Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘मानवी कुतूहलातून लेखनाची प्रेरणा

0
0
‘मानवी स्वभावात असलेल्या कुतूहलाच्या मागे धाव घ्या. तुम्हाला त्यातून बरेच काही शिकायला मिळेल तसेच आनंदही मिळेल. त्या शिकण्यात मजा येईल. हेच कुतूहल माझ्या विविध क्षेत्रातील विषयांवर लिहिल्या गेलेल्या पुस्तकांचे प्रेरणास्त्रोत आहे,’ अशा शब्दांतून प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांनी त्यांच्या साहित्यनिर्मितीचे रहस्य उलगडले.

मुरगूडमध्ये गॅस्ट्रोसदृश साथ

0
0
मुरगूड परिसरातील दहा गावांमध्ये गॅस्ट्रो सदृश्य साथीचा फैलाव झाला असून या गावांतील शेकडो रुग्ण मुरगूड ग्रामीण रुग्णालय आणि खासगी दवाखान्यात उपचार घेत आहे. ताप, संडास, उलट्या, जुलाब अशी या साथीची लक्षणे आहेत. पाणी व हवेच्या प्रदूषणाने या साथीचा फैलाव होत असल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

खोळंबा आकार ७५ रुपये करा!

0
0
सौंदत्ती यात्रेसाठी प्रासंगिक कराराच्या एसटीचा दर प्रतिकिलोमीटर ३९ रुपये आणि खोळंबा आकार ७५ रुपये करावा, अशी मागणी जिल्हा रेणुका भक्त मंडळाच्या रविवारी झालेल्या बैठकीत करण्यात आली. दोन्ही मागण्या मान्य न झाल्यास सौंदत्ती पॅकेज जाहीर करावे, अशी एकमुखी मागणी करण्यात आली.

बाजारसमितीचे सत्ताकारण जोरात

0
0
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचा प्रशासक पदाचा पदभार सहायक उपनिबंधक रंजन लाखे यांनी पोलिस बंदोबस्तात स्वीकारला. करवीरचे तहसीलदार योगेश खरमाटे यांनी रितसर पंचनामा करुन प्रशासकांकडे पदभार सोपवला.

जातपडताळणी वेगाने होणार

0
0
जातपडताळणीचे काम अधिक सोपे आणि गतिमान करण्यासाठी राज्य सरकारने अतिरीक्त जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे अधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जातीचे दाखले गतीने मिळतील अशी अपेक्षा सर्वसामान्यांतून व्यक्त केली जात आहे.

कळंबा तलावात पोहण्यास बंदी

0
0
गेल्यावर्षी कळंबा ग्रामपंचायतीने हौशी पोहणाऱ्यांवर बंदी घातली होती. मात्र, काही दिवसांनंतर बंदी आदेश झुगारून काहींचे पोहणे सुरूच आहे. आता याविरोधात पुन्हा ग्रामपंचायतीने आक्रमक धोरण स्वीकारले आहे. काही पदाधिकाऱ्यांना कडक शब्दांत समज देऊन पोहण्यास मज्जाव केला.

वनजमिनी गावांच्या नावावर

0
0
वनांचे संरक्षण व्हावे, वनांमध्ये पुन्हा नव्याने झाडांची लागवड करावी आणि त्यातील विविध उत्पादनांचा त्याच गावातील लोकांना फायदा व्हावा यासाठी वनविभागाच्या नावावर असलेली जमीन आता गावांच्या नावावर केली जाणार आहे.

टोलनाके जप्त करणार

0
0
महापौरांनी पुढाकार घेऊन आयुक्तांच्या सहकार्याने फुलेवाडी, कळंबा, सरनोबतवाडी, उचगांव आणि वाशी असे सहा नाके जप्त करून ताब्यात घ्यावेत, अशी मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा सर्वपक्षीय टोल विरोधी कृती समितीने महापौर तृप्ती माळवी यांच्याकडे केली. याप्रश्नी आज (मंगळवारी) कृती समिती आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांचीही भेट घेणार आहे.

लोकल-ग्लोबल विद्यापीठ

0
0
शिवाजी विद्यापीठात संशोधनाच्या बाबतीत अग्रेसर ठरले आहे. विद्यार्थीभिमुख उपक्रम राबवून अनेक विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यात विद्यापीठ यशस्वी ठरत आहे. पारंपरिक शिक्षणाला आधुनिक तंत्र, वैज्ञानिक आणि कौशल्य शिक्षणाची जोड दिल्याने गेल्या वर्षांत शिवाजी विद्यापीठाचा प्रवास ‘लोकल टू ग्लोबल,’ असा ठरला आहे.

मुरगूडमध्ये आजाराची साथ

0
0
मुरगूड परिसरातील दहा गावांसह तालुक्यातील अन्य गावांमध्येही गॅस्ट्रोच्या साथीचा फैलाव वाढतच असून याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी मुरगूड ग्रामीण रुग्णालयास भेट देवून आरोग्य अधिकारी अजितकुमार गवळी यांना धारेवर धरून तालुक्यातील ही साथ तातडीने आटोक्यात आणण्याची मागणी केली.

बारा कोटी भरुन ९० कोटी घेतले

0
0
रेणुका शुगर्सने सर्वाधिक १४६ कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. अबकारी करापोटी केवळ १२ कोटी ३० लाख एवढीच रक्कम भरून ९० कोटी ४१ लाख या कारखान्यासाठी वापरल्याचे कारखान्याने प्रतिज्ञापत्रात सांगितल्याचे साखर संचालकांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे.

सवलती नाहीच!

0
0
‘सरकारची आर्थिक स्थिती फार चांगली नाही, त्यामुळे वस्त्रोद्योगात काम करणाऱ्या संस्थांनी वीजबिल, कर्जमाफी किंवा सबसिडी मागण्यापेक्षा लोकसहभागातून काही योजना राबविण्यासाठी सूचना कराव्यात,’ असा सल्ला एक सदस्यीय वस्त्रोद्योग समितीचे अध्यक्ष आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिला.

'दौलत'चे काय होणार?

0
0
गेले तीन हंगाम हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत कारखाना बंद अवस्थेत असल्यामुळे ऊस उत्पादक सभासदांसह, कामगार व कारखान्यावर रोजीरोटी अवलंबून असलेल्या सर्वांनाच याचा मोठा फटका बसला आहे.

पशुपालनाची परवड

0
0
उत्पादन खर्चाच्या आधारे दुधाला न मिळणारा दर, अपुरी पशुवैद्यकीय सेवा, पशुखाद्याचे दररोज वाढणारे दर, वैरणीचा प्रश्न या साऱ्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील पशुपालन व्यवसाय परवडेनासा झाला आहे. उत्पादन खर्च व उत्पादन याचा ताळमेळ बसत नसल्याने दुग्ध व्यवसायापुढे आव्हान निर्माण झाले आहे.

भाजपच्या गळाला पाच आमदार?

0
0
स्वबळावर काही काळ तरी राज्य करता यावे, यासाठी भाजपने गेल्या काही दिवसांत युध्दपातळीवर केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे. तीन पक्षांतील पाच आमदार भाजपच्या गळाला लागल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

सिंघम होण्यासाठी अभ्यास हवा!

0
0
‘विद्यार्थी हेच देशाचे भविष्य आहेत. जीवनात ‘सिंघम’ बनायचे असेल तर अभ्यास गरजेचा आहे. ध्येय निश्चित करा अन् ते साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करा. त्याचबरोबर अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव द्या,’ असे आवाहन अभिनेते अजय देवगण यांनी केले. चांगली ​स्क्रिप्ट असेल तर मराठी चित्रपटात निश्चित येईन, असेही त्यांनी सांगितले.

'वारणा'चे १५ लाख टनाचे उद्दीष्ट

0
0
‘वारणा परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांनी आपला ऊस वारणा सहकारी साखर कारखान्याला गळीतास पाठवून कारखान्याचे १५ लाख टनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे,’ असे आवाहन माजी मंत्री विनय कोरे यांनी केले.

...म्हणून पर्यावरणाचा ऱ्हास

0
0
‘मराठा कालखंडात स्थानिक राजघराण्यांमध्ये सातत्याने होणाऱ्या लढायाच पर्यावरणाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरल्या. त्यात प्रामुख्याने राजपुतान्यातील लढाया आहेत,’ असे मत अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठाच्या दक्षिण आशियाई अभ्यास केंद्राचे वरिष्ठ संशोधक प्रा. स्टुअर्ट गॉर्डन यांनी व्यक्त केले.

शाहूपुरी पोलिस स्टेशनचे पुनर्निमाण?

0
0
स्टेशन रोडवरील शाहूपुरी पोलिस ठाण्याची इमारत हेरिटेज आहे. त्यामुळे ती हटविण्यात येऊ नये. या शाहूकालीन रेस्ट हाउसला अनेक ऐतिहासिक संदर्भ आहेत. त्यामुळे ती हटविण्याऐवजी तिचे पुनर्निर्माण (रिस्टोरेशन) करावे, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. या इमारतीत राजर्षि शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांच्या भेटी झाल्या आहेत.

प्रमुख सहकारी संस्थांवर अशासकीय प्रशासक मंडळ?

0
0
राज्यातील अ व ब प्रकारच्या संस्थांच्या निवडणुका सहा महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेताना भाजप सरकारने काही नेते आणि कार्यकर्त्यांची तात्पुरती सोय करण्याचा डाव आखला आहे. याचाच एक भाग म्हणून मुदत संपलेल्या महत्त्वाच्या आर्थिक संस्थांवर अशासकीय प्रशासक मंडळ नेमण्याच्या हालचाली जोरात सुरू झाल्या आहेत.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images