Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

महिलांसाठी खास केएमटी स्पेशल

$
0
0
महिलांना सुरक्षित आणि वेळेत प्रवास करता यावा यासाठी नव्या वर्षात केएमटीकडून स्पेशल बस धावणार आहे.

हवा विजेचा ‘रास्त’ पर्याय

$
0
0
सद्यस्थितीतही उद्योजकांना वीजदरात सवलत देणे शक्य आहे. परंतु, त्यासाठी जाहिरातदार आणि व्यापाऱ्यांना देण्यात येणारे अनुदान बंद करण्याबरोबरच वीजनिर्मितीतील गळती कमी करणे गरजेचे आहे, असे मत या क्षेत्रातील ‌तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

वेलकम 2015

$
0
0
थीम पार्टी, डीजे आणि भव्य डान्स फ्लोअरला रोषणाईचा झगमगाट अशा रंगारंग वातावरणात शहरात नववर्षाचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. ‌शहरातील बहुतांशी हॉटेल्स आणि हॉलमध्ये न्यू इअर पार्टीची जय्यत तयारी करण्यात आली होती.

कोल्हापूरात बिबट्या जेरबंद

$
0
0
शहरातील रुईकर कॉलनी परिसरात आलेल्या बिबट्यामुळे सकाळीच नागरिकांची तारांबळ उडाली.

माणसांच्या जंगलात बिबळ्या ठार

$
0
0
नववर्षाच्या पहिल्या दिवशीच कोल्हापूर शहरातील रुईकर कॉलनीत बिबळ्याचा चार तासांचा थरार शहरवासियांनी अनुभवला. मात्र, बिबळ्याला पकडण्यासाठी कुठलीही शास्त्रीय पद्धत न वापरता सावळागोंधळ घालण्यात आल्याने या उमद्या जनावराचा ‘माणसांच्या जंगला’त मृत्यू झाला.

मंडल अधिकाऱ्याला वाळू तस्करांची मारहाण

$
0
0
अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा ट्रक अडवल्याच्या कारणातून मंडल अधिकारी आणि कोतवाल यांना मारहाण करण्यात आली. तसेच गाव चावडीतील साहित्याचे नुकसान केल्याची घटना हातकणंगले तालुक्यातील इंगळी येथे घडली.

निराधार लाभार्थ्यांची थट्टा

$
0
0
संजय गांधी, श्रावणबाळ आणि इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजनेची कागल तालुक्यातील चौकशी ही सरकारची परिपत्रके व सरकार निर्णय डावलून नियमबाह्यरित्या सुरु आहे. त्यामुळे निराधार,गोरगरीब लाभार्थ्यांची थट्टाच होत आहे,’ असा आरोप करीत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

३२ ते ३५ टक्के वीज दरवाढ?

$
0
0
‘महावितरणने आणखी पाच हजार ९०५ कोटी रुपयांची भर घालून अंदाजे १२ टक्के दरवाढीची मागणी करणारी याचिका नियामक आयोगाकडे दाखल केली आहे.

सर्वाधिक रेडीरेकनर गुजरीत

$
0
0
नव्या वर्षासाठी जाहीर झालेल्या रे​डीरेकनरमध्ये अंबाबाई मंदिराजवळील व शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या गुजरी परिसरातील रेडीरेकनरचा प्रती चौरस मीटरचा दर ५२ हजार ६४० रुपये इतका सर्वाधिक ठरला आहे, तर शहराशेजारील प्रभावक्षेत्रातील ग्रामीण परिसरात यंदा उजळाईवाडीतील प्रती हेक्टरचा दर २२ हजार ६०० रुपये एवढा सर्वाधिक आहे.

‘व्होट’ बँकेसाठी योजनांची खिरापत

$
0
0
कागल तालुक्यात संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ आणि इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेत बोगस लाभार्थी घुसडून मोठ्या प्रमाणात सरकारी पैशाची लूट करण्यात आली आहे. फेब्रुवारी ते नोव्हेंबर २०१४ पासून या विधानसभा निवडणुकपूर्व कालावधीत तालुक्यात लाभार्थ्यांच्या संख्येत तब्बल १०२ पटींनी वाढ झाली आहे.

माकडवाल्यांचे डिझास्टर मॅनेजमेंट

$
0
0
बिबट्याला पकडण्यासाठी अग्निशमन दल व वनधिकारी घटनास्थळी आल्यावर खासदार धनंजय महाडिक यांनी माकडवाले (कुचकोरवी) समाजाच्या कार्यकर्त्यांना बिबट्याला पकडण्यासाठी बोलवले. माकडवाले समाज हा भटका समाज असून डुकरे पकडण्याचा त्यांच पारंपरिक व्यवसाय.

बिनकामाचे वनखाते

$
0
0
वन्यप्राणी नागरी वसाहतीत शिरण्याचे प्रकार वनखात्याला नवीन नाहीत. यापूर्वीही कोल्हापूरसाख्या ठिकाणी बिबट्या, तरस, भेकर, गवे आदी वन्यप्राणी आले आहेत. या प्राण्यांना सुखरुप पकडून पून्हा जंगलात सोडणे हे वनखात्याचे काम असताना गुरुवारी मात्र हा विभाग सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून आले.

बघ्यांनी उडविला गोंधळ

$
0
0
रूईकर कॉलनीसारख्या भागात बिबट्या आल्याची माहिती व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून क्षणार्धात शहरात पसरली आणि रूईकर कॉलनीला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले. काही मिनिटातच झालेली गर्दी पाहून पोलिसही भांबावून गेले.

बिबट्याचा चार तास थरार

$
0
0
नववर्षाच्या पहिल्या दिवशी शहरातील रुईकर कॉलनी येथे बिबट्याचा चार तासांचा थरार शहरवासियांनी अनुभवला. वाघऱ्या (डुक्कर पकडण्याच्या जाळ्या) आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी जंपिग नेटचा वापर करून धाडसाने बिबट्याला पकडल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

अवकाळीचा द्राक्षांना फटका

$
0
0
हुडहुडी भरवणारी थंडी असताना दोन दिवस अचानक झालेल्या ढगाळ वातावरणानंतर गुरुवारी शहर परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. दरम्यान, सांगली जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले.

रंगणार राज्य बालनाट्य स्पर्धा

$
0
0
स्त्रीशिक्षणापासून ते व्यवहारातील क्लिष्टता, स्वातंत्र्याची कल्पना ते आरोग्यव्यवस्थेवर भाष्य करण्यापर्यंत हरेक विषयांना स्पर्श करत बालरंगकर्मींनी रंगभूमीवर आता आपलेही राज्य आहे याची प्रचिती दिली.

‘शिवाजी मराठा’त अवतरले

$
0
0
चॉकलेटचे रिकामे बॉक्स आकर्षक रंगवून तयार केलेली कुंडी, वारली चित्रकलेचा नमुना, भौमितिक आकृतीसारख्या तयार केलेल्या चित्रात भरलेली रंगसंगती, ओरिगामी आणि कोलाज चित्रकलेचा नमुना पाहण्याची संधी चित्रप्रेमींना उपलब्ध झाली आहे.

'त्या' बिबळ्याची अन्नान्न दशा

$
0
0
कोल्हापुरातील रुईकर कॉलनीसारख्या भर वस्तीत आलेल्या बिबळ्या किमान आठवडाभर उपाशी होता. त्याच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता. शरीरातील पाणीही कमी होते. अन्नान्न दशा, प्रचंड गर्दी आणि पळापळीने झालेली दमछाक यामुळे त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला.

३५० विद्यार्थ्यांना विषबाधा

$
0
0
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात कोर्टी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये सुमारे ३५० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे वृत्त आहे. या विद्यार्थ्यांपैकी २० ते २२ मुलांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या सगळ्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती मिळते आहे.

शिक्षिकांसाठी कराटे प्रशिक्षण

$
0
0
मुली धीट बनाव्यात, स्वसंरक्षणाचे कौशल्य त्यांना अवगत असावे यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिका शाळांतील शिक्षिकांना सध्या कराटेचे प्रशिक्षण दिले जात आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>