Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘अभंगरंग’ उद्या रंगणार

$
0
0
‘महाराष्ट्र टाइम्स’च्यावतीने आयोजित केलेल्या ‘सेलिब्रेट कोल्हापूर’ची सुरूवात ‘अभंगरंग’ या कार्यक्रमाने बुधवारी (ता. ७) होणार आहे. भक्ती संगीताचा हा कार्यक्रम ऐतिहासिक भवानी मंडपात बुधवारी सायंकाळी सहा वाजता होईल.

खंडोबाचा बिथरलेला हत्ती सावरला

$
0
0
पाल (ता. कराड) येथील खंडोबा यात्रेच्या मुख्य दिवशी मिरवणुकीत सहभागी झालेला हत्ती बिथरल्याने एका वृद्धेचा मृत्यू तर अन्य एक महिला जखमी झाल्याची घटना घडली होती. मात्र, यातून बिथरलेला हत्ती आता सावरला आहे.

मांढरदेवी यात्रेत अंधश्रद्धा कायम

$
0
0
मांढरदेवीच्या यात्रेसाठी जिल्हा प्रशासनाने अगदी नेटके आणि चोख आयोजन केले होते. प्रशासनाचे आव्हान आणि अंधश्रद्धा निमूर्लन समितीकडून होणारी जागृती आणि जादूटोणाविरोधी कायदा होऊनही काळूबाईच्या नावाने सोमवारी मांढरदेवीच्या डोगरावरील झाडीत काळ्या बाहुल्या आणि खिळे ठोकण्याची प्रथा सुरूच आहे.

मंदिराच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष

$
0
0
करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराच्या सुरक्षा ऑड‌िटमध्ये केलेल्या सूचनाकडे जिल्हा प्रशासन वारंवार दुर्लक्ष करत आहे. मंदिराच्या दगडी तटबंदीवर तारेचे कुंपन, बॅग स्कॅनर, मंदिरापासून ५० मीटर अंतरावर विक्रेत्यांची सोय करावी, या सूचनांना जिल्हा प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे.

‘सेलिब्रेट कोल्हापूर..!’ची पर्वणी

$
0
0
कोल्हापूर प्रचंड ऊर्जेचे आणि जिंदादिल माणसाचे शहर. कला, क्रीडा, ज्ञान आणि नवनिर्माणाची प्रचंड क्षमता असलेले हे शहर. या शहरातील सुजाण आणि चोखंदळ नागरिकांसाठी महाराष्ट्र टाइम्सने ‘सेलिब्रेट कोल्हापूर’चा विविधांगी उपक्रम आयोजित केला आहे.

कणेरी मठावर मदतीचा महापूर

$
0
0
रोज लाखावर लोकांची उपस्थिती, त्यांच्या जेवणाची आणि राहण्याची मोफत व्यवस्था, आदर्श शेतीसह आरोग्य, विज्ञान, शैक्षणिक व कला संस्कृतीचे प्रदर्शन... एवढ्या प्रचंड उपक्रमासाठी दहा कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाच वाघ

$
0
0
सह्याद्री पर्वत रागांत वसलेल्या सातारा, सांगली, कोल्हापूर व रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या क्षेत्रात येणाऱ्या कोअर व बफर झोन मिळून एकूण ११६५ चौरस किलोमीटर क्षेत्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तब्बल पाच वाघांचा अधिवास असल्याची माहिती प्रथमच वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

कामांची सोडवणूक नव्हे, अडवणूक

$
0
0
शहराच्या मध्यवस्तीतील कपिलतीर्थ मंडईची स्वच्छता नियमित झाली पाहिजे, बांधकाम कामगारांना दाखले त्वरित मिळाव्यात अशा मागण्यासह नागरिकांनी व्यक्तीगत स्वरूपातील अडचणी महापालिकेच्या जनता दरबारात मांडल्या.

बांधकाम कामगारच निवाऱ्याविना

$
0
0
दिवसभर काम केले तर रात्री चूल पेटणार, अन्यथा कुटुंबांसह अर्धपोटी झोपी जावे लागणार. प्रचंड अंगमेहनतीची कामे केल्याने उतारवयात अनेक व्याधींनी त्रस्त होतात. तरीही कामाचे नित्याचेच ओझे वाहणारे बांधकाम कामगार सर्वांना निवारा तयार करण्याचे काम करतात.

साठ दूध संस्था ‘बिनविरोध’

$
0
0
‘गोकुळ’ची निवडणूक वेळेत व्हावी यासाठी जिल्हा पशुसंवर्धन दुग्धविकास विभागाने जोरदार तयारी सुरू केली आहे. दूध संस्थांच्या सर्व निवडणुका या फेब्रुवारी अखेरपर्यंत संपविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

भवानी मंडपात आज ‘अभंगरंग’

$
0
0
‘महाराष्ट्र टाइम्स’च्यावतीने ऐतिहासिक भवानी मंडपात बुधवारी (ता. ७) सायंकाळी सहा वाजता ‘अभंगरंग’ कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘सेलिब्रेट कोल्हापूर’च्या धमाल कार्यक्रमांना सुरुवात होईल. गायक संजीव मेहंदळे व चैतन्य कुलकर्णी यांच्या साथीने अभंगरंग रंगणार आहे.

‘एंट्री’ने पोलिसांचे कल्याण

$
0
0
राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार सत्तेवर आले तरी बेकायदेशीर कामांना वरदहस्त कायम आहे. अवैध व्यवसायांना एंट्री व हप्ता देऊन बेकायदशीर काम करणाऱ्या ‘सरंक्षण’ मिळत असून त्यात पोलिसांचेच अधिक ‘कल्याण’ होत आहे.

पन्हाळा ट्रेकचे होणार रेकॉर्ड

$
0
0
अभेद्य तटबंदी व घनदाट जंगल सभोवतीने असलेल्या पन्हाळा किल्ल्याच्या रोमांचकारी इतिहासाला ११ जानेवारी रोजी किल्ले पन्हाळगड प्रदक्षिणा मोहिमेच्या रुपाने उजाळा देण्यात येणार आहे.

बांधकामासाठी ‘बुरे दिन’

$
0
0
मंदीने ग्रासलेल्या बांधकाम क्षेत्राला नव्या वर्षातील पहिल्याच आठवड्यात सिमेंट व वाळू दरवाढीचा झटका बसला आहे. सिमेंटच्या पोत्याचा दर ४०० ते ४७० रुपयांपर्यंत पोहचला आहे तर एक ट्रक वाळूचा दर २४ ते २५ हजारांपर्यंत गेला आहे.

ट्विंकल देसाईची दिल्ली परेडसाठी निवड

$
0
0
संभाजीनगर येथील न्यू इंग्लिश स्कूलची विद्यार्थीनी ट्विंकल बाजीराव देसाईची दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या संचालनासाठी निवड झाली आहे. ट्विंकल नववीमध्ये शिकत असून एनसीसीच्या द्वितीय वर्षाचे प्रशिक्षण घेत आहे.

‘गोकुळ’च्या हालचालींना वेग

$
0
0
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीबाबत सर्वांच्या मनात औत्सुक्य आहे. निवडणुकीची प्रारूप यादी तयार करण्याची प्रक्रिया जाहीर झाल्यापासून ‘गोकुळ’शी संबंधित नेते आणि कार्यकर्त्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

विद्यापीठात ‘मन की बात’

$
0
0
मोबाइल आणि सोशल मीडियामुळे मुलांचा पालक, भावंडे आणि मित्र-मैत्रिणींबरोबरचा संवाद कमी झाला आहे. एकाच घरात राहणाऱ्या आणि सोबत वावरणाऱ्या मुलांना एकमेकांशी स्पष्ट बोलणे अडचणीचे वाटू लागल आहे. त्यामुळे मुले हिंसा आणि आत्महत्येसारख्या मार्गावर जातात.

‘अभंगरंगा’त रंगले कोल्हापूरकर

$
0
0
ईश्वरानुभूतीच्या विश्वात नेणारे भक्तीस्वर आणि तल्लीन करून सोडणारे शब्द तनामनात साठवत रंगलेल्या अभंगरंगाची उधळण बुधवारच्या रम्य सायंकाळी ऐतिहासिक भवानी मंडपाच्या कानाकोपऱ्यात झाली.

पणनमंत्र्यांचे धोरण व्यापारीधार्जिणे

$
0
0
राज्यातील बाजार समितीमध्ये खरेदीदारांकडून अडत घेण्याच्या पणन संचालकांच्या निर्णयाला स्थगिती देऊन याबाबतचा सर्वमान्य तोडगा पंधरा दिवसांत काढण्याचे पणन मंत्री चंद्रकांत पाटील नागपूर अधिवेशनात सांगितले होते. परंतु, पंधरा दिवस उलटूनही याबाबत काहीच निर्णय घेतलेला नाही.

भाजपचे आता मिशन महापालिका

$
0
0
विधानसभा निवडणुकीतील यशानंतर आत्मविश्वास दुणावलेल्या भारतीय जनता पक्षाने आता मिशन महापालिकाचे धोरण आखली आहे. ऑक्टोबर २०१५ मध्ये होणाऱ्या कोल्हापूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी पक्षाने सुरू केली आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images