Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

शहीद उमाजींना साश्रू नयनांनी निरोप

0
0
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेला जवान उमाजी शिवाजी पवार (वय, २३) याच्या पार्शिवावर बुधवारी सायंकाळी तासगाव तालुक्यातील वडगाव येथे सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोल्हे दाम्पत्याला ‘लाखमोलाचा’ सलाम

0
0
लग्नाबाबतचा मजेशीर प्रसंग, आदिवासींसाठी काम करताना आलेल्या अडचणी, कधी अंगावर शहारे आणणारे, तर कधी काळजाला हात घालणारे. डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे सांगत गेले आणि एका समाजपरिवर्तनाची कहाणी सातारकरांपुढे उलगडत गेली.

नुकसानप्रश्नी लवाद नेमणार

0
0
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या माजी संचालकांच्या कारभारामुळे समितीचे आर्थिक नुकसान झाले आहे. आर्थिक नुकसानाची जबाबदारी निश्चित करण्यासाठी आठ दिवसात लवादाची नेमणूक करण्यात येणार आहे. समितीमध्ये दोन वर्षापूर्वी केलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी मोठी रक्कम खर्ची पडली आहे.

चार महिन्यांत जागा द्या

0
0
महापालिकेने दिलेल्या ३० हजार चौरस मीटर जागेतच आयआरबीने चार महिन्यांत खेळाचे मैदान विकसित करून द्यावे, अशी भूमिका महापालिकेने घेतली आहे. त्याबाबतचे पत्र लवकरच आयआरबीला देण्यात येणार असल्याचे आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी सांगितले.

कॉन्ट्रॅक्टर, इंजिनीअरला शिक्षा

0
0
टेंबलाईवाडी रेल्वे उड्डाणपुलाच्या अर्धवट बांधकामामुळे मोटारसायकलस्वाराच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी हलगर्जीपणा केल्याबद्दल पुण्यातील कॉन्ट्रॅक्टर प्रकाश गंगाधर पटवर्धन व इंजिनीअर सदाशिव मल्लाप्पा कुंभार (रा. कोरोची, ता. हातकणंगले) यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांनी एक महिना कारावास व १० हजार ५०० रूपयाचा दंडा ठोठावला.

क्रीडासंकुलासाठी डेडलाइन

0
0
विभागीय क्रीडासंकुलाची पहिल्या टप्प्यातील अपूर्ण कामे २६ जानेवारी २०१५ पर्यंत पूर्ण करून ते खेळाडूंसाठी तत्काळ उपलब्ध करून देण्याचे आदेश पुणे विभागीय आयुक्त विकास देशमुख यांनी दिले.

२३०० कोटींचा निधी द्या

0
0
कोल्हापूर ती‌र्थक्षेत्र विकासाचा मुद्दा बुधवारी लोकसभेत चर्चेला आला. धार्मिक स्थळे, ऐतिहासिक वास्तू, निसर्गरम्य ठिकाणांमुळे जिल्ह्याला दरवर्षाला ५० लाख भाविक व पर्यटक भेट देत असतात. पण त्यांच्यासाठी रस्त्यांपासून रेल्वे, विमान अशा पायाभूत सुविधा तातडीने देण्याची गरज आहे.

कोयना धरणाची सुरक्षा रामभरोसे

0
0
कोयना धरणावरील अपुऱ्या सुरक्षा यंत्रणेमुळे संपूर्ण प्रकल्पाचीच सुरक्षा अडचणीत आली आहे. परिसरात आलेले पर्यटक थेट धरणाच्या भिंतीवरच जाताना दिसत आहेत.

टूर निघाली...

0
0
डिसेंबर सुरू झाला आणि शाळांमध्ये सहलींच्या चर्चा रंगू लागल्या. ‌थंड हवामानात निसर्गाच्या सान्निध्यात जाताना वळणावळणाचा रस्ता, मागे पळणारी झाडे, दूरवर दिसणाऱ्या डोंगररांगा असा सुंदर निसर्ग पाहत मुले भरपूर धम्माल करतात.

रंकाळा संवर्धनासाठी हवे पुढचे पाऊल

0
0
रंकाळा तलावाला कायमपणे आयसीयूतून बाहेर काढण्यासाठी भविष्याचा वेध घेत संवर्धनाच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रस्ताव बनवण्याच्या हालचालींवर चर्चा सुरू झाली आहे.

कोल्हापूरी लोगो राष्ट्रीय पातळीवर

0
0
​देशातील नागरिकांना संगणक साक्षर करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबवलेल्या ‘नॅशनल डिजिटल लिटरसी मिशन’साठी कोल्हापुरातील निर्मिती ग्राफिक्सचे अनंत खासबारदार यांनी डिझाइन केलेल्या लोगोची निवड झाली आहे.

युतीत पाटील यांची शिष्टाई यशस्वी

0
0
भाजप आणि शिवसेना यांच्यात पुन्हा युती व्हावी यासाठी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेली शिष्टाई महत्त्वाची ठरल्याचे मानले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशी असलेले थेट संबंध, संघ परिवारातील त्यांचे वजन आणि राजकीय मुत्सद्देगिरी यांच्या जोरावर त्यांनी ही शिष्टाई केली.

प्लास्टिकमुक्त पन्हाळा उपक्रम

0
0
कमला कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबीर पन्हाळा तालुक्यातील राक्षी येथे झाले. या शिबीरामध्ये विद्यार्थीनींनी प्लॅस्टिक मुक्त पन्हाळा हा विशेष उपक्रम राबविला. शिबिराचे उदघाटन सरपंच अजित पाटील व शिक्षण समितीचे अध्यक्ष वसंत पाटील यांच्या हस्ते झाले.

निषेध, माफी अन् दिलगिरी

0
0
चूक.. निषेध... माफी... दिलगिरी ... यातच पालिकेची मॅरेथॉन सभा तब्बल साडेपाच तास रंगली. सत्ताधारी व विरोधकांमध्ये फक्त आणि फक्त वादच रंगला.

कार्यकर्त्यांना पोलिसप्रमुखांचा इशारा

0
0
‘कोल्हापूर शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये वाढलेल्या राजकीय हस्ताक्षेपाचे प्रमाण वाढल्याने यापुढे कोणत्याही पोलिस ठाण्यात राजकीय पक्ष संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही’ असा इशारा पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी दिला आहे.

शिक्षणमंत्री तावडे यांचा दिलासा

0
0
‘राज्यातील एकाही अतिरिक्त शिक्षकांची आणि शिक्षणसेवकांच्या नोकरी जाणार नाही. शिक्षकांचा पगार ऑनलाइन केला असून रिटारमेंटच्या सहा महिन्यांपूर्वी शिक्षकांच्या सर्व कागदपत्रे शिक्षण खाते जमा करून घेणार आहे. खोटी पटसंख्या दाखवून सरकारचे अनुदान लाटणाऱ्या शिक्षण संस्थाना चाप लावला जाईल.

शिक्षणमंत्र्यांनी घेतला ‘तास’

0
0
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शिवाजी विद्यापीठात पाच तास शिक्षण क्षेत्रातील घटकांचा अध्ययन आणि अध्यपनाचा पाच तासांचा कालावधीत तास घेतला. शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक समस्या आणि अडचणी जाणून घेऊन काही घटकांना कानपिचक्याही दिल्या.

खासबारदारांचा लोगो ‘क्लिक’

0
0
नागरिकांना संगणक साक्षर करण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने राबवलेल्या ‘नॅशनल डिजिटल लिटरसी मिशन’ साठी कोल्हापुरातील निर्मिती ग्राफिक्सचे अनंत खासबारदार यांनी डिझाइन केलेल्या लोगोची निवड झाली आहे.

मूर्तीसाठी रासायनिक संरक्षणच

0
0
श्री अंबाबाईच्या काळ्या पाषाणातील मूर्तीची मोठ्या प्रमाणात होत असलेली झीज थांबवण्यासाठी मूर्तीचे रासायनिक संरक्षण करणेच योग्य आहे, असे मत राज्य पुरातत्व व वस्तुसंग्रहालयाच्या उपसंचालक डॉ. माया पाटील यांनी दिल्याची माहिती हक्कदार श्रीपूजक मंडळाच्यावतीने गजानन मुनीश्वर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रंकाळा चौपाटीला गवसला आत्मा

0
0
निवांत बसण्यासाठी लुसलुशीत लॉन, डेरेदार वृक्षांची सावली आणि मन प्रसन्न करणारी फुलझाडे यांच्याशिवाय उद्यानांना शोभा नाही. तसेच बच्चे कंपनीला विरंगुळा देणारी खेळणी नसतील तर त्या उद्यानांना जिवंतपणाही येत नाही.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images