Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

एलबीटीप्रश्नी आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

$
0
0
महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांची शिखर संस्था असलेल्या फेडरेशन ऑफ असोसिएशनच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत एलबीटी आणि जकात रद्द करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार करण्यात आला.

पोलिस व्हेरिफिकेशनची सुळावरची पोळी!

$
0
0
पारंपरिक पद्धतीने पोस्टमनसारखे या कार्यालयाची कागदपत्रे त्या कार्यालयात पोहच करण्याच्या कामामुळे वेळेचा अपव्यय होतो. आजतागायत पासपोर्टसाठी लागणाऱ्या पोलिस व्हेरीफिकेशनबाबतही असाच पोस्टमनस्टाइल प्रकार सुरू आहे.

डेक्कन ओडिसी उद्या येणार कोल्हापुरात

$
0
0
पर्यंटकांना पर्यटनासह सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि कलेचा वारसा यांची सफर घडविणारी डेक्कन ओडिसीचे गुरुवारी (ता. ६) आगमन होत आहे. देशी आणि परदेशी पर्यंटकांत ही ओडिसी लोकप्रिय ठरली आहे.

पार्किंगसाठी अरेरावी

$
0
0
श्री अंबाबाई मंदिर परिसरात असणाऱ्या पार्किंग सुविधेचा परगावच्या भाविकांना नाहक त्रास होत आहे. सबंधित ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून भाविकांना दमदाटी करुन जादा पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी आहेत.

धावत्या जीपवर बिबट्याचा हल्ला

$
0
0
कराड-रत्नागिरी मार्गावरील उंडाळे येथून येवतीकडे प्रवासी घेऊन निघालेल्या जीपवर बिबट्याने अचानक झेप घेऊन दरवाजाकडेला बसलेल्या प्रवाशांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखून जीप भरधाव वेगाने पुढे नेल्याने बिबट्या जीपमधून बाहेर फेकला गेला.

‘शाहू’ पहिली उचल २५३० रु देणार

$
0
0
‘ऊसदराबाबत सरकारकडून वेगवेगळे निर्णय घेण्याचे काम सुरू आहे. भविष्यात जे निर्णय होतील ते आम्ही राबवूच. याशिवाय एफआरपीप्रमाणे उसाला प्रतिटन २५३० रुपयांप्रमाणे पहिली उचल देऊ,’ अशी घोषणा येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विक्रमसिंह घाटगे यांनी केली.

केडीसीसीला गरज स्थैर्याची

$
0
0
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक स्थिती पूर्णतः सुधारलेली नाही. बँक पूर्वपदावर येण्यासाठी अजून किमान १० कोटी रुपयांची वसूली होणे अपेक्षित आहे. त्यामुळे ऑडीट वर्ग ‘अ’ मिळाला असला तरीही बँकेला पुढील टप्प्यात ५ हजार कोटींचा व्यवसाय करावा लागणार आहे.

पाइपलाइनचे ‘थेट’ राजकारण

$
0
0
करवीरवासियांच्या चाळीस वर्षाच्या लढ्यानंतर साकार होत असलेल्या थेट पाइपलाइन योजना राजकीय कुरघोडीच्या विळख्यात अडकण्याचा धोका आहे. खरेतर, राज्यात आणि केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सत्ता असल्याने योजनेसाठी निधी तत्काळ उपलब्ध करून देऊन योजना गतिमन करण्याची अपेक्षा आहे.

माणिकराव ठाकरेंना मुदतवाढ?

$
0
0
लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतर विधानसभेत ही काँग्रेसला राज्यात दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिलेल्या माणिकराव ठाकरे यांना आणखी पाच ते सहा महिने मुदतवाढ मिळण्याची चिन्हे आहेत.

जब्बार पटेल यांना भावे पुरस्कार प्रदान

$
0
0
‘रंगभूमीवरील प्रत्येकाकडे आधुनिक व विज्ञाननिष्ठ दृष्टी असणे आवश्यक आहे. विष्णुदास भावे यांच्याकडे त्या काळात ती होती,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी बुधवारी येथे केले.

दूध संस्था निवडणूक लांबणार

$
0
0
सहकारी सेवा सोसायट्यांच्या निवडणुकांबरोबरच दूध संस्था, मत्स्य उत्पादन संस्था, कुक्कुटपालन, शेळी मेंढी पालन आणि वराह पालन या ‘क’ वर्गातील संस्थांच्या निवडणुकाही होणार आहेत. त्यासाठी सहायक निबंधकांनी संस्थांची माहिती मागवली होती.

वेध ‘बिद्री’च्या निवडणुकीचे

$
0
0
विधानसभा निवडणुकीत आपल्याच शिष्याकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर माजी आमदार के. पी. पाटील यांनी गारगोटी येथे शुक्रवारी (ता. ७) आभार मेळाव्याचे आयोजन केले आहे, तर याच दिवशी आदमापूर (ता. भुदरगड) येथे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या समर्थकांकडून त्यांच्या सत्काराचे आयोजन केले आहे.

सुळये परिसरात हत्तींचा धुडगूस

$
0
0
गेले आठवडाभर हेरे, गुडवळे, पार्ले, मोटणवाडी, सावर्डे परिसरात रमलेल्या हत्तींनी मंगळवारी रात्री चंदगडपासून जवळच असलेल्या सुळये (ता. चंदगड) येथे आपला मोर्चा वळविला. सुळये गावापासून जवळच असलेल्या तांबाळ नावाच्या शेतातील भात, नाचणा, ऊस, भुईमूग पिकांचे मोठे नुकसान केले.

‘गोडसाखर’मुळे राष्ट्रवादी तरली

$
0
0
विधानसभा निवडणुका संपली... समाजातल्या सर्वच घटकांनी आपापल्या परीने विश्लेषण केले. या सर्व घटनाक्रमात एक मुद्दा अधोरेखित करणे गरजेचे आहे तो म्हणजे ‘गोडसाखर’. कागल व चंदगड या दोन्ही मतदारसंघांसाठी हा कारखाना कळीचा मुद्दा ठरला.

भ्रष्टाचाराची शपथ कागदावरच

$
0
0
भ्रष्टाचार रोखण्यासाठी विविध सरकारी कार्यालयात घेतलेल्या शपथ केवळ कागदावरच राहिल्या आहेत. जलदगतीने काम करुन देण्यासाठी काही कार्यालयांत भ्रष्टाचार फोफावला आहे. प्रत्येक टेबलानुसार दर ठरलेले आहेत.

‘पर्ल्स’च्या दारात ठेवीदारांच्या चकरा

$
0
0
भारतातील सर्वात मोठ्या आर्थिक फसवणुकीपैकी एक समजल्या जाणाऱ्या पर्ल्स अॅग्रोटेक कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (पीएसीएल) कोल्हापूर कार्यालयातून नोव्हेंबर २०१३ पासून गुंतवणुकदारांना त्यांचे पैसे देण्यात आलेले नाहीत.

जनता दरबारात ‘बांधकाम’ लक्ष्य

$
0
0
बांधकाम परवान्यासाठी नागरिकांना मारावे लागणारे हेलपाटे, अधिकाऱ्यांकडून केली जाणारी अडवणूक, मंजुरीसाठी करावी लागणारी यातायात आणि तक्रार करूनही दखल न घेणारी प्रशासकीय यंत्रणा यावरून महापालिकेच्या जनता दरबारात बांधकाम विभाग लक्ष्य ठरला.

अधिकाऱ्यांची झाडाझडती

$
0
0
फुलेवाडी येथील रस्त्याला भगदाड पडून दहा दिवस उलटले तरी एमएसआरडीसीकडून आयआरबी कंपनीवर गुन्हा का दाखल होत नाही? हे अधिकारी आयआरबी कंपनीसोबत खाबूगिरी करत आहेत.

‘जवखेडा’प्रकरणी मोर्चा

$
0
0
जवखेडा (अहमदनगर) येथे झालेल्या तिहेरी हत्याकांडातील आरोपींना तत्काळ अटक करुन त्यांना फाशी द्यावी अशी मागणी भटके विमुक्त जमाती विचारमंचच्या वतीने बुधवारी करण्यात आले. या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

ऑफिसच्या दारात भिकाऱ्यासारखी वागणूक

$
0
0
पुण्यात पासपोर्ट ऑफिसच्या दारात जेव्हा कागदपत्रांची छाननी करण्यासाठी बोलावले जाते तेव्हा तिथे अक्षरशः भिकाऱ्यासारखे फूटपाथवर बसावे लागते. चार जिल्ह्यातील लोक तिथे येत असल्याने तेथील सुविधांवर ताण येतो.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images