Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

ऊस दराचा निर्णय लांबणीवर

$
0
0
भाजप सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाला योग्य दर देण्यासाठी ऊस दर नियामक मंडळाची घोषणा केली. या मंडळाच्या बैठकीत ऊस दर जाहीर करण्याची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात ही बैठक ऊस दराबद्दल कोणताही निर्णय न करता पार पडली.

गूळ उत्पादक अडचणीत

$
0
0
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाच्या मुहूर्ताच्या सौद्यांना भरमसाट दर मिळत असतो. गूळ उत्पादकाला मिळालेल्या दराला जाणीवपूर्वक प्रसिद्धी मिळवून दिली जाते. मात्र, त्यानंतर उत्पादकांची ससेहोलपट सुरू होते. त्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे.

...तरी जगतो मराठीच

$
0
0
मराठी फारसे बोलता येत नसले तरी ‘मी मराठी जगतो,’ अशा शब्दांत अजयने पत्नी काजोलमुळे मराठीशी नाळ जोडल्याची भावनाही व्यक्त केली.

'एलिझाबेथ एकादशी'वर बहिष्कार

$
0
0
श्री विठ्ठल, एकादशीचे व्रत, पंढरीची वारी आणि वारकरी अभंग यांचा घोर अवमान झाल्याचा आरोप करत 'एलिझाबेथ एकादशी' या मराठी चित्रपटावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आळंदी येथील दहाव्या वारकरी महाअधिवेशनात सर्व वारकरी संघटनांनी एकत्रीतपणे जाहीर केला आहे.

मनसे शहराध्यक्षाची हत्या

$
0
0
मनसेचे अकलूज शहराध्यक्ष राहुल भोसले (वय २९) यांची अज्ञात व्यक्तींनी तलवार आणि कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण त्या केली. ही घटना गुरुवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास विजय चौकात घडली. गंभीर वार झाल्याने भोसले यांचा जागीच मृत्यू झाला. हल्ला करून हल्लेखोर फरार झाले आहेत.

'दौलत' कारखान संकटात?

$
0
0
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत कारखान्याचा गेले तीन हंगाम बंद असून यावर्षीच्या चौथ्या हंगामातही कारखाना सुरू होण्याची चिन्हे दिसत नाहीत.

पर्यटन महामंडळ 'रिकामे'

$
0
0
राज्यातील महत्वाचे पर्यटन केंद्र म्हणून विकसित होत असलेल्या कोल्हापुरला प्रत्येक वर्षी सुमारे एक कोटी पर्यटक भेट देतात. मात्र, येणाऱ्या पर्यटकांना पर्यटनस्थळे आणि अन्य पूरक बाबींबाबत माहिती मिळत नसल्याची स्थिती आहे.

करवीरवासिनीच्या गाभा-यात LED

$
0
0
अंबाबाईच्या गाभाऱ्यातील सध्याच्या फ्लूरोसंट लाइटच्या प्रखरतेमुळे वाढणारी उष्णतेमुळे मूर्तीची झीज होत असल्याचा मुद्दा इर्डियॉस या मूर्ती व मंदिर संरक्षणाबाबत काम करणाऱ्या कंपनीने मूर्ती वज्रलेप प्रकरणी केलेल्या निरीक्षण अहवालात नमूद केला होता. या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासून पाच दिवस मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात एलईडी लाइट लावण्यात येणार

टोल कर्मचा-यांना मारहाण

$
0
0
कळंबा टोल नाक्यावर दादागिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गुरुवारी टोलविरोधी कृती समितीच्या महिला कार्यकर्त्यांनी चप्पलने मारहाण करत टोल वसुली बंद पाडली. ट्रकचालकाला मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्यासह सुपरवायझरवर दरोड्याचा गुन्हा दाखल करुन अटकेची मागणी करत समितीच्या कार्यकर्त्यांनी ​नाक्याजवळ ठिय्या मारला.

टोल पुन्हा पेटला

$
0
0
टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी चालकासह कारमध्ये लहान बाळासोबत असलेल्या महिलांनाही शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्यावरुन संतप्त जमावाने गुरुवारी रात्री प्रचंड मोडतोड करत उचगावचे टोल बुथ पेटवून दिले.

एसटीपी अखेर पूर्ण

$
0
0
वर्षभरापासून शेवटच्या टप्प्यात असलेला महापालिकेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) अखेर पूर्ण क्षमतेने सुरू झाला. तीन दिवसांपासून शेवटच्या दोन बेसिनमध्ये प्रक्रिया करण्यासाठी सांडपाणी घेण्यात आले.

सरकारचा शेतक-यांना दिलासा

$
0
0
ऊसदर नियंत्रण समितीची स्थापना, मोलॅसिसवरील उठवलेली राज्यबंदी, एफआरपीपेक्षा कमी दर देणाऱ्या कारखान्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

रिकाम्या रंगडब्याचे सुंदर डस्टबिन

$
0
0
सध्या देशभर स्वच्छ सुंदर भारत अभियान सुरू आहे. प्रत्येकजण या मोहिमेत आपापल्यापरीने योगदान देत आहे. यामध्ये कोल्हापुरात स.म.लोहिया हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी शाळा रंगवण्यासाठी आलेल्या रंगांच्या रिकाम्या डब्यांना सुंदर डस्टबीन बनवून शाळेतील कचरा एकत्र करण्याचा उपक्रम राबवला आहे.

टोल कर्मचाऱ्यांनी केला विनयभंग

$
0
0
उचगाव टोल नाका गुरुवारी रात्री पेटवून दिल्यानंतर शुक्रवारी दुसऱ्या दिवशी तेथील टोल वसुली बंद राहिली. कर्मचाऱ्यांची अरेरावी अशीच राहिली तर कोल्हापूरकर शांत राहणार नाहीत असा इशारा देत शिवसेनेने टोल नाक्यावर कोल्हापुरी चप्पल दाखवत जोरदार निदर्शने केली. दरम्यान, गुरुवारच्या प्रकाराबाबत सात कर्मचाऱ्यांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपकडून फसवणूक

$
0
0
‘राज्यातील भारतीय जनता सरकारने एलबीटी आणि टोलच्या प्रश्नावर केलेले घुमजाव म्हणजे जनतेची फसवणूक असून हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र एलबीटी आणि टोलमुक्त न झाल्यास पुन्हा राज्यभर आंदोलन केले जाईल’ असा इशारा शिवसेनेचे आमदार राजेश ‌क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिला.

टोलमुक्ती होणारच

$
0
0
‘टोल आणि एलबीटीपासून राज्याला मुक्ती देण्यासाठी सरकार बांधील आहे. भाजपचे सरकार आता कुठ‌े स्थिरस्थावर होऊ लागले आहे. पाच वर्षांपासून रेंगाळलेल्या या प्रश्नावर सोल्यूशन काढणे सुरू आहे. यावर लवकरच निर्णय घेतला जाईल. कोल्हापूर टोलमुक्त करणारच आहे’ असे शुक्रवारी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सेना-भाजप युती होणार?

$
0
0
भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने चार दिवसांपूर्वी अचानक केलेल्या वक्त्यव्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. यातूनच पाच आमदारांना भाजपच्या तंबूत आणण्याच्या प्रयत्नाबरोबरच शिवसेनेशी ​जमवून घेण्यासाठी नव्याने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

लेटलतिफांचा 'संघटित गोंधळ'

$
0
0
उशिरा कामावर येणाऱ्या ११५ कर्मचा ऱ्यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी पकडले. त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई केली. परंतु, उलट याच लेटलतिफांनी संघटनेचा आधार घेत पदाधिकाऱ्यांनी आमच्या कामकाजात हस्तक्षेप करु नये अशी शिरजोरी करत अर्धा तास कार्यालबाहेर निदर्शने केली.

अंबाबाईचा पर्यावरण संदेश

$
0
0
‘झाडे जगवा, पर्यावरण रक्षण करा,’ असा संदेश देणारी करवीर निवासिनी श्री अंबाबाई शुक्रवारी सालंकृत पूजेच्या रूपातून सीताफळाच्या बागेत विराजमान झाली.

सेना-भाजपची पुन्हा युती?

$
0
0
भाजप आणि शिवसेना यांच्यात गेले काही महिने सुरू असलेली तू-तू-मै-मै संपल्याचे वृत्त असून, लवकरच भाजप सेनेला सत्तेत सहभागी करुन घेणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. २३ ते २७ नोव्हेंबरच्या दरम्यान होणा-या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारात सेना सत्तेत प्रवेश करेल. असे संकेत मिळत आहेत.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images