Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

बंदला आता पर्याय चर्चेचा

$
0
0
एलबीटी, टोल, वीजदरवाढ अशा विविध प्रश्नांवर अनेकदा बंद पाळून निषेध करणाऱ्या कोल्हापूरच्या उद्योजकांचे आता बंद नको यावर एकमत झाले आहे. यामुळे भविष्यात कोणत्याही मागणीसाठी बंद न पाळता निवेदन किंवा चर्चेच्या स्वरुपाचे आंदोलन असणार आहे.

‘रक्ताच्या नात्या’चे वाढले भान

$
0
0
बदलत्या लाइफ स्टाइलमुळे आजार बळावत आहेत. त्यामुळे रक्ताची गरज नेहमीच भासत असते. अनेकदा रक्ताचा तुटवडाही जाणवतो. त्यामळे ऑपरेशन असेल तर पर्यायी रक्तदात्याची व्यवस्था केल्यानंतरच रक्ताची पिशवी उपलब्ध करून दिली जाते.

‌तीर्थक्षेत्र विकासाचे पहिले पाऊल

$
0
0
धार्मिक पर्यटनाला चालना देणाऱ्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मूर्त रूप आणण्यासाठी ‘नगरोत्थान’मधील शिल्लक १ कोटी ९२ लाखाचा निधी तीर्थक्षेत्र विकासासाठी वर्ग करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

माळी झाले अध्यक्ष

$
0
0
शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे चौथे अधिवेशन फेब्रुवारी २०१५ मध्ये सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथे होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी कोल्हापुरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे (केएमसी) मराठी विभागप्रमुख, माजी प्राचार्य व ज्येष्ठ सा​हित्यिक प्रा. डॉ. जी. पी. माळी यांची एकमताने निवड करण्यात आली.

'खोल खंडोबा'ची विलोभनीय स्थापत्य कला

$
0
0
जमिनीखाली २५ फूट मंदिर, अतिशय गारवा, हिंदूंचे मंदिर असूनही मुस्लिम शैलीतील डेरेदार घुमट अशी वैशिष्ट्ये असलेल्या शनिवार पेठ खोल खंडोबा मंदिर हे स्थापत्यकालीन मंदिर अभ्यासकांना खुणावते आहे. हिंदू मंदिरांवर शिखर असते. मात्र, या मंदिरावर घुमट आहे. त्यामुळे हे मंदिर हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे.

SSCचा ३०,HSCचा २५ टक्के निकाल

$
0
0
दहावी आणि बारावीच्या ऑक्टोबर परीक्षेचा ऑनलाइन निकाल मंगळवारी दुपारी १ वाजता जाहीर झाला. कोल्हापूर विभागाचा दहावीचा निकाल ३०.२ टक्के तर बारावीचा निकाल २५.१२ टक्के लागला. राज्याचा दहावीचा निकाल २९.२५ टक्के आणि बारावीचा निकाल २६.७७ टक्के लागला असल्याची माहिती कोल्हापूर विभागीय मंडळाचे सचिव शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डिजिटल फलकांचा विळखा

$
0
0
फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद असतानाही महिनाभरात एकदा फलक काढण्याची मोहिम राबवणे व किरकोळ दंड घेऊन फलकाचे साहित्य देण्याच्या प्रकारामुळे शहराला डिजिटल फलकांचा विळखा कायम पडत आहे.

वीस टक्के कर्मचारी लेटलतिफ

$
0
0
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी वेळेत कार्यालयात येत आहेत. तरीसुद्धा हे प्रमाण अजून ८० टक्क्यांपर्यंत आहे.

शिस्तीची यंत्रणाच बंद

$
0
0
महापालिकेतील कर्मचाऱ्यांना वेळेची शिस्त लावणारी बायोमेट्रिक यंत्रणाच गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. आपल्याच विभागात हजेरी पत्रक असल्याने सकाळी अकरा वाजेपर्यंत रमतगमत येऊन सही करण्याची सवय कर्मचाऱ्यांना लागली आहे.

श्रीमंतीसाठी परराज्यात दरोडा

$
0
0
झटपट श्रीमंतीच्या भुलभुलैय्याने गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या पाचजणांच्या टोळीने केरळसारख्या राज्यात दरोडा टाकल्याचे वास्तव उघडकीस आले. अटक करण्यात आलेल्या पाचही जणांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

पंचगंगेची 'नीरी'कडून पाहणी

$
0
0
हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे पंचगंगा प्रदूषणाबाबत सर्वंकष अहवाल देण्यासाठी राष्ट्रीय पर्यावरण व अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (नीरी) मंगळवारी पुन्हा सुरुवात केली. कोल्हापूर व इचलकरंजीमधील सांडपाण्याचे नमूने घेतले आहेत.

नांदगाव-मेंगळुरू रो-रो सेवा

$
0
0
कोकण रेल्वे कॉर्पोरेशच्यावतीने कोलाड (रायगड) ते मेंगलोर रो-रो (माल भरलेले ट्रक) सेवा सुरू आहे. याच मार्गावरील नांदगाव (सिंधुदुर्ग) येथे एक महिन्यात प्लॅटफार्म उभारण्यात येणार आहे.

महिनाभरात याटिंग अकादमी सुरू

$
0
0
शहरात वॉटर स्पोर्टससाठी अनेक संधी आहेत. त्याचा पुरेपूर वापर करून शालेयस्तर ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंतच्या स्पर्धांमध्ये येथील स्पर्धकांनाही सहभागी होता यावे यासाठी याटिंग अकादमी सुरू होत आहे. सात वर्षांवरील सर्वांना या थरारक खेळाचा आनंद घेता येणार आहे.

दहाच्या आत कार्यालयात

$
0
0
जिल्हा परिषदेत कर्मचारी धावत, पळत, धापा टाकत दहाच्या आत येताना दिसत होते. शाळेतील शिस्तप्रिय विद्यार्थ्यासारखे चित्र जिल्हा परिषदेत दिसून आले. कधीही आले तरी चालते अशी मनोवृत्ती वाढत चालली असल्याची चर्चा असताना सध्याचे चित्र मात्र लेटलतीफ सुधारले अशा पद्धतीची होती.

शिक्षकानेच मुलीला पळवले

$
0
0
कांबळवाडी (ता.राधानगरी) येथील माध्यमिक विद्यालयात आठवीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी मंगळवार दुपारपासून बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. याबाबत त्याच शाळेतील विवाहित शिक्षक दीपक भानुदास वाघमारे (रा.मजरंथ ता.माजलगाव,जि.बीड.सध्या कांबळवाडी) यानेच फूस लावून तिला पळवून नेल्याची फिर्याद मुलीच्या वडिलांनी बुधवारी दिल्याने प्रकरणाला गंभीर वळण प्राप्त झाले.

अंतिम सत्याची व्यथा-‘चिताई’

$
0
0
सजीव माणसाला त्याच्या असणाऱ्या विविध चिंता आयुष्यभर जाळतात तर तोच माणूस मृत्यूच्या स्वाधीन होतो तेव्हा त्याला चिता दहन करते. मृत्यूने होणारा नाश हा समग्र व अंतिम आहे.

हत्तींकडून सुळयेत उच्छाद

$
0
0
पाच हत्तींच्या कळपाकडून सुळये (ता. चंदगड) येथे तर आजऱ्यातून चंदगड तालुक्यात प्रवेश केलेल्या टस्कराने बोजुर्डी परिसरात उच्छाद मांडल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हत्तींकडून भात, नाचना, भुईमूग यासह अन्य पिकांना लक्ष केले जात आहे.

बांधकामाविरोधातील प्रस्ताव

$
0
0
नगरसेवकपदाचा गैरवापर करुन अनधिकृत बांधकाम केल्याबद्दल सरस्वती पोवार आणि त्यांचे पती दिलीप पोवार यांच्यावर न्यायालयीन प्रक्रियेबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने सर्वसाधारण सभेसमोर ठेवला आहे.

मैदानाची जागा तातडीने परत करा

$
0
0
रस्ते प्रकल्पाचा करार, ९५ टक्के काम झाल्याचे प्रोव्हिजनल सर्टिफिकेट हायकोर्टाने कायदेशीर ठरवले आहे. शिवाय त्या करारानुसार टोल वसुली सुरू झाल्यानंतर कराराला आव्हान देता येणार नसल्याचे स्पष्ट करत टोल वसुलीबाबत आयआरबीला पोलिस संरक्षण देण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.

कायदा हातात घेणे बेजबाबदारपणाचे

$
0
0
कोल्हापूरमधील वादग्रस्त टोलवसुलीचा मुद्दा नागरिकांनी मुंबई हायकोर्टात मांडून कायदेशीर निवाड्याची अपेक्षा ठेवलेली असताना कोल्हापूरकरांनी कायदा हातात घेऊन हिंसाचार करणे उचित नव्हते.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images