Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

शेततळ्यात पडून गव्याचा मृत्यू

0
0

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

चिंचणे (ता. चंदगड) येथील जंगलाच्या पायथ्याशी कृषी विभागाने काढलेल्या शेत तळ्यात पडून गवा मृत झाला. त्याच्यावर रविवारी दुपारी वनविभागाच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. जंगल परिसरात तळे असल्याने या भागात लोकांची ये-जा कमी असते. पण दोन दिवसापासून परिसरात दुर्गंधी सुटल्याने शेतकऱ्यांनी त्याचा शोध घेतला असता त्यांन तळ्यात गवा मृतावस्थेत दिसून आला. पाच दिवसांपूर्वी गवा तळ्यात पडला होता. उंचावरुन तो तळ्यात पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॅ. अरुण मनगुतकर यांनी सांगितले. दीड महिन्यात या परिसरात दोन गव्यांचा मृत्यू झाल्याने गव्यांच्या मृत्यूबाबत परिसरात जोरदार चर्चा सुरु आहे.

कृषी विभागाच्या वतीने चिंचणे जंगलाच्या पायथ्याशी गायरान हद्दीत शेततळे खोदले आहे. जंगलातील प्राणी तळ्यातील पाणी पिण्यासाठी येत असतात. पंधरा फूट खोल तळे असल्याने रात्री अंधारत गवा तळ्यात पडला. त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. घटनेची माहीती मिळताच वनक्षेत्रपाल एस. बी. तडवळेकर यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना घेवून कायदेशीर सोपस्कार पूर्ण करुन ग्रामस्थांच्या मदतीने गव्यावर अंत्यसंस्कार केले. यावेळी वनपाल के. जे. पावरा, वनरक्षक डी. ए. कदम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फळांच्या दरात घसरण

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अवकाळी पावसाने मराठवाडा, विदर्भाला दणका दिला असला तरी त्यामुळे वातावरणामध्ये कमालीचा बदल झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून वातावरण ढगाळ झाल्याने कलिंगड, द्राक्षांच्या मागणीत प्रचंड घट होऊन दरातही कमालीची घसरण झाली आहे. फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या दरात किलोमागे दहा ते वीस रुपयांनी वाढ झाली आहे. कोबी, फ्लॉवरच्या दरात आणि मागणीमध्ये मोठी घसरण झाली आहे.

उन्हाची तीव्रता वाढल्याने गेल्या आठवड्यापासून कलिंगड, द्राक्षांसह काकडीच्या मागणीत वाढ झाली होती. ग्राहक आणि विक्रेत्यांना समाधानकारक दर मिळत असल्याने विक्रीही चांगली होत होती. शहरातील प्रमुख बाजारपेठांसह विविध चौकांमध्ये कलिंगड विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात स्टॉल मांडले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे कलिंगड व काकडी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल कमी झाला आहे. ७० ते १०० रुपयांपर्यंत असणारा दर दहा रुपयांपासून ५० रुपयांपर्यंत कमी झाला आहे. अवकाळी पावसामुळे निर्यातक्षम द्राक्षे खराब होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे निर्यातक्षम द्राक्षे किरकोळ बाजारपेठेत विक्रीस आली आहेत. फळांच्या आवकेत वाढ झाली आहे. सध्या आवक जास्त झाल्याची स्थिती आहे. त्यामुळे द्राक्षांचे सरासरी २० ते २५ रुपये दर कमी झाले आहेत.

जानेवारी महिन्यापासून फळभाज्यांसह पालेभाज्यांची आवक वाढल्याने दर सर्वसामान्याच्या आवाक्यात आले होते. मात्र, रविवारी फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या दरामध्ये कमालीची तफावत झाल्याचे दिसले. वांगी, दोडका, गवार, भेंडी या फळभाज्यांच्या दरात वाढ झाली असताना कोबी, फ्लॉवर व पालेभाज्यांची कवडीमोल दराने विक्री होत आहे. दरातील तफावतीमुळे बाजारात आलेल्या ग्राहकांचा गोंधळ झाल्याचे चित्र होते.

(दर किलोचे, रुपयांत)

भाजीपाला

वांगी - ४०

टोमॅटो - २०

गवार - ८०

भेंडी - ६०

दोडका - ६०

हिरवी मिरची - ६०

फळे

द्राक्षे - ४०

कलिंगड - १० ते ५०

संत्री - ४०

सफरचंद - १००

चिकू - ३०

डाळिंब - ६०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्ताधाऱ्यांकडून हुकूमशाही कारभार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हंटस को-ऑप बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाने पैशांची प्रचंड उधळपट्टी करण्याबरोबरच सभासदहिताची एकही योजना राबवलेली नाही. संचालक मंडळाने एकतंत्री व हुकूमशाही पद्धतीने कारभार केला,' असा आरोप राजर्षी शाहू स्वाभिमानी ​परिवर्तन पॅनेलचे प्रमुख बाळासाहेब घुणकीकर यांनी पत्रकार परिषदेत केला. कर्जावरील व्याजदर कमी करणे, मृत सभासदांचे कर्ज माफ करणे आणि सभासदांसाठी एक सभागृह या तीन मुद्यांची पूर्तता या पॅनेलच्या माध्यमातून केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गव्हर्न्मेंट बँकेची निवडणूक २२ मार्चला होत आहे. सत्तारूढ संचालकांच्या विरोधातील गटांनी एकत्र येऊन शाहू स्वाभिमानी पॅनेलची ​स्थापना केली आहे. ही पॅनेल उभारणी घुणकीकर, राजन देसाई, राजेंद्रकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली झाली आहे. पॅनेलच्या अजेंड्याची माहिती देताना घुणकीकर म्हणाले, '२५ वर्षे एकहाती सत्ता असल्याने विद्यमान संचालकांनी अनिर्बंध आणि मनमानी कारभार केला आहे. पैशाची प्रचंड उधळपट्टी केली आहे. सभासदांना सेवा सुविधा पुरवण्यात अपयशी ठरले आहे. तसेच बँकेचा व्याजदर कमी केलेला नाही. संचालक मंडळाच्या कारभाराला सभासद कंटाळले आहेत. बँक सभासदांच्याच हातामध्ये रहावी यासाठी सरकारी विभागांतील संघटनांनी शाहू पॅनेलला पाठिंबा दिला आहे. बँकेचे शुद्धिकरण करण्यासाठी सभासदही उत्सुक आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभा तहकुबीने ठरावाला शह देणार

0
0

म. टा. प्र​तिनिधी, कोल्हापूर

महापौर तृप्ती माळवी यांच्या राजीनाम्याप्रश्नी समर्थकांना आवर घाला, या राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या भूमिकेला प्रत्युत्तर म्हणून महाडिक गटही आक्रमक झाला आहे. सोमवारी आयोजित करण्यात आलेली महापालिकेची सर्वसाधारण सभा माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांना श्रद्धांजली वाहून तहकूब करण्याची व्यूहरचना या गटाने आखल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. तसे झाल्यास महापौरांना कायद्याच्या चौकटीत अडकविण्याची काँग्रेस-राष्ट्रवादीची खेळी किमान आज तरी फोल ठरणार आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीने, महापालिका नियमावलीचा (१३ (१) अ) आधार घेत, महापौर माळवी लाचप्रकरणात सापडल्यामुळे नैतिक अधःपतन झाल्याने त्यांना पदावरून हटविण्याचा सदस्य ठराव सोमवारच्या विषयपत्रिकेत मांडला आहे. मात्र, तो बेकायदा असून, ठराव मांडणाऱ्या नगरसेवक व नगरसचिवांवर कारवाई करावी, अशी मागणी महाडिक समर्थक माजी महापौर सुनील कदम यांनी केली आहे.

सभागृहात काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. यामुळे ठराव मंजूर झाल्यानंतर त्यावर सही करण्याची नामुष्की महापौरांवर ओढवणार होती, परंतु ही सभा माजी खासदार मंडलिक यांना श्रद्धांजली वाहून तहकूब करण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. तहकूब सभा नंतर कधी बोलवायची याचे सर्वाधिकार महापौरांना आहेत. महापौरांविरोधात सभागृहात ठराव मांडल्यास त्या विरोधात मतदान करण्याचा निर्णय महाडिक समर्थकांनी घेतल्याचे वृत्त आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तो छद्मी हसला, आणि गोळ्या घातल्या’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी रविवारी उमा पानसरे यांना व्हील चेअरवरून घटनास्थळी नेले. त्यांनी सुमारे पाऊण तास पोलिसांना घटनेविषयी माहिती दिली. 'घराजवळ थांबलेल्या दोन तरुणांपैकी एकाने गोविंदराव पानसरे यांना 'मोरे कुठे राहतात?' असा पत्ता विचारला. मोरे इथे राहात नाहीत, असे उत्तर पानसरेंनी दिल्यावर मागे बसलेला तरुण छद्मी हसला आणि त्याने गोळीबार केला,' असे त्यांनी सांगितले.

पानसरे यांच्या हत्येला सोमवारी महिना पूर्ण होत आहे. १६ फेब्रुवारीला सकाळी साडेनऊच्या सुमारास पानसरे दाम्पत्यावर खुनी हल्ला झाला होता. या प्रकरणी उमा पानसरे प्रत्यक्षदर्शी असल्याने त्यांचा जबाब महत्त्वाचा होता; पण प्रकृती अस्वास्थामुळे डॉक्टरांनी पोलिसांना परवानगी दिली नव्हती.

रविवारी सकाळी साडेनऊ वाजता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गोयल यांनी कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत पानसरे यांच्या घरी जाऊन माहिती घेतली. 'हल्ला झालेल्या दिवशी सकाळी बंगल्यासमोर मी स्वच्छता करत असताना दोन तरुण मोटारसायकलसह थांबले होते. त्यांनी मास्क घातला नव्हता,' असे पानसरे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर पानसरे यांना व्हील चेअरवरून घटनास्थळी नेण्यात आले. 'फिरून परतताना घराच्या परिसरात थांबलेल्या त्या दोनपैकी एका तरुणाने गोविंदराव पानसरे यांना मोरे कुठे राहतात, असे विचारले. पानसरेंनी उत्तर दिल्यानंतर गोळीबार करण्यात आला,' असे उमा पानसरे यांनी सांगितले. 'हल्लेखोर समोरून आले की मागून आले हे आठवत नाही. गोळ्या कुठून व कशा झाडल्या, हे आठवत नसल्याचे त्यांनी सांगितले.

उमा पानसरे यांच्याकडून माहिती घेण्यात येत आहे. त्यांच्यावर ताण पडू नये, यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच माहिती घेण्याचे काम सुरू आहे. पानसरे यांनी दिलेल्या माहितीची खातरजमा करून घेण्यात येईल. पूर्ण माहिती मिळाल्यानंतर रीतसर जबाब नोंदवला जाईल.

- अंकित गोयल, तपास अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता घरपोच पेन्शन

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

पेन्शन खात्याला आधार कार्ड जोडल्यास खातेदाराला घरपोच पेन्शन देण्याची सुविधा बँक ऑफ महाराष्ट्रने सुरू केली आहे. त्यामुळे प्रामुख्याने वृद्ध व अपंग पेन्शनधारकांची पेन्शनसाठी रांगेत ताटकळत थांबून दिवस घालवण्यापासून सुटका होणार आहे. जिल्ह्यातील सुमारे १५ हजार पेन्शधारकांसाठी या योजनेचा लाभ होणार आहे. पेन्शनधारकांना बँकांमधील गर्दीमुळे ताटकळावे लागते. त्यात वृद्ध, आजारी व्यक्ती आणि अपंग यांचे हाल होतात. हा त्रास टाळण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रने नवीन उपक्रम हाती घेतला आहे.

माजी सैनिक, राज्य सरकारी कर्मचारी व इतर विभागातील मिळून जिल्हाभरात बँकेकडे सुमारे १५ हजार पेन्शनधारक आहेत. त्यांना विविध शाखांच्या माध्यमातून पेन्शन वितरित केली जाते. ग्रामीण व निमशहरी भागातील पेन्शनधरकांना पेन्शन घरपोच देणारी ही योजना आहे. बँकेने जिल्हाभरात सुमारे २०० व्यवसाय प्रतिनिधी नेमले आहेत. या प्रतिनिधींमार्फत पेन्शनधारकांच्या घरी पेन्शन पोचविली जाणार आहे. त्यासाठी पेन्शनधारकाने आपल्या खात्याशी आधारकार्ड संलग्न करून घेणे आवश्यक आहे. त्याची व्यवस्था संबंधित खातेदाराच्या शाखेमध्ये करण्यात आली आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांबरोबरच इंदिरा गांधी विधवा योजना, श्रावणबाळ योजना तसेच संजय गांधी निराधार योजनेमध्ये सहभागी असणार्या लाभार्थ्यांनाही या सेवेचा फायदा होणार आहे. त्यासाठी त्यांनाही आधारकार्ड आपल्या पेन्शन खात्याशी संलग्न करून घ्यावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूर्ती संवर्धनाचा नवा अध्याय

0
0

अनुराधा कदम, कोल्हापूर

आदिलशाहीकाळातील परकीय आक्रमणे शमल्यानंतर अंबाबाई मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना करण्यात आली. कोल्हापुरातील धार्मिक अधिष्ठानातील या ऐतिहासिक वळणानंतर मूर्तीची झीज भरून काढण्यासाठी वज्रलेप करण्यात आला. मात्र वज्रलेपामुळेही मूर्तीच्या आस्तित्वाला तडे जाण्याचा धोका निर्माण झाला होता. आता मूर्तीच्या पुनर्प्रतिष्ठापनेला ३०० वर्षे पूर्ण होत असताना केमिकल कॉन्झर्वेशनमुळे मूर्ती संवर्धनाचा नवा अध्याय उलगडला जाणे हा एक चांगला योगायोग जुळून येत आहे.

वज्रलेप करा आणि वज्रलेप नको या दोन मुद्द्यावर श्रीपूजक आणि देवस्थान यांच्यातील मतभेदामुळे अंबाबाई मूर्तीची झीज वाढत होती. २००५ साली मूर्तीच्या कपाळावर नागाचा फणा दिसत होता, मात्र पुढच्या पाच वर्षात हा फणा पुसट होत गेल्याचे पुरावे श्रीपूजकांनी नोंद करून ठेवले आहेत. मूळ मूर्तीवर अभिषेक व कुंकूमार्जन करणे बंद करून १८ वर्षे होऊनही मूर्तीची झीज होतच होती. त्यामुळे मूर्ती संवर्धनाबाबत तातडीने ​निर्णय घेण्यासाठी मुळात वज्रलेपाचा वाद मिटवणे अत्यंत गरजेचे होते. तरीही वज्रलेपाबाबतच्या दोन मुद्द्यावरून दोन तप चाललेल्या न्यायालयीन लढ्याला अखेर श्रीपूजक आ​णि देवस्थान समिती यांच्यातील समन्वयासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाच्या मध्यस्थीमुळे यश आले. वज्रलेपाऐवजी केमिकल कॉन्झर्वेशन (रायासनिक संवर्धन)चा पर्याय देवस्थान समितीनेही मान्य केला. मूर्तीचे रासायनिक संवर्धन करण्याच्या प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे. त्यासाठीचे अधिकार केंद्रीय पुरातत्व विभागाकडे देण्यात आले आहेत. या प्रक्रियेमध्ये मूर्तीमध्ये इंजेक्शनच्या माध्यमातून रासा​यनिक द्रव्य मूर्तीत सोडले जाणार आहे. मूर्तीच्या सद्यःस्थितीची पाहणी करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्थातच देवीचे दर्शन बंद ठेवण्यात येईल तेव्हाही भाविकांचे सहकार्य अपेक्षित असेल.

३०० वर्षापूर्वी अंबाबाई मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना झाली, तत्पूर्वी कित्येक वर्षे आधी ही मूर्ती घडवली गेली आहे. पुढच्या पिढीसाठी मूर्ती सुस्थितीत ठेवायची असेल तर ती आतूनही कणखर असण्याची गरज आहे. तसेच कोणत्याही मूर्तीचे वैशिष्ट्य हे सुबकतेवर अवलंबून असते. झीज झाल्यामुळे अंबाबाई मूर्तीचे सौंदर्यही लोप पावत आहे. त्यामुळे धार्मिक भावना आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा आयाम जुळून येणाऱ्या रासायनिक संवर्धनाचा पर्याय भाविकांनीही स्वीकारला पाहिजे.

-योगेश प्रभुदेसाई, पुरातत्त्व विशारद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाडिकांच्या राजकारणाचा ‘झोल’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापौर तृप्ती माळवी यांनी सोमवारची (ता. १६) सभा तहकूब केली तर त्यासंदर्भात काय भूमिका घ्यायची याचा निर्णय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनसुराज्यच्या आघाडीच्या उद्या सकाळी होणाऱ्या पार्टी मिटिंगमध्ये घेतला जाणार आहे. याबाबत कायदेशीर प्रक्रिया तपासून पुढील दिशा ठरवू असे राष्ट्रवादीचे गटनेते राजू लाटकर यांनी सांगितले. दुसरीकडे, जनसुराज्य अपक्ष आघाडीचे नेते प्रा. जयंत पाटील यांनी आमदार महादेवराव महाडिक यांची भेट घेऊन त्यांना राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या भावना कळवल्या. याबाबत महाडिक हे सोमवारी मुश्रीफ यांच्याशी याबाबत बोलणार आहेत असे प्रा. पाटील यांन सांगितले. तर महाडिक यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तर त्यांचे दोन्ही मोबाइल 'स्वीच ऑफ' होते.

याबाबत प्रा. जयंत पाटील म्हणाले, 'आमदार महादेवराव महाडिक यांचा महापौरांच्या राजीनाम्याशी संबंध नाही असे त्यांनी सांगितले आहे. राष्ट्रवादीचे नेते मुश्रीफ यांच्या मनात महाडिक यांच्याबद्दल काही भावना होत्या. त्या भावना मी महाडिक यांना कळविल्या. राजकीय घडामोडींचा सद्यस्थितीत काय परिणाम होईल यासंदर्भात चर्चा केली. यावेळी महाडिक यांनी मुश्रीफ आणि माझ्यात दुरावा निर्माण होईल असे करणार नाही. काही गैरसमज झाले असतील तर सोमवारी त्यांची भेट घेऊ ते दूर करू असे सांगितले आहे.'

दरम्यान, महापौरांच्या राजीनामाप्रश्नी जनसुराज्य-अपक्ष आघाडीतील काही नगरसेवक महापौरांच्या बाजूने आहेत. काही जणांनी सभेत तटस्थ राहणार असल्याचे सांगितल्याचे प्रा. पाटील यांनी म्हणाले.

काँग्रेस-राष्ट्रवादीचा व्हीप

'महापौरांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी प्रयत्नशील आहे. महापौरांच्या विरोधात ठराव मंजूर होण्यासाठी आघाडीच्या नगरसेवकांना व्हीप लागू केला आहे. सोमवारच्या सभेत विषयपत्रिकेवरील विषयांनुसार चर्चा घडावी यासाठी आघाडी प्रयत्नशील आहे. सोमवारच्या सभेपूर्वी होणाऱ्या पार्टी मिटिंगमध्ये योग्य तो निर्णय घेतला जाईल' असे राजू लाटकर व शारंगधर देशमुख यांनी सांगितले.

सेना-भाजपही महापौरांविरोधात

'महापौरांनी नैतिक अध:पतन केल्याने त्यांना पदावरून हटवावे असा ठराव सभेत मांडला तर शिवसेना-भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक ठरावाच्या बाजूने मतदान करतील. भ्रष्ट व्यक्ती पदावर बसू नये अशी आमची भूमिका आहे' असे युतीचे गटनेते संभाजी जाधव यांनी सांगितले.

महाडिक गटाला मालोजीराजेंची साथ

रमणमळा येथील जलतरण तलावाचे उदघाटन सोमवारी सकाळी होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मालोजीराजे गटाच्या नगरसेवकांची भूमिका ठरेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाइन फ्लूचा पावसामुळे फैलाव

0
0

कोल्हापूरः पावसामुळे स्वाइन फ्लूची तीव्रता वाढली आहे. स्वाइन फ्लूमुळे अडीच महिन्यांत चार रुग्ण दगावले आहेत. आतापर्यंत २८ जणांना त्याची लागण झाली असून, ८१ रुग्ण संशयित असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालात म्हटले आहे. गेल्या तीन महिन्यांत स्वाइन फ्लूची लागण झालेल्या आणि संशयित रुग्णांची संख्या वाढत आहे. तो रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने प्रयत्न सुरू आहेत. २८ पैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. कोल्हापूर जिल्ह्यात विविध रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी आणि कर्नाटक परिसरातील रुग्णांचा समावेश आहे.

अवकाळी पावसाआधी संशयित रुग्ण ५२ होते, तर १२ जणांना लागण झाली होती. मात्र पावसानंतर अवघ्या पंधरा दिवसांत २९ सं‌शयित रुग्ण व १६ जणांना लागण झाली आहे. गेल्या अडीच महिन्यात २८ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. विविध पातळीवर आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे, परंतु अवकाळी पावसामुळे स्वाइन फ्लूच्या रुग्णांत वाढ झाली आहे.

- डॉ. बी. डी. आरसूळकर, जिल्हा शल्यचिकित्सक

पोलिसांचे बाण अंधारातच

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते दिवंगत गोविंदराव पानसरे आणि हल्ल्यात जखमी झालेल्या त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावरील हल्ल्याला एक महिना झाला तरी या प्रकरणाच्या ठोस निष्कर्षापर्यंत पोहचण्यात पोलिस अपयशी ठरले आहेत. पोलिस महासंचालक आणि अतिरिक्त पोलिस महासंचालकांनी दिलेल्या तपासाबाबतच्या सूचना आणि २५ पथके दिवसात सलग १८ ते २० तास तपास करूनही हल्लेखोर शोधण्यात यश मिळत नसल्याने पोलिसांवरील तणाव वाढला आहे.

पानसरे दाम्पत्यावर १६ फेब्रुवारीला हल्ला झाला. पोलिसांनी जिल्ह्याची नाकेबंदी करण्याचे आदेश ताबडतोब दिले. पण प्रत्यक्षात नाकेबंदी कशी व कुठे झाली, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. पानसरे यांच्यासारख्या नेत्यावर हल्ला झाल्याने पोलिस सुरवातीला गोंधळून गेले होते. पोलिस अधीक्षकांसह शहरातील सर्व अधिकारी नवीन आहेत. पानसरे यांचे व्यक्तिमत्व कसे होते हे जाणून घेण्यात स्थानिक पोलिसांना आठवडा गेला. पानसरे यांची हत्या वैयक्तिक की अन्य कारणाने झाली याबाबत अधिकाऱ्यांचा गोंधळ उडाला होता.

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रितेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्याच दिवशी दहा पथके स्थापन करण्यात आली. दुसऱ्या दिवशी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आणखी दहा नवीन पथके तयार करण्यात आली. पुणे व मुंबई क्राइम ब्रँच आणि एटीसएस पथकही सहभागी झाले. सध्या २५ पथके कार्यरत आहेत. फॉरेन्सिक लॅबचे पथक हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी घटनास्थळी दाखल झाले असले तरी महिना उलटून गेला तरीही हल्ल्यात किती पिस्तुले होती?, पिस्तूल देशी होते की विदेशी याचा बॅलेस्टिक अहवाल कोल्हापूर पोलिसांना अद्याप मिळालेला नाही. परिक्षेत्राबाहेर मुंबई व पुण्यातील पोलिसांशी स्थानिक पोलिसांनी तपासाबाबत संवाद आणि समन्वय ठेवला नसल्याने पहिल्याच आठवड्यात परीक्षेत्राबाहेरील पथके माघारी परतली.

दुसऱ्या आठवड्यात परिक्षेत्रात यापूर्वी ज्या अधिकाऱ्यांनी चांगला तपास केला त्या अधिकाऱ्यांना हल्ल्याच्या तपासासाठी पाचारण करण्यात आले. परिक्षेत्रातील स्थानिक गुंड, टोळ्या, हत्यारे विकणाऱ्या टोळ्यासह सर्वांगाने पोलिस तपास करत आहेत. दहा दिवसानंतर हल्ल्याच्या तपासाची माहिती घेण्यासाठी अतिरिक्त पोलिस महासंचालक के. एल. बिष्णोई कोल्हापुरात आले. त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर व पानसरे यांच्या हल्ल्यात 'मॉर्निंग वॉक' वगळता कसलेच साधर्म्य नाही, असे स्पष्ट केल्यानंतर डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांत चलबिचल झाली.

विधानसभा अधिवेशनात पानसरे हत्या तपासाचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्याचे पोलिस महासंचालक संजीव दयाळ कोल्हापुरात आले. त्यांनी २५ पथकांची बैठक घेऊन तपासाचा आढावा घेतला. पोलिस योग्य दिशेने तपास करत असून हल्लेखोर लवकरच सापडतील असे उत्तर त्यांनी त्यावेळी दिले. खुद्द पोलिस महासंचालकांनी वक्तव्य केल्याने व तीन आठवडे उलटूनही पोलिसांना हल्ल्याचा सुगावा नसल्याने तीन आठवडे शांत असलेल्या कार्यकर्त्यांनी चर्चा, निदर्शने, मोर्चे लोकशाही मार्गाने सरकारवर दबाव वाढवण्यास सुरूवात केली. मात्र, हल्लेखोर अद्याप सापडत नसल्याने कार्यकर्त्यांच्या भावना संतप्त आहेत.

कर्नाटकातील संशयिताकडे तपास

पानसरे यांच्या हत्त्येच्या तपासाची व्याप्ती कोल्हापूर पोलिसांनी शेजारील राज्यातही वाढवली आहे. रविवारी रात्री कर्नाटकातील एका संशयितांला कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडे माहिती घेतली जात आहे. रेकॉर्डवरील व गोळीबाराच्या गुन्ह्यातील संशयित आरोपींच्याकडे पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे.

१६ फेब्रुवारी : सकाळी ९.२६ वा कॉम्रेड गोविंदराव पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार.

१७ फेब्रुवारी : पानसरे दाम्पत्यावर अॅस्टर-आधारमध्ये उपचार, पत्नीची प्रकृती धोक्याबाहेर, सर्वपक्षीय मोर्चा. तपासासाठी १० पथके

१८ फेब्रुवारी : गोळीबार करणारे हल्लेखोर मोटारसायकलवरून आल्याचे स्पष्ट, २० व्यक्तींचे जबाब

१९ फेब्रुवारी : पानसरे यांच्या प्रकृतीत सुधारणा, संशयितांची रेखाचित्रे तयार, तीन मोटारसायकल्स जप्त

२० फेब्रुवारी : पानसरे यांना मुंबईला ब्रीच कँडी हॉस्पिटलला हलविले, रात्री १०.४५ ला निधन

२१ फेब्रुवारी : पानसरे यांना अखेरचा लाल सलाम, तपासासाठी २२ पथके नियुक्त

२२ फेब्रुवारी : हल्लेखोराची माहिती देणाऱ्यास पाच लाखांच्या बक्षिसाची घोषणा, महाराष्ट्र बंद

२३ फेब्रुवारी : हल्लेखोरांच्या तपासासाठी गोवा, कर्नाटककडे पथके

२४ फेब्रुवारी : पानसरे यांच्या हत्येप्रकरणी महापालिकेच्या तीन नगरसेवकांकडे चौकशी

१ मार्च : विशेष पोलिस महानिरीक्षक रितेशकुमार यांच्याकडून २२ तपास पथकांचा आढावा

३ मार्च : पानसरे खुनाच्या तपासाबाबत हायकोर्टात याचिका, पोलिस महासंचालक संजीव दयाल यांच्याकडून अधिकाऱ्यांची आढावा बैठक

९ मार्च : पानसरे हत्येप्रकरणी विधिमंडळात शोकप्रस्ताव, १५ मार्च : उमा पानसरे यांच्याकडून पोलिसांनी घटनेची माहिती घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुमन रावसाहेब पाटील २४ ला अर्ज भरणार

0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार श्रीमती सुमन रावसाहेब पाटील यांचा उमेदवारी अर्ज २४ मार्च रोजी दाखल करण्यात येणार असल्याची माहिती तासगाव तालुकाध्यक्ष हणमंत देसाई यांनी सोमवारी दिली. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आमचे प्रयत्न आहेत. भाजप वगळता अन्य सर्व पक्षांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. भाजपचे खासदार संजय पाटील, जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांची आम्ही मंगळवारी भेट घेऊन त्यांना बिनविरोधसाठी विनंती करणार आहोत, असेही देसाई म्हणाले. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे.

तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यातील दुष्काळ संपुष्टात आणण्याचे आर. आर. पाटील यांचे स्वप्न त्यांच्या अकाली जाण्याने अधुरे राहिले आहे. त्यांचा सामाजिक आणि राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी पक्षाने सुमन पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचे कुटुंबीय, कार्यकर्ते या सर्वांनी या उमेदवारीला पाठींबा दिला आहे. सर्वसामान्य जनतेनेही त्यांच्या मागे आपली ताकद उभी करावी, ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षाही देसाई यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भोंदूगिरी करणाऱ्यास साताऱ्यात अटक

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

गेल्या दोन महिन्यांपासून सातारा येथील यादोगोपाळ पेठेत बोकील वाड्यात भाडेकरू म्हणून राहण्यात आलेल्या आणि आपल्याला अज्ञात शक्तींचे ज्ञान आहे, असे सांगून फसविणाऱ्या विश्वास भालचंद्र दाते (५५, मूळ गाव - सोलापूर) या भोंदूस सातारा शाहूपूरी पोलिस ठाण्याने अटक करून ताब्यात घेतले. सातारा येथे खुलेआम सुरू असलेला हा प्रकार अंधश्रद्धा निर्मूलन समितीने उघडकीस आणला आहे.

दोन दिवसांपूर्वी पोवई नाका परिसरात दाते हा आपली छापील पत्रके वाटत होता. दरम्यान, तेथे असणाऱ्या 'अंनिस'च्या कार्यंकर्त्यांनी ही पत्रके घेऊन याबाबतची माहिती अंनिसचे पदाधिकारी डॉ. हमीद व डॉ. शैला दाभोलकर यांना दिली. त्यानंतर प्रशांत पोतदार यांनी 'मी राजेश जगताप बोलत आहे. मला १२ वर्षे मूल होत नाही व माझ्या मित्राचे लग्न होत नाही,' असे सांगितले. त्या समितीतील प्रशांत पोतदार व मुराद पटेल व सोबत पोतदार यांची पत्नी म्हणून एक महिला पोलिस व भाऊ म्हणून डीवायएसपी नितीन जाधव हे सर्वजण दातेकडे बनावट ग्राहक म्हणून गेले. 'मला मूल होत नाही व माझे लग्न झाले नाही,' मार्गदर्शन करा असे सांगितले. त्यावर दाते याने पोतदार यांचा व्यवसाय विचारून घेत व दुकानात दोष असल्याचे सांगत पूजा अर्चा करण्यास सांगितले. त्यावर पोतदार यांनी आम्ही 'अंनिस'चे कार्यकर्ते आहोत. आमच्यासोबत आलेले हे पोलिस आहेत, असे सांगून दाते याचे पितळ व हा सर्व बेबनाव समितीने उघडा पाडला.

दाते हा सर्व प्रकार करत असतानाच दाते हा उपस्थित पोतदार व इतरांना डॉ. पानसरे यांच्या खुनाचा मारेकरी कोण याचा शोध मीच शोधून दाखवतो असे सांगत होता. दाते याला पोलिसांनी सोमवारी दुपारी ताब्यात घेऊन शाहूपूरी पोलिस ठाण्यात आणले. मुराद पटेल यांच्या फिर्यादीनुसार दातेवर गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीसीटीव्ही कॅमेऱ्याची घोषणा हवेतच

0
0

मारुती पाटील, कोल्हापूर

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकपदाचा कार्यभार स्वीकारताना सहायक उपनिबंधक रंजन लाखे यांनी अनेक घोषणांचा भडीमार केला होता. समितीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, वाहतूक कोंडी रोखण्यासाठी एकेरी वाहतूक मार्गाचा अवलंब आणि रखडलेल्या धान्य बाजाराचे स्थलांतर करण्याची घोषणा त्यांनी केली होती. मात्र प्रत्यक्षात डिसेंबरपासून यातील एकाही घोषणेची पूर्तता झालेली नाही. यामुळे प्रशासकांनी केलेल्या सर्व घोषणा राजकीय पक्षांच्या घोषणेप्रमाणे हवेतच विरल्या आहेत, अशी स्थिती सध्या आहे.

बाजार समितीच्या संचालक मंडळाने भ्रष्टाचार केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रथम डॉ. महेश कदम आणि नंतर रंजन लाखे यांची एकाचवेळी नियुक्ती केल्याने प्रश्न गंभीर बनला होता. शेवटी प्रशासक म्हणून लाखे यांनी पोलिस बंदोबस्तामध्ये पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी समितीच्या उत्पन्नवाढीसह विविध घोषणांचा भडीमार केला होता. समितीत वारंवार होणाऱ्या भुरट्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी २५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची घोषणा केली होती.

शिवाय आवरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी एकेरी वाहतुकीचे नियोजन करण्याबरोबरच अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण तसेच समितीत निर्माण होणारा कचरा निर्गत करण्यासाठी डस्टबीनबरोबर गांडूळ खत प्रकल्प उभारणार असल्याचे जाहीर केले होते. गांडूळ प्रकल्पाबाबत प्रशासक डॉ. कदम असताना दोन ते तीनवेळा निविदाही प्रसिद्ध केली होती. मात्र समितीत निर्माण झालेल्या पेचप्रसंगामुळे त्याचाही बोजवारा उडाला आहे.

लक्ष्मीपुरीतील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी धान्य बाजार स्थलांतरित करण्याची घोषणा अनेक वर्षांपूर्वी केली आहे. यासाठी लक्ष्मीपुरी येथील धान्य व्यापाऱ्यांना टेंबलाईवाडी परिसरात प्लॉट आणि दुकानगाळेही दिले आहेत. मात्र आवश्यक लाइट, पाणी आदी पायाभूत सुविधा मिळालेल्या नसल्याने धान्य बाजार स्थलांतराची प्रक्रिया रखडली आहे. महिना दोन महिन्यातून प्रत्येकवेळी टेंबलाईवाडीतील जागेची पाहणी केली जाते. प्रत्येक पाहणीवेळी व्यापाऱ्यांना सुविधा देण्याचे आश्वासन दिले जाते. प्रत्यक्षात त्याची पूर्तता होत नसल्याने जागेची पाहणी फोटोसेशनपुरतीच मर्यादित राहिली आहे. बाजार समितीच्या रखडलेल्या कामानिमित्त प्रशासक लाखे यांच्याशी संपर्क साधला असता ते दिवसभर 'नॉट रिचेबल' होते.

वारंवार चोरीच्या घटना

बाजार समितीच्या आवारात अनेक व्यापारी व शेतकऱ्यांचा माल उघड्यावर पडलेला असतो. अनेकवेळा शेतीमालाची विशेषतः गुळाची चोरीही होत असते. चोरट्यांना पकडण्यात समितीच्या सुरक्षारक्षकांना काहीवेळा यश आले असले, तरी अनेकदा चोरटे पळून जातात. अशावेळी सीसीटीव्ही कॅमेरे अस्तित्त्वात असते तर अशा चोरीच्या घटनांच्या छडा लावणे पोलिसांना सोपे झाले असते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होसूर तलावप्रकरणी चौकशीची मागणी

0
0

चंदगड : होसूर (ता. चंदगड) येथील पाझर तलावाचे काम भूसंपादनाची कार्यवाही न करता शेतकऱ्यांची फसवणूक करुन निकृष्ट दर्जाचे सुरु आहे. त्यामुळे ते तत्काळ रद्द करुन संबंधितांची चौकशी करावी. अधिकाऱ्यांवर व ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख नंदकुमार गोंधळी यांनी मुख्यमंत्र्याकडे निवेदनातून केली आहे.

निवेदनात म्हटले आहे, गायरान व खासगी क्षेत्र असे मिळुन दोन हेक्टर ५६ गुंठ्यामध्ये ७० लाख अंदाजपत्रकीय तरतूद असलेल्या पाझर तलावाचा खर्च एक कोटी आहे. तलावामध्ये पाणी नसून या पाझर तलावातून हजारो एकर जमीन पाण्याखाली येणार असल्याचे जाहीर करुन लोकांची फसवणूक करण्यात आली आहे. यासंबंधी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तक्रार अर्जावर चौकशी करुन कारवाईसाठी निवडणूक निर्णय अधिकारी गडहिंग्लज यांना कळविले होते. त्यांनी चंदगड तहसिलदारांना चौकशीचे आदेश दिले. ही चौकशी स्थानिक पातळीवर केलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकास आराखड्यावरून कोंडी

0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

भविष्यातील शहराचा वाढता व्याप लक्षात घेऊन बनविलेला तब्बल ३१४८ कोटी रुपयांचा शहर विकास आराखडा विषयपत्रिकेवर नसताना त्याचा ठराव झालाच कसा असा मुद्दा उपस्थित करीत काँग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर यांनी प्रशासनाला सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत चांगलेच कोंडीत पकडले. या प्रश्नाचे उत्तर देताना प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडाली. प्रशासनाकडून झालेल्या गंभीर चुका बावचकर यांनी चव्हाट्यावर मांडल्या असतानाही केवळ मलमपट्टीचे निर्णय घेत हा विषय मंजूर करण्यात आला. तर राजीव गांधी सांस्कृतिक भवन प्रायोगिक तत्वावर खासगी मक्तेदारास चालविण्यास देणे, नाट्यगृह दुरुस्ती आदी विषयांना मंजुरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे होत्या.

प्रारंभी राष्ट्रवादीचे नगरसेवक विठ्ठल चोपडे यांनी उन्हाळ्यात नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी गैरसोय टाळण्यासाठी एकदिवस आड पाणीपुरवठा करण्यात यावा अशी लक्षवेधी सूचना मांडली. सध्या चार दिवसाआड पाणी पुरवठा होत असून त्यामुळे भागातील नगरसेवक व प्रशासनाच्या विरोधात असंतोष निर्माण होत आहे. उन्हाळा सुरु झाल्याने पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करुन प्रत्येक भागात एक दिवसाआड व तासभर पाणी पुरवठा करण्यात यावा असे सुचविले. संदीप गुरव अॅण्ड असोसिएशन यांनी तयार केलेल्या इचलकरंजी शहराचा ३१४८ कोटी ३८ लाख रुपयांचा शहर विकास आराखडा सरकारकडे सादर करण्याच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरु होताच काँग्रेसचे शशांक बावचकर यांनी शहराचा विकास आराखडा तयार करण्याचे काम कोणत्या संस्थेला दिले आणि त्याला कोणत्या सभेत मंजुरी दिली असा प्रश्न उपस्थित केला. तर या कामास ठरावाशिवाय मंजुरी कशी दिली, याबाबत मुख्याधिकारी यांनी खुलासा करावा अशी मागणी केली. नियमबाह्य विषयात शहराचा महत्वाचा विषय मंजूर करुन प्रशासनाने सर्वांनाचा अंधारात ठेवत अत्यंत चुकीच्या पद्धतीने हा विषय मंजूर केल्याचा आरोप केला. तसेच ज्या कंपनीने शहराचा विकास आराखडा बनवला आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात चुका झाल्याचेही निदर्शनास आणून दिले. आराखड्यात इचलकरंजीऐवजी 'पुणे' असा उल्लेख असून शहरासाठी काळम्मावाडी धरणातून पाणी आणण्याचा प्रयत्न सुरु असताना आराखड्यात मात्र 'वारणा' नदीतून पाणी आणणे असा चुकीचा उल्लेख केला आहे. शिवाय शहरातील वस्त्रोद्योग व कामगार वर्गाच्या उन्नतीसाठी पुढील ३० वर्षांच्या आराखड्यामध्ये उल्लेखच केला नाही. त्यामुळे कार्यालयात बसून शहराचा विकास आराखडा तयार केल्याचा आरोप केला. त्यावर गटनेते बाळासाहेब कलागते, अशोकराव जांभळे, अजितमामा जाधव, तानाजी पोवार, प्रमोद पाटील आदींनी मत मांडले. या प्रश्नाला मुख्याधिकारी सुनील पवार यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण त्यावर बावचकर यांचे समाधान झाले नाही. अखेर विविध मान्यवर, नगरसेवकांच्या सूचना स्वीकारुन अहवालातील त्रुटी आणि चुका दुरुस्त करुन विकास आराखडा सरकारकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

पालिकेच्या मालकीचे राजीव गांधी सांस्कृतिक भवन खासगी मक्तेदाराला चालविण्यास देण्याच्या विषयाला बिस्मिला मुजावर, नितीन जांभळे आदींनी विरोध करुन ते पालिकेमार्फतच चालवावे, गरज पडल्यास भाड्यामध्ये वाढ करावी अशी सूचना केली. त्यावर शहर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अजितमामा जाधव यांनी प्रायोगिक तत्वावर पालिकेने घालू नदिलेल्या अटी-शर्ती नुसार केवळ राजीव गांधी सांस्कृतिक भवन भाड्याने देण्याचे असून तेथील कर्मचारी वर्ग पालिकेला अन्य कामासाठी मिळतील. शिवाय पालिकेच्या उत्पन्नामध्ये भर पडते की नाही हे पाहण्यासाठी सांस्कृतिक भवन मक्तेदाराला देणे आवश्यक असल्याचे सांगितले. चर्चेअंती राजीव गांधी सांस्कृतिक भवन मक्तेदारामार्फतच चालविण्याचा निर्णय घेतला.

स्वाईन फ्लूचे रूग्ण येतीलच कशाला

काँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील यांनी स्वाईन फ्लूने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. स्वाईन फ्लूबाबत आयजीएमकडून काय उपाययोजना केली आहे अशी विचारणा केली. त्यावर डॉ. सुर्यवंशी यांनी आयजीएममध्ये स्वतंत्र कक्ष सुरु असल्याचे सांगून ज्यांना लागण झाल्याचे निष्पन्न झाले ते मुंबईला उपचारासाठी गेल्याचे सांगताच नगरसेवक प्रमोद पाटील यांनी आवश्यक त्या सुविधाच नसल्यामुळे रुग्ण याठिकाणी येतीलच कशासाठी ? अशा शब्दात संताप व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live

Latest Images