Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

...तर कारखान्यांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'साखर कारखान्यांना एफआरपीप्रमाणे दर देता यावा यासाठी सरकारने २००० कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. त्याबरोबरच उसापासून तयार होणाऱ्या इतर उत्पादनांची बिले लवकर देण्याचे आदेश दिले आहेत. सरकारच्या या उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांना किमान एफआरपी प्रमाणे दर देणे शक्य आहे. तरी देखील कारखान्यांनी दर दिले नाहीत. तर नाईलाजास्तव कारखान्यांवर कारवाई करावी लागेल,' असा इशारा सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. ते येथील सरकारी विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

पाटील म्हणाले, ' राज्यात गतवर्षी ७०० लाख मेट्रीक टन तर यावर्षी ९२५ लाख मेट्रीक टन साखरेचे उत्पादन झाले. शेतकऱ्यांच्या उसाच्या क्षेत्रात आणि उत्पादनातही वाढ झाली आहे. त्यामुळे अचानक साखरेचे दर कोसळल्याने साखर कारखानदारांना एफआरपीप्रमाणे दर देता आला नाही. आता सरकारने कारखान्यांना २००० कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले असल्यामुळे त्यांना एफआरपीप्रमाणे दर देणे शक्य होणार आहे.

शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे दर मिळावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने काही उपाययोजना केल्याचे सांगून पाटील पुढे म्हणाले, ' सरकारच्या मदतीमुळे कारखान्यांना आता शेतकऱ्यांना दर देणे अवघड नाही. जेवढी रक्कम कमी पडते, तेवढी त्यांनी कर्ज स्वरुपात उभी करावी. सुरूवातीच्या टप्प्यात सरकारने साखर कारखान्यांना ८७० कोटींचा पर्चेस टॅक्स माफ केला. त्यामुळे दरात १०० रुपयांचा फरक पडेल.मोलॅसिसचे विकेंद्रीकरण केल्याने त्याचेही दर वाढले आहेत. को जनरेशन प्रकल्प असलेल्या साखर कारखान्यांना त्यांनी उत्पादित केलेल्या विजेची बिले ४० दिवसात देण्याचा आदेश देण्यात आले आहेत. त्याबरोबरच ५० लाख मेट्रीक टन साखरेचा बफर स्टॉक करावा म्हणजे राज्यातील २५ ते ३० लाख मेट्रीक टन साखरेचा स्टॉक होईल याबाबत केंद्र सरकारला विनंती करण्यात येणार असून याची बैठक लवकरच होणार आहे.' या बैठकीला आपण स्वतः उपस्थित राहणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

'गोकुळ' मध्ये एक पाऊल मागे

सहकारामध्ये भाजपला संधी मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून आमचे काही संचालक 'गोकुळ'मध्ये असतील असे सहकारमंत्र्यांनी सांगितले होते. प्रत्यक्षात 'गोकुळ'च्या रणांगणातून भाजपने माघार घेतली आहे. त्यामुळे भाजपचे 'गोकुळ'मध्ये काय असा प्रश्न विचारला असता पुढे मोठी उडी टाकण्यासाठी भाजपने एक पाऊल मागे घेतले असल्याचे पाटील यांनी सांगितले. निवडणुकीत कोणताही अडथळा न येता संचालक बहुमताने निवडून यावेत यासाठी भाजपचे समाधान करण्यात सत्ताधारी गटातील नेत्यांना यश आले आहे. त्यामुळे भाजपला निवडणुकीत न उतरविता निवडणुकीनंतर स्वीकृत सदस्य करून घेतले जाईल, असे आश्वासन देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे भाजपने निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली असून सत्ताधारी आपल्याला संधी देतील या विश्वासावर भाजपचे नेते विसंबून आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकऱ्याची पोर झाली फौजदार

$
0
0

प्रकाश कारंडे, कागल

एकाच गल्लीत महाराष्ट्र आणि कर्नाटक अशी दोन राज्ये असणाऱ्या आणि त्यामुळेच सुविधेपासून वंचित असणाऱ्या कागल तालुक्यातील दुर्गम शंकरवाडीतील शेतकऱ्याच्या मुलीने पोलिस उपनिरीक्षक (फौजदार) परीक्षेत यश संपादन केले आहे. अश्विनी पांडुरंग केर्ले असे तिचे नाव असून तिचे यश ग्रामीण भागातील मुलींना निश्चितच प्रेरणादायी आहे. स्वत:वरील विश्वास,अपार कष्टाची तयारी आणि आई-वडिलांची साथ यामुळेच ती या यशापर्यंत पोहचू शकली.

स्पर्धा परीक्षांत यशस्वी होणे ग्रामीण भागातील मुलांना शक्यच नाही, त्यासाठी इयत्ता पाचवीपासून अभ्यास करावा लागतो, असे कितीतरी गैरसमज आणि न्यूनगंड ग्रामीण मुलांमध्ये आहेत. त्यातली परिस्थिती हादेखील एक भाग आहे. परंतु या सगळ्या गोष्टी तकलादू असल्याचे अश्विनीने आपल्या यशातून सिध्द करून दाखविले आहे. अश्विनीने दहावीपर्यंत शेंडूर येथे येता जाता सहा किलोमीटर अंतर चालत येवून शिक्षण पूर्ण केले.

बी.कॉमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सोबतच्या मैत्रिणींच्या अपुऱ्या माहीतीमुळेच स्पर्धा परीक्षाऐवजी पुढे एम.बी.ए.चे शिक्षण घेतले. त्यानंतर अश्विनीला स्पर्धा परीक्षेतून पोलिस उपनिरीक्षक झालेल्या प्रतिजा आमते-पाटील या कोल्हापूरच्या अधिकारी महिलेची ओळख झाली आणि त्यांचाच आदर्श घेऊन यशाचे शिखर सर केले.

मुळात अश्विनीला वाचनाची प्रचंड आवड. अभ्यास करताना तिला या वाचनाच्या आवडीचा प्रचंड फायदा झाला. याबाबत अश्विनी सांगते, 'कोणत्याही ट्युशन्स अथवा खासगी क्लासची गरजच भासली नाही. क्लास लावला तरी अभ्यास आपल्यालाच करावा लागतो. म्हणून घरी आणि महिनाभर शिवाजी विद्यापिठाच्या लायब्ररीबाहेर बसून अभ्यास केला. सहा महिन्यानंतर लायब्रित रितसर अॅडमिशन मिळाले. त्यानंतर मात्र लायब्ररी आणि मी असे अतूट नातेच निर्माण झाले. परिक्षेच्या महिनाभर अगोदर तर सकाळी सहा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत असे १४ तास अभ्यासातच गेले.

वृत्तपत्र वाचन किमान दोन तास केले. ५ वी ते १२ वीच्या सायन्स, इतिहास व भूगोलाचे वाचन केले. प्रत्येक विषयाच्या स्वतंत्र नोट्स काढल्याचा फायदा झाला. या परीक्षेतील यशानंतर आता राज्यसेवा परीक्षेचे वेध लागले आहेत.'

मोबाइलचा असाही वापर

मोबाइलचा वापरही अश्विनीने अत्यंत खुबीने केला. अभ्यासक्रमातील सनसनावळ्या, कलमे, तारखा, शोध यांचे मोबाइलवर रेकॉर्डिंग केले. दररोज रुमवरुन शिवाजी विद्यापिठात चालत येता जाता हे रेकॉर्डिंग ऐकून ही वेळदेखील अभ्यासाच्या सत्कारणी लावली.

स्वत:ची स्वप्ने ओळखून प्रामाणिक कष्टाची तयारी ठेवल्यास अशक्य काहीच नाही. सगळ्याच गोष्टींची सगळी माहीती कुणालाच नसते. ऐकीव माहीतीवर न्यूनगंड करुन घेवून ग्रामीण मुलांनी स्वत:चे नुकसान करुन घेवू नये.

- अश्विनी केर्ले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोनोग्राफी मशीन बंद ठेवणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पीसीपीएनडीटी कायद्यातील काही कलमांमध्ये सुधारणा करण्यात यावी, या मागणीसाठी कोल्हापुरातील प्रसूती आणि स्त्री रोगतज्ज्ञ बुधवारी (ता. १५ एप्रिल) त्यांच्या हॉस्पिटलमधील सोनोग्राफी मशीन बंद ठेवणार आहेत.

कोल्हापूर ऑबस्ट्रेटिक्स आणि गायनॅकॉलॉजीकल सोसायटीच्यावतीने हा संप पुकारण्यात आला आहे. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मिलिंद पिशवीकर आणि सचिव डॉ. तानाजी पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकातून ही माहिती दिली.

पत्रकात म्हटले आहे, 'गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान यंत्र कायद्याचा मुख्य उद्देश लिंग निदान आणि त्यानंतर होणाऱ्या स्त्रीभ्रूण हत्यांना प्रतिबंध घालणे हा आहे. त्यासाठी खऱ्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी स्टिंग ऑपरेशन, छुपा कॅमेऱ्यांचा वापर करणे अभिप्रेत आहे. प्रत्यक्षात अपुरे रेकॉर्ड, किरकोळ 'क्लिरिकल' चुकांसाठी सोनोग्राफी मशिन सील करणे, डॉक्टरांची सोनोग्राफी प्रॅक्टिस बंद करणे असे प्रकार सुरू आहेत. फॉर्मवर डॉक्टरची आणि पेशंटची सही नसणे, एफ फॉर्म ऑनलाइन भरूनही त्याची प्रिंट नसणे, कायद्याचे पुस्तक नसणे अशा किरकोळ बाबींसाठी कारवाई होत आहे. सोनोग्राफी मशिन सील करण्याचा अधिकार गैरपद्धतीने वापरला जातो. काही वेळा प्रमाणिक डॉक्टरांचीही बदनामी होत आहे.'

कायद्यातील क्निनील चुका आणि प्रत्यक्ष गर्भलिंग निदानाचा गुन्हा यात कोणाताही फरक केलेला नाही. कोल्हापुरातील संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबतीत तारतम्य बाळगले आहे. सोसायटीशी सहकार्य केले आहे. परंतु या कायद्यातील शिक्षेच्या तरतुदीत योग्य ते बदल करणे आवश्यक आहे. या संपात पुणे आणि परभणीसह राज्यातील विविध ठिकाणचे डॉक्टर सहभागी होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवघ्या दीडशे कोटींची ‘पत’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शहराला टोलपासून मुक्ती देण्यासाठी राज्य सरकार महापालिकेला ३५० कोटी रुपये कर्ज म्हणून देण्याच्या विचारात आहे. मात्र, महापालिकेचे आर्थिक उत्पन्न, करवसुलीची क्षमता या बाबींचा विचार केल्यास एवढ्या मोठ्या कर्जाच्या परतफेडीची क्षमता सद्यस्थितीत दिसत नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून जादा कर्ज दिले गेल्यास ते महापालिकेच्या कुवतीबाहेरचे असेल. सरकारने दीर्घ मुदतीच्या अटींवर कर्जाऊ रक्कम दिली तर त्याची परतफेड करताना महापालिकेला नाकीनऊ येऊ शकतील. त्याचा पायाभूत सुविधांवर परिणाम होणार आहे. याशिवाय, क्रेडिट रेटिंग अँड इन्व्हेस्टिंग कार्पोरेशनने महापालिकेचे क्रेडिट रेटिंग १५० कोटी रुपयांपर्यंत निश्चित केले आहे. त्यामुळे टोलचे संभाव्य ३५० कोटींचे कर्ज महापालिका कशी फेडणार? असा प्रश्न उप​स्थित होतो.

केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांतंर्गत शहरात सध्या विविध प्रकल्प सुरू आहेत. त्यात थेट पाइपलाइन योजना आणि नगरोत्थान योजनेतंर्गत रस्ते विकास, स्टॉर्म वॉटर अँड ड्रेन योजनेसाठी महापालिकेला स्वनिधीतून रक्कम गुंतवावी लागणार आहे. थेट पाइपलाइनसाठी दहा टक्के निधीअंतर्गत ४२ कोटी रुपये आणि इतर खर्चासाठी ५० कोटी रुपये अशी एकूण ९० कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. नगरोत्थानच्या कामांसाठी ६० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. महापालिकेला दोन्ही प्रकल्पांसाठी मिळून एकूण १५० कोटी रुपये खर्ची करावे लागणार आहेत. महापालिका प्रशासनानेही तितकेच कर्ज प्रस्तावित केले आहे. प्रशासन 'हुडको'कडूनही कर्ज घेणार आहे.

दरम्यान, महापालिकांचे आर्थिक उत्पन्न, विविध माध्यमांतून जमा होणारा कर, वसुलीची क्षमता, भविष्यातील शक्यतांचा विचार करून क्रेडिट रेटिंग ठरविले जाते. क्रेडिट रेटिंग अँड इन्व्हेस्टिंग कार्पोरेशन संस्थेतर्फे महापालिकेचे क्रेडिट रेटिंग १५० कोटी रुपयांपर्यंत निश्चित केले आहे. सध्या महापालिकेने १५० कोटी रुपयांच्या कर्जाचा प्रस्ताव दोन प्रकल्पांसाठी प्रस्तावित केला आहे.

महापालिकेचे महसुली व भांडवली बजेट ३८९ कोटी ४५ लाख रुपयांचे आहे. त्यापैकी ३८९ कोटी रुपये खर्च आहे. ४४ लाख रुपयांचे शिल्लकी अंदाजपत्रक असणाऱ्या महापालिकेला नव्या प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपयांचे कर्ज परवडणारे नाही. थेट पाइपलाइन योजना आणि नगरोत्थान योजनेंतर्गत कर्जाची परतफेड सुरू झाल्यानंतर महापालिकेवर आर्थिक ताण पडणार आहे. महापालिकेकडे सध्या आर्थिक उत्पन्नाचा प्रभावी मार्ग नाही. एलबीटी बंद झाला तर महापालिकेला राज्य सरकारवरच अवलंबून रहावे लागणार आहे. या बाबींचा विचार केला तर महापालिकेला टोलमुक्तीचा आर्थिक भार सहन होणार नाही असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोकुळ’च्या दुधात ‘बिद्री’ची साखर

$
0
0

शांताराम पाटील, गारगोटी

'गोकूळ' दुध संघाच्या निवडणुकीत भुदरगड तालुक्यातून माजी आमदार दिनकरराव जाधव यांनी विरोधी आघाडीला पाठिंबा दिल्याने व मधुकर देसाई यांच्या सारखा कसलेला उमेदवार विरोधी आघाडीला मिळाल्याने भुदरगड तालुक्यात विरोधी आघाडी भक्कम झाली आहे. पी. एन. पाटील यांचे विश्वासू साथीदार अशी प्रतिमा असताना दिनकरराव जाधव यांनी विरोधी आघाडीला पाठिंबा देऊन 'गोकूळ'च्या दुधात 'बिद्री'ची साखरपेरणी केली आहे. त्यामुळे दोन्ही आघाडीचे नेते दुधाच्या उकळीत साखरेचा अंदाज घेतला जात आहे.

भुदरगड तालुक्यात गोकूळ दुध संघासाठी ३५७ ठराव आहेत. त्यामुळे येथून मतांचे विभाजन होऊ नये, म्हणून माजी आमदार दिनकरराव जाधव यांचे पुत्र सत्यजित यांना सतारूढ गटातून उमेदवारी दिली जाईल असा अंदाज होता. मात्र त्यांची उमेदवारी डावलण्यात आली. तालुक्यातून एक जागा राष्ट्रवादीला अर्थात आमदार के. पी. पाटील यांना देण्यात आली. उमेदवारी डावलल्या नंतर सत्यजित जाधव यांनी विरोधी आघाडीतील नेत्यांनी प्रयत्न करून सुद्धा आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे त्यांची या निवडणुकीत त्यांची भूमिका काय असणार या विषयी उत्सुकता होती. पण, दोन दिवसाच्या प्रतीक्षेनंतर माजी आमदार जाधव यांनी विरोधी आघाडीच्या कार्यक्रमांना हजेरी लावून आपली भूमिका स्पष्ट केली. याला मे मध्ये होणाऱ्या बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीची किनार आहे. माजी आमदार के. पी. पाटील व बजरंग देसाई यांची विधानसभेपासून सुरु झालेली राजकीय मैत्री बिद्री साखर कारखान्यात कायम राहणार आहे. व याला आमदार महादेवराव महाडिक यांचा पाठिंबा राहणार आहे. तर दुसऱ्या बाजूला कारखान्यात ज्यांना बरोबर घेऊन लढावे लागणार आहे. ते आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार संजय घाटगे, विजयसिंह मोरे हे विरोधी आघाडीत असल्याने जाधव यांनी विरोधी आघाडीचा पर्याय निवडून गोकुळाच्या दुधात बिद्रीच्या साखरेची पेरणी केली.

कांबळेंना ब्रिदीचा शब्द

जाधवांच्या या भुमिकेमुळे तालुक्यात विरोधी आघाडी भक्कम झाली आहे. सत्यजित जाधव यांनी १४५ ठराव जमा करून नेत्यांजवळ दिल्याचा दावा केला होता. तर स्वत: उमेदवार मधुकर देसाई यांनी २५ ठराव दाखल केले होते. सतेज पाटील यांच्या विश्वासू साथीदारांमध्ये मधुकर देसाई आहेत. धैर्यशील देसाई यांनी स्वत: १८५ ठराव गोळा केले होते. त्यांना नंतर राष्ट्रवादीने आपले ठराव देखील दिले होते. आता तर उमेदवारीत त्यांना राष्ट्रवादीच्या विलास कांबळे यांचा कव्हर आहे. सतारूढ पॅनेलने उमेदवारी डावललेल्या दिनकरराव कांबळे यांना बिद्रीसाठी शब्द दिल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तडजोडीतून घाटगेंचा ‘काटा’

$
0
0

बाळासाहेब पाटील, कोल्हापूर

'गोकुळ' च्या उमेदवारीसाठी संजय घाटगे यांना टोकाचा विरोध करून सत्ताधारी पॅनेलमध्ये एकही जागा न घेता तडजोड केलेल्या आमदार हसन मुश्रीफ यांनी एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. आपल्या पारंपरिक प्रतिस्पध्याची आर्थिक रसद तोडायची, जिल्हा बँकेचा मार्ग सुकर करायचा, घाटगे यांचे पाठीराखे पी.एन.पाटील यांचा काटा काढायचा आणि महापौरांच्या कथित लाचप्रकरणानंतर पदरी पडलेली बदनामी धुवून काढायची असे एका दगडात अनेक पक्षी मारत मुश्रीफ यांनी आपला राजकारणातील खुंटी घट्ट केली आहे. आपला मतदारसंघ सुरक्षित करण्याबरोबरच जिल्हा बँक आणि पक्षीय राजकारणावर पकड मिळविण्यासाठी त्यांनी महाडिक यांच्याशी मतभेद असूनही जुळवून घेतले आहे.

'गोकुळ'च्या सत्ताधारी पॅनेलने सत्तेसाठी लागणारी गणिते एक वर्ष आधीच जुळवून ठेवली असली तरी सतेज पाटील यांच्यामुळे या जुळणीला हादरे बसत आहेत. तरीही सत्ताधारी गटातून उमेदवारी मिळावी यासाठी अनेकजण प्रयत्नशील होते. कागल तालुक्यातून संजय घाटगे यांच्या उमेदवारीवरून बराच मोठा खल झाला. वास्तविक एक वर्षापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्याविरुद्ध संजय मंडलिक उमेदवार होते. त्यावेळी मुश्रीफ यांनी कागल तालुका सांभाळत मतदारसंघातून मंडलिक यांचे आव्हान परतवून लावत महाडिक यांच्या विजयाची वाट सुकर करून दिली होती. त्यावेळी घाटगे मंडलिक यांचे बिनीचे शिलेदार होते. विधानसभा निवडणुकीत संजय घाटगे यांनी मुश्रीफ यांना तगडे आव्हान दिले होते. त्यावेळी उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णत: निष्प्रभ असूनही मुश्रीफ यांना या मतदारसंघाने विजयी केले. यासाठी सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक जि. प. माजी अध्यक्ष उमेश आपटे यांची छुपी मदत. ही छुपी मदत सतेज पाटील यांच्यामुळेच झाली होती. त्यामुळेच मुश्रीफ 'गोकुळ'मध्ये सतेज पाटील यांच्या गोटात येतील अशी अनेकांची धारणा होती. मा‌त्र, आगामी जिल्हा बँक, बाजार समितीच्या निवडणुकांत महाडिकांची मदत हवी असेल तर सद्यस्थितीत तडजोड करणे हाच मुश्रीफ यांच्याकडे उपाय होता. जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत झालेली ससेहोलपटीमुळे कदाचित मुश्रीफ केवळ जिल्हा बँकेवर लक्ष ठेवून असतील. त्यामुळे पाटील यांचा पैरा ते आगामी दोन निवडणुकांतही फेडू शकत नाहीत.

संजय घाटगे यांना मुश्रीफ यांनी विरोध करण्याचे दुसरे कारण म्हणजे आगामी निवडणुका मंडलिक आणि घाटगे गट एकत्र लढेल आणि समझोत्यानुसार विधानसभेला पुन्हा घाटगेच विरोधात असतील असा मुश्रीफ यांचा होरा आहे. त्यामुळेच घाटगे यांची आर्थिक रसद बंद करणे आणि त्यांना सापडतील तेथे नामोहरम करणे हाच सध्या तरी डाव आहे. ‌संजय घाटगे आपले चिरंजीव अंबरिश घाटगे यांच्यासाठी आग्रही होते. त्यामुळे मुश्रीफ यांनी तहाला बसून अनेक गोष्टी साध्य करून घेतल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत मंडलिक यांना मदत करणाऱ्या घाटगे यांनाही आपली ताकद यानिमित्ताने दाखवून दिली आहे.

जिल्हा बँकेचा रस्ता सुकर

जिल्हा बँकेवर प्रशासक नेमण्यात आला तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. प्रशासकामुळे नाचक्की झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला त्यामुळे मिरच्या झोंबल्या होत्या. त्यानंतर नेत्यांवर कर्जवाटपाच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या होत्या. त्यावेळी मुश्रीफ यांनी तत्कालिन पालकमंत्री आणि सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका करून त्यांनी सूड घेतल्याचे पत्रकार परिषद घेवून जाहीर केले. आता पुन्हा सत्ता घ्यायचीच या उद्देशाने कामाला लागलेल्या राष्ट्रवादीला काही तडजोडी कराव्या लागतील. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली तर आपला मार्ग सुकर करण्यासाठी मुश्रीफ यांनी पहिली तडजोड तेही वजन ठेवून महाडिक यांच्याशी केली आहे.

पी.एन. पाटील यांना शह

पी.एन. पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असल्याने त्यांच्यात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छुपे युद्धच आहे. हे युद्ध जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेवेळी उघड झाले. राष्ट्रवादीचा टोकाचा विरोध असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोबत घेवून पी.एन. पाटील यांनी सत्ता स्थापन केली. तेव्हापासून मुश्रीफ आणि पी.एन. यांच्यात ‌राजकीय वैर आहे. त्यातून पाटील यांचा काटा काढण्याची संधी मुश्रीफ यांनी घाटगे यांच्या निमित्तातून साधली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरचा टोलप्रश्न सोपा नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरच्या टोलचे प्रकरण दिसते एवढे सोपे नाही. टोल रद्द करण्याच्या मागणीसाठी येथे सातत्याने आंदोलने होत आहे. त्यांना हिंसक वळणही लागले. त्यामुळे येथील टोलप्रश्नाबाबत फार विचारपूर्वक घ्यावा लागणार आहे. त्यासाठी काही वेळ लागत असल्याने या टोलचा निर्णय उशीरा होईल. पण, ३१ मेपर्यंत अंतिम अहवाल घेऊन निर्णय घेतला जाईल. अन्यथा राज्यातील अन्य टोलबरोबरच याठिकाणचाही निर्णय घेतला गेला असता, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

कोल्हापुरातील टोलची सर्व रक्कम कंपनीला देण्याचा विचार आहे. त्यासाठी महापालिकेला बिनव्याजी कर्ज दिले जाईल. ते टप्प्याटप्याने फेडावे किंवा मालकीचा एखादा भूखंड विकूनही महापालिका पैसे उभारु शकते, याचा पुनरुच्चार करुन टोलमधून लाइट व्हेइकल वगळण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करीत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

कोल्हापूर म्हणजे खाईन तर तुपाशी...

पाटील यांनी पत्रकार परिषदेत जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले, 'राज्याचे धोरण कोल्हापुरात राबविणे अशक्य आहे. याची पूर्ण कल्पना सरकारला आहे. मी कोल्हापूरचाच असल्यामुळे येथील परिस्थितीची जाणीव आहे. परिस्थिती फार बिकट आहे. 'कोल्हापूर म्हणजे खाईन तर तुपाशी, नाही तर राहीन उपाशी,' अशीच परिस्थिती असते. त्यामुळे कोल्हापूरच्या टोलसाठी वेगळी व्यवस्था करण्याचा सरकार विचार करत आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विक्रमसिंह घाटगे यांचं निधन

$
0
0


मटा ऑनलाइन वृत्त । कोल्हापूर

महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व, सहकारमहर्षी विक्रमसिंग घाटगे यांचं आज सकाळी सातच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. कोल्हापूरमधील नागाळा पार्क येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनानं सहकार क्षेत्राचा मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

कागल येथील शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष असलेल्या विक्रमसिंह घाटगे यांना सहकार चळवळीत अत्यंत आदराचं स्थान होतं. १९८० साली स्थापन झालेल्या त्यांच्या कारखान्यानं ऊसाला नेहमीच चांगला दर दिला. शेतकऱ्यांचं हित जपणारा नेते अशी त्यांची ख्याती होती. सहकाराचा गाढा अभ्यास असलेल्या घाटगे यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर महासंघाचे तसेच राष्ट्रीय साखर महासंघाचेही अध्यक्षपद भूषवले होते. १९७८ साली अपक्ष म्हणून तर १९८० साली काँग्रेसच्या तिकीटावर ते विधानसभेत निवडून गेले होते.

शिक्षण क्षेत्रातही विक्रमसिंह घाटगे यांचे मोठे काम होते. त्यांनी सर पिराजीराव घाटगे फिजिकल एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट, सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, कागल एज्युकेशन ट्रस्ट आणि श्री शाहू शिक्षण प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थांचं अध्यक्षपद भूषवलं होतं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जत्रांमधून तमाशा होतोय कालबाह्य

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

ग्रामीण भागांत यात्रा-जत्रांमधील आकर्षण असणारा तमाशा आता कालबाह्य होऊ लागला आहे. डॉल्बी, डिजेच्या बॅण्डबाजांच्या जमान्यात तमाशाची सुपारी परवडत नसल्याने ग्रामीण भागातील पारावरचा तमाशा दुर्मिळ होत आहे. परिणामी तमाशा कलावंतांची परवड होत आहे. तमाशा कला जोपासण्यासाठी या तमाशाला लोकाश्रय प्राप्त होणे आवश्यक आहे.

ग्रामीण भागात रब्बी हंगामाची लगबग संपल्याबरोबर ग्रामदेवतांच्या यात्रा-जत्रांचा हंगाम सुरू होतो. या निमित्ताने ग्रामीण भागात मौजमजा करण्याचा काळ असतो. या काळात गावोगावी पै-पाहुण्यांची वर्दळ सुरू असते. येणाऱ्या पै-पाहुण्यांच्या व ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी तमाशासह कलापथकाचे कार्यक्रम आयोजित करण्याची रुढी परंपरा आहे. वाढत्या महागाईमुळे तसेच डॉल्बी-डिजेच्या जमान्यात ही पारंपारीक पद्धती तरुणांच्या दृष्टीने कालबाह्य होत आहेत.

रोजगारा अभावी कलाकारांची परवड

बदलत्या काळात ग्रामीण भागातील तमाशाची वाताहात होत आहे. हाताला पुरेसे काम उपलब्ध होत नसल्याने तमाशा कलावंताची आर्थिक परवड होत आहे. अर्धबेकारी मुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे. तमाशा ही लोककला फार जुनी आहे. या कलेचे जतन व्हावे, यासाठी राज्य सरकार तमाशा कलावंतांना मानधन देते. सरकराचा तमाशा वाचविण्यासाठी सुरू असलेला प्रयत्न कितपत यशस्वी होत आहे. हा संशोधनाचा विषय आहे, कारण कलाकार मानधन योजनेचे लाभार्थी खरे किती व बोगस किती, याचा काहीच ताळमेळ लागत नाही. यात्रा हंगामात जेमतेम काम मिळत असल्याने उर्वरित कालवधीत बेरोजगारीचा सामना करावा लागतो. त्यामुळे तमाशा लोकाश्रय मिळणे गरजेचे आहे. तमाशाला लोकाश्रय मिळाल्यास दुर्मिळ होत असलेल्या लोककलेला संजीवनी मिळेल, असा विश्वास येथील प्रख्यात तमाशा सम्राज्ञी मंगला बनसोडे यांनी 'मटा' शी बोलताना व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन भाविकांचा जीप उलटून मृत्यू

$
0
0

पंढरपूरः जोतिबाचे दर्शन घेवून कोल्हापूरहून तुळजापूरकडे निघालेली क्रूजर जीप पलटी होऊन झालेल्या अपघातात तीन भाविकांचा मृत्यू झाला. अकरा भाविक गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी पहाटे मिरज-सांगोला रस्त्यावर हातीद गावाजवळ ही घटना घडली.

संबधित क्रुझर गाडी रविवारी रात्री तुळजापूरला जाण्यासाठी कोल्हापूरहून निघाली होती. पहाटेच्या वेळी झोप अनावर झाल्याने हा अपघात झाल्याची शक्यता आहे. अपघाताची माहिती समजताच सांगोला पोलिसांनी तातडीने जखमींना उपचारासाठी हलविले. अपघातात तीन भाविकांचा जागीच मृत्यू झाला. सर्व भाविक तुळजापूर येथील आहेत. दत्तात्रय निबाळकर (५५), शारदाबाई तोंडे (५०), सुशालाबाई कदम (७०) अशी मृतांची नावे आहेत. जखमींमध्ये आठ महिला, दोन लहान मुले आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. जखमींवर सांगोला येथील गावडे हॉस्पिटल, आणि स्थानिक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. गाडीचा चालक श्रीनिवास जाधव पोलिसांच्या ताब्यात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृष्णा नदी पुन्हा फेसाळली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

उन्हाळ्यामुळे कृष्णेच्या पात्रातील पाणी दरवर्षी अटते आणि त्यातच आयर्विन पुलानजीक शेरीनाल्यातील दूषित फेसाळणारे सांडपाणी नदीत मिसळते, हे दरवर्षीचे चित्र यंदाही दिसत आहे. परिमाणी सांगलीकरांना अजूनही दूषित पाणी प्यावे लागत आहे. नागरिकांच्या प्रश्नाकडे महापलिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ कोणीच गांभीर्याने पाहत नाही. केवळ घोषणांचाच फार्स चालला आहे.

कृष्णा नदीकाठच्या अनेक गावातील सांडपाणी कृष्णेत मिसळते. शिवाय सांगली-मिरज परिसरातील दूषित सांडपाणीही मोठ्या प्रमाणात नदी पात्रात मिसळते. या संदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वारंवार महापालिकेला नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, दंडही करण्यात आला आहे. पण, सुधारणा होताना दिसत नाही. अलिकडेच महापालिकेवर या बाबत फौजदारी खटलाही दाखल करण्यात आला आहे. पण, शेरीनाला शुद्धिकरण प्रकल्प पूर्णत्वाला जाऊ शकला नाही. राहिलेल्या कामांसाठी महापालिका सरकारकडे ६५ लाख रुपयांची मागणी करणार असल्याचे महापौर विवेक कांबळे सांगितले आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने कोणतेही पाऊल उचललेले नाही.

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

सांगलीकरांना पुरेसे, शुद्ध पाणी मिळावे ही गेल्या ४०-४५ वर्षांची मागणी आजही कायम आहे. प्रत्येक उन्हाळ्यात शेरीनाल्याचे दूषित पाणी कृष्णा नदीत मिसळते आणि नदीचे पाणी दूषित होते. जे सांगलीकरांच्या आरोग्याला घातक ठरते. कृष्णा नदीचे पात्र दूषित करणाऱ्या शेरीनाला निर्मूलन योजनेचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. ते जवळजवळ पूर्ण झाले आहे. लवकरच त्याचा शुभारंभ होईल, अशा घोषणा आता सांगलीकरांना नेहमीच्या झाल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तंत्रशिक्षण शिक्षकांचे आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

विनाअनुदानित तंत्रशिक्षण संस्थांमधील भ्रष्टाचाराकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विनाअनुदानित तंत्रशिक्षण संस्थांमधील शिक्षकांच्या संघटनेने (टॅफनॅप) सोमवारी राज्यव्यापी आंदोलन केले. साताऱ्यातही संघटनेने तीव्र आंदोलन करून आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

तंत्रशिक्षण क्षेत्रात दिले-घेतले तत्वाने आर्थिक व्यवहार होत आहेत. तंत्रशिक्षण संस्थांमध्ये असणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कागदोपत्री पूर्ण वेतन अदा केले आहे, असे दाखवून वेतनामधून दरमहा ठराविक रक्कम कापून घेतली जाते. कर्मचाऱ्यांकडून वर्षाच्या सुरुवातीलाच कोऱ्या धनादेशावर अथवा पैसे काढण्याच्या स्लीपवर सह्या करून घेतल्या जातात. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून रोखीने पैसे परत घेतले जातात. संस्थाचालकांच्या भाषेत या पद्धतीला 'दिले-घेतले' म्हटले जाते.

अशा आहेत मागण्या

तंत्रशिक्षण संस्थांना सरकारने वेतन अनुदान द्यावे.

कर्मचाऱ्यांचे वेतन सरकारमार्फत व्हावे.

'दिले-घेतले' पद्धतीने कर्मचाऱ्यांची होणारी लुबाडणूक बंद करावी.

सेवेत घेताना कर्मचाऱ्यांच्या नावावर कर्जे काढून पिळवून केली जाते.

सरकारी नियमांनुसार वेतन, कायमस्वरुपी नियुक्ती पत्र याचा आग्रह धरल्यास संस्था बंद करून त्या इमारतीमध्ये लग्न कार्यालय, हॉटेल, माल सुरू करण्याची धमकी दिली जाते त्या संस्था बरखास्त कराव्यात.

वादग्रस्त संस्थांवर मंत्री विनोद तावडे यांनी प्रशासकाची नियुक्ती करावी.

लठ्ठे पॉलिटेक्नीक, सांगली या संस्थेतील चार कर्मचाऱ्यांचा होणारा छळ थांबवावा.

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण तंत्रनिकेतन या संस्थेवर प्रशासक नेमावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप जिल्हा बँकेच्या रिंगणात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मिरज

'सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लढविण्याची भाजपची तयारी आहे. आम्ही निवडणूक लढविण्यात कोठेही कमी पडणार नाही. समविचारी पक्षांकडून समोपचाराचा प्रस्ताव आल्यास त्या-त्या परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल. अन्यथा स्वतंत्र निवडणूक लढविण्याही भाजपची तयारी आहे,' असे खासदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मिरजेत जिल्ह्यातील भाजप नेत्यांच्या उपस्थितीत बैठक झाल्यानंतर खासदार संजय पाटील यांनी ही माहिती दिली. शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनाही सोबत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार विलासराव जगताप, माजी मंत्री अजितराव घोरपडे, आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, गोपीचंद पडळकर, जिल्हा ग्रामीण अध्यक्ष राजाराम गरुड, भाजप पश्चिम महाराष्ट्र समन्वयक मकरंद देशपांडे, माजी उपमहापौर शेखर इनामदार, गणेश गाडगीळ, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली. बैठकीत जिल्हा बँकेची निवडणूक लढविण्यासंबदर्भात आढावा घेण्यात आला.

बैठकीतील निर्णयाबाबत माहिती देताना खासदार पाटील म्हणाले, 'जिल्हा बँकेची निवडणूक लढविण्याबाबत सर्व बाबींचा बैठकीत आढावा घेण्यात आला. निवडणूक लढविण्यात आम्ही कोठेही कमी पडणार नाही. मात्र समविचारींकडून प्रस्ताव आल्यास त्याचा विचार करुन निर्णय घेतला जाईल. अन्यथा स्वतंत्र निवडणूक लढविण्याची भाजपची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार सुरेश खाडे हे परगावी असल्याने ते बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, त्यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा झाली आहे. अनिल बाबर हे शिवसेनेच आमदार आहेत. त्यांनाही बरोबर घेणार आहे.'

माजी संचालकांची धावाधाव सुरूच

कुपवाड : अपात्रतेला आव्हान देणाऱ्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माजी संचालकांच्या हायकोर्टातील याचिकेवरील सुनावणी पुन्हा बुधवारपर्यंत पुढे गेली आहे. दरम्यान, संबधितांनी कोल्हापूरचे विभागीय सहनिबंधक राजेंद्रकुमार दराडे यांच्याकडे नव्याने अपील करून कारवाईबाबत फेरविचार करण्याची विनंती केली आहे. जिल्हा बँकेतील अनियमित कारभाराचा ठपका ठेवून केलेल्या चौकशीच्या खर्चाची जबाबदारी संबधित माजी संचालकांवर निश्चित झाल्याने त्यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत. या अपात्रतेला आव्हान देण्यारी याचिका सोमवारी हायकोर्टाच्या खंडपीठासमोर सुनावणीला आली. काही प्रमाणात सुनावणी झाल्यानंतर पुढील सुनावणी बुधवारी होणार असल्याचे कोर्टाने सांगितले.

'सांगली अर्बन'बाबत सावध भूमिका

सांगली अर्बन बँकेच्या निवडणुकीबाबत विचारले असता खासदार संजय पाटील यांनी सावध भूमीका घेतली. सहकारात पक्ष विरहीत निवडणुका होतात असे, सांगत मत व्यक्त करणे ठाळले. म्हैसाळ योजना सुरु राहण्यासाठी शेतकऱ्यांनी पैसे भरण्याची गरज आहे. शेतकरीही आता पैसे भरण्यासाठी पुढाकार घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. मंत्रिमंडळ विस्तारात सांगली जिल्ह्याला संधी मिळेल, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूविकास बँक बंद करणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

'राज्यातील २९ भूविकास बँका बंद होणार आहेत. बँकेच्या कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई देऊन भूविकास बँका बंद करण्यात येतील,' अशी माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिली.

भूविकास बँकांच्या आर्थिक स्थितीचा चौकशीचा अहवाल देण्यासाठी सरकारने कर सल्लागार डी. ए. चौगुले समिती नियुक्त केली होती. या समितीने तत्कालिन आघाडी सरकारला अहवाल सादर केला होता. महाराष्ट्रातील सत्ताबदलानंतर भूविकास कर्मचारी संघटनेने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली होती. कर्मचारी संघटनेने भूविकास बँकाचे पुनर्वसन करण्यात यावी, अशी मागणी केली होती. मात्र, भाजप सरकारने या आर्थिक तोट्यात असणाऱ्या भूविकास बँकाच बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सरकारने बँक गॅरंटीपोटी दिलेली रक्कम सॉफ्ट लोन म्हणून मान्य केल्यास राज्यातील सर्वच भूविकास बँका फायद्यात येऊ शकतात, अशी भूमिका मांडली होती. दरम्यान, बँकेच्या जिल्हा बँकावर दोन हजार ११३ कोटी ३० लाखांचे शिखर बँकाचे कर्ज आहे. जिल्हा बँकानी सभासदांना दिलेल्या कर्जांची व्याजासह रक्कम ८५१कोटी ६९लाख होते. शिखर बँकेचे देणे, जिल्हा बँकाची देणी, याचा विचार केला तर १२६१ कोटीची तफावत आहे. सरकारची एकूण देणी १२९९ कोटी ७ लाख आहे. सरकारची सर्व देणी भागवण्यासाठी या बँकांना ४९१ कोटी ८९ लाख कमी पडत आहेत. भूविकास बँकामधील कर्मचाऱ्यांची संख्या ११८९ इतकी आहे. या बँकेचे पुनरुजीवन करण्याऐवजी बँकच बंद करणार असल्याचे त्यानी सांगितले आहे. भूविकास बँकेच्या ११ शाखा सक्षम तर १८ असक्षम आहेत.

हजारहून अधिक संस्थांची चौकशी

राज्यातील बँका, बाजार समित्या, सोसायट्यांसह एक हजारांहून अधिक सहकारी संस्थाची चौकशी निवडणुकीनंतर केली जाणार असल्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सांगलीत स्पष्ट केले. साखर कारखान्यांना सरकारने सर्व ती मदत केली आहे. तरीही एफआरपीनुसार ऊसाला दर देण्यास चालढकल होत असेल तर सरकारकडून कारवाई अटळ आहे, असेही ते म्हणाले. सहकारी संस्थाच्या गैरकारभाराची चौकशी सुरू आहे, तत्कालिन आघाडी सरकारने ही चौकशी थांबवली होती. ज्या संस्थांवर प्रशासक नियुक्त आहे, अशा संस्थाच्या चौकशीला सुरुवात झाली आहे. सुनावण्याही सुरू आहेत. यात अनेक गैरप्रकार आहेत.

'आडत'प्रकरणी अन्याय करणार नाही

आडत रद्द करण्याचा निर्णय घेताना व्यापाऱ्यांवर कसलाही अन्याय होणार नाही. शेतीमालाच्या गोडावून आणि कोल्ड स्टोअरेजसाठी व्यापारी-शेतकरी वर्गाने पुढाकार घेतल्यास सरकार अनुदान देईल, अशी घोषणाही चंद्रकांत पाटील यांनी केली. सांगली चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने नुतनीकरण करण्यात आलेल्या स्व. हनुमानबगस सारडा सभागृहाचे नामकरण आणि व्यापारी मेळाव्यात ते बोलत होते. शेतकरी, व्यापारी, तोलाईदार, हमाल अशा सर्वच घटकांना आवश्यक त्या सुविधा देणे बाजार समितीवर बंधनकारक आहे. राज्यांतील ३०० बाजार समित्यांपैकी ५० टक्के बाजार समित्यांवर प्रशासक आहे. देशात फक्त आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातच आडत सुरू आहे. सरकारने घाई न करता २२ जणांची समिती नियुक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फ्लोरेन्सवासीयांनी जपल्या स्मृती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

फ्लोरेन्स (इटली) येथील प्रशासनाने ज्या प्रेमाने युवराज राजाराम महाराज यांच्या स्मृतिस्थळाचे जतन केलेले आहे, ते पाहता फ्लोरेन्सवासियांनी युवराज राजाराम महाराजांच्या स्मृतींचा गंध जपला आहे असे शिवाजी विद्यापीठातील हिंदी अधिविभाग प्रमुख प्रा. पद्मा पाटील यांनी सांगितले. प्रा. पाटील या इटली येथील तुरिनो विद्यापीठाच्या निमंत्रणावरून आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी झाल्या.

प्रा. पाटील यांनी राजर्षी शाहू महाराज यांचे आजोबा युवराज राजाराम महाराज (पहिले) यांच्या फ्लोरेन्स येथील समाधीस्थळाचे दर्शन घेतले. युवराज राजाराम महाराज १८७० साली युरोपचा अभ्यास दौऱ्या दरम्यान इटली येथील मुक्कामी आजारी पडले आणि सन १८७१ मध्ये त्यांचे निधन झाले.

इटलीमधील अर्ना नदी व मुगनोने प्रवाह यांच्या संगमस्थळी वसलेल्या केसीन पार्क याठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले होते. या ठिकाणी मूर्तीकार जी. एफ. फ्यूलर यांनी १८७४ मध्ये युवराज राजाराम महाराज यांचा अप्रतिम अर्धाकृती पुतळा व छत्री उभारली; तर, अभियंता माँट यांनी उत्तम स्मारक साकारले.

पुतळ्याच्या चारही बाजूंवर इटालवी (रोमन), इंग्रजी, मराठी (देवनागरी) व गुरूमुखी (पंजाबी) या भाषांमध्ये महाराजांबद्दल माहिती कोरली आहे. १६० हेक्टर जागेवरील हे स्मारक 'इंडियाना मोनुमेंट' या नावाने ओळखले जाते. या ठिकाणाच्या जवळून वाहणाऱ्या अर्ना नदीवरील पूल 'इंडियाना ब्रिज (ऑफ प्रिन्स राजाराम महाराज)' या नावाने ओळखला जातो. इटलीच्या जनतेची स्मृती स्मारकाच्या माध्यमातून वारसा जपल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले. अभियांत्रिकी व वास्तूशास्त्र या दोन्ही विषयांच्या अनुषंगाने कोल्हापूर व इटलीचे संबंध दृढ करण्याचा प्रयत्न या राजाने केला होता.

सामंजस्य कराराचा विद्यार्थ्यांना लाभ

प्रा. पद्मा पाटील यांनी इटलीच्या तुरिनो विद्यापीठात 'कल्चरल इमेजिस ऑफ व्हेजिटेबल किंगडम इन लिटरेचर: सिम्बॉलिक अस्पेक्ट्स अॅण्ड इंटरप्रिटीव्ह अॅप्रोचेस' या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग घेतला. शिवाजी विद्यापीठ व तुरिनो विद्यापीठ यांच्या दरम्यान झालेल्या सामंजस्य कराराची कागदपत्रे विद्यापीठातर्फे स्वीकारली. या सामंजस्य कराराअंतर्गत शिवाजी विद्यापीठातील शिक्षक व विद्यार्थी यांना तुरिनो विद्यापीठाशी समन्वय साधून शैक्षणिक व संशोधन करण्याच्या संधी उपलब्ध होतील. तुरिनो विद्यापीठात हिंदी भाषेचा बी. ए., एम. ए. तसेच पी. एचडीचा अभ्यासक्रमही उपलब्ध आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नळ कनेक्शनप्रश्नी कबनूरमध्ये उपोषण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

जादाची रक्कम भरुनही जलस्वराज्य योजनेतून नळ कनेक्शन देण्यास कबनूर ग्रामपंचायतीकडून सहा महिन्यांपासून टाळाटाळ केली जात असल्याच्या कारणावरुन कबनूर येथे प्रकाश महादेव पाटील, जावेद दस्तगीर इनामदार, अमोल अशोक परीट, लक्ष्मण पांडुरंग लोहार, कृष्णात शंकर चव्हाण व विठ्ठल संभाजी मोपगार या सहाजणांनी सोमवारपासून आमरण उपोषण सुरु केले होते.

दरम्यान, जलस्वराज्य प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी ३० एप्रिलपर्यंत समस्या सोडविण्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले. तर ३० पर्यंत समस्या न सोडविल्यास एक मेपासून पुन्हा उपोषण करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

हातकणंगले तालुक्यातील कबनूर परिरात असलेल्या मुरगोंडनगर, विठ्ठल मंदिर व कुलकर्णी मळा परिसरातील नागरिकांनी जलस्वराज्य प्रकल्प अंतर्गत १५०० रुपये भरुन नळ कनेक्शन घेतले होते. परंतु ग्रामपंचायतीकडून रस्ता करताना गटर खोदली गेल्याने सर्वच पाईप लाईन फुटल्या. त्यामुळे या भागातील पाणीपुरवठा पूर्णत: बंद पडला. या संदर्भात भागातील नागरिकांनी जलस्वराज्य प्रकल्प व ग्रामपंचायतीकडे सातत्याने पाठपुरावा केला. पण सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. याप्रश्नी जलस्वराज्य प्रकल्पावर मोर्चाही काढण्यात आला होता. त्यावेळी झालेल्या चर्चेत सर्वच नळ कनेक्शनधारकांनी प्रत्येकी ६०० रुपये भरल्यास पाइपलाईन टाकून कनेक्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर ६०० रुपये अनामत रक्कम म्हणून जलस्वराज्यकडे राहिल. त्याची परतफेड बिलातून केली जाईल असे ठरले. त्यानुसार नागरिकांनी पैसेही भरले. परंतु सहा महिन्यांचा कालावधी लोटला तरी नळ कनेक्शन देण्यास अद्यापही टाळाटाळ केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिकोत्रा खोऱ्यात ठणठणाट

$
0
0

प्रकाश कारंडे, कागल

चिकोत्रा प्रकल्पात सध्या केवळ ६५० दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक राहिले आहे. पावसापूर्वीच चिकोत्रा काठच्या ३२ पैकी काही गावात पिण्याच्या पाण्याचीही टंचाई जाणवत आहे. या टंचाईला शेतकऱ्यांची अनास्था आणि पाटबंधारे विभागाची हतबलताच कारणीभूत आहे. लोकप्रतिनीधीनींचा हस्तक्षेपामुळे नियम मोडून पाणी घेतल्याने शेतीसाठी व पिण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे.

चिकोत्रा मध्यम प्रकल्प १५५२ दशलक्ष घनफूट क्षमतेचा आहे. प्रकल्पाच्या निर्मीतीनंतर १४ टक्के ऊस लागण आणि ८६ टक्के रब्बी पिके घ्यायची असे धोरण कागदोपत्री ठरले. कारण चिकोत्रा काठच्या ३२ गावांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी याच प्रकल्पावर अवलंबून राहावे लागते. पण प्रत्यक्षात ७० ते ८० टक्के उसाची लागण झाली आहे आणि २५ ते ३० टक्के रब्बी पिके घेतली जातात. साहजिकच पाण्याचे नियोजन बिघडते. समन्यायी पध्दतीने पाणी द्यायचे म्हटले तर किमान चार आठवड्यांनी पाण्याचा फेर करता येतो. पाणी वेगाने सोडावे तर कर्नाटकात जाण्याची भिती आणि कमी दाबाने सोडावे तर शेवटच्या टोकाला न मिळण्याची भिती अशा दुहेरी कचाट्यात पाटबंधारे विभाग अडकतो. त्यातच एकीकडे ऊस क्षेत्र १४ वरुन ८० टक्के करुनही काहींनी लोकप्रतिनीधींच्या मदतीने कहर म्हणून लाभक्षेत्राच्या बाहेरही पाणी नेले आहे. विद्युत पंपांच्या हॉर्स पॉवरची मंजुरीही आवश्यकतेपेक्षा जास्त घेण्यात आली आहे.त्यामुळेच महिन्याचे पाणी दहा दिवसच पुरते. पाटबंधारे विभाग नियमाप्रमाणे वृतपत्रात जाहिरात आणि ग्रामपंचायतीला पत्र देवून आपली बाजू 'सेफ' करुन घेतात व हतबलता लपवतात.आणि सालाबादप्रमाणे उन्हाळा सुरु झाला की पाणीटंचाईचे गुऱ्हाळ सुरु होते आणि बंद पडते. असे प्रकल्प निर्मीतीपासून सुरुच आहे.

गतवर्षी ९८ टक्के पाणीसाठा

गतवर्षी प्रकल्पात ९८ टक्के पाणीसाठा झाला. २००६ -०७ आणि ०८ सालीच प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मे महिन्यापर्यंत प्रकल्पातून शेतीला पाणी सोडण्यात येणार आहे. मात्र प्रति महिना १५० दशलक्ष घनफूट पाणीसाठा सोडल्यास व जून महिन्यात पाऊस नाही पडल्यास चार हजार हेक्टरवरील ऊस पिक धोक्यात येणार आहे. त्यातच पिण्यासाठीही पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे. चिकोत्रा प्रकल्प अत्यंत उपयुक्त असला तरी पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असणे ही समस्याही आहे.

दरवर्षी उपलब्ध पाण्याचे विवरण आम्ही प्रसिध्द करतो. ३२ ग्रामपंचायतींना पत्र देतो. लाभक्षेत्राच्या बाहेर पाणी नेणाऱ्यांना नोटीसा देतो. परंतु जैसे थे परिस्थिती आहे. याप्रश्नी शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी सामंजस्याची भूमिका घेणे गरजेचे आहे तरच परिस्थिती आटोक्यात राहील. या सर्व परिस्थतीतही बारमाही शेती आणि पिण्यासाठी पाणी आवश्यक असेल तर

ठिबक सिंचन हाच चांगला पर्याय आहे. लोकप्रतिनिधी आणि सरकारने पाठपुरावा केल्यास हे शक्य आहे.

- उत्तम कापसे, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दौलत’ची विक्री होऊ देणार नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चंदगड तालुक्यातील दौलत सहकारी साखर कारखाना कर्ज फेडून पुन्हा सुरू करणे शक्य नाही. त्यामुळे आता 'दौलत'ची विक्री करण्याशिवाय पर्याय नाही. या सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा दौलत बचाव संघर्ष समिती निषेध केला आहे. चंदगडची स्वाभिमानी जनता 'दौलत'ची विक्री होऊ देणार नाही, असा इशाराही दौलत कारखाना बचाव संघर्ष समितीने दिला आहे.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने दौलत कारखाना भाडे तत्वाने लीजवर देण्यासाठी निविदा काढली आहे. त्याची प्रक्रिया सुरू असताना सहकारमंत्र्यांनी दौलत विक्रीची भाषा करण्यामागील हेतू काय ? दौलत शेतकऱ्यांच्याच मालकीचा रहावा, जिल्हा बँकेने तो विक्रीस काढू नये यासाठी दौलत बचाव ठेव योजना सुरू करण्याचा निर्णय कामगार, वाहतूकदार व शेतकरी यांनी घेतला आहे. अशावेळी सहकारमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री या दोन्ही नात्यांनी चंदगडच्या स्वाभिमानी जनतेच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याऐवजी दौलत विक्रीची भाषा सहकारमंत्री का ? करतात असा असा सवाल केला आहे.

'दौलत'वर कर्जाचा प्रचंड डोंगर उभा करण्यास कारखान्याचे पदाधिकारी, संचालक जबाबदार आहेत. कारखान्याचे गेल्या चार वर्षांचे ऑडिट झालेले नाही. काँग्रेस - राष्ट्रवादी सरकारने दौलत कारखान्याचे ऑडिट आणि कारभाराची चौकशी करण्याची जबाबदारी पार पाडली नाही. 'अच्छे दिन' ची भाषा करणाऱ्या सरकारमधील सहकारमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील ही जबाबदारी पार पाडणार आहेत की नाही. ? वास्तविक, सहकारमंत्री म्हणून जिल्ह्यातील एका सहकारी साखर कारखान्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पुढाकार घेऊन केंद्र व राज्य सरकारमार्फत चंदगडच्या जनतेला मदत करण्याची भूमिका त्यांच्याकडून अपेक्षित आहे. चंदगड तालुक्यातील शेतकरी, कामगार, वाहतूकदार तसेच दौलतचे सर्व हितचिंतक यांनी दौलत कारखाना शेतकऱ्यांचाच राहून चालू व्हावा यासाठी मोठ्या जिद्दीने पुढाकार घ्याव, दौलत बचाव संघर्ष समितीने आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३ ठिकाणी चोरीचा गारगोटीत प्रयत्न

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

गारगोटी (ता. भुदरगड) येथील डॉ. जे. पी. नाईक परिसरात अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकाणी चोरीचा अयशस्वी प्रयत्न करून शाहू कॉलनीतील रणजीत भरमाजी गवेकर यांच्या बंद घराचा दरवाजा उचकटून १४ हजारांच्या ऐवजाची चोरी केली. गवेकर हे शनिवारी आपल्या दुंडगे (ता.चंदगड) या मूळ गावी गेले होते. त्याच रात्री गवेकर यांच्या घरी चोरी झाली होती पण घरी कोणीही नसल्याने चोरी झाल्याचे कोणाच्या लक्षात आले नाही. रविवारी संध्याकाळी शेजारच्या घरातील विजयराव कालेकर हे गवेकर यांच्या घरासमोरून जात असताना गवेकर यांच्या घरी कोणी नसताना त्यांचे दार उघडे असल्याचे लक्षात आले.

कालेकर यांनी सम्राट मोरे यांनी बोलवून घरात पाहिले असता गवेकर यांच्या घरी चोरी झाल्याचे लक्षात लक्षात आले. चोरट्यांनी लहान मुलांची चार ग्रॅम वजनाची चेन, एक ग्रॅम वजनाची अंगठी व चांदीचे काही दागिने लंपास केले. तर जे. पी. नाईक कॉलनीतील अंताजी जाधव, डी. एस. कांबळे, जाधव फोटोग्राफी येथे शटरची कुलूपे तोडून चोरी करण्याच्या प्रयत्न चालू होता. मात्र याच कॉलनीतील रहिवाशी बापू देशपांडे यांच्या घरातील लाईट सुरु झाल्याने चोरट्यांनी मोटरसायकल वरून धूम ठोकली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योगांचा नव्याने सर्व्हे

$
0
0

मोहसीन मुल्ला, कोल्हापूर

राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक वसाहतींव्यतिरिक्त अन्य ठिकाणी उभारल्या गेलेल्या औद्योगिक वसाहतींना सेवा-सुविधा पुरविण्याचे धोरण राज्य सरकारने निश्चित केले आहे. त्यानुसार राज्यातील अधिकृत औद्योगिक वसाहतींबाहेर उभ्या राहिलेल्या उद्योगांचा सर्व्हे करण्यात येत आहे. राज्यभर त्या-त्या ठिकाणच्या जिल्हा उद्योग केंद्रांच्यावतीने असा सर्व्हे सुरू आहे. या उद्योगांच्या पायाभूत सुविधांसाठी उद्योगांनी ५० टक्के तर सरकारने ५० टक्के रक्कम खर्च करण्याचे नियोजन आहे. त्यासंदर्भातील प्रस्तावही संबंधित औद्योगिक वसाहतींकडून मागविण्यात आले आहेत.

राज्यात एमआयडीसीच्या अखत्यारीत १६ विभागीय कार्यालये आहेत. सुमारे ८४ हजार हेक्टर जागेवर २८१ औद्योगिक वसाहती आहेत. मात्र या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी औद्योगिक वसाहती उभ्या राहिल्या आहेत. अनेक ठिकाणी पन्नास ते शंभर उद्योग एकाच परिसरात उभे राहिले आहेत. तेथे एक प्रकारे या स्वतंत्र औद्योगिक वसाहती उभ्या राहिल्या आहेत. या उद्योगांकडूनही मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो. मात्र अशा पद्धतीने उभ्या असलेल्या औद्योगिक वसाहतींना पायाभूत सुविधा मिळवताना फार मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते.

कोल्हापूरचे उदाहरण घ्यायचे झाले तर शहरात शिवाजी उद्यमनगर, वाय. पी. पोवारनगर, विक्रमनगर येथे मोठ्या संख्येने उद्योग उभे आहेत. मात्र, तेथे पायाभूत सुविधा नाहीत. या उद्योगांचे महाराष्ट्राच्या विकासातील योगदान लक्षात घेत राज्य सरकारने अशा पद्धतीने उभ्या राहिलेल्या औद्योगिक वसाहतींना सुविधा पुरवण्याचे धोरण स्वीकारले आहे.

सर्वसाधारणपणे एका औद्योगिक वसाहतीत पाच कोटी रुपयांपर्यंतच्या पायाभूत सुविधा दिल्या जातील. एमआयडीसीच्या माध्यमातून ही कामे केली जातील. यातील अडीच कोटी रुपयांचा खर्च एमआयडीसी करेल. उर्वरीत अडीच कोटी रुपये संबंधित औद्योगिक वसाहतीच्या संघटनेने खर्च करायचे आहेत. कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशनचे सचिव प्रदीप व्हरांबळे यांनी कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशनला हा प्रस्ताव मिळाल्याचे सांगितले.

यासंदर्भात जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक शैलेश राजपूत म्हणाले, 'राज्य सरकारचे अशा प्रकारचे धोरण आहे. या धोरणाला पूरक माहितीसाठी राज्यभर उद्योगांची माहिती जमविण्याची प्रक्रिया उद्योग आयुक्तालयाकाडून सुरू करण्यात आली आहे. कोल्हापुरातही अशा पद्धतीने माहिती घेतली जात आहे.'

औद्योगिक वसाहतींना पायाभूत सुविधा पुरवण्याची योजना निश्चितच चांगली आहे. सुरुवातीला यात २५ टक्के वाटा उद्योजकांचा आणि उर्वरीत राज्य सरकारचा असे नियोजन होते. मात्र आता उद्योजकांचा वाटा ५० टक्के करण्यात आला आहे. योजनेत सरकारने ७५ टक्के खर्च करावा अशी आमची मागणी आहे. मात्र ही योजना निश्चितच स्वागतार्ह आहे.

-संजय अंगडी, अध्यक्ष, कोल्हापूर इंजिनी‌अरिंग असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images