Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

संघटना एकसंध ठेवण्याचे शेट्टींसमोर आव्हान

0
0
विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीवरून सुरू झालेल्या संघर्षातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडली आहे. बंडखोर नेत्यांनी एकत्र येऊन बळिराजा शेतकरी संघटनेची स्थापना केली आहे. या संघटनेत सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील अनेक नेते गेले असले तरी कोल्हापूर जिल्ह्यात मात्र स्वाभिमानीला फार मोठा धक्का बसला नाही, पण सतत भूमिका बदलत राहणाऱ्या खासदार राजू शेट्टी यांना मात्र आता संघटनेत विरोध सुरू झाल्याचे उघड संकेत मिळू लागले आहेत. आमदार उल्हास पाटील यांनी स्वाभिमानीला पहिला दणका दिल्याने शेट्टी यांच्यासमोर संघटना एकसंध ठेवण्याचे आव्हान आहे.

एसटी कामगारांचे काळ्या फिती लावून आंदोलन

0
0
एसटी कर्मचाऱ्यांच्या जिल्हा पातळीवरील असलेल्या मागण्यांबाबत सातत्याने पाठपुरावा करुनही स्थानिक प्रशासनाने काहीही दखल घेतली नसल्याबद्दल महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्यावतीने जिल्हाभर काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले. टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यात येऊन अखेरीला काम बंद आंदोलनही केले जाणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीमधील ‘सीईटीपी’ची देखभाल उद्योजकांकडे

0
0
कागल पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीमध्ये महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने उभारलेले इफ्लएंट ट्रिटमेंट प्लान्टची (सीईटीपी) देखभाल, दुरुस्ती आणि चालू ठेवण्याची जबाबदारी फाईव्ह स्टार सीईटीपी युजर्स इंडस्ट्रिज असोसिएशनकडे सोपवण्यात आली आहे.

विविध उपक्रमांनी बालदिन उत्साहात साजरा

0
0
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या बालदिनाचे औचित्य साधून शहरातील शाळा, सामाजिक संघटनांतर्फे लहान मुलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या आदेशानुसार शाळांमध्ये बाल स्वच्छता मोहिम उपक्रम सप्ताहाला सुरूवात झाली. बालदिनाचे महत्व आणि नेहरू यांच्याविषयी माहिती देऊन शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

महापालिकेची इमारत असेल पर्यावरणपूरक

0
0
महापालिकेच्या प्रस्तावित सात वेगवेगळ्या भागांचा व पर्यावरणपूरक प्रशासकीय इमारतीचा आराखडा शनिवारी पदाधिकारी व अधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात आला. संभाजीनगरजवळील निर्माण चौकातील (मैलखड्डा) जागेवर १७ हजार चौरस मीटर इतके बांधकाम असलेल्या इमारतीत दीडशे नगरसेवकांच्या सोयीचे सभागृह, स्थायी सभागृह याबरोबरच दोन बँक, अग्निशामक स्थानक, केएमटी स्थानक, भोजन कक्ष, पोलिस चौकी यांचा समावेश आहे.

मराठा आरक्षणप्रश्नी हिवाळी अधिवेशनात भक्कम कायदा करा

0
0
मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या नारायण राणे समितीमध्ये असलेल्या त्रुटी दूर करून हिवाळी अधिवेशनात भक्कम कायदा करण्यात यावा, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केली. त्यासाठी रस्त्याबरोबरच बौद्धीक आणि कायदेशीर लढाईची तयारी मराठा समाजाचे ठेवली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

१९ स्वच्छतागृहे उभारणार

0
0
येत्या आठवडाभरात महिलांसाठी १९ जागा निश्चित करून फायबरची स्वच्छतागृहे तातडीने उभारण्यात येणार असल्याची ग्वाही महापालिकेच्या स्थायी ​समिती सभेत प्रशासनाने दिली. नगरसेविका यशोदा मोहिते यांनी महिला स्वच्छतागृहांच्या अपुऱ्या संख्येमुळे स्थानिक महिलांसह व पर्यटकांची गैरसोय होत असल्याचा मुद्दा सभेत उपस्थित केला.

अवकाळीने सुगीला गाठले

0
0
गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले असून, ऐन सुगीत सुरू झालेल्या पावसाने शेतात पाणी साचल्याने भात, नाचणा, जोंधळा या पिकांचे नुकसान झाले आहे. पीक शेतातच कापून ठेवल्याने ते भिजून कुजण्याची भीती आहे.

मुलींच्या पालकत्वाकडे ओढा

0
0
जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघटनेने (बालकल्याण संकुल) तसेच शिशू आधारगृहाकडून मागील वीस वर्षात तीनशेहून अधिक मुलांना दत्तक देण्यात आलेले आहे. निराधार व अनाथ बालकांना दत्तक देताना जिल्हा न्यायालयाची परवानगी आवश्यक असते. याबाबतची प्रक्रिया सबंधित संस्थेच्या सदस्य मंडळाला करावी लागते.

१५ दिवसांत काम सुरू करा

0
0
कोल्हापूर सांगली रस्त्याच्या चौपदरीकरण प्रकल्पाची मुदत संपली तरी अजूनही बहुतांश काम अपूर्ण आहे. त्यामुळे नागरिक धोकादायक स्थितीत प्रवास करत असल्याने रखडलेल्या रस्त्याचे व पुलाचे काम पंधरा दिवसात सुरु करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.

आठ प्रवाशांवर काळाचा घाला

0
0
पुणे-सातारा महामार्गावरील पारगाव खंडाळा येथे भरधाव वेगात असलेला कंटेनर उलटून रविवारी दुपारी झालेल्या विचित्र अपघातात आठ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. मरण पावलेले प्रवासी बसची वाट पाहत उभे होते. चालकाचे नियंत्रण सुटलेला कंटेनर येत असल्याचे पाहून काही प्रवासी लांब पळाल्यामुळे त्यांचा जीव वाचला.

महापालिकेत समित्यांवरील सदस्यत्वासाठीही फिल्डिंग

0
0
नव्या वर्षाच्या प्रारंभीच महापालिकेतील प्रमुख पाच पदाधिकाऱ्यांच्या निवडी होणार आहेत. यात महापौर, उपमहापौर, स्थायी, परिवहन आणि महिला बाल-कल्याण समिती सभापतीपदाचा समावेश आहे. त्याचबरोबर स्थायी, परिवहन आणि महिला बाल-कल्याण समितीच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी सदस्य नियुक्तीची प्रक्रिया डिसेंबर महिन्यात पूर्ण करावी लागणार आहे.

आयआरबीचे २५ कोटी महापालिकेला मिळावेत

0
0
रंकाळा ते जुना वाशी नाका रस्ता आयआरबी करणार नसेल, तर त्या रस्त्यावरील टोल बंद करण्यात यावा, अशी जोरदार मागणी नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली. त्यामुळे प्रशासनानेही आयआरबी जर रस्ते करणार नसेल तर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा केलेली २५ कोटी रुपयांची बँक गॅरंटी जप्त करुन त्यातून रस्ता केला जाईल अशी कडक भूमिका घेतली.

परमारांसह पाचजणांचे सदस्यत्व निलंबित

0
0
सलग दोन वर्षे सर्वसाधारण सभा न बोलावता संस्थेच्या खर्च मंजूर केल्याप्रकरणी कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे मावळते अध्यक्ष रणजित परमार, उपाध्यक्ष संजय खद्रे, सचिव सुरेश ओसवाल, रामचंद्र संकपाळ व सदस्य धर्मपाल जिरगे यांचे सदस्यत्व सहा वर्षासाठी निलंबीत करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत करण्यात आला.

गुणवंतांच्या सत्कारासाठी सभापतिपदाचे मानधन

0
0
शिष्यवृत्ती परीक्षेच्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम रहावी, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आणि त्यांच्या मार्गदर्शकांना कौतुकाबरोबरच स्फूर्ती मिळावी तसेच त्यांचा यथोचित सन्मान व्हावा. यासाठी तालुक्यातील अशा यशवंतांच्या गुणगौरव सोहळ्यासाठी आपले मानधन देण्याचा निर्णय जि. प. चे शिक्षण व अर्थ सभापती अभिजित तायशेटे यांनी घेतला आहे.

सामाजिक बांधिलकीची बीजं कोल्हापूरच्या मातीत

0
0
‘कोल्हापूरच्या मातीतच सामाजिक बांधिलकीची बीजं रुजली आहेत. माणुसकी उरली नसल्याचा अनुभव वाढत असतानाच एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याची कोल्हापूरच्या माणसाचा चेहरा कधीच बदलणार नाही’ असे मत प्राचार्य पवन खेबूडकर यांनी व्यक्त केले.

पंड‌ित नेहरूंचे विकासाचे मॉडेल आजही महत्त्वाचे

0
0
‘जागतिक इतिहासाचे सूक्ष्मज्ञान व भारतीय लोकमानसाचे नेमके भान असणारे सर्वमान्य नेतृत्त्व म्हणून पंडीत नेहरुंचा जगभर लौकिक होता. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याबरोबरच स्वतंत्र भारताची पहिली सतरा वर्षे पंतप्रधान म्हणून त्यांनी भारताच्या सर्वांगिण विकासाची पायाभरणी केली.

स्वच्छ, सुंदर जैन्याळला अवकळा

0
0
२००७ साली ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात दुसरा क्रमांक आलेल्या कागल तालुक्यातील जैन्याळच्या सौंदर्यासह आदर्शांनाच घरघर लागली आहे. वशिलेबाजीतून क्रमांक गेल्याची भावना,अंतर्गत घाणेरडे राजकारण, श्रेयवाद आणि गावात झालेल्या खर्चाबाबत अविश्वासाचा सूर यामुळे या स्वच्छ, सुंदर गावाला अवकळा प्राप्त झाली आहे.

‘मी नाराज नाही, व्यथित आहे’

0
0
‘मी केलेली विकासकामे आणि जातपात न मानता केलेली गोरगरीबांची सेवा याचे फलित म्हणून मला ४० हजारांचे मताधिक्य अपेक्षित होते. परंतु विधानसभा निवडणुकीत झालेला जातीयवादी विषारी प्रचार, कार्यकर्त्यांचे अंतर्गत वाद आणि याच घाईत आलेली कारखान्याची स्थगिती या सर्वांमुळे पडलेले कमी मताधिक्य या गोष्टींमुळे मी नाराज नाही तर व्यथित आहे,’ असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.

हेमरस कारखान्यावर २६ ला मोर्चा

0
0
मागील वर्षीच्या गळीत हंगामातील उसाच्या दुसऱ्या उचलीबाबत हेमरस कारखान्याकडे वारंवार मागणी करुनही त्याकडे व्यवस्थापनाचे दुर्लक्ष होत आहे. या विरोधात आवाज उठविण्यासाठी कारखान्यावर २६ नोव्हेंबर रो​जी दुपारी बारा मोर्चा काढण्याचा निर्णय कोवाड (ता. चंदगड) येथे झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images