Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

राज्यातील शाळा बेमुदत बंद

$
0
0
सरकारने घेतलेल्या अनेक अन्यायकारक निर्णयांच्या विरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षण क्षेत्र संघटना समिती व कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्यावतीने २ फेब्रुवारीपासून राज्यातील शाळा बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरात धुळीचे साम्राज्य

$
0
0
रस्त्यांवरील खड्डे, ड्रेनेजसाठी केलेली खोदाई व पावसाचे पाणी वाहून जाऊन रस्त्यावर आलेली माती यामुळे उडणारी धूळ या परिस्थितीत आता रस्ते तयार करण्यास सुरू झाल्यानंतर धुळीत आणखी भर पडत आहे.

संरक्षण कवचापासून पुरुष वंचितच

$
0
0
स्त्रियांना अबला मानून त्यांना सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी अनेक कायद्यांची अमंलबजावणी करण्यात आली. कायद्याची कितीही कडक अंमलबजावणी केली, तरी महिलांचा छळ होतच आहे.

लायसन्ससाठी ‘साक्षर’च नापास

$
0
0
आरटीओमध्ये लर्निंग लायसन्स काढण्यासाठी आलेल्यांची संगणकावर परीक्षा होते. काही क्षणांत ‘क्षमस्व, आपण अनुत्तीर्ण आहात...’ असा स्पष्ट निकाल पुढच्या स्क्रीनवर झळकतो. परंतु, दहावी शिकलेली व्यक्तीही ‘मी सक्षम आहे’ असे चुकीचे वाचत आनंदाने उड्या मारत येते.

तटबंदीसाठी निधीची वानवा

$
0
0
रंकाळ्याच्या तटबंदीच्या दुरुस्तीसाठी महापालिकेकडे पैसे नाहीत. निधी आणि योग्य नियोजनाअभावी तटबंदी बांधकामाचा आराखडा कागदावरच राहिला आहे.

‘यूजीसी’ला प्राचार्यांचा पाठिंबा

$
0
0
सीनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांना किमान दोन वाजेपर्यंत कॉलेजमध्ये थांबण्याच्या निर्णयाला कोणताही विरोध राहणार नाही. गुरूवारपासून (ता. २२) प्रत्येक कॉलेजमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचा निर्णय शिवाजी युनिव्हर्सिटी प्रिन्सीपल असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आला.

आता मोहीम नोंदणीची

$
0
0
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतर भाजपला अभूतपूर्व यश मिळाले. सोशल मीडियावरील कॅम्पेनिंग आणि जनमानसात असलेला प्रस्थापितांविरुद्धचा राग या निवडणुकीतून प्रकट झाला. विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेनेही यश मिळविले.

‘मटा’दरमहा फक्त ५० रुपयांत

$
0
0
गेल्या अडीच वर्षापासून शहराच्या अनेक प्रश्नांना थेट भिडून अनेक प्रश्न मार्गी लावण्यात यशस्वी झालेला आणि अल्पावधीत कोल्हापूरकरांच्या मनात रूजलेला महाराष्ट्र टाइम्स कोल्हापुरात ‘नववर्ष धमाका ऑफर’ची न्यू इअर गिफ्ट घेऊन आला आहे.

बिल्डरांचा महापालिकेला ठेंगा

$
0
0
एखादी चांगली गोष्ट जनजागृतीअभावी कशी फसते ते महापालिकेच्या कारभारावरून दिसते. पंचगंगेचे प्रदुषण रोखण्याच्या हेतूने मोठ्या बांधकाम प्रकल्पांना सांडपाणी शुध्दीकरण प्रक्रिया केंद्र (एसटीपी) अत्यावश्यक करुन प्रशासनाने चांगले पाऊल टाकले.

थेट पाइपलाइनचे अखेर पडले कुदळ

$
0
0
कोल्हापूर शहरासाठीच्या थेट पाइपलाइन योजनेंतर्गत पाइप टाकण्यासाठी खुदाईस सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या हद्दीतील ४३० मीटर अंतराची खुदाई सुरू झाली आहे.

पाणी बिल वाढीचा वाचणार ताप

$
0
0
उत्पन्नवाढीचा सहज व सोपा उपाय म्हणून महापालिका दरवर्षी पाणी बिल वाढीचा बोजा नागरिकांवर टाकत असते. पण यंदा मात्र कोल्हापूरकरांना दरवाढीचा झटका न देण्याचा आनंददायी निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत छुप्या पध्दतीने होणारी दरवाढही यावेळी होणार नसल्याने नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

जातपंचायतीविरुद्ध अंनिसचा ‘एल्गार’

$
0
0
जातपंचायत विरोधी कायदा व्हावा, यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन ‌समितीच्यावतीने (अनिस)सातत्याने संघर्ष सुरू असून ८ फेब्रुवारीला महाड येथे ‘जात पंचायत मनमानी विरोधील एल्गार परिषद’ आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती अनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

सागर चव्हाणला राष्ट्रपती पदक

$
0
0
शिवाजी विद्यापीठाचा ५१ वा दीक्षान्त समारंभ येत्या २९ जानेवारी रोजी होत असून ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या हस्ते पदवीदान सोहळा होत आहे. दुपारी अडीज वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात हा सोहळा होईल. यात डॉ. डी. वाय. पाटील यांना डी. लिट आणि राष्ट्रपती सुवर्णपदक विद्यार्थी सागर गणपत चव्हाण आणि कुलपती पदक विद्यार्थिनी ऋचा रवींद्र शिदोरे हिला बहाल करण्यात येणार आहे.

आयुक्तालय प्रतीक्षेतच

$
0
0
कोल्हापूर व इचलकरंजी शहरांतील वाढती लोकसंख्या व पोलिस दलावर पडणारा ताण लक्षात घेता कोल्हापुरात पोलिस आयुक्तालय स्थापन करावे यासाठी पोलिस प्रशासनाकडून प्रयत्न होत आहेत. मात्र, पोलिसांच्या प्रयत्नाला स्थानिक नागरिकांचा रेटा, मंत्रिमहोदय व लोकप्रतिनिधींनी सरकार दरबारी मागणी केल्यास आयुक्तालयाचा प्रश्न मार्गी लागू शकतो. गेली तीस वर्षे आयुक्तालयाचा प्रस्ताव प्रलंबित आहे.

वीजदरवाढीचा सामान्यांना फटका

$
0
0
वीजदरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसू नये यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने दिलेले ७०६ कोटी रुपयांचे अनुदान बंद करण्याचा निर्णय भाजप सरकारने घेतला होता. त्याला विरोध झाल्यानंतर पुन्हा अनुदान कायम ठेवण्याचा निर्णय झाला. त्यामुळे ग्राहकांना नोव्हेंबर महिन्याच्या बिलात वाढून आलेली रक्कम पुढील बिलात कपात करून मिळेल अशी आशा होती, पण तसे झालेले नाही.

पंचगंगेमुळे कृष्णाही होतेय प्रदूषित

$
0
0
शिरोळ तालु्क्यात पंचगंगेमुळे आता कृष्णा नदीही दूषित झाली असून याचा फटका नृसिंहवाडी, कुरूंदवाड, इचलकरंजी, आलास, बुबनाळसह नदीकाठच्या गावांना बसला आहे. हिप्परगी धरणाचे बॅकवॉटर म्हैशाळ बंधाऱ्यापर्यंत पोहोचल्याने दूषित पाणी साठून राहिले आहे. या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

सहाशेवर संस्था बिनविरोध

$
0
0
जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सुरू असताना क आणि ड गटातील सुमारे ६०४ संस्था बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे जवळपास अडीच कोटी वाचले आहेत. या संस्थांच्या निवडणुका लागल्या असत्या तर एवढा खर्च करावा लागला असता. खर्च वाचण्याबरोबरच सोसायटीतील वादही चव्हाट्यावर न येता सामोपचाराने निर्णय घेण्यात आले. उमेदवारांचा कोट्यवधींचा खर्चही वाचला आहे.

राधानगरी जंगलात वाघ पाहुणाच

$
0
0
राधानगरी जंगलातील जैवविविध्याची ख्याती आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे. येथे इतर वन्यप्राण्यांबरोबर सह्याद्रीचा शिरोबिंदू मानल्या जाणाऱ्या वाघांचा अधिवास असल्याचेही वारंवार वन‌विभागाकडून स्पष्ट केले जाते. मात्र जंगलप्रेमी आणि वनविभागातील सूत्रांनुसार या जंगलपट्ट्यात वाघाचे खाद्य असणारे तृणभक्षी प्राण्यांची संख्या कमी असल्याने वाघाचा अधिवास तयार झालेला नाही.

रंकाळ्याच्या तटबंदीला पुन्हा भगदाड

$
0
0
रंकाळा तलावाची तटबंदी कोसळली की पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा ठरलेला. तटबंदी दुरुस्तीसाठी निधीची घोषणा होते, आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या जातात. काही दिवस उलटले की, पुन्हा एकदा ‘ये रे माझ्या मागल्या...’सारखी स्थिती असेच चित्र पुन्हा एकदा अनुभवयास येत आहे. मंगळवारी रंकाळा तलावाची शालिनी पॅलेससमोरील उद्यानाकडील तटबंदी कोसळली.

आमदार रमेश कदमांविरोधात गुन्हा

$
0
0
राष्ट्रवादीचे मोहोळ येथील आमदार रमेश कदम यांच्यावर तलाठ्याला दमदाटी आणि मारहाण केल्याच्या आरोपावरून पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images