Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘तासगाव-पलूस’मागे स्वाभिमानीची ताकद

$
0
0
तासगाव-पलूस सहकारी साखर कारखान्याची विक्री-प्रक्रिया रद्द करण्याबाबत, तसेच कारखाना सभासदांचाच रहावा असे धोरण स्वीकारण्यासंदर्भात ५ ऑगस्टला बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले होते.

कामगारांची देणी दिल्यानंतर कारखाना सुरू

$
0
0
प्रथम कामगारांची सर्व थकित देणी भागविली गेली तरच वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरू करून दिला जाईल, असा इशारा ज्येष्ठ कामगार नेते आर. बी. शिंदे यांनी बुधवारी ‘मटा’शी बोलताना दिला.

जवान उत्तम फडतरे यांचा अपघाती मृत्यू

$
0
0
भारतीय लष्करात सिलिगुडी (आसाम) येथे कार्यरत जवान उत्तम जगन्नाथ फडतरे (वय ३६, रा. सुलतानवाडी, ता. कोरेगाव) यांचा अपघाती मृत्यू झाला. रविवारी (४ जुलै) सायंकाळी ही घटना घडली. फडतरे हे १९९६मध्ये लष्करात चालकपदी भरती झाले होते.

कुष्ठरुग्णांना सन्मानाने जगता यावे

$
0
0
कुष्ठरुग्णांना समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी सुरू असलेल्या अभियानात जास्तीत-जास्त तरुणांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ख्यातनाम समाजसेवक डॉ. विकास आमटे यांनी केले.

नवे उपविभागीय कार्यालय कवठेमहांकाळला

$
0
0
जत आणि कवठेमहांकाळ उपविभागीय कार्यालय कवठेमहांकाळमध्ये होणार असून, यासंदर्भातील अधिकृत अंतिम अधिसूचना जारी झाली आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे १५ ऑगस्टपासून हे नवीन उपविभागीय कार्यालय सुरू होणार आहे, अशी माहिती मिरजेचे प्रांताधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिली.

केंद्राचे विधेयक अन्यायकारक

$
0
0
केंद्र सरकारने सुचविलेले जमीन सुधारणाचे प्रारूप हे शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असल्याने राज्य सरकारने ते फेटाळले आहे.

पिस्तुलाचा धाक दाखवून महिलेचे दागिने लंपास

$
0
0
इंगळेनगर येथे घरात शिरून दोघा अज्ञात तरुणांनी एका महिलेला पिस्तुलाचा धाक दाखवून गळ्यातील दोन तोळ्यांचे दागिने लुटले. यावेळी महिलेने आरडाओरडा केला असता चोरटे मोटारसायकलवरून पसार झाले.

जवाहरनगरात घरफोडी, दोन तोळे दागिने लंपास

$
0
0
जवाहरनगर येथे एका बंद घरातील कुलूप तोडून चोरट्यांनी दोन तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याचा प्रकार बुधवारी सकाळी उघडीस आला.

गुजरीत पाच ठिकाणी चोरीचा प्रयत्न

$
0
0
एकाच ठिकाणी पाच ते दहा घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांच्या नव्या पध्दतीचा रोख आता गुजरीसारख्या व्यापारी पेठेकडे वळला आहे. बुधवारी पहाटे गुजरी कॉर्नरला एका पतसंस्थेसह चार दुकानांमध्ये चोरीचा प्रयत्न झाला.

पंचगंगा घाटाची स्वच्छता

$
0
0
तब्बल २९ दिवसांनंतर पंचगंगा नदीचे पाणी पात्रात परतल्यानंतर महापालिकेच्यावतीने बुधवारी दिवसभर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पाणी उतरल्याने पंचगंगा नदी घाटाच्या परिसरात दलदल निर्माण झाली होती.

निर्णय घ्या, अन्यथा काम बेमुदत बंद

$
0
0
शेतकरी सहकारी संघाच्या संचालक मंडळाने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही काम बंद ठेवू, असा इशारा ज्येष्ठ नेते अॅड. गोविंदराव पानसरे यांनी दिला.

व्हॅलिडिटीसाठी विद्यार्थ्यांचे वेटिंगच

$
0
0
प्रवेश प्रक्रिया संपली तरीही विभागीय जातपडताळणी कार्यालयाकडून व्हॅलिडीटी सर्टिफिकेट मिळत नाही. समितीच्या गचाळ कारभारामुळेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याशी खेळ दरवर्षी सुरू आहे.

मजूर सहकारी संघाच्या व्यवस्थापकास अटक

$
0
0
मजूर सहकारी संस्थेची बनावट कागदपत्रे बनवून त्याच्या सत्यप्रती सहकार न्यायालयात सादर केल्याप्रकरणी मजूर सहकारी संघाचे माजी अध्यक्ष व त्यांच्या सख्ख्या भावासह संघाच्या व्यवस्थापकावर शाहूपुरी पोलिस स्टेशनमध्ये गुरुवारी गुन्हा नोंद झाला.

राज्यातील पोलिसांचे पगार एका क्लिकवर

$
0
0
दरमहा ट्रेझरीतून चेक घ्यायचे आणि पोलिस स्टेशननिहाय त्यांचे वाटप करायचे. त्यानंतर संबंधित पोलिस स्टेशनमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पगार त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू व्हायची.

पुढील वर्षीचे नियोजन १५ ऑगस्टपूर्वी

$
0
0
आगामी वर्षात येऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून होणारी विकासकामे रखडली जाऊ नयेत यासाठी विविध खात्यांना १५ ऑगस्टपूर्वी पुढील आर्थिक वर्षातील कामांचे नियोजन सादर करण्याची सूचना केली आहे.

२१ फुटी गणेशमूर्तींची उंची कमी होणार?

$
0
0
मूर्तींचे विसर्जन करताना मंडळांना दरवर्षी करावी लागणारी जीवघेणी कसरत यामुळे गणेशमूर्तीची उंची कमी करण्याबाबत पोलिसांकडून होत असलेल्या जनजागृतीला मंडळांकडून यंदा तरी प्रतिसाद मिळणार का, याबाबत शहरवासीयांत चर्चा सुरू आहे.

फैय्याज यांची उद्या मैफल

$
0
0
संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय नाट्यपरिषदेच्यावतीने ज्येष्ठ गायिका फैय्याज यांच्या नाट्यगीतांच्या मैफलीची आयोजन करण्यात आले आहे.

यंग सीनिअर्सचा निषेध पंधरवडा

$
0
0
जेष्ठ नागरिक संघाच्या प्रमुखांनी आमदार राजेश क्षीरसागर यांची भेट घेऊन सरकारकडून मिळणारी आश्वासने, समस्या मांडल्या. जेष्ठ नागरिकांकडून १ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट या कालावधीत निषेध पंधरवडा पाळला जात आहे.

वाहतुकीचा ‘बोजा’ कायम

$
0
0
शहरातील वर्दळीच्या भागात अवजड, जड व मध्यम मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना वर्दळीच्या वेळेत बंदी आहे. तरीही अवजड वाहनांची वाहतूक होत असताना शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून दुर्लक्ष केले जात आहे.

उत्कृष्ट तपास अधिकारी सन्मान

$
0
0
पोलिस निरीक्षक सयाजी गवारे यांचा राज्य सरकारच्या वतीने ‘उत्कृष्ट तपास अधिकारी’ म्हणून पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images