Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

आगीत सात जण भाजले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

वाई तालुक्यातील ओझर्डे येथील पद्मावती देवीच्या वार्षिक यात्रेत बुधवारी रात्री बारा वाजता शोभेच्या दारुगोळ्यांचा स्फोट झाला. स्फोटानंतर लागलेल्या आगीत सात जण जखमी झाले. त्यापैकी दोन चिमुरड्या मुली गंभीर आहे.

त्याचबरोबर आग विझवणारे पंधरा जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी इस्लामपूर (जि. सांगली) येथील वामन आमले व त्यांच्या दोन साथीदारांना भुईंज पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मांढरदेव, पालींनंतर या यात्रेत दुर्घटना घडल्याने जिल्ह्यातील यात्रा धोक्याच्या वळणावरच असल्याचे मानले जात आहे. बुधवारी यात्रेचा पहिला दिवस होता. रात्री १२ वाजता छबिन्यावेळी शोभेची दारू उडवण्याचे काम मूळचे कवठेएकंद येथील व सध्या इस्लामपूर यल्लमा चौक येथे वास्तव्यास असणारे विक्रम भिकोबा आमले व त्याचे कामगार सावकर रामचंद्र पाटील (रा. साखराळे ता. वाळवा जि. सांगली) व मारुती भाऊ सुतार (रा. बेघरवस्ती इसलामपूर) हे करत होते. यात्रेवेळी वामन आमले यांनी आणलेला दारू गोळा पोत्यात भरून यात्रेत मांडलेल्या खेळण्याच्या दुकानाजवळ ठेवला होता. छबिण्याला सुरुवात होताच वामन आमले याने शोभेची दारू उडवण्याचे काम सुरू केले. त्याचीच ठिणगी दारू गोळ्याच्या पोत्यावर पडल्याने स्फोट झाला.

मांडलेली खेळण्याची दुकाने जळून खाक झाली. तसेच त्याच दुकानात कॉटखाली झोपलेल्या गीता रामदास पवार (वय ५) पूजा रामदास पवार (वय ९) व खेळणी विक्री करणारे रेखा अनिल पवार (वय २) अनिल सायबू पवार (वय २५) सुरेखा अनिल पवार (वय २२) आणि ओझर्डेचे ग्रामस्थ रवींद्र बाळासाहेब पिसाळ (वय ३०), चंदर उत्तम पिसाळ हे जखमी झाले. त्यानंतर अवघ्या काही क्षणातच दुसरी दुकाने ही आगीने वेढली गेली. स्थानिक ग्रामस्थांनी आटोकाट प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या सगळ्या धावपळीत दारुकाम करणारा वामन आमले पळून गेला. ओझर्डे ग्रामस्थांनी भुईंज पोलिस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम व सचिन ससाणे यांना घेऊन त्याच्या गावी इस्लामपूर येथे जाऊन त्याला ताब्यात घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुठे आहेत अच्छे दिन?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

'कॉँग्रेस सरकारच्या दहा वर्षांच्या काळात पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी जितके प्रदेश दौरे केले आहेत. त्याच्यापेक्षा जास्त दौरे मोदींनी केवळ ९ महिन्यांत केले. देशात काय चालले आहे, याचे त्यांना देणे-घेणे नाही. शेतकरी उध्वस्त झाला आहे पण, त्यांना मदत देण्याचे नाव नाही. अच्छे दिन कुठे आहेत, ते मोदींनी सांगावे,' असे आव्हान माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशिलकुमार शिंदे यांनी दिले. 'एमपीएसी'त राज्यात पहिला आलेल्या अभय मोहिते यांच्या सत्कार समारंभासाठी सुशीलकुमार शिंदे मंगळवेढा येथे आले असता, ते पत्रकारांशी बोलत होते.

कॉँग्रेसच्या काळात पेट्रोलियम पदार्थांच्या एका ब्यारेलचा दर १२६ डॉलर होता. तेव्हाही विकास दर ८.५ टक्के होता. आज ब्यारेलचा दर ४६ डॉलरपर्यंत कमी होवूनही विकास दर ५. ५ पर्यंत गडगडला आहे. देशात महागाई गगनाला भिडली आहे, कुठे गेले अच्छे दिन, अशा शब्दात त्यांनी मोदींवर सडकून टीका केली.

'एमआयएम'ला भाजपकडून ताकद

ओवेसींची एमआयएम मी केंद्रीय गृहमंत्री असताना फक्त हैद्राबाद पुरती मर्यादित होती. आता ती सगळीकडे वाढू लागली आहे. त्यांना भाजपकडूनच त्यांना ताकद मिळत आहे. असेही शिंदे म्हणाले. गोहत्या बंदीबाबत आपण सावरकर यांच्या गाईबाबतच्या भूमिके सोबत आहोत. जनता दलाच्या एकत्रीकरणाचा कोणताही फटका कॉँग्रेसला बसणार नाही. कॉँग्रेसने अनेक पराभव पचविले आहेत. प्रत्येक पराभवानंतर मोठ्या ताकदीने काँग्रेस पुढे आल्याचा इतिहास आहे. वाजपेयी आणि मोदी या दोघांची तुलना करताना वाजपेयी समंजस नेते होते. कायम विरोधकानाही ते सोबत घेत. विरोधकांना संपविण्याचा त्यांनी कधी प्रयत्न केला नाही. मोदी मात्र, तसे वागताना दिसत नाहीत, असेही शिंदे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयुक्तांचा मनमानी कारभार’

$
0
0

कुपवाड : सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या आयुक्तांवर मनमानी कारभाराचा आरोप खुद्द महापौरांनीच गुरुवारी केला. 'रस्त्यावर उतरुन करांची वसुली करायची आम्ही आणि वेगवेगळ्या कंपन्याना बोलवून त्यावर खर्च करायचा आयुक्तांनी, हे बरोबर नाही. घनकचरा व्यवस्थापन हा महत्वाचा विषय असतांना कंपनीबरोबरच्या चर्चेपासून महापौर, उपमहापौर, गटनेते, विरोधी पक्ष नेते यांना दूर का ठेवले, असा सवालही महापौर कांबळे यांनी उपस्थित केला.

स्थायी समितीच्या सभागृहात एका कंपनीने घनकचरा व्यवस्थापनाविषयी प्रात्यक्षिके दाखवून प्राथमिक चर्चा केली. या पार्श्वभूमीवर बोलताना कांबळे म्हणाले, 'कोणाला विचारून सभागृह अन्य चर्चांना दिले? हा सदस्यांचा सवाल अगदी योग्य आहे. महापालिकेच्या बाबतीत काही हिताचे निर्णय घ्यायचे असतील त्यामध्ये पदाधिकाऱ्यांसह सदस्यांना सामावून घेणे आवश्यक आहे. जबाबदार पदाधिकाऱ्यांना बाजूला ठेवून आयुक्तांचा सुरू असलेला मनमानीचा कारभार चालू देणार नाही. गुपचुप चर्चा करण्यामागचे गौडबंगाल काय? कोणासाठी ते असे करत आहेत? असा चोरटा कारभार मान्य नाही.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांदोलीत ३५ मि.मी. पाऊस

$
0
0

शिराळा : शिराळा तालुक्यात गुरुवारी रात्री जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. चांदोली धरण परिसरात ३५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जोरदार विजा आणि वाऱ्यामुळे काही भागातील वीजपुरवठा रात्रीच खंडीत झाला होता. तो शुक्रवारी दुपारी सुरळीत झाला.

रात्री अचानक पडलेल्या पावसामुळे आणि विजांच्या कडकडाटामुळे लोक रात्रीच रस्त्यावर आले. तासभर पडलेल्या पावसामुळे शेतात पाणी साठले, लहान ओढे नाले भरून वाहू लागले होते. काही ठिकाणी झाडांची पडझड झाली तर शिराळा तालुक्याच्या दक्षिण भागात घरांची पडझड झाली. मांगले येथे हरिजन वसाहतीत घरावरील पत्र्याचे छत उडून बाजूला पडल्यामुळे सुमारे ४० हजारांचे नुकसान झाले. घरात झोपलेल्या सुशिला तानाजी मोहिते यांच्या डोक्यात पत्र्याचा तुकडा पडून त्या जखमी झाल्या. मांगले येथील आनंदा महिपती पाटील यांच्या घराशेजारच्या शौचालायावर नारळीचे झाड कोसळल्यामुळे सात हजाराचे नुकसान झाले. मांगले येथील गाव कामगार तलाठी बी. जी. मुलानी यांनी पंचनामा केला आहे.

तालुक्याच्या उत्तर भागातील शिरशी येथे पाच मिलीमीटर सर्वात कमी तर शिराळा शहरात २५ मिलीमीटर तालुक्याच्या दक्षिण भागात मांगले येथे २२ मिलीमीटर तर सागाव येथे ४८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. अचानक पडलेल्या पावसामुळे लोकांची चांगलीच तारांबळ उडाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिराळा, मिरज परिसराला झोडपले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शिराळा, मिरज

सांगली जिल्ह्यातील शिराळा, मिरज आणि जत तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. गुरुवारी रात्री जत तालुक्यात हलका पाऊस झाला. तर शिराळा आणि मिरज परिसरात शुक्रवारी पुन्हा विजांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. पावसामुळे मिरज शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले. पूर्व भागातील ऊस उत्पादक शेतकरी मात्र आजच्या पावसाने सुखावले.

शुक्रवारी सायंकाळी मिरज शहरासह परिसरात पावसाने पुन्हा हजेरी लावली. उन्हाळ्यास सुरुवात झाल्याने व द्राक्षांसह इतर पिकांचा हंगामही संपल्याने कोणतेही नुकसान झालेले नाही. पूर्व भागात ऊसाच्या पिकाला पावसाचे पाणी मिळाल्याने फयदा होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे व रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली. पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले.

ऐतिहासिक कमानीवर वीज कोसळली

मिरजेतील मिरासाहेब दर्गा समोर असलेल्या ऐतिहासिक नगारखान्याच्या इमारतीवर वीज कोसळली. वीजेमुळे इमारतीचे दगड निकळून किरकोळ नुकसान झाले. तर परिसरातील घरांमधील टीव्ही जळाले. विजेच्या आवाजाने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होत. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. शहरात सायंकाळी विजांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. काही वेळात मोठा आवाज करीत दर्ग्यासमोरील नगारखान्याच्या इमारतीवर वीज कोसळली. वीजेमुळे कमानीच्या कोपऱ्यावरील दगड निकळले. यामुळे इमारतीचे किरकोळ नुकसान झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सलोनी कुलकर्णीला बेस्ट एडिटर पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोमंतकीय दिग्दर्शक जितेंद्र शिकेरकर यांच्या कोकणी चित्रपट 'मोर्तू'ला गोवा राज्य चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात तीन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. जितेंद्र शिकेरकर (बेस्ट स्क्रीन प्ले), राजदीप नाईक (बेस्ट अॅक्टर) यांच्यासह दिनेश मेंगडे आणि कोल्हापूरच्या सलोनी कुलकर्णीला 'बेस्ट एडिटिंग'साठीचा पुरस्कार मिळाला.

अंत्यसंस्काराचे विडंबन शैलीत विवेचन केलेला 'मोर्तू' सिनेमा गोमंतकीय पार्श्वभूमीवर तयार करण्यात आला आहे. कोल्हापुरातील मुली फिल्म इंडस्ट्रीमधील करिअरकडे केवळ 'स्टार' होण्याची पायरी म्हणून पाहत नाहीत; तर त्या फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीमधल्या प्रत्येक प्रांतात आपला वेगळा ठसा उमटवत आहेत. त्याच परंपरेतील सलोनी कुलकर्णीचा उल्लेख करावा लागेल. फिल्म एडिटिंगमध्ये तिचा हातखंडा असल्यामुळे तिला याच क्षेत्रात नावलौकिक मिळवायचा आहे. मुंबईतील रहेजा स्कूल ऑफ आर्टमध्ये 'जीडी आर्ट' शिक्षण पूर्ण होताच ती एडिटिंगच्या क्षेत्रात आली. अनेक नामांकित एडिटर्सची ती सहायक म्हणून काम करत आहे. आजवर अनेक हिंदी व मराठी चित्रपटांसाठी एडिटिंग केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तमदलगेजवळ अपघातात एक ठार

$
0
0

जयसिंगपूरः कोल्हापूर-सांगली मार्गावर तमदलगे (ता. शिरोळ) येथे दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तमदलगेचा तरुण ठार झाला. बाळासाहेब दत्तात्रय गायकवाड (वय ५८) असे मृताचे नाव आहे, तर प्रीतम धनाजी कांबळे (३०, रा. आजरा) गंभीर जखमी झाला. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास बाळासाहेब गायकवाड हे रोपवाटिकेतून स्प्लेंडर मोटारसायकलवरून घरी जात होते, तर आजरा येथील प्रीतम कांबळे पत्नीसमवेत मोटारसायकलवरून सांगलीला गेले होते. सांगलीहून आजऱ्याकडे परत जात असताना बसवान खिंडीजवळ दोन्ही मोटारसायकलींची धडक झाली. त्यात गायकवाड व कांबळे गंभीर जखमी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जमीन वादातून तलवार हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जमिनीच्या वादातून पाडळी खुर्द (ता. करवीर) येथे गुरुवारी सायंकाळी दोन तरुणांवर झालेल्या तलवार हल्लाप्रकरणी दोन्ही गटांनी करवीर पोलिस ठाणे व जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्या. हल्ल्यात अविनाश गणपती पाटील (वय २६, रा. पाडळी खुर्द) आणि विशाल आत्माराम सावंत (२३, रा. कोल्हापूर) हे जखमी झाले. दोघांना सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी धनाजी पाटील, महादेव पालकर, तानाजी पालकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, महादेव गणपती पालकर (६३) व तानाजी महादेव पालकर (३०) यांना फुलेवाडीत मारहाण केल्याप्रकरणी जुना राजवाडा ठाण्यात तर महादेव पालकर यांच्या फिर्यादीत गणपती दत्तात्रय पाटील, संदीप गणपती पाटील, अविनाश पाटील यांची नावे आहेत. अविनाश पाटील यांनी धनाजी पाटील आदींविरोधात फिर्याद दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घोटाळा दडपण्याचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

व्यापारी संकुलाचा थकीत घरफाळा वसूल करताना नियमबाह्य ​सवलत दिल्याप्रकरणी घरफाळा विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना सोमवारपर्यंत खुलासा करण्याची आदेश आयुक्त पी. शिव शंकर यांनी दिले आहेत. आयुक्तांनी या प्रकारात स्वतः या प्रकरणाची चौकशी करत विभागीय कार्यालयात कम्प्युटरवरील नोंदी तपासल्या. दरम्यान काही अ​धिकारी हे प्रकरण दडपण्याच्या प्रयत्नात आहेत. कम्प्युटरमधील नोंदीतील तफावत आणि तांत्रिक बाबी पुढे करून संबंधित कर्मचाऱ्यांना नामानिराळे करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

बागल चौकातील आमले मार्केटकडे घरफाळा थकबाकी आणि व्याज असे एकूण २२ लाख रुपये थकित आहेत. घरफाळा विभागातील दोन कर्मचाऱ्यांनी घरगुती मिळकतधारकांना दंडात ५० टक्के सवलत योजनेचा लाभ व्यापारी संकुलाला दिला. एकूण थकबाकीपैकी १४ लाख रुपये भरून घेतले. व्यापारी संकुलाला आठ लाख रुपयांची सवलत दिल्याची तक्रार एका नागरिकाने आयुक्तांकडे केली. आयुक्तांनी याची चौकशी करत, भरून घेतलेली रक्कम कम्प्युटरवर फीड केली की नाही हे तपासले. त्यानंतर कर्मचाऱ्यांना नोटिसा काढल्या आहेत.

आमले मार्केटकडील आमले या थकबाकीधारकाकडून कर्मचाऱ्यांनी फक्त कराची रक्कम भरून घेतली. मूळ बिलात कोणतीही सूट देण्यात आली नाही. उर्वरित आठ लाख रुपये आमले यांच्याकडून वसूल केले जातील. यंदाचे बील तयार करताना थकबाकीचा समावेश असेल. सोमवारपर्यंत दोन्ही कर्मचाऱ्यांकडून खुलासा येईल. चौकशी करून आयुक्तांना अहवाल सादर करू, अशी माहिती घरफाळा विभागप्रमुख दिवाकर कारंडे यांनी दिली. आयुक्तांनी कारंडे यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

वसुलीची चौकशी

नगरसेवकांचा हस्तक्षेप, कर्मचाऱ्यांचे संगनमत यामुळे अनेक मिळकतींची थकबाकी मोठी आहे. त्यांच्या वसुलीतही अशी सवलत दिली आहे का? किती रक्कम जमा झाली याची चौकशी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसच्या पॅनेलमध्ये सतेज पाटील?

$
0
0

म. टा. प्र‌तिनिधी कोल्हापूर

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात काँगेस पूर्ण ताकदीने उतरणार असून, पॅनेलमध्ये आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील असतील, असे संकेत जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी दिले. 'गोकुळ'च्या निवडणुकीचे नेतृत्व महाडिक आणि 'पीएन' करीत आहेत. या पार्श्वभूमीवर सतेज पाटील जिल्हा बँकेत काँगेसच्या पॅनेलमध्ये सहभागी होतील का, याबाबत आता काँगेस कार्यकर्त्यांत चर्चा सुरू झाली आहे.

'गोकुळ'च्या श्री राजर्षी शाहू आघाडीच्या प्रचाराचा प्रारंभ अंबाबाई मंदिरात झाला. या वेळी पत्रकारांशी बोलताना जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पॅनेल उभारण्याबाबत नेते मंडळींत चर्चा सुरू असल्याचे सांगितले. काँगेसच्या पॅनेलमध्ये आमदार महाडिक व सतेज पाटील यांचा सहभाग असेल का, असा प्रश्न केला असता, त्यांनी दोघेही पॅनेलमध्ये असतील असे सांगितले. 'गोकुळ'च्या पॅनेलमध्येही आम्ही सतेज पाटील यांना आमंत्रित केले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

'गोकुळ'च्या निवडणुकीमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे काही प्रमाणात काँगेसचे दुर्लक्ष झाले आहे. गगनबावड्यातून सतेज पाटील यांनी उमेदवारी जाहीर केली आहे, पण काँगेसकडून उमेदवारी असेल की नाही ते 'गोकुळ'च्या राजकारणांवर ठरेल असे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. 'गोकुळ'च्या सत्ताधारी पॅनेलमध्ये परस्परविरोधी पी. एन, नरके, दीपक पाटील राजेश पाटील, डोंगळे पीएन हे विरोधाला तिलांजली देत एकत्र आले आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँगेसच्या पॅनेलमध्ये महाडिक, पीएन-सतेज पाटीलही एकत्र येऊ शकतील असा युक्तिवाद काँगेसचे कायकर्ते करीत आहेत. पण 'गोकुळ'च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने पाठिंबा दिला असताना महाडिक व पीएन पूर्ण ताकदीने केडीसी बँकेच्या निवडणुकीत उतरतील का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीनशे पेट्रोलपंपचालक संपात सहभागी

$
0
0

कोल्हापूर : विविध मागण्यांसाठी देशभरातील पेट्रोल-डिझेल पंपचालकांनी शनिवारी इशारा संप पुकारला आहे. यात राज्यातील साडेचार हजार आणि कोल्हापुरातील तीनशे पंपचालक सहभागी होत आहेत. संपादरम्यान शनिवारी रात्री ८ ते रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत पंप बंद राहणार आहेत. कोल्हापूर जिल्हा पेट्रोल डिझेल पंप मालक संघाचे उपाध्यक्ष प्रसाद पाटील यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, 'न्याय्य मागण्यासंदर्भात शासन आणि ऑइल कंपन्या टाळाटाळ करतात. त्यामुळे नियंत्रणमुक्त बाजारपेठेशी स्पर्धा करणे डिलर्सना कठीण बनले आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफाळा रकमेचा थेट बँकेत भरणा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

घरफाळा वसुलीतील गैरप्रकारांना चाप लावण्यासाठी प्रशासन या वर्षापासून नवी पद्धत सुरू करणार आहे. पावती पुस्तकाद्वारे पैसे स्वीकारण्याची पद्धत बंद करण्यात येणार असून, त्याऐवजी घरफाळ्याची रक्कम बँकेमार्फत किंवा नागरी सुविधा केंद्रांमार्फत भरण्याची यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. आयुक्त पी. शिव शंकर यांनी घरफाळा विभागाला ही नवी पद्धत सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे घरफाळा विभागातील कर्मचाऱ्यांकडून वसुलीदरम्यान केल्या जाणाऱ्या बनवेगिरीला ब्रेक लागणार आहे.

घरफाळा हा महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नाचा मार्ग आहे. घरफाळा विभागाकडे साधारणपणे वर्षाला ३६ कोटींचा आसपास कर जमा केला जातो. पावती पुस्तकाद्वारे घरफाळा रक्कम वसूल केली जाते. या रकमेपैकी सुमारे ६५ टक्के रक्कम पावती पुस्तकाच्या माध्यमातून वसूल केली जाते. मात्र, विभागातील काही कर्मचारी वसुलीदरम्यान पावती पुस्तकाचा गैरवापर करीत असल्याच्या तक्रारी आहेत. बिलाची आकारणी करताना सवलतीच्या नावाखाली त्यात फेरफार केले जातात. यामुळे महापालिकेला अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. दोन दिवसांपूर्वी या विभागातील काही कर्मचाऱ्यांनी व्यापारी संकुलाला सवलत योजनेचा लाभ नियमबाह्यरित्या दिल्याचे उघड झाले आहे. त्यांनी बिलाच्या रकमेच्या वेगवेगळ्या पावत्या केल्या आहेत. आयुक्तांनी या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करत वसुलीची जुनी पद्धत बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

घरफाळा विभागाचे करनिर्धारक दिवाकर कारंडे म्हणाले, 'बँकेमार्फत अथवा नागरी सुविधा केंद्रामार्फत यापुढे रक्कम भरून घेतली जाणार आहे. काही ठिकाणी मशिन्स बसवली जाणार आहेत. नजीकच्या काळात नवी यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. यंदा विभागातर्फे शहरातील विविध भागात घरफाळा वसुली कॅम्प भरवले होते. थेट नागरिकांच्या घरापर्यंत कॅम्प पोहचल्यामुळे वसुलीत वाढ झाली.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलबीटीचा दंड माफ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थकीत एलबीटीसाठी अभय योजना जाहीर केली असून एलबीटी विरोधातील व्यापाऱ्यांच्या लढ्याला फार मोठे यश यातून मिळाले आहे. व्यापाऱ्यांच्या थकीत एलबीटीवरील दंड आणि व्याज माफ होणार आहे. त्याचा फायदा महापालिकांसह व्यापाऱ्यांनाही होणार आहे. एलबीटी न भरल्यास वार्षिक २४ टक्के दंड आहे. कोल्हापुरात एलबीटीची अंमलबजावणी २०११ पासून सुरू आहे. ज्या व्यापाऱ्यांचा २०११ पासनू एलबीटी थकीत आहे, अशांना ९६ टक्के इतका दंड झाला आहे. जेवढी मूळ रक्कम तेवढेच व्याज असा प्रकार अनेकांबाबत झाला असल्याने एलबीटी न भरलेले अनेकजण आहेत. त्यांना ही योजना फायद्याची ठरेल.

राज्य सरकारने १ ऑगस्टपासून एलबीटी रद्द करण्याची घोषणा केली आहे. सहाजिकच तोपर्यंत एलबीटी भरावा लागेल. एलबीटीच्या आंदोलनामुळे अनेक महापालिकांत व्यापाऱ्यांनी नोंदणीच केली नव्हती. नोंदणी करूनही कर भरलेले नाही, असे प्रकार घडले आहेत. सहाजिकच एलबीटी जर रद्द होणार असेल तर न भरलेल्या एलबीटीचे काय होणार? हा फार मोठा प्रश्न होता. या विषयावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यापाऱ्यांना प्रस्ताव देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार २७ जानेवारीला फेडरेशन ऑफ असोसिएशनने सरकारला अभय योजनेचा मसुदा बनवून दिला होता.

कोल्हापूर व्यापार आणि उद्योग महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगावकर यांनी योजनेमुळे कोल्हापुरातील व्यापाऱ्यांचे जवळपास ५० ते १०० कोटी रुपये वाचतील असे सांगितले. ते म्हणाले, '१ जानेवारी २०११ ते ३१ डिसेंबर २०११ या काळात व्यापाऱ्यांनी तीव्र आंदोलन करून एलबीटी भरणा केला नव्हता. आंदोलनात वेळोवेळी आवाहन केल्यानंतरही अनेक व्यापाऱ्यांनी एलबीटी भरला नव्हता. काहीजणांनी नोंदणीच केलेली नाही. अशांना योजनेचा लाभ होईल. ही योजना जाहीर केल्याबद्दल सरकारचे आम्ही स्वागत करतो.' व्यापारी मित्र संघटनेचे अध्यक्ष अजीत कोठारी म्हणाले, 'एलबीटीच्या आंदोलनात ‌भाजप आणि शिवसेनेचे सरकार आल्यानंतर चर्चेचा टप्पा सुरू झाला. विधानसभा निवडणुकीत एलबीटीच्या मुद्द्यावर व्यापारी सराकारच्या पाठीशी राहिले होते, त्याची पोचपावती मिळाली.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोडेखोरांना मोक्काचा प्रस्ताव

$
0
0

मिरज : मिरजेतील विद्यानगर येथे आयकर विभागाचे अधिकारी व मुंबई पोलिस असल्याची बतावणी करीत लाखो रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लूटल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींना मोक्का लावण्याचा प्रस्ताव पाठविण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. दरोड्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांचा इतरही गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आल्याची माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली होती.

दरोड्यामया घटनेनंतर काही वेळातच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून एका ताब्यात घेतले होते. ताब्यात घेतलेल्या संशयिताने पुणे येथील त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीने दरोडा टाकल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांच्या सांगली येथील गुंडा विरोधी पथकाने दरोड्यात सहभागी असलेल्यांना ताब्यात घेऊन गुन्ह्यात वापरण्यात आलेली चारचाकी गाडी, लुटण्यात आलेली रोकड व सोन्याचे दागिने हस्तगत केले होते. दरोड्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांचा आणखीही काही गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रदूषणाचा शिरोळकरांना धोका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

कोल्हापूर येथील रसायनयुक्त सांडपाण्यामुळे पंचगंगा नदीच्या प्रदूषणाची तीव्रता वाढत असून नदीतील मासे व अन्य जलचर प्राणी मृत होत आहेत. परिणामी शिरोळकरांच्या आरोग्यास धोका वाढला आहे. पाटबंधारे विभागाकडून शिरोळ तालुक्यातील तेरवाड तसेच राजापूर बंधाऱ्यास बरगे घालण्यात आले आहेत.

कोल्हापुरातील जयंती नाल्याचे सांडपाणी थेट पंचगंगा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. इचलकरंजी शहराबरोबरच परिसरातील उद्योगांचे सांडपाणीही मिसळत असल्याने पंचगंगेतील पाण्याला काळसर रंग आला आहे. इचलकरंजीपासून तेरवाड बंधाऱ्यापर्यंत नदीपात्रात जलपर्णी पसरली आहे. प्रदूषणामुळे मासे मृत होऊन पाण्यावर तरंगत आहेत. नदी प्रदूषणामुळे शिरोळ तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्यास धोका वाढला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे शिरोळ तालुक्यातील तेरवाड बंधाऱ्याचे बरगे काही दिवसांपूर्वी काढण्यात आले होते. मात्र, कोल्हापूर येथून सांडपाणी थेट पंचगंगा नदीत सोडण्यात येत असल्याने पाटबंधारे विभागाने बंधाऱ्यास पुन्हा बरगे घातले आहेत. यामुळे शिरोळ तालुक्यातील नांदणी, धरणगुत्ती, टाकवडे, शिरदवाड, शिरढोण, शिरोळ या गावांना दूषित पाण्याचा फटका बसला आहे. प्रदूषणामुळे नदी परिसरात मोठी दुर्गंधी असून पंचगंगेचे पाणी जनावरेही पित नाहीत अशी स्थिती आहे. दरम्यान, कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी कमी होत असल्याने बुधवारपासून शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्यास बरगे घालण्याचे काम पाटबंधारे विभागाने हाती घेतले. शनिवारपर्यंत हे काम पूर्ण होईल असे कर्मचाऱ्यानी सांगितले. शुक्रवारी येथील पाण्याची पातळी सात फूट इतकी होती.

नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी हवे. मात्र, कोल्हापूर व इचलकरंजी पालिकेकडून पंचगंगेचे प्रदूषण टाळण्यासाठी योग्य उपाययोजना होत नाहीत. प्रदूषण नियंत्रण मंडळही गांधारीची भूमिका घेते. यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी पुन्हा एकदा आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात येईल.

-विश्वास बालिघाटे, स्वाभिमानी संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


१५६ कोटींची विक्रीकरात वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विभागीय विक्रीकर कार्यालयाने गेल्यावर्षाच्या तुलनेत १५६ कोटी रुपयांचा जादा विक्रीकर गोळा केला आहे. मात्र, कार्यालयाला दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत ६१ कोटी ९१ लाख विक्रीकर जमा करता आलेला नाही. कोल्हापूर जिल्ह्याने मात्र उद्दिष्टापेक्षा १८ कोटी रुपयांचा जादा विक्रीकर जमा केला असून सांगली, सातारा, रत्नागिरी व सिधुदुर्ग हे जिल्हे उद्दिष्ट गाठण्यात कमी पडले आहे.

कोल्हापुरातील विभागीय विक्रीकर कार्यालयाच्या कक्षेत कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे जिल्हे येतात. या कार्यालयातून महाराष्ट्र व्हॅट, सेंट्रल सेल्स टॅक्स, ऊस खरेदी कर, व्यवसाय कर, सेवा कर अशा विविध करांची वसुली, नियमनाचे कामकाज चालते. विभागीय कार्यालयाला २०१३-१४ या आर्थिक वर्षात विक्रीकराचे १७९० कोटींचे उद्दिष्ट दिले होते. प्रत्यक्षात १७२२ कोटी रुपये जमा झाले. २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी १९४१ कोटी रुपये विक्रीकर जमा करण्याचे मोठे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात ३१ मार्चअखेर १८७९ कोटी रुपये विक्रीकर जमा झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्याला ८५३ कोटी ३५ लाख रुपयांचे उद्दिष्ट होते. कोल्हापूर जिल्ह्यातून उद्दिष्टापेक्षा १८ कोटी रुपये अधिक विक्रीकर जमा झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून एकूण ८७१ कोटी ८३ लाख रुपये जमा झाले आहे.

सांगली जिल्ह्याला ४६० कोटी ३९ लाख रुपयांचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात ४०८ कोटी ६६ लाख रुपये विक्रीकर जमा झाला आहे. उद्दिष्टांपेक्षा ५१ कोटी ७३ लाख रुपये कमी जमा झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर उतरल्याने राज्य सरकारने ऊस खरेदी कर माफ केला. त्यामुळे या कराच्या रुपाने होणारा ३० कोटी रुपये कर जमा झाला नाही. सातारा जिल्ह्यातून ३७८ कोटी ७३ लाख रुपये विक्रीकर जमा झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तर तुम्ही नोकऱ्या सोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तीन महिन्यांच्या थकीत पगारासाठी महापालिकेच्या दारात आलेल्या केएमटीच्या कर्मचाऱ्यांना प्रशासनाच्या असंवेदनशीलपणाचा अनुभव शुक्रवारी आला. 'आमच्या हक्काच्या कामाचे पैसे मिळाले पाहिजेत, पगार दिला पाहिजे' असे आक्रमकपणे बोलणाऱ्या कर्मचाऱ्यांना 'हमरीतुमरी करून, तावातावाने बोलून काही होणार नाही. तुम्हाला जमत नसेल तर नोकऱ्या सोडा. केएमटी बंद करणार असाल तर करा' असे उत्तर उपायुक्त अश्विनी वाघमळे यांनी दिल्याने कर्मचाऱ्यांना धक्का बसला. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या पगारावरून महापालिकेतील काही पदाधिकाऱ्यांनी राजकारण करण्याचा प्रयत्नही केला.

केएमटी कर्मचाऱ्यांना सप्टेंबर २०१४ आणि फेब्रुवारी-मार्च २०१५ या तीन महिन्यांचा पगार मिळालेला नाही. थकीत वेतनासाठी शुक्रवारी २०० कर्मचारी महापालिकेत दाखल झाले. आयुक्त उपस्थित नसल्याने कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने उपायुक्त अश्विनी वाघमळे यांची भेट घेतली. शिष्टमंडळातील रवींद्र इंगवले, राजू निगवेकर, आनंदा आडके, निलेश डोईफोडे, सचिन गवळी आदी कर्मचाऱ्यांनी उपायुक्तांसमोर थकीत पगारामुळे भेडसावणाऱ्या समस्य मांडल्या.

यावेळी उपायुक्त वाघमळे म्हणाल्या 'केएमटी सध्या तोटात आहे. अर्थसंकल्पात साडेतीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे. निधी उपलब्ध झाला की, पगार दिला जाईल. पगारासाठी आम्हीही प्रयत्नशील आहोत'. यावेळी कर्मचाऱ्यांनी 'काम करूनही पगार मिळाला नाही तर कुटुंबांचा गाडा कसा हाकणार?' अशी भूमिका मांडली. उपमहापौर मोहन गोंजारे, सभागृह नेते चंद्रकांत घाटगे, राजू पसारे, जहाँगीर पंडत, प्रकाश कुंभार यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला. उपमहापौर गोंजारे यांनी, 'बजेटवर महापौरांची सही झालेली नाही. त्यामुळे पगार होण्यात अडचणी आहेत. तुम्ही महापौरांच्या केबिनसमोर आंदोलन करा' असे कर्मचाऱ्यांना सांगितले.

व्यथा कर्मचाऱ्यांच्या

पगार रखडल्याने कर्मचाऱ्यांच्या विमा पॉलिसी बंद पडल्या आहेत. पोस्टाचे पैसे भरलेले नाहीत. प्रशासनाने, प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम भरली नाही. कर्मचाऱ्यांना हक्काच्या पगारासाठी झगडावे लागत असल्याचे चालक बी. पी. काळे यांनी सांगितले. वर्षभर पगाराच्या तक्रारी आहेत. कुटुंबियांसोबत भाड्याच्या घरात राहतो. नियमित पगार नसल्यामुळे घराचे भाडे थकीत आहे अशी व्यथा कर्मचारी अरविंद पोतदार यांनी मांडली.

सोमवारपर्यंत निर्णय

कर्मचाऱ्यांनी महापौर तृप्ती माळवी यांची भेट घेऊन वस्तु​​स्थिती सांगितली. महापौर माळवी यांनी आयुक्त व परिवहन व्यवस्थापकांशी पगाराबाबत चर्चा करू. सोमवारपर्यंत या संदर्भात निर्णय घेतला जाईल असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांदोलीत ३५ मि.मी. पाऊस

$
0
0

शिराळा : शिराळा तालुक्यात गुरुवारी रात्री जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. चांदोली धरण परिसरात ३५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जोरदार विजा आणि वाऱ्यामुळे काही भागातील वीजपुरवठा रात्रीच खंडीत झाला होता. तो शुक्रवारी दुपारी सुरळीत झाला.

रात्री अचानक पडलेल्या पावसामुळे आणि विजांच्या कडकडाटामुळे लोक रात्रीच रस्त्यावर आले. तासभर पडलेल्या पावसामुळे शेतात पाणी साठले, लहान ओढे नाले भरून वाहू लागले होते. काही ठिकाणी झाडांची पडझड झाली तर शिराळा तालुक्याच्या दक्षिण भागात घरांची पडझड झाली. मांगले येथे हरिजन वसाहतीत घरावरील पत्र्याचे छत उडून बाजूला पडल्यामुळे सुमारे ४० हजारांचे नुकसान झाले. घरात झोपलेल्या सुशिला तानाजी मोहिते यांच्या डोक्यात पत्र्याचा तुकडा पडून त्या जखमी झाल्या. मांगले येथील आनंदा महिपती पाटील यांच्या घराशेजारच्या शौचालायावर नारळीचे झाड कोसळल्यामुळे सात हजाराचे नुकसान झाले. मांगले येथील गाव कामगार तलाठी बी. जी. मुलानी यांनी पंचनामा केला आहे.

तालुक्याच्या उत्तर भागातील शिरशी येथे पाच मिलीमीटर सर्वात कमी तर शिराळा शहरात २५ मिलीमीटर तालुक्याच्या दक्षिण भागात मांगले येथे २२ मिलीमीटर तर सागाव येथे ४८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. अचानक पडलेल्या पावसामुळे लोकांची चांगलीच तारांबळ उडाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिराळा, मिरज परिसराला झोडपले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शिराळा, मिरज

सांगली जिल्ह्यातील शिराळा, मिरज आणि जत तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. गुरुवारी रात्री जत तालुक्यात हलका पाऊस झाला. तर शिराळा आणि मिरज परिसरात शुक्रवारी पुन्हा विजांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. पावसामुळे मिरज शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले. पूर्व भागातील ऊस उत्पादक शेतकरी मात्र आजच्या पावसाने सुखावले.

शुक्रवारी सायंकाळी मिरज शहरासह परिसरात पावसाने पुन्हा हजेरी लावली. उन्हाळ्यास सुरुवात झाल्याने व द्राक्षांसह इतर पिकांचा हंगामही संपल्याने कोणतेही नुकसान झालेले नाही. पूर्व भागात ऊसाच्या पिकाला पावसाचे पाणी मिळाल्याने फयदा होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे व रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली. पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले.

ऐतिहासिक कमानीवर वीज कोसळली

मिरजेतील मिरासाहेब दर्गा समोर असलेल्या ऐतिहासिक नगारखान्याच्या इमारतीवर वीज कोसळली. वीजेमुळे इमारतीचे दगड निकळून किरकोळ नुकसान झाले. तर परिसरातील घरांमधील टीव्ही जळाले. विजेच्या आवाजाने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होत. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. शहरात सायंकाळी विजांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. काही वेळात मोठा आवाज करीत दर्ग्यासमोरील नगारखान्याच्या इमारतीवर वीज कोसळली. वीजेमुळे कमानीच्या कोपऱ्यावरील दगड निकळले. यामुळे इमारतीचे किरकोळ नुकसान झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सलोनी कुलकर्णीला बेस्ट एडिटर पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोमंतकीय दिग्दर्शक जितेंद्र शिकेरकर यांच्या कोकणी चित्रपट 'मोर्तू'ला गोवा राज्य चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात तीन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. जितेंद्र शिकेरकर (बेस्ट स्क्रीन प्ले), राजदीप नाईक (बेस्ट अॅक्टर) यांच्यासह दिनेश मेंगडे आणि कोल्हापूरच्या सलोनी कुलकर्णीला 'बेस्ट एडिटिंग'साठीचा पुरस्कार मिळाला.

अंत्यसंस्काराचे विडंबन शैलीत विवेचन केलेला 'मोर्तू' सिनेमा गोमंतकीय पार्श्वभूमीवर तयार करण्यात आला आहे. कोल्हापुरातील मुली फिल्म इंडस्ट्रीमधील करिअरकडे केवळ 'स्टार' होण्याची पायरी म्हणून पाहत नाहीत; तर त्या फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीमधल्या प्रत्येक प्रांतात आपला वेगळा ठसा उमटवत आहेत. त्याच परंपरेतील सलोनी कुलकर्णीचा उल्लेख करावा लागेल. फिल्म एडिटिंगमध्ये तिचा हातखंडा असल्यामुळे तिला याच क्षेत्रात नावलौकिक मिळवायचा आहे. मुंबईतील रहेजा स्कूल ऑफ आर्टमध्ये 'जीडी आर्ट' शिक्षण पूर्ण होताच ती एडिटिंगच्या क्षेत्रात आली. अनेक नामांकित एडिटर्सची ती सहायक म्हणून काम करत आहे. आजवर अनेक हिंदी व मराठी चित्रपटांसाठी एडिटिंग केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images