Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

१४० कोटींच्या वसुलीचे आव्हान

0
0
आर्थिक उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असलेल्या स्थानिक संस्था कराचा (एलबीटी) भरणा करण्यास व्यापाऱ्यांचा विरोध, अन्य विभागाची धिम्म्या गतीने सुरू असलेली वसुली मोहीम यामुळे महापालिकेच्या गंगाजळीत गेल्या सात महिन्यात केवळ ११० कोटी ६९ लाख इतकी रक्कम कर स्वरूपात जमा झाली आहे.

निवडणूक सहा महिन्यांत

0
0
राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असली तरी सध्या फक्त २०० पेक्षा कमी सभासद असलेल्या ड गटातील संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. तर क गटातील संस्थांच्या निवडणुकीसाठी निवडणूक प्राधिकरणाकडे परवानगी मागण्यात आली आहे.

तीस फुटी उंच उसाचा डौल

0
0
कसबा बावडा येथील राजाराम साखर कारखान्याच्या दारात तीस फुटी उंचीच्या उसाची शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. अठरा महिन्यांच्या या उसाची अद्यापही उंची वाढत असून, आणखी सहा महिन्यांनी त्याची उंची चाळीस फुटांहून अधिक होईल असे कारखाना प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टोलप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी कृती समितीला वेळ द्यावा

0
0
‘कोल्हापूरचा टोल प्रश्न हा जनतेच्या जिव्हाळ्याचा आणि स्वाभिमानाचा प्रश्न बनला आहे. त्यामुळे या प्रश्नी समितीचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी वेळ द्यावा’ अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

स्मार्टर फार्म मशिन्सची ‘किर्लोस्कर’कडून निर्मिती

0
0
कृषी पंप सेट्स, जनसेट आणि डिझेल इंजिनच्या निर्मितीतील आघाडीची कंपनी असलेल्या किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेडने स्मार्टर फार्म मशिन्सची निर्मिती केली आहे. त्यासाठी पेटंटही मिळालेले आहे. बहुपयोगी पॉवर टिलर असलेल्या या स्मार्टर फार्म मशिन्सची निर्मिती कागल पंचतारांकित औद्यो‌‌गिक वसाहतीतील फॅक्टरीमध्ये करण्यात येणार आहे. दरवर्षी बारा हजार मशिन्सची निर्मिती करण्यात येणार आहे.

‘अवकाळी’मुळे शेतकऱ्यांत चिंता

0
0
संपूर्ण जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडविली. काढणीला आलेल्या पिकांना हा पाऊस नुकसानकारक असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली आहे. पाऊस न थांबल्यास शेतीचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकरी पाऊस थांबण्याची वाट पाहत आहेत. हा पाऊस भात, नाचणा, जोंधळा, भुईमूग या पिकांना नुकसानकारक ठरणार आहे. साखर कारखान्यांच्या गळीत हंगामावरही याचा मोठा परिणाम होणार आहे.

खुनातील संशयिताला तीन दिवस कोठडी

0
0
बारमध्ये बसण्याच्या कारणावरून गुरुवारी झालेल्या खुनातील संशयित अब्दुलअजीज मोहिद्दीन मलबारी (वय ६२, रा. सिरात मोहल्ला, सुभाषनगर) याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली. गुरुवारी रात्री साडेदहाच्या मलबारीने केलेल्या चाकूहल्ल्यात असिफ सलिम मोमीन (वय ३३, रा. रविवार पेठ) ठार झाला. याची नोंद लक्ष्मीपुरी पोलिसांत झाली.

‘सीपीआय’ चेहरामोहरा बदलणार

0
0
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने (सीपीआय) आपला चेहरा तरुण करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पक्षाने राष्ट्रीय पातळीवर घेतलेल्या निर्णयानुसार पक्षातील सहसचिव पदावरील व्यक्तीचे वय ४५ वर्षांपेक्षा कमी असावे असे निर्देश दिले आहेत.

शिवसेना विरोधात बसल्याने क्षीरसागर, नरकेंची हुकली संधी

0
0
शिवसेनेने राज्यात विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनेच्या रुपाने कोल्हापूर जिल्ह्याला आणखी एक मंत्रिपद मिळण्याचा मार्ग बंद झाला आहे. दोन्ही काँग्रेसच्या बालेकिल्याला खिंडार पाडत सेनेने जिल्ह्यात दणदणीत यश मिळवले होते.

अवास्तव अपेक्षांचे वाढले ओझे

0
0
प​रीक्षेचा ताण सहन न झाल्यामुळे अभियांत्रिकी व वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत. लागोपाठ झालेल्या अशा घटनांनी पालक चिंताक्रांत आहेत. पालकांच्या अवास्तव अपेक्षा, विद्यार्थ्यांचा कल आणि गुणवत्ता लक्षात न घेतल्याने अभ्यासक्रम पेलताना विद्यार्थ्यांची होणारी ओढाताण यामुळे अशा आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे.

संस्थेने काम थांबवल्याने बदनामी

0
0
जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघटना (बालकल्याण संकुल) संस्थेच्यावतीने सहा वर्षापर्यंतची मुले चांगल्या कुटुंबात दत्तक दिली जात आहेत. कायदेतज्ज्ञांचे मत घेऊनच दत्तक प्रक्रिया राबविली जाते, असे बालकल्याण सकुलाचे मानद कार्यवाह भिकशेठ पाटील यांनी दिली.

रुग्णांना सीपीआर आधार वाटावा

0
0
‘सीपीआर हॉस्पिटल हा जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना आधार वाटला पाहिजे, असा विश्वास सीपीआर प्रशासनाने द्यावा. रुग्णालयात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी लोकप्रतिनिधी सीपीआर प्रशासनाच्या पाठीशी ठाम उभे राहतील,’ असे आश्वासन खासदार धनंजय महाडिक यांनी दिले.

आधी सुविधा द्या, मगच कर मागा

0
0
कोल्हापूर महापालिका शहरवासीयांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरत आहे. जयंती नाला, दुधाळी नाल्यातून थेट पंचगंगेत मिसळणारे सांडपाणी, खराब रस्ते, कचऱ्याच्या प्रश्नी उपाययोजना करण्यात महापालिक प्रशासन कुचकामी ठरली असल्याचा आरोप शिवसेनेने महापालिकेने ‘शहरवासियांना अगोदर सुविधा द्याव्यात, मगच कर मागावा’ अशी भूमिका मांडली.

‘चलता है’ वृत्ती सोडून काम करा

0
0
‘प्रभावी आणि प्रामाणिक कारभाराची जनतेची अपेक्षा आहे. राज्य सरकार विकासात्मक योजना व उपक्रमांना प्रोत्साहन देईल. मी स्वत: जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र, राज्य स्तरावर यशस्वीपणे पाठपुरावा करणार आहे.

पोलिस ठाण्याचा परिसर भंगारात

0
0
गुन्ह्यात जप्त केलेली वाहने अनेक वर्ष गंजून भंगार झाल्याने पोलिस ठाण्याच्या आवाराला बकाल स्वरूप आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मुख्य करवीर तहसीलदार कार्यालय व करवीर पोलिस ठाणे एकाच ठिकाणी असल्याने परिसरातील असलेल्या भंगार वाहनांमुळे पोलिस ठाणीच भंगारात गेल्यासारखी अवस्था आहे.

घरभेद्यांना सुटी द्या

0
0
काँग्रेसच काँग्रेसला पराभूत करते ही परिस्थिती जिल्ह्यात नव्हे मुंबईत व दिल्लीत सांगण्याची गरज आहे. प्रामाणिक कार्यकर्त्यांना जर उभारी द्यायची असेल, तर पक्षाला घातक असलेल्या अशा घरभेदी लोकांना सुटी द्यायला लावली पाहिजे, असे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी व्यक्त केले.

महापालिकेवर धडक देण्याची तयारी

0
0
महिलांसाठी शहरातील विविध भागात स्वच्छ आणि सुरक्षित स्वच्छतागृहे उभारावीत या मागणीसाठी महिला संघटनांनी महापौर आणि महापालिका आयुक्तांची भेट घेऊन निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे. महिला स्वच्छतागृहांच्या उभारणीसाठी महापालिकेने तातडीने कार्यवाही करावी तसेच जागा आणि निधी तत्काळ मंजूर करावा, अशीही मागणी महिला संघटनांच्यावतीने करण्यात येणार आहे.

कोल्हापूरात पाऊस ‘काळ’

0
0
दोन दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर शुक्रवारी जिल्ह्यात दिवसभर पावसाळ्याप्रमाणे पाऊस कोसळत राहिला. कधी रिमझिम तर कधी जोरदार पावसाने जनजीवनावर परिणाम झालाच. तसेच हवेत गारवाही निर्माण झाला. पुढील तीन दिवस पावसाळीच वातावरण राहील, असा हवामानाचा अंदाज आहे. अवेळी, पावसाळ्याप्रमाणे कोसळणाऱ्या या पावसाने नागरिक मात्र वैतागून गेले.

६८९ बालकांना नवजीवन

0
0
आरोग्य तपासणीमध्ये आढळलेल्या बालकांवर गेल्या दहा वर्षांत कोल्हापूरातील ० ते १२ वयोगटातील ६८९ बालककांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्याची सुरू असलेल्या राजीव गांधी योजनेतून ही शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत.

बाजार समितीत खुर्चीचा ताकतुंबा

0
0
जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशानुसार कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचा पदभार स्वीकारण्यास गेलेल्या प्रशासक रजन लाखेंना शनिवारी सकाळी पदभार स्वीकारण्यास मज्जाव केला. यावेळी अशासकीय प्रशासक मंडळाच्या सदस्यांनी न्यायालयीन आदेशानुसार आपण काम करण्यास सक्षम आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images