Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

टोप खणीप्रकरणी उद्या सुनावणी

$
0
0
शहऱ्यातील कचऱ्याच्या प्रश्नाने गंभीर रूप धारण केलेले असताना टोप खणीप्रश्नी शुक्रवारी (ता.१४) राष्ट्रीय हरित लवादसमोर अंतिम सुनावणी होत आहे. चार वर्षांच्या लढाईनंतर हा प्रश्न आता हरित लवादासमोर आहे.

गरज आहे, पण सुविधा नाही

$
0
0
विविध कामांसाठी शहरांतर्गत प्रवास असो किंवा बाजारहाटाच्या निमित्ताने चार-पाच तासांपेक्षा जास्त काळ बाहेर फिरणे असो. तसेच फिल्डवर्कसाठीची पायपीट असो किंवा हातावरचे पोट सांभाळण्यासाठी फेरीवाला म्हणून काम करणे असो.

एक गाव पर्यटन विकासासाठी...

$
0
0
जिल्ह्याला विविध पर्यटनस्थळांचे वरदान लाभलेले आहे. पण अजूनही पर्यटनाच्या नकाशावर जिल्ह्याला नगण्य स्थान असलेली परिस्थिती बदलण्यासाठी प्रत्येक वर्षी तालुक्यातील एक ठिकाण पर्यटनवाढीच्यादृष्ट‌िने विकसीत करण्याचा निर्णय खासदार धनंजय महाडिक यांनी घेतला.

समर्थकांना चमत्काराची अपेक्षा

$
0
0
चार वर्षापुर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीतील तिकीट वाटपातच काँग्रेसच्या उमेदवारांवर गटाचा शिक्का बसला, हाच शिक्का निवडून आल्यानंतर काहीना फायदेशीर ठरला, तर काहींसाठी तोच कुऱ्हाडीचा दांडा ठरला आहे.

जर्मनना शाहू कार्याची प्रेरणा

$
0
0
‘राजर्षी शाहूंचे विचार वैश्विक आहेतच. दलितांच्या हक्कांसाठी लढणारा, शिक्षणाचे महत्त्व ओळखणारा द्रष्टा लोकराजा म्हणून शाहूंची ओळख करून देण्यात हा ग्रंथ यशस्वी ठरला आहेच. जर्मन भाषेत लोकराजा शाहू चरित्र आल्याने सर्वसामान्य जर्मन नागरिकांनाही मानवतावादी विचारांच्या राजाची खऱ्या अर्थाने ओळख होईल,’ असे गौरवोद्गार फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनीचे कौन्सुल जनरल मायकेल झीबर्ट यांनी काढले.

किरणांचा देवीच्या कमरेला स्पर्श

$
0
0
अंबाबाई मंदिरात होणारा किरणोत्सव तीन दिवसांऐवजी पाच दिवसांचा असू शकतो, या गृहितकाला प्रयोगशील निष्कर्षाची जोड देण्यासाठी बुधवारी अंबाबाई मंदिरात प्रायोगिक तत्त्वावर किरणोत्सवाची पाहणी करण्यात आली. यावेळी पाच वाजून ४४ मिनिटांनी सूर्यास्ताच्या किरणांनी देवीच्या कमरेला स्पर्श केला आणि किरणे खाली झुकली.

‘अर्थ’कारणामुळे पीयूसी परावलंबी

$
0
0
प्रदूषणाची तीव्रता अधिक असूनही केवळ ‘अर्थ’ कारणातून प्रदूषण मर्यादित असल्याचे कागदाच्या चिटोऱ्यावर हाताने लिहून दिलेले सर्टिफिकेटच प्रदूषण रोखण्यातील महत्त्वाचा अडथळा आहे.

साकारल्या ‘शाळकरी मुलांच्या कविता’

$
0
0
शालेय जीवनात मुलांना साहित्याची गोडी लागावी, लिखाणाची आवड निर्माण व्हावी म्हणून दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेमार्फत गेल्या पाच सहा वर्षापासून ‘लेखक आपल्या भेटीला’ कार्यक्रम राबविला जातो.

एक भी मच्छर है डेंजरस...

$
0
0
मिस इंडिया, मिस युनिव्हर्स कुछ भी जीत सकती थी, पर असली जीत तो मच्छर की हुई... हजारो लोक मौके गवाते है और अपनी जाने भी... इसलिए एक भी मच्छर है डेंजरस....अशा अनेक जाहिराती रोज दूरचित्रवाणीवर दिसतात. या आठवण्याचं कारण म्हणजे सध्या सुरू असलेला डेंगीचा प्रसार. या जाहिराती पाहून डासांपासून बचाव होणार नाही आणि रोगांपासूनही. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करून स्वच्छता राखली पाहिजे.

‘राज्य नाट्य’ची तयारी

$
0
0
कोल्हापूर म्हणजे कलेची पंढरी. या पंढरीत गायन, वादन, नृत्य आणि नाट्य अशा सर्वच कला रंगमंचावर एक नवा अंदाज घेऊन प्रेक्षकांसमोर येत असतात. रंगभूमी ही कलाकारासाठी एक मोठा आधार, बळ आणि प्रेरणादायी असतेच. याच रंगभूमीसाठी प्रत्येक कलाकार आपली कला सादर करीत असतो.

पहिली उचल तीन हजारच हवी

$
0
0
ऊस दराबाबत पहिली उचल किंवा अंतिम दर याबाबत निर्णय न होताच गळीत हंगाम सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. ऊस दर नियंत्रण मंडळाची निर्मिती आणि स्वामिनाथन समिती ऐवजी रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार ठरविले जाणारे दर मान्य नाहीत.

त्रुटीतील ग्रंथालयांना दिलासा

$
0
0
किरकोळ त्रुटीच्या फेऱ्यात सापडलेल्या राज्यातील ५७०१ सार्वजनिक ग्रंथालयांना फरक वाढीव अनुदान देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला दिल्याने या सार्वजनिक ग्रंथालयांचे मागील दोन वर्षांचे थकबाकी अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पॅराऑलिम्पिक जलतरणपटू स्वप्नील पाटीलची भरारी

$
0
0
गोपाळकृष्ण गोखले कॉलेजचा विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पॅराऑलिंपिक जलतरणपटू स्वप्नील संजय पाटीलने एशियन पॅरा गेम्स २०१४ मध्ये खुल्या गटात कास्यपदक पटकाविले. स्पर्धेसाठी त्याला कॉलेजने भरीव मोलाची मदत केली आहे. त्याच्या यशामुळेच कॉलेजचे नाव उंचावले आहे, अशी माहिती शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. जयकुमार देसाई, प्रशासनाधिकारी मंजिरी देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मधुमेहाचे वाढते प्रमाण

$
0
0
मधुमेहाच्या रूग्णांमध्ये कोल्हापुरातही झपाट्याने वाढ होत असून हे रोखणे अशक्य असले तरी ते मर्यादेत ठेवणे शक्य आहे. येथील हे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा वाढलेले आहे. कोल्हापुरातील १६ टक्के स्त्री व पुरूषांना मधुमेहाचा जास्त प्रमाणात धोका असल्याचा अहवाल इंडस हेल्थ प्लस अॅब्नॉरमॅलिटीन रिपोर्ट प्रसिध्द केला आहे. त्यानुसार कोल्हापुरात २० ते ३५ वयोगटामध्ये मधुमेहाचे सर्वात जास्त रूग्ण असल्याचे निदर्शनास आले आहे.

इचलकरंजीत धूम स्टाईलने अडीच तोळे दागिने लंपास

$
0
0
बुधवारी रात्रीच्या सुमारास शहरात दोन ठिकाणी धूम स्टाईलने अडीच तोळे सोन्याचे दागिने पळविण्याचा प्रकार घडला.

आजऱ्यातील टस्कर चंदगडमध्ये

$
0
0
गेले काही महिने आजऱ्यामध्ये स्थिरावलेला टस्कर हत्ती गवसेमार्गे चंदगड तालुक्यातील भोगोली येथे दाखल झाल्याने चंदगडवासियांच्या नुकसानीत वाढ होणार आहे. `आधीच थोडे त्यात आले घोडे` अशी म्हणण्याची वेळ तालुक्यातील शेतकऱ्यांवर आली आहे.

महामंडळात सुसंवादाची घडी बसवणार

$
0
0
विस्कटलेली आर्थिक घडी, बिघडलेला संवाद, कायदेशीर अडथळे, विरोधाची टोके अशा परिस्थितीत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी अभिनेते विजय पाटकर यांची निवड झाली. अध्यक्ष म्हणून पाटकर यांच्या हातात एक वर्षाचा कार्यकाळ आहे.

जात पडताळणीसाठी हवा कायमचा अधिकारी

$
0
0
विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीत तिन्ही अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान चार दिवस उपस्थित राहण्याची गरज आहे. मात्र, सध्या आठवड्यातून दोनच दिवस अधिकारी हजर राहत असल्याने कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील पाच हजारांहून अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत.

४८ महिला संघटना एकवटल्या

$
0
0
सार्व​जनिक सुविधा मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क असताना शहरात विविध कामाच्या निमित्ताने घराबाहेर फिरणाऱ्या महिलांना स्वच्छतागृहांची सु​विधा मिळत नाही. संपूर्ण शहरात केवळ दोन स्वच्छतागृहे महिलांसाठी आहेत. हे प्रमाण अतिशय नगण्य असून फायबरची स्वच्छतागृहे अतिशय गलिच्छ आणि असुरक्षित आहेत.

आअो बच्चो तुम्हे सिखाए...

$
0
0
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिवशी १४ नोव्हेंबर रोजी बालदिनानिमित्त शहरात विविध संस्था, संघटना यांनी कार्यक्रम आयोजित केले आहे. जिल्हा परिषदेने बाल स्वच्छता मोहीम आणि निबंध, वक्तृत्व, चित्रपट, व्याख्यान, आणि बालस्वच्छता सप्ताह आयोजित केला आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images