Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

अजूनही चालतो रेशनकार्डचा ‘पत्ता’

$
0
0
कोणत्याही गोष्टीसाठी रेशनकार्डचा रहिवाशी पुरावा म्हणून वापर करु नये, असा राज्य सरकारचा स्पष्ट आदेश आहे. असे असताना आरटीओ, विविध दाखले, नोकरी व शाळेच्या प्रवेशासाठी रेशनकार्डचा वापर रहिवाशी पुरावा म्हणून सर्रास केला जातो.

पर्ल्स एजंटाची आत्महत्या

$
0
0
गुंतवणूकदारांनी पैशासाठी तगादा लावल्याने मौजे आगर (ता.शिरोळ) येथील पर्ल्स एजंटाने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. चंद्रकांत आप्पासो पाटील (वय ३५) असे त्याचे नाव आहे.

औट घटकेची संस्थाने खालसा

$
0
0
निवडणुकीपूर्वी आपल्या कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी दोन्ही काँग्रेसने बाजार समित्यांवर नियुक्त केलेली प्रशासकीय मंडळे आणि मुदत संपलेली संचालक मंडळे बरखास्त करण्याची कारवाई पणन खात्याने मंगळवारी सुरू केली.

आम्हाला नको दिल्ली दर्शन...!

$
0
0
खासदार धनंजय महाडिक यांना लोकसभा निवडणुकीवेळी सर्वच नगरसेवकांनी मदत केली होती. त्यातून उत्तराई होण्यासाठी त्यांनी नगरसेवकांना दिल्ली दर्शन घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते.

‘टक्क्या’-टोणप्यात रस्ता रखडला

$
0
0
दाभोळकर कॉर्नरकडून नागाळा पार्क, ताराबाई पार्क आणि कसबा बावडा परिसराला जोडणाऱ्या आणि आणि सर्वाधिक वर्दळ असलेल्या रस्त्याचे काम उदघाटनानंतर दोनच दिवसांत रडतखडत सुरू आहे.

प्रसंगी डिसेंबरमध्ये पुन्हा आंदोलन करणार

$
0
0
देशभरातील राष्ट्रीयीकृत बँकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नवीन वेतन कराराच्या मुद्द्यावर बुधवारी लाक्षणिक संप केला. संपात कोल्हापुरातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांतील जवळपास पाच हजारावर कर्मचारी सहभागी झाले होते.

हस्तक्षेप झाल्यास रस्त्याचा ठेका रद्द

$
0
0
नगरोत्थान योजनेंतर्गत शहरात कोट्यवधींच्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. ते दर्जेदार आणि मुदतीत पूर्ण करून घेण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. मात्र रस्त्यांच्या कामात विनाकारण हस्तक्षेप होत असेल, अडथळे आणण्याचा प्रयत्न झाला तर त्या रस्त्याच्या कामाचा ठेकाच रद्दचा निर्णय घेण्यास प्रशासन कचरणार नाही असा इशारा आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी दिला आहे.

‘जीपीआय’ला मंजुरीसाठी दोन डिसेंबरला सुनावणी

$
0
0
कागल पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू होत असलेल्या घाटगे-पाटील इंडस्ट्रीजच्या (जीपीआय) फाउंड्रीसाठी पर्यावरण विभागाच्या मंजुरीसाठी जनसुनावणी २ डिसेंबरला होत आहे. जीपीआयच्या कागल पंचतारांकित वसाहतीमधील युनिट २, प्लॉट क्रमांक डी-२ येथे सकाळी ११.३० वाजता सुनावणी होणार आहे.

शनिवार पेठेत ‘रास्ता रोको’

$
0
0
अपुरा व अनियमित पाणी पुरवठ्याच्या निषेधार्थ शनिवारी पेठेतील महिला रस्त्यावर उतरल्या. शनिवार पेठेतील सिटी सर्व्हे ऑफीसच्या चौकात अर्धा तास रास्ता रोको करत पाणी प्रश्नाकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले.

चोरटे कॅमेऱ्याबाहेर

$
0
0
सुरक्षेसाठी दुकान अथवा ऑफिसमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात येते. त्याचा चांगला फायदाही होतो. परंतु, दुकानाच्या शटरवर किंवा बाहेर सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने चोरटे राजरोस सुटतात. दुकानाबाहेर सीसी कॅमेरा लावल्यास चोऱ्यांना आळा बसू शकतो. त्यासाठी सीसीटीव्हीधारकांनीही योगदान देण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.

डेंगीप्रश्नी जयसिंगपुरात आरोग्य प्रशासन धारेवर

$
0
0
जयसिंगपुरात डेंगीचा रूग्ण आढळल्याने शिवसेना, भाजप, आरपीआय आणि दलित सेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील कचरा व अस्वच्छतेकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. तसेच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली.

राष्ट्रवादीचा गडहिंग्लजमध्ये निषेध मोर्चा

$
0
0
माजी उपनगराध्यक्ष रामदास कुराडे यांच्या घरावर भ्याड हल्ला करणाऱ्यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्यावतीने येथील प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला.

मुकादमांचा वाहनधारकांना गंडा

$
0
0
जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी ऊस गळीत हंगामाचा प्रारंभ केला आहे. पण मजुरांअभावी पूर्ण क्षमतेने कारखाने सुरू झालेले नाहीत. ऊसतोड मजुरांना बीड, औरंगाबाद येथून आणण्यासाठी वाहनधारकांसह कारखान्याचे कर्मचारी गेले आहेत.

इंटक कामगार प्रतिनिधींचे उद्या राज्य अधिवेशन

$
0
0
मोफिसील टेक्स्टाईल वर्कर्स फेडरेशनचे राज्य पातळीवरील अधिवेशन शुक्रवारी (ता.१४) कामगार कल्याण केंद्रात माजी कामगार मंत्री हरिभाऊ नाईक यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती फेडरेशनचे उपाध्यक्ष शामराव कुलकर्णी यांनी दिली.

‘ड्रीम अ पेंटिंग’तर्फे रविवारपासून प्रदर्शन

$
0
0
पुण्यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून मिळत असलेल्या भरघोस प्रतिसादानंतर खास कोल्हापूरकरांसाठी पुण्यातील नावाजलेल्या ‘ड्रीम अ पेंटिंग’तर्फे १६ ते २१ नोव्हेंबरदरम्यान शाहू स्मारक भवन येथे चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे.

वसुलीची धडक मोहीम

$
0
0
महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर मर्यादा आल्याने प्रशासनाकडून उत्पन्नवाढीसाठी धडक मोहीम सुरू आहे. स्थानिक संस्था कर (एलबीटी) विभागापाठोपाठ परवाना आणि घरफाळा विभागाने वसुली मोहीम प्रभावी केली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात एलबीटी​ विभागाकडे एक कोटी ७५ लाख इतकी रक्कम कर स्वरूपात जमा झाली आहे, तर परवाना विभागाने विनापरवाना व्यावसायिकांविरोधात कारवाई करताना मंगळवारी नऊ दुकाने सील केली.

भीमा कृषी प्रदर्शनात तांदूळ महोत्सवाचे आयोजन

$
0
0
शेतकऱ्यांना आधुनिक नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळावी. तंत्रज्ञानाच्या वापरातून शेतीच्या उत्पादनात वाढ होऊन शेतकरी सक्षम व्हावा, या उद्देशाने दरवर्षी कोल्हापुरात भीमा कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. भीमा कृषी प्रदर्शनाची व्याप्ती दरवर्षी वाढत आहे. त्यामुळे जानेवारी २०१५ मध्ये होणाऱ्या भीमा कृषी प्रदर्शनामध्ये तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.

‘ड’ वर्गची निवडणूक महिनाअखेर

$
0
0
जिल्ह्यातील ‘ड’ वर्गातील ३७४ सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या संस्थांची निवडणूक नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर ‘क’ वर्गातील सहकारी संस्थांची माहिती मागविण्याचे काम सहकार विभागाकडून सुरू करण्यात येणार आहे.

कोल्हापुरातील उद्योग विस्तारासाठी प्रयत्न करू

$
0
0
‘जर्मन उद्योजकांनी कोल्हापुरात विस्तार करावा यासाठी प्रयत्न करू,’ असे आश्वासन जर्मनीचे कौन्सुल जनरल मायकेल झीबर्ट यांनी बुधवारी येथे दिले. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रिजच्यावतीने (सीआयआय) झीबर्ट आणि कोल्हापुरातील उद्योजक यांच्यात चर्चेचा कार्यक्रम आयोजित केला होता, त्यावेळी ते बोलत होते. झीबर्ट यांनी विमानसेवाचा अभाव हे कोल्हापुरातील औद्योगिक विकासात फार मोठी समस्या असल्याचे स्पष्ट सांगितले.

कुणबीसाठी ७०, तर विद्यार्थ्यांसाठी ३० हजारांचे दरपत्रक

$
0
0
विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयातील काही कर्मचारीच पंटर बनले आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रकरणासाठी तीस हजार आणि नोकरीचे जात वैधता प्रमाणपत्रासाठी ७० हजार रुपयांचा दर यंत्रणेने ठरविला आहे. दक्षता पथकाच्या कार्यालयात काही पंटरचा दबदबा आहे, तर कुणबीचा किंगमेकर म्हणून कार्यालयातील एक अधिकारी लोकप्रिय बनला आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images