वृत्तांत कर्मचाऱ्यांना सांगितला. त्यानंर सगळे कर्मचारी शाहू क्लॉथ मार्केटसमोरील केएमटी ऑफीससमोर जमले. त्यांनी प्रशासनाच्या गलथान कारभाराच्या विरोधात पुन्हा घोषणेबाजी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ईव्हीएम मशिनऐवजी मतपत्रिका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) पंचवार्षिक निवडणुकीचे मतदान सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये घेण्यात येणार आहे. दरम्यान, प्रचार सुरू झाल्यापासून मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आचारसंहितेचे उल्लघंन झाल्यास कडक कारवाई करू असे उमेदवारांना सांगण्यात आले आहे, अशी माहिती निवडणूक अधिकारी अशोक पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. निवडणूक जाहीर झाली असताना गोकुळच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषद घेतल्याप्रकरणी व्यवस्थापकीय संचालक डी. व्ही. घाणेकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचेही पाटील यांनी सांगितले.

पाटील म्हणाले, 'निवडणूक प्रक्रिया आणि सुलभ होण्यासाठी एव्हीएम मशीन्स वापरण्याची परवानगी सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे मागितली होती. प्राधिकरणाने एव्हीएम मशीन्स वापरण्यास परवानगीही दिली. मात्र सध्या मशीन्स उपलब्ध नसल्याने पूर्वीप्रमाणेच बॅलेट पत्रिकेवर मतदान घेतले जाणार आहे. मशीन्सद्वारे मतदान घेतले असते, तर त्याच दिवशी मतमोजणी करण्याचा विचार होता. मात्र मतपत्रिकेवर मतदान घेतले जात असल्याने नियोजित वेळेनुसारच मतमोजणी प्रक्रिया राबवली जाणार आहे.'

पाटील म्हणाले, 'शहरातील वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पार्किंगची चांगली सुविधा असलेल्या सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये मतदान होईल. प्रत्येकी दहा खोल्यांमध्ये सरासरी ३०० ठरावधारक मतदानाचा हक्क बजावतील. मतपत्रिका छपाईचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी सोमवारी सर्व उमेदवारांची बैठक घेतली आहे. अचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. निवडणूक प्रचारात संघाचे कर्मचारी, वाहने, कार्यालये व इतर सभा समारंभ आणि मतदानावर परिणाम करतील अशा घोषणा करण्यास प्रतिबंध घातला आहे. प्रचार दरम्यान सर्व उमेदवारांना दररोजचा खर्च तपशीलवार निवडणूक कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. निवडणुकीसाठी दूध संघाचा वापर होत असल्यास संबंधीतांना नावासह तक्रार दाखल करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. मतदानासाठी येतांना ठरावधारक मतदारांनी सरकारने घालून दिलेल्या १९ ओळखीच्या पुराव्यासह मतदानामध्ये भाग घ्यावा, ओळखीचा पुरावा नसल्यास मतदान प्रक्रियेत सहभागी करुन घेणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान सतेज पाटील यांनी आरोप केल्यानंतर गोकुळचे व्यवस्थापकीय संचालक डी. व्ही. घाणेकर यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटीस बजावल्याने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी कुलगुरू, प्राचार्य रा. कृ. कणबरकर यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य रा. कृ. कणबरकर (वय ९५) यांचे सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. भोगावती येथे खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच रात्री नऊच्या सुमारास प्राणज्योत मालवली. कोल्हापुरात आज, मंगळवारी सकाळी दहा वाजता त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात मुलगा डॉ. अरुण, अंजली साबळे, नमिता खोत, मेघा वागळे या तीन मुली आहेत.

कणबरकर काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच नाळे कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी गर्दी केली. प्राचार्य कणबरकर अनेक वर्षे राजर्षी शाहू स्मारक भवन ट्रस्टचे विश्वस्त होते. त्यांनी भाई माधवराव बागल विद्यापीठाच्या माध्यमातून राजर्षी शाहूंच्या कार्यावर इंग्रजीत ग्रंथलेखन केले होते. राजर्षी शाहूंचा पुरोगामी विचार आणि त्यांच्या कार्याच्या प्रसाराबद्दल सन २०११ मध्ये राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टने त्यांना शाहू पुरस्काराने गौरविले होते. भाई माधवराव बागल विद्यापीठाचे संस्थापक सदस्य आणि उपाध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. त्यांची विविध विषयांवरील पुस्तके प्रकाशित झाली होती. त्यातील 'महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न : महाराष्ट्राची न्याय्य बाजू,' 'भाई माधवराव बागल (संक्षिप्त चरित्र)', 'अ ग्रामर ऑफ इंग्लिश' ही काही महत्त्वाची पुस्तके होत. २००३ मध्ये कोल्हापूर महापालिकेचा कोल्हापूर भूषण पुरस्कार, कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार, संत गाडगे महाराज पुरस्कार आणि शैक्षणिक कार्यासाठी दक्षिण भारत जैन सभेच्या कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्काराबरोबरच राज्य सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कारही त्यांना मिळाला होता.

शिवाजी विद्यापीठाचा १९७४ चा नवीन कायदा करण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता. विद्यापीठाच्या कार्यकारिणीचे ते दहा वर्षे सभासद होते. रयत शिक्षण संस्था, विवेकानंद, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस आदी संस्थांवर ते पदाधिकारी म्हणून कार्यरत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जातून टोलमुक्ती निंदनीय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारला कोल्हापूरच्या जनतेच्या भावनांची चाड असेल तर त्यांनी महापालिकेला कर्ज देऊन नव्हे, तर अनुदानातून टोलमुक्ती करावी. किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून जमा होणाऱ्या रोडटॅक्समधून रस्ते विकास प्रकल्पासाठी झालेला खर्च वसूल करावा अशा प्रतिक्रिया सेवाभावी संस्था, टोलविरोधी कृती समितीचे पदाधिकारी व्यक्त करीत आहेत.

यासंदर्भात प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे दिलीप देसाई व बुरहान नाईकवडी यांनी म्हटले आहे,' कोल्हापूरकर दरवर्षी सरकारला विविध कराच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये जमा करतात. वाहनांच्या नोंदीवेळी कोट्यवधी रुपये रोड टॅक्स जमा होतो त्या मोबदल्यात सरकारने जनेतला काय सुविधा दिल्या. टोल रद्द केला असे भासवून सर्वच कोल्हापूरवासीयांवर टोलचा भार टाकण्याचा सरकारचा निर्णय निंदनीय आहे. सरकारची टोल मुक्तीची घोषणा फसवी आहे. कर्जाच्या माध्यमातून वाहने असणाऱ्यांच्या बरोबरच सायकल व पायी फिरणाऱ्यांवरीही टोलची रक्कम लादण्याचा प्रकार आहे. सरकारने आयआरबी धार्जिणा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात पुन्हा आंदोलन करण्यात येईल.'

टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे म्हणाले, 'भाजप-शिवसेनेच्या नेत्यांनी कोल्हापूर टोल मुक्तीचे अभिवचन दिले होते. टोलमुक्तीसाठी महापालिकेला कर्ज दिले तर, ते पर्यायाने कोल्हापूरच्या जनतेवर बोजा पडणार आहे. जो प्रकल्प कोल्हापूरला नको होता, त्यासाठी पुन्हा जनतेवर कशाला भार टाकला जात आहे. यापेक्षा कंपनीला भाडेतत्वावर दिलेल्या तीन लाख चौरसमीटर जागेची बाजारभावाने किंमत ठरवावी. वाढीव एफएसआय देऊन प्रकल्पाचा खर्च भागवावा. जनतेच्या पैशातून टोलमुक्ती करणार म्हणता, मग सरकार काय करणार ? सरकारने वेगळ्या माध्यमातून कंपनीचे पैसे भागवावेत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live

Latest Images