Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

दरोडाप्रकरणी तपास शून्यच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

येथील के. व्ही. पालनकर सराफी दुकानावरील दरोड्याला ३६ तास उलटून गेले तरी तपासात कोणतीही प्रगती झालेली नाही. केवळ तपास सुरु आहे, अशी मोघम उत्तरे पोलिसांकडून मिळत आहेत. दाते मळा येथील पालनकर यांच्या सराफी दुकानावर शनिवारी पहाटेच्या सुमारास धाडसी दरोडा टाकण्यात आला. सुरक्षा रक्षकाला बंदूक व चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी संपूर्ण दुकान साफ केले. दरोड्यानंतर तब्बल तीन तासानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केल्याने कोणत्याही प्रकारचे धागे दोरे त्यांच्या हाती लागले नाहीत. कमलाकर पालनकर यांनी शनिवारी दुपारनंतर गावभाग पोलिस ठाण्यात रितसर फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. सुमारे पाच कोटींच्या दरोडा प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रज्ञा देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तर दरोड्याप्रकरणी काहीजणांची पोलिसांनी चौकशी केल्याचे समजते. मात्र अधिकृत माहिती मिळू शकली नाही. पालनकर यांच्या दुकानातील कामगारांचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला असून त्यांच्यावर करडी नजर राहणार आहे. एक कामगार गेल्या काही दिवसांपासून सुटीवर आहे. तो परराज्यात गेल्याने त्याच्याशीही पोलिसांनी संपर्क केल्याचे समजते. दरम्यान, दरोडा प्रकरणातील तपासासाठी पोलिसांची पथके कर्नाटक राज्यात रवाना करण्यात आली होती. या पथकाच्या हाती महत्वाचे काहीच न लागल्यामुळे ते माघारी परतले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोनाळीचा तलाव गाळात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

सोनाळी (ता.कागल) येथील ७० एकरातील पाझर तलाव अक्षरश: गाळात गेला आहे. पाटबंधारे विभागाने १९७२ पासून केवळ शेतकरी आणि ग्रामपंचायतीकडून पाणीपट्टी वसूल करण्याशिवाय काहीही केलेले नाही. आता गारवेल आणि गाळामुळे 'क' वर्ग पर्यटन क्षेत्रात समावेश असलेल्या या तलावाच्या दुरवस्थेमुळे पिराचीवाडी व सोनाळी गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनणार असून सुमारे ४०० एकरच्यावर शेती पाण्याअभावी धोक्यात येणार आहे.

१९७२ साली बांधलेल्या या तलावात सध्या केवळ ५ ते ७ फूटच पाणीसाठा आहे. गारवेलने तलावाचे क्षेत्र व्यापले असून पाणी सोडण्याच्या जॅकवेलचीही पडझड झाली आहे. सुरुवातीला चार कि.मी.परिसरातील ३०० एकर जमीन ओलीताखाली होती. मात्र सध्या या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून तलावाची पूर्णतः दुरवस्था झाली आहे. चौकीदार रहाण्याच्या इमारतीची मोठी पडझड झाली आहे. संरक्षक कठड्यावरती झाडे उगवली असल्याने बंधाऱ्यालाच धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तलाव पाण्याने भरण्याऐवजी तो गाळानेच भरला असल्याने केवळ ५ ते ६ फूट इतकीच पाण्याची पातळी आहे. त्यातच इतक्या कमी पाण्यातही जनावरे, कपडे धुणे,मासेमारी यामुळे पाण्याची दुर्गंधी वाढली आहे. याच तलावातून सोनाळी व पिराचीवाडी गावासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भिती व्यक्त होत आहे. तर या तलावात गाळामुळे पाणीसाठी कमी होत असल्याने ऐन उन्हाळ्यात दोन गावांना पाणीटंचाई जाणवण्याची दाट शक्यता आहे.

या तलावाचा परिसर निसर्गसंपन्नेतेने नटलेला होता. त्यावेळी शाळांच्या सहली,पर्यटकांची येथे मोठ्या प्रमाणात ये-जा होत असे. पर्यटकांना आर्कषित करणारा हा तलावा आता मात्र समस्याच्या गर्तेत सापडला आहे. दोन वर्षांपूर्वी बांधकाम, दुरुस्ती आणि सुशोभिकरणासाठी या तलावाचा समावेश सरकारने 'क' वर्ग पर्यटनामध्ये केला होता. मात्र आजपर्यत सरकारनेही या कामावर एक रुपया देखील खर्च केलेला नाही. या उलट लघु पाटबंधारे विभाग ग्रामपंचायतीकडून दरवर्षी १८ हजारांची पाणीपट्टी वसूल करते. शिवाय शेतकऱ्यांकडूनही नियमानुसार पाणीपट्टी वसूल केली जातेच. मात्र कोणत्याही प्रकारच्या सुविधा मात्र दिल्या जात नाहीत.

एक टक्कादेखील सहकार्य न करता पाटबंधारे विभागाने तलावाकडे जाणविपूर्वक दुर्लक्षच केले आहे. वारंवार समस्यांची जाणीव करुन देऊनही या विभागाने मनमानीच केली आहे. तलावाची दुरुस्ती झाल्यास उत्कृष्ट पर्यटनस्थळ म्हणून जिल्ह्यात नावलौकीक होवू शकतो.

-सत्यजित पाटील,

सरपंच, सोनाळी

पुढील महिन्यात सरकारकडे तलावातील गाळ काढणे व दुरुस्तीसाठी इस्टिमेट पाठवणार आहे. शेतीसाठी गरज असणाऱ्या लोकांनी स्वत:हून गाळ काढून नेल्यास आमची काहीच हरकत नाही. मात्र 'क' वर्गच्या निधीबाबत आपणास माहिती नाही.

-गोविंद भोसले, शाखाधिकारी, पाटबंधारे विभाग, निढोरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीचे उत्तरकार्य वृद्ध सेवाअाश्रमात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पत्नीच्या निधनाचे दुःख सहन करत, पत्नीने जपलेल्या सामाजिक बांध‌िलकी जपण्यासाठी पत्नीचे उत्तरकार्य शिपुगडे तालमीचे अध्यक्ष अमोल डांगे यांनी वृद्धाश्रमात करून एक नवीन पायंडा पाडला. अर्बन बँकेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्यावर अमोल डांगे व त्यांच्या पत्नी पुष्पा डांगे यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला होता. डांगे दाम्पत्य सामाजिक कार्यात अग्रेसर असले तरी ते विज्ञानवादी दृष्टीकोन जपत असे. निवडणुकीतील माघारीपूर्वी पुष्पा डांगे यांचे १७ मार्चला हृदयविकाराने निधन झाले. त्यामुळे अमोल डांगे यांनीही निवडणुकीतून माघार घेतली.

अमोल डांगे यांनी पत्नीचे उत्तरकार्य पै-पाहुण्यांबरोबर करताना गरीबांना मदतीचा निर्णय घेण्यात आला. दोन मुली व मुलग्याने त्यांच्या निर्णयाला पाठींबा दिला. ज्या संस्था लोकांच्या देणगीवर वृध्दांची सेवा करतात अशा संस्थांना मदतीचा निर्णय डांगे कुटुंबीयांनी घेतला. चोकाक येथील शेवंताबाई शिंदे या वृध्दा महिला वृद्धाश्रम चालवतात अशी माहिती डांगे यांना समजली. ज्या वृध्दांना लकवा मारला आहे अशा वृध्दांची सेवा शिंदे यांच्या वृद्धाश्रमात केली जात असल्याची माहिती डांगे यांनी समजली. वैशिष्ट्य म्हणजे ज्यांनी वृद्धाश्रमाची स्थापना केली आहे त्या शेवंताबाईंनाही लकवा मारला असतानाही त्या संस्था चालवत असल्याने डांगे कुटुंबियांनी शिंदे यांच्या वृद्धाश्रमाला मदतीचा निर्णय घेतला.

डांगे यांनी पत्नीच्या उत्तरकार्यासाठी केवळ पाहुणे व नातलगांना बोलावले. तसेच शिंदे यांच्या वृद्धाश्रमाला ५० किलो तांदूळ, वीस किलो रवा, २० किलो साखर, तेलाचा डबा, बटाटा, कांदे, मसाले असे साहित्य दिले. या साहित्यातून किमान आठ दिवस वृद्धाश्रमातील मंडळींना जेवण मिळणार आहे. या वृद्धाश्रमात लकवा मारलेले १२ रूग्ण आहेत. वृद्धाश्रमाला मदत केल्यावर पत्नीचे दुःखही विसरून गेलो असे अमोल डांगे यांनी सांगितले. लकवा मारलेल्या वृध्दांची सेवा करण्याचे काम अतिशय अवघड असल्याने यापुढे या वृद्धाश्रमाला जमेल तशी मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अमोल डांगे सार्वजनिक बांधकाम शाखेत अभियंता आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्रतिटन ५०० रुपये अनुदान द्या’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'खुल्या बाजारात साखरेचे ढासळत असलेल्या दरामुळे ऊस उत्पादकांना एफआरपी रक्कम देणे हे सहकारी साखर कारखान्यांना आर्थिकदृष्ट्या अडचणीचे झाले आहे. साखर उद्योगाला उभारी देण्यासाठी टनाला पाचशे रुपयांचे अनुदान द्यावे,' अशी मागणी आमदार चंद्रदीप नरके यांनी विधानसभेत केली. तसेच राज्यामध्ये शिल्लक असलेल्या ३१०० रुपये प्रती क्विंटल दर देण्याचीही मागणी केली.

आमदार नरके यांनी २९३ अन्वये ऊस दर आणि अनुदानाचा प्रश्न उपस्थित केले. देशातील व राज्यातील ऊस उत्पादक व साखर कारखानदारी अभूतपूर्व संकटात सापडला आहे. गेल्या वर्षाच्या गळीत हंगामात देशात २४३ तर राज्यात ७७ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. तर यावर्षी ३०० लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. शिल्लक असणारी व चालू हंगामात उत्पादीत होणाऱ्या साखरेपैकी ८४ लाख साखर पुढील हंगामापूर्वी शिल्लक राहणार आहे. केंद्र सरकारच्या कायद्याप्रमाणे कारखान्यांना एफआरपी नुसार २२०० ते २६७५ रुपये प्रतीटन दर द्यावा लागणार आहे. एफआरपी ठरवताना कृषी मुल्य आयोगाने बाजारातील साखरेचा दर ३१०० रुपये पकडला होता. मात्र सध्या साखरेचा दर २२०० रुपयांपर्यंत घसरला असल्याने ऊस उत्पादकांना दर देण्यास अडचणी निर्माण होत आहेत. ५०० ते ८०० रुपये अनुदान टनामागे दिले नाही, तर सर्व साखर कारखाने शॉर्टमार्जिनमध्ये येऊन कोट्यवधींचा तोटा होणार आहे. अनुदान लवकर मिळाले नाही, तर जानेवारीपासूनची शेतकऱ्यांची बिले थकीत जाण्याची दाट शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ता झाला, पण चेंबर उघडेच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वाय. पी. पोवारनगर ते जवाहरनगर चौकादरम्यानच्या रस्त्याचे डांबरीकरण जवळपास दहा ते बारा वर्षांनी करण्यात आले. वाहनधारक, पादचाऱ्यांची चांगली सोय झाली, परंतु अद्यापही या रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथ आणि चेंबर्सवर झाकणे बसविलेली नाहीत. त्यामुळे पादचाऱ्यांसाठी रस्ता धोकादायक ठरत आहे. याच परिसरातून जाणाऱ्या शास्त्रीनगर रस्त्याची मात्र चाळण झाली आहे. सुभाषनगर ते जवाहनगर रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे.

आरके नगरकडून शहरात येणारा सुभाषनगर ते वाय. पी. पोवारनगर हा जवळचा रस्ता आहे. त्यामुळे रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. अनेक वर्षांनंतर जवाहरनगर चौकापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. गटारीसाठी प्रत्येक ‌ठिकाणी दोन्ही बाजूस चेंबर्स बांधले आहेत. त्यावर झाकणे बसविलेली नाहीत. घरे आणि रस्त्याच्या मध्येच असे चेंबर्स असल्यामुळे लहान मुलांसाठी ते धोकादायक आहेत. शिवाय तेथे सूचना देणारा फलकही लावलेला नाही. चेंबर्स रस्त्याच्या उंचीबरोबरच असल्यामुळे अनेकदा ते लोकांच्या लक्षातच येत नाही. या चेंबर्सची खोली तीन ते पाच फूट असल्यामुळे धोका जास्त आहे. त्यामुळे महापालिकेने ही अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी या परिसरातील नागरिक करत आहेत.

शास्त्रीनगरकडे जाणारा रस्ताही दुर्लक्षित आहे. या परिसरातील हॉस्पिटलकडू रुग्ण नेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. खराब रस्त्यामुळे अनेक रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार होत आहे. या मार्गावरून वाहन चालवताना अक्षरशः कसरत करावी लागते.

मुख्य रस्तेही डांबरीकरण आणि गटर कामासाठी उकरले आहेत. अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. याच रस्त्यांतून वाट काढत नागरिकांना प्रवास करावा लागतो. रस्त्यातील खड्ड्यात साचलेले गटारीचे पाणी आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूस पसरलेल्या मातीमुळे या भागातील रस्ते धोकादायक झाले आहेत.

गेल्या दहा ते बारा वर्षांपासून

वाय. पी. पोवारनगर ते जवाहनगर हा रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत होता. आता कुठे हा रस्ता पूर्ण होत आहे. मात्र अजूनही गटारींसाठी बांधलेले चेंबर्स खुलेच आहेत. त्यामुळे अपघाताची शक्य नाकारता येत नाही. लहान मुले आणि वृद्धांना हा धोका मोठ्या प्रमाणात आहे. स्थानिक नगरसेवकांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

- सुमन पाटील, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भर रस्त्यात ट्रक उलटून दीड लाखाचे नुकसान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुक्त सैनिक वसाहतीजवळ ट्रक उलटून झालेल्या अपघातात दीड लाखाचे नुकसान झाले. सकाळी सव्वा नऊच्या सुमारास अपघात झाला. ट्रकचालक दीपक माळी (रा. सांगली) लक्ष्मीपुरी येथून जनावरांचे खाद्य असलेला कोंडा घेऊन ट्रकने सांगलीकडे जात होते. मुक्तसैनिक वसाहतीजवळ स्पीड ब्रेकरवर त्यांचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला. ट्रक रस्त्यांवर आडवा पडला. चालक दीपक माळी केबिनमधून सुखरूप बाहेर पडला. या अपघातात कुणीही जखमी झाले नाही, पण ट्रक रस्त्यावर आडवा झाल्याने काही काळ वाहतूक खोळंबली होती. अपघातस्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. अर्धा तासाने ट्रक क्रेनने हटवण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरवापसीचे ढोंग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

'स्वातंत्र्यानंतर धर्मांतर केलेल्यांना परत बोलावण्यासाठी सध्याच्या केंद्र सरकारमध्ये बसलेल्यांच्या बगलबच्च्यांचे घरवापसी अभियान सुरू असले तरी घरी परत बोलावल्यानंतर त्यांना तुम्ही कोणत्या जातीत टाकणार याप्रश्नाचे उत्तर द्या. पण याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. कारण हे लबाड लांडग्यांचे ढोंग आहे. कारण हजारो वर्षे मारून-मुटकून हिंदू धर्माचा शिक्का मारून अस्पृश्यतेच्या चिखलात कुजत ठेवलेल्यांना बाहेर काढून स्वाभिमानाने जगण्याची संधी देणाऱ्या त्यांच्या न्याय्य अशा धम्मात परत नेण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ मध्ये बौध्द धम्मदिक्षेतून केले. म्हणूनच सध्याचे घरवापसी अभियान हे डॉ. बाबासाहेबांच्या बौध्द धम्मदिक्षेचीच नक्कल असल्याचे प्रतिपादन आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी आजरा येथे केले.

आजरा, चंदगड, गडहिंग्लज व भुदरगड तालुक्याच्या चौथ्या बौध्द धम्म परिषदेचे आयोजन येथील जुन्या कोर्टाच्या प्रांगणात करण्यात आले होते. त्यावेळी प्रा. कवाडे 'मनुस्मृती की भारतीय संविधान' या विषयाच्या अनुषंगाने बोलत होते. भदन्त यश काश्यपायन महाथेरो (जयसिंगपूर) परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते. भदन्त आर. आनंद (हुपरी) यांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन झाले.

भदन्त धम्मानंद, भदन्त मोगलीतीस्स यांच्यासह अध्यक्ष भदत्न महाथेरो यांचेही यावेळी भाषण झाले. यावेळी 'बौध्द धम्मासाठी क्रांतीची गरज' या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्राचार्य हरिष भालेराव, प्रा. अमर कांबळे, डॉ. सिध्दार्थ जोंधळे, डॉ. सुरज पवार, मल्लेश चौगुले, सुनील तलवारे, भरतकुमार शेळके, विजयकुमार गायकवाड, रवि राजपुते, प्रा. शहाजी कांबळे, राजाभाऊ शिरगुप्पे आदी उपस्थित होते. भदन्त एस. संबोधी यांनी परिषदेचे नियोजन केले.

देशाची अखंडता कायम

प्रा. कवाडे म्हणाले, 'मनुस्मृती आणि संविधानातील फरक म्हणजे एक नरक तर दुसरा स्वर्ग असाच करावा लागेल. केवळ भारतीयांच्याच नव्हे तर अखिल विश्वाच्या मुक्तीची घोषणा करणारा ग्रंथ म्हणूनच भारतीय संविधानाची निर्मिती बाबासाहेबांनी केली. अशा संविधानाची बरोबरी करणारा ग्रंथ जगात दुसरा नाही. येथील समाज व्यवस्थेत जनावरांना सन्मान होता पण अस्पृश्यांना नव्हता. याचा बदला म्हणून बाबासाहेबांनी संपूर्ण दलित समाजाला कोणत्यातरी धर्मात नेले असते, तर भारतापासून तीनच नव्हे तर चार राष्ट्रे निर्माण झाली असती. पण संविधानाच्या निर्मितीबरोबरच धम्मदिक्षेतून बाबासाहेबांनी या देशाची अखंडता कायम ठेवली.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंदिरातील शिल्पाकृतींना धोका

$
0
0

अनुराधा कदम, कोल्हापूर

अंबाबाई मंदिरातील दगडी बांधकामाला पडलेल्या चऱ्यांमधून उगवलेली झुडपे, दगडी पारांमध्येच लोखंडी जिन्याचे केलेले फिटिंग, काही छोट्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर रंगवलेला ऑइलपेंट यामुळे अंबाबाई मंदिराच्या भक्कमपणाला धक्का लागण्याचे संकेत दिसत आहेत. चारही प्रवेशद्वारी पोलिस उभे करून आणि मेटल डिटेक्टर दरवाजातून भाविकांची तपासणी करून मंदिराचे एका अर्थी संरक्षण असले तरी पुराणवास्तू म्हणून मंदिर बांधकामातील एकाही दगडाची पकड ढिली होणार नाही यासाठी मंदिरावर संरक्षण कवच देण्याची गरज आहे.

रामाचा पारकट्टा कठडा ढासळला आणि अंबाबाई मंदिरातील हेमाडपंथी भक्कम बांधकामालाही पोखरत असलेल्या गोष्टी समोर आल्या. शिल्पाकृतींमधील आकृत्या पुसट होण्यापासून ते कमानीवर कोरलेल्या हत्ती, खांब यांचा काही भाग तुटला आहे. पूर्वदरवाजाच्या आतील भागात दर्शनरांगेसाठी केलेला लोखंडी जिना थेट वडाच्या झाडाच्या दगडी पारावरच लावल्यामुळे पाराला भेग पडली आहे. काही दिवसात या पाराची अवस्थाही रामाच्या पारासारखी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोखंडी जिन्यामुळे कठड्याला भेग

पूर्वदरवाजा हा सध्या अंबाबाई मंदिराचा प्रमुख दर्शनमार्ग बनला आहे. विशेषत: पर्यटक भाविक याच मार्गाने देवीच्या दर्शनासाठी येतात. त्यामुळे या प्रवेशद्वारालगत डाव्याबाजूला असलेल्या दगडी पारावरच लोखंडी जिना लावण्यात आला आहे, जो दगडी पारावर कायमस्वरूपी बसवण्यता आला आहे. त्यामुळे दगडी कठड्याला भेग पडली आहे. नवरात्रकाळात या जिन्यावर एकावेळी किमान तीनशे ते चारशे भाविक उभे असतात. त्यामुळे भविष्यात हा दगडी कठडा कमकुवत होण्याची दाट शक्यता आहे.

चऱ्यांमध्ये झुडपे

अंबाबाई मंदिरातील विविध दगडी कमानींमधील चऱ्यांमध्ये झुडपे उगवली आहेत. सुरूवातीला लहान असलेल्या या झुडपांच्या पूर्णवाढीनंतर त्याचा धोका मंदिराच्या कमानीला ठिसूळ बनवू शकतात. त्यामुळे वेळीच अशी झुडपे काढून टाकली पाहिजेत. मात्र सध्या विद्यापीठ हायस्कूल समोरील जी मंदिराची बाजू आहे त्या छतावर वाढलेल्या झुडपांमुळे धोका निर्माण झाला आहे.

रामाचा पार छत्रपती ट्रस्टच्या मालकीचा

अंबाबाई मंदिरातील रामाचा पार हा दगडी कठडा ढासळल्यानंतर त्याच्या दुरुस्तीसाठी पुरातत्व विभागाच्या परवानगीचा मुद्दा पुढे आला. अंबाबाई मंदिर हेरिटेज असल्यामुळे पुरातत्व विभागाच्या परवानगीनेच दुरूस्ती होईल असे देवस्थान व्यवस्थापन समितीने सांगितले. मात्र हा पारकट्टा छत्रपती शाहू चॅरिटेबल ट्रस्टच्या मालकीचा असून या कठड्याची डागडुजी ट्रस्टमार्फत केली जाईल असे पत्र ट्रस्टने देवस्थान समितीला दिले आहे.

पाण्याचा निचरा व्हावा

मंदिराच्या आवारात ज्या ठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, त्याठिकाणी पाण्याचा निचरा योग्यप्रकारे होत नसल्यामुळे शेवाळ साठून दगडी फरशी कमकुवत होत आहे. त्यासाठी पाण्याच्या टाकीजवळील दगडी फरशी लवकरात लवकर कोरडी होईल अशापद्धतीने ढाळ ठेवण्याची गरज आहे. सतत ओलावा राहिल्याने शेवाळ साठण्याची शक्यता आहे ज्याचा परिणाम मंदिरातील भक्कमपणाला ठिसूळ करण्यावर होऊ शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वाभिमानीच्या विरोधात महाआघाडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक पतसंस्थेतील एकाधिकारी, हुकूमशाही प्रवृत्तीच्या विरोधात सहा ते सात संघटनांनी एकत्र येऊन राजर्षी शाहू परिवर्तन आघाडी स्थापन केली आहे. सध्या सत्तारुढ सुशिक्षित सावकारांच्याकडून लुबाडणूक सुरु आहे. सुकाणू समितीकडून उमेदवारांची निवड करेल, ही माहिती महाआघाडीचे एम. एम. गळदगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गळदगे म्हणाले, संस्थाचालक, शिक्षकेतर संघटना, सत्तारुढ आघाडीतील विद्यमान सात संचालकांची मिळून राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीची स्थापना केली आहे. सभासदांच्या मागणीनुसारच आघाडी स्थापन केली आहे. परिवर्तन आणि लोकशाही आघाडीचे सर्व कार्यकर्ते सत्ताधारी स्वाभिमानी सहकार आघाडीच्या विरोधात एकत्र आले आहेत. या पॅनेलमध्ये सर्वच संघटनाच्या प्रमुखांना विश्वासात घेऊन सुकाणू समितीची स्थापना केली आहे. सुकाणू समितीने काही निकष ठरविले आहेत. त्यानुसारच उमेदवारांची निवड आणि कार्यपद्धती राहणार आहे. हा लढा पतसंस्थेतील कोणा एका व्यक्तिविरुद्ध नसून भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या विरोधात आहे. सत्तारुढ पॅनेलकडून वाढीव व्याजदरामुळे गरजू कर्जदारांची सुशिक्षित सावकारांच्याकडून लुबाडणूक सुरु आहे. ही लूबाडणूक थांबविण्यासाठी महाआघाडी एकत्रित आली आहे. गेली कित्येक वर्षे सभासदांच्या मनात असलेले परिवर्तन निश्चितच या निवडणुकीत घडणार आहे. महाआघाडीची सत्ता आल्यास ठेवी आणि कर्जे व्याजदरात समतोल ठेवला जाईल. पतसंस्थेच्या प्रगतीसाठी समान किमान कार्यक्रम तयार केला जाईल.

पत्रकार परिषदेस राम पाटील, शिवाजीराव सावंत, शिवाजीराव चौगले, शिक्षकेतर संघटनेचे गणपतराव बागडी, संस्थाचालक संघटनेचे जयंत आसगांवकर, धर्माजी सायनेकर, बाबा पाटील, दत्ता पाटील, पंडित पवार, बी. डी. पाटील, एस. जी. तोडकर, राजेंद्र रानमाळे, संजय पाटील, राजेश वरक, राजाराम बरगे, जी. ए. पाटील, शहाजी पाटील, सुलोचना कोळी, सुरेश खोत संचालक एस. एस. कलागते, एस. टी. संकपाळ, जे. ए. भास्कर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बजेटमधून दिलासा?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. ३०) सादर केल्या जाणाऱ्या बजेटमधून ​कसलीही करवाढ न करता स्वभांडवलातून नवीन योजना, काही जुन्या प्रकल्पांच्या पूर्ततेचे प्रयत्न अशा दिलासादायक निर्णयांची अपेक्षा आहे. पाच वर्षांत सरकारी मदतीवर भरपूर योजनांना प्रारंभ झाला. पण स्वनिधीतून काही प्रकल्प निवडणुकी अगोदर कार्यरत करण्याचे प्रयत्न या बजेटमधून केले जाण्याची शक्यता आहे. यंदाच्या सभागृहातील हे शेवटचे बजेट असल्याने नगरसेवकांनाही खूष करण्यासाठी भरघोस ऐच्छिक निधी दिला जाण्याची शक्यता आहे. महापौर व नगरसेवकांमध्ये गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या वादाचे पडसाद बजेटच्या या सभेवर होण्याची शक्यता कमी आहे.

घोडेबाजाराला रोखण्याच्यादृष्टीने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी २०१० ची निवडणूक चिन्हांवर लढवली. त्याचा परिणामही झाला. त्याचबरोबर राज्यात या पक्षांची सत्ता असल्याने शहराला मोठा निधी मिळाला. पण त्यात कोणत्या ना कोणत्या पातळीवर अडथळे आल्याने विविध प्रकल्प पूर्ण होऊ शकले नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवर सात महिन्यानंतर निवडणूक होणार आहे. शिवसेना व भाजपचे मोठे आव्हान त्यावेळी असेल. त्यामुळे जनतेसमोर जाताना ठोस प्रकल्प घेऊन जाण्याची गरज आहे. हीच गरज पूर्ण करण्याची संधी यावेळच्या बजेटमधून सत्ताधाऱ्यांना मिळाली आहे.

महापालिका प्रशासनाने ३८९ कोटीचे महसुली व भांडवली बजेट स्थायी समितीकडे सादर केले आहे. त्यात स्वभांडवलातून विविध योजनांचा समावेश होण्याची शक्यता आहे. पाच वर्षांत नगरसेवकांना ऐच्छिक निधीची केवळ घोषणा झाली. पण महापालिकेकडील महसुली तुटीत अनेकांना तो निधी मिळाला नाही. त्यामुळे या बजेटकडून नगरसेवकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. प्रत्येक बजेटमध्ये ऐच्छिक निधी पाच लाखापर्यंत दिला जातो. यंदा शेवटचे वर्ष असल्याने यामध्ये वाढ करीत ही मर्यादा सात लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे. हा निधी मिळाल्यास नगरसेवकांना तातडीच्या ​​विकासकामांसाठी वापरला जाण्याची संधी आहे. नगरसेवकांच्यादृष्टीने हा जॅकपॉटच ठरण्याची शक्यता आहे.

भावी पिढीला आकृष्ट करण्याबरोबरच सर्व घटकांना दिलासा देण्याचा प्रयत्न बजेटमध्ये असेल. निवडणुकीच्या तोंडावर शून्य करवाढ हा मोठा दिलासा असेल. पण त्याचबरोबर नजीकच्या पाच महिन्यांत पूर्णत्वाला येतील, अशा योजनांची भेटही बजेटमधून अपेक्षित आहे. काही जुन्या योजनांचा केवळ निधी प्रत्येक वर्षी नवीन बजेटमध्ये पुढे सरकवण्यात येतो. पण आता निवडणुकीपूर्वी या योजना मार्गी कशा लागतील या दृष्टीने शहरवासीयांना अपे​​क्षित आहे. गेल्या महिन्याभरापासून महापौरांच्या विरोधात पदाधिकारी व नगरसेवक एकटवले आहेत. निवडणुकीमुळे सर्वांनाच बजेट ही बाब अत्यावश्यक असल्याने या सभेत राजकारण होण्याची शक्यता दिसत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाभिमानीच्या विरोधात महाआघाडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक पतसंस्थेतील एकाधिकारी, हुकूमशाही प्रवृत्तीच्या विरोधात सहा ते सात संघटनांनी एकत्र येऊन राजर्षी शाहू परिवर्तन आघाडी स्थापन केली आहे. सध्या सत्तारुढ सुशिक्षित सावकारांच्याकडून लुबाडणूक सुरु आहे. सुकाणू समितीकडून उमेदवारांची निवड करेल, ही माहिती महाआघाडीचे एम. एम. गळदगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गळदगे म्हणाले, संस्थाचालक, शिक्षकेतर संघटना, सत्तारुढ आघाडीतील विद्यमान सात संचालकांची मिळून राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीची स्थापना केली आहे. सभासदांच्या मागणीनुसारच आघाडी स्थापन केली आहे. परिवर्तन आणि लोकशाही आघाडीचे सर्व कार्यकर्ते सत्ताधारी स्वाभिमानी सहकार आघाडीच्या विरोधात एकत्र आले आहेत. या पॅनेलमध्ये सर्वच संघटनाच्या प्रमुखांना विश्वासात घेऊन सुकाणू समितीची स्थापना केली आहे. सुकाणू समितीने काही निकष ठरविले आहेत. त्यानुसारच उमेदवारांची निवड आणि कार्यपद्धती राहणार आहे. हा लढा पतसंस्थेतील कोणा एका व्यक्तिविरुद्ध नसून भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या विरोधात आहे. सत्तारुढ पॅनेलकडून वाढीव व्याजदरामुळे गरजू कर्जदारांची सुशिक्षित सावकारांच्याकडून लुबाडणूक सुरु आहे. ही लूबाडणूक थांबविण्यासाठी महाआघाडी एकत्रित आली आहे. गेली कित्येक वर्षे सभासदांच्या मनात असलेले परिवर्तन निश्चितच या निवडणुकीत घडणार आहे. महाआघाडीची सत्ता आल्यास ठेवी आणि कर्जे व्याजदरात समतोल ठेवला जाईल. पतसंस्थेच्या प्रगतीसाठी समान किमान कार्यक्रम तयार केला जाईल.

पत्रकार परिषदेस राम पाटील, शिवाजीराव सावंत, शिवाजीराव चौगले, शिक्षकेतर संघटनेचे गणपतराव बागडी, संस्थाचालक संघटनेचे जयंत आसगांवकर, धर्माजी सायनेकर, बाबा पाटील, दत्ता पाटील, पंडित पवार, बी. डी. पाटील, एस. जी. तोडकर, राजेंद्र रानमाळे, संजय पाटील, राजेश वरक, राजाराम बरगे, जी. ए. पाटील, शहाजी पाटील, सुलोचना कोळी, सुरेश खोत संचालक एस. एस. कलागते, एस. टी. संकपाळ, जे. ए. भास्कर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बजेटमधून दिलासा?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. ३०) सादर केल्या जाणाऱ्या बजेटमधून ​कसलीही करवाढ न करता स्वभांडवलातून नवीन योजना, काही जुन्या प्रकल्पांच्या पूर्ततेचे प्रयत्न अशा दिलासादायक निर्णयांची अपेक्षा आहे. पाच वर्षांत सरकारी मदतीवर भरपूर योजनांना प्रारंभ झाला. पण स्वनिधीतून काही प्रकल्प निवडणुकी अगोदर कार्यरत करण्याचे प्रयत्न या बजेटमधून केले जाण्याची शक्यता आहे. यंदाच्या सभागृहातील हे शेवटचे बजेट असल्याने नगरसेवकांनाही खूष करण्यासाठी भरघोस ऐच्छिक निधी दिला जाण्याची शक्यता आहे. महापौर व नगरसेवकांमध्ये गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या वादाचे पडसाद बजेटच्या या सभेवर होण्याची शक्यता कमी आहे.

घोडेबाजाराला रोखण्याच्यादृष्टीने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी २०१० ची निवडणूक चिन्हांवर लढवली. त्याचा परिणामही झाला. त्याचबरोबर राज्यात या पक्षांची सत्ता असल्याने शहराला मोठा निधी मिळाला. पण त्यात कोणत्या ना कोणत्या पातळीवर अडथळे आल्याने विविध प्रकल्प पूर्ण होऊ शकले नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवर सात महिन्यानंतर निवडणूक होणार आहे. शिवसेना व भाजपचे मोठे आव्हान त्यावेळी असेल. त्यामुळे जनतेसमोर जाताना ठोस प्रकल्प घेऊन जाण्याची गरज आहे. हीच गरज पूर्ण करण्याची संधी यावेळच्या बजेटमधून सत्ताधाऱ्यांना मिळाली आहे.

महापालिका प्रशासनाने ३८९ कोटीचे महसुली व भांडवली बजेट स्थायी समितीकडे सादर केले आहे. त्यात स्वभांडवलातून विविध योजनांचा समावेश होण्याची शक्यता आहे. पाच वर्षांत नगरसेवकांना ऐच्छिक निधीची केवळ घोषणा झाली. पण महापालिकेकडील महसुली तुटीत अनेकांना तो निधी मिळाला नाही. त्यामुळे या बजेटकडून नगरसेवकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. प्रत्येक बजेटमध्ये ऐच्छिक निधी पाच लाखापर्यंत दिला जातो. यंदा शेवटचे वर्ष असल्याने यामध्ये वाढ करीत ही मर्यादा सात लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे. हा निधी मिळाल्यास नगरसेवकांना तातडीच्या ​​विकासकामांसाठी वापरला जाण्याची संधी आहे. नगरसेवकांच्यादृष्टीने हा जॅकपॉटच ठरण्याची शक्यता आहे.

भावी पिढीला आकृष्ट करण्याबरोबरच सर्व घटकांना दिलासा देण्याचा प्रयत्न बजेटमध्ये असेल. निवडणुकीच्या तोंडावर शून्य करवाढ हा मोठा दिलासा असेल. पण त्याचबरोबर नजीकच्या पाच महिन्यांत पूर्णत्वाला येतील, अशा योजनांची भेटही बजेटमधून अपेक्षित आहे. काही जुन्या योजनांचा केवळ निधी प्रत्येक वर्षी नवीन बजेटमध्ये पुढे सरकवण्यात येतो. पण आता निवडणुकीपूर्वी या योजना मार्गी कशा लागतील या दृष्टीने शहरवासीयांना अपे​​क्षित आहे. गेल्या महिन्याभरापासून महापौरांच्या विरोधात पदाधिकारी व नगरसेवक एकटवले आहेत. निवडणुकीमुळे सर्वांनाच बजेट ही बाब अत्यावश्यक असल्याने या सभेत राजकारण होण्याची शक्यता दिसत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिरजेतील दरोड्याचा छडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मिरज

मिरजेतील माजी सैनिक वसाहत, विद्यानगर येथे आयकर विभाग व मुंबई पोलिस असल्याचे सागून घरात घुसून टाकलेल्या धाडसी दरोड्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. गुंडा विरोधी पथकाने पिलीव (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथे छापा टाकून नऊ जणांना जेरबंद केले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली चारचाकी गाडी, १ लाख ४० हजार रुपयांची रोकड व २ लाख ७० हजार रुपये किमतीचे सोने हस्तगत केल्याची माहिती पोलिस अधीक्षक दिलीप सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या प्रकरणी पोलिसांनी जेरबंद करण्यात आलेल्यांची नावे अशी, रनजितसिंग लक्ष्मनसिंग रजपूत (वय २६, रा. पिलीव, ता. माळशिरस), धोंडीराम वसंत शिंदे ( वय ३२, रा. दांगट बिल्डींग, सिंहगड रोड, पुणे), सोमनाथ उर्फ गोट्या बाळासो शेलार ( वय २५, रा. नांदोशी, ता. हवेली, जि. पुणे), उमेद रफिक शेख (वय २३, रा. खडकवासला, पुणे), नितीन वसंतराव पारधी (वय २९, रा. नांदेड फाटा, सिंहगड रोड), संतोष तुकाराम गाडे ( वय ३१, रा. बेकराई नगर, जुने हडपसर, पुणे), आरीफ हसनसाब शेख ( वय २६, रा. नावाजी चौक, कोडवा), संतोष विठोबा कोळी ( वय २६, कोल्हेवाडी, सिंहगडरोड, पुणे) अशी आहेत. पोलिसांनी १९ तोळे ३ ग्रॅम शंभर मिली वजनाचे २ लाख ७० हजार पाचशे रुपये किमतीचे सोने, रोख रक्कम १ लाख २४ हजार व दरोड्यासाठी वापरण्यात आलेली दहा लाख रुपये किमतीची एमएच ०६ एएम ००९९ क्रमांकाची चारचाकी गाडी, पन्नास रुपये किमतीची पोलिस काठी असा एकून १३ लाख ९४ हजार ५५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शहरतील विद्या नगर येथे शुक्रवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. अज्ञात दरोडेखोर आयकर विभागाचे व मुंबई क्राईम ब्रांचचे अधिकारी असल्याची बतावणी करीत घरात घुसले. घरातील सदस्यांना मारहाण करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने लुटले. दरोड्यानंतर चोरट्यांनी चारचाकी गाडीतून पोबारा केला. दरोड्याची माहिती मिळताच पोलिस अधिकाऱ्यांनी गुंडा विरोधी पथक, सांगली येथील विशेष पथक, स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा आदींच्या माध्यमातून गतीने तपास सुरू केला. सांगलीच्या गुंडा विरोधी पथक गुन्ह्याचा छडा लावण्यात यशस्वी झाले.

पोलिसांना मिरजेतील विद्यानगर येथीलच राहुल सतीश माने (वय २२) याची चौकशी केली असता, पुण्यातील काही लोकांकरवी हा गुन्हा करण्यात आल्याची माहिती समोर आली. लुटण्यात आलेल्या सोन्याच्या दागिन्यांची माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे वाटणी करण्यात येणार असल्याचीही माहिती मिळाली. गुंडाविरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक बाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जितेंद्र शहाने यांच्या दोन पथकांनी या ठिकाणी छापा टाकून आठ जणांना ताब्यात घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आत्महत्येचा बनाव पोलिसांकडून उघड

$
0
0

कराड : कोयनानगरजवळील बोपोली (ता. पाटण) येथील काजल गुरव या तरुणीने आत्महत्या केल्याचा संशयितांनी पद्धतशीरपणे रचलेला बनाव कोयनानगर पोलिसांनी उघड केला आहे. काजल हिने आत्महत्या केली नसून, आत्महत्या भासविण्यासाठी बेशुद्ध अवस्थेतील काजलच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून देवून खून केल्याची कबुलीच तिची सावत्र आई आशा चंद्रकांत गुरव हिने पोलिसांना दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी काजलची सावत्र आई आशा गुरव हिला पोलिसांनी अटक केली आहे.

कोयना विभागातील बोपोली येथील काजल गुरव हिने गेल्या दहा मार्च रोजी राहत्या घरी स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याची फिर्याद काजलचे वडील चंद्रकांत गुरव यांनी दिली होती. मात्र, या प्रकरणी काजल हिच्या मामाला संशय आल्याने त्यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फिर्याद दाखल करीत काजलचे वडील चंद्रकांत गुरव व मावशी असलेल्या संगीता गुरव या दोघांविरूद्ध तक्रार दिली.

त्यानंतर या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, या गुन्ह्यात सत्य काही वेगळेच असावे, असा संशय काजलच्या मामांना आल्याने त्यांनी कोयनानगर पोलिसांकडे पाठपुरावा सुरूच ठेवला होता. त्यामुळे कोयनानगर पोलिसांनी या प्रकरणाच्या सखोल तपासाला गती देऊन घटनेनंतर अवघ्या २० दिवसांत या गुन्ह्यातील वस्तुस्थिती समोर आणली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुगारप्रकरणी ५५ जणांना जामीन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

सैदापूर (ता. सातारा) येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एकूण ५५ आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्याकडील रोख रकमेसहीत ३८ लाख ६६ हजार १२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत राज्यासह परराज्यातील व्यक्तींचाही समावेश आहे.

सोमवारी सातारा तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सैदापूर येथे बेकायदा जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी राजलक्ष्मी शिवणकर यांनी सातारा तालुका पोलिसांचे एक पथक तयार करून संबंधित ठिकाणी छापा टाकण्यास सांगितले. पोलिसांनी सैदापूर येथे संबंधित ठिकाणी छापा टाकल्यानंतर त्या ठिकाणी दिलीप इरळे यांच्या मालकीच्या इमारतीत मोठ्या प्रमाणात तीन पत्ती जुगार चालू असल्याचे निदर्शनास आले.

संबंधित ठिकाणावरील पोलिसांनी जुगार अड्ड्याचा मालक दिलीप नामदेव इरळे, (मु. सैदापूर, ता. जि. सातारा), हणमंत लक्ष्मण फडतरे, (रा. कोरेगाव), मदन बंडू घोडके (रा. कागल, जि. कोल्हापूर), सैफुद्दीन हमीउद्दीन रहामी (रा. कुडची, जि. बेळगाव), बजरंग हिंदुरांव मोहिते (रा. मसूर, ता. कराड), अनिस समुद्दीन खान (रा. शिरवळ), गोपाळ श्रीवल्लभ धुत (रा. सातारा), राजू रामू राठोड (रा. सैदापूर), अर्जुन मुरलीधर मलजी (रा. सैदापूर), मनोज पामजी वायदंडे (रा. सातारा ), आनंद बाबुराव वासुलकर (रा. तळेगाव दाभाडे), अब्दुल महमंद पठाण (रा. सातारा), सुनिल विश्वास आवळे (रा. मालगाव शिवथर), कपील रामसूर्य अग्रवाल (रा. करंजे), आनंद तानाजी बर्गे (रा. कोरेगाव), विजय दत्तात्रय पडवळ (रा. जकातवाडी), उमाकांत शामराव धस्के (रा. वर्णे), राजेंद्र महादेव पुरोहित (रा. पुणे), सुधीर बिंदेश्वर राऊत (रा. हडपसर पुणे), प्रविण महादेव राऊत (रा. शिरवळ), रविंद्र राजाराम पाटेकर (रा. शिरवळ), अमोल विकास भोसले (रा. सातारा), राजू इकबाल शेख, रा. कोरेगाव, ज्ञानेश्वर सुभराव लोंढे (रा. दत्तनगर पुणे), सुधीर दिलीप सिंग (रा. पुणे), दत्तात्रय ज्ञानोबा शिळीमकर (रा. पुणे), आनंदा दामोदर सणस, युवराज गुलाप्पा शेलूकर (रा. पुणे) आदींसह ५५ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून २९ लाख ५० हजार रुपये किंमतीची १३ वाहने, रोख रक्कम सुमारे ६ लाख ५८ हजार १२५ व साहित्य २ लाख ५८ हजार रुपये असा सुमारे ३८ लाख ६६ हजार १२५ रुपये किंमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. वरील सर्व आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायद्यांर्गत गुन्हा दाखल केले आहेत. सर्व आरोपींची जामिनावर मुक्तता झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वांग-मराठवाडीतून पाणी सोडले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

कराड-पाटण तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या पाटण तालुक्यातील वांग-मराठवाडी धरणातून वांग नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरूवात केली. त्यामुळे वागंनदी पात्र भरून वाहत आहे. त्याचा फायदा नदीकाठावरील शेतीला व गावांना होणार आहे. ऐन उन्हाळ्यात धरण व्यवस्थापनाने पाणी सोडण्याचा निर्णय घेऊन धरणातून पाणी विसर्ग सुरू केल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

सुमारे पावणे तीन टीएमसी क्षमता असणाऱ्या वांग-मराठवाडी धरणाच्या कामाला युती सरकारच्या काळात सुरुवात झाली. सन १९९७साली तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते भूमीपूजन झाले होते. त्यानंतर धरणाचे काम जलदगतीने सुरू होते. 'आधी पुनर्वसन मगच धरण' असे धोरण युती सरकारचे होते. त्यामुळे बुडीत क्षेत्रामध्ये समाविष्ट रेठरेकरवाडी, यादववाडी या गावांचे झपाट्याने पुनर्वसन झाले. त्यातर सन १९९९ साली आघाडी सरकार सत्तेत आले. त्यानंतर मात्र धरणाच्या कामाला कधी गती प्राप्त झालीच नाही. कधी धरणग्रस्तांची आंदोलन तर कधी निधीचा तुटवडा यामध्ये गेली १९ वर्षे धरणाचे काम सुरू असूनही अपूर्णच आहे.

गतवर्षी पावसाळ्याच्या शेवटी म्हणजे दिवाळीच्या दरम्यान धरण व्यवस्थापनाने धरणाचे गेट बंद करून पाणी अडवण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे जलाशयात काहीसा पाणीसाठा करण्यात व्यवस्थापनाला यश आले होते. आता ऐन उन्हाळ्यात साठलेले पाणी व्यवस्थापनाने वांग नदीमध्ये सोडण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे नदीकाठच्या विहिरीमध्ये पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात होत आहे. याचा फायदा नदीकाठच्या गावांतील नळ योजना व लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना होऊ लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उदयनराजेमुक्त सातारा करू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

'छत्रपती जर छत्रपतींसारखे वागले, तरच सभापती सभापतींसारखे वागतील. छत्रपतींना खासदारकी विनासायास मिळाली. फलटणच्या राजघराण्यानेच त्यांना राजकारणात आणले, अन्यथा हे राजकारणात दिसलेच नसते. पंधरा वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत सातारा शहरात साधी एक गटार तरी यांनी बांधलीय का? ज्या प्रमाणे पंतप्रधान मोदींनी काँग्रेसमुक्त देश करण्याचा विडा उचलला, त्याप्रमाणे संबंधित नेतामुक्त जिल्हा करण्यासाठी प्रयत्न करू.' असे आव्हान रामराजे नाईक-निंबाळकर यांनी खासदार उदयनराजे यांना दिले आहे.

विडणी (ता. फलटण) येथे श्रीराम कारखान्याच्या निवडणूक प्रचारसभेत रामराजे बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार व रामराजे यांच्यावर सडकून टीका करणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले यांना रामराजे नाईक-निंबाळकर यांनी रविवारी चांगलेच फटकारले.

'सातारा जिल्ह्यातील विद्यमान खासदार व माजी खासदार यांचा पाण्याशी संबंध फक्त बाटलीपुरताच येतो. ते आज पाणी चोरीची भाषा करीत आहेत. जिल्हा बँकेत शिरण्यासाठी शिवसेनेच्या पालकमंत्र्यांसोबत पॅनेल करण्यासही ते तयार झाले आहेत. ज्यांनी आजपर्यंत बाटलीपुरतेच तोंड उघडले, अशा लोकप्रतिनिधींना यापुढे फलटण-खंडाळा तालुक्यातील एकही मत मिळू देणार नाही,' असा उघड आव्हानही रामराजेंनी उदयनराजेंना दिले. दरम्यान, आता खासदार उदयनराजे त्यांच्यावर काय प्रतिक्रिया देतात याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध अर्जावर अपील

$
0
0

कोल्हापूरः गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी इतर मागास गटातून उमेदवारी दाखल केलेल्या अविनाश तुकाराम पाटील यांनी आपला अर्ज चुकीच्या पद्धतीने अवैध ठरविण्यात आल्याबाबत सहकार उपनिबंधकांकडे अपील दाखल केले आहे. त्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह इतर मागास गटातून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अशा सुमारे ३० जणांना प्रतिवादी करण्यात आले असून यामध्ये विद्यमान संचालकांचाही समावेश आहे.

गोकुळसाठी एकूण २२० उमेदवार रिंगणात आहेत. २४ मार्चला झालेल्या छाननीमध्ये यशवंतराव चव्हाण सहकारी दूध संस्था राशिवडेचे संचालक असलेल्या अविनाश पाटील यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे. याबाबत पाटील यांनी उपनिबंधकांकडे आपला अर्ज वैध ठरविण्यात यावा यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह इतर मागासमधून निवडणूक लढविणाऱ्या सर्वच ३० उमेदवारांना प्रतिवादी केले आहे. याबाबत सहायक निवडणूक अधिकारी यांनी इतर मागासमधून उमेदवारी लढणाऱ्या ३० उमेदवारांना नोटीस काढली असून आपले म्हणणे सहकार उपनिबंधक, मिरज यांच्याकडे १ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता मांडण्याचे आदेश दिले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ८ एप्रिल ही शेवटची तारीख आहे. २७ एप्रिलपासून आजअखेर एकाही उमेदवाराने उमेदवारी मागे घेतलेली नाही. ज्या उमेदवारांनी अजूनही निवडणूक खर्च दिलेला नाही, अशा ४४ उमेदवारांना नोटीस पाठविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गगनबावड्यातून लढणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आठ वर्षानंतर होवू घातलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीची राजकीय समिकरणे जिल्हा दूध संघातील (गोकुळ) राजकीय घाडामोडींवर ठरणार असल्याचे संकेत आहेत. दरम्यान काँग्रेसचे नेते माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केडीसीसीत स्वत:चे स्वतंत्र पॅनल उभे न करता काँग्रेसचे उमेदवार म्हणून गगनबावडा तालुक्यातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

गोकुळमध्ये आमदार महादेवराव महाडिक आणि माजी आमदार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांची सध्या सत्ता आहे. तर दुसरीकडे सध्या प्रशासक असलेल्या केडीसीसीत राष्ट्रवादी काँग्रेसेचे पारडे जड आहे. रविवारी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली, या बैठकीत गोकुळमध्ये काही जागा घेवून सत्तारूढ गटा समवेत रहावे तसेच केडीसीसत काँग्रेसला सोबत घ्यावा, असा सूर व्यक्त झाला. काँग्रेसला निर्णय घेण्यासाठी ५ एप्रिलपर्यंत मुदतही देण्यात आली आहे.

केडीसीसीमध्ये राष्ट्रवादीचे पारडे जड असल्याने मुश्रीफ यांचा प्रस्ताव स्वीकारावा अशी भूमिका काही काँग्रेसच्या नेत्यांची आहे. पण गोकुळमधील काही जागा देण्यासाठी प्रत्यक्षात आमदार महादेवराव महाडिक यांची फारशी मनस्थीती नसल्याचे समजते. सहाजिकच अशा पद्धतीने समझोता करायचा का या संदर्भात आमदार महादेवराव महाडिक यांचीच भूमिका महत्त्वाची असणार आहे.

याबाबत आमदार महादेवराव महाडिक म्हणाले, पी. एन. पाटील आणि माझ्या नेतृत्वाखाली गोकुळची प्रगती झाली आहे. केडीसीसीत काँग्रेसला सोबत घेण्याची भूमिका राष्ट्रवादीची असली तरी त्यात गोकुळमध्ये त्यांना जागा हव्या आहेत. आम्ही या अटीशर्थींसंदर्भात अत्यंत सावधपणे निर्णय घेऊ. केडीसीसीच्या निवडणुकांना तालुकापातळीवर फार महत्त्व आहे.

सर्व नेत्यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मी गगनबावड्यातून निवडणूक लढवणार आहे. केडीसीसीत माझे स्वतंत्र पॅनल देण्याचा विचार नाही.

- सतेज पाटील, माजी गृहराज्यमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोकुळमध्ये राष्ट्रवादी चक्रव्यूहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने कितीही आव आणला तरी त्यांना स्वतंत्र पॅनेल उभे करता येणार नाही. त्यातच पुन्हा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उपकाराच्या ओझ्याखाली दबल्यामुळे सत्ताधाऱ्यांकडे जाऊन एखाद दुसरी जागा मिळवावी की विरोधात सतेज पाटलांना मदत करावी, अशा चक्रव्युहात राष्ट्रवादी सापडली आहे. त्यामुळे त्यांची अवस्था 'ना घर का ना घाट का' अशीच झाल्याचे दिसते.

सहकारातील निवडणुका या सहकार्यानेच लढाव्या लागतात. राजकीय निवडणुकांमध्ये पारडे थोडे कमी जास्त झाले तरी काही ठिकणी त्यामध्ये भर घालून समतोल करता येतो. पण सहकारात सहकाऱ्यांना जीवापाड जपणाऱ्यांनाच मतदारही निवडणुकीच्या काळात जपत असतात. गोकुळच्या निवडणुकीत कायम वर्चस्व ठेवण्यासाठी सत्ताधाऱ्यांची धावपळ सुरू असताना सत्ताधाऱ्यांचा गैरकारभार चव्हाट्यावर आणण्याचा निश्चय विरोधकांनी केला आहे. या परिस्थितीत राष्ट्रवादीची अवस्था दयनीय झाली आहे. नेते एकत्र असले तरी कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.

आमदार महादेवराव महाडिक यांनी महानगरपालिकेत केलेला उघड विरोध आणि सतेज पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत हसन मुश्रीफ यांना केलेली मदत यामुळे मुश्रीफ यांचा सतेज पाटील यांच्यासोबत जाण्याचा विचार असला तरी पुढील कालावधीत बिद्री कारखाना आणि इतर सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीत आमदार महादेवराव महाडिक यांची मदत झाली तरच आपले बस्तान बसेल अन्यथा अनेक अडचणी येतील अशी भिती जिल्हाध्यक्ष के. पी. पाटील यांना आहे. त्यामुळे काय निर्णय घ्यायचा याबाबत नेत्यांमध्ये संभ्रम आहे. सध्याच्या स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसने आपले पॅनेल तयार होईल अशा रितीने अर्जही भरलेले नाहीत. त्यामुळे ऐनवेळी त्यांनी पॅनेल केले तरी सर्व जागांवर उमेदवार मिळणे शक्य होईल अशी स्थिती नाही.

राष्ट्रवादीसमोर असलेल्या या परिस्थितीत त्यांनी एकतर सत्ताधाऱ्यांसोबत जाऊन ते जे देतील तेवढ्याच जागांवर समाधान मानायचे. अन्यथा उघड विरोधात जाऊन सतेज पाटील गटातून सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणायचे एवढेच पर्याय त्यांच्यासमोर आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने कितीही दबाव आणला तरी ते किती पाण्यात आहेत याची माहिती समोरच्यांना आहे. त्याचाच फायदा घेऊन राष्ट्रवादी कुठे जात नाही असा विश्वास सत्ताधाऱ्यांमध्ये आहे. या पार्श्वभूमीवरच ५ एप्रिलला राष्ट्रवादी काँग्रेसला निर्णय घ्यावा लागणार आहे.

ताकद आजमावली, हाती काहीच नाही...

महानगरपालिकेत राष्ट्रवादीच्या महापौरांना पक्षाच्या विरोधात बंड करण्यासाठी ताकद देऊन ज्या आमदार महादेवराव महाडिक यांनी राष्ट्रवादीचा डाव उलटविला त्यांच्या विरोधात जाऊ, असा फक्त इशाराच राष्ट्रवादीकडून दिला जात आहे. यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये आपली ताकद अजमावण्याचा प्रयत्न केल्यानंतर हाती काहीच लागलेले नाही याची जाणीवसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसला आहे. त्यामुळे मिळाल्या तर दोन जागा घेऊन शांत बसण्याचा राष्ट्रवादीचा विचार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images