Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

ओटी विक्रेत्यांच्या वादातून एकाला पेटवण्याचा प्रयत्न

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ओटी विक्रेत्यांच्या व्यावसायिक स्पर्धेतून शनिवारी सकाळी अंबाबाई मंदिरातील महाद्वार चौकात झालेल्या वादातून एकावर रॉकेल ओतून पेटवण्याचा प्रयत्न झाला. रॉकेल ओतण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका दुकानातील कामगारास जोरदार मारहाण करण्यात आली. भर गर्दीच्यावेळी झालेल्या या प्रकाराने भाविकांबरोबर स्थानिकांचीही मोठी पळापळ झाली. ओटी विकत घेण्यासाठी भाविकांना हाक मारण्याच्या प्रकारातून हा वाद झाला. मात्र, या प्रकरणाबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली नाही.

अंबाबाई मंदिरात महाद्वार चौकाजवळ ओटीसाहित्य विक्रीची दुकाने आहेत. त्याच्याशेजारील दुकानातील कामगाराचा शनिवारी सकाळी भाविकांना ओटी घेण्यास बोलावण्याच्या कारणावरुन वाद झाला. त्यावेळी त्या परिसरात असलेल्या त्या दुकानदाराच्या नातेवाईकांनी दुसऱ्या दुकानातील कामगाराला मारहाण केली. या प्रकाराने चिडून तो कामगार तेथून निघून गेला. परत येताना तो एका बाटलीतून रॉकेल घेऊन आला. 'तुला रॉकेल ओतून पेटवून देतो' असे म्हणत त्याने एका दुकानदाराच्या अंगावर रॉकेल ओतण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पुन्हा त्या कामगाराला दुसऱ्या दुकानदाराच्या नातेवाईकांनी त्याला पकडून पुन्हा जोरदार मारहाण केली. या प्रकारात अनेकांच्या अंगावर रॉकेल सांडल्याने मोठी धावपळ उडाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाळोबावाडी : एकाचा मृत्यू

0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

आजरा तालुक्यातील चाळोबावाडी (किणे) येथील वांजोळे परिवारातील मारामारी प्रकरणातील जखमीपैकी एकाचा उपचारादरम्यान मुंबईतील खासगी रूग्णालयात मृत्यू झाला. जानबा गणू वांजोळे असे मयताचे नाव आहे. यामुळे या प्रकरणातील सहा आरोपींच्या विरोधात आता मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात येणार आहे. मात्र त्याबाबतची कागदपत्रे उपलब्ध झाली नसून ती सोमवारी उपलब्ध होतील असे पोलिसांतून सांगण्यात आले.

चाळोबावाडी येथे १५ मार्चला घडलेल्या मारामारीबाबत शिवाजी गणू वांजोळे यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार ते, त्यांचा मोठा भाऊ जानबा व लहान भाऊ बसवंत हे त्यांच्या चिराटी नावाच्या शेतात गवत रचत असताना अर्जून तुळसाप्पा वांजोळे व गोविंद तुळसाप्पा वांजोळे या दोघांनी शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली होती. याबाबत पोलिसांत तक्रार दिल्यानंतर संबंधित फिर्यादी पुन्हा गावी गेले असता संदीप वांजोळे व रामचंद्र वांजोळे तेथे आले व काठ्यांनी मारहाण केली. यामुळे मारहाण झालेल्यांचे नातलग जानबा, संतोष, छाया जानबा वांजोळे, शेवंता जानबा वांजोळे व मिना बसवंत वांजोळे मारामारी सोडविण्यासाठी तेथे पोहोचले. मात्र यामध्ये एकमेकांना झालेल्या मारहाणीत सातजण जखमी झाले. या घटनेतील अर्जून, गोविंद, संदिप, रामचंद्र, सखुबाई, सुनंदा यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. जखमीपैकी जानबा यांना प्रथम गडहिंग्लजच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर जानबा वांजोळे यांना मुंबईतील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे त्यांच्या मृत्यू झाला. शनिवारी त्यांच्यावर चाळोबावाडीत शांततेत अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीच्या आमिषाने ३५ लाखांचा गंडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विदेशात नोकरी, सैन्यात भरती, पैसे दुप्पट, वैयक्तिक कर्ज अशी विविध अमिषे दाखवून जवळपास ३५ लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. याबाबत शहरासह ग्रामीण भागातील आठजणांनी तक्रार दिली. शिवाजी पेठेतील आठ नंबर शाळेजवळ राहणाऱ्या शशिकांत सदा​शिव सुतार (वय ३७) याला राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याने आणखी काहीजणांची फसवणूक केली असण्याची शक्यता आहे.

आर. के. नगरातील अविनाश प्रभाकर पवार हे खासगी कंपनीत नोकरी करतात. त्यांना चंदगडमध्ये प्लॉट हवा होता. त्यांच्याकडे ड्रायव्हर असलेल्या सुतार याने चंदगड येथे प्लॉट देण्याबरोबरच हैदराबादच्या एका कंपनीकडून दोन टक्के व्याजाने २५ लाखांचे कर्ज मिळवून देतो असे अमिष दाखवले. त्यासाठी स्टॅम्प व इतर कागदपत्रांसाठी त्याने २०१३ मध्ये ५० हजार रुपये घेतले. खात्री पटावी यासाठी नऊ लाख ६६ हजारांचे दोन चेक त्याने पवार यांच्याकडे डिपॉझिट म्हणून ठेवायला दिले. त्याबदल्यात त्याने १६ लाख ५० हजार रुपये घेतले. नंतर पवार यांनी विचारणा केल्यावर तो तब्बल अडीच वर्षे टोलवाटोलवी करत होता. पवार यांनी शुक्रवारी त्याच्या घरी जाऊन पैशांची विचारणा केली. नंतर पवार यांनी चेक न वठल्याची फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी सुतारला अटक केली.

सुतार याच्या घरी दररोज अशा प्रकारे फसवणूक झालेले नागरिक येत होते. त्याला पोलिसांनी अटक केल्याचे समजताच आणखी सात जणांनी तक्रार दाखल केली. त्यामध्ये पुण्यातील उन्मेश सुरेश रणधीर यांच्याकडून अडीच लाख रुपये, रंगराव कृष्णा भोसले यांच्या पुतण्याला नोकरी लावतो असे सांगून दोन लाख रुपये, अर्जुनवाडा येथील जयवंत आनंदा तिकोडे यांना रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करून देतो म्हणून तीन लाख ९७ हजार रुपये, तेथील अरविंद गणपती पाटील यांना पैसे दुप्पट करून देतो म्हणून साडेतीन लाख रुपये, शिवाजी पेठेतील अजित धोंडिराम साळोखे यांना कर्ज मिळवून देतो म्हणून दहा हजार रुपये, नसीर मुल्ला यांच्याकडून ६३ हजार आणि मुकुंद मधुकर कुलकर्णी यांच्याकडून अशी एकूण सुमारे ३५ लाख रुपयांची फसवणूक त्याने केली आहे. फसवणूक झालेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राण्यांसाठी ग्रीन कॉरिडॉर करा

0
0

मोहसीन मुल्ला, कोल्हापूर

सातारा येथील खिंडवाडी येथे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर काळ्या बिबट्याच्या अपघाती निधनाने पर्यावरप्रेमी कार्यकत्यांतून संतापाचे सूर उमटू लागले आहेत. जंगलातून जात असलेल्या रस्त्यांवर आवश्यक तेथे प्राण्यांसाठी कॉरिडोर बांधले जावेत, अशी मागणी पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांतून होत आहे. विशेषत: फेसबुकवर मृत बिबट्याप्रती पर्यावरणप्रेमी कार्यकत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

पुण्यातील कार्यकर्ते सुहाज गुजर यांनी www.change.org या वेबासाईटवर ऑनलाइन पिटिशन सुरू केली आहे. राज्य सरकारला सादर होणाऱ्या या पिटिशनमध्ये वनविभागाने जंगलातून कॉरिडॉर उभी करण्याचे मागणी करण्यात आली आहे. 'सॅकच्युरी एशिया' या पर्यावरण क्षेत्रातील नियतकालिकाच्या फेसबुक पेजवर सायंकाळी चार वाजेपर्यंत बिबट्याच्या निधनाची पोस्ट ५४ जणांनी शेअर केली होती तर १५० च्यावर कमेंट पडल्या होत्या.

कोल्हापुरातील ग्रीन गार्डस संस्थेचे सचिव फारूक म्हेतर म्हणाले, 'कोल्हापुरातील पाटगावनजीक सोनवडे येथील घाट रस्त्याचे काम प्रलंबित आहे. या रस्त्याच्या कामाला परवानगी मिळावी म्हणून वनखात्यावर प्रचंड दबाव आहे. हा प्रस्त‌ावित रस्ता पूर्ण जंगलातून जातो. रस्ते केल्यानंतर जंगलाची थेट विभागणीच होते. असा रस्ता ओलांडताना जंगली प्राण्यांची मोठी अडचण होते. पावसाळयात तर परिस्थिती फारच बिकट असते. परदेशात अशा रस्त्यांवर प्राण्यांच्या वापरासाठी ग्रीन कॉरिडॉर उभे केले जाताते. एक प्रकारचे प्राण्यांच्या वापरासाठीचे जंगलातील रस्त्यावरील हे पूलच असतात. सातारा येथील काळ्या बिबट्याच्या निधनानंतर अशा प्रकारचे कॉरिडॉर उभे करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.' सातारा येथील वाइल्डलाइफ वार्डन रोहन भाटे यांनीही अशीच मागणी केली आहे. 'ज्या ठिकाणी काळ्या बिबट्याचे निधन झाले तेथे काही महिन्यांपूर्वीच आणखी एका बिबट्याचे अपघाती निधन झाले आहे.'

सातारा येथील कार्यकर्ते मिलिंद हळबे गेल्या मार्चपासून या बिबट्याचे निरिक्षण करतात. ते म्हणाले, 'अजिंक्यताराच्या परिसरात मार्च २०१४ मध्ये मादी आणि तीन बछडे दिसले होते. त्यावेळी या बछड्यांचे वय दोन महिने असावे. त्यानंतरही आम्ही या बिबट्यांची निरीक्षणे केली आहेत. काळ्या बिबट्यांची संख्या आधीच खूप कमी आहे. ज्या ठिकाणी अपघात झाला तेथे उतारावर वाहने अतिशय वेगाने येत असतात. त्यामुळे या मार्गावर प्राण्यांच्या ये जा करण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर निर्माण करण्याची गरज आहे.'

सातारा येथील पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते नाना खामकर यांनी कास आणि आजूबाजूचा परिसर इकोसेन्सिटिव्ह जाहीर होण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले, 'कराडच्यानजीक आगाशिवचा डोंगर आहे. त्यावरून बिबटे खाली येतात आणि राष्ट्रीय महामार्गावरच्या असलेल्या पुलाखालून हे बिबटे रस्त्यापलिकडच्या गावात जावून शिकार करतात. त्यामुळे प्राण्यांसाठी जंगलातून जाणाऱ्या रस्त्यांवर कॉरिडॉर असावेत ही मागणी रास्तच आहे .'

मेलॅनिनमुळे काळा रंग

काळ्या बिबट्यांना मेनॅलिस्टिक लिपर्ड म्हटले जाते. अशा बिबटांच्या त्वचेत मेलॅनिनचे प्रमाण जास्त असल्याने त्यांचा रंग काळा झालेला असतो. लांबून पाहताना असे बिबटे पूर्णपणे काळे दिसातत, पण प्रत्यक्षात त्यांच्या शरीरावरही ‌पिवळे ठिपके असतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मलबार पिट वायपरचे अवेळी दर्शन

0
0

कुमार कांबळे, कोल्हापूर

ऋतुचक्र बदलाचा फटका पिकांप्रमाणे वन्यजीवांनाही जाणवत आहे. ‌पावसाळ्याच्या अगदी सुरुवातीच्या काळात आढळणारा मलबार पिट वायपर साप आंबा जंगलाच्या परिसरात आताच दिसत आहे. या सापाचे अस्तित्व अवेळी जाणवणे, ही बाब पर्यावरणदृष्ट्या गंभीर असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

वन्यजीव अभ्यासक प्रमोद माळी यांना शुक्रवारी (२७ जानेवारी) आंबा जंगलात हा साप आढळला. कोल्हापूर परिसरात नुकताच पाऊस झाला. विशेषतः आंबा परिसरात काही वेळा गाराही पडल्या. त्यातच पाऊस व्हायच्या आधी ढगाळ वातावरणही होते. वातावरणातील याच बदलामुळे हा साप आताच बाहेर पडलेला दिसू लागला आहे.

गवतावरील कीटक, सरड्यासारखे प्राणी, उंदीर आणि झाडांवरील बेडूक हे या सापाचे मुख्य अन्न ‌असते. प्रजननकाळात भूक भागविण्यासाठी तो बाहेर पडतो. आंबा परिसरातील जंगलात सध्या फारसे गवत नाही. कारवीची वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. कारवीवर जगणाऱ्या अन्य जीवांना त्याने दंश केल्यास ते मृत्युमुखी पडू शकतात.

खाद्य सध्या पुरेशा प्रमाणात न मिळत नसल्याने भक्ष्याच्या शोधात बराच काळ भटकावे लागल्यामुळे या सापालाही धोका निर्माण होऊ शकतो. या सापाच्या रसल वायपर, सॉ स्केल्ड, बांबू पीट वायपर, हम्प नोज्ड आणि मलबार पीट वायपर अशा प्रमुख पाच जाती आहेत. त्यापैकी मलबार पिट वायपर हा पश्चिम घाटाच्या केरळ, गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तमिळनाडूच्या काही भागांतच आढळतो, तर हम्प नोज्ड वायपर गोव्याच्या जंगल प्रदेशात आढळतो.

पिट वायपरची वैशिष्ट्ये

डोळ्यांच्या मधोमध आणि नाकाच्या वर पिट (खड्डा)

त्यातील इन्फ्रा रेड किरणांमुळे भक्ष्य ओळखणे शक्य

सभोवतीच्या वातावरणानुसार रंग बदलण्याची क्षमता असल्यामुळे लगेच शिकार करणे शक्य

हा खड्डा एखाद्या अँटेनासारखे काम करतो

हा साप अतिविषारी असून, त्याने दंश केल्यास थेट रक्तावर परिणाम होऊन मृत्यू ओढवतो. जानेवारी ते मेपर्यंत त्यांचा प्रजननकाळ असतो. ते या काळात अज्ञातवासात असल्यासारखेच असतात.

- प्रा. डॉ. योगेश कोळी, संशोधक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वळवाच्या पावसाने झोडपले

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विजांचा कडकडाट व गारांसह झालेल्या वळवाच्या पावसाने शनिवारी सायंकाळी शहराला जवळपास तासभर झोडपले. दोन दिवसानंतर वळवाच्या पावसाने पुन्हा लावलेल्या हजेरीने हवेत गारवा निर्माण झाला. पावसादरम्यान शहरातील बहुतांश भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता.

मार्चमध्ये वळवाच्या पावसाने सतत हजेरी लावली आहे; पण उष्म्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. गुरुवारीच जिल्ह्यात अनेक ठिकाणी वळवाने हजेरी लावली होती. पण त्यावेळी शहराच्या दक्षिण भागात पाऊस झाला नव्हता. त्यानंतर शुक्रवारी मात्र दिवसभर प्रचंड उष्मा वाढला असल्याने पावसाची शक्यता होती. शनिवारी मात्र सायंकाळी अचानक आभाळ भरून आले व वळीव पावसाचे वातावरण तयार झाले. जोरदार वाऱ्याबरोबर विजांचा कडकडाट होत सव्वासहाच्या सुमारास शहराच्या पूर्व व उत्तर भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली. गारांसोबत सुरू झालेल्या पावसाने क्षणभरातच सर्वत्र पाणी पाणी केले. पावसाचा तसेच गारांचाही जोर अधूनमधून कमी होत होता. पण हा पाऊस तासभर सुरु राहिला. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला बसलेल्या धरणग्रस्त वृद्ध महिला, पुरुष तसेच बालवाडी शिक्षिकांची पुन्हा त्रेधातिरपीट उडाली. पावसापासून बचाव करण्यासाठी आजूबाजूच्या इमारतीमध्ये आसरा घ्यावा लागला होता.

पावसाबरोबर गाराही पडत असल्याने अनेक ठिकाणी गारांचा खच पडला होता. शहरात प्रथमच गारा पडल्याने लहानग्यांसह मोठ्यांनीही गारा वेचण्याचा आनंद लुटला. पावसाचा जोर शहराच्या उत्तर व पूर्व भागातच होता. दक्षिण परिसरात तुरळकच पाऊस झाला. यामुळे काही ठिकाणी गारवा तर काही ठिकाणी उष्मा असे वातावरण झाले होते.

नोकरीच्या नावे ३५ लाखांचा गंडा

हापूस आवाक्याबाहेर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापुरात हापूस आंब्याचा सुगंध मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच दरवळत आहे. हापूसचा सुवास ग्राहकांचे लक्ष वेधून घेत असला, तरी डझनाचा दर ८०० ते एक हजार रुपये असल्यामुळे तो सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. फळांची मागणी आणि दरात तेजी असताना फळभाज्यांसह पालेभाज्यांचा दर मात्र या आठवड्यातही स्थिर राहिले आहेत.

हापूसला मुहूर्ताच्या सौद्यात पेटीला पाच हजार रुपये मिळाला होता. मात्र आवक मर्यादित राहिल्याने ग्राहकांची संख्याही कमी होती. सध्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आंब्याची आवक हळूहळू वाढत आहे. बाजार समितीत गेल्या आठवड्यापासून हापूसच्या ७० ते ८० पेट्यांची आवक झाली आहे. याचबरोबर स्थानिक व्यापारीही स्वतंत्र आंब्याची जाग्यावर खरेदी करुन शहरात विक्री करत आहेत. लक्ष्मीपुरी व कपिलतीर्थ मार्केटमध्ये सर्वांत जास्त आंब्याची विक्री होत आहे. मात्र एक नंबर आंब्याच्या डझनाचा भाव ८०० ते एक हजार तर दोन नंबर आंब्याचा दर ५०० ते ७०० रुपयांपर्यंत आहे.

फळे (दर किलोमध्ये)

सफरचंद (वॉशिंग्टन)१८०

संत्री ५०

डाळिंब १००

मोसंबी ४०

चिकू ४०

द्राक्षे ४०

हापूस ८०० ते एक हजार (डझन)

भाजीपाला

वांगी ३०

कारली ४०

गवार ८०

भेंडी ४०

टोमॅटो १० ते १५

डाळी...

तूरडाळ ९०

मसूरडाळ ७५

मूगडाळ १२०

पालेभाज्यांचे दर स्थिर

गेल्या आठवड्यापासून फळभाज्या व पालेभाज्यांच्या दरात चांगलीच घसरण झाली आहे. ७० ते ८० रुपयांपर्यंत गेलेल्या किलोच्या दरात सरासरी २० ते ३० रुपयांची घट झाली आहे. यामुळे वांगी, कारली, भेंडी, दोडका फळभाज्यांचे दर सरासरी ३० ते ४० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. मात्र गवारचा दर अजूनही ८० रुपयांवर स्थिर आहे. टोमॅटोचा दर १० ते १५ रुपये असून कांदा व बटाट्याचा दर २० रुपयांवर स्थिर राहिला आहे. पालेभाज्या व कोबी फ्लॉवरच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निम्मेच अधिकारी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दहा वर्षांपूर्वीपासून महानगरपालिकेत आवश्यक वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली जात नसल्याने मंजूर पदांच्या केवळ निम्म्या संख्येवरच शहराच्या आरोग्य सेवेचा गाडा हाकला जात आहे. आरोग्य सेवेबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दृष्टिकोनात बदल होत नसल्याने या पदांसाठी उत्सुक नसल्याची परिस्थिती आहे. पण त्यामुळे शहरवासियांना त्याचा फटका बसत असून प्रशासनाकडून याबाबत तातडीने पाऊले उचलली पाहिजे.

महापालिकेच्यावतीने शहरात दोन मॅटर्निटी हॉस्पिटल, एक रुग्णालय, एक फिरता दवाखाना, १३ वॉर्ड दवाखाने चालवली जातात. या सर्व ठिकाणांसाठी ५८ वैद्यकीय अधिकाऱ्यांची जरुरी आहे. पण गेल्या वर्षभरापासून नेमणुकीबाबतच्या जाहीरात वारंवार देऊन प्रतिसाद मिळत नाही. या प्रयत्नानंतर सध्या ५८ पैकी २८ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक झालेली आहे. जवळपास निम्म्या जागा अजून रिक्त आहेत. पण पूर्वी एकाच अधिकाऱ्याला दोन वॉर्ड दवाखान्यांचा कारभार सांभाळावा लागत होता. ती परिस्थिती आता थोडी बदलली आहे.

नवीन अधिकाऱ्यांची नेमणूक होण्यासाठी त्यांना पगाराचे अामिष दाखवण्याची आवश्यकता आहे. तीच गोष्ट प्रशासनाकडून होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. सध्या एमबीबीएस असलेले खासगी प्रॅक्टिस सोडून या पदांकडे येण्यासाठी पगार ही मोठी बाब आहे. कमी पगाराबरोबरच लोकप्रतिनिधींचा दबाव ही गोष्टही नवीन नेमणुकीच्या आड येत आहे. यामुळे हॉस्पिटल्स असूनही अधिकाऱ्यांअभावी शहरवासियांना योग्य त्या आरोग्यविषयक सुविधा मिळत नसल्याची परिस्थिती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उष्मा, पाऊस आणि धुके

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कडाक्याचा उष्मा, मधूनच होणारे ढगाळ वातावरण, बंद झालेल्या वाऱ्यामुळे वाढणारी तगमग, कधी गारांसह कोसळणारा जोरदार पाऊस या सर्व वातावरणात कमी म्हणून रविवारी सकाळी थंडीतील दिवसाप्रमाणे धुक्याची दुलईही शहरवासियांनी अनुभवली. सकाळी गारवा, दुपारी उष्मा व सायंकाळी ढगाळ वातावरणाने होणारी तगमग असे सरमिसळ वातावरण एका दिवसांत अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उष्म्याचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली. त्यामुळेच वळीवाने सलामीही दिली. या आठवड्यात तापमानाने कहर केला. यंदाच्या उन्हाळ्यात प्रथमच तापमान ३७ अंशांवर पोहचले. त्याबरोबरच वाराही मंदावला असल्याने उष्मा प्रचंड वाढला होता. गुरुवारी सायंकाळी जिल्ह्याच्या काही भागात वळीवाने जोरदार हजेरी लावली. काही भागात हा पाऊस झाला नसला तरी हवेत गारवा होता. दुसऱ्या दिवशी पुन्हा वातावरण मूळ पदावर येत उष्म्याचा कहर वाढला. त्यादिवशीही सायंकाळी पावसाची हजेरी अपे​क्षित होती. पण त्यावेळी हुलकावणी मिळाली. ​शनिवारी मात्र ही भरपाई करत गारांसह पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात सर्वत्रच गारवा निर्माण झाला होता.

वळीव पावसाच्या हजेरीनंतर रविवारी उष्म्यात वाढ होईल अशी अपेक्षा होती. रविवारची सकाळ मात्र शहरवासियांना आश्चर्याचा धक्का देणारीच ठरली. एरव्ही आठ वाजताच सूर्याची किरणे तापवत असताना रविवारी सकाळी मात्र शहर व परिसरात धुक्याची चादर पसरल्याचे चित्र होते. यंदाच्या हिवाळ्यात धुके फारसे पहायला मिळाले नाही. पण कडाक्याचा उन्हाळा, वळीव पाऊस अशा वातावरणात धुके हे न पटणारे असेच होते.

चिलटांमुळे भयंकर उपद्रव

वळवाच्या पावसाची चाहूल घेऊन येणारी चिलटे यंदा मार्चमध्येच दाखल झाल्याने कोल्हापूरकर वैतागले आहेत. रस्त्यावर, बागांमध्ये, सार्वजनिक ठिकाणांबरोबरच अगदी वातानुकूलित ऑफिसमध्येही मुक्काम ठोकलेल्या या चिलटांच्या उपद्रवामुळे डोळ्यांना त्रास होतो आहे. उष्णतेमुळे आणि अस्वच्छतेमुळे चिलटे, डास आणि कीटकांचे प्रमाण शहरात वाढले आहे. सूर्योदयापासून सक्रीय होणारे हे कीडे संध्याकाळपर्यंत कोल्हापूरकरांना त्रास देत आहेत. उद्याने, हॉटेल, फूटपाथ, बसस्टॉप अशा सार्वजनिक ठिकाणांबरोबरच वातानूकुलीत कार्पोरेट ऑफिसेसमध्येही या चिलटांनी आक्रमण केले आहे. चिलटांसह इतर किटकांच्या वाढीसाठी दमट हवा पोषक असते. त्यामुळे त्यांची संख्या वेगाने वाढत आहे, अशी प्रतिक्रिया पर्यावरणअभ्यासक धनंजय जोशी यांनी दिली. ते म्हणाले, 'तापमान वाढले की किटकांच्या कोषांमधून बाहेर पडण्याची प्रक्रिया वाढते. चिलटांच्या काही जातीसाठी जनावरांच्या आणि मानवी डोळ्यांतील अश्रू हे खाद्य असते.'

वेगवेगळ्या वातावरणामुळे संसर्गाचा प्रादूर्भाव होण्याची जास्त शक्यता असते. त्यासाठी थोडासा त्रास जाणवू लागल्यास विश्रांती घेणे, भरपूर पाणी व त्याचबरोबर सकस आहारही घेणे आवश्यक आहे. त्यानंतरही त्रास वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

- डॉ. अमोल माने

चिलटांच्या काही जातीसाठी जनावरांच्या आणि मानवी डोळ्यांतील अश्रू हे खाद्य असते. त्यामुळे डोळ्यांभोवतील चिलटे फिरताना दिसतात. डोळे येण्याच्या आजाराची साथ चिलटांमुळे बळावू शकते. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे योग्य ठरते.

- डॉ. बशीर मुल्ला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उरमोडी डावा कालव्यामुळे ९०० हेक्टर ओलिताखाली

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

दिवंगत आमदार अभयसिंहराजे भोसले यांनी सातारा तालुक्याचा सिंचनाचा प्रश्न मिटवण्यासाठी उरमोडी धरण प्रकल्पचा पाया रोवला. आज हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. तालुक्याच्या सिंचनाचा प्रश्न मिटणार आहे. उरमोडी धरणाचा १४ किलोमीटर लांबीचा डावा प्रवाही कालवा पूर्ण झाला असून, लवकरच या कालव्यातून पाणी सोडण्यात येणार असल्याने या कालव्यामुळे सुमारे ९०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या कालव्याच्या प्रलंबित कामांसाठी आमदार शिवेंद्रराजे यांनी पाठपुरावा केला होता. दरम्यान, उरमोडी उजवा प्रवाही कालव्याचे आणि भोंदवडे उपसा सिंचन योजनेचे काम प्रगतीपथावर असून, लवकरच ही कामे पुर्णत्वास जातील, असा विश्वास शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टीईटी’च्या परीक्षेत गुरुजी नापास

0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल जाहीर झाला असून, पेपर एक (इयत्ता पहिली ते पाचवी) चा निकाल १.०४ टक्के तर पेपर दोन (सहावी ते आठवी शिक्षकांसाठी) ४.९२ टक्के लागला आहे. त्यामुळे शिक्षक होऊ इच्छिणारे विद्यार्थी चांगलेच घाबरले आहेत.

पेपर एकसाठी राज्यात परीक्षेस बसलेल्या २ लाख ४५ हजार ८११ उमेदवारांपैकी फक्त २ हजार ५६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर पेपर दोन साठी १ लाख ४२ हजार ८५८ उमेदवारांपैकी ७ हजार ३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी संस्थांच्या सुमारे एक लाख प्राथमिक शाळा आहेत. त्यातील ३२ हजार ५७३ शाळा खाजगी अनुदानित, विनाअनुदानित आहेत. या शाळांमध्ये सुमारे १ कोटी ७५ लाखाहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून सरकारने शिक्षक पदावर नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य केली आहे. त्यानुसार गेली दोन वर्षे ही परीक्षा सुरू आहे. डिसेंबर २०१३ व डिसेंबर २०१४ मध्ये या टीईटी परीक्षा झाल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्दीत पाकीट मारणारे कुठे आहेत

0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

एलबीटी आंदोलनाच्यावेळी आपले दुकान उघडे ठेवून गर्दीत पाकिट मारणारे आता चर्चेच्यावेळी कुठे गेले? असा टोला माजी मंत्री मदन पाटील यांनी शनिवारी नाव न घेता आमदार सुधीर गाडगीळ यांना लगावला. एलबीटीवर तोडगा निघाल्यानंतर व्यापाऱ्यांनी शनिवारी मदन पाटील यांच्या उपस्थितीत उपोषण सोडले.

मदन पाटील म्हणाले, 'यापुढे एलबीटीसाठी आंदोलन नको. आतापर्यंत खूप झाले. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून अगदी विश्वासाने ग्राहक आपल्या बाजारपेठेकडे येतो. महापालिका आणि व्यापाऱ्यांनी समन्वय ठेवून महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी सहकार्य करावे. व्यापाऱ्यांनी प्रामाणिकपणे एलबीटी भरल्यास आमच्या अधिकाऱ्यांकडून कोणताही त्रास दिला जाणार नाही. तसे घडल्यास संबधितावर कारवाई करण्यासही आम्ही मागे-पुढे पाहणार नाही. सरकार निर्णय होईपर्यंत थकीत एलबीटीवरील दंड, व्याज वसूल केले जाणार नाही. उलट दंड, व्याज माफ करावे, असा महापालिकेचा ठराव करून सरकारला पाठविण्याची आमची तयारी आहे. खासदारांच्या मध्यस्थीनंतर ठरल्याप्रमाणे थकीत एलबीटीची पंचवीस टक्के रक्कम त्वरीत भरावी. विवरण पत्रांनुसार उर्वरित रक्कमेचे तीन भाग करून त्यापोटी चेक द्यावेत. एक एप्रिलपासून रितरसर एलबीटी भरुन सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. या वेळी उपस्थित व्यापाऱ्यांचे स्वागत समीर शहा यांनी केले. शहा, विराज कोकणे आणि सुरेश पटेल यांनी उपोषण सोडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यावसायिक संकुल सोलापुरात आगीत खाक

0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

शहरातील सात रस्ता परिसरात असलेल्या पाच मजली व्यवसायिक संकुलातील वरील दोन मजले रविवारी पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत खाक झाले. एका स्थानिक केबल नेटवर्कच्या कार्यालयातील व्हिड‌िओ कॅमेरे, न्यूज स्टुडिओसह महागडी उपकरणे आगीच्या भक्षस्थानी पडून सहा कोटी रुपयांचे नुकसान झाले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे. १० ते १५ गाड्या पाण्याचा मारा करून तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.

सात रस्ता परिसरातील पाच मजली इमारतीमध्ये कार्पोरेट कार्यालयासह हॉस्पिटल आहेत. यातील शेवटच्या दोन मजल्यामध्ये केबल नेटवर्कचे कार्यालय आहे. या कार्यालयामध्ये बातमीपत्रासाठीचा एक स्टुडिओ तसेच अन्य कार्यालये होती. तसेच वरच्या मजल्यावर केबल नेटवर्कचे संपूर्ण वातानुकूलित कार्यालय होते. लाखो रुपयांचे व्हिडिओ कॅमेरे आणि अन्य इलेक्ट्रॉनिक्सचे महागडे साहित्यही होते. शहराच्या निम्म्या भागाला याच कार्यालयामधून केबल सेवा पुरविण्यात येत होती. दरम्यान, रविवारी पहाटेच्या सुमारास या कार्यालयाच्या काचेच्या खिडक्यांमधून आगीचे लोळ बाहेर पडताना अनेकांनी पाहिले. त्यांनी तत्काळ गस्तीवरील पोलिसांना यांची माहिती दिली. अग्निशमन दलाला तत्काळ पाचारण केले. पण, तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले होते. संपूर्ण इमारत काचेची असल्यामुळे आतील धूर बाहेर पडत नव्हता त्यामुळे आग विझविताना अग्निशमन दलाच्या जवानांना बरीच कसरत करावी लागली. काचा फोडून आत पाण्याचे फवारे मारण्यात आले. तोपर्यंत संपूर्ण कार्यालय आगीच्या भक्षस्थानी पडले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकच्या धडकेत दोघे जखमी

0
0

जयसिंगपूरः देवदर्शनासाठी जात असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने दोघेजण गंभीर जखमी झाले. कोल्हापूर-सांगली महामार्गावर तमदलगे (ता. शिरोळ) येथे रविवारी सकाळी सव्वादहा वाजता हा अपघात झाला. अजित सुतार व श्रीकांत सुतार (रा.प्रयाग चिखली ता. करवीर) अशी जखमींची नावे आहेत. नवीन घेतलेल्या मोटारसायकलवरुन ते दोघे मंगसुळीला देवदर्शनासाठी जात होते. तमदलगेनजिक पाठीमागून आलेल्या बगॅस वाहतुकीच्या ट्रकने मोटारसायकलला ठोकरले. या अपघातात अजित सुतार व श्रीकांत सुतार यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना हातकणंगले येथील खासगी रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले आहे. जयसिंगपूर पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोठ्याची भिंत कोसळून तिरवड्यात मुलगा ठार

0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

तिरवडे ( ता. भुदरगड ) येथे घराला लागून असलेल्या गोठ्याची भिंत कोसळून झालेल्या अपघातात श्रेयस बाबूराव पाटील हा पाच वर्षाचा मुलगा ठार झाला. याबाबत अधिक माहिती अशी, श्रेयसचे चुलते धनाजी शंकर पाटील हे घराला लागून असलेल्या गोठ्याची कमकुवत झालेली भिंत कोसळू नये यासाठी लाकडाचा आधार देत होते. ते कामात असताना श्रेयस तेथे आला. याबाबत त्यांना कल्पना नव्हती. यावेळी अचानक भिंत कोसळून दोघेही भिंतीखाली सापडले. भिंत कोसळल्याचा आवाज झाल्याने शेजारचे लोक घटनास्थळी जमा झाले.त्यांनी मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडलेल्या धनाजी पाटील यांना त्वरीत बाहेर काढून त्यांचा जीव वाचविला. पण ढिगाऱ्याखाली श्रेयस सापडल्याची कुणालाच माहिती नव्हती. काही वेळाने घरात श्रेयस नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर ढिगाऱ्याखाली शोध घेतला असता श्रेयस ढिगाऱ्याखाली गाडला गेल्याचे निदर्शनास आले. त्याला गारगोटी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद भुदरगड पोलिसांत झाली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक संभाजी पाटील करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live

Latest Images