Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘काळम्मावाडी’ची गळती रोखली

0
0
काळम्मावाडी धरणाची गळती रोखण्यात पाटबंधारे विभागाला यश आले आहे. दूधगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या या धरणाला १९९९ मध्ये गळती लागल्याचे लक्षात आले. त्यावेळी धरण पूर्णक्षमतेने भरले होते. ही गळती त्यावेळी प्रतिसेकंद ३९८ लिटर होती.

सुरक्षेचे सेन्सर ‘आय’

0
0
अनेक वर्षे एखादी कार मनात भरलेली असते. कधीतरी ही कार आपल्या दारात उभी करूच, असे स्वप्न असते. हरएक प्रयत्नानंतर हे स्वप्न सत्यात उतरते. लाखमोलाच्या कारचा आनंद घेण्याआधीच सुरक्षेच्या उपायांअभावी त्या स्वप्नाचा चुराडा होण्यासारखे दुसरे दुर्दैव नाही.

पुन्हा रंगणार गडकरींचं ‘गर्वनिर्वाण’

0
0
तांत्रिक अडचणींमुळे थांबलेलं राम गणेश गडकरी लिखित ‘संगीत गर्वनिर्वाण’ हे भव्यदिव्य संगीत नाट्य पुन्हा रसिकांसमोर येण्यासाठी सज्ज झालं आहे. नव्या वर्षात पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, कोकण आणि गोव्यात या नाटकाचे प्रयोग रंगतील.

साकारतोय ऑक्सिजन पार्क

0
0
नाकात भरणारा औषधांचा कडवट वास सहन होत नाही म्हणून दवाखान्याची वाट नको वाटते. पण आजारपण आले की दवाखान्यात जाण्याशिवाय पर्यायही नसतो. रूग्ण दवाखान्यात दाखल होतो, तेव्हा त्यांना प्रसन्न वाटावे यासाठी खासगी हॉस्पिटल्समध्ये खास हाऊसकिपिंग यंत्रणा असते.

आठवणींचा कॅलिडोस्कोप

0
0
ज्या शाळा ते कॉलेजमध्ये लहानाचे मोठे झालो, ज्या मातीने आपल्याला घडवले, आयुष्य जगण्याचा मंत्र आणि तंत्र दिले त्या भूमीत पुन्हा एकदा त्याच वर्ग मित्र-मैत्रिणींबरोबर गप्पांचा फड रंगण्याची संधी घेण्यात माजी विद्यार्थी दंगून गेले आहेत.

चांदोलीची सफर होणार सुखद

0
0
चांदोली राष्ट्रीय उद्यान परिसरातील पर्यटनवाढीसाठी लवकरच पर्यटकांसाठी राहण्याची सोय, उद्यानाची सफर करण्यासाठीची वाहने याची उपलब्धता करण्यात येणार आहे. एक ते दीड महिन्यांत याची कार्यवाही होऊन पर्यटनाला गती देण्याबरोबरच या उद्यानाची संपूर्ण माहिती असलेली वेबसाइट कार्यरत करण्यात येत आहे.

सर्वेक्षणात तांत्रिक अडचणी

0
0
सामाजिक, आर्थिक आणि जातीनिहाय सर्वेक्षणाला २०११ मध्ये सुरूवात झाल्यानंतर ही प्रक्रिया सहा महिन्यात पूर्ण करण्यात येईल असा अंदाज होता.

पुढील वर्ष संघर्षाचे

0
0
महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस संघटनेने (इंटक) विविध मागण्यांसाठी व एसटीच्या सक्षमीकरणासाठी २०१५ हे ‘संघर्ष वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे. संघटनेच्या राज्यस्तरीय कार्यकारिणीच्या बैठकीत तसा ठराव करण्यात आला असून, त्यासाठी आंदोलन समितीही जाहीर केली आहे.

वीज ग्राहकांना फटका

0
0
केवळ वीजदरवाढीच्या माध्यमातून वीज ग्राहकांना फटका बसतो अशी परिस्थिती नाही, तर महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशनने (एमईआरसी) दिलेल्या निर्णयाची आपल्याला मदत होईल अशाच प्रकारे अंमलबजावणी करण्याचे काम महावितरणने केले आहे.

टोलप्रश्नी आठवड्यात बैठक

0
0
रस्ते विकास प्रकल्पांतर्गत आयआरबीकडून सुरू असलेली टोलवसुली रद्द करण्याबाबत हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखालील आमदारांच्या शिष्टमंडळाला दिली.

प्रभागातील रस्तेच पर्यायी

0
0
रस्ते विकास प्रकल्पात त्रिपक्षीय करारात महापालिका मुख्य घटक असल्याने पर्यायी रस्ते तयार करण्यावरून कराराचा भंग होण्याच्या भीतीने पर्यायी रस्ते हे प्रभागातील रस्ते म्हणून तयार करण्यात येणार आहेत.

सुवर्णमहोत्सवात सुवर्णझळाळी

0
0
शिवाजी विद्यापीठाला नॅक समितीने ‘अ’ मानांकन जाहीर केल्याने संशोधनासह सात निकषांत विद्यापीठ अग्रेसर ठरले आहे. गेल्या पंधरा वर्षात केलेल्या शैक्षणिक कामागिरीच्या बळावर विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

हद्दवाढीला सरकारचा ग्रीन सिग्नल

0
0
कोल्हापूरच्या हद्दवाढीस सरकारने बुधवारी ग्रीन सिग्नल दाखवला. हद्दवाढीसंदर्भात विधान परिषदेत विचारलेल्या तारांकित प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसा प्रस्ताव विचारधीन असल्याचे स्पष्ट केले.

लोकसहभागातून कायापालट

0
0
कसबा बावड्यातील जुनी शाळा म्हणून श्री प्रिन्स शिवाजी विद्यालय ओळखले जाते. शाळेची इमारत दगडी आहे .पण वर्ग खोल्यांचे छप्पर खराब झालेले, त्यामुळे पावसाळ्यात गळती लागायची.

शिवाजी विद्यापीठ ‘ए’ ग्रेड

0
0
शिवाजी विद्यापीठास राष्ट्रीय मूल्यांकन तथा प्रत्यायन परिषदेकडून (नॅक) ३.१६ गुणांसह ‘अ’ मानांकन मिळाल्याची माहिती शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी बुधवारी दिली.

नाट्य संमेलनावर प्रश्नचिन्ह

0
0
नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्या वक्तव्यामुळे पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात आयोजित होणा-या नाट्य संमेलनाच्या आयोजनावरच प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे. बेळगाव नाट्य परिषदेने ६ ते ८ फेब्रुवारी २०१५ दरम्यान नियोजित नाट्य संमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात असमर्थता दर्शवली आहे.

गोविंद कुलकर्णी यांचे निधन

0
0
‘सोंगाड्या’, ‘एकटा जीव सदाशिव’, ‘हऱ्या-नाऱ्या झिंदाबाद’ अशा गाजलेल्या सिनेमांचे दिग्दर्शक आणि निर्माते गो​विंद कुलकर्णी (८५) यांचे गुरुवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. शरदचंद्र लक्ष्मण भागवत हे त्यांचे मूळ नाव. मात्र, गोविंद कुलकर्णी या नावाने त्यांनी सिनेसृष्टी गाजवली.

अपंगांसाठी अडीच लाखांचा निधी

0
0
समाजाचे आपण काही देणे लागतो ही भावना प्रत्येकाने मनात ठेवून अपंग बांधवांना मदत केली पाहिजे. अपंग आणि दीनदुबळ्यांना मदत हीच प्रभू येशूची शिकवण असल्याचा संदेश कोल्हापूर आशीर्वाद महोत्सवात देण्यात आला.

पाइपलाइनचे काम बंद

0
0
काळम्मावाडी धरणातून कोल्हापूर शहराला थेट पाइपलाइनद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठीच्या योजनेच्या कामाला प्रारंभाला खो बसला आहे. धरणाच्या खालच्या बाजूला उभारण्यात येणाऱ्या जॅकवेलसाठी जमीनीचे सपाटीकरण बुधवारपासून सुरू करण्यात आले.

जय्यत तयारी आंबिल यात्रेची

0
0
सौंदत्तीच्या रेणूका यात्रेहून परतलेल्या भाविकांना आता वेध लागले होते ते यलम्मादेवीच्या आंबिल यात्रेचे. आज ओढ्यावरच्या रेणुकादेवीची आंबील यात्रा भरणार आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images