Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

'ट्रँक्विलायझर गन’चे फुसके बार

0
0
वन विभागाचे अधिकारी आता कितीही सांगत असले तरी कोल्हापूर वन विभाग व वन्यजीव विभागाकडे सध्यातरी 'ट्रँक्विलायझर गन’ (बेशुध्द करण्याची बंदूक) उपलब्ध नाही हे वास्तव आहे.

रेल्वेची लवकरच श्वेतपत्रिका

0
0
‘रेल्वेच्या जमा आणि खर्चात काहीच अंतर राहिले नसल्याने देशातील दळणवळणाचे प्रमुख साधन असलेल्या रेल्वेची आर्थिक स्थिती अतिशय कठीण बनली आहे. त्यासाठी रेल्वेची श्वेतप​त्रिका जाहीर केली जाणार आहे,’ असे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी येथे सांगितले.

बोगस लाभार्थ्यांची चौकशी सुरू

0
0
कागल तालुक्यात एका गावातील बोगस लाभार्थी पुराव्यासह शोधल्याची फाइल पाहून वरिष्ठ अधिकारी धास्तावले आहेत. फेब्रुवारीत याबाबत झालेल्या तक्रारींनंतर याची चौकशी सुरू करण्यात आली होती.

हत्ती बिथरल्याने चेंगराचेंगरी

0
0
खंडोबाची पाल (ता. कराड) येथील यात्रे‍ेवेळी मानाचा हत्ती बिथरल्याने चेंगराचेंगरी होऊन एक कोल्हापूरची महिला भाविक मत्युमुखी पडली आणि १२ जण जखमी झाले. अंजना नामदेव कांबळे (वय ६५ रा. कदमवाडी, कोल्हापूर) असे मृत महिलेचे नाव आहे.

निवडणुकीच्या कामाला वेग

0
0
जिल्ह्यातील ब गटातील सहकारी संस्थांपैकी विकास संस्थांच्या निवडणुका घेतल्याशिवाय जिल्हा बँक, खरेदी विक्री संघ, बाजार समिती या संस्थांच्या निवडणुका घेता येत नाहीत. त्यामुळे ५२८ विकास संस्थांपैकी पात्र संस्थांची निवडणूक घेण्याच्या कामाला सुरूवात झाली असून मार्च अखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

साहित्यात दु:ख पचवण्याची ताकद

0
0
‘साहित्य जीवनाचा शोध घेते तसेच ते जीवनाला आकार, गती अन् दिशा देते. जीवनाला पूर्णत्वाकडे नेणारा प्रकाशदूत म्हणजे साहित्य होय. नव्या पिढीने जीवन समृध्द करण्यासाठी ग्रामजीवनाशी निगडीत सकस साहित्य वाचावे,’ असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. द. ता. भोसले यांनी केले.

जातीअंताच्या शक्यतेबाबत शिबिर

0
0
भारतीय समाज हजारो वर्षांपासून जातिग्रस्त आहे. या व्यवस्थेच्या उतरंडीच्या तळातील स्त्रिया व शुद्रातिशुद्रांचे जगणे दु:खमय बनलेले आहे. तर उतरंडीच्या शीर्षस्थानाकडील जातींनी विशेष कष्ट न करताही जगणे सुखमय करून घेतले आहे.

रुग्ण सहाय्य समिती होणार अॅक्टिव्ह

0
0
‘दीड वर्षांपूर्वी ३० वर्षाच्या तरुणाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्याला मुंबईतील कार्पोरेट हॉस्पिटलमध्ये तत्काळ दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी २ लाख ४० हजार रुपयांचे इंजेक्शन लगेच देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

‘अडती’बाबत व्यापारी एकवटले

0
0
व्यापाऱ्यांकडून अडत वसुलीला सरकारने तात्पुरती स्थगिती दिली असली, तरी व्यापाऱ्यांवर अडतीची टांगती तलवार असल्याने संघटित होण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून पुणे चेंबर ऑफ कॉमर्सने राज्यातील व्यापाऱ्यांची बैठक सोमवारी (ता. ५) बोलवली आहे.

महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा

0
0
कामगार असल्याचा दाखला न मिळाल्याने कष्टकरी वर्गाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कामगार असल्याचा दाखला मिळाल्यानंतर सरकारी स्तरावरील काही प्रमाणात सोयी मिळू शकतात. मात्र, कामगार असल्याबाबतचा दाखला मिळावा म्हणून यासाठी धडपड करावी लागत आहे.

​वाहतूक नियंत्रक निलंबित

0
0
एसटीच्या विद्यार्थी पासचा गैरवापर झाल्याचे स्पष्ट झाल्याने चौकशीसाठी रंकाळा आगारातील वाहतूक नियंत्रक रंजना पाटील यांना निलंबीत करण्यात आले आहे. या प्रकारात गैरव्यवहार झाल्याच्या शक्यतेने चौकशी सुरु असून आतापर्यंत संशयास्पद जवळपास बारा पास आढळून आले आहेत. येत्या दोन ते तीन दिवसात चौकशी पूर्ण होणार आहे.

अपक्षांकडे दुर्लक्ष

0
0
महापालिकेच्या राजकारणात आघाडी करताना अपक्षांना सोबत घेतले. कुणाला स्थायी समिती सभापतीची ऑफर तर कुणाला उपमहापौर पदाचे आमिष दाखविले. मात्र गेल्या चार वर्षात अपक्षांच्या वाट्याला पदांऐवजी पक्षपातीपणा आला आहे.

गळतीमुळे पाणीच पाणी...

0
0
मेरी वेदर ग्राऊंड ते महावीर कॉलेजकडे येणाऱ्या मार्गावर पाइपलाइनला गळती लागल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले. बराच काळ ही गळती सुरु राहिल्याने वाहनचालकांना पाण्यातूनच वाट काढावी लागली. परिसरातील नागरिकांनी यापूर्वी पाणी पुरवठा विभागाला कळवूनही दखल घेतली नसल्याच्या तक्रारी आहेत.

मार्ग बदलला, कोंडी कायम

0
0
शहरातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकात थांबणाऱ्या सावंतवाडी, मालवण, मडगाव, वेगुर्ले, पणजीकडे जाणाऱ्या गाड्या संभाजीनगर आगारात थांबवल्या.

संशयित दहशतवाद्यांचा वावर

0
0
पुण्यातील फरासखाना व बेंगळुरू स्फोटातील संशयित आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. या संशयितांचा वावर कोल्हापुरातही होता. ही बाब स्पष्ट झाल्याचे दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) वरिष्ठ पोलिस निरीक्षक भानुप्रताप बर्गे यांनी महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना सांगितले. करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे. सुरक्षेच्यादृष्टीने येथे अनेक त्रुटी आहेत.

वादळी वाऱ्याने द्राक्षबागा भुईसपाट

0
0
बामणी (ता. खानापूर) येथे सोमवारी पहाटे झालेल्या वादळी वाऱ्याने राजाराम बाळू लेंगरे या शेतकऱ्याची तीन एकर निर्यातक्षम द्राक्षबाग जमिनदोस्त झाली आहे. या घटनेत सुमारे ५० लाखांचे नुकसान झाले आहे. खानापूर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे अनेक द्राक्षबागांचे मडप तुटले आहेत.

उत्पादकच करणार गुळाचे मार्केटिंग

0
0
गुजरातमध्ये ‘कोल्हापुरी गुळा’च्या नावाखाली इतरत्र तयार होणाऱ्या गुळाची विक्री होत आहे. यामुळे मूळ कोल्हापूरच्या गुळाची विक्री कमी होत आहे. शिवाय या बनावट गुळाला दर्जा नसल्यामुळे कोल्हापूरची नाहक बदनामी होत आहे.

इचलकरंजी नगराध्यक्ष राजीनामानाट्याला कलाटणी

0
0
काँग्रेसच्याच नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी आपण अडीच वर्षाचा कार्यकाल पूर्ण करणार असल्याचे ठामपणे सांगत पदाचा राजीनामा देण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिल्याने राजीनामानाट्याला सोमवारी वेगळीच कलाटणी मिळाली.

‘गोकुळ’साठी सतेज पाटील, मुश्रीफ सक्रिय

0
0
गोकुळच्या निवडणुकीत आमदार महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील यांच्यासमोर आता सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांचे आव्हान असेल. त्यादृष्टीने सतेज पाटील सक्रीय झाल्याने गोकुळची निवडणूक चांगलीच रंगणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे पडसाद या निवडणुकीत उमटण्याची चिन्हे आहेत.

चंदगडमध्ये हत्ती हटाव

0
0
‘गेली काही वर्षे पिकांसह झाडे आणि घरादाराचे नुकसान करणाऱ्या हत्तींबाबत राज्य सरकारने विशेषतः कोकण विभागात हत्ती हटाव मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार वन विभागामार्फत कोकणात दहशत माजविलेल्या हत्तींना नियंत्रित करण्याबाबत कार्यवाही सुरू झाली आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images