Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

महापौर ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

$
0
0
महापालिकेने संपादित केलेली जागा परत देण्यासाठी खासगी स्वीय सहायकाकरवी १६ हजारांची लाच घेतल्याबद्दल महापौर तृप्ती माळवी व स्वीय सहायक अश्व‌िन गडकरी यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी पकडले.

लाचखोर महापौर हॉस्पिटलात

$
0
0
लाचखोरीच्या प्रकरणातील आरोपी असलेल्या कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी या ब्लडप्रेशर वाढल्याने शनिवारी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या. त्यामुळे शनिवारीही त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली नाही.

मावळतीच्या किरणांचा देवीला चरणस्पर्श

$
0
0
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तूशैलीचा नमुना अशी ओळख असलेल्या किरणोत्सवाने पहिल्याच दिवशी देवीची गर्भकुडी सोनेरी तेजाने उजळून गेली. सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांच्या ठोक्याला मावळतीच्या किरणांनी देवीला चरणस्पर्श करताच मंदिर परिसरात घंटानाद घुमला.

८० किलोंचा बकरा, चॅम्पियन बैल

$
0
0
‘एकच धुडगूस, कारण आला आहे यळगूडचा काडतूस’ अशी टॅगलाईन सार्थ करणारा ८० किलो वजनाचा कलरफूल बकरा, ‌उंचापुरा आणि भक्कम शरीरयष्टीचा सांगोल्याचा चॅम्पियन बैल यासह सजवलेल्या म्हशी, रेडे आणि गाई पाहण्यासाठी भीमा कृषी प्रदर्शनाला शनिवारी दुसऱ्या दिवशी जनसागर लोटला होता.

खंडपीठासाठी वकिलांचा ‘ब्लॅक डे’

$
0
0
उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे यासाठी शनिवारी दि इचलकरंजी बार असोसिएशनच्यावतीने न्यायालयाच्या प्रवेशद्वारात जोरदार निदर्शने करण्यात आली.

तीस वर्षांपासून चालढकल सुरूच

$
0
0
‘३० वर्षे न्याय मागून मिळत नसेल तर कामकाज बंद ठेवणेच योग्य आहे. आंदोलन सुरु झाले की बैठक घेऊन बोळवण करायची व पुन्हा जैसे थे परिस्थिती ठेवायची ही यंत्रणेची चालढकल करण्याची पद्धत आहे,’ अशा शब्दांत कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विवेक घाटगे यांनी वकिलांच्या खंडपीठाबाबतच्या भावना मांडल्या.

अमिताभ-शाहरूखला नाना घालणार साकडे

$
0
0
कोल्हापुरातील अवनि, गायन समाज देवल क्लब आणि चेतना विकास मंदिरचे पालकत्व स्वीकारण्यासाठी पुढाकार घेण्याचे जाहीर वचन अभिनेता नाना पाटेकर यांनी दिले होते.

लायसन्स अपॉइंटमेंट आता सेतूमधून

$
0
0
लर्निंग आणि पर्मनन्ट लायसन्सची अपॉइमेंटसाठी होणारी आर्थिक लुबाडणूक आता थांबणार आहे. त्यासाठी आरटीओ कार्यालयाने पुढाकार घेत राजर्षी शाहू सुविधा केंद्रांतून (सेतू) ऑनलाइन अपॉंइटमेंट मिळण्याची सुविधा देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

खंडपीठासाठी न्यायाधीशांना रोखले

$
0
0
खंडपीठाच्या मागणीबाबत अन्याय करणाऱ्या यंत्रणेचा निषेध करत कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने शनिवारी जिल्हा सत्र न्यायाधीशांसह अन्य न्यायाधीशांना न्यायालयात प्रवेश करण्यापासून रोखत ठिय्या आंदोलन केले.

किरणोत्सवाने उजळली गर्भकुडी

$
0
0
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तूशैलीचा नमुना अशी ओळख असलेल्या किरणोत्सवाने पहिल्याच दिवशी देवीची गर्भकुडी सोनेरी तेजाने उजळून गेली.

स्वक‌ीयांनी सहकारमंत्र्यांना घेरले

$
0
0
भाजप, शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटना आदी पक्षांनी काँग्रेस व राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवत निवडणुकीत प्रचाराचे रान उठवले. याच्या परिणामी सत्ताही मिळाली, मात्र सत्ता मिळाल्यानंतर विरोधी पक्षांऐवजी भाजपला मित्रपक्षांबरोबरच संघर्ष करावा लागत आहे.

शिक्षण पद्धती योग्य, पण...

$
0
0
मॅनेजमेंट, इंजिनीअरिंग, फार्मसी, अॅग्रीकल्चर अशा विविध कोर्सचे शिक्षण घेणारे विद्यार्थी महाराष्ट्र टाइम्सने घेतलेल्या ‘मटा’ डिबेट या अभिनव उपक्रमाअंतर्गत एकत्र जमले...

अंबाबाई मूर्तीला वज्रलेप

$
0
0
श्री अंबाबाई मूर्तीची मोठ्या प्रमाणात होत असलेली झीज थांबवण्यासाठी मूर्तीचे रासायनिक संरक्षण (केमिकल कॉन्झर्वेशन) करण्याच्या श्रीपूजक संघटनेच्या मागणीला अखेर अंबाबाई वज्रलेप समितीचे प्रभारी अध्यक्ष जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी मान्यता दिली.

बेबी शकुंतला यांना चित्रपट महामंडळाची आदरांजली

$
0
0
‘पडद्यावर ज्या ताकदीने बेबी शकुंतला भूमिका ​जिवंत करायच्या तितक्याच त्या प्रत्यक्ष आयुष्यात माणुसकी जपण्यासाठी स्नेह जोडायच्या, अशा शब्दांत चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनी बेबी शकुंतला तथा उमा नाडगोडा यांना आदरांजली वाहिली.

यंग सीनिअर्सच्या पासला हवा ‘आधार’

$
0
0
एसटी, रेल्वे व राष्ट्रीयकृत बँकामध्ये यंग सिनियर्सना अनेक सवलती दिल्या जातात. मात्र असे यंग सीनियर्स ठरवताना अनेकवेळा बोगसपणा उघड झाला आहे. अशा गैर प्रकारांना आळा घालण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र देताना आधार कार्डवरील जन्मतारीख गृहीत धरून ओळखपत्र देण्यात येणार आहे.

केएमटी चालक, वाहकाला धमकी

$
0
0
सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथील सहायक पोलिस निरीक्षक राजू सावंत यांनी केएमटीच्या चालक व वाहकाला बंदूकीची गोळी घालून ठार मारीन अशी धमकी दिली. पापाची तिकटी परिसरात रविवारी रात्री साडेसात वाजता हा प्रकार घडला.

बालकुमार साहित्य सभेला गरज अनुदानाची

$
0
0
वाचनाची गोडी शालेय वयात लागावी यासाठी बालवाचक घडवण्याबरोबरच बालसाहित्याला प्रेरणा देण्यासाठी कार्यरत असलेल्या बालकुमार साहित्य सभेच्या कोल्हापूर विभागाच्या अनुदानाची तिजोरी गेल्या २२ वर्षापासून रिकामीच आहे.

‘कर्मवीरांचा’ क्रियाशील वारसा

$
0
0
गल्लीपासून दिल्लीपर्यंत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना आपल्या गावातील मुलींची होणारी छेडछाड पाहून कागल तालुक्यातील रणदिवेवाडीच्या आप्पासो संकपाळ यांनी स्वखर्चातून १० वी पर्यंत शाळा उभारुन कुणाच्याही मदतीशिवाय मंजूर करुन घेतली.

मोबाइल बॅटरीला उष्णता मिळाल्यास स्फोटाची शक्यता

$
0
0
एका व्यक्तीकडे दोनपेक्षा अधिक मोबाइल हँडसेट किंवा एका चौकोनी कुटुंबात पाच-दहा मोबाइलचे प्रमाण नेहमीचे बनत चालले आहे. त्यामुळे मोबाइलची संख्या फुगत आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचे मोबाइल घेण्याचे प्रमाण मोठे असल्याने याचा परिणाम मोबाइल कचरा साचण्यावर होत आहे.

निवडणुकांमुळे वाढली वसुली

$
0
0
जिल्ह्यातील निवडणुकीस पात्र असलेल्या सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया सुरू असताना सहकार विभागाच्या नवीन कायद्यानुसार थकबाकीदार सभासदास किंवा संस्थेस निवडणूक लढविण्याचा किंवा मतदानाचा अधिकार नाही.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images