Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

चौपदरीकरणाचे काम ३१ मार्चपूर्वी संपवा

$
0
0
कोल्हापूर सांगली रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम कोणत्याही परिस्थितीत ३१ मार्चपूर्वी संपवण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. ज्या रस्त्यासाठी कोर्टाचे आदेश आहेत, ते सोडून काम पूर्ण करा. ‘जर जमत नसेल तर काम सोडा,’ अशी कंत्राटदाराची कानउघडणीही त्यांनी केली.

बोळावीच्या जवानाची उत्तरांचलमध्ये आत्महत्या

$
0
0
बोळावी (ता. कागल) येथील सशस्त्र सेना दलाच्या जवानाने उत्तरांचलमधील चंपा येथे सेवेत असताना स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. शनिवारी सकाळी ही घटना घडली. संतोष चंद्रकांत पोवार (वय २५) असे या जवानाचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

राज्यातील ५० नाके बंद करण्यासाठी त्रिस्तरीय समिती

$
0
0
‘महाराष्ट्र टोलमुक्त झाला पाहिजे, ही सरकारची भूमिका असून ज्यादिवशी टोलमधून रस्त्यांवर खर्च केलेली रक्कम वसूल होईल, त्या दिवसापासून टोल बंद होईल,’ असे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

रोजगारनिर्मितीत कोल्हापूर अग्रेसर

$
0
0
केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या सहाव्या आर्थिक गणनेचे तात्पुरते निष्कर्ष सप्टेंबर महिन्यात ‌जाहीर करण्यात आले असून यातून कोल्हापुरच्या आर्थिक प्रगतीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेला आहे.

टोलमुक्ती जानेवारीमध्ये

$
0
0
‘टोलमुक्तीसाठी विविध पर्यायांचा अभ्यास सुरु आहे. विधीमंडळाच्या डिसेंबरमधील हिवाळी अधिवेशनानंतर जानेवारी महिन्यात सरकारच्या पातळीवर बैठका घेऊन कोल्हापूरच्या टोलचा विषय संपवला जाईल,’ असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी टोलविरोधी कृती समितीला दिले.

जेटकडून विमानसेवेस मान्यता

$
0
0
‘कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी २५० कोटी रुपयांच्या निधीची घोषणा झाली आहे,’ याशिवाय जेट एअरवेजने कोल्हापुरातून विमानसेवा सुरू करण्यासाठी तत्वत: मान्यता दिली आहे अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी दिली.

कोयना परिसरात सौम्य भूकंप

$
0
0
येथील कोयना धरण परिसराला शनिवारी सायंकाळी पाच वाजून चार मिनि टांनी ३.३ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. हा धक्का कोयनेसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत जाणवला.

२३ ते २८ नोव्हेंबरदरम्यान विस्तार

$
0
0
‘सात अपक्ष आमदार सोबत असून शेकापनेही पाठिंबा देण्याचे मान्य केल्यानेच भाजप सरकारला कसलाही धोका नाही. सेनेला मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार आहे. २३ ते २८ नोव्हेंबर दरम्यान हा विस्तार होईल, असे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

निष्कलंक नेत्याचे स्मरण आजही प्रेरणादायी

$
0
0
निष्कलंक, चारित्र्यसंपन्न, निस्पृह लोकप्रतिनिधी कसा असावा याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणून कोल्हापूरचे चारवेळेचे आमदार शेतकरी कामगार पक्षाचे नेते त्र्यं. सी. उर्फ त्र्यंबक सीताराम कारखानीस यांचे नाव आजही आदाराने घेतले जाते.

कल्पक उपक्रमांची राज्यात दखल

$
0
0
कोल्हापूर जिल्हा परिषद आणि कल्पक उपक्रम हे समीकरण आता घट्ट झाले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजना व उपक्रम प्रभावीपणे राबवत असताना स्थानिक प्रशासनाकडून सतत कल्पक उपक्रम राबवून ग्रामविकासाची गती वाढवली जात आहे.

झोपडीमुक्तीसाठी कोल्हापूरची निवड

$
0
0
राजीव आवास योजनेऐवजी (रे) केंद्र सरकार राबवणार असलेल्या नवीन योजनेमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेचा समावेश केला आहे.

गुळाचा दाणेदारपणा टिकणार

$
0
0
काही दिवस गेल्यानंतर गुळाला पाणी सुटण्याचा प्रकार कालबाह्य करण्याच्या प्रयत्नाला यश आले आहे. शिवाजी विद्यापीठाने मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीच्या (आयसीटी) सहकार्याने भरपूर दिवस टिकणारा दाणेदार (ग्रॅन्युएल्स) गूळ केला आहे.

मिरजेत गॅस्ट्रोचा चौथा बळी

$
0
0
मिरजेत पसरलेल्या गॅस्ट्रोच्या साथीमुळे रविवारी ब्राम्हणपुरीतील जिलेबी चौकात राहणाऱ्या सुहासनी भालचंद्र जोग (वय ७०) या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. जोग यांच्या मृत्यूने गॅस्ट्रोच्या बळींची संख्या चार झाली आहे.

अजित पवारांसमोरच ‘दादा’गिरी

$
0
0
संध्याकाळी साडेसातची वेळ. नेहमीप्रमाणेच शिये टोलनाक्यावर वाहनांची वर्दळ सुरू असते. यादरम्यान एमएच ४२ पासिंगची कार येते. गाडीच्या पुढे बॅरेकेडस लावली जातात. ‘गाडी सोडा, गाडीत अजितदादा आहेत...’ कारचालक सांगतो. परंतु, नाक्यावरील कर्मचारी ऐकून घेत नाहीत.

हुतात्मा एक्स्प्रेसच्या डब्याला आग

$
0
0
पुणे-सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेसच्या प्रवासी डब्याला अचानक आग लागल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. मात्र, आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असून गाडीतील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

सांगलीत गॅस्ट्रो, कॉलरा

$
0
0
मिरजेत धुमाकूळ घालून चार जणांचा बळी घेतलेल्या गॅस्ट्रोची साथ आता सांगलीच्या उंबरठ्यावर उभी आहे. सांगलीतील संशयितांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. सांगलीत १६ हून अधिक लोकांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे.

रेशनच्या धान्यात आढळले सिमेंटचे तुकडे अन् बुरशी

$
0
0
राजगोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथील भरमलिंग सेवा संस्थेच्या रेशन धान्य दुकानातील तांदळाच्या पोत्यातून सिमेंटचे तुकडे व बुरशी आलेले गहू आढळून आल्याने खळबळ उडाली.

एचआयव्ही/एड्सग्रस्त मुलांना दत्तक घेणार

$
0
0
शंभरहून अधिक एचआयव्ही-एड्सग्रस्त मुलांना मायेचा आधार देत त्यांना दत्तक घेण्याचा निर्णय महालक्ष्मी अन्नछत्र या संस्थेने घेतला आहे. या मुलांना पोषक आहार देवून त्यांचे जीवन सुखकर करण्याबरोबरच त्यांचे आयुष्य वाढवण्याचा विडा या संस्थेने उचलला आहे.

गॅस्ट्रोचा विळखा घट्ट

$
0
0
मिरज शहरातील गॅस्ट्रोचे थैमान रोखण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. साथीचा विळखा अधिक घट्ट होत आहे. रविवाररात्रीपासून सोमवारी दुपारपर्यंत आणखी सुमारे १०० पेशंट विविध हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत.

थेट गूळ विक्री योजना बारगळली

$
0
0
मध्यस्थांचे उच्चाटन करून शेतकरी आणि ग्राहकांना वाजवी दरात गुळाची खरेदी-विक्री करण्यासाठी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये थेट गूळ विक्री केंद्राची स्थापना केली होती. मात्र, जुलैपासून समितीमध्ये सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे थेट गूळ विक्री योजना बारगळली आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images