Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पूररेषा निश्चित करणार

$
0
0
‘जिल्हाधिकारी आणि पाटबंधारेचे अधिकारी यांच्या पूरपट्ट्याच्या सर्व्हेनंतर एक ‘ब्ल्यू लाइन’ निश्चित करण्यात येणार आहे.

पक्षनिष्ठेसह इलेक्टिव्ह मेरिट महत्वाचे

$
0
0
‘युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र पक्षनिष्ठा, निवडून येण्याची क्षमता, जनहिताची कामे आणि राजकीय, सामाजिक जीवनातून काँग्रेससाठी दिलेले योगदान हे प्रमुख निकष असतील.

‘कोजिमाशि’ही गाजली वादाने

$
0
0
सभासदांना कर्जमर्यांदा १२ लाख रुपये, वीस टक्के लाभांश आणि सभासदांना ओळखपत्र देण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांच्या सहकारी पतसंस्थेच्या रविवारी झालेल्या वार्षिक सभेत घेण्यात आला.

आरोप अन् समांतर सभा

$
0
0
अध्यक्षांऐवजी सत्तारूढ सभासदांनीच विरोधकांना बोलण्यास मज्जाव करणे आणि विद्यमान संचालकांच्या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधकांचा सभात्याग आणि मग समांतर सभा अशा प्रकारांनी दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची रविवारी आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलच्या सभागृहात झालेली सभा यंदाही गाजली.

सिनेमावाल्यांपाठोपाठ गुरुजींचाही गोंधळ

$
0
0
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातील गोंधळाची चर्चा अद्याप सुरू असतानाच रविवारी झालेल्या कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण (कोजिमाशि) सेवकांच्या सहकारी पतसंस्था आणि दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या वार्षिक सभेतही प्रचंड गोंधळ उडाला.

‘महावितरण’चे फिडर सेपरेशन

$
0
0
भारनियमन नाही असे महावितरणकडून कितीही सांगितले गेले तरी त्यावर ग्रामीण भागातील लोकांचा विश्वास बसत नाही. कारण ग्रामीण भागात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या फिडरवरूनच घरगुती आणि कर्मशियल ग्राहकांनाही वीज दिली जात होती.

५७ पदांसाठी २१७४ उमेदवार

$
0
0
शिवाजी विद्यापीठातर्फे वर्ग तीन व वर्ग चारमधील ५७ पदांसाठी रविवारी लेखी परीक्षा झाली. या दोन्ही प्रवर्गातील पदांसाठी २१७४ जणांनी अर्ज केला होता. यापैकी शिपाईपदाच्या अकरा जागांसाठी एक हजारांहून अधिक उमेदवार होते.

महापालिकेत अपंगांचे हाल

$
0
0
दैनंदिन कामासाठी सातत्याने संबंध येणाऱ्या महापालिकेच्या मुख्य इमारतीत रॅम्प नसल्याने अपंग आणि वृध्द नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

‘अस्वच्छ अन् रोगी निपाणी’

$
0
0
मागील काळात शहरात विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने प्रसिद्ध झालेल्या ‘स्वच्छ, सुंदर, निरोगी निपाणी’ हे ब्रीदवाक्य आता कालबाह्य ठरत आहे. अस्वच्छतेमुळे शहराची अवस्था दिवसेंदिवस खालावत आहे.

‘उजनी’ शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर

$
0
0
सलग दोन वर्षे दुष्काळामुळे अडचणीत आलेले उजनी धरण आता येत्या दोन दिवसांत १०० टक्के भरणार आहे.

नरेंद्र पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

$
0
0
शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख आणि भारतीय जनता पार्टीचे विद्यमान प्रदेश कार्यकारिणी सदस्य नरेंद्र पाटील यांनी भाजपला रामराम ठोकाला आहे. पाटील यांनी अपेक्षेप्रमाणे पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला असून, भाजपला मोठे खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वेगळा विदर्भ नको

$
0
0
क्रांतिसिंहांच्या नावाने पुरस्कार असल्यानेच आपण स्वीकारला. अन्यथा आपण पुरस्कारांपासून दूरच राहतो. आपण पूर्व विदर्भातले असलो तरी वेगळ्या राज्यास आपला विरोध आहे.

मोलकरणींसाठी पदविका अभ्यासक्रम

$
0
0
परिस्थितीमुळे शिक्षणाचा मार्ग सोडून उदरनिर्वाहासाठी दुसऱ्याच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणींना आता शिक्षणाची नवी दिशा मिळणार आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने घरकामगार कल्याण पदविका अभ्यासक्रमाच्या माध्य‌मातून ही संधी प्राप्त करून दिली आहे.

कोल्हापूर-सांगली रस्त्यावर खड्डेच खड्डे

$
0
0
सांगली-कोल्हापूर महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. खड्डयांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.

राधानगरीत ओला दुष्काळ जाहीर करा

$
0
0
तालुक्यात सरासरीपेक्षा यंदा सर्वाधिक पाऊस झाल्याने अनेक पिके वाया गेल्याची वस्तुस्थिती असून त्या सर्व बाधित पिकांची पाहणी व पंचनामा करून राधानगरी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने केली.

रस्त्यांसाठी धडक मोर्चा

$
0
0
वाळवा, पलूस तालुका कार्यक्षेत्रातील खराब रस्त्यांचे खडीकरण आणि डांबरीकरण करावे, या मागणीसाठी शेतमजूर, कष्टकरी, शेतकरी संघटनेच्या वाळवा शाखेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंडळावर सोमवारी मोर्चा काढण्यात आला.

गव्याच्या हल्ल्यात वृद्धा ठार

$
0
0
बुझवडे (ता. चंदगड) येथील वृध्दा सौ. भागूबाई बंडोपंत सुकये (वय ६२) यांना शेतामध्ये काम करताना गव्याने समोरून धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. उपचारासाठी त्यांना रूग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

होस्टेलमध्ये तातडीने सुविधा पुरवा

$
0
0
विद्यापीठाच्या आवारातील विद्यार्थी होस्टेलमधील गैरसोयींची गंभीर दखल घेत त्यामध्ये सुधारणा करण्याच्या सूचना कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी प्रशासनाला केल्या आहेत.

क्रांतिदिनी जलसमर्पणाचा श्रमिक मुक्ती दलाचा इशारा

$
0
0
वर्षानुवर्षे धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी लक्ष वेधण्यासाठी ९ ऑगस्टला चिकुर्डे येथे जलसमर्पण करण्याचा इशारा श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने सोमवारी जिल्हा प्रशासनाला दिला.

‘भ्रष्ट अधिका-यांना तुरुंगात पाठवू’

$
0
0
कोल्हापूर जिल्ह्यातील १२ हजार प्रकरणे येत्या १३ ऑगस्टपर्यंत निकाली काढली जातील. निकाली प्रकरणांची माहिती संकेतस्थळावर देणार असल्याची माहिती विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे मुख्य समन्वयक डी. आर. परिहार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images