Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सूर्यकिरणांनी केली निराशा

$
0
0
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवाचा क्षण डोळ्यात साठवण्यासाठी आलेल्या शेकडो भाविकांची दुसऱ्या दिवशी मावळतीच्या अंधूक किरणांनी निराशा केली. सायंकाळी सव्वा सहा वाजता किरणे देवीच्या चरणांवर पोहोचली आणि उजवीकडे खाली झुकली.

येळ्ळूरमध्ये महाराष्ट्राचा झेंडा

$
0
0
येळ्ळूर गावाच्या वेशीवर असलेला महाराष्ट्र राज्य फलक काढण्यावरून कर्नाटक पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीनंतर सहा महिन्यांनी येळ्ळूरमध्ये पुन्हा महाराष्ट्राचा भगवा झेंडा फडकविण्यात आला.

आज येणार नवी केएमटी

$
0
0
केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरु नगरोत्थान अभियानातंर्गत (जेएनयुआरएम) केएमटीला मंजूर झालेल्या १०४ बसेसपैकी पहिली बस सोमवारी (२ फेब्रुवारी) शहरात येत आहे.

अटकेच्या शक्यतेने महापौर आजारीच

$
0
0
सोळा हजार रुपयांच्या लाच घेतल्याप्रकरणी संशयित महापौर तृप्ती माळवी या आजारी असल्याने खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे रविवाराही महापौरांवर अटकेची कारवाई झाली नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ अधिकारी सोमवारी याबाबत डॉक्टरांची भेट घेणार आहेत.

ऊस पीककर्ज होणार बिलातूनच वसूल

$
0
0
शेतकऱ्यांना ऊस पिकासाठी दिलेले कर्ज शेतकऱ्यांकडून रोखीने वसूल न करता ते त्याच्या ऊस बिलातूनच वसूल करा, रोखीने पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची पीक कर्जे थांबवा, असे आदेश कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासकांनी सेवा संस्थांना दिले आहेत.

पीएन-महाडिकांकडे अडीच हजार ठराव

$
0
0
‘गोकुळच्या निवडणुकीस पात्र असलेल्या ३२६२ संस्थांपैकी सुमारे अडीच हजार संस्थांचे ठराव आमच्याकडे दाखल झाले आहेत. ४ तारखेपर्यंत मुदत असल्याने आणखी ४०० ठरावांची त्यामध्ये भर पडू शकते. बहुसंख्य ठराव आमच्याकडेच असल्यामुळे या निवडणुकीत विजय आमचा होणार हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

अजित पवारांनी दिल्या नेत्यांना कानपिचक्या

$
0
0
विधानसभेत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अपयश मिळाले म्हणून खचू नका, चुका दुरुस्त करून अंग झटकून, तडफेने कामाला लागा, असा कानमंत्र माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.

विजयसिंह यादव यांचे निधन

$
0
0
पेठवडगाव येथील रौप्यमहोत्सवी माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक विजयसिंह बळवंतराव यादव (वय ८१) यांचे सोमवारी (ता. २) दुपारी १२ वाजता निधन झाले. गेला महिनाभर ते आजारी होते.

आयुक्तांनी केली सरप्राइज व्हिजीट

$
0
0
शहरातील कचरा उठावासाठी काय यंत्रणा उपलब्ध आहे, कर्मचाऱ्यांना काय सुविधा उपलब्ध आहेत, बोगस हजेरी भरली जाते का ?, रेकॉर्ड अपडेट ठेवले जाते की नाही ? कर्मचारी वेळेवर कामाला येतात का ते त्यांच्यावर व्यवस्थित देखभाल केली जाते का ? अशा विविध गोष्टींची आयुक्त पी. शिवशंकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेतली.

लक्झरियस लूक, जादा अॅव्हरेज

$
0
0
लक्झरियस लूक, स्वयंचलित दरवाजे, आरामदायी बैठक व्यवस्था आणि जीपीएस प्रणाली युक्त आधुनिक धर्तीवरी​ल अशोक लेलँड कंपनीची मॉडेल बस केएमटीत दाखल झाली. आणि गेल्या काही महिन्यापासूनची प्रतीक्षा संपली.

परीक्षा प्रक्रिया ऑनलाइन

$
0
0
शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या वर्षाच्या ४९४ अभ्यासक्रमांच्या परीक्षांची सुरुवात येत्या तीन मार्च पासून होत आहे. गेल्या वर्षी ढीभगर झालेल्या चुकांत सुधारणा करण्यासाठी परीक्षा विभागाने कॉलेज आणि विद्यार्थ्यांनी सक्तीच्या सूचना केल्या आहेत.

राज्य कुस्तीगीर परिषदेला ढाक

$
0
0
राज्य कुस्तीगीर परिषद आणि जिल्हा तालीम संघातील कुरघोडीच्या राजकारणामुळे कुस्तीची झपाट्याने पिछेहाट होत असतानाही पदाधिकाऱ्यांनी यातून कसलाच बोध घेतलेला नाही. यामुळेच राज्याचा मल्ल असूनही सुनील सदाशिव साळुंखेला कर्नाटककडून खेळावे लागले.

स्मशानात थाटला संसार

$
0
0
नानीबाई चिखली (ता.कागल) येथे एचआयव्ही एड्सग्रस्त पतीच्या विधवा पत्नीला जाणीवपूर्वक बहिष्कृत करुन त्रास दिला जात आहे. एकतर कुणीही गावात रहायला भाड्याने घरही देत नाही आणि अतिक्रमण केलेल्या गायरानात झोपडी बांधून राहिल्यास तिची झोपडी उध्वस्त केली जाते.

अंबाबाईच्या किरणोत्सवात निराशा

$
0
0
किरणोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सोमवारी सूर्यकिरणांनी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या चरणांना स्पर्श केला. त्यामुळे भाविकांची निराशा झाली. वाढते तापमान, धुळीकण व धुक्यामुळे सूर्यकिरणांची तीव्रता कमी झाल्याने सूर्यकिरणे देवीच्या मुखापर्यंत पोहोचली नसल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले.

शिवसेनेचे पालकमंत्र्यांना आव्हान

$
0
0
‌शिवसेनेने एफआरपीप्रश्नी शुक्रवारी प्रादेशिक सह संचालक कार्यालयावर आंदोलन केले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा देत आंदोलकांची गय केली जाणार नसल्याचा गर्भित इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करुन शिवसेनेने पालकमंत्र्यांना प्रतिआव्हान दिले आहे.

महापौरांचा अंतरिम जामीन फेटाळला

$
0
0
महापौर तृप्ती माळवी यांचा अं​तरिम जामिन अर्ज जिल्हा व ​अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. डी. बोचे यांनी फेटाळला. महापौरांना शुक्रवारी सायंकाळी महापालिकेत १६ हजारांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात घेऊन सोडून देण्यात आले होते.

युतीचा जातीयवाद सुरूचः पवार

$
0
0
‘भाजप आणि शिवसेनेचे सरकार जातीयवादी आहे. मार्केटिंग करुनही ही सत्ता मिळविली आहे. अच्छे दिन आनेवाले है, असे म्हणत पावनेदोन कोटी जनतेला सवलतीपासून वंचित ठेवले आहे. हा फसवणुकीचा ट्रेलर असून सरकारची शंभरी भरली आहे.

ढेकणांमुळे सिद्धेश्वर एक्स्प्रेस लेट

$
0
0
मुंबईहून सोलापूरला निघालेल्या सिद्धेश्वर एक्स्प्रेसच्या वातानुकुलित तीन नंबरच्या डब्यात मोठ्या प्रमाणावर असलेल्या ढेकणांमुळे त्रस्त झालेल्या दोन प्रवाशांनी तक्रार करून पुण्यात दोन तास गाडी थांबवून ठेवली.

निखिलच्या डोळस प्रवासाची लिम्का बुकने घेतली दखल

$
0
0
निसर्गाची अवदृष्टी आणि डॉक्टरांचा हलगर्जीपणा यामुळे बालपणापासूनच लाभलेली मंद दृष्टी. त्यावर मात करीत दुर्दम्य आत्मविश्वासाच्या बळावर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील ‘बी टेक’ पदवी संपादन करणाऱ्या साताऱ्यातील निखील प्रभाकर शेडगे या युवकाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेतली आहे.

सोलर बॅटऱ्या चोरीला; दिवे अंधारात

$
0
0
राज्य सरकारच्या नागरी दलित वस्ती योजनेतून सार्वजनिक शौचालयांच्या परिसरात लावण्यात आलेले २०० सोलर पथदिव्यांपैकी बहूतांश ठिकाणचे दिवे चोरीला गेले आहेत. अनेक ठिकाणी महापालिकेच्या दुर्लक्षाने कंत्राटदाराने यंत्रणा बसवल्यानंतर सोलर दिवे जाग्यावर आहेत की नाहीत हेही पाहिले गेले नाही.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images