Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘कीटकांमुळेच मानवी अस्तित्व’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जगात अन्नधान्याच्या उत्पादनासाठी परागीभवनाच्या प्रक्रियेचे महत्त्व आहे. कीटकांच्या माध्यमातून परागीभवन होत असल्याने कीटक नसते तर मानवाचे अस्तित्वच धोक्यात आले असते,' असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ज्येष्ठ प्राणिशास्त्रज्ञ डॉ. ए. एम. खुरद यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या समान संधी कक्षातर्फे आयोजित 'डॉ. आप्पासाहेब तानसेन वरुटे स्मृती व्याख्यानमालेत' 'कीटकांचे अद्भुत विश्व' या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे होते. शिक्षणशास्त्र अधिविभाग सभागृहात व्याख्यान झाले.

डॉ. खुरद म्हणाले, 'पृथ्वीतलावर सुमारे १.७५ सजीव आहेत. त्यामध्ये १.४ दशलक्ष प्राणी असून, यात सुमारे एक दशलक्ष निव्वळ कीटक आहेत. मानवाची लोकसंख्या साधारणतः सहा ते सात दशलक्षांच्या दरम्यान आहे. कीटकांची संख्या मात्र सरासरी एकरी ४० दशलक्ष इतकी प्रचंड आहे. केवळ एक टक्का कीटक उपद्रवी असतात. मधमाश्या, रेशीमकीडे, लाख अळ्या यांची मानवाला मदत होते. परागीभवन अधिक गतीने कीटकांमार्फतच होते. त्यामुळे कीटकांचे मानवजातीवरील उपकार मोठे आहेत.'

डॉ. एम.एस. पद्मिनी यांनी स्वागत केले. डॉ. प्रतिभा पाटणकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुप्रिया पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. डी.व्ही. मुळे यांनी आभार मानले.


‘योजना तीच’ केवळ नावात बदल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ग्रामीण भागात वीज जाण्याचे प्रमाण कमी व्हावे आणि कृषी पंपांसाठीही वीज मिळून शेतीकामे सुलभ व्हावी यासाठी देशात नव्याने दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी सुरू असलेल्या राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेचे नाव बदलून केंद्र सरकारने दीनदयाळ उपाध्याय योजना सुरू केली असली तरी योजनेतील उद्देश तेच ठेवण्यात आले आहेत. गुजरातमध्ये या योजनेला चांगले यश मिळाल्यानंतर ती संपूर्ण देशात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण ज्योती योजना ही केवळ ग्रामीण भागासाठीच असेल. त्यामध्ये शेती आणि बिगरशेती असे दोन वेगवेगळे फिडर बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे शेती पंपांना वीज मिळेल तसेच मोटार जळण्याचे प्रमाणही कमी होणार आहे. त्याबरोबरच ग्रामीण भागात प्रत्येक ठिकाणी मीटर बसविण्यात येणार असून उपकेंद्रे, फिडर्स, वितरण संहित्रे आणि ग्राहकांचे एनर्जी ऑडिटही करण्यात येणार आहे. यापूर्वीही राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेंतर्गत फिडर वेगळे करण्याचे काम करण्यात आले आहे.

केंद्र सरकारकडून या योजनेसाठी ४३ हजार ३३ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची गरज लागेल. यामध्ये केंद्र सरकार ३३ हजार ४५३ कोटी मदत करणार आहे. ग्रामीण विद्युतीकरण योजनेचे सशक्तीकरण हा या योजनेचा उद्देश असून, यामध्ये येणाऱ्या विविध घटकांसाठी आराखडा तयार करून तो केंद्र सरकारकडे पाठवावा लागणार आहे.

या योजनेसाठी ग्रामीण विद्युतीकरण समिती नोडल एजन्सी म्हणून काम करणार आहे. ही समिती ऊर्जा सचिवांच्या अध्यक्षतेखाली काम करणार आहे. योजनांना मंजुरी देणे आणि त्याची पाहणी करणे असे काम त्यांना करावे लागणार आहे. ही योजना यशस्वी करण्यासाठी ऊर्जा मंत्रालय, राज्य सरकार आणि डिस्कॉम यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार करण्यात येणार आहे. योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर एक वर्षाच्या आत ते काम मार्गी लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या योजनेसाठी राज्य सरकारांनी योग्य प्रगती दाखविली तर त्यांना ७५ टक्के केंद्राचे अनुदान, अन्यथा ६० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. तर विशेष राज्यांना ८५ टक्के अनुदान देण्यात येणार आहे. अधिक अनुदान मिळविण्यासाठी योजना वेळेत पूर्ण करणे, राज्य सरकारकडून अनुदान योग्य प्रकारे देणे याला महत्त्व असणार आहे. विशेष राज्यांमध्ये पूर्वेकडील राज्ये, जम्मू आणि काश्मीर तसेच हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश होतो.

महापौर ‘नॉट रिचेबल’

$
0
0

'ना'राजीनाम्याची पुनरावृत्ती; राष्ट्रवादीत चलबिचल; काँग्रेसची कोंडी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापौर तृप्ती माळवी यांनी सोमवारच्या (ता.१६) सभेत राजीनामा सादर करावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून दबाव टाकला जात आहे. मात्र, राष्ट्रवादीचे नेते आणि पक्षाच्या आवाहनाला न जुमानता महापौर माळवी गेले दोन दिवस 'नॉट रिचेबल' आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांशी त्यांचा संपर्क होऊ न शकल्याने पक्षात चलबिचलता वाढली आहे. महापौरांचा राजीनामा लांबल्यामुळे काँग्रेस पक्षाची कोंडी झाली आहे. महापौरपदाची संधी असूनही काँग्रेसला पदासाठी राष्ट्रवादीच्या मागे धावावे लागत आहे. महापौरांच्या बदलत्या भूमिकेमुळे सोमवारच्या सर्वसाधारण सभेत नऊ तारखेची पुनरावृत्ती होणार की महापौरांच्या राजीनाम्याचा फैसला होणार? याबद्दल सांशकता आहे. महापौरांनी रजा अर्ज दिला असला तरी सभेपूर्वी त्या येऊ शकतात. त्यामुळे सभा सुरू होईपर्यंत त्या येणार की अनुपस्थित राहणार हे सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून आहे. माळवी जर आल्या नाहीत तर नगरसचिवांकडून रजेचा अर्ज सभागृहासमोर सादर केला जाईल.

राजीनामा हा पक्षाचा प्रश्न..

महापौर माळवी यांच्या राजीनाम्यासाठी उद्योगपती राजू जाधव मध्यस्थी करत असल्याचे राष्ट्रवादीचे नेते सांगत आहेत. यासंदर्भात जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 'माळवी यांचा राजीनामा ही राष्ट्रवादीची पक्षांतर्गत बाब आहे. राजीनाम्यासंदर्भात माझे कुणाशीही बोलणे झाले नाही. माळवी या मी राहत असलेल्या प्रभागातील असल्याने त्यांना महापौरपद मिळावे यासाठी आपण मुश्रीफांची भेट घेतली होती. मुळात राजकारण आणि माझा काही संबंध नाही. त्यामुळे राजकीय घडामोडीत सहभागी होण्याचा प्रश्न नाही.'

...तर उपमहापौर सभेचे अध्यक्ष

महापौरांनी सभागृहात स्वतः उपस्थित राहून राजीनामा सादर करण्याचे संकेत आहेत. माळवी सोमवारी रजेवर आहेत. त्या अनुपस्थित राहिल्या तर उपमहापौर मोहन गोंजारे यांना सभेचे अध्यक्षपद भूषविता येते. उपमहापौरही हजर राहिले नाहीत तर सभागृहाला नवा अध्यक्ष निवडावा लागतो असे महापालिका कायद्यात नमूद आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता सभा होणार आहे.

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना मुश्रीफांची ग्वाही

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पॅटर्ननुसार महापौरपद काँग्रेसकडे आले आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी रात्री मुश्रीफ यांची सर्किट हाउस येथे भेट घेतली. मुश्रीफांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना, माळवी या सोमवारी राजीनामा देतील अशी ग्वाही दिली आहे. शिष्टमंडळात उपमहापौर मोहन गोंजारी, गटनेते शारंगधर देशमुख, चंद्रकांत घाटगे, प्रदीप उलपे, आदींचा समावेश होता. रविवारी मुश्रीफ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते कौटुंबिक कार्यक्रमासाठी पुणे येथे असल्याचे सांगण्यात आले.

राजीनामा न दिल्यास पक्षाकडे तत्काळ अहवाल

'महापौरांनी स्वतः १६ तारखेची विशेष सभा बोलावली आहे. त्यामुळे त्या राजीनामा देतील. पॉप्युलर स्टील वर्क्सचे राजू जाधव, अनिल काटे यांनी माळवी यांना महापौर करण्यासाठी पुढाकार घेतला होता. आता त्यांच्या राजीनाम्यासाठी जाधव आणि काटे यांच्याशी चर्चा केली आहे. ते दोघे माळवी यांच्याशी चर्चा करतील आणि सोमवारी राजीनामा होईल. तथा​पि, त्यांनी राजीनामा दिला नाही तर पक्षाचे नेते हसन मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष के. पी. पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्याशी चर्चा करून राजीनाम्यासंदर्भातील अहवाल प्रदेश राष्ट्रवादीकडे स्वत: जाऊन देणार आहे. पक्षाकडून जे आदेश येतील त्यानुसार माळवी यांच्यावर कारवाई होईल असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी सांगितले.

टस्करचा मुक्काम कायम

$
0
0

राधानगरी तालुक्यातील दुबळेवाडी परिसरातील ग्रामस्थांत भीतीचे वातावरण

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

गावानजीकच्या शेतातच टस्करने मुक्काम केल्याने ग्रामस्थांच्या मध्ये असलेली प्रचंड भीती....टस्करला पाहण्यासाठी दिवसभर बघ्यांची उडालेली झुंबड...आणि हत्ती आला रे..अशा अचानक आलेल्या आरोळीने सर्वांची झालेली धावपळ. तर टस्करला पकडण्यासाठी दिवसभर व्यूहरचना करणारे वन अधिकारी, त्यांचे कर्मचारी आणि पोलिस यंत्रणा यामुळे दुबळेवाडीला अगदी छावणीचे स्वरूप आले असून प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या अभावी वनविभाग हतबल झाल्याचे चित्र येथे दिसत आहे

शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता आजरा, कडगाव, एरंडपे मार्गावरून टस्करने दाजीपूर अभयारण्य हद्दीतील आडोलीपैकी दुबळेवाडी येथील बाळू कृष्णा दळवी यांच्या शेतातील केळी व उसाचे मोठे नुकसान केले होते. वनविभाग व स्थानिकांनी हुसकावल्याने टस्करने नजीकच्या जंगलात आश्रय घेतला. दिवसभर जंगलात राहिल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र शनिवारी रात्री त्याने पुन्हा त्याच उसाच्या फडात शिरून पिकांचा फडसा पाडला. रविवारी दिवसभर त्याच उसात त्याचे अस्तित्व असल्याच्या शक्यतेने वनविभाग व ग्रामस्थांनी दिवसभर ऊसाच्या शेताभोवती कडा पहारा दिला होता. वेगवेगळ्या वाद्यांचे, पत्र्याच्या डब्यांचे आवाज काढले. त्याचबरोबर फटाक्याची आतिषबाजी करूनही टस्कर उसातून बाहेर आला नाही. केवळ त्याच्या दर्शनाची प्रतीक्षा सुरु असताना तोच टस्कर जंगलात फिरताना दिसल्याची चर्चा झाली आणि रविवारच्या सगळ्या मोहिमेचा फज्जा उडाला.

शनिवारी रात्री टस्करने प्राथमिक शाळेतील पाण्याची टाकी सोंडेने फोडून टाकली. गावच्या मंदिराच्या कळसापर्यंत पोहचणारी त्याची सोंड आणि गावभर निनादलेला त्याचा चित्कार अनेकांनी पहिला आहे. त्यातच गावानजीकच्या शेतात टस्करचा मुक्काम असल्याच्या शक्यतेने ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.त्याला पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केल्याने त्यांना पांगविण्यासाठी वनविभागाने अखेर पोलिसांना पाचारण केले आहे .वनविभागाच्या वरिष्ठ प्रशासनाने हत्ती पकडण्यासाठी पथक पाठविले खरे मात्र त्यांना खास प्रशिक्षण नसल्याच्या कारणाने पथक माघारी गेले. रविवारी रात्री टस्कर पुन्हा त्याच शेतात येण्याची शक्यता वनविभागाला असून असंख्य ग्रामस्थासह वनखात्याचे पंचवीस कर्मचारी,पाच पोलस तंबू टाकून येथेच टस्करची प्रतीक्षा करीत असल्याचे चित्र आहे.

कोकणासारखी मोहिम राबवा ...

आमदार प्रकाशराव आबिटकर यांनी दुबळेवाडीस भेट दिली असता वनक्षेत्रपाल एस.एस.पाटील यांनी संभाव्य धोके पाहता या टस्करला पकडण्यासाठी कोकणात सध्या हत्ती पकडण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाला येथे पाचारण करण्याची मागणी त्यांच्याकडे केली.

आधी वाटले फटाके फुटले!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोविंद पानसरे दररोज सागर माळ परिसरातून शिवाजी विद्यापीठ परिसरात पत्नी उमा पानसरे यांच्यासोबत फिरायला जातात. नेहमीप्रमाणे आज सकाळी साडे सात वाजता ते फिरण्यासाठी बाहेर पडले. त्यानंतर विद्यापीठ परिसरात फिरावयास गेले. फिरून साधारणतः नऊ वाजण्याच्या सुमारास रेड्याची टक्कर परिसरात आले. त्याठिकाणी थोडा वेळ थांबून घराकडे निघाले होते. घरापासून अवघ्या २०० मीटरवरवरच त्यांना मागावर असलेल्या हल्लेखोरांनी गाठले.

पानसरे यांच्यावर हल्लेखोरांनी गोळ्यांचे पाच राऊंड फायर केले आणि ते पसार झाले. त्यामधील तीन गोळ्या पानसरे यांना लागल्या असून एक मानेत, एक छातीला आणि एक कमरेच्या वरच्या भागाला चाटून गेली आहे. पानसरे यांचा आयडीयल सोसायटीमध्ये १७ क्रमांकाचा बंगला आहे. या बंगल्यामध्ये ते पत्नी उमा पानसरे, सून मेघा पानसरे आणि नातवंडे मल्हार आणि कबीर यांच्यासोबत राहतात. त्यांच्या बाजुलाच सागर तळाशीकर यांचा बंगला आहे. त्याठिकाणी तळाशीकर यांच्या आई आणि शशिकांत जोग हे राहतात. सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास जो गोळीबार झाला तो चंपालाल ओसवाल यांच्या घरासमोर झाला. त्यावेळी चंपालाल ओसवाल हे गाडी धूत होते. भारत-पाकिस्तान मॅचमध्ये भारताने विजय मिळविल्याने रात्रभर फटाके वाजत होते. त्याप्रमाणे सकाळी देखील कोणीतरी फटाके वाजवत असेल असे वाटून त्यांनी या आवाजाकडे दुर्लक्ष केले. तसाच आवाज शशिकांत जोग यांनाही आला होता. थोड्यावेळाने ओरडण्याचा आवाज आला 'घात झाला, घात झाला' असा आवाज आल्याने चंपालाल ओसवाल आणि शशिकांत जोग हे पळत आले. त्यावेळी गोविंदराव पानसरे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. तर पत्नी तोंडावर पडल्या होत्या. त्यांना धक्का बसल्यामुळे काहीच बोलता येत नव्हते.

शशिकांत जोग घटनास्थळावर आल्यानंतरही त्यांना पानसरे आहेत हे ओळखताही येत नव्हते कारण त्यांच्या संपूर्ण शरीरावर,चेहऱ्यावर रक्त पसरले होते. तोंडातूनही रक्त येत होते.गोविंद पानसरेंनीच जोग यांना ओळखले. त्यानंतर जोग यांनी त्यांच्या सून मेघा पानसरे यांना आवाज दिला आणि त्यांच्या बंधूंनाही बोलविले. त्यानंतर त्यांना तातडीने जवळच असलेल्या अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. गोविंदराव पानसरे यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. तीन गोळ्या त्यांना छाटून गेल्या असून त्यांच्यावर शस्त्रक्रियेनंतरच पुढील माहिती देण्यात येईल असे डॉक्टरांनी सांगितले. तर त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांची प्रकृती स्थिर असल्याचेही त्यांनी सांगितले. घटनास्थळावर पोलिसांची टीम दाखल झाली असून पूर्ण रस्ता बंद करण्यात आला आहे. घटनास्थळी पिस्तुलच्या पाच पुंगळ्या सापडल्या आहेत. त्यातील चार गोळ्या जमीनीवर तर एक गोळी समोरच्या सागर शिक्षण मंडळाच्या भिंतीवर लागली आहे. पिस्तुलच्या सर्व पुंगळ्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून प्रत्यक्षदर्शींचे जाबजबाबही घेतले आहेत.

धिक्कार...संताप!

$
0
0

राज्यभरातून तीव्र निषेध

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी मोकाट असताना सोमवारी कोल्हापुरात कॉ. गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद मुंबईतही उमटले. 'आम्ही सारे पानसरे... आम्ही सारे दाभोलकर..' अशा बुलंद घोषणा देत भाकपच्या कार्यकर्त्यांसह महाराष्ट्रातल्या डाव्या पुरोगामी विचारांच्या संस्था- संघटनांनी आझाद मैदानात तीव्र निदर्शने करीत हल्ल्यांचा निषेध केला. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये पानसरेंच्या घराजवळ दिवसाढ‍वळ्या झालेला हल्ला हा नाकर्त्या सरकारवरील कलंक असल्याची चीड या आंदोलनातून व्यक्त झाली.

भाकपच्या राष्ट्रीय कार्यकारणीतल्या ज्येष्ठ नेत्यांसह माकप, भाकप, जनता दल, राष्ट्रीय सेवा दल, लोकभारती, स्त्री मुक्ती संघटना, शेकाप, आयटक, लाल निशाण पक्ष यासारख्या परिवर्तनवादी संस्था- संघटनांनी पानसरेंवरील या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. कोणत्याही परिस्थितीमध्ये चोवीस तासांच्या आत मारेकऱ्यांना अटक व्हायला हवी, ही मागणी लावून धरण्यात आली. कष्टकरी, सामान्यजनांचा आवाज असलेल्या पुरोगामी विचारांच्या कॉ. पानसरेंवरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून कष्टकरी वर्गही मोठ्या संख्येने आझाद मैदानात येऊन धडकला होता. माकपचे महाराष्ट्राचे सचिव डॉ. अशोक ढवळे, कॉ. प्रकाश रेड्डी, जनता दलाचे प्रभाकर नारकर, लाल निशाण पक्षाचे मिलिंद रानडे, आ. कपिल पाटील, शेकापचे राजू कोरडे, सिनेदिग्दर्शक आनंद पटवर्धन, शिक्षक चळवळीच्या नेत्या क्रांती जेजुरीकर आदी यावेळी उपस्थित होते.

दुपारी तीन वाजल्यानंतर मुंबईच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केल्यावर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला. काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी गाड्यांतून उचलून नेले, अर्ध्या तासाने पुन्हा आझाद मैदानात आणले.

कोल्हापुरात बंदसदृश स्थिती

कोल्हापूरः सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अग्रणी ज्येष्ठ नेते कॉमेड गोविंदराव पानसरे यां‍च्यावर हल्ला झाल्याची बातमी क्षणार्धात संपूर्ण शहरभर पसरल्यानंतर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या भ्याड हल्ल्याचा निषेध करत मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील दुकाने व हातगाड्या बंद ठेवण्यात आल्या. संपूर्ण शहरात विविध संघटनांकडून निदर्शने करण्यात आली. दिवसभर बंदसदृश स्थिती होती. सर्वत्र पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्याची मागणी करीत दुपारी बाराच्या सुमारास वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून वाहतूक सुरळीत केली. दहा-बारा मोटरसायकलवरून तरुणांचा एक गट मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आला. त्यांनी हल्ल्याच्या निषेधाच्या घोषणा देत एसटी व केएमटी बसेस थांबवून प्रवाशांना खाली उतरवले. भाऊसिंगजी रोड, शिवाजी प‌ुतळा व गंगावेश या ठिकाणी गेला. त्यांनी या ठिकाणी केएमटी बसेस थांबवल्यामुळे रिक्षा व वडाप वाहतूकही बंद करण्यात आली.

'आम्ही पानसरे, आम्हालाही गोळ्या घाला'

औरंगाबाद ः डावी लोकशाही आघाडी व पुरोगामी पक्षातर्फे (लोकशाहीवादी) सकाळी पैठण गेट येथे एकत्र येऊन, 'आम्ही पानसरे, आम्हालाही गोळ्या घाला, धर्मांध फॅसिस्ट शक्ती मुर्दाबाद' अशा घोषणा देत, तीव्र शब्दांमध्ये निषेध करण्यात आला. भाकप, आप, सप तसेच पुरोगामी तसेच धर्मनिरपेक्ष विचारांच्या संघटनांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला. मराठवाड्यात उस्मानाबाद, लातूर येथेही निषेध मोर्चे काढण्यात आले.

सांगलीत उद्या आंदोलन

सांगली : सांगलीत डाव्या चळवळीतील स्थानिक नेत्यांनी बुधवारी सांगलीतील राजवाडा चौकात रस्ता रोको करण्याचा इशारा दिला. जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार प्रा. शरद पाटील, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. के.डी. शिंदे, कामगार नेते शंकर पुजारी, संपतराव पवार आदी बैठकीला उपस्थित होते.

सातारा जिल्ह्यात निषेध

सातारा : साताऱ्यात एसटी स्टँड परिसरातील फेरीवाल्यांनी तातडीने गाड्या बंद करून जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. हल्लेखोरांना पकडेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराही संघटनेने दिला.

राम शिंदेंसमोर कार्यकर्त्यांचा उद्रेक

$
0
0

राम शिंदे यांच्या मोटारीला घातला गराडा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते गोविंदराव पानसरे यांच्यावर उपचार सुरू असलेल्या अॅस्टर-आधार हॉस्पिटलमध्ये भेटीसाठी आलेल्या गृह राज्यमंत्री राम शिंदे यांना सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास कार्यकर्त्यांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागले. 'हिंदुत्ववाद्यांचा निषेध असो', 'राम शिंदे चले जाव', 'पानसरे झिंदाबाद, इन्कलाब ‌झिंदाबाद', 'हल्लेखोरांना पकडा, नाहीतर खुर्ची खाली करा' अशा घोषणांनंतर कार्यकर्त्यांनी 'हल्लेखोर सरकारचा निषेध असो' असे म्हणत थेट सरकारवरच टीकेची झोड उठवली.

पानसरे दाम्पत्यावर सकाळी झालेल्या गोळीबारानंतर हा प्रकार म्हणजे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यावरील हल्ल्याची पुनरावृत्ती असल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर कार्यकर्त्याचा संताप वाढत होता. 'आणखी किती दिवस आपण विवेक सांभाळायचा?, बस्स झाले आता, बांध फुटला' अशा प्रतिक्रिया कार्यकर्ते देत होते. दुपारपर्यंत काही कार्यकर्ते निषेधाचा मजकूर लिहिले फलक, भाकपचे चिन्ह असलेले झेंडे घेऊन हॉस्पिटलमध्ये आले. श्रमिक मुक्ती दल, धरणग्रस्त चळवळीतील कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.

त्यामुळे दुपारी गृह राज्यमंत्री शिंदे हे हॉस्पिटलमध्ये येताच कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी सुरू केली. ते हॉस्पिटलमध्ये आत गेल्यानंतर काही महिला कार्यकर्त्यांनी गाडीसमोरच मानवी ‌साखळी केली. दुसरीकडे हॉस्पिटलच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील लॉनवर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. कार्यकर्ते ऐकणार नाहीत हे लक्षात येताच पोलिस आणि हॉस्पिटल प्रशासनाने प्रा. मेघा पानसरे यांना कार्यकर्त्यांना शांतता राखण्याची विनंतीस सांगितले. काही निवडक कार्यकर्त्यांनी मंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करावी असे पोलिसांनी सुचवले. मेघा पानसरे यांनी कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन केले. मात्र, पोलिसांनी कार्यकर्त्यांचा संताप लक्षात घेऊन शिंदे यांना हॉस्पिटलच्या कँटिनकडील बाजूने बाहेर आणले. हॉस्पिटलमधून बाहेर जाण्याच्या प्रवेशद्वाराऐवजी आतमध्ये प्रवेश करण्यासाठी असलेल्या गेटमधून शिंदे यांची मोटार बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात आल्यावर या गेटजवळ कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली. त्यातच अनेक कार्यकर्त्यांनी मोटारीवर लाथा-बुक्क्या मारल्या.

पानसरे यांच्यावरील हल्ल्यामागे हिंदुत्ववादी संघटनाच आहेत, असा थेट आरोप कार्यकर्ते करत होते. त्यातच शिंदे हे भाजपचे नेते असल्याने कार्यकर्ते अधिकच संतप्त झाले. 'हाफ चड्डी चले जाव, गोडसे प्रवृत्तीचा निषेध असो' अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या गाडीला गराडा घातला. पोलिसांनी महत्तप्रयासाने शिंदे यांची गाडी गर्दीतून बाहेर काढली.

तपासासाठी २० पथके

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'अॅड. गोविंदराव पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर सोमवारी झालेल्या खुनी हल्ल्याच्या तपासासाठी २० पथके नेमली आहेत. अँटी टेररिस्ट स्कॉड (एटीएस), लोकल क्राइम ब्रँचचे (एलसीबी) पोलिसही तपासात सहभागी आहेत. पोलिस या हल्ल्याचा छडा लावतील,' अशी माहिती गृह राज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली. पानसरे दाम्पत्यावर गोळीबार झाल्यानंतर लोणावळा येथे दौऱ्यावर आलेले शिंदे दुपारी कोल्हापुरात आले. पानसरे यांच्यावर उपचार सुरू असलेल्या अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये भेट घेऊन त्यांनी विशेष पोलिस महासंचालक रितेशकुमार, जिल्हा पोलिसप्रमुख मनोजकुमार शर्मा, जिल्हाधिकारी राजाराम माने, हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ. उल्हास दामले, मेघा पानसरे यांच्याशी चर्चा केली.

पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले, 'हल्ल्याच्या तपासासाठी सकाळी तातडीने दहा पथके नेमली आहेत. त्यात वाढ करून आणखी दहा पथके नेमण्याची सूचना मी केली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हल्ल्यानंतरची पार्श्वभूमी लक्षात घेता तपासात कोणत्याही उणिवा राहू नयेत याची काळजी पोलिस घेत आहेत. विशेष पोलिस महासंचालकांच्या देखरेखीखाली हा तपास होत आहे. तपास सर्व बाजूंनी होत असून, पोलिस याचा छडा लावतील. एटीएस, एलसीबीदेखील तपासकार्यात सहभागी आहे. गरज पडल्यास सीआयडी आणि स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमदेखील तपासकार्यात असेल. मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आश्वासन दिले आहे, पण स्थानिक पोलिसांना थोडा अवधी द्यावा लागेल.'

ते म्हणाले, 'दोघा हल्लेखोरांनी दुचाकीवरून गोळीबार केल्याचे प्रथमदर्शनी दिसते. त्यासाठी त्यांनी नेमके कोणते शस्त्र वापरले याचाही तपास सुरू आहे. वैद्यकीय सुविधांबाबत कसलीही कमतरता पडू दिली जाणार नाही. सध्याच्या वैद्यकीय सुविधांचा आढावा घेतला आहे. गरज पडल्यास एअर अॅब्युलन्सची तयारी केली आहे, याशिवाय आवश्यकता भासली तर अन्य हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांना बोलावण्याच्या सूचना दिल्या आहेत.'

हल्ल्याचे वृत्त वाऱ्याच्या वेगाने कोल्हापूरसह संपूर्ण राज्यभर पसरले. कार्यकर्ते आणि नागरिकांनी अॅस्टर आधारकडे धाव घेतली. हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. उल्हास दामले यांनी दुपारी दीडच्या सुमारास पहिले मेडिकल बुलेटिन दिले. त्यात त्यांनी, पानसरे यांच्या शरीरातून तीन गोळ्या काढल्या असून शस्त्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. उमा पानसरे यांचे स्कॅन करण्यात आले असून, त्यांच्या कवटीत रक्तस्राव झाला आहे; परंतु त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्या उपचाराला प्रतिसाद देत असल्याचेही दामले यांनी स्पष्ट केले.

भेकड हल्ला

गोविंदराव पानसरे हे अत्यंत प्रामाणिक आणि तळमळीने काम करणारे सच्चे कार्यकर्ते आहेत. साठ वर्षे ते सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात निष्ठेने काम करत आहेत, असे सांगून ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील म्हणाले, ' कष्टकरी वर्गाबद्दल आग्रही मते मांडणाऱ्या पानसरे यांनी कधीही कुणाच्या द्वेषातून काम केलेले नाही. त्यांची मते ठाम असली तरी समाजहिताची असल्याचे उभा महाराष्ट्र जाणतो आहे. ते शांत आणि संयमी वृत्तीचे असताना त्यांच्यावर झालेला हल्ला भेकडपणाचा कळस आहे. या हल्ल्याने हे सिद्ध केले आहे की, आपण महाराष्ट्राला आता पुरोगामी म्हणणे बंद केले पाहिजे.'


भ्याड हल्ल्याचा धिक्कार..

$
0
0

पुरोगामी विचारांवरील भ्याड हल्ला

हा पुरोगामी विचारांवरील भ्याड हल्ला आहे. पानसरे हे कष्टकरी, शोषितांचे नेते होते. गोडसे विचारांना पुनरुज्जीवन मिळत आहे, त्याविरोधात पानसरे सातत्याने बोलत होते. गोडसेला राज्यमान्यता मिळावी, यासाठी प्रयत्नशील असलेल्या धर्मांध शक्तींनी केलेला हा हल्ला आहे. - प्रकाश रेड्डी, भाकप

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला

दाभोळकरांप्रमाणेच पानसरेंवर झालेला हल्ला हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे. भाजप सरकार भांडवलदारांचा विकास आणि हितसंबध जोपासण्यामध्ये गुंग आहे. सामान्य माणसांचा आवाज दाबून टाकण्याचा हा प्रयत्न आहे.
- विश्वास उटगी, ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन

पुरोगामी विचारांची लढाई टोकदार व्हावी

बदलत्या सामाजिक- राजकीय परिस्थितीमध्ये पुरोगामी विचारांची लढाई अधिक टोकदार करण्याची गरज आहे.
- डॉ. अशोक ढवळे

धर्मांध शक्तींचा बिमोड व्हावा

देशामध्ये नवा दहशतवाद रुजवू पाहणाऱ्या या धर्मांध शक्तीचा वेळीच बिमोड करायला हवा. - आनंद पटवर्धन, प्रख्यात सिनेदिग्दर्शक

हिंदुत्ववाद्यांनी केलेला हल्ला

डॉ. नरेंद्र दाभोलकर असोत किंवा गोविंद पानसरे, त्यांनी आजवर धर्मांधतेला विरोध करणाऱ्या विचारांची मांडणी केली. धर्मांध शक्तीविरोधात जे शब्द उच्चारतील, त्यांचा आवाजच दाबून टाकला जाईल याचेच संकेत या हल्ल्यातून दिले गेले आहेत. असे हल्ले भ्याड असतात, त्याने चळवळी संपणार नाही.
- मुक्ता दाभोलकर

एकत्र येण्याची गरज

हा हल्ला म्हणजे धर्मांध शक्तींचा विश्वास वाढल्याचे प्रतीक आहे. नियोजनबद्धरित्या पानसरेंवर हा हल्ला झाला आहे. त्याविरोधात चळ‍वळीतल्या कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याची गरज आहे.- दत्ता इस्वलकर, कामगार नेते

विचारवंतांची मुस्कटदाबी

डॉ. दाभोळकरांचे खुनी अजूनही सापडत नाहीत. परिवर्तनवादी राज्य म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये विचारवंताची मुस्कटदाबी करण्यासाठी त्याच पद्धतीने हा दुसरा हल्ला होतो. विचारांची लढाई ही विचारांनीच लढायला हवी. पानसरेंसारखा अभ्यासू, संयत आणि संयमी पुरोगामी नेत्याचा आवाज दाबवण्याचा हा हल्ला भ्याड, निंदनीय आहे. - सुरेखा दळवी, सामाजिक कार्यकर्त्या

जातीयवाद्यांचा भ्याड हल्ला

कॉ. पानसरे यांच्यावरील हा जातीयवाद्यांनी केलेला भ्याड हल्ला आहे. त्यांच्या चळवळीला ५० वर्षांचा प्रदीर्घ इतिहास असून, हा लढा नवतरुण नेतृत्त्व पुढे न्यायला सज्ज आहे. - गिरीश फोंडे, वर्ल्ड फेडरेशन ऑफ डेमोक्रेटिक यूथ

ऊर्जास्थाने संपवण्याचा प्रयत्न

पानसरे हे पुरोगामी चळवळीचे ऊर्जास्थान. ही ऊर्जास्थाने संपवण्यासाठी असेच हल्ले होत राहिले तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनाही जाहीर कार्यक्रमात संपवण्यासाठी हे भ्याड मागेपुढे पाहणार नाहीत. त्यामुळे सरकराने याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घालायला हवे.- कृष्णा चांदगुडे, जातपंचायतविरोधी अभियान

धर्मांधशक्तीविरोधात एकत्र या

राजकीय पक्ष आणि प्रशासन दोन्ही यंत्रणा अत्यंत बेजबाबदारपणे वागत आहेत. डॉ. दाभोळकर, कॉ. पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्यांचे गांभीर्य त्यांना नाही. यात ज्या धर्मांध शक्ती आहेत त्यांचा बिमोड करण्यासाठी आता अधिक ताकदीने लढण्याची गरज आहे. -विनोद शिरसाट,संपादक, साधना

हितसंबंध दुखवल्याने हल्ला

धर्मांध आणि प्रतिगामी शक्तींच्या विरोधातील मुद्दे डॉ. दाभोलकरांबरोबरच कॉ.पानसरेही प्रभावीपणे जनतेला पटवून देत होते. त्यामुळे जातीयवादी शक्तींना अडचणीचे ठरल्याची शक्यता आहे. टोलसमर्थक ज्या भांडवली शक्ती आहे त्याविरोधातल्या आंदोलनाचे नेतृत्व कॉ. पानसरे करत आहेत. हितसंबध दुखावल्यामुळे यांच्यापैकी कुणीतरी त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केल्याची शक्यता आहे. - सुभाष वारे, संयोजक, आम आदमी पार्टी

नथुरामी प्रवृत्तीचा निषेध

हा हल्ला म्हणजे नथुरामी प्रवृत्तीचा भ्याड हल्ला आहे. त्याचा प्रत्येक सामाजिक अंगाने निषेध व्हायला हवा. विचार असे संपत नसतात. ही लढाई विचारांची आहे, ती विचारांनीच लढायला हवी. - कपिल पाटील, लोकभारती

विघातकशक्तींना वेळीच ठेचा

तर्कशुद्ध पद्धतीने विचारप्रबोधन करणाऱ्या डॉ.दाभोळकर आणि पानसरे या दोघांचा संपवणाऱ्या विघातक शक्तींना वेळीच ठेचून काढायला हवे.

- राजन अन्वर, युक्रांद

हल्लेखोरांचा तातडीने शोध घ्या

हा हल्ला धक्कादायक आणि निषेधार्ह, पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजिरवाणा आहे. पुरोगामी विचारांसाठी लढणाऱ्यांविरूद्ध समाजविघातक शक्ती सुनियोजित कट आखत आहेत. त्यांना रोखण्यासाठी पोलिस विभागाने तातडीने हल्लेखोरांचा शोध घ्यावा.

- माणिकराव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

कोल्हापूरमध्ये व्हिंटेज कार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हिंदी, मराठी किंवा इंग्रजी सिनेमामध्ये युनिक कारच्या अॅक्शन पाहिल्यास कोणालाही अशी कार पाहण्याची इच्छा होईल. शंभर वर्षांपूर्वीच्या काळातील टू आणि फोर व्हिलर पाहण्याची पर्वणी रविवारी कोल्हापूरकरांना मिळाली. १९३७ मधील ऑस्टिन, फियाट, रिक्षा, व्हिंटेज कार, डिझेलवरील बुलेट, बिटल अशा अनेक युनिक कार व बाइक पाहण्याची संधी ऑटो शो प्रदर्शनामुळे कोल्हापूरकरांना मिळाली.

न्यू पॉलिटेक्निकच्या ऑटो मोबाइल इंजिनीअरिंग विभाग व ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग स्टुडंट्स असोसिएशनच्यावतीने महाराष्ट्र हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित ऑटो शोमध्ये २०० गाड्या प्रदर्शनात लावण्यात आल्या होत्या.

प्रदर्शनाचे उद्घाटन श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाउसचे चेअरमन डी. बी. पाटील यांच्या हस्ते व संचालक विनय पाटील, शामराव चरापले, पी. बी. पाटील, प्रा. श्रीधर वैद्य, राजेंद्र ढवळे, वैभव पाटणकर, श्रीकांत पाटील, दिग्विजय भोसले, आदींच्या उपस्थितीत झाले.

कोल्हापुरात अशा प्रकारचा प्रथम ऑटो शो घेण्यात आला. ज्यामध्ये फोर बाय फोर जीप, रिक्षा, सायकल, रेस बाइक, व्हिंटेज कार, आधुनिक स्पोर्ट कार, बिटल, रॉयल्ड, रोडस्टर अशा गाड्या पाहता आल्या. तसेच यावेळी काही विद्यार्थ्यांनी थरारक बाइक स्टंट दाखवित पाहणाऱ्यांच्या भुवया उंचावल्या.

महापौर राजीनामा देणार?

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सोळा हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटकेची कारवाई झालेल्या महापौर तृप्ती माळवी यांनी बंडखोरीचा पवित्रा कायम ठेवत सोमवारच्या सर्वसाधारण सभेकडे पाठ फिरवली. सभेपुरते रजेवर जात असल्याचे पत्र देतानाच आपण राजीनामापत्र दिले नसल्याचे प्रशासनाला कळविल्यामुळे महापौर सर्वसाधारण सभेस उपस्थित राहणार नाहीत ही शक्यता खरी ठरली.

दरम्यान, महापौरांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसही आक्रमक झाली असून, माळवी राजीनामा देत नाहीत तोपर्यंत त्यांना सभागृहात आणि सभागृहाबाहेर कोणत्याही प्रकारचे सहकार्य न करण्याची भूमिका घेतली आहे. महापौरांच्या सर्वच कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. नगरसेवकांनी सभा न घेता महापालिका चौकात एकत्र येऊन माळवी यांचा निषेध केला. राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दबावतंत्राचा वापर करूनही माळवी यांनी राजीनामा दिला नाही. राष्ट्रवादीकडून येत्या दोन दिवसात माळवी यांच्यावर कारवाई होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

चौकात निषेध सभा

नऊ तारखेची सर्वसाधारण सभा संपल्यानंतर खुद्द माळवी यांनीच सोमवारी (ता.१६) विशेष सभा बोलावून यावेळी राजीनामा देण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्तांना सोमवारी होणाऱ्या सभेसाठी अनुपस्थित राहत असल्याचे पत्र दिले होते. यामुळे दोन्ही काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली होती. महापौरांनी आयुक्तांनी दिलेल्या पत्रात 'मी कोणताही राजीनामा पत्र दिले नाही, कुणी माझे राजीनामापत्र सादर केल्यास ते ग्राह्य मानू नये' असे स्पष्ट म्हटल्याने त्या राजीनामा देणार नाहीत हे स्पष्ट झाले होते. माळवी यांनी सोमवारच्या सभेकडे पाठ फिरवल्याने संतप्त दोन्ही काँग्रेस व आघाडीच्या नगरसेवकांनी सभा न घेता महापालिका चौकात निषेध सभा घेतली.

महापौरांना सहकार्य नाही, कार्यक्रमावर बहिष्कार

'महापौर लाचखोरीच्या प्रकरणात अडकल्यामुळे पक्षाची, शहराची बदनामी होत आहे. महापौरपदाची शान आहे, समाजात किंमत आहे, याचे भान ठेवून माळवी यांनी महापौरपदाचा राजीनामा देणे आवश्यक होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या समोर त्यांनी सर्वसाधारण सभेत राजीनामा देणार असल्याचे सांगितले होते. मात्र आता त्या राजीनामा देण्याचे टाळत आहेत त्यांच्या या प्रवृत्तीचा निषेध करत राजीनामा देईपर्यंत त्यांना कसल्याही प्रकारचे सहकार्य करण्यात येणार नाही अशी भूमिका आघाडीच्या नगरसेवकांनी घेतल्याचे राष्ट्रवादीचे गटनेते राजू लाटकर यांनी सांगितले. आघाडी धर्मानुसार महापौरपद काँग्रेसच्या वाट्याला आले आहे. माळवी यांनी राजीनामा देऊन महापौरपदाची शान राखावी. माळवी यांच्यावर लाचखोरीचा आरोप झाला आहे. त्यांनी राजीनामा देईपर्यंत त्यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आघाडीच्या नगरसेवकांनी घेतला आहे, असे काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी सांगितले.

नव्या सभेचा अधिकार महापौरांनाच

महापौर माळवी सभेस अनुपस्थित राहिल्याने उपमहापौर मोहन गोंजारे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा घेता येते. त्यासाठी सोमवारी सभा घेऊन तहकूब करणे व पुढील सभा बोलाविण्याचा अधिकार सभा अध्यक्षांना आहे. दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी सभागृहात प्रवेश न करताच चौकात एकत्र येऊन महापौरांचा निषेध केला. आता नव्याने सर्वसाधारण सभा बोलाविण्याचा ​अधिकार माळवी यांनाच आहे.

हल्लेखोर निपाणीमार्गे पळाले?

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते कॉ. गोविंदराव पानसरे यांच्यावर गोळीबार करून हल्लेखोर निपाणीमार्गे पळून गेले असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिभानगर ते शिवाजी विद्यापीठ मार्गावर असणारे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा निर्णय स्थानिक पोलिसांनी घेतला आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रितेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची वीस पथके तयार करण्यात आली आहे. हल्ल्याचा तपास विविध अंगांनी करण्यास सुरुवात केली आहे.

पानसरे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर जिल्हा पोलिस दल खडबडून जागे झाले. जिल्ह्यात सर्व ठिकाणी नाकाबंदी केली असून, संशयित वाहनांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. हॉटेल व लॉजची तपासणी करण्यात आली. हल्ल्याची काय कारणे असावीत यादृष्टीने तपास सुरू केला. घटनास्थळी पोलिस महानिरीक्षक रितेशकुमार, पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी भेट दिली. घटनास्थळी तीन पुंगळ्या सापडल्या असून, त्या फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात आल्या आहेत.

दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा पथके नेमण्याचा आदेश दिला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व एटीएस पथक संयुक्तरीत्या तपास करणार आहेत. फॉरेन्सिक तज्ज्ञांचे एक पथकही तपास करत आहे.

धमकीचे फोन आणि पत्रेही

पानसरे हे डाव्या चळवळीतील कार्यकर्ते असल्याने प्रतिगामी शक्तींना ते सातत्याने विरोध करत होते. प्रति​ग्रामी शक्तींविरोधात जहाल टीकेमुळे त्यांना धमकीचे फोन सतत येत होते. तसेच पानसरे यांना धमकीची पत्रेही येत असत. ते धमकीचे फोन आणि पत्रांकडे दुर्लक्ष करत होते. त्यांनी धमकीच्या पत्रांकडे कधीही गांभीर्याने पाहिले नाही, असे अंधश्रद्दा निर्मूलन समितीचे पदाधिकारी उमेश सूर्यवंशी यांनी सांगितले. याबाबत पोलिसांनाही कल्पना होती अशी माहिती सूत्रांनी दिली.

अलीकडच्या घटनांबाबत पोलिसांकडून पडताळणी सुरू

कॉम्रेड गोविंदराव पानसरे म्हणजे सर्वसामान्यांचा आधार. पुरोगामी नेते म्हणून त्यांनी सनातनी कार्यकर्त्यांवर कायम झोड उठविली. अलीकडच्या अशा घटनांबाबत पोलिसांनी पडताळणी सुरू केली. विद्यापिठात एका विद्यार्थ्याने त्यांच्या विचारांना थेट विरोध केल्याची चर्चा सुरू आहे.

विवेक निर्धार परिषद

अंनिसचे प्रमुख नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर एक महिना उलटून गेला तरी तपास लागला नाही. त्यामुळे सर्व पुरोगामी पक्ष-संघटनांच्यावतीने केशवराव भोसले नाट्यगृहात विवेक निर्धार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पानसरे यांनी अतिशय आक्रमक भाषण केले होते. त्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते असलेल्या पत्रकार निखिल वागळे यांच्या व्याख्यानाला हिंदुत्त्ववादी संघटनांनी सुरूवातीपासून विरोध केला. त्यानंतरही निर्धार परिषद केशवराव भोसले नाट्यगृहात घेण्यात आली आणि ती यशस्वीही झाली.

'हू किल्ड करकरे' व्याख्यान

निवृत्त पोलिस महानिरीक्षक शमशुद्दीन मुश्रीफ यांनी एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्याविषयी 'हू किल्ड करकरे' हे पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकामध्ये ब्राम्हणी विचारसरणीनेच करकरे यांची हत्या केल्याचे मत मांडण्यात आले आहे. पुस्तकावर माजी निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील आणि गोविंदराव पानसरे यांची भाषणे झाली. त्याला आक्षेप घेण्यात आला होता. कार्यक्रम होऊ नये यासाठीही आंदोलने झाली. पत्रकबाजी रंगली. या कार्यक्रमानंतर पुण्याहूनही पानसरे यांना धमकीची पत्रे येत होती. मात्र, त्याची तमा न बाळगता त्यांचे काम सुरूच होते.

आम्ही भारतीय लोक आंदोलन

मध्यंतरी व्हॉट्सअॅपवर महापुरुषांची बदनामी करण्याच्या प्रकारानंतर शहरात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी आम्ही भारतीय लोक आंदोलनाच्यावतीने फेरी काढून शहरात शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात आला होता.

शाहू ग्रंथ महोत्सवात आक्रमक भाषण

प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर नुकत्याच झालेल्या शाहू ग्रंथ महोत्सवात कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांनी नथूराम गोडसे आणि या प्रवृत्तींवर कडाडून हल्ला केला होता. अत्यंत आक्रमकपणे त्यांनी केलेले भाषण त्यांच्यासाठी अडचणीचे ठरलेले असू शकते असा अंदाज आहे. त्यामुळे या घटनांचा तपास सुरू आहे.

खांडेकर व्याख्यानमालेविरोधात तक्रार

करवीरनगर वाचन मंदिरात वि. स. खांडेकर व्याख्यानमालेत कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे १३ जानेवारी २०१५ रोजी 'डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा खून आणि विवेकवाद' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानात पानसरे यांनी सनातन संस्था आणि हिंदुत्ववादी संघटनांवर टीका करू नये, अन्यथा कार्यक्रमस्थळी हिंदुत्ववादी संघटना तीव्र निदर्शने करतील असा इशारा हिंदू जनजागृती समितीने दिला होता. पानसरे यांच्याविरोधात जुना राजवाडा पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी पानसरे यांना हिंदुत्ववादी संघटनांसंदर्भात वक्तव्य करण्यास मज्जाव केला होता. त्यामुळे पोलिसांचे अभिनंदन करणारे मसेजही व्हॉट्सअॅपवर टाकण्यात आले होते. त्याचाच फटका त्यांना बसल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

एटीएस, एलसीबीसह २० पथके

'अॅड. गोविंदराव पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर सोमवारी झालेल्या खुनी हल्ल्याच्या तपासासाठी २० पथके नेमली आहेत. अँटी टेररिस्ट स्कॉड (एटीएस), लोकल क्राइम ब्रँचचे (एलसीबी) पोलिसही तपासात सहभागी आहेत. पोलिस या हल्ल्याचा छडा लावतील,' अशी माहिती गृह राज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली. लोणावळा येथे दौऱ्यावर आलेले शिंदे हे पानसरे दाम्पत्यावरील गोळीबाराची घटना समजल्यानंतर दुपारी कोल्हापुरात आले. अॅस्टर आधार हॉस्पिटलला भेट देऊन त्यांनी विशेष पोलिस महासंचालक रितेशकुमार, जिल्हा पोलिसप्रमुख मनोजकुमार शर्मा, जिल्हाधिकारी राजाराम माने, हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ. उल्हास दामले, मेघा पानसरे यांच्याशी चर्चा केली. शिंदे म्हणाले, 'हल्ल्याच्या तपासासाठी सकाळी तातडीने दहा पथके नेमली आहेत. त्यात वाढ करून आणखी दहा पथके नेमण्याची सूचना मी केली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हल्ल्यानंतरची पार्श्वभूमी लक्षात घेता तपासात कोणत्याही उणिवा राहू नयेत याची काळजी पोलिस घेत आहेत. विशेष पोलिस महासंचालकांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. एटीएस, एलसीबीही तपासात कार्यरत आहे. गरज पडल्यास सीआयडी आणि स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमही कार्यरत होईल. मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आश्वासन दिले आहे. मात्र स्थानिक पोलिसांना थोडा अवधी द्यावा लागेल.' शिंदे म्हणाले, 'दोघा हल्लेखोरांनी दुचाकीवरून गोळीबार केल्याचे प्रथमदर्शनी दिसते. त्यासाठी त्यांनी नेमके कोणते शस्त्र वापरले याचाही तपास सुरू आहे. वैद्यकीय सुविधांबाबत कमतरता पडू दिली जाणार नाही. '

अधिवेशनाबाबत संभ्रम

ज्येष्ठ नेते गोविंदराव पानसरे यांच्यावरील झालेल्या हल्ल्यामुळे कोल्हापुरात २१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत नियोजित असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या त्रैवार्षिक राज्य अधिवेशनाबाबात संभ्रम आहे. पक्षाचे राज्यसचिव भालचंद्र कानगो यांनी 'पानसरे यांच्या प्रकृतीचा विचार करून निर्णय घेतला जाईल. पण शक्यतो अधिवेशन रद्द केले जात नाही. पानसरे यांच्यावरील हल्ला अतिशय भ्याड आहे. आम्हाला पानरसे यांच्या इच्छाशक्तीची कल्पना आहे. ते नक्कीच यातून सावरतील असा ठाम विश्वास आहे,' असे सांगितले.

पानसरेंच्या प्रकृतीत सुधारणा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना वेदानाशामक औषधे दिलेली असल्याने ते अजुनही गुंगीत आहेत. तसेच त्यांचे 'व्हायटल पॅरामिटर्स' चांगले असल्याची माहिती अॅस्टर आधार हॉस्पिटलचे डॉक्टर उल्हास दामले यांनी दिली. मंगळवारी सकाळी हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ. उल्हास दामले आणि डायरेक्टर डॉ. अजय केणी यांनी मेडिकल बुलेटीन दिले, त्यावेळी ही माहिती देण्यात आली.

पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. उमा पानसरे पूर्ण शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सोमवारी सकाळी पानसरे दांपत्यावर त्यांच्या राहत्या घरानजीक गोळीबार झाला होता. त्यानंतर दोघांवरही शास्त्रीनगर येथील अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

आर. आर. पाटील अनंतात विलीन

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । तासगाव (सांगली)

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, सर्वांचे लाडके आबा ऊर्फ आर. आर. पाटील यांना आज हजारो तासगावकरांनी साश्रूनयनांनी शासकीय इतमामात अखेरचा निरोप दिला. आबांचे मूळगाव अंजनीतील हेलिपॅड मैदानावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा आबांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांधच फुटला.

तासगाव हा आबांचा बालेकिल्ला होता. सलग सहा वेळा आबांना तासगावकरांनी विधानसभेवर निवडून दिले. आबांवरचं तासगावकरांचं हे प्रेम आजही पहायला मिळालं. सकाळी साडेनऊच्या सुमारास तासगावहून आबांचे मूळगाव अंजनीच्या दिशेने अंत्ययात्रा निघाली. 'आपला माणूस' असा संदेश लिहिलेल्या वाहनात आबांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. अंत्ययात्रेत अनेक मान्यवरांसह संपूर्ण सांगली जिल्ह्यातून आलेले हजारो लोक सहभागी झाले होते. अंत्ययात्रा पुढे सरकत असताना रस्त्याच्या दुतर्फा तसेच इमरतींच्या गच्चींवरही डोळ्यांत अश्रू दाटून लोक आपल्या लाडक्या नेत्याचे अखेरचे दर्शन घेत होते.

सुमारे तीन तासांच्या प्रवासानंतर आबांची अंत्ययात्रा अंजनीत पोहोचली. अंजनीतील हेलिपॅड मैदानावर अंत्यसस्कार होणार असल्याने तेथे आधीपासूनच हजारोंची गर्दी झाली होती. संपूर्ण मैदान आबांवर प्रेम करणाऱ्या सांगलीकरांच्या गर्दीने खच्चून भरले होते. या शोकाकुल जनसागराच्या साक्षीने आबांचा मुलगा रोहितने आबांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी 'अमर रहे, अमर रहे, आर. आर. पाटील अमर रहे', अशा घोषणा आसमंतात घुमल्या.

अनेक मान्यवरांनी व्यक्त केला शोक

हेलिपॅड मैदानावर अंत्यसंस्काराला उपस्थित असलेल्या अनेक मान्यवरांनी आबांना श्रद्धांजली वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, शेकाप नेते गणपतराव देशमुख, महसूल मंत्री एकनाथ खडसे, अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस नेते नारायण राणे, पतंगराव कदम, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कार्याध्यक्ष जीतेंद्र आव्हाड आदी मान्यवर अंत्यसंस्कारावेळी उपस्थित होते.

'संघ-सनातनला दहशतवादी घोषित करा!'

$
0
0

पानसरेंचे हल्लेखोर चार दिवसांत शोधा; विराट मोर्चाने सर्वपक्षीय आंदोलकांचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते गोविंदराव पानसरे यांच्यावर गोळीबार करणाऱ्या संशयितांना चार दिवसांत पकडा, अन्यथा सर्व पुरोगामी संघटना राज्यभरात निदर्शने करतील, असा इशारा मंगळवारी विराट संख्येने जमलेल्या जनसमुदायाने ‌सरकारला दिला. पानसरे यांच्यावर सोमवारी झालेल्या गोळीबारातील संशयितांना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. भर उन्हात निघालेल्या या मोर्चात प्रचंड संख्यने लोक सहभागी झाले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सनातन प्रभात आदी हिंदुत्ववादी संघटनांना दहशतवादी घोषित करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

पानसरे यां‍च्यावर गोळीबार करणाऱ्यांचा आम्ही कसून शोध घेत आहोत, असे आश्वासन यावेळी जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर दिले. ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, कम्युनिस्ट नेते भालचंद्र कानगो व आम्ही भारतीय लोक आंदोलनच्या नेतृत्वाखाली बिंदू चौकातून मोर्चाला सुरवात झाली.

'गोळीबार करणाऱ्यांना फाशी द्या,' 'छत्रपती शिवाजी महाराजांचा, वारकऱ्यांचा, संत तुकारामांचा भगवा जिंदाबाद, आरएसएसचा भगवा मुर्दाबाद', 'काल दाभोलकर, आज पानसरे आता उद्या तुम्ही-आम्ही,' अशा घोषणांचे फलक व लाल झेंडे घेतलेले हजारो महिला व पुरुष मोर्चात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. मिरजकर तिकटी, महाव्दार रोड, भाऊसिंगजी रोड, आईसाहेबमहाराज पुतळा, व्हीनस कॉर्नरमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला.

यावेळी शैला दाभोलकर, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, दिलीप पवार, माजी आमदार राजीव आवळे, टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे, मुस्लिम बोर्डींगचे अध्यक्ष गणी आजरेकर, अतुल दिघे, रघुनाथ कांबळे, डॉ. राजन गवस, शाहीर राजू राऊत, सतिशचंद्र कांबळे, सुभाष लांडे, शिवाजी परुळेकर, धनाजी गुरव, डॉ. सुनिल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर, सुभाष देसाई, नामदेव गावडे, गिरीश फोंडे, युथ काँग्रेस जिल्हाध्यक्ष रुपाली पाटील, स्वप्नजा पाटील, वंदना पाटील यांच्यासह भाकप, राष्ट्रसेवा दल, वारांगणा संघटना, श्रमुद, श्रमिक संघ, ब्लॅक पँथर, 'हिंदी है हम,' आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.

आम्ही सारे पानसरे...

मोर्चावेळी 'आम्ही सारे पानसरे', 'रक्त हिरवं, भगवं नसतं, ते फक्त लाल असतं', 'महात्मा गांधी आणि कॉम्रेड पानसरे यांच्या फलकावरील छायाचित्रावर 'लढेंगे और जितेंगे,' असा मजकूर लिहिण्यात आला होता.


‘शाहू’ ब्रँडचा दबदबा

$
0
0

प्रकाश कारंडे, कागल

एकीकडे ऊसाचा आणि साखरेचा दर यावरुन घमासान सुरु असताना कागलच्या छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने स्वत:च्या ब्रँडखाली एक, दोन आणि पाच किलोची साखरेची पॅकींग बाजारात आणली आहेत. विविध प्रकारच्या क्वालिटी साखरेसह स्वत:ची वेगळी मार्केटिंग सिस्टीम बनवून लाखो क्विंटल साखर मार्केटमध्ये स्वत:च्या ब्रँडखाली विकणारा 'शाहू' हा सहकारी क्षेत्रातील राज्यातील एकमेव कारखाना आहे. शिस्त, उत्तम प्रशासन आणि नेहमीच पुढच्या किमान दहा वर्षांचा विचार यामुळेच 'शाहू' ला हे शक्य झाले आहे.

१९६७ सालापासून मागील तीन वर्षाच्या काळापर्यंत साखरेवर केंद्र सरकारचे नियंत्रण होते. देशात दरमहा किती साखर विक्रीस आणावयाची आणि प्रत्येक कारखान्याने ती किती द्यायची असे धोरण ठरलेले होते. अपवादात्मक वर्ष वगळता ६५ ते ७० टक्के साखर लेव्ही आणि ३० ते ३५ टक्के साखर खुल्या बाजारात विकली जात असे. त्यामुळे 'क्वॉलीटी साखर' ही संकल्पनाच कुठल्या कारखान्याने विचारात घेतली नव्हती. त्यामुळे साखर कारखान्यांना 'मार्केटिंग' हा विषयच माहीती नव्हता. आज एकीकडे कारखाना मनाला येईल तेवढी साखर कधीही विकू शकतो. त्यामुळे बाजारात साखरच प्रचंड उपलब्ध झाल्याने घेणाऱ्यालाही 'चॉईस' निर्माण झाला आहे. साहजिकच कारखान्यांना आता देशात आणि देशाबाहेर साखर विक्रीसाठी मार्केटिंगची गरज निर्माण झाली आहे.

शाहू कारखान्याने या गोष्टींचा विचार ११ वर्षांपूर्वीच केला होता. त्यानुसार 'क्वॉलीटी' साखर बनवायला सुरवात करुन २००२ सालापासून सरकारच्या परवानगीने परदेशातही साखर विक्री केली आहे.१९९६-९७ साली या कारखान्याने स्वत:च्या ब्रँडखाली पाऊचमध्ये साखर बाजारात आणली. परंतु त्यावेळी मोठ्या संख्येने मॉल्स नसल्याने हा प्रयोग म्हणावा तितका यशस्वी झाला नाही. त्यानंतर मागील दोन वर्षात प्रथम रिलायन्स 'ग्रुप'च्या माध्यमातून कारखान्याने दोन वर्षे बाजारात पाउचमध्ये साखर आणली आणि आता स्वत:च्या एक, दोन आणि पाच किलोच्या पाऊचला यश येत असून यावर्षी उत्पादनाच्या दहा टक्के म्हणजेच एक लाख क्विंटल साखर या पध्दतीने खपेल असा विश्वास कारखाना प्रशासनाला आहे. याशिवाय पेप्सी, कोका कोला, हल्दीराम, नेसले अशा कंपन्यांनाही शाहूने मागणीनुसार पुरवठा सुरु ठेवला आहे. आगामी काळात २५ किलोचे पँकिंगही बाजारात आणण्याचा विचार सुरु आहे.

'सध्या कारखान्यांकडे मागील वर्षाची काही साखर शिल्लक आहे. त्यात यावर्षीचीही भर पडणार आहे. सध्याचा साखरेचा दर पहाता पाऊचमध्ये साखरेचे मार्केटिंग ही काळाची गरज आहे. रिटेलमध्ये फारसे काही मिळत नाही ही वस्तुस्थिती असली तरी हळूहळू प्रोडक्ट लाँच होवून साखरेचा उठाव होईल यात शंका नाही. - विक्रमसिंह घाटगे, संस्थापक, चेअरमन

पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते गोविंदराव पानसरे व उमा पानसरे या दाम्पत्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी निषेध मोर्चे काढण्यात आले. समाजातील सर्वच थरातून या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला.

जयसिंगपूर : सकाळी अकरा वाजता गावचावडीसमोर पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते व नागरिक एकत्र जमले. यानंतर मोर्चास सुरूवात झाली. गांधी चौक, स्टेशनरोड, क्रांती चौक, अकरावी गल्लीतून मोर्चा गावचावडीसमोर आला. येथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.

यावेळी कॉम्रेड रघुनाथ देशिंगे म्हणाले, 'पानसरे दाम्पत्यावर हा हल्ला नसून पुरोगामी विचारसरणीच्या महाराष्ट्रात फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेवर हा हल्ला झाला आहे. हल्लेखोरांना तत्काळ गजाआड करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.'

यावेळी डॉ.महावीर अक्कोळे, डॉ.अतिक पटेल, अशोक शिरगुप्पे, रमेश शिंदे यांनी हल्ल्याच्या घटनेचा निषेध केला. याप्रसंगी डॉ.किरण पाटील, अफसर मुजावर, अनिल शिंगाडे, प्राजक्ता कांबळे, फुलाबाई बेडगे,यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, या हल्ल्याच्या निषेधार्थ लोकशाहीवादी धर्मनिरपेक्ष पुरोगामी संघटनेच्यावतीने बुधवारी(ता.१८) गावचावडीसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

चंदगड : पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते गोविंदराव पानसरे यांच्यावर झालेला हल्ला हा दुदैवी आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात आणि कोल्हापूरसारख्या समतेचा जगभर संदेश देणाऱ्या जिल्ह्यात घडलेला हा प्रकार निंदनीय असून या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी प्रा. गुंडूराव कांबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.

गारगोटी : गारगोटी (ता. भुदरगड) व बिद्री (ता. कागल) येथे दोन्ही तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांच्या वतीने कॉ. गोविंदराव पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. गारगोटी येथे बंद पाळून व निषेध सभा घेऊन तर बिद्री येथे रास्तारोको करून या घटनेचा निषेध करण्यात आला.

गारगोटी येथील शाहू वाचनालयात निषेध सभा घेण्यात आली. यावेळी बोलताना माजी आमदार बजरंग देसाई म्हणाले, 'राज्य व देशाचे सामाजिक वातावरण बिघडविण्याच्या हेतूने हे हल्ले होत आहेत. पोलिसांनी पानसरे यांच्या मारेकऱ्यांना शोधून त्यांना कडक शिक्षा द्यावी.'

कॉ. दत्ता मोरे म्हणाले, ' पुरोगामी विचारांचा वैचारिकदृष्ट्या आपण पराभव करू शकत नाही, हे सनातन्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विचारवंतांनाच संपविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना एक वर्षाचा कालावधी लोटूनही पोलिसांनी अटक केली नाही. त्यामुळे गुंडांची हिंमत वाढत चालली आहे.' मौनी विद्यापीठाचे माजी संचालक बाळासाहेब देसाई, कॉ. रामभाऊ कळबेकर, गारगोटी शहर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद मोरे यांनी आपल्या मनोगतात घटनेचा निषेध केला.

दरम्यान, बिद्री येथेही बिद्री बसस्थानकापासून निषेध फेरी काढून रास्तारोको करण्यात आला. मुरगूड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत म्हस्के यांना कॉ. पानसरे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना लवकरात लवकर पकडण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले. बिद्री ग्रामपंचायत सदस्य शहाजी गायकवाड, रिपाईचे जिल्हाउपाध्यक्ष सतीश माने, प्रवीण पाटील, साताप्पा सोनाळकर, उमेश चौगले, प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.

ते थरारक दहा तास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सोमवारी झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर ज्येष्ठ नेते गोविंदराव पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा यांची प्रकृती सुधारत आहे. अॅस्टर-आधार हॉस्पिटलमधील डॉक्टारांनी दाखवलेले कौशल्य, समयसूचकता, निर्णयक्षमता, व्यवस्थापन कौशल्य यांच्यासह गोळीबाराच्या प्रकारानंतर दोघांनाही तातडीने हॉस्पिटलपर्यंत तत्परतेने आणले गेल्याने हे शक्य होऊ शकले.

सोमवारी सकाळी ९ वाजून २६ मिनिटांनी पानरसे दाम्पत्यावर हल्ला झाला. त्यावेळी त्यांच्या सून प्रा. मेघा पानसरे, त्यांचे भाऊ मुकुंद कदम, शेजारी प्रभाकर जाधव यांनी ताताडीने त्यांना 'अॅस्टर आधार'मध्ये आणले. हल्ल्याची तिव्रता लक्षात घेऊन दोघांनाही वेगवेगळ्या गाड्यांमधून हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. गोविंदराव पानरसे यांच्या चेहऱ्यावर इतका रक्तस्त्राव झाला होता की त्यांना ओळखणेही कठीण झाले होते. हॉस्पिटलमच्या कॅज्युअल्टीत पहिल्यांदा गोविंदराव पानसरे यांचा रक्तदाब तपासून श्वसनक्रिया आणि रक्तस्त्राव कोठून होत आहे याची तातडीने तपासणी झाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अन्य नियोजित शस्त्रक्रिया स्थगित करण्यात आल्या. पानसरे यांच्या सुरू राहिलेल्या रक्तस्त्रावामुळे रक्तदाब वेगाने कमी झाला होता. त्यांचे नाडीचे ठोके जवळपास बंदच झाले होते. त्यांना तातडीने बेसिक आणि सेकंडरी लाइफ सपोर्ट पुरविण्यात आला. त्यातून श्वाच्छोश्वास आणि हृदयाची स्थिती पूर्ववत आणण्यात आली. त्यानंतर मानेतून 'सेंट्रल लाइन' पद्धतीने सलाइन देण्यात आले. जवळपास ३५ बॅग रक्त, प्लेटलेट्स, प्लाझ्मा यांची व्यवस्था करण्यात आली. तोपर्यंत शस्त्रक्रियेसाठी आवश्यक चाचण्या पूर्ण करण्यात आल्या.

पानसरे यांच्या मानेतून गोळी डाव्या बाजूने घुसून ती उजव्या बाजूने बाहेर पडली होती. त्यासाठीची पहिली आणि मानेतील रक्तस्त्राव थांबविण्यासाठीची शस्त्रक्रिया साडेदहा वाजता सुरू झाली. पानसरे यांच्या मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या, मणक्याला सुदैवाने इजा झाली नव्हती. चार सर्जन्स, दोन भूलतज्ज्ञ, कान-नाक-घसा तज्ज्ञ, इन्टेंसेव्हिस्ट होते. ऑपरेशन थिएटर आणि बाहेरील व्यवस्था पाहण्यासाठीही तज्ज्ञ डॉक्टर होते. दुपारी दीड वाजता शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यावर डॉक्टरांनाही धीर आला. नंतरची छातीची महत्त्वाची शस्त्रक्रीया झाली. यात गोळी डाव्या बाजूने घुसून ती छातीच्या मध्यभागी आली होती. त्यामुळे फुफ्फुसांनाही जखम झाली होती. काही बरगड्यांना फ्रॅक्चर होते. सुदैवाने ही गोळी दंडाला चाटून गेल्याने गोळीचा मार थोडा कमी झाला होता. शस्त्रक्रियेने गोळी काढण्यात आली. या भागातील रक्तस्त्रावाचा धोका लक्षात घेऊन 'ड्रेन' बसविण्यात आला.

तिसरी गोळी पायाला लागली होती. ती जखम गंभीर नव्हती. गॅस्ट्रोस्कोपी तंत्राने पोटात साठलेले, ब्रॉन्कोस्कोपीने फुफ्फुसातील गोठलेले रक्त काढण्यात आले. ानरसे यांना मधुमेहाचा त्रास आहे. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणासाठी इन्शुलीनचा वापर केला गेला. रात्री आठ वाजता शस्त्र‌क्रिया संपल्यावर पानसरे यांना 'ग्रेव्ह डेंजर'मधून बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. नंतर त्यांना आयसीयूत हलविताना तोच बेड ऑपरेशन थिएटरमधून शिफ्ट केला गेला. शस्त्रक्रियांसाठी सलग दहा तासांपेक्षा जास्त काळ लागला.

गोल्डन टाइम

कोणत्याही अपघातानंतर पहिला तास महत्त्वाचा ठरतो. पानसरे यांच्या घरापासून काही मिनिटांच्या अंतरावरील या हॉस्पिटलमध्ये त्यांना लगेच आणले गेल्याने फायदा झाला.

तब्बल १२० संशयितांकडे चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते गोविंदराव पानसरे व उमा पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा तपास सर्व अंगाने करण्यात येत असून पोलिसांनी १२० संशयितांची चौकशी केली आहे. फॉरेन्सिक लॅबचे पथक व एटीएसचे पथकांनी घटनास्थळी भेट देऊन तपासासाठी सूचना केल्या आहेत. चौकशीमध्ये स्थानिक गुन्हेगार, रेकॉर्डवरील गुन्हेगार, संस्थाचे प्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांकडेही चौकशी करण्यात येत आहे.

घटनास्थळी सापडलेल्या पुंगळ्या फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आल्या आहेत. पुंगळ्याच्या अहवालावरून गुन्ह्यात एक की दोन पिस्तूलांचा वापर झाला हे स्पष्ट होईल. जखमी झालेल्या उमा पानसरे यांची तब्येत सुधारली असली तरी त्या बोलण्याच्या स्थितीत नसल्याने त्यांचा जबाब घेण्यात आलेला नाही. त्यांच्या जबाबानंतर हल्लेखोरांचे वर्णन स्पष्ट होणार आहे.

फॉरेन्सिक लॅबट्या पाच जणांची टीम सोमवारी मध्यरात्री कोल्हापुरात दाखल झाल्यावर त्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन काम सुरू केले. या टीममध्ये एक बॅलेस्टिक अधिकाऱ्याचा समावेश आहे. या टीमने पहाटे साडेतीन वाजेपर्यंत घटनास्थळाची पाहणी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल दिला. त्यानुसार तपासासाठी सूचना करण्यात आल्या.

पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा हे प्रमुख तपास अधिकारी आहेत. तपासातील समन्वयाची जबाबदारी अतिरिक्त पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्याकडे आहे. मंगळवारी दिवसभर पोलिस मुख्यालयात अधिकाऱ्यांनी टीमसोबत बैठक घेऊन तपासाच्या सूचना दिल्या. वीस पथके तपासासाठी तयार करण्यात आली प्रत्येकाकडे स्वतंत्र जबाबदारी आहे.

जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. पानसरे यांच्याशी संबधीत सर्व गुन्ह्यांची व खटल्यांवरही लक्ष केंद्रित करण्यात आली आहे. गोवा येथे नरेंद्र दाभोळकर आणि गोविंदराव पानसरे यांच्यावर एका संघटनेने खटला दाखल केला आहे. या खटल्याचीही माहिती घेण्यात येत आहे. शिवाजी विद्यापीठातील एका चर्चासत्रात पानसरे यांना एका मुद्द्यावरून एका संघटनेच्या कार्यकर्त्याने विरोध केला होता. या विद्यार्थ्याकडेही पोलिसांनी चौकशी करण्यात आली. पानसरे यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांकडूनही पोलिसांनी माहिती घेतली. दरम्यान, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी आणि करवीर या पोलिस ठाण्यांकडे स्थानिक कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी आहे.

जनतेने पोलिसांच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा. तपासासाठी थोडा वेळ द्या. या गुन्ह्याचा तपास पोलिस शास्त्रिय पद्धतीने, कुशलतेने करीत आहेत. झालेली घटना दुर्देवी आहे. तपास कामात प्रत्येक पैलूवर लक्ष देण्यात येत आहे. - मनोजकुमार शर्मा,
पोलिस अधीक्षक

‘आधार’च बनले पानसरे कुटुंबीयांचे घर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पानसरे दाम्पत्यावर सोमवारी हल्ला झाल्यानंतर त्यांना त्यांच्या स्नुषा मेघा पानसरे यांनी अॅस्टर आधार हॉस्पिलमध्ये दाखल केले. त्यानंतर सर्व कुटुंबीय हॉस्पिटलमध्येच आहेत. सोमवारपासून घराला कुलूप असून, सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सर्वजण हॉस्पिटलमध्येच असतात. त्यामुळे हॉस्पिटलच पानसरे कुटुंबीयांचे घर झाले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून पानसरे उपचार घेत असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. पण, त्यांच्यासाठी लागणारी औषधे आणि भेटण्यासाठी येणाऱ्या लोकांमुळे सर्वांना रुग्णालयातच थांबावे लागत आहे. पानसरे यांच्या दोन मुली, सून, नातवंडे हे सर्वजण हॉस्पिटलमध्येच आहेत. त्यामुळे घराकडे जाण्यासाठी कोणालाच वेळ नाही. पानसरे यांचे कुटुंबीय नातेवाइकांनी आणलेला जेवणाचा डबाही हॉस्पिटलमध्येच खात आहेत. त्यामुळे त्याचे जेवणही हॉस्पिटलमध्येच होत असल्याने घर बंदच आहे.

घरासमोरील तोरणा कॉलनीकडे जाणारा रस्ता पोलिसांनी पूर्णपणे बंद केला आहे. दोन्ही बाजूला बॅरिकेड्स लावले असून जिथे हल्ला झाला, त्याच्या मध्यभागी आणखी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. तपासासाठी मुंबईहून आलेले पथक घटनास्थळाची पाहणी करत आहेत. कोठून हल्ला झाला असावा, हल्लेखोर कोठून पळून गेले असावेत याबाबत तर्क लावले जात असून गाडी जाण्याचा मार्ग आणि तीनही बाजूने असल्याने या तीनही मार्गावरील टपरीवाले आणि कट्ट्यावर नेहमी बसलेल्या लोकांकडे विचारपूस केली जात आहे. त्याबरोबरच शेजाऱ्यांकडूनही काही माहिती मिळते का ? याबाबत विचारपूस केली जात आहे.

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images