Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

क्रांतिदिनी हुतात्म्यांच्या शौर्याला उजाळा

$
0
0
९ ऑगष्ट १९४२ ला महात्मा गांधींनी इंग्रजांना ‘चले जाव’ चा इशारा दिला. या इशाराने देशातील तरुणांना स्फूर्ती मिळाली, त्यांच्यात उत्साह संचारला आणि देश स्वातंत्र्यासाठी तरुण वर्ग पेटून उठला. १३ डिसेंबर १९४२ ला गारगोटी कचेरीवर झालेल्या हल्ल्याचा यात प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. गारगोटीतील या ऐतिहासिक लढ्यात २४ ते ३५ वयोगटातील सात तरुणांना हौतात्म्य पत्करावे लागले. क्रांत‌िदिनी (ता.९) या सात हुतात्म्यांच्या आठवणींना उजाळा मिळत आहे.

राज यांना साताऱ्यात जामीन

$
0
0
रेल्वे पोलिस भरतीत मराठी तरुणांना प्राधान्य द्यावे, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या आंदोलन आणि बसेसवरील दगडफेकप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सातारा जिल्हा कोर्टाने गुरुवारी चारही गुन्ह्यांत जामीन मंजूर केला.

सांगली ‘महापौर’साठी कांबळे विरुद्ध देवमाने

$
0
0
काँग्रेस पक्षातर्फे महापौर निवडीचे सर्व अधिकार उर्वरित महाराष्ट्र वैधानिक मंडळाचे अध्यक्ष मदन पाटील यांना देण्यात आले होते. त्यांनी नगरसेवकांची मते अजमावली आणि महापौरपदासाठी कांचन कांबळे व उपमहापौर पदासाठी प्रशांत पाटील मजलेकर अशी नावे निश्वित केली.

सोलापुरात १०० नव्या सिटी बसेस

$
0
0
सोलापूर महानगरपालिका परिवहन विभागाला उर्जितावस्था आणण्यासाठी केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू शहर विकास योजनेमधून १०० नवीन बसेस खरेदी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव दिल्लीच्या केंद्र सरकार मान्यताप्राप्त अर्बन मास ट्रान्झिट कंपनीमार्फत तयार करण्यात येणार आहे.

हजारोंच्या उपस्थितीत शहीद माने यांना अखेरचा निरोप

$
0
0
पाकिस्तानच्या हल्ल्यात पूँच येथे धारातीर्थी पडलेले कागल तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथील नायक कुंडलिक माने यांच्यावर गुरुवारी सकाळी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पिंपळगावच्या सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी मंत्री, लोकप्रतिनिधींसह जिल्ह्यातून जनसागर लोटला होता.

डोळ्यांत पाणी, गळ्यात हुंदका

$
0
0
शहीद जवान कुंडलिक माने यांचे पार्थिव गुरूवारी येणार हे समजल्यापासूनच गावातील व्यवहार बंद होते. पहाटेपासून रस्त्याकडे डोळे लावून बसलेल्या नागरिकांच्या अश्रुंचा बांध फुटला तेव्हा सैन्यदलाच्या गाड्यांचा ताफा दाखल झाला होता. त्यापूर्वीच कुंडलिक माने यांच्या घरासमोर मूकपणे अंत्ययात्रेची तयारी सुरू झाली होती. पावणेआठच्या सुमारास कुंडलिक यांचे पार्थिव दारात आल्यानंतर त्यांची आई, पत्नी, वडील, भाऊ आणि नातेवाईकांनी फोडलेल्या हंबरड्याने सर्वांचे डोळे पाणावले.

निपाणीनजीक तरुणाचा खून

$
0
0
भिवशी (ता.निपाणी ) येथे अज्ञात तरुणाची क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. प्रेम अथवा अनैतिक संबंधातून हा खून झाला असल्याचा प्राथमिक संशय निपाणी पोलिसानी व्यक्त केला आहे.

'तासगाव-पलूस'ची विक्री प्रकिया रद्द करा

$
0
0
तासगाव-पलूस सहकारी साखर कारखान्याची विक्री-प्रक्रिया रद्द करण्यात यावी, तसेच कारखाना २७ हजार सभासदांचाच रहावा, अशी मागणी करणाऱ्या कारखाना बचाव कृती समितीच्या धरणे आंदोलनाला आता श्रमिक मुक्ती दलानेही पाठिंबा दिला आहे.

जवान मधुकर महाडिक यांचा हृदयविकाराने मृत्यू

$
0
0
मिरज तालुक्यातील शिपूर येथील जवान मधुकर श्रीकांत महाडिक (वय ३०) यांचा पाकिस्तान सीमेवर द्रास भागात गस्त घालताना हृदयविकाराचा झटका आल्याने जागीच मृत्यू झाला.

आता बीट साखर

$
0
0
ब‌िटाच्या लागवडीमुळे क्षारपड जमीन पुन्हा लागवडीखाली आणणे आणि आंतरपीक म्हणून उसामध्ये देखील लागवड जम‌िनीचा पोत सुधारण्याबरोबरच अधिक उत्पन्न मिळविणे आता शक्य झाले आहे.

शहर सुविधांचे प्रस्ताव पुढील मीटींगमध्ये

$
0
0
महानगरपालिकेच्या आर्थिक हिताचा व शहराच्या हिताचे प्रस्ताव प्रशासनाने सभागृहापुढे ठेवले की सत्ताधारी पक्ष नेहमीच एकमुखाने ‘पुढील मीट‌िंग’ असे सांगून वेळ मारून नेत आहेत.

महालक्ष्मी अन्नछत्र ट्रस्टतर्फे लाडू प्रसाद वाटप

$
0
0
तिरूपती बालाजी देवस्थानच्या धर्तीवर करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या भक्तांनाही गायीच्या तुपातील लाडू प्रसाद देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ महालक्ष्मी अन्नछत्र ट्रस्टच्यावतीने करण्यात आला.

भावी कलाशिक्षक कळसूत्री बाहुल्यांच्या जगात

$
0
0
अॅनिमेशनपटाने जगात आधुनिक क्रांती केली आहे, मात्र भविष्यातील कला शिक्षकांना कोल्हापुरातील कला महाविद्यालयांमध्ये आउटडेटेड झालेल्या कळसूत्री बाहुल्या आणि स्क्रिन प्रिटींगच्या माध्यमातून प्रात्यक्षिकाचे धडे गिरवावे लागत आहेत.

'स्मॅक'ची दुरंगी लढत रंगणार

$
0
0
शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनची (स्मॅक) निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नांना अपयश आल्यानंतर आता असोसिएशनची निवडणूक दोन पॅनेलमध्ये रंगण्याची शक्यता आहे.

श्रावण महिमा

$
0
0
‘भविष्यमेनू आरोग्यज्ञान, उपयुक्त साहित्य प्रत्येक पान, पंचांग सोपे सुमंगल स्वभावे’ असे भिंतीवर टांगलेल्या दिनदर्शिकेचे (तारखेच्या कॅलेंडरचे) वर्णन केले जाते. ते यथार्थ वाटते.

खड्ड्यांत पैसा...!

$
0
0
शहरातील एकही रस्ता धड नाही. मग तो आयआरबीचा असो, राज्य सरकारच्या निधीतील असो वा महापालिकेच्या निधीतील. राजकारणी, ठेकेदारांच्या युतीतून खड्ड्यांतून पैसा कमवायचा आणि पैशासाठी खड्डा खोदायचा, असे वर्षानुवर्षे गणित सुरू आहे.

श्रावण बहरला

$
0
0
श्रावण सुरू झाला की विविध सण, व्रतवैकल्यांना सुरूवात होते. या विविध सणांमध्ये श्रावण सोमवार, गुरूवार, नारळी पौर्णिमा, गोपाळकाला या सणांना तितकेच महत्त्व असल्याने श्रावण महिन्यात फुलांचे मार्केट चांगलेच तेजीत चालते.

शहीद कुंडलिक माने यांना आदरांजली

$
0
0
पिंपळगाव बुद्रुक (ता.कागल) येथील शहीद जवान कुंडलिक केरबा माने यांच्या रक्षाविसर्जनाचा विधी शुक्रवारी पार पडला. ९ ऑगष्ट या क्रांतिदिनाचे औचित्य साधून ग्रामस्थांनी व नातेवाईकांनी शोकसभा घेतली.

चाकूचा धाक दाखवून लुटणा-या तिघांना अटक

$
0
0
पेठवडगांव येथील भिशीचालक भिमराव चव्हाण यांच्या पत्नीला चाकूचा धाक दाखवून आठ लाखाची रक्कम लुटून नेल्याप्रकरणी पोलिसांनी तिघाजणांना अटक केली.

पाकविरोधात मुरगूडमध्ये निषेध फेरी

$
0
0
‘पाकिस्तान मुर्दाबाद,गल्ली गल्ली मे चोर हे पाकिस्तान चोर है,शहीद कुंडलिक माने अमर रहे अशा घोषणा देत मुरगूडमधील मुस्लीम समाजाने निषेध फेरी काढली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images