Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘गोकुळ’साठी १८ एप्रिलला मतदान?

$
0
0

कोल्हापूरः जिल्हा दूध संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत १८ एप्रिलला मतदान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना गेल्या दोन दिवसांत वेग आला आहे. मतदारयादी जाहीर झाल्यानंतर १० ते ११ दिवसांत निवडणूक कार्यक्रम जाहीर करायचा असतो. त्याप्रमाणे निवडणूक कार्यक्रम जवळपास निश्चित करण्यात आला असून १८ मार्चला तो प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

गोकुळ दूध संघाचा निवडणूक कार्यक्रम परवानगीसाठी सहकार निबंधकांकडे पाठविण्यात आला आहे. त्याला मंगळवारी परवानगी मिळणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्यानंतर एक महिन्याच्या कालावधीत मतदान घेतले जाते. त्यानुसार १८ मार्चला निवडणूक कार्यक्रम जाहीर होत असल्याने मतदानाची तारीख १८ एप्रिल असण्याची दाट शक्यता आहे. निवडणुकीसाठी कमी कालावधी राहिला असल्याने राजकीय खलबते सुरू झाली आहेत. सत्ताधारी विरुद्ध सतेज पाटील गट अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘टाइम्स प्रॉपर्टी': मोठा प्रतिसाद

$
0
0

मोठी उलाढाल; बुकिंगसाठी गर्दी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडियाच्यावतीने ७ ते ९ मार्चअखेर झालेल्या 'टाइम्स प्रापर्टी शो २०१५'ला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. सोमवारी सायंकाळी प्रदर्शनाचा समारोप झाला. प्रॉपर्टीला ग्राहकांकडून अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला असून, सहभागी बांधकाम व्यावसायिकांना चांगल्या संख्येने बुकिंग मिळाले. प्रदर्शन पॅव्हेलियन हॉटेल येथे उत्साहात पार पडले.

'टाइम्स प्रॉपर्टी शो'ला शहरातून तसेच जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. सहभागी बांधकाम व्यावसायिकांना चांगले बुकिंग मिळाल्याने प्रदर्शनात मोठी उलाढाल झाली तसेच बांधकाम व्यसायाला चालना मिळण्यासही फायदा झाला. गुढीपाडव्याच्या काही दिवस आधी हे प्रदर्शन झाल्याने बांधकाम व्यावसायिकांनी नोंदणीवर सॉफ्ट लाँच ऑफर, कार भेट, दरांत सवलत अशा विविध ऑफर्सही दिल्याने त्याचा ग्राहकांना मोठा लाभ झाला. अन्य शहरांतून नोकरी-व्यवसायानिमित्त कोल्हापुरात राहण्यास आलेल्या नागरिकांना या प्रदर्शनाचा चांगला फायदा झाला. विविध भागातील गृहप्रकल्प पाहून त्यांची तुलना करणे या प्रदर्शनामुळे शक्य झाल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली.

वेदार्जुन इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक अमोल वडियार म्हणाले, 'प्रदर्शनाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या ग्राहकांमध्ये ज्यांना घर खरेदी करायचे आहे, अशाच ग्राहकांचा सहभाग जास्त होता. प्रदर्शन काळात काही साइट व्हिजीटही झाल्या. प्रदर्शनामुळे अनेक लोकांपर्यंत पोहोचता आले.'

सीएमई हायटेकचे अद्वित दीक्षित म्हणाले, 'प्रदर्शनाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. गुंतवणूक तसेच वापरासाठी म्हणून व्यावसायिक प्रापर्टी घेण्यासंदर्भात जागृती वाढत असून, त्यादृष्टीने कल निर्माण होण्यासाठी प्रदर्शनाचा फायदा झाला.'

नाशिक येथून वर्षभरापूर्वी कोल्हापुरात कामानिमित्त आलेले उमेश मोटे म्हणाले, 'एकाच ठिकाणी विविध परिसरातील फ्लॅटस, त्यांचे दर पाहता आले, तसेच अॅमेनिटजी तुलनाही करता आली. प्रदर्शनामुळे नागरिकांचेही समाधान झाले. त्यांना प्रत्यक्ष प्रदर्शन पाहता आले.' पाचगाव येथील अमित पाटील पुण्यात फ्लॅट घेण्यास इच्छुक होते. या प्रदर्शनात पुण्यातील काही बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग असल्याने प्रदर्शनाचा लाभ झाल्याचे पाटील यांनी सांगितले.

'महाराष्ट्र टाइम्स'चे मुख्य प्रतिनिधी गुरुबाळ माळी यांच्या हस्ते सायंकाळी सहभागी बांधकाम व्यावसायिकांना स्मृतिचिन्हांचे वाटप करण्यात आले.

रॉपर्टी खरेदी करताना इमारतीचे आयुष्य वाढवण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाने कोणती काळजी घेतली आहे, याचा विचार करावा. बांधकाम व्यावसायिकांनी काय सुविधा दिल्या आहेत, बांधकाम कसे केले आहे, नियोजन कसे आहे याची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवता आली. कसबा बावडा येथे जामदार टॉवर्स या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाने आम्ही व्यवसायात पदार्पण करत आहोत.

- जयदीप जामदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचगंगा प्रदूषणप्रश्नी १६ मार्चला सुनावणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका आणि इचलकरंजी पालिकेने केलेल्या उपाययोजनेसंबंधी म्हणणे सादर करण्याचे आदेश हायकोर्टाने सोमवारी दिले. प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पाच मार्चला प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक होते. पण त्यांनी सोमवारी प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यामुळे हायकोर्टाने प्रदूषणाची सुनावणी सोळा मार्चपर्यंत पुढे ढकलली आहे. यासंबंधी विभागीय आयुक्ताचा अहवाल अद्याप मिळाला नसल्याचे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितले.

महापालिकेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू नाही. ड्रेनेज लाइनची व्यवस्था तत्काळ करणे आवश्यक आहे. जुन्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे अपग्रेड करणे आवश्यक असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोर्टासमोर सांगितले. पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासंदर्भात विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील कमिटीने उपाययोजना सुचवून त्या अनुषंगाने कार्यवाहीचे आदेश हायकोर्टाने पूर्वीच दिले आहेत. पंचगंगा प्रदूषणप्रकरणी हायकोर्टात विविध याचिका दाखल आहेत. त्यांची एकत्रित सुनावणी सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वितरण व्यवस्थेतील गोंधळ थांबवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रोख सबसीडी न देता गोरगरिबांना धान्य द्या, गहू, तांदूळ याबरोबरच डाळी, खाद्य तेल, साखर शिधापत्रिकांधारकांना द्या, केशरी शिधापत्रिकांधारकांनी प्रत्येकी वीस किलो गहू व तांदूळ द्या आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सावळा गोंधळ थांबवा या मागणीचे निवदेन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने शहर पुरवठाधिकारी डी. एम. सणगर यांना दिले. सणगर यांनी 'वरिष्ठांना आपल्या भावना कळवतो,' असे सांगून वेळ मारून नेली. शिष्टमंडळाचे नेतृत्व दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी केले.

युपीए सरकारने अन्न सुरक्षा कायद्याची अमंलबजावणी केल्यानंतर शहरी आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य शिधापत्रिका धारकांना गहू, तांदळाचे वितरण केले जात होते. अन्न सुरक्षा कायद्यामध्ये नव्याने समावेश करण्यासाठी २०१५ ची लोकसंख्या गृहीत धरुन पुन्हा नवीन यादी तयार करावी. अन्न सुरक्षा कायदा लागू केल्यानंतर अनेक केशरी शिधापत्रिकांना धान्यच मिळत नाही. तसेच त्यांचा अन्न सुरक्षा कायद्यात समावेश झालेला अशांना शिधापत्रिकाधारकांची मोठी अडचण निर्माण होत आहे. गहू, तांदूळ याचप्रमाणे डाळी, खाद्यतेल व साखर शिधापत्रिकांधारकांना द्यावे अशी मागणी केली. शिष्टमंडळात नागेश शिंदे, प्रभाकर पाटील, नितीन मस्के, सचिन चौगले, राजू हरवंदे, शशिकांत शिंदे, सुनील सुतार, चंद्रकांत गायकवाड, विशाल पाटील, बजरंग पाथरवट आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक बँकेसाठी ५०४ अर्ज

$
0
0

वरुटेंना शह देण्याच्या हालचाली; 'पुरोगामी' व शिक्षण समिती येणार एकत्र

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दि प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी सोमवारी १७ जागांसाठी ५०४ असे विक्रमी अर्ज दाखल झाले. बँकेची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता असून ३ एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीसाठी राजाराम वरूटे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पॅनलमध्ये फुट पडण्याची चिन्हे दिसत आहे. एकास एक लढत देण्यासाठी विरोधी महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक संघ व शिक्षण समिती हे दोन पॅनल एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस असल्यामुळे वेगवेगळ्या गटांनी अर्ज दाखल करण्यासाठी सकाळपासून उपनिबंधक कार्यालयामध्ये गर्दी केली होती. मंगळवारी या उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. तर बुधवारी दाखल झालेल्या अर्जांपैकी वैद्य आणि अवैद्य ठरलेल्या अर्जांची यादी जाही करण्यात येणार आहे. त्यानंतर १५ दिवस अर्ज माघारीसाठी असून ३ एप्रिलला निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

यंदा बँकेचे अध्यक्ष आणि शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांच्या सत्ताधारी शिक्षक संघ पॅनेल यांच्या विरोधात शिक्षक समिती आणि पुरोगामी शिक्षक संघटना एकत्र आली आहे. शिक्षक संघातच वरुटे आणि नेते संभाजी थोरात यांच्यामध्ये फुट पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तर 'पुरोगामी'चे प्रसाद पाटील, शिक्षण समितीचे जोतिराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल असून करवीरचे जिल्हाध्यक्ष एस. व्ही. पाटील हे संघाचे नेते संभाजीराव थोरात गटाच्या नेतृत्वाखाली स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिक्षक संघाचे ६८२२ सभासद असून १७ जागांसाठी ५०४ विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर हे निवडणूक अधिकारी तर प्रदीप मालगावे सहाय्यक अधिकारी आहेत.

राखीव गटातील अर्ज

इतर मागासवर्गीय गटात - ६०

महिला गटात - ५३ अर्ज

भटक्या विमुक्त गटात- ३४

अनुसूचित जाती-जमाती गट - ५५

तालुकानिहाय अर्ज

करवीर- २१

शिरोळ - ३१

हातकणंगले- २६

राधानगरी - ४३

भुदरगड - २१

कागल - २४

गडहिंग्लज - २३

आजरा - २५

चंदगड - १६

गगनबावडा - १८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्त्रीशक्तीला सलाम

$
0
0

जागतिक महिला दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जागतिक महिला दिनानिमित्त विविध सामाजिक संस्था, महापालिका, कॉलेज, शाळांमध्ये विविध उपक्रमांनी हा दिवस साजरा करण्यात आला. कर्तृत्वान महिलांचा सत्कार, महिलांच्या आरोग्याबाबत काळजी घेण्यासाठी मार्गदर्शनपर व्याख्याने झाली.

जिल्हा परि‌व‌िक्षा व अनुरक्षण संघटना

जिल्हा महिला व बालविकास कार्यालय व जिल्हा परिव‌िक्षा व अनुरक्षण संघटनेच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी संरक्षण अधिकारी अॅड.आशिष पुंडपळ उपस्थित होत्या. त्यांनी कायदेविषयक ज्ञानामध्ये महिला महिला व मुलींनी स्वसंरक्षण कायद्याने गर्भलिंग तपासणी बंदी, प्रत्येक स्त्रीला शिकण्याचा अधिकार, सायबर काइम, अल्पवयात लग्न करणे व करविणे गुन्हा हुंडाबंदी विषयक कायदा, कौटुंबिक हिंसाचार, मिळकतीवरील अधिकार इत्यादी कायदेविषयक मार्गदर्शन केले. यावेळी मानद सहसचिव पद्मा तिवले, परिव‌िक्षा अधिकारी एस. एच. बेंद्रे, अलका मोरे, पी. के. डवरी, द्रौपदी पाटील, नजिरा नदाफ, मुली, महिला व कर्मचारी उपस्थित होत्या. पद्मजा गारे यांनी आभार मानले.

लोटस वुमन्स असोसिएशन

महिला दिनानिमित्त लोटस वुमन्स असोसिएशनच्यावतीने कलेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी सत्यजीत कदम, माजी महापौर सई खराडे, अरूंधती महाडिक, नगरसेविका भारती पोवार, शितल खराडे, समीरा पोवार, अलका दबडे, नलिनी सातवेकर, पद्मावती पाटील, शारदा देवणे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात अनेक महिलांनी सहभाग घेतला. अध्यक्षा संजीवनी भरडे यांनी प्रास्ताविक केले. अनुराधा चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. जयश्री पाटील यांनी आभार मानले.

समिधा प्रतिष्ठान

कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या सहकार्याने गरजू महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य शिबिरामध्ये १७५ महिलांनी सहभाग घेतला. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी निलेश ठाणेकर, नंदन जोशी, संदेश कातवरे, योगेश जोशी, वरदराज दशिंगे, संतोष जोशी, अभिजीत रेणावीकर, रोहन दातार, उर्मिला ठाणेकर आदींनी परिश्रम घेतले.

यशोदर्शन चॅरिटेबल फाउंडेशन

यशोदर्शन चॅरिटेबल तर्फे कर्तृत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला. फाऊंडेशनच्या संस्थापक योगेश अग्रवाल यांच्या हस्ते सात महिलांचा फाऊंडेशनच्यावतीने सत्कार करून सन्मानित करण्यात आले. यावेळी अॅड.शशिकला पाटील, डॉ.अभिनंदन पाटील, गौरीशंकर संगोळी उपस्थित होते. अॅड.शैलजा चव्हाण यांनी आभार मानले.

देशभक्त सामाजिक सेवा संस्था

राजेंद्रनगर येथील देशभक्त सामाजिक सेवा संस्थेच्यावतीने महिला दिनानिमित्त कचरावेचक महिला कामगारांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. दरम्यान रांगोळी स्पर्धा व जनजागृतीपर पथनाट्या सादर करण्यात आले. यावेळी प्रसाद पाटोळे, उपाध्यक्ष ‌अमित नागटीळे, सचिव बळीराम रोडगे, देवराज लोंढे, अमोल लोंढे, अर्जुन कांबळे, संजय दनाने, ‌मयुरी कारंडे, आप्पासाहेब पाटील, स‌ुप्रिया वाघमारे आदी उपस्थित होते.

क्रांत‌िगुरू सोशल फाउंडेशन

मल्हारपेठ येथील क्रांत‌िगुरू सोशल फाउंडेशनच्यावतीने महिला महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. डॉ. छाया साठे यांचे स्त्र‌ियांचे आजार व घ्यावयाची काळजी यावर व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनीषा नाईक होत्या. यावेळी लक्ष्मण सोनुले, सदाशिव तांदळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

फँड्री फाउंडेशनतर्फे फळे वाटप

फँड्री फाउंडेशनच्यावतीने सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमधील महिला रूग्णांना फळे व वस्तू वाटप करण्यात आले. यावेळी विठ्ठल देसाई, डॉ. वाडेकर, डॉ. रोहिदास आदी उपस्थित होत्या.

परिवर्तन फाउंडेशन

कर्तृत्वान महिलांचा सत्कार भागिरथीच्या अध्यक्षा अरूंधती महाड‌िक यांच्या हस्ते व अॅड. धनंजय पठाडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी डॉ. रेश्मा पोवार, शैलजा पाटील, प्रा. सुरेखा कांबळे, प्रा.वृषाली कदम, तेजस्विनी इंगवले, मनीषा नाईक, अॅड. धनंजय पठाडे, अध्यक्ष अमोल कुरणे, शरद कांबळे आदी उपस्थित होते.

माझी शाळा, कदमवाडी

कदमवाडी येथील माजी शाळा, सुसंस्कार हायस्कूल, अभिनव बालक मंदिर यांच्या संयुक्त विदयमाने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. रुपा शहा यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या माजी विद्यार्थीनी प्रा. दीपाली राणे, मिनाज पठाण, अश्विनी पाटील, अश्विनी केंबळे, पालक आशा शिंदे. मंगल दिडोले, अंजली गवळी, विद्या चौगुले मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. डॉ. उषा पाटील, मुख्याध्यापक अरुणा हुल्ले, संस्थापक एम. एच. मगदूम, भरत लाटकर उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक पी. आर. गवळी यांनी केले तर सागर पाटील यांनी आभार मानले.

कंजारभाट स्पोर्टस् क्लब

महिलांनी आपली निर्णय क्षमता वाढवून समाजातील स्थान बळकट करावे, असे मत माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केले. जागतिक महिला दिनानिमित्त बरखा मछले, कोल्हापूर कंजारभाट स्पोर्टस् क्लब व सखी सहेली ग्रृप यांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमात सई खराडे, जयश्री सोनवणे, कांचन कवाळे, वंदना बुचडे, कादंबरी कवाळे, सविता माने, वंदना दळवी, संयोगिता पाटील, वंदना दळवी, संयोगिता पाटील, प्रा. डॉ. शैलजा मंडले, कृष्णा नेतले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. चंद्रकुमान नलगे, व्यंकाप्पा भोसले, वसंतराव मुळीका आदी उपस्थित होते.

आरोग्य उपकेंद्र, बालिंगा

बालिंगा (ता. करवीर) आरोग्य उपकेंद्रात जिल्हा आरोग्यअधिकारी डॉ. आर. एस. आडकेकर यांच्या उपवस्थितीत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे करवीर तालुकाध्यक्ष मधुकर जांभळे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनीही मनोगत व्यक्त केले.

जिल्हा काँग्रेस कमिटी

जागतिक महिला दिनानिमित्त काँग्रेस कमिटीत महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्याला जिल्हाध्यक्षा अंजना रेडेकर, शहराअध्यक्षा संध्या घोटणे, शेतकरी सेल अध्यक्ष सुलोचना नाईकवाडे, शारदा पाटील, वैशाली महाडिक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गंगा गौरी ग्रुप-गिजवणे, वरदविनायक ग्रुप-उत्तूर, दुर्गा ग्रुप-मंदोली या गटांनी गौरी गणपती, झिम्मा फुगडी कार्यक्रम झाला. यामध्ये लेक वाचवा या विषयावर नाट्य सादर करण्यात आले. यावेळी लीला धुमाळ, सरस्वती पोवार, रेखा आवळे, रुपाली पाटील आदी उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीपी अधिभार कशासाठी?

$
0
0

प्रकल्प बंद असताना भुर्दंडाचा युतीच्या शिष्टमंडळाने विचारला जाब

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरळीत नसताना देखील ठेकेदारांशी हातमिळवणी करून जनतेची लूट सुरू असल्याची थेट टीका भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने केली. एसटीपी प्रकल्पावरून भाजपच्या कार्यकर्त्यांनी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सांडपाणी अधिभार प्रश्नी ​निवेदन सादर केले.

महापालिकेकडून एक एप्रिल २०१३ पासून सांडपाणी अधिभारची आकारणी सुरू आहे. गेल्या दोन वर्षाच्या कालावधी शहरवासियाकंडून सांडपाणी अधिभाराच्या नावाखाली ८ कोटी २० लाख रुपये गोळा केले आहेत. प्रकल्प पूर्ण क्षमेतेने सुरू नसताना अधिभार आकारणे चुकीचे आहे. महापालिकेने जमा केलेल्या निधीचा वापर पायाभूत सुविधासाठी करावा, उपनगरातील नागरिकांना रस्ते, ड्रेनेजलाइन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नगरसेवक सुभाष रामुगडे यांनी केली.

महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदारांचे संगनमत आहे. महापालिकेने ठेकेदारांशी करार योग्यपणे केला नाही. ठेकेदार कंपनीला आतापर्यंत पाच वेळा मुदतवाढ देण्यामागील गौडबंगाल काय? ३१ जानेवारी, २०१५ ही अंतिम मुदत होती. ठेकेदारावर दंडात्मक कारवाईचे काय झाले, अशी विचारणा अशोक देसाई यांनी केली. ठेकेदाराची महापालिकेकडे चार कोटीची बँक गॅरंटी आहे. ठेकेदाराला आतापर्यंत ६५ लाख रुपयांचा दंड केला असल्याचे अतिरिक्त आयुक्त देसाई यांनी शिष्टमंडळाला सांगितले. शिष्टमंडळात अॅड. संपतराव पवार, सुरेश जरग, हेमंत आराध्ये, संजय सावंत, अशोक लोहार, अमोल पालोजी यांचा समावेश होता.

सांडपाणी प्रक्रिया यंत्रणाकार्यान्वित करावी आणि प्रकल्प सुरू होईपर्यंत अधिभाराची आकारणी करू नये, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, शिवाजी जाधव, उदय पोवार, गजानन भुर्के, अनिल पाटील, किशोर घाटगे आदींचा समावेश होता. एसटीपीचे काम बंद असल्याने सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याचे निदर्शनास आणले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तोंड भाजले आता ताकही फुंकून!

$
0
0

पानसरेंच्या हत्येनंतर कोल्हापुरातील पोलिस यंत्रणा सक्रिय

सतीश घाटगे, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्येमुळे खडबडून जागे झालेले कोल्हापूर पोलिस आता प्रत्येक बारीक-सारीक प्रकरणांत सक्रिय झाले आहेत. शहरात नुकतेच घडलेले अपहरणनाट्य आणि पेठ वडगावमधील चार मुली पळून गेल्याच्या घटनेत पोलिसांची ही तत्परता ठळकपणे दिसून आली. अशीच तत्परता फॅन्सी नंबरप्लेटवरील कारवाईबाबत पाळली असती तर कदाचित पानसरेंचे मारेकरी सापडले असते. या घटनेने तोंड भाजलेले पोलिस आता ताकही फुंकून पिऊ लागले आहेत.

हल्लेखोरांनी वापरलेल्या मोटारसायकलला फॅन्सी नंबरप्लेट असल्याची शक्यता लक्षात घेऊन अशा मोटारसायकलस्वारांवर सलग महिनाभर कारवाईचा आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक रितेशकुमार यांनी दिला होता, पण त्याला शहर वाहतूक शाखेने केराची टोपली दाखवली. हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिस अधिकारी रात्रीचा दिवस करत आहेत. रात्री दोन ते अडीच वाजेपर्यंत तपासाशी संबंधित अधिकारी व कर्मचारी काम करत आहेत. हल्लेखोरांनी मोटारसायकल वापरल्याचे लक्षात आल्यानंतर मोटारसायकल शोधण्यासाठी काही पथके कार्यरत आहेत. पण गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकलला फॅन्सी नंबरप्लेट असल्याच्या शक्यतेने तपास अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.

रितेशकुमार यांनी फॅन्सी नंबरप्लेट तयार करणाऱ्या व्यावसायिकांवरही कारवाईचे आदेश दिले होते, पण त्याचा विसर वाहतूक शाखा आणि पोलिस ठाण्यांना पडला आहे. वाहतूक शाखेचे पन्नास पोलिस नियमित रस्त्यावर असतात. प्रत्येकी रोज दहा फॅन्सी नंबरप्लेटवर कारवाई केल्यास महिनाभरात कोल्हापूर फॅन्सी नंबरप्लेटमुक्त शहर होऊ शकते. गेल्या दोन वर्षांत फॅन्सी नंबरप्लेटवर प्रामाणिकपणे व कठोरपणे कारवाई केली असती तर पानसरे यांच्यावरील हल्ल्यात वापरलेल्या मोटारसायकलचा क्रमांक ओळखला असता.

पोलिसही फॅन्सीच्या प्रेमात

पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे नातेवाईकही फॅन्सी नंबरप्लेट वापरतात. पोलिस मुख्यालयाच्या पार्किंगमध्ये अशा नंबरप्लेट दिसतात. राजारामपुरी पोलिस ठाण्यात पानसरे यांच्या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या एका उपनिरीक्षकाच्या महागड्या व दणकट मोटारसायकलची नंबरप्लेटही फॅन्सी आहे. चेन स्नॅचिंग, चोरी आणि गंभीर गुन्ह्यात ओळख पटू नये म्हणून गुन्हेगार बनावट किंवा फॅन्सी नंबरप्लेट वापरतात. या पार्श्वभूमीवर तीन वर्षे फॅन्सी नंबरप्लेटवर कारवाईचे आदेश पोलिस प्रशासन देते, पण तेवढ्यापुरती कारवा होते आणि नंतर ती थंडावते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘गोकुळ’साठी १८ एप्रिलला मतदान?

$
0
0

कोल्हापूरः जिल्हा दूध संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत १८ एप्रिलला मतदान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना गेल्या दोन दिवसांत वेग आला आहे. मतदारयादी जाहीर झाल्यानंतर १० ते ११ दिवसांत निवडणूक कार्यक्रम जाहीर करायचा असतो. त्याप्रमाणे निवडणूक कार्यक्रम जवळपास निश्चित करण्यात आला असून १८ मार्चला तो प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

गोकुळ दूध संघाचा निवडणूक कार्यक्रम परवानगीसाठी सहकार निबंधकांकडे पाठविण्यात आला आहे. त्याला मंगळवारी परवानगी मिळणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्यानंतर एक महिन्याच्या कालावधीत मतदान घेतले जाते. त्यानुसार १८ मार्चला निवडणूक कार्यक्रम जाहीर होत असल्याने मतदानाची तारीख १८ एप्रिल असण्याची दाट शक्यता आहे. निवडणुकीसाठी कमी कालावधी राहिला असल्याने राजकीय खलबते सुरू झाली आहेत. सत्ताधारी विरुद्ध सतेज पाटील गट अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामाजिक आशयाची उद्योगगाथा

$
0
0

शिरोली पुलाची येथील ज्येष्ठ उद्योगपती तुकाराम हिंदुराव पाटील यांचा आज (ता. ११) ७५ वा वाढदिवस. एका शेडवजा खोलीत दोन लेथ मशिन्सच्या माध्यमातून त्यांनी उद्योग व्यवसायाचा श्रीगणेशा केला. आज दिमाखात उभी असलेली हिंद गिअर इंडस्ट्री त्यांच्या मेहनतीची आणि जिद्दीचे प्रतिक आहे. गिअर निर्मितीमध्ये उच्च गुणवत्ता जोपासणारी कंपनी म्हणून या इंडस्ट्रीचा लौकिक आहे. उद्योगाचा परिघ विस्तारताना ते समाजिक बांधिलकी विसरलेले नाहीत. विविध उपक्रमांना मदत करताना ते हात आखडता घेत नाहीत. समाजिक आशय असलेली त्यांची उद्योगगाथा म्हणूनच तर प्रेरणादायी आहे.

तुकाराम पाटील यांचा जन्म १९४१ सालचा. घरची स्थिती बेताचीच होती. वयाच्या ९ व्या वर्षी वडिलांचे छत्र हरवलेले. या परिस्थितीत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी आई, बंधू पांडुरंग व कृष्णात यांची साथ मोलाची ठरली. १९६६ मध्ये त्यांनी मिरज टेक्निकल संस्थेतून ड्राफ्ट्स्मन अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्यांना लगेच नाशिकच्या मिग विमान कंपनीत नोकरीची संधी मिळाली. मात्र घरच्या परिस्थितीमुळे ती स्वीकारता आली नाही. ही गोष्ट त्यांच्या मनाला लागली. मग त्यांनी उद्योगक्षेत्रात उतरायचे ठरवले. पण अनुभव हवा म्हणून त्यांनी युनायटेड कास्टिंग येथे काही काळ नोकरी केली. १४ वर्षांच्या अनुभवानंतर त्यांनी आपल्या विश्वासू सहकाऱ्यांसह १९८० मध्ये देवजी इंडस्ट्री सुरु केली. १९९० ला ते देवजीतून बाहेर पडले.

त्यांना स्वत:ची कंपनी सुरु करायची होती. गुणवान स्थानिक युवकांना नोकरी तर देता येईल, शिवाय कुटुंब उभे करून सामाजिक उपक्रमांना मदत करता येईल, हा विचार त्यामागे होता. त्यांनी आरएनडी इंडस्ट्रीज सुरु केली ती केवळ दोन लेथ मशीन्सच्या बळावर. पुढे उद्योग समूह निर्माण केला. त्यांच्या मनात व्हिजन पक्के होते. १९९४ मध्ये हिंद गिअर्सच्या माध्यमातून गिअर निर्मितीत पाउल टाकले. आठ वर्षांच्या खडतर प्रवासानंतर कंपनीचा विस्तार करताना २००२ मध्ये न्यू हिंद गिअर, २००४ मध्ये पवन इंडस्ट्री, २००५ मध्ये महालक्ष्मी इंडस्ट्री अशा कंपन्या सुरु केल्या. २००७ मध्ये हिंद गिअर इंडस्ट्री सुरु केली. आज उद्योग समूहात विविध प्रकारच्या २५० गिअरची निर्मिती होते. त्यांच्या गिअरना औरंगाबादपासून बेळगावपर्यंत मागणी आहे. यामध्ये त्यांची मुले राजू पाटील यांचे तांत्रिक कौशल्य आणि नामदेव पाटील यांचे व्यवस्थापन कौशल्य महत्त्वाचे ठरले आहे. या प्रवासात पत्नी सुशिला यांचे मोठ सहकार्य लभल्याचेही ते आवर्जून नमूद करतात.

तुकाराम पाटील यांचे व्यक्तिमत्व अतिशय साधे आहे. विविध संस्थांना केलेल्या मदतीचा उल्लेख ते कटाक्षाने टाळतात. त्यांच्या मते कामाच्या मार्केटिंगपेक्षा त्याचा हेतू महत्त्वाचा आहे. तो साध्य झाला की मिळणारे समाधान आनंददायी असते. शिरोली स्मशानभूमी प्रकल्प, तालीम मंडळ इमारत, मराठी शाळांना संगणक व बेंच भेट, वाचनालयांना पुस्तके, वृक्षारोपण, अशा अनेक उपक्रमांना त्यांनी आर्थिक बळ दिले आहे. कामगारांच्या व्यक्तिगत अडचणी ते स्व: लक्ष घालून सोडवितात. त्यामुळे हिंद उद्योग समूह एक परिवार झाला आहे.

- प्रियांका पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सध्या झटपट कवींचे दिवस’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

'कविता ही मनात भिनली तरच ती कविता. मात्र सध्या आज कविता लिहिली जाते, उद्या छापून येते, परवा कवितासंग्रह निघतो तर तेरवा पुरस्कार काढला जातो. त्यामुळे सध्या झटपट कवींचे दिवस आलेत,' असे मत ख्यातनाम कवी डॉ.महेश केळुस्कर यांनी व्यक्त केले.

येथील केदारी रेडेकर शिक्षण समूहाच्यावतीने कै.केदारी रेडेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत 'कवितेच्या गावा जावे' या विषयावर त्यांनी रसिकांशी सवांद साधला. अरुण नाईक यांच्या साथीने डॉ.केळुस्कर यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी संस्थाध्यक्षा अंजना रेडेकर व सचिव प्रा.सुनील शिंत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. केळुस्कर म्हणाले, 'आपण शब्द लिहतो पण कवी तुमच्या मनातील भावना व्यक्त करतो. म्हणून तुम्ही मुके कवी आहात तर आम्ही बोलके रसिक आहोत. कवी म्हणून आजपर्यंतच्या प्रवासात अनेक लोकांचा प्रभाव आपल्यावर झाला आहे. कविवर्य बा.भ.बोरकर यांनी माझ्यातील कवी ओळखला आणि त्यांच्यामुळेच कवी झालो.'यावेळी डॉ. केळुस्कर यांनी 'मातीत ते पसरले अतिरम्य पंख' या कवितेद्वारे जखमी पक्षिणीचे अतिशय सुंदर वर्णन केले. प्रेम कसे पाहिजे याविषयी बोलताना त्यांनी 'तीळ-फुलांच्या शेतात.. तू हात घेतले हातात' ही कविता सादर केले. पूर्वीच्या काळातील लपूनछपून सुरु असलेला प्रेमप्रसंग वर्णन करताना 'बाळगी नि मालग्या' ही गाजलेली मालवणी कविता सादर केली. राजकारणावर भाष्य करणारी 'शरदाच्या चांदण्यात वसई मी नाहते गं' ही कविता सादर केली.

यावेळी डॉ.केळुस्कर यांनी कॉ.पानसरे यांना अभिवादन करीत नथुराम वृत्ती वाढत असून गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. तो केवळ हिणकस मनोवृत्तीचे प्रतिनिधित्व करतो असे मत व्यक्त केले. यावेळी 'नाकात नथ घालायचा तो लहानपणी..पुढे त्याच्या नथीतून तीर मारला त्यांनी आपल्या बापावर' या कवितेतून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. डॉ. केळुस्कर यांच्या गाजलेल्या 'झिनझिनाट' या कवितेने कार्यक्रमाची सांगता झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साखर व्यापाऱ्यांना गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कारखान्यांकडून साखर खरेदी करून देतो असे सांगून व्यापाऱ्यांना तीन कोटी ८२ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या केदार शामराव मंत्री (वय ३८, रा. न्यू पॅलेस परिसर) या संशयिताला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी दिली.

फसवणूक केल्याप्रकरणी साखर व्यापारी हंसराज छोगालाल जैन (५५, रा. माने कॉलनी, सम्राटनगर) यांनी शुक्रवारी शाहूपुरी पोलिस ठाण्यात मंत्रीविरोधात फिर्याद दिली होती. पोलिस मंत्रीचा शोध घेत होते. मात्र, तो सोमवारी रात्री पोलिस ठाण्यात हजर झाला. गेले चार दिवस तो गणपतीपुळे, चिपळून परिसरात जंगलात दोन मुले व पत्नीसह पोलिसांची नजर चुकवत फिरत असल्याची कबुली मंत्री याने दिली. त्याने व्यापाऱ्यांकडून साखर खरेदी करून देतो म्हणून रक्कम घेतली होती. पण साखरेचा दर २६०० वरून २४०० रुपयांवर झाल्याने त्याला फटका बसला. त्याचबरोबर व्यापाऱ्याकडून मिळालेल्या पैशातून त्याने सांगलीत एक कोटी ४० लाखांचा कारखाना खरेदी केल्याचे तपासात पुढे आले आहे.

जैन यांच्यासह गिरीधारीलाल अग्रवाल, कमल अग्रवाल, कन्नबाई अग्रवाल, निकेत दोशी, प्रीतेश शहा, कांतिलाल जैन, सुमेश भाई, परेश टेलर यांच्याकडून मंत्रीने अॅडव्हान्सपोटी रक्कम घेतली आहे. तसेच अटक केल्यानंतर केलेल्या चौकशीत मंत्रीने हरियाणातील चेतन जोशी यांचीही एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ओंकार इंडस्ट्रीज’शी कोणताही संबंध नाही

$
0
0

कोल्हापूर : कोंडुसकर ट्रॅव्हल्स ही कोल्हापूरस्थित प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असून, या कंपनीचा ओंकार इंडस्ट्रीज या कंपनीशी कोणताही संबंध नाही, असा खुलासा कोंडुसकर ट्रॅव्हल्सच्यावतीने प्रसिद्धीस देण्यात आला आहे.

'महाराष्ट्र टाइम्स'च्या मुंबई, पुणे, कोल्हापूर या आवृत्त्यांमध्ये १० मार्च २०१५ च्या अंकात 'कोंडुसकर' पुन्हा ड्रग्ज वादात' अशा आशयाची बातमी प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये प्रसिद्ध झालेली ओंकार इंडस्ट्रीज ही कंपनी कोंडुसकर ट्रॅव्हल्सची उपकंपनी असल्याचे नजरचुकीने म्हटले आहे, पण या कंपनीचा कोंडुसकर ट्रॅव्हल्सशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही.

कोंडुसकर ट्रॅव्हल्स ही प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूरस्थित कंपनी आहे. या कंपनीची कोणतीही उपकंपनी नाही. तसेच ओंकार इंडस्ट्रीजचे मालक व कर्मचारी यांचा कोंडुसकर ट्रॅव्हल्स प्रा. लि. या कंपनीशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. तसेच कोंडुसकर ट्रॅव्हल्सच्या कोणत्याही व्यक्तीचा या प्रकरणामध्ये सहभाग अथवा संबंध नसल्याचेही पत्रकात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हिक्टोरिया पुलाला पर्याय कधी?

$
0
0

आजऱ्यातील महत्त्वाच्या मार्गावरील सव्वाशे वर्षांपूर्वीचा पूल

म. टा. वृत्तसेवा, आजरा

एकोणीसाव्या शतकात इंग्रजी राजवटीत बांधण्यात आलेला व गोवा आणि कोकणाला जोडणा-या महत्वाच्या मार्गावरील व्हिक्टोरिया पुलाला पर्याय कधी मिळणार, याची प्रतीक्षा आजरेकरांना आहे. सरकार व प्रशासनाच्या पातळीवर याबाबत अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. यामुळे भविष्यात वाहतुकीच्या समस्येला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते.

हिरण्यकेशी नदीपात्रावर सुमारे सव्वाशेहून अधिक काळ वाहतुकीचा भार सोसणाऱ्या या पुलासाठी पूर्णत: काळ्या-कभिन्न पाषाणांचा वापर केलेला आहे. हे पाषाण येथील परिसरात कोठेही आढळून येत नाहीत. साधारणत: कोल्हापुरातील रंकाळा तलावाच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या पाषाणासारखेच ते आहेत, हे विशेष. शिवाय रंकाळा तलावाच्या संरक्षक कठड्याप्रमाणेच येथील बांधकामाची रचना आहे. असे हे विशेष घडई केलेले भले-भक्कम पाषाण चुनखडीमध्येच सांधण्यात आल्याने हा पूल म्हणजे रस्ते-पूल बांधकामातील एक आदर्श नमुना आहे. इचलकरंजीचे संस्थानिक श्रीमंत नारायणराव घोरपडे यांनी १८८७ मध्ये या व्हिक्टोरिया ज्युबिली पुलाचे बांधकाम केले. हिरण्यकेशी नदीपात्रावर आजऱ्यापासून साधारणत: अर्धा किलोमीटर अंतरावर हा ९७ मीटर लांबीचा पूल त्याकाळात एक लाख रूपये खर्च करून बांधण्यात आला. यामुळे कोल्हापूरसह कर्नाटकातील वाहनधारकांना कोकण व गोव्याकडे जाण्यासाठी एक नवा मार्ग तयार झाला. तेव्हापासून सुमारे सव्वाशे वर्षांहूनही अधिक काळ या पुलाचा वापर होत आहे. या पुलाचे वय शंभर वर्षे मानून त्याला पर्यायी पुलाचे बांधकाम करण्याची निकड ब्रिटीश प्रशासनाच्या बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी कळविली आहे. तरीही याबाबत कोणतीही आश्वासक हालचाल झालेली नाही.

काळाच्या ओघात अनेक प्रकारच्या अपघातांचे आघातही या पुलाने सोसले आहेत. काही अवजड वाहनांनी पुलाच्या संरक्षक कठड्याला दिलेल्या धडकांमुळे त्याचे काही अवशेष खिळखिळे झाले आहेत. पुलाचे काही दगडही नदीपात्रात कोसळले आहेत. पुलाच्या मार्गावरही निर्माण झालेले चढउतार पुलाचा आधार असलेल्या दगडी खांब कमकुवत झाल्याचे दर्शवित आहेत. अशा परिस्थितीत अचानकपणे उदभवू शकणाऱ्या संकटाआधीच पर्यायी पुलाच्या बांधणीबाबत कार्यवाही होणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक बँकेसाठी २१ अर्ज अवैध

$
0
0

१७ जागांसाठी ३४८ उमेदवार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दि प्राथमिक शिक्षक बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या ५०३ अर्जांपैकी २१ अर्ज अवैध ठरले. यामध्ये सर्वसाधारण गटातील १६ आणि राखीव गटातील ५ असे एकूण २१ अर्ज मंगळवारच्या छाननी प्रक्रियेत अवैध ठरले.

प्राथमिक शिक्ष‌क बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवारअखेर ५०३ अर्ज दाखल झाले होते. मंगळवारी दुपारी २ वाजल्यापासून तालुकानिहाय या अर्जांची छाननी करण्यात आली. प्रत्येकी दोन तालुकानिहाय या छाननीची प्रक्रिया सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू होती. ही छाननी झाल्यानंतर उमेदवारांनी या छाननी प्रक्रियेत कोणताही आक्षेप घेतला नाही.

एकूण १७ जागांसाठी ३४८ उमेदवार असून बुधवारी सकाळी ११ वाजता वैध अर्ज व उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. ११ ते २५ मार्च या दरम्यान अर्ज माघार घेण्याची मुदत देण्यात आली असून २६ मार्चला चिन्हे वाटप, ३ एप्रिलला प्रत्येक तालुका ठिकाणी मतदान होणार आहे. तर ४ एप्रिलला मतमोजणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कारवाँ बनता गया

$
0
0

मैं अकेला ही चला था, जानिब-ए-मंझील मगर

लोग मिलते रहे और, कारवाँ बनता गया.

'संघर्षाशिवाय सुतळीचा तोडाही मिळाला नाही,' असे जाहीरपणे सांगणाऱ्या एका ट्रॅक्टर ड्रायव्हरच्या मुलाने दुर्दम्य आशावाद, अहोरात्र राबण्याची तयारी आणि स्टेट फॉरवर्ड वाटचालीत पराकोटीचा संघर्ष पचवत सत्तेचे शिखर गाठण्याची कामगिरी केली. सलग ४७ वर्षे विधानसभा आणि लोकसभेच्या अकरा निवडणुका लढवित ३५ वर्षे सत्तेवर राहण्याचा विक्रम करणाऱ्या कै. माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी जनमानसावर आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या ५० वर्षाच्या सार्वजनिक जीवनात चरित्र आणि चारित्र्य याची जपणूक करणारे, नैतिकतेचे अधिष्ठान लाभलेले संघर्षमय नेतृत्व म्हणजे सदाशिवराव मंडलिक. प्रबोधन, पुरोगामी विचार व लोककल्याणाची निश्चित दिशा यापेक्षा चंगळवाद, भ्रष्ट संस्कृती व ओरबडून खाण्याची प्रवृत्ती फोफावत आहे. त्यात प्रामाणिक कार्यकर्त्यांची ससेहोलपट होत आहे हे चित्र वेदनादायी आहे. म्हणूनच रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत माझी लढाई सुरु राहील, असे ते नेहमी म्हणत. शिक्षण,सहकार आणि राजकारण यातून तळागाळातील जनतेची सेवा करावी यासाठी ते कार्यमग्न होते.

राजाराम महाविद्यालयातून अर्थशास्त्राची पदवी संपादन केल्यावर शिक्षण हेच समाजाच्या परिवर्तनाचे साधन आहे, ही दृष्टी त्यांना मिळाली. त्यातूनच 'कुणी न राहो दुर्बल अज्ञ! यासाठी हा शिक्ष यज्ञ!! हे ध्येय उराशी जपत १९६० ला मुरगूड येथे जय शिवराय शिक्षण संस्थेची स्थापना केली. प्रस्थापितांचा मोठा संघर्ष पचवत तालुकाभर त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला. मुरगूड नगरपालिकेच्या निवडणुकीत जीवनातल्या पहिल्या राजकीय लढाईचा पराभव पचवला. १९६२ ला वयाच्या २८ व्या वर्षी विधानसभेच्या पहिल्या निवडणुकीत पराभव वाट्याला घेऊन ते लढत राहिले. १९६२ पासून आजअखेर एकदा जिल्हा परिषद, सात वेळा विधानसभा व चारवेळा लोकसभेच्या निवडणुका त्यांनी लढविल्या. तीन विधानसभांचा पराभव वगळता त्यांचे नेतृत्व आजअखेर अपराजीतच राहिले आहे. या सर्व राजकीय वाटचालीत पावला-पावलावर संघर्ष करताना लढावू बाण्याचा कार्यकर्ता, अभ्यासू आमदार, कर्तव्यदक्ष मंत्री, लोकप्रिय खासदार, समर्पक सहकारी अशी त्यांची ओळख अधोरेखीत झाली होती.

काळम्मावाडी धरणाच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या मंडलिकांनी पाटबंधारे राज्यमंत्री झाल्यावर राधानगरी, भुदरगड, कागल आणि सीमाभागातील शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांतीचे स्वप्न फुलविले ते वेदगंगा नदीला बारमाही करून. डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा त्यांनी घेतलेला धाडसी निर्णय व धडक अंमलबजावणी हा त्यांच्या सार्वजनिक जीवनातील सुवर्णक्षण होता. पुढे तालुक्यातील तिन्ही नद्या बारमाही केल्या. पाण्यातून आलेल्या समृध्दीला फुलविण्यासाठी फोंड्या माळावर साखर कारखाना, दूध संघाची उभारणी आणि ती सक्षमपणे चालवून सर्वसामान्यांचे संसार उभे केले. पाटगांव आणि चिकोत्रा यासह जिल्ह्यातील मध्यम पाटबंधारे उभारणीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. कोल्हापूरच्या रेल्वे स्थानकास राजर्षी शाहू छत्रपती टर्मिनस, असे नामकरण करण्यात त्यांचा पुढाकार महत्त्वाचा राहिला. संसदेच्या प्रांगणात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी लक्षवेधी प्रयत्न, हरीप्रिया एक्सप्रेस आणि डेक्कन ओडीसी कोल्हापूरातुन सुरु करण्यात अग्रभागी, कागल तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध ठिकाणी शेती पाणी पुरवठा संस्था सहकार तत्वावर स्थापन करण्यात पुढाकार, मोतीबाग तालमीसाठी पन्नास लाखाचे अनुदान, कागल येथे जवाहर नवोदय विद्यालय तसेच डाएट केंद्र, कागल पंचतारांकीत एमआयडीसीसाठी प्रयत्न तसेच मतदार संघातील रस्ते, दळणवळण, आरोग्य, वाहतूक, पाणी, क्रीडा, शेती, सहकार, टेलिफोन आदी महत्वपूर्ण नागरी सुविधांबरोबरच चित्रनगरी, सीमाप्रश्न, पाटबंधारे, पर्यटन, साखर कारखानदारी यांसारख्या समाजहिताच्या प्रश्नांसाठी राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री तसेच केंद्र व राज्याच्या मंत्र्यांकडे ते सातत्याने पाठपुरावा करीत राहिले. संघर्षमय वाटचालीत काळाचे कठोर प्रहार झेलत ते वयाच्या ८० व्या वर्षीही कार्यमग्न होते.

- प्रकाश कारंडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामान्य कार्यकर्ता ते खासदार

$
0
0

सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या मात्र जनसेवेची आस असलेल्या आणि त्याप्रमाणे वाटचाल करणाऱ्या माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी सोमवारी रात्री निधन झाले. राजकारणात संघर्ष करत त्यांनी राज्यात मंत्रिपद आणि सलग चारवेळा खासदार होण्याचा बहुमान मिळविला. त्यांच्या एकूण राजकीय जडणघडण आणि कारकिर्दीसंदर्भातील आढावा...

सदाशिवराव मंडलिक यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९३४ रोजी मुरगूड (ता. कागल) येथे झाला. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी विद्यार्थीदशेपासूनच राजकारणात प्रवेश करत समाजकारण आणि राजकारण सुरू केले. राजकारण करायचेच असे ठरविलेल्या मंडलिक यांनी बी. ए.सुद्धा अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र हे विषय घेऊन १९५९ मध्ये पूर्ण केले. दरम्यान, विद्यार्थीदशेतच ते १९५६ ते १९६० या कालावधीत कोल्हापूर जिल्हा विद्यार्थी संघटनेचे सरचिटणीस होते. त्याबरोबरच १९५७ मध्ये राजाराम कॉलेजचे विद्यार्थी सचिवही होते. छत्रपती शाहू मराठा बोर्डिंगचे सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्याबरोबरच गोवा मुक्ती आंदोलनात अग्रभागी होते. १९६० ते ६२ या काळात ते कोल्हापूर जिल्हा विकास मंडळाचे सदस्य होते, तर ६७ ते ७१ या काळात कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समिती सभापती म्हणून काम केले. त्यानंतर अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून विधानसभेची निवडणूक कागल विधानसभा मतदारसंघातून लढवून चारवेळा मोठ्या मताधिक्याने विजयी मिळ‍विला. १९७२, १९८५, १९९० आणि १९९५ या चार निवडणुका त्यांनी जिंकल्या. राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करताना त्यांनी १९९३ मध्ये शिक्षण आणि पाटबंधारे व विविध सहा खाती सांभाळली.

१९९९ ते २००९ असे सलग चारवेळा खासदार म्हणून लोकसभेवर जाण्याची किमया त्यांनी केली. सहकार चळवळीतही मंडलिक यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी शेतकरी सहकारी संघ, दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक, कोल्हापूर जिल्हा कृषी उद्योग संघाचे संस्थापक, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि अध्यक्ष, राज्य सहकारी बँकेचे संचालक, हमीदवाडा साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, महालक्ष्मी दूध संघाच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण योगदान, कागल तालुक्यातील महिलांच्या अनेक सहकारी संस्था व दूध संस्था स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली.

त्यांनी मुरगूड येथे जय शिवराय एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. तसेच या संस्थेमार्फत १२ हायस्कूल व एक कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सुरू केले. समाजातील गोरगरीब व मागासवर्गीय विद्यार्थ्यांची वसतिगृहामध्ये राहण्याची व्यवस्थाही त्यांनी केली. तसेच हमीदवाडा येथे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, कागलमध्ये जवाहर नवोदय विद्यालय आणि चिमगाव येथे आश्रमशाळेचीही स्थापना केली.

काळम्मावाडी धरणाचे बांधकाम पूर्ण करण्यामध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. या धरणाचा लाभ दोन लाख शेतकऱ्यांना मिळाला, तर दीड लाख एकर जमीन ओलिताखाली आली. वेदगंगा, चित्री, चिकोत्रा व जांभरे हे मोठे व मध्यम पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करण्यामध्येही त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्याबरोबरच दूधगंगेचे पाणी वेदगंगेत वळविण्यासाठीही त्यांनी महत्त्वाचे काम केले.

संसदेत कोल्हापूरच्या विविध प्रश्नांवर त्यांनी आवाज उठविला. कोल्हापूर रेल्वे स्थानकाला राजर्षी शाहू महाराजांचे नाव देण्यासाठी सतत पाठपुरावा केला. तसेच संसद भवन परिसरात शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले. पुणे-मिरज-कोल्हापूर हा रेल्वेमार्ग मध्य रेल्वेला जोडण्याबाबत २० वर्षे पाठपुरावा करून त्यात यश मिळविले. पंचगंगा नदीचा राष्ट्रीय नदी योजनेत समावेश करण्यासाठी पाठपुरावा, स्वजलधारा योजनेखाली एकूण कोल्हापूर जिल्ह्यातून २०५ गावांचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविले व त्यामध्ये जिल्हा परिषदेचे १८१ व राज्य जीवन प्राधिकरणाच्या २४ गावांच्या योजनेचा समावेश आहे. याच्या मंजुरीसाठीही त्यांनी प्रयत्न केले. साखर उद्योगाच्या अडचणीबाबत वारंवार प्रश्न उपस्थित केले. अपुऱ्या पाटबंधारे योजना, केंद्र सरकारच्या मदतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले, जिल्हा बँकेतील गैरव्यवहाराबाबत तसेच बँकेच्या एनपीएमध्ये झालेली वाढ लक्षात घेऊन बँकेवर प्रशासक नेमावा म्हणून नाबार्ड व रिझर्व्ह बँकेकडे मागणीची दखल घेऊन बँकेवर त्रिस्तरीय प्रशासक मंडळ नेमले. कोल्हापूरच्या टोलविरोधी प्रश्नामध्येही त्यांनी आग्रही भूमिका घेतली होती.

दारादारात जाऊन हात जोडले

हमीदवाडा साखर कारखान्याची निवडणूक जिल्ह्यात नव्हे पश्चिम महाराष्ट्रात लक्षवेधक ठरली होती. मंडलिकांविरोधात हसन मुश्रीफ यांनी पॅनेल केल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत आली होती, पण मंडलिकांनी त्यावेळी कार्यकर्त्यांना ओळखून आपले पॅनेल मजबूत केले होते. सिद्धनेर्ली येथील शहाजी पाटील हे त्यांचे कट्टर कार्यकर्ते. मुश्रीफ यांच्याविरोधात त्यांनी पाटील यांना रिंगणात उतरवले होते. त्यावेळी मुश्रीफांसमोर सामान्य कार्यकर्त्याचा काय निभाव लागणार, अशीच चर्चा होती. मात्र, मंडलिकांनी 'तू फक्त उभा रहा, मी बघतो' अशा विश्वासाच्या शब्दावर शहाजी पाटील यांना रिंगणात उतरले. पाटील यांचा आवाका व विरोधकांची ताकद माहिती असणारे मंडलिक त्यावेळी पायाला जखम झालेली असतानाही मतदारांच्या दारादारात जाऊन हात जोडून उभे असायचे. १७ गावांमध्ये अशाप्रकारे केलेल्या प्रचाराने मतदारही हेलावून गेले होते. 'साहेब, तुम्ही येऊ नका, आम्ही काय करायचे ते करतो,' असे प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ते सांगायचे. पण 'आपला कारखाना वाचवायचा आहे' हे वाक्य ते मतदारांना सांगत. पण त्या कार्यकर्त्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी ते स्वतः घराघरात जाऊन हात जोडून उभे राहायचे. त्यावेळी शहाजी पाटील यांनी बाजी मारली. त्यांची ही आठवण सांगताना हमीदवाड्याचे संचालक असणारे शहाजी पाटील यांचे अश्रू अनावर झाले. 'साहेब नव्हे, ते आमचे भीष्माचार्यच होते' असे सांगत कार्यकर्त्यांवर जीव असणारा असा नेता पुन्हा होणार नाही असे पाटील यांनी सांगितले.

सामान्य कार्यकर्त्यांचा आधारवड

कागल मतदारसंघातील नव्हे तर मंडलिकांच्या नेतृत्वावर विश्वास असणारे जिल्ह्यात हजारो कार्यकर्ते होते. शेवटच्या टप्प्यात मंडलिक राष्ट्रवादीत नसले तरी कोल्हापूर शहरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हक्काने त्यांच्याकडे जात. मंडलिकांनीही त्यांना कधी दुसऱ्या पक्षातील म्हणून दूर लोटले नाही. त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्याचा त्यांचा प्रयत्न असे. त्यांच्या अशा कार्यपद्धतीमुळे अनेक सामान्य कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर विश्वास होता. पद्मा तिवले व राष्ट्रवादीतील अन्य महिला कार्यकर्त्यांची मंडलिकांच्या निधनामुळे आपला मोठा आधार गेल्याची भावना होती. 'सध्याच्या इतर नेत्यांची तुलना करता मंडलिकसाहेब केव्हाही गेला तर उपलब्ध असायचे. बाहेर तिष्ठत बसवण्याचा प्रश्नच नसायचा. तेच आता नाहीत त्यामुळे राजकारणात कशाला रहायचे,' पद्मा तिवले यांनी व्यक्त केलेल्या या भावना सामान्य कार्यकर्त्यांचे मंडलिकांवर असलेले प्रेम व्यक्त करत होत्या.

प्रकृतीची साथ नसतानाही पायाला भिंगरी

२००९ ची लोकसभा निवडणूक देशभरात चर्चेचा विषय ठरली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे मंडलिक कुठेपर्यंत पोहचणार याची चर्चा त्यावेळी प्रथम झाली. त्यावेळी प्रकृती साथ देत नसतानाही ते दिवसदिवसभर प्रचारासाठी फिरत होते. शरद पवारांवर प्रहार करत असताना पवारांच्या कार्यकर्त्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे ते प्रत्येक सभेत मांडत. त्यांच्या या आक्रमक शैलीलाच जिल्ह्यातील नागरिकांनी सलाम ठोकला व या अपक्ष उमेदवाराला तब्बल ४४ हजार मतांनी विजय मिळवून दिला.

दगड पडत असताना मंडलिक निश्चल

शहराचा व प्रामुख्याने ग्रामीण भागातील नागरिकांना टोल प्रकरण त्रासदायक आहे हे जाणून मंडलिक टोलविरोधी आंदोलनात प्रथमपासून सक्रिय होते. टोल विरोधाची बैठक असो वा आंदोलन, काही अपवादात्मक स्थिती सोडल्यास मंडलिक तिथे नव्हते असे कधीही होत नसे. टोल बंद करण्यासाठी रात्री दहा वाजता सर्व कार्यकर्ते जमलेले असताना मंडलिकही त्या आंदोलनात अग्रेसर होते. शहरवासीयांच्या संतप्त भावना असल्याने काहीही होण्याची शक्यता असताना मोठा पोलिस बंदोबस्त होता. त्याची जाणीव नेत्यांनाही होती. त्यावेळी मंडलिकांची प्रकृती व्यवस्थित नव्हती. घोषणाबाजी सुरू असताना अचानक वीज घालवण्यात आली व तुफान दगडफेक सुरू झाली. तिथेच नेते व कार्यकर्ते असल्याने दगडापासून वाचण्यासाठी इतरांची धावपळ सुरू झाली, पण मंडलिक मात्र निश्चल होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संघर्षशील राजकारणी

$
0
0

>> विक्रमसिंह घाटगे

कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाचा झंझावात म्हणजे सदाशिवराव मंडलिक होत. मुरगूडमध्ये जन्मलेल्या, शालेय शिक्षणही मुरगूडमध्येच पूर्ण केलेल्या मंडलिक यांनी कॉलेज जीवनातच समाजकारण आणि राजकारणाला सुरुवात केली. त्यांची राजकीय कारकीर्द संघर्षशील राहिली. संघर्षाच्या राजकारणातून यशाची चढती कमान गाठणाऱ्या मंडलिकांनी प्रत्येक टप्प्यावर आपला ठसा उमटवला. जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. पुढे आमदार, मंत्री, खासदार अशी मजल त्यांनी मारली.

त्यांनी कागल तालुक्याचे नेतृत्व केले. राजकारणात सक्रिय असताना, आमदार, मंत्री, खासदार म्हणून कार्याचा ठसा उमटवताना त्यांचा सामाजिक, सहकार क्षेत्रातही वावर होता. कारखाना, शाळा, कॉलेज उभी केली. गेले काही वर्षे ते आजारी होते, पण त्यांचे समाजकारण, राजकारण थांबले नाही. शेवटपर्यंत ते लोकांना भेटत राहिले. मंडलिकांनी शून्यातून विश्व निर्माण केले. त्यांची कारकीर्द म्हणजे झंझावात आहे. राजकारणात आम्ही अनेक वर्षे परस्परांशी संघर्ष केला, पण विकासाच्या मुद्यावर आम्ही एकत्र आलो. राजकारणात त्यांनी नीतिमत्ता पाळली. पुरोगामी विचार जपण्याचा प्रयत्न केला. अलीकडच्या काळात आम्ही संघर्ष विसरून एकत्र आलो होतो. त्यांच्याशी जसा संघर्ष केला, तशी मैत्रीही अनुभवली.

(संस्थापक, श्री शाहू छत्रपती कारखाना)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्तांतरानंतर पुन्हा ठराव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या (केडीसीसी) निवडणुकीमध्ये महत्त्वपूर्ण असलेल्या विकास सेवा संस्थेच्या निवडणुकीचे जिल्ह्यात धुमशान सुरू आहे. निवडणूक अधिनियम १० (चार) नुसार सत्तांतर झालेल्या विकास सेवा संस्थांना ठराव बदलण्याची मुबा मिळणार असल्याने विकास सेवा संस्थेवर वर्चस्व मिळवण्यासाठी जिल्हा स्तरावरील राजकीय नेत्यांपासून ग्रामीण भागातील कार्यकर्ते जीवाचे रान करु लागले आहेत. जिल्ह्यात सर्वत्र निवडणुकीचे पडघम जोरात सुरू असताना हातकणंगले तालुक्यातील एकाही संस्थेची निवडणूक प्रक्रिया झालेली नाही. ज्या संस्थांनी आधीच ठराव केले आहेत, त्या संस्थांमधील सत्ताधारी गट सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी साम,दाम, दंड, भेदाचा वापर करत आहेत. यातून अनेक गावांमध्ये जोरदार हाणामाऱ्याही झाल्या आहेत.

९७ व्या घटनादुरुस्तीनुसार सहकार कायद्यात मोठे बदल झाले होते. बदललेल्या कायदा व विविध कारणामुळे सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणूका दोन वर्षापासून झालेल्या नाहीत. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर सहकारी संस्थांच्या टप्प्याने निवडणूका जाहीर झाल्याने शिखर संस्थांसह ग्रामीण भागातील संस्थावर सत्ता मिळवण्यासाठी राजकीय पक्षामध्ये चढाओढ सुरू झाली आहे. जिल्हा बँकेसाठी मागील काही महिन्यांपासून ठरावाची प्रक्रिया सुरु आहे. हा ठराव आपल्यालाच मिळावा यासाठी इच्छुकांनी हात सैल सोडला होता. निवडणूक प्रक्रिया झालेल्या किंवा मुदत न संपलेल्या सेवा संस्थांचे ठराव २० फेब्रवारीपर्यंत दाखल झाले आहेत. मात्र ठराव दाखल करुनही जर संस्थेत संत्तातर किंवा ठरावधारक मतदाराचे निधन झाल्यास पुन्हा ठराव दाखल करण्याची तरतूद महाराष्ट्र सहकारी संस्था (समिती निवडणूक) नियम २०१४ मध्ये केली आहे. बदललेल्या या नियमामुळे निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या सेवा संस्थांमध्ये संत्तातर घडवून आणण्यासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. आता सत्ताधारी गटाला आपला ठराव कायम करण्यासाठी पुन्हा हात सैल सोडावा लागत आहे. काही गावांमध्ये यावरून जोरदार हाणामाऱ्या झाल्या आहेत. तसेच अनेक तोट्यात असलेल्या संस्थांवर निवडणूक लादून संस्थेवर कर्जाचा बोजा वाढविला आहे.

जिल्हा बँकेसाठी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध होऊन त्यावर हरकती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. पक्की मतदार यादी प्रसिद्ध होण्याच्या पाच दिवस अगोदर असे दुबार ठराव दाखल करण्याची मुभा असल्याने सेवा संस्था ताब्यात घेण्यासाठी ग्रामीण पातळीवरील कार्यकर्ते धडपड करत असून त्यांना जिल्हा पातळीवरील बड्या नेत्यांचे मोठे पाठबळ प्राप्त होत आहे.

संस्था अडचणीत

काही संस्था कर्जमाफीच्या अपात्रतेनंतर कमीत कमी आठ ते दहा लाख रुपये तोट्यात गेल्या आहेत. त्यात निवडणुका लागल्यानंतर या प्रक्रियेचा खर्च सुमारे दोन लाख रूपये संस्थेच्या नावे पडतो. त्यामुळे बुडत्याचा पाय खोलात जात असल्याने भविष्यकाळात या संस्था बंद होण्याच्या मार्गावर आहेत. केवळ राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी या संस्थांच्या निवडणुका लागल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घडला गुन्हा, शोधा मोटारसायकली

$
0
0

सतीश घाटगे, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्यावर हल्ला करणारे हल्लेखोर विशिष्ट कंपनीच्या मोटारसायकलवरून आले होते असे तपासात पुढे आल्यानंतर कोल्हापूर परिक्षेत्रातील चोरीला गेलेल्या मोटारसायकलींच्या तपासाची आकडेवारी पोलिस काढू लागले आहेत. मोटारसायकल चोरीस गेल्यावर पोलिस खात्याकडून तपास संथगतीने होत असल्याने पानसरे यांच्या हत्येनंतर चोरीस गेलेल्या मोटारसायकलींचा तपास म्हणजे 'बैल गेला आणि झोपा केला' अशी स्थिती झाली आहे.

दहशतवादी गर्दीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट करण्यासाठी सायकल व मोटारसायकलचा वापर करतात. पुण्यातील फरासखाना पोलिस ठाण्यासमोर झालेल्या बॉम्बस्फोटात तपास करताना बॉम्ब पेरणाऱ्यांनी मोटारसायकलच्या डिगीत बॉम्ब ठेवला होता. मोटारसायकलचा तपास करताना ही मोटारसायकल चोरीची होती असे निदर्शनास आले. स्फोटासाठी हल्लेखोर मोटारसायकलचा वापर करण्याची शक्यता लक्षात घेऊन चोरीस गेलेल्या मोटारसायकलचा कसून तपास करावा, असे आदेश गृहखात्याने दिले होते, पण प्रत्येक पोलिस ठाण्यात मात्र वाहन चोरीचा तपास अतिशय संथगतीने होतो हे सत्य आहे.

बनावट चावीचा वापर करून मोटारसायकल चोरीचे प्रकार वाढले आहेत. मोटारसायकल चोरीची फिर्याद द्यायला गेल्यावर फिर्यादीला पोलिसांकडून चमत्कारिक उत्तर मिळते. पहिल्यांदा तक्रार करा आणि दोन दिवसांनंतर फिर्याद द्या. तोपर्यंत मित्र, पै-पाहुण्यांकडे तपास करा, असा सल्ला दिला जातो. मोटारसायकल चोरीस गेल्याची माहिती कळताच ती ताबडतोब कंट्रोल रूमला कळवून जर पोलिसांनी नाकाबंदी केली तर मोटारसायकल सापडण्याची शक्यता जास्त असते, पण मोटारसायकलची किंमत व पोलिसांच्या बेफिकिरीमुळे मोटारसायकलचा तपास रेंगाळत राहतो. एकादा चोरटा सापडल्यावर मोटारसायकलची ओळख पटते.

पानसरेंच्या हत्येनंतर मोटारसायकल चोरीचा तपास पुन्हा सुरू झाला आहे. मोटारसायकलचे मालक कोण?, मोटारसायकल कोणत्या परिसरातून गेली? किती वर्षांपूर्वी गेली? रेकॉर्डवरील मोटारसायकल चोरट्यांची माहिती जमा केली जात आहे. पानसरेंच्या हल्ल्यात वापरलेली मोटारसायकल चोरीची होती का, या संशयावरून मोटारसायकल चोरीच्या तपासाची पुन्हा उजळणी होते हे मोटारमालकांचे नशीबच म्हणावे लागेल, अन्यथा 'बैल गेला व झोपा केला' अशी स्थिती पोलिसांची मात्र झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images